news
stringlengths
344
19.5k
class
int64
0
2
पावसाच्या व्यत्ययानंतर खडतर आव्हान असताना भारताने ऑस्ट्रेलियाचा तीन चेंडू व नऊ विकेट राखून पराभव केला आणि एकदिवसीय मालिकेपासून मिळवलेले वर्चस्व कायम ठेवले . प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला १८ . ४ षटकांत ११८ धावांत रोखल्यानंतर पावसाचा मोठा व्यत्यय आला . भारताला विजयासाठी ६ षटकांत म्हणजेच ३६ चेंडूत ४८ धावांचे आव्हान मिळाले . भारतीयांनी या धावा एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केल्या . एवढ्या कमी षटकांच्या खेळात जम बसवण्यासाठी उसंत नसते . त्यामुळे रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला ; परंतु लगेचच तो बाद झाला ; मात्र शिखर धवन आणि विराट कोहलीने तडाखा देत विजय साकार केला . विराटने सर्वाधिक २२ धावा फटकावल्या . स्टीव स्मिथ दुखापतीमुळे मायदेशी परतला . त्याच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नरने नेतृत्व केले . संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया १८ . ४ षटकांत ८ बाद ११८ ( फिंच ४२ - ३० चेंडू , ४ चौकार , १ षटकार , मॅक्सवेल १७ - १६ चेंडू , २ चौकार , बुमराह ३ - ० - १७ - २ , कुलदीप ४ - ० - १६ - २ ) आव्हान ६ षटकांत ४८ धावा पराभूत विरुद्ध भारत ः ५ . ३ षटकांत १ बाद ४९ ( धवन नाबाद १५ - १२ चेंडू , ३ चौकार , विराट कोहली २२ - १४ चेंडू , ३ चौकार )
2
स्वस्तात जास्तीत जास्त मोबाईल डेटा देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा विविध टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरू आहे . रिलायन्स जिओनं ग्राहकांना स्वस्तात मस्त वेगवेगळा डेटा प्लान उपलब्ध करून दिल्यापासून प्रतिस्पर्धी कंपन्यांनीही ग्राहकांसाठी स्वस्त डेटा प्लानचं आमिश दाखवायला सुरूवात केली आहे . एअरटेलनं नुकताच २४९ चा प्लान लाँच केला आहे . या प्लॅनमध्ये एअरटेल ग्राहकांना काय देतोय ते पाहूयात . - एअरटेलच्या २४९ प्लानमध्ये दरदिवशी २ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे . – अनलिमिटेड लोकल कॉल – मोफत एसटीडी , आऊटगोईंग आणि रोमिंग कॉल – दरदिवसाला १०० एसएमएस – हा प्लान थ्रीजी आणि फोरजी ग्राहकांसाठी आहे . एअरटेलच्या प्लानची व्हॅलिडिटी फक्त २८ दिवसांची असणार आहे . रिलायन्स जिओ २९९ प्लान – एअरटेलपेक्षा रिलायन्सनं ग्राहकांना १ जीबी अधिक डेटा देऊ केला आहे . त्यामुळे ग्राहकांना आता दरदिवशी ३ जीबी डेटा मिळणार आहे . – जिओनं देखील अनलिमिटेड लोकल , एसटीडी , आउटगोईंग आणि रोमिंग कॉलची सुविधा दिली आहे . तसेच ग्राहकांना १०० एसएमएस मोफत करता येणार आहेत . अर्थात याही प्लानची व्हॅलिडिटी ही २८ दिवसांची असणार आहे .
1
आयफोन आणि स्मार्ट वॉचची घोषणा केल्यानंतर आज सोमवार अॅपलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस जारी केले जाणार आहे . भारतामधील आयफोनधारक ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस १२ आज सोमवारी रात्री १० : ३० वाजाता डाऊनलोड करू शकतात . गेल्या आठवड्यात घेतलेल्या एका पत्रकारपरिषदेमध्ये ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस १२ जारी केले जाणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती . गेल्या आठवड्यात अॅपलने तीन नवीन फोन लाँच केले आहेत . अॅपलचे आयफोन आणि आयपॅडमध्ये आजपासून हे नवीन सिस्टिम डाऊनलोड करून तुम्ही तुमचा आयफोन अपडेट करू शकता . या आयओएस प्रणालीमुळे अॅपल आयफोन आणि मॅक तसचे आय कंप्युटरमध्ये शेअरिंग जलद पद्धतीने होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे . आयओएस १२ दोन प्रकारे डाऊनलोड करू शकता . १ ) सेटिंग > जनरल > सॉफ्टवेअर > डाऊनलोड . २ ) कॉम्पुटरला आयफोन जोडा आणि आइट्यून्सचा वापर करून सॉफ्टवेअर डाऊनलोड करा आयओएस १२ फ्री असणार आहे . यासाठी आयफोनकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही . आयफोन ४ एस , आयफोन ५ , आयफोन ५सी , आयफोन ६ , आयफोन ६ प्लस , आयफोन ६एस , आयफोन ६ एस प्लस , आयफोन एसइ , आयफोन ७ , आयफोन ७ प्लस , आयफोन ८ , आयफोन ८ प्लस आणि आयफओन एक्स यामध्ये अपडेट करू शकता . आयओएस १२ अपडेट केल्यास तुमचा आयफोन पहिल्यापेक्षा जलद , स्मूथ आणि वेगवान होईल असा दावा कंपनीने केला आहे . त्याचप्रमाणे ग्राहकांना कौटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र फाईल शेअर करण्याचा पर्यायही दिला आहे . त्यासे कीबोर्डमध्येही बदल करण्यात आला आहे . फोटो फीचर्समध्ये एडिटींग आणखी जलद आणि चांगले होईल असा दावा कंपनीने केला आहे .
1
मुंबई ः जोरदार चक्रीवादळामुळे भारत - इंग्लंड यांच्यातील चेन्नई कसोटी रद्द होण्याचीच दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे . ही कसोटी 18 डिसेंबरपासून होणार आहे . आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही कसोटी चेन्नईतच होईल , असे सांगितले असले तरी , तमिळनाडू क्रिकेट पदाधिकाऱ्यांना याबाबत शंकाच आहे . शहरातील यंत्रणा कोलमडली आहे . दोन दिवसांनी त्यात सुधारणा होईल . त्यानंतर स्काईपद्वारे चर्चा करून निर्णय होईल , असे सांगितले . भारतीय क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी चेन्नईतील परिस्थिती पाहता तिथे कसोटी होण्याची शक्यता धूसर आहे . त्याचबरोबर एवढ्या कमी कालावधीत अन्य ठिकाणी कसोटीही होणार नाही . त्यामुळे ही कसोटी रद्द होण्याचीच शक्यता आहे , असे सांगितले . . . . . .
2
हॉलिवूडचे ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अँजेलिना जोली आणि ब्रॅड पीट यांच्या घटस्फोटाच्या बातमीवर सध्या अनेक क्षेत्रांतून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत . मादाम तुसाँ संग्रहालयातील पुतळ्यांवरही या घटस्फोटाचा फरक पडला आहे असेच म्हणावे लागेल . अँजेलिना आणि ब्रॅडच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मादाम तुसाँ संग्रहालयातील त्यांचे एकत्र असलेले मेणाचे पुतळे वेगळे करण्यात आले आहेत . या संग्रहालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनच यासंबंधिचे ट्विट करण्यात आले आहे . २०१३ मध्ये या दोघांचे मेणाचे पुतळे मादाम तुसाँ संग्रहालयात साकारण्यात आले होते . अॅंजेलिना आणि ब्रॅड पीट म्हणजेच ‘ब्रँजेलिना’च्या विभक्त होण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या पुतळ्यांमध्येही दुरावा आला आहे . अॅंजेलिना जोलीचा पुतळा निकोल किडमॅनच्या पुतळ्याशेजारी आणि ब्रॅडचा पुतळा मॉर्गन फ्रीमॅनच्या पुतळ्याजवळ ठेवण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . दरम्यान , या दाम्पत्याच्या संपर्कात असणाऱ्यांनी ब्रॅडच्या त्यांच्या मुलांसोबतच्या गैरवर्तणुकीमुळेच अँजेलिनाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचे सांगत हा निर्णय सर्वस्वी अँजेलिनाने घेतला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे . मडॉक्स , पॅक्स , झारा , विविन , शिलो , नॉक्सनेवर या मुलांचे पालकत्व अँजेलिना आणि ब्रॅडने स्वीकारले होते . पण कुटुंबाच्या हितासाठी घटस्फोट घेत असल्याचे कारण पुढे करत अँजेलिनाने तिच्या मुलांवर हक्क सांगितला आहे . तसेच त्यांची जबाबदारी स्वतःकडे ठेवण्याची मागणीही तिने केली आहे . ‘मि अॅण्ड मिसेस स्मिथ’ चित्रपटाच्या सेटवर ब्रॅड आणि अँजेलिनाची भेट झाली . या आधी ब्रॅडचे जनेफर आईन्स्टनशी लग्न झाले होते , तर अँजलिनाचे पहिल्यांदा जॉनी ली मिलर आणि त्यानंतर बिली बॉब थ्रॉंटॉनशी लग्न झाले होते .
0
नव्या संशोधनातील निष्कर्ष संप्रेरके अवरोधित केल्यास शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढण्याबरोबरच इन्सुलिनच्या प्रमाणातही वाढ होते . त्यामुळे रक्तातील शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण राखण्यास मदत होते , असे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे . त्यामुळे पहिल्या टप्प्यातील क्षयरोगावर प्रभावी उपचार करण्यास मदत होणार आहे . या संदर्भात काही क्षयरुग्णांवर उपचार करण्यात आल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे . रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी रुग्णांना सतत इन्सुलिनचा डोस घ्यावा लागतो . मात्र , या उपचारांना काही प्रमाणात मर्यादा असतात , असे जिनेव्हा विद्यापीठातील प्रेडो हेरेरा यांनी सांगितले . हेरेरा म्हणाले की , स्वादुपिंडातील संप्रेरके अवरोधित करून अवशिष्ट इन्सुलिननिर्मितीस चालना कशी देता येईल , या विषयावर आम्ही संशोधन केले आहे . नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार इन्सुलिनच्या कमतरतेमुळे स्वादुपिंडात निर्माण झालेल्या पॉलिपेप्टाइडचे ( ग्लुकॅगॉन ) प्रमाण वाढते . या ग्लुकॅगॉनचे संप्रेरक अवरोधित केल्यास रक्तातील शर्करेचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते . या वेळी इन्सुलिनचा अभाव असला तरी हा मधुमेहावरील रामबाण उपाय असल्याचे संशोधकांचे मत आहे . ग्लुकॅगॉनच्या संप्रेरकांना अवरोधित करणे किंवा इन्सुलिन घेणे हाच पहिल्या टप्प्यातील मधुमेहावर प्रभावी उपाय असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे . मात्र , सद्यःस्थितीत इन्सुलिनचे डोस पूर्णपणे कमी न करता ग्लुकॅगॉनची संप्रेरके अवरोधित करण्याचा दुहेरी उपचाराचा अवलंब केला जातो . काही रुग्णांमधील ग्लुकॅगॉनची संप्रेरके अवरोधित केल्यानंतर रक्तातील शर्करेचे प्रमाणही नियंत्रणात ठेवण्यात संशोधकांना यश आले .
1
इंग्लिश प्रीमिअर लीगचे ( ईपीएल ) जेतेपद नावावर करणाऱ्या मँचेस्टर सिटीने बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ‘प्रीमिअर लीग’च्या वार्षिक संघामध्ये दबदबा निर्माण केला आहे . प्रीमिअर लीगच्या संघात मँचेस्टर सिटीच्या पाच खेळाडूंनी स्थान पटकावले आहे . यामध्ये सिटीच्या जेतेपदात सिंहाचा वाटा असलेल्या केव्हिन डी ब्रुयनेसह कायले वॉल्कर , निकोला ओटामेंडी , डेव्हिड सिल्व्हा व सर्गिओ अॅग्युरोचा समावेश आहे . त्यापाठोपाठ या संघात टोटन्हॅम हॉटस्परच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे . जॅन व्हेर्टोंघन , ख्रिस्तियान एरिक्सेन आणि हॅरी केन ही हॉटस्परची मजबूत फळी या संघात आहे . मँचेस्टर युनायटेड , चेल्सी आणि लिव्हरपूल यांच्या प्रत्येकी एका खेळाडूलाच या संघात स्थान पटकावता आले आहे . गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या युनायटेडचा गोलरक्षक डेव्हिड डी गी , चेल्सीचा मार्कोस अलोन्सो आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह हे ते खेळाडू आहेत . ईपीएलच्या हंगामात सर्वाधिक ३० गोल करणारा सलाह वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या शर्यतीतही आहे . त्याच्यासह डी ब्रुयने , सिल्व्हा , डी गी , केन आणि मँचेस्टर सिटीचा लेरॉय साने यांना नामांकन दिले आहे .
2
पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये तिचा नवा सिनेमा नूर प्रदर्शित होणार आहे . तिने ट्विटरवर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली . तिचा ‘नूर’ हा सिनेमा ७ एप्रिल , २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या सिनेमात ती एका पत्रकाराची भूमिका करत आहे . याबाबद ट्विटरवर बोलताना ती म्हणाली , ‘नूर’ सिनेमा ७ एप्रिल , २०१७ ला प्रदर्शित होणार आहे . यात सोनाक्षी बरोबर मॉडेल शिबानी दांडेकरही दिसणार आहे . या सिनेमाशी जोडले गेले हे माझं भाग्यच आहे असेही ती पुढे म्हणाली . शिबानीनेही याच अनुशंघाचे ट्विट केले . हा सिनेमा सुनील सिप्पी यांनी दिग्दर्शित केली आहे . सध्या सोनाक्षी अकिराच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे . एआर मुर्गदास दिग्दर्शित हा एक अॅक्शन ड्रामा पट आहे . ‘अकिरा’ चित्रपटाच्या पोस्टरवर ‘नो वन विल बी फरगिव्हन’ अशी टॅगलाइन आहे . हा चित्रपट आधी २३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता . पण , आता ही तारीख मागे घेण्यात आली असून सोनाक्षीचा हा चित्रपट २ सप्टेंबरला प्रदर्शित होईल .
0
सर्व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज ड्रोनद्वारे हृद्यरुग्णांपर्यंत रुग्णवाहिकेपेक्षा चार पटीने अधिक वेगात पोहोचणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे . स्विडनमधील कारोलिन्स्का संस्थेत हृद्यरुग्णांपर्यंत वेगात पोहोचण्यासाठी संशोधन सुरू होते . या वेळी या संस्थेने अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ड्रोनद्वारे आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पोहोचविण्याचा यशस्वी प्रयोग केला . स्विडनमधील परिवहन संस्थेने या ड्रोनचा शोध लावला आहे . या यंत्रणेद्वारे रुग्णाचे हृदयाचे ठोके तपासणे शक्य आहे . त्याचप्रमाणे विजेचा शॉक देऊनही हृदयाचे ठोके पूर्ववत करण्याची सुविधा या यंत्रणेत उपलब्ध आहे . या ड्रोनमध्ये उच्च प्रतीचा कॅमेरा असून अत्याधुनिक स्वनियंत्रित यंत्रणा आहे . हा ड्रोनजवळच्या दहा किलोमीटर परिसरात आपत्कालीन उपचारांसाठी पाठविण्यात आला होता . हा ड्रोन तातडीने रुग्णाच्या घरी जाऊन त्याद्वारे उपचार सुरू झाले , असे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे . हा ड्रोन तब्बल १६ मिनिटे वाचवू शकतो . हृद्यरुग्णांसाठी एक मिनिटही अत्यंत महत्त्वाचा असतो . ड्रोनमधील सर्व वैद्यकीय सुसज्जता तपासणे , तंत्रज्ञानाची तपासून हा ड्रोन पाठविल्यास हृद्यरुग्णास तातडीने उपचार मिळणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे . हे संशोधन नुकतेच जेएएमए या मासिकात प्रसिद्ध झाले आहे .
1
१ . अनेकांच्या घरात जागा कमी असल्याने ते फ्रिजवर टोस्टर , ओव्हन , मिक्सर , फूडप्रोसेसर आशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवतात . मात्र त्यामुळे फ्रिजचे कूलिंग कमी होण्याची शक्यता असते . २ . फ्रिजमध्ये जास्त वस्तू असतील तरीही त्यातील कूलिंग कमी होण्याची शक्यता असते . त्यामुळे आवश्यक तेव्हड्याच वस्तू फ्रिज मध्ये ठेवा . ३ . फ्रिजमध्ये पदार्थ किंवा भाज्या , फळे हे ठेवताना त्या गोष्टींमध्ये पुरेशी जागा असेल असे बघा . एकदम गर्दीत वस्तू ठेवल्या की फ्रिजचे कूलिंग कमी होते . त्यामुळे मधे मोकळी जागा राहील याची काळजी घ्या . ४ . फ्रिजच्या मागच्या बाजूला डबे , पदार्थ टेकून राहणार नाहीत याची काळजी घ्या . मागच्या बाजूने कूलिंगची हवा येते . पण तुम्ही जर वस्तू मागे चिकटून ठेवल्यात तर ही कूलिंगची हवा योग्य पद्धतीने येत नाही आणि कूलिंग कमी होते . यामुळे फ्रिजमध्ये वास येतो . ५ . फ्रिजचे दार उघडले तरी ते काम झाले की लगेचच बंद करा . काही जणांना फ्रिजचे दार उघडे ठेऊन एखादे काम करण्याची सवय असते . त्यामुळे फ्रिजमधील गार हवा बाहेर जाते आणि गारवा कमी होतो आणि वस्तू खराब होण्याची शक्यता असते . ६ . फ्रिजच्या कूलिंग कमी - जास्त करण्यासाठी त्यामध्ये एक बटण दिलेले असते , त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा . दर तीन दिवसांनी डिफ्रोजसाठी दिलेले बटण एकदा दाबा . त्यामुळे फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ कमी होऊन तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होईल . ७ . फ्रिज भिंतीला चिकटून ठेवू नये . भिंतीपासून काही अंतर ठेऊन फ्रिज ठेवावा . त्यामुळे कॉम्प्रेसरचा आवाज येतो आणि फ्रिज खराब होण्याची शक्यता असते .
1
फेनसेडील व कोरेक्ससह बंदी घातलेली किमान ४३९ औषधे बाजारात विक्री व वितरणास उपलब्ध आहेत , पण त्यातील काही न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विक्रीस उपलब्ध आहेत , असे रसायन व खतेमंत्री अनंत कुमार यांनी सांगितले . लोकसभेत एका प्रश्नावर माहिती देताना ते म्हणाले की , ४३९ पैकी ३४४ औषधांची विशिष्ट मात्रा प्रतिबंधित आहे . अनेक औषधांच्या प्रकरणांत कंपन्या न्यायालयात गेल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली आहे . कारण न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सरकारला परवानगी देण्यावाचून पर्याय नव्हता . केंद्रीय औषध नियंत्रण संस्थेने स्वतंत्रपणे काम करून या औषधांचे नमुने तपासून बंदी घातली होती . ही संघटना परदेशातील शिफारशींचा विचार न करता स्वतंत्र अहवाल देत असते . ती भारताची औषध नियंत्रक संस्था आहे . इतरांनी औषधांविषयी केलेले नियम किंवा दिलेली माहिती आम्ही आंधळेपणाने मान्य करीत नाही . औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ अन्वये औषधांचे नियंत्रण करण्यात येते . औषधांच्या उत्पादनास विक्री व वितरण यांचे परवाने राज्य सरकारांचे नेमलेले अधिकारी देत असतात . प्रतिबंधित औषधांचे उत्पादन व विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असून , त्यावर राज्यांचे परवाना अधिकारी शिक्षा करू शकतात . ( टीप : ‘ आरोग्यवार्ता ’ मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘ लोकसत्ता ’ चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण तिच्या आगामी हॉलिवूडच्या चित्रपटातून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे . एका अर्थाने दीपिका इंग्रजी वर्षीतील नवीन वर्ष आणि आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष असा दुहेरी आनंद साजरा करत आहे . आयुष्याच्या नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी दीपिकाने कामाला प्राधान्य दिल्याचे दिसते . गुरुवारी ५ जानेवारीला दीपिकाचा ३१ वा वाढदिवस आहे . दीपिका आपला वाढदिवस कसा साजरा करणार याची तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे . मात्र सध्याच्या घडीला यशाच्या शिखरावर असणाऱ्या दीपिकाने आजही पार्टीपेक्षा स्वतःला आपल्याला कामात झोकून दिल्याचे दिसते . वाढदिवसाचा आनंद अधिक काम करण्याचा जणू तिने संकल्पच केला आहे . यासाठी ती १५ तास काम करणार आहे . दीपिकाच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दीपिका तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रचारासाठी सध्या मॅक्सिकोमध्ये आहे . तिचा आजचा दिनक्रम अधिक कामाचा असणार आहे . सकाळी ८ वाजता तिचा दिवस सुरु होणार असून रात्री ११ वाजेपर्यंत ती चित्रटाच्या कामात व्यग्र असणार आहे . यावेळी दीपिकासोबत तिच्या पहिल्या हॉलिवूडपटातील सहकलाकार विन डिझेल , रुबी रोस यांच्यासह ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाची पूर्ण टीम असेल . सध्याच्या घडीला दीपिकाचे नाव सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे . एक मॉडेल म्हणून सुरु झालेला तिचा प्रवास आज एका यशस्वी अभिनेत्रीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे . ‘ये जवानी है दिवानी’ , ‘पिकु’ , ‘कॉकटेल’ , ‘चेन्नई एक्स्प्रेस’ , ‘बाजीराव - मस्तानी’ या चित्रपटांमधून तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली . बॉलिवूडमध्ये छाप सोडल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे . ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ दीपिकाचा पहिला हॉलिवूडपट १४ जानेवारीला सर्वप्रथम भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे . त्यानंतर २० जानेवारीला हा चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल . सध्या या चित्रपटाच्याच चर्चा सर्वत्र रंगत आहे . २००७ साली ‘ओम शांति ओम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . ‘ओम शांति ओम’ , ‘बचना ऐ हसीनो’ , ‘कॉकटेल’ , ‘राम - लीला’ , ‘बाजीराव - मस्तानी’ या आणि अशा बऱ्या चित्रपटांमधून दीपिकाने भूमिका साकारल्या आहेत . हॉलिवूडमध्ये पदार्पणास सज्ज असणारी दीपिका बॉलिवूडमधील ‘पद्मावती’ या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे . या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसतील .
0
केपटाऊन : भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन - डेपाठोपाठ टी - 20 क्रिकेट मालिकासुद्धा जिंकली . निर्णायक तिसरा सामना भारताने सात धावांनी जिंकला . आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते . शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती . ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल केल्या . 19व्या षटकात बुमराकडून 16 धावा गेल्या . शेवटच्या षटकात 18 धावांची गरज होती . भुवनेश्वरकडून एक वाईड पडला , पण आफ्रिकेला एका चौकारासह 11 धावाच काढता आल्या . अखेरच्या चेंडूवर जॉंकर बाद झाला . संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 7 बाद 172 ( शिखर धवन 47 , सुरेश रैना 43 , हार्दिक पांड्या 21 ) वि . वि . दक्षिण आफ्रिका ः 20 षटकांत 6 बाद 165 ( डेव्हिड मिलर 24 , जेपी ड्युमिनी 55 - 41 चेंडू , 2 चौकार , 3 षटकार , ख्रिस्तीयन जॉंकर 49 - 24 चेंडू , 5 चौकार , 2 षटकार , फरहान बेहर्डीन नाबाद 15 , भुवनेश्वर 4 - 0 - 24 - 2 , बुमरा 1 - 39 , शार्दुल 1 - 35 , पंड्या 4 - 0 - 22 - 1 , रैना 1 - 27 )
2
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सध्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत . मोबाईल आणि इंटरनेटमध्ये वेगाने झालेल्या बदलांमुळे तर अगदी कोणतीही गोष्ट आपण घरबसल्या एका क्लिकवर सहज करु शकतो . ई कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याने ऑनलाइन शॉपिंगच्या कंपन्याही आपले जाळे पसरताना दिसत आहेत . यातही ग्राहकांना एकाहून एक आकर्षक ऑफर्स देत आपल्याकडे वळविण्याचे कामही या कंपन्या सध्या मोठ्या प्रमाणात करत आहेत . याच अॅमेझॉनमध्ये आता नोकरभरती करण्यात येणार आहे . अॅमेझोनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये तुम्हाला मिळतील ‘या’ खास ऑफर्स नुकताच अॅमेझॉनने ग्रेट इंडियन सेल जाहीर केला असून २१ ते २४ जानेवारी या कालावधीत असणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना अनेक उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाणार आहे . या सेलच्यादृष्टीने अॅमेझॉनने ही नोकरभरती होणार असल्याचे जाहीर केले आहे . यानिमित्ताने विविध पदांसाठी अॅमेझॉनमध्ये ५५०० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . या सेलदरम्यान ग्राहकांकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी कंपनीला आशा आहे . त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनी नोकरभरती करणार आहे . कंपनीच्या कस्टमर केअरमध्येही जवळपास १ हजार सहाय्यकांना काम दिले जाणार आहे . यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि मागण्या वेळीच पूर्ण केल्या जातील . भारतातील प्रमुख मेट्रो सिटींप्रमाणेच हैदराबाद आणि बॅंगलोरमध्ये ही भरती होणार आहे . हा ग्रेट इंडियन सेल ग्राहकांसाठी ही खरेदीची उत्तम संधी ठरणार आहे . या सेलमध्ये १ कोटी ६० लाखांहून अधिक उत्पादनांवर सूट देण्यात आली आहे . यामध्ये अनेक कपडे , होम अॅप्लायन्सेस , इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे . जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील त्यांना २०० रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे . सेलबरोबरच ग्राहकांना एचडीएफसी बँकेकडून जास्तीची १० टक्के कॅशबॅक सवलत देण्यात येणार आहे .
1
मुंबई : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच नाटकांचे सिक्वेल पहायला मिळाले आहेत . नुकताच " गोष्ट तशी गमतीची " या नाटकाचा ४००वा प्रयोग गडकरी रंगायतन , ठाणे येथे एन . चंद्रा , आदेश बांदेकर , जितेंद्र जोशी , अनंत जोग , भाऊ कदम , सागर कारंडे आणि श्रेया बुगडे - शेठ आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला . याप्रसंगी " गोष्ट तशी गमतीची " या नाटकाचा सिक्वेल लवकरच रंगमंचावर पहायला मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आता या सिक्वेलमधून गमतीच्या गोष्टीच नाट्य अधिक नाट्यमय होणार आहे . " गोष्ट तशी गमतीची " या नाटकात करिअर कुठलं निवडायचं या संदर्भात वडील आणि मुलगा यांच्यात संघर्ष निर्माण होतो . वडील आपले अनुभव मुलाला सांगतात मात्र , ते काही त्याला पटत नाहीत . तरीही त्यातून सुवर्णमध्य काढण्याच्या कल्पनेवर नाटक संपतं . आता पुढच्या भागात ही गोष्ट अजून पुढे जाणार आहे . पुन्हा वडील - मुलाचीच जुगलबंदी नाटकाच्या केंद्रस्थानी आहे . मात्र , ती अधिक प्रगल्भ आणि नाट्यमय पद्धतीनं मांडण्यात आली आहे . सोनल प्रॉडक्शनतर्फेच हा सिक्वेल रंगमंचावर येणार आहे . मिहिर राजदा यांनीच नाटकाचं लेखन केलं असून , अद्वैत दादरकर यांनी दिग्दर्शन केलं आहे तर नंदू कदम हे या नाटकाचे निर्माते आहेत . शशांक केतकर , लीना भागवत , मंगेश कदम यांच्या त्यात भूमिका आहेत . आता या सिक्वेलमध्ये याच तीन भूमिका असणार , की अजून काही व्यक्तिरेखा रंगमंचावर येणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे . नाटकाच्या सिक्वेलबद्दल मंगेश कदम म्हणाले , ' गोष्ट तशी गमतीची हिट झालं म्हणून दुसरी भाग करायचा असा काही प्रकार या सिक्वेलच्या निर्मितीमध्ये नाही . तर सिक्वेल हा गरजेतून निर्माण झाला आहे . आमच्या चर्चेत नाटक अजून पुढे जाऊ शकतं , त्यात पूर्णपणे वेगळे मुद्दे मांडता येऊ शकतात , याची जाणीव झाल्यानं सिक्वेल लिहिला गेला . व्यावसायिक लाभ डोळ्यासमोर ठेवून सिक्वेल करण्याचा अजिबात प्रयत्न नाही . पहिल्या भागातील व्यक्तिरेखा आता अधिक प्रगल्भ झाल्या आहेत . स्वाभाविकच यातील नाट्यही अधिक गहिरं होणार आहे . पहिल्या भागावर जसं प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं , तसंच सिक्वेलवरही नक्की करतील याची खात्री आहे . '
0
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिला विभागात परंपरागत प्रतिस्पर्धी राहिलेल्या पुणे , मुंबई उपनगर संघांच्या अंतिम लढतीत या वेळी मुंबई उपनगरने बाजी मारली . अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव या सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंच्या मुंबई उपनगर संघाने पुण्याचा ३० - २३ असा पराभव करून पुण्याची राज्य महिला कबड्डीतील बारा वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली . पुण्याच्या पुरुष संघाने मात्र विजेतेपद राखले . मात्र , त्यांना कोल्हापूरचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला . विश्रांतीच्या १२ - ११ अशा निसटत्या आघाडीनंतर उपनगरने उत्तरार्धात हुकुमत राखली . पुण्यास निष्प्रभ करताना उपनगरने निर्णायक लढतीत ३० - २३ असा विजय मिळवला . अभिलाषा आणि सायलीने गेल्याच महिन्यात भारताच्या आशियाई महिला कबड्डीच्या विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावली होती . त्यांनी कोमल देवकरच्या साथीत उत्तरार्धात पुण्याला प्रतिकाराचीही फारशी संधी दिली नाही . उपनगरने पुण्यावर तीन लोण देत बाजी मारली . त्यातील उत्तरार्धातील दोन लोणनी लढतीचा निर्णयच केला . संपूर्ण सामन्यात पुण्याकडून केवळ आम्रपाली गलांडे हिच्याच चढाया यशस्वी ठरत होत्या . तिला पूजा शेलारची साथ मिळाली . अखेरच्या टप्प्यात आम्रपालीचीच पकड झाल्याने पुण्याचे आव्हान संपुष्टात आले . स्नेहल शिंदे आणि सायली केरिपाळे यांना आलेले अपयश पुण्याला चांगलेच महागात पडले . पुरुषांच्या अंतिम लढतीत पुण्याने नियोजित वेळेतील २४ - २४ अशा बरोबरीनंतर कोल्हापूरचे आव्हान पाच - पाच चढायांच्या टायब्रेकरमध्ये ६ - ५ असे परतवून लावले . सिद्धार्थ जाधव , मोबीन शेख या पुण्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय खेळ केला . मात्र , टायब्रेकमध्ये ५ - ५ अशा बरोबरीत कोल्हापूरच्या अखेरच्या चढाईपटूची पकड करणारा शिवराज जाधव पुण्याचा हिरो ठरला . त्यापूर्वी कोल्हापूरने सांगलीचे आव्हान पाच - पाच चढायांच्याच लढतीत २८ - २८ ( ८ - ५ ) असे परतवून लावले .
2
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीवर कौतुकाचा वर्षाव केला . स्टीव्हन ओ’कफी आणि नॅथन लियॉन या फिरकी जोडीने भारतीय संघाचे कंबरडे मोडले आहे . पुण्यातील कसोटीत स्टीव्हन ओ’कफी याने दोन डावात तब्बल १२ विकेट्स घेतल्या होत्या , तर बंगळुरूतील दुसऱया कसोटीत नॅथन लियॉनने पहिल्या डावात भारताच्या ८ विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला . लियॉनच्या अचूक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली . ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की , मी आजवर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीजोडीला अशाप्रकारची अफलातून कामगिरी करताना याआधी केव्हाच पाहिले नाही . ओ’कफी आणि नॅथन लियॉन यांनी दोघांनी भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले . दोघांकडून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी गांगुलीने भारतीय संघ कांगारुंना व्हाईटवॉश देईल असे भाकीत केले होते . पण पहिल्याच कसोटीत भारतीय संघाला ३३३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी गांगुलीचे भाकीत खोटे ठरवून दाखवले . दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १८९ धावांत संपुष्टात आणल्यानंतर ८७ धावांची आघाडी घेत सर्वबाद २७६ धावा केल्या . जडेजाने ६३ धावांवर ६ विकेट्स घेतल्या . म्हणून ऑस्ट्रेलियाची आघाडी रोखता आली . दरम्यान , दुसऱया डावात भारतीय संघाने १५० धावांचा टप्पा ओलांडला असला तरी संघाचे चार फलंदाज तंबूत दाखल झाले आहेत . तर भारताकडे जवळपास ६८ धावांची आघाडी आहे . भारतीय संघाच्या आघाडीला भक्कम करण्याची जबाबदारी आता चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर आहे .
