text
stringlengths 1
2.66k
|
---|
लंडनमधल्या हल्ल्याच्या वृत्ताने आपल्याला तीव्र दुख झाले आहे |
या हल्ल्यात बळी पडलेल्या जखमी झालेल्यांच्या परिवारांबद्दल संवेदना वाटते |
पंतप्रधान कार्यालय शहीद दिनानिमित्त भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव यांना पंतप्रधानांकडून आदरांजली नवी दिल्ली 23 मार्च 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद दिनानिमित्त भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव यांना आदरांजली वाहिली आहे |
आज शहीददिनी भगतसिंह राजगुरु आणि सुखदेव यांचे स्मरण आपण करत आहे |
संरक्षण मंत्रालय पहिल्या गोरखा बटालियनचे द्विशताब्दी वर्ष साजरे नवी दिल्ली 23 मार्च 2017 ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या नऊ गोरखा बटालियनपैकी पहिल्या बटालियनचे यंदा द्विशताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे या बटालियनची स्थापना 1817 मध्ये करण्यात आली होती |
बटालियनमधील जवानांनी दिलेल्या सेवेबद्दल अनेक मोठे महत्वपूर्ण आणि मानाचे पुरस्कार या बटालियनला मिळाले आहेत |
अनेक व्हिक्टोरिया क्रॉस पाच महावीर चक्र आणि सतरा वीरचक्र मिळवणाऱ्या लष्करी जवान अधिकाऱ्यांनी गेल्या दोन शतकात बटालियनलाही गौरव प्राप्त करुन दिला |
या बटालियनच्या रेजिमेंटस्नी देशात डेराबाबा नानक जम्मू आणि काश्मीर याबरोबरच अफगाणिस्तान फ्रान्स उत्तर आफ्रिका बर्मा अशा विविध देशांमधूनही कर्तव्य बजावले |
द्विशताब्दी वर्षानिमित्त या बटालियनच्या एका पथकाने लडाख क्षेत्रातले कांगडी शिखर (6153 मीटर उंची) सर करण्याचा विक्रम केला |
या बटालियनच्या माध्यमातून आत्तापर्यंत 32 हजार नेपाळींनी भारतीय लष्करात सेवा बजावली आहे भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचे काम या बटालियनने केले |
बटालियनच्या द्विशताब्दी समारोहामध्ये नेपाळमधून 500 पेक्षा जास्त निवृत्त जवान उपस्थित राहिले होते या कार्यक्रमाला पंजाबचे माजी राज्यपाल जनरल बीकेएनछिब्बर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते |
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती केंद्र सरकारने खनिज उत्पादनाबाबत स्वाक्षरी केलेल्या कराराना मुदतवाढ देण्याच्या धोरणाला मंजुरी नवी दिल्ली 22 मार्च 2017 खनिज उत्खनन संदर्भातल्या परवाना धोरणापूर्वीच्या खाण पट्टीमधला उर्वरित साठा काढण्यासाठी गुंतवणूक सुलभ व्हावी यादृष्टीने केंद्र सरकारने स्वाक्षरी केलेल्या उत्पादन सहभागा विषयीच्या कराराला मुदत वाढ देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली |
या धोरणामुळे देशांतर्गत तेल उत्पादनात वृद्धी बरोबरच 2022 पर्यंत कच्च्या तेलाच्या आयातीत 10 कपात करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे |
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर चराचे खोलीकरण आणि रुंदीकरण टप्पा दुसरा नवी दिल्ली 22 मार्च 2017 मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर चराच्या दुसऱ्या टप्प्यातल्या खोलीकरण आणि रुंदीकरण प्रकल्पा साठीच्या नव्या अंदाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली |
सेवा कर वगळून या प्रकल्पाचा खर्च 2029 कोटी रुपये असेल |
जवाहरलाल नेहरू बंदर ट्रस्टच्या अंतर्गत संसाधनामार्फत हा संपूर्ण निधी दिला जाणार असून आवश्यक भासल्यास बाजारातून कर्ज उचलण्यात येईल |
जागतिक निविदा मागवून काम करण्यात येईल अशी अपेक्षा असून त्यानंतर दोन वर्षात काम पूर्ण होईल |
जेएनपीटीची कंटेंनर हाताळणी क्षमता सध्या 5 दशलक्ष टीईयु आहे चौथे टर्मिनल कार्यन्वित झाल्यावर ही क्षमता 98 दशलक्ष टीईयु होईल |
800012000 टीईयुपेक्षा जास्त क्षमता असलेल्या आकाराची जहाजे जेएनपीटी मधे मालाची नेआण करू शकतील अशी अपेक्षा आहे |
यामुळे जहाजाचा खोळंबा कमी होणार आहे परिणामी खर्चात कपात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर फायदा तसेच बंदरातली वाहतूक कोंडी कमी होणार आहे |
पूर्वपीठिका मोठी जहाजे आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरत असल्याने कंटेनर जहाजांच्या आकारमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे हे लक्षात घेऊन चराच्या खोली आणि रुंदीत वाढ करणे गरजेचे झाले होते |
