news
stringlengths
344
19.5k
class
int64
0
2
टांझानियाचा माजी विश्वविजेता फ्रान्सिस चेका याने भारताच्या विजेंदर सिंगच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी शाब्दिक हल्ला चढविला . विजेंदरच्या चेहऱ्यावर इतका कठोर प्रहार करेन , की व्यावसायिक मुष्टियुद्ध करण्याचा विचारही पुन्हा त्याच्या मनात येणार नाही , ’ असे वक्तव्य त्याने केले . जागतिक मुष्टियुद्ध संघटनेच्या ( डब्ल्यूबीओ ) आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट गटासाठी ही लढत १७ डिसेंबर रोजी होईल . त्यासाठी दिवसाला ४० फेऱ्या कसून सराव करीत असून , याचा उल्लेख चेकाने ‘अमानवी’ असा केला . मानवी क्षमतेच्या व्याख्येत बसणार नाही इतका घाम गाळतो , असे त्याला म्हणायचे आहे . जय मसांगी त्याचे ट्रेनर आहेत . तो म्हणाला , विजेंदरने आतापर्यंत सर्व व्यावसायिक लढती जिंकल्या असतील ; पण माझ्याकडे ३०० फेऱ्यांचा अनुभव आहे . १७ तारखेला कशाचा सामना करावा लागेल याची विजेंदरला काहीही कल्पना नाही . माझे आव्हान स्वीकारण्यापूर्वी त्याने विचार केला नसावा . या गटात विजेंदर विजेता आहे . चेका ३४ वर्षांचा आहे . तो टांझानियाचा अव्वल व्यावसायिक बॉक्सर आहे .
2
निरोगी आरोग्यासाठी आठ तासांची झोप आवश्यक असल्याचे सर्वश्रुत आहे ; परंतु रोज रात्री एक तास अधिक झोपल्याने शर्करायुक्त पदार्थाचे सेवन कमी करण्यास मदत होत असून आहारात सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . लठ्ठपणा आणि चयपचयाचे रोग यासाठी झोपेच्या सवयींमधील बदल कारणीभूत असतात . यामुळे संशोधकांनी झोपेच्या वेळेत वाढ केल्याने आहारात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला . या अभ्यासात जास्त वेळ झोपल्याने शर्करेचे सेवन कमी होत असल्याचे किंग्ज महाविद्यालय लंडन येथील संशोधकांना आढळले . शर्करेसोबत कर्बोदकांचे सेवनदेखील कमी झाल्याचे संशोधकांनी नमूद केले . काही वेळ जास्त झोपल्याने शर्करेचे सेवन कमी होणे म्हणजेच आपल्या जीवनशैलीत सामान्य बदलामुळेदेखील लोक निरोगी आहाराचे सेवन करू शकतात हे सूचित करते , असे किंग्ज महाविद्यालय लंडनच्या वेन्डी हॉल यांनी म्हटले . या अभ्यासासाठी २१ जणांना निद्राविस्तार गटात सामील केले होते . त्यांच्या झोपेच्या वेळेत दीड तासाने वाढ करण्यासाठी त्यांना विशेष सल्ला देण्यात आला , तर २१ जणांच्या दुसऱ्या गटातील लोकांना झोपेच्या वेळेत बदल करण्याचा कोणताही सल्ला देण्यात आला नाही . सात दिवसांसाठी या प्रयोगात सहभागी झालेल्यांना त्यांच्या झोपेबाबत आणि आहाराबाबत नोंदी ठेवण्यास सांगितले . त्याचप्रमाणे झोपेच्या कालावधीची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या मनगटाला मोशन सेन्सर यंत्र बांधून झोपण्याच्या सूचना दिल्या . झोपेच्या वेळेत एका तासाने वाढ केल्याने निरोगी आहाराची निवड लोक करत असल्याचे आमच्या अभ्यासात आढळून आले , असे किंग्ज महाविद्यालयाच्या हया अल खातीब यांनी म्हटले . हा अभ्यास अमेरिकन जर्नल ‘क्लिनिक न्यूट्रिशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे .
1
महाराष्ट्रात हास्याला मिळाले हमखास आरक्षण , कारण महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ प्रेक्षकांना एका नव्या ढंगात सहा महिन्यांआधी भेटायला आला . या कार्यक्रमातील कल्लाकार प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी , खुसखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवत आहेत . हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच ठरतोय . कार्यक्रमातील अनेक बदलांबरोबर यामधील परीक्षक देखील बदलले ज्यांनी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली . याच कार्यक्रमातील महाराष्ट्राची लाडकी , देखणी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यांमध्ये या परिवाराचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे . याच आपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधील कल्लाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिलं . ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला . सोनालीचा वाढदिवस १८ मेला असतो . पण , त्याआधीच ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या संपूर्ण टीमने तिला सरप्राईझ दिलं . सेटवर तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता , स्टेज फुग्यांनी सजवला होता . तिचा वाढदिवस नक्कीच या टीमने खूप खास बनविला यात शंका नाही . यावर बोलताना सोनाली म्हणाली , ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचा मी आता सहा महिन्यांपासून भाग आहे जणू हा माझा परिवारच आहे असं मला वाटतं . माझ्यासाठी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या सेटवर येणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते . जसा प्रत्येकासाठी रविवार असतो तसंच काहीस माझ्यासाठी इथे या मंचावर येण असतं . माझा वाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला हे माझ्यासाठी खूप मोठ सरप्राईज होत . या मंचावर येऊन मला सकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या – छोट्या अडचणींमधून देखील आनंद कसा शोधावा हे कळलं . तसेच विनोदाचे कौतुक करण्याची माझी कुवत वाढली असे मी म्हणेन” . माझ्या वाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांनादेखील लवकरच एक सरप्राईझ मिळणार आहे” . आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली संपूर्ण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या टीमला पुण्यामध्ये पार्टी देणार आहे .
0
आरएमव्ही गुरुसाईदत्त , प्रतुल जोशी आणि हर्षिल दाणी यांनी कॅनडा ग्रां . प्रि . बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली . ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेता गुरुसाईदत्तने ऑस्ट्रियाच्या रुडिगर नेडटचा २१ - ७ , २१ - ६ असा धुव्वा उडवला . अवघ्या १८ मिनिटांत गुरुसाईने हा मुकाबला जिंकला . दुसऱ्या फेरीत त्याची लढत जोनाथन लाइशी होणार आहे . प्रतुलने कॅनडाच्या बायरॉन होलसेकवर २१ - १३ , २१ - १२ अशी मात केली . पुढच्या फेरीत त्याच्यासमोर स्कॉटलंडच्या अॅलिस्टर कॅसेचे आव्हान असणार आहे . मुंबईकर हर्षिलने कॅनडाच्या तिमोथी चियूला २१ - ११ , २१ - १४ असे नमवले . दुसऱ्या फेरीतील त्याचा प्रतिस्पर्धी व्हिएतनामच्या तिइन मिन्ह न्युगेनने माघार घेतल्याने हर्षिलला पुढे चाल देण्यात आली आहे . अन्य लढतींमध्ये एच . एस . प्रणॉयची लढत स्वीडनच्या मॅटिअस बोर्गशी होणार आहे . अव्वल मानांकित अजय जयरामसमोर सलामीच्या लढतीत कॅनडाच्या मार्टिन गियूफ्रीचे आव्हान असणार आहे . बी . साईप्रणीतचा मुकाबला तैपेईच्या कान चाओ यू याच्याशी होणार आहे . महिलांमध्ये तन्वी लाड आणि डेन्मार्कच्या ज्युली फिन इप्सेन समोरासमोर असणार आहेत . रुथविका शिवानी आणि कॅनडाच्या कायलेघ ओ डोनघी यांच्यात लढत होणार आहे .
2
विंडीजविरुद्धचा पहिला टी२० सामना भारताने ५ गडी राखून जिंकला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली . भारताच्या गोलंदाजांनाही केलेल्या माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज २० षटकात केवळ १०९ धावाच करू शकले . पण या माफक आव्हानाचा बचाव करताना विंडीजने उत्तम गोलंदाजी केली . त्याच्या वेगवान गोलांदाजांनी भारतीय फलंदाजांना नाकीनऊ आणले . विंडीजचा नवोदित गोलंदाज ओशाने थॉमस याने सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली . २१ वर्षीय थॉमसने भारतीय फलंदाजांना चांगलेच हैराण केले . त्याचा मारा प्रचंड वेगवान होता . त्याने टाकलेल्या ४ षटकांमध्ये केवळ एकच चेंडू ताशी १४० किमी वेगापेक्षा कमी होता . इतर सर्व चेंडू त्यापेक्षा हा जास्त वेगाचे होते . त्यामुळे भारतीय फलंदाजांची धावपळ झाली . या सामन्यात सर्वात जलद चेंडू टाकण्याचा पराक्रमही थॉमसने केला . त्याच्या या जलद माऱ्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने एक मजेशीर ट्विट केले . अतिवेगाच्या गुन्ह्यासाठी थॉमसला दंड किंवा शिक्षा का केली जाऊ नये ? असा सवाल केला . त्याचा हा पदार्पणाचा सामना होता . या सामन्यात त्याने ४ षटके फेकत २१ धाव देऊन दोन बळी टिपले . त्यातही महत्वाचे म्हणजे फॉर्मात असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शिखर धवन या दोघांना त्याने माघारी धाडले .
2
तळेगाव ढमढेरे ( ता . शिरूर , जि . पुणे ) : तळेगाव ढमढेरे येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाने १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय पातळीवरील सॉफ्टबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून अव्वल स्थान मिळविले असून , या संघाची राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी दिली . जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्यातर्फे गुरूवारी ( ता . ५ ) विभागीय स्पर्धेचे आय़ोजन करण्यात आले होते . सोलापूर येथील संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत अहमदनगर , सोलापूर व पुणे ( शहर व ग्रामिण ) आणि पिंपरी चिंचवड या सात संघांनी सहभाग घेतला . या स्पर्धेत पुणे ग्रामिण संघाकडून संभाजीराव भुजबळ विद्यालयाने प्रतिनिधित्व केले . या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात भुजबळ विद्यालयाने सोलापूर शहर संघाचा दोन होमरनांने पराभव केला . अंतिम सामना पुणे शहर विरूद्ध पुणे ग्रामिण यांच्यामध्ये अतिशय रोहर्षक व अटीतटीचा झाला . या सामन्यात पुणे ग्रामिण संघाकडून संभाजीराव भुजबळ विद्यालयाने एक होमरनने विजय संपादन करून राज्यपातळीवरील स्पर्धेत प्रवेश मिळविला . या संघातील सर्व खेळाडूंना शासकीय सवलती , दहावी व बारावीच्या परीक्षेत ग्रेस गुणांचा लाभ मिळणार आहे . भुजबळ विद्यालयाच्या संघात काजल देंडगे ( कर्णधार ) , दिव्या भुजबळ , प्रणाली भुजबळ , सुलभा भुजबळ , पुजा झेंडे , पूनम मारणे , साक्षी शिंदे , निकीत पवार , अक्षदा मोरे , प्रतिक्षा वडघुले , कोमल वडघुले , स्नेहा साळुंके , रूचा भुजबळ , तेजश्री घाडगे , हर्षदा भुजबळ , सुनिता काळे या खेळाडूंनी भाग घेवून विशेष कामगिरी केली . विजेत्या संघाला प्रा . किरण झुरंगे , ज्ञानेश्वर शितोळे , शालन खेडकर , राजेंद्र हंबीर यांनी खेळाचे मार्गदर्शन केले . विजयी खेळाडूंचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीरव भुजबळ , पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र भुजबळ यांनी विशेष अभिनंदन केले असून , राज्य पातळीवरील खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
2
एकेकाळी छोट्या पडद्यावर राज्य करणारा विनोदाचा बादशहा कपिल शर्मा प्रसिद्धीपासून फारच दूर निघून गेला आहे . कपिल शर्मासोबत एक सेल्फी घेता यावी किंवा त्याचा कॉमेडी शो सेटवर पाहता यावा यासाठी चाहते कितीतरी धडपड करायचे . खुद्द बॉलिवूडचे बडे सितारेही कपिलच्या कॉमेडी शोमध्ये येण्यासाठी वाट पाहायचे . अशा या विनोदाच्या राजाची अवस्था आता मात्र पुरती वाईट झालीय . अपयशी झालेला टीव्ही शो , सहकलाकारांनी फिरवलेली पाठ , पूर्वाश्रमीच्या प्रेयसीसोबत झालेले वाद या सगळ्या कारणानं अस्वस्थ झालेला कपिल गेल्या दोन महिन्यांपासून प्रकाशझोतात नाही . सोशल मीडियापासूनही त्यानं फारकत घेतली आहे . पत्रकारांना शिवीगाळ केल्यानंतर कपिलनं सोशल मीडियापासून चार हात लांब राहणंच पसंत केलं आहे . काही दिवसांपूर्वी कपिलचा एक फोटो व्हायरल झाला होता तो फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला होता . आता कपिलचे आणखी काही फोटोही व्हायरल होत आहे . अॅमस्टरडॅममधल्या सुपर मार्केटमधले कपिलचे हे फोटो आहेत . ज्यामध्ये कपिलला ओळखणं जवळपास अशक्य होत आहे . सुटलेलं पोट , डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं असा हा कपिलचा फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे . ‘गेल्या काही वर्षांपासून आपण वेगवेगळ्या कामात व्यग्र होतो . या दिवसांत तब्येतीकडे मी कधीही लक्ष दिलं नाही याचाच दुष्परिणाम आता होत आहे . पण सध्या मी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं आहे . जोपर्यंत फिट अँड फाईन होत नाही तोपर्यंत चाहत्यांसमोर येणार नाही’ असंही कपिल म्हणाला . गेल्या काही दिवसांपासून कपिल वादात सापडला होता . तसेच अपयशी झालेल्या शोमुळे नैराश्येत अडकलेला कपिल आता यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे . त्यानं या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवावं अशी प्रार्थना त्याच्या चाहत्यांनी केली आहे .
0
सरकारतर्फे लवकरच गर्भप्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात येणार आहे . लवकरच या लसीची वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये माहिती देण्यात येणार आहे . याबाबतची माहिती लोकसभेमध्ये देण्यात आली . केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी याबाबत विस्तृतपणे बोलताना सांगितले . सरकारतर्फे गर्भप्रतिबंधक लस लोकांसाठी उपलब्ध करण्यात येणार असून याची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे . प्रथम जिल्हा रुग्णालये , मग उपजिल्हा रुग्णालये , सामाजिक आरोग्य केंद्रे , प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी ही माहिती देण्यात येणार आहे . त्यांनी सांगितले की , सध्याच्या अर्थसंकल्पात गर्भनिरोधाबाबत चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात यावी म्हणून ७७६६५ . ४५ लाख इतक्या रकमेची तरतूद केली आहे . दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की , कुटुंबनियोजनामध्ये सुधारणा व्हावी म्हणून शासनाकडून नवीन उपक्रम राबविले जात आहेत . यामध्ये नवे गर्भनिरोधक जसे गर्भप्रतिबंधक लस , गर्भनिरोधक गोळ्या असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत . त्यांनी असेही सांगितले की , निरोधांची मागणी वाढावी यासाठी त्याच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत . त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमधून जनजागृती आणि नसबंदी योजनेची व्याप्ती ११ राज्यांमध्ये वाढवली आहे . आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आशा’ कामगारांकडून गर्भनिरोधासाठी घरपोच सुविधा पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे . ( टीप : ‘ आरोग्यवार्ता ’ मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘ लोकसत्ता ’ चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
हीना सिद्धू आणि जितू रायने गॅबाला विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या एअर पिस्तूल मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले . या स्पर्धा प्रकाराचा टोकियो ऑलिंपिकमध्ये समावेश होणार असला , तरी या कामगिरीची नोंद अद्याप पदक क्रमवारीत होत नाही . सुवर्णपदकाच्या लढतीत रशियाने ४ - ० अशी आघाडी घेत भारतास धक्का दिला ; पण रोनक पंडितचे मार्गदर्शन लाभलेल्या भारतीय जोडीने या पिछाडीनंतर रशियाला ७ - ६ असे चकवले . ‘‘माझी आणि जितूची अंतिम फेरीत कामगिरी कायम उंचावते . या वेळीही आम्ही हेच दाखवून दिले . अंतिम लढतीत प्रतिस्पर्ध्यांनी खूपच चांगले स्कोअर केले . सुरवातीच्या पिछाडीमुळे दडपण आले होते ; पण त्यानंतरही आम्ही यशस्वी ठरलो , याचा आनंद आहे’ , असे हीनाने सांगितले . वैयक्तिक दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत जितू ; तसेच हीनाची अंतिम फेरी थोडक्यात हुकली होती . जितू बारावा आला होता ; तर हीना नववी . मात्र या अपयशाची भरपाई दोघांनी मिश्र स्पर्धेत केली . या प्रकारातील त्यांचे हे दुसरे विश्वकरंडक सुवर्णपदक आहे . दिल्ली स्पर्धेतही त्यांनी हे सुवर्णपदक जिंकले होते . याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना त्यांनी अंतिम फेरीत रशियाच्या जोडीला ७ - ६ असे पराजित केले . भारतीय जोडीने प्राथमिक फेरीपासून हुकमत राखली . त्यांनी ४८५ गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला होता . यात हीनाचा वाटा २४२ गुणांचा होता ; तर जितूचा २४३ गुणांचा . या चुरशीच्या स्पर्धेत सर्बिया , युक्रेन आणि चीन ४८२ गुणांसह संयुक्त दुसरे आले होते . प्राथमिक फेरीत आठवे आलेल्या रशियाने अंतिम फेरीत भारतासमोर खडतर आव्हान उभे केले . अंतिम फेरीच्या टप्प्यात अव्वल क्रमांक मिळवताना भारताने ( २४० . ७ ) रशियाला ( २३९ . ८ ) मागे टाकले .
2
बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यांचा हंगाम आता सुरु झाला आहे . नुकताच लक्स गोल्डन रोज पुरस्कार सोहळा रिलायन्स स्टुडिओजमध्ये पार पडला . बॉलीवूडमधील सुंदरी आणि त्यांचे बहारदार परफॉर्मन्स यांनी पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लावले . करिना कपूर खान , कतरिना कैफ , दीपिका पदुकोण , श्रीदेवी , आदिती राव हैदरी , माधुरी या सौंदर्यवतींसह अभिनेत्यांमध्ये शाहिद कपूर , शाहरुख खान , हृतिक रोशन , अर्जुन कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांनीही उपस्थिती लावली होती . एका छताखाली इतके कलाकार आले असताना तिथे काहीच घडणार नाही असे कसे होईल ? तर बॅकस्टेज मागे घडलेली एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे . तर झाले असे की , शाहिद कपूर त्याच्या परफॉर्मन्ससाठी स्टेजमागे वाट पाहत होता . त्याचवेळी लाल रंगाचा सुंदर गाउन परिधान केलेली करिना वॉशरुममध्ये जाण्यासाठी त्याबाजूला आली . हे दोघेही पूर्वाश्रमीचे प्रियकर होते हे सर्वांनाच माहित आहे . सहसा , आपल्या आधीच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला पाहिल्यावर समोरची व्यक्ती काही हावभाव दाखवत नाही . पण , यावेळी काही वेगळेच पाहावयास मिळाले . हे दोघं एकमेकांच्या समोर येताच त्यांनी मिठी मारत एकमेकांचे अभिनंदन केले . शाहिदने करिनाचे अभिनंदन करत तिच्या येणा - या बाळासाठी खूप सा - या शुभेच्छा दिल्या . तर करिनाने आपल्या ‘उडता पंजाब’ सहकलाकार नुकत्याच झालेल्या त्याच्या मुलीसाठी अभिनंदन केले . करिना आणि शाहिद कपूर यांच्यात तब्बल तीन वर्षे प्रेमसंबंध होते . २००७ साली त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला . ब्रेक अपनंतर या दोघांनीही एकमेकांपासून नेहमीच अंतर ठेवणे पसंत केले . ते एकमेकांच्या समोर येणं टाळायचे . तसेच , एकमेकांच्या वाटेत आपण येणार नाही याची दोघही काळजी घ्यायचे . त्यानंतर , तब्बल नऊ वर्षांनी शाहिद - करिना हे त्यांच्या ‘उडता पंजाब’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी एकाच मंचावर दिसले . या चित्रपटात दोघांनी काम केले असले तरी त्यांनी एकही दृश्य एकत्र केलेले नाही . या दोघांमधील तणाव तेव्हा दिसून येत होता . पण करिनाने पुढाकार घेत यावर मौन सोडायचे ठरवले . त्यानंतर दोघांनीही चित्रपटाविषयी आणि एकमेकांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी भाष्य केले .
0
परंपरा कितीही चांगली आणि अभिजात असली तरी त्यात काळानुरूप बदल हे करावेच लागतात . किंबहुना परंपरेतील अस्सलता या बदलांमुळे नव्याने उजळून निघत असते . साहित्य , संगीत , कला आदी सर्वच क्षेत्रांत हे घडत असते . माणसांच्या सामाजिक जीवनाशी थेट संबंध असणारे फॅशन विश्वही त्याला अपवाद नाही . आपल्याकडे पारंपरिक पोशाखांमध्ये कमालीची विविधता आहे . मात्र त्या त्या काळात त्या परंपरेला नवतेची जोड दिल्यानेच त्यातील ताजेपणा कायम आहे . सध्या वस्त्रालंकार म्हणून मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा ‘लटकन’ हा त्यातलाच एक प्रकार आहे . परंपरेतील अभिजातता कायम ठेवून त्यातील तोचतोचपणा टाळण्यासाठी त्याला काळानुरूप नावीन्याची जोड दिली जात असते . कला , साहित्य , संगीत आदी सर्वच क्षेत्रांत असे बदल होत असतात . रामायण आणि महाभारत या महाकाव्यांच्या कित्येक आवृत्त्या आपल्याकडे आल्या . जुन्या चित्रपटांचे रीमेक आपण पाहतो . फॅशन विश्वातही नेमके हेच घडत असते . पारंपरिक वस्त्रालंकारातला मूळ गाभा कायम ठेवून त्यात थोडे बदल केले जात असतात . आपल्याकडे साडी , चनिया चोली , घागरा , लेहंगा , पंजाबी ड्रेस , चुणीदार असे प्रांतिक वैविध्य असलं तरीही त्यातही एक साचेबद्धता येते . मग त्यामध्ये जरा वेगळेपणा आणण्यासाठी आपण एखाद्या अॅक्सेसरीजकडे वळतो . हल्ली पारंपरिक पोशाखाला अधिक देखणेपणा आणण्यासाठी ‘लटकन’चा वापर होताना दिसून येते . छोटे छोटे मणी , लहान - मोठय़ा आकाराचे रेशमी गोंडे , घुंगरू , झुमके आणि बरेच काही या लटकनमध्ये दिसून येते . पारंपरिक पोशाखाला नवा लूक देण्यासाठी आता लटकन हा महत्त्वाचा अंलंकार झाला आहे . विशेषतः सण - समारंभांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खास कपडय़ांमध्ये ‘लटकन’च्या सजावटीला विशेष महत्त्व दिलेले दिसते . पारंपरिक पोशाखामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो साडीचा . सध्या साडीच्या पदराला व ब्लाऊजला लटकन लावण्याची फॅशन आहे . उत्सवांमध्ये ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लटकन लावून मिरवणाऱ्या मुली तुम्हाला दिसतील . ब्लाऊजला वेगळा लूक देण्याचे काम हे लटकन करत असल्यामुळे त्याच्या किमतीही बऱ्यापैकी आहेत . लटकन असलेला ब्लाऊज घातला असला आणि केस लांब असले तरी फक्त लटकन दिसण्यासाठी केस पुढे घेतले जातात . तसेच केसांची हेअर स्टाइल अशी करतात की ज्याने त्यांची महागडी किंवा स्वस्त लटकन सगळ्यांच्या नजरेत भरेल . केसांचा अंबाडा तरी घालतात किंवा बटा सोडून वर बांधले जातात . अशा प्रकारे खास लटकन मिरविण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या रचना केल्या जातात . एकंदरीत काय तर लटकन दिसायला हवी . लटकन कुठे वापरू शकता . . ? लटकनचा वापर फक्त कुर्ता किंवा ब्लाऊजवरच नव्हे तर इतरत्रही करता येतो . इतर वस्त्रप्रावरणांची शोभाही लटकनद्वारे वाढविता येते . आपल्याला हे लटकन घागरा , कुर्ता , ब्लाऊज , पदर , स्कार्फवरही वापरता येतात . लटकनमध्ये सध्या भरपूर व्हरायटी बघायला मिळते . फक्त आकारामध्येच नाही तर रंगांमध्येही वैविध्य दिसून येते . रंगांमध्ये नियॉन कलर्स मोठय़ा प्रमाणावर दिसताहेत . सध्या टी - शर्ट असो किंवा हेअर क्लिप्स सगळ्यांवर नीऑन कलरचे राज्य आहे . गेल्या वर्षी गणपतीचे पितांबरही नीऑन कलरचे पाहायला मिळाले . मग लटकनने तरी का मागे राहावे ? प्लेन अर्दी कलरच्या ड्रेसवर निऑन कलरचे लटकन . असे कॉम्बिनेशन अगदी भन्नाट दिसते . वेगवेगळ्या आकाराचे कलरफुल लटकन तुमच्या प्लेन कुर्त्यांला अगदी आकर्षक आणि फ्रेश बनवतात हे नक्की . वेस्टर्न पोशाखाला गोंडय़ांची झालर . वस्त्रलंकार केवळ पारंपरिक पोशाखापर्यंत मर्यादित न राहता आता वेस्टर्न पोशाखावरही शोभून दिसतात . सध्या बाजारामध्ये टॅझलस् म्हणजेच रंगीबेरंगी गोंडा असलेल्या कपडय़ांची गर्दी दिसून येते . टॅझलची झालर असलेले ड्रेस किंवा नाडीला गोंडा असलेले टॉप तरुणींना भुरळ घालत आहेत . तसेच कुर्ताबरोबरच मडीच्याही नेकलाइनची शोभा वाढविण्यासाठी गोंडय़ांचा वापर केला जातो . लटकन निवडताना . . बाजारात लटकनचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत . त्यामध्ये काही हलके तर काही अगदीच वजनदार असतात . त्यामुळे कोणते लटकन कुठे वापरावेत याची विशेष काळजी घावी . ब्लाऊज अगदीच भारदस्त असल्यास त्यावर जड असे हिऱ्यांचे किंवा मोत्यांचे लटकन शोभून दिसतात . तसेच घागऱ्यासाठी लटकन निवडताना चोळीच्या रंगाशी साम्य असणारे किंवा घागऱ्याच्या बॉर्डरच्या रंगाचे लटकन घ्यावेत . सध्या बाजारांमध्ये घागऱ्यासाठी मोठय़ा आकाराचे लटकन उपलब्ध आहेत . तसेच स्कार्फवर जर लटकन लावायचे झाल्यास लाइट वेटेड म्हणजेच हलके - फुलके असे रंगीबेरंगी गोंडे हा उत्तम पर्याय ठरू शकतो . कुठे मिळतील . . ? मुंबईमध्ये दादर , बांद्रा हिल रोड , तसेच गोरेगाव , बोरीवली , मालाड स्टेशन पश्चिमेला टेलरिंगचे साहित्य विक्री करणारी अनके दुकाने आहेत . १० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतचे लटकन येथील दुकांनामध्ये मिळतात . लटकनचे प्रकार . . हल्ली बाजारांमध्ये अनेक प्रकारचे लटकन उपलब्ध आहेत . त्यामध्ये रंगीबेरंगी मण्यांचा वापर करून तयार केलेले लटकन , तसेच धातूंपासून तयार केलेल्या कलाकृती , गोंडे यांसारखे अनेक प्रकार सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत . पूर्वी ब्लाऊजच्या उरलेल्या कापडापासून त्रिकोणी आकारचा गोंडा तयार करून तोच ब्लाऊच्या नाडीला लावला जात असे . आता हीच क्लृप्ती वेगळ्या प्रकारे अमलात आणून काही डिझायनर्सनी कापडाचे छोटे मोर , चिमण्या , पोपट , हत्तीच्या निरनिराळ्या आकाराचे लटकन तयार केले आहेत .
1
१ जून २०११ रोजी गरोदर माता व आजारी असणाऱ्या नवजात ( ३० दिवसांपर्यंतच्या ) अर्भकांना मोफत आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे . योजनेचे घटक * सार्वजनिक आरोग्य संस्थामध्ये प्रसूती होणाऱ्या मातांना संपूर्णतः मोफत प्रसुती सेवा पुरवली जाते . * या सेवांमध्ये मातेला मोफत औषधे व शुश्रूषा , सामान्य प्रसूती झाल्यास ३ दिवसांपर्यंतचा आहार व सिझेरियन झाले असल्यास ७ दिवसांपर्यंतचा आहार दिला जातो . तसेच मोफत निदान सेवा , रक्त पुरवठा , घरापासून दवाखान्यापर्यंत वाहतूक सेवा , संदर्भसेवांसाठीच्या वाहतूक सेवा तसेच सुट्टी झाल्यावर दवाखान्यापासून घरापर्यंत वाहतूक सेवा मोफत दिल्या जातात . * सार्वजनिक आरोग्य सेवा घेताना ‘माता व नवजात बालकांचा’ करावा लागणारा जास्तीचा खर्च वाचावा हा खरा या योजनेमागचा उद्देश आहे . या योजनेचा लाभ किमान १२० लाख मातांना देण्याचे उद्दिष्ट आहे . * आरोग्याच्या निर्देशांकामध्ये मागे पडलेल्या २१ राज्यांमधील २६४ जिल्हे विशेष लक्ष्य म्हणून निवडण्यात आले आहेत . या भागामध्ये अनुसूचित जाती व जमातींचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते . * वर उल्लेखिलेल्या वाहतूक सेवा देण्यासाठी लाभार्थी महिलांचे पत्ते , दूरध्वनी क्रमांक इ . एकत्र करून ‘माता व बालक शोध सेवा’ ( ( mother & child tracking system ) तयार करण्यात येत आहे . यामुळे लाभार्थी माता व बालकांना वाहतूक सेवा पुरविणे , लसीकरण तसेच प्रसूती पश्चात सर्व सेवा पुरविण्यासाठी या यंत्रणेचा वापर करता येईल .
