text
stringlengths
1
2.66k
आपण काम करतच आहात अनेक प्रकारची कामे करतच आहात पण मी आग्रह करतो की आपण सक्रियतेने या कामांवर भर द्याल तर मोठा परिणाम साध्य करण्यात आपले योगदान राहील
आज पुन्हा आपल्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे
निसर्गाचे संरक्षण मातृ शक्ती रक्षण बालकाच्या जीवनात बदल घडवण्याचे प्रयत्न या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांमध्ये एक ठेव म्हणून आहेतया कार्यक्रमासाठी सर्व देशातून लोक आले आहेत ते भारताचे हे महान चिंतन विचार बरोबर घेऊनच परततील ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचेल मानव कल्याणासाठी त्याचा उपयोग होईल
दादा लेखराजजींनी जे काम हाती घेतले होते त्याला आपल्या प्रयत्नांनी नवी ऊर्जा मिळेल 100 वर्षाच्या असूनही इतके कठोर परिश्रम दादींचे जीवन नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल नव्या ऊर्जेने लोकांना काम करण्याची ताकद मिळत राहील
स्वच्छ भारत अभियानाची दादीजी आमच्या सदिच्छादूत राहिल्या आहेत
दादीजींनी ब्रम्हकुमारी द्वारे स्वच्छता अभियानाला बळ दिले आहे
शुभ्र वस्त्रांकित आमचे हे ब्रम्हकुमार ब्रम्हकुमारी स्वच्छता आंदोलनाला मोठे बळ देऊ शकतात
2022 पर्यंत असे संकल्प घेऊन वाटचाल करा
2019 मध्ये महात्मा गांधींची 150 वी जयंती आहे स्वच्छता ही जनतेची सवय बनावी हे आंदोलन सवयीत कसे बदलेल यावर आमचा कटाक्ष आहे
मी आज आपल्याशी संवाद साधताना काही गोष्टीसाठी आग्रह धरतो मला विश्वास आहे की आपण हे साध्य कराल
आपल्याजवळ सामर्थ्य आहे संघटना आहे संकल्प आहे
पवित्र कार्याने आपण प्रेरित आहात
आपल्याकडून इसिप्त साध्य होण्याचा विश्वास आहे जगभरातून आलेल्या सर्व महानुभावांचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो
आपणा सर्वांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे
आपणा सर्वाना माझ्याकडून ओम शांती ओम शांती ओम शांती
पंतप्रधान कार्यालय देशाच्या सर्वात लांब महामार्ग बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण नवी दिल्ली 30 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 एप्रिलला भारतातल्या सर्वात लांब म्हणजेच 9 किमीच्या चेनानीनाशरी या बोगद्याचे राष्ट्रार्पण करणार आहे राष्ट्रीय महामार्ग 44 वर बांधलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर एकमेकांशी जोडले जाणार आहे
या बोगद्यामुळे दोन शहरांमधील अंतर दोन तासांनी कमी होणार आहे
या बोगद्यामुळे दररोज 27 लाख रुपये किमतीच्या इंधनाची बचत होईल असा अंदाज आहे
या बोगद्यात जागतिक दर्जाची सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून त्यातून जम्मूकाश्मिरमधील व्यापाराला आणि पर्यटनाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे
या बोगद्याची ठळक वैशिष्टये एकाच पोकळीत तयार करण्यात आलेला हा द्विमार्गी बोगदा असून त्याची उंची पाच मीटर इतकी आहे
या बोगद्याच्या दर 300 मीटर अंतरावर बाहेर निघण्यासाठी छोटे समांतर बोगदे बांधण्यात आले आहेत
या बोगद्याच्या एकात्मिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था टेहळणी व्यवस्था हवा खेळती राहण्यासाठीची सुविधा अग्निशमन व्यवस्था आणि आपत्तकालीन परिस्थितीमध्ये मदत मिळविण्यासाठीची यंत्रणा दर 150 मीटरवर उभारण्यात आली आहे
या प्रकल्पासाठी सुमारे 2500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च झाला
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांकडून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा आढावा नवी दिल्ली 30 मार्च 2017 केंद्र सरकारचा पथदर्शी सिंचन कार्यक्रम प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला
या बैठकीला विविध संबंधित मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी प्रधानमंत्री कार्यालय आणि निती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते
एकूण 99 सिंचन प्रकल्पांपैकी 21 प्रकल्प जून 2017 पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली या प्रकल्पांची एकत्रित सिंचन क्षमता 522 लाख हेक्टर इतकी आहे
त्याशिवाय महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि ओदिशा या राज्यांमधल्या 45 प्रकल्पांचे काम वेगाने सुरु असून ते नियोजित कालावधीपूर्वीच पूर्ण होतील असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला
भविष्यात हाती घेतल्या जाणाऱ्या सिंचन प्रकल्पांमध्ये ठिबक आणि सूक्ष्म सिंचन प्रकल्पांकडे विशेष लक्ष दयावे अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली
विविध सरकारी कार्यालये कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठांनी एकत्र येऊन समन्वयातून काम करावे आणि प्रभावी पिक पध्दती आणि जलवापर यंत्रणा तयार कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले
पंतप्रधान कार्यालय नमामि ब्रम्हपुत्रा उत्सवाला पंतप्रधानांच्या शुभेच्छा नवी दिल्ली 31 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमामि ब्रम्हपुत्रा या उत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत
आसाम सरकारने सुरु केलेला हा उत्सव अतिशय अभिमानास्पद आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
ब्रम्हपुत्रा नदी आसामची आणि ईशान्य भारताची जीवनवाहिनी आहे तसेच या प्रदेशातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे
भारतीय संस्कृती आणि इतिहासात नद्यांचे मध्यवर्ती स्थान आहे
भारताच्या प्रगतीसाठी नद्या स्वच्छ करण्याचा आपण संकल्प करु या असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
अर्थ मंत्रालय दक्षिण आशियात परस्पर व्यापारासाठी एसएएसईसीच्या विविध सुविधा नवी दिल्ली 31 मार्च 2017 दक्षिण आशियाई देशांमधला व्यापार सुलभ व्हावा यादृष्टीने एसएएसईसी म्हणजेच दक्षिण आशिया उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य परिषदेने काही सुविधा दिल्या आहेत
त्यानुसार व्यवहाराचे शुल्क कमी करणे व्यापार परवाने जलदगतीने देणे आणि व्यापारातील अनिश्चितता कमी करणे अशा सुविधा देऊन आर्थिक स्पर्धात्मक वातारवरण तयार करण्याचा परिषदेचा उद्देश आहे
दक्षिण आशियाई क्षेत्रात भारतासह इतर देशांनी केलेली प्रगती लक्षात घेता आशियाई विकास बँकेने 92 अब्ज डॉलर्स किमतीच्या विविध 46 प्रकल्पांना पाठिंबा दिला आहे यात दळणवळण व्यापार सुविधा ऊर्जा माहितीदूरसंचार तंत्रज्ञान आणि वित्तीय पट्टा विकास अशा प्रकल्पांचा समावेश आहे
अर्थ मंत्रालय अल्पबचत खाते योजनांवरील व्याजदरात बदल नवी दिल्ली 31 मार्च 2017 वित्तीय वर्ष 201718 च्या पहिल्या तिमाहीसाठी केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांसाठीच्या व्याजदरात बदल केले आहेत
यामुळे जवळपास सगळे व्याजदर बाजारातील स्पर्धात्मक व्याजदरांच्या समान आले आहेत
सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या अजेंडयानुसार व्याजदर पध्दतीत अधिक व्यापकता आणण्याच्या दृष्टीने व्याजदरात हे बदल करण्यात आले आहेत
व्याजदरात घट असली तरी ते बँक ठेवींपेक्षा बचतीसाठी अधिक आकर्षक आहेत
पंतप्रधान कार्यालय युरोपियन गुंतवणूक बँकेच्या अध्यक्षांनी घेतली पंतप्रधानांची भेट नवी दिल्ली 31 मार्च 2017 युरोपियन गुंतवणूक बँकेचे अध्यक्ष डॉ
वॉर्नर होयर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
बँकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते
पंतप्रधान मोदी यांनी एक वर्षांपूर्वी भारतयुरोपियन युनियन शिखर परिषदेच्या वेळी युरोपियन गुंतवणूक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती
आज या कार्यालयाचे उद्‌घाटन झाले
यावेळी झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी वातावरण बदल आणि शाश्वत पर्यावरणाबद्दलच्या भारताच्या धोरणांबद्दल माहिती दिली
