news
stringlengths
344
19.5k
class
int64
0
2
पॉर्न जगतातून बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सनी लिओनी सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करते आहे . बंगळुरु येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी सध्या तिचा विरोध केला जात असून , वर्षअखेरीस होणाऱ्या तिच्या कार्यक्रमावर कन्नड समर्थकांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे . सनीचा कार्यक्रम हा भारतीय संस्कृतीसाठी घातक असल्याचे मत या संघटनेतर्फे मांडण्यात आले आहे . गुरुवारपासूनच सनीच्या या कार्यक्रमाविषयी अनेकांनी विरोध केल्याचे पाहायला मिळते आहे . ३१ डिसेंबरला बंगळुरुमध्ये सनीचा कार्यक्रम झाला तर , मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन आत्महत्या करतील असा इशारा‘कन्नड रक्षक वेदिके युवा सेने’च्या कार्यकर्त्यांनी दिला आहे . सनीचा कार्यक्रम संस्कृतीच्या दृष्टीने घातक असणाऱ्या या कार्यकर्त्यांनी तिने साडी नेसून परफॉर्म केले तर त्याला आमचा विरोध नसेल , असेही म्हटले आहे . वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय… त्याविषयीच एका कार्यकर्त्याने , या कार्यक्रमाला विरोध करण्यामागचे कारणही स्पष्ट केले . ‘सनी लिओनीच्या तोकड्या कपड्यांचा आम्ही विरोध करतो . त्याऐवजीच तिने जर साडी नेसून परफॉर्मन्स केला तर आम्हीही तो कार्यक्रम पाहू . सध्या जरी सनी एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरीही तिच्या भूतकाळाविषयी आपले चांगले मत नसून अशा व्यक्तींना आम्ही कधीच प्रोत्साहन देणार नाही’ , असे मत त्या कार्यकर्त्याने मांडल्याचे वृत्त स्पॉटबॉय ईने प्रसिद्ध केले आहे . तेव्हा आता नववर्षाच्या पूर्वसंध्येला सनीचा हा कार्यक्रम पार पडणार , की कार्यकर्त्यांच्या दबावामुळे कार्यक्रम रद्द होणार , हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे .
0
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचे विविध पैलू दाखवलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री मैथिली जावकर हिंदी मालिकेत एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे . क्राईम पेट्रोल , सावधान इंडिया यांसारख्या मालिकांमध्ये , अॅण्ड टिव्ही वाहिनीवरील ‘होशियार’ ही नवी मालिका आपले वेगळेपण दाखवायला सज्ज आहे . या मालिकेत येत्या शनिवारी म्हणजेच ७ जानेवारी रोजी प्रसारित होणाऱ्या भागात एका महत्त्वाच्या भूमिकेत आपली मराठमोळी अभिनेत्री मैथिली झळकणार आहे . मुलींची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा सामना करत त्यांना पोलीसात पकडून देणाऱ्या एका धाडसी महिलेची भूमिका मैथिली साकारणार आहे . तिच्या या धाडसाची कहाणी शनिवारी ७ जानेवारी रोजी रात्री १० ते ११ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार ८ जानेवारी रोजी सकाळी ११ः३०वाजता फक्त अॅण्ड टिव्हीवर पाहायला मिळणार आहे . दरम्यान , ‘मोहब्बते’ सिनेमाचा अभिनेता जिमी शेरगिल याला पडद्यावर चांगली मुलगी मिळत नाही . प्रत्येक सिनेमात त्याला आवडणारी मुलगी दुसरेच कोणीतरी घेऊन जाताना दिसते . त्यामुळे आता जिमी शेरगिल आपली नवरी शोधण्यासाठी चक्क ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेच्या सेटवर गेला होता . ‘भाभी जी घर पर है’ आठवड्याच्या विशेष भागात विभूतिने म्हणजे ( आसिफ शेख ) स्वतःचे विवाह मंडळ सुरू केले असते , जिकडे जिमी स्वतःला एखादी चांगली मुलगी शोधण्यासाठी जातो . या भागात जिमी शेरगिल त्याच्या ‘तनु वेड्स मनु’च्याच व्यक्तिरेखेमध्ये दिसला होता . त्याची या व्यक्तिरेखेची ही व्यथा असते की , त्याला जी मुलगी आवडते ती मुलगी लग्नाच्या दिवशीच पळून जाते . या भागात विभूती त्याच्या या अडचणीवर उपाय देताना दिसला होता . पण शेवटी परत काही ना काही गडबड होते जेव्हा जिमीला कळते की ज्या मुलीची त्याने निवड केली आहे , तिचे दुसऱ्याच एका मुलावर प्रेम असते आणि तिही तिच्या प्रियकरासोबत पळून जाते .
0
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात फिरकीपटू आर . अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना स्थान न देता विश्रांती देण्यात आली . या निर्णयावर बऱ्याच जणांनी टीका केली असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे . ‘‘चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर निवड समितीने धोरणांमध्ये काही बदल केले आहेत . फिरकी माऱ्यामध्ये विविधता यावी यासाठी त्यांनी मनगटाच्या जोरावर चेंडू वळवणाऱ्या फिरकीपटूंना संधी देण्याचे ठरवले असावे . याबाबत निवड समितीने अश्विन आणि जडेजा यांच्याशी संवाद साधला असेल , ’’ असे लक्ष्मण म्हणाला . लंडनमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाची संघबांधणी करण्याचा निर्णय निवड समितीने घेतला असून त्यामुळे संघात काही प्रयोग केले जात आहेत . प्रत्येक खेळाडूला चाचपडून पाहिले जात असून त्यानंतरच विश्वचषकाचा संघ निवडण्यात येणार आहे . ‘‘अश्विन आणि जडेजा संघात नाहीत , याचा अर्थ त्यांना डच्चू दिला असा होत नाही . त्यांनाही यापुढे संधी दिली जाऊ शकते . हार्दिक पंडय़ाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अधिक सातत्य दाखवावे लागेल . यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना ज्या पद्धतीने भारताला सामना जिंकवून द्यायचे , ती भूमिका पंडय़ाला यापुढे वठवावी लागणार आहे , ’’ असे लक्ष्मणने सांगितले .
2
इंग्लंडमधील क्रिकेटच्या कसोटीस उतरण्यासाठी भारतीय संघाच्या प्रयत्नास उद्यापासून सुरवात होईल . या दोन संघांदरम्यान उद्या पहिला टी - 20 सामना होईल , तेव्हा भारतीय संघ नक्कीच या दौऱ्याची यशस्वी सुरवात करण्यासाठी उत्सुक असेल . भारतीय संघ तीन टी - 20 , तीन वन - डे आणि पाच कसोटी सामने असे भरगच्च क्रिकेट या दौऱ्यात खेळणार आहे . भारतीय संघ येथील हवमानाशी जुळवून घेण्यासाठी लवकर येथे आला आहे ; तसेच या सामन्यापूर्वी ते आयर्लंडविरुद्ध दोन सामनेदेखील खेळले आहेत . त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आता खेळाडूंची ताकद ओळखून आहे . या दोन सामन्यांनंतर तरी भारतीय संघ मधल्या फळीत स्थिरता शोधताना दिसतोय असे वाटते . सुरेश रैना अत्यंत उपयुक्त खेळाडू असला तरी निव्वळ फलंदाज म्हणून लोकेश राहुलवर भरवसा ठेवला जाऊ शकतो . जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने भुवनेश्वर कुमारसोबत उमेश यादवला पसंती दिली जाईल . कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलची यशस्वी जोडी इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करते हे महत्त्वाचे ठरेल . इंग्लंडची मदार " थ्री जें ' वर म्हणडे जेसन रॉय , जोस बटलर आणि जॉर्न बेअरस्टॉ यांच्यावर असेल . मँचेस्टरमध्ये गेले काही दिवस कडक ऊन पडले असल्यामुळे खेळपट्टी संपूर्ण सुकलेली आणि फलंदाजीला पोषक असेल असे दिसते . हा सामना संध्याकाळी होत असल्यामुळे त्याच वेळेस होणाऱ्या इंग्लंडच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील कोलंबियाविरुद्धच्या लढतीकडे लंडनवासियांचे डोळे असणार आहेत . त्यामुळे या सामन्यास प्रेक्षकांच्या उपस्थितीविषयी शंका घेतली जात आहे . बेधडक क्रिकेट खेळणार - कोहली सर्वोत्तम क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडला रोखण्याचे आमच्यासमोर आव्हान नसून , ती संधी आहे , असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले . आयर्लंडविरुद्धच्या सामन्यांनी चांगला सराव झाला आहे . घरच्या मैदानावर खेळणार असल्याने इंग्लंडवर दडपण राहील . आम्ही मात्र एकदम बिनधास्त क्रिकेट खेळणार आहोत , असेही कोहली म्हणाला .
2
मुळचा मुंबईचा मात्र सध्या विदर्भाकडून रणजी क्रिकेट खेळणाऱ्या वासिम जाफरने रणजी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे . रणजी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा वासिम पहिला फलंदाज ठरला आहे . बडोद्याविरुद्ध सामन्यामध्ये वासिमने ही कामगिरी केली . नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर हा सामना सुरु आहे . वासिम जाफरने विदर्भाचा कर्णधार फैज फजलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 300 धावांची भागीदारी रचली . फजल माघारी परतल्यानंतर वासिमने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे . याचसोबत वासिमने आपला जुना मुंबईकर सहकारी अमोल मुझुमदारचा विक्रमही मोडला आहे . वासिमने पहिल्या डावात 153 धावांची खेळी केली . संक्षिप्त धावफलक – विदर्भ पहिला डाव 529/6 डाव घोषित . वासिम जाफर 153 , फैज फजल 151 , अक्षय वाडकर नाबाद 102 . लुकमन मेरीवाला 2/79 विरुद्ध बडोदा , केदार देवधर , आदित्य वाघमोडे दोन्ही फलंदाज नाबाद 20 दुसऱ्या दिवसाअखेरीस बडोदा 41/0
2
नाताळ म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव , सर्व जगभरात साजरा केला जातो . भारतात ज्या प्रमाणे दिवाळी किंवा ईद साजरी केली जाते तितक्याच मोठ्या प्रमाणात नाताळही साजरा केला जातो . हा सण ख्रिस्त बांधवांचा असला तरीही हा सण साजरा करणाऱ्या इतर धर्मियांचे प्रमाण लक्षणीय आहे . प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेम , करुणा आणि वात्सल्याचा संदेश घेऊन हा सण येतो . प्रभू येशूच्या दिव्यत्वाची प्रचिती जगभरातील कोट्यावधी लोकांना आली आहे . त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी दिलेल्या प्रेम , शांती , समता आणि बंधुता या तत्वावर मानवतेची वाटचाल होत आहे . नाताळ म्हणजे सुट्ट्या आणि उत्साहाचे वातावरण . नाताळच्या तयारीची लगबगही सुरू असणार . खरेदी , घर सजवणे , मिठाई आणि किंवा तयार करणे , ख्रिसमस ट्रीची सजावट करणे आणि पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करणे यामध्ये बहुतांश वेळ जात असेल . वेगवेगळ्या शहरात राहणारे कुटुंबाचे सदस्य एकाच ठिकाणी येऊन हा सण साजरा करतात . आपल्या आप्तेष्ठांना शुभेच्छा देण्याची , मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची ही खास वेळ असते . परंतु , काही कारणास्तव सर्वजण एकत्र येऊ शकत नाही किंवा आपले अनेक मित्र - मैत्रीण , नातेवाईक असतात त्यांना या दिवशी भेटणे शक्य होत नाही . त्यामुळे त्यांना व्हाट्सअॅप , फेसबुक किंवा मेसेजद्वारे शुभेच्छा देणे हा पर्याय उपलब्ध राहतो . आम्ही काही संदेशांचे संकलन केले आहे . आपल्या आप्तेष्टांंना देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करा . १ . नाताळचा सण , सुखाची उधळण , मेरी ख्रिसमस , तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा २ . ही ख्रिस्त जयंती आणि येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो या शुभेच्छा ३ . आला पाहा नाताळ घेऊनी आनंद चहुकडे , केलेल्या चुकांची माफी मागा प्रभूकडे , मनात धरुया आशा सर्व सुखी राहू दे , सुरात गाऊया धर्मगाणे मदतीचे ४ . येशू ख्रिस्तांचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात प्रेम , आनंद , उत्साह , हास्य आणि समाधानाचा वर्षाव घेऊन येवो . मेरी ख्रिसमस ५ . सारे रोजचेच तरीही भासे नवा सहवास , सोन्यासारख्या लोकांसाठी खास , नाताळच्या शुभेच्छा ६ . प्रभूचा आशिष अवतरला , नव साज घेऊनी , आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी ७ . वात्सल्याचा सुगंध दरवळला , आनंदाचा सण आला , विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला ८ . सगळा आनंद , सगळं सौख्य , सगळ्या स्वप्नांची पूर्तता , यशाची सगळी शिखरं , सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे याच नाताळच्या शुभेच्छा ९ . आपल्या जीवनातील सुख समृद्धी वाढू दे , जीवनातील अशुभाचा अंधकार मिटू दे हीच प्रभू येशू चरणी प्रार्थना करुन मी आपणास नाताळच्या शुभेच्छा देतो . १० . या नाताळच्या शुभक्षणांनी , आपली सारी स्वप्ने साकार व्हावी , या नाताळची पहाट ही अनमोल आठवण ठरावी , प्रभू येशूच्या कारुण्याच्या नजरेनी आपली दुःखे विरावी याच नाताळच्या शुभेच्छा . ११ . आला नाताळ सण , घेऊनी आनंद मनात , सर्व चुकांची माफी मागितली मनात , सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात , मदत हाच धर्म , गाणे गावे सुरात . या नाताळात , सांताक्लॉज आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो ! नाताळच्या शुभेच्छा ! मेरी ख्रिसमस . !
1
‘वक्त’ चित्रपटात पीसीचं अक्कीसोबत ‘लेट्स प्ले होली’ गाणं चांगलंच गाजलं . त्यानंतर आता प्रियांका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर होळी साँग घेऊन येणार आहे . पण पीसी या वेळी चक्क दबंग खानसोबत होळी खेळणार आहे . सलमानच्या ‘भारत’ चित्रपटात प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे . भारतमध्ये एक स्पेशल होळी गाणं सलमान - प्रियांकावर चित्रित करण्यात येणार असल्याची सध्या बी - टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे . अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटला १७ जुलैपासून सुरुवात होणार आहे . भारतमधील सलमान - प्रियांकाचे हे होळी गाणं तीन दिवस शूट केले जाणार असल्याचे समजत आहे . भारत चित्रपट ‘अॅन ओड टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे . सलमान - प्रियांकावर चित्रित करण्यात येणारं हे होळी सणाचं गाणं त्यांच्या चाहत्यांना वेड लावणार एवढं नक्की .
0
तेलगू चित्रपट बाहुबली हा विविध भाषांमध्ये डब करण्यात आला होता . या चित्रपटाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते . आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘बाहुबली २ द कनक्ल्यूजन’ या नावाने येणार आहे . पण , तुम्हाला माहित आहे का , ‘बाहुबली २’ चा ट्रेलरही आता प्रदर्शित करण्यात आला आहे . मात्र , यात एक गोष्ट वेगळी आहे . हा ट्रेलर ‘बाहुबली २’ चित्रपटाचा नसून ‘बाहुबली २ निवडणूक संग्रामा’चा आहे . संपूर्ण देशभरात छाप पाडणा - या या चित्रपटाने राजकीय नेत्यांनाही भुरळ पाडली आहे . सध्या निवडणूकांचे वारे जोरात वाहत आहेत . त्याच्या प्रचारासाठी विविध पक्षांकडून नागरिकांना आश्वासने दिली जात आहेत . पण , त्याचबरोबर काहींनी एक वेगळे प्रचारतंत्र वापरण्याचे ठरवलेले दिसतेय . उदाहरण घ्यायचे झालेच तर तामिळनाडूत फोटोशॉपचा वापर करून प्रचारासाठी विविध क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत . काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या जयललिता यांना तामिळनाडूच्या अम्मा ते बाहुबली अम्मा असे दाखविण्यात आले आहे . दरम्यान , बाहुबलीच्या दुस - या चित्रपटाची लोकांमध्ये उत्सुकता असताना त्याचा फायदा घेत नेते मंडळींनी ‘बाहुबली २’ चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे . या ट्रेलरमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांना उत्तराखंडचे तारणहर्ता म्हणून दाखविण्यात आले आहे . यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनाही दाखविण्यात आले आहे . हा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला असून त्यास पाच हजारांपेक्षाही जास्त शेअर्स मिळाले आहेत . तसेच , जवळपास अडीच लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहला आहे . सदर व्हिडिओत , बाहुबलीमध्ये ज्याप्रमाणे प्रभास हा आपल्या आईचा त्रास वाचविण्यासाठी शिवलिंग आपल्या खांद्यावर घेतो त्याप्रमाणे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी संपूर्ण उत्तराखंडचा भार त्यांच्या खांद्यावर घेतल्याचे दाखविण्यात आले आहे . प्रभास शिवलिंग उचलून त्याच्या खांद्यावर घेतो या दृश्यावर हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे .
0
ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिका हिने पहिल्या फेरीतील पहिल्या टायब्रेकमध्ये जॉर्जियाच्या सोपिको गुरामिश्विली हिचा पराभव करून महिलांच्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मजल मारली . पद्मिनी राऊत हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे आव्हान संपुष्टात आले . हरिकाने टायब्रेकमध्ये २ . ५ - १ . ५ असा विजय मिळवला . पद्मिनीला कझाकस्तानच्या झान्साया अब्दुमलिक हिने १ . ५ - २ . ५ अशा फरकाने हरवले . ६४ बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने आधीच दुसरी फेरी गाठली आहे . मात्र सर्वाचे लक्ष हरिकाकडे लागले असताना तिने बरोबरी पत्करल्यानंतर जलद टायब्रेकरमध्ये विजय मिळवत चाहत्यांना निराश केले नाही . पेट्रॉप बचाव पद्धतीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरिकाने सुरुवातीपासूनच वजिराच्या साहाय्याने हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला . दोघींनीही एकमेकांचे मोहरे टिपण्यावर भर दिला . सोपिको हिने उंटाची जोडी गमावली , पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही . हरिकाने आपल्या उंटांच्या साहाय्याने सोपिकोला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला . पण ७२व्या चालीनंतर हा सामना बरोबरीत सुटला . हम्पी आणि हरिका यांनी आगेकूच केली असली तरी गोव्याची ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णी हिला रशियाच्या नातालिजा पोगोनिना हिच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला . आता हम्पीची पुढील फेरीत गाठ पोलंडच्या जोलांता झावाझाका हिच्याशी पडणार आहे . हरिकाला दुसऱ्या फेरीत जॉर्जियाच्या बेला कोटेनाश्विली हिच्याशी लढत द्यावी लागेल .
2
गेल्यावर्षी अॅपलनं आपला सर्वात महागडा iPhone X हा फोन लाँच केला . अद्यावत तंत्रज्ञानानं युक्त असलेल्या या फोनमधल्या फेस रिकग्नेशन फीचरनं त्याला वेगळी ओळख दिली . पण , लाँच केल्यानंतर अॅपलच्या या महागड्या फोनला अपेक्षित असा प्रतिसाद न लाभल्यानं यावर्षात आयफोनX ची विक्री कंपनीकडून थांबवण्यात येईल अशी शक्यता सुप्रसिद्ध विश्लेषक मिंग ची क्युओनं वर्तवली आहे . सप्टेंबर २०१७ मध्ये अॅपलनं iPhone X आणि iPhone 8 Plus लाँच केले होते . पण , iPhone X ला अपेक्षित प्रतिसाद ग्राहकांकडून लाभला नाही त्यातूनही चिनी ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे कमी होता . आयफोन ८ हा आयफोन X पेक्षाही चिनी ग्राहकांच्या जास्त पसंतीस उतरला असं मिंगनं अॅपलइनसायडरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आणि याच कारणामुळे आयफोन x ची विक्री २०१८ मध्ये थांबवण्यात येईल असं भाकित मिंग यांनी वर्तवलं आहे . यावर्षात अॅपल तीन नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि हे फोन बाजारात दाखल झाल्यानंतर कंपनीकडून रितसर सर्वात मडागड्या फोनचं उत्पादन थांबवण्यात येईल . अॅपलच्या दशकपूर्तीनिमित्त हा फोन लाँच करण्यात आला होता . या फोनची भारतीय बाजारपेठेतील किंमत ८९ हजार रुपये आहे . मिंगनं नोंदवलेल्या निरिक्षणानुसार फोन लाँच केल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत आयफोन x ची मागणी जितकी असायला हवी होती त्यापेक्षा त्यात काही पटींनी घट झाली आहे , म्हणूनच हा फोन येणाऱ्या काळात उपलब्ध नसेल असं मिंगच म्हणणं आहे .
1
सहा वर्षांत तिसऱ्यांदा ब्रिटनमधील क्षयरुग्णांच्या संख्येत घट झाली आहे . गेल्या ३५ वर्षांतील ब्रिटनमधील क्षयरुग्णांची ही सर्वात कमी संख्या आहे . ब्रिटनमधील आरोग्य अहवालातील माहितीनुसार २०१२मध्ये क्षयरुग्णांची संख्या ३८ टक्क्यांनी घटली होती . तर २०१७मध्ये तिच्यात ९ . ३ टक्क्यांनी घट झाली . औषधे , उपचारपद्धती आणि जागरूकतेमुळे क्षयरुग्णींची संख्या घटल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे . तरीही पश्चिम युरोपातील सर्वाधिक क्षयरुग्ण असलेला देश म्हणून ब्रिटनकडे पाहिले जाते . या देशात केवळ ५ , २०० क्षयरुग्ण आहेत . जगभरात आजही क्षयरोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे . जागतिक क्षयरोग दिनानिमित्त २४ मार्च रोजी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता . क्षयरोगाच्या जागरुकतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून २३ ते २५ मार्चदरम्याम मोहीम राबविण्यात आली होती . या मोहिमेत ब्रिटनमध्ये यापुढेही क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी अशाच प्रकारे ठोस कार्यक्रम राबविण्यात येईल , अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली . ब्रिटनमधील राष्ट्रीय क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ . साराह अँडरसन म्हणाल्या की , देशातील दरवर्षी पाच हजार जणांना क्षयरोग होतो . हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत . क्षयरोगाविरोधात लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे , असे आवाहनही त्यांनी केले . तसेच , सरकारनेही नियोजित कार्यक्रम आखल्यास क्षयरोगाला पराभूत करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले .
1
मुंबई : माझे बाबा प्रत्येक गोष्टीवर आपले मत मांडतात . ते प्रामाणिक आहेत . त्यांच्या मनात जे येईल ते ते बोलतात . पण मला तसे जमत नाही . मी बऱ्याचदा खोटी , ठरलेली उत्तरे देतो , अशी कबुली अभिनेता रणबीर कपूरने दिली आहे . सध्या जग्गा जासूस प्रदर्शिित झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रणबीरकडे वळले आहे . त्याला अनेक बाबींवर प्रश्न विचारले जातात . त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरेही देतो आहे . अशात ऋषी कपूर सतत काहीबाही स्फोटक बोलत असतात . अशावेळी या त्यांच्या वागण्याबद्दल कुणी विचारले असता त्याने हा खुलासा केला . माझे बाबा प्रमाणिक आहेत , त्यांना त्यांची अशी मते आहेत . ते ती मांडत असतात . त्याला धाडस लागते . पण मी तसा नाही . माझी उत्तरे ठरलेली असतात . बऱ्याचदा खोटी उत्तरे देऊन मी वेळ मारून नेतो , असे तो म्हणाला .
0
सण - उत्सवांच्या काळात अनेकजण आपापल्यापरीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात . त्यामुळेच या ‘फेस्टिव्ह सिजन’मध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी आम्ही काही टिप्स येथे देत आहोत . यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नसून , फक्त काही सोपे उपाय करायचे आहेत . सणासुदीच्या वातावरणात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे . दिल्लीच्या ‘पचौली स्पा आणि वेलनेस’ सेंटरच्या कॉस्मेटोलॉजिस्ट प्रीती सेठ यांनी काही टिप्स दिल्या आहेत . आकर्षक दिसण्यासाठी या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात . खूप पाणी प्या – तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढी तुमच्या त्वचेची चमक वाढेल . जास्तीतजास्त पाणी प्यायल्याने शरीरातील अपायकारक घटक आणि टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते . यासाठी दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्या . सूर्याच्या किरणांपासून बचाव करा – सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदी आणि सेलिब्रेशनसाठी तुम्हाला बाहेर जावे लागते . उन्हात फिरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे . सूर्याच्या उष्णतेतून निघणारे अल्ट्रा - वायलेट किरण त्वचेसाठी अपायकारक असतात . त्यामुळे बाहेर पडताना जवळ छत्री बाळगा आणि SPF 45 सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा . याशिवाय पूर्ण हाताचे कपडे घाला आणि डोळ्यांवर गॉगल लावा . त्वचेला मॉश्चराइज करा – चेहरा दिवसातून केवळ दोन वेळाच धुवा , अधिक वेळा धुतल्यास तो रुक्ष पडेल . दररोज चंगल्याप्रतीचे हर्बल मॉश्चराइजर क्रिम चेहऱ्याला लावा . त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि तजेलदार राहील . क्लिंजिंग , टोनिंग और मॉश्चराइजिंग – दिवसातून एकदातरी क्लिंजिंग , टोनिंग आणि मॉश्चराइजिंग करा . क्लिंजिंगसाठी दूध आणि मॉश्चराइजिंगसाठी ऑलिव ऑईलचा वापर करा . कोमट पाण्याने अंघोळ करा – अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा . शरीर ठणठणीत राहावे म्हणून अनेकजण जिममध्ये घाम गाळतात अथवा बागेत व्यायाम करताना दिसतात . परंतु नियमितपणे घरातील एखाद्या कोपऱ्यात दोरीच्या उड्या मारल्यास याचा चांगला फायदा होऊ शकतो . दोरीच्या उड्या मारल्याने जिम अथवा व्यायामामुळे मिळणारे फायदे मिळतात . दोरीच्या उड्यामुळे केवळ आरोग्याचं नव्हे तर हृदय आणि त्वचादेखील चांगली राहते .
1
कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत . बॉलिवूडमधली बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहेत . त्यापाठोपाठ प्रियांका चोप्रा आणि निक जोनाससुद्धा विवाहबंधनात अडकणार आहेत . याव्यतिरिक्त आता दीपिकाचा कथित एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या प्रसिद्ध पार्श्वगायिका निती मोहनशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे . फेब्रुवारी २०१९ मध्ये निहार आणि निती लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे . गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत . निती मोहन बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे . ‘जब तक है जान’ चित्रपटातील ‘जिया रे’ , ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधील ‘इश्क वाला लव्ह’ , ‘पद्मावत’मधील ‘नैनोवाले ने’ या गाण्यांसाठी ती ओळखली जाते . तर निहार अभिनेता असून कंगना रणौतच्या आगामी ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे . जानेवारीत या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर निहार लगीनघाईला सुरुवात करणार आहे . वाचा : अशी झाली होती मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीची ‘दिल चाहता है’साठी निवड दीपिका तिच्या स्ट्रगलिंगच्या काळात निहारला डेट करत असल्याचं म्हटलं जातं . पुढे या दोघांचे मार्ग वेगळे झाले . मात्र आताही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं निहारने एका मुलाखतीत सांगितलं होतं .
0
मराठी रंगमंचावर सध्या तुफान गाजत असलेले नाटक म्हणजे सेल्फी . सेल्फी लवकरच १२५ प्रयोगांकडे वाटचाल करत आहे . शिल्पा नवलकर लिखित सेल्फी या नाटकाचा विषय लोकांना एवढा आवडला की हे नाटक एप्रिलमध्ये हिंदी रंगभूमीवरही आले . परितोष पेन्टर यांनी हिंदी नाटकाचे दिग्दर्शन केले असून रुपा गांगुली , दीपशिखा , लकी मोरानी , मधुरिमा निगम , उर्वशी शर्मा जोशी यांनी या नाटकात काम केले आहे . या नाटकाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे . सेल्फी आता इंग्रजीमध्येही येणार आहे . पारितोष पेन्टरने शिल्पा नवलकरकडून सेल्फीचे हिंदी आणि इंग्रजीचे अधिकार घेतले आहेत . इंग्रजी नाटकाचे दिग्दर्शन तनाझ इरानीने केले असून , नाटकाची निर्मिती पारितोष पेन्टर यांनी केले आहे . यात तनाझ इरानी , डिंपल शहा , श्वेता गुलाटी , प्रिया मलिक आणि किश्वर मर्चंड या पाच जणी काम करणार आहेत . तिन्ही भाषांचा प्रेक्षक जरी वेगळा असला तरी मूळ विषय दमदार असल्यामुळे कोणत्याही भाषेमधल्या प्रेक्षकांना सेल्फी आवडेलच . ‘इंग्रजी नाटकासाठी जॉय सिंग गुप्ता यांनी भाषांतर केले आहे . इंग्रजी भाषेतही हे नाटक येतंय याचा मला आनंदच होत आहे . प्रत्येक व्यक्तीने बघावं असं हे नाटक आहे . मराठीमध्येही या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे . अजित भुरेने दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे महिनाभर अमेरिकेत प्रयोग झाले , तर आता सव्वाशे प्रयोगांकडे आम्ही वाटचाल करत आहोत , ’ असे सेल्फीच्या लेखिका शिल्पा नवलकर म्हणाल्या .
0
हल्ली घरात वायफाय असणे ही एकप्रकारची गरज झाली आहे . कुटुंबातील व्यक्तींची संख्या आणि त्यांचा इंटरनेटचा वापर हे पाहता वायफाय घेणे परवडते . मोबाईल , लॅपटॉप तसेच नोटबुक यांसारख्या उपकरणांवर वायफाय अॅक्सेस मिळवला जातो . या वायफायचा स्पीड बऱ्याचदा कमी होतो आणि मग आपली चिडचिड होते . पुरेसे पैसे भरुनही इंटरनेट वापरण्यात अडचणी येत असल्याने काय करावे आपल्याला कळत नाही . पण आपल्याला वायफायचा चांगला स्पीड मिळवायचा असेल तर काही सोप्या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो . – राऊटर कधीच जमिनीवर ठेऊ नका , त्यामुळे सिग्नल जमिनीकडे जातो आणि आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईल वापरताना तो सिग्नल योग्य पद्धतीने मिळू शकत नाही . – वायफायचा राऊटर कॉम्प्युटरच्या जवळ ठेवल्यामुळे आपल्याला चांगला स्पीड मिळेल अशी काहींची धारणा असते . मात्र ती चुकीची आहे . टीव्ही , फ्रीज किंवा कॉम्प्युटर यांच्या जवळ राऊटर ठेवल्याने सिग्नल कमी होतो . त्यामुळे वायफायच्या बाजूला इलेक्ट्रीकची वस्तू असणार नाही याची काळजी घ्या . – राऊटर खराब होऊ नये म्हणून काही जण तो कपाटात किंवा बंद ठिकाणी ठेवतात . धूळ , पाणी आणि इतर गोष्टींपासून राऊटरला नुकसान होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश असतो . मात्र तसे न करता राऊटर एखाद्या उंच ठिकाणी ठेवावा . – तुमच्या राऊटरला अॅंटीना असतील तर त्या योग्य दिशेत राहतील याची काळजी घ्यायला हवी . दोन अँटीनांपैकी एक अँटीना सरळ तर दुसरी डावीकडे आडवी असावी . त्यामुळे तुम्हाला निश्चितच चांगला स्पीड मिळू शकतो . – सामान्यपणे राऊटरची रेंज १०० फूटांपर्यंत असते . त्यामुळे तो कुठे ठेवला आहे हे रेंज मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरते . राऊटर घराच्या मध्यभागी ठेवल्यास घरात सगळीकडे योग्य पद्धतीने रेंज मिळेल .