1
साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत मलेशियाचे आव्हान गतविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघाला आता सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत ‘जिंकू किंवा मरू’ अशा आविर्भावातच खेळावे लागणार आहे . स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी भारताला शुक्रवारी होणाऱ्या यजमान मलेशियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक झाले आहे . या लढतीत विजय मिळवल्यास भारताला जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे . भारताने पाकिस्तानविरुद्ध ५ - १ असा दणदणीत विजय मिळवत जेतेपदाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले होते ; परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या . भारताने पाच वेळा या स्पध्रेत जेतेपदाचा मान पटकावला आहे , तर गतवर्षी त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले . रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या दृष्टीने या स्पध्रेचे जेतेपद हे भारताचे मनोबल उंचावण्यासाठी महत्त्वाचे आहे . त्यामुळे शुक्रवारच्या लढतीत याच निर्धाराने भारत मैदानावर उतरणार आहे . विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने सलग पाच विजयांची नोंद करीत १५ गुणांसह अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे . न्यूझीलंड ११ गुणांसह दुसऱ्या आणि भारत ९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे . मलेशियाविरुद्धचा विजय भारताला दुसऱ्या स्थानावर घेऊन जाऊ शकतो . मलेशियाविरुद्ध भारताचे पारडे जड वाटत असले तरी घरच्या पाठिराख्यांच्या जोरावर यजमान चमत्कार घडवू शकतात . गतवर्षी बेल्जियम येथे झालेल्या जागतिक लीग उपांत्य फेरी स्पध्रेत भारताने ३ - २ अशा फरकाने मलेशियाला पराभूत करून त्यांच्या रिओ ऑलिम्पिक प्रवेशाच्या मार्गात खोडा घातला होता . त्याचा वचपा काढण्याच्या प्रयत्नात मलेशियाचे खेळाडू असतील . यजमानांना अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतावर सात गोलने विजय मिळवणे आवश्यक आहे . ‘‘अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत , परंतु त्यासाठी मलेशियाविरुद्ध आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल . मलेशियाने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले आहे , परंतु त्यांना त्याचे निकालात परिवर्तन करण्यात अपयश आले , ’’ असे मत भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले . वेळ : सायं . ६ . ०५ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ व १ एचडी , स्टार स्पोर्ट्स ३ व ३ एचडी .
2
टेलिकॉम बाजारात सध्या जोरदार वॉर सुरु आहे . एका कंपनीने एखादी ऑफर किंवा प्लॅन जाहीर केला की लगेचच दुसरी कंपनी त्याला टक्कर देण्यासाठी आकर्षक प्लॅन जाहीर करते . सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरु असल्याचे दिसत आहे . ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत . नुकताच एअरटेलने आपला २१९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला असून तो प्रीपेड ग्राहकांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे . या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज १ . ४ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे . याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० मेसेज मोफत मिळणार आहेत . या प्लॅनची वैधता २८ दिवस असेल असेही कंपनीने स्पष्ट केले आहे . एअरटेलच्या आधीच्या १९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच हा प्लॅन असेल . मात्र या नवीन प्लॅनमध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर देणार आहे . यामध्ये एअरटेलच्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्यून्स मिळणार आहेत . ही ऑफर कंपनीच्या माय एअरटेल अॅप्लिकेशनवर तसेच वेबसाईटवर उपलब्ध आहे . पण तुम्हाला हॅलो ट्यून्स नको असतील तर तुम्ही जुना १९९ रुपयांचा प्लॅन घेऊ शकता . यामध्येही दिवसाला १ . ४ जीबी डेटा म्हणजेच २८ दिवसासाठी ३९ . ४ जीही डेटा मिळेल . तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळेल . रिलायन्स जिओच्या १४९ आणि १९८ च्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी हा नवीन प्लॅन कंपनीने बनवला आहे . १४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ . ५ जीबी ४ जी डेटा मोफत मिळतो . तसेच रोज १०० मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगही मोफत मिळते . तर १९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी रोज २ जीबी डेटा रोज १०० मेसेज आणि व्हॉईस कॉलिंगही मोफत मिळते . रिलायन्स आपल्या काही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड हॅलो ट्यून्स देत असल्याने एकअरटेलने त्याला टक्कर देण्यासाठी आपला हा २१९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला आहे .
1
मुंबई : ऑलिंपिकमधील पदक हे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचे अंतिम ध्येय असते ; पण लहान वयातच हे साध्य केलेल्या सिंधूने आता या यशाच्या पायावर पुढील पावले टाकणार असल्याचे सांगितले . जागतिक क्रमवारीत अग्रस्थान हे लक्ष्य आहेच ; पण त्याचबरोबर महिला एकेरीतील आव्हान खडतर झाल्यामुळे स्पर्धाही कठीण झाल्याचे नमूद केले . आयडीबीआय फेडरल इन्शुरन्सने दिग्गज मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांच्या साथीत क्वेस्ट फॉर एक्सलन्स कार्यक्रम सुरू केला आहे . ऑलिंपिक पदकाचे लक्ष्य बाळगलेल्या या कार्यक्रमात ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी . व्ही . सिंधू , पारुपली कश्यप , ऑलिंपियन श्रीकांत यांचाही सहभाग होता . कार्यक्रमाचे आकर्षण अर्थातच सिंधू होती . ऑलिंपिक पदकानंतर अपेक्षा तसेच जबाबदारी वाढली आहे ; पण त्या यशापासून नव्याने सुरवात करण्याचे तिने ठरवले आहे . खडतर सराव महत्त्वाचाच असतो . ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर सर्वच बाबतीत नव्याने विचार केला . आता आपल्याला इथून पुढे जायचे हे निश्चित केले . प्रत्येक वेळा सर्वोत्तम कामगिरी होत नाही . पदकामुळे आत्मविश्वास उंचावला असला , तरी त्यानंतर खूप काही बदलले आहे . माझ्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत , जबाबदारी वाढली आहे . हा जो काही पल्ला गाठला आहे , जिथे पोहोचले आहे , तिथे राहणे अवघड आहे , मात्र याचे कोणतेही दडपण घेत नाही . खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे असते . अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी सर्वोत्तम खेळ करण्याकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे असते , असे तिने सांगितले . प्रत्येक खेळाडूसाठी तसेच प्रत्येक गुणानुसार खेळात बदल करावा लागतो . विचार प्रक्रियाही महत्त्वाची ठरते . प्रत्यक्ष लढतीत काय घडत आहे , मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन कायम खेळत असते , असे सांगणाऱ्या सिंधूने जागतिक अव्वल क्रमांकाचे नक्कीच लक्ष्य आहे . पण थेट उडी मारण्याचे लक्ष्य न ठेवता प्रत्येक पायरी चढत जाणार आहे . स्पर्धा खूपच वाढली आहे . केवळ काही नव्हे तर वीस खेळाडूत चुरस तीव्र आहे . त्यामुळे प्रत्येक दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरत आहे . केवळ चीनमधीलच नव्हे तर अन्य देशातील स्पर्धकही खडतर असतात . महिला स्पर्धा जास्त खडतर झाली आहे . त्यासाठी सराव कायम महत्त्वाचा असतो . ऑलिंपिकनंतर व्यूहरचनाही बदलावी लागली . हे यश प्रोत्साहन देत राहते , असेही तिने सांगितले . भारतीय बॅडमिंटनच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा खूपशा शहरात आहेत . खेळाबाबतचा रस वाढत आहे . मार्गदर्शनाचा दर्जाही उंचावत आहे . खेळाडूंची संख्या वाढल्यावर वाढत्या स्पर्धेमुळे दर्जाही उंचावतो . माझे लक्ष्य भारतीयांनी सातत्याने सुपर सीरिज स्पर्धेत पदक जिंकावे , तसेच ऑलिंपिक जागतिक स्पर्धात यश मिळवावे हेच आहे . - पुल्लेला गोपीचंद
2
वयस्कर झालेले कोणाला आवडते ? बहुतांश जणांना आपण दिर्घकाळ तरुण दिसावे असे वाटत असते . हल्ली तर जास्तीत जास्त तरुण दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात . मग हे वाढते वय लपविण्यासाठी कधी मेकअपचा आधार घेतला जातो तर कधी आणखी काही . पण बाह्यरुपासाठी प्रयत्न करण्यापेक्षा समस्येचे मूळ शोधून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्याचा निश्चतच चांगला फायदा होतो . यासाठी आपल्या आहार - विहारात बदल करणे आवश्यक असते . आहारात काही ठराविक घटकांचा समावेश केल्यास तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसू शकता . यातही फळांचे विशेष महत्त्व असून विविध घटकांनी युक्त असणाऱ्या फळांचा आहारात समावेश केल्यास त्वचा चांगली राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो . पाहूयात नेमकी कोणती फळे आपले वय जास्त दिसू नये म्हणून फायदेशीर ठरतात . स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस आणि व्हीटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते . या घटकांमुळे तुमचे वय वाढले हे दिसत नाही . तसेच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त असतात . त्यामुळे त्याचा आहारात वापर केल्यास तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता . सफरचंद सफरचंदातील एन्झामाईन हा घटक शरीर आणि त्वचा फ्रेश ठेवण्यास उपयुक्त असतो . त्वचेला विशिष्ट टोन प्राप्त होण्यासाठीही सफरचंद फायदेशीर असते . ‘अॅन अॅपल अ डे कीप डॉक्टर अवे’ अशी प्रसिद्ध म्हण आहे . ती त्वचेच्या बाबतीतही उपयुक्त ठरते . पपई त्वचा उजळण्यासाठी पपई हा अतिशय उत्तम स्त्रोत आहे . शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठीही पपईत असणारे घटक उपयुक्त ठरतात . रोज पपई खाल्ल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या , डाग इत्यादीपासून तुमची सुटका करतात . कलिंगड कलिंगडात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी कलिंगड अतिशय उपयुक्त ठरते . शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर नकळतच तुमची त्वचा चांगली राहते . त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळेही त्वचा चांगली राहते . कीवी डेंग्यूच्या आजारावरील उपाय म्हणून वापरले जाणारे कीवी हे फळ मागच्या काही काळात भारतात विशेष प्रसिद्ध झाले . डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल , चेहऱ्यावरील सुरकुत्या यांसाठी कीवीतील अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात . या फळात असणारे व्हीटॅमिन ई आणि सी हे तुम्ही लवकर वयस्कर दिसणार नाहीत असे काम करतात .
1
आयपीएल राजस्थान रॉयलचा पूर्व मालक राज कुंद्रा आणि अभिनेता सचिन जोशी यांनी एकमेकांवर फसवणुकीचा आरोप केला आहे . राजने गेल्या वर्षी पोकर लीगची स्थापना केली होती . या लीगचा सचिनही एक भाग होता . इंडियन पोकर लीगमध्ये सचिनची टीम होती . त्याच्या टीमची तेव्हा मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती . पण या लीगमध्ये त्याने कोणतेही पैसे भरले नाही . सचिनने ४० लाखांचा एक धनादेश दिला होता , जो नंतर बाऊन्स झाला असा आरोप राजने केला आहे . सचिन जोशीने राजच्या या आरोपांना उत्तर देताना म्हटले की , राजने या लीगमध्ये गैरव्यवहर केले . या लीगमध्ये कोणती टीम जिंकणार हे त्याने आधीच ठरवले होते . जेव्हा जोशीला याबद्दल माहित पडले तेव्हा त्याने या लीगमधून काढता पाय घेतला . जोशीच्या प्रवक्त्याने सांगितले की , राज कुंद्रासोबत कोणताही करार केला नव्हता , त्यामुळे त्याला पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही . याचप्रकरणावरुन सचिन आणि राज यांच्यामध्ये ट्विटरवर वाद सुरु आहेत . दोघंही ट्विटरवर एकमेकांनावर कुरघोडी करत आहेत . राजने ट्विटरवर सचिनला उद्देशून म्हटले की , ‘सचिन जर तू टीमचा खर्च करु शकत नव्हतास तर आमच्याशी हात मिळवणी का केलीस ? जर तुला पैसे देण्यासाठी अजून वेळ हवा होता तर तू तसं बोलायला हवं होतंस . लीगमध्ये तुझ्या टीमची चर्चा झाल्यानंतर तू माघार घेतलीस . ’ राजच्या या ट्विटला उत्तर देताना सचिन म्हणाला की , ‘चोरांच्या गोष्टी खऱ्या कशा होतात हे मला नुकतंच कळलं . राज कुंद्रा पूर्ण चुकीचा आहे . त्याच्या बोलण्यात काही तथ्य नाही . तरीही त्याला खूप साऱ्या शुभेच्छा . ’
0
सापाच्या विषापासून हृदयविकारावरील प्रभावी औषधनिर्मिती करणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे . हृदयरुग्णांच्या शरीरातील रक्तस्राव रोखण्यासाठी या औषधाचा वापर करणे शक्य असल्याचे संशोधकांनी सांगितले . अँटिप्लेटलेट औषधे आणि पेशी यांच्या एकत्रिकरणातून हृद्यरोगावर उपचार करणे अधिक सोपे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे . गंभीर दुखापत झाल्यावर अँटिप्लेटलेट औषधे वापरल्याचे गंभीर परिणाम होतात . त्याचाच वेदनाशामक औषध म्हणून उपयोग करणे शक्य आहे . मागील संशोधनानुसार सापाच्या विषात ट्रोवँगलेरिक्स हे प्रथिन असते . त्यामुळे मानवी शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होण्यास मदत होते . मानवी पेशीतील रक्ताच्या गुठळ्या झाल्या नाहीत तर रुग्ण बचावणे अशक्य होते . चीनमधील तैवान विद्यापीठातील संशोधकांनी सापाच्या विषापासून तयार केलेल्या औषधामुळे हृद्यरुग्णामधील रक्तास्राव रोखून त्वरित उपचार करणे शक्य होते आणि रुग्ण बचावतो , असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे . संशोधकांनी उंदरांवर या औषधाचा प्रयोग करून पाहिला आणि त्यानंतर हृद्यरुग्णांवर त्याचा वापर करण्यात आला . या औषधामुळे उंदरामधील रक्तस्राव रोखण्यात यश आल्याचे संशोधकांनी सांगितले . हे संशोधन ‘आर्टेरिऑस्क्लेरोसिस’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे .
1
सॉफ्टबॉलमधील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आयस सॉफ्टबॉल ॲकॅडमी’तर्फे येत्या २३ ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यामध्ये सॉफ्टबॉल स्पर्धा भरविण्यात येणार आहे . अमित जोशी स्मरणार्थ या लीगचे हे नववे वर्ष असून , तीन दिवस चालणारी ही स्पर्धा एस . पी . कॉलेजच्या मैदानावर होणार आहे . देशभरातील १२ संघ ( फ्रॅंचाइजी ) या सॉफ्टबॉल स्पर्धेत सहभागी होणार असून , आंतराष्ट्रीय पाळीवरील खेळाडूंचाही यांमध्ये समावेश आहे . मुले व मुलींच्या गटामध्ये एकूण २४ सामने होणार असून , यामध्ये दिल्ली , बंगळूर , छत्तीसगड , जळगाव , मध्य प्रदेश , पुणे , नागपूर , नाशिक , ठाणे व मुंबईतील एकूण १८० खेळाडूंचा समावेश आहे . यंदाच्या वर्षी सकाळ माध्यम समूह , मोहर , सार्थक हाउसिंग , रचना लाइफस्टाइल , अमानोरा ( सिटी ग्रुप ) , कुमार प्रॉपटीज , अमित इंटरप्राइजेस , साबळे संजीवनी , बट्टो ग्रीन बॅटरीज , फ्लीटगार्ड फिल्टर्स , चॅंपियन यूपीएस आणि संजय घुले व्हेंचर्स या टीमचा ( फ्रॅंचाइजी ) चा समावेश करण्यात आलेला आहे . यंदाच्या वर्षीचा इव्हेंट हा आयपीएलच्या धर्तीवर होणार असून , ज्यामुळे खेळाडूंना एक व्यावसायिक तत्त्वावर नवीन उंची गाठण्यास मदत होणार आहे . या लीगचे मीडिया पार्टनर ‘सकाळ माध्यम समूह’ आहे . सॉफ्टबॉल स्पर्धेविषयी तरुणांना अधिक माहिती मिळावी , जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळाकडे वळावे व नवनवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे , या उद्देशाने गेली नऊ वर्षे आयस सॉफ्टबॉलतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले जाते .
2
अभिनेत्री , मॉडेल लिसा हेडन सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे . लिसा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते . विविध प्रोजेक्ट्सपासून ते अगदी नव्या लूकपर्यंत आणि आपल्या मुलासोबतच्या काही खास क्षणांपर्यंत प्रत्येक गोष्ट ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते . अस असल तरी , काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं तिल चांगलच महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे . लिसाने नुकतेचे तिच्या नव्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले . यामध्ये तिचे केस पूर्णपणे राखाडी रंगाने रंगवल्याचे दिसत आहे . खरंतर लिसा नेहमीच तिच्या लूकमध्ये नवनवे प्रयोग करताना दिसते . पण , तिचा हा राखाडी केसांमधील लूक नेटकऱ्यांच्या पसंतील पडला नाही . तिच्या प्रत्येक फोटोवर काहीजणांनी ‘तू भूत वाटते आहेस’ , अशा प्रतिक्रिया दिल्या . तर काहींनी तिची तुलना किम कार्दाशिअनसोबत केली . वाचा : अबब ! विरुष्काचे लग्न झालेल्या रिसॉर्टचे भाडे जाणून तुम्हीही व्हाल अवाक् एखाद्या भयपटातील अभिनेत्रीप्रमाणे हा नवा लूक सर्वांनाच घाबरवतोय , असे म्हणत काही नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला . तर काहींनी मात्र तिची प्रशंसा करण्याचेच सत्र सुरु ठेवले . ‘लिसा तू या लूकमध्ये खू्प छान दिसते आहेस , केसांचा हा रंग तुझ्यावर अगदी खुलून दिसतो आहे’ , असे म्हणत तिचा लूक आवडल्याचे स्पष्ट केले . आपल्या फोटोंवरील प्रतिक्रियांवर लिसा व्यक्त होणार का , हे पाहणे महत्त्वाचे ठरेल . पण , नेटकऱ्यांच्या या संमिश्र प्रतिक्रियांना गांभीर्याने घेणाऱ्यांपैकी लिसा नाही . त्यामुळे तिच्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही , असेच अनेकांचे म्हणणे आहे .
0
‘मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी’ , ‘कॉफी आणि बरच काही’ , ‘चीटर’ यांसारख्या मराठी चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारणाऱ्या अभिनेता वैभव तत्ववादी याने प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केले आहे . मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावलेल्या वैभवने बॉलीवुडमध्येही पदार्पण केले . सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीळा भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या गाजलेल्या चित्रपटात वैभवने ‘चिमाजी अप्पा’ ही अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती . त्यामुळे आत्तापर्यंत विविध भूमिका साकारणारा वैभव कोणत्या नव्या चित्रपटातून पुन्हा समोर येणार याबाबत रसिकांमध्ये बरेच कुतुहल होते . चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावरही चाहत्यांच्या गराड्यात असणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरच अवधूत गुप्तेचे दिग्दर्शन असणाऱ्या एका चित्रपटात दिसणार आहे . याबाबत वैभवने काही दिवसांपूर्वी त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन ट्विट करून माहिती दिली होती . या चित्रपटात वैभव एक वेगळीच भूमिका साकारत असून अद्याप त्याच्या चित्रपटातील लूक बद्दल आणि चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही . एका वेगळ्याच विषयावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या चित्रपटाबाबतची सर्व माहिती लवकरच प्रसारमाध्यमांसमोर येईल अशी माहिती सूत्रांमार्फत मिळाली आहे . चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीही वेगळ्या आणि हटके पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे असेही सूत्राकडून समजत आहे . ‘झेंडा’ , ‘मोरया’ , ‘एक तारा’ असे तरुणाईला साद घालणारे चित्रपट बनवणारा अवधूत गुप्ते कोणता नवीन चित्रपट सादर करणार आहे याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे .
0
सध्या ‘बिग बॉस’च्या घरात खूप काही नवीन घडत आहे . जेव्हापासून ढिंच्याक पूजाने शोमध्ये एंट्री घेतली तेव्हापासून घरातले वातावरणच बदलून गेले आहे . घरात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली पूजा चक्क प्रेमात पडली आहे . बंदिगी आणि पुनीशनंतर आता पूजा प्रेमाचा नव्याने अनुभव घेत आहे . सोमवारी प्रकाशित झालेल्या भागात हिना आणि शिल्पा यांनी पूजाला सांगितले की , लवला पूजा आवडू लागली आहे . लवच्या भावना कळल्यानंतर पूजानेही तिच्या प्रेमाची कबुली दिली . तिचे हे बोलणे संपत नाही तोच प्रियांकने तिच्या मनातली गोष्ट इतर सदस्यांनाही जाऊन सांगितली . घरात पूजा सर्वात जास्त कोणाच्या जवळ असेल तर ते आर्शी आणि आकाश आहेत . लवला जरी पूजा आवडू लागली असली तरी आकाश ददलानीनेही पूजासाठीचे त्याच्या मनात असलेले प्रेम वारंवार व्यक्त केले आहे . आकाश आणि पूजा दोघंही गाणी गात असल्यामुळे शोमध्ये अनेकदा ते इतर सदस्यांचे मनोरंजन करताना दिसतात . आकाश आणि पूजामध्ये पहिल्या दिवसापासून एक वेगळीच मैत्री दिसली होती . आकाशने तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हटले ही होते . त्याच्या अशा बोलण्यावर पूजा लाजेने लालबूंद झाली होती . घरात अशा पद्धतीच्या बोलण्यावर बंदी असल्याचे तिने आकाशला सांगितले . पण त्यानंतरही त्यांच्यात असलेली जवळीक इतर सदस्यांच्या चर्चेचा विषय झाली आहे . पण या लव्ह स्टोरीमध्ये लवची एंट्री झाल्यामुळे प्रेमाच्या या त्रिकोणात नक्की कोणाची सरशी होणार हे काही दिवसांमध्ये कळेलच . ‘बिग बॉस’च्या घरात पूजाला वाइल्ड कार्ड एंट्री मिळाल्यानंतर घरातल्यांना थोडे आश्चर्य वाटले होते . पूजा घरात गेल्यानंतर हिना खानने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली त्यावरुन सोशल मीडियावर हिनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते . ढिंच्याक पूजाच्या येण्याने सलमान खानही अवाक् झाला होता . तिच्याशी बोलताना त्याने अनेकदा पूजाची खिल्लीही उडवली होती .
0
दर आठवडय़ाला अडीच तास द्रुतगतीने चालणे , सायकल चालवणे अशा प्रकारचे व्यायाम केल्याने हृदयाच्या अकार्यक्षमतेचा ( हार्ट फेल्युअर ) धोका कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . अमेरिकेतील जॉन्स हापकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी सरासरी ६० वर्षे वय असणाऱ्या ११ , ००० नागरिकांच्या व्यायामांच्या माहितीचे विश्लेषण केले . यामध्ये मागील सहा वर्षांत ठरावीक काळापर्यंत व्यायाम करणाऱ्या मध्यमवयाच्या लोकांमध्ये आणि हृदय अकार्यक्षमतेचे प्रमाण कमी होण्यामध्ये संबंध आढळून आला . या अभ्यास सरक्यूलेशन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला असून सहा वर्षांच्या काळात कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणाऱ्या मध्यम वयाच्या लोकांमध्ये हृदयाच्या समस्या वाढल्याचे दिसून आले . हृदय विकारामुळे हृदयाचे स्नायू मृत पावतात तर हृदयाची अकार्यक्षमता म्हणजे हृदयाकडून पूरेसा रक्तपुरवठा करण्यास असलेली दीर्घकालीन अकार्यक्षमता . दर आठवडय़ाला १५० मिनिटे सायकल चालवणे , द्रुतगतीने चालणे या प्रकारचा व्यायाम केल्याने मध्यम वयाच्या लोकांमध्ये हृदयाच्या अकार्यक्षमतेचे प्रमाण ३१ टक्के यांनी कमी होत असल्याचे जॉन्स हापकिन्स विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्र शाळेच्या चिआडी डूमेले यांनी सांगितले . त्याचप्रमाणे व्यायाम न करणाऱ्यांनी सहा वर्षांच्या कालावधीत आठवडय़ाला १५० मिनिटे व्यायामास सुरुवात केल्याने हृदय अकार्यक्षमतेचे प्रमाण २३ टक्क्यांनी कमी होत असल्याचे डूमेले यांनी सांगितले . गोळा केलेल्या माहितीनुसार मध्यम वयाच्या लोकांनी व्यायामाला सुरुवात करणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे संशोधकांनी सांगितले .
1
अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल गेल्या काही दिवसांपासून प्रकाशझोतात आली आहे . ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरीसोबत मेगन विवाहबद्ध होणार असून , सध्या ती राजघराण्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावतेय . मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या साखरपुड्याचे वृत्त अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर या शाही जोडप्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या . मेगनने साखरपुड्या फोटोंमध्ये घातलेल्या ड्रेसपासून ते तिच्या अंगठीपर्यंत सर्वच गोष्टी सोशल मीडियावर ट्रेंडमध्येही आल्या . पण , तिच्या बहिणीने मात्र नाराजीचा सूर आळवला आहे . मेगन तिच्या साखपुड्याच्या ट्रेसवर हजारो डॉलर्स खर्च करु शकते . पण , कर्जबाजारी झालेल्या वडिलांना मात्र ती मदत करु शकत नाही , असे म्हणत सावत्र बहिणीने राजराण्याच्या भावी सूनेला म्हणजेच मेगनला टोला लगावला आहे . मेगनवर निशाणा साधत समंथा ग्रँट म्हणाली , ‘एका ड्रेसवर तू ७५ हजार डॉलर्स खर्च करु शकतेस तर तुझ्या वडिलांवर ७५ हजार डॉलर्स खर्च करण्यात काहीच हरकत नाही . ’ ‘मंक’चा प्याला प्यायलेल्या संजय मिश्राला पाहिलात का ? मेगनचं शिक्षण असो , ज्या मनोरंजन विश्वात तिला पहिली नोकरी मिळाली त्यातील मोठमोठ्या व्यक्तींची तिला ओळख करून देणे असो , त्यांनी तिच्यासाठी खूप काही केले आहे . आज तिची जी ओळख आहे , त्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतले आहेत . त्यामुळे तिने त्यांना मदत करावी , अशी अपेक्षाही समंथाने व्यक्त केल्याचे वृत्त ‘मिरर डॉट को डॉट युके’ने प्रसिद्ध केले . समंथाच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा मेगन आणि तिच्या वडिलांविषयी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली असून , तिने वडिलांची मदत करावी असा सूरही आळवला जात असल्याचे पाहायला मिळतेय . १९ मे ला शाही विवाह सोहळ्याला मेगच्या वडिलांची हजेरी लावणार का , याविषयीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून बरेच प्रश्न उपस्थित केले जायचे . याविषयीच माहिती देत ते मेगनच्या विवाहसोहळ्याला जाणार असल्याचे समंथाने स्पष्ट केले .
0
छोट्या पडद्यावरील ‘दिया और बाती’ या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेली दीपीका सिंहने लग्नानंतर काही काळ छोट्या पडद्यापासून फारकत घेतली होती . मात्र आता ती पुन्हा एकदा अभिनय क्षेत्राकडे वळत असल्याचे पहायला मिळत आहे . संध्या बिंदणी अर्थात दिपीका सिंहने अगदी कमी कालावधीमध्ये लोकप्रियता मिळविली आहे . त्यामुळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये दिपीकाचे आवर्जुन नाव घेण्यात येतं . दिपीकाने नुकताच एका डान्सचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडत आहे . ‘दिया और बाती’ मालिकेतील संस्कारी आणि आपल्या मतावर ठाम असणा - या संध्या बिंदणीने तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली असून या एका मालिकेमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली . सोशल मिडीयावर अॅक्टीव्ह असणा - या दिपीकाने सध्या तिच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये ती ‘मोहब्बते’ या चित्रपटातील एका गाण्यावर शास्त्रीयनृत्य करताना दिसून येत आहे . यावेळी तिने एक सुंदर असं कॅप्शन देत आपल्या भावना दोन ओळींमध्ये व्यक्त केल्या आहेत . ‘समुद्रावरील शांत वातावरणात , वा - याची झुळूक अनुभवताना वा - याच्या झुळूकेबरोबर डान्स करणं मला आवडतं’ असं कॅप्शन दिपीकाने या व्हिडिओला दिलं आहे . हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्याच्यावर लाईक्सचा पाऊस पडत आहे . यापूर्वी १० मे रोजीदेखील दिपीकाच्या डान्सचा असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला होता . या व्हिडिओमध्येही ती समुद्रकिना - यावर डान्सची प्रॅक्टीस करत होती . तिचा हा व्हिडिओही तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता . दरम्यान , दिपीकाने २०१४ मध्ये ‘दिया और बाती’ या मालिकेचे दिग्दर्शक दीपक गोयल यांच्याबरोबर लग्न केले . लग्नानंतर दिपीकाने छोट्या पडद्यापासून लांब राहणे पसंत केले होते . या कालावधीत दिपीकाला २०१७ मध्ये एक मुलगा झाला असून ती तिच्या वैवाहिक जीवनात पूर्णपणे गुरफटून गेल्याचं दिसून आलं . मात्र आता ती छोट्या पडद्यावर पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्याचे या व्हिडिओवरुन दिसून येत आहे .
