text
stringlengths
1
2.66k
आपल्याकडे वाघांची संख्या वाढली आहे
आगामी काळात आशियाई सिंह प्रकल्पाची सुरुवात होत आहे या पकल्पाअंतर्गत भारतीय सिंहांची सुरक्षा आवश्यक पायाभूत सुविधा त्यांच्यासाठी आवश्यक विशेष आरोग्य सुविधा यावर काम होणार आहे
त्याचप्रमाणे प्रोजेक्ट डॉल्फिन देखील सुरु केले जाईल
एलओसी ते एलएसी पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्यांनी वाकड्या नजरेने पाहिले त्यांना आपल्या सैन्याने आपल्या वीर जवानांनी त्याना त्यांच्या भाषेत प्रत्त्युत्तर दिले
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले जवान काय करु शकतात हे संपूर्ण जगाने लदाखमध्ये पहिले आहे
दक्षिण आशियात जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या राहते
आपण सहकार्य आणि संवादाच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या जनतेच्या समृद्धीसाठी अगणित संधी निर्माण करू शकतो
देशाच्या सुरक्षेत आपल्या सीमा आणि किनारी पायाभूत सुविधांची मोठी भूमिका आहे
आज हिमालयाची शिखरे असोत किंवा हिंदी महासागराची बेटे असोत प्रत्येक दिशेने कनेक्टिव्हिटी विस्तारावर भर दिला जात आहे
आपल्या देशात 1300 हून अधिक बेटे आहेत
लक्षद्वीपलाही नंतर आता पुढच्या एक हजार दिवसात लक्षद्वीपलाही वेगवान इंटरनेट सुविधेने जोडण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे
जे सीमा भाग आहेत जे किनारी भाग आहेत तिथले सुमारे 173 जिल्हे आहेत जे कोणत्या ना कोणत्या देशाची सीमा किंवा समुद्र किनाऱ्याला लागून आहेत येत्या काळात एनसीसीचा विस्तार त्या सीमा भागातल्या युवकांसाठी करण्यात येईल
सीमा भागात आम्ही सुमारे एक लाख नवे एनसीसीचे कॅडेटस तयार करणार आहोत
आपली धोरणे सर्वोत्कृष्ट आपल्या प्रक्रिया आपली उत्पादने सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ मनुष्यबळ सर्वश्रेष्ठ प्रशासन प्रत्येक बाबतीत सर्वश्रेष्ठ बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे यातूनच आपण एक भारत श्रेष्ठ भारत चे स्वप्न साकारू शकू
रसायन आणि खते मंत्रालय जनऔषधी केंद्रांमधून वंचित महिलांना किमान एक रुपये दराने 5 कोटीहून अधिक सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटपः पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की त्यांचे सरकार देशातील महिला विशेषत वंचित महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेची खूप काळजी घेत आहे
देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की सरकार गरीब मुलीभगिनींच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत असून त्यांना स्वस्त दरात आरोग्यविषयक उत्पादने उपलब्ध करुन दिली जात आहेत
या दिशेने काम करीत असतानाच 6000 जन औषधि केंद्रामधून वंचित महिलांना किमान एक रूपये दराने 5 कोटी पेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले आहे
व्हिडीओ पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा पंतप्रधानांच्या घोषणेविषयी बोलताना केंद्रीय रसायन व खत मंत्री डीव्ही सदानंद गौडा म्हणाले की पंतप्रधानांच्या सतत मार्गदर्शन व पाठबळामुळे हे यश मिळाले आहे
6000 जन औषधि केंद्रांचे जाळे हे विशेषतः वंचित लोकांची सेवा करण्यासाठी तयार करण्यात आले आहे जिथे आम्ही किमान एक रुपये दराने 5 कोटी सॅनिटरी पॅडचे वितरण केले
पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाची पूर्तता करण्यासाठी आम्ही पंतप्रधान जन औषधी केंद्रांच्या माध्यमातून आवश्यक आणि दर्जेदार औषधे परवडणाऱ्या दरात सतत उपलब्ध करत राहू यावर गौडा यांनी जोर दिला
सरकारच्या या पावलाने देशातील वंचित महिलांसाठी स्वच्छता स्वास्थ्य आणि सुविधा सुनिश्चित केली आहे
पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनाला यशस्वी करण्यासाठी केंद्रीय औषधनिर्माण विभागाने हे पाऊल उचलले आहे
हे सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणास अनुकूल आहेत कारण एएसटीएम डी6954 (बायोडिग्रेडिबिलिटी टेस्ट) मानकांचेपालन करून हे पॅड्स ऑक्सोबायोडिग्रेडेबल माल वापरून तयार केले आहेत