1
सध्याचा जमाना आहे ‘इनोव्हेशन’चा . . जागतिक पातळीवर इनोव्हेशनला मोठे महत्व आहे . आज जगात होणाऱ्या अर्थिक उलाढालींपैकी सर्वाधिक उलाढाली या केवळ इनोव्हेशन वर आहेत . हे इनोव्हेशन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्यातील कल्पकताच आहे . प्रत्येक माणसाकडे असणाऱ्या या क्लपकतेच्या जोरावर आपण आजपर्यंतची प्रगती केली आहे . ही कल्पकता माणत येते कुठून याबाबत जगभरात बराच अभ्यास झाला आहे . पण तरीही त्याचे गुढ अजून उकलले नाही . ढोबळमानाने कल्पकता आणि माणसाची बुद्धी यांच्या नात्याबाबत काही शास्त्रज्ञांनी आपले मत मांडले आहे . माणसाची बुद्धी ही त्याच्या कल्पकतेचा मूळ स्रोत आहे . कारण माणसाला जगताना येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे , त्याचे निवारण करणे हे बुद्धीचे प्रमुख काम आहे त्यामुळे तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा मनुष्यासमोर समस्या आल्या तेव्हाच वेगवेगळ्या कल्पनांच्या साह्याने मनुष्याने अनेक शोध लावले आहेत . ‘चाकाचा शोध’ हा एका ठिकाणा वरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेच्या समस्येवर शोधलेली एक कल्पना होती , तसेच अग्नीचा शोध हा थंडीपासून बचाव या समस्येवरील उपाय होता आणि यासाठी दोन दगडांचा वापर ही मनुष्याला त्यावेळी सुचलेली एक कल्पना होती , तेव्हा कल्पना ही अशी खूप काही मोठी , जगावेगळी , अवघड संकल्पना नसून तुमच्या माझ्यासारख्याला सुचणारीच गोष्ट आहे . ‘कल्पकता’ ही बुद्धीला दिलेली एक चालना असते . हीच कल्पकता आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करुन विकसितही करत येते . पाहूयात काय आहेत या गोष्टी… १ . गोष्टी वाचताना किंवा ऐकताना कल्पकता वापराः आपण लहानपणापासून प्राण्यांच्या - पक्ष्यांच्या गोष्टी वाचत आलेलो आहोत आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगत आलेले आहोत , या गोष्टींचे मूल्य समजून घेण्याआधी त्यातील प्राण्यांनी - पक्ष्यांची वापरलेली कल्पकता समजून घ्या आणि समजून सांगा . जसे की कावळ्याने पाण्यावरती येण्यासाठी वापरलेले दगड , आजच्या जमान्यात वापरलेला स्ट्रॉ , धुर्त कोल्ह्याने स्वतःच्या बचावासाठी सिंहाला विहिरीत दाखवलेले स्वतःचेच प्रतिबिंब , उंदराने सिंहाला सोडवण्यासाठी स्वतःच्या दातांचा केलेला कल्पक वापर या साऱ्यावरून तुम्हाला कल्पनांचा हेतू समजू शकतो . अशा अनेक गोष्टी तुम्ही स्वतः तयार करू शकता आणि त्या तुमच्या मित्रांना , मैत्रिणींना , लहान मुलांना सांगू शकता . २ . रोजच्या जगण्यातील ‘जुगाड’ : आपल्या रोजच्या दिनचर्येत असे अनेक प्रसंग येतील ज्यात तुम्ही एखाद्या समस्येला तोंड देत असाल . जसे की मोबाईलचा चार्जर विसरणे , घरातील घड्याळाचे सेल सारखे संपणे किंवा खराब होणे , घरातील ओला कचऱ्याला कुबट वास येणे अशा अनेक गोष्टी तुमच्या समोर आ वासून उभ्या असतात . अशावेळी तुम्ही काही कल्पनांचा वापर करून त्यावर उपाय शोधू शकता . अशा रोजच्या समस्यांवरून , कल्पनांमधूनच माणूस अधिक कल्पक होऊ शकतो . ३ . रोज एक तरी खेळ खेळा : खेळण्याने तुमच्या बुद्धीला चालना मिळते आणि त्यामुळे विविध प्रकारचे विचार करण्याची सवय बुद्धीला लागते , जसे की पत्ते खेळताना , बुद्धिबळ , कॅरम , क्रिकेट , फ़ुटबॉलसारख्या असंख्य खेळांमध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ‘कल्पकता’ दिसेल . तुम्ही स्वतः तसेच तुमच्या आजुबाजूच्या लोकांसोबत तुम्हाला जमेल तसे खेळ खेळायला पाहिजे . ४ . स्मरणशक्ती वाढवा : तुम्ही तुमची स्मरण शक्ती जितकी वाढवाल तितकी तुमची बुद्धी कल्पक बनेल , कारण एकदा का तुमच्या बुद्धीने एखादी गोष्ट स्मरणात ठेवली की तुम्ही ती हव्या त्या वेळी हव्या त्या पद्धतीत वापरू शकता आणि कल्पक बनू शकता . यासाठी लोकांचे मोबाईल क्रमांक पाठ करा , तुम्ही लोकांना त्यांच्या पुर्ण नावाने लक्षात ठेवा , लोकांचे पत्ते , ई - मेल आयडी स्मरणात ठेवता आले तर उत्तमच . अशा प्रकारे ‘कल्पकता’ ही खूप साध्या साध्या गोष्टींमधून तुम्हाला सापडेल आणि तुम्हाला अधिक उत्साहित करेल . तेव्हा ही कल्पकता वापरुन आयुष्य कल्पक बनवूया . अवधूत नवले
1
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिल शर्माचा शो बंद झाल्यावर प्रेक्षकांची आणि कपिलच्या चाहत्यांची निराशा झाली . कपिल लवकरात लवकर बरा होऊन शो पुन्हा एकदा सुरु करावा अशी अनेकांचीच इच्छा होती . मात्र प्रेक्षकांना आता ‘द कपिल शर्मा शो’ पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असंच दिसतंय . कपिल बंगळुरुच्या व्यसनमुक्ती केंद्रात दारुचं व्यसन सोडवण्यासाठी ४० दिवसांच्या कोर्सला गेला होता . तेथून परतल्यानंतर त्याच्यात सकारात्मक बदल झाले असले तरी ऑक्टोबरमध्ये शूट पुन्हा सुरु करण्यास तो अद्याप तयार नसल्याची माहिती त्याच्या एका जवळच्या मित्राने ‘डीएनए’ या वृत्तपत्राला दिली . कपिलसंदर्भात अधिक माहिती देत तो म्हणाला की , ‘कपिल पूर्ण बरा झाल्यानंतर शो पुन्हा सुरु होईल . आरोग्य हे सर्वांत महत्त्वाचं असल्याचं त्याला जाणवलं आहे . त्यामुळे तो स्वतःसाठी आणखी काही वेळ देणार आहे . ’ त्याच्या आगामी ‘फिरंगी’ चित्रपटाचं चित्रीकरण अर्धवट राहिल्यामुळे तो फक्त १२ दिवसांमध्ये व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला . नोव्हेंबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याच्या प्रमोशन आणि मार्केटींगसाठीही त्याला वेळ द्यावं लागणार आहे . त्यामुळे कदाचित पुढच्या वर्षी कपिल प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी सज्ज होईल , असं म्हणायला हरकत नाही . VIDEO : अचूक निशाणा साधणाऱ्या कतरिनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने तब्येत बिघडत असल्यामुळे कपिल ‘द कपिल शर्मा शो’वर लक्ष केंद्रित करु शकत नव्हता . पर्यायाने वाहिनीने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला . कपिल शर्माची तब्येत खालावल्यामुळे शाहरुख खान , अजय देवगण , अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांना त्याच्या सेटवर वाट पाहून परतावे लागले होते .
0
डीआरएस ' च्या वापरासंदर्भात ड्रेसिंगरुमकडे इशारा करण्याच्या ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या कृतीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी ) पूर्णपणे कानाडोळा केल्याचे बुधवारी स्पष्ट झाले . दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली होती . मात्र , याच सामन्यात पंचांनी बाद दिल्यावर " डीआरएस ' घेण्यासंदर्भात स्मिथने ड्रेसिंगरुममध्ये इशारा करून विचारणा केली होती . क्रिकेटच्या " डीआरएस ' च्या नियमात स्मिथची ही कृती न बसणारी होती . त्यामुळे भारतीय क्रिकेट मंडळाने ( बीसीसीआय ) स्मिथवर कारवाई करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती . भारतीय कर्णधार विराट कोहलीनेदेखील स्मिथने ही कृती सामन्यात एकदा नव्हे , तर दोन तीनवेळा केल्याचे जाहीरपणे सांगितले होते . मात्र , आयसीसीने आज रात्री उशिरा प्रसिद्धिपत्रकाद्वारे कुठल्याही खेळाडूविरुद्ध आचारसंहितेचा भंग झाल्याचे आरोप करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले . त्यामुळे स्मिथ किंवा कोहली यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही , असेही त्यांनी पुढे म्हटले आहे . आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन म्हणाले , " " आम्ही फक्त एका संघर्षपूर्ण सामन्याचे साक्षीदार राहिलो . या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावले . अशा संघर्षपूर्ण सामन्यात खेळाडूंच्या भावना केवळ प्रखरपणे व्यक्त झाल्या . ' ' यानंतर आता आयसीसी निरीक्षक ख्रिस ब्रॉड तिसऱ्या कसोटीपूर्वी दोन्ही कर्णधारांना एकत्र बोलावून त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतील , असेही रिचर्डसन यांनी सांगितले .
2
तीन गुणांसाठीसुद्धा मुंबईचा संघर्ष ; मिनाद मांजरेकरची भेदक गोलंदाजी निर्णायक विजयाच्या दृष्टीने मुंबईने सौराष्ट्रपुढे विजयासाठी ७२ षटकांत २८५ धावांचे आव्हान समोर ठेवण्याची आक्रमक रणनीती आखली . त्यानंतर मिनाद मांजरेकरच्या भेदक गोलंदाजीमुळे अखेरच्या षटकापर्यंत रंगत टिकवणाऱ्या या सामन्यात मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळवण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागला . रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ‘अ’ आणि ‘ब’ या एकत्रित गटात मुंबईचा संघ आता एकूण ११ गुणांसह १४ व्या स्थानावर आहे . त्यामुळे मुंबईचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे . सकाळच्या सत्रात मुंबईने ५ बाद १७५ धावसंख्येवरून आपल्या दुसऱ्या डावाला पुढे प्रारंभ केला . मग १६ षटकांमध्ये दोन फलंदाजांच्या मोबदल्यात मुंबईने ६३ धावांची भर घातली आणि ८ बाद २३८ धावांवर दुसरा डाव घोषित केला . प्रत्युत्तरादाखल सौराष्ट्रने ७ बाद २६६ धावा केल्या . सौराष्ट्रला विजयासाठी १९ धावा कमी पडल्या आणि हा सामना अनिर्णीत राहिला . सौराष्ट्रने सुरुवात छान केल्यानंतर विश्वजीतसिंह जडेजा ( ७१ ) आणि शेल्डर जॅक्सन ( ५७ ) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली . २ बाद १९२ अशी धावसंख्या सौराष्ट्रच्या धावफलकावर असताना ते सहज विजय मिळवतील अशी आशा वाटत होती . परंतु ‘खडूस’ मुंबईला हे अजिबात मान्य नव्हते . जडेजा धावचीत झाला आणि त्यानंतर मिनाद मांजरेकरने अखेरच्या सत्रात सौराष्ट्रच्या डावाला खिंडार पाडले . मिनादने ६३व्या षटकात जॅक्सन आणि प्रेरक मंकड यांना तंबूची वाट दाखवली . मग आदित्य वासावडा आणि जयदेव उनाडकटलाही बाद करून त्याने सौराष्ट्रच्या नाकीनऊ आणले . परंतु अखेरीस दोन्ही संघांनी अखेरच्या षटकात दोन चेंडू बाकी असतानाच अनिर्णीत निकालावर समाधान मानले . मुंबईच्या कामगिरीचे विश्लेषण करताना कर्णधार सिद्धेश लाड म्हणाला , ‘‘सौराष्ट्रविरुद्धचा सामना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले . अननुभवी गोलंदाजीचा मारा मुंबईसाठी चिंतेचा ठरला . प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी आम्ही घेऊ शकलो नाही . पुढील सामन्यात शार्दुल ठाकूर आणि धवल कुलकर्णी संघात परतणार आहेत . आता उरलेले दोन्ही सामने जिंकणे मुंबईला आवश्यक आहे . ’’ सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकट म्हणाला , ‘‘अखेरच्या सत्रात फलंदाज बाद होत गेले आणि समीकरण अधिक कठीण होत गेले . मात्र शेवटून दुसऱ्या षटकापर्यंत सामना जिंकू शकतो , अशी आशा होती . ’’ संक्षिप्त धावफलक मुंबई ( पहिला डाव ) : ३९४ सौराष्ट्र ( पहिला डाव ) : ३४८ मुंबई ( दुसरा डाव ) : ४८ षटकांत ८ बाद २३८ ( श्रेयस अय्यर ८३ , शुभम रांजणे ४३ ; चेतन सकारिया ३ / ४७ ) सौराष्ट्र ( दुसरा डाव ) : ७१ . ४ षटकांत ७ बाद २६६ ( विश्वजीतसिंह जडेजा ७१ , शेल्डन जॅक्सन ५७ ; मिनाद मांजरेकर ४ / ३९ ) सामनावीर : जय बिश्ता . गुण : मुंबई ३ , सौराष्ट्र १
2
हवामान बदलाचा आरोग्यावर त्वरीत परिणाम होतो . सर्व वयोगटातील लोकांबरोबरच लहान मुलांना या बदलाचा सामना करताना लवकर समस्या निर्माण होतात . लहानग्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या बदलाशी जुळवून घेताना काही अडचणी येतात . तापलेली मुले चिडचिड करतात , रडतात , तापाने तोंडाला चव नसल्याने अन्न घेण्यासही तयार होत नाहीत . त्यामुळे शरीरातील ताकद कमी होते . तापाबरोबरच खोकला , सर्दी , जुलाब असे त्रास होण्याचे प्रमाणही जास्त असते . अशावेळी लहानग्यांना ताप आल्यास पालकांकडून पॅरॅसिटॅमोल दिले जाते . मात्र हे औषध देताना कोणती काळजी घ्यायला हवी आणि घरच्या घरी करता येतील असे काही उपाय… १ . ताप आला की पालक मुलांना पॅरॅसिटॅमोल देतात . मात्र प्रत्येक ताप गंभीर असतोच असे नाही . लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते . त्यामुळे कोणताही संसर्ग झाला की ताप येतो . १०० डिग्री फ़ॅरॅनाईट किंवा त्यापेक्षा अधिक ताप असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरॅसिटॅमोल देणं सुरक्षित आहे . २ . लहान मुलांना ताप आल्यानंतर प्रथम त्यांच्या डोक्यावर थंड पाण्याचा घड्या ठेवा . कोमट पाण्याने त्यांचं अंग पुसा . यानंतरही त्यांचं अंग गरम असेल तर पॅरॅसिटॅमोलचे ड्रॉप्स द्या किंवा सिरप द्या . तुम्ही देत असलेल्या पॅरॅसिटॅमोलच्या ड्रॉप किंवा सिरपची मात्रा काय आहे ? हे पाहूनच त्याचे प्रमाण ठरवा . ३ . लहान मुलांना तापामध्ये पॅरॅसिटॅमोलच्या गोळ्या देण्यापूर्वी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी . व्हायरल इंफेक्शनमुळे ताप येत असल्यास तो ३ ते ५ दिवस राहतो . म्हणजेच व्हायरसच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक प्रतिकारशक्ती निर्माण झाली की त्रास कमी होतो . ४ . लहान बाळाला ताप आल्यास कोणतेही औषध देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या . 3 महिन्यांपेक्षा लहान असलेल्या बाळांसाठी स्वतःच्या मनाने कोणतेही औषध देणं त्रासदायकच आहे . ५ . जास्त ताप आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधाच्या प्रमाणापेक्षा जास्त औषध देणे धोकादायक ठरु शकते . याशिवाय कोणतेही ओरल ड्रग देण्यापूर्वी ताप तपासून पाहणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे असते . ६ . बाळाचे कोणतेही लसीकरण केले असल्यास त्यानंतर लगेजच पॅरॅसिटॅमोल देणं टाळा . लसीमुळे येणारा ताप ठराविक वेळात हळूहळू कमी होतो . त्यामुळे या तापासाठी पॅरॅसिटॅमोल देण्याची आवश्यकता नसते .
1
मुंबईकर सनी पवारच्या नावाचा सध्या चांगलाच गाजावाजा सुरु आहे . त्याची भूमिका असणाऱ्या ‘लायन’ चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्यापासून तो अधिकच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे . नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सनीची जादू पाहायला मिळाली होती . ‘लायन’ चित्रपटाला आणि या चित्रपटातील मुख्य कलाकाराच्या भुमिकेत दिसलेल्या देव पटेलला पुरस्काराने हुलकावणी दिली असली तरी सनी पवार मात्र चांगलाच प्रकाश झोतात आला आहे . या चित्रपटात त्याने देव पटेलच्या बालपणाची व्यक्तिरेखा साकारली होती . अमेरिकेत रंगलेल्या सोहळ्यामध्ये तो भारतीयांसाठी केंद्रस्थानी होताच पण हॉलिवूडच्याही नजरा त्याच्यावर खिळल्याचे दिसले होते . कुठल्याही सर्वसाधारण आठ वर्षांच्या मुलाप्रमाणेच दिसणारा सनी आज मात्र आंतरराष्ट्रीय ‘स्टार’ कलाकार आहे . त्याने लायन चित्रपटात केलेली सरूची भूमिका चित्रपटाची जमेची बाजू होती , असे समीक्षकांनीही मान्य केले आहे . या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर मुंबईतही या बालकलाकाराचे जोरदार स्वागत करण्यात आले . सोशल मीडियावर सनी पवारचे जणू वारे वाहताना दिसत आहे . दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकप्रियतेमुळे त्याला पुन्हा एक नवी संधी मिळाली आहे . आणखी एका आगामी चित्रपटात सनी पवार झळकणार आहे . सनी पवार आगामी ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे . हा चित्रपट एका वेगळ्या धाटणीचा असून , ‘वर्ल्ड सेक्स ट्रेड’ या विषयावर चित्रपटाच्या कथानकाची मांडणी करण्यात आली आहे . या चित्रपटाची निर्मिती ‘स्लमडॉग मिलेनिअर’चे निर्माते तबरेज नूरानी हे करणार असून , त्यांच्यासोबत ‘लाईफ ऑफ पाय’चे निर्माते डेव्हिड वोमार्क हेही सहभागी असणार आहेत . या चित्रपटामध्ये रिचा चड्डा , फ्रिडा पिंटो , देमी मुरे , मनोज वाजपेयी , अनुपम खेर , राजकुमार राव आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत .
0
ईजिप्तचा आघाडीपटू मोहम्मद सलाह याचे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या फुटबॉल विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता बळावली आहे . चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात डाव्या खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी सलाह अथक मेहनत घेत आहे , त्यामुळे ईजिप्तच्या संघासाठी तो काही सामने खेळू शकतो , असा आशावाद संघाचे वैद्यांनी व्यक्त केला आहे . संघाच्या वैद्यांनी स्वतः त्याच्या तंदुरुस्तीची पाहणी केली . त्याशिवाय ईजिप्तच्या फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हनी अबू रिडा यांनी सुद्धा सलाहची भेट घेतली . ‘‘वैद्य आणि फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष अबू रिडा यांनी भेट घेतल्यानंतर सलाह विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होण्याच्या आशा बळावल्या आहेत . खांद्याच्या स्नायुंचे नियंत्रण करण्यास तीन आठवडय़ांचा अवधी पुरेसा आहे , असे ट्विट संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आले . ईजिप्तचा पहिला सामना १५ जूनला उरुग्वेशी होणार आहे . रेयाल माद्रिदविरद्ध अंतिम फेरीच्या सामन्यात कर्णधार सर्गियो रामोसशी अप्रत्यक्षरीत्या झालेल्या धक्काबुक्कीमुळे सलाह खाली कोसळला . दुखापतीतून सावरण्यासाठी निदान तीन ते चार आठवडे विश्रांतीचा सल्ला लिव्हरपूल संघाच्या वैद्यांद्वारे त्याला देण्यात आला आहे . विश्वातील आघाडीचे फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी यांच्याशी तुलना करण्यात येणाऱ्या २५ वर्षीय सलाहने यंदा लिव्हरपूलसाठी सर्वाधिक ४४ गोल नोंदवले आहेत . ‘‘येणाऱ्या तीन ते चार आठवडय़ांमध्ये आम्ही सलाहवर अथक मेहनत घेऊन त्याला विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे , ’’ असे लिव्हरपूलचे वैद्यकीय अधिकारी रुबेन पॉन्स म्हणाले . याव्यतिरिक्त सलाह स्वतः जे झाले ते विसरून दुखापतीतून लवकरात लवकर सावरण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे , असे त्यांनी सांगितले . चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात रेयाल माद्रिदने लिव्हरपूलचा ३ - १ असा पराभव केला . ‘‘सलाह ज्यावेळी मैदानावर कोसळला त्यावेळीच आम्हाला त्याला असह्य़ वेदना होत आहेत हे जाणवले . तो कधीच कोणतीही तक्रारसुद्धा करत नसल्यामुळे आम्ही घाबरलो होतो . लिव्हरपूलच्या पराभवाची बातमी मिळताच सलाह निराश झाला . ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेल्यावर त्याला स्वतःचे कपडे बदलण्यातही त्रास जाणवत होता , ’’ असे पॉन्स म्हणाले .
2
‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे . या चित्रपटाच्या अगदी पहिल्या पोस्टरपासून ते काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरपर्यंत चित्रपटाशी निगडीत प्रत्येक गोष्टीने अनेकांचेच लक्ष वेधले . या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वाधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे . यामागोमाग आता एस . एस . राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली - द कन्क्लूजन’ या चित्रपटाच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे . भारतात जवळपास ६५०० स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे याबाबतची माहिती देत सर्वांनाच थक्क केले आहे . इतर कोणत्याही चित्रपटाच्या तुलनेत बाहुबली २ या चित्रपटाला आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग मिळणार असल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे . याआधी चित्रपटाच्या ट्रेलरमुळे आणि सॅटेलाइट हक्क विकले गेल्यामुळे चित्रपटाने विविध विक्रम प्रस्थापित केले आहेत . त्यामुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असे म्हणायला हरकत नाही . त्यामुळे इतक्या मोठ्या पातळीवर प्रदर्शित होणारा हा चित्रपट कमाईचे कोणते नवे विक्रम आखणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे . ‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेले यश पाहता त्याविषयी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना या ट्रेलरच्या संकलकांनी म्हणजेच वामसी अतलुरी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती . ‘चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेले यश पाहून आम्ही भारावलो आहोत . हे यश अनपेक्षित होतं . देशातील आजवरच्या सर्वात महागड्या चित्रपटाच्या संकलनाचा कोणताही ताण आमच्यावर नव्हता . याउलट ट्रेलर पाहून प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल हे जाणून घेण्याचे दडपण आमच्यावर होते . ’ असे अतलुरी म्हणाले . अभिनेता प्रभास , राणा डग्गुबती , सत्यराज , अनुष्का शेट्टी , तमन्ना भाटिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी बाहुबलीचा म्हणजेच अभिनेता प्रभासला मराठमोळ्या अभिनेत्याने आवाज दिला आहे . बाहुबलीचा हिंदीतील आवाज आहे , अभिनेता शरद केळकर . त्यामुळे सर्वार्थाने हा चित्रपट सर्वांसाठीच एक पर्वणी असणार आहे यात शंकाच नाही .
0
गतविजेत्या भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक महिला हॉकी स्पर्धेतील धडाका कायम राखताना सलग तिसरा विजय मिळविला . भारताने गुरुवारी मलेशियाचा कडवा प्रतिकार मोडून काढत अंतिम फेरीत धडक मारली . कोरियातील दॉंगही सिटीमधील सनराईज स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने जपानला 4 - 1 आणि चीनला 3 - 1 असे हरवले होते . त्यापाठोपाठ आता मलेशियाचा 3 - 2 असा पराभव केला . गुरजीत कौर , वंदना कटारिया आणि लालरेमसियामी यांनी चाळिसाव्या मिनिटास भारतास 3 - 1 आघाडीवर नेले होते ; पण अखेरच्या सत्रात मलेशियाने जोरदार प्रतिहल्ले करीत भारतावर दडपण आणत एक गोलही केला , मात्र अखेर भारताने 3 - 2 असा विजय मिळविला . या स्पर्धेपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने मलेशियास 6 - 0 असे हरवले होते ; पण पहिल्या सत्रात भारतास गोलपासून रोखत मलेशियाने भारतास आपली ताकद दाखवून दिली . दुसऱ्या सत्राच्या सुरवातीस मिळालेल्य पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजितने मलेशियाचा बचाव भेदला . त्यानंतर मलेशियाची गोलरक्षिका भारतीय आक्रमकांची डोकेदुखी ठरली . एकतर्फी वर्चस्वानंतरही गोल झाले नाहीत . दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर भारतीयांनी आक्रमणात वैविध्य आणले . तिसरे सत्र जास्तच आक्रमक झाले . त्यात सात मिनिटांत एकंदर तीन गोल झाले . भारताची आघाडी वंदनाने हुशारीने वाढवली ; पण तीनच मिनिटांत भारताने मलेशियास पेनल्टी स्ट्रोक दिला . भारताची आघाडी 2 - 1 अशी निसटती केल्याचे मलेशियाचे समाधान फार वेळ टिकले नाही . तीन पेनल्टी कॉर्नर अपयशी ठरल्याची निराशा सुनीता लाक्राच्या पासवर नवोदित लालरेमसियामी हिने गोल करीत दूर केली . त्यानंतर जास्तच आक्रमक झालेल्या मलेशियास भारताची आघाडी कमी केल्याचेच समाधान लाभले . आम्ही गोल करण्याच्या संधीचा जास्त फायदा घ्यायला हवा . विजयाचे समाधान आहे ; पण खेळावर निराश आहोत . चुकांचा सखोल अभ्यास आता कोणतीही विश्रांती न घेता करणार आहोत . - सुनीता लाक्रा , भारतीय कर्णधार
2
‘संडे हो या मंडे . . रोज खाओ अंडे’ . . दूरचित्रवाणीवरील ही जाहिरात अंडय़ाचे आरोग्यदायी महत्त्व पटवून देते . अंडय़ांचे दररोजचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे . भरपूर प्रथिने असलेली अंडी जर दररोज सेवन करत असाल तर पक्षाघाताची शक्यता १२ टक्क्यांनी कमी होते , असे एका नव्या संशोधनात दिसून आले आहे . मोठय़ा आकाराच्या एका अंडय़ातून उच्च प्रतीचे कमीत कमी ६ ग्रॅम प्रथिनासोबतच अंडय़ातील पिवळ्या बलकातून अॅन्टीऑक्सिडंट लुटेन आणि झेक्साटीन याबरोबरच जीवनसत्तवे ‘इ’ , ‘ड’ आणि ‘ए’ मिळत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे . दिवसातून किमान एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयविकार आणि पक्षाघात यांचा धोका कमी असतो , असे संशोधकांचे म्हणणे आहे . संशोधकांनी हृदयविकार आणि पक्षाघात यांच्या काही रुग्णांवर संशोधन केले . अंडय़ांचे सेवन करणारे रुग्ण आणि १९८२ ते २०१५ दरम्यानची आकडेवारी यांचे परीक्षण केले . यावेळी अंडय़ाच्या सेवनामुळे सकारात्मक पौष्टिक गुणधर्म दिसून येताना अॅन्टीऑक्सिडंटसोबतच ताण आणि दाह यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आल्याचे अमेरिकेतील डोमिनिक अलेक्झांडर यांनी म्हटले आहे . त्याचबरोबर कमी रक्तदाब असणाऱ्यांना अंडय़ातील प्रथिने अधिक उपयुक्त असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे . ( टीप : ‘ आरोग्यवार्ता ’ मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘ लोकसत्ता ’ चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
गर्भधारणेदरम्यान मातेने अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्यास जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये अॅलर्जी आणि दमा होण्याची जोखीम वाढू शकते , असे नव्याने करण्यात आलेल्या संशोधनामध्ये आढळून आले आहे . यापूर्वीच्या काही संशोधनांमध्ये अतिप्रमाणात साखर असलेली शीतपेय घेणे आणि मुलांमध्ये दमा होणे यांचा परस्पर संबंध असल्याचे आढळून आले होते . गर्भधारणेदरम्यान अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने पुढील पिढीमध्ये अॅलर्जी आणि दमा यांची जोखीम वाढू शकत असल्याचे हे पहिलेच संशोधन आहे . ब्रिटनच्या ब्रिस्टॉल आणि क्वीन मेरी विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला . यासाठी त्यांनी १९९० पूर्वी मुलांना जन्म देणाऱ्या ९ हजार महिला आणि त्यांच्या पुढील पिढींची माहिती गोळा करून हे संशोधन केले आहे . युरोपीयन रेस्पिरेटरी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये अतिप्रमाणात साखर खाणे आणि अॅलर्जी व दमा यांचा संबंध दर्शविण्यात आला आहे . गर्भधारणेदरम्यान अतिप्रमाणात साखर खाणाऱ्या महिला आणि न खाणाऱ्या महिला यांच्यामध्ये ज्या महिला अतिप्रमाणात साखर खातात त्यांच्या पुढील पिढीला अॅलर्जी होण्याचा धोका ३८ टक्क्यांनी वाढतो . तसेच अॅलर्जीचा दमा होण्याचा धोका १०१ टक्क्यांनी वाढत असल्याचे दिसून आले .
1
डब्ल्युडब्ल्युई आणि हॉलिवूडमधील प्रचलित व्यक्तीमत्व ड्वेन जॉनसनने आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे . रेसलिंग आणि अभिनय क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या ड्वेन जॉनसनने इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत आपण पिता झाल्याची घोषणा केली . ड्वेनला तिसरे कन्यारत्न झाले असून त्याने इन्स्टावर त्याचा आणि त्याच्या लहानग्या मुलीचा फोटो शेअर केला आहे . या फोटोमध्ये जॉनसनने आपल्या मुलीला छातीशी कवटाळल्याचे दिसून येत आहे . “या जगात आणखी एका कणखर , निर्भीड मुलीचा जन्म झाला आहे . मला पुन्हा एकदा मुलीचा पिता होता आले ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे . चिमुकलीच्या आगमनामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो” , असे कॅप्शन जॉनसनने दिले आहे . दरम्यान , जॉनसनच्या या चिमुकलीचे नाव टियाना जिया जॉनसन असे ठेवण्यात आले आहे . टियानाच्या आगमनामुळे माझे आयुष्य परिपूर्ण झाले आहे . तसेच टियानाच्या जन्मामुळे माझ्या मनात स्त्रियांविषयीचा आदर आणखीनच वाढला आहे , असेही त्याने नमूद केले . जॉनसन , ‘द रॉक’ या नावानेदेखील ओळखला जात असून तो ‘द रनडाऊन’ , ‘बी कूल’ , ‘ग्रिडआयरन गँग’ , ‘द गेम प्लॅन’ , ‘गेट स्मार्ट’ , ‘प्लॅनेट ५१’ , ‘टूथ फेरी’ , ‘ड्रम’ , ‘द अदर गाईज’ या चित्रपटांमध्ये झळकला आहे .