0
जगभरात इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून भारतातही या गाड्यांना पसंती मिळत आहे . जगभरातील वाढतं प्रदुषण , पेट्रोलचे वाढते दर तसंच इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्र सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन अशा अनेक कारणांमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर जास्त भर दिला जात आहे . सध्या अनेक कार कंपन्या भारतात इलेक्ट्रिक वाहने दाखल करण्याच्या तयारीत आहेत . हायब्रीड किंवा इलेक्ट्रिक गाडय़ांच्या किमती सामान्य गाडय़ांच्या तुलनेने जास्त आहेत . त्यामुळे सामान्य ग्राहक इच्छा असूनही या वाहनांकडे कमी वळतोय . पण भारतात इलेक्ट्रिक गाडय़ांच्या बाजारासाठी चांगले दिवस येणार असल्याचे दिसत आहे . आता बऱ्याच मोठय़ा कंपन्यांनी येत्या वर्षांमध्ये इलेक्ट्रिक गाडय़ा बाजारात असणार असल्याचे जाहीर केले आहे . केंद्र सरकार पेट्रोल - डिझेलच्या कार खरेदीवर 12 हजार रुपये ‘पोल्यूटर पे’ म्हणजेच प्रदूषण शुल्क आकारण्यासाठी नियम बनवत आहे . इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे कल वाढावा या दृष्टीने हे पाऊल उचललं जाणार आहे . वर्ष 2018 मध्ये अशाच काही इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या असून या कार अनेकांना आकर्षित करतायेत . जाणून घेऊया 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या काही इलेक्ट्रिक कार्सवर – मारुती सुझुकी टोयोटासह इलेक्ट्रिक गाडी दाखल करणार आहे . ती म्हणजे भारतीय ग्राहकांची लाडकी वॅगन आर . नाव वॅगन आर जरी असले तरी ही भारतात मिळणारी वॅगन आर नसून जपानमध्ये विकली जाणारी वॅगन आर असणार आहे . सध्या या गाडीच्या भारतभर चाचण्या सुरू आहेत . ही गाडी २०२० मध्ये बाजारात दाखल केली जाणार असल्याची माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे . गाडीत १४ वॉट बॅटरी असण्याची शक्यता आहे . टाटा निओ ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे . दिसायला टाटा नॅनोप्रमाणेच असणारी निओ शहरात प्रवास करण्याच्या उद्देशाने तयार केली आहे . त्यानंतर टाटा टीगोरचे इलेक्ट्रिक संस्करण बाजारात दाखल होणार आहे . ह्युंदाईची आयोनिक ही तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे . एक इलेक्ट्रिक दुसरी , हायब्रीड आणि तिसरी प्लग इन हायब्रीड . अशा पर्यायांमध्ये येणाऱ्या या गाडीची विक्री भारतात पुढील वर्षीपासून सुरू होण्याची शक्यता आहे . Renault Zoe EV ऑटो एक्सपो 2018 मध्ये Renault ने आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक Renault Zoe EV सादर केली . 41kWh बॅटरीवर चालणारी ही कार एकदा चार्ज झाल्यावर 400 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापू शकते . तर संपूर्ण बॅटरी चार्ज करण्यासाठी केवळ 65 ते 80 मिनिटांचा वेळ लागतो . महिंद्रा ई20 प्लस महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये 19 किलोव्हॅटची पावरफुल मोटर आहे . या मोटरच्या मदतीने ही कार 26bhp पावर आणि 70nM टॉर्क जनरेट करते . पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही कार 110 किलोमीटर पर्यंतचं अंतर कापू शकते . बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी एक तास आणि 12 मिनिटांचा वेळ लागतो . महिंद्रा ई व्हेरिटो – महिंद्राची ही दुसरी इलेक्ट्रिक सिडान कार आहे . यामध्ये पाचजण बसू शकतात . मात्र , या कारचा टॉप स्पीड केवळ 86 किलोमीटर प्रतितास आहे . तर 91nM चा टॉर्क या कारच्या मोटरद्वारे जनरेट होतो . टाटा टिगोर इलेक्ट्रिक – टाटाची ही कार देखभालीसाठी लागणाऱ्या कमी खर्चामुळे चांगला पर्याय ठरु शकते . टाटा टिगोर ई व्ही ही २१६ ए एच १६ व्ही बॅटरी आणि ३ फेज एसी इंडक्शनसह असून ३९ . ९५ हॉर्स पॉवरची क्षमता आहे . डिझाइनच्या बाबतीत ही कार कॉम्पॅक्ट सिडान प्रमाणेच आहे . एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 120 किलोमीटरचं अंतर कापते . सध्या या कारसाठी टाटा कंपनी आणि ‘झूम कार’मध्ये करार झाला असून पुण्यात ही कार भाडेतत्त्वावर उपलब्ध आहे . किंमत : १० - ११ लाख रुपये . ह्युंदाई कोना इलेक्ट्रिक कोनाचे एसयुव्ही मॉडेल भारतात दखल होणार असून इलेक्ट्रिक पॉवर मॉडेलदेखील पुढील वर्षी येणार आहे . या गाडीची प्रवास क्षमता ३९० किमी असणार असून हे गाडीचे मुख्य वैशिष्टय़ मानले जाते . किंमत : २२ लाख रुपये . निस्सान लीफ लीफचे सध्याचे मॉडेल दोन बॅटरीच्या ताकदीने २२८ किमीचा प्रवास करते . नवीन मॉडेल यामध्ये या बॅटरीची क्षमता वाढवली जाण्याची शक्यता आहे . भारतीय बाजारासाठी या गाडीत बदल केले जाण्याची शक्यता आहे . किंमत : २० लाख रुपये .
1
डेंग्यूसाठी देण्यात येणाऱ्या अँटिबॉडी झिका विषाणूवर ( व्हायरस ) वर परिणामकारक ठरत असल्याचे संशोधनामध्ये दिसून आले आहे . झिका या गंभीर आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी लहान मुलांना या अँटिबॉडीची मदत होणार आहे . एखादा विषाणू शरीरात शिरल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शरीरात जो विशिष्ट प्रतिरक्षात्मक ( प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याचा ) प्रतिसाद मिळतो , त्यामध्ये रक्तद्रवात तयार होणाऱ्या विशिष्ट प्रथिनांना प्रतिपिंड असे म्हणतात . ब्राझील आणि इतर भागांमध्ये झिका विषाणूचा मोठा फटका बसला आहे . तसेच या भागामध्ये डेंग्यूचा प्रसार ही मोठय़ा प्रमाणात झाला आहे . उंदीरांना अँटिबॉडीवर आधारित काही औषधे दिल्यामुळे त्यांच्या गर्भाशयाचे झिकापासून संरक्षण होते . त्याचा दुहेरी फायदा होत असून , झिका आणि डेंग्यू या दोन्ही आजारापासून संरक्षण होत असल्याचे संशोधकांनी सांगितले . डेंग्यू आजारामध्ये लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो . सोबत डोके - डोळे दुखणे , अंगदुखी , अशक्तपणा , अंगावर लाल चट्टे येणे , मळमळणे आणि उलटय़ा येणे यासह इतर काही लक्षणे दिसून येतात . मात्र यामध्ये थेट गर्भाला हानी पोहोचत नाही , असे संशोधकांनी सांगितले . देण्यात येणाऱ्या अँटिबॉडीमुळे डेंग्यूचे विषाणूच कमी होत नाहीत तर गर्भाशयाचे झिका आजारापासून संरक्षण होते . डेंग्यू आणि झिका विषाणू एकमेकासंबंधित आहेत . डेंग्यू विषाणूला रोखण्यासाठी देण्यात येणाऱ्या अँटिबॉडी झिका विषाणूवर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले असल्याचे संशोधकांनी सांगितले .
1
चिंतन प्रिया वारियरचा डोळा मारतानाचा व्हिडिओ ज्या वेगाने व्हायरल झाला ते पाहता समाजमाध्यमांची ताकद तर लक्षात येतेच पण त्याचबरोबर काही गंभीर मुद्देही उपस्थित होतात . प्रिया प्रकाश वारियर हे नाव घेतलं की ती कोण , कुठची अभिनेत्री आहे , तिच्या आगामी चित्रपटाचं नाव काय हे आठवण्यापेक्षा ‘अरे , ही तीच ना , भुवया उंचावणारी . . व्हायरल गाण्यातली नटी , ’ असं उत्स्फूर्त उत्तर आपल्याला मिळतं . व्हायरल गाण्यातील नटी म्हणण्याचं कारण म्हणजे एक तर मल्याळम् भाषा सर्वानाच येते असं नाही आणि मुख्य म्हणजे त्या गाण्यापेक्षा प्रियाच्या भुवया उंचावणं तुलनेने जास्त व्हायरल झालं . त्यामुळे तिला कमालीची प्रसिद्धी मिळाली . मुळात ‘हे व्हायरल होणं म्हणजे काय रे भाऊ . . ’ हा प्रश्न अनेकदा आपल्या मनात घर करतो ; किंबहुना व्हायरल प्रकरणाची सुरुवात कोण करत असेल , हा प्रश्नही पडत असतो , पण त्याचं उत्तर मात्र कोणाकडे सहजासहजी सापडत नसल्यामुळे सरतेशेवटी हा प्रश्न आल्या पावली निघून जातो . व्हायरल होण्याचं वाढतं प्रमाण आणि त्याचा मानवाच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम पाहता हे व्हायरलचं गणित नेमकं आहे तरी कसं आणि त्यामागे समाजशास्त्र आणि मानसशास्त्राची काय भूमिका आहे , हे समजून घेणं आवश्यक आहे . आजच्या काळात समाजमाध्यमांच्या मदतीने आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचू शकतो ; पण मुळात गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज गेल्या काही वर्षांमध्ये विकसित झाली , असा तुमचा समज असेल तर तसं नाहीये . मुळात फार आधीपासून , अगदी मानवाच्या उत्क्रांतीपासून जसजसा काळ पुढे गेला तसतसा नवनवीन गोष्टींचा शोध लागत गेला . त्यातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे भाषा . भाषेची उत्क्रांती झाली आणि माणसं एकमेकांशी संवाद साधू लागली ; पण त्या संवाद साधण्यावर काही मर्यादा होत्या . एका व्यक्तीचा आवाज , त्याच्या भावना या ठरावीक अंतरापलीकडे जाणं शक्य नव्हतं . त्यानंतरच्या काळात विविध तंत्रांच्या साहाय्याने हा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू लागला . पुढे विविध लिपी अस्तित्वात आल्या . त्यामुळे छापील गोष्टी त्या व्यक्तीच्या गैरहजेरीतही लोकांपर्यंत पोहोचू शकल्या ; पण इथे मुद्दा असा होता की , लिखित मजकूर वाचण्यासाठी तो कागद किंवा ज्या गोष्टीवर ते लिहिलं आहे ते वाचकाच्या नजरेपर्यंत पोहोचण्याची गरज होती . तेव्हा मग वर्तमानपत्रं , पत्रकं यांच्या माध्यमातून या गोष्टी साध्य केल्या . ही गरज ओळखली गेली आणि त्याला तंत्रज्ञाची जोड मिळाली . उद्देश होता की लिपी वाचण्यासोबतच वाचक अमुक एका गोष्टीशी जोडली गेली पाहिजे . याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याचा ट्रेण्ड सुरू झाला . यामध्ये ‘गेम थियरी’चा वापर सर्रास दिसून आला . या थियरीनुसार दोन व्यक्तींमध्ये एक प्रकारचा करार होतो . विचार एकमेकांना सांगणं म्हणजेसुद्धा एक प्रकारचा करारच आहे . ज्यामध्ये गोष्टी समजून घेताना समोरची व्यक्ती तिच्या विचारशक्तीचा वापर करते आणि त्याचा सुवर्णमध्य साधला जातो . एखादी गोष्ट समजावण्याची आणि समजून घेण्याची पद्धत जितकी चांगली त्यावर ती इतरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल की नाही हे ठरतं . समाजमाध्यमात एखादी गोष्ट व्हायरल होते तेव्हा त्यातील विचार हे काही अतुलनीय वगैरे नसतात ; पण ते विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याची संबंधित व्यक्तीची इच्छा असते . पण , तेव्हा तो विचार कोणाचा आहे , तो मी इतरांपर्यंत का पोहोचवावा , त्याविषयी माझं काय मत आहे , या निकषांवर ही गेम थियरी अवलंबून असते . एखाद्या गोष्टीत तर्कशुद्धपणा आहे म्हणून ती सर्वांपर्यंत पोहोचतेच असं नाही . त्यामुळे नंतर ती व्यक्ती या गोष्टींमध्ये व्यवहारबुद्धीचा वापर करते . एक प्रकारची वाटाघाट केल्यानंतर आपल्याला भावणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देत हे व्हायरल प्रकरण पुढे जातं . एखाद्या गोष्टीविषयी इतकी चर्चा का होते , म्हणजेच हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ती गोष्ट व्हायरल का होते , हा एक प्रश्न आहेच ; पण यापूर्वीही गोष्टी व्हायरल होत होत्याच . अर्थात त्याला माहिती पसरवणं असं म्हटलं जायचं . मुळात ज्याप्रमाणे सर्वच गोष्टी व्हायरल होत नाहीत त्याचप्रमाणे उगाचच कोणत्याही गोष्टीची माहिती पसरायची नाही . यामागे एक सरळ गणित आहे . एखादी गोष्ट तुमच्या भावनेशी जोडली जाते , मनावर आघात करते किंवा मनाला हात घालते त्याच वेळी त्या गोष्टीची चर्चा होण्यास सुरुवात होते . या चर्चेतून काय घडलं , कसं घडलं , का घडलं कुणी घडवलं हे प्रत्येकाला समजून घ्यायचं असतं . पूर्वीच्या काळात तंत्रज्ञान फारसं प्रगत नव्हतं ; पण आता मात्र समाजमाध्यमांच्या माध्यमातून गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक तगडं तसंच साधं आणि सोपं साधन मानवाच्या हाती लागलं आहे , जिथे वर्तनाचं शास्रदेखील ( बिहेविअरल सायन्स ) महत्त्वाचं असतं . माणसाचा मेंदू एखादी गोष्ट खूप चांगली आणि प्रभावीपणे व्यक्त करू शकतो . एका पद्धतीने लोकांना तुमच्या मनातील बऱ्याच गोष्टी कळू शकतात . समाजमाध्यमांमुळे लोकांच्या हाती सोपं आणि तितक्याच ताकदीचं साधन आलं आहे . तिथे एखाद्या व्यक्तीची गोपनीयता कायम ठेवत तिचा विचार जनसमुदायापर्यंत अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्यात येतो . माहिती पसरवणं आणि व्हायरल होणं यात लोकांची मानसिकता काही वर्षांपूर्वी होती तशीच आहे . बदललं आहे ते फक्त तंत्रज्ञान . उदाहरणार्थ माणूस आधी दगडाने मारा करत होता , आता तो अणुबॉम्बने मारा करण्यासाठी सज्ज झालाय . त्यामुळे मानवाच्या वृत्तीत बदल झालेला नाही ; पण संहारकतेत बदल झाला आहे . समाजमाध्यमातून व्हायरल होणाऱ्या गोष्टींमध्ये धर्मभेद , वर्णभेद , जातिभेद आणि काय करावे , काय करू नये या मुद्दय़ांवरून तणावाची परिस्थिती निर्माण करणाऱ्या गोष्टींचं प्रमाण जास्त असतं . ज्यामध्ये नाही म्हटलं तरीही काही गोष्टी या पूर्वनियोजित असतात . या गोष्टींकडे जरा नीट लक्ष दिलं तर अनेकांच्या ही बाब लक्षात येण्याजोगी आहे . व्हायरलच्या या गणितात आणखी एक बाब महत्त्वाची असते , ती म्हणजे समाजमाध्यमांचं इंजिनीअरिंग . आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये होणारे बदल हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात ; पण त्यासोबतचं माध्यम ज्या पद्धतीने वापरलं जातं , हेसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे . त्या माध्यमाचा सुयोग्य वापर होणं गरजेचं आहे . उदाहरणार्थ आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राचा वापर केला . हा त्यांनी केलेल्या माध्यमाचा उत्तम वापर होता . प्रसिद्ध सूत्रसंचालक जिम्मी किम्मेल यानेसुद्धा त्याच्या कार्यक्रमासाठी ‘क्राऊड सोर्सिग’चा वापर केला होता . एखादी लक्षवेधी गोष्ट ज्या वेळी लोकांना आपलीशी वाटू लागते किंवा ती लोकांच्या भावनांना व्यक्त होण्यासाठी संधी देते त्या वेळी ती व्हायरल होते . याअंतर्गत येणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रसिद्धी . प्रसिद्धी आणि व्हायरल गोष्टी हे समीकरण सहसा कलाविश्वात बऱ्याचदा पाहायला मिळतं . याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘पिंक’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीला लिहिलेलं पत्र . त्यानंतर काही दिवसांपूर्वी गाजलेला ‘पद्मावत’ चित्रपटाचा वाद . इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की , वैयक्तिक स्वार्थासाठी आणि एखाद्याचं चारित्र्यहनन करण्यासाठीही काही गोष्टी व्हायरल होतात किंवा केल्या जातात . सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरण त्यापैकीच एक . दररोज किती आत्महत्या होतात , पण त्यातही सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरण गाजलं त्यामागचं कारण होतं त्यात असणारं शशी थरुर यांचं नाव . त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये असणारं कुतूहल . या सर्व गोष्टींमुळे हे प्रकरण चर्चेत आलं , व्हायरल झालं . बऱ्याचदा यात प्रसिद्ध व्यक्तीशी जोडल्य गेलेल्या एखाद्या व्यक्तीमुळे ती गोष्ट बरीच चर्चेत येते . रोहित वेमुला प्रकरण काही वेगळ्या गोष्टी आणि निकषांचा आधार घेत चर्चेत आलं . रोहित वेमुला हा त्याच्या मृत्यूपश्चात एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाला . मुळात त्याच्यासोबत घडलेल्या घटनेमध्ये अनेकांनी स्वतःला जोडलं होतं , त्या ठिकाणी एखाद्या आपल्या व्यक्तीला पाहिलं होतं , त्यामुळे हे प्रकरणही बराच काळ प्रकाशझोतात राहिलं . या साऱ्यामध्ये गेम थिअरी महत्त्वाची ठरते . हल्लीहल्लीचं उदाहरण घ्यायचं झालं , तर ‘मी टू’ ( # MeToo ) हा हॅशटॅग . परदेशातून सुरू झालेला हा हॅशटॅग इतका ट्रेण्डमध्ये आला की , प्रत्येकानेच त्याविषयी काही ना काही बोलण्यास सुरुवात केली . त्यामुळे समाजमाध्यमातून वाईट आणि चांगल्या अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी व्हायरल असतात . वास्तविक समाजमाध्यमं ही एक प्रकारची तलवार असून त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं असतं . व्हायरलचं हे गणित सोडवताना आता आपण ज्या पायरीवर येऊन पोहोचलो आहोत , तिथून आपण प्रिया वरियरच्या चित्रफितीच्या व्हायरल होण्यामागची सूत्रं समजून घेऊयात . व्हॅलेंटाइन डे , प्रेमाने बहरलेलं वातावरण आणि त्या पाश्र्वभूमीवर नजरेने घायाळ करणारी ती मुलगी . ती कोण , कुठली काही ठाऊक नसतानाही अनेकांना भावली ; पण नक्की काय भावलं याचा विचार केलाय का ? प्रियाचे हावभाव , आपल्या शाळेतील आवडत्या किंवा प्रेम करत असणाऱ्या मुलाप्रति व्यक्त होण्याची तिची पद्धत आणि त्याचं असणारं वेगळेपण हे यामागचे महत्त्वाचे मुद्दे आहेत . आपला समाज आणि काळ कितीही पुढे आला असला तरीही महिलांनी अशा प्रकारे व्यक्त होणं , प्रियकराला डोळा मारणं किंवा अशा प्रकारच्या काही बंडखोर कृती करणं यामुळे इतर अनेकांच्याच भुवया प्रिया वरियरपेक्षा जास्त उंचावतात , त्यांना वेगळ्या दृष्टीने विचार करायला भाग पाडतात . या सर्व गोष्टी या व्हिडीओमध्ये होत्या . त्यातही १४ फेब्रुवारीच्या पार्श्वभूमीवर जिथे काही ठिकाणी बऱ्याच स्वघोषित संस्कृतिरक्षक संघटनांनी प्रेमी युगुलांना विरोध करण्याचं सत्र चालवलं होतं , अशा वातावरणात हा व्हिडीओ व्हायरल झाला . ज्या ‘उरु अदार लव्ह’ या चित्रपटातील हे गाणं आहे , तो अतिशय कमी निर्मिती खर्चात तयार झालेला चित्रपट . मुळात तो मल्याळी चित्रपट . त्यामुळे तो इतर भारतीयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तशी कमीच . तो व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीलाही हे असं काही तरी होईल याची तिळमात्र अपेक्षा नसावी . अशा परिस्थितीत हा व्हिडीओ म्हणजे प्रेमी युगुलांचा विरोध करणाऱ्या तथाकथित संस्कृतीरक्षक संघटनांना मिळालेली चपराक होती . कारण हा व्हिडीओ शेअर करत जणू काही मुलींचे बंडखोर विचारच प्रभावीपणे शेअर करण्यात आले आहेत . मुळात इथे प्रियाच्या सौंदर्याचा किंवा तिच्या नजरेचा मुद्दा नसून तिची प्रेमळ , पण हलकीशी बंडखोरीची झाक असलेली वृत्ती अनेकांना भावली आणि ती वृत्ती व्हायरल झाली . हा निष्कर्ष काढण्याचं कारण असं की , १४ फेब्रुवारीला मल्लिका - ए - हुस्न आणि बऱ्याच विशेषणांनी ओळखली जाणारी अभिनेत्री मधुबाला हिचा ८५ वा जन्मदिवस होता . तसं पाहिलं तर चाहत्यांसाठी , चित्रपट क्षेत्रासाठी आणि योगायोगाने समाजमाध्यमांसाठीही हा एक महत्त्वाचा दिवस होता . या पाश्र्वभूमीवर मधुबालाच्या चित्रपटांतील काही गाणी , तिच्या जीवनावरील व्हिडीओ व्हायरल होणार , अशी अनेकांची अपेक्षा होती ; पण प्रत्यक्षात काय झालं , याचं चित्र आपल्यासमोर आहेच . बरं समाजमाध्यमांवर प्रिया तिच्या सौंदर्यामुळे व्हायरल होतेय , असं जे काही म्हटलं जात आहे त्यावर कितपत विश्वास ठेवावा हासुद्धा महत्त्वाचा प्रश्नच आहे . कारण मधुबाला प्रियाहून सर्वच बाबतीत उजवी . तर मग असं का व्हावं ? प्रिया वरियरला अनेकांनी प्राधान्य देण्याचं एक कारण म्हणजे त्या व्हिडीओमध्ये दडलेली बंडखोर वृत्ती , व्हॅलेंटाइन डेला होणारा विरोध आणि त्याच पाश्र्वभूमीवर टिच्चून प्रदर्शित करण्यात आलेला हा अफलातून व्हिडीओ . या व्हिडीओतून तरुणाईला प्रेम व्यक्त करण्याची न मिळालेली मुभा , तिची घुसमट आणि अव्यक्त राग या गोष्टी व्यक्त झाल्या आहेत . आणि एकमेकींना पूरक ठरल्या आहेत . याच चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ हे गाणं व्हायरल होत असताना त्यामागे समाजमाध्यमं , तंत्रज्ञान , सामाजिक परिस्थिती हे घटक तर महत्त्वाचे होतेच ; पण इथे केंद्रस्थानी होती ती म्हणजे बंडखोर वृत्ती आणि ती सादर करण्याची अनोखी पद्धत . हे व्हायरल प्रकरण मुळात आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे , असं वक्तव्य अनेक जण करतात . किंबहुना त्याचा आपल्या आयुष्यावर चुकीचा किंवा नकारात्मक परिणाम होतो , असंही म्हटलं जातं . मानवी संवादात बोलणं , ऐकणं हे महत्त्वाचं असतं ; पण समाजमाध्यमांवर मात्र देहबोलीचा अभाव पाहायला मिळतो . त्यासोबतच व्याकरणही या माध्यमातून संवाद साधताना फारसं महत्त्वाचं ठरत नाही . गोष्टी कमीत कमी शब्दांमध्ये मांडण्याला प्राधान्य दिलं जातं . शॉर्टफॉम्र्स आणि इमॉटिकॉन्समुळे शब्दांचा वापर कमी होतो . त्याचे परिणाम माणसाच्या विचारांवर , अभिव्यक्तींवर कसे होणार याविषयी तर्क व्यक्त करणं हे सध्या तरी कठीण आहे . अल्बर्ट आइनस्टाइनच्या मते ‘तंत्रज्ञानाचा वापर अशा प्रकारे तरुणाईच्या मनात घर करून बसला आणि संपूर्ण संवाद तंत्रज्ञानाने झाला तर जगात मूर्खाची पिढी असेल’ . अर्थात याबाबत दुमत असू शकतं . पण एक नक्की , समाजमाध्यमाच्या वापरामुळे कुटुंबातील संवाद कुठे तरी कमी झाला आहे . पुढच्या पिढीला चर्चा , वाद , संवाद याबद्दल घरांतून मार्गदर्शन मिळतं आहे की नाही , याबद्दल संदेह आहे . प्रत्यक्ष समाजमाध्यमं वापरताना होणाऱ्या चुका या कालांतराने विसरल्या जातात ; पण समाजमाध्यमामध्ये व्यक्त झाल्यानंतर मिळालेला समाजाचा नकारात्मक प्रतिसाद हा त्या व्यक्तीच्या डिजिटल मेमरीमध्ये सततचा कोरला जातो आणि म्हणून त्याची डिजिटल मेमरी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कायम राहते . वाचा आणि श्रुती या दोन्ही गोष्टींना मानवी आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे . पण , समाज माध्यमांवर मात्र या गोष्टी काहीशा डावलल्या जातात . इथे जास्तीत जास्त संवाद हा लिखित स्वरूपात होतो . एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्यासाठीसुद्धा हल्ली इमोटिकॉन्स ( चिन्हांचा ) वापर सर्रास केला जातो . त्यामुळे इथे भावनांचा अभाव प्रकर्षांने जाणवू लागला आहे . काहींच्या मते भावना आणि नातेसंबंधांवरही या साऱ्याचा परिणाम होत असून , प्रेम व्यक्त करण्यात भावना कुठे तरी कमी पडू लागल्या आहेत . मुळात काय , तर समाजमाध्यमांच्या माध्यमातून तुम्ही किती गोष्टीविषयी व्यक्त होताय , काय मतप्रदर्शन करताय या साऱ्याची एक डिजिटल मेमरी तयार होते . पुढे काही वर्षांनी ज्या वेळी तुमचं आयुष्य बदललेलं असेल तेव्हा काही गोष्टी आपोआपच तुमच्या मेंदूतून - स्मृतीतून निघून जातील , पण , त्याची डिजिटल मेमरी कोणत्या न कोणत्या स्वरूपात कायम राहील हे नक्की . त्यामुळे समाजमाध्यमाचा वापर पाहता या माध्यमाचा मानवी आयुष्यवर नेमका कसा आणि किती परिणाम होतो , हे सांगण तसं कठीणच . या माध्यमातून व्यक्त होणं हासुद्धा एक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच भाग आहे . फरक फक्त इतकाच आहे की , येथे गोष्टी लोकांपर्यंत पोहोचताना त्यांना कोणत्याच प्रकारची चााळणी लावली जात नाही . पूर्वी ही अभिव्यक्ती ज्या माध्यमातून व्हायची त्या माध्यमांवर काही माणसांचं नियंत्रण होतं . पण , समाजमाध्यमांमध्ये असं नियंत्रण शक्य नाही . कदाचित लोकांची समाजमाध्यमं वापरण्याची समज जसजशी वाढच जाईल तसा , या माध्यमांचा जनता जास्त विवेकबुद्धीने वापर करेल . ( शब्दांकन - सायली पाटील ) – response . lokprabha @ expressindia . com सौजन्य – लोकप्रभा
1
चिनी मार्शल आर्टमधील ‘ताय ची’ या प्रकाराचा नियमित सराव केल्यास मानसिक आजार आणि नैराश्य कमी करणे शक्य असल्याचे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे . कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार न घेणाऱ्या अमेरिकेतील चिनी नागरिकांसाठी संशोधकांनी १२ आठवडय़ांचा ‘ताय ची’ या प्रकाराची माहिती देणारा आणि सरावाचा कार्यक्रम घेतला . याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात मानसिक आजार आणि नैराश्यावर ताय ची प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते . वैद्यकीय उपचारांप्रमाणेच हा उपक्रम परिणामकारक असल्याचे मॅसॅच्युएट्स रुग्णालयाचे अल्बर्ट येऊंग यांनी म्हटले आहे . मानसिक उपचारांपेक्षाही ताय चीमुळे रुग्णाचे आरोग्य सुधारण्यास अधिक मदत होत असल्याचे येऊंग यांनी म्हटले आहे . हे संशोधन ‘क्लिनिकल सायकॅटरी’ या मासिकात प्रसिद्ध झाले आहे . ताणतणाव कमी करण्यासाठी ‘ताय ची’चा कार्यक्रम राबविण्यात आला . त्यात सहभागी झालेल्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा यात समावेश करण्यात आला होता . सहभागी झालेले सर्वच जणांना गंभीर मानसिक आजार होता . तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार सुरू नव्हते . तसेच काही जणांवर याआधी करण्यात आलेल्या मानसिक उपचारांचाही या कार्यक्रमात विचार करण्यात आला नव्हता . सहभागी झालेल्यांचे तीन गट करण्यात आले . त्यात मानसिक ताणतणावावर चर्चा करण्यात आली तसेच ‘ताय ची’चे मार्गदर्शन करण्यात आले . १२ आठवडय़ांच्या कार्यक्रमानंतर सहभागी झालेल्यांचे मानसिक आरोग्य सुधारल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले .
1
कोका कोलाचा मालक पूर्वी शिकंजी विकायचा तर मॅकडोनल्ड्सच्या मालकाचा पूर्वी ढाबा होता , असा दावा केल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रोल झाले . राहुल गांधी यांनी कोका कोलाच्या बाबत जे विधान केले यात कितपत तथ्य आहे आणि मॅकडोनल्ड्सची पार्श्वभूमी काय , याचा घेतलेला हा आढावा… कोका कोलाचा शोध कोका कोलाचे उत्पादन १८८६ मध्ये सुरु झाले . कोका कोलाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार मे १८८६ मध्ये फार्मासिस्ट जॉन पेम्बर्टन यांनी त्यांच्या लॅबमध्ये एक सिरप तयार केले . अटलांटा येथे त्यांची लॅब होती . कार्बोनेटेड वॉटर मिश्रित या सिरपला त्यांनी जेकब फार्मसी बाहेर विक्रीसाठी नेले . तिथे त्यांनी काही लोकांना सिरपची चव बघायला सांगितली . सोडा मिश्रित हे सिरप अनेकांना आवडले . पाच सेंट प्रति ग्लास या दराने त्याची विक्री सुरु झाली . अल्पावधीत सोडा फाऊंटन ड्रींक म्हणून ते प्रसिद्ध झाले . पेम्बर्टन यांचे अकाऊंट्स बघणारे फ्रॅंक रॉबिन्सन यांनी या सोडा मिश्रित सिरपला कोका कोला असे नाव दिले . नावात दोन ‘सी’ आले तर याचा कंपनीला फायदा होईल , अशी रॉबिन्सन यांची धारणा होती . पेम्बर्टन यांनी मित्राचा हा सल्ला ऐकून कोका कोला हेच नाव ठेवले . पहिल्या वर्षी दिवसाला फक्त नऊ ग्लासची विक्री व्हायची . आता जगभरात दररोज कोका कोलाच्या सुमारे २ अब्ज बॉटल्सची विक्री होते . डॉ . पेम्बर्टन यांना त्यांनी काय तयार केलंय याचा नेमका अंदाज आला नाही . त्यांनी कंपनीतील आपला हिस्सा विविध उद्योजकांना विकला . १८८८ पूर्वी निधनापूर्वी त्यांनी कंपनी विकली होती . > मॅकडोनल्ड्सच्या मालकाचा पूर्ढी ढाबा होता , असा दावा राहुल गांधी यांनी केला . या दाव्यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेऊया . . रिचर्ड आणि मॉरीस मॅकडोनल्ड या भावांनी कॅलिफोर्नियातील बेर्नार्डिनो येथे १९४० साली ‘बार्बेक्यु मॅकडोनल्डस्’ हे रेस्टॉरंट सुरु केले . विशेष म्हणजे मॅकडोनल्ड बंधू हे चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक होते . त्यांनी विविध निर्मिती संस्थांच्या सेटवर फेऱ्या मारल्या . पण , सिनेसृष्टीत त्यांना प्रभावी कामगिरी करता येत नव्हती . अखेर काही उद्योग सुरु करण्यासाठी मॅकडोनल्ड बंधूनी त्या काळी एका बँकेकडून पाच हजार डॉलरचे कर्ज मिळवले आणि ‘बार्बेक्यु मॅकडोनल्डस्’ सुरु झाले . बीफ , हॅमबर्गर , पोर्क सँडविच असे पदार्थ तिथे मिळायचे . काही महिन्यांनी मॅकडोनल्ड बंधूनी हॉटेलचे नुतनीकरण केले आणि ‘मॅकडोनल्डस्’ या नावासह ते बाजारात उतरले . जलद सेवा , स्वच्छता आणि चविष्ट खाद्यपदार्थ यामुळे मॅकडोनाल्ड्सचा ग्राहकवर्ग वाढत होता . त्यांच्या काही शाखा लगतच्या भागात सुरु झाल्या . १९५४ मध्ये क्रॉक रे या व्यावसायिकाने १९५५ साली मॅकडोनल्ड बंधूसोबत मॅकडोनल्डस् कॉर्पोरेशनची स्थापना केली . क्रॉक रे यांना मॅकडोनल्डस् चा विस्तार जगभरात करायचा होता . पण यावरुन मॅकडोनल्ड बंधू आणि क्रॉक रे यांच्यात मतभेद झाले . अखेर मॅकडोनाल्ड बंधूंनी ही कंपनी क्रॉक रे यांना विकली आणि क्रॉक रे यांनी गुणवत्ता आणि सेवेशी तडजोड न करता जगभरात या कंपनीचा विस्तार केला .
1
स्मार्टफोन कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असतानाच मागील काही दिवसांपासून मोटोरोला हा ब्रॅडही भारतात आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे . काही अहवालांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच भारतीय बाजारात सर्वसामान्यांना परवडणारा असा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे . मोटो इ४ नावाचा हा फोन ८ , ९९९ रुपयांना लवकरत भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे . मागील महिन्यातच हा फोन अमेरिकेत लाँच करण्यात आला असून त्याला अमेरिकेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे . फेसबुकने आणलं वायफाय शोधण्याचं नवं फिचर हा स्मार्टफोन अँड्रॉईड ७ वर काम करतो . ५ इंचाच्या एचडी डिस्प्ले आहे . २ जीबी रॅम असलेल्या या फोनला १ . ४ गिगाहार्टझ स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर देण्यात आला आहे . याशिवाय या फोनमध्ये १६ जीबी इंटरनल मेमरी असून मायक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून ही मेमरी वाढविण्यात येणार आहे . ८ मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला असून ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे . फिंगरप्रिंटचे फिचरही यात असणार आहे . हा फोन भारतात कधी लाँच होईल हे मात्र कळलं नाही , पण या फोनबाबत उत्सुकता मात्र लोकांना लागून आहे .
1
श्रीलंका कसोटीच्या चौथ्या दिवशीही प्रदूषणाचे ढग जास्तच गडद झाले . दुसऱ्या दिवशी मास्क लावणाऱ्या खेळाडूंवर टीका करणाऱ्या भारतीयांना महंमद शमीला प्रदूषणामुळे मैदानात उलटी झाल्याने आपले शब्दच मागे घ्यावे लागले . त्याचबरोबर श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमल यालाही वांत्या झाल्या . श्रीलंकेच्या तिघांना फटका श्रीलंका खेळाडूंनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याने मास्क परिधान केले होते ; पण गोलंदाजी करत असल्याने लकमलने मास्क परिधान केले नव्हते . भारताच्या दुसऱ्या डावातील दुसऱ्या षटकात लकमलला उलटी झाली . त्यापूर्वी काही चेंडूच अगोदर त्याने विजयला बाद केले होते . संघ फिजिओंच्या मदतीने लकमलने मैदान सोडले आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विश्रांती घेतली . त्याने काही वेळानंतर मैदानात येऊन गोलंदाजी केली . लकमलप्रमाणेच श्रीलंकेच्या अन्य तीन खेळाडूंनाही प्रदूषणाचा त्रास झाल्याचे सांगितले जात आहे . त्यांची सखोल तपासणी केल्याचे श्रीलंका संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले . आम्ही काही सांगण्याची गरजही नाही . सर्व काही स्पष्टपणे दिसत आहे . आमच्या हातात केवळ खेळणेच आहे . आम्ही व्यावसायिक आहोत . याबाबत बोलून जास्त काही साधणार नाही , असे श्रीलंकेचे मार्गदर्शक निक पोथाज यांनी सांगितले . श्रीलंका संघाने प्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे रविवारी ( दुसऱ्या दिवशी ) तीनदा खेळ थांबला होता . परिस्थिती जेवढी वाईट दाखवली जात आहे , तेवढी नाही , असा दावा महंमद शमीने तिसऱ्या दिवशी केला होता ; पण चौथ्या दिवशी तोच आजारी पडला . त्यालाही तिसऱ्या सत्रात उलट्या झाल्या . शमी त्यानंतर मैदानातच पाणी प्यायला . लगेचच कोहलीने त्याला गोलंदाजीपासून दूर केले , तसेच त्याला विश्रांतीसाठी मैदानाबाहेरही पाठवण्यात आले . दिल्लीबाहेरच असलेल्यांना . . . शमीला उलट्या झाल्यामुळे अखेर भारतीय फलंदाज धवनला बचावात्मक व्हावे लागले . दिल्लीतील वातावरणाची श्रीलंका संघातील खेळाडूंना सवय नाही , तसेच भारतीय संघातील खेळाडूंनाही नाही ; मात्र सोपवलेली जबाबदारी पार पाडणे भाग असते . श्रीलंकेस प्रदूषणाचा त्रास नक्कीच होत असेल . दिल्लीत प्रदूषण नाही , हे नाकारण्याचा प्रश्नच येत नाही , असे धवनने सांगितले . त्याच वेळी त्याने शमी पाचव्या दिवशी गोलंदाजी करू शकेल , असे सांगितले . दिल्लीतील सध्याच्या वातावरणात खेळणे खूपच धोकादायक आहे . त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात , असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष के . के . अगरवाल यांनी सांगितले . आयसीसीने याबाबत टिप्पणी करणे टाळले आहे . अमेरिकन दूतावासाने शक्यतो घराबाहेर पडू नका , असाच सल्ला संकेतस्थळावरून दिला आहे . 2020 पर्यंत लढतीच नाहीत श्रीलंका - भारत कसोटीतील प्रदूषणाच्या प्रश्नाची भारताच्या यशापेक्षा जास्त चर्चा होत आहे ; पण आता 2020 पर्यंत नवी दिल्लीत एकही आंतरराष्ट्रीय लढत होणार नाही ; मात्र याचे कारण प्रदूषण नसून नवा दौरा कार्यक्रम आहे . भारताने नव्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात फेब्रुवारी - मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय लढती भारतात घेण्याची मागणी केली आहे . भारतातील लढतींची ठिकाणे रोटेशननुसार ठरतात . नवी दिल्लीत नोव्हेंबरला एकदिवसीय लढत झाली , तर आता कसोटी होत आहे . आता नव्या वर्षात भारतीय संघ प्रामुख्याने परदेशात खेळणार आहे . त्यानंतर 2019 मध्ये फेब्रुवारी मार्चमध्येच लढती भारतात होतील आणि त्या वेळी दिल्लीस संधी मिळण्याची शक्यता कमी आहे . त्यामुळे फार तर लढत 2020 मध्येच होईल . भविष्यात दिल्लीत या कालावधीत सामने आयोजित करण्याबाबत नक्कीच विचार होऊ शकेल . आम्ही दिल्लीतील धुके तसेच प्रदूषणाच्या प्रश्नाबाबत चिंतित आहोत . त्यामुळेच देशांतर्गत लढतीच्या आयोजनाच्या वेळी याचा विचार केला होता . - अनिरुद्ध चौधरी , भारतीय क्रिकेट मंडळाचे प्रभारी सचिव
2
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ने प्रदर्शित होण्यापूर्वीच इतिहास रचला आहे . ट्विटरने पहिल्यांदा एका बॉलिवूड चित्रपटासाठी खास इमोजी केल्याची चर्चा रंगली होती . या चित्रपट प्रदर्शनापूर्वी यातील अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या आहेत . रणवीर सिंगने त्याच्या खोडकर स्वभावातून या चित्रपटातील चुंबन दृष्यावर दिलेल्या प्रतिक्रियेची यापूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती . आता रणवीरने या चित्रपटातील आपल्या आवडत्या सीनबद्दल खुलासा केला आहे . रणवीर कसरतीच्या दरम्यान डायटला फार महत्त्व देतो , मात्र डायटपेक्षा मला खाणे फार आवडत असल्यामुळे ‘बेफिक्रे’च्या चित्रिकरणावेळी खाण्याशी संबंधीत सीन मला फारच आवडायचा असे रणबीरने म्हटले आहे . ‘बेफिक्रे’च्या चित्रिकरणादरम्यानचे किस्से सांगताना रणवीरने चित्रिकरणावेळ आनंदी आणि फ्रेश असणे गरजेचे असल्याचे म्हटले . फ्रेश राहण्यासाठी तुम्हाला शरिराची देखील काळजी घ्यावी लागते , असेही तो म्हणाला . चित्रिकरणामध्ये या गोष्टी साध्य करण्यासाठी ६ ते ७ तास झोपेवर देखील लक्ष केंद्रीत केल्याचे रणवीरने सांगितले . यावेळी त्याने व्यायाम हा माझ्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक असल्याचे सांगत मद्यपान आपला प्रांत नसल्याचे म्हटले आहे . शरिरयष्टीसाठी कठिण डायट करत असताना चित्रिकरणाच्या निमित्ताने पिज्जा , बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाणे सोपे व्हायचे . यावेळी चित्रिकरणाची गरज असल्यामुळे ट्रेनर मला पिज्जा खाण्यावर कोणतेही बंधन घालायचा नाही . त्यामुळे हा सीन मला अधिक आवडायचा असे रणवीरने म्हटले आहे . डायटपेक्षा खाण्याचा अस्वाद घेणे अधिक पसंत असल्यामुळे ‘बेफिक्रे’च्या सेटवरील चित्रिकरणावेळी खाद्यपदार्थाशी निघडीत सीन मी खूप एन्जॉय केल्याचे रणवीरने सांगितले . यापूर्वी रणवीरने ‘बेफिक्रे’ तील चुंबनदृश्यांबाबत प्रतिक्रिया दिली होती . चुंबन दृश्य करण्यासाठी बरीच मेहनत लागते . माझे शोषण झाले आहे . तसेच , आपण कोणालाही भेटवस्तू देण्यावर विश्वास ठेवत नाही . मी सिंधी असल्यामुळे मला वस्तू जपून ठेवायला आवडतात , असेही त्याने म्हटले होते . ‘बेफिक्रे’तील चुंबनदृश्ये आधीच चर्चेचा विषय बनली आहेत . चित्रपटातील एका गाण्यात तर तब्बल २१ चुंबनदृश्ये होती . तर ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये दाखविण्यात आली आहेत . विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये असूनही सेन्सॉर बोर्डाने अगदी मोठ्या मनाने त्याला यूए प्रमाणपत्र दिले आहे . रणवीरचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ ९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे . या चित्रपटात रणवीरसह वाणी कपूर मुख्य भूमिकेत दिसेल . या चित्रपटाचे चित्रीकरण ५० दिवसांत पॅरिस आणि मुंबई येथे करण्यात आले आहे . ‘बेफिक्रे’ चित्रपटाची कथा पॅरिसमध्ये राहणारा मुलगा धरम ( रणवीर ) आणि शायरा ( वाणी ) यांच्याभोवती फिरते . हे दोघेही अनौपचारिक प्रेमसंबंधांमध्ये असतात . यात ते आपण कधीच एकमेकांच्या प्रेमात पडणार असा करार करतात . त्यानंतर नक्की काय होते ते तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल .
0
वन - डे , टी - २० आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारात तब्बल १६५ बळी स्टम्पिंग करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने एक सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून नावलौकिक कमावला आहे . मोठा फटका खेळण्याच्या पवित्र्यात असलेल्या फलंदाजाला धोनी केव्हा बाद करतो , याचा त्यालाही पत्ता लागत नाही . मात्र , मैदानावर समोरच्या फलंदाजाची दांडी गुल करणारा धोनी आतापर्यंत स्वतः फलंदाजी करताना केवळ पाचवेळा स्टम्प आऊट झाला आहे . अवश्य वाचा – पराभवानंतरही विराट कोहलीचा विश्वविक्रम , दुसऱ्या सामन्यात ‘या’ ११ विक्रमांची नोंद गुवाहटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी - २० सामन्यात अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी स्टम्प आऊट झाला . इतर फलंदाजांप्रमाणे धोनीलाही या सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही . आतापर्यंत धोनी कशाप्रकारे स्टम्प आऊट झाला आहे , यावर एक नजर टाकणार आहोत . ५ . भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया , दुसरी टी - २० , गुवाहटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी - २० सामन्यात भारताची सलामीची फळी पुरती ढेपाळली . अशावेळी मधल्या फळीतला महत्वाचा फलंदाज या नात्याने धोनीवर भारतीय डावाची जबाबदारी होती . भारताची धावसंख्याही कमी असल्याने धोनी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं सर्वांना वाटत होतं . मात्र अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनी स्टम्प आऊट झाला , आणि भारताचा डाव आणखीनच गडगडला . ४ . भारत विरुद्ध वेस्ट इंडिज , चेन्नई , २०११ विश्वचषक २०११ साली भारतात खेळवल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत धोनी वेस्ट इंडिजच्या देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर स्टम्प आऊट झाला होता . बिशुच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात धोनी स्टम्प आऊट झाला होता . ३ . भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका , कानपूर कसोटी , २००८ अहमदाबाद येथील सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ कानपूरमध्ये दाखल झाला होता . भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार अनिल कुंबळेने या सामन्यातून माघार घेतल्यामुळे धोनीवर या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती . कसोटी कर्णधार म्हणून धोनीचा हा पहिला कसोटी सामना ठरला . या सामन्यात पॉल हॅरिसच्या गोलंदाजीवर धोनी मोठा फटका खेळायला गेला . यावेळी मार्क बाऊचरने धोनीला स्टम्प आऊट करत भारताला मोठा धक्का दिला होता . २ . भारत विरुद्ध बांगलादेश , ढाका कसोटी , २०१० २०१० साली बांगलादेशविरुद्ध खेळताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला २३३ धावांमध्ये ऑलआऊट केलं . यानंतर राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या अर्धशतकाने सामन्यात भारताची बाजू वरचढ झाली होती . यानंतर धोनी मैदानात फलंदाजीसाठी आल्यानंतर त्यानेही काही सुरेख फटके खेळत भारताची बाजू आणखी मजबूत केली . मात्र , बांगलादेशचा लेग स्पिनर गोलंदाज रकिबुल हसनने धोनीला चकवण्याची किमया साधली , यानंतर बांगलादेशचा यष्टीरक्षक मुश्फीकुर रहीमने धोनीचा बाद करत भारतीय संघाला धक्का दिला . १ . भारत विरुद्ध पाकिस्तान , फैजलाबाद कसोटी , २००६ २००६ साली भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता . कर्णधार द्रविड आणि लक्ष्मण यांच्यात झालेल्या चांगल्या भागीदारीनंतरही भारताचा डाव गडगडला . यानंतर इरफान पठाण आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारतासाठी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला . मात्र , दानिश कनेरियाच्या गोलंदाजीवर कामरान अकमलने धोनीला स्टम्प आऊट करत भारताला आणखी एक धक्का दिला होता .
2
दोन वेळा विम्बल्डन जेतेपद पटाकवणाऱ्या चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हावर बुधवारी येथील राहत्या घरी दरोडेखोराने चाकू हल्ला केला . पण या हल्ल्यामध्ये तिला गंभीर दुखापत झालेली नाही . ‘बुधवारी सकाळी पेत्रावर दरोडेखोराने हल्ला केला . या प्रकारच्या घटना येथे नित्याच्याच आहे . ती क्वितोव्हा आहे , म्हणून कोणी जाणूनबुजून हा हल्ला केलेला नाही’ असे प्रवक्ता कॅरेल तेजकॅल याने सांगितले . तो म्हणाला , ‘घरफोडी करणाऱ्याला रोखताना तिच्यावर चाकू हल्ला झाला आणि तीला दुखापत झाली . तिच्या जीवाला कोणताही धोका नाही . तिच्यावर उपचार सुरू आहेत . ’ क्वितोव्हाच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचा दावा ‘डीएनइएस डेली’ने केला आहे . २६ वर्षीय क्वितोव्हाने २०११ आणि २०१४मध्ये विम्बल्डन जेतेपद पटकावले होते . पायाच्या दुखापतीतून सावरणाऱ्या क्वितोव्हाने १ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या होपमन चषक स्पध्रेतून माघार घेतली आहे .
2
विजय हजारे करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांसाठी आजचा दिवस आनंदाने ठरला आहे . महाराष्ट्राने बंगालवर मात केल्यानंतर मुंबई आणि विदर्भाच्या संघाने आपल्या पहिल्या फेरीत विजय मिळवला . मुंबईने पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशवर तर विदर्भाने झारखंडचा पराभव केला . अवश्य वाचा – BLOG : आशा - निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट ! ! मुंबईने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला . अखिल हेरवाडकर आणि जय बिस्ता यांनी पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची शतकी भागीदारी केली . सलामीवीर जय बिस्ताचं शतक मात्र अवघ्या १० धावांनी हुकलं . हरप्रीत सिंहच्या फेकीवर जय बिस्ता ९० धावांवर धावबाद झाला . मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने ८५ चेंडूत १३४ धावांची आक्रमक खेळी करत मुंबईला ३३२ धावांपर्यंत मजल मारुन दिली . मध्य प्रदेशकडून आवेश खानने २ बळी मिळवले . अवश्य वाचा – विजय हजारे करंडक : महाराष्ट्राची बंगालवर मात , कर्णधार राहुल त्रिपाठीची शतकी खेळी प्रत्युत्तरादाखल मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी आपल्या डावाची संयमी सुरुवात केली . मात्र मध्य प्रदेशचा एकही फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये यशस्वी ठरला नाही . ठराविक अंतराने मध्य प्रदेशचे फलंदाज माघारी परतत राहिले , ज्याचा फायदा मुंबईला झालेला पहायला मिळाला . मध्य प्रदेशकडून अंशुल त्रिपाठीने ६७ धावांची खेळी केली . मुंबईकडून शम्स मुलानीने ४ तर ध्रुवील मतकरने ३ बळी घेतले . दुसरीकडे रणजी करंडक विजेच्या विदर्भाने अटीतटीच्या लढतीत विदर्भावर ७ धावांनी मात केली . सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या विदर्भाच्या संघाने ४९ षटकांत ३०० धावांपर्यंत मजल मारली . विदर्भाकडून फलंदाजीमध्ये जितेश शर्मा , संजय रामास्वामी आणि अपुर्व वानखेडे यांनी अर्धशतकी खेळी करुन संघाला ३०० धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्वाचा हातभार लावला . झारखंडकडून राहुल शुक्लाने ४ बळी घेतले . या धावसंख्येचा पाठलाग करताना झारखंडची सुरुवात काही चांगली झाली नाही . नझिम सिद्दकी उमेश यादवच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला . यानंतर ठराविकत अंतराने झारखंडचे ३ गडी माघारी परतल्याने विदर्भाची सामन्यात सरशी होणार असं चित्र दिसत होतं . मात्र कर्णधार इशान किशन आणि सौरभ तिवारीने चौथ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचत सामन्यात झारखंडची बाजू मजबूत केली . मात्र कर्ण शर्माने सौरभ तिवारीचा अडसर दूर केल्यानंतर झारखंडची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली . झारखंडच्या कुमार देबोब्रत आणि विकाश सिंह या तळातल्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करुन अर्धशतकी खेळी केली . मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात ते अखेर अपयशीच ठरले . संक्षिप्त धावफलक : मुंबई ३३२ / ५ , सूर्यकुमार यादव १३४ नाबाद , जय बिस्ता ९० . आवेश खान २ / ६२ विरुद्ध मध्य प्रदेश अंशुल त्रिपाठी ६७ , पुनीत दाते ४३ . शम्स मुलानी ४ / ६२ , ध्रुवील मतकर ३ / ५० निकाल – मुंबई ७४ धावांनी विजयी संक्षिप्त धावफलक : विदर्भ सर्वबाद ३०० , जितेश शर्मा ७९ , संजय रामस्वामी ७७ , अपूर्व वानखेडे ५१ . राहुल शुक्ला ४ / ५२ , अतुल सुरवर २ / ५२ विरुद्ध झारखंड २९३ / ७ , सौरभ तिवारी ६५ , कुमार देबोब्रत ६० . यश ठाकूर २ / ४५ , रजनीश गुरबानी २ / ५२ निकाल – विदर्भ ७ धावांनी विजयी
2
किंग्ज इलेव्हन पंजाबचे आज आव्हान ; सातत्य राखण्यासाठी यजमान उत्सुक कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये दोन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत . पण त्यांनी मंगळवारच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभूत केल्यास त्यांना अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी असेल . त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताना अव्वल स्थान पटकावण्याचेच कोलकात्याचे लक्ष्य असेल . दुसरीकडे रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर पहिला विजय मिळवलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला स्पर्धेतील दुसरा विजय मिळवून चौथ्या स्थानावर जाण्याची नामी संधी चालून आली आहे . पण यासाठी त्यांना फॉर्मात असलेल्या कोलकातावर विजय मिळवावा लागेल . कोलकाताचा कर्णधार गौतम गंभीर हा चांगल्या फॉर्मात आहे . दमदार फलंदाजी करत त्याने संघापुढे आदर्श निर्माण केला आहे . पंजाबविरुद्धच्या सामन्यात गंभीर मोहित शर्मा आणि संदीप सिंग यांचा सामना कसा करतो , हे पाहणे उत्सुकतेचे असेल . गंभीरचा सहकारी सलामीवीर रॉबिन उथप्पाला मात्र कामगिरीत सातत्य राखावे लागेल . गंभीरबरोबर सुनील नरिन , आंद्रे रसेल , मनीष पांडे आणि सूर्य कुमार यादव चांगली कामगिरी करताना दिसत आहेत . कोलकाताच्या विजयात फिरकीपटूंचाही महत्त्वाचा वाटा असतो , त्यामुळे त्यांच्या संघातील फिरकीपटूंच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असतील . महेंद्रसिंग धोनीसारख्या चाणाक्ष कर्णधाराच्या संघाला नमवण्याचे काम पंजाबने करून दाखवले आहे . मनन व्होराची पुण्याच्या संघाविरुद्धची कामगिरी ही लक्षवेधी ठरली . सलामीवीर मुरली विजयही सातत्याने चांगल्या धावा करत आहे . पण पंजाबच्या मधल्या फळीला मात्र अजूनही हवा तसा सूर गवसलेला नाही . गेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली असली तरी त्याच्याकडून कामगिरीमध्ये सातत्य पाहायला मिळालेले नाही . पंजाबचे मध्यमगती गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत , खासकरून संदीपची कामगिरी उजवी ठरत आहे . पण फिरकीपटू अक्षर पटेलला आपली छाप पाडता आलेली नाही . लेग स्पिनर प्रदीप साहूकडे चांगली गुणवत्ता आहे , पण त्याचा उपयोग संघाने योग्य पद्धतीने केल्यास तो त्यांच्यासाठी अव्वल गोलंदाज ठरू शकतो . दोन्ही संघांचा विचार केल्यास पंजाबपेक्षा कोलकात्याचे पारडे नक्कीच जड आहे . कोलकाता संघ हा परिपूर्ण वाटत असून त्यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे . दुसरीकडे पंजाबच्या संघातील काही ठरावीक खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसत आहेत . पण पुण्याला पराभूत केल्यानंतर ते कोलकात्यालाही धक्का देतात का , याची उत्सुकता असेल . संघ किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर ( कर्णधार ) , कायले अॅबॉट , मुरली विजय , मनन व्होरा , मिचेल जॉन्सन , शॉन मार्श , ग्लेन मॅक्सवेल , अनुरीत सिंग , अक्षर पटेल , वृद्धिमान साहा ( यष्टिरक्षक ) , प्रदीप साहू , संदीप शर्मा , मोहित शर्मा , मार्क्स स्टॉयनिस , स्वप्निल सिंग , अरमान जाफर , फरहान बेहरादिन , के . सी . करिअप्पा , रिशी धवन , गुरकिराट सिंग मान , निखिल नाईक , शार्दूल ठाकूर . कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर ( कर्णधार ) , रॉबिन उथप्पा , मनीष पांडे , युसूफ पठाण , पीयूष चावला , कुलदीप यादव , मनन शर्मा , अंकित राजपूत , राजगोपाल सतीश , जयदेव उनाडकट , सूर्यकुमार यादव , उमेश यादव , जॉन हॅस्टिंग , ब्रॅड हॉग , जेसन होल्डर , शेल्डन जॅक्सन , ख्रिस लिन , मॉर्ने मॉर्केल , सुनील नरीन , कॉलिन मुर्नो , आंद्रे रसेल आणि शकिब अल हसन . वेळ : रात्री ८ . ०० वाजल्यापासून . प्रक्षेपण : सोनी सिक्स , सेट मॅक्स .
2
सकाळचा नाश्ता अजिबात चुकवू नये असे भारतीय आहारशास्त्र सांगते . रात्रभर पोट रिकामे असल्याने पोटात खड्डा पडलेला असतो . शरीराला दिवसभराच्या कामांसाठी उर्जा मिळावी यासाठी सकाळी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता करणे अतिशय आवश्यक असते . मात्र भारतात बहुतांश लोक बाहेर नाश्ता करतात . शिक्षण - नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारे , ऑफिस दूर असणारे किंवा यांसारखी अनेक कारणे यामागे असू शकतात . तर काही जण केवळ आवड म्हणून नाश्ता घराबाहेर करण्याला प्राधान्य देतात . ‘अमेरिकन एक्सप्रेसने’ केलेल्या एका अभ्यासानुसार , लोकांचा नाश्त्यावर होणारा खर्च सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे . २०१६ मध्ये नाश्त्यावर केला जाणारा खर्च हा २०१५ मध्ये केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा ५६ टक्क्यांनी जास्त असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे . मुंबई , पुणे , बंगळूरु , चेन्नई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सकाळच्या वेळात रेस्तराँमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे यामध्ये नोंदविण्यात आले आहे . मागील काही काळापासून भारतात नाश्त्याच्या बाबतीत मोठ्याप्रमाणात जागरुकता केली जात असून त्याचाच हा परिणाम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे . नाश्त्याच्या पदार्थांमध्येही दिवसागणिक बदल होत असून इडली , डोसा , पुरी - भाजी यांच्या पलिकडे जात पॅनकेक , वेफल्स अशा पाश्चिमात्य पदार्थांचाही समावेश कऱण्यात येत आहे . नाश्त्याची होम डिलिव्हरीही मोठ्या प्रमाणात सुरु आहे . बाहेर खाण्याच्या खर्चावर शहरांनुसार बदल असल्याचेही चित्र आहे . बंगळुरुमध्ये २०१६ मध्ये या खर्चात ६७ टक्क्यांनी वाढ झाली असून दिल्लीमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे . तर मुंबईमध्ये हा खर्च ६३ टक्क्यांनी वाढल्याचे या अभ्यासात म्हटले आहे . अमेरिकन एक्सप्रेस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज अडलखा याबाबत म्हणाले की , क्विक सर्व्हिस रेस्तराँ वेगाने वाढत आहेत . याचे कारण म्हणजे बाहेर खाणे अतिशय सोयीचे झाले आहे .
