text
stringlengths
1
2.66k
गरीबातला गरीबही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे हळूहळू रोकडरहित व्यवहारांकडे वळत आहेत
सव्वाशे कोटी देशवासियांसाठी हे काम जर त्यांनी मनावर घेतले तर एक वर्ष वाट पहायची गरज नाही सहा महिन्यात हे काम होऊ शकेल
आपल्याला कल्पना नसेल पण या माध्यमातून आपण देशाची फार मोठी सेवा करू शकता काळा पैसा भ्रष्टाचार याविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आपण शूर सैनिक बनू शकता
प्रत्येकाने हे काम पुढे नेण्याचा संकल्पही केला आहे
१४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि फार आधी ठरल्याप्रमाणे १४ एप्रिल रोजी ह्या डिजि मेळाव्याची सांगता होईल
मला देहरादूनमधून एका गायत्री नावाच्या मुलीने जी अकरावीची विद्यार्थिनी आहे फोन करुन एक संदेश पाठवला त्यात ती म्हणते आदरणीय पंतप्रधान माझा नमस्कार सर्व प्रथम मी तुमचे अभिनंदन करते की आपण या निवडणुकांमध्ये मोठ्या मतांनी विजय प्राप्त केला
या नदीसाठी आम्ही विविध वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती रॅली काढली लोकांशी चर्चाही केली परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही
एकदा राग निर्माण झाला त्याबद्दल रोष निर्माण झाला की आपण अस्वच्छतेविरुद्ध काहीनाकाही करू
आणि हे चांगले आहे की गायत्री स्वत तिचा राग व्यक्त करते आहे मला सूचना पाठवते आहे पण त्याचवेळी तिने स्वत खूप प्रयत्न केले हे ही ती सांगते आहे पण यश मिळाले नाही
माझ्या प्रिय देशवासियांनो जेव्हापासून मी हा मन की बात कार्यक्रम करतो आहे मला सुरुवातीपासूनच एका विषयावर खूप लोकांनी सूचना पाठवल्या अनेक जणांनी चिंता व्यक्त केली तो विषय म्हणजे अन्नाची नासाडी
आपल्याला हे माहीत आहे की घरी किंवा सामूहिक भोजन समारंभात आपण गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतो
पण ते सगळेच पदार्थ आपण खात नाही जितके प्लेटमध्ये वाढून घेतो त्याच्या अर्ध अन्न सुद्धा आपण पोटात घालत नाही
आपल्या घरी जेव्हा आई मुलाला अन्न वाढते तेव्हा ती म्हणते की मुला जेवढे हवे आहे तेवढेच घे काहीनाकाही प्रयत्न होतच असतात पण याबद्दल असणारी उदासिनता एक समाजद्रोह आहे
समाजासाठी विचार केला तर नक्कीच एक चांगली बाब आहे पण हा विषय असा आहे की ज्यात कुटुंबाचाही फायदा आहे
बघा बदल होण्यासाठी मार्ग असतातच
आता आरोग्याचा विषय निघालाच आहे तर 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन आहे
यावेळी संयुक्त राष्ट्रांनी 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रीत केले उदासीनता हीच यावेळची संकल्पना आहे
एका अंदाजानुसार जगभरात 35 कोटीपेक्षा अधिक लोक या आजाराने मानसिक विकाराने पिडीत आहेत
जो स्वत या आजाराने त्रस्त आहे तो सुद्धा काही बोलत नाही कारण त्याला काहीसा संकोच वाटत असतो
आपल्या देशाचे हे भाग्य म्हणावे लागेल की आपण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो मोठे कुटुंब असते सारे मिळून मिसळून राहतात त्यामुळे उदासीनता येण्याची शक्यता नष्ट होते
पण तरीही मी आईवडिलांना सांगू इच्छितो की घरात तुमचा मुलगा मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणी सदस्य पूर्वी सगळ्यांबरोबर जेवायला बसत असे पण आता तो म्हणतो नको मी नंतर जेवेन
घरातले सगळे लोक जेव्हा बाहेर जायला निघतात तेव्हा तो म्हणतो की मी नाही येणार आज त्याला एकटे रहायला आवडते
तुम्ही बघाल तुमच्या मनातले दुःख आपोआप नष्ट होईल
तिसरे वर्ष आहे
माता आणि भगिनींशी आज मी मुद्दाम बोलू इच्छितो कारण आज आरोग्याची चर्चा खूप झाली त्याबद्दलच जास्त बोलले गेले
पण महिलांवर काही विशेष जबाबदाऱ्‍या सुद्धा असतात