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती ईशान्येकडच्या रस्ते जाळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंत्री मंडळाची मंजुरी नवी दिल्ली 22 मार्च 2017 मेघालय आणि मिझोरममधल्या 403 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग विकासाला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मान्यता दिली |
मिझोरम मधल्या सुमारे 351 तर मेघालय मधल्या 52 किलोमीटर रस्त्यांचा यात समावेश आहे |
भू संपादनासह या प्रकल्पाला 6721 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे |
आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती 2017 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला मंत्रिमंडळाची मंजूरी नवी दिल्ली 22 मार्च 2017 तेलासाठीच्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीत 2017 च्या हंगामासाठी वाढ करून ती 6500 रुपये करायला मंत्री मंडळाच्या अर्थ विषयक समितीने मान्यता दिली आहे 2016 मध्ये हा भाव 5950 रुपये होता |
सरासरी दर्जाच्या बॉल खोबऱ्यासाठी 2017 साठी 6785 रुपये भाव करण्यात आला आहे |
मंत्रिमंडळ वस्तू आणि सेवा कर विषयक अंमल बजावणी सुलभ होण्यासाठी सीमाशुल्क आणि अबकारी कायद्यात उपकर आणि अधिभार रद्द करण्याबाबतच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी नवी दिल्ली 22 मार्च 2017 केंद्रीय मंत्रिमंडळाने 1962 च्या सीमाशुल्क कायद्यात 1975 च्या सीमाशुल्क दर कायद्यात 1944 च्या केंद्रीय अबकारी कायद्यात सुधारणा करण्याच्या तसेच 1985 चा केंद्रीय अबकारी दर कायदा रद्दबातल ठरवणाऱ्या आणि उपकर लावणाऱ्या कायद्याच्या तरतुदीत सुधारणा अथवा रद्द करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे |
वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर ज्या कायद्याच्या तरतुदी उचित राहणार नाहीत त्यात सुधारणा किंवा त्या रद्द केल्याने करबहुलता कमी होणार आहे |
मंत्रिमंडळ स्टार्ट अप साठी फंड ऑफ फंड उभारायच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली 22 मार्च 2017 स्टार्ट अप साठीच्या फंड ऑफ फंड संदर्भातल्या प्रस्तावांना केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली |
17 फेब्रुवारी 2016 च्या राजपत्रित अधिसूचनेनुसार पात्र असणाऱ्या स्टार्ट अप मधे ffs अर्थात फंड ऑफ फंडाच्या आधाराने अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड ffs कडून मिळालेल्या योगदानाच्या दुप्पट रक्कम गुंतवू शकणार आहे |
मंत्रिमंडळ नाबार्ड कायदा 1981 मधे सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली 22 मार्च 2017 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक कायदा 1981 मध्ये विधेयकाच्या मसुद्यानुसार प्रस्तावित सुधारणांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली |
नाबर्डमधले रिझर्व्ह बँकेचे 04 टक्के आणि 20 कोटी रुपये मूल्याचे समभाग केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे |
भांडवलात वृद्धीमुळे नाबर्डला दीर्घ कालीन सिंचन निधींविषयी वचनबद्धता पूर्ण करण्याला मदत होणार आहे |
मंत्रिमंडळ भारत आणि अमेरिका यांच्यात सायबर सुरक्षा सहकार्याबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी नवी दिल्ली 22 मार्च 2017 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि अमेरिकेच्या होम लँड सिक्युरिटी डिपार्टमेंट यांच्यात सायबर सुरक्षेबाबत झालेल्या सामंजस्य कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली |
11 जानेवारी 2017 ला नवी दिल्लीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या |
मंत्रिमंडळ its अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी या पदावर मूळ पदे कायम राखून पदोन्नतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली 22 मार्च 2017 1989 ते 1991 च्या तुकडीतल्या its अर्थात भारतीय व्यापार सेवेतल्या अधिकाऱ्यांना व्यक्तिगत स्तरावर आणि एका वेळेसाठी शिथिलता देऊन वरिष्ठ प्रशासकीय श्रेणी स्तरावरच्या पदोन्नतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीमधे रिक्त पदे असतील त्या वेळी या अधिकाऱ्यांना सामावून घेतले जाईल त्याचबरोबर या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांची पदे कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी या मूळ पदावर कायम राखली जातील या शर्तीवर ही मंजुरी देण्यात आली आहे |