1
पाठदुखीने त्रस्त असाल तर त्यासाठी योगासने हा उत्तम उपाय असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे . भारत , इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून योगा करणे हे आरोग्याला हितकारक असल्याचे सिद्ध झाले असून , त्यामुळे दीर्घकाळापासून असलेल्या पाठीच्या दुखण्यापासून दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे . पाठीचे दुखणे हे बहुतांशपणे प्रत्येकाला भेडसावणारा आजार असून त्यावर स्वतःची काळजी किंवा विविध प्रकारच्या औषधांचाच मारा केला जातो . सध्याच्या जीवनशैलीत व्यायाम हा उत्तम पर्याय ठरू शकतो , म्हणूनच योगा हा या आजारावरील उत्तम उपचारपद्धती असल्याचे सिद्ध होते . अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील सुसान वाइलँड यांच्या म्हणण्यानुसार पाठीच्या दुखण्यावर योगा हाच योग्य पर्याय असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे . कारण योगाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली असून दैनंदिन जीवनशैलीतदेखील पाठीच्या आजारावर योगा निश्चितच परिणामकारक उपचारपद्धती आहे . या वेळी संशोधकांनी ३४ ते ४८ वयोगटातील १ हजार ८० पुरुष आणि महिलांचे परीक्षण केले . या वेळी संशोधकांना व्यायाम न करणाऱ्यांमध्ये पाठीच्या आजाराशी निगडित समस्या अधिक असल्याचे दिसून आले , तर योगा करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण बऱ्याच अंशी कमी असल्याचे दिसून आले . ( टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
विश्वकरंडकातील सलामीच्या लढतीत अर्जेंटिना आइसलॅंडविरुद्ध किती गोल करणार याची चर्चा सुरू आहे , पण दोन वर्षांपूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डोला जखडून ठेवले होते , मग लिओनेल मेस्सी क्या चीज है , असेच प्रत्युत्तर आइसलॅंड देत आहे . दोन वर्षांपूर्वी आइसलॅंडने पोर्तुगालला 1 - 1 असे रोखत सर्वांना धक्का दिला होता . त्या वेळी रोनाल्डोची चांगलीच कोंडी केली होती . त्या वेळी रोनाल्डोने आइसलॅंडने कमालीचा बचावात्मक खेळ केला , असे सांगताना ते खूपच कोत्या मनोवृत्तीचे आहेत असे सांगितले होते . आइसलॅंडचे मार्गदर्शक योहान गुदमुंडसन नेमक्या याच गोष्टीकडे लक्ष वेधत होते . " तो काय बोलला होता आठवते ना . त्यांना आम्ही दुसरा गोल करू दिला नव्हता . आमची महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिली लढत होती . तरीही आम्ही त्याला जिंकू दिले नव्हते , ' आता प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी आहे , याकडे लक्ष वेधल्यावर गुदमुंडसन काहीसे शांत होतात . ते म्हणाले , " " मेस्सीविरुद्ध लढत सोपी नसेल , पण त्याला जखडून ठेवले , तर त्याला गोल करता यणार नाही . हे घडले , तर आम्हाला आनंदच होईल . आता त्याला जखडून ठेवले , त्याच्याविरुद्ध जिंकलो , तर तो रोनाल्डोपेक्षा जास्तच चिडेल . आमच्यावर जास्त बचाव करण्याचीच वेळ येईल , पण त्यासाठी आम्ही तयार आहोत . ' ' अर्जेंटिनाचे आक्रमण आमच्यापेक्षा खूपच सरस आहे , पण त्यांच्या बचावात खूपच उणिवा आहेत . आम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकतो . युरो स्पर्धेपेक्षा ही लढत जास्त अवघड असेल ; पण आम्हीही तितकेच तयार आहोत असेही ते म्हणाले .
2
आपल्या दैनंदिन जीवनातील एखाद्या कामापेक्षा सोशल मीडियावर अपडेट राहणे मागच्या काही काळात अनेकांसाठी महत्त्वाचे झाले आहे . आयुष्यात थोडे काही झाले की ते अपडेट करणे नाहीतर ज्यांनी अपडेट केले असेल त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवणे फारच महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे . अगदी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली बोटं आणि नजर मोबाईलवर खिळलेली असते . सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात हे आपल्यला माहितही असते . मात्र आपल्याला त्याचे इतके व्यसन असते की या समस्यांकडे आपले नकळत दुर्लक्ष होते . सोशल मीडियाच्या जास्तीच्या वापराने शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही उद्भवतात . मात्र सोशल मीडियाच्या वापरामुळे कोणतेही त्रास उद्भवू नयेत यासाठी काही सोप्या टीप्स नक्की उपयोगी पडतील . थोडा ब्रेक घ्या – आपण सोशल मीडियावर सतत वेळ घालवत असू तर आपण टाईमपास करतोय असे नाही . काही वेळा आपण चांगल्या गोष्टींसाठीही त्याचा वापर करु शकतो . पण सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहील्यास मानसिक तणाव आपल्यावर हावी झाले आहेत असा याचा अर्थ होतो . त्यामुळे जेव्हाही तुम्हाला अशाप्रकारे तणाव आहे असे वाटेल तेव्हा काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून लांब राहा . ज्या लोकांना आपल्याशी कनेक्ट राहायचे असते ते आपली नक्की वाट पाहतात यावर विश्वास ठेवा . सिलेक्टीव्ह राहायला शिका – सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी अपडेट होत असतात . ती प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पाहीजे आणि आपण ती पाहिली पाहिजे असे नाही . यामुळे आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा वेळ विनाकारण वाया जातो . त्यामुळे सोशल मीडियावर सिलेक्टीव्ह राहणे आवश्यक आहे . आपल्या गरजेनुसार आपल्याला आवश्यक असणाऱ्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा . त्यामुळे तुमचा सोशल मीडियाचा वापर निश्चितच अर्थपूर्ण होईल . थोडक्यात आनंदी राहा – एकावेळी भरपूर पोस्ट केल्यावर तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल असे नाही . त्यामुळे विनाकारण एकामागे एक पोस्ट करत राहणे यात काहीच तथ्य नसते . जे पोस्ट कराल ते चागंले असेल याकडे लक्ष द्यायला हवे . उगाचच कोणाशीही जोडले जाऊन स्वतःचा वेळ वाया घालवू नका . त्यापेक्षा जे चांगले आहेत आणि तुमच्या विचारांशी ज्यांची विचारधारा जुळते त्यांच्याशीच कनेक्ट राहा . क्रीएटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा – सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर अवलंबून राहू नका , कधीतरी ही उपकरणे बाजूला ठेऊन तुम्हाला आतून आवडतील अशा गोष्टी नक्की करा . त्या तुम्हाला नक्कीच जास्त आनंद देऊन जातील . यामध्ये चित्रकला करणे , लिहीणे अगदी शिवणकाम किंवा एखादी छान शोभेची वस्तू बनविणे असे काहीही असू शकेल . त्यामुळे तुमचा आतला आवाज ऐकायला शिका . त्यामुळे तुम्ही नक्कीच जास्त आनंदी व्हाल .
1
भोपाळमधील एका लग्नसमारंभातील ‘आप के आ जानेसे’ या गाण्यावर थिरकलेल्या काकांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे . या व्हिडिओवर गेल्या अनेक दिवसापासून लाईक्स आणि शेअरचा पाऊस पडत आहे . इतकचं नाही तर अगदी काही व्यक्तींनी हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्स अॅप स्टेटसवरही ठेवला आहे . हा व्हिडिओ व्हायरल होत अगदी बॉलिवूड कलाकारांपर्यंतही पोहोचला आहे . डान्सिंग काकांच्या याच कामाची दखल एका बॉलिवूड कलाकाराने घेतली असून त्याच्या मदतीने या काकांचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . विदिशा येथे प्राध्यापक असलेले संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू जीजा यांनी त्यांच्या मेहूण्याच्या लग्नामध्ये ‘आप के आ जानेसे’ या गाण्यावर डान्स केला होता . या डान्समध्ये त्यांच्या पत्नीनेही त्यांना साथ दिली होती . मात्र , काकांनी केलेल्या डान्समुळे उपस्थितांच्या नजरा काकांवर खिळून गेल्या होता . या लग्नातच उपस्थित असलेल्यांपैकी कोणीतरी या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आणि बघता बघता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला . मुळात हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल याची कल्पनाही संजीव यांना नव्हती . मात्र याच व्हिडिओमुळे त्यांचं नशीब सध्या पालटण्याच्या मार्गावर आहे , असं सांगण्यात येत आहे . काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ अभिनेता सुनील शेट्टीने पाहिला आणि त्याने संजीव श्रीवास्तव यांना त्यांच्या कुटुंबियांसह मुंबईला येण्याचं आमंत्रण दिलं . त्यानंतर संजीव यांनी सुनील शेट्टी याच्या मुंबईतील ऑफिसमध्ये भेट घेतली . या भेटीनंतर सुनील शेट्टी त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये संजीव यांना घेणार असल्याची चर्चा रंगत आहे . मात्र , याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही . संजीव आणि सुनील यांच्या भेटीचा फोटोदेखील संजीव यांनी शेअर केला असून सुनील शेट्टी यांच्या भेटीदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे . ‘सुनील शेट्टी यांच्या पहिल्याच भेटीत सुनील यांनी मला प्रेमाने मिठी मारत माझा व्हिडिओ आठ वेळा पाहिल्याचे सांगितले . हे ऐकून मला मनापासून आनंद झाल्याचे’ संजीव यांनी सांगितले . दरम्यान , संजीव यांनी ट्विटर खाते सुरु केले असून अवघ्या काही काळातच त्यांचे ८ हजार फॉलोअर्स झाले आहेत . ट्विटर खाते सुरु करताच त्यांनी ‘सोनी दे नखरे’ या गाण्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे . या गाण्यात त्यांनी स्वतःच्या अंदाजात डान्स केला असून गोविंदा आणि सलमान यांनीदेखील अशा डान्सस्टेप करुन दाखवाव्यात , असे आव्हान केले आहे .
0
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे पत्नीवरील प्रेम सर्वश्रुत आहे . एक आदर्श पती , वडील आणि मुलगा अशा सर्व जबाबदाऱ्या तो उत्तम पार पाडतो . त्याचं सर्वांवर जीवापाड प्रेम आहे , पण यापैकी एकाचाही फोटो त्याच्या पाकिटात नसतो . होय , हे खरं आहे . त्याच्या पाकिटात एका दिग्गज कलाकाराचा फोटो आहे . तो कलाकार जगज्जेता आहे . विनोदाचा बादशाहा असलेल्या चार्ली चॅपलिन यांचा फोटो अक्षयच्या पाकिटात असतो . अक्षयनंच हे सांगितलं आहे . Tumhari Sulu Teaser : विद्या बालन म्हणते , ‘हॅलो… मैं सुलु बोल रही हूँ ! ’ ‘माझ्या पाकिटात नेहमीच प्रसिद्ध विनोदवीर चार्ली चॅपलिन यांचा फोटो असतो . कधीही आयुष्यात कठीण प्रसंग आला की मला चार्ली यांचे विचार आठवतात . त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर माझा विश्वास आहे . ते आणि त्यांचे सिनेमे हे माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत . एवढा मोठा कलाकार असूनही त्यांची नम्रता खूप काही शिकवून जाते , असे अक्षयने एका मुलाखतीत सांगितले . ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘मास्टर शेफ ऑफ इंडिया’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन केल्यानंतर अक्षय कुमार आता परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे . ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज ५’ या कॉमेडी शोद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय . शोचे हे पाचवे पर्व आहे . त्यात अक्षय परीक्षक असणार आहे . या शोमध्ये अक्षयसह मल्लिका दुआ , जाकीर खान आणि हुसेन दलाल हेही परीक्षकाच्या भूमिकेत आहेत . सुनील पाल , एहसान कुरेशी , भारती सिंग , राजू श्रीवास्तव , कपिल शर्मा यांसारखे नामांकित कॉमेडियन्स ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत . अक्षयच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत . सध्या तो ‘पॅडमॅन’ आणि ‘गोल्ड’ या दोन सिनेमांच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र आहे .
0
शरीराच्या इतर समस्यांबरोबरच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते . अनेकदा घाईगडबडीत आपण त्वचेची निगा राखण्यात कमी पडतो . कधी प्रदूषणामुळे , उन्हामुळे , तर कधी पोट साफ नसल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात . चुकीची जीवनशैली , खाण्याच्या चुकीच्या पद्धती , अपुरी झोप यांमुळे चेहऱ्यावर फोड येतात , डोळ्याखाली डार्क सर्कल येतात . मग यावर कधी पार्लरमध्ये जाऊन उपचार केले जातात तर कधी बाजारात मिळणारी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरुन चेहरा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जातो . मात्र या सगळ्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो . ग्रीन टी हा एक उत्तम पदार्थ आहे , ज्याचा वापर करुन आपण चेहऱ्यावरील पिंपल्स नक्कीच कमी करु शकतो . ग्रीनटीमध्ये अँटीमायक्रोबायल , अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल घटक असतात जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात . पाहूयात ग्रीन टी कशाप्रकारे उपयुक्त ठरतो . ग्रीन टी ग्रीन टी काही वेळासाठी पाण्यात उकळा . हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाका . चेहरा स्वच्छ करुन घेऊन त्यावर हा स्प्रे मारा . हे पाणी काही काळासाठी चेहऱ्यावर तसेच ठेवा . मग चेहरा गार पाण्याने धुवून त्यावर मॉईश्चरायझर लावा . मध आणि ग्रीन टी ग्रीन टीच्या बॅग ३ मिनिटासाठी उकळा मग त्या बाहेर काढून गार करा . मग त्यात मध टाका . मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावून २० मिनिटांसाठी तसेच ठेवा . मग चेहरा गार पाण्याने धुवून टाका . मग टॉवेलने चेहरा स्वच्छ धुवा . हे आठवड्यातून ३ ते ४ वेळा करा . कोरफड आणि ग्रीन टी ग्रीन टीच्या बॅग उकळा आणि गार करा . मग यात कोरफडीचा गर मिसळा . हे मिश्रण एका बाटलीत ठेवा . हे मिश्रण कापसाने हळूवारपणे चेहऱ्याला लावा . हे मिश्रण कोरडे झाल्यावर साध्या पाण्याने चेहरा धुवा . त्यानंतर मॉईश्चरायझर लावून ठेवा . लिंबू आणि ग्रीन टी ग्रीन टी उकळून त्या गार करा . त्यात लिंबाचा रस मिसळा . कापसाने हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि पूर्ण वाळेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा . वाळल्यानंतर गार पाण्याने धुवून टाका . मग मॉईश्चरायझर लावा . चांगले परिणाम दिसण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून दोन वेळा करा . ऑलिव्ह ऑईल आणि ग्रीन टी ऑलिव्ह ऑईल अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असते . त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील पुरळ जाण्यासाठीही त्याचा चांगला फायदा होतो . ग्रीन टी उकळून गार झाल्यानंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाका . स्र्पे बॉटलमध्ये टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर फवारा . मग चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा . मग गार पाण्याने चेहरा धुवून मॉईश्चरायझर लावा .
1
यशराज फिल्म्सचा ‘ठग’ चित्रपट सध्या खुप चर्चेत आहे . त्यात मुख्य अभिनेता कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . अनेक अभिनेत्यांचा विचार या सिनेमासाठी केला जात आहे . सुरुवातीला यशराज फिल्म्सकडून हृतिक रोशनच्या नावाची वर्णी लागलेली . पण आता मात्र या सिनेमासाठी आमीर खानचा विचार करण्यात येणार आहे . हृतिकला पसंती असताना अचानक त्याला या सिनेमापासून का वगळण्यात आले याचे कारण अजून कळले नसून सिनेवर्तुळात सध्या ठगमध्ये नवीन अभिनेता कोण याचीच चर्चा होत आहे . सुरुवातीला हृतिक रोशनशी या सिनेमाविषयी बोलण्यात येत होते . मात्र , त्याने दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांच्याकडे ६० कोटी रुपयांचे मानधन मागितले . एकाच अभिनेत्याला ६० कोटी रुपये मानधन देणे आदित्य चोप्रा याला थोडे जास्तच वाटले . हृतिकशी मानधनाला घेऊन वाटाघाटी करण्याचा प्रयत्नही करण्यात आले होते . पण हृतिक मात्र मानधनाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायला तयार नाही असेच दिसते . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खान , सलमान खान , आमीर खान हे मानधनाच्या बाबतीत निर्मात्यांना परवडणारे कलाकार आहेत . मात्र , हृतिकने एकट्यानेच ६० कोटी रुपये मागितल्यावर मात्र आदित्यला तो ठगमध्ये असण्यावर पूर्नःविचार करावा लागला . जर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर त्यातला काही भाग हा अभिनेत्यालाही मिळत असतो . त्यामुळे ६० कोटी रुपये मानधन हे कोणत्याही निर्मात्याला विचार करायला लावणारीच रक्कम आहे नाही का ? पण , एवढी मोठी रक्कम मागण्यामागचे कारण तरी काय असेल . तर या सिनेमाचे कथानक एवढे दर्जेदार आहे की बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची चांगलीच धूम होईल अशी हृतिकला खात्री आहे . पण , अधिक रक्कम मागितल्यामुळे मात्र त्याचे ठगसाठीची दारं बंद होऊन ती आता आमीर खानसाठी खुली झाली आहेत . त्यामुळे अती हाव ही केव्हाही वाईटच…
0
सलमान खानच्या ‘लकी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या स्नेहा उल्लालचा १८ डिसेंबर १९८७ मध्ये जन्म झाला . स्नेहा प्राणी प्रेमी आहे . आज तिच्या वाढदिवसादिवशी तिच्याबद्दल फार माहीत नसलेल्या गोष्टींवर टाकूयात एक नजर… स्नेहा प्राण्यांसाठी खूप कार्य करताना दिसते . स्नेहाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये सापासोबतचा एक फोटो शेअर करत म्हटले होते की , प्राण्यांना आपल्या मदतीची फार आवश्यकता आहे . स्नेहा सापांना जेवढी अलगद सांभाळते , तेवढेच तिच्या घरातले सांभाळू शकत नाहीत . पण तरीही तिच्या घरातील सदस्य सापांना हात लावण्याचा प्रयत्न करताना दिसतात . स्नेहाने या सापाला वाचवून नंतर त्याला पनवेल येथील जंगलात सोडून दिले होते . तसेच एका पोपटालाही तिने आपल्या घरी आसरा दिला होता . सकाळी त्याच्यासोबत गप्पा मारताना स्नेहा . स्नेहाचे मांजरींवरही तेवढेच प्रेम आहे . तिच्याकडे दोन मांजरी असून पेप्सी आणि कोला अशी या दोन मांजरींची नावं आहेत . मांजरांसाठी स्नेहाने खास बेडही तयार केला आहे . स्नेहा सोशल मीडियावर फार सक्रिय असते . तिने बॉलिवूड कॉलिंग असा मेसेज तिच्या पोस्टमध्ये लिहिला होता . त्यामुळे येत्या काळात स्नेहा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसू शकते असे म्हटले तर खोटे ठरणार नाही . २००५ मध्ये आलेल्या ‘लकी’ सिनेमात स्नेहा अगदी ऐश्वर्या रायसारखी दिसते यामुळे ती चर्चेत होती .
0
नुकताच मुंबईला ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला . गेल्या आठवडाभरापासून ओखी चक्रीवादळाने केरळ , तामिळनाडू आणि लक्षद्वीप भागात थैमान घातले होते . यानंतर हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने सरकत होते . सोमवारी संध्याकाळपासूनच राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली . मंगळवारी देखील मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते . ओखी चक्रीवादळामुळे शाळा , महाविद्यालय , कार्यालये बंद ठेवण्यात आले होते . मात्र , अशा वातावरणातही ऐश्वर्या राय बच्चन , अनिल कपूर आणि राजकुमार राव यांनी आपल्या शुटिंगचे शेड्यूल रद्द होऊन दिले नाही . वाचा : बहुचर्चित प्रोजेक्टमधून आमिरचा काढता पाय ? ऐश्वर्या , अनिल आणि राजकुमार सध्या आगामी ‘फन्ने खान’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत . महाराष्ट्रात ओखी वादळाची चाहूल लागली होती तेव्हा हे कलाकार भांडूप येथील एका स्टुडिओत काम करत होते . चक्रीवादळाचे वृत्त कळूनही घरी न जाता तब्बल १२ तास ही कलाकार मंडळी स्टुडिओत काम करत होती . मिळालेल्या माहितीनुसार , मंगळवारी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत सर्व कलाकार काम करत होते . यादरम्यान , कलाकार आणि क्रूच्या सुरक्षेचा विचार करता दिग्दर्शकाने स्टुडिओतच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला . वाचा : सॅनिटरी नॅपकिनविषयी दियाने दिला महत्त्वाचा संदेश ऑस्कर पुरस्कारामध्ये नामांकन मिळालेल्या ‘एवरीबडी इज फेमस’ या डच चित्रपटाचा ‘फन्ने खान’ हा रिमेक आहे . अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून राकेश ओमप्रकाश मेहरा आणि प्रेरणा अरोरा चित्रपटाचे निर्माते आहेत .
0
फॅशन विश्वात कोणतीही गोष्ट स्थिर नसते येथे दर आठवड्याला वेगवेगळे ट्रेंड येत असतात . हे ट्रेंड फॉलो करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे . तर फॅशनविश्वात गेल्या काही दिवसांपासून एक ट्रेंड धुमाकूळ घालतोय . हा ट्रेंड म्हणजे आपोआप रंग बदलणाऱ्या नखांचा . कृत्रिम नखांना महिलांमध्ये मोठी पसंती आहे . ही नखं नैसर्गिक नखांपेक्षा अधिक आकर्षक आणि मोठी दिसतात त्यामुळे मॉडेल्सची या कृत्रिम नखांना पसंती असते . या नखांना वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेंट्सनंही रंगवता येतं त्यामुळे या नखांना मागणीही जास्त आहे . मात्र आता यात वेगळाच ट्रेंड आला असून अनेक महिलांना तो आकर्षित करत आहे . ‘ड्युपी नेल्स’नं एक व्हिडिओ शेअर केला आहे . जो सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे . या कंपनीनं कृत्रिम नखं तयार केली आहेत . ही नखं रंग बदलतात . या नखांवर थर्मल चेंजिग पॉलिश लावण्यात आलं आहे . तापमान थोडं वाढलं किंवा कोमट पाण्यात ही नखं भिजली तर त्यांचा रंग लगेच बदलतो . या नेलपॉलिशमध्ये असणारी रंगद्रव्य तापमान वाढलं की फिकट रंगाची होतात अशी माहिती या ब्रँडनं दिली आहे . त्यामुळे या ट्रेंडची चर्चा फॅशन विश्वात होताना दिसत आहे .
1
अति प्रमाणात वाढलेली थंडी आणि हवेच्या वाढलेल्या दाबामुळे वृद्ध रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते . वाढलेल्या थंडीमुळे हृदय निकामी होऊन त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आला आहे . कॅनडातील लावल विद्यापीठ आणि डी शेरब्रूके विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले . वृद्ध रुग्णांनी थंड हवामानामध्ये हृदय निकामी होण्याचे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अधिक धुके असणाऱ्या भागात जाणे टाळावे , असा सल्ला संशोधकांनी दिला आहे . मागील अभ्यासामध्ये हवामानामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम असुरक्षित ( सहज परिणाम होईल अशा ) लोकांवर कसा होतो हे सांगण्यात आले होते . ज्या वेळी अधिक तापमानवाढ किंवा थंडी येते त्या वेळी कमी उत्पन्न असलेल्या गटातील लोकांना मृत्यू येण्याचे प्रमाण वाढते , असे दिसून आले होते . संशोधकांनी अभ्यासामध्ये तापमानामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम आणि हवेचा दाब याचा रुग्णाचे हृदय निकामी होण्यावर कसा प्रभाव पडतो याचा अभ्यास केला . यासाठी २००१ ते २०११ दरम्यान ज्यांचे हृदय निकामी झाले होते अशा ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या १ लाख १२ हजार ७९३ लोकांचा अभ्यास केला . प्रत्येक दिवशी सामान्य स्थितीपेक्षा तापमान जर एक अंश सेल्सिअसने कमी झाले तर मृत्यू येण्याचा , रुग्णालयात दाखल करण्याचा अथवा हृदय निकामी होण्याचा धोका ० . ७ टक्के वाढत असल्याचे दिसून येते . त्यामुळे वृद्ध रुग्णांनी अधिक प्रमाणात थंडी असणाऱ्या भागामध्ये जाण्याचे शक्यतो टाळावे , असे लावल विद्यापीठाचे प्राध्यापक पियरे गोस्सेलिन यांनी म्हटले आहे .
1
दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा ‘सैराट’ हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरत असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या या चित्रपटासंदर्भातील वक्तव्याने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे . ‘सैराट’ हा चित्रपट मराठा समाजाची लायकी काढणारा आणि अपमान करणारा चित्रपट असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे . मराठा आरक्षण प्रश्नावर शुक्रवारी सोलापुरात आयोजिलेल्या एल्गार मेळाव्यासाठी आमदार राणे आले होते . यावेळी नितेश यांनी ‘सैराट’मध्ये मराठा समाजाच्या करण्यात आलेल्या चित्रणावर आक्षेप घेतला . मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट ८० कोटी कमावतो . अशाचप्रकारे अन्य समाजाचे किंवा ब्राह्मण समाजाचे चित्रण करण्यात आले असते तर संबंधितांना महाराष्ट्रात फिरून दिले असते , का असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला . ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात काशीबाई नाचल्याचे दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो , मग मराठा समाज का शांत राहतो असे चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केले . यावेळी नितेश यांनी ठाकरे घराण्यालाही लक्ष्य केले . मराठा आरक्षणाला ठाकरे घराण्याचा विरोध आहे . परंतु त्यासाठी ठाकरे घराण्याला अंगावर घेण्याची आक्रमकता आपण ठेवल्याचे त्यांनी नमूद केले . आपले वडील नारायण राणे यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिले होते . परंतु आता फडणवीस सरकारने हे आरक्षण हिसकावून घेतले आहे . यात सरकारची मराठा समाजाविषयी विद्वेषाची भावना दिसून येते , असा आरोप त्यांनी केला .
0
अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी आता अधिकृतरित्या विवाहबंधनात अडकणार आहे . आपली लहानपणापासूनची मैत्रिण अँटोनेला रोकुझो सोबत मेस्सी लवकर लग्न करणार असल्याचं समजतंय . मेस्सी आणि अँटोनेला वयाच्या ५ व्या वर्षापासून एकमेकांना ओळखतायत . २००८ पासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायला लागले होते . यानंतर अँटोनेलाने दोन गोंडस मुलांना जन्मही दिला होता . मेस्सीला थिएगो आणि मातेओ अशी २ मुलं आहेत . अँटोनेला आणि मेस्सी हे अर्जेंटीनाच्या रोसारिओ शहरात लहानाचे मोठे झाले . मेस्सीने आपल्या लग्नाचं नेमकं स्थळ अजून जाहीर केलं नसलं तरीही ज्या ठिकाणी दोघं पहिल्यांदा भेटले त्याच रोसारिओ शहरात हा सोहळा पार पडला जाऊ शकतो . या सोहळ्याबद्दल सध्या मेस्सीने गुप्तता पाळायचं ठरवलेलं दिसतंय . लग्नाला त्याच्या चाहत्यांची होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेता लग्नाची तारीख आणि जागा मोजक्या लोकांना कळवण्यात येणार असल्याचं समजतंय . परंतू सुत्रांच्या माहितीनूसार मेस्सी या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच ३० जूनला लग्न करण्याची शक्यता आहे . लियोनेल मेस्सीचे मैदानासोबत मैदानाबाहेरही तितकेच चाहते आहेत . त्यामुळे आंतराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अर्जेंटीनाचं नाव मोठं करणाऱ्या मेस्सीचा विवाह ही त्यांच्यासाठी नक्कीच मोठी गोष्ट असणार आहे . मात्र मिळालेल्या माहितीनूसार मेस्सी आणि अँटोनेलाने विवाहसोहळ्याला कोणतीही भेटवस्तू न आणण्याचं आवाहन केलं आहे . भेटवस्तूंपेक्षा लियोनेल मेस्सी फाऊंडेशनला मदत करण्याची विनंती या दोघांकडूनही करण्यात आल्याचं समजंतय . २९ वर्षीय लियोनेल मेस्सी हा जगातील सर्वात महागड्या फुटबॉलरपैकी एक मानला जातो . आंतराष्ट्रीय सामन्यात अर्जेंटिनाचं प्रतिनिधीत्व करणारा मेस्सी क्लब फुटबॉलमध्ये एफ . सी . बार्सिलोना संघांचं नेतृत्व करतो .