देशातील बर्‍याच भागांत विशेषत ग्रामीण भागात मुली आणि स्त्रियांना सॅनिटरी उत्पादने सहज उपलब्ध हॉट नाहीत किंवा बाजारात उपलब्ध असणार्‍या बहुतेक वस्तू महाग असतात म्हणूनच या महिला त्या वापरत नाहीत जन औषधी केंद्रांमध्ये हे पॅड्स उपलब्ध झाल्यामुळे त्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे
जन औषधि केंद्रांनी जम्मूकाश्मीर आणि लदाख प्रदेशालाही 156 कोटी पॅडचा पुरवठा केला आहे
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम चा भाग म्हणून एनएचएम तरुण मुली आणि महिलांना या पॅड्स मोफत वाटप करीत आहेत
संरक्षण मंत्रालय आयएनएस शिवाजी येथे स्वातंत्र्यदिनसोहळ्याचे आयोजन भारतीय नौदलाचे लोणावळा येथील प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीवर 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला
कमांडिंग अधिकारी आणि आयएनएस शिवाजीचे स्टेशन कमांडर कमोडोर रवनीश सेठ यांनी राष्ट्राच्या संरक्षणार्थ सर्वोच्च बलिदान दिलेल्या सागरी योद्ध्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली
सर्व जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांचे नौदल प्रमुखांनी कौतुक केले आणि दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफीसर कमांडिग इन चीफ यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला
जवान आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख पारितोषक देऊन गौरवण्यात आले
कमांडिग ऑफिसर यांनी उपस्थित जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या
सोहळ्यादरम्यान कोविड19 संबंधीची पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी पारसी नववर्ष नवरोजनिमित्त दिल्या शुभेच्छा नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी नववर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या आहे
पंतप्रधान म्हणाले नवरोज मुबारक
पारसी नववर्षाच्या शुभेच्छा
ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा पारसी समुदायाच्या उल्लेखनीय योगदानाची भारताला जाणीव आहे
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिनिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे
पंतप्रधान म्हणाले प्रिय अटलजी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो
आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवा आणि प्रयत्नांना भारत नेहमीच स्मरणात ठेवेल
उपराष्ट्रपती कार्यालय उपराष्ट्रपतींनी जनतेला नवरोझ निमित्त दिल्या शुभेच्छा नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी जनतेला नवरोजनिमित्त एका संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत
पारसी नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या नवरोझच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देशातील जनतेला माझे हार्दिक अभिवादन ते म्हणाले की कठोर परिश्रम आणि आणि समर्पणातून भारतातील पारसी समाजाने अतिशय उत्साहाने राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान दिले आहे
पारसी नववर्ष हे वसंत ऋतूला सूचित करीत नूतनीकरण आणि पुन्हा उत्साह देणारा उत्सव आहे
नवरोजला खऱ्या अर्थाने साजरे करणे म्हणजे चांगले विचार आत्मसात करणे चांगली कामे करणे सत्याने जगणे आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालणे होय उपराष्ट्रपती म्हणाले कोविड19 विरोधातला लढा सुरूच राहणार आहे आपल्या घरापुरता मर्यादित असलेल्या उत्सावात आता आपण संतुष्ट असले पाहिजे
उत्सव साजरा करताना देखील आपण सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षा निकषांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे
हा सण आपल्या आयुष्यात समृद्धी भरभराट आणि आनंद आणेल अशी इच्छा व्यक्त त्यांनी व्यक्त केली
गृह मंत्रालय अमली पदार्थ विरोधी ब्रिक्स कार्यसमूहाची चौथी बैठक पार पडली आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी अधिवेशनासाठी पाच सदस्य देशांची पुष्टी स्वीकारलीब्रिक्स देशांमधील वास्तविक वेळ माहिती सामायिक करण्यासाठी भारताने केली मध्यवर्ती केंद्रांची मागणीमादक द्रव्यांच्या वाहतुकीसाठी अंधाराचा गैरफायदा न घेण्यावर आणि प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर न करण्यावर बैठकीत लक्ष केंद्रित नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स अँटी ड्रग वर्किंग ग्रुपचे चौथे सत्र या आठवड्यात पार पडले
भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी केले
रशियाच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे यंदाचे सत्र पार पडले
ब्रिक्स राज्यांमधील अमली पदार्थांच्या स्थितीसंबंधी मतांची फलदायी देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनधिकृत पद्धतीने होणारी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या पद्धती मानसिक संतुलन बिघडविणारे पदार्थ आणि त्यांचे पूर्वगामी तसेच परिस्थितीवरील विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांचा होणारा परिणाम शिखर परिषदेत चर्चेत आला
चर्चेदरम्यान उद्भवलेल्या समान मुद्यांमध्ये सदस्य देशांमधील वास्तिविक माहिती सामायिक करणे आणि सागरी मार्गांद्वारे वाढलेल्या अमली पदार्थांच्या वाहतुकीवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे
अंधाराचा गैरफायदा आणि अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी इतर प्रगत तंत्रज्ञानाचा गैरवापर हे या बैठकीचे प्रमुख मुद्दे होते
सदस्य देशांनी एक आज्ञापत्र स्वीकारले आहे ज्यामध्ये बैठकीत चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश होता
संरक्षण मंत्रालय एनसीसीचा 173 सीमावर्ती आणि किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मोठा विस्तार होणार नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमावर्ती आणि किनारपट्टी जिल्ह्यांतील युवकांच्या आकांक्षापूर्तीसाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मोठ्या विस्तार योजनेला मंजूरी दिली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ही घोषणा केली होती
सीमावर्ती आणि किनारपट्टी 173 जिल्ह्यांतील 1000 पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालांयातील एक लाख कॅडेटस एनसीसीमध्ये सहभागी होतील
यात एकतृतीयांश कॅडेटस मुली असतील
एनसीसी कॅडेटसच्या प्रशिक्षणासाठी 83 एनसीसी युनिट्स (लष्कर 53 नौदल 20 हवाईदल 10) यांचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे
सीमावर्ती क्षेत्रांतील एनसीसी युनिट्सना लष्कराकडून प्रशिक्षण आणि प्रशासकीय मदत केली जाईल नौदल किनारपट्टी क्षेत्रांमध्ये आणि हवाई दल हवाई दलाच्या तळांजवळील एनसीसी युनिटसला मदत करेल
युवकांना लष्करी प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध जीवनशैली देण्याबरोबरच त्यांना सैन्य दलात सामील होण्यासाठी देखील प्रेरणा मिळेल
एनसीसी विस्तार योजना राज्यांच्या सहकार्याने राबवली जाईल
राष्ट्रपती कार्यालय अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचे राष्ट्रपतींकडून आयसीसीआर मुख्यालयात अनावरण नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) मुख्यालयात आज (16 ऑगस्ट 2020) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे आभासी पद्धतीने अनावरण केले
परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी मार्च 1977 ते ऑगस्ट 1979 या कालावधीत आयसीसीआरचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले आज या आभासी सोहळ्याच्या माध्यमातून भारताच्या राजकारणात भव्यदिव्य अध्याय रचणाऱ्या अतिशय प्रतिभासंप्पन्न देशाभिमानी व्यक्तीला अभिवादन करीत आहोत
ते म्हणाले कि अटलजी उदारमतवादी विचारसरणीसाठी आणि लोकशाही आदर्शांसाठी नेहमी कटिबद्ध होते
पक्षाचे कार्यकर्ते खासदार संसदेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समित्यांचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची अमिट छाप सोडली
राष्ट्रहित नेहमीच सर्वश्रेष्ठ असते ही शिकवण अटलजी यांनी त्यांच्या आचरणाने सर्व राजकीय पक्ष आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय लोकांना दिली होती
आज कोविड 19 मुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे
परंतु या महामारीतून सावरल्यानंतर आपण प्रगती व समृद्धीच्या मार्गावर वेगाने जाऊ आणि 21 वे शतक भारताचे शतक बनविण्याचे अटलजींचे स्वप्न साकार करण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला
तत्पूर्वी आज सकाळी राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सदैव अटल या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली
राष्ट्रपतींचा संदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रलयाकडून बांधकाम उपकरणे आणि वाहनांच्या मसुद्यात सुधारणा संदर्भात सूचनांसाठी निमंत्रण नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी बांधकाम उपकरणे आणि वाहने यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या उपकरणांच्या चालकाची सुरक्षिततेची तरतूद करण्यासाठी आणि इतर वाहनांसह सार्वजनिक रस्त्यावर अशी वाहने धावतानांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 13 ऑगस्ट 2020 च्या जीएसआर 502 (इ) अन्वये या वाहनांच्या सुरक्षिततेसंदर्भात वाहन अधिसूचना जारी केली आहे
सद्यस्थितीला सीएमव्हीआर 1989 नुसार बांधकाम उपकरणाच्या वाहनांसाठी काही सुरक्षितता आवश्यकता आधीच अनिवार्य केल्या आहेत
एआयएस (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड) 160 नुसार व्हिज्युअल डिस्प्ले ऑपरेटर स्टेशन आणि देखभाल क्षेत्र नॉनमेटलिक इंधन टाकी मिनिमम ऍक्सेस डायमेन्शन आणि ऍक्सेस सिस्टम यासारख्या अनेक अतिरिक्त सुरक्षा आवश्यकतांची ओळख करुन देणे हा या मानकचा हेतू आहे
या संदर्भातील सूचना किंवा अभिप्राय सहसचिव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय परिवहन भवन संसद मार्ग नवी दिल्ली 100001 (ईमेल jspbmorthgovin) यांना मसुदा सूचना जारी केल्याच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत पाठवता येतील
केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे 50000 मृत्यूसंख्या ओलांडायला अमेरिकेला 23 दिवस ब्राझीलला 95 दिवस आणि मेक्सिकोला 141 दिवसांचा अवधी लागला तर या संख्येपर्यंत पोचण्यासाठी भारताला 156 दिवस लागले
केंद्र आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार देखरेखीसह घरातील विलगीकरण ऑक्सिजनचा सौम्य प्रमाणातील वापर आणि रूग्णांना त्वरित व वेळेवर उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे
त्यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की भारताचा प्रकरण मृत्यू दर (सीएफआर) जागतिक सरासरीच्या खाली राखला जाईल
चाचणीची आक्रमकपणे यशस्वी अंमलबजावणी करणे उपाययोजनांच्या व्यापकतेने संपूर्णपणे आढावा घेणे आणि चाचणी करणे यामुळे रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाण देखील सातत्याने वाढते राहिले आहे
भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 72 पर्यंत पोहोचला आहे तो आणखी वाढेल याची खात्री असून अधिकाधिक रुग्ण बरे होतही आहेत
गेल्या 24 तासात 53322 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे या संख्येसह बरे झालेल्या कोविड19 रुग्णांची संख्या 186 लाखांपेक्षा (1862258) जास्त झाली आहे
बरे होण्याच्या रुग्ण संख्येत निरंतर वाढ होत असल्यामुळे हे निश्चित झाले आहे की देशातील रुग्णसंख्येच्या टक्केवारीचे प्रमाण आता कमी होत आहे
सध्याचे सक्रीय रुग्ण (677444) देशातील वास्तविक रुग्णसंख्या दर्शवितात
आजच्या एकूण पॉजिटीव प्रकरणांपैकी ही 2616 टक्के आहे गेल्या 24 तासांत ही नोंद कमी झाली आहे
कार्यक्षम आणि आक्रमक चाचणींद्वारे भारत ३ कोटी कोविड चाचण्या पूर्ण करण्याकडे वेगाने वाटचाल करीत आहे आतापर्यंत 29309703 नमून्यांची चाचणी घेण्यात आली आहे
तर गेल्या 24 तासात 746608 चाचण्या करण्यात आल्या आहेत
सरकारी क्षेत्रातील 969 प्रयोगशाळेच्या आणि 500 खासगी प्रयोगशाळांमध्ये अशा एकूण 1469 निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या जोडल्या जाणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या राष्ट्रीय नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे
रेल्वे मंत्रालय भारतीय रेल्वेमार्फत गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार झारखंड मध्य प्रदेश ओदिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यात 55 लाखाहून अधिक मनुष्यदिन रोजगार निर्मिती नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 भारतीय रेल्वेने गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत बिहार झारखंड मध्य प्रदेश ओदिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेश या 6 राज्यात 55 लाखाहून अधिक मनुष्यदिन रोजगार निर्मिती केली आहे