या आंतरराष्ट्रीय परिषदेत आणि सांस्कृतिक सोहळयात भारत आणि परदेशातून आलेल्या प्रतिनिधीचे त्यांनी स्वागत केले प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यापीठाची स्थापना करणारे दादा लेखराज यांच्याविषयी त्यांनी आदरभाव व्यक्त केला
तसेच वयाच्या 100व्या वर्षापर्यंत समाजाची सेवा करणाऱ्या दादी जानकीजी या सच्च्या कर्मयोगी असल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी काढले
विविध क्षेत्रात ब्रम्हकुमारी संस्थांनी केलेले काम स्पृहणीय असून सौर ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे
स्वच्छ भारत एलईडी लाईट्‌स अशा उपक्रमांच्या फायद्यांचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला
ऊर्जा मंत्रालय पर्यावरणावरील जागतिक परिषद 2017 मध्ये हवामान बदलाविषयीची भारताच्या कटिबध्दतेचा पियुष गोयल यांच्याकडून पुनरुच्चार नवी दिल्ली 27 मार्च 2017 हवामान बदलासारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा करुन नव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी पर्यावरणविषयक जागतिक परिषदेचे महत्व असून ही परिषद त्यासाठी योग्य व्यासपीठ आहे असे मत केंद्रीय ऊर्जा कोळसा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली
हवामान बदल ही समस्या मानवी चुकांमुळेच तयार झाली असून आपणच त्यापासून मार्ग काढू शकतो हे समजून पुढची वाटचाल करणे काळाची गरज आहे असे गोयल म्हणाले
एलईडी दिव्यांच्या वापराला प्रोत्साहन देऊन सरकार कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 80 दशलक्ष टनने कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे
तसेच सौर ऊर्जा कार्यक्रमांतर्गंतही 2022 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचे सरकारचे लक्ष्य असून त्यादृष्टीने काम सुरु आहे असे त्यांनी सांगितले
राष्ट्रपती कार्यालय चैत्र शुक्लादी गुढीपाडवा उगादी चेती चांद नवरेह आणि साजीबू चैराओबानिमित्त राष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली 27 मार्च 2017 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशवासियांना चैत्रशुक्लादीउगादी गुढीपाडवा नवरेह आणि साजीबू चैराओबा आणि चेति चांदच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या शुभासंदेशात राष्ट्रपतीनी म्हटले आहे की आज चैत्र शुक्लादी उगादी गुढीपाडवा नवरेह आणि साजीबू चैराओबा आणि चेति चांदच्या शुभ उत्सवाच्या निमित्ताने मी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आहे
हे उत्सव देशात वसंतऋतूचे स्वागत करतात आणि प्रगती समृद्धी आणि सुखाच्या आयुष्याची नवी सुरुवात करतात
या सणामधून मिळणारे चैतन्य आणि उर्जा सर्व भारतीयांच्या हृदयात पसरो लोकांच्या मनात सहिष्णूता आणि परस्पर सौहार्द वाढो
या उत्सवातून समाजात शांतता मैत्रभावना निर्माण होऊन जनतेला आपल्या मातृभूमीची सेवा करण्याची प्रेरणा मिळो
उपराष्ट्रपती कार्यालय गुढीपाडवा उगादी चैत्र शुक्लादी आणि चेती चांद निमित्त उपराष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा नवी दिल्ली 27 मार्च 2017 उपराष्ट्रपती एम हमीद अन्सारी यांनी देशवासियांना उगादी गुढीपाडवाचैत्र शुक्लादी आणि चेति चांदच्या शुभेच्छा दिल्या आहेतया उत्सवातून देशातील पारंपारिक नववर्षाची सुरुवात होते या उत्सवातून देशाच्या एकात्मिक संस्कृतीचे आणि समृद्ध परंपरेचे आपल्याला दर्शन होते असे उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हंटले आहे
उपराष्ट्रपतींचा शुभसंदेश मी देशबांधवाना उगादी गुढी पाडवाचैत्र शुक्लादी आणि चेति चांदच्या आनंदी पर्वाच्या शुभेच्छा देतो
या उत्सवातून देशातील पारंपारिक नववर्षाची सुरुवात होते या उत्सवातून देशाच्या एकात्मिक संस्कृतीचे आणि समृद्ध परंपरेचे आपल्याला दर्शन होतेहे नवे वर्ष आपल्या आयुष्यात शांतता सौहार्द समृद्धी आणि आनंद घेऊन येणारे ठरो