2
मे महिना म्हणजे उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे त्वचेला होणारा त्रास . बाहेर जाणे तर गरजेचे असल्याने या कडक उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावणे हा एक उत्तम मार्ग आहे . उन्हामुळे त्वचेला होणारा त्रास सनस्क्रीनमुळे कमी होतो . उन्हाचा तडाखा जास्त असल्यास चेहऱ्यावर तसेच हातांवर काळे डाग येणे , रॅश आल्यासारखे दिसणे , पांढरे डाग पडणे यांसारखे परिणाम दिसून येतात . मात्र सनस्क्रीन लोशन लावल्याने या परिणामांचे प्रमाण कमी होते . आता हे सनस्क्रीन लोशल कोणत्या कंपनीचे , किती एसपीएफ असलेले घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात . तसेच या उत्पादनांमधील घटक काहीवेळा त्वचेसाठी हानीकारक ठरु शकतात . अशावेळी घरच्या घरी सनस्क्रीन लोशन तयार करुन ते लावल्यास ? आता घरी सनस्क्रीन कसे बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आम्ही काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत . शिवानी दीक्षित यांनी घरच्या घरी सनस्क्रीन कसे बनवता येते हे सांगितले आहे . यामुळे तुमच्या त्वचेचे उत्तम पद्धतीने पोषण होण्यासही मदत होऊ शकते . असे बनवा सनस्क्रीन लोशन घटक पदार्थ – १ . खोबरेल तेल ( मॉईश्चरायझर आणि एसपीएफ ) – अर्धी वाटी २ . बदाम तेल ( मॉईश्चरायझर आणि एसपीएफ ) – अर्धी वाटी ३ . बीज वॅक्स ( वॉटरप्रूफ आणि बॅक्टेरियाला प्रतिबंध करण्यासाठी ) – दोन चमचे ४ . बटर – दोन चमचे ५ . व्हिटॅमिन ई तेल – दोन चमचे ६ . गाजरांच्या बियांचे तेल – १५ थेंब ७ . लवेंडर तेल – १० थेंब ८ . फार बारीक नसलेली जस्ताची पावडर – २ चमचे कृती – * एका उष्णता रोधक भांड्यामध्ये खोबरेल तेल आणि बदाम तेल एकत्र करा . त्यानंतर त्या बीज वॅक्स आणि बटर एकत्र करा . तुम्हाला सनस्क्रीन थोडे घट्ट हवे असेल तर वॅक्स जास्त घाला . त्यानंतर हे थोडेसे गरम करा . * दुसऱ्या एका भांड्यात दोन किंवा तीन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घ्या . त्यात जस्ताची पावडर घालून हे मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र करा . * गाजराच्या बियांचे तेल आणि लवेंडर तेलाचे यामध्ये एकत्र करुन हे मिश्रण नीट ठेवून द्या . * हे मिश्रण थंड ठिकाणी आणि सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणार नाही असे ठेवा .
1
केस हे महिलांच्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचे असतात . मात्र हे केस मेंटेन करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो . सौंदर्याचे प्रतिक असलेले हे केस काही ऋतूंमध्ये मुलायम आणि चमकदार असतात तर काही ऋतूंमध्ये ते एकदम कोरडे आणि रुक्ष दिसतात . ऑक्टोबर महिन्यातील हवेमुळे केस रुक्ष होण्यास सुरुवात होते . मग मुली पार्लरमध्ये जाण्याचा पर्याय स्विकारतात आणि हेअर स्पा , स्मूदनिंग यावर खूप पैसे खर्च करतात . मात्र काही घरगुती उपाय केल्यास केस चांगले होण्यास मदत होते . काय आहेत हे उपाय पाहूया… दही लावल्याने होतात मुलायम केस मुलायम होण्यासाठी स्वयंपाकघरातील अनेक पदार्थ उपयुक्त ठरतात . केसांवर महागडे उपचार करण्यापेक्षा केसांना दही लावल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो . एक ते दोन दिवसांत फरक पडलेला दिसेल . रोज दही लावणे शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा तरी हा उपाय कराच . खोबरेल तेल सगळ्यात उत्तम जे लोक केसांसाठी वेगवेगळी तेलं वापरतात . त्यांनी असे करण्यापेक्षा खोबरेल तेलाचा वापर करावा . खोबरेल तेलामुळे केसांच्या आतली त्वचा कोरडी होत नाही . त्यामुळे केसांची योग्यरितीने वाढ होण्यास मदत होते . यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब टाकल्यास केस वाढण्यास मदत होते . केस धुण्यासाठी दूध वापरा पूर्वीच्या काळी सुबत्ता असल्याने महिला दुधाने केस धुवायच्या असे आपण काही वेळा ऐकतो . खरंच केस धुण्यासाठी दुधाचा वापर केल्याने केस मुलायम होण्यास मदत होते . आठवड्यातून एकदा कच्च्या आणि गार दूधाने केस धुतल्यास केस मजबूत होण्यास मदत होते . काही दिवसांतच केसांतील कोरडेपणा दूर होतो . लहान मुलांचा शाम्पू वापरा अनेकदा शाम्पू जास्त तीव्र असल्याने त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो . अनेक महिलांना रोज किंवा जास्त वेळा शाम्पूने केस धुण्याची सवय असते . मात्र त्यामुळे केसांचा पोत बिघडतो . त्यामुळे लहान मुलांसाठी बाजारात मिळणारा शाम्पू किंवा एकदम माईल्ड शाम्पू वापरुन पाहा . त्यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते .
1
३ महिन्यांच्या प्रवासानंतर प्रो - कबड्डीचं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहचलं आहे . तब्बल १२ संघांमध्ये सुरु असलेल्या रणसंग्रामात अखेर गतविजेता पाटणा पायरेट्स आणि पाचव्या पर्वात पदार्पण केलेल्या गुजरातच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे . उद्या चेन्नईच्या मैदानावर या दोन्ही संघांमध्ये पाचव्या पर्वाचा अंतिम सामना रंगणार आहे . गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने बंगालच्या संघावर ४२ - १७ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला . तर पाटणा पायरेट्सच्या संघानेही बंगाल वॉरियर्सवर मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान नक्की केलं . त्यामुळे या दोन्ही संघांमधला अंतिम हा सामना हा रंगतदार होणार यात काहीच वाद नसल्याचं जाणकारांनी म्हणलं आहे . पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीआधी दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी प्रो - कबड्डीच्या ट्रॉफीसोबत फोटोसेशन केलं . यावेळी गुजरातचं नेतृत्व करणाऱ्या फैजल अत्राचलीने हे पर्व आपल्यासाठी अनेक कारणांसाठी खास असल्याचं नमूद केलं . नवीन संघ असूनही आम्ही संपूर्ण हंगामात एकत्र होऊन खेळलो ज्याचा फायदा आम्हाला अंतिम फेरीत पोहचताना झाला . त्यामुळे अंतिम सामन्यातही आमची हीच रणनिती असेल असं फैजलने स्पष्ट केलं . तर दुसरीकडे पाटणा पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने , तिसऱ्या पर्वातही आपलाच संघ बाजी मारेल असा आत्मविश्वास व्यक्त केला . पाचवं पर्व सुरु होताना , आम्ही विजयाची हॅटट्रीक साधायची हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं . या ध्येयासाठी आमच्या संघातला प्रत्येक खेळाडू गेले ३ महिने झटत आहे . त्यामुळे अंतिम सामन्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नसल्याचं सांगत प्रदीपने हा सामना अजुनच रंगतदार होणार हे सांगितलं . त्यामुळे उद्याच्या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारेल याकडे सर्व क्रीडारसिकांचं लक्ष लागलेलं असणार आहे .
2
बॉलिवूडचा मि . परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने अभूतपूर्व यश मिळवले होते . या चित्रपटापासून प्रेरित होत त्यातील व्यक्तिरेखांवर आता केक तयार करण्यात आला असून , आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा केक म्हणून त्याची गणना करण्यात येतेय . भारताच्या ७०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ५४ किलोची ही खाद्य कलाकृती तयार करण्यात आलाय . दुबई बेकरीत तयार करण्यात आलेला हा केक जगातील सर्वात महाग केक असल्याचे म्हटले जातेय . तब्बल २५ लाख रुपये किंमत असलेला ‘दंगल केक’ तयार करण्यासाठी ब्रॉडवे बेकरीतील १२०० केक आर्टिस्टि्सने जवळपास एक महिना काम केले . ब्लॉकबस्टर चित्रपट असलेल्या ‘दंगल’मध्ये महावीर फोगट यांची भूमिका साकारणाऱ्या आमिर खानची प्रतिकृती केकवर लावण्यात आली आहे . त्याचसोबत कुस्तीच्या आखाड्यात सराव करणाऱ्या छोट्या गीता आणि बबितादेखील यावर दाखवण्यात आल्या आहेत . वाचा : नागराज यांनी बिग बींसाठी खास हिंदीमध्ये लिहिली फेसबुक पोस्ट केक तयार केलेल्या बेकरीने याचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे . केक तयार करतानाची संपूर्ण कृती खरंच पाहण्याजोगी आहे . या केकची सजावट करण्यासाठी वापरण्यात आलेली प्रत्येक गोष्ट खाता येईल हे लक्षात घेऊनच ‘दंगल केक’ तयार करण्यात आलाय . यासाठी साखरेचे फॉनडन्ट , चॉकलेट स्पॉन्ज , चॉकलेट गनाश , बेल्जियन चॉकलेट , पाम शुगर आणि खाण्यायुक्त सोन्याचा वापर करण्यात आलाय . केकवरील कॉमनवेल्थ स्पर्धेचे सुवर्ण पदक तयार करण्यासाठी ७५ ग्रॅम सोने वापरण्यात आलेय . एकावेळी २४० लोक या केकचा आस्वाद घेऊ शकतात . वाचा : कोणाचे रेस्तराँ तर कोणाची एअरलाइन्स , जाणून घ्या साउथ स्टार्सचे साइड बिजनेस आपल्या चित्रपटापासून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेला हा केक पाहून आमिरलाही आनंद होईल यात शंका नाही .
0
भारतात पिण्यायोग्य पाण्याची कमतरता भासू लागली आहे . नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार , जर पाण्याची चणचण अशीच राहिली तर २०४० मध्ये भारतात प्यायला पाणी राहणार नाही . केंद्रीय जल संसाधन मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगभरातल्या लोकसंख्येतली १८ टक्के लोकसंख्या ही भारतात राहते . पण देशात फक्त चार टक्केच पाणी साठा शिल्लक आहे . ही फार चिंतेची बाब आहे . १९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य होताना प्रती व्यक्तीसाठी सहा घनमीटर पाण्याचे वाटप होते . तर तेच २००१ मध्ये १ . ८ घनमीटर होते तर २०११ मध्ये अजून घट होऊन ते १ . ५ घनमीटर एवढे झाले आहे . पाण्याची घट अशीच चालू राहिली तर वर्ष २०२५ मध्ये १ . ३ घनमीटर प्रती व्यक्ती असे पाण्याचे प्रमाण राहील . नद्यांमध्ये सोडण्यात येणारे पाणी हे पर्यावरणाला पुरक नसते . तसेच पावसाचे ६५ टक्के पाणी हे समुद्रात जाते . त्यातच देशात सगळ्यात जास्त पाणी शेतांसाठी वापरले जाते . त्यानंतर घरातल्या कामांसाठी आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी पाण्याचा सगळ्यात जास्त वापर होतो . पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आतापासूनच ठोस पाऊलं उचलणे आवश्यक आहे . नाही तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी फार संघर्ष करावा लागेल यात काही शंका नाही . हे संकट केवळ भारतापुरतेच मर्यादीत नसून , जगभरात पिण्याचे पाणी ही एक गंभीर समस्या बनली आहे . पण भारताला त्याचा दाह सगळ्यात जास्त बसणार आहे . वीजेची कमतरता हाही सध्या एक मोठा प्रश्न जगासमोर आहे . पण वीजेची समस्या पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत . वीज निर्मितीसाठी वेगवेगळी उपकरणे बनवली जात आहेत . पण ती उपकरणे थंड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याची गरज लागते . यासर्वात पाण्याच्या समस्येकडे पूर्णपणे दूर्लक्ष होत आहे . जर ऊर्जा निर्मितीसाठीची ही धाव अशीच सुरू राहिली तर २०४० मध्ये तहान भागवण्यासाठी पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाहीत . त्यामुळे प्रत्येकाने पिण्याच्या पाण्याची बचत कशी होईल याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे .
1
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे . या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून सुरु झाला . या सामन्यात भारताने पहिल्या दिवशी द्विशतकी मजल मारत सामन्यावर पकड मिळवली आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली केली . पण रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासाठी नवीन वर्षी एक निराशादायक बाब घडली आहे . न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात मार्टिन गप्टिल याने या दोघांचा विक्रम मोडला आहे . मार्टिन गप्टिल याने श्रीलंकेविरुद्दच्या सामन्यात शतक लगावले आणि एकदिवसीय कारकिर्दीतील ६ हजार धावांचा टप्पा ओलांडला . १६० सामन्यांमध्ये त्याने हा टप्पा गाठला . याबरोबर त्याने रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला . रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी १६२ तर धोनीने १६६ सामने खेळले होते . दरम्यान , गप्टिल सर्वात जलद ६ हजार धावा गाठणाऱ्यांच्या यादीत ८वा फलंदाज ठरला . या यादीत १२३ सामन्यात हा टप्पा गाठणारा आफ्रिकेचा हाशिम आमला अव्वल आहे . तर विराटने ६ हजार धावांचा टप्पा गाठण्यास १३६ सामने खेळले होते .
2
सेंच्युरियनः यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकचे घणाघाती शतक आणि रिली रॉसूच्या वेगवान अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेने काल ( शुक्रवार ) रात्री झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा गडी आणि 82 चेंडू राखून सहज विजय मिळविला . प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 294 धावा केल्या . हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने 37 व्या षटकातच पूर्ण केले . या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे . सेंच्युरियनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती . पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना याचा फायदा घेता आला नाही . डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंचने नऊ षटकांतच 60 धावा करत वेगवान सुरवात करून दिली होती . वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला खीळ बसली . जॉर्ज बेलीच्या 74 धावा आणि जॉन हेस्टिंगच्या 51 धावांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर जम बसविता आला नाही . कारकिर्दीतील दुसराच सामना खेळणाऱ्या 20 वर्षीय अँडिली फेहलूक्वायो याने वेगवान गोलंदाजाने चार गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले . क्विंटन डिकॉक आणि रिकी रॉसूने धडाक्यात सुरवात करून ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली . या दोघांनी 17 षटकांतच 145 धावांची सलामी दिली . डिकॉकने 113 चेंडूंत 16 चौकार आणि 11 षटकारांसह 178 धावा केल्या . एबी डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या फाफ डू प्लेसिसने 26 धावा केल्या . डू प्लेसिस , जेपी ड्युमिनी , डिकॉक झटपट बाद झाले , तरीही विजय दक्षिण आफ्रिकेच्या आवाक्यात आला होता . डेव्हिड मिलर आणि फरहान बेहर्डिन यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली . संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 9 बाद 294 डेव्हिड वॉर्नर 40 , ऍरॉन फिंच 33 , जॉर्ज बेली 74 , मिशेल मार्श 31 , जॉन हेस्टिंग्ज 51 अँडिली फेहलूक्वायो 4 - 44 , डेल स्टेन 2 - 65 , वेन पार्नेल 1 - 56,1 - 46 इम्रान ताहीर दक्षिण आफ्रिका : 50 षटकांत 36.2 षटकांत 4 बाद 295 क्विंटन डिकॉक 178 , रिली रॉसू 63 , फाफ डू प्लेसिस 26 स्कॉट बोलंड 3 - 67 , ऍडम झम्पा 1 - 44
2
मानधनात वाढ आणि वेळापत्रकात कपात अशा विराट कोहलीच्या दोन्ही मागण्यांविषयी प्रशासकीय समितीने सहमती दर्शविली आहे , तर समितीच्या भूमिकेविषयी क्रिकेटपटूसुद्धा आनंदी आहेत . विराट , माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद राय , डायना एडल्जी आणि बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांची गुरुवारी भेट घेतली . ही बैठक सुमारे दोन तास चालली . राय यांनी सांगितले , की सामन्यांची संख्या , नियोजित वेळापत्रक ( फ्यूचर टूर प्रोग्राम - एफटीपी ) , भरपाईचे पॅकेज अशा खेळाडूंशी थेट संबंधित असलेल्या मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली . याविषयी सादरीकरण झाले . आम्ही एफटीपीविषयी खेळाडूंना कल्पना दिली . आम्ही त्यांच्या सर्व सूचना जाणू घेतल्या . आम्ही धोरणात त्याचा अंतर्भाव करू . मानधनाविषयी सहमती मानधनवाढीसाठी प्रशासकीय समिती एक आराखडा तयार करीत आहे . त्याविषयी माहिती दिली असता विराट आणि धोनीने सहमती दर्शविली असे राय म्हणाले . आता केवळ आकडे भरण्याचा प्रश्न आहे . आम्ही मंडळाचे उत्पन्न आणि प्रत्येक खेळाडूला मिळणारे मानधन यांत तफावत ठेवणार नाही . कसोटी खेळणारे आणि झटपट क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी वेगवेगळे स्वरूप असणार का , असे विचारले असता , राय यांनी या मुद्यावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले . खेळाडू आनंदीच एकतर्फी निर्णय घेऊन त्याविषयी माहिती देण्याऐवजी बीसीसीआयचे प्रतिनिधी चर्चा करीत असल्याबद्दल खेळाडू आनंदी असल्याचे राय यांनी आवर्जून नमूद केले . सर्व विषयांवरील चर्चा फलदायी ठरली . विराट - धोनी यांचा प्रतिसाद फार सकारात्मक होता , कारण कुणीतरी प्रथमच त्यांच्या संवाद साधत होते , असे भाष्य त्यांनी केले . इंग्लंडसाठी नियोजन पुढील वर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान भारतीय संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटींची मालिका खेळेल . या दौऱ्यासाठी सखोल नियोजन केले जाईल . हवामानशी जुळवून घेण्याकरिता भारतीय संघ दोन आठवडे आधी दाखल होईल . दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याची तक्रार विराटने केली होती . त्याची प्रशाकीय समितीने तातडीने दखल घेतली होती .
2
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे . या दौऱ्यात टी२० मालिका बरोबरीत सुटली . पण कसोटी मालिका मात्र भारताने २ - १ ने जिंकली . ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकून नुकताच इतिहास रचला . ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २ - १ अशी मालिका आपल्या नावे केली आणि प्रथमच ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका विजय प्राप्त केला . या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने जिंकला . शेवटच्या दिवसापर्यंत हा सामना रंगला होता . या सामन्यात भारताने ३१ धावांनी विजय मिळवला . त्यानंतर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना फलदायी ठरला . भारताचा या सामन्यात १४६ धावांनी पराभव झाला . आणि मालिका १ - १ अशी बरोबरीत आली . मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताकडून काही बदल करण्यात आले आणि तो सामना भारताने १३७ धावांनी जिंकला . तर चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला . मालिकेची सुरुवात ६ डिसेंबरपासून झाली . मात्र भारताचा माजी फिरकीपटू आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी २६ नोव्हेंबर रोजी एक भविष्यवाणी वर्तवली होती . ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली . जेव्हा त्यांना मालिकेबाबत अंदाज वर्तवण्यास सांगितले होते , तेव्हा त्यांनी हि मालिका भारत २ - १ अशी जिंकला पाहिजे असा अंदाज वर्तवला होता . मालिका ४ सामन्यांची असूनही २ - १ अशा ३ सामन्यांच्याच अंदाज का व्यक्त करत आहात ? असे विचारले असता एक सामना हा अनिर्णित राहील व पाऊस यात निर्णायक भूमिका बजावेल , असे कुंबळे यांनी सांगितले होते . या मालिकेत जसे कुंबळे म्हणाले , तसेच घडले . त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स त्यांची स्तुती करताना दिसत आहेत . — — — — = = दरम्यान , भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका १२ ते १८ जानेवारी दरम्यान होणार आहे .
2
रणबीर आणि कतरिनाच्या आगामी “जग्गा जासूस” या बहुचर्चित सिनेमाचं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे . यंगस्टरच्या पसंतीस उतरलेलं “उल्लू का पठ्ठा” हे गाणं युट्युबवर सध्या धमाल गाजतंय . “उल्लू का पठ्ठा” या पहिल्या गाण्यापासून सिनेमाच्या प्रमोशनची सुरूवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही . या गाण्यातल्या स्टेप्स अनेकांचे लक्ष वेधत आहेत . अशा अनोख्या स्टेप्स यापूर्वी कोणत्या गाण्यात पाहायला मिळाल्या नव्हत्या अशा प्रतिक्रियाही प्रेक्षकांकडून येत आहेत . अलका कुबल - आठल्येंच्या मुलीची गगन भरारी रणबीर आणि कतरिनाला या अनोख्या स्टेप्स देणारा हा अवलिया आहे प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर . शामकने या गाण्यासाठी खास वेगळ्या धाटणीची कोरिओग्राफी केली आहे . जग्गा ( रणबीर ) व श्रुती ( कतरिना ) हे वेगवेगळ्या शहरांतून फिरत नृत्यामार्फत लोकांचे मनोरंजन करून पैसे जमा करत असतात . त्यामुळे शामकने त्याची कोरिओग्राफीही थोडी हटकेच ठेवली आहे . बऱ्याच काळानंतर शामक पुन्हा आल्या डान्स स्टाइलची भुरळ प्रेक्षकांवर पाडणार आहे असं “उल्लू का पठ्ठा” या गाण्यातून दिसतंय . या दोघांची केमिस्ट्री गाण्यात उत्तम दिसत आहे . अनुराग बासू दिग्दर्शित या सिनेमात रणबीर - कतरिनाची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकही नक्कीच उत्सुक आहेत . अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या या गाण्याची चालही अगदी सुरेख आहे . ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्यातही जिराफ , झेब्रा , ऑस्ट्रीच , शेळ्या हे प्राणी पाहायला मिळत आहेत . १४ जुलै रोजी रणबीर - कतरिनाच्या रुपात बॉलिवूडचे हे क्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . VIDEO : राणा डग्गुबतीच्या आगामी चित्रपटाचा दमदार टिझर पाहिलात का ? दरम्यान , हे गाणे चित्रीकरण करताना अनेक हास्यास्पद प्रसंगही घडले . ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्याचा एक भाग म्हणून रणबीरला रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या स्थानिकांकडे पैसे मागावे लागणार होते . त्यामुळे सरावासाठी का असेना पण , रणबीरने चक्क मोरक्कोमध्ये भीक मागितली होती . त्यामुळे फक्त कॅमेऱ्यासमोरच नाही तर , कॅमेऱ्याच्या मागेही भारतातील हा स्टार अभिनेता मोरक्कोत भिकारी झाला अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहेत . किंबहुना रणबीरच्या आयुष्यातही हा असा अनुभव पहिल्यांदाच आला असेल .
0
प्रो - कबड्डीच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटण संघाने दबंग दिल्लीवर २६ - २१ अशी मात केली . नागपूर येथे झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणच्या संघाला प्रेक्षकांचा जास्त पाठींबा मिळताना दिसत होता . मात्र दबंग दिल्लीच्या खेळाडूंनीही आपल्या खेळीने प्रेक्षकांची मन जिंकली . रेडींग आणि डिफेन्समध्ये पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत या स्पर्धेतल आपला दुसरा विजय निश्चीत केला . तर पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर दबंग दिल्लीला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला . मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये दबंग दिल्लीने ६ पेक्षा कमी गुणांनी पराभव स्विकारल्यामुळे त्यांच्या खात्यात १ गुण जमा झाला आहे . राजेश मोंडलचा झंजावात , कर्णधार हुडाचीही उत्तम साथ – पुणेरी पलटण संघासाठी आजच्या सामन्यात हिरो ठरला तो राजेश मोंडल . आजच्या सामन्यात त्याने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात मिळून रेडींगमध्ये ८ पॉईंट मिळवले . सलामीच्या सामन्यात यू मुम्बाविरुद्ध राजेशला अवघ्या २ पॉईंटवर समाधान मानावं लागलं होतं . मात्र त्या सामन्याची कसर भरुन काढत राजेश मोंडलने पुण्याला या सामन्यात आघाडीवर नेण्यात मदत केली . राजेश मोंडलला पॉईंट मिळवून देण्यात दिल्लीच्या बचावपटूंचा मोठा वाटा होता . विशेषकरुन दबंग दिल्लीचा पहिल्या सत्रातला बचाव हा खूप ढिसाळ होता . बाजीराव होडगे , निलेश शिंदे यांनी वॉकलाईनवर राजेश मोंडलला टॅकल करण्याची चूक केली , ज्याचा फायदा राजेश मोंडलला झाला . धर्मराज आणि संदीप नरवालची रेडर्सना उत्तम साथ – पुणेरी पलटणला बचावात धर्मराज चेरलाथन आणि संदीप नरवाल यांनी डिफेन्समध्ये उत्तम साथ दिली . पहिल्या सत्राच्या सुरुवातीला डिफेन्समध्ये काही उत्तम पॉईंट मिळवत संदीप नरवालने दिल्लीच्या खेळाडूंवर दबाव टाकला . धर्मराज चेरलाथन सुरुवातीच्या सत्रात चाचपडत खेळताना दिसत होता . मात्र दुसऱ्या सत्रात त्याला सूर सापडायला लागल्यानंतर दिल्लीच्या रेडर्ससाठी तो मोठी डोकेदुखी ठरला . गिरीश एर्नेकला मात्र या सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही . उजवा आणि डावा कोपरारक्षकामध्ये असणारा ताळमेळ आजच्या सामन्यात पहायला मिळाला नाही . त्यामुळे दिल्लीच्या रेडर्सनी पुण्याच्या डिफेन्समध्ये गिरीश एर्नेकला आपलं लक्ष्य केलं , आणि बहुतांश प्रमाणात त्यांना यात यश मिळालं . मिराज शेख पुन्हा अपयशी , आनंद पाटील मात्र चमकला – कबड्डीत कर्णधाराने केलेल्या कामगिरीवर त्या संघाची कामगिरी ठरत असते . दुर्देवाने दबंग दिल्लीचा कर्णधार मिराज शेख आजच्या सामन्यातही अपयशी ठरला . दोन्ही सत्रांमध्ये मिराजला रेडमध्ये एकही पॉईंट मिळवता आला नाही . पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी अभ्यास करुन मिराजला मैदानाबाहेर बसवून ठेवण्याची युक्ती लढवली आणि त्यात त्यांना यश आलं . संपूर्ण सामन्यात मिराज शेख जवळपास १५ मिनीटं बाहेर होता . मात्र ज्यावेळी मिराजला रेड करण्याची संधी मिळाली , त्यावेळी एकदाही पॉईंट आणण्यात त्याला यश आलं नाही . याचसोबत बचावादरम्यानही मिराजने राजेश नरवालला चुकीच्या पद्धतीने टॅकल करत पुणेरी पलटणला अनेक पॉईंट बहाल केले . मिराजला आजच्या सामन्यात अपयश आलं असलं तरीही महाराष्ट्राच्या आनंद पाटीलने या सामन्यात दिल्लीची कमान सांभाळली . आनंद पाटील रेडींगमध्ये तब्बल ८ पॉईंट मिळवत संघाला सामन्यात आणण्याचा प्रयत्न केला . पहिल्या सत्रात आनंदने रेडींगमध्ये धर्मराज चेरलाथनला केलेला टो टच , संदीप नरवालवर केलेले रनिंग हँड टच हे निव्वळ पाहण्यासारखे होते . दुसऱ्या बाजूने बदली खेळाडू आर . श्रीरामने त्याला चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला . मात्र इतर कोणत्याही खेळाडूंकडून त्यांना मदत मिळाली नसल्यामुळे दिल्लीचे सामन्यात परतण्याचे प्रयत्न तोकडे पडले . याव्यतिरीक्त दबंग दिल्लीचे निलेश शिंदे आणि बाजीराव होडगे हे सामन्याच्या सुरुवातीपासून फॉर्मात नव्हते . निलेश शिंदेला फॉर्ममध्ये येण्यासाठी दुसऱ्या सत्राची वाट पहावी लागली . बाजीराव होगडेनाही पहिल्या सत्रात टॅकल करताना क्षुल्लक चुका करुन पुण्याच्या संघाला पॉईंट बहाल केले . मात्र दुसऱ्या सत्रात या दोन्ही खेळाडूंनी आपला खेळ सुधारत काही चांगले पॉईंट मिळवले मात्र तोपर्यंत दिल्लीने सामन्यावरची आपली पकड गमावली होती . ५ तारखेला म्हणजेच शनिवारी दबंग दिल्लीचा सामना यू मुम्बासोबत होणार आहे . मुम्बाच्या संघाला पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणकडून पराभवाचा सामना करावा लागला होता . मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी हरियाणाच्या संघावर मात करत पुनरागमन केलं होतं . त्यामुळे उद्या होणाऱ्या सामन्यात दबंग दिल्लीचा संघ मुम्बाचं आव्हान कसं पेलतो हे पहावं लागणार आहे .
2
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कामगिरी करणाऱ्या ‘क्षितिजः अ होरीझॉन’ या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार रोवला गेला आहे . नुकत्याच पार पडलेल्या ५५व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत या चित्रपटाने तृतीय क्रमांक पटकावला आहे . तसेच या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रणासाठी ऑस्कर विजेते रसूल पुकुट्टी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . Photos : ६५व्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याची क्षणचित्रे मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी ( यू . एस ) आणि नवरोज प्रसला यांनी या चित्रपटाची निर्मित केली असून करिष्मा म्हाडोलकर सहनिर्माती आहेत . याआधी झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाला नावाजण्यात आले . त्यामुळे दिग्दर्शक मनोज कदम यांच्या ‘क्षितिजः अ होरीझॉन’चे महत्व आणखीनच वाढले आहे . शिक्षणाचे महत्व सांगणाऱ्या या चित्रपटाची कथा प्राध्यापक रेबन देवांगे यांनी लिहिली आहे . तसेच नीरज वोरलीया यांनी संकलित या चित्रपटाचे योगेश राजगुरू यांनी छायाचित्रण केले आहे .
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल ( १७ सप्टेंबर ) वाढदिवस होता . देशभरात विविध उपक्रमांनी तो साजरा करण्यात आला . त्यानिमित्त त्यांच्यावर देश आणि विदेशातील नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला . अनेकांनी गिफ्ट म्हणून विविध उपक्रम राबवले . पण एक ‘स्पेशल गिफ्ट’ मोदींना खूप भावले . भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी . व्ही . सिंधू हिने ते ‘गिफ्ट’ मोदींना दिले आहे . देशाची निस्वार्थ सेवा करणारे आणि अविश्रांत मेहनत घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी माझा विजय समर्पित करत आहे , असे ट्विट सिंधूने केले आहे . मोदींनीही हे ट्विट रिट्विट करत ही माझ्यासाठी खूपच खास भेट आहे . त्याबद्दल मी खूप आभारी आहे , असे ट्विटमध्ये म्हटले आहे . सिंधूने कोरियन ओपन स्पर्धेत जपानच्या नोझुमी ओकुहारावर मात केली . २२ - २० , ११ - २१ , २१ - १८ अशा गुणफरकाने नमवून विजेतेपदावर नाव कोरले . या विजयानंतर तिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला . पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या . कोरियन ओपनमध्ये अजिंक्य ठरल्याबद्दल मनापासून कौतुक . भारताला तुझा खूप अभिमान आहे , असे ट्विट मोदींनी केले होते . त्यानंतर सिंधूनेही ट्विट करून आपला विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त समर्पित करत आहे , असे म्हटले . त्यावर ही भेट माझ्यासाठी खूपच खास आहे , असे ट्विट मोदींनी केले . तसेच भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही सिंधूचे अभिनंदन केले . तू देशासाठी प्रेरणादायी आहेस , अशा शब्दांत सचिनने तिचे कौतुक केले .