2
‘झारा’ , ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ आणि ‘एच अॅण्ड एम’ हे जगभरातील तरुणाईचे लाडके ब्रॅण्ड्स भारतातही जम बसवू लागले आहेत . चला या ब्रॅण्ड्सच्या शोरूम्समध्ये एक फेरफटका मारू . मॉलमध्ये काही अशी शोरूम असतातच , जी नेहमीच आपलं लक्ष वेधून घेतात . कधी त्यांच्या सुंदर देखाव्यांमुळे , कधी कलेक्शन किंवा कधी गर्दीमुळे . काही ब्रॅण्ड असे असतात , ज्यांना सेलचं सोयरसुतक नसतंच . कायम तिथे गर्दी असते . पण जेव्हा सेल असतो , तेव्हा काही क्षणांत अख्खं दुकान रिकामं होतं . सध्या सेल्सचा सीझन चालू आहेच . मोठमोठय़ा ब्रॅण्ड्सनी त्यांच्या जुन्या कलेक्शन्सवर भरपूर सूट दिली आहे . पण यातही तमाम मुंबईकर फॅशनिस्टा वाट बघत असतात , ‘झाराच्या सेल’ची . यासाठी पेपरमधील जाहिराती , फेसबुक अपडेट यांच्यावर सतत लक्ष असतं . सेलच्या पहिल्याच दिवशी जवळच्या मॉलमध्ये जायचे प्लान बनतात . कित्येक जणी तर दोघींना एकच ड्रेस आवडला आणि त्यावरून भांडणं होऊन मत्री तुटायला नको म्हणून एकटय़ाच खरेदीला जातात . अशीच काहीशी गर्दी असते , ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ आणि ‘एच अॅण्ड एम’च्या सेलला . ही किमया आहे या ब्रॅण्ड्सच्या ग्लोबल प्रेझेन्सची . जगाच्या पाठीवर कुठेही जा , या ब्रॅण्ड्सचं नाव सगळ्यांनाच ठाऊक असतं . यांचं कलेक्शन अमुक एक शरीरयष्टी , देश , समाज यांच्यापर्यंत मर्यादित नसतं . मुख्य म्हणजे खिशाला परवडणारं असतं . २०१५ मध्ये ‘एच अॅण्ड एम’ भारतात सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी त्यांनी केलेली कमाई ही भारतातील कोणत्याही बडय़ा ब्रॅण्डच्या वार्षकि कमाईइतकी होती . यावरून तुम्हाला या ब्रॅण्ड्सचं लोकांमध्ये किती आकर्षण आहे , याची कल्पना येईल . २०१० मध्ये ‘झारा’ आणि ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हे दोन ब्रॅण्ड भारतात दाखल झाले . त्यामानाने २०१५ मध्ये आलेल्या ‘एच अॅण्ड एम’ने थोडा उशीरच केला . पण यांच्या येण्याआधीच या तीनही ब्रॅण्ड्सचा चाहता वर्ग भारतात होता . याआधी सेलेब्रिटीजच्या बोलण्यात या ब्रॅण्ड्सचा उल्लेख यायचा . परदेशी गेलेल्या प्रत्येकाच्या शॉिपग यादीत यांचा उल्लेख असायचा . फॅशन मासिकांमध्ये यांच्याबद्दल छापून यायचं . त्यामुळे या ब्रॅण्ड्सबद्दलची उत्सुकता सगळ्यांमध्येच होती . हे तिन्ही ब्रॅण्ड्स अमेरिकन आहेत , असा बऱ्याच जणांचा समज आहे . पण फक्त ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा अमेरिकन ब्रॅण्ड असून ‘झारा’ आणि ‘एच अॅण्ड एम’ हे स्पॅनिश आणि स्विडिश ब्रॅण्ड्स आहेत . तिन्ही परदेशी ब्रॅण्ड्स म्हणजेच वेस्टर्न कलेक्शनचे ब्रॅण्ड्स या जुजबी ओळखी पलीकडे यांच्यातील कलेक्शन्समध्ये खूप फरक आहे . थोडक्यात सांगायचं झालं तर ते त्यांच्या देशांचे त्यांच्या संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत , असं म्हटलं तरीही चालेल . तसे तिन्ही ब्रॅण्ड्स औद्योगिकीकरणातून जन्मलेले . त्यामुळे त्यांना सांस्कृतिक इतिहास वगरे नाही . युरोप फॅशन क्षेत्राची जननी . युरोपीयन ब्रॅण्ड्सची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे ते काळानुसार बदलतात , पण त्यांच्या बदलातही संयम असतो . त्यामुळे झारा , एच अॅण्ड एममध्ये तुम्हाला सतत वेगवेगळ्या ट्रेण्ड्सची कलेक्शन्स पाहायला मिळतील . त्यामुळे या ब्रॅण्ड्समधून घेतलेले कपडे , अॅक्सेसरीज दोन - तीन वर्षे विनातक्रार वापरणारी अनेक उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला मिळतील . अमेन्सिओ ऑर्टेगाने १९७५ मध्ये ‘झारा’चं पहिलं शोरूम काढलं . त्या वेळी ते बडय़ा ब्रॅण्ड्सच्या कपडय़ांच्या नकला करत आणि स्वस्तात विकत . हळूहळू त्यांनी सर्वसामान्यांना परवडू शकतील , अशी कलेक्शन्स काढायला सुरुवात केली . बडय़ा ब्रॅण्ड्सच्या तुलनेत सुरुवातीपासून ‘झारा’मध्ये मार्केटिंगवरचा खर्च शक्य तितका आवरता घेतला जातो . तसेच त्यांचं बहुतेक कलेक्शन अजूनही स्पेन आणि त्याच्या आसपासच्या गावातून तयार होतं . त्यामुळे त्यांच्या स्पर्धकांपेक्षा झाराच्या कपडय़ांच्या किंमती थोडय़ा जास्त आहेत . पण त्यामुळे कपडय़ांचा दर्जा कायम ठेवण्यास मदत होते . एका डिझायनरवर विसंबून राहण्याऐवजी झाराने त्यांची अख्खी डिझायनर्सची टीम उभारली आहे . त्यामुळे बाजारातील प्रत्येक ट्रेण्ड अचूक हेरला जातो आणि त्यानुसार त्यांच्या शोरूममधील कलेक्शन्स सतत बदलत असतात . पण त्यातही ब्लॅक ड्रेस , ब्ल्यू डेनिम असे काही निवडक क्लासिक झारा कलेक्शन्स शोरूममध्ये कायम असतात . आज त्यांची ८८ देशांमध्ये ७०१३ शोरूम्स आहेत , त्यातील १८ शोरूम्स भारतात आहेत . वेगवेगळे ट्रेण्ड्स , लुक्स वापरून झाल्यावर स्वतःची स्टाइल तयार करायचा विचार जेव्हा कोणाच्या मनात येतो , तेव्हा त्यांची पावलं सहज झाराकडे वळतात . या ब्रॅण्डची कलेक्शन्स सतत बदलत असली , तरी ती ट्रेण्डमधून सहसा बाहेर जात नाहीत . त्यामुळे यांच्या किमती महाग असल्या तरी दोन - तीन वर्षे कपडे तुम्ही सहज वापरू शकता . कधी कोणाच्या हातातली झाराची पिशवी बघितली आहेत ? नेव्ही रंगाच्या कागदी बॅगवरची गोल्ड अक्षरं , त्यांच्यातील रॉयल लुकची जाणीव करून देतात . हीच झाराची खासियत आहे . तुमच्या फॉर्मल वेअर वॉडरोबसाठी झारा उत्तम पर्याय ठरू शकतो . यांच्या कलेक्शन्सची सुरुवात अडीच हजार रुपयांपासून होते . त्यामुळे खिशाला थोडासा चटका लागू शकतो . त्यामुळेच झाराच्या सेलची इतक्या आतुरतेने वाट पाहिली जाते . एका बडय़ा , प्रथितयश डिझायनरचे कपडे तुम्हाला तुमच्या जवळच्या दुकानात अगदीच खिशाला परवडतील , या किमतीत मिळाले तर ? ‘एच अॅण्ड एम’ने नेमकं हेच केलं . इíलन पसाँ यांनी १९४७ मध्ये स्विडन येथे हेन्स ( स्विडिशमध्ये भाषेत ‘तिचा’ ) या वूमन्सवेअर ब्रॅण्डची स्थापना केली . १९६८ मॉरिझ विड्फोस या मेन्सवेअर ब्रॅण्डसोबत भागीदारी केल्यावर सध्या ब्रॅण्डचं नाव ‘एच अॅण्ड एम’ ( हेन्स अॅण्ड मॉरिझ ) जन्माला आलं . जगभरातील ६२ देशांमध्ये ३९०० हून अधिक शोरूम असलेला हा ब्रॅण्ड सध्या रिटेल क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे . भारतात यांची १३ शोरूम्स आहेत . या ब्रॅण्ड्सनी त्यांच्या वैयक्तिक कलेक्शन्ससोबत कार्ल लाग्फेर , लाविन , वर्साचे , जिमी चू अशा अनेक बडय़ा डिझायनर्सची कलेक्शन्स सर्वसामन्यांच्या आवाक्यात आणली . तसेच पॉप सिंगर मडोना , बियॉन्से यांची कलेक्शन्ससुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिली . दर वर्षी हे ब्रॅण्ड्स एका बडय़ा डिझायनरच्या कलेक्शनची घोषणा करतात . हे कलेक्शन फक्त ‘एच अॅण्ड एम’मध्येच उपलब्ध होतं . त्यामुळे अशा कलेक्शन्सना पहिल्या दिवसापासूनच चाहत्यांची तोबा गर्दी मिळते . कार्ल लाग्फेर हे नाव जगातील पहिल्या क्रमांकाचा फॅशन ब्रॅण्ड ‘शनेल’ याच्याशी जोडलं गेलंय . या ब्रॅण्ड्स किंवा कार्लच्या ब्रॅण्डचं कलेक्शन म्हणजे जगभरात चच्रेचा विषय . त्यामुळे ज्या दिवशी त्याचं कलेक्शन शोरूममध्ये येणार असल्याची घोषणा ‘एच अॅण्ड एम’ने केली , त्याच्या आदल्या रात्रीपासून लोकांनी त्यांच्या शोरूमबाहेर गर्दी केली होती . कलेक्शनच्या अनावरणाच्या काही तासांतच सगळे कपडे विकले गेले . एच अॅण्ड एम मुख्यत्वे इझी मूड युथचं प्रतिनिधित्व करतो . त्यामुळे लूज गार्मेट्स , रिलॅक्स फिट लुक प्रामुख्याने पाहायला मिळेल . एरवी बाजारात सहज मिळणार नाही , असे सुंदर कोट्स , हुड्स , ट्राऊझर , जॅकेट्स इथे मिळू शकतील . यांच्या किमती साधारणपणे पंधराशे ते सहा हजारच्या घरात आहेत . अर्थात इथे तुम्हाला दहा हजाराचे कोट्स , बूट्ससुद्धा पाहायला मिळतात . या दोघांच्या तुलनेत ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा तसा नवा ब्रॅण्ड आहे . १९८४ मध्ये कॅलिफोíनयामध्ये डॉन वॉन श्यान आणि त्यांची पत्नी यांनी या ब्रॅण्डची सुरुवात केली . सुरुवातीला याचं नाव ‘फॅशन ट्वेंटीवन’ होतं . सध्या अमेरिकेतील बडय़ा रिटेल ब्रॅण्ड्समध्ये यांची गणना होते . जगभरात यांची ७५० हून अधिक शोरूम असून भारतात १३ शोरूम्स आहेत . मॉलच्या एका कोपऱ्यात असलेलं यांचं शोरूमही ब्राइट लेमन यलो रंगाचा बोर्ड आणि त्यावर ब्रॅण्डच्या काळ्या रंगातील नावाने चटकन लक्षात येतो . ‘फॉरेव्हर ट्वेंटीवन’ हा नावाप्रमाणेच तरुण पिढीला डोळ्यासमोर ठेवून कलेक्शन्स बनवतो . त्यामुळे यांच्या कलेक्शन्समध्ये नेहमीच तुम्हाला ब्राइट कलर्स , फंकी डिझाइन्स , िपट्र्स , हटके पॅटर्न दिसतील . बाजारातील छोटेछोटे ट्रेण्ड हा ब्रॅण्ड टिपतो , त्यामुळे रोज काही तरी नवं हवं असणाऱ्या कॉलेजवयीन मुलांना हा ब्रॅण्ड आवडतो . हा अमेरिकन ब्रॅण्ड असल्यामुळे याच्या स्वभावातच बोल्डनेस दिसून येईल . त्यामुळे टोन्ड जीन्स , शिअर स्कर्ट , शॉर्ट टॉप , प्लंजिंग नेकलाइन असं बोल्ड कलेक्शन इथे मिळत . याच्या किमतीही इतर दोघांपेक्षा तुलनेने कमी आहेत . भारतात यांची कलेक्शन्स साधारणपणे ६०० ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत . पण यांची कलेक्शन्सची हौसमौज असते ती बाजारात तो ट्रेण्ड असेपर्यंत . एकदा ट्रेण्ड गेला की कपडे कोपऱ्यात जातात . त्यामुळे इथून खरेदी करताना अति महाग कपडे घेणं टाळा . सेलच्या काळात इथे कपडे , अॅक्सेसरीजवर भरपूर सूट मिळते . एरवी आवाक्याबाहेरचे वाटणारे कपडेही स्वस्तात मिळून जातात . पण मुळात सेल असतात , जुना स्टॉक काढून नव्या कलेक्शन्ससाठी जागा करण्यासाठी . त्यामुळे सेलमधून घेतलेल्या कपडय़ांचा ट्रेण्ड काही महिन्यांमध्ये जाणार , हे लक्षात ठेवून खरेदी करा . मृणाल भगत सौजन्य – लोकप्रभा
1
मुंबईच्या प्रतिष्ठित ‘जेजे कला महाविद्यालया’चे पहिले भारतीय अधिष्ठाता रावबहादूर महादेव विश्वनाथ ( एम . व्ही . ) धुरंधर यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या चित्रांतून त्यांची थोरवी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कलादालनात येत्या मंगळवार , ११ सप्टेंबरपासून मिळणार आहे . महाराष्ट्राभिमानी माणसाने चुकवू नये असे हे पाच मजली प्रदर्शन , केवळ धुरंधरांचीच नव्हे तर गेल्या शतकातल्या महाराष्ट्रीय चित्रकलेची ओळख करून देणारे आहे . रावबहादूर धुरंधर १८ मार्च १८६७ रोजी जन्मले आणि १ जून १९४४ रोजी निवर्तले . त्यांचे शतकोत्तर सुवर्णजयंती वर्ष खरे तर उलटून गेले आहे . पण केंद्र सरकारच्या मोठय़ा कलादालनात त्यांचा इतिहास मांडणारे प्रदर्शन साकारणे , हे सोपे काम नव्हते . दिल्ली , सांगली , कोल्हापूर , मुंबई , सातारा , औंध , नागपूर , हैदराबाद इत्यादी ठिकाणच्या संग्रहालयांत तसेच देश - विदेशातील संग्राहकांकडे असलेली धुरंधरांची चित्रे ( वा त्यांच्या प्रति ) या निमित्ताने मुंबईत एका छताखाली पाहता येणार आहेत . ब्रिटिश आमदनीत धुरंधर वाढले , मानवाकृती चित्रांवर त्यांनी भर दिला , पण या मानवाकृतींच्या एकत्रित रचना - फिगर कॉम्पोझिशन - करताना त्यांनी जणू प्राचीन लेण्यांमधून दिसणाऱ्या भारतीय समूहशिल्पांच्या परंपरेला आधुनिक रूप दिले . पीठावाला आणि ए . एक्स . त्रिन्दाद यांसारखे अव्वल व्यक्तिचित्रणकार होते ; तसेच आबालाल रहिमानांसारखे पेन्सिल / चारकोल / जलरंग अशा कोणत्याही माध्यमातून तरल अभिव्यक्ती करणारे प्रतिभावंतही होते . या तिन्ही विविध वाटांचा मिलाफ धुरंधरांच्या चित्रकलेत दिसून येतो . ‘एनजीएमए’ ( नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या कावसजी जहांगीर हॉलमधील ( रीगल सिनेमाच्या चौकात , छ . शिवाजी वस्तुसंग्रहालयाच्या समोर ) या प्रदर्शनाची कल्पना ‘एनजीएमए’च्या मुंबई सल्लागार समितीचे प्रमुख आणि महाराष्ट्रीय कलेचे अभ्यासक व चित्रकार सुहास बहुळकर यांनी मांडली . या केंद्र सरकारी संस्थेच्या दिल्ली व मुंबईतील संचालकांनी संकल्पनेस पाठिंबा दिला आणि धुरंधरांची अनेक चित्रे ज्या ‘दिल्ली आर्ट गॅलरी’कडे आहेत , तिचे संस्थापक आशीष आनंद यांनीही सहभागाची तयारी दाखवली . त्यामुळे केवळ प्रदर्शनच नव्हे , तर एक देखणे , मोठय़ा आकारातील ३१४ पानांचे पुस्तकही या प्रदर्शनासोबत सिद्ध होऊ शकले . ‘रोमँटिक रिअॅलिस्ट’ हे या पुस्तकाचे नाव . सुहास बहुळकरांनीच त्याचे लेखन केले आहे . रेखाटने , रंगचित्रे , चित्र - पोस्ट कार्डे , पुस्तकांची मुखपृष्ठे आणि बोधचित्रे ( इलस्ट्रेशन्स ) जाहिरातींसाठी केलेली प्रचारचित्रे ( पोस्टर्स ) , व्यक्तिचित्रे , निसर्गचित्रे याखेरीज शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग , औंधच्या राजांचे दसरा सोहळ्यातील चित्र , ब्रिटनच्या राजाचे भारतातील आगमन आदी रचनाचित्रे , आई - मूल तसेच निरनिराळ्या संस्कृतींतील स्त्रियांची चित्रे आणि धुरंधरांच्या दोन्ही पत्नींची चित्रे असा या प्रदर्शनाचा पसारा आहे . यातील बहुतेक चित्रे ‘रोमँटिक रिअॅलिस्ट’ या पुस्तकातही आहेत . पुस्तक मराठीतही ? मुंबईतील मोठय़ा प्रदर्शनाच्या निमित्ताने धुरंधर यांच्याविषयी प्रकाशित होणारे पुस्तक फक्त इंग्रजीतच आहे . पण त्याचे लेखक सुहास बहुळकर हे मराठीत महत्त्वपूर्ण लेखन करणारे अभ्यासू चित्रकार . ‘धुरंधरांवर मी मुळात भरपूर लिहिलं मराठीत . . त्याचा काही भागच इंग्रजीत येऊ शकला आहे’ असे त्यांनी बोलण्याच्या ओघात सांगितले . ‘पुस्तक मराठीत येणार नाही का ? ’ या प्रश्नावर , ‘‘मजकूर तयारच आहे , चित्रंही उपलब्ध आहेत . . पण प्रकाशक तयार झाले पाहिजेत . . ’’ असे बहुळकर म्हणाले . एवढय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी मराठीत कोण प्रकाशक तयार होणार , असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला . याविषयी प्रदर्शनाशी संबंधित काही माहीतगारांचे म्हणणे असे की , महाराष्ट्र राज्याच्या ‘साहित्य संस्कृती मंडळा’ने तरी मराठी पुस्तकाचे काम हाती घ्यावे . बहुळकरांनी ‘बॉम्बे स्कूल : आठवणीतले , अनुभवलेले’ हे मराठी पुस्तक लिहिले होते , पण ( केंद्रीय ) ललित कला अकादमीने केवळ धुरंधरांचेच नव्हे तर बॉम्बे स्कूल कलापरंपरेतील अनेक महत्त्वाच्या चित्र - शिल्पकारांविषयीची सचित्र पुस्तके केली पाहिजेत , असे मतही या जाणकारांनी व्यक्त केले . ‘‘किमान एक उत्तम उपयोजित कलावंत - कमर्शिअल आर्टिस्ट - या दृष्टीने तरी धुरंधरांकडे पाहा . धुरंधरांकडे दुर्लक्ष बरेच झाले आहे . १९३६ मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्ट मध्ये खांदेपालट झाला . त्यांनी त्यापूर्वीच्या काळातील चित्रकार धुरंधर यांना चित्रकार म्हणून स्वीकारले नाही , पण आजचे निकष त्या काळातील कलाकारांवर लावून त्यांचे मूल्यमापन करणे चुकीचे आहे . काळाच्या संदर्भात चित्रकारांचे मूल्यमापन व्हावे . ’’ – सुहास बहुळकर , प्रदर्शनाचे संयोजक व ज्येष्ठ चित्रकार . तरुण पिढीला धुरंधरांची चित्रकारी आणि त्यांचे महत्त्व समजावे या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरेल . – शिवप्रसाद खेनेड , नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट - मुंबईचे संचालक
0
सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या ` घंटा ` या धमाल विनोदी चित्रपटाचे म्युझिक आणि ट्रेलर अत्यंत नावीन्यपूर्ण पद्धतीने , मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांच्या उपस्थितीत लाँच झाले . महेश मांजरेकर , संजय मोने , जीतेंद्र जोशी यांसारख्या कसलेल्या कलावंतांनी ‘घंटा’ चित्रपटातील अमेय वाघ , सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर या कलाकारांचा ‘घंटा - टोस्ट’ केला आणि उपस्थित तारकादळे हास्यकल्लोळात बुडून गेली . या ‘घंटा - टोस्ट’च्या तावडीतून अमृता खानविलकरसारखी अभिनेत्रीही सुटली नाही . ‘घंटा’ चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या पुष्कर श्रोत्री याने या ‘घंटा - टोस्ट’मध्येही सूत्रसंचालकाची महत्त्वाची भूमिका बजावत सगळ्यांना खुमासदार पद्धतीने झुंजवले . एकूणच , या ‘घंटा - टोस्ट’मुळे ` घंटा ` हा चित्रपट कसा असेल , याची जबरदस्त उत्कंठा उपस्थितांमध्ये निर्माण झाली . अमेय , सक्षम आणि आरोह यांनी सादर केलेल्या धमाल मोशन पोस्टरने ‘घंटा’च्या प्रमोशनला प्रारंभ झाला होता . त्यानंतर आलेला ‘घंटा’चा टीझरही चर्चेचा विषय बनून गेला . ` यू ट्यूब ` वर सव्वा लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला . त्या पाठोपाठ अमेय - सक्षम - आरोह या त्रिकुटाने फेसबुकवरून त्यांच्या चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधला . या अभिनव प्रमोशनमुळे ‘घंटा’ हा चित्रपट प्रत्येकाच्या मनात घणघणू लागला आहे . अशा पार्श्वभूमीवर आज पारंपरिक प्रकारांना फाटा देत ‘घंटा’ टीमने ‘घंटा - टोस्ट’ हा छोटेखानी कार्यक्रम सादर करत चित्रपटाचा ट्रेलर , तसेच म्युझिक व्हिडिओ लॉंच करत धमाल उडवून दिली . ` घंटा ` हा आरोह - अमेय - सक्षम या त्रिकुटाने केलेल्या उचापतींनी भरलेला सिनेमा आहे . मुंबईत स्ट्रगल करत असेलेले हे तिघे जगण्यासाठी काय उद्योग करतात , याचं खुमासदार चित्रण दिग्दर्शक शैलेश काळे यांनी या चित्रपटात केलं आहे . तरुणाईच्या विषयावरचा , तरुणाईच्या भाषेतला हा चित्रपट असला , तरी तो सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा , असा आहे . ` दशमी स्टुडिओज ` , ` ब्रह्मपुरा पिक्चर्स ` आणि ` यलो इन्कोर्पोरेशन ` यांनी हा चित्रपट सादर केला आहे . ` दशमी क्रिएशन्स ` ने अल्पावधीत टीव्ही क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे . निर्माते नितीन वैद्य , निनाद वैद्य यांच्या या प्रॉडक्शन हाउसच्या ` दुर्वा ` या मालिकेने एक हजार एपिसोडसचा टप्पा ओलांडला आहे . त्यांच्या ` माझे मन तुझे झाले , ` ` पसंत आहे मुलगी ` , या मालिकांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे . ` घंटा ` या चित्रपटाच्या निमित्ताने ही कंपनी चित्रपट क्षेत्रातही भक्कम पाय रोवण्यासाठी सज्ज आहे . शैलेश काळे आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे . सुमित बोनकर आणि राहुल यशोद यांनी या हटके सिनेमाचं लेखन केलं आहे . फ्रेश लूक , धमाल प्रेझेंटेशन ही सिनेमाची वैशिष्ट्यं आहेत . चित्रपटाचे टीझर्स , जाहिराती आणि म्युझिकमधून निर्माण झालेली उत्सुकता पूर्ण करण्यासाठी प्रेक्षकांना १४ ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे .
0
भारतातल्या बहुतेकशा साड्यांची नावे ही गावाच्या किंवा शहराच्या नावावरुन दिलेली असतात . कांचीपुरम हे तमिळनाडूमधील प्रसिद्ध विणकामाचे ठिकाण आहे . इथे बनवली जाणारी सिल्कची साडी कांचीपुरम सिल्क म्हणून ओळखली जाते . सोन्याचे धागे वापरुन विणल्यामुळे या साडीला तमिळनाडूची बनारसी साडी असंही म्हटलं जातं . यामध्ये सोन्याच्या धाग्यांबरोबर चांदीचे धागेही वापरले जातात . या साडीविषयी पुरातन काळातल्या अनेक समजुती आहेत . असं म्हटलं जातं की , सुती कापड शंकराला प्रियं आहे , तर रेशीम विष्णुला . कांचीपुरम साडी तुतीच्या रेशमापासून विणली जाते . ही साडी विणायला तीन कारागीर लागतात . एक कारागीर उजव्या बाजूने विणत असेल , तर दुसरा कारागीर डाव्या बाजूने विणू शकतो . तुतीचे रेशीम दक्षिण भारतातून तर जरीचे धागे गुजरातमधून मागवले जातात . काठाचा रंग आणि नक्षीकाम हे साडीपासून वेगळे असते . जर पदर वेगळ्या रंगात विणायचा असेल तर , तो साडीपासून वेगळा विणला जातो आणि नंतर नाजूकपणे साडीला जोडला जातो . नाजूकपणे जोडला असला तरी विण इतकी घट्टं असते , की साडी फाटली तरी पदर तिच्यापासून वेगळा होत नाही . नक्षीकामाची वैशिष्ट्ये – साडीवरील नक्षीकाम हे सोन्याच्या धागे वापरून केले जाते . या नक्षीकामात माणसांच्या आणि प्राण्यांच्या आकृत्या , मंदिरांचे कळस , भूमितीतील आकृत्या , इ . वापरले जाते . या साडीवर रामायण व महाभारतातील चित्रे अतिशय कुशलतेने विणलेली असतात . याबरोबरच चंद्र , सूर्य , मोर , सिंह , कोयरीचे आकार वापरून नक्षीकाम केले जाते . नक्षीकामाचे प्रकार – तंडवलम – यामध्ये पूर्ण साडीवर उभ्या रेषा विणल्या जातात . कोट्टडी – यामध्ये उभ्या व आडव्या रेषांना जोडून विविध आकाराचे चौरस व आयत बनवले जातात . पुट्टा – या प्रकारामध्ये काठावर फूलांची नक्शि विणून नंतर काठ साडीला जोडले जातात . कांचीपुरम साडीचे नक्षीकाम जितके खास असते , तितकेच तिचे रंगही खास असतात . लाल , नारंगी , मोरपंखी , हिरवा , काळा , इ , असे गडद रंग व नाजूक नक्शिकाम यामुळे ही साडी अधिकच खुलून दिसते . काळजी कशी घ्याल – कांचीपुरम सिल्कपासून बनवलेल्या या साडीची निगा राखणे सोपे आहे . दीर्घकाळापर्यंत टिकत असल्यामुळे घरच्या घरी पाण्याने धुतलेली चालते . अवघड नक्षीकाम आणि विणायला लागणारा वेळ यामुळे या साडीची किंमत जास्त असते . पारंपारिक पद्धतीने विणलेल्या या साडीची किंमत अडिच हजारांपासून एक लाखापर्यंत असते . पारंपरिक विणकामाबरोबरच आधुनिक पद्धतीने विणलेल्या साड्यादेखील उपलब्ध आहेत . ही साडी विणण्यासाठी संगणकाचा उपयोग केला जातो . मजुरी कमी असल्यामुळे या साडीची किंमत परवडणारी असते . या भरजरी साडीवर पारंपारिक दागिने घातलेले चांगले दिसतात . नाजूक दागिने शक्यतो घालू नयेत . जुन्या साडीचे काय कराल – लग्नसमरंभात किंवा सणासुदीला घालण्यासाठी जुन्या साडीपासून पायघोळ ड्रेस शिवता येईल . साडीच्या पदराची ओढणी करून सलवार कमीजवर घालता येऊ शकते . सध्या फॅशनच्या दुनियेत आघडीवर असलेली पलाझो पॅंट , रॅप अराउंड स्कर्ट हे देखील उत्तम पर्याय आहेत . वेगळ्या पद्धतीचा कुर्ताही छान दिसू शकतो . वल्लरी गद्रे , फॅशन डिझायनर
1
कोल्हापूरने पाच सुवर्णासह एकूण १६ पदकांची कमाई करत जिल्हा नेमबाजी क्रीडा संघटना आणि महाराष्ट्र रायफल संघटना यांच्या वतीने येथे आयोजित महाराष्ट्र एअर वेपन नेमबाजी स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले . या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा , ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे , निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यजमान नाशिकने चार सुवर्णासह आठ , तर पुण्याने सहा रौप्यसह नऊ पदके मिळवली . मुंबईने तीन सुवर्णाची कमाई केली . एअर रायफल ( एनआर ) वरिष्ठ व कनिष्ठ गटात मुंबईचा ओमकार घोडके , नाशिकची श्वेता शिंपी , युवा गटात औरंगाबादचा सिद्धेश्वर जाधव , मुलींमध्ये नाशिकची श्वेता शिंपी , ओपन साईट एअर रायफल प्रकारात नाशिकची चंदन सोनी यांनी सुवर्ण मिळविले . एअर रायफल ( आयएसएसएफ ) प्रकारात मुली व कनिष्ठ गटात कोल्हापूरची वैष्णवी पडाळकर , युवा गटात मुंबईची ऋतुजा महेंद्रकरने सुवर्ण , तर याच गटासह मुले व कनिष्ठ गटात कोल्हापूरच्या शाहू मानेने सुवर्ण मिळवित हॅटट्रीक केली . स्पेनची भारतावर मात माद्रिदः रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून आयोजित दौऱ्यात भारतीय हॉकी संघाला स्पेनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले . जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असलेल्या स्पेनने क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतीय संघाला ३ - २ असे नमवत धक्का दिला . या पराभवासह स्पेनने दोन सामन्यांची मालिका २ - ० अशी जिंकली . मनप्रीत सिंग ( ३८ ) आणि रमणदीप ( ५७ ) यांनी भारतातर्फे गोल केले . स्पेनकडून जोसेप रोमेयू ( २० ) , पौयू क्यूमाडा ( ४२ ) आणि साल्व्हाडोर पिअरा ( ५३ ) यांनी गोल केले . नाशिकमध्ये राज्य कबड्डी पंच शिबीर नाशिक : जिल्हा कबड्डी संघटना आणि क्रीडा प्रबोधिनी यांच्या वतीने येथील विभागीय क्रीडा संकुलात ३० व ३१ जुलै रोजी राज्य कबड्डी पंच शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . शिबीराचे उद्घाटन शनिवारी दुपारी ४ . ३० वाजता राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील , कार्याध्यक्ष दत्ता पाथरीकर , प्रमुख कार्यवाह आस्वाद पाटील , सहसचिव प्रकाश बोराडे , प्रा . सुनील जाधव , महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य मोहन भावसार , क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ . जयप्रकाश दुबळे , जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष जयंत जाधव , प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड व क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे . राज्य कबड्डी पंच शिबीरासाठी महाराष्ट्रातून १५० पंच उपस्थित राहणार असून त्यांना डॉ . शैलेश शेलार हे ‘पंचांची तंदुरूस्ती व शारीरिक क्षमता’ , माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अनुराधा डोणगावकर ‘पंचांचे मानसिक संतुलन’ , योगाचार्य गोकुळ घुगे ‘योगाचे पंच आणि खेळाडूंसाठी महत्व’ , महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष मनोहर इंदुलकर व सचिव राऊत ‘कबड्डीतील नवनवीन बदल - नियम व पंचांची कामगिरी’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत . ३१ जुलै रोजी दुपारी १ . ३० वाजता शिबीराचा समारोप होणार आहे .
2
रविंद्र जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची शिक्षा लादण्यात आल्यानंतर , तिसऱ्या कसोटीत संघात कोणत्या फिरकीपटूला स्थान मिळणार यावर चर्चांना उधाण आलं आहे . मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कुलदीप यादवऐवजी तिसऱ्या कसोटीत अक्षर पटेलचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे . बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिलेली आहे . अक्षर पटेल सध्या दक्षिण आफ्रिकेत भारत ‘अ’ संघाकडून वन - डे मालिकेत खेळतो आहे . या मालिकेतल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याची कसोटी संघात निवड झालेली आहे . आफ्रिका दौरा आटोपून अक्षर गुरुवारी म्हणजेच १० ऑगस्टपर्यंत भारतीय संघात दाखल होऊ शकतो . रविंद्र जाडेजाप्रमाणे अक्षर पटेल संघात भरीव कामगिरी करु शकतो असा संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला विश्वास आहे . त्यामुळे चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला डावलून अक्षर पटेलला पल्लकेले कसोटीत संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे . अवश्य वाचा – जाडेजावर बंदीच्या कारवाईमुळे ‘या’ खेळाडूची संघात निवड पहिल्या दोन कसोटीप्रमाणे भारताने तिसऱ्या कसोटीत दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला , तर संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला संघात स्थान देऊ शकते . पल्लकेलेच्या खेळपट्टीवर अक्षर पटेल श्रीलंकेसाठी धोकादायक ठरु शकतो , असं संघ व्यवस्थापनाच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना नमूद केलंय . कोलंबो कसोटीत आयसीसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी जाडेजावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे . जाडेजाच्या जागी निवड करण्यात आलेल्या अक्षर पटेलला कसोटी सामन्यांचा अनुभव नसला तरीही राष्ट्रीय पातळीवर त्याची कामगिरी दुर्लक्षित करण्यासारखी नाहीये . २३ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये अक्षर पटेलने १० अर्धशतकं आणि १ शतक झळकावलं आहे . याचसोबत पटेलने प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये ७९ बळी घेतले आहेत . अक्षर पटेलकडे आंतराष्ट्रीय स्तरावर ३० वन - डे आणि ७ टी - २० सामन्यांचा अनुभव आहे . यादरम्यान पटेलला फलंदाजीत आपली कमाल दाखवता आली नसली तरीही गोलंदाजीत त्याने महत्वाच्या विकेट घेतल्या आहेत . त्यामुळे शनिवारी सुरु होणाऱ्या कसोटीआधी संघ व्यवस्थापन कुलदीप यादव की अक्षर पटेलला संघात स्थान देतं हे पहावं लागणार आहे .