पंतप्रधान कार्यालय नववर्षानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा नवी दिल्ली 29 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हिंदू कालगणनेनुसार आज देशातल्या अनेक भागात नवे वर्ष साजरे केले जात आहे
हे नवे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांतता आनंद आणि समृध्दी घेऊन येणारे ठरो असे पंतप्रधानांनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे
भारतातील लोक आज नव्या वर्षाची सुरुवात करत आहेत
नव्या वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा
हे वर्ष आपणासाठी शांतता सुख आणि समृध्दीचे ठरो
आगामी वर्षात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत सर्व सिंधी बांधवाना चेति चांद च्या शुभेच्छा
झुलेलालचा कृपाप्रसाद आपल्याला सदैव मिळत राहो महाराष्ट्रातील सर्व जनतेला गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा
नवे वर्ष आपल्यासाठी आनंद आरोग्य आणि समृद्धी घेऊन येणारे ठरो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे
ऊर्जा मंत्रालय एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लिमिटेडने एलईडी बल्बच्या खरेदीसंदर्भातले आरोप फेटाळले नवी दिल्ली 28 मार्च 2017 ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कंपनी एनर्जी एफिशिएंसी सर्विसेज लिमिटेडने एलईडी बल्बच्या खरेदीसंदर्भातल्या आरोपांचे खंडन केले आहे काही वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या
हे आरोप चुकीचे आणि भ्रामक असल्याचे कंपनीने म्हटले आहे कंपनीने केलेल्या खुलाशात म्हटले आहे की एलईडी बल्बची खरेदी अतिशय पारदर्शक आणि व्यावसायिक पध्दतीने केली जाते
उजाला योजनेंतर्गत आतापर्यत २२ कोटी रुपयांची विक्री झाली आहे ज्यातून ग्राहकांच्या वीजबिलात ११५०० कोटी रुपयांची बचत झाली आहे
ही खरेदी प्रक्रिया ईखरेदी पध्दतीने होते असे ईईएसएल कंपनीने सांगितले
त्यासाठी निविदा काढल्या जातात खरेदी प्रक्रियेला बोर्डाकडून मंजुरी दिली जाते त्यासाठीचे नियम अतिशय कठोर आहेत
तसेच केवळ भारतातल्या कंपन्याना बल्बच्या खरेदीसाठी परवानगी दिली जाते
ऊर्जा मंत्रालय भारत पहिल्यांदाच वीजेचा निर्यातदार नवी दिल्ली 29 मार्च 2017 वीजेच्या सीमेपार व्यापारात भारत पहिल्यांदाच वीजेचा निर्यातदार ठरला आहे केंद्रीय वीज प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे
वर्ष 201617 मध्ये फेब्रुवारी महिन्यांपर्यंत भारताने सुमारे 5798 दशलक्ष युनिट वीज नेपाळ बांग्लादेश म्यानमार आणि भूतानला निर्यात केली आहे
गेल्या तीन वर्षात नेपाळ बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या वीजेत लक्षणीय वाढ झाली आहे
80च्या दशकापासून भारताने वीजेबाबत सीमापार व्यापार सुरु केला मात्र तेव्हापासून भारत आणि भूतानकडून वीज आयात करत होता तर नेपाळला अतिशय कमी प्रमाणात वीज निर्यात करत होता
बांग्लादेशालाही सध्या भारतातून 600 मेगावॅट वीज निर्यात केली जाते
नेपाळला होणाऱ्या वीज निर्यातीत लवकरच वाढ होईल अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे
क्रीडा मंत्रालयाने राबवलेल्या या उपक्रमात लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी दोन्ही सभागृहातल्या खासदारांना फुटबॉल भेट म्हणून दिले
त्यानिमित्ताने फुटबॉल खेळ देशभरात लोकप्रिय करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला
माहिती आणि प्रसारण मंत्रालय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची केंद्रीय मंत्री व्यंकय्यचा नायडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नवी दिल्ली 29 मार्च 2017 देशात कम्युनिटी रेडिओच्या विस्ताराचा आराखडा तयार करण्यासाठी आज केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड हे ही यावेळी उपस्थित होते