0
कॉम्प्युटर आल्यापासून सगळी कामे या उपकरणाव्दारे अगदी सोपी झाली . मात्र त्यामुळे कामासाठी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले . आयटीप्रमाणेच इतरही क्षेत्रात दिवसातील ९ ते १० तास कॉम्प्युटरसमोर बसून काम असल्याने त्याला काहीच पर्याय राहीला नाही . पण दिवसभर एका जागी बसल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात . लठ्ठपणा , सांधे आखडणे अशा तक्रारी सुरु होतात . अशा तक्रारी भेडसावूच नयेत म्हणून काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो . ज्यांना दिवसभर एका जागी बसावे लागते त्यांनी काही ठराविक व्यायाम केल्यास ते फायदेशीर ठरतात . पाहूयात कोणते आहेत हे व्यायामप्रकार… १ . पाठीवर झोपावे . त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून तळवे जमिनीला टेकलेले राहतील असे पहावे . हात वर ठेवावेत . डावा पाय आणि उजवा हात वर करुन एकमेकांना लावण्याचा प्रयत्न करावा . याचप्रमाणे उजवा पाय आणि डाव्या हाताने करावे . या व्यायामामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम होऊन पोट वाढण्याची शक्यता कमी होते , तसेच वाढलेले असेल तर ते कमी होण्यास मदत होते . २ . पालथे होऊन हात कोपरापर्यंत टेकलेले ठेवा . पायाचे चवडे जमिनीला टेकलेले राहू द्या . कंबरेचा भाग वर - खाली करा . त्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायान होऊन दिवसभर बैठे काम असेल तरीही त्याचा त्रास होणार नाही . ३ . पाठीवर झोपा , पाय गुडघ्यातून वाकवा . मात्र तळवे जमिनीला टेकलेले असू द्या . पाठ आणि तळवे टेकलेले ठेऊन कंबर जमिनीपासून वर उचला . यानंतर कंबर आणि एक पाय वर उचलूनही हा व्यायाम करु शकता . त्यामुळे कंबरेच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो . ४ . सूर्यनमस्कार हाही सर्वांगिण व्यायाम आहे . त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर किमान १२ सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो . स्नायू मोकळे होण्यास सूर्यनमस्काराचा उपयोग होतो . ५ . ज्यांना शक्य असेल त्यांनी जीम , योगा , झुंबा , अॅरोबिक्स , पोहणे अशा ठिकाणी नियमित गेल्यास त्याचाही शरीर बळकट आणि सुदृढ राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो . त्यामुळे तुमचे काम बैठे असेल तरीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही .
1
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या मफलरची किंवा मग त्यांच्या डोक्यावरच्या ‘ठियाराची’ सोशल नेटवर्किंग साइट्सवरची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही . आता केजरीवाल चर्चेत असण्याचे कारण आहे जनतेने त्यांना विचारलेले प्रश्न . काहीतरी वेगळे करण्याचा मनसुबा ठेवत यावेळी केजरीवालांनी आपल्या संकेतस्थळ ‘टॉक टु एके’ आणि फेसबुकवरुन जनतेशी थेट संवाद साधण्याचा बेत आखला . या कार्यक्रमात जनतेचे प्रश्न ऐकून त्यांना उत्तरे देण्याचे ठरवले आहे . ११ जुलै रोजी जवळपास एक तासासाठी केजरीवाल त्यांच्या संकेतस्थळामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहेत . या कार्यक्रमाबाबत ट्विट करत केजरीवालांनी संवाद साधण्यासाठी जनतेला आमंत्रण दिले . संधीचा फायदा घेत जनतेनेही ट्विटरवरुनच केजरीवालांच्या या प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात करुन दिली . अनेकांनी काही गंभीर विषयांवर केजरीवालांना थेट प्रश्न विचारले , तर बऱ्याचजणांनी ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा , कॅन्सरवर काही इलाज आहे का ? ’ असे अतरंगी प्रश्न करत केजरीवालांभोवती गराडाच घातला आहे . केजरीवाल या अतरंगी प्रश्नांची सतरंगी उत्तरे कशी देणार हेच पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत . .
0
भारतीय क्रिकेट नियामक मंडळास ( बीसीसीआय ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अखेर ४० कोटी ५० लाख डॉलर इतका हिस्सा मिळणार आहे . आयसीसीच्या लंडन येथे सुरू असलेल्या वार्षिक परिषदेत आयसीसीने ‘बीसीसीआय’चा हिस्सा वाढविण्यास मंजुरी दिली . आयसीसीच्या नव्या महसूल वाटपानुसार ‘बीसीसीआय’ला २९ कोटी ३० लाख डॉलर मिळणार होते . यानंतर ‘बीसीसीआय’ने अनेक आघाड्यांवर चर्चा करून आपला हिस्सा वाढविण्याची मागणी केली होती . त्या वेळेस आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी दहा कोटी डॉलर वाढविण्यास मंजुरी दिली होती . मात्र , आज अचानक आयसीसीने भारतीय क्रिकेट मंडळास आणखी ११ कोटी २० लाख वाढवून देण्याचा निर्णय घेतला . या नव्या निर्णयानुसार भारताला पूर्वनियोजित रकमेपेक्षा २६ कोटी ६० लाख डॉलर अधिक मिळणार आहेत . ‘बीसीसीआय’नंतर सर्वाधिक १३ कोटी ९० लाख डॉलर इतकी रक्कम इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळास मिळणार आहे . ऑस्ट्रेलिया , पाकिस्तान , वेस्ट इंडीज , न्यूझीलंड , श्रीलंका आणि बांगलादेश या अन्य संघटनांना प्रत्येकी १२ कोटी ८० लाख डॉलर मिळतील . झिंबाब्वेला ९ कोटी ४० लाख डॉलर मिळणार आहेत . ‘बीसीसीआय’ने नियम आणि अटींवर हा निर्णय स्वीकारल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले . महसूल वाटपाबाबत यापूर्वी झालेल्या मतदानात ‘बीसीसीआय’ला १ - १३ असा पराभव पत्करावा लागला होता . बीसीसीआयच्या एकूण महसूलातील ८६ टक्के वाटा हा पूर्ण सदस्यांना देण्यात आला असून , उर्वरित रक्कम सहयोगी सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे . परिषदेतील अन्य निर्णय आयर्लंड , अफगाणिस्तानला कसोटी दर्जा कसोटी खेळणारे आता बारा देश द्विपक्षीय मालिकेत आयसीसी हस्तक्षेप करणार नाही अमेरिका क्रिकेट संघटनेचा मतदानाचा अधिकार काढून घेतला
2
Sonam Kapoor birthday : बॉलिवूडमध्ये बहुचर्चित ठरलेला सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे . आतापर्यंत चर्चेत ठरलेल्या सर्व विवाहसोहळ्यांपैकी सोनमचा विवाह प्रचंड चर्चेत आला होता . अगदी तिच्या संगीत सोहळ्यापासून ते लग्नानंतर तिने नावात केलेल्या बदलापर्यंत सोनमच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट गाजली . मात्र या सा - यातून वेळ काढत सोनम आणि आनंद लंडनमध्ये आपला क्वालिटी टाईम घालविण्यासाठी गेले आहे . यावेळी सोनमने येथील प्रत्येक फोटो शेअर केल्याचं दिसून येत आहे . शेअर केलेल्या फोटोंमध्ये आणखी एका फोटोची भर पडली आहे . विशेष म्हणजे हा फोटो आनंदने शेअर केला असून त्याला साजेशी कॅप्शनही दिली आहे . मुंबईमध्ये जन्मलेल्या सोनमचा आज ३३ वा वाढदिवस आहे . लग्नानंतर सोनमचा हा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे तिच्यासाठी तो खास असणार यात शंका नाही . मात्र हा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची खरी जबाबदारी आहे ती आनंदवर . यामुळे सोनमला सरप्राईज देण्यासाठी आनंदनेही कंबर कसली असून तो जीवतोड मेहनत करुन सोनमसाठी बर्थ डे प्लान करत आहे . हा प्लॅन करत असतानाच आनंदने मज्जा म्हणून सोनमचा एक फोटो शेअर केला असून एका अनोख्या पद्धतीने तिला शुभेच्छा दिल्या आहेत . आनंदने शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने डोक्यावर पदर ओढला असून ती शुन्यामध्ये नजर लावून बसली आहे . त्यातच हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाईट कलरमध्ये असल्यामुळे या फोटोची शोभा अधिक वाढली आहे . फोटो शेअर केल्यानंतर आनंदने कॅप्शनमध्ये ‘बर्थ डेचा स्पेशल केक पाहिल्यानंतर सोनमची प्रतिक्रिया अशीच असणार आहे’ , असं म्हटलं आहे . आनंदने हा फोटो शेअर करत सोनमला एका नव्या अंदाजात शुभेच्छा दिल्या असल्या तरी सोनमसाठी त्याने एखाद्या खास सरप्राईजची तयारी केली असणार यात शंका नाही .
0
आज ‘जागतिक चहा दिन’ चित्रपटसृष्टी व चहा यांचे पडद्यावर व पडद्यामागे विविध स्तरावर अगदी घट्ट नाते ! चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वात चवदार - यादगार व पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा चहा राजेश खन्नाच्या खार येथील कार्यालयात मिळे . ज्यांनी त्याचा आस्वाद व आनंद घेतलाय ते अनेक दिवस त्या चहावरच बोलत . एक तर राजेश खन्ना कधीच आपल्या चित्रपटाच्या सेटवर वेळेवर येत नसे , त्याच सवयीनुसार तो आपल्या ऑफीसमध्ये तरी कसा बरे वेळेवर येईल ? त्याच्या मुलाखतीसाठी साडेअकराची वेळ ठरलेली असली तरी तो एकपूर्वी क्वचितच येई . तोपर्यंत दोनदा चहा होई… . छे , छे दोनदा चहा मिळायलाच हवा असे वाटे . भरभरून आले आणि कुटलेले ड्रायफ्रूटस त्यात वेगळीच चव आणे . अर्थात राजेश खन्ना गप्पांना सुरुवात करताना , आपने चाय पी की नही असे विचारतच आणखीन एक कप मागवे . तेव्हा कोण नको म्हणणार ? आपण त्याचे ‘चहा’ते कधी झालो हे समजत देखील नसे . चित्रीकरणापासून इव्हेंटपर्यंत चित्रपटसृष्टीत सर्वत्र संचार असणारी गोष्ट म्हणजे ‘चहा’ ! सगळीकडचा मिळून दिवसभरात किती चहा या क्षेत्रात प्यायला जातो याची मोजदाद कशाला हो करायची ? पण ‘टायगर जिंदा है ‘ अथवा ‘पद्मावती’च्या निर्मितीच्या पहिल्या बैठकीपासून मग प्रत्येक चित्रीकरण सत्र , विविध कारणास्तव बैठका वगैरे वगैरे स्तरावर एकूणच प्यायल्या जाणार्या चहाच्या बजेटमध्ये एक छोटासा सामाजिक मराठी चित्रपट निर्माण होऊ शकेलही . मोठ्या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया दीर्घ असते हे लक्षात घेऊन गणित केलेय . त्यात पुन्हा स्पॉटबॉयचा चहा साधा व सुपर स्टारचा खास हा फरक आहेच . कधीतरी एखाद्या निर्मात्याने कधी तरी म्हणावे , आमच्या चित्रपटाच्या सेटवर स्टुडिओ कामगार ते नायक - नायिका एकाच चवीचा चहा पीतात . बातमीला वेगळीच चव येईल . पण चित्रपटसृष्टीत रेकॉर्डिंग स्टुडिओपासून वितरक - प्रदर्शकाच्या कार्यालयात कुठेही कधीही जा , पहिला प्रश्न असतो , ‘आप चाय लेंगे ना ? ’ ही या क्षेत्राची दुर्लक्षित खासियत . गंमत म्हणजे येथे सगळीकडेच एकाच चवीचा चहा मिळतो . ही मात्र वेगळ्याच प्रकारची एकीच म्हणायला हवी . पण अजून एक गंमत म्हणजे , चित्रपटाच्या सेटवर एखाद्या स्टारला भेटायला गेल्यावर तो आपल्याला युनिटच्या काचेच्या ग्लासात चहा देतो व स्वतः वेगळ्या महागड्या स्टीलच्या ग्लासात स्पेशल चहा पितो . एखादा जॅकी श्रॉफ अथवा उर्मिला मातोंडकर अपवाद . काचेच्या ग्लासची जागा आता छोट्या प्लॅस्टिक ग्लासने घेतलीय . काही असो , मराठी असो की हिंदी चित्रपटसृष्टीला चहा भरपूर उर्जा देतो . काही प्रसंगात वा गाण्यातही चहा आहेच . ‘दो घुट चाय पी’ या १९६१ च्या ‘संजोग ‘ चित्रपटातील गाण्यापासून गीत - संगीतात चहा आला . राजेश खन्ना व टीना मुनिमचे सौतन’ ( १९८३ ) मधले ‘इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है’ हे गाणे सर्वकालीन लोकप्रिय . ‘गरम गरम चाय पियो’ ( बनफूल ) , ‘एक गरम चाय की प्याली हो’ ( हर दिल जो प्यार करेगा ) अशी चहावाली गाणी बरीच . चित्रपटसृष्टी व चहा यांच्या नात्याचा आणखीन एक छान फ्लॅशबॅक आहे , साठ - सत्तरच्या दशकात मुंबईतील इराणी हॉटेलमध्ये ज्युक बॉक्स असे . त्यात चार आण्यांचे नाणे ( नंतर ते आठ आणे झाले ) त्या बॉक्समध्ये टाकून आपल्या आवडत्या गाण्याचा नंबर दाबायचा . आणि आपले गाणे येईपर्यंत इतरांच्या पसंतीची गाणी ऐकण्यासाठी कटींग चहा व बन मस्का मागवायचा . आणखीन एक विशेष , चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी राजेश खन्ना व जीतेंद्र दोघेही गिरगावकर . गंमत म्हणजे , ठाकूरव्दार नाक्यावरच्या राजेशच्या सरस्वती निवाससमोर इराणी तसाच गिरगाव नाक्यावरच्या जीतेन्द्रच्या सुंदर भवनाच्या ( पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग ) समोरही इराणी हॉटेल . येथे ते दोघेही सुरुवातीच्या काळात अर्धा कप चहा पीत पीत स्वप्न रंगवत गप्पांत रमत असे किस्से गाजलेत . लक्ष्मीकांत बेर्डे गिरगावातील कुंभारवाड्याचा रहिवाशी . तो देखील इराणी हॉटेलमधील चहाचे किस्से सांगे . तर धोबीतलावच्या मेट्रो अथवा एडवर्ड चित्रपटगृहात जाणारा रसिक शक्यतो थियेटरमध्ये चहा पीत नसे ( मेट्रोत दर्जाप्रमाणे महागच असे ) तो चित्रपट पाहण्यापूर्वी वा नंतर खयानी बेकरीत जाऊन केक व चहा ऑर्डर करणार . तेव्हा एकदम सहा केक दिले जात . तुम्हीच त्यातील किती खायचे ते ठरवा अशी पध्दत होती . चहा पीता पीता पिक्चरवरच्या गप्पा काही संपत नसत . नाझ चित्रपटगृहाच्या कॅन्टीनचा चहा वेगळाच अनुभव देई . तेथे चित्रपट वितरकांची कार्यालये असल्याने व्यावसायिक गप्पा कानावर पडत . ओशिवरा - वर्सोवात चित्रपट निर्मिती कार्यालये वाढताना कार्पोरेट कल्चर आले आणि चहा - कॉफीची मशिन्स आली . ते कृत्रिम वाटते , त्यात आपलेपण नाही . चित्रपटसृष्टीतील चहाचा प्रवास व विस्तार असा चौफेर आहे ही गोडी महत्त्वपूर्ण ! तुम्हीसुध्दा गरम चहाची मजा लुटा… ! दिलीप ठाकूर
0
पुढील सात वर्षांमध्ये देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय धोरणात्मक योजना तयार केली आहे . यामुळे एड्सबाबतच्या उपचारासाठी अनेक उपाय करण्यात येणार असून , याचा अनेक रुग्णांना फायदा होईल , असे सरकारने म्हटले आहे . आरोग्य मंत्रालयाने ‘एचआयव्हीसाठी चाचणी आणि औषधोपचार’ धोरण तयार केले आहे . या चाचणीमध्ये रुग्णाला एचआयव्ही झाल्याचे आढळल्यास त्याच्यावर एआरटी थेरपी करण्यात येईल . ज्या पुरुष , महिला , किशोरवयीन आणि मुले यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळेल , त्यांच्यावर हे उपचार करण्यात येणार आहेत . या तात्काळ उपचारामुळे संबंधित व्यक्तीला दीर्घायुष्य लाभेल . त्याच्या जीवनाचा दर्जा सुधारेल आणि टीबीसारख्या संसर्गजन्य आजारापासून रुग्णांचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे , केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटले आहे . २१ लाख एचआयव्ही झालेल्या रुग्णांपैकी केवळ फक्त १४ लाख रुग्णांना ओळखण्यात यश आले आहे . इतरांना शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत . आम्ही राष्ट्रीय एचआयव्ही तपासणी सुधारित केली असून , समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे . या व्यक्तींचे समुपदेशन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले . सरकारकडे सध्या १ , ६०० एआरटी असून , देशभरात या माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत . सध्या आम्ही १० लाख लोकांवर एआरटी केली आहे . मोठय़ा प्रमाणात उपचार करणारा भारत हा दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे .
1
डेव्हिस चषक स्पर्धेत दुहेरीतील पराभवानंतर निवड समितीवर आगपाखड करणाऱया भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेसच्या टीकेला रोहण बोपण्णा आणि महिला टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे . गेल्या दोन ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोत्तम संघ पाठवला नाही , अशी टीका लिएण्डर पेस याने शनिवारी डेव्हिस चषक स्पर्धेतील दुहेरीतील पराभवानंतर केली होती . प्रत्युत्तरादाखल सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी पेसवर नाव न घेता टीका केली आहे . जिंकण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे ‘विषारी’ व्यक्तींसोबत खेळू नये , असे ट्विट सानिया मिर्झा हिने केले . सानियाचे हे ट्विट रोहन बोपण्णा त्वरित रिट्विट देखील केले . त्यानंतर रोहननेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करून पेसवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला . असभ्य भाषेतून सहकारी खेळाडूंवर टीका करणे हा माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठीचा चांगला पर्याय आहे , असे उपरोधिक ट्विट रोहन बोपण्णाने केले . वाचाः ऑलिम्पिकसाठी सर्वोत्तम संघ पाठवला नाही – पेस रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत सानिया मिर्झासह रोहन बोपण्णा खेळला होता , तर पुरुष दुहेरीत बोपण्णाची साकेत मायनेनीला पसंती असूनही पेसला खेळवण्याचा निर्णय राष्ट्रीय संघटनेने घेतला होता . सानिया - रोहनने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती , तर पेस - बोपण्णाला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता . याबाबत पेस शनिवारी म्हणाला की , ‘रिओ आणि लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत भारताने सर्वोत्तम संघ पाठवला नाही , असे मी स्पष्टपणे सांगतो . यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीत आपल्याला चांगली संधी होती . १४ महिन्यांत चार ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद , ही कामगिरी पुरेशी नव्हती का ? जिंकण्यासाठी अजून कोणत्या स्पर्धा नव्हत्या आणि मी त्या निर्माणही करू शकत नव्हतो . या मुलांना शिकण्याची गरज आहे . ’ पेसच्या या विधानावर सानिया आणि बोपण्णा यांनी थेट प्रतिक्रिया दिली नसली , तरी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली . अर्थात सानिया आणि बोपण्णा यांनी पेसचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख मात्र पेसने केलेल्या वक्तव्याच्याच दिशेने होता , हे स्पष्ट आहे . डेव्हिस चषक स्पध्रेत दुहेरीतील पराभवानंतर पेसने आपली नाराजी व्यक्त केली . ४३ वर्षीय पेसने मायनेनीसोबत खेळायला आवडेल असे सांगितले . पेस म्हणाला की , निवड समिती आणि कर्णधार यांचा हा निर्णय असल्याचे मला नेहमी वाटते . साकेतला भविष्यात माझ्याबरोबर खेळायचे असेल , तर मी तयार आहे . त्याच्याबरोबर इतर स्पध्रेत खेळायला मला आवडेल . पुढील सहा महिन्यांसाठी साकेत माझ्यासोबत अथक मेहनत करून खेळला , तर मी ठामपणे सांगू शकतो की तो ग्रॅण्ड स्लॅम विजेता ठरेल . साकेतसोबत मी पहिल्यांदाच खेळलो . त्याच्या सव्र्हिस आणि परतीच्या फटक्यांनी प्रभावित केले , असेही पेस पुढे म्हणाला .
2
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे . १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले आता याच स्पर्धकांमधून फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत . ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाला अंतीम पाच शिलेदार मिळाले असून सुरांची स्पर्धा आता अजूनच रंगतदार होणार यात शंका नाही . शरयू दाते , प्रेसेनजीत कोसंबी , निहिरा जोशी देशपांडे , अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या स्पर्धकांमध्ये आता गाण्याची मैफल रंगेल . ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमामध्ये प्रेसेनजीतचा शाही बाज , निहीराचा गोड आवाज , अनिरुध्दचे नाट्यसंगीत आणि शरयूचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली . कार्यक्रमामधील एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत या पाच स्पर्धकांनी अंतिम फेरीमध्ये जाण्याचा मान मिळवला आहे . या कार्यक्रमाचा विजेता किंवा विजेती कोण होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे . प्रेक्षकदेखील वोटिंगद्वारे त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला हा कार्यक्रम जिंकण्यासाठी मदत करू शकतात . या स्पर्धकांमधूनच महाराष्ट्राला नवीन सूर लवकरच मिळेल . तेव्हा ही सुरांची मैफल , हे संगीत युध्द पाहायला विसरू नका ‘सूर नवा ध्यास’ कार्यक्रमामध्ये सोम ते बुध रात्री ९ . ३० वााजता फक्त कलर्स मराठीवर .
0
कुस्ती म्हटलं की मराठी माणसाच्या डोळ्यासमोर येते ते कोल्हापूर आणि तिथल्या तालमी , पैलवान . आता यात भर पडली आहे ती महिलांची . पुरुषांच्या बरोबरीने कोल्हापुरातल्या आखाडय़ांमध्ये आता महिलाही घाम गाळायला लागल्या आहेत . कोल्हापूर म्हटले की डोळ्यांसमोर येते ती कुस्ती . दणकट बाहूंच्या पलवानांनी गाजवलेला आखाडा आणि देशविदेशात नाव कमावलेल्या कुस्तीगिरांची दीर्घ नामावली . या कुस्ती क्षेत्रावर पुरुषी क्षेत्राचे एकहाती वर्चस्व . हा खेळ जणू पुरुषांची मक्तेदारी बनलेला , असा दृढ समज झालेला . पूर्वइतिहासही हेच मांडत आलेला . पण , या दशकात या समजाला जबर छेद मिळत आहे . कोल्हापूरसह जिल्ह्यतील बऱ्याच आखाडय़ात आता मुलींच्या शड्डूचा आवाज घुमतो आहे . रणरागिणी ताराराणीचा वारसा सांगत या मुली कुस्तीमध्ये आपली ठसठशीत मुद्रा उमटवत आहेत . त्यांनी स्थानिक पातळीपासून ते विदेशात त्यांनी लौकिक मिळवला आहे . त्यात रेश्मा माने हे सुपरिचित नाव . पाठोपाठ नंदिनी साळोखे , स्वाती िशदे यांच्यासह जवळपास ५० मुली कुस्तीच्या आखाडय़ात उतरल्या आहेत . साक्षी मलिक , गीता फोगट यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवीत त्यांची दमदार वाटचाल सुरू आहे . फोगट भगिनीसोबत आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या सरावातही या मुली भाग घेण्याइतपत लौकिक मिळवून राहिल्या आहेत . कोल्हापूरच्या पुरुष पलवानांच्या मात्तबरीला ओहोटी लागत असताना मुलींची कामगिरी मात्र डोळ्यांत भरते आहे , किंबहुना मुलींमुळेच कोल्हापूरच्या कुस्तीचे नाव देश - विदेशातील कुस्ती क्षेत्रात राहील की काय असे म्हणण्याइतपत मुलींची कामगिरी दिवसेंदिवस सरस होत आहे . ऑलिम्पिक स्पध्रेमध्ये भारतीय पुरुषांच्या बरोबरीने महिला कुस्तीगिरांनीही नेत्रदीपक यश मिळवले आहे . या यशापासून प्रेरणा घेत खेडोपाडय़ातील शाळेत शिकणाऱ्या मुली कुस्तीकडे वळल्या आहेत . आपल्याही मुलीने साक्षी , गीता , बबिता यांच्यासारखे नाव कमवावे अशी मनीषा पालकांच्याही मनात रुंजी घालत आहे . यामुळेच पुरुषांचा खेळ या मानसिकतेतून बाहेर पडत पालक व मुली कुस्तीसारख्या मर्दानी खेळात मोठय़ा प्रमाणात आकृष्ट होत आहेत . समाजाचा दृष्टिकोनही बदलला आहे . मुलींची कुस्तीतील कामगिरी , प्रगती पाहून समाजाच्यातील सर्वच स्तरांतील लोक खुल्या दिलाने दाद देत आहेत . दुसरीकडे शासनाकडून चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जात असल्याचा फायदाही होताना दिसत आहे . महिला कुस्तीचे मुख्य केंद्र ठरले आहे ते मुरगुड . येथील सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रा . दादासाहेब लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मुली कुस्तीचा सराव करीत असतात . इचलकरंजीत ‘महाराष्ट्र कामगार केसरी’ अमृत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वारणा कोडोली , कोगे , आमशी यासह काही तालमींमध्ये मुली कुस्तीत रममाण झाल्या आहेत . ५० ते ६० मुलीच्या सरावाने जिल्हयातील आखाडय़ांना पहाटेपासूनच जाग येत आहे . कोल्हापूर जिल्हय़ात अनेक महिला कुस्तीपटू विविध तालमींत सराव करीत आहेत . राज्य , राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर नाव गाजविणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे . मुरगूड येथे ‘साई’चे ( स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया ) कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे . दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व ‘साई’चे महाराष्ट्राचे तत्कालीन समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांच्या प्रयत्नातून हे केंद्र साकारले . सन २०१० मध्ये हे केंद्र सुरू झाले तेव्हा तीन मुली सरावाला येत होत्या . आता ही संख्या दसपटीने वाढल्याचे प्रा . दादासाहेब लवटे सांगतात . एका अर्थाने महिला कुस्ती किती झपाटय़ाने वाढते – विस्तारते आहे , याचे दर्शनच यातून घडते . ‘साई’कडून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट पुरवण्यात आले असून आणखी एक मॅट मंजूर झाले आहे . १२ मुलींना दत्तक घेतले आहे . नंदिनी साळोखे व स्वाती िशदे या दोघीही गरीब घरातील . पण , त्यांची कुस्तीतील प्रगती पाहून डार्फ केटल केमिकल इंडिया या बहाराष्ट्रीय कंपनीने खर्चाचा पूर्ण भार उचलला आहे . दरमहा दहा हजार रुपये मानधन , देश - विदेशातील प्रवास खर्च , उच्च प्रशिक्षणाचा खर्च ही जबाबदारी घेतली असून कंपनीचे एक आहार विशेषज्ञ दर्शन वाघ हे महिन्यातून एकदा भेट देऊन आहार , व्यायाम याविषयी सखोल मार्गदर्शन करतात . भारतीय कुस्ती संघाच्या ऑलम्पिक सराव शिबिरासाठी स्वातीची निवड झाली आहे . देशातील सर्वोत्तम महिला कुस्तीगिरांसमवेत तिचा सराव सुरू आहे . कोल्हापूर जिल्हय़ात महिला कुस्तीगीर संख्या वाढत आहे . रेश्मा माने हिची ओळख महाराष्ट्राला झाली आहे , ‘लोकप्रभा’ने तिच्यावर एक खास लेख यापूर्वीच प्रसिद्ध केला आहे . तेजल सोनवणे , ऋतुजा मुळीक , निशा खेनर ( पुणे ) , राणी गुरव व गीता मिसाली ( कर्नाटक ) , नम्रता माने ( वडणगे ) , दिशा व दिव्या कारंडे ( सावर्डे ) , विश्रांती व स्मिता पाटील , रसिका कांबळे ( आमशी ) , उषा माने ( सोलापूर ) , ऊर्मिला बाटे ( स्वयंभूवाडी ) , सुकन्या मिठारी ( पाचगाव ) , श्वेता साळुंखे ( मौजे सांगाव ) , अशा अनेक महिला कुस्तीगीर चांगल्या प्रकारे चमकू लागल्या आहेत . कुस्ती खेळ ताकदीचा . सहा मिनिटांच्या खेळात गती व ताकद यांचे संतुलन ठेवत प्रतिस्पध्र्याला नमवावे लागते . अशा खेळाकडे वळणाऱ्या मुलींची संख्या वाढत असली तरी त्यांची जबाबदारी कोण घेणार हा कळीचा मुद्दा आहे . एखादी रेश्मा वगळता बऱ्याचशा मुली गरीब घरच्या . त्यांचा आहारासह वाढता खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा . खेळात प्रगती पण आíथक चणचण खेळापासून परावृत्त करायला लावणारी . राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेत पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना सात , पाच तसेच तीन लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्य शासनाने केली , पण वर्ष उलटले तरी ही रक्कम अद्याप मिळाली नसल्याने कशाच्या जिवावर हा खर्चीक खेळ खेळायचा , हा प्रश्न महिला कुस्तीगिरांना छळणारा . त्यांना पाठबळ देण्यात सर्वच पातळीवर उदासीनता कायम आहे . घरच्यांच्या विरोध पत्करून दंड थोपटायचे पण विविध समस्यांना धोबीपछाड कसे करायचे हे मात्र त्यांच्या कुवती पल्याडचे . मुरगूड वगळता कुस्तीचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नाही , आखाडा नाही . व्यायामासाठी जिम , मॅट याचा अभाव . खुराकाची आबाळ नित्याची . पदोपदी होणाऱ्या खर्चासाठी आíथक पाठबळाचा अभाव . अशा प्रतिकूल परिस्थितीने जेरीस आलेल्या महिला कुस्तीपटूंची या खेळातर धडपड सुरू आहे ती केवळ आपले करिअर सुधारेल या अपेक्षेने . दयानंद लिपारे – response . lokprabha @ expressindia . com सौजन्य – लोकप्रभा
2
सर्वाधिक मोबाइल युजर्स असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे . स्वस्त स्मार्ट फोन , स्वस्तात उपलब्ध असलेले डेटा पॅक यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे . ‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार भारतीय त्यांच्या एकूण डिजिटल मिनिट्सपैकी ९० % वेळ ही मोबाइलवरून ऑनलाइन राहण्यात खर्च करतात . जगभरातील लोक मोबाइल आणि डेक्सटॉपवरून किती वेळ सोशल मीडियावर ऑनलाइन असतात , किती वेळ ते खर्च करतात या डिजीटल मिनिट्सचा अहवाल ‘कॉमस्कोअर’नं प्रसिद्ध केला . त्यानुसार भारतीय हे आपल्या एकूण वेळेपैकी ९० % टक्के वेळ मोबाइलवरून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात असं समोर आलं आहे . भारतीयांपाठोपाठ इंडोनेशिया , मेक्सिको आणि अर्जेंटिनाचा क्रमांक लागतो . या देशातील लोक अनुक्रमे ८७ % , ८० % आणि ७७ % मिनिटे मोबाइलवरून ऑनलाइन राहतात . मोबाइलच्या कमी किमती आणि स्वस्त डेटा पॅक यामुळे मोबाइलवरून ऑनलाइन असणाऱ्यांची संख्या वाढल्याचं म्हटलं जात आहे . एक भारतीय सरासरी ३ हजार मिनिटे मोबाइलवरून ऑनलाइन असतात तर डेक्सटॉपवरून तुलनेनं ते फक्त १ हजार २०० मिनिटेच ऑनलाइन राहण्यास खर्च करतात असं कॉमस्कोअरनं म्हटलं आहे . या अहवालानुसार भारतीय युजर्स व्हॉट्स अॅप , गुगल प्ले , युट्युब , जीमेल आणि गुगल सर्चचा सर्वाधिक वापर करतात .