2
‘पद्मावत’ चित्रपटाविषयी होणारे वाद आणि सद्यपरिस्थिती पाहता काही केल्या भन्साळींच्या मागे असणारे हे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये हेच स्पष्ट होत आहे . करणी सेनेचा या चित्रपटाला असणारा विरोध पाहता भन्साळी आणि चित्रपट निर्मात्यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षण मिळण्यासंबंधीची मागणी केल्याचे कळते . या चित्रपटाला होणाऱ्या विरोधामध्ये आता चित्तोडच्या राणी महेंद्र कंवर यांनीसुद्धा उडी घेतली आहे . भन्साळी सर्वसामान्य जनतेला फसवत असून , त्यांनी या चित्रपटासंबंधी मेवाडच्या महाराणांशी विचारविनिमय करायला हवा होता , असे मत त्यांनी मांडले . ‘पद्मावत’ या चित्रपटाचे पेड प्रीव्ह्यू प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाच ‘राणी सां’चे हे वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधत आहे . जवळपास २०० राजपूत महिलांनी ‘पद्मावत’चा विरोध करण्यासाठी राजस्थानमध्ये निदर्शने केल्यानंतर राणी महेंद्र कंवर यांनी ‘मिड डे’शी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली . ‘येथील स्थानिक वितरकांनी राजस्थानमध्ये पद्मावत प्रदर्शित न करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे . ते स्वतःसुद्धा या चित्रपटाला विरोध करतात’ , असे त्या म्हणाल्या . दीपिका , रणवीर आणि शाहिदची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पद्मावत’ला राजस्थानमध्ये प्रवेश देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला . आम्ही कायद्याचा मान राखतो . पण , समाजातील महिलांचा सन्मानही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे , अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली . कर्ता , कर्म आणि ‘करनी’ ‘जर हा चित्रपट काल्पनिक असल्याचे भन्साळी सांगत आहेत तर त्यामध्ये असणाऱ्या पात्रांची नावे अलाउद्दीन खिल्जी , रावल रतन सिंह अशी कशी असू शकतात ? भन्साळी सर्वांची फसवणूक करत आहेत . चित्रपटाविषयी ते प्रामाणिक असते तर त्यांनी याविषयी मेवाडचे महाराणा , अरविंद सिंह यांच्याशी चर्चा केली असती’ , असे त्या म्हणाल्या . त्यामुळे आता राजस्थानमध्ये ‘पद्मावत’च्या स्क्रीनिंगपुढे हे एक मोठं संकटच आहे , असे म्हणावे लागेल .
0
‘नच बलिये’ या डान्स रिअॅलिटी शोच्या आठव्या पर्वात प्रेक्षकांची मनं जिंकणारी कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा प्रियकर हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या नात्याला एक नवं वळण देण्याचा निर्णय घेतला आहे . भारतीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटोमधून तिने हर्षसोबत आपला रोका झाल्याचं सांगितलं आहे . ‘हे काही संस्मरणीय क्षण आहेत’ , असं म्हणत तिने या फोटोला कॅप्शनही दिलं आहे . सध्या इन्स्टाग्रामवर भारतीचा हा फोटो टेलिव्हिजन वर्तुळात प्रचंड चर्चेत आला असून , चाहत्यांनीही भारतीला शुभेच्छा दिल्या आहेत . या फोटोमध्ये तिने एक लाल रंगाचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत असून , लग्नासाठी अवघे काही दिवस बाकी राहिल्यावर एखाद्या नववधूच्या चेहऱ्यावर जी लकाकी पाहायला मिळते अगदी त्याच प्रमाणे भारतीच्या चेहऱ्यावरही लकाकी पाहायला मिळत आहे . मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत या दोघांचा रोका पार पडला असल्याचं कळत आहे . वाचाः . . म्हणून ‘ट्युबलाइट’च्या ट्रेलरपेक्षा सलमान - अहिलचा व्हिडिओ होतोय व्हायरल टेलिव्हिजन विश्वात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केल्यानंतर आता या दोघांनीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे . हर्ष लिंबाचिया , भारतीच्या टेलिव्हिजन शोचा लेखक आहे . या दोघांमुळेही आता टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी कपल्सच्या नावांच्या यादीत आणखी एका जोडप्याच्या नावाचा समावेश झाला आहे . त्यामुळे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणारी ही कॉमेडियन तिच्या लग्नाची तारीख कधी ठरवते याबद्दलच चाहत्यांमध्ये उत्सुकताही पाहायला मिळत आहे .
0
व्हॅलेंटाईन डेचा हँगओव्हर एव्हाना उतरला असेल . गेल्या आठवड्यात सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक १४ फेब्रुवारीला संपला बाबा एकदाचा असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे . तर हा वीक २१ फेब्रुवारीपर्यंत असतो बरं का ! विशेष म्हणजे १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीचा हा आठवडा अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो . Happy Teddy Day 2017 : कुठल्या रंगाचा टेडी काय दर्शवतो ? फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही . आता हेच बघाना प्रोपज डे , चॉकलेट डे , टेडी डे , प्रॉमिस डे , हग डे , किस डे अशा वेगवेगळ्या डेंनी सुरू झालेला व्हॅलेंटाईन वीक अखेर ‘व्हॅलेंटाईन डे’ने संपतो असे अनेकांना वाटतं . पण खरं तर हा वीक २१ फेब्रुवारीला संपतो हे फार कमी लोकांना माहिती असते . ७ फेब्रुवारीला रोझ डे , ८ ला प्रोपज डे , ९ ला चॉकलेट डे , १० ला टेडी डे अशा वेगवेगळ्या डे्जने व्हॅलेंटाईन वीक सुरु होतो . तो १४ फेब्रुवारीला संपतो . हे डेज् म्हणजे प्रेमाची एक एक पायरी असते ती चढत जायची आणि १४ तारखेला अखेर आपल्या प्रेमाची कबुली तिच्यापुढे किंवा त्याच्या पुढे द्यायची अशी एकूण संकल्पना . पण हा प्रेमचा आठवडा संपला की सुरू होता अँटी व्हॅलेंटाईन डे , म्हणजे आधी प्रेम मग भांडण असंच काहीसं हो ! या अँटी व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस असतो तो स्लॅपडेचा . त्यानंतर सुरू होते ती वेगवेगळ्या डेजची यादी . १६ फेब्रुवारी – Kick Day १७ फेब्रुवारी – Perfume Day १८ फेब्रुवारी – Perfume Day १९ फेब्रुवारी – Confession Day २० फेब्रुवारी – Missing Day २१ फेब्रुवारी – Breakup Day Happy Promise Day 2017 : आजचा दिवस खऱ्या प्रॉमिसचा
1
आपल्याला अनेकदा आरोग्याच्या लहान - मोठ्या तक्रारी उद्भवतात . सुरुवातीला या तक्रारी फारशा मोठ्या वाटत नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो . मात्र दिर्घकाळ या तक्रारी तशाच राहिल्या तर त्या गंभीर रुप धारण करु शकतात . काही तक्रारी या गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात . रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरात वाढत आहे . चुकीच्या जीवनशैलीमुळे रक्तदाबाशी निगडीत तक्रारी उद्भवतात . सामान्यपणे कमाल रक्तदाब १२० आणि किमान ८० हा सामान्य समजला जातो . पण ही आकडेवारी कमी - जास्त असेल तर आपल्याला रक्तदाबाचा त्रास आहे हे वेळीच ओळखायला हवे . आता हे कसे ओळखायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खालील लक्षणांकडे विशेष लक्ष द्या . ( ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे . त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही . त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
मुस्लिम धर्मियांचा महत्त्वाचा मानला जाणारा मोहरम सण सध्या साजरा होतो . आज हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . इस्लामनुसार , मोहरम म्हणजे वर्षारंभ . मोहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर काही वाद सुरू झाले होते . मोहम्मद यांचा चुलत भाऊ आणि जावई , अली हा त्याचा उत्तराधिकारी होता . त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल शोक व्यक्त करण्याकरता शिया बांधव आजही मातम साजरा करतात . आजच्या दिवशी सामुहीक पद्धतीने शोक व्यक्त केला जातो . त्यावेळी हुसेन व इतर शियांना जखमा झाल्याच्या प्रित्यर्थ आजचे शियाही स्वतःला जखमा करून घेतात . तलवारीने स्वतःवर वार करतात . धारदार लोखंडी साखळ्यांनी स्वतःला मारून घेतात . हा दिवस सणाचा नाही तर दुःखाचा आहे . पाण्याचे वाटप करणे हा ही एक फार महत्त्वाचा प्रकार असतो . सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे ताबुताची प्रथा सुरु झाली . मोहरम निमित्त या गावी २५० फूट उंचीचे बांबू पासून ( कळक ) ताबूत बनवले जातात . अष्टकोनी आकाराचे व पहिल्यांदा कळस आणि मग पाया या पद्धतीने हे ताबूत उभारले जातात व त्याची मिरवणूक काढली जाते . इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर - पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे . येथे तारीख - ए - इस्लामचे एक ऐतिहासिक युध्द झाले . त्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला . या करबला गावामुळेच जगातील प्रत्येक शहरात ‘करबला’ नावाचे पवित्र स्थान उभारण्यात आले आहे व या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो .
1
सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे रणबीर कपूर . संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे . ‘संजू’च्या माध्यमातून रणबीरचंही जबरदस्त कमबॅक होणार आहे . म्हणूनच सध्या सोशल मीडियावर रणबीरचीच चर्चा आहे . याशिवाय आणखी एक कारण म्हणजे रणबीरचं आलिया भट्टशी असलेलं नातं . मुलाखतींमध्येही हे दोघं आता रिलेशनशिपविषयी मोकळेपणाने बोलू लागले आहेत . ‘संजू’च्या निमित्ताने रणबीरने नुकतंच ट्विटरवर पदार्पण केलं आणि चाहत्यांशी संवाद साधला . यावेळी चाहत्यांनीही आलिया आणि त्याच्या लग्नाबाबत अपेक्षित प्रश्न विचारला . ट्विटर चॅटच्या माध्यमातून अनेकांनी रणबीरला प्रश्न विचारले आणि रणबीरने दिलखुलासपणे चाहत्यांशी गप्पा मारल्या . त्याच्या आवडत्या गाण्यापासून ते लग्न कधी करणार इथपर्यंत बरेच प्रश्न युजर्सनी विचारले . लग्नाबाबतच्या प्रश्नावर ‘लवकरच . . ‘ असं उत्तर देत रणबीरने चाहत्यांना जणू इशाराच दिला आहे . आलियासोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा असतानाच आता या दोघांनी लवकरच लग्न करण्याचाही विचार केला का असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावू लागला आहे . वाचा : इरफान खानने टेकले कॅन्सरपुढे हात अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर - आलिया एकत्र झळकणार आहेत . या चित्रपटाच्या सेटवरच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले . त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये , पार्ट्यांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं गेलं . तर एका मुलाखतीत ‘हे सर्व नवीनच आहे , ’ असं सांगत रणबीरने प्रेमाची कबुली दिली . तर आलियानेही एका मुलाखतीत वयाची ३० वर्ष पूर्ण करण्याआधीच कदाचित मी लग्न करू शकते असं सूचक विधान केलं होतं . त्यामुळे आता बॉलिवूडच्या या नव्या कपलविषयी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे .
0
बंगळूर : अफगाणिस्तान संघाने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले . पण त्यांच्या कौतुकाचा बहर पहिल्या दोन तासांतच संपला . बंगळूरच्या चिन्नास्वामी मैदानावर पहिल्या सत्रात उपाहारापूर्वी शिखर धवन , तर दुसऱ्या सत्रात मुरली विजयने शतकी खेळी केली . त्यानंतर पावसाच्या सरीने खेळात व्यत्यय आला . पहिल्या दिवशी 78 षटकांच्या खेळात भारताने 6 बाद 347 धावा उभारून सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली . अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या चार विकेट मिळवून सामन्यात थोडी जान आणली . प्रथम फलंदाजी करताना धवनच्या अफलातून फलंदाजीने अफगाणिस्तानचे गोलंदाज भांबावले . धवनने मुख्यत्वे रशिद खान आणि मुजीब रहमान या फिरकी गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला . पहिल्या सत्रात मुजीबला दोन आणि रशिदला एक चौकार ठोकत धवनने उपाहारापूर्वी शतक ठोकण्याचा पराक्रम केला . कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात पाच दिवसांचा सामना खेळणे किती वेगळे आहे याचा अनुभव अफगाणिस्तानने घेतला . उपाहारानंतर धवन बाद झाल्यावर विजयला लोकेश राहुलची साथ मिळाली . विजयनेही शतकी खेळी करत भारतीय फलंदाजीचे वर्चस्व राखले . अफगाणिस्तानचे मुख्य अस्त्र ठरलेल्या रशिदला 26 षटकांत 120 धावांचे मोल मोजावे लागले . अखेरच्या सत्रात मात्र भारतीयांच्या विकेट झटपट पडल्या . विजय , राहुल , पुजारा , दिनेश कार्तिक झटपट बाद झाल्याने 1 बाद 280 धावसंख्येवरून खेळ संपताना भारताला 6 बाद 347 धावांपर्यंत पोचता आले . खेळ थांबला तेव्हा अश्विन आणि हार्दिक पंड्या खेळत होते . संक्षिप्त धावफलक : भारत पहिला डाव 78 षटकांत 6 बाद 347 ( शिखर धवन 107 , मुरली विजय 105 , लोकेश राहुल 54 , चेतेश्वर पुजारा 35 , यामिन अहमदझाई 2 - 32 )
2
अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर जवळपास २७ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत . त्यांच्या आगामी ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे . ‘बच्चे की जान’ या गाण्यात बिग बी आणि ऋषी कपूर यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे . अमिताभ बच्चन यात वडिल्यांच्या भूमिकेत असून , ऋषी कपूर ७५ वर्षांच्या मुलाची भूमिका साकारत आहेत . अरिजीत सिंगच्या आवाजातील या मजेशीर गाण्यात बिग बी आपल्या मुलाला म्हणजेच ऋषी कपूर यांना पत्नीला प्रेमपत्र लिहिण्यास सांगतात . हेच प्रेमपत्र लिहिताना ऋषी कपूर यांची कशी दमछाक होते आणि त्याचा बिग बी कसा आनंद लुटतात , हे गमतीशीर पद्धतीने या गाण्यात दाखवण्यात आलं आहे . वाचा : ‘हम साथ साथ है’मधील सलमानच्या सहकलाकाराला बिष्णोई समाजाकडून जीवे मारण्याच्या धमक्या ‘१०२ नॉट आऊट’च्या ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहता प्रेक्षकांसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने परवणी ठरणार आहे असंच म्हणावं लागेल . उमेश शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाला असणारी विनोदी झाक आणि या दोन्ही कलाकारांचा दमदार अभिनय ही चित्रपटाच्या दृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे . वडिल आणि मुलाच्या हटके नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट ४ मे ला प्रदर्शित होणार आहे .
0
भारताने जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद पटकावले . अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पिछाडीवरून थरारक विजय मिळविला . पंकजचे हे कारकिर्दीतील १९वे जागतिक विजेतेपद ठरले . पंकज अडवानी आणि मनन चंद्रा यांच्या संघाने हे यश साकार केले . सर्वोत्तम पाच फ्रेमच्या लढतीत भारताने पहिल्या दोन फ्रेम गमावल्या होत्या . त्यानंतरही भारत तिसऱ्या फ्रेममध्ये ० - ३० असा पिछाडीवर होता . त्यानंतर मनन याने ३९ गुणांचा उपयुक्त ब्रेक नोंदविला . चौथ्या फ्रेममध्ये मग पंकजने लौकिकाला साजेसा खेळ केला . बाबर मसीह याच्याविरुद्ध तो १ - २० अशा पिछाडीवर होता . मग त्याने टेबल क्लिअरींगचा धडाका लावत ६९ गुणांचा ब्रेक मिळविला . पंकजने ही फ्रेम जिंकल्यामुळे बरोबरी निर्माण झाली . यानंतर मनन आणि महंमद असिफ यांच्यातील फ्रेमला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले . त्यात मननला आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी हिरव्या चेंडूची गरज होती , तर असिफला अशक्यप्राय कोनातून तपकिरी चेंडू पॉट करायचा होता . ते शक्य नसल्यामुळे त्याने पराभव मान्य केला . भारताने उपांत्य फेरीत इराणला ३ - २ , उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडला २ - १ , तर बाद फेरीत चीनला ३ - २ असे हरविले होते . त्याआधी ब गटात भारताने आइसलॅंड आणि आयर्लंड २ या संघांना हरविले होते . आम्ही ० - २ असे पिछाडीवर पडल्यामुळे पाकिस्तानचे पारडे जड झाले होते . आम्हाला विजयाची किंचितच संधी होती , पण दुहेरीतील विजयासह आम्ही आशा पल्लवित केल्या . आता आमच्या वैयक्तिक प्रयत्नांवर सारे काही अवलंबून होते . मनन याने उपांत्य आणि अंतिम फेरीत निर्णायक फ्रेममध्ये अप्रतिम खेळ केला . मला त्याच्या पहिल्या जागतिक विजेतेपदाचा आनंद वाटतो . - पंकज अडवानी बाबर मसीह २४ - ७३ . पंकज अडवानी पराभूत वि . महंमद असिफ ५६ - ६१ . मनन - पंकज विवि बाबर - महंमद ७२ - ४७ . पंकज विवि बाबर १०६ - २० . मनन विवि महंमद ५६ - २०
2
मोबाईल हा सध्या आपल्या सगळ्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग झाला आहे . झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतांश कामांसाठी आपल्याला मोबाईल लागतो . अनेकदा काही महत्त्वाचे काम असले की हा फोन अचानक खूप स्लो काम करतो , मधेच हँग होतो . अशावेळी आपली बरीच चिडचिडही होते , पण ही चिडचिड टाळण्यासाठी आधीपासूनच काळजी घेतल्यास फायद्याचे ठरते . आता फोन स्लो होऊ नये म्हणून नेमके काय करावे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे . त्यामुळे आपण काही सोप्या युक्त्या पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा फोन सारखा स्लो होणार नाही आणि घाईच्या वेळी कामात अडचणी येणार नाहीत . जाहिरातींपासून सुटका करुन घ्या जाहिरातींनी हा आपल्या आयुष्यातील मोठा भाग व्यापला आहे . विविध माध्यमांतून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती अगदी सामान्य झाल्या आहेत . आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्येही हल्ली सतत विविध जाहिराती येत असतात . स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या या जाहिराती आपल्याला अनेकदा नकोशा होतात . प्रमाणापेक्षा जास्त जाहिराती येत असतील तर तुमचा फोन हँग होण्याची शक्यता असते . तसेच एखादे काम करताना मधेच जाहिरात आली तरीही नको होते . अशावेळी फोनमध्ये एक विशेष सेटींगची सविधा असते जी केल्यामुळे जाहिरातींपासून सुरक्षित राहता येईल . Settings > Google > Ads > Opt out of Ads Personalization ला ऑन करा . यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर येणाऱ्या अॅड्स दिसणार नाहीत . व्हॉटसअॅप आणि इतर मेमरी डिलीट करत राहा आपण व्हॉटसअॅप सध्या मोठ्या प्रमाणावर वापरतो . कधी ऑफीसच्या कामासाठी तर कधी वैयक्तिक वापरासाठी वापरले जाणारे हे अॅप्लिकेशन जास्त मेसेजेसमुळे मर्यादेपेक्षा जास्त मेमरी वापरते . यामध्ये येणारे फोटो , व्हिडियो आणि इतरही अनेक फाईल्स यामुळे फोन स्लो होऊ शकतो . त्यामुळे व्हॉटसअॅप किंवा इतरही सोशल नेटवर्किंगसाठी वापरली जाणारी अॅप्लिकेशन्स वेळच्य़ा वेळी क्लिन करा . त्यामुळे फोनमधील इतर गोष्टी वेगाने चालण्यास सुरुवात होईल . व्हायरसपासून बचाव करा व्हायरस हा लॅपटॉप किंवा स्मार्टफोनसाठी अजिबात चांगला नसतो . स्मार्टफोनमध्ये एखादा व्हायरस गेल्यास हे डिव्हाईस कधी बंद पडते तर कधी स्लो होते . आपण अनेकदा मोबाईल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपला जोडत असतो . त्यावेळी किंवा कोणाकडून काही डेटा ट्रान्सफर करुन घेताना आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस जाण्याची शक्यता असते . अशावेळी आपण मोबाईलचा व्हायरसपासून बचाव करायला हवा . नाहीतर फोन वारंवार हँग होण्याची शक्यता असते . यासाठी Settings > Google > Security > Google Play Protect > Turn on या क्रमाने सेटींग्जमध्ये बदल करा .
1
बरेच पोस्टर आणि बहुविध चर्चा रंगल्यानंतर नुकताच बहुप्रतिक्षित ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे . धर्मा प्रॉडक्शनच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा टिझर शेअर करण्यात आला असून , काही क्षणांतच हा टिझर चर्चेत आला आहे . अवघ्या १३ सेकंदांच्या या टिझरमध्ये अभिनेता प्रभास दिसतो . टिझरमध्ये अभिनेता प्रभासच्या डोक्यातून रक्ताचा ओघळ वाहताना दिसत असून , त्याच्या डोळ्यात दाहक भाव पाहायला मिळत आहे . ‘बाहुबली - द कन्क्लूजन’ या चित्रपटासाठी अभिनेता प्रभाससह चित्रपटाच्या संपूर्ण चमूनेच प्रचंड मेहनत घेतली होती . त्यामुळे आता त्यांची इतक्या वर्षांची मेहनत या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाच्या रुपात फळास येणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे . तूर्तास गेल्या दोन दिवसांमध्ये मनोरंजन विश्वामध्ये बाहुबली या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्याच चर्चा रंगल्याचे दिसत आहे . चित्रपटाच्या दोन पोस्टर्समागोमाग आता टिझर लाँच झाल्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी आता सर्वांचेच लक्ष १६ तारखेकडे लागले आहे . एस . एस . राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाबद्दलच्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे . या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली लोकप्रियता पाहता आता प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाहुबलीचा चमू तयार झाला आहे . काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये एस . एस . राजामौली यांनी चित्रपटाबद्दलची माहिती दिली होती . ‘या चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये पात्रांची फक्त ओळखच होती , असे म्हणायला हरकत नाही . पण , चित्रपटाचा दुसरा भागच मूळ कथा सांगणार आहे’ , असे ते म्हणाले होते . बाहुबली २ या चित्रपटामध्ये अभिनेता प्रभास , राणा डग्गुबती , तमन्ना भाटीया , अनुष्का शेट्टी , राम्या कृष्णन आणि सत्यराज या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत . त्यामुळे या सर्व पात्रांच्या भूमिका आणि कटप्पाने बाहुबलीला का मारले , या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अनेकजण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहात आहेत . सध्या ‘बाहुबली - द कन्क्ल्यूजन’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांप्रमाणेच चित्रपटाशी संलग्न प्रत्येक व्यक्ती उत्सुक असून , चित्रपटाला घवघवीत यश मिळावे , अशीच अपेक्षा सर्वजण करत आहेत . त्यामुळे आता राजामौलींचा हा महत्वाकांक्षी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .
0
गेल्या आठवड्यात Oppo कंपनीने भारतीय बाजारात आपली सब - ब्रँड कंपनी Realme चा नवा फोन Realme 2 लॉन्च केला होता . आज पहिल्यांदाच या फोनचा सेल आयोजीत करण्यात आला आहे . दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा सेल सुरू होत आहे . पहिलाच सेल असल्याने कंपनीने या फोनवर अनेक आकर्षक ऑफरही देऊ केल्या आहेत . हा फोन एचडीएफसी बँक डेबिट / क्रेडिट कार्ड यूजर्सना ७५० रुपयांच्या डिस्काऊंटसह मिळणार आहे . याशिवाय एक्स्चेंज ऑफरनुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला पाचशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल . तर , रिलायन्स जिओकडून या फोनसाठी 2200 रुपयांची कॅशबॅक ऑफऱ आहे . तसंच पेटीएमकडूनही 2200 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहेत . नो - कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील ग्राहकांना देण्यात आला आहे . फुल एचडी नॉच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 6.2 इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे . आयफोन X प्रमाणे हा डिस्प्ले देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे . या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा , स्लिम डिझाईन , गोरिल्ला ग्लास , तगडी बॅटरी , पोर्ट्रेट मोड , यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत . Realme 1 हा फोन आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध असून या फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने Realme 2 लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता . Realme 2 हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे . 4 सप्टेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल . केवळ फ्लिपकार्टवरुनच ग्राहकांना हा फोन खरेदी करता येईल . या फोनच्या 3 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 990 रुपये तर 4 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये आहे . या फोनमध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर 450 प्रोसेसर असून याच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि पुढील बाजूला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे , याशिवाय 4230mAh ची तगडी बॅटरी फोनमध्ये आहे .
1
‘माव्र्हल’ कंपनीला गेल्या काही वर्षांत सातत्याने मिळणाऱ्या यशामागे अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे . त्यामुळे त्याने साकारलेला ‘टोनी स्टार्क’ ऊर्फ ‘आयर्न मॅन’ हा सुपरहिरो त्यांच्याकडे असलेला हुकमाचा एक्का असे म्हटले जात आहे . या सुपरहिरोची संपूर्ण ताकद त्याच्या ‘आयर्न सूट’मध्ये आहे आणि आश्चर्याची बाब म्हणजे आता तो सूटच चोरीला गेला आहे . ‘एमसीयू’ ( माव्र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स ) वस्तुसंग्रहालयातून २५ एप्रिलच्या आसपास सूट चोरीला गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे . दहा वर्षांपूर्वी १ लाख अमेरिकी डॉलर खर्च करून स्टॅन विन्स्टन यांनी तयार केलेला हा सूट ‘आयर्न मॅन’ चित्रपटमालिकेच्या पहिल्या भागात वापरला गेला होता . दिग्दर्शक केनेथ ब्रेनग यांच्या मते आज बाजारात या सूटची किंमत तब्बल ३ लाख २५ हजार अमेरिकी डॉलर आहे . माव्र्हल सुपरहिरोंनी वापरलेले सर्व साहित्य एखाद्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाप्रमाणे त्यांच्या एका खास वस्तुसंग्रहालयात ठेवले जाते . हा आयर्न सूटही तेथेच संग्रहित करून ठेवला गेला होता . परंतु आश्चर्याची बाब म्हणजे शेकडो सीसीटीव्हींची नजर चुकवून तो चोरीला गेला . चोरी लक्षात येताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेचच पोलीस तक्रार केली . तसेच पोलिसांनीही तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत तातडीने आपले तपासकार्य सुरू केले . सीसीटीव्ही कॅमेरा , अद्ययावत सुरक्षा प्रणाली आणि शेकडो सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून सूट चोरी झालाच कसा ? , हा प्रश्न पोलिसांना सतावतो आहे . तसेच ‘माव्र्हल’नेही या शोधकार्यासाठी काही गुप्तहेरांची नेमणूक केली असून आयर्न सूट शोधून देणाऱ्यास हजारो डॉलर्सचे इनाम जाहीर केले आहे . ‘माव्र्हल’साठी तो एक केवळ सुपरहिरो सूट नाही तर त्यांच्या वस्तुसंग्रहालयातील एक खास आकर्षणदेखील आहे . त्यामुळे लाखो चाहत्यांच्या भावना या सूटशी जोडल्या गेल्या आहेत . शिवाय २००७ साली जेव्हा ‘माव्र्हल’ कंपनी कर्जबाजारी झाली होती . त्या वेळी हा आयर्न मॅन सूटच होता ज्याने त्यांना पुन्हा एकदा यशाची इमारत रचण्यास मदत केली . त्यामुळे हा सुपरहिरो सूट म्हणजे त्यांच्या यशाची गुरुकिल्लीच आहे , असे म्हटले जाते . आणि म्हणूनच या सूटची किंमत त्यांच्यासाठी काही डॉलर्सपेक्षा जास्त आहे .
0
धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी धोक्याचे असते हे आपल्यातील अनेकांना माहित आहे . मात्र धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास वावरणेही धोक्याचे असते हे लक्षात घ्यायला हवे . जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले . सिगारेट ओढणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग , सीओपीडी , काळा दमा होण्याचा धोका जास्त असतो . मात्र याबरोबरच धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या आसपास असणाऱ्यांनाही त्या धुराने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते . यालाच पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हटले जाते . सिगारेट , सिगार आणि पाईप यांच्यातून येणारा धूर श्वासाद्वारे शरीरात गेला की त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो . त्यामुळे तुम्ही जास्त काळ धुम्रपान कऱणाऱ्या लोकांमध्ये वावरत असाल तर वेळीच सावध व्हा . ठळकपणे समोर येणारी आकडेवारी – धुम्रपानात असणारे जवळपास ४ हजार रासायनिक पदार्थ आणि १५० टॉक्सिन्स शरीरासाठी अतिशय घातक असतात . – २ महिने ते ५ वर्षे वयाच्या मुलांमधील ३८ टक्के मुले धुम्रपानातून निघणाऱ्या धुराच्या संपर्कात येतात . – या धुरामुळे लहान वयात दमा , डोळ्यांचे त्रास , घशाचा संसर्ग , सर्दी - खोकला होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते . – धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या पत्नीमध्ये हृदयाशी निगडीत तक्रारी , सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते . – जगात दरवर्षी ७० लाख लोक तर भारतात दररोज २७३९ लोक धुम्रपानामुळे आपले प्राण गमावतात . यामध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असते . पॅसिव्ह स्मोकिंगमुळे उद्भवणाऱ्या तक्रारी – घसा , स्वरयंत्र , सायनसेस , मेंदू , मूत्राशय , जठर , गुदाशय , स्तन या महत्वाच्या अवयवांचे कर्करोग होतात . – हृदय आणि रक्तवाहिन्यांवर विपरित परिणाम होऊन हृदयविकाराचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो . – पॅसिव्ह स्मोकिंगमुळे कमालीचे मानसिक नैराश्यही येऊ शकते . – लहान मुले सतत आजारी पडू लागतात . त्यांना सर्दी , खोकला , दमा , कान फुटणे असे साधे आणि दमा , ब्रॉन्कायटिस , न्युमोनियासारखे श्वसनाचे गंभीर आजार होण्याची शक्यता असते . – सिगारेटच्या धुरामुळे या मुलांना दम्याचा अॅटॅक येऊ शकतो . या मुलांना लिम्फोमा , रक्ताचा कर्करोग , मेंदूचे ट्युमर्स तसेच यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात . – नवजात अर्भकाचा सिगारेटच्या धुराने श्वास गुदमरून अचानक मृत्यू होऊ शकतो , याला ‘सडन इन्फंट डेथ सिंड्रोम’ म्हणतात .
1
१२ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘रुस्तम’ या चित्रपटाबद्दल सध्या सिनेरसिकांसह कलाकारांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे . अनेक कलाकारांनी ‘रुस्तम’ या चित्रपटाला त्यांच्या परीने शुभेच्छा दिल्या आहेत . त्यातच आता एका मोठ्या कलाकाराचीही भर पडली आहे . कबाली स्टार रजनीकांत यांनीही अक्षय कुमारला त्याच्या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन या शुभेच्छा दिल्या आहेत . टिनू सुरेश देसाईच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘रुस्तम’ या चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच एका नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे . ‘रुस्तम’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेरसिकांना १९५९ च्या काळतील बहुचर्चित नानावटी केसचा थरारक काळ अनुभवता येणार आहे . या चित्रपटात अक्षय कुमार , इलियाना डिक्रूज , एशा गुप्ता , अर्जन बाजवा , परमीत सेठी हे कलाकार झळकणार आहेत . कलाकारांची मांदीयाळी , थरारक कथानक आणि प्रभावी संगीत अशी सांगड घालत खिलाडी कुमारचा ‘रुस्तम’ प्रेक्षकांच्या भेटासाठी सज्ज झाला आहे . काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘कबाली’ या चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवरही फार गाजला होता . अनेक चित्रपटांचे विक्रम मोडित काढत सुपरस्टार रजनीच्या ‘कबाली’ने बाजी मारल्यामुळे या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती .
0
पचनसंस्थेच्या अडचणी असण्याची अनेक कारणे आहेत . योगशास्त्रात बहुतांश शारीरिक समस्यांवर आसनांव्दारे उत्तम उपाय करता येतात . शयनस्थितीतील हे आसन म्हणजे हलासनाची प्रगत अवस्था होय . यामध्ये गुडघे कानाशेजारी येतात , म्हणून याला कर्णपीडासन म्हणतात . प्रथम शयनस्थितीत जावे मग श्वास घेत घेत दोन्ही पाय काटकोनात जमिनीपासून वर उचलावे . मग श्वास सोडत कंबर वर उचलावी , पाय डोक्यावरून मागे नेऊन तरंगते ठेवावे . यावेळी तोल सांभाळता आला पाहिजे . आता श्वास पूर्ण सोडावा . दोन्ही पाय आणखी खाली नेऊन दोन्ही पायांचे अंगठे जमिनीला टेकवावे . चवडे मागच्या दिशेला ताणावे . श्वसन संथ चालू ठेवावे . त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून कानांच्या शेजारी जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा . हे आसन एकदम जमत नाही , मात्र सरावाने उत्तम जमू शकते . कालावधी तीस सेकंदापर्यंत तरी ठेवता आला पाहिजे . ज्यावेळी आपण गुडघे जमिनीला टेकवतो तेव्हा शरीरातील अनावश्यक ताण कमी करावा . तरच स्थिरता येईल व जास्त काळ टिकवता येईल . म्हणूनच तज्ज्ञ योगशिक्षकाच्या मदतीने कर्णपीडासन करावे . आसन सोडताना प्रथम पाय गुडघ्यात सरळ करून मागच्या दिशेने ताणून घ्यावेत . श्वास सोडावा , श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवावेत . श्वास घेतच पाठीचा कणा सावकाश जमिनीवर टेकवावा . द्विपाद उत्तानपादासनात यावे . श्वास सोडत पाय जमिनीवर टेकवावे . आसनाने दमल्यासारखे झाले तर लगेचच शवासनात जावे . पायांचे चवडे ताणलेले असतात . त्यामुळे नखे जमिनीला टेकणे आवश्यक आहे . या आसनात जालंदर बंध बांधला जातो . पाठीच्या कण्याची घडी होते . पाठीच्या कण्याला योग्य व्यायाम मिळतो . पोटातील स्नायूंचे कार्य सुधारते व पचनेंद्रीयावर हलका दाब येतो . मात्र या आसनामुळे हातपाय कणखर होतात . काही वेळा गुडघे जमिनीवर टेकवता येत नाहीत , जास्त ताकद लागते . अशावेळी ओढाताण करून गुडघे टेकवू नये तर सराव वाढवत न्यावा . पाठीच्या कण्याचे विकार असलेल्यांनी हे आसन करू नये . आसन जमू लागताच पाठीच्या कण्याला , गुडघ्यांना , पोटातील ग्रंथींना फायदा होतो . आसन करताना सावकाश करावे . मूत्रपिंडाचे विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये . आतडय़ाला सूज आलेली असेल , यकृताचे विकार असतील तर आसन टाळावे . कंबरेतील उखळीच्या सांध्यावर दाब येतो . झेपेल त्यांनीच हा ताण सहन करावा . स्थिरतेबाबत सरावाने आसनाची सुखकारकता वाढेल . तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करावे . सुजाता गानू - टिकेकर , योगतज्ज्ञ
1
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांची भावना रंगभूमी आणि चित्रपटांमधून काम करीत असताना रसिकांनी सदैव दाद आणि प्रोत्साहन दिले . रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळेच इथवर पोहोचले , अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी बुधवारी व्यक्त केली . कलासंस्कृती परिवारतर्फे आयोजित स्टार ऑफस्क्रीन पुरस्कार सोहळ्यात सुलोचना दीदींना कलाकृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . या वेळी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले . ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त , प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ , चारुदत्त सरपोतदार , सुधीर मांडके , कलासंस्कृती परिवारचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले या वेळी उपस्थित होते . गुरु भालजी पेंढारकर आणि रसिकांची मी आभारी आहे , त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हा टप्पा गाठता आला , असेही सुलोचनादीदींनी सांगितले . मी कामगार आहे , मला फक्त काम करता येते , बोलता नाही . ‘तोंड बंद , कान खुले आणि काम सुरू’ हाच माझ्या कामाचा फंडा अशी सुरूवात करीत जॅकी श्रॉफ म्हणाले , की पडद्यामागील मंडळींमुळेच माझ्यासारखे कलाकार मोठे होतात . जात - पात न मानता सर्वाचा सन्मान करा आणि आई - वडिलांची सेवा करा . झगमगत्या रुपेरी पडद्यामागील अनिल शेलार , बाळू शेलार , बाळू भोकरे , अमित इंगळकर , विठ्ठल सलगर , चंद्रकांत भंडारी , जगदीश जगदाळे या सहायक तंत्रज्ञ , स्पॉट बॉय , सेट बॉय , प्रकाशयोजना , वेशभूषा , प्रॉडक्शन आर्टिस्ट आदी विभागातील कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह , पुस्तके आणि दोन लाख रुपयांच्या विम्याची कागदपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . बाबा शिंदे , तन्मय पेंडसे , विवेक दामले , भारत कुमावत , प्रवीण जोशी यांना समाजसंस्कृती पुरस्कार आणि यशवंत भुवड , शिवानंद आक्के यांना निकोप पुरस्काराने गौरविण्यात आले .
0
OnePlus 6T या बहुचर्चित स्मार्टफोनचं थंडर पर्पल एडिशन भारतात लाँच झालं आहे . कंपनीकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे . काही दिवसांपूर्वीच हे एडिशन चीनमध्ये लाँच करण्यात आलं होतं . भारतात 16 नोव्हेंबरपासून अॅमेझॉन , वन प्लसचं अधिकृत संकेतस्थळ , रिलायंस डिजीटल आणि क्रोमा स्टोअर्समध्ये हे स्पेशल एडिशन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे . थंडर पर्पल एडिशन दिसण्यास अत्यंत आकर्षक असून याचं डिझाइन उत्तम आहे . OnePlus 6T च्या या स्पेशल एडिशनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आलं असून याची किंमत 41 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे . या नव्या एडिशनमुळे आता हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक , मिरर ब्लॅक आणि थंडर पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे . वन प्लस 6Tच्या बेसिक व्हेरिअंटची म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 37 हजार 999 रुपये आहे . टॉप व्हेरिअंटची म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 45 हजार 999 रुपये आणि मध्यम व्हेरिअंट म्हणजेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्याची किंमत 41 हजार 999 रुपये आहे , आणि आता याच किंमतीत थंडर पर्पल एडिशनही उपलब्ध असणार आहे . फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स – वन प्लसच्या या नवीन फोनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फोनच्या ६ . ४ इंच स्क्रीनवर असलेला वॉटरड्रॉप स्टाइलचा नॉच . वन प्लसच्या युझर्सने दिलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे . फोनला ६ . ४ इंचाची फूल एचडी ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे . हा फोन क्वॉलकोम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरवर हा फोन काम करेल . फोनमध्ये ६ जीबी तसेच ८ जीबी रॅमचा आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी इंटरनल मेमरी असे दोन पर्याय देण्यात आले आहेत . या फोनचे बेसिक व्हेरिअंट कंपनीच्या आधीच्या फोनप्रमाणे ६४ जीबी इंटरनल मेमरी ऐवजी थेट १२८ जीबी इंटरनल मेमरीपासून सुरु होईल . वन प्लस सिक्स टीमध्ये तीन कॅमेरा असतील असा अंदाज बांधला जात होता . मात्र फोनमध्ये केवळ दोनच कॅमेरा असतील असे कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये स्पष्ट केले आङे . रेअर कॅमेरा हा २० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स३७६के सेन्सर्स असणार असेल तर फ्रण्ट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स५१९ सेन्सर्सचा असेल . फोनमध्ये स्टुडिओ लायटनिंग आणि नाईट्स्केप हे दोन नवीन फिचर्स देण्यात आले आहेत . पोर्टेट मोडमध्ये एखाद्या व्यक्तीचा फोटो काढताना त्याच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश किती असावा हे स्टुडीओ लायटिंगच्या मदतीने ठरवता येईल तर कमी प्रकाशात फोटो काढताना म्हणजेच एचडीआर मोडच्या मदतीने अगदी दोन सेकंदात फोटो काढण्यासाठी नाईट्स्केप फिचर वापरता येईल . फोनमध्ये ३७०० एमएएचची बॅटरी आहे . कंपनीचा सध्याचा प्लॅगशिप फोन असणाऱ्या वन प्लस सिक्सच्या बॅटरीपेक्षा ही बॅटरी ३७ टक्क्यांनी जास्त शक्तीशाली आहे . गेम खेळणाऱ्यांसाठी हा फोन खास असेल कारण यामध्ये स्टेबिलायझर म्हणजे फोनमधील ग्राफिक्स स्थिर राहण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे . हा फोन अॅण्ड्रॉइड ९ पायवर काम करेल . या फोनमध्ये स्मार्ट बुस्टर हे विशेष फिचर उपलब्ध करुन देण्यात आले असून यामुळे मोबाइलच्या रॅम तसेच रॉमवर पडणारा ताण कमी करुन बुटिंगसाठी लागणारा वेळ कमी करता येईल . फोनला एनएफसी आणि फोर जी व्होल्ट कनेक्टीव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत .
1
बॉलिवूड निर्माता - दिग्दर्शक करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये तारे - तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली . ‘केजो’च्या बर्थडे बॅशला त्याला शुभेच्छा देण्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती . ऐश्वर्या राय बच्चन , रणबीर कपूर , अनुष्का शर्मा , कतरिना कैफ , अक्षय कुमार , ट्विंकल खन्ना , सिद्धार्थ मल्होत्रा , आलिया भट्ट आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित होते . छायाचित्रकारांना यापैकी जवळपास सर्वच कलाकारांचे फोटो काढण्याची संधी मिळाली . वाचा : प्रेमासाठी मुस्लिम धर्म स्वीकारणारे बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरदेखील उपस्थित होती . अनेक तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही भावी अभिनेत्री मात्र या पार्टीत एका खास व्यक्तीच्या मागे लागली होती . ‘पिंकविला’ वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार , पार्टी संपेपर्यंत जान्हवी बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूर याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होती . पण , रणबीर मात्र ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटातील त्याचा सहकलाकार आदित्य रॉय कपूर आणि ‘ऐ जवानी है’ मधील अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासोबत गप्पा मारण्यात रमला होता . रणबीरचे लक्ष वेधण्यात गुंतलेली जान्हवी यावेळी सावत्र भाऊ अर्जुन कपूरपासून चार हात दूरच राहत होती . वाचा : सारा अली खान - आर्यनसोबत शाहरुखचा ‘सेलिब्रेशन मोड ऑन’ काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुनने सावत्र बहिणींशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते . अर्जुन म्हणालेला की , ‘मी जान्हवी आणि खुशीला कधी भेटत नाही आणि त्यांच्यासोबत वेळही घालवत नाही . त्यांचं माझ्या आयुष्यात काहीही स्थान नाही . ’ जेव्हा अर्जुनचे आई - वडील वेगळे झाले होते तेव्हा अर्जुन फक्त ११ वर्षांचा होता . त्यांच्या घटस्फोटाचा गंभीर परिणाम अर्जुनच्या आयुष्यावर पडला होता .
0
चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ जाहीर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार देशांच्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ड्रॅग - फ्लिकर व्ही . आर . रघुनाथकडे सोपवण्यात आले आहे . कर्णधार व गोलरक्षक पी . आर . श्रीजेशला दुखापत झाल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे . आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेच्या वेळी रघुनाथला विश्रांती देण्यात आली होती . श्रीजेश हा गुडघ्याच्या दुखापतीमधून तंदुरुस्त झालेला नाही . त्याच्याऐवजी गोलरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्राचा खेळाडू आकाश चिकटे तसेच उत्तर प्रदेशचा अभिनवकुमार पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे . आकाशने नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात नेत्रदीपक गोलरक्षण करीत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता . संघातील आणखी एक ड्रॅग - फ्लिकर रुपिंदरपाल सिंग याच्याकडे ऑस्ट्रेलियातील स्पर्धेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे . श्रीजेश याच्याबरोबरच एस . व्ही . सुनील व रमणदीप सिंग यांनाही दुखापतीच्या कारणास्तव संघात स्थान मिळू शकले नाही . श्रीजेश व सुनील यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या क्रीडा वैद्यक केंद्रात उपचारांसाठी ठेवण्यात आले आहे . मध्यरक्षक मनप्रीतसिंग व सेंटर फॉरवर्ड आकाशदीप सिंग यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे . ऑस्ट्रेलिया व भारत यांच्याबरोबरच मलेशिया व न्यूझीलंड यांचा या स्पर्धेत समावेश असून २३ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेला प्रारंभ होईल . भारतीय संघ
2
पावसाळा आला की ठिकठिकाणी साचणारे पाणी , त्यात होणारे डास आणि माश्या तसेच गढूळ पाणी यांमुळे सर्वच वयोगटात विविध आजार व्हायला सुरुवात होते . कधी नुसत्या ताप आणि सर्दीवर निभावते अन्यथा संसर्गजन्य आजार होतात . हे आजार दिर्घकाळ सुरु राहतात तसेच त्यावर योग्य ते उपचार घेणेही आवश्यक असते . त्यामुळे पावसाळ्यात आजारांपासून स्वतःची सुटका करुन घ्यायची असेल तर योग्य वेळी योग्य ते उपाय करायलाच हवेत . तसेच आजारांची लक्षणे , उपचार याबाबत पुरेशी माहितीही असायला हवी . जाणून घेऊया अशाच काही आजारांविषयी… स्वाईन फ्लू - ढगाळ हवामान असेल आणि हवामानाच्या कमाल आणि किमान तापमानात खूप फरक असेल एच् १ एन् १ आणि इन्फ़्लुएन्झा जातीच्या इतर विषाणूंचा संसर्ग होऊन स्वाईन - फ्लूची लागण सुरू होते . श्वसनाचे आजार - पावसाळ्यातल्या सर्दी खोकल्याचे रुपांतर अनेकदा ब्राँकायटिस , अस्थमा , न्युमोनिया , सीओपीडी अशा गंभीर आजारांमध्ये होते . अशा केसमध्ये रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून उच्च दर्जाची औषधे आणि प्राणवायूदेखील लावावा लागतो . मलेरिया - पाऊस पडून गेला की जागोजागी पाणी साचून डबकी तयार होतात . त्यात तयार होणाऱ्या अॅनॉफेलिस डासांद्वारे मलेरिया फैलावतो . थंडी वाजून ताप येणे , हिमोग्लोबिन कमी होऊन कावीळ होणे ही लक्षणे दिसतात . मलेरियाच्या एका प्रकारात हा आजार मेंदूमध्ये शिरून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो . डेंगी - पावसात साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या एडीस इजिप्ती नावाच्या डासांमुळे हा होतो . डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात . या आजारात खूप ताप येतो , प्रमाणाबाहेर डोके दुखते , हातापायांचे सांधे , हाडे खूप दुखतात आणि महत्वाचे म्हणजे शरीरावर विशेषतः पाठीवर एक बारीक लालसर , न खाजणारी पुरळ येते . रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात . लघवी , शौच , थुंकीमधून तसेच शरीरांतर्गत रक्तस्त्राव होतो . यामध्ये रुग्णाची परिस्थिती अतिशय गंभीर होऊन तो दगावू शकतो . चिकुनगुनिया - हा विषाणू हा एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो . यात दोन - तीन दिवस ताप येतो , डोके दुखते , अंगावर विशेषतः पाठ , पोट , कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात . हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते . पायांचे घोटे , गुडघे , तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो . साधे चालणे , पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते . आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात - पाय दुखणे सुरूच राहते . उपचार – पावसाळ्यात शक्यतो भिजणे टाळावे . रेनकोट , टोपी , छत्री , किमान पावसाळी जाकिट आणि टोपी तरी वापरावी . पावसात भिजल्यास लगेच अंग कोरडे करून पूर्ण वाळलेले स्वच्छ कपडे घालावेत . केस पूर्णतः कोरडे करावेत , लांब केस असलेल्या महिलांनी व मुलामुलींनी ही खबरदारी घ्यावी . खूप वेळ पावसात भिजून , अंगावर चिखल उडाला असल्यास गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी . चिखलाने भिजलेले कपडे वेगळ्या बादलीतल्या पाण्यात भिजायला टाकावेत आणि त्यात डेटॉल किंवा सॅव्हलॉनसारख्या जंतूनाशक औषधाचे दोन चमचे न विसरता टाकावेत . चिखलातील काही कृमी किंवा जंतू इतर कपड्यात जाऊ नये यासाठी ही काळजी घेणे अत्यावश्यक असते . सर्दी खोकला झाल्यावर गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात . शक्यतो थंड पदार्थ , थंड पेये , ज्यूस घेऊ नयेत . कडक ताप असल्यास किंवा खोकला सर्दी २ - ४ दिवसात कमी न झाल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला वेळ लावू नका . डॉ . अविनाश भोंडवे फॅमिली फिजिशियन
1
कोनॉर मेकग्रेगर आणि फ्लॉयड मेवेदर यांच्यात झालेला मिक्स्ड मार्शल आर्ट्स प्रकारातील सामना सर्वाधिक लक्षवेधी ठरला . सोशल मीडियापासून ते अगदी चित्रपट वर्तुळातही याच सामन्याची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं . मेवेदरने या रोमांचक सामन्यात काही अफलातून तंत्र वापरत मेकग्रेगरवर मात केली . टी - मोबाईल अरिना लास वेगस येथे पार पडलेल्या या सामन्यासाठी प्रत्यक्षदर्शींसोबतच बॉलिवूडकरही तितकेच उत्साही होते . या सामन्याचे लाइव्ह अपडेट्सही काही सेलिब्रिटींनी पोस्ट करत एका वेगळ्या मार्गाने सामन्याचा आनंद घेतला . सुशांत सिंग राजपूतपासून ते सुश्मिता सेनपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी ट्विटर अकाऊंटवरुन या सामन्याच्या अपडेट्स शेअर केल्या . सामन्याची जितकी चर्चा झाली होती तितकाच तो रंजक होणार अशीच अनेकांची अपेक्षा होती , तसं झालंही . पण , अभिनेता अर्जुन रामपालला मात्र हे फार काही रुचलं नाही . त्याने केलेलं ट्विट पाहूनच त्याची निराशा झाल्याचं लक्षात येत होतं . न्यूयॉर्कमध्ये असलेल्या अर्जुनने सामना पाहिल्यानंतर ट्विटमध्ये लिहिलं , ‘आताच मी सामना पाहिला . हे सर्व फक्त पैशांसाठी केलं गेलंय . ’ या ट्विटमध्ये त्याने # sad # saddayforboxing असे हॅशटॅगही वापरले . वाचा : ‘चक दे ! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का ? एकट्या अर्जुनचं ट्विट वगळता जवळपास इतर सर्वच सेलिब्रिटींचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळालं . या दोन खेळाडूंपैकी हा सामना कोण जिंकणार… , असा प्रश्न सुशांत सिंग राजपूतने त्याच्या ट्विटमधून विचारला . सुश्मिता सेननेही या सामन्यातील काही क्षणांचं वर्णन तिच्या ट्विटमध्ये करत दोन्ही खेळाडूंची प्रशंसा केली . या कलाकारांव्यतिरिक्त व्हीजे बानी , गायक शान , अतुल कसबेकर यांच्याही ट्विटर अकाऊंटवर या सुपर सिजलिंग सामन्याच्या अपडेट्स पाहायला मिळाल्या . दरम्यान , या सर्वात मोठ्या सामन्यावर जवळपास तीस हजार कोटींचा सट्टाही लागला होता . मेवेदर आणि मेगग्रेगर या दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेला हा सामना ट्विटर आणि इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवरही ट्रेंडमध्ये आला असून , अनेकजण त्यासंबंधीचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत आहेत .
0
कोहली , जडेजाचे मानांकन उंचावले एका आठवड्यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी मानांकनांतील स्थान उंचावले आहे . आठवड्यापूर्वी चौथ्या स्थानावर असणारा कोहली नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे . कोहलीबराबेरच रवींद्र जडेजा याचेही मानांकन उंचावले आहे . इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आला आहे . कारकिर्दीमध्ये कोहली आणि जडेजा दोघांचेही सर्वोत्तम मानांकन आहे . अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताचाच अश्विन अव्वल स्थानावर कायम आहे . त्याचे ४९३ गुण झाले आहेत . दक्षिण आफ्रिकेच्या जॅक्वस कॅलिसने इतक्या गुणांची कमाई केली होती . त्यानंतर अशी कामगिरी करणारा अश्विन एकमेव अष्टपैलू खेळाडू आहे . तिसऱ्याच कसोटीत पाच विकेट घेणारा महंमद शमीचेदेखील मानांकन उंचावले असून , तो २१व्या स्थानावरून १९व्या स्थानावर आला आहे . कोहलीची मजल मोठी असून तो दुसऱ्या क्रमांकावरील ज्यो रुटपेक्षा केवळ १४ गुणांनी मागे आहे . कोहलीचे ८३३ गुण झाले आहेत . इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरवात झाली , तेव्हा कोहली १५व्या स्थानावर होता . मालिकेत आतापर्यंत तीन कसोटीत त्याने ४०५ धावा करताना तिसऱ्या क्रमांकापर्यंत उडी मारली आहे . ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानावर कायम आहे . याच मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा इंग्लंडचा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टॉदेखील प्रथमच पहिल्या दहांत आला असून , त्याचे नववे स्थान आहे . आयसीसी क्रमवारी फलंदाज ः स्टिव्ह स्मिथ ( ८९७ ) , ज्यो रुट ( ८४७ ) , विराट कोहली ( ८३३ ) , केन विल्यम्सन ( ८१७ ) , हशिम आमला ( ७९१ ) . गोलंदाज ः आर . अश्विन ( ८९१ ) , रंगना हेराथ ( ८६७ ) , डेल स्टेन ( ८४४ ) , जेम्स अँडरसन ( ८३४ ) , जोश हेझलवूड ( ८३४ ) . अष्टपैलू ः आर . अश्विन ( ४९३ ) , शकिब अल हसन ( ४०५ ) , बेन स्टोक्स ( ३५१ ) , रवींद्र जडेजा ( ३३४ ) , मोईन अली ( ३१२ )
2
क्रिकेटच्या मैदानात गुरुवारपासून टी - १० लीगच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे . टी - २० सामन्याची लोकप्रियता पाहता या नव्या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल , अशी आयोजकांना आशा आहे . टेन क्रिकेट लीग नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली असून , १४ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी आहेत . तीन दिवसात १० षटकांचे १३ सामने खेळवण्यात येणार आहेत . सर्व सामने शारजाच्या मैदानात रंगणार आहेत . स्पर्धत सहभागी संघ : मराठा अरेबियन्स - वीरेंद्र सेहवाग ( कर्णधार ) , मोहम्मद आमिर , मोहम्मद शमी , इमाद वासिम , कामरान अकमल , शैमान अन्वर , जहूर खान , अॅलेक्सहेल , रॉस व्हायटली , लेंडल सिमंस , रिल रोसॉवू , हार्डर व्हिलजोएन , कृष्मार संतोकी , ड्वेन ब्रावो , रेवोलोफ , वान डेर मेरवे . केरला किंग्ज - इयॉन मॉर्गन ( कर्णधार ) , लियाम प्लंकेट , सोहेल तन्वीर , वहाब रियाज , रियान , बाबर हयात , किरॉन पोलार्ड , सॅमुअल बद्री , रियाद इमरिट , चॅडविक वॉल्टन , निकोलस पूरण , शाकिब अल हसन , पॉल स्ट्रेलिंग , रोहन मुस्तफा , इमरान हैदर . पख्तुन्वा - शाहिद आफ्रिदी ( कर्णधार ) , फखर झमान , अहमद शहजाद , ज्यूनिद खान , सोहेल खान , उमर गुल , मोहम्मद इरफान , शाहिन आफ्रिदी , ड्वेन स्मिथ , लीमन डेवसन , तमीम इक्बाल , नजीबुल्लाह झदरान , मोहम्मद नबी , अमजद जावेद , शकलेन हैदर . पंजाबी लिजंड - शोएब मलिक ( कर्णधार ) , हसन अली , उमर अकमल , मिसबाह उल हक , फहिम अश्रफ , उस्मा मीर , अब्दुल रझाक , ख्रिस जार्डन , अदिल रशिद , कॅरलोस ब्रेटवेटस , रंगना हेराथ , लूक रॉन्ची , झार्डन , शहिफ असादुल्लाह , गुलाम शबीर . कोलंबो लायन्स - दिनेश चंडिमल ( कर्णधार ) , शेहान जयसूर्या , दिलशान , रसीथ रॅम्बुकवेल्ला , भनूका , वानीडू हंसरंगा , अँजेलो परेरा , थिक्षिला डि सिल्वा , विश्वा फर्नांडो , सुचित्रा सेनानाईके , शेहान , लाहुरे , कौसन , अँजेलो परेरा , किथूरवान विथरंगे , अलंकारा असनका . बंगाल टायगर्स - सरफराज अहमद ( कर्णधार ) , मोहम्मद नवाझ , रुमान रईस , अन्वर अली , हसन खान , मुस्ताफिझूर रेहमन , सुनील नरेन , डॅरेन सॅमी , डॅरेन ब्रावो , जोन्सन चार्लेस , आंद्रे फ्लेचरस , टॉम कोल्हेर , कॅमरुन डेलपोर्ट , मोहम्मद नावीद , रमीझ शहजादे , नबील . १४ डिसेंबरला बंगाल टायगर्स आणि केरला किंग्ज यांच्यात सलामीचा सामना खेळण्यात येईल . त्यानंतर दुसरा सामना हा विरेंद्र सेहवागचा मराठा अरेबियन्स आणि आफ्रिदीच्या पख्तुन्वा या संघात रंगणार आहे . १५ डिसेंबरला बंगाल टायगर्स विरुद्ध पंजाबी लिजंड , मराठा अरेबियन्स विरुद्ध कोलंबो लायन्स , पंजाबी लिजंड विरुद्ध केरला किंग्ज आणि पख्तुन्वा विरुद्ध कोलंबो लायन्स यांच्यात सामने खेळवले जातील . अ आणि ब गटात वर्गवारी करुन १६ डिसेंबरला सामने खेळवण्यात येतील . १७ डिसेंबरला उपांत्य आणि अंतिम सामने रंगणार आहेत .
2
चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने आपल्या ग्राहकांना तिसरं गिफ्ट दिलं आहे . कंपनीचा भारतातील टॉप सेलिंग सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Redmi Y2 च्या किंमतीमध्ये 3 हजार रुपयांची कपात केलीये . भारतात पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या शाओमी कंपनीने ग्राहकांना पाच ‘गिफ्ट’ देण्याचं जाहीर केलं होतं . तीन हजार रुपयांच्या कपातीमुळे 3GB रॅम + 32GB स्टोरेजचा Redmi अवघ्या 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे . तर 4GB रॅम + 64GB स्टोरेजचं व्हेरिअंट 10 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल . Mi . com , अॅमेझॉन इंडिया , Mi Home आणि देशभरातीव एमआय पार्टनर्सच्या दुकानांमधून हा फोन खरेदी करु शकतात . शाओमीने 5 गिफ्ट देण्याची घोषणा केली होती – भारतीय बाजारात 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने ग्राहकांना पाच ‘गिफ्ट’ देण्याचं जाहीर केलं होतं . यानुसार , कंपनीने सर्वप्रथम Mi A2 या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली , त्यानंतर Redmi Note 5 Pro च्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात आणि आता Redmi Y2 च्या किंमतीत 3 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे .
1
जागतिक फुटबॉल महासंघाच्या परिषदेच्या ( फिफा ) झुरिच येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत विश्वचषक स्पर्धेत सहभागी संघांची संख्या वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . फिफा विश्वचषक स्पर्धेत ४८ संघ खेळविण्यात येणार आहेत . स्पर्धेत एकूण १६ गट तयार करण्यात येणार असून एकूण ८० सामने होणार आहेत . २०२६ सालच्या विश्वचषक स्पर्धेपासून हे नियम अंमलात आणले जातील . प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सात सामने खेळण्याची संधी यामुळे मिळणार आहे . लवकरच ‘फिफा’कडून या संदर्भातील अधिक माहिती जाहीर केली जाणार आहे . वाचाः विश्वविक्रमी क्लोसचा अलविदा ‘फिफा’ विश्वचषकात सध्या ३२ संघांचा समावेश आहे . २०१८ आणि २०२२ सालच्या विश्वचषक स्पर्धा त्यानुसारच खेळविण्यात येतील . त्यानंतर २०२६ सालच्या विश्वचषक स्पर्धेत आणखी १६ संघांची वाढ करण्यात येईल . फिफाच्या अध्यक्षांनी याबाबतचा अंतिम निर्णय घेतला आहे . दरम्यान , फिफाच्या या निर्णयावर काहींनी टीका केली आहे . स्पर्धेत अधिक संघांना समाविष्ट केल्याने स्पर्धेचे महत्त्व कमी होईल , अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे . वाचाः ‘फिफा’ क्रमवारीत भारताची उत्तुंग झेप ‘फिफा’च्या क्रमवारीत भारताने सुधारणा केली असली तरी त्यामुळे विश्वचषक स्पर्धेचे तिकीट काही आपल्याला मिळू शकत नाही . भारतीय संघ फिफा क्रमवारीत १७३ व्या स्थानी होती . त्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक कॉन्स्टनटाईन यांनी मेहनत घेऊन संघाला १३७ व्या स्थान प्राप्त करून दिले होते . वाचाः सुनील छेत्रीचे नेतृत्व प्रेरणादायी
2
नावाजलेले टीव्ही कलाकार सेठ मेयेर्स , नील पॅट्रीक हॅरीस आणि सलमा हायेक पिनॉल्ट आणि अन्य कलाकारांबरोबर प्रियांका चोप्राही संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करणार आहे . २४ सप्टेंबर २०१६ ला न्यू यॉर्कच्या सेण्ट्रल पार्कमध्ये होणार आहे . अनेक कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे . केण्ड्रीक लमर , मेचॅलीका , रिहाना , मेजर लेझर . युशेर , एली गोल्डींग , सेलेना गोमेझ यांसारखे कलाकार यात सहभागी होणार आहेत . या सगळ्या कलाकारांच्या मांदीयाळीत एक भारतीय नावही दिमाखात उभं राहणार आहे . ते म्हणजे प्रियांका चोप्रा . ट्विटरवर गायक युशेर बरोबरचा फोटो तिने शेअर केला . ती म्हणाली , “युशेर बरोबर काम करताना खूप मजा आली . दिग्गज कलाकारांबरोबर संयुक्त राष्ट्राचा जागतिक नागरिक महोत्सव होस्ट करण्याची संधी मिळत आहे याचा मला अभिमान वाटत आहे . ”
0
खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन सावध खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांच्या कामगिरीमुळे विजयाची संधी निर्माण झाली आहे . विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था ३ बाद ३५ अशी झाली होती . त्या वेळी चेतेश्वर पुजारा ११ , तर पार्थिव पटेल ५ धावांवर खेळत होता . दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांवर संपुष्टात आला . डिव्हिलर्स आणि डीन एल्गर यांनी अर्धशतकी खेळी केली . शमीने चार , बुमराने तीन गडी बाद केले . विजयासाठी २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला मुरली विजय आणि लोकेश राहुल चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले . विजयचा खाली राहिलेल्या चेंडूवर त्रिफळा उडाला , तर राहुल चेंडूच्या गतीवर फसला . कोहली - पुजारा या जोडीवर भारताच्या आशा असताना पहिल्या डावातील शतकवीर विराट कोहलीही अपयशी ठरला . पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या एन्गिडीच्या वेगवान इनस्विंगवर कोहली पायचीत झाला . कोहली बाद झाल्यावर संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागी पार्थिव पटेलला बढती दिली . त्याने पुजाराच्या साथीत अखेरपर्यंत तग धरला . आता उद्या अखेरच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांबरोबर भारतीय फलंदाजांसमोर खेळपट्टीच्या विचित्र स्वरूपाचे आव्हान असेल . खेळपट्टीवर चेंडू कधी खाली राहतो , तर मध्येच तो उसळी घेतोय . त्यापूर्वी , दक्षिण आफ्रिका संघाने खेळपट्टीचे एकूण स्वरूप लक्षात घेता सावधपणा बाळगूनच फलंदाजी केली . त्यामुळेच आघाडी दोनशेच्या वर गेल्यानंतरही त्यांनी फारकी आक्रमकता दाखवली नाही . दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज लय मिळविण्यासाठी चाचपडत असतानाच डिव्हिलर्सने पुन्हा एकदा आपले मोठेपण सिद्ध केले . त्याची सहज फटकेबाजी हेच दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाचे वैशिष्ट्य ठरले . त्याने डीन एल्गरसोबत तिसऱ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली . त्यानंतरही भारताच्या महंमद शमीने न कचरता गोलंदाजी करून सकाळच्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाला तीन धक्के दिले . दिवसाचे दुसरे सत्र मात्र कंटाळवाणे ठरले . दक्षिण आफ्रिका संघ विजयाच्या प्रयत्नांना महत्त्व न देता आघाडी वाढवून सामना अनिर्णित अवस्थेकडे कसा जाईल , याच हेतूने खेळत होते . या दुसऱ्या सत्रात २७ षटकांत केवळ ५४ धावा निघाल्या . चहापानाच्या ७ बाद २३० अशा स्थितीनंतर तिसऱ्या सत्राच्या सुरवातीला दहा षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव २५८ धावांत आटोपला . संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका ः३३५ आणि दुसरा डाव २५८ ( एल्गर ६१ , डिव्हिलर्स ८० , डू प्लेसिस ४८ , शमी ४ - ४९ , बुमरा ३ - ७० , ईशांत २ - ४० ) भारत ३०७ आणि १६ . १ षटकांत ३ बाद ३५ ( पुजारा खेळत आहे ११ , पटेल खेळत आहे ५ , लुंगी एन्गिडी २ - १४ ) .
2
सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सच्या धबडग्यात स्वतःचं वेगळेपण यशस्वीरित्या टिकवून ठेवणारी कोणती वेबसाइट असेल तर ती म्हणजे लिंक्डइन . पण फेसबुक आणि ट्विटरची लोकप्रियता अधिक असल्याने नेटिझन्सची या दोन माध्यमांना पसंती असते . क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर फेसबुक आणि ट्विटरवरही विक्रम रचल्यानंतर आता ‘लिंक्डइन’वरही त्याने आपले मास्टरस्ट्रोक दाखवण्यास सुरूवात केली आहे . मार्च महिन्याच्या सुरूवातील सचिनने ‘लिंक्डइन’वर आपले अकाऊंट सुरू केले आणि अवघ्या दोन आठवड्यांत त्याचे ३० हजारांहून अधिक चाहते झाले आहेत . ‘लिंक्डइन’ हे वेब पोर्टल सोशल नेटवर्किंग या वर्गात मोडत असलं तरी उद्योगधंद्यांमधील व्यावसायिक भेटीगाठींपुरतंच ते मर्यादित ठेवण्यात आहे . सचिनचे ‘लिंक्डइन’वर सध्या ३० हजार ३०३ चाहते झाले आहेत . सचिनने हा पल्ला अवघ्या दोन आठवड्यांत गाठला आहे . सचिनचे फेसबुक आणि ट्विटरवर प्रचंड फॉलोअर्स आहेत . आता ‘लिंक्डइन’वरही सचिनचा कारनामा सुरू झाला आहे . सध्याच्या घडीला जगभरात ३०० पेक्षा जास्त सोशल नेटवर्किंग वेबसाइट्स अस्तित्वात आहेत . यामध्ये व्हिडीओ शेअरिंग , फोटो शेअरिंग , म्युझिक शेअरिंग , ब्लॉगिंग , मायक्रोब्लॉगिंग अशा सगळ्याच प्रकारांचा समावेश होतो . मात्र शुद्ध आणि फक्त व्यावसायिक जनसंपर्क तसंच भेटीगाठींसाठी अस्तित्वात असणारी लिंक्डइन ही एकमात्र वेबसाइट आहे .