देशात कम्युनिटी रेडिओचा प्रसार करण्यासाठी समितीने राबवलेल्या विविध उपक्रमांचे नायडू यांनी यावेळी कौतुक केले
कम्युनिटी रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठीच्या अनुदानात सरकारने अलिकडेच वाढ केली असल्याचेही त्यांनी सांगितले
शिक्षण ग्रामविकास कृषी आरोग्य पोषक आहार पर्यावरण समाज कल्याण पंचायत राज यांसारख्या विविध विषयांवर या रेडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाते
सामुदायिक स्तरावर समाजात बदल घडवून आणण्यासाठी तसेच ग्रामीण रोजगार स्त्रिया आणि दलितांच्या उत्थानासाठी कम्युनिटी रेडिओ हे प्रभावी माध्यम असल्याचे नायडू यावेळी म्हणाले
कम्युनिटी रेडिओ गावागावांमध्ये पोचवावा तसेच अशी रेडिओ केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुलभ करावी अशी सूचना यावेळी समितीने केली
राष्ट्रपती कार्यालय एक एप्रिलला होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळा रद्द राष्ट्रपती भवन नवी दिल्ली 29 मार्च 2017 राष्ट्रपती भवनात येत्या एक एप्रिलला नियोजित असलेला चेंज ऑफ गार्ड सोहळा रद्द करण्यात आला आहे
कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय भ्रष्टाचाराविरोधात सरकारचे कठोर धोरण नवी दिल्ली 29 मार्च 2017 केंद्र सरकार भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी वचनबद्ध असून कुठल्याही प्रकाराचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं धोरण राबवत आहे
त्यामुळे जनतेला ऑनलाईन अर्ज आणि अपिल करता येणे शक्य झाले आहे कुठल्याही गोष्टीची खरेदी प्रक्रिया करतांना सचोटीचे व्यवहार करावेत अशी सूचना केंद्रीय दक्षता अयोगाने संबंधित संस्थांना आणि राज्य सरकारांना केली आहे
संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये संमत केलेल्या भ्रष्टाचार विरोधी संमेलनातल्या मसुद्याची अंमलबजावणी करणे
केंद्र सरकारच्या सेवेतील तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या सर्व उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांना त्यांची संपत्ती सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत
विविध राज्यांमध्ये सीबीआय अंतर्गत असलेले खटले हाताळण्यासाठी विशेष अतिरिक्त न्यायालयांची स्थापना करणे
ईप्रशासनाला सुरुवातप्रक्रिया आणि व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक आणि सोप्या करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे पैसे थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे
गेल्या तीन वर्षात केंद्रीय दक्षता आयोगाने केलेल्या कारवाईनुसार भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढले आहे
रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट आरक्षणावर सवलत नवी दिल्ली 29 मार्च 2017 डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने तिकिटांच्या ऑनलाईन आरक्षणावर लागणारा सेवा कर रद्द केला आहे
याआधी दुसऱ्या श्रेणीच्या तिकिटांसाठी 20 रुपये तर इतर श्रेणींसाठी 40 रुपये सेवा कर आकारला जात असे
मात्र 23 नोव्हेंबर 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटांवरचा हा सेवाकर माफ करण्यात आला आहे
इतर वर्गाच्याही तिकिटांसाठी आता ही सवलत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेत यांनी आज लोकसभेत सांगितले
फास्टर अडॉप्शन ण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ (हायब्रीड ण्‍ड) इलेक्ट्रीक व्हेईकल म्हणजेच फेम इंडिया या योजनेअंतर्गत दुचाकी तीन चाकी ऑटोरिक्षा चारचाकी प्रवासी वाहन हलकी मालवाहू वाहने आणि बसेसची निर्मिती केली जाते
