text
stringlengths
1
2.66k
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रलयाकडून बांधकाम उपकरणे आणि वाहनांच्या मसुद्यात सुधारणा संदर्भात सूचनांसाठी निमंत्रण कोळशाच्या राखेचा वापर वाढविण्यासाठी एनटीपीसीने रिहांद येथे पायाभूत सुविधा विकसित केल्या
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमावर्ती आणि किनारपट्टी जिल्ह्यांतील युवकांच्या आकांक्षापूर्तीसाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मोठ्या विस्तार योजनेला मंजूरी दिली आहे
भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार झारखंड मध्य प्रदेश ओदिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यात 55 लाखाहून अधिक मनुष्यदिन रोजगार निर्मिती केली आहे
महाराष्ट्र अपडेट्स राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईहून ग्रामीण भागात होणाऱ्या स्थलांतरामुळे कोविड19 चा प्रकोप वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली
राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण समाधानाकारक आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले
राज्यात एकूण रुग्णसंख्या 584 लाख असून 156 लाख सक्रीय रुग्ण आहेत
पानिपत प्रकल्पाला भेट खतांच्या संतुलित वापरावर दिला भर केंद्रीय रसायने व खत राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) च्या पानिपत प्रकल्पाला भेट दिली नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 मांडवीय यांनी सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला आणि सध्याच्या महामारीच्या परिस्थितीत एनएफएल किसान चमूने दिलेल्या उत्कृष्ट सेवांबद्दल त्यांचे अभिनंदन केले
कोविड 19 मुळे लावलेल्या टाळेबंदी दरम्यान कडक निर्बंध असूनही एनएफएलच्या विक्रीत 71 वाढ झाली आहे
जास्तीत जास्त दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी व मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी मृदा परीक्षण करणे आवश्यक आहे असे मंत्र्यांनी यावेळी सांगितले त्यांनी फिरत्या मृदा परीक्षण प्रयोगशाळेस भेट देऊन खतांच्या संतुलित वापरावर विशेष लक्ष केंद्रित करायला अधिकाऱ्यांना सांगितले
बैठकीनंतर मांडवीय यांनी वृद्धी आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून वृक्षारोपण केले
पानिपत प्रकल्पात आगमन झाल्यावर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र नाथ दत्त आणि संचालक (तांत्रिक) निर्लेप सिंह राय यांनी मंत्र्यांचे स्वागत केले
यावेळी मुख्य महाव्यवस्थापक (विपणन) अनिल मोतसरा आणि पानिपत प्रकल्पाचे प्रभारी महाव्यवस्थापक रत्नाकर मिश्रा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
पानिपत प्रकल्पात सादरीकरणाच्या माध्यमातून मंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली
सादरीकरणाच्या वेळी मंत्र्यांनी खत क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक बाबींवर चर्चा केली आणि कंपनीला मार्गदर्शन केले
अल्पसंख्यांक मंत्रालय कोरोना कालावधी हा भारतासाठी काळजी वचनबद्धता आणि आत्मविश्वास चा सकारात्मक काळ असल्याचे सिद्ध झाले आहे ज्याने जगभरातील मानवतेसाठी एक उदाहरण स्थापित केले आहे मुख्तार अब्बास नक्वी मंत्रालयांतर्गत एनएमडीएफसीतर्फे होली फॅमिली हॉस्पिटल नवी दिल्ली यांना सीएसआर अंतर्गत मोबाइल क्लिनिक प्रदान केलेहे आपत्कालीन मल्टी पॅरा मॉनिटर ऑक्सिजन सुविधा आणि ऑटो लोडिंग स्ट्रेचरसह सुसज्ज आहे जे कोणत्याही आपत्कालीन रूग्णांसाठी आवश्यक आणि जीवन रक्षक सुविधा आहेअल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित 1500 हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत करत आहेत मुख्तार अब्बास नकवीदेशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना कोरोना बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 कोरोना कालावधी हा भारतासाठी काळजी वचनबद्धता आणि आत्मविश्वास चा सकारात्मक काळ असल्याचे सिद्ध झाले आहे ज्याने जगभरातील मानवतेसाठी एक उदाहरण स्थापित केले आहे असे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाने (एनएमडीएफसी) होलि फॅमिली हॉस्पिटल नवी दिल्ली यांना दिलेली अत्याधुनिक आरोग्य सेवा सुविधा असलेल्या मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन करताना नक्वी म्हणाले की या कालावधीत लोकांच्या आयुष्यात आणि त्यांच्या जीवनशैली आणि कार्य संस्कृतीत महत्त्वपूर्ण बदल झाला आहे