2
मोबाईल हँडसेट क्षेत्रातील ख्यातनाम कंपनी नोकिया आता बाजारपेठेत नव्या रुपात दाखल होणार आहे . ‘नोकिया ३’ , ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे तीन अँड्रॉईड फोन १३ जून रोजी भारतात लाँच करण्यात येणार आहेत . नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे . त्यामुळे ज्या फोनच्या पुनरागमनाची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या कंपनीचे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणार आहेत . तेव्हा ग्राहकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे . फेब्रुवारी महिन्यात बार्सिलोना येथे झालेल्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये नोकियाने पुनरागमनाची घोषणा केली होती . त्यानुसार ‘नोकिया ३’ , ‘नोकिया ५’ आणि ‘नोकिया ६’ हे स्मार्टफोन पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत . हे फोन भारतात जरी उशिरा लाँच झाले असले , तरी अनेक देशांत एप्रिल महिन्यांतच हे फोन विक्रीसाठी उपलब्ध झालेत . आठवड्याभरापूर्वीच नोकियाचा ३३१० हा फोन विक्रीसाठी उपलब्ध झाला . नोकिया लाँच करणारे तिन्ही स्मार्ट फोन हे ग्राहकांना परवडणाऱ्या दरात असणार आहेत . या तिन्ही हँडसेटपैकी नोकिया ६ ला चीनमध्ये तुफान प्रसिद्धी मिळाली . हा फोन तिथे आधिच लाँच करण्यात आला होता . ५ . ५ इंचाच एचडी डिस्प्ले , गोरिला ग्लास प्रोटेक्शन , ३ जीबी रॅम , ३२ जीबी इंटरनल मेमरी , १६ मेगापिक्सेल कॅमेरा , ८ मेगापिक्सेल फ्रँट कॅमेरा , फिंगरप्रिन्ट सेन्सॉर असे या फोनचे वैशिष्टेय असणार आहे . भारतामध्ये हा फोन १६ ते १८ हजारांच्या आसपास उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जातय . ‘नोकिया ३’ची किंमत १० हजार तर ‘नोकिया ५’ची किंमत १५००० असल्याचं म्हटलं जातंय .
1
बॉलिवूडचा ‘बादशहा’ असा टॅग घेऊन फिरणारा अभिनेता शाहरुख खान याने अनेक वर्ष अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याची लेक सुहानादेखील हळूहळू प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे . सुहाना जेथे जाईल तिथं तिला चाहते स्पॉट करत असतात . त्यामुळे तिचा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असतो . सध्या सुहानाचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत ती ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे . सुहाना सध्या लंडनमध्ये शिकत असून ती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते . असाच एक फोटो सुहानाने शेअर केला असून या फोटोमध्ये तीने प्लाजो आणि क्रॉप टॉप घातला आहे . तसंच त्यावर शोभेल असं स्नीकर्स आणि सनग्लासेस देखील घातल्यामुळे ती आणखीनच उठून दिसत आहे . कायम आपल्या फॅशनसेन्सकडे जाणीवपूर्वक लक्ष देणाऱ्या सुहानाच्या प्रत्येक फोटोमधून तिचा आत्मविश्वास झळकत असतो . विशेष म्हणजे स्टारकिडमध्ये सुहाना कायम ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटमध्ये बाजी मारुन नेत असल्याचं दिसून येतं दरम्यान , हा फोट व्हायरल होत असतानाच काही दिवसापूर्वी सुहानाने ‘वोग’ या मासिकाच्या कव्हरफोटोसाठी फोटोशूट केलं आहे . यावेळी तिने यातील काही फोटोदेखील शेअर केले होते . विशेष म्हणजे सुहाना २०२० पर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे . मात्र सुहानाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही असं शाहरुखने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं .
0
‘माझं वजन खूप वाढलंय , काय करावं कळतच नाही . ’ ‘मी तर रोज व्यायाम पण करते , रात्रीचं जेवणही खूप कमी केलंय तरीही काहीच फरक नाही . ’ असे संवाद आपल्या कानावर सर्रास पडतात . मग डाएटचे वेगवेगळे फंडे वापरले जातात . यात केवळ लिक्वीड डाएट घेणे , सॅलाड आणि कडधान्ये खाणे , कोणतेतरी शेक पिणे असे उपाय केले जातात . मात्र दैनंदिन जीवनातील काही सवयी बदलल्या तरीही त्याचा बराच फायदा होऊ शकतो . अनेकांना जेवण किंवा नाश्ता झाला की काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते . बऱ्याच जणांना जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायचीही सवय असते . मात्र वजन कमी करायचे असल्यास गोड खाण्यावर नियंत्रण आणणे अतिशय महत्त्वाचे आहे . क्वचित कधीतरी आणि तेही ठराविक प्रमाणात गोड खाणे ठिक . यातही कोणते गोड पदार्थ आणि किती खावेत याबाबत माहिती असणे गरजेचे आहे . बाहेर जेवल्यानंतर अनेकदा आयस्क्रीम खाल्ले जाते किंवा अनेक जण कॉफीही घेतात . डोनटस , कुकीज किंवा अगदी काहीच नसेल तर मग साखरही खाल्ली जाते . आता वजन कमी करण्यासाठी हे पदार्थ पूर्ण बंद करायचे ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल . पण हे तुमच्या आवडीचे पदार्थ खाणे पूर्ण बंद करायचे नाहीत तर रोज खात असू तर ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच खायचे . याशिवायही काही उपयुक्त टिप्स… १ . हर्बल टी हा गोड पदार्थांना चांगला पर्याय ठरु शकतो . त्यामुळे जेवणानंतर गोडाऐवजी हर्बल टी घेतल्यास फायद्याचे ठरते . २ . जेवणानंतर गोड खावेसे वाटल्यास एखादा हेल्दी पर्याय मिळतोय का ते पाहा . जेवणात किंवा त्यानंतर एखादे फळ खाऊ शकता . सफरचंद , पेरु , संत्रे अशी फळे खाल्लेली चांगली . ३ . शक्यतो रात्री झोपताना गोड खाण्यापेक्षा दिवसा किंवा सकाळी खाल्लेले जास्त चांगले . ४ . केक , डोनट , नानकटाई असे बेकरी प्रॉडक्टस आठवड्यातून शक्यतो एकदाच खावेत . ५ . गोड पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असल्याने त्याने पटकन वजन वाढते . त्यामुळे एखादवेळी थोडेसे जास्त जेवण झाले तरी ठिक पण गोड पदार्थ दररोज खाणे टाळलेलेच बरे . ६ . आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणेही अतिशय गरजेचे आहे . त्यामुळे शरीरात अन्नामुळे तयार होणाऱ्या कॅलरीज जाळण्यास मदत होते .
1
क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही विक्रम करण्यात मागे नसतो . फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारणारा विराट कोहली कमाईच्या बाबतीत देखील मागे नाही . ‘फोर्ब्स’च्या २०१८ रिपोर्टनुसार विराट कोहली हा सर्वात जास्त कमाई करणारा जगातील ८३ व्या तर भारतातील पहिल्या स्थानावरील खळाडू आहे . विराटने क्रिकेटमध्येच नाही तर कमाईच्या बाबतीतही सर्वांना मागे टाकले आहे . फोर्ब्सने निवडलेल्या जगातील अव्वल १०० ऐथीलट्समध्ये विराट कोहली ८३ व्या स्थानावर आहे . या यादीत विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू आहे . सध्याच्या घडीला विराट कोहली जाहिरात क्षेत्रातील आघाडीची नाव आहे . गेल्या १२ महिन्यात विराट कोहलीची कमाई १७० कोटी रूपये आहे . विराट कोहली एकूण २१ कंपन्यासाठी जाहिरात करत आहे . घड्याळ , कार , स्पोर्ट्स शू , बाईक , कपडे , टायर्स , स्नॅक्स , हेल्थ फूड , हेडफोन आणि टूथब्रशसह अन्य कंपन्यांच्या जाहिरातीच्या माध्यमांतून विराट कोहली कोट्यवधी रूपयांची कमाई करतो . विराट कोहली लवकरच एम . एस . धोनीचे वर्षभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे . माजी कर्णधार धोनीने २०१५ मध्ये अनेक कंपन्यांची जाहिरात केली होती . धोनीचे या काळात ३१० लाख कोटी ( ३१ मिलीयन डॉलर ) रूपये वार्षिक उत्पन्न होते . कोहलीचे गेल्या १२ महिन्यातील कमाई २४ मिलीयन डॉलर आहे . सध्याची विराट कोहलीची कामगिरी आणि सोशल मीडियावर असणारे चाहते पाहता भविष्यात धोनीला मागे टाकण्याची शक्यता आहे . तरूण वर्गामध्ये विराट कोहलीच्या नावाची क्रेज आहे . युवा वर्ग विराट कोहलीच्या प्रत्येक गोष्टींकडे बारकाईने लक्ष देऊन असतो . त्यामुळे जाहिरात विश्वात विराट नावाचा एक ब्रँड तयार झाला आहे . गेल्यावर्षी विराट कोहलीने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले . अनुष्काशी लग्न केल्यामुळे त्याची फॅमिली मॅन म्हणूनही वेगळी इमेज तयार झाली आहे . त्याचा त्याला कमाईमध्ये चांगलाच फायदा होत आहे . भविष्यामध्ये विराट कोहली धोनीला मागे टाकून आर्थिक कमाईमध्ये नवा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे .
2
रिलायन्स जिओ मागच्या काही काळापासून बाजारात इतर स्पर्धक कंपन्यांना चांगलीच टक्कर देत आहे . मोफत इंटरनेटनंतर कंपनीने आपला फोन बाजारात आणला . त्यालाही ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला . कंपनीने मागील आठवड्यात आपल्या या फोनचा फ्लॅश सेल जाहीर केला होता , तेव्हा ऑनलाइन विक्रीसाठी असलेला हा फोन अवघ्या एका मिनीटात आऊट ऑफ स्टॉक झाला . त्यामुळे ग्राहकांची या फोनलाही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे . तर कंपनीने आपल्या या नवीन मॉडेलच्या विक्रीसाठी पुढील फ्लॅश सेल ३० ऑगस्ट रोजी जाहीर केला आहे . त्यामुळे ज्यांना हा फोन खरेदी करायचा आहे ते ग्राहक दुपारी १२ वाजल्यापासून jio . com या कंपनीच्या वेबसाईटवर फोनची ऑनलाइन खरेदी करु शकतात . यु ट्यूब , गुगल मॅप्स आणि फेसबुकचे इनबिल्ट अॅप ही या नव्या फोनची वैशिष्ट्ये आहेत . दिसायला हा फोन जुन्या ब्लॅकबेरी फोनप्रमाणे असून या फोनची किंमत २ , ९९९ रुपये आहे . लवकरच आपण या फोनमध्ये व्हॉट्स अॅपची सुविधाही देणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे . या फोनची फिचर्सही आकर्षक असल्याने त्याला ग्राहकांची पसंती मिळताना दिसत आहे . फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे . तसेच मेमरी कार्डद्वारे हे स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येईल . या ४जी फोनमध्ये २ हजार मिलिअॅम्पियर्सची बॅटरी आहे . यामध्ये वाय - फाय , ब्लूटूथ , एनएफसी आणि एफएम रेडिओ यांसारखे कनेक्टिविटी फिचर्स देण्यात आले आहेत .
1
भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि सुरेश रैना अपात्र ठरलेली यो - यो टेस्ट आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनिवार्य करण्यात आली आहे . युवराज आणि रैनाने या टेस्टमध्ये कमी गुण मिळाल्याने त्यांना संघात स्थान देण्यात आले नव्हते . त्यावेळीच भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची असल्याचे संकेत मिळाले होते . यावर बीसीसीआयने अधिकृतपणे भूमिका स्पष्ट केली . बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी म्हणाले की , दुखापतीतून सावरुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू सज्ज आहेत . यात प्रत्येक खेळाडूला पुनरागमनासाठी चांगल्या कामगिरीसह यो - यो टेस्टमध्ये पात्रता सिद्ध करावी लागेल . जे खेळाडू या चाचणीमध्ये पात्र ठरतील त्यांनाच संघात संधी दिली जाईल . भारतीय संघाचा कर्णधार , प्रशिक्षक आणि निवड समितीने खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात मापदंड ठरवले आहेत . त्यात यो - यो चाचणीचा समावेश आहे . भारतीय संघाची निवड करताना टी - २० , एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारातील निवड प्रक्रियेत खेळाडुंना ही परीक्षा अनिवार्य असणार आहे . यापूर्वी कसोटी संघाची निवड करत असताना तांत्रिक कौशल्यावर खेळाडुंची निवड करण्यावर अधिक भर दिला जायचा . मात्र , आता टेस्ट क्रिकेटमध्येही फिटनेस हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे . काय आहे यो - यो टेस्ट ? अनेक ‘शंकूं’च्या ( cones ) मदतीने २० मीटर अंतरावर दोन रांगा तयार केल्या जातात . खेळाडूला या दोन रांगेच्यामधून सलग धावावे लागते . धावत असताना बीपच्या आवाजावर मागे वळावे लागते . दर मिनिटाला ही गती वाढत जाते . गती कमी झाल्यास बीपने दोन वेळा सावध केले जाते . त्यानंतरही खेळाडूची गती कमी राहिल्यास चाचणी थांबवली जाते . ही संपूर्ण चाचणी प्रक्रिया संगणकीकृत आहे . या चाचणीत १९ . ५ पेक्षा अधिक गुण मिळवणे अपेक्षित आहे .
2
हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित " नगरसेवक ' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे . हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . दिल्लीत नरेंद्र , राज्यात देवेंद्र आणि सिनेमातला हा उपेंद्र ! कसा आहे त्याचा सिनेमा ? " नगरसेवक ' चित्रपटाबद्दल . . . " नगरसेवक ' हा मनोरंजनाने परिपूर्ण असा चित्रपट आहे . माझा ऑफबीट किंवा प्रायोगिक चित्रपटांकडे जास्त कल असतो . मला वाटतं की मी व्यावसायिक अभिनेता आहे आणि सर्व प्रकारचे चित्रपट योग्य पद्धतीने करू शकतो . एकेदिवशी मला अभिनेता सयाजी शिंदेचा फोन आला . ते म्हणाले एक कमर्शियल चित्रपट आहे व मी त्यात काम करतो आहे . मला माहीत आहे की तू अशा प्रकारचे चित्रपट करत नाहीस . माझ्या अपोझिटच्या भूमिकेसाठी तू हवा आहेस . तर , आपण हा चित्रपट करूयात . मधल्या काळात " जोगवा ' , " धग ' व " तुह्या धर्म कोंचा ' अशा प्रकारचे मी चित्रपट केले . त्यातून मी अभिनेता कमी चळवळीतला माणूस जास्त वाटलो . " प्यारवाली लव्ह स्टोरी ' सारखा कमर्शियल चित्रपट व हिंदी चित्रपट मी केले आहेत . " नगरसेवक ' हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे . दमदार गाणी , आयटम सॉंग , दमदार ऍक्शन , प्रेमकथा , उत्तम लोकेशन , कॉमेडी अशा सर्व गोष्टींचा समावेश असणारा हा चित्रपट आहे . " नगरसेवक ' मधील भूमिका . . . " नगरसेवक ' मध्ये मी मल्हार शिंदे या तडफदार तरुणाची भूमिका साकारतोय . त्याला अन्याय व अत्याचाराची प्रचंड चीड आहे . त्याविरोधात आवाज उठविणारा हा युवक आहे . व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींविरोधात लढताना तो दिसणार आहे . प्रेमकथा . . . या चित्रपटाचं नाव " नगरसेवक ' असलं तरी लव्ह स्टोरीही पाहायला मिळणार आहे . ही लव्ह स्टोरी माझ्यात व अभिनेत्री नेहा पेंडसेमध्ये रंगताना दिसणार आहे . मी नेहासोबत पहिल्यांदाच काम केलं आहे . चित्रपटात आमची केमिस्ट्री उत्तम जुळली आहे . दमदार ऍक्शन . . . " नगरसेवक ' मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांसारखे ऍक्शन सीन पाहायला मिळणार आहेत . यात मी भरपूर ऍक्शन सीन्स केलेत . मराठी चित्रपटात मी पहिल्यांदाच अशा प्रकारे ऍक्शन केलीय . भूमिकेच्या तयारीबाबत . . . भूमिकेची तयारी करण्यासाठी आशय खूप महत्त्वाचा असतो . कलाकाराला योग्य दिशा दाखवण्याचं काम दिग्दर्शक करत असतो . नशिबाने मला हिंदी व मराठीत खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली . मराठीत डॉ . जब्बार पटेल , अमोल पालेकर , राजीव पाटील , महेश लिमये आणि हिंदीत रामगोपाल वर्मा , मधुर भांडारकर या दिग्दर्शकांसोबत मी काम केलं ; पण दर वेळेला मला चांगलेच दिग्दर्शक मिळतील असं नाही . ज्याच्याकडे पैसे आहेत तो निर्माता होऊ शकतो . टेलिव्हिजनवर व्यावसायिकता आहे . चांगली प्रॉडक्शन टीम आहे . त्यामुळे मी साडेनऊ वर्षांनंतर स्टार प्रवाहवरील " नकुशी ' मालिकेत काम करतो आहे . अव्यावसायिक लोकांबरोबर काम करणं खूपच कठीण जातं . त्यामुळे शक्यतो टाळतो ; पण प्रत्येक वेळेस तसं होईलच असं नाही . मला वर्षाला बारा - तेरा चित्रपटांच्या ऑफर येत असतील तरी मी तीन - चार ऑफर स्वीकारतो . आव्हान स्वीकारण्याबाबत . . . मी गंभीर भूमिका खूप चांगल्याप्रकारे करत असेन तर मला मसालेदार चित्रपटातील रोलदेखील तितक्याच चांगल्याप्रकारे करता आला पाहिजे . हे कलाकार म्हणून आव्हान स्वीकारायला पाहिजे . मी स्वतःला नशीबवान समजतो की , मी अशा प्रोफेशनमध्ये आहे जिथे नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात . ज्या क्षणी कलाकार म्हणून मला सगळं येतं असं म्हणेन त्याच क्षणी व्हीआरएस घ्यायला हरकत नाही असं मी म्हणेन . आगामी प्रोजेक्ट . . . विठाबाई नारायणगावकर यांच्यावरील चरित्रपट , यशराज फिल्म्सचा " बॅंकचोर ' , आदित्य क्रिपलानीने " टिकली ऍण्ड लक्ष्मी बॉम्ब ' पुस्तक लिहिले होते . त्या पुस्तकावर तो चित्रपट करतो आहे . त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे . " शेंटिमेंटल ' नावाचा मराठी चित्रपट करतो आहे . या चित्रपटात रघुवीर यादव , अशोक सराफ व मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत . " सूरसपाटा ' , " क्षितिज ' हे माझे आगामी मराठी प्रोजेक्ट आहेत . त्याशिवाय काही हिंदी चित्रपटही करतो आहे .
0
बाल कलाकार ते आजपर्यंत अतिशय सहजरित्या सर्व प्रकारच्या भूमिका लिलया साकारणारे सचिन पिळगांवकर हे सर्वांचे आवडते अभिनेते असून त्यांनी मराठी , हिंदी भाषांमधील चित्रपट , दूरचित्रवाणी कार्यक्रम , नाटकांतून अभिनय केले आहे . ‘सरगम’च्या ‘किड्स स्पेशल एपिसोड’मध्ये लहान मुलांबरोबर त्यांच्यातील एक होऊन गाऊ शकतील असं एकचं नाव होत ते म्हणजे सचिन पिळगांवकर . या आठवड्यात १९ आणि २० एप्रिल या दोन दिवसांत ‘सरगम’मध्ये किड्स स्पेशल कार्यक्रम रात्री ९ वाजता रंगणार आहे . या कार्यक्रमामध्ये सचिन पिळगांवकर त्यांची आजपर्यंत गाजलेली अनेक गाणी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत . ‘सरगम’ या कार्यक्रमात सचिन पिळगांवकर ‘प्यार हमे इस मोड पे ले आया’ , ‘बडे अच्छे लगते है’ , ‘लागा चुनरी में दाग’ , ‘अशी ही बनवाबनवी’ , ‘माझा मार्ग वेगळा’ ही गाणी गाऊन धमाल उडवून देणार आहेत . सचिन लहानग्यांसोबत एक होऊन त्यांच्यासोबतही गाणी गाणार आहेत . आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माता असून सूत्रसंचालनाची जबाबदारी उर्मिला कानेटकरकडे आहे . या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे . सिद्धार्थ आणि सौमिल यांनी हे गाणे संगीतबद्द केले आहे . ‘सरगम’ हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरुवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल .
0
सिंगापूर : सध्या वाढत चाललेल्या टी 20 आणि टी 10 लीगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने ( आयसीसी ) गंभीर दखल घेतली असून , त्याला आळा घालण्यासाठी लीगवर कडक निर्बंध घालण्याचा विचार व्यक्त केला आहे . " आयसीसी ' च्या बैठकीला उद्यापासून येथे सुरवात होत आहे . या वेळी टी 20 आणि टी 10 लीगचे फुटलेले पेव हा मुद्दा चर्चेच्या विषयपत्रिकेवर मुख्य असेल . या लीगच्या वाढत्या संख्येमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा भ्रष्टाचाराचा धोका निर्माण झाला आहे , असे आयसीसीचे म्हणणे आहे . " आयपीएल ' सुरू झाल्यानंतर आता अगदी अलीकडेच अफगाणिस्तानने लीगला सुरवात केली आहे . " टी 20 ' लीगला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून आयसीसीने देखील आता " टी 10 ' लीगला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे . " आयसीसी ' चे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ ऍलरडाईस म्हणाले , " " आतापर्यंत लीगला मिळालेल्या मान्यता या गेल्या वर्षी देण्यात आल्या आहेत . या पुढे अशा लीगला मान्यता देताना नियम आणि अटी कडक करण्यात येतील . आता कुणी उठून अशा लीग सुरू करू शकणार नाही . ' ' या बैठकीस प्रथमच इंद्रा नूयी उपस्थित राहणार आहेत . आयसीसीच्या महिला विभागाच्या पहिल्या स्वतंत्र संचालक म्हणून त्या बैठकीस उपस्थित राहतील . भारताकडून हंगामी सचिव अमिताभ चौधरी बैठकीस उपस्थित राहणार आहेत . बैठकीत चर्चेस येणारे अन्य मुद्दे - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट करणे - क्रिकेटचा 2028 पासून ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव
2
मातांना अधिक शिक्षित केल्याने आघाडीच्या जैववैद्यकशास्त्रातील लसीच्या तुलनेत मलेरिया या विषाणूवर मात करता येणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे . कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले . यासाठी दोन महिने पाच वर्षांच्या ६४७ मुलांची तपासणी करण्यात आली . याबाबत सर्वेक्षणही करण्यात आले . यामध्ये मुलांच्या आईवडील तसेच पालकांकडून लोकसंख्याशास्त्र , सामाजिक स्थिती , मातृशिक्षण , बेड नेटचा वापर आणि अलीकडील तापामुळे आलेले आजारपण याबाबत प्रश्न विचारून सर्वेक्षण करण्यात आले . सहभागी झालेल्यांमध्ये ज्या मुलांच्या माता अधिक शिक्षण घेतलेल्या होत्या , त्यांच्या मुलांना मलेरिया होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे संशोधकांना दिसून आले . हा काही साधा परिणाम नाही . आईच्या शिक्षणाचा प्रचंड प्रभाव पडत असून , आईच्या शिक्षण घेण्यामुळे जैववैद्यकशास्त्रातील लसीच्या तुलनेत मलेरिया विषाणूवर अधिक प्रभावीपणे मात करता येणे शक्य असल्याचे , अल्बर्टा विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक मायकल हॉक्स यांनी सांगितले . ६४७ मुलांपैकी १२३ मुलांना संशोधनामध्ये मलेरिया आढळून आला . मलेरिया होणाऱ्या मुलांच्या मातांना कसलेही शिक्षण नसल्याचे प्रमाण ३० टक्के होते . जर मातांना प्राथमिक शिक्षण असेल तर मलेरिया होण्याचे प्रमाण हे १७ टक्क्यांनी कमी होत असून , त्यापेक्षा अधिक शिक्षण असेल तर तरुण मुलांमध्ये मलेरिया होण्याचे प्रमाण अधिक कमी होत असल्याचे संशोधकांना दिसून आले . मुलांना मलेरियापसून वाचविण्यासाठी मातांना खूप काही शिक्षण देण्याची आवश्यकता नाही . मुलांचा डासांपासून बचाव होण्यासाठी आवश्यक असणारी जाळी वापरल्यास आणि ताप होण्यापासून काळजी घेतल्यास मलेरिया होण्यापासून बचाव होऊ शकतो , असे अल्बर्टा विद्यापीठातील विद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कॅरी मा यांनी म्हटले आहे . हा अगदी थेट आणि सोपा संदेश असून , योग्य आरोग्य आणि स्वच्छता ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असून , यामुळे विविध आजारांना दूर ठेवण्यास मदत होत असल्याचे , संशोधकांनी सांगितले .
1
चॉकलेट म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं . कोणत्याही मूडमध्ये चॉकलेटचं नुसतं नाव ऐकलं तरी नकळत आपण आनंदी होतो . असे हे चॉकलेट आपल्या तब्येतीसाठीही फायद्याचे असते . चॉकलेट खाल्ल्याने मूड चांगला होतो हे आपण ऐकले आणि अनुभवलेही असेल पण चॉकलेट खाल्ल्याने वजनवाढीवरही नियंत्रण मिळवता येते . वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रासलेले असतात . त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे . मात्र सामान्य चॉकलेट खाऊन नाही तर डार्क चॉकलेटमुळे वजन नियंत्रणात आणण्यास मदत होते . यामध्ये कोको जास्त प्रमाणात असते , त्याचा उपयोग होतो . आता हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल , पण हे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे कसे शक्य होते . भुकेला नियंत्रणात ठेवते सतत भूक लागण्याच्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तर डार्क चॉकलेट अतिशय प्रभावी ठरते . यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असल्याने भूक लागण्याची वेळ पुढे ढकलू शकतो . तसेच डार्क चॉकलेट खाल्ल्याने फास्ट फूड खाण्याची इच्छाही कमी होते . वजन वाढण्यावर मर्यादा डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या फ्लेवानोल्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते . त्यामुळे शरीरातील चरबी कमी करण्यास त्याचा उपयोग होतो . मात्र हे अतिप्रमाणात न खाता विशिष्ट प्रमाणात याचे सेवन करायला हवे . रक्ताभिसरण सतुंलित ठेवण्यास उपयुक्त काही लोकांना पोटात जळजळ होत असते . रक्ताचे योग्य पद्धतीने वहन न झाल्याने असे होते . डार्क चॉकलेट अतिशय कमी गोड असते . त्यामुळे हे चॉकलेट खाल्ल्याने व्यक्तीची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते . तणाव कमी होण्यास मदत आपल्या धकाधकीच्या आयुष्याला जर तुम्ही वैतागला असाल आणि त्यामुळे तुम्हाला जर ताण आला असेल तर डार्क चॉकलेट खूप उपयुक्त होऊ शकते . डॉर्क चॉकलेट खाल्ल्याने तणाव कमी होतो असे डॉक्टरांनीही सांगितले आहे .
1
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चांमुळे प्रसिद्धीस येत आहे . पण ती नक्की कोणत्या सिनेमातून आणि कोणत्या अभिनेत्यासोबत पदार्पण करणार याबद्दल अधिकृत माहिती मिळत नव्हती . पण आता सारा तिचा पहिला सिनेमा सुशांत सिंग राजपूतसोबत करणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे . ही एक प्रेम कहाणी असणार आहे . सुशांत पुन्हा एकदा ‘काय पो छे’ सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरसोबत काम करणार आहे . गेल्या काही वर्षांपासून तारखा जुळून येत नसल्यामुळे सुशांत आणि अभिषेक एकत्र काम करू शकत नव्हते . आता या दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला असून या सिनेमात साराही काम करणार आहे . या सिनेमाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरू होणार आहे . बालाजी मोशन पिक्चर्समधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार , अभिषेक आपल्या या सिनेमासाठी नवीन जोडीच्या शोधात होता . त्यामुळेच त्याने सैफच्या मुलीची म्हणजे साराची मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली . सिनेमाच्या टीमने यासंदर्भात साराशी संपर्क केला . सारालाही सिनेमाची कथा आवडली आहे . ती येत्या दोन आठवड्यांत या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी करणार आहे . एकता कपूर ही साराची आई अमृता सिंगच्या फार जवळची व्यक्ती आहे . त्यामुळे जेव्हाही अमृताला छोट्या पडद्यावर आगमन करायचे असेल तेव्हा एकता तिच्या मदतीला असेलच . स्वतः एकताला अमृताला छोट्या पडद्यावर आणण्याची इच्छा आहे . अमृताने एकताची निर्मिती असलेल्या ‘फ्लाइंग जट्ट’ या सिनेमात टायगर श्रॉफच्या आईची भूमिका साकारली होती . त्यामुळे अमृताला आपल्या मुलीच्या पदार्पणासाठी एकतावर पूर्ण विश्वास आहे . अमृताने या प्रोजेक्टसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत . सध्या सारा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे . ती अनेकदा इन्स्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत असते . तर सुशांत सध्या ‘राबता’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे . या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती सनॉन आहे . याशिवाय सुशांतच्या ‘ड्राइव्ह’ या आगामी सिनेमात तो जॅकलीन फर्नांडिससोबत दिसणार आहे तर ‘रॉ’ सिनेमात तो पुन्हा एकदा दिशा पटानीसोबत काम करणार आहे .
0
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे मिळवलेले विजेतेपद हे वाढत्या वयाच्या खेळाडूंपेक्षा प्रत्येकाची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याचे सिद्ध करणारी आहे , असे मत महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले . आयपीएलच्या लिलावात तीसपेक्षा अधिक वय असलेले नऊ खेळाडू निवडल्यामुळे चेन्नई संघावर टीका करण्यात आली होती . सर्वजण नेहमीच वाढत्या वयाबाबत बोलतात , पण माझ्यासाठी वय कितीही असले तरी तंदुरुस्ती महत्त्वाची असते . रायुडू हा 32 वर्षांचा आहे ; परंतु मैदानात तो अतिशय चपळ असतो . कितीही धावायला लागले तरी त्याची तक्रार तो करत नाही . त्यामुळे माझ्यासाठी तंदुरुस्तीला प्राधान्य असते , असे धोनीने विजेतेपदानंतर सांगितले . प्रत्येक खेळाडू कोणत्या वर्षात जन्माला आला याला माझ्या लेखी काहीच अर्थ नाही . तुम्ही 19 वर्षांचे असा अथवा तिशीतले , चपळता असणे आवश्यक असते . त्याचवेळी दुसरी बाजूही लक्षात घेणे महत्त्वाचे असते , असे सांगून धोनीने वॉटसनचे उदाहण दिले . जर मी त्याला धाव घेण्यासाठी कॉल दिला आणि लगेचच थांबवले तर त्याला हॅमस्ट्रिंगची ( मांडीचा स्नायू ) दुखापत होऊ शकते . त्यामुळे तो पुढच्या सामन्यासाठी अनुपलब्ध होईल . अशा वेळी मी त्याला मध्येच थांबवणार नाही , तर कोणत्याही परिस्थितीत धाव पूर्ण करण्याची सूचना करेन . अविस्मरणीय मोसम गतवर्षी बंगळुरूकडून चांगली कामगिरी करता आली नव्हती . अशा परिस्थितीत यंदा दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह 555 धावा केल्या , त्यामुळे हा मोसम माझ्यासाठी अविस्मरणीय होता ; असे मत वॉटसनने मांडले . अंतिम सामन्यात पहिल्या 10 चेंडूंत मला एकही धाव करता आली नव्हती , त्यामुळे पुढील डावात किमान चेंडूमागे एक धाव करण्याचा माझा मानस होता , असेही त्याने सांगितले . वॉटसनला दुखापत झाली होती , त्याचा त्रास होत होता ; तरीही तो अंतिम सामन्यात खेळला आणि झंझावाती शतक करून संघाला जिंकून दिले . पुढील तीन - चार महिने त्याला विश्रांती आहे . त्यामुळे या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याच्याकडे चांगला वेळ असेल , असे चेन्नई संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले . विल्यम्सननेही केले वॉटसनचे कौतुक अंतिम सामन्यात उभारलेली 178 ही धावसंख्या विजयासाठी पुरेशी होती . खेळपट्टीवर चेंडू थोडासा थांबूनही येत होता . पहिल्या पाच - सहा षटकांमध्ये आम्ही पकडही मिळवली होती , पण शेन वॉटसनने आमच्या हातून सामना हिरावला , असे सांगून हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने वॉटसनच्या खेळीचे कौतुकही केले . संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करून पराभूत झाल्याचे दुःख आहे . पण झुंझार खेळ केल्याचेही समाधान आहे , असे तो म्हणाला .