युरोपियन गुंतवणूक बँकेने लखनौ मेट्रोसह इतर शाश्वत पर्यावरण प्रकल्पांसाठी भारताला एक दशलक्ष युरोचे कर्ज दिले आहे
वातावरण बदलाबाबत भारताच्या मजबूत आणि स्वयंप्रेरीत उपायांची प्रशंसा केली आणि या दिशेने भारत करत असलेल्या प्रयत्नांना बँकेचा सातत्याने पाठिंबा मिळत राहील असे स्पष्ट केले
हे विधेयक संसदेत सादर केले जाणार आहे
मंत्रिमंडळ मलेशियाबरोबर सुधारित हवाई सेवा कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मलेशियाबरोबर सुधारित हवाई सेवा कराराला मंजुरी देण्यात आली आहे या हवाई सेवा करारामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया 2011 मध्ये सुरू झाली होती
त्यामुळे हा करार अद्ययावत सुधारित व आधुनिक करण्याची गरज आहे नव्या आयसीएओ अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्या अस्तित्त्वात असलेला हवाई सेवा करार बदलण्यात आला आहे तिसऱ्‍या देशाच्या विमान कंपन्यांसाठी सहकारी पणन व्यवस्था समाविष्ट करण्यात आली आहे
सुधारित हवाई सेवा करारात सुरक्षितता आणि सुरक्षा या विषयीची कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत सुधारित हवाई सेवा करारात आंतरमध्य सेवा संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे ज्यांमुळे इतर पक्षाच्या प्रदेशातील कोणत्याही स्थानापासून आंतरमध्य वाहतुकीच्या पर्यायाद्वारे प्रवासी व माल हाताळणी करता येऊ शकेल
मंत्रिमंडळ संसदेत सादर होणार असलेल्या मोटर वाहन(सुधारणा) विधेयक 2016 मधील बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठी सुधारणा नवी दिल्ली 31 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोटार वाहन(सुधारणा) विधेयक 2016 मधील बदलांना मंजुरी देण्यात आली आहे
हे विधेयक संसदेत सादर करण्यात येणार आहे
मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळाची नियामक मंच आणि राष्ट्रीय नियामक उपयोगिता आयुक्त संघटनेमधील सामंजस्य कराराला मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 अपारंपरिक उर्जेच्या जाळ्याचे मोठ्या प्रमाणावर एकात्मिकरण करण्याच्या क्षेत्रात नियामक मंच आणि राष्ट्रीय नियामक उपयोगिता आयुक्त संघटनेमध्ये सामंजस्य करार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे
या सामंजस्य करारामुळे अपारंपरिक उर्जेच्या व्यापक एकात्मिकरणाशी संबंधित सहकार्याची खालील क्षेत्रे उपलब्ध होणार आहेत
अपारंपरिक उर्जा प्राप्त करण्याच्या चौकटीचा आराखडा आंतरराष्ट्रीय अनुभव राज्य आणि केंद्रीय अपारंपरिक उर्जा खरेदी बंधने अपारंपरिक उर्जा प्रमाणपत्र चौकट यांसारख्या नियामक बाबींचे पाठबळ भार अंदाज तंत्रज्ञान व प्रक्रिया अशी विविध क्षेत्रे या करारामुळे उपलब्ध झाली आहेत
मंत्रिमंडळ रांची येथील हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशनच्या जमिनीचे झारखंड सरकारकडे हस्तांतरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 रांची येथील हेवी इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेडकडून( एचईसी) सध्या वापर होत नसलेल्या 67543 एकर जमिनीचे झारखंड सरकारकडे हस्तांतरण करण्याला तसेच या जमिनीची विक्री करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
यामुळे एचईसीला 74298 कोटी रुपये उभारण्यास मदत मिळणार आहे आणि कर्मचाऱ्‍यांची ग्रॅच्युईटी भविष्य निर्वाह निधी रजा भरपाई निधी आणि निवृत्तीपश्चात इतर फायदे आदी देण्यासाठी निधी उपलब्ध होईल
तसेच सरकारकडे बँकांकडे असलेली थकबाकी आणि इतर देणी चुकवण्यासाठी एचईसीला मदत मिळेल
मंत्रिमंडळ एचएमटी घड्याळ कंपनीच्या जमिनीच्या हस्तांतरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 केंद्रीय अवजड उद्योग विभागाने दिलेल्या खालील प्रस्तावांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे
बंगळूरु आणि टुमकूर येथील एचएमटी वॉचेस लि
यां कंपनीच्या 20835 एकर जमिनीचे भारतीय अंतराळ संशोधन संघटनेला(इस्रो) 119421 कोटी रुपये आणि देय असलेले कर व शुल्क यांच्या मोबदल्यात हस्तांतरण एचएमटी लि