लोकं आता समाजाप्रती सेवा आणि आपली जबाबदारी पार पडण्यासाठी अधिक वचनबद्ध झाले आहेत
कोरोना साथीच्या काळात लोकांची उत्कट बांधिलकी व सरकारच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे भारत आरोग्य क्षेत्रामध्ये वेगाने आत्मनिर्भर झाला आहे असे नक्वी म्हणाले
ते पुढे म्हणाले राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे
एका व्यक्तीची प्रत्येक आजाराची कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले याची माहिती तसेच सर्व चाचण्या अहवाल ही सर्व माहिती या एका आरोग्य आयडीमध्ये असतील नक्वी म्हणाले की जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना मोदी केअर ने लोकांच्या आरोग्याची हमी दिली आहे
मोदी केअर योजने अंतर्गत देशातील जवळपास 40 टक्के लोकसंख्येचा समावेश आहे
अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित 1500 हून अधिक आरोग्य सहाय्यक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत करत आहेत असे नक्वी म्हणाले
देशभरातील 16 हज हाऊस राज्य सरकारांना कोरोना बाधित लोकांसाठी विलगीकरण आणि अलगीकरण सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत
नक्वी म्हणाले की सीएसआर कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाच्या एनएमडीएफसी द्वारे प्रदान केलेले मोबाइल क्लिनिक गरीब दुर्बल घटकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी होली फॅमिली हॉस्पिटल नवी दिल्लीद्वारे चालविले जाईल
हे आपत्कालीन मल्टी पॅरा मॉनिटर ऑक्सिजन सुविधा आणि ऑटो लोडिंग स्ट्रेचरसह सुसज्ज आहे जे कोणत्याही आपत्कालीन रूग्णांसाठी आवश्यक आणि जीवन रक्षक सुविधा आहे एनएमडीएफसीने युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या उपचारासाठी मोहालीतील संरक्षण मंत्रालयाच्या पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरला सुधारित स्कूटर फिजिओथेरपी वैद्यकीय उपकरणे व इतर आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन दिली आहेत अशी माहिती नक्वी यांनी यावेळी दिली
उपराष्ट्रपती कार्यालय उपराष्ट्रपतींनी आयआयटी आणि उच्च शिक्षण संस्थांना सामाजिक समस्यांबाबत संशोधन करण्याचे केले आवाहन उपराष्ट्रपतींनी उच्च शिक्षण संस्थांना उद्योगांशी परस्पर हिताचे संबंध विकसित करायला सांगितले संशोधन प्रकल्पांना निधी पुरवठा करण्यासाठी खासगी क्षेत्राला केले आवाहन शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व हितधारकांकडून सामूहिक कृतीचे केले आवाहन विविध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याची भारतात अपार क्षमतादिल्ली आयआयटीच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे केले उद्घाटनउद्योजकतेत अग्रेसर म्हणून उदयाला आलेल्या आयआयटी दिल्लीची केली प्रशंसा नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 आयआयटी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन हे समाजाशी संबंधित असले पाहिजे आणि हवामान बदलापासून आरोग्याच्या प्रश्नांपर्यंत मानवजातीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला पाहिजे अशी सूचना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी दिल्ली आयआयटीच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करताना केली
ते म्हणाले की जेव्हा भारतीय संस्था देशाला भेडसावणाऱ्या समस्यांवर अनुकूल आणि शाश्वत उपाय विकसित करून सभोवतालच्या समाजांवर प्रभाव टाकण्यास सुरवात करतील तेव्हाच जगातील सर्वोत्तम संस्थांमध्ये भारतीय संस्थांची गणना होईल सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन आणि विकास प्रकल्पांमध्ये अधिक गुंतवणूकीचे आवाहन करताना उपराष्ट्रपतींनी खाजगी क्षेत्राला असे प्रकल्प जाणून घेण्यात शैक्षणिक क्षेत्राबरोबर सहकार्य करण्याचे आणि उदारपणे वित्तपुरवठा करण्याचे आवाहन केले