2
बडोद्याविरुद्धचा सामना अनिर्णित राखण्यात यश ; स्वप्निल सिंग सामनावीर बडोदा : सलामीवीर ऋतुराज गायकवाडने झळकावलेले झुंजार शतक व इतर फलंदाजांकडून त्याला मिळालेली योग्य साथ यामुळे महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटात बडोदाविरुद्धचा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले . बडोद्याने विजयासाठी दिलेल्या ४६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्राने दुसऱ्या डावात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या . पहिल्या डावात ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करणाऱ्या व सामन्यात एकूण सात बळी मिळवणाऱ्या बडोद्याच्या स्वप्निल सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले . बुधवारच्या ३ बाद ३६७ धावांवरून पुढे खेळताना बडोद्याने विष्णू सोलंकी १७५ धावांवर बाद होताच डाव घोषित केला . पहिल्या डावात ९९ धावांची खेळी करणारा युसूफ पठाण दुसऱ्या डावात १६ धावांवर नाबाद राहिला . दुसऱ्या डावात ८२ . ४ षटकांत बडोद्याने ४१० धावांचा डोंगर उभारला . प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राने दमदार सुरुवात केली . ऋतुराज व चिराग खुराना यांनी पहिल्या गडय़ासाठी ८१ धावांची भागीदारी केली . चिराग ३६ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार अंकित बावणेने बाद होण्यापूर्वी ४० धावांचे बहुमूल्य योगदान देत बडोद्याचा विजय होणार नाही , याची काळजी घेतली . ऋतुराजने १६ चौकार व एका षटकारासह नाबाद ११८ धावांची खेळी केली . विशेष म्हणजे त्याने तब्बल २६६ मिनिटे ( चार तास , १६ मिनिटे ) खेळपट्टीवर ठाण मांडल्याने सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकला . बडोद्यासाठी स्वप्निलने दुसऱ्या डावातील दोनही गडी गारद केले . संक्षिप्त धावफलक बडोदा ( पहिला डाव ) : ८३ . ४ षटकांत सर्वबाद ३२२ महाराष्ट्र ( पहिला डाव ) : ८९ . २ षटकांत सर्वबाद २६८ बडोदा ( दुसरा डाव ) : ८२ . ४ षटकांत ५ बाद ४१० ( डाव घोषित ) महाराष्ट्र ( दुसरा डाव ) : ६७ षटकांत २ बाद २१७ ( ऋतुराज गायकवाड नाबाद ११८ , अंकित बावणे ४० ; स्वप्निल सिंग २ / ५९ ) . सामनावीर : स्वप्निल सिंग ( बडोदा ) विदर्भ कर्नाटक सामना अनिर्णित नागपूर : यंदाच्या हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या गतविजेत्या विदर्भाला अद्याप विजयी सूर गवसला नाही . फलंदाजीत बलस्थान असलेल्या विदर्भाचा दुसरा सामनाही अनिर्णित ठरला . पहिल्या डावात कर्नाटकाच्या देगा निश्चल आणि आर . शरथने शानदार शतक ठोकून विदर्भाच्या अडचणीत भर टाकली . मात्र , दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यात विदर्भाच्या फलंदाजांना यश आले नाही आणि कर्नाटकाला १५८ धावांचे विजयी लक्ष्य दिले . मात्र , चौथ्या दिवसअखेर कर्नाटकाने ७६ धावा करत सामना अनिर्णित ठरवला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुणांची कमाई करत विदर्भाला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळवले . संक्षिप्त धावफलक विदर्भ ( पहिला डाव ) १०२ . २ षटकांत सर्वबाद ३०७ ( वसीम जाफर ४१ , गणेश सतिश ५७ , श्रीकांत वाघ ५७ ; जगदीशा सूचिथ ४ / ३३ , अभिमन्यू मिथून ३ / ५३ , ) वि . कर्नाटक ( पहिला डाव ) १३४ षटकांत सर्वबाद ३७८ ( श्रेयस गोपाल ३० , आर . शरथ १०३ , विनयकुमार ३९ ; आदित्य सरवटे ५ / ९१ , अक्षय वखरे २ / ९३ , आर . संजय २ / २३ ) विदर्भ ( दुसरा डाव ) ८६ . १ षटकांत सर्वबाद २२८ ( वसीम जाफर नाबाद २१ , गणेश सतिश ७९ , अपूर्व वानखेडे ५१ ; जगदीशा सूचिथ ५ / ७० , एम . प्रसिद २ / ५८ ) कर्नाटक ( दुसरा डाव ) ३३ षटकांत ६ बाद ७६ ( रविकुमार समर्थ ३० ; आदित्य सरवटे ४ / २४ ) .
2
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या दोघांनीही त्यांच्या रलेशनशिपला पूर्णविराम द्यायचं ठरवलं आणि त्यांच्या या निर्णयाचा परिणाम आगामी चित्रपटावर झाला . अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावर रणबीर - कॅटच्या ब्रेकअपचा परिणाम झाला . पण , सरतेशेवटी या दोन्ही कलाकारांनी दिलेल्या शब्दाखातर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं . अशा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे . मोरक्कोमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आल्याचं पाहताक्षणी लक्षात येतं . मोरक्कोमधील पार्श्वभूमीच्या बळावर प्रदर्शित झालेलं ‘उल्लू का पठ्ठा’ हे गाणं येत्या काळात अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग होईल असं म्हणायला हरकत नाही . अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या या गाण्याची चालही अगदी सुरेख आहे . मुख्य म्हणजे रणबीर - कतरिनाने या गाण्यावर धरलेला ठेका पाहण्याजोगा आहे . अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्यातून रणबीर - कतरिनाची केमिस्ट्रीही सुरेख आहे . मुख्य म्हणजे या गाण्यात बॉलिवूडच्या या दोन आघाडीच्या कलाकारांपैकी इतरही पाहुणे कलाकार पाहण्याची संधी मिळत आहे . हे कलाकार म्हणजे विविध प्राणी . ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही बऱ्याच प्राण्यांची झलक पाहायला मिळालेली . आता ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्यातही जिराफ , झेब्रा , ऑस्ट्रीच , शेळ्या हे प्राणी पाहायला मिळत आहेत . या गाण्यामधील दृश्य आणि रणबीर - कॅटच्या चेहऱ्यावरील भाव पाहता चित्रपटाच्या कथानकाविषयी फार काही अंदाज लावता येत नाहीये . पण , गाण्याच्या सुरुवातीलाच आमिरच्या ‘हम है राही प्यारके’ या चित्रपटातील ‘बम्बई से गई पुना…’ या गाण्याची आठवण होत आहे . या गाण्यातील सुरुवातीप्रमाणे ‘उल्लू का पठ्ठा’चीही सुरुवात करण्यात आल्यामुळे हा निव्वळ योगायोगाचा भागच म्हणावा लागेल . दरम्यान , ‘जग्गा जासूस’मधून रणबीरच्या भूमिकेतून एक वेगळ्याच रुपातील निरागस हेर पाहायला मिळणार आहे . १४ जुलै रोजी रणबीर - कतरिनाच्या रुपात बॉलिवूडचे हे क्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . वाचाः … या अभिनेत्यांचं नक्की वय तरी काय ?
0
घे पंगा म्हणत सुरु झालेल्या प्रो - कबड्डी स्पर्धेचं पाचवं पर्व आता जवळ आलं आहे . अतिशय अल्पावधीत या स्पर्धेने संपूर्ण भारतीय खेळाडूंच्या मनावर आपलं गारुढ केलं . महाराष्ट्राच्या रांगड्या मातीत खेळणाऱ्या मराठी तरुणांना या स्पर्धेने सुपरस्टार बनवलं , देशाच्या प्रत्येक घराघरांत आज प्रत्येक जण प्रो - कबड्डीची वाट पाहत असतं . महाराष्ट्राच्या यू मुम्बा आणि पुणेरी पलटण या संघानी आतापर्यंत या स्पर्धेत आपली छाप पाडली आहे . मात्र देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुमचे लाडके खेळाडू यंदा तुमच्यासाठी खास रांगड्या मराठमोळ्या वेशात तुम्हाला भेटायला येणार आहेत . गेले काही वर्षे बॉलिवूडमध्ये तारे - तारकांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या वृषाली चव्हाण या कोरिओग्राफरने या सर्व खेळाडूंना एकत्र आणलं आहे . पाचव्या पर्वासाठी प्रो - कबड्डीच्या मराठी प्रोमोचं पुण्याच्या शनिवारवाडा येथे चित्रीकरण करण्यात आलं आहे . मराठी अभिनेता अंकुश चौधरीने या प्रोमोची झलक आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे . ”आम्ही कबड्डीचे वारकरी” या थीमवर यंदा प्रो - कबड्डीच्या प्रोमोचं चित्रीकरण करण्यात आलं आहे . या चित्रीकरणाचा अनुभव वृषाली चव्हाणने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला . ”सिनेमात तारे - तारकांना नाचायला शिकवणं एकवेळ खूप सोप्प असतं . मात्र खेळाडूंना एखाद्या गाण्यावर नाचायला शिकवण्याची ही माझी पहिलीच वेळ होती . गाणं आणि प्रोमो शूट करण्यामागे बराच फरक आहे . काही मोजक्या सेकंदांमध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं नृत्यातून सांगायचं असतं . पण सुदैवाने सर्व खेळाडूंनी मी शिकवलेल्या प्रत्येक स्टेप्स कॅमेऱ्यासमोर जशाच्या तशा करत उत्तम परफॉर्मन्स दिला . खेळाडूंना मैदान सोडून कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करायला लावणं हे खरं अत्यंत धाडसाचं काम आहे , त्यांना अशा कामांची सवय नसल्यामुळे ते अनेकवेळा या शेड्युलमध्ये कंटाळण्याची शक्यता असते . मात्र , अनुप कुमार , काशिलिंग अडके , नितीन मदने , दिपक हुडा यांनी कोणत्याही तक्रारीला जागा दिली नााही . ” प्रो - कबड्डीच्या पाचव्या हंगामात ४ नवीन संघांचा समावेश करण्यात आला आहे . यू मुम्बाने अनुप कुमारला आपल्या संघात कायम ठेवलं आहे , तर त्याच्या जोडीला नितीन मदने आणि काशिलिंग अडके हे मराठमोळे वीर यू मुम्बात असणार आहेत . तर पुणेरी पलटणच्या संघाची जबाबदारी हरियाणाच्या दिपक हुडाकडे सोपवण्यात आली आहे . यू मुम्बाने आतापर्यंत ४ पैकी ३ पर्वांची अंतिम फेरी गाठली आहे . पुणेरी पलटण संघानेही पहिल्या पर्वातली आपली मरगळ मागे झटकत पुढच्या ३ पर्वांत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं . या आधीच्या पर्वात ‘एक नंबर महाराष्ट्राचा एक नंबर खेळ’ असं प्रमोशन केलेल्या प्रो - कबड्डीने आता ‘कारण मैदान पंढरी आणि आम्ही कबड्डीचे वारकरी’ म्हणत पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुणांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे . गेल्या काही दिवसांत नेटिजन्सनेही या प्रोमोला चांगली पसंती दिली आहे . यात मराठमोळ्या वृषालीने घेतलेल्या मेहनतीचेही तितकंच चीज झालेलं आहे . याआधी वृषाली चव्हाणने प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर फराह खान सोबत काम केलं असून आतापर्यंत तीने अनेक मराठी - हिंदी चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केली आहे .
2
‘स्लॉ’ हा सलाडचाच एक प्रकार आहे . सँडविचसोबत याची चव काही औरच असते . स्लॉमध्ये कोबी , गाजर , ढोबळी मिरची , व्हिनेगर वापरतात . परंतु इथे आपण एक वेगळा प्रयोग केला आहे . या सलाडमध्ये गोड चव असलेला मिरची सॉस वापरला आहे . याला आंबट - गोड चव असते . ही चव आणायची असेल तर भेळेत वापरलेली चिंच चटणीही वापरता येते . गोड मिरची सॉस बनविण्यासाठी १ वाटी मध , १ टेबलस्पून व्हिनेगर आणि पाच ते सहा ताज्या लाल मिरच्या चिरून मिसळाव्या . साहित्य कृती नूडल्स उकडून घ्या . त्यानंतर कोबी आणि पातीचा कांदा चिरून घ्या . नूडल्स , भाज्या एकत्र करा . त्यावर सॉस पसरवा , पुदिन्याची पाने आणि शेंगदाणे यांचे मिश्रण करा . हे नूडल्स कणकेच्या वा तांदळाच्या पिठाचे असल्यास या सलाडमधून परिपूर्ण आहार मिळू शकतो . nilesh @ chefneel . com पाककृतीसाठी लागणारा वेळ : पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1 एकूण वेळ : 1 पदार्थाचा प्रकार : किती व्यक्तींसाठी : लेखक :
1
आयपीएलच्या लिलावात तब्बल 2.6 कोटी रुपये मिळविलेला आणि वडील रिक्षाचालक असलेल्या महंमद सिराजची ट्वेंटी - 20 भारतीय संघात निवड झाली आहे . न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी - 20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने सिराजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय ) आज ( सोमवार ) न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली . जलदगती गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या महंमद सिराज याच्यासह मुंबईच्या श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आले आहे . आगामी विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआयकडून भारतीय संघाची बांधणी करण्यात येत आहे . युवा जलदगती गोलंदाज म्हणून सिराज सर्वप्रथम उजेडात आला तो सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या लिलावात त्याच्या बोलीच्या 13 पट जास्त बोली लावत 2.6 कोटी रुपयांना विकत घेतले होते . त्याची आयपीएलमधील कामगिरीही उल्लेखनीय होती . सिराजने या निवडीबद्दल आपल्याला विश्वास बसत नसल्याचे म्हटले आहे . मी एवढे काही मिळवेल असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे . 2015 च्या रणजी मोसमात त्याने नऊ सामन्यांमध्ये 41 बळी घेतल्याने त्याच्यावर निवडकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले . त्यानंतर फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात त्याचे आयुष्यच बदलून गेले . सिराज हा लहानपणी टेनिसच्या चेंडूवर गल्ली क्रिकेट खेळत होता . तीन वर्षांपूर्वी त्याचा आईने त्याला क्रिकेटमध्ये विशेष लक्ष देण्यास सांगितले अन् त्याने क्रिकेटमध्ये आपली रुची दाखविली . हैदराबादचा असलेल्या सिराजने चारमीनार क्रिकेट क्लबमधून खेळण्यास सुरवात केली . सर्वप्रथम तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला . तेथे 10 बळी मिळविल्यानंतर त्याने रणजीत पदार्पण केले . तेथेही 41 बळी घेतल्यानंतर आज तो भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करत आहे . सिराजचे वडिल रिक्षाचालक असून , एका सामान्य कुटुंबातील तरुणाने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे .
2
पायाचा घोटा दुखावला असला तरीही आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील एकेरीच्या सामन्यांपर्यंत तंदुरुस्त होऊन पदके जिंकण्याची मला खात्री आहे , असे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी . व्ही . सिंधूने सांगितले . गोपीचंद अकादमीत सराव करीत असताना सिंधूचा उजवा पाय दुखावला . मात्र तिच्या हाडाला किंवा स्नायूंना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर तिला दिलासा मिळाला आहे . वैयक्तिक सामने सुरू होण्यास अद्याप थोडा कालावधी असल्यामुळे तोपर्यंत मी शंभर टक्के तंदुरुस्त होईन , असे सिंधूने सांगितले . सिंधूची सहकारी सायना नेहवालने २०१०मध्ये या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते . २०१४मध्ये सिंधूला उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिशेली ली हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता . त्यामुळे सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते . ‘‘गेल्या चार वर्षांमध्ये माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे . मी भरपूर पदके जिंकली आहेत . त्यामध्ये ऑलिम्पिक , जागतिक व ऑल इंग्लंड स्पर्धेतील रौप्यपदकांचा समावेश आहे . या दोन्ही स्पर्धामध्ये मला अंतिम फेरीत निसटता पराभव स्वीकारावा लागला होता . तीन गेम्सपर्यंत लढत झाल्यानंतर कौशल्याची अपेक्षेइतकी उंची गाठता येत नाही हे माझ्या लक्षात आले आहे . त्यावर मी आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे , ’’ असे सिंधूने सांगितले . ‘‘आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेतेपदासाठी मी दावेदार मानली जात आहे . त्याचप्रमाणे चाहत्यांना माझ्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे , याची मला पूर्णपणे कल्पना आहे . त्यामुळेच क्षमतेच्या शंभर टक्के इतके कौशल्य दाखवत अजिंक्यपदाचे स्वप्न साकार करण्याचे माझे ध्येय आहे . तिथेही मला कॅनडा , इंग्लंड व ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे आव्हान असणार आहे . प्रत्येक सामन्यानुसार व्यूहरचना ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल . जर सामन्याच्या वेळी शंभर टक्के तंदुरुस्ती दाखवली तर विजय मिळवणे सोपे असते याची मला कल्पना आहे , ’’ असेही सिंधूने सांगितले .
2
ख्राइस्टचर्च ( न्यूझीलंड ) - न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकताना इंग्लंडने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली आघाडी २३१ धावांपर्यंत वाढवली . तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे तीन षटके आधी खेळ थांबविण्यात आला . तिसऱ्या दिवशी खेळ थांबविण्यात आला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद २०२ धावा केल्या होत्या . कर्णधार ज्यो रुट ३० , तर डेविड मलान १९ धावांवर खेळत होता . इंग्लंडची सामन्यावर पूर्ण पकड असली , तरी उद्या इंग्लंड आपली आघाडी किती वाढवणार आणि न्यूझीलंडसमोर किती धावांचे आव्हान ठेवणार हा औत्सुक्याचा भाग राहणार आहे . तिसऱ्या दिवशी जेम्स विन्स आणि मार्क स्टोनमन यांनी इंग्लंडची आघाडी वाढवली . चहापानानंतर न्यूझीलंडला या दोघांना बाद करण्यात यश आले ; मात्र हे दोन्ही खेळाडू आपल्या पहिल्या शतकापर्यंत पोचू शकले नाहीत . स्टोनमन ६० , व्हिन्स ७६ धावांवर बाद झाला . सलामीचा फइलंदाज ॲलिस्टर कूकला ( १४ ) या वेळीही सूर गवसला नाही . त्यापूर्वी कारकिर्दीत सोळाव्यांदा डावात पाच गडी बाद करताना स्टुअर्ट ब्रॉडने न्यूझीलंडच्या डावाला २७८ धावांवर पूर्णविराम दिला . वॉल्टिंगने सर्वाधिक ८५ धावा केल्या . डावाच्या अखेरीस टीम साऊदीने ( ५० ) देखील अर्धशतक झळकावले . नील वॅगनर आणि ट्रेंट बोल्ट यानी काहीशी आक्रमक फलंदाजी केल्याने न्यूझीलंडला पहिल्या डावात पावणे तीनशेची मजल मारणे शक्य झाले . संक्षिप्त धावफलक इंग्लंड ३०७ आणि ३ बाद २०२ ( मार्क स्टोनमन ६० , जेम्स व्हिन्स ७६ , ज्यो रुट खेळत आहे ३० , टीम साऊदी २ - ३८ ) वि . न्यूझीलंड २७८ ( बीजे वॉल्टिंग ८५ , ग्रॅंडहोम ७२ , टीम साऊदी ५० , स्टुअर्ट ब्रॉड ६ - ५४ , जेम्स अँडरसन ४ - ७६ )
2
पारुपल्ली कश्यपने जपान सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत मुख्य फेरीत वाटचाल केली . मात्र मुंबईकर तन्वी लाडचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले . पात्रता फेरीच्या पहिल्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडू ऑस्ट्रियाच्या डेव्हिड ओबर्नोस्टइरने माघार घेतल्याने कश्यपला विजयी घोषित करण्यात आले . दुसऱ्या लढतीत कश्यपने डेन्मार्कच्या आंद्रेस अँटोन्सनवर २१ - १८ , २१ - १२ अशी मात केली . दोन विजयासंह कश्यपने मुख्य फेरीत आगेकूच केली . मुख्य फेरीत त्याचा मुकाबला भारताच्याच किदम्बी श्रीकांतशी होणार आहे . प्रणॉय , बी . साईप्रणीत हेही मुख्य फेरीत नशीब आजमवणार आहेत . तन्वी लाडला गाशा गुंडाळावा लागला . जपानच्या चिसाटो होशीने तन्वीला १९ - २१ , २१ - १८ , २१ - ९ असे नमवले . सायना नेहवाल आणि पी . व्ही . सिंधू या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाहीत . तन्वीच्या पराभवामुळे मुख्य फेरीत महिला एकेरीत भारताचा कोणीही प्रतिनिधी नाही .
2
‘कुछ तो गडबड हे दया…’ , ‘तोड दो दरवाजा…’ हे सीआयडीचे डायलॉग्ज लोक आजही आवडीने बोलतात . सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ देखील भरपूर मोठ्या फॅन आहेत . विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा ‘अंड्या चा फंडा’ देखील याच धाटणीचा असल्यामुळे , लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली . नुकतेच या सिनेमाचे ‘गोष्ट आता थांबली’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले . विशेष म्हणजे लता दिदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचे गाणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून , हे भाग्य ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाच्या टीमला लाभलं आहे . आदर्श शिंदेच्या आवजातले हे गाणे क्षितीज पटवर्धन याने लिहिले असून , याला अमित राज याने ताल दिला आहे . वाचा : अखेर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील पोपटलाल अडकणार लग्नाच्या बेडीत ? रहस्य आणि शोध कथा लिहिण्यास विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी याने या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे , हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल , असा अंदाज वर्तवला जात आहे . महत्वाची गोष्ट म्हणजे , खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात , आणि त्यामुळेच त्यांनी ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला . याप्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर , शुभम परब , मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती . लाता दीदींनी या सर्वांना शुभाशिर्वाद देत सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छादेखील दिल्या . बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे . तसेच पटकथा आणि संवाद अंबर हडप , गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा लोकांना आपल्या जवळच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे . वाचा : तैमुरमुळे करिना - सैफमध्ये फुटलं नव्या वादाला तोंड ?
0
स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या लोकप्रिय मालिकेत एक नवीन ट्विस्ट आला आहे . या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी आता ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे . अल्लड , अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे . अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत उलगडली आहे . या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं . उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे . त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण होऊ लागलं आहे . मात्र , सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही . तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे . या मालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे . वाचा : मराठी बिग बॉसच्या घरात ‘खंडोबा’ ? सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली , ”शतदा प्रेम करावे’ची कथा खूपच रंजक आहे . अभिजित साटम , अमिता खोपकर , प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत . त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला . सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत . त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल . या भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे . स्टार प्रवाहच्या ‘अग्निहोत्र’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या मालिका मी नियमितपणे पहायचे . ‘शतदा प्रेम करावे’चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं . स्टार प्रवाहबरोबर काम करायला मिळावं अशी इच्छाही होतीच . ‘शतदा प्रेम करावे’ च्या रुपानं ती पूर्ण होत आहे . यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार . ’ उन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे . सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे .
0
मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे माजी प्रशिक्षक सर अलेक्स फर्ग्युसन यांना शनिवारी मध्यरात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . मेंदूतून रक्तस्राव होत असल्याने त्यांच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली आहे . फर्ग्युसन उपचाराला योग्य प्रतिसाद देत असून त्यांना अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे युनायटेड क्लबने आपल्या निवेदनातून म्हटले आहे . फर्ग्युसन यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी याकरिता फुटबॉल विश्व प्रार्थना करत आहे . ‘‘फर्ग्युसन यांची प्रकृती स्थिर असून त्यांना अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे , ’’ असे क्लबने आपल्या निवेदनात म्हटले आहे . दरम्यान , फर्ग्युसन यांच्या कुटुंबीयांनी याबाबत बोलणे टाळले . चेशायर येथील राहत्या घरी ७६ वर्षीय फर्ग्युसन यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि मेंदूतून रक्तस्राव सुरू झाला . त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले . फर्ग्युसन यांच्या प्रकृतीमुळे युनायटेड चाहत्यांसह खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे . फर्ग्युसन यांनी कट्टर वैरी आर्सेन वेंगर यांच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथील अखेरच्या लढतीत उपस्थिती लावली होती . इतकेच नव्हे तर त्यांनी वेंगर यांना भेटवस्तूही दिली होती . त्या वेळी आनंदित असलेल्या फर्ग्युसन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याने फुटबॉल विश्व चिंतेत आहे . स्पेनचा गोलरक्षक डेव्हिड डी गी , इंग्लंडचा मिचेल कॅरिक यांनी फर्ग्युसन यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली . फर्ग्युसन यांच्यामुळे आज जगातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो या वृत्तामुळे पूर्णपणे हादरला आहे . त्यानेही सरांसाठी प्रार्थना केली . फर्ग्युसन यांनी २०१३ नंतर मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदावरून निवृत्ती घेतली होती . जवळपास २७ वष्रे त्यांनी युनायटेड क्लबला मार्गदर्शन केले . निवृत्तीनंतरही ते युनायटेडच्या लढती पाहण्यासाठी मैदानावर जातीने हजर असायचे . त्यांच्या निवृत्तीचा पाचवा वाढदिवस मंगळवारी आहे . ब्रिटिश फुटबॉल इतिहासात सर्वात यशस्वी प्रशिक्षक असलेल्या फर्ग्युसन यांनी ४९ जेतेपदाचे चषक उंचावले आहेत . अलेक्स सरांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो . अलेक्स यांच्या आजारपणाचे वृत्तदेखील न पचविण्यासारखे आहे . या वृत्ताचाही फुटबॉल क्षेत्रावर अनिष्ट परिणाम जाणवत आहे . – मॅसिमिलानो अलेग्री , युव्हेंटसचे प्रशिक्षक मला चिंता वाटत आहे . त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांबाबत सतत डोक्यात विचार घोंघावत आहेत . फर्ग्युसन यांच्या इच्छाशक्तीवर मला पूर्णपणे विश्वास आहे आणि ते लवकरच बरे होतील . – आर्सेन वेंगर , आर्सेनल क्लबचे प्रशिक्षक सर अलेक्स रुग्णालयात असल्याचे ऐकून मी कोसळलो . माझ्या भावना आणि प्रार्थना त्यांच्या व कुटुंबीयांच्या सोबत आहेत . तुम्ही लवकरच बरे व्हा बॉस . – मिचेल कॅरिक , मँचेस्टर युनायटेडचा कर्णधार सर अलेक्स लवकरच बरे व्हा . मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो . – वेन रुनी , इंग्लंडचा माजी खेळाडू माझ्या भावना आणि प्रार्थना तुमच्यासोबत आहेत . – ख्रिस्तियानो रोनाल्डो , रेयाल माद्रिदचा खेळाडू
2
बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ हृतिक रोशन लवकरच एका चरित्रपटात दिसणार आहे . ‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असेल . यामधील आनंद कुमार यांच्या भूमिकेसाठी आधी अक्षय कुमारच्या नावाची चर्चा होती . मात्र , आता त्याच्याऐवजी हृतिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . विकास बहल या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत . चित्रपटात नाव अद्याप निश्चित झालं नसून ‘सुपर ३०’ हेच नाव ठेवण्यात येईल असं म्हटलं जात आहे . पाटणा येथील आनंद कुमार यांच्या संघर्षाचं चित्रण यामध्ये करण्यात येईल . आपल्या देशात अनेकांकडे गुणवत्ता आहे , बुद्धिमत्ता आहे , शिकण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करण्याची तयारीही आहे . मात्र , त्यांना चांगले मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळत नाही . अशा मुलांसाठी आनंद कुमार यांनी ‘सुपर ३०’ हा प्रकल्प साकारला . वाचा : ‘यूनीब्रोमुळे’ या व्यक्तीही झाल्या प्रसिद्ध हृतिक रेहान आणि रिधान या आपल्या दोन मुलांसोबत अमेरिकेत फिरायला जाणार आहे . तिथून परत आल्यानंतर तो या चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे . ‘काबिल’च्या शूटिंगनंतर त्याच्याकडे या चित्रपटाची स्क्रिप्ट दिली गेली आणि भूमिकेविषयी बराच विचार केल्यानंतर त्याने होकार दिला . हृतिक पहिल्यांदाच एखाद्या चरित्रपटात काम करणार आहे . अनेक दिग्दर्शकांना आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवायचा होता . अनेकांनी त्यासाठी त्यांची परवानगी मिळवण्याचाही प्रयत्न केला होता . मात्र , त्यांनी सर्वांना नकार दिला होता . अखेर त्यांचा होकार मिळवण्यात दिग्दर्शक विकास बहल यांना यश मिळालं आणि आता या चरित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात होणार आहे .
0
ख या नकारात्मक भावना या प्रकृती ढासळत असल्याचे निदर्शक असतात , असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे . अमेरिकेतील पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे , की नकारात्मक भावनांनी शरीरातील जैवसंवेदक जास्त प्रमाणात उद्दीपित होऊन वेदनामय अनुभूती वाढत असते . नैराश्यामुळे प्रकृतीवर परिणाम होताना पेशींचा नाश होतो . सततच्या शारीरिक वेदना निर्माण होऊन हृदयरोग , मधुमेह व कर्करोग यांसारखे विकार बळावण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते . ब्रेन , बिहॅवियर व इम्युनिटी या नियतकालिकात म्हटले आहे , की नकारात्मक भावनांचा शरीरावर परिणाम बघताना प्रामुख्याने शारीरिक वेदनांचा विचार केला जातो . रोजच्या जीवनातील भावना व त्या अनुषंगाने होणारे शारीरिक त्रास या बाबतची माहिती विशिष्ट कालावधीसाठी नोंदवण्यात आली होती . त्यात व्यक्तींना स्वमूल्यमापन करण्यास सांगण्यात आले होते , अशी माहिती पेन स्टेट विद्यापीठाचे संशोधक जेनीफर ग्रॅहम एंजलँड यांनी दिली . त्यानंतर या व्यक्तींच्या रक्तातील संवेदकांची माहिती घेण्यात आली . आठवडाभरातील नकारात्मक भावना व विचार यामुळे शरीरातील वेदना वाढलेल्या दिसून आल्या . यात प्रश्नावली व तपासणी या दोन्ही तंत्रांचा वापर करण्यात आला असून , त्याच काळातील सकारात्मक भावना असलेल्या व्यक्तींमध्ये वेदनांचे प्रमाण कमी दिसून आले . हा प्रयोग पुरुषांवर करण्यात आला ही त्याची मर्यादा आहे .
1
विविध विषयांवरील नवनवीन माहिती मिळविण्यासाठी गुगलचा सर्रास वापर केला जातो . मात्र , गुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर अधिक ताण पडून स्मृतिभ्रंशाचा धोका वाढत असल्याचा इशारा ब्रिटनमधील संशोधकांनी दिला आहे . संशोधकांकडून सध्या स्वतःवरच प्रयोग सुरू आहे . मेंदूच्या आरोग्यासाठी त्याला चालना देणे योग्य असले तरी सध्या इंटरनेटचा वाढता वापर काळजी वाढविणारा असल्याचे ब्रिटनमधील सेंट अँन्ड्रयु विद्यापीठातील अभ्यासक फ्रँक गन मूर म्हणाले . एखाद्या विषयाची माहिती हवी असल्यास सर्वच जण इंटरनेटचा वापर करतात . किंवा ती माहिती वाचलेली असल्यास आठवण्याचा प्रयत्न करतात , असेही निरीक्षण मूर यांनी नोंदविले . गुगलचा किंवा मेंदूला ताण देण्यामुळे स्मृतीभ्रंशाचा विकार कसा उद्भवू शकतो , याबाबतचे संशोधन सुरू असून त्याचे परिणाम शोधण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे , मूर म्हणाले . स्कॉटलंड येथील वार्षिक कार्यक्रमात बोलताना मूर यांनी याबाबतची माहिती दिली . २०१५मध्ये जगभरात स्मृतिभ्रंशाचा विकार झालेल्यांची संख्या ४५ दशलक्ष होती . १९९०च्या तुलनेत ती दोन पटींनी अधिक होती .
1
नवी दिल्ली , ता . 9 ः इंग्लंड दौऱ्याच्या अगोदर आयर्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी - 20 मालिकेसाठी निवड समितीने काल विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ जाहीर केला ; परंतु त्या वेळी त्यांनी कोहलीचा सरे या इंग्लंडमधील क्लबशी असलेल्या कराराच्या तारखा लक्षात घेतल्या नसाव्यात . त्यामुळे कोहली एकाच वेळी दोन सामने कसा खेळणार ही चर्चा रंगात आली आहे . इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कोहली जून महिन्यात सरे क्लबकडून खेळणार आहे , त्यासाठी त्याने मायदेशात होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे . भारतीय संघ निवडीनंतर आता ही नवी अडचण निर्माण झाली आहे . कोहलीला आता एक तर कौंटी सामना किंवा आयर्लंड विरुद्धचा सामना यापैकी एकाचीच निवड करावी लागणार आहे . या वेळी तो काय निर्णय घेतो , या कडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत . करार केल्यानंतर सरे क्लबने त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण जून महिन्यात तो आमच्या क्लबसाठी उपलब्ध असणार आहे , सरेचा यॉर्कशायरबरोबरचा सामना 25 ते 28 जूनदरम्यान होणार आहे ; तर भारताचे आयर्लंडविरुद्धचे दोन ट्वेन्टी - 20 सामने 27 आणि 29 जूनला होणार आहेत . सरेचा सामना पूर्ण चार दिवस चालला , तर कोहली 29 जूनच्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे . तारखांचा हा घोळ भारताचा संघ निवडताना निवड समितीच्या लक्षात कसा आला नाही , याचे आश्चर्य भारतीय क्रिकेट वर्तुळात व्यक्त केले जात आहे . कोहली आमच्या क्लबसाठी पूर्ण जून महिना उपलब्ध असेल , यादरम्यान तो तीन चॅंपियन्सशिप सामने आणि 50 - 50 षटकांचे कमीत कमी तीन सामने खेळणार आहे , असे सरेचे क्रिकेट संचालक आणि इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक ऍलेक स्टुअर्ट यांनी सांगितले .