या योजने अंतर्गत प्रकल्पातील कामाची प्रगती व त्याद्वारे या राज्यांमधील स्थलांतरित मजुरांना रोजगार निर्मितीच्या संधीवर रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल बारकाईने लक्ष ठेवून आहेत
या राज्यात सुमारे 2988 कोटी रुपये खर्चाचे सुमारे 165 रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येत आहेत
14 ऑगस्ट 2020 पर्यंत या अभियानामध्ये 11296 कामगार जोडले गेले असून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी कंत्राटदारांना 133684 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत
राज्य सरकारबरोबर जवळून समन्वय स्थापित करण्यासाठी रेल्वेने प्रत्येक जिल्ह्यात तसेच राज्यांत नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत
स्थलांतरितांना प्रकल्पात काम मिळण्याबरोबरच मोबदला मिळणे सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी विभागीय स्तरावर रेल्वे प्रशासनाला निर्देश दिले आहेत
कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय प्रत्येक जिल्ह्यात तक्रार निवारण पोर्टल स्थापन करण्यासाठी केंद्र सरकार जम्मूकाश्मीरला मदत करणार डॉ जितेंद्र सिंग 20 जिल्ह्यांपैकी प्रत्येक जिल्ह्यात ऑनलाईन सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलसाठी डीएआरपीजी आणि जम्मू काश्मीर सरकार यांच्यात अधिक सहकार्य नवी दिल्ली 16 ऑगस्ट 2020 जम्मूकाश्मीर केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक 20 जिल्ह्यात तक्रार निवारण पोर्टल स्थापित करण्यासाठी केंद्र सरकार जम्मूकाश्मीर सरकारला मदत करेल अशी घोषणा आज ईशान्य प्रदेश विकास विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री कार्मिक सार्वजनिक तक्रारी पेन्शन अणु उर्जा आणि अवकाश मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केली
जम्मूकाश्मीरमध्ये सुरू असलेल्या सुशासन उपक्रमांना बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण अभियान म्हणून डॉजितेंद्र सिंह आणि जम्मूकाश्मीरचे नायब राज्यपाल यांनी केंद्रशासित प्रदेशात ऑनलाइन सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टलच्या विस्ताराच्या पुढील टप्प्यातील योजनेवर दूरध्वनीद्वारे चर्चा केली
हा उपक्रम राबविण्यासाठी भारत सरकारचा प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभाग (एआरपीजी) जम्मूकाश्मीर सरकारबरोबर सुरू असलेल्या सहकार्यातून तक्रार निवारणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रकरणांची कमी कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अखेरच्या टप्प्यातील तक्रार निवारण अधिकाऱ्यांच्या सहाय्याने आवाज ईअवम पोर्टलचे नूतनीकरण करण्याच्या कामात आणखी वाढ करेल असा निर्णय घेण्यात आला आहे
जितेंद्र सिंह यांनी सांगितले की या प्रयत्नांच्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत जम्मूकाश्मीर सरकारबरोबर काम करण्यासाठी डीएआरपीजीच्या अधिकाऱ्यांचे एक प्रेरित पथक स्थापन केले जाईल
pib headquarters पत्र सूचना कार्यालयाचे कोविड19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र दिल्लीमुंबई 16 ऑगस्ट 2020 (कोविड19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) मुख्यालयात आज (16 ऑगस्ट 2020) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे आभासी पद्धतीने अनावरण केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी नववर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत
ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा पारसी समुदायाच्या उल्लेखनीय योगदानाची भारताला जाणीव आहे
येणारे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता आणि भरभराट घेऊन येवो ही सदिच्छा आरोग्य मंत्रालयाची कोविड19 घडामोडींवरील माहिती इतर अपडेट्स ब्राझील रशिया चीन दक्षिण आफ्रिका आणि भारत यांचा समावेश असलेल्या ब्रिक्स अँटी ड्रग वर्किंग ग्रुपचे चौथे सत्र या आठवड्यात पार पडले