|
लंडन (इंग्लिश: London ) हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे.
|
|
थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे.
|
|
लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यू यॉर्क शहर व टोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.[२][३][४].
|
|
तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो.[५]
|
|
जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात[६] तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे.[७].
|
|
२०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसर्यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे.
|
|
जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते.[८] ग
|
|
्रेटर लंडनची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे.[९] लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते.
|
|
लंडन परिसरात ३०० भाषा बोलल्या जातात. आजच्या घडीला लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत.
|
|
|