2
अभिनेता टायगर श्रॉफ याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून तारा सुतारिया ही नवोदित अभिनेत्री पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे . या चित्रपटाव्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्येही ती झळकणार असल्याची चर्चा होती . मात्र या चित्रपटामध्ये तिच्याऐवजी अन्य एका अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचं समोर आलं आहे . ‘डेक्कन क्रॉनिकल’नुसार , ‘एम . एस . धोनी’ या चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री कियारा अडवाणी ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये झळकणार आहे . अर्जुन रेड्डी हा दाक्षिणात्य चित्रपट असून त्याचं दिग्दर्शन संदीप रेड्डी बांगा यांनी केलं . या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळेच त्याच्या हिंदी रिमेकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या चित्रपटासाठी प्रथम तारा सुतारियाच्या नावाची चर्चा सुरु होती . मात्र आता ताराऐवजी कियारा झळकणार असल्याचं समोर आलं आहे . या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं नाव अद्याप निश्चित झालं नसून तो २१ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे . दिग्दर्शक संदीप वोंगा यांनी कियाराकडे या चित्रपटाविषयी विचारणा केल्यावर तिने तात्काळ तिचा होकार कळविला . या चित्रपटासाठी ती प्रचंड उत्साही असल्याचं चित्रपट दिग्दर्शकांनी सांगितलं . ‘अर्जुन रेड्डी’मध्ये शाहिदने एका डॉक्टराच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे . दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अर्जुन रेड्डी हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय असून तो सुपरहिट ठरला होता .
0
योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीने एफएमसीजी क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांच्या उरात धडकी भरवली आहे . कारण सरलेल्या वर्षात पतंजलीची उलाढाल 10 हजार 561 कोटींवर पोचली आहे . पतंजली आयुर्वेदचे संस्थापक रामदेव बाबा व बाळकृष्ण यांनी गुरुवारी हरिद्वार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते . पतंजलीची चालू वर्षात उलाढाल 20 हजार कोटींवर पोचण्याची आश त्यांनी यावेळी व्यक्त केली . गेल्यावर्षी पतंजलीच्या विविध उत्पादनांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे . गेल्या आर्थिक वर्षात कोलगेट , नेस्ले यांसारख्या परकी कंपन्यांना भारतीय बाजारात संकटांचा सामना करावा लागला ; परंतु 2012 मध्ये खुल्या बाजारपेठेत दाखल झालेल्या " पतंजली आयुर्वेद लिमिटेड ' ने चार वर्षांत मोठी उलाढाल करत प्रगतीचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे . 2011 - 12 या वर्षात 446 कोटी रुपये असलेली उलाढाल असलेली कंपनी 2016 - 17 या वर्षात 10000 कोटी रुपयांवर नेऊन कंपनीने नवीन मापदंड तयार केला . विशेषतः नोव्हेंबर 2015मध्ये जाहिरात मोहीम सुरू केल्यावर त्याचा कंपनीला मोठा फायदा मिळाला आहे . केंद्र सरकारच्या " मेक इन इंडिया ' धोरणाचे हे एक उत्तम उदाहरण बनले आहे . याशिवाय स्वदेशीचा नारा देत पतंजली आयुर्वेद देशभरातील लाखो कुटुंबांच्या घरात आणि मनात पोचली आहे . कोणतेही अतिरंजित दावे अथवा ब्रॅंड ऍम्बेसिडरचा वापर न करता ; तसेच संपूर्णतः संशोधन व तथ्यांवर आधारित जाहिरातींमुळे कंपनीची कामगिरी मार्केटिंग क्षेत्रातील विकासाचे वेगळे उदाहरण बनली आहे . सध्या देशभरात पतंजलीचे तब्बल 6 हजार वितरक असून त्याची संख्या 12 हजारापर्यंत नेण्याचे पतंजलीने उद्दिष्ट जाहीर केले आहे . त्याचप्रमाणे येत्या दोन वर्षात कंपनीने देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी होण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे . हरिद्वारप्रमाणेच जम्मू - काश्मीरमध्ये एक प्रकल्प सुरू करण्याची योजना बाबांनी जाहीर केली आहे . गेल्या वर्षात पतंजलीने विविध प्रकारची उत्पादने बाजारात आणली आहेत . पतंजलीने सातत्यपूर्ण संशोधन व विकास , कंत्राटी उत्पादनाचा विस्तार आणि दर्जा राखण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे . शिवाय संशोधनावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे . शिवाय पतंजलीने त्यांच्या उत्पादनांची किंमत इतर कंपन्यांच्या तुलनेने अतिशय कमी आणि स्पर्धात्मक ठेवल्या आहेत . ( अर्थ विषयक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www . sakalmoney . com )
0
विश्वकरंडक सतरा वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा तीन महिन्यांवर असतानाच भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा आशियाई फुटबॉल महासंघाच्या त्रैमासिकावर झळकला आहे . हा मान मिळणारा तो भारताचा पहिलाच फुटबॉलपटू आहे . आशियाई फुटबॉल महासंघातर्फे प्रकाशित होत असलेल्या या त्रैमासिकात स्टार खेळाडू , मार्गदर्शक , क्लब तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध होत असतात . आशियाई फुटबॉलमध्ये त्यास खूपच महत्त्व आहे . या त्रैमासिकाच्या १९ व्या अंकाच्या मुखपृष्ठावर छेत्रीचे छायाचित्र झळकले आहे . छेत्री हा बंगळूर एफसीचा प्रमुख खेळाडू आहे . पुढील महिन्यात बंगळूर एफसीचे होम ग्राऊंड असलेल्या श्री कंटिरवा स्टेडियमवर एएफसी कपमधील लढत होईल . आशियाई पात्रता स्पर्धेत भारताच्या मकावविरुद्ध सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये लढती होतील , त्या लढतीपूर्वी त्याला हा सन्मान लाभला आहे . छेत्रीवरील लेखात त्याचे बालपण , त्याला लहानपणासून असलेली फुटबॉलची आवड , यावर भर आहे . छेत्रीचे वडील लष्कर फुटबॉल संघात होते , तर त्याची आई नेपाळकडून फुटबॉल खेळली आहे . त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल पाकिस्तानविरुद्ध २००५ मध्ये केला होता . छेत्रीने मुलाखतीत आपण फुटबॉलमध्ये एवढी प्रगती करू , असे कधीही वाटले नव्हते , असे छेत्रीने मुलाखतीत सांगितले .
2
तुम्हाला सुंदर हास्य हवे असेल तर त्यासाठी तुमचे दात स्वच्छ असणे गरजेचे आहे . खाण्याच्या चुकीच्या पद्धती , खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न घासणे यांमुळे दात किडणे , दात दुखणे , दात कमकुवत होऊन पडणे अशा समस्या निर्माण होतात . दातांची निगा राखणे हे दातांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते . पण दातांची स्वच्छता ठेवली नाही तर तुमचे संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते . त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास काही सोप्या टीप्सचा अवलंब करणे आवश्यक आहे . आता या टीप्स नेमक्या काय आहेत ज्यामुळे दाताचे आरोग्य चांगले राहील पाहूया… . दात पूर्ण २ मिनिटे घासा दात स्वच्छ ठेवण्यासाठी ते घासणे अतिशय़ महत्त्वाचे असते . यातही दात भरभर घासल्यास ते नीट स्वच्छ होत नाहीत . त्यामुळे दातात अडकलेले अन्नाचे कण निघण्यास मदत होते . याबरोबरच ब्रश संपूर्ण तोंडात योग्य पद्धतीने फिरवून दात स्वच्छ करावेत . झोपण्यापूर्वी दात घासा दिवसातून दोनदा दात घासणे दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे . यातही रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे . त्यामुळे दिवसभर तोंडात जमा झालेले जीवाणू आणि किटाणू निघून जाण्यास मदत होते . भरपूर पाणी प्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरात दररोज पुरेसे पाणी जाणे आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे . मात्र त्याबरोबरच तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही भरपूर पाणी पिणे आवश्यक असते . जास्त पाणी प्यायल्याने तोंडात अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होते . हे कण पाण्याबरोबर वाहून पोटात जातात . साखर आणि आम्लयुक्त पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा जास्त साखर आणि आम्लयुक्त पदार्थ खाण्याने दाताचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते . त्यामुळे हे पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवणे दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते . तंबाखू खाणे टाळा तंबाखूमध्ये आरोग्याला अपायकारक घटक असतातच , पण दातांच्या आरोग्यासाठीही तंबाखू खाणे धोकादायक असते . त्यामुळे दाताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे .
1
भीम ( BHIM ) अॅपकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे . भीम अॅपला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही ऑफर देण्यात आली आहे . गेल्यावर्षी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं . ही कॅशबॅक ऑफर , ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठी आहे . ऑफरअंतर्गत एकूण १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे . भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरअंतर्गत ग्राहकांना एका महिन्यात ७५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल , तर व्यापा - यांना १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे . नव्या युजर्सला पहिल्या ट्रांजेक्शनवर ५१ रुपये कॅशबॅक मिळेल . पण , पहिलं ट्रांजेक्शन किमान किती रुपयांचं असावं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही , त्यामुळे ग्राहक १ रुपयांचं ट्रांजेक्शनही करुन ५१ रुपये कॅशबॅक मिळवू शकतात असं बोललं जात आहे . भारत शासनाचे भीम अॅप्लिकेशन हे यूपीआय - आधारित असे एक अॅप आहे . केवळ दोन एमबीचं हे अॅप ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’द्वारे हे अॅप चालवलं जातं .
1
मायक्रोसॉफ्ट ही टेक्नॉलॉजी कंपनी कायम नवनवीन बाबतीत प्रगती करत आघाडीवर असते . आता कंपनीने भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठीजनांसाठी एक खास गोष्ट केली आहे . मायक्रॉसॉफ्टने इ - मेल आयडीसाठी १५ भारतीय भाषांची निवड केली आहे . त्यामध्ये मराठी भाषेचाही समावेश असून येत्या काळात त्यामुळे तुमचा मेलआयडी निर्णाण करायचा असेल तर मराठीसारख्या स्थानिक भाषेचाही वापर करता येणार आहे . आतापर्यंत आपण मेलआयडी केवळ इंग्रजीमध्ये निर्माण करु शकत होतो . पण मायक्रोसॉफ्टने उचललेल्या सकारात्मक पाऊलामुळे आता भारतीयांना आपल्या स्थानिक भाषेत मेल आयडी तयार करता येणार आहेत . ही सुविधा युजर्सना ऑफीस ३६५ , आऊटलूक २०१६ , आऊटलूक डॉट कॉम , एक्सचेंज ऑनलाइन , एक्सचेंज ऑनलाइन प्रोटेक्शन यांसारखी अॅप्लिकेशनवर वापरता येणार आहे . आऊटलूक वापरणाऱ्यांसाठी ही सुविधा उत्तम पर्याय ठरेल . आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने ही घोषणा केली असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे . अँड्रॉईड आणि अॅपलच्या आऊटलूक अॅप्लिकेशनमध्ये युजर्सना भारतीयांना आपल्या मातृभाषेतील मेल पाठवता आणि स्विकारता येणार आहे . तंत्रज्ञानाच्या मदतीने संवाद जास्तीत जास्त सोपा करण्याच्यादृष्टीने इ - मेल आयडी १५ भारतीय भाषांमध्ये करता येणा हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे , असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अधिकारी मितुल पटेल यांनी सांगितले . लोकांना तंत्रज्ञानाची भाषा शिकावी लागण्यापेक्षा तंत्रज्ञानाने लोकांची भाषा शिकावी असा आमचा प्रयत्न आहे असेही पटेल यांनी सांगितले . यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात हिंदी , बोडो , डोगरी , कोकणी , मैथिली , मराठी , नेपाळी , सिंधी , बंगाली , गुजराती , मणिपुरी , पंजाबी , तमिळ , तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश असेल . याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच ती वापरासाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे .
1
पती - पत्नीचे नाते आणि जगण्यातील तणाव यावर भाष्य करणाऱ्या “डोण्ट वरी Be Happy” या नाटकाने २०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे . आताच्या बहुमाध्यमांच्या काळात एखाद्या नाटकाचे २०० प्रयोग होणं ही नक्कीच गौरवाची बाब आहे . हे नाटक म्हणजे अनेक जोडप्यांसाठी समुपदेशक ठरलं आहे . अलीकडच्या काळात पती - पत्नीच्या नात्यावर आधारित अनेक नाटकं मराठी रंगभूमीवर आली . कौटुंबिक नाटकाची संकल्पना बाजूला ठेवत सध्याच्या काळाच्या नजरेतून बदलणारी नाती हा या नाटकांचा केंद्रबिंदू ठरला . सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित ‘डोण्ट वरी Be Happy’ हे नाटकही बदललेला काळ आणि त्या अनुषंगानं पती - पत्नीचं बदलणारं नातं या विषयीच भाष्य करतं . ‘स्ट्रेस’ हा शब्द आपण फार गंभीरपणे घेत नाही . खरं तर तणावाचे परिणाम मनावर , शरीरावर होतात . त्याचा परिणाम शेवटी नातेसंबंधावर होतो . ‘डोण्ट वरी Be Happy’ मधील अक्षय आणि प्रणोती यांची कथा म्हणजे कॉर्पोरेट जगतातील प्रत्येक मध्यमवर्गीय जोडप्याच्या घरात घडणारी स्ट्रेसफुल गोष्ट . मोठय़ा कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी करतानाच टार्गेटच्या सतत मागे लागणारा व बायकोला वेळ न देणारा अक्षय , तर स्वतःच्या करिअरमागे लागलेली , टीव्ही मालिकांमध्ये रमणारी नायिका . दोघांनी मूल जन्माला घालण्याचा निर्णय लांबणीवर टाकलाय , त्यातून लैंगिक संबंधाचे प्रश्न , अगदी मूल होणार नाही , ही शक्यता निर्माण होणे , मग दोघांनी परस्परापासून दूर जाणे , एकटेपण हे सारं नाटकात आहे . ही आजच्या युवा पिढीची व्यथा आहे . जोडप्यांमध्ये प्रेम आहे , पण रोमान्स संपला . व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्याचे संतुलन हरवलंय . अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता उमेश कामत यांची जोडी या नाटकात आपल्याला पहायला मिळते . ‘नाटकाचे २०० प्रयोग होणं हीच प्रेक्षकांची मोठी दाद आहे . हे नाटक लिहायला एक वर्ष लागलं आणि त्या नंतरच्या जवळपास दोन वर्षांत नाटकाचे २०० प्रयोग झाले . या नाटकाला येणारा प्रेक्षकवर्ग बहुतांशी तरूणच आहे . आम्हाला जे म्हणायचं होतं , ते नेमकेपणानं पोहोचतंय , याचीच ही पावती आहे . स्वाभाविकच नाटकाची टीम खूप खूश आहे’ असं नाटककार मिहीर राजदा यांनी सांगितलं .
0
चॉकलेट हा अनेकदा लहान मुलांबरोबरच मोठ्यांचासुद्धा वीक पॉईंट असतो . चॉकलेटचे नुसते नाव काढले तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते . शुभेच्छा देताना , सणवारांचा आनंद साजरा करताना तर कधी आजारी व्यक्ती बरी होताना आणि आपले एखाद्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट दिले जाते . सध्या बाजारात चॉकलेटसचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत . त्यात वेगवेगळे फ्लेवर्सही मिळतात . चॉकलेट खाल्ल्याने एकप्रकारे तरतरी येते असेही म्हणतात . संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे , डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खाल्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते . मेंदू , हृदयविकार आणि स्ट्रोकसारखे आजार होण्याची शक्यता चॉकलेट खाण्याने कमी होते . चॉकलेटमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे शरीराला याचा फायदा होतो . हे झाले चॉकलेट खाल्ल्याचे फायदे . पण आता हे चॉकलेट केवळ खाण्यासाठीच नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त असल्याचे समोर आले आहे . चॉकलेट सूर्य किरणांपासून त्वचेचा बचाव करतं असं काही संशोधकांनी आपल्या संशोधनातून सिद्ध केले आहे . बराच काळ सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे त्वचा काळी पडते . इतकेच नाही तर प्रखर सूर्यप्रकाशामुळे काहीवेळा त्वचेचे विविध आजार अगदी त्वचेचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते . अशावेळी चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंट सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करू शकतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे . यासाठी जर्मनीच्या डुशेल्डॉल्फ विद्यापीठातील बायोकेमिस्ट्री आणि मॉल्यिक्यूलर बायोलॉजीच्या प्राध्यापकांनी चॉकलेटमधील अॅँटिऑक्सिडंट , अल्ट्रा - व्हायलेट किरणांपासून त्वचेचं संरक्षण करू शकतात का यावर संशोधन केलं . ज्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट असलेलं चॉकलेट खाल्लं त्या व्यक्तीच्या त्वचेवर अल्ट्रा व्हायलेट किरणांचा फारसा प्रभाव जाणवून आला नाही . अशाच प्रकारचं एक संशोधन कॅनडातील शास्त्रज्ञांनी देखील केलं होतं . डॉ . सिव्ही डोडिन यांच्या संशोधनात मात्र , जास्त अँटिऑक्सिडंट असलेलं चॉकलेट खाल्याचा चांगला परिणाम लोकांच्या त्वचेवर आढळून आला नाही . आता हे झाले चॉकलेट खाण्याचे फायदे . पण चेहऱ्याला चॉकलेट लावल्यास त्याचाही आपल्याला फायदा होत असल्याचे समोर आले आहे . चॉकलेटचा फेस पॅक त्वचा चांगली करण्यासाठी उपयुक्त असतो . विरघळलेलं चॉकलेट , मध , दही आणि साखरेच्या मिश्रणाचा चॉकलेट फेस पॅक म्हणून उपयोग केला जातो . हे मिश्रण २० मिनिटे लावून नंतर चेहरा धुतल्यास त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते . हिवाळ्यात त्वचा कोरडी होते . अनेकदा कोरड्या त्वचेवर स्किन क्रीमसुद्धा फायदेशीर ठरत नाहीत . अशा वेळी चॉकलेट त्वचेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतं . कोरड्या त्वचेवर उपाय करण्यासाठी दोन चमचे विरघळलेल्या चॉकलेटमध्ये दोन चमचे नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल टाका . हे मिश्रण त्वचेवर लावा . कोरडी त्वचा मऊ करण्यासाठी हे मिश्रण उपयोगी ठरू शकतं . विरघळलेलं चॉकलेट कोमट करुन त्याने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा उजळण्यास मदत होते .
1
आपल्या अष्टपैलू खेळीने क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलेल्या हार्दिक पांड्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले . पहिल्या कसोटीत पांड्याने ४९ चेंडूत ५० धावा केल्या . त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा टप्पा झटपट पार केला . हार्दिक पांड्या हा फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे . स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात तीन चेंडूत तीन षटकार मारणे सहज शक्य असल्याचे त्याने अनेक सामन्यात दाखवून दिले . यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर एका मुलाखतीमध्ये त्याला युवराज सिंगप्रमाणे सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विचार कधी केला आहेस का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता . सहा चेंडूत सहा षटकार खेचण्याबाबत पांड्या म्हणाला की , एका षटकात षटकारांची आतषबाजी करण्याचा विचार घेऊन मी मैदानात कधीच उतरत नाही . मी तीन चेंडूत सलग तीन षटकार नक्की मारले आहेत . पण परिस्थितीनुसार खेळी करत असल्यामुळे चौथ्या चेंडूवर षटकाराची गरज वाटत नसेल तर चेंडूवर आघात करण्याचा नाहक प्रयत्न कधीच करत नाही . मैदानात असताना जर परिस्थिती निर्माण झाली तर एका षटकारात सलग सहा षटकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच करेन . अर्थात पांड्या युवीचा विक्रम मोडण्याच्या इराद्याने मैदानात उतरत नसला तरी जर परिस्थिती निर्माण झाली तर नवा विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता ठेवतो , याचा त्याला आत्मविश्वास आहे . यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार खेचण्याचा करिष्मा युवराज सिंगने केला होता . इंग्लंडविरुद्धच्या टि - २० सामन्यात ब्रॉडला त्याने सहा चेंडूत सहा षटकार खेचले होते . सध्याच्या घडीला पांड्यामध्ये ती क्षमता आहे . आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पांड्याने कमालीची फलंदाजी केली होती . या सामन्यात भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर त्याने दमदार खेळी केली होती . त्याच्या चौफेर फटकेबाजीनंतर हातातून गेलेला सामना भारताच्या बाजूने फिरेल , अशी आशा प्रत्येक क्रिकेट चाहता करत होता . मात्र या सामन्यात तो धावबाद झाला . यावेळी पांड्याला बाद केल्यामुळे जाडेजावर जोरदार टीका देखील झाल्याचे पाहायला मिळाले होते .
2
मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनीऐवजी विराट कोहली हाच योग्य कर्णधारपद सांभाळू शकेल . २०१९च्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत धोनी कर्णधारपदावर टिकल्यास मला आश्चर्य वाटेल , असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे . ‘‘राष्ट्रीय निवड समितीने याबाबत आतापासूनच विचार केला तर भविष्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करणे शक्य होईल . धोनी हा गेली नऊ वर्षे कर्णधारपद भूषवीत आहे . हा खूप दीर्घ कालावधी आहे . त्याने उत्कृष्टरीत्या नेतृत्व सांभाळले आहे . मात्र आणखी चार वर्षांनी तो तेवढय़ा कुशलतेने प्रभाव दाखवू शकेल काय , याची मला शंकाच वाटते . त्याने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे . आता फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये तो भाग घेत आहे . अर्थात एक खेळाडू म्हणून धोनीने खेळत राहाव , े असे मला वाटते , ’’ असे गांगुली या वेळी म्हणाले . ‘‘कोहलीने कसोटी सामन्यांमध्ये भारताचे चांगल्या रीतीने नेतृत्व केले आहे . त्याच्याकडे प्रत्येक स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे . प्रत्येक दिवसामागे त्याच्या कामगिरीत सुधारणा होत आहे , ’’ असेही गांगुली यांनी सांगितले .