च्या बंगळूरु येथील एक एकर जमिनीचे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया(गेल) या कंपनीला 3430 कोटी रुपये व इतर देय कर आणि शुल्काच्या मोबदल्यात हस्तांतरण या जमिनीच्या विक्रीतून येणारी रक्कम कंपनीकडून या व्यवहारावर लागू होणारे कर आणि इतर शुल्क चुकते केल्यावर त्यांची कर्जे व आगाऊ रक्कम चुकती करण्यासाठी सरकारच्या खात्यात जमा केली जाईल
मंत्रिमंडळ हैदराबादमधील सिरडॅप एस्टॅब्लिशमेंट केंद्रासाठीच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 ग्रामीण विकास मंत्रालय आणि आशिया व प्रशांत क्षेत्रासाठी एकात्मिक ग्रामीण विकास केंद्र(सिरडॅप) यांच्यात हैदराबाद येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थेमध्ये सिरडॅप केंद्र उभारण्यासाठी करार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी विशेषतः दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासाठी सीएमसी सदस्य देशांशी समन्वय साधणे अशा प्रकारच्या केंद्रामुळे शक्य होणार आहे सिरडॅप ही आंतरसरकारी आणि स्वायत्त संस्था असून 1979 मध्ये आशियाप्रशांत क्षेत्रातील देशांच्या व संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या(एफएओ) पुढाकाराने तिची स्थापना झाली
भारत हा या संघटनेच्या प्रमुख संस्थापक देशांपैकी एक असून या संघटनेचे मुख्यालय बांगलादेशमधील ढाका येथे आहे
संशोधन प्रशिक्षण माहितीची देवाणघेवाण यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे
मंत्रिमंडळ भारत आणि सर्बिया यांच्यात नवा हवाई सेवा करार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 भारत आणि सर्बिया यांच्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या हवाई सेवा करारामध्ये बदल करून नवा करार करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली हा करार 31 जानेवारी 2003 रोजी करण्यात आला होता
सध्याच्या काळात नागरी हवाई क्षेत्रातल्या घडामोडींना विचारात घेऊन आयसीएओ अर्थात आंतरराष्ट्रीय नागरी हवाई संघटनेने निर्धारित केलेल्या आधुनिक मार्गदर्शक तत्वांना अनुसरून या सुधारणा करण्यात आल्या आहेत
या नव्या सुधारित आणि उदारमतवादी करारामुळे भारत आणि सर्बिया यांच्यातील व्यापार गुंतवणूक पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढीला लागण्याची अपेक्षा आहे
दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना सुरक्षितता आणि सुरक्षा यांची हमी मिळण्याबरोबरच अधिक जास्त व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांतर्फे ओडिशाच्या जनतेला उत्कला दिवसाच्या शुभेच्छा नवी दिल्ली 1 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाच्या जनतेला उत्कल दिनाच्या शुभेच्छा दिल्या
उत्कला दिनानिमित्त ओडिशाच्या जनतेला शुभेच्छा असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे
पंतप्रधान कार्यालय अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन नवी दिल्ली 2 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित समारोप समारंभाला संबोधित केले
उच्च न्यायालय हे न्यायपालिकांसाठी तीर्थस्थानासारखे आहे
न्याय व्यवस्थेशी संबंधित अनेक वकीलांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली असून वसाहतवादी साम्राज्यापासून भारतीयांचे वेळोवेळी संरक्षणही केले
२०२२ मध्ये आपण भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करणार आहोत त्यावेळी लोकांना आपला देश कसा हवा आहे याचा आराखडा प्रत्येक नागरिकाने तयार करायला हवा असे आवाहन पंतप्रधानांनी केले
केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात सुमारे १२०० कालबाहय कायदे रद्द केले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले
शतकात तंत्रज्ञानाचे विशेष महत्व असून न्यायव्यवस्थेत याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायला हवा