2
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे . ज्यात गायक अभिजीत भट्टाचार्य वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत . एका टीव्ही पत्रकाराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला होता . केजरीवाल यांनी याच ट्विटला रिट्विट केले . हा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसांपूर्वीचा आहे . या व्हिडिओच्या सुरुवातीला अभिजीत हे बोलताना दिसत आहे की , ‘अरे सोडा , कुठलं स्वातंत्र्य आहे . घाणेरडा देश आहे आपला , गुलामी करणारा देश आहे… अजून काय बोलू . . ’ या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत . ‘आता अभिजीतवर देशद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही , कारण तो भाजपाचा चमचा आहे . . ’ अशा प्रकारची प्रतिक्रिया शाश्वत याने या व्हिडिओवर दिली होती . तर विनीता यांननी लिहिले आहे की , ‘अभिजीतची प्रतिक्रिया हेच दाखवून देते की कोण घाणेरडं आहे . देश की अभिजीत स्वतः…’ दुसरीकडे ‘अभिजीत न्यायव्यवस्थेपेक्षा मोठा आहे का ? तो भारताबद्दल अशी वक्तव्य करु शकतो पण त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही . ’ असा प्रश्न विनय कुमार गुप्ता यांनी विचारला . सोशल मीडियावर या बातमीला अजून महत्त्व देण्याकडे काहींनी नकार दर्शवला आहे . काही दिवसांपासून अभिजीत सोशल मीडियावर फार सक्रिय झाला आहे . आपल्या वादग्रस्त ट्विट्सवरुन तो नेहमीच चर्चेत येत असतो . यामुळे जनतेच्या रोशालाही त्याला अनेकदा सामोरे जावे लागते . एका महिला पत्रकाराला अपशब्द बोलल्याबद्दल अभिजीतच्या विरुद्ध आपची नेता प्रिती शर्मा मेनन यांनी तक्रार दाखल केली होती . काही दिवसांपूर्वी अभिजीतने ट्विटवर महिला पत्रकार स्वाती चतुर्वेदीला अपशब्द वापरले होते . जेव्हा आप नेत्या प्रिती यांच्या सोबत इतर महिलांनी अभिजीतच्या या वागण्याचा विरोध केला तेव्हा तो त्यांच्यासोबतही उद्धटपणेच बोलला . प्रितीने जेव्हा अभिजीतच्या या वर्तवणूकीबद्दल पोलिस आयुक्तांना ट्विट केले तेव्हा त्याने त्यांच्या विरोधात शिवीगाळ केली . यामुळे अभिजीतच्या विरोधात आयपीसी कलम ५०० , ५०९ आणि आयटी कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता .
0
‘बॉईज’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या , ध्येर्या – ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे . ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत , यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हि दोघे आता , ‘गोटी सोडा आणि बाटली फोडा’ म्हणत महाविद्यालयीन तरुणांना आपल्या मस्तीत शामिल करून घेत आहेत . विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’च्या धम्माल सिक्वेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेले हे गाणे , सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी मिळवत आहे . नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्यातील धमालमस्ती प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे . इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत , अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा येत्या ५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे . कॉलेज तरुणांना भुरळ पाडणाऱ्या या गाण्याचे बोल अवधूत गुप्तेने लिहिले असून उडत्या लयीच्या या गाण्याला संगीतदेखील त्यानेच दिले आहे . तसेच आदर्श शिंदे आणि रोहित राऊतने या गाण्याला स्वरसाज दिला आहे . राहुल - संजीव जोडीचे दमदार नृत्यदिग्दर्शन असलेले हे गाणे प्रेक्षकांनाही बेभान नाचवण्यास यशस्वी ठरत आहे . या गाण्याबरोबरच , सुमंत शिंदे , पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचा डबल धमाका पाहण्यासाठीदेखील त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत . शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या या तिघांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बॉईज २’ चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून , ऋषिकेश कोळीने संवादलेखन केले आहे . तसेच लालासाहेब शिंदे , राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे . शिवाय , इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखील केले जाणार आहे .
0
बॉलिवूड किंग शाहरुख खान नेहमीच त्याच्या कुटुंबाविषयी भरभरुन बोलतो . त्यातही आपल्या मुलांवर त्याचं विशेष प्रेम . छायाचित्रकारांपासून आपल्या मुलांना होणारा त्रास पाहता ही बाब निदर्शनास आणणारा शाहरुख सुहाना , आर्यन आणि अब्रामवर जिवापाड प्रेम करतो . पण , सुहानावर त्याचा जास्तच जीव . मुलीवर कोणत्याही वडिलांचा जरा जास्तच जीव असतो , या ओळीची प्रचिती शाहरुख आणि सुहानादरम्यान असणारं नातं पाहता लक्षात येत आहे . आपल्या मुलीसोबत एखाद्या मित्राप्रमाणे असणारा हा किंग खान सध्या तिचे सल्लेही ऐकू लागला आहे . पण , ती शिक्षणासाठी पुन्हा परदेशी गेली असता त्याला तिची उणीव भासू लागलीये . सुहाना नुकतीच शिक्षणासाठी पुन्हा एकदा लंडनला गेली आहे . पण , शाहरुखला मात्र आपल्या मुलीपासून दूर राहणं जमत नाहीये . कारण , त्याने ट्विट करत सुहानाची आठवण येत असल्याची भावना व्यक्त केली आहे . ‘जेव्हा तुमची मुलगी शिक्षणासाठी पुन्हा परदेशात जाते आणि बाबा तुम्ही फोटोसाठी जरा जास्तच ‘फिल्टर्स’ वापरताय असं सांगणारा कोणीच नसतं तेव्हा… . ’ असं कॅप्शन देत त्याने सुहानासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे . शाहरुखने जाणूनबुजून ‘फिल्टर’ असलेला फोटोच पोस्ट करत तो या फोटोच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे असं म्हणायला हरकत नाही . वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर दरम्यान , सुहाना सध्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत असल्याचंही म्हटलं जात आहे . काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या ऑफिसमध्ये तिने हजेरी लावली होती . त्यामुळे येत्या काळात खुद्द करण जोहर तिला चित्रपटसृष्टीत लाँच करणार असल्याचंही म्हटलं जातंय . सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणापद्दलची अधिकृत माहिती समोर आली नाहीये . पण , तिने चित्रपटसृष्टीत करिअर करावं अशीच अनेकांची इच्छा आहे . किंबहुना सुहानाने शिक्षण पूर्ण करुनच पुढचे निर्णय घ्यावेत असं मत शाहरुखने एका मुलाखतीदरम्यान मांडलं होतं .
0
घराला रंग देणं ही तशी वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया . ती तशी का असते ते समजून घेतलं तर या कामाला वेळ का लागतो आणि ते नीट , बारकाईने करणं का आवश्यक असतं ते लक्षात येतं . रंगकामाचा उपयोग फक्त चांगले दिसण्यासाठी नसून त्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढते . साफसफाई करणे सोपे जाते . रंगाच्या अचूक निवडीने तापमान नियंत्रित करता येते अशा काही गोष्टींकडे आपण लक्ष वेधले . पूर्वीच्या काळी िभतीला जरा कुठे टेकून बसले की कपडय़ांना , केसांना रंगाची पांढरी भुकटी हमखास लागायची . अगदी चिडचिड होऊन जायची . पण सध्या रंगांच्या गुणवत्तेत लक्षणीयरीत्या फरक पडला आहे . पाहिजे ती छटा , पाहिजे तो पोत , हवे ते डिझाइन , पाहिजे तेवढी चकाकी रंगामध्ये आपण आणू शकतो . त्यामुळे घरात एकदा का रंगकाम सुरू झाले की छोटय़ांपासून मोठ्ठय़ांपर्यंत सगळे हिरिरीने चच्रेत भाग घेतात . हा रंग तयार तरी कसा होतो ? कुठल्याही रंगात तीन मूळ घटक असतात . पहिला म्हणजे बाइंडर , दुसरा थिनर आणि तिसरा पिगमेंट . बाइंडर हा कुठल्याही रंगाला बांधून ठेवायचे काम करतो . याची एक पातळ फिल्मच कुठल्याही रंगावर तयार होते . एखाद्या रंगाची तकाकी , त्याचा टिकाऊपणा , मजबूतपणा हा त्यामध्ये वापरलेल्या बाइंडरवर अवलंबून असतो . बरेच वेळा हा बाइंडर रेसिनने ( नसíगक रेसिन झाडाच्या आतील जाड चिकट द्रव्यापासून करतात तर कृत्रिम रेसिन हे रासायनिक प्रक्रिया करून बनवतात ) बनवलेला असतो . आता थिनरचे मुख्य काम असते रंगाला योग्य प्रमाणात पातळ करून बाइंडरचा चिकटपणा अॅडजेस्ट करणे . जेणेकरून कुठल्याही पृष्ठभागावर रंगकाम चांगल्या तऱ्हने , पक्के बसेल . रंगाचा प्रवाहीपणा , तो लावताना हाताची व ब्रशची सुलभरीत्या होणारी हालचाल ही थिनरच्या प्रमाणावर अवलंबून असते . आता या झाल्या रंगाला कार्यशील बनवणाऱ्या गोष्टी . पण आपल्याला सर्वात आनंद देणारी , डोळ्याला सुखावणारी गोष्ट म्हणजे पिगमेंट . ज्यामुळे आपल्याला पाहिजे तो नािरगी , पिवळा , जांभळा रंग तयार होऊ शकतो . अशा या तीन घटकांमुळे व त्याच्या योग्य प्रमाणामुळे एखादा रंग चांगला आहे की नाही हे ठरते . आता रंगकाम सुरू करण्यापूर्वी काय खबरदारी घ्यायला पाहिजे ? एक म्हणजे ज्या भिंतींवर रंग लावणार आहोत त्या भिंती पूर्णपणे कोरडय़ा आहेत की नाही याची खात्री करून घेणे . पाण्याचा थोडादेखील अंश असेल तर आधी वॉटरप्रूिफग करून तो भाग पूर्ण कोरडा झाल्यावरच रंगकामाला सुरुवात करावी . त्याचबरोबर भिंतीवर हलकेच हातोडा वगरे ठोकून कुठे प्लास्टर सल झालेय किंवा निघाले नाहीये ना हे बघावे . तसे असल्यास गवंडीकाम आधी करून साताठ दिवस प्लास्टरला सुकायला पुरेसा वेळ देऊन ( क्युिरग ) मग रंगकाम सुरू करावे . प्रत्यक्ष रंगकामाची प्रक्रिया फार वेळखाऊ असते . आधी सॅण्डपेपरने केलेली घिसाई , मग लांबी - पलटी , परत घिसाई , मग प्रायमर , मग रंगाचा एक हात , तो सुकल्यावर दुसरा हात . . डोळ्यांत प्राण आणून आपल्या आवडीचा रंग आपल्या खोलीला कसा दिसतोय याची आपण प्रतीक्षा करीत असतो . . पण दुर्दैवाने या सर्व प्रक्रियेत आपल्याला कुठलाच शॉर्टकट वापरता येत नाही , कारण चांगल्या रंगकामासाठी या सगळ्याच प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे असते . सॅण्डपेपरने भिती किंवा ज्यावर रंगकाम करायचे आहे तो पृष्ठभाग घासणे जरुरीचे आहे , कारण त्यामुळे त्यावर साचलेली धूळ , पोपडे निघून जाऊन तो भाग गुळगुळीत होतो . लांबी करणे जरुरीचे आहे कारण या पेस्टने भिंतीमधील बारीक खाचखळगे भरून यायला मदत होते . सगळा पृष्ठभाग समांतर दिसतो . आता प्रायमर का जरुरी आहे तर , लांबीच्या गुणधर्मामुळे ! कारण लांबीवर टाकलेला द्रवपदार्थ ती लगेच शोषून घेते . आता लांबीवर जर आपण डायरेक्ट रंग मारला तर लांबी असमानरीत्या कुठे कमी , कुठे जास्त असा रंग शोषून घेईल . त्यामुळे रंगाचे असमान डाग भिंतीवर तयार होतील . आणि याच कारणामुळे लांबीवर प्रायमर मारणे जरुरीचे आहे . कारण प्रायमर हे एक असे अस्तर आहे की जे लावल्याने रंग एकसमान लागायला मदत होते . त्याचबरोबर त्याच्या गुणधर्मामुळे रंग त्या भागाला चांगला चिकटून बसतो . लांबीच्या शोषून घेण्याच्या भोकांमध्ये प्रायमर जाऊन रंगासाठी एक संरक्षण फिल्म तयार होते . गृहसजावटीच्या इतर कुठल्याही साहित्याची इतकी जाहिरात होत नाही जेवढी रंगाची होते . हा रंग लावा , समाजात स्वतःची पत वाढवा . तो रंग लावा , मुलीकडून होकार मिळवा ! . . एक ना दोन , शंभर कारणे दिली जातात त्या त्या कंपनीचा रंग वापरण्यासाठी . पण रंग म्हणजे फक्त त्याचे वरचे आकर्षक रूप नव्हे . त्याच्यातील घटकांवर आधारित घरातल्या कुठल्या खोल्यांना कुठला रंग द्यावा हा विचार करणे आवश्यक आहे . ढोबळमानाने फरक करायचा झाला तर रंग दोन प्रकारचे असतात . एक वॉटर बेस्ड आणि दुसरे ऑईल बेस्ड . डिस्टेम्पर , इमल्शन हे रंग वॉटर बेस्ड आहेत तर इनॅमल , लस्टर , झिंक वगरे रंग हे ऑईल बेस्ड आहेत . डिस्टेम्पर हा सर्वात स्वस्त आणि पटकन लागणारा रंग आहे . घर भाडय़ाने द्यायला उत्सुक असलेल्या घरमालकांचा हा आवडता पर्याय . एक हात मारून जरा ठीकठाक दिसण्याइतपत घर केले की झाले . डिस्टेमपर किंवा व्हाइट वॉश अशा वेळी आपल्या कामी येतो . वर सांगितल्याप्रमाणे िभतीला टेकून बसले की केसांना - कपडय़ाला लागणारा रंग हा याचाच भाऊ . पण इतक्या वर्षांत डिस्टेम्परमध्ये बरीच सुधारणा झाली आहे . पहिल्याइतका तो आपल्यापाठी लागत नाही . पण वॉटर बेसचा दुसरा पर्याय - इमल्शन पेंट यापेक्षा डिस्टेम्पर हा कमी टिकाऊ , कमी फिनििशग देणारा आहे . त्यामुळे गृहसजावाटीत त्याचा वापर जरा कमीच केला जातो . वॉटर बेस्ड इमल्शन हा सध्याचा उत्तम पर्याय आहे . आधी प्लॅस्टिक मग अॅक्रालिक अशा त्याच्यामध्ये सुधारणा होत गेल्या . डिस्टेम्परपेक्षा इमल्शनला जास्त श्रीमंती झाक येते . त्यामुळे सध्या त्याची चलती आहे . यामध्ये असलेल्या घटकांमुळे कुठल्याही सरफेसवर हा घट्ट बसतो . या रंगावर पडलेले डाग आपण सौम्य साबणाच्या पाण्याने आरामात धुऊ शकतो . यामध्ये हजारो रंगाच्या छटा उपलब्ध असल्याने गृहसजावट करताना कुठलीच अडचण येत नाही . दिवाणखाना , बेडरूम या ठिकाणी इंटिरिअर डिझायनरची पहिली पसंती इमल्शनला असते . फक्तडिस्टेम्परपेक्षा इमल्शन हा थोडा महाग रंग आहे . आता ऑईल बेस्ड रंगामध्ये येतात इनॅमल , लस्टर , िझक वगरे रंग . ऑईल बेस्ड असल्याने यांचा उपयोग पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या जागी बहुतेक करून होतो . जसे स्वयंपाकघर , बाथरूम वगरे . पण याचा अर्थ असा नाही की घरातील बाकीच्या खोल्यांमध्ये या रंगाला मज्जाव आहे . ऑईलमुळे िभतीला आलेली चकाकी बऱ्याच लोकांना इमल्शनपेक्षा जास्त आवडते . त्यामुळे कित्येक लोक सरसकट सगळ्या घराला लस्टर पेंट लावतात . ऑईल बेस्ड इनॅमल हा लाकूड किंवा मेटलवर लावतात . त्यामुळे त्या फíनचरला एक संरक्षणात्मक कोटिंग मिळून त्याचे आयुष्य वाढीस लागते . वॉटर बेस्ड आणि ऑईल बेस्ड रंगात काही तुलनात्मक फरक करायचा झाल्यास वॉटर बेस्ड इमल्शन पेंट हे ऑईल बेस्ड पेंटपेक्षा पटकन सुकतात . त्यामुळे कामाचा वेळ बराच वाचतो . ऑईल बेस्ड रंगाचा पहिला कोट पूर्ण सुकायला सात ते आठ तास तरी द्यावे लागतात . त्यामुळे तोपर्यंत रंगारी लोक मस्त ताणून देतात आणि इथे आपलं बीपी वाढतं . पण आधीचा कोट पूर्ण सुकल्याशिवाय दुसरा कोट आपण मारू शकत नाही . कारण तसे केल्यास सुरकुत्या , डाग पडण्याची शक्यता असते . तसेच रंगाची चकाकीही कमी होते . रंगाचा एक ठरावीक डोकं उठवणारा वास असतो , तो वॉटर बेस्ड पेंटमध्ये कमी येतो . इमल्शनवर टचअप करणे सोपे असते . लस्टरवर टचअप करायचे झाल्यास पूर्ण भिंतीलाच परत रंग मारावा लागतो , ज्यामुळे परत वेळेचा व पशाचा अपव्यय होतो . घासून रगडून भिंती धुवायच्या असतील तर त्या ठिकाणी ऑईल बेस्ड पेंट जरा जास्त मजबूत , भक्कम वाटतो . जागेच्या व आपल्या गरजेनुसार रंगाचे अजूनही विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे . जसे अॅण्टी फंगल , फायर रेझिस्टन्ट , हिट रेझिस्टन्ट वगरे . त्यांचा वापर कुठे व कसा करावा , त्याचबरोबर टेक्शर पेंट , रंगाची चकाकी , रंगकामातील दोष याबद्दल माहिती पुढील लेखात जाणून घेऊ या . वैशाली आर्चिक सौजन्य – लोकप्रभा response . lokprabha @ expressindia . com
1
झोप ही औषधासारखी असते असे म्हटले जाते . रात्री मिळालेली झोप आपल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करते . मात्र , चुकीच्या अवस्थेत बराच वेळ झोपल्यास आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात . आपल्यापैकी अनेकांनी शरीराच्या एकाच भागामध्ये वेदना होत असल्याचे अनुभवले असेल . या वेदना सहसा डोके , खांदा , पोट व पाठ यांच्याशी संबंधित असतात . झोपण्याची पद्धत चुकीची असेल तर आपले शरीर त्याला विपरित प्रतिसाद देते . याचे कारण म्हणजे , बाहेरून आपले शरीर डाव्या व उजव्या बाजूला सारखेच दिसत असले तरी ते आतल्या बाजूने सारखे नसते . हृदय , पोट , मूत्राशय व आणखी काही अवयव शरीरात डाव्या बाजूला असतात . आपले हृदय , पचनक्रिया व मेंदू कसा काम करेल , हे ठरवण्यामध्ये आपल्या झोपण्याच्या दिशेची ( डावी की उजवी ) भूमिका महत्त्वाची असते . स्लीप @ १० या उपक्रमांतर्गत गोदरेज इंटेरिओने याबाबत विशेष अभ्यास केला आहे . हृदयाच्या कार्यात सुधारणा : हृदयाकडून रक्त वाहून आणणारी सर्वात मोठी धमनी ही डाव्या बाजूला असते , त्यामुळे आपण उजव्या कुशीवर झोपलो तर पृथ्वीची गुरूत्वाकर्षणशक्ती आपल्या हृदयाच्या विरुद्ध दिशेला काम करते व त्यामुळे या धमनीला रक्त वाहून नेण्यासाठी दुप्पट परिश्रम करावे लागतात . त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्यास हृदयावर फार ताण येत नाही , कारण गुरूत्वाकर्षणशक्ती रक्त वाहून नेण्याच्या क्रियेच्या विरुद्ध काम न करता या क्रियेच्या बाजूने काम करते . पचनक्रियेत सुधारणा : हृदयासारखा आपल्या शरीरातील दुसरा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे पोट . हेही शरीरात डाव्या बाजूला असते . पोटामध्ये पित्तरस असतो व त्यामुळे पचन प्रक्रियेमध्ये मदत होते . डाव्या बाजूला झोपल्याने अन्नामध्ये पित्तरस मिसळण्याची शक्यता वाढते व त्यामुळे पचन वेगाने होण्यास मदत होते , तर उजव्या कुशीवर झोपल्यास पचनाची प्रक्रिया मंदावते . अपचनाचा त्रास असलेल्या व आतड्याची हालचाल अनियमित असलेल्या व्यक्तींनी या समस्यांवर मात करण्यासाठी डाव्या कुशीवर झोपायला हवे . मेंदूला चालना : मेंदू मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कोणत्याही कुशीवर झोपल्यावर त्याच्या कार्यात कोणताही अडथळा येत नाही . परंतु , मेंदूच्या वेस्ट क्लीअरिंग सिस्टीमवर किंवा ग्लिम्फेटिक सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो . आपल्या शरीराची डावी बाजू महत्त्वाची लिम्फेटिक बाजू असते . आपल्या मेंदूमध्ये काही टॉक्सिन तयार होतात व ते लिम्फेटिक सिस्टीमद्वारे बाहेर टाकले जातात . त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणशक्तीच्या मदतीने ही प्रक्रिया अधिक कार्यक्षमपणे केली जाते . त्यामुळे डाव्या कुशीवर झोपल्याने मेंदू स्वच्छ होण्यास मदत होते . निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी , डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला प्राचीन परंपरा व आधुनिक विज्ञान यांनी दिला आहे . कारण , यामुळे शारीराची कार्ये सुधारण्यासाठी मदत होते व त्यामुळे हृदय व पोट यांच्याशी संबंधित समस्या दूर राहतात . येथून पुढे , जाणीवपूर्वक डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा . डॉ . प्रिती देवनानी , स्लीप थेरपिस्ट
1
भारतात सुमारे १० कोटी जनता मधुमेहाच्या विकाराने त्रस्त आहे . त्यामुळे आरोग्य विमा काढणाऱ्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मधुमेहग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे . मुंबई , नवी दिल्ली या महानगरांमध्ये मधुमेहाचा विकार जडलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून या शहरांमध्ये आरोग्य विमा काढणाऱ्या मधुमेहग्रस्तांची संख्याही अधिक आहे . जागतिक आरोग्य संस्थेकडून ( डब्ल्यूएचओ ) यंदाच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेह या विषयावर प्रकाशझोत टाकण्यात येत आहे . भारतात १३१ कोटी लोकसंख्येपैकी ७ . ८ टक्के लोक मधुमेहग्रस्त असल्याने डब्ल्यूएचओने भारताकडे आपले लक्ष वळविले आहे . भारतात मधुमेहग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यांचा आरोग्य विमा काढण्याकडेही कल असल्याचे लक्षात आले आहे . भारतातील तब्बल दोन लाख मधुमेहग्रस्तींनी आरोग्य विम्यासाठी दावा केला असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे . मधुमेह या आजाराकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही . मात्र २०३० पर्यंत सर्वात जास्त मृत्यूंना कारणीभूत ठरणाऱ्या जगातील सातव्या स्थानावरील या आजाराकडे आता सरकार , समूह आणि वैयक्तिक स्तरावर पण गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे आग्नेय आशियाई देशांमधील डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक पूनम सिंग यांनी सांगितले . हृदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित आजार , मधुमेह हा स्वादुपिंडातून इन्सुलीनची निर्मिती किंवा शहरांच्या विस्कळीत जीवनशैलीमुळे शरीराकडून त्याचा योग्य प्रकारे केला जात नसल्याचे समोर आले आहे . आयसीआयसीआय लोमबार्ड यांनी दिलेल्या एका अहवालानुसार , मधुमेहाशी निगडित आरोग्यविषयक दावा करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे ६० वर्ष वयोगटातील लोकांचा समावेश हा अधिक असतो , पण २०११ - २०१५च्या आकडेवारीनुसार सद्यःपरिस्थितीत वेगवेगळ्या वयोगटातील ७ हजार ९१५ लोकांनी देखील विम्याविषयक दावे केले आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून विम्याविषयक दावे हाताळणाऱ्या विमा कंपनीनुसार , २०११ साली विम्या अंतर्गत मिळणाऱ्या संरक्षणाअंतर्गत मधुमेहग्रस्त असलेल्यांपैकी विम्यासाठी दावा करणाऱ्या ४ हजार १४० ज्येष्ठांसोबतच २५ वयोगटातील २३५ जणांनी , तर २६ ते ४५ वयोगटातील आणि ४६ ते ६० वयोगटातील अनुक्रमे १ हजार ५६४ आणि ३ हजार ४३३ लोकांचा समावेश आहे .
1
आमिरचा दंगल हा सिनेमा सध्या फार चर्चेत आहे . हा सिनेमा प्रत्येक वयोगटाला आवडेल असाच आहे . दंगल सिनेमाने सलमानच्या सुलतान सिनेमालाही मागे टाकले आहे . खेळाशी निगडीत या सिनेमात आमिरने घेतलेली मेहनत दिसते . दंगल हा सिनेमा हरियाणाचे कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे . आपल्या मुलींना जागतिक दर्जाचे कुस्तीपटू बनवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत या सिनेमात दाखवण्यात आली आहे . बॉलिवूड कलाकारांपासून ते क्रिकेटर्सपर्यंत सगळ्यांनाच या सिनेमाचे कुतुहल आहे . टीम इंडियात असताना आपल्या षटकरांनी विरोधी टीमच्या नाकी नऊ आणणारा क्रिकेटपटू सेहवागनेही या सिनेमाचे कौतुक केले आहे . सेहवाग नेहमीच ट्विटरवर सक्रिय असतो . खेळाबाबत असो किंवा इतर गोष्टींबाबत तो नेहमीच काही ना काही ट्विट करतच असतो . नुकतेच त्याने या सिनेमाबद्दलही ट्विट केले आहे . सेहवागला हा सिनेमा आवडला पण त्याचबरोबर त्याने आमिरला एक सल्लाही दिला आहे . सगळ्यात आधी सेहवागने फोगट बहिणी आणि आमिरला या सिनेमासाठी धन्यवाद म्हटले आहे . पण त्यानंतर लगेच त्याला एक सल्लाही दिला आहे . सेहवागने ट्विट करत म्हटले की , सिनेमाच्या शेवटी जेव्हा तुमचे डोळे भरुन येतात तेव्हा तुमच्याकडे अंगोछा असतो पण आता तुम्ही आम्हा सर्वांना टिश्यू मोफत दिले पाहिजे . नेहमीच आपल्या ट्विट्सनी अनेकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या सेहवागने आता दंगल सिनेमावरच ट्विट केले आहे म्हटल्यावर आता या ट्विटचीही चर्चा होणारच ना… दरम्यान , शुक्रवारी भारतात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने देशात नोटाबंदीचे वातावरण असूनही चार दिवसांत तब्बल १३२ . ४३ कोटींची कमाई केली आहे . ‘दंगल’ने पहिल्या दिवशी २९ . ७८ कोटी , दुस - या दिवशी ३४ . ८२ कोटी , तिस - या दिवशी तब्बल ४२ . ३५ कोटी तर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी २५ . ४८ कोटी इतकी कमाई केली . या कमाईत तमिळ आणि तेलगूमधील व्हर्जनच्या कमाईचा आकडादेखील आहे . सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ‘दंगल’च्या कमाईचा आकडा ट्विट करून ही माहिती दिली . भारताबाहेर २१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत ६० . ९९ कोटींची कमाई केली आहे . आंतरराष्ट्रीय बाजारात ‘दंगल’ला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे . ‘दंगल’ने रविवारी ४२ . ३५ कोटी इतका गल्ला जमविला होता . आतापर्यंत कोणत्याच सिनेमाने रविवारच्या दिवसात इतकी कमाई केलेली नसल्याचे कळते . १०० कोटी क्लबमध्ये आमिरच्या ‘गजिनी’ ( २००८ ) , ‘३ इडियट्स’ ( २००९ ) , ‘धूम ३’ ( २०१३ ) , ‘पीके’ ( २०१४ ) आणि ‘दंगल’ ( २०१६ ) या चित्रपटांचा समावेश आहे .
0
आयटीआर फाइल करताना प्राप्तिकर विभागाकडे सर्व उत्पन्ने सादर करणे आवश्यक असते . या उत्पन्नांमध्ये ठेवींवर आणि बचतींवर मिळवलेले व्याज , गुंतवणुकींमधून मिळवलेले भांडवली लाभ व तोटे इ . समाविष्ट असतात . आपल्या सर्व करपात्र उत्पन्नांची माहिती देणे आवश्यक असते हे करदात्यांना माहिती असते , पण स्रोताच्या ठिकाणी कापलेल्या करापलिकडे ( टीडीएस ) असणाऱ्या उत्पन्नाची माहिती देणे त्यांच्याकडून राहून जाते . कोणत्याही उत्पन्नाची माहिती देण्याचे राहून जाऊ नये , यासाठी आयटीआर फाइल करताना लक्षात ठेवावयाची ही काही उत्पन्ने आहेत . नियत ठेवींवरील ( एफडी ) व्याज एफडी आणि आरडीवरील एका आर्थिक वर्षातील १० हजार रुपयांहून जास्त असणाऱ्या व्याजावर टीडीएस वजावट लागू होते . हे उत्पन्न करपात्र उत्पन्नाच्या मोजणीत समाविष्ट होते . मग त्या व्याज उत्पन्नातून टीडीएस वजा झालेला असो अथवा नसो . तुम्ही बँकेने दिलेल्या फॉर्म १६ ए चा किंवा फॉर्म २६ एएसचा वापर करून टीडीएसची रक्कम नक्की करू शकता . आयटीआर फाइल करताना तुम्हाला हे व्याज उत्पन्न चुकवायचे नसते . हे सहज राहून जाते , विशेषतः जेव्हा एफडी बँक लॉकरसाठी ठेवलेली असते . व्याज थेट लॉकरच्या भाड्यातून डेबिट होत असते . बचत खात्यावरील व्याज बचत खाती द . सा . ३ टक्के ते ७ टक्के व्याज उत्पन्न देऊ करतात . बचत खात्यांवर १० हजार रुपयांपर्यंत कमावलेले व्याज कलम ८० ( टीटीए ) वजावटीसाठी पात्र असते . या उत्पन्नावर टीडीएस लागू होत नाही पण आयटीआर फाइल करताना त्याची माहिती द्यावी लागते . तुम्ही अशाप्रकारचे उत्पन्न ‘इतर स्रोतांमधून उत्पन्न’ या प्रवर्गामध्ये समाविष्ट करू शकता आणि कलम ८० ( टीटीए ) अंतर्गत वजावटीचा दावा करू शकता . एनएससी गुंतवणुकीवरील व्याज नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्सवरील व्याज करपात्र असते आणि आयटीआर फाइल करताना उत्पन्न म्हणून दाखवणे गरजेचे असते . दरवर्षी कमावलेले व्याज परत गुंतवले जाते , जे कलम ८० ( क ) अंतर्गत एका आर्थिक वर्षात १ . ५ लाखापर्यंत वजावटीसाठी पात्र असते . पाचव्या वर्षी , संचयित व्याज पुन्हा गुंतवले जात नाही . म्हणून , अखेरच्या आर्थिक वर्षात कमावलेले व्याज कलम ८० ( क ) अंतर्गत वजावटीसाठी पात्र ठरत नाही आणि लागू स्तराच्या दरानुसार कर वजावटीच्या अधीन असते . प्रलंबित टीडीएस परताव्यावरील व्याज जर प्राप्तिकर विभागाने तुम्ही दावा केलेला कर परतावा पुरवण्यास उशीर केला , तर तुम्ही विहित दरानुसार परताव्याच्या रकमेवर व्याज मिळवण्यास पात्र असता . ही व्याजाची रक्कम तुम्हाला ती मिळालेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न म्हणून गणली जाते . म्हणूनच , आयटीआर भरताना तिची माहिती द्यायला हवी . पीपीएफ गुंतवणुकीवरील व्याज पीपीएफ गुंतवणुकीवर कमावलेले व्याज करामधून माफ केले जाते . परंतु , आयटीआर भरताना करमाफी असणाऱ्या उत्पन्नाच्या विभागात हे उत्पन्न दाखवणे आवश्यक असते . आयटीआर भरताना हे करमाफी असणारे उत्पन्न दाखवल्याने भविष्यात तुमचे एकूण उत्पन्न प्रस्थापित करण्यास मदत होते . चुकवू नये अशी इतर व्याज उत्पन्ने उपरोक्त व्याज उत्पन्नांखेरीज , तुम्ही टपाल खात्याच्या आरडी आणि एफडीवर कमावलेल्या व्याजांची माहिती द्यायला हवी . या उत्पन्नांवर टीडीएस लागू होत नाही . माहिती द्यावयाच्या इतर उत्पन्नांत वीज विभागाकडे दिलेल्या ठेवींवरील व्याज , बाँड इशुमधील गुंतवणुकीवरील व्याज , इ . चा समावेश होतो . परंतु , ही उत्पन्ने आयटीआर भरताना योग्य त्या शीर्षकांखाली भराल याची खात्री करा . आदिल शेट्टी सीईओ , बँकबझार
1
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्यातल्या दात्याचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं आहे . बच्चन यांनी आपण उत्तर प्रदेशमधल्या 850 शेतकऱ्यांचं कर्ज फेडत असल्याचं टम्बलर या ब्लॉगच्या माध्यमातून जाहीर केलं आहे . याआधीही महाराष्ट्रातल्या 350 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आपण योगदान दिलं होतं हे ही बच्चन यांनी नमूद केलं आहे . “आपल्या देशवासियांना काहीतरी परत देणं हे खूप समाधानकारक असतं . हे देशवासी आपल्यासाठी सगळं जीवन खर्च करत असतात . महाराष्ट्रामध्ये 44 कुटुंबातल्या 112 जणांना काही प्रमाणात मदत करता आली होती . यात अत्यंत शूर असा शहिदांचा समावेश होता . देशातल्या इतर भागांसाठीही बरच काही करायची गरज आहे . आणि ते करूच , ” असं बच्चन यांनी म्हटलं आहे . पुढे बच्चन म्हणतात , “असे 350 शेतकरी होते , ज्यांना त्यांचं कर्ज फेडता येणं शक्यच नव्हतं . त्यांनी आत्महत्या करू नये म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची कर्ज फेडली आहेत . याआधीही आंध्र प्रदेश व विदर्भातल्या शेतकऱ्यांना सहाय्य केलं होतं . आता उत्तर प्रदेशमधल्या 850 जणांची यादी आलीय . त्यांच्या डोक्यावर 5.5 कोटी रुपयांचं कर्ज आहे , जे ते फेडू शकत नाहीयेत . संबंधित बँकेच्या सहकार्यानं हे कर्जही फेडण्यात येईल , ” बच्चन यांनी आश्वस्त केलं आहे . केबीसी कर्मवीरमध्ये सहभागी झालेल्या अजित सिंह यांनादेखील मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय . “उद्याच अजित सिंहला मदत पोच होईल . तो केबीसी कर्मवीरमध्ये होता . जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या महिलांसाठी तो काम करतो . अत्यंत घृणास्पद अशा या गुन्ह्याविरोधात लढण्यासाठी त्याला मदत करण्यात येत आहे , ” बच्चन म्हणतात .