1
विराट कोहलीच्या दुखापतीवरून वक्तव्य करणारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉज याने कोहलीची माफी मागितली आहे . आयपीएलमध्ये खेळण्यासाठी कोहलीने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्याचे वक्तव्य हॉजने केले होते . या वक्तव्यावरून त्याच्यावर क्रिकेट वर्तुळातून टीका करण्यात आली होती . आता हॉजने या प्रकरणी आपल्या वक्तव्यावर माफी मागत तो एक खेळाडू असून दुखापतग्रस्त होऊ शकतो , असे म्हटले आहे . हॉजने ट्विटरवरून म्हटले आहे , की विराट कोहलीबाबत मी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागतो . विशेषकरून भारतातील नागरिकांची , क्रिकेट प्रेमींची आणि विराट कोहलीची . कोहलीबद्दल मला आदर आहे आणि माझा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता . माझ्या वक्तव्याबद्दल नागरिकांना आणि क्रिकेट चाहत्यांना नाराज होण्याचा हक्क आहे .
2
आहारातील काही पदार्थांमध्ये आपण लसूण खातो . पण दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश असेलच असे नाही . पण लसणामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक उपयुक्त घटक असतात . आहारात ६ रसांचा समावेश असावा असे आपण कायम ऐकतो . विशेष म्हणजे लसणामध्ये आंबटपणा सोडून इतर ५ ही रस असतात . त्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ समजला जातो . आयुर्वेदात परिपूर्ण आहारद्रव्य म्हणूनही लसणाची ओळख आहे . लसणाच्या कंदापासून पानाच्या टोकापर्यंत सर्व घटक शरीरासाठी उपयुक्त असतात . आपल्यातील अनेक जण लसूण बाजारातून खरेदी करतात . पण कुंडीतही लसूण अगदी सहज येऊ शकतो . हृदयरोग , कफ , पचनाच्या तक्रारी यांसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे हे आहेत फायदे… १ . लसूण आणि त्याच्या पातीची चटणी जेवणात चव तर आणतेच पण ती चवीलाही खूप रुचकर लागते . ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी ही चटणी म्हणजे अतिशय उत्तम उपाय आहे . २ . साधारणपणे हिवाळ्यामध्ये ओला लसूण बाजारात मिळतो . तो कमी तिखट आणि कमी उग्र असतो . त्यामुळे ज्यांना लसूण आणि त्याचा वास आवडत नाही त्यांच्यासाठी हा लसूण म्हणजे उत्तम पर्याय ठरु शकतो . ३ . ताप आणि इतर कारणांमुळे ज्यांच्या तोंडाला चव नसते त्यांनी आवर्जून ४ ते ५ दिवस लसणाची फोडणी दिलेले अन्न खावे . त्यामुळे तोंडाची गेलेली चव येण्यास मदत होते . ४ . लसूण उष्ण पदार्थ असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी लसूण खाणे टाळावे . एखादवेळी हिवाळ्यात खाणे ठिक आहे पण उन्हाळ्यात लसूण खाणे टाळावे . ५ . लसूण बुद्धीवर्धक असून ज्यांना लक्षात ठेवण्यात अडचणी येतात त्यांनी जरुर लसूण खावा . ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास लक्षात राहत नसेल त्यांनी लसणाच्या दोन पाकळ्या खाल्ल्यास चांगला उपयोग होतो . ६ . दिवसभर एका जागी बसून काम करणाऱ्यांनीही लसूण खावा . याशिवाय सतत आळस , झोप , थकवा वाटत असल्यास ते कमी होण्यासाठीही लसणाचा चांगला उपयोग होतो . ७ . ज्यांना कफ आणि दम्याचा त्रास होतो त्यांनी सकाळी उठल्यावर दोन पाकळ्या लसणाबरोबर गरम पाणी प्यावे . हा त्रास कमी होण्यास मदत होते . वैद्यकीय उपचारांबरोबर हा उपाय केल्यास लवकर बरे होण्यास मदत होते .
1
अभिनेता , दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण करताना मनोज कुमार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण के ली होती . ‘भारत कुमार’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली कारण त्यांच्या प्रत्येक चित्रपटात देशप्रेम ओतप्रोत भरलेले असायचे . पन्नास वर्षांनंतरही ‘शहीद’ , ‘रोटी , कपडा और मकान’ हे आपले चित्रपट आजच्या काळाशी सुसंगत वाटतात . कारण त्याची मांडणी तेव्हाही वास्तवाला धरूनच होती . चित्रपट हा तेव्हा व्यवसाय झाला नव्हता त्यामुळे एका ध्यासातून बनवलेले हे चित्रपट आजही तरुण पिढीला दाखवले जातात , त्यांना पहावेसे वाटतात तेव्हा खरा आनंद होतो , अशी भावना मनोज कुमार यांनी व्यक्त केली . यावर्षी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले . याच निमित्ताने मनोज कुमार यांचे चित्रपट ४७ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ ( इफ्फी ) मध्ये दाखवण्यात येणार आहेत . १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘शहीद’ , ‘शोर’ , ‘क्रांती’ , ‘रोटी , कपडा और मकान’ आणि ‘गुमनाम’ असे पाच चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत . यानिमित्ताने बोलताना दोन वर्षांपूर्वी ‘इफ्फी’साठी जाण्याचा योग आला होता , त्यावेळी आपण अभिनेता प्रेम चोप्रा यांच्यासोबत तिथे गेलो होतो . चित्रपट पाहण्यासाठी लोकांची होणारी गर्दी थक्क करणारी होती , असा आपला अनुभव मनोज कुमार यांनी सांगितला . ‘शहीद’ काय किंवा ‘रोटी , कपडा और मकान’ काय हे चित्रपट आजही प्रेक्षकांना आपलेसेच वाटणार असं ते विश्वासाने म्हणतात . त्याचे कारण हे चित्रपट रोजच्या जगण्यातून , विचारमंथनातून आलेले होते , असे त्यांनी सांगितले . ‘शहीद’ची कथाकल्पना तर शाळकरी वयापासून मनात घोळत होती . त्यामुळे त्यावर चित्रपट करण्याची संधी मिळाली तेव्हा ती लगेच घेतली , असे सांगणाऱ्या मनोज कुमार यांनी या चित्रपटाने आपल्याला तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे प्रेम मिळवून दिले , असं सांगितलं . त्यावेळी शास्त्रीजींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता . त्या विषयानुरूप चित्रपट बनवावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली . हा विषय खूप मोठा होता . ‘भारत गावात राहतो’ असं आपण कित्येकदा म्हणतो मात्र तिथलं वास्तव दाखवणं तितकं सोपं नव्हतं . ‘उपकार’ या नावाने आलेल्या या चित्रपटात केवळ एकच विषय नव्हता . गांधीजींनीही त्यावेळी खेडय़ाकडे चला अशी हाक दिली होती . याची पाश्र्वभूमी त्या चित्रपटाला होती . कुटुंब नियोजन हा गावागावांतून महत्त्वाचा विषय होता त्यासाठी शहरात शिकल्यासवरलेल्या डॉक्टर्सनी खेडेगावात जाणं गरजेचं होतं . याचाही ऊहापोह चित्रपटात आहे . मला वाटतं , माणसाला एकच एक अडचण नसते . तो वेगवेगळ्या समस्यांमधून मार्ग काढत जगत असतो . त्यामुळे चित्रपटातून जेव्हा त्याला त्याच्या जगण्यातील या समस्या दिसतात तेव्हाच तो चित्रपट वास्तव ठरतो , असं मनोज कुमार म्हणतात . ‘क्रांती’मध्ये देशप्रेमाविषयी बोलत असताना त्याकाळी असलेल्या राजेरजवाडे यांच्या संस्थानांचा जो माहौल होता तो चित्रपटात दिसतो . इथेही विचार करत असताना संस्थानांमधूनही सर्वसामान्य माणूस कोण असणार ? देशप्रेमासाठी लढणारा क्रांतिकारी की शेतकरी असं विचाराचं द्वंद्व होतं आणि तेव्हाही शेतकरी हेच उत्तर मनात आलं होतं . ‘शोर’ हा चित्रपट तर स्वानुभवाचं बोट धरून आला होता , असं त्यांनी सांगितलं . ‘रोटी , कपडा और मकान’चा विषय आणि त्यातलं ‘हाय हाय यह मजबूरी’ या गाण्यातला प्रत्येक शब्द आजही तितकाच खरा आहे . या चित्रपटाची कल्पना अशीच वर्तमानपत्रातील बातमी वाचून सुचली होती , असं ते सांगतात . दिल्ली विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या वेळी एका विद्यार्थ्यांने डिग्री हातात आल्यानंतर सगळ्यांसमोर ती फाडून टाकली होती . ही डिग्री घेऊनही नोकरी मिळणार नाही या अनुभवापायी त्याने त्या डिग्रीच्या कागदाचे तुकडे केले होते . या घटनेवरून चित्रपटाची कथाकल्पना विकसित झाली . त्या सगळ्या काळात आजूबाजूला घडणारे हे विषय माणूस म्हणून टिपत गेलो आणि एक अभिनेता - दिग्दर्शक म्हणून ते पडद्यावर आले याचं श्रेय मात्र ते त्या काळच्या निर्मात्यांना देतात . निर्मात्यांना अशा विषयात खूप रस होता . चित्रपट करणं हे त्यावेळी सर्जनशील , कल्पक काम होतं . एखाद्या ध्येयाने झपाटून काम करणं आणि व्यवसाय करणं यात जो फरक असतो तो तुम्हाला तेव्हाच्या चित्रपट निर्मितीत आणि आजच्या चित्रपट व्यवसायात दिसून येईल , इतक्या रोखठोक भाषेत त्यांनी आजच्या चित्रपटसृष्टीतलं वास्तव मांडलं . चित्रपटकर्मी हा समाजाशी बांधील असतो , तो त्या समाजाचा भाग असतो त्यामुळे त्या त्या समाजाची नीतीमूल्य , संस्कार , प्रेरणा या त्याच्या कलाकृतीतून उमटायलाच हव्यात असा आग्रह धरणारे मनोज कुमार आता या वयातही आपण पुन्हा चित्रपट करणार आहोत , असं सांगतात . व्हीलचेअरवर बसून करेन , पण चित्रपट करेन हा त्यांचा ध्यास असून पुढच्या एकोणऐंशी वर्षांच्या या तरुण दिग्दर्शकाने आपण चित्रपटाची तयारीही सुरू केली असल्याचे सांगितले .
0
अॅपलच्या कोणत्याही फोनबाबत किंवा इतर कोणत्याही उत्पादनांबाबत कायमच जोरदार चर्चा असते . नुकत्याच आलेल्या आयफोन X बाबतही बरीच चर्चा रंगली आहे . कंपनीनेही आपल्या या फोनचे चांगल्या पद्धतीने मार्केटींग केले आहे . एक लाखांहून जास्त किंमत असलेल्या या फोनबाबत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती आणि त्याला भारतीय बाजारपेठेत चांगला प्रतिसादही मिळाला . मात्र या फोनमध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत ज्या आपल्यातील अनेकांना माहीतच नाहीयेत . आता अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आयफोन X मध्ये आहेत पाहूया… आयफोन X चा लॉजिक बोर्ड लहान करण्यात आला आहे . हा बोर्ड लहान असल्याने बॅटरीसाठी जास्त जागा मिळते आणि ते फायद्याचे ठरते . अॅपलने पहिल्यांदाच आपल्या फोनमध्ये दोन बॅटरी दिल्या आहेत . लॉजिक बोर्ड लहान असल्याने एल आकाराच्या या दोन बॅटरी फोनमध्ये योग्य पद्धतीने बसतात . या मॉडेलमध्ये आयफोनने पहिल्यांदाच सॅमसंगचा ओएलईडी डिस्प्ले ड्रायव्हर वापरला आहे . या फोनमध्ये ६४ जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे . जपानी कंपनी असलेल्या सोनी कंपनीचे फ्रंट सेन्सर वापरण्यात आले आहे . यामध्ये ५ . ८ इंचांचा रेटिना डिस्प्ले दिला आहे . या फोनमध्ये चेहऱ्याची ओळख , वायररहित चार्जिगची सुविधा देण्यात आली आहे . हा फोन पाणी आणि धूळरोधक आहे . फोनमध्ये बारा मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे . यामध्ये डय़ुएल ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनची सुविधा देण्यात आली आहे . याचबरोबर कॅमेराची रंगसंगती आणि पिक्सल सुविधा अद्ययावत करण्यात आली आहे . या फोनमध्ये सात मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे . यामध्ये ए११ बायोनिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे . ज्यामुळे या फोनमध्ये मशीन लर्निग , ऑगमेंटेड रिअॅलिटी , थ्रीडी गेमिंगसारख्या गोष्टी वापरणे शक्य होणार आहे . फोनमध्ये आयओएस ११ देण्यात आली असून रॅम ३ जीबी आहे . बॅटरी क्षमता २७१६ एमएएच इतकी आहे .
1
मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी भारत उत्सुक ; न्यूझीलंडचे लक्ष्य बरोबरी साधण्याचे भारतीय क्रिकेट संघ पाच वर्षांतील तिसऱ्या ट्वेन्टी - २० आंतरराष्ट्रीय मालिकेतील विजयाच्या उंबरठय़ावर आहे . दिल्लीतील पहिल्या सामन्यात ५३ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर कांधेरीतील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवरील दुसरा सामना जिंकून मालिकेत २ - ० अशी विजयी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे . मात्र झुंजार वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला तीन ट्वेन्टी - २० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत हरवणे सोपे नसेल . पहिल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या फळीने , विशेषतः शिखर धवन आणि रोहित शर्माने धडाकेबाज आक्रमण केले . त्यामुळे ट्वेन्टी - २० क्रिकेटमधील किवींविरुद्धचा पहिलावहिला विजय साकारता आला . २००७मधील पहिल्या ट्वेन्टी - २० विश्वविजेत्या भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी केली . मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांचीही छान साथ लाभली . त्यामुळेच केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघापुढे आव्हान कठीण असेल . थिरुवनंतपूरमला ७ नोव्हेंबरला होणाऱ्या अखेरच्या सामन्यापर्यंत मालिकेतील उत्कंठा टिकवायची असेल , तर शनिवारच्या सामन्यात भारताच्या धवन , शर्मा आणि कोहलीच्या फलंदाजीला वेसण घालण्याचे आव्हान किवी गोलंदाजांवर असेल . दिल्लीच्या सामन्यात धवन आणि शर्मा जोडीने १६ षटकांत १५८ धावांची विक्रमी सलामी नोंदवत भारताची धावसंख्या दोनशेचा टप्पा ओलांडेल , याची खात्री दिली . दिल्लीत ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी हे न्यूझीलंडचे अनुभवी वेगवान गोलंदाज नवा चेंडू हाताळण्यात अपयशी ठरले . याशिवाय संघाचे क्षेत्ररक्षणही ढिसाळ झाले . त्यामुळे सामन्यानंतर विल्यमसन म्हणाला , ‘‘ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा संघ भारतापेक्षा सरस होता आणि संघाला आपल्या क्षेत्ररक्षणाचाही गर्व होता . मात्र या सामन्यात भारताने सर्वच प्रांतात आमच्यावर कुरघोडी केली . ’’ कोहली आघाडीवर राहून संघाचे नेतृत्व करीत आहे . त्याने ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्येही दोन हजार धावांचा टप्पा वेगाने ओलांडला आहे . भारताची आघाडीची फळी ढासळल्यास माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाला सावरायला समर्थ असतो . लेग - स्पिनर युजवेंद्र चहल किवी फलंदाजांना त्रस्त करीत आहे . अगदी विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलरलाही या मनगटी फिरकी गोलंदाजाचा सामना करणे आव्हानात्मक ठरत आहे . पाहुण्या संघाकडून फक्त डावखुरा फलंदाज टॉम लॅथमने धावांचे सातत्य राखले आहे . राजकोटच्या स्टेडियमवरील हा दुसरा ट्वेन्टी - २० आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येत आहे . याआधी ऑक्टोबर २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पहिला सामना भारताने जिंकला होता . या मैदानावर गुजरात लायन्सचे आयपीएल सामनेसुद्धा झाले आहेत . याशिवाय येथे २०१३ आणि २०१५मध्ये अनुक्रमे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन एकदिवसीय सामने झाले आहेत . हे दोन्ही सामने भारताने गमावले आहेत . मागील हंगामात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यावेळी या स्टेडियमला कसोटीचा दर्जा मिळाला आहे . संघ
2
सध्या मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यातील ताईतच झाले आहेत . जरा मोकळआ वेळ मिळाला की सोशल नेटवर्कींग साईटसवर सर्फींग करणे हा जणू अनेकांसाठी उद्योगच झाला आहे . या तंत्रज्ञानाचा कामासाठी उपयोग होत असला तरीही सतत मोबाईल वापरण्याचे व्यसनच अनेकांना असल्याचे समोर येत आहे . कधी मित्र - मैत्रीणींशी चॅटींग करण्यासाठी , कधी स्वतःचे स्टेटस अपडेट करण्यासाठी तर कधी वेळ घालविण्यासाठी या माध्यमाचा सर्रास वापर होताना दिसतो . पण घरी आल्यावरही सतत फोनवर असणे तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी चांगले नाही हे एका संशोधनातून नुकतेच समोर आले आहे . यातही ऑफीसच्या कामासाठी घरी आल्यावरही मोबाईलवर असणाऱ्यांचे जीवन जास्त त्रासदायक होऊ शकते . ऑक्युपेशनल हेल्थ सायकॉलॉजी या जर्नलमध्ये देण्यात आलेल्या निष्कर्षानुसार या ३४४ जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला . यामध्ये नोकरीसाठी दिवसातील सर्वाधिक वेळ बाहेर असणाऱ्या जोडप्यांचा अभ्यास करण्यात आला . जे लोक घरी आल्यावरही ऑफीसच्या कामासाठी मोबाईलवर असतात त्या लोकांना नोकरीचे समाधान कमी मिळेत , तसेच त्यांची नोकरीतील कामगिरीही चांगली नसते असा निष्कर्ष समोर आला आहे . जोडीदारांपैकी एक जण सातत्याने घरी आल्यावरही मोबाईलवर असतो त्या जोडप्यामध्ये वाद होण्याचे प्रमाण जास्त असते . यापुढे जात या संशोधनात आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीची नोंद कऱण्यात आली आहे . त्यानुसार ज्या लोकांचे कौटुंबिक आयुष्य समाधानी नसते . ते नोकरीमध्ये आपली कामगिरी जास्त चांगली करु शकत नाहीत . अंतिमतः या गोष्टीमुळे नोकरी आणि घर अशआ दोन्ही ठिकाणी ताणाचीच परिस्थिती असते . त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्याला घरी गेल्यावरही काम करावे लागणार नाही याची काळजी कंपनीने घ्यायला हवी अशीही नोंद यामध्ये करण्यात आली आहे .
1
सोनी बीबीसी अर्थ या भारतातील पहिल्या वास्तववादी मनोरंजनात्मक वाहिनीने मुंबईत आयोजित केलेल्या ‘ब्लू प्लॅनेट २’ च्या ब्लू कार्पेट प्रिमीयर सोहळ्याला टीव्ही , समाजमाध्यम आणि चित्रपटसृष्टीतील बहुसंख्य मंडळी उपस्थित होती आणि यावेळी लाईट्स , कॅमेरा यानंतर अॅक्शनचा अनोखा अनुभव उपस्थितांना लुटता आला . १८ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झालेला हा शो २२ शहरांतील पीव्हीआर सिनेमांमध्ये प्रदर्शित होणार आहे . या प्रिमीयर सोहळ्याला अर्जून रामपाल , सोनू निगम , दिया मिर्झा , कोंकणा सेन शर्मा , कल्की कोचलीन , सोहा अली खान , आर . बाल्की , सोनाली बेंद्रे , सुमीत व्यास , राकेश ओम प्रकाश मेहरा , झायेद खान , राहूल बोस , भारती सिंग , करण सिंग ग्रोव्हर , ऋत्विक धनजानी , आशा नेगी , मिनी माथूर , तारा शर्मा , रिधी डोगरा , कानन गिल आणि मल्लिका दुवा आदी कलाकार उपस्थित होते . त्यांनी पृथ्वीवरील महासागरांप्रती आपले प्रेम व जिव्हाळा व्यक्त केला . यावेळी आयोजित करण्यात आलेल्या समुद्रांतर्गत सफरीची मजा आपल्या सेलिब्रिटी पालकांसोबत आलेल्या सर्व बालकलाकारांनी लुटली . मासे , कासव , डॉल्फिन्स यांना पाहण्याचा अद्वितीय आनंद मुलांना अनुभवता आला . समुद्राच्या पाण्याखालचे जग प्रेक्षकांना दाखवून एक नवा , अद्भूत अनुभव देणारी ‘ब्लू प्लॅनेट २’ ही सुंदर कथा आहे . ३९ देशांत १२५ प्रवासी मोहिमा आखून तब्बल चार वर्षे या कथेचे चित्रीकरण करण्यात आले असून ‘ब्लू प्लॅनेट २’ ही कथा निसर्ग इतिहासाचे जनक सर डेव्हिड अटेनबरो यांनी कथन केली आहे . याला जगप्रसिद्ध संगीतकार हान्स झिमर यांनी संगीत दिले आहे . श्वास रोखायला लावतील अशा भव्य दृश्यांसह यंदाच्या उन्हाळ्यात या कथेचा आगळावेगळा अनुभव सर्वांनी घ्यायवा असाच आहे .
0
फ्रान्स आणि पोर्तुगाल यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला हिरो होण्याची संधी आहे . मोठ्या स्पर्धेमध्ये संघाला विजयी करुन देण्याची त्याला संधी आहे . यापुर्वी २००४ मध्ये पोर्तुगालने युरो चषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली होती . त्यावेळी रोनाल्डोने नुकतेच संघात पदार्पण केले होते . अवघ्या १९ व्या वर्षी रोनाल्डो पोर्तुगालकडून पहिल्यांदा युरो चषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता . या सामन्यात ग्रीसने आश्चर्यकारकरित्या पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत युरो चषकावर कब्जा केला होता . यानंतर तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा रोनाल्डो आज फ्रान्स विरुद्ध पोर्तुगालला युरोचषक देण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरेल . फ्रान्सचा संघ पोर्तुगालच्या तुलनेने वरचढ असला तरी , रोनाल्डोच्या खेळीने पोर्तुगाल या सामन्यात करिश्मा करेल , अशी रोनाल्डोच्या चाहत्यांना अपेक्षा आहे . फ्रान्सचा अॅँटोनी ग्रिझमन आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील चुरस पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे . दरम्यान , सोशल मिडीयावरही फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता दिसून येत आहे . चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील क्लब सामन्यात रोनाल्डो हा फ्रान्सच्या अॅँटोनी ग्रिझमन याच्यापेक्षा भारी ठरला आहे . मात्र क्लब सामन्यातील रोनाल्डो आणि अॅँटोनी ग्रिझमन यांच्यातील संघ समतुल्य होता . पण राष्ट्रीय संघाचा विचार करता रोनाल्डो विरुद्ध फ्रान्स असे समीकरण दिसते आहे . अँटोनी ग्रिझमन या फ्रान्सच्या हुकमी खेळाडूसमोर क्लब सामन्यात खेळताना रोनाल्डो नेहमी सरस ठरला आहे . त्यामुळे फ्रान्समधील या स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या हिरोवर मात करुन राष्ट्रीय संघासाठी खेळताना हिरो बनण्याची आज रोनाल्डोकडे संधी आहे .
2
मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राझी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे . ११ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी ७ कोटी ५३ लाखांची कमाई केली होती . तर दुसऱ्या दिवशीही या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये ५० टक्क्यांची भर पडली . दुसऱ्या दिवशी या सिनेमाने ११ कोटी ८३ लाखांची भरघोस कमाई केली . भारताता ‘राझी’ सिनेमाने आतापर्यंत १८ कोटी ८३ लाखांची कमाई केली आहे . सिनेव्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दोन दिवसांची सिनेमाची कमाई ट्विट करुन सांगितली आहे . ‘राझी’ सिनेमात आलिया भट्ट आणि विक्की कौशलची महत्त्वपूर्ण भूमिका आहे . आलिया सहमत नावाच्या काश्मिरी मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे . सहमत दिसायला अगदी साधीशी असली तरी फार चतूर असते . सिनेमात आलियाचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी ( विक्की कौशल ) लग्न होते . भारतातून पाकिस्तानात आलिया सून म्हणून जाते , पण तिचा मुळ उद्देश पाकिस्तानात जाऊन गुप्तहेरी करणं असतो . ती भारताचे डोळे आणि कान बनून पाकिस्तानात राहत असते . हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या कादंबरीवर ‘राझी’ सिनेमाची कथा बेतलेली आहे . या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे . १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वातावरणात सहमत एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न करते . ट्रेलरमध्ये आलियाचे एक आज्ञाधारक मुलगी , कुटुंबवत्सल पत्नी आणि निर्भीड गुप्तहेर असे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात . तर विक्की कौशलही त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये खुलून दिसतो .
0
विम्बल्डन स्पध्रेतील पराभवानंतर जोकोव्हिचचा निर्धार विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या सॅम क्युरीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने पुढच्या स्पर्धामध्ये नेहमीपेक्षा अधिक जबरदस्त पुनरागमन करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे . गेल्या आठवडय़ात ऑल इंग्लंड क्लब येथे दाखल झालेला जोकोव्हिच सलग तिसऱ्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज होता , परंतु त्याची ही घोडदौड क्युरीने तिसऱ्या फेरीतच रोखली . जोकोव्हिचने चार महत्त्वाच्या स्पध्रेची जेतेपद पटकावली आहेत आणि याआधी खेळलेल्या २८ ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला आहे . त्यामुळे हा निकाल २९ वर्षीय जोकोव्हिचला आश्चर्यचकित करणारा आहे . ‘‘मी आयुष्यात सकारात्मक विचार करतो . मी सलग चार गँड्र स्लॅम जिंकण्यात यश मिळवले . त्यामुळे अपयशापेक्षा यशावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा प्रयत्न आहे , ’’ असे जोकोव्हिच म्हणाला . ‘‘गँड्र स्लॅम स्पध्रेतील हा माझा पहिलाच पराभव नाही . त्यामुळे पुढे काय करायचे , याची कल्पना मला आहे . हा पराभव निराशाजनक आहेच . गँड्र स्लॅममध्ये पराभूत होणे हे इतर स्पध्रेतील पराभवापेक्षा अधिक वेदनादायी असते . त्यात काडीमात्र शंका नाही . हरणे मला आवडत नाही , परंतु मी पुढे अधिक चांगल्या मजबुतीने पुनरागमन करेन , ’’ असे जोकोव्हिच म्हणाला . क्युरीकडून पराभूत झाल्यानंतर जोकोव्हिचवर प्रश्नांचा भडिमार झाला . त्याच्या एकदम सुस्तावलेल्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले . त्यावर फ्रेंच खुल्या स्पध्रेनंतर मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत असल्याचे त्याने सांगितले . अँडी मरेला पराभूत करून पहिल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचने विम्बल्डनमध्ये खेळणे सोपे नसल्याचे म्हटले आहे . तो म्हणाला , ‘‘वर्षभरात चार ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याची भावना विस्मयकारक आहे , परंतु विम्बल्डनमध्ये खेळणे हे मानसिकदृष्टय़ा सोपे नसल्याची कल्पना मला होती . या स्पध्रेचे महत्त्व सांगायचे झाल्यास , तुम्ही प्रत्येक वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असता . ’’
2
भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तंदुरुस्त झाला आहे . माझ्यासाठी या स्पर्धेतले सुवर्णपदक महत्त्वाचे आहे . त्यासाठी तंदुरुस्त होण्याकरिता मी गेल्या वर्षी काही स्पर्धांतून माघार घेतली होती . जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापेक्षा माझ्यासाठी राष्ट्रकुल सुवर्णपदक महत्त्वाचे आहे , असे मत त्याने व्यक्त केले . राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेतले सुवर्णपदक अधिक प्रतिष्ठेचे असते , असे सांगून श्रीकांत म्हणतो , गतवर्षी मी हॉंगकॉंग आणि फ्रेंच ओपन स्पर्धांत खेळू शकलो असतो ; पण पुढील महिन्यातील राष्ट्रकुल आणि ऑगस्टमधील आशियाई स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्यावर मी भर दिला . श्रीकांत सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे . सध्या माझा फॉर्म पाहता मी चायना किंवा हॉंगकॉंग स्पर्धांची किमान उपांत्यपूर्व फेरी गाठली असती आणि त्यामुळे मिळू शकणाऱ्या गुणांच्या जोरावर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आलोही असतो ; परंतु मानांकनासाठी गुण मिळवण्यापेक्षा स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे असते . त्यामुळे या स्पर्धांतून माघार घेतली होती , असे श्रीकांतने सांगितले . जागतिक बॅडमिंटनमध्ये काही वर्षांपूर्वी चिनी खेळाडूंचे वर्चस्व होते , आता तशी परिस्थिती राहिलेली नाही . अव्वल खेळाडूंमध्ये फारसा फरक नसतो . 2008 च्या बीजिंग आणि 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये चीनने बॅडमिंटनची पाचही सुवर्णपदके ( पुरुष एकेरी , दुहेरी , महिला एकेरी , दुहेरी आणि मिश्र दुहेरी ) मिळवली होती . आता इतर देशांचेही खेळाडू तेवढ्याच ताकदीने पुढे आले आहेत , असे सांगून श्रीकांतने सांगितली की , पुरुषांमध्ये विक्टर अक्सेलसेन हा अव्वल क्रमांकाचा खेळाडू डेन्मार्कचा आहे . ली चोंग वेई हा मलेशियाचा , मी भारताचा आहे , तर चीनचा चेन लॉंग हा चौथ्या क्रमांकावर असलेला खेळाडू आहे . सध्या युरोपातील खेळाडू जागतिक बॅडमिंटनमध्ये चांगली कामगिरी करत आहेत . आपल्या देशाचेही खेळाडू अशीच प्रगती करत आहेत . पहिल्या 20 अव्वल खेळाडूंमध्ये पाच भारतीय आहेत , अशी माहिती श्रीकांतने दिली . श्रीकांतने गतवर्षी चार सुपर सीरिजचे विजेतेपद मिळवले होते . आता त्याला ऑल इंग्लंड आणि ऑलिंपिक पदकाची प्रतीक्षा आहे . या दोन स्पर्धांतील पदके आपल्या लिजेंटचा दर्जा मिळवून देते , असेही तो म्हणाला . गोपीसरांकडून सदैव प्रेरणा ऑल इंग्लंडचे माजी विजेते गोपीचंद यांच्याकडून ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रेरणा मिळते का ? या प्रश्नावर श्रीकांत म्हणतो , केवळ ऑल इंग्लंडच नव्हे तर माझ्या प्रत्येक विजयाचे श्रेय गोपीचंदसरांना आहे . ऑल इंग्लंड जिंकायची असेल , तर ते कोर्टवर माझ्यासोबत असायला हवे .