संशोधनामध्ये लोकांचे जीवन आरामदायी बनवण्यावर प्रगतीला गती देण्यावर आणि अधिक न्याय्य जागतिक सुव्यवस्था सुनिश्चित करण्याकडे लक्ष दिले जावे यावर त्यांनी भर दिला
आयआयटीतून शिक्षण घेतलेल्यांना शेतकरी आणि ग्रामीण भारताला भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करत नायडू यांनी त्यांना केवळ कृषीउत्पादन वाढवण्यासाठीच नव्हे तर पौष्टिक आणि प्रथिनेयुक्त खाद्य उत्पादनावर विशेष लक्ष देण्याची सूचना केली
उच्च शिक्षण संस्थांनी दबावाखाली काम करू नये तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उद्योग क्षेत्राशी सहकार्याचे संबंध स्थापन करावेत असे ते म्हणाले विविध क्षेत्रांतील उद्योग तज्ज्ञांनी संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम केले पाहिजे
अशा प्रकारच्या सहकार्याने प्रकल्पांना गती मिळेल आणि लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील असे ते पुढे म्हणाले
नवीन शैक्षणिक धोरण भारताला जागतिक अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रोत्साहित करणारे असल्याबद्दल आनंद व्यक्त करत जागतिक स्तरावरील अव्वल 500 संस्थांमध्ये केवळ आठ भारतीय संस्थांचा समावेश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले
ते म्हणाले की ही परिस्थिती बदलायाला हवी आणि आपल्या उच्च शिक्षण संस्थांच्या शिक्षणाच्या दर्जात आणि गुणवत्तेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व हितधारकसरकार विद्यापीठे शिक्षणतज्ञ आणि खासगी क्षेत्र यांच्याकडून एकत्रित आणि सामूहिक कृती व्हायला हवी
लोकसंख्येचा फायदा आणि अत्यंत प्रतिभावान तरुणांची संख्या लक्षात घेऊन विविध तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याची अपार क्षमता भारतामध्ये असल्याचे निरीक्षण नोंदवत उपराष्ट्रपती म्हणाले गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही काळाची गरज आहे
उद्योजकतेच्या बाबतीत अग्रेसर म्हणून उदयाला येत असलेल्या आयआयटी दिल्लीचे कौतुक करताना नायडू म्हणाले आयआयटी दिल्लीसारख्या संस्था नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देणारे तयार करत आहेत आणि देशातील अन्य संस्थांसाठी उदाहरण ठरत आहेत ही चांगली गोष्ट आहे
यावेळी उपराष्ट्रपतींनी हीरक महोत्सवी लोगो आणि आयआयटी दिल्ली 2030 रणनीती दस्तवेजांचे प्रकाशन केले
दिल्लीचे संचालक प्रा
व्ही रामगोपाल राव आदी मान्यवर उपस्थित होते
संरक्षण मंत्रालय उत्तराखंडमधल्या 20 गावांना जोडणाऱ्या 180 फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम सीमा रस्ते संघटना (bro) कडून केवळ तीन आठवड्यात पूर्ण नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 bro म्हणजेच सीमा रस्ते संघटनेने उत्तराखंड च्या पिथौरागड जिल्ह्यात जौलजीबी भागात 180 फूट लांबीच्या बेली पुलाचे बांधकाम तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत पूर्ण केले आहेसतत होणारे भूस्खलन आणि मुसळधार पावसातही अत्यंत अल्पावधीत हा पूल तयार करण्यात आला आहे
27 जुलै 2020 रोजी झालेल्या ढगफुटीनंतर आलेल्या पुरात 50 मीटरचा पुलाचा सिमेंटचा भाग संपूर्ण वाहून गेला होता
त्यामुळे या भागातून अत्यंत वेगाने चिखलगाळ देखील वाहून आला होता
या भूस्खलनात अनेकांचे जीव गेले आणि रस्त्यांचा संपर्कही पूर्णपणे तुटला होता
त्यानंतर बीआरओने या पुलासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव केली आणि पूल बांधण्याची व्यवस्था केली
सातत्याने होत असलेल्या भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे पिथौरागड हून कामाच्या ठिकाणी बांधकामाचे साहित्य पोहचवणे सर्वात मोठे आव्हान होते
या पुलामुळे पूरग्रस्त गावांशी संपर्क साधता आला तसेच या पुलाने जौलजीबी ते मुन्सियारी हे भाग जोडले गेले
या पुलामुळे निर्माण झालेल्या संपर्काने 20 गावातल्या सुमारे 15000 लोकांना मदत मिळणार आहे