त्यांनी स्टार्ट अप क्षेत्रात कार्य करणाऱ् नव उद्योजकांनी न्यायव्यवस्थेला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे तंत्रज्ञान विकसित करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले
पंतप्रधान कार्यालय जम्मूकाश्मिरमधील चेनानीनाशरी बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण उधमपूर येथील सार्वजनिक सभेत भाषण नवी दिल्ली 2 एप्रिल 2017 देशातला सर्वात लांब म्हणजेच ९2 किमीचा जम्मूकाश्मीरमधील चेनानीनाशरी बोगदा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला अर्पण केला
स्वत या बोगद्याची संपूर्ण पाहणी करून काही सूचना केल्यात
उधमपूर येथे सार्वजनिक सभेला संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की जागतिक दर्जाचा हा बोगदा असून तो बांधताना पर्यावरणाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे
जगातल्या पर्यावरणवाद्यांसाठी हा बोगदा म्हणजे नैसर्गिक रक्षण करुन विकासकाम करण्याचे उत्तम उदाहण आहे असे पंतप्रधान म्हणाले
भरकटलेले काही युवक काश्मिरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी दगड हातात घेतात मात्र जम्मूकाश्मिरच्या युवकांनी दगडातून हा बोगदा आपल्या श्रमाने साकार करत आम्हाला विकासाचा मार्ग हवा आहे असा संदेश दिला आहे
या बोगद्यामुळे काश्मिरच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार असून यामुळे आर्थिक विकासाला मदत होईल
केंद्राकडून मिळालेला विकास निधी उत्तम कामावर खर्च केल्याबद्दल त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे आभार मानलेत
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचार कार्याला उजाळा देतांना मोदी यांनी काश्मिरीयत इन्सानियत जमूरीयत हा मंत्र त्यांनी दिला होता
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती देशांतर्गत युरीया उत्पादनाला चालना देण्यासाठी नवे युरिया धोरण2015 मधील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 31 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने नवे युरिया धोरण 2015 मधील पुनर्मुल्यांकन क्षमतेपेक्षा(आरएसी) जास्त उत्पादनाशी संबंधित परिच्छेद 5 मधील सुधारणांना आणि या धोरणात परिच्छेद 8 चा समावेश करायला मंजुरी दिली आहे
युरिया कारखान्यांमध्ये आरएसी पेक्षा जास्त होणाऱ्‍या उत्पादनाचे संरक्षण करण्यासाठी देशात होणाऱ्‍या युरिया उत्पादनाला चालना देण्यासाठी या सुधारणेचा उपयोग होण्याची अपेक्षा आहे
यापूर्वी 25 मे 2015 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या युरिया धोरणामध्ये आरएसी पेक्षा जास्त उत्पादनावर मर्यादा घालण्यात आली होती नव्या सुधारणेमुळे ही मर्यादा शिथिल केली असून युरिया कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन करण्याची परवानगी देण्यात आली आहे
तसेच युरियाच्या आयातमूल्यात चढउतार झाल्यास त्याचा युरिया कारखान्यांवर विपरित परिणाम होऊ नये यासाठी खत विभागाला खर्च विभागाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत
या सुधारणेचा फायदा प्रामुख्याने शेतकरी युरिया उत्पादक आणि सरकारला होणार आहे
पंतप्रधान कार्यालय 'स्मार्ट इंडिया हॅकॆथॉन २०१७' मध्ये सहभागी झालेल्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण नवी दिल्ली 1 एप्रिल 2017 माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही सकाळपासून बसलेले आहात थकून गेले असाल
अजून आणखी ३६ तास काढायचे आहेत तर आणखी थकून जाल का
मात्र तुम्ही लोकांनी विचार केला असेल कि १० वाजता कुणी पंतप्रधान येतात का आणि नंतर तुम्हाला आठवले असेल आज तर १ एप्रिल आहे त्यामुळे बहुधा मोदीजी आपल्याला एप्रिल फुल करत असतील
मित्रांनो आज तुम्हा सर्वांबरोबर सहभागी होताना मला खरेच अतिशय आनंद होत आहे
स्मार्ट इंडिया हॅकॆथॉन हा भारतातील सर्वात मोठा प्रयोग आहे