2
आजकाल आपल्याला डिप्रेशनबद्दल खूप ऐकायला , वाचायला मिळते . आजुबाजूला पाहीले तर सतत तक्रार करणारे , आयुष्याबद्दल दुःखी किंवा असंतुष्ट असणारे , सतत कंटाळलेले किंवा थकलेले अनेकजण दिसतात . आपल्याला स्वतःला देखील कधीकधी असे काहीसे होते . पण यामागे नेमके काय कारण आहे ते निटसे कळत नाही . मग धकाधकीचे जीवन , ऑफिसमधील दगदग , ट्रॅफीक अशा कोणत्यातरी गोष्टीमध्ये आपण ते कारण शोधत बसतो . पण खरं सांगायचं तर आपल्या शरीरातील काही ठराविक हार्मोन्स आपले आनंदी असणे नियंत्रित करतात . या हार्मोन्सची नावे एन्डॉर्फिन , डोपामाईन , सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन अशी आहेत . काही सोप्या गोष्टी करून आपण या हार्मोन्सचा योग्य पुरवठा केला जातो . एन्डॉर्फिन : १ . व्यायाम केल्याने शरीरात उत्तम प्रमाणात एन्डॉर्फिन निर्माण होते . एन्डॉर्फिनचा शरीरावरील प्रभाव २ - ३ तास मोठ्या प्रमाणावर आणि कमी प्रमाणात २४ तासापर्यंत राहतो . त्यामुळे नियमित व्यायामाला प्राधान्य द्या . २ . कोका आणि तिखट पदार्थ जसे मिरची , हिरवी , लाल किंवा पिवळी भोपळी मिरची हार्मोन्स निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात . ३ . भरपूर मनमोकळेपणाने हसणे हे देखील एन्डॉर्फिन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते . डोपामाइन : १ . कोणतेही ध्येय गाठणे , लहान मोठे काम पूर्ण करणे यामुळे आपल्या शरीरात डोपामाइन तयार होते . त्यामुळे रोजचा दिनक्रम नीट पूर्ण करा . अन्यथा मनावर एकप्रकारचे ओझे राहून हा हार्मोन स्त्रवत नाही . लहान मोठे ध्येय गाठल्यावर स्वतःचे अभिनंदन करा . २ . याबरोबरच खाण्यापिण्यात काही बदल करुन आपण डोपामाइनचा स्तर वाढवू शकतो . जसे साखर , अल्कोहोल , कॉफी , ड्रग्स टाळा . ३ . आहारात पुरेसे मॅग्नेशियम घ्या . पालेभाज्या , फळे , बदाम , आक्रोड , मोड आलेली कडधान्ये , अंडी , मासे या सर्व पदार्थात भरपूर मॅग्नेशियम असते . ४ . क आणि इ जिवनसत्व भरपूर प्रमाणात घ्या . ५ . नियमीत व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या . सिरोटोनिन : १ . भरपूर सुर्यप्रकाश मिळाल्याने उत्तम सिरोटोनिन निर्माण होते . २ . नियमित व्यायामामुळे देखिल सिरोटोनिन स्त्रवण्यास मदत होते . ३ . आहारात ‘ब’ जिवनसत्व , प्रथिने , पचनसंस्थेसाठी उत्तम असणारी धान्य , कर्बोदक यांचा भरपूर समावेश करावा . ४ . इतरांना मदत करणे , समाजासाठी किंवा आसपासच्या लोकांसाठी काही कार्य करणे यामुळेही सिरोटोनिन निर्माण होण्यास मदत होते . ऑक्सिटोसिन : १ . आपल्या जवळच्या व्यक्तीला स्पर्श करणे , मिठी मारणे किंवा आपल्या पार्टनर बरोबर शारिरीक संबंध यामुळे सर्वात जास्त ऑक्सिटोसिन निर्माण होते . २ . भरपूर हसणे देखील ऑक्सिटोसिन निर्माण करते . ३ . तसेच आपण स्वतःचे किंवा इतरांनी आपले कौतुक करणे , तसेच आपण इतरांचे कौतुक करणे त्यांना प्रोत्साहीत करणे , इतरांना वेळ देणे , त्यांना गरज असेल तेव्हा मित्र म्हणून त्यांच्या व्यथा विवंचना ऐकून घेणे , यामुळे ऑक्सिटोसिन निर्माण होण्यास मदत होते . या गोष्टी करायलाच हव्यात १ . नियमीत व्यायाम करा . २ . लहान मोठी ध्येय गाठा . ३ . इतरांना मदत करा , सर्वांशी चांगले वागा . ४ . ध्यान करणे महत्त्वाचे आहे . ५ . आपल्या माणसांना भेटून हस्तांदोलन करा , मिठी मारा . ६ . भरपूर जिवनसत्व , प्रथिने असणारा चौरस , सकस आहार घ्या . आनंदी राहा . डॉ . अस्मिता सावे आहारतज्ञ
1
मोबाईल हा सध्या बहुतांश जणांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे . सकाळच्या गजरापासून ते रात्रीच्या कामांपर्यंत सर्व गोष्टी सध्या एका क्लिकवर शक्य झाल्या आहेत . मोबाईल कंपन्याही दिवसागणिक एकाहून एक फिचर्स असणारे मोबाईल बाजारात आणत आहेत . ग्राहकांचा मोबाईलचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे चित्र बघायला मिळते . असे असतानाही आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला आवश्यक नसणारी फिचर्स नसल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे . जवळपास ८१ टक्के भारतीयांचे आपल्या मोबाईलमधील फीचर्स उपयोगाची नसल्याचे म्हणणे आहे . ‘नाइन्टी वन मोबाइल्स डॉट कॉम’ या वेबसाइटने ‘कन्झ्युमर इनसाइट्स स्टडी २०१८’ हा अहवाल नुकताच जाहीर केला . त्यावरुन ही आकडेवारी समोर आली आहे . या सर्वेक्षणामध्ये १८ ते ३० वयोगटातील १५ हजार मोबाईल युजर्सनी सहभाग घेतला होता . त्यातील ८१ टक्के जण आपल्या फोनमधील वेगवेगळ्या फीचर्सबाबत नाखूश असल्याचे स्पष्ट झाले आहे . यातील २१ टक्के ग्राहकांनी आपला स्मार्टफोन वॉटरप्रूफ नसल्याचे सांगितले . तर १९ टक्के ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फेसिंग फ्लॅश नसल्याची खंत व्यक्त केली . तर ११ टक्के लोकांनी फोनमध्ये फेस लॉकींगची सुविधा नसल्याने आपण निराश असल्याचे म्हटले . आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कंटाळा आल्याने किंवा अपडेटेड स्मार्टफोन हवा असल्याने स्मार्टफोन बदलणाऱ्यांचे प्रमाणही भारतात जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे . स्मार्टफोनच्या बॅटरीबाबतही असंख्य जण नाराज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे . अनेक सॉफ्टवेअर सारखी बंद पडत असल्याची तक्रारही बऱ्याच जणांनी केली . आपण वापरत असलेल्या फोनचा कंटाळा आल्याने किंवा अपडेटेड फोन खरेदी करायचा असल्याने वर्षभरातच दुसरा अपडेटेड स्मार्टफोन खरेदी करण्यावर अनेकांचा भर असल्याचेही दिसून आले आहे . याशिवाय अनेक जण ब्रँडच्या बाबतीत चोखंदळ असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे . एका नामवंत ब्रँडचा स्मार्टफोन वापरत असल्यास त्यानंतर ब्रँड बदलण्याची इच्छा नसल्याचेही या लोकांनी नमूद केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले .
1
मुंबई : रोहित शेट्टीचा गोलमाल फाॅर्म्युला आता नव्याने सज्ज झाला असून , या दिवाळीत या गोलमाल अगेन या चित्रपट धमाका उडवायला सज्ज झाला आहे . या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज लाॅंच झाले . नेहमीप्रमाणे या चित्रपटात अजय देवगण , श्रेयस तळपदे , आर्शद वारसी , तुषार कपूर , कुणाल खेमू ही मंडळी आहेतच . शिवाय यावेळी आपल्याला दिसणार आहे परिणिती चोप्रा . शेट्टी यांनी या चित्रपटातून मॅड काॅमडीचा तडका पुन्हा बाॅलिवूडमध्ये आणला . एकापेक्षा एक गोलमालचे भाग काढत त्यांनी हिटचे नवे फाॅर्म्युले दिले . आता या चित्रपटातून ते नेमकी कशाप्रकारची काॅमेडी बाहेर आणत आहेत ते पाहाणे औत्सुक्याचे ठरलेले आहे . या एकाच दिवशी गोलमाल अगेनची तीन पोस्टर्स लाॅंच करण्यात आले आहे . ही तीनही पोस्टर्स चित्रपटातील कलाकारांनी ही पोस्टर्स रिट्विट केली आहेत . एकाचवेळी तीन पोस्टर्स लाॅंच करून या सिनेमाचा मोठा धमाका उडवून देण्याचा प्रयत्न शेट्टी आणि त्यांची टीम करते आहे .
0
मैदानातील अफलातून क्षेत्ररक्षणामुळे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरलेला मोजक्या खेळाडूंमध्ये मोहम्मद कैफला डावलता येणार नाही . रॉबिन सिंगनंतर भारतीय संघातील चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली . क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षण हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे . मोहम्मद कैफने आपल्या कारकिर्दीत या क्षेत्रातील जबाबदारी लीलया पेलली . क्षेत्ररक्षणाशिवाय संघाच्या मध्यफळीची जबाबदारी ही त्याच्या खांद्यावर होती . २००२ मध्ये रंगलेला नेटवेस्ट मालिकेतील अंतिम सामना ज्यांच्या लक्षात आहे , तो क्रिकेटप्रेमी मोहम्मद कैफची खेळी आजही विसरला नसेल . मोहम्मद कैफने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी या सामन्यात केली होती . त्याच्या आणि युवराज सिंगच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा ३२५ धावांचा डोंगर सर केला होता . या विजयानंतर भारताचा कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्डसच्या मैदानावर शर्ट काढून फ्लिंटॉपच्या कृतीची परतफेड केली होती . यापूर्वी इंग्लंडने भारताला मायदेशात पराभूत केल्यानंतर फ्लिंटॉफने मैदानात शर्ट काढून आनंद व्यक्त केला होता . भारत आणि इंग्लंड यांच्यात १३ जुलै २००२ मध्ये लॉर्डसच्या मैदानावर अंतिम सामना रंगला होता . या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ३२५ धावांचा डोंगर रचला होता . या धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीने दमदार सुरुवात केली . सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी शतकी भागीदारी रचून भारतीय संघ इंग्लंडचे आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले . मात्र , ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी अक्षरशः कोलमडली . ५ बाद १४६ धावा असताना कैफ आणि युवराज यांनी भारतीय संघाच्या डावाला आकार दिला . युवराज सिंग अर्धशतक झळकावल्यानंतर मोहम्मद कैफनं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला . कैफने या सामन्यात १०९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं नाबाद ८७ धावांची खेळी केली होती . मोहम्मद कैफनं १२५ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे . यात त्याने २७५३ धावा केल्या असून , यात २ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे . तर १३ कसोटीत एक शतक आणि ३ अर्धशतकासह त्याने ६२४ धावा केल्या आहेत .
2
अंतिम लढतीसाठीच्या खेळपट्टीवर दोन्ही संघांची नाराजी हॅरिस शिल्ड ही मुंबई क्रिकेटमधील मानाची स्पर्धा . देशवासीयांना अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या असंख्य क्रिकेटपटूंनी याच स्पर्धेद्वारे आपल्या कौशल्याची चुणूक पहिल्यांदा दाखवली . यंदा रिझवी स्प्रिंगफिल्डने जेतेपदावर नाव कोरले . मात्र अंतिम लढतीला साजेशी खेळपट्टी नसल्याने दोन्ही संघांनी नाराजी प्रकट केली आहे . चेंडूला असमान उसळी मिळणारी आणि पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीमुळे संपूर्ण लढतीत केवळ दोनच फलंदाजांना अर्धशतकाची वेस गाठता आली . चांगल्या दर्जाच्या खेळपट्टीवर हा सामना झाला असता तर सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते , अशी प्रतिक्रिया दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केली . ‘‘सलामीच्या दिवशीच खेळपट्टी खराब होत जाईल याची कल्पना आली . म्हणूनच आम्ही वेगवान गोलंदाजांना संघात सामील केले नाही . श्रेयश बोगर हा मूलतः वेगवान गोलंदाज आहे . मात्र त्याने बहुतांशी बळी डावखुरा फिरकीपटू म्हणून कमावले . अंतिम लढत सुरू असताना बॉम्बे जिमखाना येथील खेळपट्टी उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत होते . कर्नाटक स्पोर्टिग येथेही हा सामना खेळवता आला असता . आमच्या संघात मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आहेत . त्यांनाही या खेळपट्टीवर स्थिरावून मोठी खेळी करता आली नाही . चारही डावांमध्ये मिळून केवळ दोन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली . आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले . आमच्या खेळात चुका झाल्या . मात्र खेळपट्टी चांगली असती तर आम्ही रिझवी संघाला दमदार प्रत्युत्तर दिले असते , ’’ असे मत अल बरकत संघाचे प्रशिक्षक नफीस खान यांनी व्यक्त केले . ‘‘स्थानिक क्रिकेटमधील ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे . मुंबईतील बहुसंख्य मैदाने सामन्यासाठी उपलब्ध होती . मात्र साधारण दर्जाची खेळपट्टी असलेल्या मैदानात सामना खेळवण्यात आला . किमान उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना तरी चांगली खेळपट्टी असलेल्या मैदानावर झाला असता तर दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाले असते . तीन दिवसांत ४० फलंदाज बाद झाले . दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांनी जेमतेम पाच षटके टाकली . यावरून फिरकीचे प्रभुत्व लक्षात येते . अंतिम लढतीत अर्धशतक झळकावणे कठीण व्हावे , यावरून खेळपट्टीची कल्पना यावी . रिझवी संघाने चिवटपणे खेळ करीत जेतेपद पटकावले , ही आनंदाची गोष्ट आहे . मात्र त्याने खेळपट्टीचे सत्य नाकारता येणार नाही , ’’ असे रिझवीचे प्रशिक्षक राजू पाठक यांनी सांगितले .
2
नावाजलेल्या व्यक्तींना दूषण लावणं हा कमाल आर खान याचा जन्मसिद्ध हक्कच बनला आहे . त्याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मोहनलाल यांची खिल्ली उडवली होती . तर ‘बाहुबली २’ सिनेमाचे अभिनेते प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांच्याविरोधात भाष्य केले होते . या सगळ्यांमध्ये कमालने आमिर खानच्या ‘दंगल’ सिनेमातील फातिमा सना शेखला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमात का घेतलं , असा प्रश्न उपस्थित केला होता . आता हे कमी की काय त्याने आपला मोर्चा सचिन तेंडुलकरकडे वळवला आहे . केआरकेने सचिनच्या आत्मचरित्रपटावर भाष्य करताना म्हटले की , ‘हा सिनेमा जुन्या व्हिडिओंनी बनवलेला सिनेमा आहे . पण हा सिनेमा झेलणं माझ्यासाठी कठीण आहे . ’ ‘विरुष्का’चा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल , ‘ये साथ छुटेना’ ! या सिनेमाच्या ट्रेलरमध्येच हे स्पष्ट झाले होते की हा सिनेमा एमएस धोनीच्या सिनेमासारखा नसणार . पण तो मात्र धोनी आणि तेंडुलकर यांच्या सिनेमांची तुलनाच करत आहे . त्याने एका मागोमाग एक असे अनेक ट्विट केले आणि ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ सिनेमाला धोनीच्या सिनेमापेक्षा ४० ते ५० टक्क्यांनी जास्त स्क्रीन्स मिळाल्या आहेत . त्यामुळे पहिल्या दिवशी हा सिनेमा ९ ते १० कोटी रुपयांचा गल्ला कमावू शकतो . तर धोनी सिनेमाची कमाई सुशांतमुळे नाही तर स्वतः धोनीमुळे झाली होती . ‘राबता’ सिनेमाचे यश हे सुशांतचे असेल . या सिनेमावेळी त्याचे स्टारडम कळेल . जर सचिनच्या या ड्रॉक्युमेंट्रीने जास्त कमाई केली तर कपिल , सेहवाग , कोहली , गंभीर आणि इतर खेळाडूही त्यांच्या डॉक्युमेंट्री बनवतील . स्वघोषित समीक्षक म्हणून सचिनच्या सिनेमावर टीप्पणी करताना कमाल म्हणाला की , कोणाच्याही जीवनपटापेक्षा माझ्या आयुष्यावर बनवलेला सिनेमा अधिक रंजक असेल . कारण यात पुरेपुर मसाला असेल . सेक्स , गुन्हेगारी , प्रेम , व्यवसाय , बॉलिवूड अशा अनेक गोष्टींचा भरणा यात असेल .
0
वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे हाडांचे वस्तुमान आणि त्यांच्या मजबुतीवर परिणाम होत असून हाड तुटण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . जेबीएमआर प्लस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या समीक्षेनुसार शस्त्रक्रियेनंतर हाडांमध्ये बदल होतात आणि ही प्रक्रिया वजन संतुलित झाल्यानंतरही सुरूच राहते . हाडाच्या आरोग्याबाबत सद्यःस्थितीत वैद्यकीय मार्गदर्शके दिली जातात . परंतु यातील बहुतांश सल्ले हे निकृष्ट दर्जाचे पुरावे किंवा तज्ज्ञांच्या मतांवर अवलंबून असल्याचे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अॅन स्चॅफर यांनी सांगितले . पौष्टिक घटक , संप्रेरके , शरीर रचनेतील बदल आणि अस्थि मज्जेतील मेदामुळे हाडांचे आरोग्य खालावते . वजन घटविण्यासाठी काही काळांपूर्वी प्रचलित असलेल्या गस्ट्रीक शस्त्रक्रियेमुळे शरीरावर होणाऱ्या परिणामाचे परीक्षण करण्यात आले आहे . सध्या या शस्त्रक्रियेची जागा स्लीव्ह गॅसरेक्टमीने या शस्त्रक्रियेने घेतली आहे . ही शस्त्रक्रिया नवीन असल्यामुळे या शस्त्रक्रियेमुळे हाडांवर काय परिणाम होतात हे अद्याप अस्पष्ट असल्याचे संशोधकांनी सांगितले . वजन घटविण्याच्या शस्त्रक्रियेमुळे हाडांवर होणाऱ्या परिणामांबाबात प्राधान्याने वैद्यकीय निर्देश देण्याचे या समीक्षणामध्ये सूचित करण्यात आले आहे . या शस्त्रक्रियांमुळे होणारे हाडांवरील दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता असल्याचे स्चॅफर यांनी सांगितले .
1
जगातील सर्वात सुंदर पुरुषांमध्ये तिस - या स्थानावर असलेला बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता हृतिक रोशन आज ४२ वर्षांचा झाला आहे . वैविध्यपूर्ण भूमिका आणि माचोमॅन पर्सनॅलिटीमुळे हृतिकने अनेकांची मन जिंकले आहे . मुंबईमध्ये १० जानेवारी १९७४ रोजी जन्मलेल्या हृतिकला अभिनयाची कला वारसा म्हणून मिळाली आहे . हृतिकचे वडिल राकेश रोशन हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता आहेत . तर त्याच्या आजोबांचे संगीत क्षेत्रात फार मोलाचे योगदान आहे . त्याने बाल कलाकार म्हणून ‘आशा’ , ‘आपके दीवाने’ , ‘आसपास’ आणि ‘भगवान दादा’ या चित्रपटांमध्ये काम केले होते . ‘भगवान दादा’ चित्रपटात बाल कलाकार असणा - या हृतिकने तेव्हा एक फायटिंग सीनही दिला होता . केवळ अभिनयासाठीच नाही तर हृतिक त्याच्या डान्ससाठीही नावाजला जातो . आजच्या घडीला डान्सच्या बाबतीत हृतिकला तोडीस तोड असा एकही बॉलीवूड अभिनेता नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही . त्याच्या डान्सचे तर करोडो दिवाने आहे . हृतिकला पहिल्यांदा ‘आशा’ चित्रपटात डान्स करण्याची संधी मिळाली होती . त्यासाठी त्याला १०० रुपये इतके मानधन मिळाले होते . या चित्रपटात त्याने जितेंद्र यांच्यासोबत डान्स केला होता . हृतिकला वाचनाची खूप आवड आहे . त्याला वेळ मिळाली की तो पुस्तकं वाचतो . तुम्हाला माहित आहे का , रोशन हे त्यांचे खरे आडनाव नाही आहे . त्याचे खरे आडनाव ‘नागरथ’ असे आहे . हृतिकला घरी प्रेमाने डुग्गू असे म्हणतात . चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी हृतिकने त्याच्या वडिलांना ‘कोयला’ आणि ‘करण अर्जुन’ चित्रपटात मदत केली होती . दरम्यान , जगातील सर्वात सुंदर पुरुषांमध्ये हृतिक तिसऱ्या स्थानावर आहे . एका वेगळ्याच लूकमुळे बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृतिकच्या नावाचा Worldstopmost . com . या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या एका यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे . हॉलिवूड अभिनेता जॉन डेप आणि ब्रॅड पिट या कलाकारांना मागे टाकत हृतिक रोशनने यात बाजी मारली होती . लवकरच हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘काबिल’ या चित्रपटात झळकणार आहे . या चित्रपटाद्वारे हृतिक एका अंध व्यक्तीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . हृतिकसोबतच या चित्रपटामध्ये अभिनेत्री यामी गौतमसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे . राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबिल’ हा चित्रपट २६ जानेवारी २०१७ ला प्रदर्शित होणार आहे . हृतिक आणि यामी गौतम व्यकिरिक्त या चित्रपटामध्ये अभिनेता रोनित आणि रोहित रॉय खलनायकी भूमिकेत झळकणार आहेत .
0
दिवाळी सणाला अविस्मरणीय बनवण्यासाठी सगळेच आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात . यात कलाकार तरी मागे कसे राहतील . अभिनेत्री आलिया भट्टनेही असेच काहीसे प्लॅनिंग केले होते . आयुष्य आनंदाने जगण्याची एकही संधी ती सोडत नाही . सध्या ती वरुण धवनसोबत ‘बद्रीनाथ की दुल्हनीया’ या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे . पण या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून ती वरुणसोबत खरेदीसाठी गेली होती . तिच्या या शॉपिंगनंतरचा एक फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे . मनसोक्त खरेदी केल्यानंतर चित्रिकरणाच्या सेटवर पोहचलेल्या आलियाने हा फोटो शेअर केला आहे . त्या दोघांच्या मागे सुंदर लाइटिंग केलेली दिसत आहे . या फोटोत आलिया आणि वरुणची घनिष्ठ मैत्री दिसून येत आहे . वरुण आलियाचा आणि तिच्या शॉपिंगच्या पिशव्यांचा भारही आनंदाने उचलताना दिसत आहे . शशांक खेतान यांच्या दिग्दर्शनामध्ये बनत असलेला या सिनेमाचे चित्रिकरण सध्या जोरात सुरु आहे . वरुण आणि आलियाचा हा एकत्रित असा तिसरा सिनेमा आहे . याआधी ‘स्टुण्डंट ऑफ दी इयर’ , ‘हंप्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये काम केले आहे . ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा पुढच्या वर्षी १० मार्चला प्रदर्शित होणार आहे . ’
0
संयम हा काही जन्मतःच येत नसतो . त्यासाठी मेहनत करावी लागते . मेहनत करूनच मी संयम राखायला शिकलो , अशी प्रतिक्रिया भारताचा मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजारा याने व्यक्त केली . तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती भक्कम करण्यात पुजाराच्या संयमी द्विशतकी खेळीचा वाटा मोठा होता . चौथ्या कसोटीपूर्वी सराव सत्रादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्याने संवाद साधला , तेव्हा आपल्या द्विशतकी खेळीविषयी मत मांडले . रांची कसोटीत प्रथम भारताला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पुजाराने नंतर जम बसल्यावर जबरदस्त खेळी करून भारताची स्थिती भक्कम केली . दडपणाखाली त्याने तब्बल ७०० मिनिटे फलंदाजी केली . तो म्हणाला , ‘‘कुमार गटात खेळायला लागल्यापासून मला संयम किती महत्त्वाचा हे समजले . तेव्हापासून संयम हा माझ्या फलंदाजीचा एक भाग झाला . प्रदीर्घ खेळी करण्याकडेच माझा कल राहिला . प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मला त्याचा फायदा झाला . रणजी स्पर्धेत नुसते शतक झळकावून तुमच्याकडे कुणी बघत नाही . शतकानंतर द्विशतक साजरे झाले की चर्चा होते . द्विशतकाचे रूपांतर त्रिशतकात झाले की तुमच्याकडे माना वळायला लागतात . देशांतर्गत स्पर्धांमधून अशीच कामगिरी करून मी राष्ट्रीय संघात दाखल झाला . स्थानिक क्रिकेट खेळताना खेळपट्टीवर टिकून राहण्याची सवय मला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील फायद्याची ठरत आहे . ’’ मैदानाबाहेर सुरू असलेल्या वादांवरदेखील पुजाराने आपल्या संयमी खेळीइतकेच संयमाने भाष्य केले . तो म्हणाला , ‘‘विराट कोहलीची तुलना एखाद्या खेळाडूशी होणे समजू शकतो . त्याची तुलना उगाच अन्य कुणाबरोबर करायची आणि मग वाद उरकत बसायचे यात काही अर्थ नाही . विराट केवळ महान खेळाडू नाही , तर तो क्रिकेटचा ब्रॅंड ॲम्बेसिडर आहे . मैदानाबाहेर काय चालू आहे , याकडे आमचे लक्ष नाही . चालू मोसमातील अखेरचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे . आतापर्यंत आमची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे . त्याची सांगतादेखील चांगलीच व्हावी , यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहू . ’’
2
अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब झरदान हा काही दिवसांपूर्वीच आयपीएलच्या अकराव्या हंगामात लागलेल्या बंपर बोलीसाठी चर्चेत आला होता . १६ वर्षीय मुजीबवर किंग्ज इलेव्हन पंजाबने तब्बल ४ कोटी रुपयांची बोली लावली . मात्र आता अफगाणिस्तानचा हा युवा गोलंदाज आंतरराष्ट्रीय वन - डे सामन्यात आणखी एका कामगिरीसाठी चर्चेत आला आहे . वन - डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात ५ बळी घेण्याचा विक्रम मुजीबने आपल्या नावावर जमा केला आहे . अवश्य वाचा – टी - २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कांगारु विजयी , न्यूझीलंडचं २४४ धावांचं आव्हान केलं पूर्ण वकार युनूसने वयाच्या १८ व्या वर्षी वन - डे सामन्यात ५ बळी घेत हा विक्रम सर्वात प्रथम आपल्या नावे केला होता . मुजीब सध्या १६ वर्षाचा आहे . झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या मुजीबने वकार युनूसलाही मागे टाकलं . मुजीब झरदानच्या या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला १३४ धावांमध्ये गुंडाळलं . झिम्बाब्वेकडून क्रेग एर्विनचा अपवाद वगळता एकही फलंदाज अफगाणिस्तानच्या माऱ्यासमोर टिकू शकला नाही . सध्या अफगाणिस्तानचा संघ ५ सामन्यांच्या मालिकेत २ - १ ने आघाडीवर आहे . अवश्य वाचा – न्यूझीलंडच्या मार्टीन गप्टीलचा विक्रम , टी - २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
2
ब्रिस्टॉल ( इंग्लंड ) : भारताची कर्णधार मिताली राज हिने महिला वन - डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला . तिने इंग्लंडच्या शार्लोट एडवर्डस हिचा 5992 धावांचा उच्चांक मागे टाकला . विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने सहा हजार धावांचा टप्पा सुद्धा पार केला . मितालीने 69 धावांची खेळी केली . 34 वर्षांची मिताली हैदराबादची रहिवासी आहे . याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत ती पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाली होती . या लढतीत तिने कामगिरी उंचावली . शार्लोटचा उच्चांक मागे टाकण्यासाठी तिला 34 धावांची गरज होती . शार्लोटला या कामगिरीसाठी 180 डाव लागले . त्या तुलनेत मितालीने 16 डाव कमी घेतले . वन - डेमधील तिची सरासरी 51.52 आहे . ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिचीच सरासरी पन्नासपेक्षा जास्त आहे . मितालीला यंदा विलक्षण फॉर्म गवसला आहे . तिने सलग सात अर्धशतकांचा उच्चांकही अलीकडेच केला होता . वन - डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा विश्वविक्रम मितालीची सहकारी झूलन गोस्वामी हिने अलीकडेच केला . मितालीचे ' राज ' विश्वकरंकड क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान बुधवारी फटका खेळताना भारताची कर्णधार मिताली राज तिने महिला वन - डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम नोंदविला . विश्वकरंडकातील पाचवे शतक महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शतक झळकाविणारी पूनम राऊन भारताची पाचवी महिला खेळाडू ठरली . एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून वीस शतके झाली असून , यात सर्वाधिक पाच शतके मिताली राज हिची आहेत . एकदिवसीय क्रिकेटमधील पूनमचे हे दुसरे शतक ठरले . यापूर्वी तिने आयर्लंडविरुद्ध नाबाद 109 धावांची खेळी केली होती . विंडीज , 29 जून 17 ) , पूनम राऊत ( 106 , वि . ऑस्ट्रेलिया , 12 जुलै 17 ) ( संकलन : गंगाराम सपकाळ )
2
‘सावरिया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता रणबीर कपूर तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे असंच म्हणावं लागेल . कपूर कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील रणबीर त्याच्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवत असतानाच त्याच्या अभिनयासोबत खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगल्या जाऊ लागल्या . चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीच्याच काही दिवसांमध्ये रणबीरचं नाव सोनम कपूरसोबत जोडलं गेलं . पण , त्यानंतर मात्र त्याचं नाव अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत जोडलं गेलं . दीपिका आणि रणबीरने एकाच सुमारास चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं . ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांनी स्क्रीनही शेअर केली . त्यावेळेपासूनच दीपिका आणि रणबीरची जवळीक वाढली . विविध कार्यक्रमांना , सेलिब्रिटी पार्ट्यांना आणि विमानतळांवरही या दोघांना एकत्र पाहिलं जाऊ लागलं . त्यांच्या नात्यावर सर्वांनाच विश्वास तेव्हा बसला ज्यावेळी दीपिकाने रणबीरच्या नावाचा ‘टॅटू’ करुन घेतला . रणबीर आणि दीपिकाच्या प्रेमाला बहर येत असतानाच त्यांचा साखरपुडा झाल्याचंही वृत्त समोर आलं होतं . पण , त्याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती कळू शकली नव्हती . दीपिका आणि रणबीरच्या प्रेमप्रकरणाचा त्यांच्या करिअरवर कोणताच वाईट परिणाम झाला नव्हता . किंबहुना दीपिका ‘सावरिया’ रणबीरची ‘लकी चार्म’ असल्याचं अनेकांचं मत होतं . ती रणबीरच्या आयुष्यात असेपर्यंत त्याच्या वाट्याला येणारा चित्रपटांचा ओघ यशाच्या मार्गावर नेणारा होता . पण , ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटादरम्यान रणबीर आणि कतरिना कैफमधील वाढत्या जवळीकीमुळे दीपिकासोबतच्या त्याच्या नात्याला तडा गेला . त्यानंतरच्या काळात दीपिका आणि रणबीरच्या वाटा वेगळ्या झाल्या . वाचा : रणबीरच्या हातातील ‘ती’ स्पेशल अंगठी पाहिली ? दीपिकाने आपल्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रित करत चित्रपटसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं . पण , रणबीरच्या चित्रपटांना मात्र सतत अपयश मिळत होतं . त्यानंतरच्या काळात ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाने रणबीरच्या चित्रपट कारकिर्दीला वेगळीच कलाटणी दिली आणि पुन्हा ही गोष्ट सिद्ध झाली की प्रेक्षकांच्या मनावर आजही रणबीर आणि दीपिकाचीच जोडी अधिराज्य गाजवते . दीपिका आणि रणबीर आज वेगवेगळ्या वाटांवर असून , खासगी आयुष्यात ते एकमेकांपासून बरेच दूर आहेत . पण , त्यांच्या ब्रेकअपमुळे रणबीरचं ‘लकी चार्म’ कुठेतरी हरवून गेलं अशीच प्रतिक्रिया चाहते आजही देतात .