या पुलामुळे जौलजीबी ते मुन्सियारी दरम्यानच्या 66 किलोमीटर्सच्या रस्त्यावरील संपर्क प्रस्थापित झाला आहे
खासदार अजय तमाटा यांनीही जौलजीबीपासून 25 किलोमीटर अंतरावरच्या लुमती आणि मोरी या पूरग्रस्त गावांच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली होतीपुरामुळे या दोन्ही गावात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे
या नव्या पुलामुळे आता सर्व गावांच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण होणार आहे * * *
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतात आजवर एका दिवसात सर्वाधिक 57584 रुग्ण बरे रुग्ण बरे होण्याचा दर 72 च्या वरएकूण रुग्ण बरे होण्याचा आकडा लवकरच 2 दशलक्षचा टप्पा पार करणार नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 भारतात कोविड19चे रुग्ण बरे होण्याच्या दरात निरंतर वृद्धी होत आहे
आज गेल्या 24 तासात देशात कोविड19चे सर्वाधिक 57584 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे
या कामगिरीमुळे देशातील कोविड19चे रुग्ण बरे होण्याचा दर 72 च्या पार पोहोचण्यासाठी प्रोत्साहन मिळाले
प्रभावी रोग नियंत्रण धोरणाची यशस्वी आणि समन्वित अंमलबजावणी जलद आणि सर्वसमावेशक चाचणी व गंभीर रूग्णांच्या प्रमाणित नैदानिक व्यवस्थापनाचा हा सकारात्मक परिणाम आहे
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल (एमओएचएफडब्ल्यू) मध्ये स्पष्टपणे नमूद केल्यानुसार सौम्य मध्यम व गंभीर स्वरूपाच्या कोविड19 रुग्णांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणासाठी भारताने केअर प्रोटोकॉलचे अनुसरण केले आहे
प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत
अधिक संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे तसेच गृह अलगीकरणाचा (सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेले) कालावधी पूर्ण करणाऱ्या रुग्णांमुळे भारतातील कोविड19च्या बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जवळपास 2 दशलक्ष (1919842) पर्यंत पोहोचला आहे
बरे होणारे रुग्ण आणि सक्रीय रुग्णांमधील अंतर वाढत आहे हे याने सुनिश्चित झाले आहे
हा आकडा आज 1242942 इतका आहे
देशातील सक्रीय रुग्णांचा आकडा (आजच्या तारखेला 676900) कमी झाला असून सध्याच्या कोविड बाधित रुग्णांच्या केवळ 2557 इतकाच आहे
रुग्णांची लवकर ओळख पटल्याने सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि त्वरित अलगीकरण सुविधा प्रदान करण्यात आणि गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात मदत झाली ज्यामुळे रुग्णांचे वेळेवर आणि प्रभावी व्यवस्थापन झाले
देशातील कोविड19 च्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन आज ते 192 वर पोहोचले आहे * * *
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 3 कोटी पेक्षा जास्त कोरोना चाचण्या करत भारताने केला नवा टप्पा पार दहा लाख लोकसंख्येमागे चाचण्यांच्या प्रमाणात सातत्याने वाढ आज हे प्रमाण 21769 नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 लक्ष्यकेन्द्री सातत्यपूर्ण आणि केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नातून भारताने 3 कोटी चाचण्या करत नवा टप्पा पार केला आहे
याच काळात पॉझिटीव्हिटी दर 75 वरून 881झाला चाचण्यांच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुरवातीला पॉझिटीव्हिटी दरात सुरवातीला वाढ होईल मात्र तत्पर विलगीकरण शोध आणि वेळेवर वैद्यकीय व्यवस्थापन यासह इतर उपाय योजनांमुळे हळू हळू या पॉझिटीव्हिटी दरात दिल्लीप्रमाणे घट होऊ लागते
चाचण्या अधिक केल्यामुळे कोविड 19 रुग्ण वेळीच ओळखता येऊन त्याचे सुरवातीलाच विलगीकरण करता येते
याच्या बरोबरीने प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन राबवल्याने मृत्यू दर कमी झाला आहे
म्हणजेच चाचण्यामध्ये वाढ आणि वेळेवर चाचण्या यामुळे पॉझिटीव्हिटी दर कमी होण्याबरोबरच मृत्यू दरही कमी होतो
चाचण्यांचे धोरण विकसित करण्याच्या निर्धारामुळे देशात निदान चाचण्यांच्या जाळ्याचा विस्तार होत आहे