2
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ( पीपीएफ ) आणि राष्ट्रीय बचत योजना ( एनएससी ) या अनेक भारतीयांसाठी लोकप्रिय अशा गुंतवणूक योजना आहेत . या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो आणि सुरक्षिततेची खात्रीही असते . याशिवाय , या दोन्ही योजनांमधून मिळणारे उत्त्पन्न ८० - सी अंतर्गत करमुक्त असते . या दोन्ही योजना फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत . एनएससी आणि पीपीएफसारख्या लघु बचत योजनांमध्ये एनआरआय गुंतवणूक करू शकत नाहीत . पण भारतीय नागरिक असताना या योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील आणि नंतर खातेधारक एनआरआय झाला तर शासनाकडून त्यांना सूट दिली जात असे . मात्र , आता या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत . काय आहेत हे बदल पाहूया… हे आहेत आधीचे नियम एनआरआयसाठी पीपीएफः एनआरआय लोक पीपीएफ खाते उघडू शकत नाहीत . पण , खाते उघडल्यानंतर जर निवासी भारतीय एनआरआय झाला , तर खाते सुरू राहून योजनेची मुदत संपल्यानंतर त्याचा फायदा मिळू शकेल . एनआरआयसाठी एनएससीः एनआरआय लोक एनएससीमध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत . पण , ती केल्यावर जर निवासी भारतीय एनआरआय झाला , तर योजनेची मुदत संपल्यानंतर त्याचा फायदा मिळू शकेल , पण तो पैसा त्यांना भारताबाहेर नेता येणार नाही . आता एनआरआयसाठी एनएससी आणि पीपीएफच्या नियमांत बदल झाल्यामुळे जुने नियम आणि नवे नियम यांत बरीच तफावत झालेली आहे . काय आहेत नवीन नियम एनआरआयसाठी पीपीएफः नवीन अधिसूचनेप्रमाणे ‘जर या योजनेत एखाद्या निवासीने खाते उघडले असेल आणि नंतर खाते सुरू असताना ते अनिवासी भारतीय झाले , तर त्यांच्या अनिवासी होण्याच्या तारखेपासून खाते बंद झाले असे समजण्यात येईल . एनआरआयसाठी एनएससीः नव्या नियमांप्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केलेल्या व्यक्तीला एनआरआयचा दर्जा मिळेल , त्या तारखेला संबंधित खाते गोठवले जाईल . व्याजाचा हिशेब काय ? अधिसूचनेमध्ये सांगितल्याप्रमाणे , एनआरआय व्यक्तींचे पीपीएफ आणि एनएससी खाते ज्या महिन्यात गोठवले जाईल त्या तारखेच्या अलीकडच्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे व्याज पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्याच्या दराप्रमाणे दिले जाईल . आदिल शेट्टी , सीईओ , बँकबझार
1
। । रवींद्र पाथरे मुंबईत मुलुंडच्या कालिदास नाटय़गृह - प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडासंकुलात नुकतंच पार पडलेलं ९८ वं अ . भा . मराठी नाटय़संमेलन हे दरवर्षी ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीला सर्वार्थानं सकारात्मक छेद देणारं ठरलं यात काहीच शंका नाही . गेली २५ वर्षे नाटय़ - संमेलनाचे नित्य वारकरी या नात्यानं आजवरच्या प्रत्येक संमेलनाचं भलंबुरं आयोजन आणि त्याचं फलित जवळून पाहायला मिळालं . मात्र , यंदाच्या संमेलनाबद्दल समस्त नाटय़कर्मीमध्ये जाणवलेली आपलेपणाची उत्कट भावना यापूर्वीच्या कुठल्याच संमेलनात कधी जाणवली नव्हती . ( अर्थात एवढं मोठं भव्यदिव्य संमेलन म्हटलं की काही त्रुटी , उणिवा व गैरसोयी या राहणारच . त्याबद्दल काहींनी आगपाखडही केली . परंतु त्या प्रत्येक संमेलनात असतातच . असो . ) अ . भा . मराठी नाटय़ परिषद ही जरी स्वतःला सर्व नाटय़प्रवाहांची मातृसंस्था म्हणवत असली तरी आजवर या वैविध्यपूर्ण रंगधारांना नाटय़संमेलनात कधीच आपुलकीनं सहभागी करून घेतलं गेलं नव्हतं . त्यामुळे प्रायोगिक , समांतर , हौशी व लोकरंगभूमीवरील कलावंत कायमच संमेलनापासून दूर राहत आले आहेत . यंदा प्रथमच त्यांना सन्मानानं संमेलनात स्थान दिलं गेलं आणि त्यांना योग्य तो मानही राखला गेला . यापूर्वी उपकाराच्या भावनेतून संमेलनात या रंगकर्मीना स्थान देण्याचं तोंडदेखलं ‘नाटक’ केलं जाई . मात्र , संमेलनावर वर्चस्व असे ते व्यावसायिक रंगभूमीचंच . नाटय़ परिषदेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यक्रमांना फिरकतदेखील नसत . यावेळी नाटय़ परिषदेचे पदाधिकारी व कलावंत जातीनं या लोककलावंतांना , प्रायोगिक - समांतर धारेतील रंगकर्मीना प्रोत्साहन देण्यासाठी , त्यांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते . ही खचितच सुखदाश्चर्याची गोष्ट आहे . मुख्य धारा रंगभूमी आणि प्रायोगिकांतली दरी दूर करण्याचे प्रयत्न कधीच मनःपूर्वक झालेले दिसले नाहीत ; जे या संमेलनात प्रकर्षांनं दिसून आले . संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी आपल्या भाषणात ‘नाटय़ परिषद बदलते आहे याचा प्रत्यय या संमेलनात आला . . ’ हे जे निरीक्षण नोंदवलं , ते रास्तच होतं . आळेकरांनी एक खंतही यावेळी बोलून दाखविली . ती म्हणजे - जागतिक ख्यातीप्राप्त नाटककार विजय तेंडुलकर , पं . सत्यदेव दुबे , डॉ . श्रीराम लागू यांच्यासारख्या दिग्गज रंगकर्मीना संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान त्यांच्या कर्तृत्वामुळे खरं तर सहज मिळायला हवा होता . परंतु नाटय़ परिषदेनं आपल्या या प्रतिभावंत सुपुत्रांची कधीच दखल घेतली नाही . आळेकरांची ही खंत अनेक रंगकर्मीच्या मनातही सलत असते . अलीकडेच प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखालील नव्या नाटय़ परिषदेनं विजय तेंडुलकरांसह दामू केंकरे , सुधाताई करमरकर यांची छायाचित्रे परिषदेच्या नाटय़संकुलात लावून ही खंत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे . यापुढील संमेलनांत अशा प्रतिभावंत रंगकर्मीचा संमेलनाध्यक्षपदासाठी प्राधान्यानं विचार होईल अशी आशा बाळगायला त्यामुळे जागा आहे . ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता , सई परांजपे , डॉ . जब्बार पटेल , अरुण काकडे , प्रतिमा कुलकर्णी आदींची संमेलनातील उपस्थिती आणि त्यांचा उचित सन्मान ही संमेलनातील आणखी एक सुखद गोष्ट होय . त्यासाठी परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि त्यांचे सहकारी निश्चितच कौतुकास पात्र आहेत . नाटय़ परिषद म्हणजे आपसातले हेवेदावे आणि लाथाळ्यांचं प्रच्छन्न प्रदर्शन करणारा आणि त्यायोगे परस्परांवर चिखलफेक करणारा एक चव्हाटा अशी जी प्रतिमा आजवर सर्वाच्या मनात निर्माण झाली आहे , ती धुऊन टाकणारी आणखीन एक चांगली घटना यंदाच्या संमेलनात घडली . ती म्हणजे नाटय़ परिषदेचे पूर्वाध्यक्ष मोहन जोशी आणि नाटय़निर्माता संघाचे पूर्वाध्यक्ष प्रशांत दामले यांचा त्यांच्या रंगभूमीवरील योगदानाबद्दल केला गेलेला सत्कार ! आपल्या मनात कुणाहीबद्दल कसलीही किल्मिषं नाहीत , झालं गेलं विसरून आम्ही सर्वाना सोबत घेऊन वाटचाल करू इच्छितो , हा संदेश परिषदेच्या नव्या नेतृत्वानं या सांकेतिक कृतीद्वारे दिला आहे . त्यातून समस्त रंगकर्मीमध्ये सकारात्मकतेची एक लाट न उसळती तरच नवल . या संमेलनाकरता तीन दिवस नाटय़प्रयोग बंद ठेवून रंगमंच कामगारांसह सर्वच घटकांना संमेलनाचा निखळ आनंद व आस्वाद घेऊ दिल्याबद्दलही नाटय़ परिषदेचे तसेच सर्व निर्मात्यांचेही अभिनंदन करायला हवे . हेही पहिल्यांदाच घडतं आहे . नाटय़ परिषदेचा नियम प्रथमच पाळला गेला आहे . संमेलनाचं आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे नाटय़ परिषदेच्या निवडणुकीमुळे यंदा नाटय़संमेलन पुढे ढकललं गेलं होतं . ज्यांनी यापूर्वी संमेलन घेण्यासाठी निमंत्रण दिलं होतं त्या नाटय़ परिषद शाखांनी पावसाळ्याच्या तोंडावर आणि इतक्या अल्प अवधीत संमेलनाची आर्थिक समीकरणं जुळवणं शक्य होणार नसल्यानं संमेलन घेणं शक्य नसल्याचं कळवलं होतं . त्यामुळे यंदा संमेलन न होण्याचीच शक्यता व्यक्त केली जात होती . परंतु प्रसाद कांबळी यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीनं हे शिवधनुष्य स्वतःच उचलायचं ठरवून मुंबईत संमेलन घेण्याचा घाट घातला . संमेलन तयारीसाठी मिळालेल्या अल्पावधीमुळे हे संमेलन म्हणजे ‘एक उरकणं’ ठरणार असं म्हटलं जात होतं . परंतु प्रत्यक्षात हे संमेलन आजवरच्या नाटय़संमेलनांतील एक संस्मरणीय संमेलन म्हणून रसिकांच्या स्मरणात राहील अशा भव्यदिव्य स्वरूपात अन् कार्यक्रमांतील देखण्या कल्पकतेनं सर्वाचाच हा होरा परिषदेनं खोटा ठरवला . संमेलन सलग ६० तास अखंडपणे आयोजित केल्याबद्दल त्यांच्यावर टीकाही झाली . परंतु संमेलनातील सगळ्या कार्यक्रमांवर एक नजर टाकली तर त्यांत कमालीची कल्पकता दिसून येते . एकाही व्यावसायिक नाटकाचा प्रयोग या संमेलनात नव्हता . दरवर्षी संमेलनात आपल्या संस्थेच्या नाटकाचा प्रयोग ठेवला जावा म्हणून बहुसंख्य निर्माते ‘फिल्डिंग’ लावत असतात . आणि त्यात सुमार नाटकांचे प्रयोगही कधी कधी रसिकांच्या गळी मारले जातात . यंदा संमेलन मुंबईत होत असल्यानं व्यावसायिक नाटकांच्या प्रयोगांवर फुली मारण्यात आली . त्याऐवजी महाराष्ट्रातील प्रांतोप्रांतीच्या लोककला , उत्तम आशयघन एकांकिका , बालनाटय़ं , झाडीपट्टी रंगभूमीवरील नागर प्रेक्षकांना परिचित नसलेलं वेगळं नाटय़ , संगीत - नृत्याचे उत्तमोत्तम कार्यक्रम यांचा अंतर्भाव या संमेलनात आवर्जून केला गेला होता . त्यामागे विचार होता तो - ज्या कला शहरी प्रेक्षकांना सहसा पाहायला मिळत नाहीत त्या त्यांना पाहता याव्यात , हा ! संमेलनात यावेळी पुष्पगुच्छांना फाटा देऊन ‘नाटकाची पेटी’ स्मृतिचिन्ह म्हणून देण्यातली कल्पकता तर दाद देण्याजोगीच . आणखीन एक बाब जाणीवपूर्वक करण्यात आली . ती म्हणजे संमेलन व्यासपीठावर नाटय़ परिषद पदाधिकाऱ्यांचं संमेलनात केलं जाणारं आगतस्वागत व त्यांचे रटाळ सत्कार यांची यावेळी गच्छंती करण्यात आली . त्यामुळे ‘चमकेश’ लोकांची निराशा झाली असली तरी रसिकांना मात्र त्यामुळे हायसंच वाटलं . नाटय़ परिषदेचे अध्यक्ष वगळता कुणीच व्यासपीठावर नव्हतं . नाटय़ परिषदेचे नवे पदाधिकारी मानपानासाठी हपापलेले नाहीत , हा संदेश त्यामुळे रसिकांत गेला . तो योग्यच आहे . ( नियामक मंडळातील जुन्या खोडांना मात्र ही बाब चांगलीच झोंबलेली दिसली . ) संमेलनात वैचारिक मंथन झालं नसलं तरी नाटय़ - व्यवसायातील समस्या , प्रश्न आणि अडीअडचणींवर चर्चा करणारा ‘सांस्कृतिक आबादुबी’ हा खुला कार्यक्रम त्यात झाला . यात सहभागी नाटय़कर्मीनी नाटय़व्यवसायाला भेडसावणारे प्रश्न आणि समस्यांचा रोखठोक ऊहापोह केला . तो ऐकण्यासाठी नाटय़ परिषदेच्या अध्यक्षांसह सगळे पदाधिकारी जातीनं उपस्थित होते . त्यामुळे यातून काही फलनिष्पत्ती होईल अशी आशा करायला जागा आहे . केदार शिंदे यांना यासंदर्भात नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचा कान धरण्याची संधी आम्ही बिलकूल देणार नाही , असे सांगून परिषदेचे उपाध्यक्ष डॉ . गिरीश ओक यांनी , यापैकी अनेक गोष्टींवर याआधीच कार्यवाही सुरू झाल्याचं तिथल्या तिथंच सांगितलं . संमेलन अखंड ६० तास चाललं . अहोरात्र चाललेल्या या संमेलनातील एकूण एक कार्यक्रमांना रसिकांची तुडुंब गर्दी होती . अगदी पहाटे २ - ३ वाजता झालेल्या कार्यक्रमांनाही अनेक रसिकांना हाऊसफुल्ल गर्दीमुळे हे कार्यक्रम लाइव्ह चित्रफितीद्वारे पाहावे लागले . अर्थात ही संमेलनाच्या यशस्वीतेचीच पावती होय . या संमेलनातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा पाहता नाटय़ परिषदेच्या धुरिणांकडून रंगकर्मीसह रसिकांच्याही अपेक्षा आता वाढल्या आहेत यात शंका नाही . ही सकारात्मकता नाटय़ परिषदेच्या नवनव्या उपक्रमांतून , त्यांच्या कृतीतून यापुढे प्रत्ययाला येईल अशी अपेक्षा आहे . त्याचबरोबर नाटय़ - व्यावसायिकांमधील क्षुद्र , कोती मनोवृत्ती गाडून टाकण्यासाठीसुद्धा प्रसाद कांबळी यांनी आता पुढाकार घ्यायला हवा . मराठी रंगभूमीचा व्यापक परिप्रेक्ष्यातून विचार करायला त्यांना आता शिकावं लागेल . तसं झालं तर मराठी रंगभूमीवर नक्कीच पुन्हा सुवर्णकाळ येईल . ती अधिकाधिक बहरेल . वृद्धिंगत होईल . आणि इतिहासही त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय राहणार नाही . संमेलनाची फलनिष्पत्ती . . सांस्कृतिक मंत्री आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी काही घोषणा यावेळी केल्या . त्यात रंगमंच कामगारांसाठी मेडिक्लेम योजना , प्रायोगिकांसाठी स्वतंत्र नाटय़गृह उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार , नवनवे रंगकर्मी घडावेत याकरता रंगभूमीच्या विविध अंगांचे प्रशिक्षण देणाऱ्या शंभर कार्यशाळांचे राज्यभरात आयोजन , प्रोयोगिक नाटकांनाही अनुदान मिळण्यासाठी अनुदान योजनेत योग्य ते बदल , राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह नगरविकास खात्याच्या अखत्यारित असलेल्या नाटय़गृहांच्या देखभालीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे त्यांच्या दुरुस्ती , डागडुजीचे दायित्व सोपवण्याची घोषणा , इत्यादींचा समावेश होता . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत रंगभूमीचा इतिहास मांडणारे कलादालन उभारण्याची घोषणा केली . तसंच वांद्रे येथील बालगंधर्व नाटय़गृहाचे प्रचंड भाडे कमी करून ते मराठी नाटकांसाठी परवडण्यायोग्य करण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील याची ग्वाहीही त्यांनी दिली . तसंच बाहेरगावच्या रंगकर्मीना प्रयोगानिमित्ताने मुंबईत आल्यावर निवासासाठी अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडासंकुलात सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले . सतीश आळेकरांचे मूलभूत चिंतन संमेलनात ज्येष्ठ नाटककार आणि संमेलनाचे उद्घाटक सतीश आळेकर यांनी रंगभूमीविषयी मांडलेले विचार मूलगामी स्वरूपाचे होते . नाटकाचे अर्थकारण कुणालाही चुकलेलं नाही , असं सांगून त्यांनी लोककलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशा फडाचं उदाहरण दिलं . वार्षिक साडेतीनशे कोटींची उलाढाल असलेल्या या फडाचं अर्थकारण खेडकरांकडून समजून घेताना थक्क व्हायला होतं , असं ते म्हणाले . प्रयोगक्षम कलांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण देणाऱ्या आपल्याकडच्या सगळ्या संस्था या विनाअनुदानित आहेत . त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होतो . आय . आय . टी . तून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुलांसारखीच कलाशिक्षण घेतलेल्या मुलांकडून अपेक्षा धरायची तर त्या तोडीचं शिक्षण मिळण्याची सोय त्यांना आधी उपलब्ध करून द्यायला हवी , असं मतही त्यांनी व्यक्त केलं . नव्वदोत्तरी आर्थिक उदारीकरणाचा लाभ उद्योग - व्यवसायांसह ज्यांना ज्यांना मिळाला आहे , त्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पुढे येऊन आपल्या फायद्यातला काही वाटा रंगभूमीसह सर्वच कलांना द्यायला हवा , असा विचार त्यांनी यावेळी मांडला . नाटकं ‘भव्यदिव्य’ व्हायला हवीत . . संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी मराठी नाटकांच्या स्थिती - गतीबद्दल चर्चा करताना मराठी नाटकांत भव्यता यायला हवी आणि उत्तम संहितेची त्यास जोड मिळायला हवी असे मत व्यक्त केले . त्याला संदर्भ होता तो अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या शेक्सपीअरकृत मराठी ‘हॅम्लेट’चा ! या भव्य कलाकृतीचे सलग प्रयोग लावण्यावरून नाटय़निर्माता संघाने आक्षेप घेत ‘हॅम्लेट’च्या प्रयोगांना झुंडशाहीने आडकाठी केली होती . खरं तर अशा प्रकारचे भव्य ‘प्रयोग’ रंगभूमीवर झाले तर प्रेक्षकही ते बघायला नाटय़गृहांकडे वळतील . मग अशा नाटकाचे तिकीट दर कितीही ठेवले तरी त्यांना त्याचं काही वाटणार नाही , असंही मत उभय नेत्यांनी व्यक्त केलं . त्यासाठी त्यांनी पाश्चात्य रंगभूमीवरील भव्यदिव्य प्रयोगांचे तसेच आपल्याकडे सुरू असलेल्या ‘मुघल - ए - आझम’ या नाटय़प्रयोगाचे दाखले दिले .
0
पोटाची वाढलेली चरबी कमी करणे हे एकप्रकारचे आव्हान असते . मग व्यायाम , आहार आणि इतर अनेक गोष्टींचे पालन करुन ही चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो . योगासने हा यावरील आणखी एक उत्तम उपाय आहे . आता अनेक आसनांमधील नेमके कोणते आसन केल्यावर पोटावरील चरबी कमी होण्यासाठी फायदा होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे . अध्वासन हे विपरित शयनस्थितीतील एक आसन आहे . करायला अतिशय सोपे असल्याने तुम्ही ते सहज करु शकता . प्रथम विपरित शयनस्थिती घ्यावी म्हणजेच पालथे झोपावे . श्वास सोडत कपाळ जमिनीला टेकावे . दोन्ही हात डोक्याच्या दिशेने पुढे करावेत . हाताचे तळवे एकमेकांना जुळवून घ्यावेत . याचप्रमाणे पायाच्या टाचा एकमेकांना जुळवून घ्याव्यात . अंगठय़ाची नखे जमिनीला टेकलेली असावीत . नंतर हात आणि पाय दोन्ही चांगल्याप्रकारे ताणावेत व रिलॅक्स व्हावे . श्वसन संथ करावे व हळूहळू कुंभक स्थिती घ्यावी . शरीर सैल सोडावे . थोडावेळ शरीराची अशी ताणरहित अवस्था करावी . मग हळूहळू हात जागेवर न्यावेत . कपाळ उचलून हनुवटी जमिनीला टेकवावी मग सावकाश बैठकस्थितीत यावे . हे आसन करताना मनात कोणतेही विचार येणार नाहीत असा प्रयत्न केलेला चांगला . अध्वासनामध्ये पोटावर चांगला दाब येतो . त्यामुळे पचनक्रिया सुधारते . पाचकरस चांगल्याप्रकारे स्त्रवू लागतो . त्यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते . हात आणि पाय ताणल्यामुळे हाता - पायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते . नोकरी करणाऱ्या महिलांनी रोज रात्री झोपताना हे आसन जरूर करावे . दिवसभर आखडलेले शरीर मोकळे होण्यास मदत होते . या आसनामुळे खांद्यानाही मजबूती येते . दिवसभर एका जागी बसून किंवा प्रवासामुळे पाठिचा त्रास होत असेल तर कण्याचे विकार बरे होऊन पाठीला चांगला आराम मिळतो . हे आसन करायला अतिशय सोपे आहे त्यामुळे वृद्ध लोकांनी कोणत्याही वयातील व्यक्ती हे आसन करु शकतो . अध्वासन हे नियमित केल्यामुळे चरबी कमी होते . प्रत्येकाने हे रोज केलेच पाहिजे असे आसन आहे . सरावाने या आसनाचा कालावधी अर्धा तासही टिकवता येतो .
1
कॉफी हे पेय तसं अनेकांच्याच आवडीचं . अगदी दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या ‘कापी’पासून ते ‘स्टारबक्स’ आणि इतर मोठमोठ्या आऊटलेट्समध्ये मिळणाऱ्या कॅफे लातेपर्यंत विविध रुपांमध्ये ही कॉफी आपल्या समोर येते . दरांपासून ते चवींपर्यंत प्रत्येक गोष्टीत कॉफी तिचं वेगळेपण सिद्ध करुन गेली असं म्हणायला हरकत नाही . कोणाला भेटणं असो किंवा मग एखादी महत्त्वाची मिटींग असो , प्रत्येक वेळी कॉफीचीसुद्धा महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे . अशा या सर्वांच्याच आवडत्या कॉफीची नवी चव सर्वांच्या जिभेवर तरळण्यासाठी सज्ज झाली आहे . ‘फोर सिग्मॅटीक’ या ब्रँडने ही नवी कॉफी बाजारात आणली आहे . मशरुम हा या कॉफीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे . ‘फोर सिग्मॅटीक’च्या संस्थापकांनीच याविषयीची माहिती देत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या या कॉफीबद्दल काही माहिती दिली . रेशी Reishi मशरुमपासून ही कॉफी तयार करण्यात आली आहे . ज्यामध्ये असणाऱ्या तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते , असंही संस्थापक टेरो आयसोकौप्पीला यांनी सांगितल्याचं वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलं होतं . ही मशरुम कॉफी रक्तातील साखरेचं प्रमाण आणि चयापचन क्रियेत योग्य तो समतोल राखण्यास कारणीभूत ठरतं . तेव्हा आता या कॉफीला कितपत पसंती मिळते आणि मोठमोठ्या आऊटलेट्समध्ये ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होते का , हे पाहणं महत्त्वाचं ठरेल . ‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली - सनी लिओनी सध्या सर्वत्र याच मशरुम कॉफीच्या चर्चा आहेत . मुळात फक्त कॉफीमध्येच नव्हे , तर चहा आणि विविध प्रकारचे शेक , ज्यूस यांच्यातही मशरुमचा सर्रास वापर केला जातो . याचं उत्तम उदाहरण म्हणजे लॉस एन्जेलिसच्या लाईफहाऊस टॉनिक्स येथे मिळणारं श्रुम शेक . ज्यामध्ये लिंबाचा रस , चहा आणि त्यात मशरुम असं कधीही न पाहिलेलं समीकरण एकत्र केलं जातं . ही सर्व उदाहरणं पाहता प्रयोगशीलतेचं प्रमाण वाढलं असून आता खाद्य क्षेत्रावरही त्याचे पडसाद उमटल्याचं स्पष्ट होत आहे .
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वांकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानल्या जाणाऱ्या खेलो इंडिया या मोहिमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे . आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी देशातील शालेय पातळीवरील खेळाडूंमधील गुणवत्ता हेरुन त्यांना पुढे प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली होती . Star Sports या अग्रगण्य क्रीडा वाहिनीने केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं होतं . BARC या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनूसार , आठवडाभर खेलो इंडिया अंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेल्या सामन्यांना देशभरातून अंदाजे १० कोटी २० लाख लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे . BARC ही संस्था टेलिव्हीजन वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येचे तपशील ठेवत असते . केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत पहिल्यांदा शालेय सामन्यांचं मोठ्या प्रमाणात खासगी क्रीडा वाहिनीवर प्रक्षेपण करण्यात आलं होतं . खेलो इंडियाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनीही आनंद व्यक्त केला . “ज्या पद्धतीने खेलो इंडियातील सामन्यांना भारतभर प्रतिसाद मिळाला आहे तो वाखणण्याजोगा आहे . ज्या पद्धतीने लोकांनी या सामन्यांना आपली पसंती दर्शवली आहे , हे पाहता आगामी काळात भारत क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवेल यात काहीच शंका नाही . अशाप्रकारच्या क्रीडामोहीमेतून भारताचा क्रीडाक्षेत्रात दबदबा निर्माण होईल . ” येणाऱ्या काही वर्षांमध्ये या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे आलेले खेळाडू मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करुन पदकांची लयलूट करतील अशी आशाही राठोड यांनी व्यक्त केली .
2
तापमान कमी झाले की शरीर या तापमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते . अशाप्रकारे तापमानाशी जुळवून घेताना त्यात अनेक अडचणी येतात . सर्दी , खोकला , सांधेदुखी यांसारखे आजार थंडीमुळे बळावतात . हिवाळा म्हणजे वर्षभरासाठी तब्येत कमावण्याचा चांगला काळ असे म्हटले जाते . थंडीत खाल्लेले पदार्थ लवकर पचतात तसेच या काळात व्यायाम करण्यासही सुरुवात केली जाते . याशिवाय थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकून रहावी यासाठी आहारात काही साधे बदल केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो . अनेक व्हिटॅमिन ही खास थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी फायदेशीर असतात . व्हिटॅमिन ए , बी १२ , सी आणि डी तसेच झिंक आणि सेलेनियम हे घटक उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात . थंडी आणि फ्लू यांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी या व्हिटॅमिन्सचा उपयोग होतो . १ . व्हिटॅमिन डीसाठी ऊन हा उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे . सकाळच्या कोवळ्या उन्हात काही काळ बसल्यास त्याचा व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी फायदा होतो . यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते . २ . काही सप्लिमेंटस ही आहारात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात . त्यामुळे तुम्ही आहारात अशा सप्लिमेंटसचा समावेश करु शकता . मात्र त्यासाठी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे . ३ . शरीरातील पेशींचे कार्य सुधारण्यास व्हिटॅमिन ए उपयुक्त असते . त्वचेचे विविध संसर्गांपासून संरक्षण होण्यासाठी व्हिटॅमिन एचा उपयोग होतो . भाज्या , फळे , दूध , टोमॅटो , पालक , रताळी , सोयाबिन , कोथिंबीर , लोणी , चीज , मासे , गाजर यांसारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते . आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल बाजरी थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी . लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी . बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते . बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक मॅग्नेशियम , कॅल्शियम , मॅग्नीज , ट्रिप्टोफेन , फायबर , व्हिटॅमिन - बी , अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते . बदाम बदाम सालीसकट खाल्ल्यास ते जास्त पौष्टीक असतात . बदामात व्हिटॅमिन ई , व्हिटॅमिन बी आणि फायबर उपलब्ध असते . बदामात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने महिलांनी याचे सेवन करणे फायद्याचे असते . हृदय आणि रक्त धामन्या ( arteries ) सुरक्षित बदाम उपयुक्त ठरतो . बदामात असलेले ६५ टक्के मोनोसॅच्युरेटेड फॅट शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते . मध हिवाळ्यात मधाचा आरोग्याला फायदा होतो . मधामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊन रोग प्रतिकारक शक्तीही वाढते . शरीराला निरोगी , स्वस्थ आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मधाचे सेवन आरोग्यदायी आहे . आले नेहमीच्या आहारात आले वापरल्यास छोट्या - मोठ्या आजारांपासून दूर राहणे शक्य आहे . हिवाळ्यात कोणत्याही स्वरुपातील आल्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो . यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि डायजेशनही चांगले राहते . आलं उत्तम पाचक असल्याने पोटदुखी आणि अॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते . शेंगदाणे शेंगदाण्यामध्ये लोह , कॅल्शिअम आणि झिंकचा उत्तम स्रोत आहे . मुठभर शेंगदाण्यामध्ये ४२६ कॅलरीज , ५ ग्रॅम कार्बोहायड्रेट , १७ ग्रॅम प्रोटीन असते . यामध्ये व्हिटॅमिन इ , के , आणि बी ६ भरपूर प्रमाणात असते . यामध्ये उपलब्ध असलेले अँटीऑक्सीडेंट , व्हिटॅमिन , मिनिरल्स आदी तत्त्व फायदेशीर ठरतात . ( ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे . त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही . त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
भारतीय प्रेक्षकांसाठी फेब्रुवारी हा महिना निखळ मनोरंजनाचा आहे . कारण , बहुप्रतिक्षित असे बरेचसे चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होत आहेत . राणा डग्गुबती , तापसी पन्नू , के के मेनन , अतुल कुलकर्णी , राहुल सिंग आणि ओम पुरी यांच्या भूमिका असलेला ‘द गाझी अॅटॅक’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे . प्रेक्षकांच्या बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर हा चित्रपट काल सर्वत्र प्रदर्शित झाला . चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १ . ६५ कोटी इतकी कमाई केली आहे . पण ही केवळ बॉलीवूडमधील कमाई आहे . प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘द गाझी अॅटॅक’ च्या बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा ट्विट केला आहे . त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की , ‘द गाझी अॅटॅक’ ने शुक्रवारी हिंदी भाषिक व्हर्जनमध्ये १ . ६५ कोटी रुपयांची कमाई केली . इतर सर्व व्हर्जनमध्ये या चित्रपटाने ४ . २५ कोटी रुपयांची कमाई केली . दरम्यान , हिंदी , तेलगू आणि तामिळ या भाषांमध्ये बनवण्यात आलेल्या ‘द गाझी अॅटॅक’ या चित्रपटाचे डिजिटल राइट्स तब्बल १२ . ५ कोटींना अॅमेझॉन प्राइमने खरेदी केले आहेत . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘द गाझी अॅटॅक’ चे सर्व भाषांमधले डिजिटल अधिकार हे १२ . ५ कोटींमध्ये विकण्यात आले आहेत . एका नवोदित दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटासाठी मिळालेली ही फार मोठी रक्कम आहे . आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार , याबद्दल अधिकृत माहिती घेण्यासाठी निर्मात्यांना संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही . इतर चित्रपटांप्रमाणे ‘द गाझी अॅटॅक’ चित्रपटाला देखील स्पर्धेचा सामना करावा लागत आहे . या चित्रपटासोबतच हिंदीमध्ये ‘रनिंग शादी’ आणि ‘इरादा’ हे दोन चित्रपट काल प्रदर्शित झाले . तसेच , या स्पर्धेत गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला सुभाष कपूर दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट देखील विसरून कसे चालेल . पण , या सगळ्यात कोणाचा फायदा झाला असेल तर ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री तापसी पन्नू . तापसीने ‘द गाझी अॅटॅक’ आणि ‘रनिंग शादी’ या दोन्ही चित्रपटांमध्ये काम केले आहे . ‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट सत्यघटनेवर आहे . १९७१च्या भारत - पाक युद्धादरम्यान त्यावेळी विशाखापट्टणमच्या बंदरात असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर हल्ला करून ते नष्ट करण्याची योजना पाकिस्तानने आखली होती . आणि त्यांनी या योजनेसाठी दुसऱ्या महायुद्धात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या ‘गाझी’ या पाणबुडीचा वापर करायचे ठरवले . पाकिस्तानच्या या कारवाईची कुणकुण लागलेल्या नौदल अधिकाऱ्यांनी केवळ ‘सर्च ऑपरेशन’साठी ‘एस २१ – आयएनएस राजपूत’ ही पाणबुडी विशाखापट्टणमजवळच्या समुद्रात तैनात केली . या सर्च ऑपरेशनची तयारी करण्यापूर्वीची नौदल अधिकाऱ्यांची परिस्थिती , त्यांच्यावरचे राजकीय दबाव आणि त्यातून त्यांना घ्यावे लागणारे निर्णय या चित्रपटात दाखविण्यात आले आहे . ‘द गाझी अॅटॅक’ हा चित्रपट पूर्णपणे पाणबुडीत घडतो . त्यामुळे पाणबुडीची अंतर्गत रचना , त्यातली कार्यपद्धती , तांत्रिक भाग अशा अनेक गोष्टी चित्रपटात महत्त्वाच्या होत्या . ज्या दिग्दर्शकाने तंतोतंत पाणबुडीचा सेट उभारून पूर्ण केल्या आहेत .
0
हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीमध्येही अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होताना दिसत आहे . या नव्या आशयाच्या आणि धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असल्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांमध्येही नवी उर्मी निर्माण होऊन ते नवीनवीन चित्रपट तयार करत आहेत . यातच आता आणखी एक नव्या दमाचा चित्रपट येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे . यशाच शिखर गाठण्यासाठी अपरिमित कष्ट करावे लागतात . तरच एखादी गोष्ट साध्य करता येते . या यशाच्या घोडदौरेमध्ये अनेक अडथळे येत असतात . मात्र जो हे अडथळे पार करुन स्वतःला सिद्ध करतो तोच खरा विजयी ठरतो . या अशाच यशाची गाथा सांगणारा ‘रे राया कर धावा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यापूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे . राधे मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘रे राया कर धावा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मिलिंद शिंदे यांनी उचलली असून निर्मिती अजय सुखेजा यांनी केली आहे . तर अनिता संजय पोपटानी या कार्यकारी निर्मात्या पदाची जबाबदारी सांभाळली आहे . दरम्यान , या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान , संस्कृती बालगुडे , उदय टिकेकर , अभिजित चव्हाण , हंसराज जगताप , विवेक चाबुकस्वार , सुदर्शन पाटील , नयन जाधव , प्रकाश धोत्रे आदी कलाकार मंडळी झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे . भूमिका आहेत . या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ही गाणी मिलिंद शिंदे यांनी लिहिली आहेत . संगीतकार मंगेश धाकडे यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत . गायक जावेद अली , कैलाश खेर यांच्यासह वैशाली भैसने माडे , मंगेश धाकडे यांनी ही गाणी गायली आहेत .
0
पुस्तक हे माणसांचे सच्चे दोस्त असतात असं म्हणतात . पुस्तकांच्या सानिध्यात आपण बरंच काही शिकून जातो . स्वतः पुस्तकांच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही हे मनापासून पटलं आहे . त्यामुळे कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली सध्या पुस्तकांच्या सानिध्यात वेळ व्यतीत करत आहे . १० ऑगस्ट हा बुक लव्हर डे म्हणून साजरा केला जातो . म्हणूनच सोनालीनं इन्टाग्राम पोस्टमधून तमाम पुस्तकप्रेमींना Book Lovers Dayच्या शुभेच्छा दिल्या आहेत . सोनाली स्वतः पुस्तकप्रेमींसाठी बुक क्लब चालवत आहे . सोशल मीडियावर देखील या बुक क्लबद्वारे हजारो पुस्तकप्रेमी जोडले गेले . तेव्हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुस्तक प्रेमी सोनालीनं तिच्यासारख्या असंख्य पुस्तक प्रेमींना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये असून , हायग्रेड कॅन्सरवर ती उपचार घेत आहे . काही दिवसांपूर्वी कॅन्सर झाल्याचं निदान डॉक्टरनं केलं . त्यानंतर उपचार घेण्यासाठी ती अमेरिकेत गेली . गेल्याच आठवड्यात आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिनं एक फोटोही शेअर केला होता . कॅन्सरच्या उपचारांसाठी तिनं पूर्णपणे केसंही कापले . ‘हल्ली मला तयार होण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी आहे . कारण आता केस विंचरण्यात माझा वेळ वाया जात नाही’ , असं तिने लिहित आपला फोटो शेअर केला होता . खरं तर सोनालीला अशा अवस्थेत पाहायला मिळेल असा विचार तिच्या चाहत्यांनी कधीच केला नव्हता , मात्र आता या आजारातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचं बळ देव तूला देवो अशी प्रार्थनाही चाहत्यांनी तिच्यासाठी केली आहे .
0