0
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच वेध लागतात , ख्रिसमस आणि न्यू इयर पाटर्य़ाचे . नवीन वर्षांचं थाटात स्वागत करायचं निमित्त पार्टी करण्यासाठी पुरेसं असतं . जिथे पार्टीचा विषय येतो , तिथे शॉिपग , नवीन लुक , नवी स्टाइल ही आलीच . अर्थात पण चालू वर्षांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कपडय़ांची खरेदी करायची , म्हणजे ते ‘लेटेस्ट ट्रेंड’चे असलेच पाहिजेत . नाही तर पुढच्या दोन महिन्यांमध्ये हे कपडे ‘आऊटडेटेड’ होतात . म्हणूनच येत्या काळातही ‘ट्रेंड’मध्ये राहतील , अशा पोशाखांबद्दल जाणून घेतले पाहिजे . सध्या सगळ्यांना रविवारी येणाऱ्या ख्रिसमसचे वेध लागले आहेत . त्यातच यंदा ख्रिसमस , ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी वीकेण्डला आल्यामुळे जंगी पाटर्य़ाचे बेत रचले जात आहेत . अशी पार्टी म्हटलं की , केवळ आधुनिक पोशाख असून फायदा नाही तर , तो ‘ट्रेंडी’ आणि ‘स्टायलिश’ही असला पाहिजे . पार्टीवेअर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर वन पीस ड्रेस येतात . किंचित फ्लेअर असलेले , साधारणपणे गुडघ्याच्या उंचीचे गोंडस वन पीस ड्रेस म्हणजे कोणत्याही पार्टीसाठी उत्तम . अर्थात त्यातही पर्याय खूप आहेत . यंदा ड्रेसेसच्या पलीकडे सुद्धा पार्टीवेअर मध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत . स्कर्ट्स , जंपसूट्स , जॅकेट्स , सूट्स असे बरेच पर्याय सध्या पार्टीवेअरमध्ये आहेत . त्यांचा विचार नक्कीच करू शकता . सिक्वेन्स शाइन यंदाच्या सीझनचा सगळ्यात मोठा ट्रेंड म्हणजे सिक्वेन्स , गोल्ड फिनिश , ग्लिटर ड्रेसेस . एरवी दागिने , अॅक्सेसरीजपर्यंत मर्यादित राहणारा गोल्ड रंग कपडय़ांमध्ये उतरला आहे . सोनेरी किंवा चंदेरी ड्रेसला सध्या प्रचंड मागणी आहे . फक्त ड्रेस नाही , तर जॅकेट , लेिगग , स्कर्टमध्येही हा झगमगाट पाहायला मिळेल . अर्थात हे ड्रेस घालताना आपल्याला सोन्याची ‘बेबी डॉल’ व्हायचं नाही आहे , हे लक्षात असू द्यात . त्यामुळे सोनेरी स्कर्ट किंवा लेिगगसोबत पांढरा किंवा काळ्या रंगाचा शर्ट आणि एखादं स्पोर्टी जॅकेट घालून सोनेरी रंगाचा भडकपणा कमी करू शकता . सिक्वेन्स ड्रेससोबत शूज बेसिक काळ्या किंवा न्यूड रंगाचे असू द्यात . अगदी पार्टीमध्येसुद्धा या ड्रेससोबत तुम्ही सफेद स्नीकर्स घालू शकता . ऑफिसवरून एखाद्या पार्टीला जायचं असेल , तर सोबत एक सोनेरी जॅकेट ठेवू शकता . फॉर्मल ट्राऊझर आणि शर्टला सुद्धा हे जॅकेट ग्लॅमरस लुक देतं . लिटिल ब्लॅक ड्रेस लिटिल ब्लॅक ड्रेस ही संकल्पना खरं तर पन्नासच्या दशकातली , पण आजही पार्टीजमध्ये त्याने त्याचं वर्चस्व कायम ठेवलं आहे . यंदाच्या सीझनमध्ये रिलॅक्स फिटचे सिक्वेन्स ब्लॅक ड्रेस ट्रेंडमध्ये आहेत . याशिवाय शिफ्ट ड्रेस किंवा न्यूडल स्ट्राप ड्रेससुद्धा तुम्ही वापरू शकता . यंदा पार्टीला जाताना हाय हिल्स घालण्यापेक्षा मस्त स्निकर्स घालून स्पोर्टी लुक कॅरी करू शकता . यंदा लिटिल व्हाइट ड्रेससुद्धा ट्रेंडमध्ये आहे . एरवी पार्टीजमध्ये सहसा वापरला न जाणारा सफेद रंग या वर्षी आवर्जून वापरा . स्कर्ट अफेअर पार्टीवेअर लुक्समध्ये सध्या स्कर्ट्सचे वेगवेगळे पर्याय पाहायला मिळतील . अर्थात यात सगळ्यात भाव खाणारा प्रकार म्हणजे सोनेरी प्लिटेड स्कर्ट . पण त्यासोबतच टय़ूल स्कर्ट , फ्लेअर स्कर्ट तुम्हाला यंदा प्रामुख्याने पहायला मिळतील . टय़ूल या पारदर्शी कापडाचे पदर असलेला टय़ूल स्कर्ट तुम्हाला थेट डिस्ने प्रिन्सेसच्या दुनियेत घेऊन जाईल . या सिंपल स्कर्टसोबत तुम्ही प्लेन कॉन्ट्रास्ट शेडचा क्रॉप टॉप किंवा शर्ट कॅरी करू शकता . याशिवाय िपट्रेड स्कर्टसुद्धा बाजारात आले आहेत . िपट्रेड फ्लेअर स्कर्टसोबत फिटेड टी - शर्ट आणि एखादा लूझ समर शर्ट ड्रेस जॅकेट म्हणून घालू शकता . बोल्ड जंपसूट ऑफिस पार्टीमध्ये काय घालायचं ? हा प्रश्न जर तुम्हाला असेल , तर बोल्ड शेडचा जंपसूट हे तुमचं उत्तर ठरू शकतं . फॉर्मल पार्टीजमध्ये ड्रेसकोडच पाळावा लागतो . पण त्याचंबरोबर तुमचा लुक उठून दिसेल , हेही महत्त्वाचं असतं . अशा वेळी निळा , लाल , पिवळा , जांभळा , नारंगी अशा बोल्ड रंगाचा जंपसूट तुम्ही वापरू शकता . अर्थात तो निवडताना तुमच्या स्किनकलरचा विचार कराच . अगदीच सेफ प्ले करायचा असेल , तर पांढरा किंवा काळा जंपसूट आणि त्यावर स्टायलिश जॅकेट घालू शकता . जंपसूटसोबत मस्त बेल्ट असणं गरजेचं असतं . त्याचंबरोबर हिल्सचे शूज यासोबत छान दिसतात . कुठे मिळेल ? सध्या मुंबईच्या प्रत्येक मॉलमध्ये पार्टीवेअर लुक पाहायला मिळेल . यांच्या किमती सधारणपणे १०० रुपयांपासून सुरू होतात . तसचं बांद्रा , लोखंडवालाच्या स्ट्रीट शॉिपग मार्केटमध्येही स्वस्तात मस्त असे कपडय़ांचे पर्याय तुम्हाला मिळतील .
1
भारताच्या १९ वर्षाखालील संघाने ऑस्ट्रेलियन संघांचा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धुव्वा उडवत जेतेपद पटकावले . ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले २१७ धावांचे आव्हान टीम इंडियाने आठ गडी राखून दहाहून अधिक षटके शिल्लक असतानाच पूर्ण केले . हा भारताचा १९ वर्षाखालील क्रिकेटमधील चौथा विश्वचषक आहे . याआधी २००० साली मोहम्मद कैफ , २००८ साली विराट कोहली आणि २०१२ रोजी उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने अशीच कामगिरी केली होती . नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियन संघाने घेतला . मात्र भारतीय गोलंदाजांनी केवळ ऑस्ट्रेलियन संघाच्या धावगतीलाच लगाम न घालता वेळोवेळी विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण ५० षटकेही न खेळता २१६ धावांवर तंबूत परतला . इशार पोरेल , शिवा सिंग , कमलेश नागरकोटी आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी दोन तर शिवम मावीने एक विकेट घेतली . तुलनात्मक रित्या सोप्प्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या मनजोत कालराने अवघ्या १०२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली . त्याला हार्वीक देसाई ( नाबाद ४७ ) , कर्णधार पृथ्वी शॉ ( २९ ) आणि शुभम गील ( ३१ ) यांची चांगली सोबत केली . या विजयानंतर भारतीय संघाने मैदानात केलेल्या खास सेलिब्रेशनची सध्या सोशल नेटवर्किंगव चांगलीच चर्चा रंगली आहे . मात्र या सेलिब्रेशनचा अर्थ अनेकांना ठाऊक नाहीय म्हणूनच आम्ही सांगत आहोत नक्की काय होते ते सेलिब्रेशन . हार्वीक देसाईने ऑफ साईडला चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय खेळाडूंचा एकच जल्लोष सुरु झाला . डगाआऊटमध्ये बसलेले पृथ्वी शॉ , शुभम गील बरोबरच इतर खेळाडूही लगेचच धावत मैदानावर आले आणि त्यांनी शतकवीर मनजोतला मिठ्या मारल्या . त्यानंतर पृथ्वी शॉने एक वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन मैदानातच क्रिजजवळ केले . पृथ्वी शॉ आपल्या हाताने एखादी शक्तीशाली ऊर्जा सोडतो आणि समोरचे सर्व खेळाडू पडतात अशाप्रकारचं हे सेलिब्रेशन होतं . खरं म्हणजे क्रिकेटच्या मैदानात असं वेगळे सेलिब्रेशन नवीन असलं तरी हे फुटबॉलच्या फिफा १८ या गेममध्ये तरी वरचेवर पहायला मिळेत . काय आहे हे सेलिब्रेशन या सेलिब्रेशनला हायपनोसीस सेलिब्रेशन असं म्हणतात . सर्व खेळाडूंना समोर गोळा करुन हाताने सोडलेल्या टेलीकायनॅटिक पॉवरच्या ( हवेच्या माध्यमातून जाणारी अदृश्य शक्ती ) माध्यमातून जमीनीवर पाडायचे असे हे सेलिब्रेशन असते . या संदर्भात स्पोर्टसकीड या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार हे अशाप्रकारचे हायपनोसीस सेलिब्रेशन फिफा १८ या गेममध्ये अनेकदा केले जाते . जेव्हा एखादा संघ एखाद्या सामन्यात किंवा स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा खूपच वरचढ कामगिरी करतो त्यावेळी हे सेलिब्रेशन केले जाते . पाहा भारतीय संघाचे हे सेलिब्रेशन
2
कलाविश्वामध्ये क्षणात नाती बनतात आणि कोणतीही कल्पना नसताना याच नात्यात दुरावाही येतो . गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काही कलाकारांच्या नात्यात दुरावा आल्याचे अनेकांनाच ठाऊक आहे . अशाच सेलिब्रिटी जोडप्यांच्या यादीत आता अभिनेता नागार्जुनच्या मुलाच्या नावाचाही समावेश झाला आहे . इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनचा मुलगा अखिल अक्किनेनीचे त्याची प्रेयसी श्रिया भुपाल हिच्याशी ठरलेले लग्न मोडले आहे . एका दिमाखदार सोहळ्यामध्ये या दोघांचाही साखरपुडा झाला होता . लग्न ठरण्याआधीच जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या प्रेमीयुगुलांनी हैद्राबाद येथील जीव्हीके हाउस येथे खासगी पद्धतीने साखरपुडा केला होता . अगदी नेमक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता . दरम्यान , साखपुड्यानंतर हे प्रेमीयुगुल इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार होते . या दोघांच्या लग्नसोहळ्यासाठी जवळपास सहाशे मंडळी भारतातून इटलीला जाणार असल्याचेही म्हटले जात होते . पण , अखिल आणि श्रिया यांच्या काही कारणावरून बिनसले आणि दोघांनीही हे नाते इथेच थांबविण्याचा निर्णय घेतला . श्रिया ही प्रसिद्ध व्यावसायिक जीव्हीके रेड्डी यांची नात असून , अभिनेता नागार्जुन आणि जीव्हीके रेड्डी यांनी या दोघांचीही समजूत काढली . पण , अखिल आणि श्रियावर त्याच्या काहीही परिणाम झाला नाही . अखिल आणि श्रियाच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे आमंत्रितांनी त्यांच्या लग्नाला जाण्यासाठीची तयारी आणि आरक्षण वगैरे करण्यास सुरुवात केली होती . पण , त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे आता अनेकांच्याच मनात विविध प्रश्नांनी घर केले आहे . लग्नासाठी तयारीला लागलेल्या आमंत्रितांना त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्याचे वृत्तही इंडियन एक्प्रेसने प्रसिद्ध केले आहे . दरम्यान , गेल्या आठवड्यापर्यंत अखिल आणि श्रियाच्या नात्यात कोणताही वाद नसताना त्यांनी अचानक असा निर्णय घेतल्यामुळे सध्या याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे . काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात अखिल आणि श्रियाची भेट झाली होती . तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते . मात्र , त्यांनी वर्षाभरापूर्वीच आपल्या पालकांना त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत कल्पना दिली होती . दाक्षिणात्य फिल्मफेअरसाठी अधिकृतरित्या कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम पाहते . तिने टॉलिवूडमध्ये श्रिया सरण , काजल अग्रवाल , रकुल प्रित यांच्यासाठी काम केले आहे . तर बॉलीवूडमध्ये तिने श्रद्धा कपूर , आलिया भट्ट यांच्यासोबत काम केले आहे .
0
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणा - या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून कमी कालावधीमध्येच त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडू लागला आहे . ‘धडक’च्या निमित्ताने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे . चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असताना जान्हवीच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली होती . मात्र , या कार्यक्रमात इशानचा भाऊ शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी हजेरी न लावल्यामुळे कलाविश्वात एकच चर्चा सुरु झाली आहे . दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं होतं . त्यामुळे ‘सैराट’ची क्रेझ पाहता निर्माता - दिग्दर्शक करण जोहरने त्याचा हिंदी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच साकार झाला ‘धडक’ . ‘धडक’च्या निमित्ताने जान्हवी आणि इशान या नव्या जोडीने ख - या अर्थाने कलाविश्वात पाऊल ठेवले आहे . ट्रेलर प्रदर्शनाच्यावेळी जान्हवी - इशानला शुभेच्छा देण्यासाठी शाहीद कपूर आणि मीरा राजपूत उपस्थित राहतील असं सा - यांनाच वाटलं होतं . परंतु या दोघांनीही या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली . त्यामुळे शाहीदने इशानची जाहीर माफी मागितली असून त्या दोघांच्या अनुपस्थिती मागचे कारण स्पष्ट केले आहे . शाहीद सध्या त्याच्या आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे . त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चित्रीकरणासाठी मुंबईबाहेर आहे . त्यामुळे त्याला ‘धडक’च्या ट्रेलर प्रदर्शनासाठी उपस्थित राहता आलं नाही . मात्र , शाहीद - मीराने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडीयावर शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत . दरम्यान , ट्रेलर प्रदर्शनाच्यावेळी इशानबरोबर शाहीद - मीरा नसले तरी त्याची आई निलिमा सतत इशानबरोबर वावरताना दिसून आल्या . आतापर्यंत ‘धडक’च्या ट्रेलरला २० मिलीयन व्ह्युज मिळाले असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल असं दिसून येत आहे .
0
आग्नेय आशियामध्ये अतिजलद गतीने पसरणाऱ्या ‘सुपर मलेरिया’ने जागतिक धोका निर्माण केला असून , या मलेरियाने औषध प्रतिरोधक होण्यापूर्वीच त्याला नष्ट करण्याची आवश्यकता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे . कम्बोडियामध्ये उदयास आलेला मलेरियाचा हा धोकादायक परजीवी मुख्य मलेरियाविरोधी औषधांनी नष्ट होत नाही . मात्र आतापर्यंत तो थायलंड , लाओस आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये वेगाने पसरला आहे . बँकॉकमधील ऑक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसिन रिसर्च युनिटच्या संशोधकांनी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध केलेल्या या संशोधनामध्ये ‘सुपर मलेरिया’बाबत माहिती देण्यात आली आहे . या सुपर मलेरियामध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या मलेरियाच्या औषधाला प्रतिरोध करण्याची क्षमता असल्याने त्याचा प्रसार जगभर वेगाने होऊ शकतो , असे संशोधकांनी म्हटले आहे . आम्हाला वाटते हा एक गंभीर धोका आहे . हा मलेरिया संपूर्ण प्रदेशामध्ये अतिशय वेगाने पसरत असून , अफ्रिकेमध्ये तो मोठय़ा प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे , असे ऑक्सफर्ड ट्रॉपिकल मेडिसिन रिसर्च युनिटचे प्राध्यापक अर्जेन डॉनड्रॉप यांनी म्हटले आहे . या सुपर मलेरियाला रोखण्यासाठी सामान्य मलेरियाची औषधे देण्यात आली , मात्र त्याला रोखण्यात अपयश आले . क्लोरोक्विन , प्रायमाक्विन , क्विनाईन , आरर्टिमिसिन ही मलेरियाविरोधी औषधे वापरली जातात . मात्र या औषधांना या सुपर मलेरियाने कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही . उपचारामध्ये अपयश येण्याचे प्रमाण कम्बोडियामध्ये सुमारे ६० टक्क्यांवर गेले आहे . त्यामुळे या सुपर मलेरियाला तात्काळ रोखणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे . प्रत्येक वर्षी २१२ दशलक्ष लोकांना मलेरियाची लागण होते . अॅनॉफिलस जातीचे डास चावल्यामुळे मलेरियाची लागण मोठय़ा प्रमाणात होते . मलेरियामुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू होतो .
1
थंडीचे दिवस आले की घशाची खवखव ठरलेलीच . मग ऑफीसला गेलो किंवा कुठे बाहेर गेलो तरी इरिटेशन होत राहतं . उगाचच आजारी असल्याचा फिल येत राहतो . बोलताना , खाताना त्रास होतो . आता वातावरण बदललल्याने शरीरावर त्याचे काही ना काही परिणाम तर होणारच . त्यातही इतक्या लहान तक्रारीसाठी डॉक्टरांकडे कशाला जायचे म्हणून आपण ती गोष्ट अंगावर कढतो . पण असे अंगावर काढल्यास त्या त्रास होऊ शकतो . त्यामुळे या समस्येसाठी काही घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो . पाहूयात अगदी सहज करता येतील असे सोपे आणि घरगुती उपाय… . वाफ घ्या थंडीमध्ये घशाचे इन्फेक्शन होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे . याच्या जोडीला येणारा ताप , सर्दी यामुळे आपण हैराण होऊन जातो . पण वाफ घेणे हा यारील सोपा उपाय आहे . घरच्या घरी गरम पाणी करुन त्याची वाफ घेतल्यास घशाला आराम पडतो . दिवसातून दोन ते ती वेळा हे केल्यास इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते . गुळण्या करा सर्दी , खोकला यांसारख्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे गेल्यास तेही औषधांबरोबर गुळण्या करायला सांगतात . कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने त्याचा निश्चित फायदा होतो . इतकेच नाही तर ऑफीसमध्ये किंवा बाहेर असल्यास कोमट पाणी आणि मीठ शक्य नसले तर साध्या पाण्याने गुळण्या कराव्यात . त्यामुळे घसा मोकळा व्हायला मदत होते . गरम पेय फायदेशीर घसा दुखत असल्यास काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते . अशावेळी गरम चहा , कॉफी किंवा सूप प्यायल्यास त्याचा निश्चित फायदा होतो . चहामध्ये तुळस , लवंग , आले घातल्यास घशासाठी तो जास्त उपयुक्त होतो . असा चहा दिवसातून २ वेळा घेतला तरी घशाला आराम मिळतो .
1
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची मॉडेल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त आहे . मात्र या व्यस्त कामकाजातून वेळ काढत तिने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे . या फोटोशूटचा एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे . त्यामुळे कतरिनाचे हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून तिच्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे . याच कमेंट्समध्ये अभिनेता अर्जुन कपूरनेही उडी घेतली असून त्याने कतरिनाला एक मजेशीर प्रश्न विचारला आहे . व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर कतरिनाने पावडर अँण्ड अर्थ अशी कॅप्शन दिली आहे . या फोटोवर तिचे चाहते चांगल्या प्रतिक्रिया देत असून अर्जुन अशी काही प्रतिक्रिया देईल असं कतरिनाला स्वप्नातही वाटलं नव्हतं कतरिनाचा हा व्हिडिओ पाहताच तुझ्या डोक्यात कोंडा झाला आहे का ? असा प्रश्न अर्जुनने तिला विचारला . अर्जुनची ही कमेंट वाचून कतरिनाने त्याला मजेशीर उत्तर देत वेळ मारुन नेल्याचं दिसून आलं . मात्र अर्जुन - कतरिनाची ही मस्ती सुरु असतानाच कतरिनाच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स मिळत आहे . दरम्यान , बॉलिवूडमध्ये पुन्हा सक्रिय झालेल्या कतरिनाचा आगामी ठग्स ऑफ हिंदुस्तान आणि झीरो हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत .
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे . नुकतंच या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं . या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे . विवेकच्या नावाची घोषणा झाल्यापासून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आता विवेकच्या निवडीवरून जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मोदींची आणि विवेकची फिरकी घेतली आहे . ‘डॉक्टर मनमोहन सिंग यांची भूमिका करण्यासाठी अनुपम खेर सारख्या उत्तम अभिनेत्याची निवड होते , पण बिच्चाऱ्या मोदींना मात्र आपल्या जीवनपटासाठी विवेक ओबेरॉय सारख्या अभिनेत्यावर समाधान मानावं लागत आहे त्यापेक्षा सलमानची निवड झाली असती तर खरी मज्जा आली असती’ असं उपहासात्मक ट्विट करत ओमर यांनी मोदींची फिरकी घेतली आहे . मोदींच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होणार आहे . जवळपास २३ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . याचा पहिला लूक प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी विवेकला ट्रोल केलं . यात ओमरही मागे राहिले नाही . या पोस्टर लाँचनंतर त्यांनी मोदींची आपल्या उपहासात्मक ट्विटनं फिरकी घेतली . त्यांचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .
0
मराठी - हिंदी कलाकृतींतून आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या , तसेच रंगभूमीच्या माध्यमातून स्त्री हक्कांचा , महिला सक्षमीकरणाचा जागर करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नाट्य लेखिका सुषमा देशपांडे यांचा लंडन येथे नुकत्याच झालेल्या चित्रपट महोत्सवात गौरव करण्यात आला . रंगभूमी असो वा चंदेरी पडदा , आपली भूमिका अधिकाधिक जिवंत कशी होईल , यावर भर देणे हे सुषमा देशपांडे यांच्या अभिनयाचे सार सांगता येईल . ‘आज्जी’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाबद्दल सुषमा देशपांडे यांना गौरविण्यात आले . लंडन येथे शनिवारी झालेल्या ‘यूके आशियाई चित्रपट महोत्सवा’मध्ये सुषमा देशपांडे यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मान करण्यात आला . देवाशिष माखिजा यांनी दिग्दर्शित केलेला ‘आज्जी’ हा चित्रपट सारेगामा आणि यूडली फिल्म्स यांची संयुक्त निर्मिती आहे . खेळण्या - बागडण्याच्या अल्लड वयात वासनेची शिकार ठरलेली आपली नात मंदा अकाली कोमेजून जावू नये यासाठी तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला अद्दल घडवणाऱ्या , धडा शिकवणाऱ्या कठोर आजीची भूमिका सुषमा देशपांडे यांनी ‘आज्जी’ या चित्रपटात रंगवली आहे . स्थानिक राजकारण्याच्या मुलाच्या वासनेची शिकार ठरलेल्या आपल्या नातीला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी आजी , राजकारणी आणि पोलीस यांची अभद्र युती , त्यातून सामान्यांवर होणारे परंतु तेवढ्याच ताकदीने दडपून टाकले जाणारे अत्याचार , पीडितेच्या पालकांची होणारी घुसमट , उद्ध्वस्त होत जाणारे कुटुंब आणि या परिस्थितीला शरण न जाता ‘त्या’ नराधमाला अखेरीस धडा शिकवणारी शस्त्रसज्ज झालेली आजी , अशी खुर्चीला खिळवून ठेवणारी ‘आज्जी’ या चित्रपटाच्या कथेची गुंफण आहे . ‘यूके आशियाई चित्रपट महोत्सवात मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे . ‘आज्जी’ चित्रपटाचे दिग्दर्शक , निर्माते यांच्यासह असंख्य प्रेक्षकांना या पुरस्काराचे श्रेय जाते’ , अशी प्रतिक्रिया सुषमा देशपांडे यांनी पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना व्यक्त केली . चित्रपटात सुषमा देशपांडे यांच्यासह स्मिता तांबे , सादिया सिद्दीकी , श्रावणी सूर्यवंशी , सुधीर पांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत . गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला ‘आज्जी’ चित्रपटगृहांत झळकला होता . तत्पूर्वी बुसान आणि मुंबई या दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत ‘आज्जी’ वर चित्रपट समीक्षकांनी स्तुतिसुमने उधळली होती .
0
भारतीय क्रिकेट संघातील बऱ्याच खेळाडूंची नाव काही अभिनेत्रींशी जोडली जातात . मुळात अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केल्याचीही उदाहरणं आहेत . या कधीही न संपणाऱ्या चर्चांमध्ये आता नव्याने लक्ष वेधतोय तो म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( आरसीबी ) या संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल . आरसीबीच्या संघातील गोलंदाजाच्या फळीमध्ये असणारा हुकमी एक्का म्हणून युजवेंद्रकडे पाहिलं जातं . असा हा स्टार खेळाडू त्याच्या गोलंदाजीसोबतच खासगी आयुष्यामुळेही प्रकाशझोतात आला आहे . गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आणि एका कन्नड अभिनेत्रीच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या . कन्नड अभिनेत्री तनिष्का कपूरला युजवेंद्र डेट करत असून , येत्या काही दिवसांमध्ये तोही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं . आपल्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता खुद्द युजवेंद्रनेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत . ‘माझ्या आयुष्यात कोणतीच महत्त्वाच गोष्ट घडत नाहीये . मी लग्न करत नाहीये . तनिष्का आणि मी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत . त्यामुळे मी माध्यांना आणि चाहत्यांना विनंती करतो की कृपा करुन चुकीची माहिती पसरवू नका . तुम्ही सर्वजण माझ्या खासगी आयुष्याविषयी काहीही बोलताना इतकी काळजी घ्यावी अशीच माझी अपेक्षा आहे . लग्नाविषयीच्या चर्चांना उगाचच हवा देऊ नका . किंबहुना कोणत्याही गोष्टीविषयी सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी त्याची पडताळणी करुन घ्या’ , असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं आहे . वाचा : ऑलिम्पिक पदकाचा वेध घेण्याचे स्वप्न ! युजवेंद्रने केलेली ही पोस्ट पाहता त्याच्या आणि तनिष्काच्या नात्याविषयी आतातरी या अफवांना वाव मिळणार नाही असं म्हणावं लागेल . गेल्या बऱ्याच दिवसांपासून युजवेंद्र आणि तनिष्काच्या डेटिंगविषयीच्या चर्चांना उधाण आलं होतं . इतकंच काय , तर येत्या काळात ते दोघंही लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात होतं . पण , आता मात्र हे संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे हेच खरं .
0
आपल्या अभिनयाने आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ओम पुरी यांची एक मुलाखत सध्या प्रकाशझोतात आली आहे . २०१७ च्या सुरुवातीलाच ओम पुरी यांचं निधन झालं होतं . ज्यानंतर कलाविश्वात त्यांची अनुपस्थिती नेहमीच सहकलाकारांना आणि चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली . असं असलं तरीही विविध कलाकृतींच्या माध्यामातून ते आजही आपल्याच आहेत . सध्याच्या घडीला ओम पुरींचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . ‘लश्टम पश्टम’ असं या चित्रपटातं नाव असून , तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . ‘लश्टम पश्टम’मध्ये ओम पुरी एका पाकिस्तानी टॅक्सी चालकाच्या भूमिकेत झळकणार आहेत . पाकिस्तानातून भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली आहे . याच चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एक मुलाखत दिली होती . ज्यामधून त्यांनी कमी निर्मिती खर्चात साकारलेल्या चित्रपटांनाही प्रेक्षकांना प्रभावित करावं आणि त्या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा असं मत मांडलं होतं . पाहा : Loveratri Trailer : ‘लवरात्री’तून पाहता येणार नौरात्रोत्सव आणि प्रेमाचे अनोखे रंग ‘लश्टम पश्टम’ तुलनेने कमी निर्मिची खर्चात साकारलेला चित्रपट आहे . आजच्या घडीला मोठ्या चित्रपटांप्रमाणे प्रसिद्धीसाठी पैसे खर्च करणं ही अशा चित्रपटांच्या वाट्याची गोष्ट नसते , याविषयीच सांगत ते म्हणाले होते , ‘चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तीन महिने आधीपासूनच या चित्रपटांचा गाजावाजा नसतो . त्यांच्या कुठे जाहीरातीसुद्धा नसतात . किंबहुना बॅनरबाजीसुद्धा त्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते . त्यामुळे अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी पाहावं आणि त्यांना दाद द्यावी . ’ प्रेक्षकांसोबतच या चित्रपटांनीही प्रेक्षकांचा विश्वास जिंकणं तितकच महत्त्वाचं असल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला होता .