2020 मध्ये जानेवारीच्या सुरवातीला पुण्यात केवळ एक प्रयोगशाळा होती आता देशात प्रयोग शाळांची संख्या 1470 झाली आहे यामध्ये सरकारी क्षेत्रातल्या 969 तर खाजगी 501 प्रयोग शाळांचा समावेश आहे
यामध्ये रिअलटाईम rt pcr प्रयोगशाळा 754 (शासकीय 450 + खासगी 304) truenat आधारीत प्रयोगशाळा 599 (शासकीय 485 + खासगी 114) cbnaat आधारीत प्रयोगशाळा 117 (शासकीय 34 + खासगी 83) कोविड19 शी संबंधित तांत्रिक विचारणा technicalquerycovid19govin यावर तर इतर मुद्दे ncov2019govin आणि covidindiaseva यावर पाठवू शकता
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय नितीन गडकरी यांच्या हस्ते मणिपूरमध्ये 13 महामार्ग प्रकल्पांची कोनशिला आणि रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन ईशान्येकडील राज्यांसाठी विकास उपाययोजना जाहीर ईशान्येकडील राज्ये सरकारची प्राथमिकता डॉ जितेंद्रसिंग नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि एमएसएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मणिपूर येथील 13 महामार्ग प्रकल्पांची कोनशिला ठेवण्याच्या आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्ते सुरक्षा प्रकल्पाचे आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले
या प्रकल्पांमुळे मणिपूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होऊन रस्त्यांमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये दळणवळण सुविधा सुलभता आणि आर्थिक विकास होईल
याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याची पंतप्रधानांची इच्छा लक्षात घेऊन आम्ही या भागांमध्ये अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत
भविष्यात मणिपूरमध्ये अनेक नवीन रस्ते प्रकल्प हाती घेतले जाईल असे त्यांनी सांगितले
इम्फाळ येथील प्रगत रस्त्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे आणि 23 महिन्यांत याच्या कामाची सुरुवात होईल
नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना रस्ते प्रकल्प तातडीने सुरु करण्यासाठी भूसंपादन आणि त्यासंबंधीची कामे लवकर पूर्ण करण्यास सांगितले
केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) च्या मुद्याविषयी बोलताना ते म्हणाले राज्यांकडून वापर प्रमाणपत्र मिळाल्यास तातडीने 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल
मंत्र्यांनी याप्रसंगी माहिती दिली की ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांमध्ये ड्रेजिंगचे काम पूर्ण झाले असून जलमार्गाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणे आता शक्य आहे
राज्याच्या अर्थव्यवस्थेला अतिरिक्त लाभ मिळण्यासाठी 5060 किलोमीटरचा हा मार्ग नदीमार्गाला जोडण्याचे त्यांनी सुचवले
ईशान्येकडील प्रांतात सार्वजनिक वाहतुकीच्या इंधनासाठी स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्यायी इंधनाचा वापर करावा असे ते म्हणाले
गडकरींनी मणिपूर राज्यात रोजगार आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमएसएमई क्षेत्राची भूमिका अधोरेखीत केली
एमएमएमई युनिटच्या नुकत्याच केलेल्या विस्तारीत व्याख्येबदद्ल सांगताना ते म्हणाले हस्तकला हातमाग मध बांबू उत्पादनामध्ये या संधीचा लाभ घेतला तर मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळेल
ईशान्य प्रांत विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंग म्हणाले आजच्या सोहळ्यातून तीन महत्त्वाचे संदेश मिळाले आहेत
ईशान्य प्रांत सरकारची प्राथमिकता आहे अनेक अडथळ्यानंतरही या भागातील पायाभूत सुविधांवर काम सुरु आहे आणि पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन पायाभूत सुविधांसाठी जाहीर केलेल्या 100 लाख कोटी रुपयांच्या घोषणेशी हे सुसंगत आहे
पर्यटन मंत्रालय पर्यटन मंत्रालयाद्वारा आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित वेबिनार सिरीजचा सरदार वल्लभभाई पटेलएकात्मिक भारताचे शिल्पकार या सत्राने समारोप नवी दिल्‍ली 17 ऑगस्‍ट 2020 देखो अपना देश या अभियानाअंतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय वेबिनार आयोजित केले होते