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मनोज सिन्हा यांच्या हस्ते कब स्काऊटविषयक टपाल तिकीटाचे प्रकाशन नवी दिल्ली 30 मार्च 2017 शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या कब स्काऊट या उपक्रमाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय दूरसंवाद मंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले
स्काऊटमुळे मुलांच्या शारिरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकासात मोठी मदत होते असे मत सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केले देशाची नवी पिढी घडवण्यात भारत स्काऊट गाईडचे मोठे योगदान आहे
तसेच रस्ते आणि रेल्वे सुरक्षा स्वच्छ भारत अशा अभियानांमध्ये या विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असतो त्याशिवाय नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्यांचे मोठे योगदान असते असे कौतुकोद्‌गार सिन्हा यांनी काढले
8 ते 11 या वयोगटातल्या मुलांसाठी कब स्काऊट हा उपक्रम शाळांमध्ये चालवला जातो याअंतर्गत खेळ गोष्टी सांगणे विविध उपक्रम कलाकुसर आणि स्पर्धा भरवल्या जातात
जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय गंगा नदीतील जलचर सर्वेक्षण नवी दिल्ली 30 मार्च 2017 केंद्र सरकारने अलिकडेच गंगा नदीतील जलचर सजीवांची संख्या आणि स्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण हाती घेतले आहे
या सर्वेक्षणात प्रामुख्याने गंगा नदीतील डॉल्फिन माशांच्या स्थितीचा अभ्यास केला जाणार आहे
केंद्रीय जलसंपदा राज्यमंत्री विजय गोयल यांनी आज लोकसभेत यावर उत्तर देताना सांगितले की देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे त्यानुसार गंगा नदीच्या पात्रात बहुआयामी सर्वेक्षण सुरु झाले आहे
गृह मंत्रालय आंतरराज्य परिषदेच्या स्थायी समितीची अकरावी बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार नवी दिल्ली 30 मार्च 2017 आंतरराज्य परिषदेच्या स्थायी समितीची अकरावी बैठक येत्या 9 एप्रिलला नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
केंद्र आणि राज्य सरकारांमधील संबंधांबाबत पुच्छी आयोगाने दिलेल्या शिफारसींवर या बैठकीत चर्चा होईल
केंद्राच्या विविध विभागांचे मंत्री तसंच काही राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी होतील
कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय स्वसाक्षांकित प्रमाणपत्रांची वैधता नवी दिल्ली 30 मार्च 2017 द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोगानं आपल्या बाराव्या अहवालात प्रशासकीय प्रक्रियांचे सुलभीकरण करण्यावर भर दिला आहे
जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली
कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय सरकारी अधिकाऱ्यांकडून संपत्तीचे विवरण जाहीर करण्याबाबत सूचना नवी दिल्ली 30 मार्च 2017 लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 नुसार सरकारी अधिकारी त्यांचे वैवाहिक जोडीदार आणि अपत्ये यांच्या नावावर असलेली संपत्ती आणि इतर आर्थिक माहिती जाहीर करण्याविषयीच्या तरतुदीत 2016 साली दुरुस्ती करण्यात आली आहे
या दुरुस्तीनुसार प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याला त्याची संपत्ती आणि आर्थिक जबाबदाऱ्यांविषयीची माहिती विवरणपत्रात सांगितलेल्या नमुन्यानुसार जाहीर करावी लागेल
जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली
पंतप्रधान कार्यालय ब्रह्मकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केलेले भाषण नवी दिल्ली 26 मार्च 2017 ब्रह्मकुमारी संस्थेचे सर्व सदस्य आंतरराष्ट्रीय संमेलन आणि सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून आलेल्या सर्व लोकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो
शांती म्हणून आपणा सर्वाना अभिवादन करतो