0
मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंगाच्या प्रकरणानंतर दाक्षिणात्य अभिनेत्रीने चित्रपट सृष्टीमध्ये महिलेंवर होणाऱ्या लैंगिक शोषणाबद्दल खंत व्यक्त केली आहे . अभिनेत्रीवर ओढावलेल्या प्रसंगानंतर वरलक्ष्मी सरथकुमारने चित्रपटसृष्टीत तिच्यासोबत कार्यालयामध्ये घडलेल्या लैंगिक शोषणाचा प्रसंग फेसबुकच्या माध्यमातून सांगितला आहे . तिच्यावर झालेल्या अन्यायावर खुलेपणाने लिहिताना तिने समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे दाखवून दिले . लैंगिक अत्याचारावर व्यक्त होताना वरलक्ष्मी लिहिते की , “एका लोकप्रिय वाहिनीमध्ये प्रोग्रॅमिंगची मुख्य जबाबदारी स्वीकारताना कार्यालयीन मिटींगमध्ये मला एक भयानक अनुभव आला . अर्ध्या तासाची मिटींग संपल्यानंतर पुरुष सहकाऱ्याने बाहेर कधी भेटायचे असे विचारले . त्याच्या या प्रश्नावर प्रतिउत्तर देताना काही विशेष कामानिमित्त का ? असा प्रतिप्रश्न मी केला . यावर हसत मुखाने त्या व्यक्तिने मला कामाविषयी नाही तर काही वेगळा विचार करण्याविषयी सांगितले . त्याच्या या उत्तरानंतर मला खूप राग आला होता . माफ करा असे सांगत मी त्याला तिथून जायला सांगितले . तो मनुष्य असे वागून देखील हसत मुखाने बाहेर गेला . ” ती पुढे लिहिते की , लोकांची याबाबतची प्रतिक्रिया ही अगदी सामान्य असते . चित्रपटसृष्टीमधील आणि चित्रपटसृष्टीबाहेरील लोक या क्षेत्रात असेच होणार असे मानतात . तुम्हाला माहिती असते मग या क्षेत्राकडे तुम्ही वळताच कशाला असा प्रश्न देखील अनेकजण करतात . एवढेच नाही तर तक्रार करण्यात काय अर्थ आहे ? असा सूर देखील पाहायला मिळतो . समाजातील संकुचित विचारांवर तिने खंत व्यक्त केली . महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला सांभाळून पुढे चालविण्यासाठी मी या क्षेत्रात आलेली नाही , तर मला अभिनयावर प्रेम असल्यामुळे मी हे क्षेत्र निवडले आहे असेही ती म्हणते . मी माझ्या कामाबद्दल प्रामाणिक आहे . मी अशा घटनांमुळे माघार घेणार नाही . समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विचार व्यक्त करताना महिलांची सुरक्षा हे एक स्वप्न आहे . त्यामुळेच बलात्कार या शब्दाचे समाजातून उच्चाटन होऊ शकलेले नाही , असा उल्लेख तिने पोस्टमध्ये केला आहे . वरलक्ष्मीच्या चित्रपटाविषयी सांगायचे तर , राष्ट्रीय पुरस्कार विजेता निर्माता बाला पाजनीसामी यांच्या आगामी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटामध्ये ती करकट्टम नर्तकीच्या भूमिकेत दिसणार आहे . यासाठी तिने खास नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे . वरलक्ष्मीने २०१२ मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीमधून पदार्पण केले होते . यापूर्वी मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भावनाचे अपहरण आणि विनयभंग केल्याची घटना ही दुर्देवी असल्याचे मत मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने व्यक्त केले होते . या प्रकारानंतर या अभिनेत्याने महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित केला होता . या घटनेमुळे पुरुष असल्याने मान खाली झुकली असल्याचेही तो म्हणाला होता . केरळमधील अभिनेत्रीवरील ओढावलेल्या प्रसंगामुळे चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाचाही मुद्दा आता समोर येत आहे .
0
‘ए दिल है मुश्किल’मुळे सिनेवर्तुळ आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेत असणारा रणबीर कपूर त्याच्या एका विधानामुळे पुन्हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे . विविध भूमिका साकारणाऱ्या रणबीरने समलैंगिक भूमिका साकारण्याची तयारी दर्शवली आहे . ‘कपूर अॅन्ड सन्स’ या चित्रपटामध्ये अभिनेता फवाद खानने साकारलेली भूमिका पाहता अशा भूमिकांसाठी आता कलाकारांना दारं खुली झाली आहेत’ असे रणबीर म्हणाला . ‘वोग इंडिया’ या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने हे विधान केले आहे . ‘याआधी जर कोणी मला समलैंगिक भूमिकांसाठी विचारले असते तर मी बहुधा त्या भूमिका नाकारल्याच असत्या’ असेही रणबीर म्हणाला . चित्रपटांतील काही आव्हानात्मक भूमिकांविषयी बोलताना रणबीरने ‘उडता पंजाब’च्या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टची आणि ‘कपूर अॅन्ड सन्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता फवाद खानची प्रशंसा केली आहे . मोठ्या पडद्यावर समलैंगिक भूमिका साकारण्याविषयी बोलताना ‘मी नक्कीच अशी भूमिका करेन . पण याआधीच अशी भूमिका फवादने साकारली आहे . त्याने ही भूमिका साकारत इतरांसाठी समलैंगिक भूमिकांचे दार खुले केले आहे’ , असे रणबीर बोलला . याशिवाय सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठीही आपण तयार आहोत असेही या मुलाखतीत रणबीरने स्पष्ट केले . ‘उद्या जर राजकुमार हिरानी यांनी मला ‘मुन्नाभाई एमबीबीबीएस’मध्ये ‘सर्किट’ची भूमिका साकारायला सांगितली तर मी त्या पात्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन’ , असे मत रणबीरने मांडले . रणबीरच्या या मुलाखतीची सध्या प्रचंड चर्चा आहे . त्याच्या आगामी ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटासाठीही सिनेरसिकांमध्ये कमीलीची उत्सुकता आहे .
0
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला एकमेव टी - २० सामना ९ जुलैला जमैकाच्या मैदानात खेळवला जाईल . यावेळी भारतीय संघात काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात . पीटीआयने दिलेल्या वृत्तानूसार कर्णधार विराट कोहली उद्याच्या सामन्यात सलामीला येऊ शकतो . वन - डे सामन्यांची मालिका भारतीय संघाने ३ - १ अशा फरकाने जिंकली आहे . त्यामुळे एकमेव टी - २० सामन्यात विजय मिळवत वेस्ट इंडिज दौऱ्याचा शेवट गोड करण्याचा भारतीय संघाचा मानस असणार आहे . अजिंक्य रहाणेने एकदिवसीय मालिकेत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे . मात्र उद्याच्या सामन्यात अजिंक्य रहाणेएवजी विराट कोहली सलामीला येण्याची शक्यता आहे . याआधी विराट कोहलीने आयपीएलमध्ये रॉयल चँलेजर्सकडून खेळताना काही वेळा डावाची सुरुवात केली आहे . याचसोबत एकाह वन - डे सामन्यात संधी न मिळालेल्या ऋषभ पंतला उद्याच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे . याव्यतिरीक्त फिरकीपटूंमध्ये कुलदीप यादवच्या जोडीला युजवेंद्र चहलला संघात स्थान मिळू शकतं . जलदगती गोलंदाजीची जबाबदारी ही भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवच्या खांद्यावर असणार आहे . दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघही तितकाच तुल्यबळ आहे . ख्रिस गेलचं संघात पुनरागमन झाल्याने विंडिजमध्ये दहा हत्तींच बळ आलं आहे . त्यातच हा सामना गेलच्या घरच्या मैदानावर असल्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला गेलपासून विशेष काळजी घ्यावी लागणार आहे . या व्यतिरीक्त कायरन पोलार्ड , मार्लन सॅम्युअल्स , जेरॉम टेलर , कार्लोस ब्रेथवेट , सुनील नारायण यांनाही संघात स्थान मिळालेलं आहे . त्यामुळे उद्या होणाऱ्या वन - डे सामन्यात भारतीय संघ विंडिजच्या संघाला टक्कर देण्यासाठी नेमके कोणते डावपेच आखतो हे पहावं लागणार आहे .
2
वेब सीरिजना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे यात दररोज वेगवेगळ्या विषयांची भर पडत आहे . मोठमोठे बॉलिवूड कलाकारसुद्धा डिजीटल प्लॅटफॉर्मकडे आपला मोर्चा वळवत आहेत . अशातच वेब सीरिजच्या विश्वात एक आश्चर्यकारक एण्ट्री झाली आहे . स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँने एका वेब सीरिजची निर्मिती केली असून त्यात मुख्य भूमिकाही साकारली आहे . ‘राह दे माँ’ असं या वेब सीरिजचं नाव असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे . आता राधे माँ म्हटल्यावर ही वेब सीरिज धार्मिक किंवा आध्यात्मिक असेल असं अनेकांनी गृहित धरलं असणार . पण तसं नसून एका वेगळ्यात मुद्द्यावर यात भाष्य केलं गेलंय . ट्रेलरची सुरुवातच एका बोल्ड दृश्याने होत असून त्यात समलैंगिकतेचा मुद्दा मांडला आहे . राधे माँच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांवर ही वेब सीरिज आधारित आहे . गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राधे माँचे मॉर्डन लूकमधले काही फोटो व्हायरल होत आहेत . हे फोटो या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातील असल्याचं समोर आलं आहे . विविध कारणांमुळे चर्चेत आलेली आणि वादग्रस्त ठरलेली राधे माँ वेब सीरिजच्या माध्यमातून अशा प्रकारे समोर आल्याने अनेकांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे .
0
भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत मलेशियाला २ - ० असे नमवून अपराजित मालिका कायम राखली . या विजयाबरोबर भारताने गटात सात गुणांसह अव्वल स्थान कायम राखले . बाद फेरीच्या दिशेने कूच करणाऱ्या भारतीय संघाने ७व्या मिनिटाला पुनम राणीच्या गोलच्या जोरावर आघाडी मिळवून मलेशियावर दडपण निर्माण केले . भारतीय महिलांनी सातत्यपूर्ण खेळ करून सामन्यावर पकड घेतली . ४५व्या मिनिटाला दीपिकाने गोल करत भारताचा २ - ० असा विजय निश्चित केला . श्रीजेशकडून शहीद जवानांना विजेतेपद अर्पण बंगळुरू : आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत आम्ही मिळविलेले हे विजेतेपद उरी येथे अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना अर्पण करीत आहे , असे भारतीय हॉकी संघाचा कर्णधार पी . आर . श्रीजेश याने सांगितले . श्रीजेश म्हणाला , या स्पर्धेत पाकिस्तानबरोबर आमचा सामना होणार आहे हे निश्चित होते आणि आम्ही त्यादृष्टीनेच नियोजन केले होते . दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला पराभूत करण्याचाच आम्ही चंग बांधला होता . केवळ साखळी लढतीत नव्हे तर अंतिम सामन्यातही त्यांना पुन्हा पराभूत केल्यामुळे आम्ही एकप्रकारे शहीद जवानांना आदरांजलीच अर्पण केली आहे . हे विजेतेपद आमच्या जवानांसाठी व सर्व भारतीयांसाठी दिवाळी भेटच आहे . ‘ ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत खात्री नाही ’ २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्याची खात्री नाही , परंतु संघात स्थान मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार पी . आर . श्रीजेशने सांगितले . तो म्हणाला , ‘मी खात्रीने सांगू शकत नाही , परंतु संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन . ’ आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा जिंकल्यानंतर श्रीजेश आणि निक्कीन थिमैया यांचे बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी आगमन झाले . या स्पध्रेदरम्यान श्रीजेशच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते .
2
संपूर्ण देशात सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच कलाकारही या उत्साहात मागे नाहीत . सोशल मीडियाद्वारे होळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच काही कलाकार या सणाच्या सुरेख आठवणींमध्ये रमले आहेत . बॉलिवूड कलाकारांची होळी म्हटलं की , कपूर कुटुंबियांच्या होळीची आठवण सर्वांनाच होते . आर . के . स्टुडिओजमध्ये साजऱ्या होणाऱ्या होळीचा उत्साह सर्वांनाच ठाऊक आहे . त्याचीच प्रतिची देणारा एक सुरेख फोटो नीतू कपूर यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे . नीतू कपूरने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये बालपणीचा रणबीर कपूर आणि त्याची बहिण रिद्धीमा कपूर दिसत आहेत . होळीच्या पार्श्वभूमीवर पोस्ट केलेला हा फोटो सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे . अभिनेता रणबीर कपूरच्या चाहत्यांचा आकडा पाहता त्याचा हा फोटो विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे . या फोटोमध्ये नीतू कपूर आणि रिद्धीमा कपूर फोटोसाठी कॅमेरामध्ये पाहात आहेत . पण , रणबीर मात्र त्याच्याच धुंदीत आहे . फोटोसाठी पोझ देण्यापेक्षा रणबीरचे जास्त लक्ष हातातील लाडू पाहण्याकडेच लागल्याचे दिसते आहे . होळी म्हटलं की , खाद्यपदार्थांची चंगळही आलीच . त्यामुळे फक्त एका फोटोसाठी चविष्ट लाडू का सोडावा ? असेच काहीसे भाव रणबीरच्या चेहऱ्यावर दिसत आहेत . नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या या फोटोला त्यांनी साजेसे कॅप्शनही दिले आहे . ‘लाडू म्हणजे रणबीरचा आवडीचा विषय’ , असे कॅप्शन देत नीतू कपूर यांनी सर्वांना हटके पद्धतीने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत . सध्या चित्रपटांच्या निमित्ताने व्यग्र असणाऱ्या रणबीरचा हा फोटो त्याच्या काही सुरेख आठवणींना उजाळा देत आहे असेच म्हणावे लागेल . बी टाऊनचा हा ‘सावरिया’ सध्या अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये व्यग्र आहे . राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटातील लूक आणि एकंदर संजय दत्तची देहबोली आत्मसात करण्यासाठी तो फारच मेहनत घेताना दिसतो . त्यामुळे येत्या काळात रणबीर त्याच्या प्रेक्षकांना थक्क करण्यासाठी सज्ज झाला आहे , असे म्हणणे वावगे ठरणार नाही .
0
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या भूमिकेतील अभिनेत्री शिल्पा शिंदेवरील लैंगिक शोषणाबद्दल माहिती नसल्याचे सांगत शिल्पाची सहकलाकार सौमय्या टंडनने निर्मात्याची वर्तणूक चांगली असल्याचे म्हटले आहे . शिल्पा शिंदेने ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेचा निर्माता संजय कोहलीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे . ‘तू मला खूप आवडतेस . तू खूप हॉट आणि सेक्सी आहेस . अशा भाषेत संजयने माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला . माझ्यावर जबरदस्ती करत त्याने माझ्या शरीराला स्पर्श केला . मी त्याला विरोध करत असताना , त्याने हे तर चालतच असते , असे बोलत माझ्याशी गैरवर्तन केले . ’ , असा आरोप शिल्पा शिंदेने केला होता . आपण हा सर्व प्रकार सहकलाकार सौमय्याला सांगितला असल्याचे तिने म्हटले होते . मात्र , सोमय्याने या घटनेकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केल्याचे ती म्हणाली होती . याप्रकरणावर नुकतेच सौमय्याला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता . शिल्पासोबत घडलेला प्रकार तुला माहिती होता का ? असा प्रश्न तिला विचारण्यात आला . या प्रश्नावर उत्तर देताना सौमय्या म्हणाली , कामाच्या ठिकाणी असो किंवा इतर ठिकणी अशा घटनांना मी कधीच प्रोत्साहन देत नाही . मी नेहमीच अशा परिस्थितीत खंबीरपणे महिलांच्या पाठिशी उभी राहण्याला प्राधान्य देते . आमच्या दोघींच्यात याप्रकरणी कोणताही संवाद झालेला नाही . माझे आणि संजयचे व्यावसायिक संबंध चांगले आहेत . मला वैयक्तिकरित्या त्याच्यापासून कोणताही त्रास जाणवलेला नाही , असेही सौमय्या टंडन म्हणाली .
0
सेल्फी काढण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे . अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच या गोष्टीची मोठी क्रेझ असल्याचे दिसून येते . विविध पर्यटन स्थळांवर गेल्यावर आणि आयुष्यातील महत्त्वाचे क्षण टिपून ठेवण्यासाठी सेल्फी काढण्याला सगळेच पसंती देत असल्याचे पाहायला मिळते . या सेल्फीसाठी मोबाईल कंपन्यांनी आपल्या तंत्रज्ञानात बदल केला आहे . सेल्फी चांगला काढता यावा यासाठी मोबाईलच्या फ्रंट कॅमेराचे रिझोल्यूशन वाढविण्यात आले . एक किंवा दोन जणांचा सेल्फी काढणे तुलनेने सोपे असते पण ग्रुपचा सेल्फी काढायचा असल्यास त्यासाठी एकाने पुढे उभे राहून हा सेल्फी काढावा लागतो . ग्रुपचा सेल्फी काढणे सोपे व्हावे यासाठी सेल्फीस्टीक बाजारात आल्या . त्यांचे फॅड कमी होत नाही तोवरच असे एक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे , ज्यात तुम्हाला पायाने सेल्फी काढता येऊ शकतो . आता हे कसे काय ? तर यामध्ये कॅमेरा आपल्या बुटात अडकवून फोटो काढता येऊ शकतो . फोन बुटाला अडकविण्यासाठी इलॅस्टीक बँडची उत्तम सोय करण्यात आली असल्याने फोन खाली पडण्याची शक्यता नाही . केवळ पाय वर केल्यास आपण सहज आपला फोटो काढू शकतो . व्हिडिओमधील मुलगा आपल्या बुटाला फोन अडकवत कशापद्धतीने फोटो काढत असल्याचे पाहायला मिळते . यासाठी एक रिमोटही देण्यात आला आहे . ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज सेल्फी काढू शकता . या डिव्हाईसला ‘सेल्फी फीट’ असे नाव देण्यात आले आहे . या सेल्फी फीटला लोहचुंबकही देण्यात आले आहे . त्यामुळे एखाद्या लोखंडी वस्तूवर तुम्ही आपला फोन लावूनही फोटो काढू शकता . याशिवाय हे डिव्हाईस तुम्हाला तुमच्या घड्याळावरही लावता येऊ शकते . त्यामुळे तुमचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो तुम्ही अगदी सहज काढू शकता . सध्या हे डिव्हाईस ऑनलाईन उपलब्ध असून त्याची किंमत १६०० रुपये इतकी आहे .
1
द्विस्तरीय कसोटी सामन्यांच्या पद्धतीच्या प्रस्तावाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) केलेला विरोध लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी ) तो मागे घेतला आहे . भारताबरोबरच श्रीलंका , बांगलादेश व झिम्बाब्वे यांनीही या प्रस्तावाला विरोध केला होता . दुबई येथे विविध देशांच्या क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाणार होता . परंतु भारताच्या दबावाखाली आयसीसीला झुकावे लागले आहे . याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले , ‘‘हा प्रस्ताव मागे घेण्याबाबत आम्ही आयसीसीला विनंती केली होती . ही विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आयसीसीचे आभारी आहोत . प्रचलित पद्धतीद्वारेही कसोटी सामने लोकप्रिय होऊ शकतात . त्यामुळेच त्यात कोणताही बदल करू नये असे आमचे मत होते . ’’ द्विस्तरीय कसोटी पद्धतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी मतदानाचे अधिकार असलेल्या दहा देशांपैकी किमान सात देशांचा पाठिंबा आवश्यक होता . मात्र भारतासह चार देशांनी विरोध केल्यानंतर आयसीसीला माघार घ्यावी लागली . ‘‘या प्रस्तावामध्ये काही त्रुटी आहेत . या प्रस्तावावर आणखी चर्चा होण्याची आवश्यकता आहे , असे आमच्या लक्षात आले आहे . क्रिकेटच्या तीनही स्वरूपांच्या सामन्यांबाबत प्रत्येक देशाला जाणीव आहे , हे पाहिल्यानंतर मला खूप समाधान वाटत आहे , ’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले . दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत रोहित , धवन खेळणार नवी दिल्ली : दुलीप करंडक स्पर्धेची अंतिम फेरी १० सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार असून यामध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनसारख्या भारतीय कसोटी संघातील खेळाडूंचा समावेश असेल . या संघांत भारतीय संघामधील सहा खेळाडूंचा समावेश आहे . संघ इंडिया रेड : युवराज सिंग ( कर्णधार ) , अभिनव मुकुंद , शिखर धवन , सुदीप चॅटर्जी , गुरकिरट सिंग मान , अंकुश बैन्स ( यष्टीरक्षक ) , स्टुअर्ट बिन्नी , अक्षय वाखरे , कुलदीप यादव , अमित मिश्रा , नथ्थू सिंग , अनुरीत सिंग , इश्वर पांडे , नितीश राणा , प्रदीप सांगवान . इंडिया ब्ल्यू : गौतम गंभीर ( कर्णधार ) , मयांक अगरवाल , रोहित शर्मा , चेतेश्वर पुजारा , सिद्धेश लाड , दिनेश कार्तिक , परवेझ रसूल , सूर्यकुमार यादव , करण शर्मा , रवींद्र जडेजा , मोहित शर्मा , पंकज सिंग , अभिमन्यू मिथून , शेल्डन जॅकसन , हनुमा विहारी . इंडिया ब्ल्यू अंतिम फेरीत ग्रेटर नोएडा : पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे . इंडिया रेडविरुद्ध अंतिम फेरीचा सामना १० सप्टेंबरला सुरू होणार आहे . ब्ल्यू संघाने इंडिया ग्रीन संघापुढे ७६९ धावांचे अशक्यप्राय असे आव्हान ठेवले होते . अखेरच्या दिवशी ग्रीन संघाला ४ बाद १७९ धावा करता आल्या आणि सामना अनिर्णीत राहीला . ब्ल्यू संघाने पहिल्या डावात ७०७ धावांचा डोंगर रचत ग्रीन संघाला पहिला डाव २३७ धावांमध्ये संपुष्टात आणला होता . त्यानंतर दुसऱ्या डावात ब्ल्यू संघाने २९८ धावा करत ग्रीन संघापुढे ७६९ धावांचे आव्हान ठेवले होते . या सामन्यातील पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात ५८ धावा करणाऱ्या ब्ल्यू संघाच्या मयांक अगरवालला सामनावीराचा किताब देण्यात आला . ओझाच्या डोक्याला दुखापत ग्रेटर नोएडा : दुलीप करंडकाच्या इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन यांच्यातील सामन्यादरम्यान फिरकीपटू प्रग्यान ओझाच्या डोक्याला दुखापत झाली . इंडिया ग्रीनकडून खेळताना ओझा मिडऑनला क्षेत्ररक्षण असताना चेंडू जमिनीवरून उसळला आणि ओझाच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर आदळला . त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले .
2
ज्या महिलांना अतिलठ्ठपणा किंवा भूक मंदावल्याचा त्रास असतो अशा महिलांना नैराश्याचा आणि अस्वस्थतेचा धोका असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे . शरीरातील न्यूरोअॅक्टिव स्टेरॉइड ऑलोपग्रॅनोलोनला किंवा अॅलो यांच्या कमी स्तरामुळे नैराश्य आणि अस्वस्थतेचा त्रास उद्भवतो . जे लठ्ठपणा आणि भूक मंदावण्याच्या सामान्य विकारांशी संबंधित आहेत . भूक मंदावल्याचा विकार असणाऱ्या ५० टक्क्यांहून अधिक महिला नैराश्याने पीडित आहेत . तर अतिलठ्ठपणा असलेल्यापैकी ४३ टक्के लोक नैराश्याने पीडित आहेत . ऑलो आणि नैराश्य , अस्वस्थता आणि अशा प्रकारच्या इतर आजारांमध्ये संबंध असल्याचे पुरावे समोर येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले . असे शिकागो इलिनॉइस विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक ग्राझिनो पिन्ना यांनी सांगितले . अमेरिकेतील हार्वर्ड वैद्यकीय शाळेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या चाचणीत ३६ महिलांनी सहभाग घेतला होता . या वेळी भूक मंदावण्याचा विकार असलेल्या १२ महिलांची या अभ्यासासाठी निवड केली . या महिलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक हा १८ . ५ पेक्षा कमी होता , तर १२ सामान्य वजन असलेल्या महिलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक हा १९ ते २४ यामध्ये होता आणि १२ अतिलठ्ठ महिलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक २५ किंवा त्याहून अधिक होता . या महिलांचे सरासरी वय २६ असून यापैकी कोणत्याही याआधी महिलेला नैराश्येचे निदान झाले नसून या विकाराचा औषधोपचारदेखील केलेला नाही . अभ्यासात भूक मंदावल्याचा आजार असलेल्या महिलांमध्ये ऑलोचे प्रमाण सामान्य महिलांच्या शरीर वस्तुमान निर्देशांकाच्या तुलनेने ५० टक्क्यांनी कमी आढळून आले तर अतिलठ्ठ महिलांमध्ये हे प्रमाण ६० टक्क्यांहून कमी आढळून आले . हा अभ्यास ‘न्यूरोसायकोफार्माकोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे .
1
वय हा निव्वळ एक आकडा आहे हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यावर लक्षात येत . मलायकाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉग्स केल्याचं पाहायला मिळालं आहे . वयाच्या ४४ वर्षीही मलायका एखाद्या २१ वर्षीय तरुणीप्रमाणे स्वतः ला मेंटेन करुन आहे . त्यामुळे तिने वयाची ४० ओलांडली आहे हे पाहणाऱ्याला खरं वाटणार नाही . तिच्या याच ग्लॅमरस अंदाजामुळे ती पुन्हा एकदा आयटम साँग करण्यास सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे . अभिनेता अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आलेली मलायका अरोरा कायम तिच्या वेशभूषेवरुन सोशल मीडियावर ट्रोल होत असते . मात्र या साऱ्याकडे दुर्लक्ष करत मलायका स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते . तिच्या याच फिटनेसमुळे तिला पुन्हा एकदा आयटम साँग करण्याची संधी मिळाली असून ती लवकरच विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’ या चित्रपटामध्ये आयटम साँग करताना दिसून येणार आहे . दरम्यान , ‘पटाखा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे . हा चित्रपट चरण सिंह पाठिक यांच्या ‘दो बहनें’ कथेवर हा आधारित आहे . या चित्रपटाचं कथानक राजस्थानच्या एका गावातील दोन सख्या बहिणींभोवती फिरताना दिसून येणार आहे . ‘पटाखा’मध्ये सान्या मल्होत्रा आणि राधिका मदान या प्रमुख भूमिकेमध्ये असून या चित्रपटातील एका आयटम साँगच्या माध्यमातून मलायकाचा चित्रपटात प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे . त्यामुळे पुन्हा एकदा मलायकाच्या चाहत्यांना ती नव्या आणि ग्लॅमरस अंदाजात दिसून येणार आहे यात शंका नाही . मलायकाने आतापर्यंत ‘छैय्या , छैय्या’ , ‘मुन्नी बदमान’ या सारखं प्रचंड गाजलेल्या आयटम साँगमध्ये आपलं नृत्य कौशलं दाखविलं आहे .
0
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पुर्वसंध्येला बीसीसीआयने आपल्या महिला व पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली . एकीकडे महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत तोडीस तोड कामगिरी करत असताना , वार्षिक करारांत बीसीसीआयने महिला खेळाडूंवर अन्याय केल्याचं दिसून येतंय . महिला क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयने यंदा C ही नवीन श्रेणी तयार केली असली तरीही पुरुष खेळाडूंच्या तुलनेत महिला खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांमध्ये बरीच मोठी तफावत असल्याचं स्पष्ट झालंय . पुरुष खेळाडूंसाठी बीसीसीआयची गटवारी पुढीलप्रमाणे – A + – ७ कोटी A – ५ कोटी B – ३ कोटी C – १ कोटी महिला खेळाडूंसाठी बीसीसीआयची गटवारी पुढीलप्रमाणे – A – ५० लाख B – ३० लाख C – १० लाख अवश्य वाचा – क्रिकेटपटूंसाठी बीसीसीआयची नवीन आर्थिक करार यादी जाहीर या गटवारीतून बीसीसीआय महिला क्रिकेटबद्दल किती गंभीर आहे हे समोर येतंय . पुरुष क्रिकेटपटूंच्या C गटातील खेळाडूंना मिळणाऱ्या वार्षिक कराराच्या अर्धी रक्कम महिला खेळाडूंच्या A गटातील खेळाडूंना मिळत आहे . मात्र गांभीर्याने विचार केल्यास महिला क्रिकेटपटूंबद्दलच्या या उदासीन धोरणाला बीसीसीआयसोबत भारतीय क्रीडा चाहतेही तितकेच जबाबदार असल्याचं आपल्याला दिसून येईल . एक उदाहरण म्हणून २०१७ सालात इंग्लंड मध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं उदाहरण घेऊया . साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता . यानंतर भारतीय क्रीडा रसिकांचा मोठा रोष क्रिकेटपटूंना सहन करावा लागला . त्यातच तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वादाने बीसीसीआयमधलं वातावरण पुरतं ढवळून निघालं . लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे भारतीय क्रीडा रसिक मनापासून दुखावले गेले होते . अशातच मिताली राजच्या भारतीय महिला क्रिकेट संघाने क्रीडा रसिकांना एक आशेचा किरण दिला . ज्या देशात भारतीय पुरुष क्रिकेट संघ अपमानास्पद पराभव स्विकारुन परतला होता , त्याच देशात मिताली राजच्या टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली . स्मृती मंधाना , पुनम राऊत यांसारख्या मराठमोळ्या खेळाडूंनी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसारमाध्यमांनी आपला मोर्चा महिला संघाकडे वळवला . अपेक्षेप्रमाणे भारतीय महिलांनी चांगली कामगिरी करत , अंतिम फेरीत प्रवेश मिळवला . अंतिम फेरीत महिलांना पराभव पत्करावा लागला असला तरीही ज्या पद्धतीने मिताली राजचा संघ मैदानात खेळला ते पाहता प्रत्येक भारतीयांच्या ओठावर काही दिवस महिला संघाचं नाव पहायला मिळत होतं . अवश्य वाचा – मोहम्मद शमीचे तरुणींसोबत अनैतिक संबंध असल्याचा पत्नीचा आरोप , बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला मात्र ही बाब झाली विश्वचषकापुरती , इतर स्पर्धांच्या दरम्यान क्रीडा रसिक म्हणून आम्हाला महिलांचेही सामने बघायचे आहेत अशी मागणी भारतीय क्रीडा रसिक का करत नाहीत ? महत्वाच्या स्पर्धा सोडल्या तर महिला क्रिकेट संघाच्या फार कमी सामन्याचं थेट प्रक्षेपण केलं जातं . यदाकदाचीत एखाद्या मालिकेचं थेट प्रेक्षपण करण्यात आलं तरीही त्याला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद हा अगदीच नगण्य असतो . त्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण अधिक सजग होणं गरजेचं आहे , हे भारतीय क्रीडा रसिक कधी ओळखणार हा देखील एक मोठा प्रश्नच आहे . विश्वचषकात महिला संघाने पाकिस्तानवर मात केली . या सामन्याचं वृत्तांकन बहुतांश प्रसारमाध्यमांनी , पुरुष संघाच्या पराभवाचा बदला महिलांनी घेतला असं केलं . पण महिला संघाच्या कामगिरीचं विश्लेषण करताना नेहमी पुरुष संघाच्या कामगिरीची परिमाण लावणं कितपत योग्य आहे ? ? महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानवर मिळवलेला विजय हा एक स्वतंत्र विजय आहे . त्या कामगिरीचं मुल्यमापन करताना पुरुषांचा तराजू लावण्यात काय हाशील ? ? महिलांच्या कामगिरीचं मुल्यांकन होताना तराजू हा वेगळाच घ्यायला हवा . त्यामुळे आगामी काळात महिला क्रिकेटला आणखी उंच पातळीवर न्यायचं असेल बीसीसीआयसोबत तर क्रीडा रसिक म्हणून आपलीही तितकीच जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही .
2
तारुण्याची अभिलाषा सर्वानाच असते . पण ते टिकवण्यासाठी लागणारे परिश्रम घेण्यास अनेकांची तयारी नसते . काही अंशी ते जनुकांवरही अवलंबून असते असे आता नव्य संशोधनातून सिद्ध होत आहे . लाल रंगाचे केस आणि निस्तेज त्वचा यासाठी कारणीभूत असलेले एमसी १ आर ( जिंजर ) जनुक आपण किती तरुण दिसतो यासाठीही जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे . नेदरलँड्समधील रॉटरडॅम येथील इरॅस्मस विद्यापीठाच्या संशोधकांनी या विषयावर संशोधन केले . विविध प्रकारचे २५ निकष लावून केलेले हे संशोधन करंट बायोलॉजी या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले . २७०० वयस्क व्यक्तींच्या त्वचेचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढला की ज्यांच्या डीएनएवर ‘एमसी १ आर’ हे जनुक होते ते त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा दोन वर्षांनी तरुण दिसतात . काही लोक आपल्या वयापेक्षा तरुण दिसतात तर काही आहे त्यापेक्षा वयस्क दिसतात . त्यामागे हे जनुक हेच कारण असावे हे आता सिद्ध झाल्याचे या शोधनिबंधाचे सहलेखक डॉ . मॅनप्रेड केसर यांनी सांगितले . हेच जनुक शरीराची सूज आणि डीएनएची दुरुस्ती यासाठीही उपयुक्त असते . त्याचाही तरुण दिसण्यावर परिणाम होऊ शकतो , असे या संशोधकांना वाटते . आपण किती तरुण दिसतो यावरून आपल्या शारीरिक आणि एकंदर प्रकृतीचीही कल्पना येऊ शकते . आता तरुण दिसण्यासाठीच्या प्रयत्नांना संशोधनाचा आधार मिळू शकतो . ( टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
पाकिस्तानी कलाकारांच्या मुद्द्यावरुन सध्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही दोन गट पडलेले दिसत आहेत . जेष्ठ कलाकार अभिनेते ओम पुरी यांनी नुकतेच पाकिस्तानी कलाकारांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत त्यांच्यावर बंदी घालून काहीही साध्य होणार नाही असे म्हटले आहे . एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ओम पुरी बोलत होते . सध्या ट्विटरवरुनही त्यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला जात आहे . ओम पुरी यांच्या वक्तव्याविषयी विरोध करत अभिनेते अनुपम खेर यांनीही एक ट्विट केले आहे . ‘प्रिय ओम पुरीजी , मी तुमचा फार आदर करतो . पण काल टिव्हीवर भारतीय सैन्याविषयीचे तुमचे मत ऐकून मला फार दुःख झाले आहे’ , असे ट्विट करत त्यांनी निराशा व्यक्त केली . एका वृत्तपत्र वाहिनीला मुलाखत देताना ओम पुरी म्हणालेले की , ‘पाकिस्तानी कलाकारांकडे अधिकृत व्हिसा असून त्यांनी भारतात अवैध प्रवेश केलेला नाही . अचानक त्यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या चित्रपटात कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या भारतीय निर्मात्यांनाच मोठा फटका बसणार आहे . हा निर्णय सरकारी पातळीवर घेतला गेला असता , तर गोष्ट वेगळी होती . त्यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले जवान शहीद होत असताना तुम्ही तेथील कलाकारांना पाठिंबा कसे देता , असा सवाल करण्यात आला . या प्रश्नावर ओम पुरी यांचा पारा चढला . तेव्हा ते म्हणाले की , शहीद झालेल्या जवानांना आम्ही सैन्यात जायला सांगितलं होतं का ? त्या जवानांना लष्करात जाण्यासाठी कोणी आग्रह केला होता का ? इतकेच वाटत असेल तर , १५ - २० जणांना आत्मघातकी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानला पाठवा . मी सहा वेळा पाकिस्तानला गेलो आहे . त्यांच्याकडून मला प्रेम आणि आदर मिळाला आहे , असेही ओम पुरी म्हणाले . ‘तुम्हाला असं वाटत आहे का की , भारत आणि पाकिस्तानदरम्यान असणारे वैमन्नस्य इस्राइल आणि पॅलेस्टाईनसारखे व्हावे आणि या देशांमध्ये फार वर्षांसाठी युद्ध सुरु रहावे ? भारतात करोडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव राहतात . किंबहुना काही भारतीयांचे आणि पाकिस्तानातील नागरिकांचे नातेवाईकही सीमेपलीकडे आहेत . ते या सीमावादाचा लढा कसा देतील ? ’ , असा प्रश्न ओम पुरी यांनी उपस्थित केला . या चर्चेमध्ये ओम पुरी यांनी केलेल्या वक्तव्यासाठी नेटिझन्सनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे . दरम्यान ओम पुरी यांच्या वक्तव्यामुळे सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत . पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा इतका चर्चेत येण्यामागचे मुळ कारण म्हणजे अभिनेता सलमान खानने त्यांच्या समर्थनार्थ केलेले वक्तव्य असा अनेकांचा समज आहे . उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे . अभिनेता रणदीप हुड्डा , अशोक पंडित , नाना पाटेकर आणि अनुपम खेर या कलाकारांनी आणि निर्माते दिग्दर्शकांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात येण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे . त्यामुळे सध्या हे वातावरण आणखीनच विकोपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
0
नवी दिल्ली : उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर बेतलेला ' एम . एस . धोनी : द अनटोल्ड स्टोरी ' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी येण्याची दाट शक्यता आहे . हा चित्रपट भारतामध्ये येत्या शुक्रवारी ( 30 सप्टेंबर ) प्रदर्शित होणार आहे . उरीतील हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधी भावना तीव्र झाली आहे . पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्यास अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी केली होती . एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार , पाकिस्तानमध्ये ' एम . एस . धोनी ' चित्रपटाच्या वितरणाचे हक्क ' आयएमजीसी ग्लोबल एंटरटेन्मेंट ' या कंपनीकडे होते . मात्र , ' सद्यस्थितीतील दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पाहता हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करू नये , ' अशी भूमिका या कंपनीने घेतली आहे . पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांचा मोठा चाहतावर्ग आहे . सध्या अमिताभ बच्चन यांचा ' पिंक ' आणि रितेश देशमुख यांचा ' बॅंजो ' हे दोन चित्रपट पाकिस्तानमधील थिएटर्समध्ये झळकले आहेत . हिंदी चित्रपटांना दणदणीत प्रतिसाद मिळत असला , तरीही अनेक चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदीही घातली गेली आहे . जॉन अब्राहम - वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ' ढिशूम ' या चित्रपटावरही पाकिस्तानने बंदी घातली होती .
0
भारतीय यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कारकीर्दीतील १०० वे अर्धशतक झळकावलं . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( १६४ ) , राहुल द्रविड ( १४५ ) आणि सौरव गांगुली ( १०६ ) या दिगज्ज भारतीयांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे . याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांच शतक साजरं करणारा धोनी दुसरा यष्टिरक्षक ठरला . यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने अर्धशतकांची शंभरी गाठली आहे . धोनीचं हे अर्धशतक अविस्मरणीय असचं आहे . याचं कारण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली असताना धोनीने हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला . त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वनडेत ६६ , कसोटीमध्ये ३३ आणि टी - २० मध्ये १ अशी शंभर अर्धशतकं केली आहेत . चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दमदार कामगिरी करण्याची धोनीची ही पहिली वेळ नाही . यापूर्वी आफ्रिका इलेव्हन विरुद्धच्या सामन्यात धोनीने १३९ धावांची शतकी खेळी केली होती . यावेळी देखील अवघ्या ७२ धावांवर ५ गडी तंबूत परतल्यानंतर त्यानं डाव सावरला होता . याच मैदानावर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात देखील त्यानं अविस्मरणीय खेळी केली होती . भारतीय संघाने २९ धावांत ५ गडी बाद झाल्यानंतर धोनीनं नाबाद ११३ धावा केल्या होत्या . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताची अवस्था ४ बाद ७९ अशी असताना धोनी मैदानात आला . त्यानंतर संयमी खेळी करत त्याने भारताचा डाव सावरला . भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने त्याला चांगली साथ दिली . पांड्याने या सामन्यात ६६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा केल्या . तर भुवनेश्वर कुमारने ३० चेंडूत ३२ धावांचे योगदान दिलं . धोनी , हार्दिक पांड्या , केदार जाधव आणि भुवनेश्वरच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ७ बाद २८१ धावा केल्या .
2
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड इंडस्ट्रीत घटस्फोटाचे वारे वाहत आहेत . यामध्ये अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांचीही भर पडणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता . मात्र , मी आणि सोहा घटस्फोट घेणार नाही , असे सांगत कुणालने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे . ”माझे लग्न का संकटात येईल ? माझे लग्न का तुटेल ? लोक काहीही बरळतात” , अशाप्रकारे कुणाल खेमूने ट्विटरवरून घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले . याशिवाय कुणालने यावेळी प्रसारमाध्यमांनाही लक्ष्य केले . एक बार जो मेने कमिटमेंट कर दि तो फिर में अपने प्रेस कि भी नहा सुनता , असे सांगत त्याने प्रसारमाध्यमांना टोला लगावला . कुणाल खेमू आणि पत्नी सोहा अली खान जानेवारी २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले होते .
0
समाजमाध्यमांवर कसे व्यक्त व्हावे , याची जाण भारतातील बहुतांशी जणांना नाही , असे म्हटले जाते . प्रत्येक गोष्टीवर लोकांच्या टीका , सल्ले , कुत्सितपणे बोलणे सुरूच असते . भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनंतर या गोष्टीचा प्रत्यय भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही आला . पण त्याने शांत न राहता खडे बोल सुनावले आहेत . शमीने त्याची पत्नी आणि मुलीसोबतचे कौटुंबिक छायाचित्र समाजमाध्यमावर टाकले . त्या छायाचित्रामध्ये शमीच्या पत्नीने बाह्य़ा नसलेला पेहराव परिधान केला होता . त्यावरून टीकाकारांनी त्यावर तोंडसुख घेतले . या टीकाकारांवर शमीने जोरदार पलटवार केला . ‘‘तुम्हाला जे आयुष्यात हवेसे वाटते ते प्रत्येकाला मिळत नाही आणि ज्यांना मिळते ते फार नशीबवान असतात . माझी पत्नी आणि मुलगी या माझ्या आयुष्याच्या महत्त्वाच्या घटक आहेत . काय चांगले आहे आणि काय नाही , हे मला उत्तमरीत्या माहीत आहे . प्रत्येकाने अंतरंगात डोकावून पाहणे गरजेचेच आहे . तुम्हाला माझा तिरस्कार करायचा असेल तर करीत राहा , ’’ असे शमीने ‘ट्विटर’वर म्हटले आहे .
2
सीमेवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला आपल्या देशात खेळू न देण्याच्या भारतीयांच्या ठाम भूमिकेमुळे आशियाई करंडक स्पर्धा अखेर संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यास आशियाई क्रिकेट परिषदेला भाग पडले . पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही स्पर्धा १३ ते २८ ऑक्टोबर दरम्यान भारतात होणार होती . आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली आणि आम्हाला स्पर्धेचे ठिकाण बदलावे लागले , असे आशियाई क्रिकेटचे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष नजाम सेठी यांनी जाहीर केले . यंदाच्या या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान , श्रीलंका , बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे . सहावा संघ अमिराती , हाँगकाँग , नेपाळ , ओमन यांच्यातील स्पर्धेतून निश्चित होणार आहे . या स्पर्धेचे ठिकाण बदलले जाणार हे अपेक्षित होते . काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपंगाच्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामना पाकिस्तानमध्ये होणार होता ; परंतु अंतिम सामन्यात प्रवेश केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये खेळणार नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते . त्यामुळे हा अंतिम सामना दुबईत खेळवावा लागला होता . आता आशियाईतील उदयोन्मुख खेळाडूंची आशियाई स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंकेत संयुक्तपणे होणार आहे . या स्पर्धेत खेळण्यास भारताने नकार दिला , तर आशियाई स्पर्धेतून आम्ही माघार घेऊ , अशी धमकी पाकिस्तानने दिली होती .
2
आईने बाळाला मिठी मारल्यामुळे बाळाच्या रोगप्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होत असून , त्यामुळे बाळाच्या हृदयाची गती आणि शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे . चेहऱ्यावर एक स्मितहास्य दाखवण्यापेक्षा मिठी मारणे अधिक फायदेशीर असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये डॉक्टरांनी म्हटले आहे . लहान मुले आईने घातलेली मिठी ओळखतात , असा विश्वास ९० टक्के डॉक्टरांनी सर्वेक्षणात व्यक्त केला आहे . डायपर तयार करणाऱ्या ‘हगीस’ या कंपनीने दिल्ली , मुंबई , बेंगळूर , चेन्नई आणि कोलकाता येथे दोन हजार माता आणि पाचशे वैद्यकीय व्यावसायिक यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे . आई आणि बाळ यांच्यामध्ये मिठीची शक्ती जाणून घेण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता . सर्वेक्षणातील जवळपास ७६ टक्के डॉक्टरांनी आईने मिठीत घेतल्यामुळे बाळाच्या प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होत असल्याचा विश्वास व्यक्त केला . बाळाला मिठीत घेतल्याने बाळाच्या हृदयाची गती योग्य राहते , रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होते . एवढेच नव्हे तर बाळ रडायचे थांबते आणि त्याला आलेला ताणही कमी होण्यास मदत होत असल्याचे कंपनीने सर्वेक्षणात म्हटले आहे . आईने आलिंगन दिल्यामुळे संप्रेरक वाहण्यास सुरुवात होते व त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते . सर्वेक्षणामध्ये ८५ टक्के डॉक्टरांनी मातांना बाळाला आलिंगन देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे . यामुळे आरोग्याचे फायदे मिळत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे . बाळाला मिठीत घेण्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांची जवळपास ८० टक्के महिलांना माहितीच नसते . जवळपास ९० टक्के भारतीय माता बाळाला मिठी मारून त्याच्याबाबतचे प्रेम व्यक्त करतात . बाळाला दिवसातून सात ते आठ वेळा मिठी मारल्यामुळे बाळाबाबतच्या चिंता कमी होत असल्याचा विश्वास ९१ टक्के महिलांनी व्यक्त केला आहे .
1
काही दिवसांपूर्वी बोनी कपूर यांनी त्यांचा ६३ वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात चेन्नईमध्ये साजरा केला . या पार्टीला बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती . पण त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती या पार्टीला हजर नव्हती . त्यामुळे बोनीचे अनिल आणि संजयसोबतच्या नात्यात काही दुरावा तर आला नाही ना हा प्रश्न साऱ्यांना पडला आहे . एकीकडे बोनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीला कोणी नव्हते तर दुसरीकडे संजय आणि अनिल यांनी दिलेल्या दिवाळी पार्टीत बोनी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती . पण अर्जुन आणि अन्शुला ही दोन्ही मुलं संजय आणि अनिल काकांकडे वारंवार दिसतात . कपूर यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की , ‘बोनी यांचे त्यांच्या दोन्ही भावांशी असलेले नात जवळपास संपत आले आहे . बोनी यांची पहिली पत्नी मोना यांच्या मृत्यूनंतर तर त्यांच्या नात्यात अजून दरी निर्माण झाली . संपूर्ण कपूर कुटुंबाचा मोनावर फार जीव होता . पण तिच्या मृत्यूनंतर सगळ्याच गोष्टी बदलल्या . आता बोनीही फारसा संजय आणि अनिलच्या घरी येत नाही आणि ते दोघंही त्याच्याकडे जात नाहीत . राहत राहिला अर्जुन आणि अन्शुलाचा प्रश्न तर त्यांनी फार आधीच बोनी यांच्या दुसऱ्या कुटुंबासोबत न राहण्याचा निर्णय घेतला होता . त्यामुळे ते आपल्या काकांसोबत राहणंच पसंत करतात . ’ सध्या बोनी यांना श्रीदेवीच्या घरच्यांचा पाठिंबा मिळत आहे . बोनी यांच्या वाढदिवसाला श्रीदेवी यांची बहिण श्रीलथा आणि तिचा नवरा उपस्थित होता . श्रीदेवी आणि श्रीलथा यांच्यातले वाद मिटवण्यात बोनी यांचा फार मोठा हात आहे . पण तेच बोनी आज स्वतःच्या सख्या भावांपासून दूर गेले आहेत . बोनी यांनीच अनिल आणि संजय यांचे करिअर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती .
0
साखळी गटात आघाडीचे स्थान घेणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला हरवले तरच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे इंडियन प्रीमिअर लीगच्या प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे . त्या दृष्टीनेच येथे रविवारी होणाऱ्या लढतीबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे . हैदराबादने आतापर्यंत झालेल्या अकरा सामन्यांमध्ये अठरा गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे . चेन्नईने तेवढय़ाच सामन्यांमध्ये चौदा गुण मिळवले आहेत . शुक्रवारी राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईला पराभवाचा धक्का दिल्यामुळे त्यांना प्लेऑफसाठी आज सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे . राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवाचे खापर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांवर फोडले होते . त्यांचा अनुभवी गोलंदाज हरभजनसिंगने केवळ दोन षटकांमध्ये २९ धावा दिल्या होत्या . त्यामुळे उर्वरित दोन षटके टाकण्यासाठी त्याला संधी देण्याचे धाडस धोनी दाखवू शकला नाही . चेन्नईच्या फलंदाजीची मुख्य मदार शेन वॉटसन , अंबाती रायुडू , सुरेश रैना , ड्वेन ब्राव्हो , फॅफ डय़ु प्लेसिस , ध्रुव शौरी तसेच धोनी यांच्यावर आहे . राजस्थानविरुद्ध त्यांना अपेक्षेइतका दोनशे धावांचा टप्पा गाठता आला नव्हता . हैदराबादविरुद्ध त्यांना दोनशे धावांचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे . चेन्नईच्या गोलंदाजीची भिस्त हरभजनसिंग , ब्राव्हो , रवींद्र जडेजा , वॉटसन , इम्रान ताहीर , शार्दूल ठाकूर , डेव्हिड विली , कर्ण शर्मा , सॅम बिलिंग्ज यांच्यावर आहे . हैदराबादला शिखर धवन , कर्णधार केन विल्यम्सन , युसूफ पठाण , मनीष पांडे , शकीब अल हसन , वृद्धिमान साह , सचिन बेबी , कालरेस ब्रेथवेट यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे . भारताचा द्रुतगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे हैदराबादच्या गोलंदाजीचे मुख्य अस्त्र असणार आहे . त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कौल , संदीप शर्मा , रशीद खान , शकीब अल हसन यांच्याकडून प्रभावी कामगिरीची आशा आहे . गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून खेळपट्टी फलंदाजीस पोषक राहील अशी अपेक्षा आहे . साप्ताहिक सुटीमुळे या सामन्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे .
2
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत . डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानूसार सततच्या व्यग्र कारभारामुळे ते पाठिच्या दुखण्याने त्रस्त होते . यावर उपचार करण्यासाठी ते लॉस ऐन्जेलिसला गेले आहेत . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २००९ मध्ये इमरान खानच्या ‘लक’ या सिनेमात एक स्टंट केला होता . हा स्टंट करताना त्यांना दुखापत झाली होती . त्यांना एका दृष्यामध्ये चॉपरवरुन उडी मारायची होती . पण चुकीच्या उडीमुळे ते सरळ खाली जमिनीवर पडले आणि त्यांना गंभीर पाठीची जखम झाली . जेव्हा पाठिचे दुखणे थांबले नाही तेव्हा त्यांनी अमेरिकेतल्या तज्त्रांचा सल्ला घेण्याचे ठरवले . मिथून यांचे व्यवस्थापक यांनी या बातमीला दुजारा दिला आहे . ‘गेल्या दोन आठवड्यांपासून ते लॉस ऐन्जेलिसमध्ये उपचार घेत आहे असेही ते म्हणले . ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी ते भारतात येणार नाहीत , ’ असेही ते म्हणाले . मिथुन हे ८० च्या दशकातले नावाजलेले अभिनेते होते . ‘डिस्को डांसर’ , ‘मुझे इन्साफ चाहिए’ , ‘घर एक मंदिर’ यांसारख्या अनेक हिट सिनेमातून त्यांनी काम केले आहे . ‘हवाईजादा’ या सिनेमानंतर मिथुन यांनी व्यावसायिक पातळीवर कोणताही सिनेमा केलेला नाही . त्यांचे पाठिचे दुखणे लवकर बरे व्हावे इच्छ आमच्याकडून सदिच्छा . मिथुन चक्रवर्ती यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेमध्ये पाठवण्यात आले होते . पण दोन वर्षांच्या या कालावधीत ते फक्त तीनदा संसदेत गेले होते . मंगळवारी आजारपणामुळे त्यांच्याकडून संसदेतून सुट्टीसाठी परवानगी मागण्यात आली तेव्हा खासदारांनी त्यांच्या सुट्टीवर आक्षेप घेतला होता . मिथुन यांनी नंतर वैद्यकीय प्रमाणपत्रही दाखवले .
0
शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट याच आठवड्यात शुक्रवारी ( १ जून ) प्रदर्शित होणार आहे . स्वच्छंदीपणे आयुष्य जगणा - या चारजणींभोवती फिरणारा हा चित्रपट पाहण्यासाठी सध्या तरुणाई फारच उत्सुक आहे . भारतीय सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केलं असलं तरी पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे . त्यामुळे हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांना जरी पाहता आला तरी पाकिस्तानमधील प्रेक्षकांना पाहता येणार नाही . आजच्या पिढीला आकर्षित करण्यासाठी या चित्रपटामध्ये काही अपशब्द आणि उथळ भाषेचा वापर करण्यात आला आहे . मात्र याच अपशब्दांवर आक्षेप घेत पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सॉरने चित्रपटावर बंद घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे . विशेष म्हणजे हा निर्णय सेन्सॉर मंडळातील सर्व सदस्यांनी एकमताने घेतला आहे . एकाही सदस्याने या निर्णयाविरुद्ध आवाज न उठविल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय अंतिम करण्यात आला . ‘वीरे दी वेडिंग’च्या माध्यमातून अभिनेत्री करिना कपूर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे . या चित्रपटामध्ये सोनम कपूर , करिना कपूर , स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत . काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता . या ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसादही दिला होता . मात्र तरीदेखील पाकिस्तानमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे . दरम्यान , काही दिवसांपूर्वीच ‘वीरे दी . . ’ला भारतीय सेन्सॉर बोर्डाने ‘ए’ प्रमाणपत्र देऊन प्रमाणित केलं आहे . निर्मात्यांनी या चित्रपटातील शिवीगाळ किंवा एकंदर वापरण्यात आलेल्या भाषेवर कोणत्याही प्रकारची कात्री न चालवण्याची विनंती सेन्सॉरकडे केली होती . ज्यानंतर या चित्रपटावर कात्री न चालवता कोणत्याही कटशिवाय त्याला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आलं . त्यामुळे हा चित्रपट भारतात जरी प्रदर्शित झाला तरी पाकिस्तानात होणार नाही . याकारणामुळे प्रेक्षकांचा हिरमोड होण्याबरोबरच चित्रपटाच्या कमाईवरही त्याचा परिणाम होणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे .
0
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या लग्नाविषयी कमालीची गुप्तता बाळगली होती . लग्नानंतर दोघांनीही अधिकृत घोषणा करुन फोटोही शेअर केले . त्यानंतर दोघांचे साखरपुडा , हळद आणि लग्नाच्या विधीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले . ‘विरुष्का’च्या लग्नाची जेवढी चर्चा होती तेवढीच चर्चा त्यांचा पोषाखाचीही होती . दोघांचाही पोषाख चर्चेचा विषय ठरत आहे . विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नात जो ड्रेस घातला होता तो ड्रेस डिझाइन करायला कारागिरांनी फार मेहनत घेतली . या दोघांचा पोषाख एवढा का ट्रेण्डमध्ये येतोय याची कारणं पाहुया… लग्नाच्या विधींना ९ डिसेंबरपासून सुरूवात झाली . एक कंटेनर भरून फूल मागवण्यात आली होती . लग्नात पारंपरिक सनई - चौघड्यांसह भांगडाही करण्यात आला . लग्नात दोघांनी जो ड्रेस घातला होता ते दोन्ही ड्रेस प्रसिद्ध डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केले होते . स्वतः सब्यसाची म्हणाले की अनुष्काचा लेहंगा तयार करायला त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली . अनुष्काचा लेहंगा तयार करायला तब्बल ६७ कारागीर लागले . या सर्व कारागिरांनी मिळून ३२ दिवसांमध्ये हा शाही लेहंगा तयार केला . फिकट गुलाबी रंगाच्या या लेहंग्यावरील खास नक्षीकाम कोणत्याही मशीनवर न करता हाताने केले आहे . हे तर झाले लेहंग्याचे वैशिष्ट्य , पण तिच्या दागिन्यांवरही विशेष मेहनत घेण्यात आली होती . पारंपरिक जडाऊ पद्धतीचे काम केलेले दागिने तिने परिधान केले होते . या दागिन्यात पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला . विराटची शेरवानीही अनुष्काच्या लेहंग्याला साधर्म्य साधेल अशीत तयार करण्यात आली होती . अनुष्काच्या लेहंग्यासाठी फिकट गुलाबी रंगाची निवड केल्यावर विराटच्या शेरवानीसाठी पांढरा रंग निवडला . शेरवानीवर बनारसी नक्षीकामासोबत हातमागाचीही कारागिरी करण्यात आली . टसर फ्रॅब्रिकच्या स्टोलसह विराटने फिकट गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता . मेहंदी सोहळ्यातही विरुष्काच्या कपड्यांकडेच साऱ्यांचे लक्ष होते . यावेळी अनुष्काने गडद गुलाबी रंगालाच प्राधान्य दिले . ग्राफिक क्रॉप टॉपसह गुलाबी आणि केशरी रंगाचा सिल्कचा लेहंगा घातला होता . या लेहंग्यावरही कोलकाताची प्रसिद्ध ब्लॉक प्रिंट आणि हातमागाची कारागिरी करण्यात आली होती . विराटने मेहंदी समारंभात खादीच्या सफेद कुर्त्यासोबत त्याच रंगाचा चुडीदार घातला होता . पण अनुष्काच्या ड्रेसला मॅचिंग म्हणून त्याने गुलाबी रंगाचे नेहरू जॅकेट वापरले होते . साखरपुड्याला अनुष्काने मरुन रंगाची साडी नेसली होती . साडीवरील मोतीसह जरदोजी आणि मरोरीची कारागिरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती . दागिन्यांत तिने मोती आणि खड्यांची कारागिरी असलेला चोकर घातला होता . त्यालाच साजेसे स्टड कानातले , आंबाडा आणि त्याच्या बाजूला गुलाबाचं फूल माळलं होत . साखरपुड्याला विराटने व्हाइट शर्टवर निळ्या रंगाचा सूट घातला होता . दागिन्यांत तिने २२ कॅरेट सोन्याचे झुमके घातले . या झुमक्यातही पैलू न पाडलेले खडे आणि जपानी मोत्यांचा वापर करण्यात आला . परिपूर्ण लूक दाखवण्यासाठी तिने पंजाबी चपलांनाच प्राधान्य दिले . या चपलांचीही विशेष गोष्ट म्हणजे त्यावर हाताने नक्षीकाम केले गेले होते .
0
भारताचे प्रतिनिधित्व करताना मैदानावर धमाकेदार फलंदाजीने विरोधी संघातील गोलंदाजांना भयभित करुन सोडणारा मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल माध्यमातून फटकेबाजी करताना दिसतो आहे . या फटकेबाजीत सेहवाग सतत पाक खेळाडू विरोधात आक्रमक रुप धारण करताना दिसतोय . यापूर्वी त्याने रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरसह अनेक क्रिकेटरवर ट्विटरसुख घेतले आहे . सेहवागने पुन्हा एकदा पाकच्या खेळाडूवर निशाणा साधला आहे . क्रिकेटर उमर अकमल ट्विटवर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोशेअर करत असतो . त्याने शेअर केलेल्या एका फोटोवर सेहवागने त्याची मस्करी केली . अकमलने शेअर केलेल्या फोटोवर सेहवागने ‘मैं तो नन्हा सा , मुन्ना सा , प्यारा सा बच्चा हूं . एक साथ ४ - ४ बॅट . ’ असे ट्विट केले आहे . वीरेंद्र सेहवाग अशा ट्विटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतो . सेहवागने केलेले हे ट्विट अकमलच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे . पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळतो आहे . मात्र , खराब कामगिरीमुळे अकमलला पाकिस्तानच्या या संघात स्थान मिळवता आलेले नाही . त्यामुळे सेहवागने केलेले हे ट्विट अकमलची खिल्ली उडविणारे असेच आहे .
2
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक हा एकेकाळचा सर्वोत्तम फलंदाज होता . त्याने अनेकदा पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले . असे असले तरी इंझमामची एक गोष्ट चाहत्यांना कायम लक्षात राहते ती म्हणजे त्याचे धावचीत बाद होणे किंवा साथीदार फलंदाजाला धावचीत करणे . इंझमामच्या एकूण कारकिर्दीत एकेरी , दुहेरी आणि तिहेरी धावांची संख्या फार कमी आहे . त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत तो एकूण ४० वेळा हास्यास्पद पद्धतीने धावचीत झाला . आता इंझमामचा पुतण्या इमाम उल हक हा देखील एका सामन्यातील हास्यास्पद रन आउटमुळे चर्चेत आला आहे . इमाम उल हकने नॉर्थम्टन्शायरविरुद्धच्या सामन्यात एक चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलवला आणि धाव घेण्यास सुरुवात केली . मात्र आपल्या साथीदाराकडे लक्ष देण्याऐवजी तो चेंडूकडे बघत धावू लागला . नॉन स्ट्राईकवर असलेल्या अझर अलीने त्याला चुकवण्याचा प्रयत्न केला . मात्र इमाम आणि अझरची अखेर टक्कर झाली . त्यामुळे अझर अली धावचीत झाला आणि इमाम मात्र कमरेवर ठेवून उभा राहिला . हा पहा व्हिडीओ – या घटनेनंतर इमामला ट्रॉल करण्यात आले . त्याची चाहत्यांनी खिल्ली उडवली . जसा काका तसा पुतण्या , ही तर इंझमामची आठवण करून देणारी घटना आहे , हे गल्ली क्रिकेट सुरु आहे का ? , इंझमामच्या पुतण्याने धावचीत करण्याची परंपरा कायम ठेवली , अशा विविध कमेंट करून चाहत्यांनी इमामला ट्रोल केले .
2