देशात सध्या कोरोना या जागतिक साथीच्या आजाराने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्रालयाने यावर्षी 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला अभिवादन करण्यासाठी वेब माध्यमाची निवड केली
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याअंतर्गत पाच वेबिनार आयोजित केले होते
भारताचा स्वातंत्र्यलढा स्वातंत्र्यलढयाशी संबंधित ऐतिहासिक महत्वाच्या जागा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्ती अशा विविध विषयांचा परामर्श या वेबिनार शृंखलेत घेण्यात आला
वेबिनारमध्ये 15 ऑगस्ट 2020 रोजीचे सत्र सरदार पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाला समर्पित होते
या वेबिनारच्या सुरुवातीला गुजरात सरकारचे पर्यटन आयुक्त आणि गुजरात पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जेनु दिवाण यांनी गुजरातमधील सरदार पटेलांशी सबंधित स्थळांचा परिचय करून दिला
या वेबिनार मध्ये सरदार पटेल यांच्या आयुष्याशी सबंधित अनेक घटनांना उजाळा देण्यात आला
त्यांचे बालपण शालेय शिक्षण वकिली शिकण्याकरीता लंडनला जाणे बॅरीस्टर म्हणून कारकीर्द 1916 साली बॅरीस्टर क्लब येथे महात्मा गांधींशी झालेली भेट अहमदाबाद महापालिकेच्या अध्यक्षपदासाठी 1922 1924 आणि 1927 साली झालेली निवड अहमदाबादच्या शालेय शिक्षण व्यवस्थेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सुधारणा नैसर्गिक आपत्तीच्या काळात केलेले मदतकार्य आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाशी तडजोड न करणारे उच्च मूल्यांवर आजन्म वाटचाल करणारे त्यांचे व्यक्तीमत्व या सर्व गोष्टींना या वेबिनारमध्ये उजाळा देण्यात आला
या वेबिनारमध्ये सरदार पटेलांशी संबंधित गावाचा मागोवा घेण्यात आला यात नाडीयाद हे त्यांचे जन्मगाव जिथे त्यांचे शिक्षण झाले पेटलाड बोरसाड गोधरा आणि कर्मासाद या गावांचा समावेश होता
या वेबिनारमध्ये आपले अनुभव सांगण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने स्वातंत्र्यपूर्व काळ अनुभवलेल्या अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते यात माजी आयपीएस अधिकारी आणि राष्ट्रीय पोलीस अकाडमीचे माजी संचालक पद्म रोषा यांचाही समावेश होता
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडिया नॅशनल आर्मीमधल्या राणी झाशी रेजिमेंटच्या माजी सेकंड लेफ्टनंट 94 वर्षे वयाच्या रमा खांडवाला देखील या वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या
सरदार पटेल यांच्याशी मुंबईत झालेल्या भेटीच्या आठवणीना त्यांनी यावेळी उजाळा दिला
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिचारिका म्हणून केलेले काम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी आलेल्या संपर्कामुळे त्यांचे आयुष्य कसे आमूलाग्र बदलून गेले याची माहिती खांडवाला यांनी दिली
आपल्या या वीर निर्भय स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेचा आपण आजही आणि पुढेही एकतेची ताकद ओळखायला हवी असा संदेश देत या वेबिनारचा समारोप झाला
हैदराबाद या शीर्षकाचे पुढचे वेबिनार येत्या 22 ऑगस्टला सकाळी 11 वाजता होणार आहे
सांस्कृतिक मंत्रालय नेहरू विज्ञान केंद्र लॉकडाऊन व्याख्यानमालेत नोबेल पारितोषिक आणि भारतीय नागरी सेवा परीक्षे दरम्यानच्या काही अपरिचित तथ्यांचा उलगडा आयसीएस मध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या मॅरिसने दुसरा क्रमांक पटकावलेल्या अर्नेस्ट रुदरफोर्डला त्याच्या नोबेल प्रवासात कशी मदत केलीमहात्मा गांधींची तुलना फक्त धर्म संस्थापकांशी केली जाऊ शकते 1948 नोबेल समिती मुंबई 17 ऑगस्‍ट 2020 असे म्हणतात की महान व्यक्ती एकसारखे विचार करतात
आपण या पारंपारिक म्हणी मध्ये थोडा बदल करून असे म्हणू की महान व्यक्ती एकाच शाळेत शिकतात 19व्या शतकातील दोन महान व्यक्तिमत्व जी संबंधित क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचली आहेत ते दोघेही वर्गमित्र होते