मंत्रिमंडळ बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणाऱ्या 2009 च्या कायद्यातल्या सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता नवी दिल्ली 22 मार्च 2017 बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणाऱ्या 2009च्या कायद्यातल्या सुधारणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली |
यामुळे सर्व शिक्षक हे शैक्षणिक अधिकाऱ्यांनी विहित केल्यानुसार किमान पात्रता धारक असतील हे सुनिश्चित करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी या शिक्षकांना 31 मार्च 2019 पर्यंत वाढीव कालावधी उपलब्ध होणार आहे |
यामुळे सेवेत असलेल्या आणि प्रशिक्षित नसलेल्या प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करता येणार असल्याने देशात प्राथमिक स्तरावर विशिष्ट किमान स्तर राखणे सुलभ होणार आहे |
शिक्षक शिक्षण प्रक्रिया आणि शिक्षणातून बालकांना मिळणाऱ्या ज्ञानाचा दर्जा यातून उंचावणार आहे |
पूर्व पीठिका बालकांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क देणारा 2009 चा कायदा 1 एप्रिल 2010 पासून अमलात आला |
6 ते 14 वयोगटातल्या प्रत्येक बालकाला मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण घेण्याचा हक्क या कायद्या अंतर्गत मिळाला आहे |
मात्र प्राथमिक स्तरावरचे 11 लाख शिक्षक प्रशिक्षित नसल्याचे अनेक राज्य सरकारानी सांगितल्याने हा प्रशिक्षण कालावधी वाढवण्यासाठी या कायद्यात सुधारणा आवश्यक होती |
ऊर्जा मंत्रालय रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी योजना सुरु नवी दिल्ली 23 मार्च 2017 रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पामधून वायू आधारीत ऊर्जा निर्मिती केली जात आहे |
201516 आणि 201617 या वर्षांमध्ये या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती केली असल्याची माहिती ऊर्जा कोळसा आणि खाण मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली |
रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पाकडून दि 1 एप्रिल 2017 पासून 500 मेगावॅट ऊर्जा अखंडितपणे पाच वर्षे खरेदी करण्यात येईल असे रेल्वेने मान्य केले आहे |
तसेच या प्रकल्पाला येणारा ऊर्जा वितरणासाठी लागणारा खर्च आणि त्यामध्ये होणारे नुकसान तसेच व्हॅट कर माफ करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्यानेही तत्वत मान्य केले आहे असेही गोयल यांनी यावेळी सांगितले |
रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने केलेल्या उपाय योजनांची माहिती मंत्र्यांनी यावेळी दिली |
गेल कंपनीला रत्नागिरी ऊर्जा प्रकल्पातून पाच वर्षे ठराविक दराने गॅस पुरवठा करणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले |
ऊर्जा मंत्रालय सर्वांना 2019 पर्यंत 24x7 परवडणारी आणि पर्यावरण स्नेही वीज पुरवणार नवी दिल्ली 23 मार्च 2017 देशात सर्वांना सप्ताहभर अगदी चोवीस तास परवडणारी आणि पर्यावरण स्नेही ऊर्जा पुरवण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली |
सरकारने दिलेली माहिती आणि आखलेल्या योजना पुढीलप्रमाणे आहेत ज्या खेड्यांमध्ये वीज नाही अशा 18452 गावांचे (1 एप्रिल 2015च्या आकडेवारीनुसार) विद्युतीकरण करणे |
सप्ताहातले सर्व दिवस चोवीस तास वीज पुरवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करणे त्याप्रमाणे वीज निर्मिती वितरण प्रणाली तयार करणे |
ग्रामीण भागांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना लागू करण्यात आली |
201417 (2822017 पर्यंत) या काळात ऊर्जा निर्मितीमध्ये 562326 मेगावॅटची वाढ नोंदवली गेली सन 201314 मध्ये वीजनिर्मितीमध्ये 967 अब्ज युनिटवरुन 1048 अब्ज युनिटपर्यंत वृद्धी झाली |
चालू वर्षात 201617 मध्ये फेब्रुवारी 2017 पर्यंत 1057746 अब्ज युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे |
नवीनीकरण ऊर्जेसाठी हरित ऊर्जा पट्टा तयार करण्यात आला |
उन्नत ज्योती अंतर्गत सर्वांना वीज देण्यासाठी अतिशय परवडणाऱ्या किंमतीत एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात आला या योजनेतून 77 कोटी बल्ब बदलण्यात आले |
आतापर्यंत देशभरात 218 कोटी एलईडी बल्ब वितरीत करण्यात आले |
त्या व्यतिरिक्त 536 लाखांपेक्षा जास्त ऊर्जा बचत करणारे पंखे आणि 1337 लाख एलईडी ट्यूब वाटण्यात आले |
राष्ट्रीय पथदिवे कार्यक्रमांतर्गत 14 कोटी एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत यामुळे 9 अब्ज केडब्ल्यूएच वीजेची मार्च 19 पर्यंत बचत होणार आहे |
आत्तापर्यंत देशभरातल्या रस्त्यांवरचे 183 लाख दिवे बदलून त्या जागी एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत |
अशी माहिती ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी आज सभागृहात दिली |
कोळसा मंत्रालय कोळसा आयातीमध्ये 259 टक्के घट नवी दिल्ली 23 मार्च 2017 देशांतर्गत कोळसा उत्पादनात वाढ झाल्याने 201415च्या तुलनेत 201516 मध्ये कोळसा आयातीत घट झाली आहे आणि चालू वर्षात 201617 मध्ये आयात कमी होत आहे 201415 मध्ये 21778 मेट |
मात्र 201516 मध्ये 9988 मेट कोळसा बाहेरुन आणण्यात आला एप्रिल 2016 ते जानेवारी 2017 याकाळात कोळसा आयातीमध्ये गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत 259 टक्के घट नोंदवली आहे |
अशी माहिती ऊर्जा आणि कोळसा खात्याचे मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली |
हे एकमेव कारण यामागे नाही तर ऊर्जा क्षेत्राच्या कोळसा पुरवठ्याच्या धोरणात बदल करण्यात आला आहे |
गृह मंत्रालय ईलर्निंगमुळे पैसा वेळ आणि अंतर यांची बचत पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांचे प्रतिपादन पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या 35व्या राष्ट्रीय परिषदेत बेदी यांचे मार्गदर्शन नवी दिल्ली 23 मार्च 2017 गृहमंत्रालयाच्या पोलीस संशोधन आणि विकास संस्थेच्या वतीने दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते |
यावेळी पाँडेचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी मार्गदर्शन केले |
केंद्र सरकारने सुरु केलेल्या डिजिटल इंडिया अभियानाचा महत्वपूर्ण भाग म्हणजे ईलर्निंग आहे |
यामुळे पैसा वेळ आणि अंतर यांच्यात बचत होणार आहे असे किरण बेदी यांनी यावेळी सांगितले |
देशातल्या आयआयटी आणि आयआयएम सारख्या उत्कृष्ट संस्थांच्या सहकार्याने नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याचे यावेळी बोरवणकर यांनी सांगितले |
पंतप्रधान कार्यालय देशाच्या परिवर्तनाचा घटक बनावे पंतप्रधानांचे मन की बात द्वारे नागरिकांना आवाहन मुंबई 26 मार्च 2017 नुतन भारताचे स्वप्न साकार व्हावे यासाठी देशाच्या परिवर्तनाचा एक हिस्सा बननण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे |
नवीन भारत हे 125 कोटी भारतवासियांसाठी जागरुक होण्याचे आवाहन असून दैदिप्यमान भारत घडविण्याकरता एकत्रित येण्यासाठी उत्सुक असणाऱ्या भारतीयांच्या भावनांचे सार असल्याचे त्यांनी सांगितले |
जर प्रत्येक प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार केला तर तो नवीन भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठीचे योगदान ठरेल असे पंतप्रधानांनी सांगितले |
स्वराज्य ते सुराज्य या वाटचालीचा भाग होण्यासाठी लोकांनी आपले आयुष्य शिस्तबध्द आणि निर्धारपूर्वक घडवावे असे आवाहन त्यांनी केले |
स्वातंत्र्य लढ्यातील सामान्य माणसाची प्रचंड शक्ती जर स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात व्यक्त झाली तर ती सर्वांसाठी उपयुक्त आणि आनंद घेऊन येणारी ठरेल असे पंतप्रधानांनी सांगितले |
डिजीटल व्यवहारात लोकांच्या मोठ्या सहभागाबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की गरीबातला गरीबही रोख रकमेशिवाय व्यवहार करण्याचा प्रयत्न करत आहे |
विमुद्रीकरणानंतर डिजीटल व्यवहारांच्या विविध पध्दतींमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे आणि आतापर्यंत दीड कोटी लोकांनी भीम प डाउनलोड करुन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले |
लोकांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचार याविरुध्दच्या लढ्यात शूर सैनिक बनावे असे आवाहन करताना पंतप्रधानांनी या वर्षात 125 कोटी देशवासियांना 2500 कोटी आर्थिक व्यवहार हाती घ्याचे असे आवाहन केले |
7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन असून यावर्षी उदासिनतेवर लक्ष केंद्रीत करण्यात आले असल्याचे ते म्हणाले |
येत्या मंगळवारी देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या नववर्षानिमित्त पंतप्रधानांनी लोकांना शुभेच्छा दिल्या |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन मन की बातद्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 मार्च 2017) नवी दिल्ली 26 मार्च 2017 माझ्या प्रिय देशवासियांनो आपणा सर्वांना नमस्कार |
सारे ब्रिटीश साम्राज्य या तिघांना घाबरत असे ते तुरुंगात होते फाशी होणार हे निश्चित होते तरीही या तिघांचे काय करायचे ह्याची चिंता इंग्रजांना सतावत असे आणि म्हणूनच २४ मार्च ही फाशीची तारीख ठरलेली असताना २३ मार्च रोजी त्यांना फासावर चढवले गेले |
पण शंभर वर्षांपूर्वीच्या गांधीजींबद्दल आपण विचार करू लागलो त्या चंपारण्य सत्याग्रह करणाऱ्या गांधीजींबद्दल तर आपल्या असे लक्षात येईल की सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी चंपारण्य सत्याग्रह हा एक निश्चितच अभ्यासाचा विषय आहे |
सार्वजनिक जीवनाचा कसा आरंभ करावा स्वत किती कष्ट करावे लागतात |
लोकांमध्ये मिसळून लोक जे काम करत आहेत त्याला स्वातंत्र्याच्या रंगात कसे रंगवता येईल |
दोन्ही एकाच वेळी सुरु होते जणू गांधीजींनी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू केल्या होत्या |
सत्याग्रह म्हणजे काय असहमती म्हणजे काय |
इतक्या मोठ्या राजवटीपुढे असहकार म्हणजे काय एक पूर्णत नवा अनुभव गांधीजींनी शब्दातून नव्हे तर एका यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवला होता आज ज्यावेळी देश चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी साजरी करत आहे त्यावेळी भारतातल्या सामान्य माणसाची शक्ती किती अपार आहे |
या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरतानाच सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती परिश्रमाची पराकाष्ठा स्वजन हिताय स्वजन सुखाय हा मूलमंत्र घेऊन देशासाठी समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुति देणाऱ्या महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करेल आज आपण २१व्या शतकात जगत आहोत |
अशा वेळी कोण भारतीय असा असेल बरेजो भारताला बदलू इच्छित नाही देशात होत असलेल्या बदलांचा भागीदार होऊ इच्छित नाही |
सव्व्वाशे कोटी देशवासियांच्या मनातली एक आशा आहे एक उत्साह आहे एक संकल्प आहे एक इच्छा आहे |
माझ्या प्रिय देशवासियांनो जर आपण आपल्या वैयक्तीक आयुष्यातून बाजूला होऊन संवेदनापूर्ण नजरेने समाजाकडे आपल्या आजूबाजूला काय घडतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षावधी लोक निस्वार्थ भावनेने त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलिकडे जाऊन समाजासाठी शोषितांसाठी पिडीतांसाठी गरीबांसाठी काहीनाकाही करतांना दिसतात हे पाहून आपण आश्चर्यचकित होतो |
एखाद्या मूक सेवकाप्रमाणे जणू तपस्या करावी साधना करावी त्याप्रमाणे काम करतात |
जेव्हा न्यू इंडियाचा मुद्दा निघेल तेव्हा त्यावर टीका होईल वेगळ्या नजरेने त्याकडे बघितले जाईल हे साहजिकच आहे आणि लोकशाहीत ते आवश्यकही आहे |
पण ही गोष्ट खरी आहे की सव्वाशे कोटी देशवासीयांनी जर संकल्प केला आणि संकल्प सिद्ध करण्यासाठी मार्ग तयार करायचा असे ठरवले एका मागून एक पावले उचलली तर न्यू इंडिया सव्वाशे कोटी देशवासियांचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार होऊ शकेल |
प्रत्येक गोष्ट सरकारी अंदाजपत्रकातूनच झाली पहिजे सरकारी प्रकल्पातूनच झाली पाहिजे सरकारच्या पैशानेच झाली पाहिजे असे नाही |
हीच न्यू इंडियाची चांगली सुरुवात ठरेल |
स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात आपले जीवन शिस्तबद्ध रितीने संकल्पपूर्वक आपण का बरे जोडू नये |
मी आपल्याला आमंत्रण देतो |