0
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात संघनिवडीवरुन निर्माण झालेलं वादळ काही केल्या शमण्याचं नाव घेताना दिसतं नाहीये . चांगल्या कामगिरीच्या निकषावर रोहित शर्माला संघात जागा मिळाली असल्याचं विराट कोहलीने स्पष्ट केल्यानंतर विरेंद्र सेहवागने विराटवर चांगलाच निशाणा साधला आहे . चांगली कामगिरी हा निकष लावयचा असेल तर , सेंच्युरिअनमध्ये विराट कोहली अपयशी ठरल्यास त्याने स्वतःहून संघाच्या बाहेर पडावं . अनेक माजी खेळाडूंसह सेहवागनेही दुसऱ्या कसोटीत भारताच्या संघनिवडीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे . केप टाऊन कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला संघाबाहेर करत रोहित शर्माला संघात जागा दिली . विराट कोहलीच्या या निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केली . अनेक माजी खेळाडूंनी भारताचा हा निर्णय संपूर्णपणे चुकीचा असल्याचं बोलून दाखवलं होतं . यानंतर सेंच्युरिअन कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने , अंतिम ११ जणांमध्ये अनाकलनिय बदल केले . पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन इशांत शर्माला संघात जागा दिली गेली . याचसोबत शिखर धवनलाही विश्रांती देऊन लोकेश राहुलला संघात सलामीवीराच्या जागी बढती देण्यात आली . अवश्य वाचा – शिखर धवन बळीचा बकरा , दुसऱ्या कसोटीच्या संघनिवडीवर सुनिल गावसकरांची बोचरी टीका “केवळ एका कसोटी सामन्यात अपयशी झाल्यामुळे विराटने शिखर धवनला संघाबाहेर बसवलं . भुवनेश्वर कुमारला विश्रांती देऊन इशांत शर्माला संघात जागा देण्याचा निर्णय तर समजण्याच्या पलीकडचा आहे . त्यामुळे याच निकषाच्या आधारावर सेंच्युरिअन कसोटीत विराट कोहली अपयशी ठरला तर आगामी कसोटीत त्याने स्वतःहून संघाबाहेर पडावं . ” इंडिया टुडे या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवाग बोलत होता . दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या साहाऐवजी पार्थिव पटेलला संघात जागा देण्याचा निर्णय वगळता या कसोटीत भारताची संघ निवड पुरती फसली आहे . इशांत शर्माला संघात जागा देताना भुवनेश्वर कुमार ऐवजी शमी किंवा अन्य गोलंदाजाला संघाबाहेर करता आलं असतं , सेहवागने आपलं परखड मत मांडलं . अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत , विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर केप टाऊन कसोटीत भारताला ७२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता . यानंतर सेंच्युरिअन कसोटीच्या पहिल्या दिवशी आफ्रिकन फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं . अखेर रविचंद्रन आश्विनच्या फिरकीने तिसऱ्या सत्रात आफ्रिकन फलंदाजांना धक्के दिले . याचसोबत भारतीय क्षेत्ररक्षकांच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारताने अखेरच्या सत्रात सामन्यात पुनरागमन केलं .
2
भूक न लागणे हा प्रकार बहुतेक सर्वांबरोबरच कधी ना कधी होतो . काही दिवसांसाठी असं होणं हे सामान्य आहे मात्र अनेक दिवस भूक लागत नसेल तर नक्कीच तो चिंतेचा विषय आहे . भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात . अगदी शारिरीक जडणघडणीपासून ते मानसिक कारणामुळेही भूकेवर परिणाम होतो . भूक न लागण्याच्या समस्येकडे जास्त काळ दूर्लक्ष केल्यास शरिरावर त्याचे दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात म्हणूनच जाणून घेऊयात भूक न लागण्याची कारणे काय असतात आणि त्यासंदर्भात काय करता येईल याबद्दल… ताणतणाव जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण असेल किंवा तुम्ही तणावाखाली असल तर शरिरात एड्रेनालाईन नावाचे संप्रेरक स्त्राव मोठ्या प्रमाणात होतो . ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि पचनक्रीया मंदावते . त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही . औषधे अनेक औषधांमुळे कमी भूक लागते . प्रतिजैविके ( अॅण्टीबायोटिक्स ) , अॅण्टीफंगल्स , आणि स्नायू शिथिलतेसंदर्भातील औषधांमुळे भूक कमी होते . साध्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही डिप्रेशन , मायग्रेन , उच्च रक्तदाब , अनेक वर्षांपासूनचे आजार , फुफ्फुसांसंदर्भातील आजार आणि पार्किन्सन संदर्भातील औषधे घेत असाल तर तुमची भूक मरते . सर्दी ताप तुम्ही आजारी असताना शरिरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा जास्त वापर होत असतो . यामुळे अधिक अशावेळेस शरिरामध्ये सायटोकीन्स नावाच्या रसायनाचा स्त्राव होतो . त्यामुळे भूक कमी लागते किंवा लागतच नाही . मात्र अशा परिस्थितीमध्ये भूक न लागणे हे इंडिकेशन असते की शरिराला आरामाची गरज आहे . मात्र आजारी असताना अधूनमधून थोडं खालल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते . वय वढत्या वयाबरोबर भूकदेखील मंदावते . यामागे अनेक कारणे असतात असे आपण म्हणू शकतो . पचनक्रीया मंदावल्याने थोडेसे खाल्ले तरी बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते . तसेच पदार्थांकडे पाहून , त्यांच्या सुगंधाने अवेळी लागणारी भूक असा प्रकार वयस्कर लोकांच्या बाबतीत होत नाही . संप्रेरकांचे प्रमाण बदलणे , आजारपण , औषधे अशा अनेक कारणांने वय वाढत असताना भूक मंदावते . मधुमेह मधुमेहावर वेळीच नियंत्रण न मिळवल्यास रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढल्याने रक्त वाहून नेणाऱ्या नसांवर परिणाम होऊ शकतो . अशावेळेस सर्वाधिक ज्या नसांवर परिणाम होतो त्यापैकी एक नस म्हणजे पोटातील स्नायूंना रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करणारी व्हेगस नर्व्ह . कोणत्याही कारणाने या नसेच्या कार्यावर परिणाम झाल्यास अन्ननलिकेतून अन्नपदार्थ सामान्य गतीने पुढे सरकरण्यास अडथळा निर्माण होतो . त्यामुळे भूक कमी लागते . दारु जास्त प्रमाणात दारु प्यायल्याने भूक कमी लागते . भूक लागण्यासंबंधीची रासायनिक प्रक्रिया दारुच्या सेवनाने मंदावते . त्यामुळे अधिक प्रमाणात दारु प्यायल्यास भूक कमी लागते .
1
दागिन्यांची जिला खरीखुरी आवड असते तिला त्यात भरपूर वैविध्य हवं असतं . कुंदन वर्कचे दागिने , सोन्याचे दागिने , मोत्याचे दागिने यांच्याबरोबरीने सध्या बोहोमियन पद्धतीच्या दागिन्यांची चलती आहे . लग्न समारंभाचे दिवस जवळ येत आहेत . या दिवसांत खरेदीची रेलचेल चालू झालेली असते . काय काय आऊटफिट्स घ्यावे , त्यावर कोणत्या अॅक्सेसरीज घ्याव्यात हा विचार सतत सुरू असतो . कुंदन वर्क केलेले दागिने , सोन्याचे दागिने , मोत्याचे दागिने या नेहमीच्या प्रकारांव्यतिरिक्त हल्ली भरपूर दागिने बाजारात उपलब्ध आहेत . याबद्दलचा आजचा लेख . केवळ मोती , सोने किंवा हिऱ्यांसारख्या पारंपरिक दागिन्यांना छेद देत डिझायनर्स सध्या बोहो पद्धतीचे दागिने तयार करताना दिसतात . केवळ वेस्टर्न आऊटफिट्स नाही , तर साडय़ा , लेहेंगा , अनारकली सूट्स या सगळ्यांवर ते शोभून दिसतात . सोने , चांदी , हिरे , मोती अशा मौल्यवान धातूंपासून बनविलेले , अत्यंत नाजूक , सुंदर कलाकुसर केलेले दागिने म्हणजे खरे दागिने अशीच दागिन्यांबद्दल सर्वसामान्य संज्ञा प्रचलित आहे ; पण या साचेबद्ध संज्ञेपलीकडे जाऊन काळपट दिसणारे , भरगच्च , लांबीला मोठाले दिसतील असे रंगीबेरंगी स्टोन्स , चिवटेबावटे गोंडे यांनी सजलेल्या ज्वेलरीला सध्या खूपच मागणी आहे . या दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरी म्हटले जाते . पारंपरिक दागिन्यांना बोहेमिअन ज्वेलरीचा पर्याय उपलब्ध झाला आहे . बोहेमियन ज्वेलरीचे मोटिव्हज हे फॅशनच्या बंडखोरीमधून आलेले आहेत . कोणताही ट्रेण्ड न स्वीकारता बोहेमियन ज्वेलरी बनवली जाते . तिचा वापर करून अत्यंत क्लासी लुक मिळतो . भौमितिक आकार , वेगवगेळे लहानमोठे स्टोन्स , कधीही वापरात नसतील असे काळपट डल रंग , भरपूर साखळ्या किंवा पातळ चेन्स आणि रस्ट लुक यांचा वापर करून बोहेमियन ज्वेलरी बनवली जाते . बोहो चोकर ठुशीप्रमाणे गळ्यालगत असलेले बोहो चोकर्स सध्या खूप लोकप्रिय आहेत . त्याला कधी गोंडे किंवा स्टोन्स जडवलेले असतात , तर कधी केवळ रस्ट लुक असलेले चोकर्स तुम्हाला बघायला मिळतील . ब्रॉड नेक असलेला आऊटफिट वापरणार असाल त्या वेळी तुम्ही बोहो चोकर वापरू शकता . बोहो चोकर घालणार असाल त्या वेळी बन असलेली कोणतीही हेअर स्टाइल तुम्ही करा . त्यामुळे चोकर उठून दिसेल . नाही तर मोकळ्या केसांमुळे चोकर लपून राहण्याची शक्यता आहे . बरोबरीने एखादे लहानसे कानातले तुम्ही टीम अप करा . एखादी टिकली लावा . त्यामुळे तुम्हाला क्लासी लुक मिळेल . बोहो इयिरग्स लहान , मोठय़ा किंवा ओव्हरसाइज अशा पद्धतीने बोहो इयिरग्स तुम्हाला उपलब्ध होतील . हँिगग किंवा स्टडस् या दोन्ही प्रकारांतील बोहो इयिरग्स तुम्ही वापरू शकता . शर्ट ब्लाऊज , कॉलर ब्लाऊज , क्लोज्ड नेक ड्रेस अशा आऊटफिट्सवर तुम्ही स्टड्स पद्धतीचे बोहो इयिरग्स घालू शकता . काही वेळा बोहो इयिरग्स गोल्ड रस्ट रंगात उपलब्ध होतात . तुमच्या आऊटफिटला साजेसे इयिरग खरेदी करा . हँिगग बोहो इयिरग्ज तुम्ही ओपन नेक ड्रेसेस , ऑफ शोल्डर आऊटफिट्स , कोल्ड शोल्डर आऊटफिट्स यावर वापरू शकता . हँिगग इयिरग्जमध्ये स्टोन्स जडवलेले आढळून येतील . लहान - लहान स्टोन्स , चेन्स यांचाही वापर हँिगग बोहो इयिरग्जमध्ये होतो . गोंडे व टॅसल्सचा वापर हँिगग बोहो इयिरग्जमध्ये होतो . कुर्तीज , हेवी दुपट्टा , अनारकली सूट्स अशा आऊटफिट्सवर हे बोहो इयिरग्ज खूपच उठावदार दिसतात . हेअरस्टाइल करताना इयिरग्जमधील प्रत्येक एलिमेंट दिसेल याची काळजी घ्यावी . बन , केसांच्या वेण्या अशा पद्धतीने हेअरस्टाइल तुम्ही करा . सोबत परफेक्ट आय मेकअप करा . आणि पहा तुम्ही कशा सगळ्यांमध्ये उठून दिसताय ते . बोहो नेकपिसेस सध्या वेगवेगळ्या पद्धतींचे बोहो नेकपिसेस उपलब्ध आहेत . त्यात सिंगल चेनचे नेकपिसेस किंवा काही पदराचे नेकपिसेस उपलब्ध आहेत . हे नेकपिसेस नाजूक नसतात , तर काहीसे ओबडधोबड प्रकारात आढळतात . मोठे पेण्डंट , साखळी , गोंडे , टॅसल्स , स्टोन्स , भौमितिक आकार यांचा वापर नेकपिसेसमध्ये होतो . सिंगल चेनमध्ये किंवा काही पदरांमध्ये हे नेकपिसेस उपलब्ध असतात . लेयिरग पद्धतीमध्येही हे नेकपिसेस उपलब्ध आहेत . कॉलर आऊटफिट्स , ओपन नेक आऊटफिट्स , क्लोज्ड नेक आऊटफिट्स , ऑफशोल्डर्स किंवा कोल्ड शोल्डर आऊटफिट्सवर असे नेकपिसेस खूप छान दिसतील . त्याचा रस्ट लुक तुम्हाला क्लासी लुक मिळवून देईल . बोहो नेकपिस घालणार असाल तर त्यावर इयिरग्स घालू नका . ते चांगलं दिसणार नाही . तुमच्या आऊटफिटला शोभून दिसेल अशाच पद्धतीने बोहो नेकपिसेस वापरा . सटल लुक ठेवा . लहान बोहो अॅक्सेसरीज बोहेमियन अंगठी , हेडचेन्स , नोजपिन्स , अँकलेट्स , ब्रेसलेट्स या अॅक्सेसरीज तुमच्या आऊटफिटवर खूपच खुलून दिसतील . फक्त त्या व्यवस्थित टीम अप करणे आवश्यक आहे . त्याच्या जोडीला परफेक्ट मेकअप तुमचा लुक उठावदार करण्यास मदत करेल . स्मोकी आइज लुक बोहो ज्वेलरीवर खूपच उठावदार दिसतो . काही टिप्स - बोहो ज्वेलरी वापरताना ती व्यवस्थित टीम अप करा . - एकाच वेळी सगळ्या अॅक्सेसरीज वापरू नका , त्यामुळे लूक भडक दिसेल . - अँकलेट्स तुम्ही कधीही वापरू शकता . - एकमेकांपासून दूर असलेल्या अॅक्सेसरीज एका वेळी तुम्ही घालू शकता . म्हणजेच बोहो इयिरग्स आणि बोहो ब्रेसलेट किंवा बोहो हेडचेन आणि बोहो नोजपिन असे कॉम्बिनेशन खूप छान लुक मिळवून देतात . - स्मोकी आइज बोहो लुकसाठी परफेक्ट आहेत . आऊटफिट आणि बोहो ज्वेलरी यांचा योग्य ताळमेळ साधून तुम्ही छान लुक मिळवू शकता . response . lokprabha @ expressindia . com सौजन्य – लोकप्रभा
1
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे . मुख्य प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर रमेश पोवारची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे . खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता . जोपर्यंत तुषार अरोठेंच्या जागी योग्य व्यक्तीची निवड होत नाही तोपर्यंत रमेश पोवारकडे जबाबदारी असणार आहे . मिळालेल्या माहितीनुसार , वरिष्ठ खेळाडूंसोबत असलेल्या मतभेदामुळे तुषार अरोठे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं . तुषार अरोठे यांच्या कोचिंग पद्धतीवर खेळाडू नाराज होते . भारतीय महिला संघाच्या टीम कॅम्पला २५ जुलैपासून बंगळुरुत सुरुवात होत आहे . रमेश पोवार या कॅम्पमध्ये सहभागी होईल . दरम्यान बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून अर्ज करण्यासाठी २० जुलै अंतिम तारीख आहे . जबाबदारी मिळाल्याचा मला आनंद असून , माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन असं रमेश पोवारने म्हटलं आहे . ४० वर्षीय रमेश पोवार भारतासाठी दोनच कसोटी सामने खेळला आहे . दोन सामन्यात त्याने सहा विकेट्स घेतले होते . याशिवाय त्याने ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत . प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रमेश पोवारची कामगिरी उत्तम होती . त्याने १४८ सामन्यात ४७० विकेट्स घेतल्या आहेत .
2
आपल्या फटकेबाजीने समोरच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी करणाऱ्या क्रिकेटच्या देवाने आज ४५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे . तब्बल २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा मराठमोळ सचिन तेंडुलकर हा संपूर्ण जगासाठी एक आयकॉन बनला . आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिनच्या चाहत्या वर्गात सतत वाढ होतानाच दिसते आहे . आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वन - डे आणि कसोटी सामन्यांत मिळून १०० शतकं , वन - डे क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम द्विशतक करणारा खेळाडू यासारखे अनेक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत . आज संपूर्ण जगभरातून सचिनवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे . आपल्या खास मित्रांसाठी आणि परिवारातल्या सदस्यांसाठी सचिनने एका पार्टीचं आयोजन केलं होतं . याचसोबत सचिनसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या देवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . वन - डे क्रिकेटमध्ये सचिनसोबत सलामीला येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्लाबोल करणाऱ्या विरेंद्र सेहवागसह , माजी कर्णधार सौरव गांगुली यांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत .
2
‘दिल चीज क्या है’ ते ‘आजा आजा’ अशा विविध शैलीतील गाण्यांतून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपले गायकीतील अष्टपैलूत्व दाखवून दिले आहे . गेली अनेक दशकं त्या संगीत क्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहेत . सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजेच आशाताई . त्यांच्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही . त्यांच्या आवाजाने चैतन्य निर्माण होऊ शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही . केवळ गायनच नाही तर लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सादरीकरण करण्याची त्यांची अदादेखील दिलखेचक असते . वाचा : करिना नव्हे तर या अभिनेत्रींनीही केलंय गरोदरपणात काम आपण सर्वांनीच त्यांना गाणं गाताना आणि लाइव्ह कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करताना पाहिलं आहे . इतकं वय होऊनही त्या अतिशय सुंदर पद्धतीने नाचू शकतात याचा कोणी विचारही केला नसेल . पण , सोशल मीडियार काही दिवसांपूर्वी व्हारल झालेल्या व्हिडिओमध्ये याचीही प्रचिती आली . एका कार्यक्रमादरम्यान , ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील ‘आम्ही ठाकरं ठाकरं’ या गाण्यावर आशा भोसले यांनी ठेका धरला होता त्याचाच हा व्हिडिओ आहे . त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधत आहे . आशा भोसले या व्हिडिओमध्ये कमरेत साडी खोचून गाण्यावर ठेका धरताना दिसतात . विशेष म्हणजे आशाजींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर हार्मोनिअमच्या साथीने स्वतः यात गाणं गाताना दिसत आहेत . सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ बऱ्याच वर्षांपूर्वी चित्रीत केला असून , तो नक्की कोणत्या कार्यक्रमातील आहे याबाबत माहिती मिळालेली नाही . मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत आशाजींनी पार्श्वगायन केले आहे . बर्मन यांच्यापासून ते ए . आर . रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील , अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे . मराठीतही दत्ता डावजेकर - श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे . मधुबाला - मीनाकुमारीपासून ते तब्बू - उर्मिला मातोंडकर - ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे . त्यांनी मोहम्मद रफी , किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच , तसेच त्यांनी आजच्या घडीतील हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गाणी गायली आहेत . आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत . तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत .
0
घराघरांत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या लसणातील घटक विविध रोगांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . लसणामध्ये आढळणारी संयुगे आणि फ्लोरिन यांचे मिश्रण हे रक्तातील गुठळ्या आणि कर्करोगाला आळा घालण्यासाठी परिणामकारक औषध म्हणून वापरले जाऊ शकतात , असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे . शतकांपासून लसणाचा वापर नैसर्गिक औषधी म्हणून करण्यात येत आहे . लसणामध्ये आढळणारे घटक हे विविध रोग आणि आजारांविरोधात नैसर्गिक प्रतिजैविक म्हणून कार्य करीत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे . अमेरिकेतील अल्बानी विद्यापीठाच्या संशोधकांनी नैसर्गिकरीत्या लसणात आढळणाऱ्या घटकांमध्ये फ्लोरिनमिश्रित केल्यामुळे उपयुक्त जैविक प्रक्रियेत सुधारणा होत असल्याचा गृहितप्रमेय मांडला आहे . फ्लोरिन हे आवर्तसारणीमधील सर्वाधिक प्रतिक्रियाशील घटकांपैकी एक आहे . गृहितप्रमेय सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी लसूण संयुगांमध्ये बदल करीत हायड्रोजन अणूऐवजी फ्लोरिन अणू वापरले . यानंतर फ्लोरिन सुधारित संयुगांची परिणामकारकता तपासण्यासाठी कोंबडीच्या अंडय़ांचा अभ्यास केला . यामध्ये फ्लोरिन सुधारित संयुगे आणि सुधारणा न केलेली संयुगे यांची तुलना करण्यात आली . यामधील अॅन्टी एजियोजेनेसिस घटकांचा वापर कर्करोगाला आळा घालण्यासाठी होत असून अॅँटीथ्रोबोटिक घटकांचा वापर रक्तात निर्माण होणाऱ्या गुठळ्या कमी करण्यास होतो . संशोधनाअंती आढळलेल्या निकालांमध्ये सुधारित संयुगे हे जैविक प्रक्रियांमध्ये उत्तमरीत्या कार्यरत असून भविष्यात याचा विचार औषधोपचार पद्धतीच्या सुधारणेसाठी होऊ शकत असल्याचे समोर आले . फायदेशीर जैविक प्रक्रियेसाठी नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या लसूण संयुगांमध्ये सुधारणा करून औषधनिर्मिती केली जाऊ शकते असे पुरावे आमच्या संशोधनात आढळले असल्याचे अल्बानी विद्यापीठातील एरिक ब्लॉक यांनी सांगितले . हा अभ्यास मॉलेक्यूल्स या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे .
1
अनेकदा लॅपटॉप बराच वेळ चार्ज केल्यानंतरही लगेच डिस्चार्ज होतो . त्यामुळे महत्वाचे प्रेझेन्टेशन किंवा काम असल्याने लॅपटॉप चार्ज होताना काम करावे लागते . अशाप्रकारे लॅपटॉप चार्ज होताना काम करणे धोकादायक ठरु शकते . म्हणूनच आम्ही सांगत आहोत लॅपटॉपची बॅटरी जास्तीत जास्त काळ टिकवण्याच्या काही खास टिप्स… > स्मार्टफोनप्रमाणे लॅपटॉपमध्येही स्क्रीनमुळे मोठ्या प्रमाणात बॅटरी ड्रेन होते . त्यामुळेच लॅपटॉपच्या स्क्रीनचा ब्राईटनेस कमी ठेवावा . जर लॅपटॉपच्या कीबोर्डचा वापर होणार नसेल तर कीबोर्डची बॅकलाईटही बंद करु शकतो . व्हिडिओ किंवा सिनेमा पाहताना कीबोर्ड बॅकलाईट बंद करु शकता . कीबोर्ड लाईट बंद करण्यासाठी Start > > Control Panel > > windows mobility center > > click icon Keyboard Brightness on Set as off / on / dim keyboard backlight . > यूएसबी पोर्टच्या माध्यमातून कनेक्ट केलेल्या डिव्हाइसमुळेही बॅटरी पटकन डिस्चार्ज होते . त्यामुळे काम झाल्यानंतर माऊस , पेनड्राइव्हसारखे डिव्हाइस डिस्कनेक्ट करावेत . त्यामुळे बरीच बॅटरी वाचते . > लॅपटॉप जास्त गरम झाल्यास तो थंड करण्यासाठी लॅपटॉपमधील इंटर्नल फॅन्स जास्त वेगाने फिरतात . त्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीचा वापर होतो . अनेक लॅपटॉपचे कुलिंगपॅड्सही लॅपटॉपच्या बॅटरीवरच काम करतात . त्यामुळे लॅपटॉप थंड जागी ठेवावा . खास करुन लॅपटॉपचा बेस म्हणजेच खालचा भाग हवेशीर जागी असेल याची काळजी घ्यावी . त्यामुळे लॅपटॉप गरम झाला तरी तो नैसर्गिक हवेने थंड होतो किंवा त्यामधील उष्णता बाहेर पडण्यासाठी जागा उपलब्ध होते आणि ती उष्णता साठून न राहिल्याने इंटर्नल फॅन्सवरील ताण कमी होतो . वाचाः मोबाईलमधले काँटॅक्ट्स उडालेत ? असे करा रिस्टोअर > विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या लॅपटॉपमध्ये बिल्ट - इन पॉवर प्लॅन सेटिंगचा पर्याय उपलब्ध असतो . यामधून तुम्ही लॅपटॉपच्या काही विशिष्ट भागांना कधी बॅटरीचा पुरवठा बंद करायचा हे ठरवू शकता . हा पर्याय वापरून तुम्हाला डिस्प्ले तसेच हार्ड डिस्क किंवा यूएसबी पोर्टला होणारा बॅटरीचा पुरवठा बंद करता येतो . > बॅटरीशी संबंधित अनेक अॅप्लिकेशन उपलब्ध आहेत . हे अॅप्लिकेशन्स बॅटरीबद्दलची सर्व माहिती तुमच्या होम स्क्रीनवर उपलब्ध करुन देतात . यात बॅटरी कधी चार्ज केली ती किती वेळ चालेल कशासाठी ती सर्वाधिक वापरली जात आहे अशी बरीच माहिती समजते . या माहितीनुसार आपण लॅपटॉपच्या बॅटरीचा जास्तीत जास्त वापर करु शकतो . तसेच हे अॅप्स सीपीयू आणि हार्डड्राइव्हचे तापमानही सांगतात . त्यामुळे ओव्हर हिटिंग कधी होते हे समजते . याचा बॅटरीच्या सुनियोजित वापरासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो . ‘असा’ मिळवा मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा जाणून घ्या सावधान ! स्मार्टफोनच्या अती वापराने हे पाच आजार होऊ शकतात
1
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा चुकीचा वापर करण्याची शक्यता जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी गुगलने फेटाळली आहे . गुगलने स्पष्ट केलं आहे की , आम्ही कधीही असं कोणतंही तंत्र विकसित करणार नाही आहोत जे मनुष्याची हत्या करण्यासाठी किंवा हत्यार म्हणून उपयोगाला येईल . गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एका ब्लॉगमधून हे स्पष्ट केलं आहे . सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिलं आहे की , कंपनी हत्यार किंवा अन्य कोणत्या तंत्रासाठी ना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स डिझाईन करणार आहे , ना असं कोणतं काम करणार आहे ज्यामुळे लोक जखमी होतील . याशिवाय त्यांनी लिहिलं आहे की , आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करणारं कोणतंही तंत्र विकसित केलं जाणार नाहीये . सुदंर पिचाई यांनी लिहिलं आहे की , ‘आम्ही स्पष्ट करु इच्छितो की हत्यारांच्या वापरासाठी आम्ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स विकसित करत नाही आहोत . पण आम्ही दुसऱ्या क्षेत्रांमध्ये सरकार आणि लष्कराला मदत करत राहू’ . गुगल अमेरिकेसाठी अशा एका प्रोजेक्टवर काम करत आहे , ज्यामध्ये ड्रोन हल्ल्यांना एकदम अचूक करता येईल अशी चर्चा आहे . मात्र होणारा विरोध पाहता सध्या ते माघार घेण्याचा प्रयत्न करत आहेत .
1
कोणत्याही संघासाठी शिस्त अतिशय महत्त्वाची असते . याच शिस्तिचं महत्त्व आता भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे सांगणार आहे . जर कोणत्याही क्रिकेटरमुळे संघाच्या बसला उशिर होत असेल तर त्या क्रिकेटरला ५० डॉलरचा दंड भरावा लागणार आहे असा फतावा कुंबळेंनी काढला आहे . इतकच नाही तर दर चार दिवसांनी मिटिंग घेतली जाणार असून , संघातल्या प्रत्येक खेळाडूसाठी आपल्या घराचे दार कायम उघडे असेल असेही नव्या प्रशिक्षकांनी जाहिर केले आहे . भारतीय क्रिकेट संघात युवा खेळाडू अधिक आहेत . या संघाला शिस्त लावण्याच्या दृष्टीनं कुंबळेंनी नियमात काही बदल केले आहेत . कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौ - यासाठी सज्ज झालाय . फक्त संघातल्या खेळाडूंच्याच नाही तर नव्या प्रशिक्षकांनी भारतीय संघाला मदत करणा - या स्टाफच्या वेळापत्रकातही काही सुधारणा केल्यात . ‘भारतीय संघाच्या खेळाडूंना कोणत्याही बंधनात न अडकवता योग्य ती शिस्त लावावी हे कुंबळेंचे महत्त्वाचं उद्धिष्ट आहे . कुठे बंधने आणायची आणि कुठे नाही हे कुंबळेंना ठावुक आहे . ’ अशी स्तुती देखील भारतीय संघासोबत असलेल्या एकाने केली . वेस्ट इंडिजच्या दौ - यावर निघण्यापूर्वी बंगरूळूच्या कॅम्पमध्ये काही नव्या कल्पना देखील कुंबळेंनी बोलून दाखवल्या . संघातल्या प्रत्येक खेळांडूमध्ये चांगले समन्वय राहावे यासाठी आधिच्या प्रशिक्षकांनी रावबलेली संकल्पना पुन्हा राबवण्याचा विचार कुंबळे करत आहेत . तसेच खेळाडूंना मॅचेसच वेळापत्रक हे महिनाभर आधी कळावं अशी सूचना देखील कुंबळेंनी बीसीसीआयला केलीय . लॉजिस्टीक विभागाच्या कारभारामुळे अनेकदा खेळाडूंचे लॉजिस्टीक विभागाशी खटके उडतात त्यामुळे खेळाडूंना महिनाभर आधी वेळापत्रक देण्यात यावे अशी विनंती कुंबळेंनी केलीय .
2
अभिमन्यू पुराणिकने अबू धाबी येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर किताबावर मोहोर उमटवली . हा किताब मिळवणारा तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण खेळाडू आहे . अभिमन्यूने या स्पर्धेतील नवव्या फेरीनंतर साडेपाच गुणांची कमाई करीत ग्रँडमास्टर किताब निश्चित केला . त्याने नऊ फे ऱ्यांमध्ये प्रत्युषा बोड्डा , गुओ झिआओबिंग , इंडेजिक अॅलेक्झांडर यांच्यावर मात केली तर लुपुलेस्कू , अन्तोन कोरोबोव्ह , विरिदोव व्हॅलेरी , इदानी पौउया , लुका पाईचादेझ या ग्रँडमास्टर खेळाडूंविरुद्ध बरोबरी केली . त्याला मिर्का पार्लिग्रासविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला . नवव्या फेरीत त्याने हा डाव गमावला तरीही त्याचे ग्रँडमास्टर निश्चित झाले . अभिमन्यूचे १७ वर्षे ६ महिने वय असून यापूर्वी नाशिकच्या विदित गुजराथीने १८व्या वर्षी हा किताब मिळवला होता . ग्रँडमास्टर किताब मिळविणारा अभिमन्यू हा महाराष्ट्राचा सातवा व पुण्याचा तिसरा खेळाडू आहे . अभिमन्यू हा फिडे प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे सराव करीत आहे . त्याने ग्रँडमास्टर आर . बी . रमेश , चुचेलोव , अमानोतोव , शरद टिळक यांच्या प्रशिक्षण शिबिरातही भाग घेतला आहे . तसेच त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी पूर्वतयारी म्हणून आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर , समीर कठमाळे , राकेश कुलकर्णी , अनिरुद्ध देशपांडे , चिन्मय कुलकर्णी , महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन , आंतरराष्ट्रीय महिला मास्टर आकांक्षा हगवणे यांच्याबरोबर अनेक डावांचा सरावही केला . क्रीडा मानसतज्ज्ञ देबश्री मराठे - दांडेकर यांचेही त्याला मार्गदर्शन लाभले आहे . अभिमन्यूला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने शिष्यवृत्ती दिली आहे . तो सध्या सिम्बायोसिस कॉमर्समध्ये बारावीत शिकत आहे . ग्रँडमास्टर किताबाची खात्री होती - अभिमन्यू अबू धाबी येथील स्पर्धेत ग्रँडमास्टर किताब मिळवण्यासाठी मी खूप तयारी केली होती . त्यामुळेच तेथेच हा किताब मिळेल अशी मला खात्री होती . या स्पर्धेतील सातव्या फेरीत इंडेजिक अॅलेक्झांडरविरुद्ध मिळवलेला विजय हा माझ्यासाठी निर्णायक डाव होता . साडेपाच तास चाललेला हा डाव त्याने १२७व्या चालीला जिंकला . पुण्यातील एमजे करंडक स्पर्धाची मालिका गेली तीन वर्षे आयोजित केली जात असून त्यामध्ये मी नियमित भाग घेत असतो . त्याचाही फायदा मला झाला . माझ्या या किताबामध्ये मार्गदर्शक जयंत गोखले तसेच आई - वडिलांचा मोठा वाटा आहे . आता २६०० गुणांचा टप्पा ओलांडण्याचे माझे ध्येय आहे .
2