news
stringlengths
344
19.5k
class
int64
0
2
फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला नसून धूम्रपान न करणाऱ्या अनेक युवकांना हा कर्करोग होत आहे . वाढते वायू प्रदूषण याला कारणीभूत असू शकते , असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे . सर गंगा राम रुग्णालय येथील डॉक्टरांनी मार्च २०१२ ते जून २०१८ या काळात १५० रुग्णांचा अभ्यास केला . या वेळी जवळपास ५० टक्के रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते . ५० वर्षांखालील रुग्णांमध्ये हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत वाढला . यातील पाच रुग्ण २० ते ३० या वयोगटातील होते . मात्र त्यातील कोणीही धूम्रपान करीत नव्हते , असे गंगाराम रुग्णालयातील फुप्फुस शल्यविशारद अरविंद कुमार यांनी सांगितले . कमी वयाच्या आणि धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण धक्कादायक असल्याचे कुमार यांनी सांगितले . धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होत असल्याचे सर्वज्ञात आहे , परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे आढळून येत आहे . १५० पैकी ११९ रुग्ण हे पुरुष होते आणि ३१ महिला होत्या . महिला रुग्णांमधील निम्म्याहून अधिक महिला या दिल्ली - एनसीआर भागातील होत्या . २० ते ८० या वयोगटातील रुग्णांवर हा अभ्यास करण्यात आला . हे रुग्ण उत्तर प्रदेश , बिहार , उत्तराखंड , राजस्थान , हरयाणा , पंजाब , हिमाचल प्रदेश , जम्मू आणि काश्मीर या भागांतील होते . रुग्णांचे सरासरी वय हे ५८ होते . यातील ७४ रुग्ण हे धूम्रपान न करणारे होते , तर ७६ धूम्रपान करणारे होते .
1
रोजच्या आहारातील पदार्थात दालचिनीचा समावेश केला तर शरीराचे तापमान दोन अंशांनी कमी होऊ शकते व त्यामुळे प्रकृतीत सुधारणा होते , असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे . याबाबत डुकरांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की , दालचिनीमुळे त्यांच्या पोटातील थर व्यवस्थित राहतात , अशी माहिती ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे प्रकल्प संचालक कोरोश झदेह यांनी दिली . कक्ष तापमानाला डुकरांना दालचिनीयुक्त आहार दिला असता त्यांच्या पोटात कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले . तसेच गॅस्ट्रिक अॅसिड व पेप्सिन कमी झाले . त्यामुळे त्यांचे पोट थंड झाले . जेव्हा डुकरांच्या शरीराचे तापमान जास्त असते तेव्हा त्यांच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साइड कमी होतो . दालचिनीने तो आणखी कमी होतो , पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसते . दालचिनीमुळे पोटाचे तापमान दोन अंश सेल्सियसने कमी होते . उष्ण कटिबंधातील लोक थंडाव्यासाठी दालचिनीचा वापर करतात , असे या विद्यापीठाचे डॉ . जियना झेन व नरेश पिल्ले यांनी म्हटले आहे . पचनानंतर पोटात वायू तयार होतात व त्यांच्या प्रमाणावर आतडय़ाचे आरोग्य अवलंबून असते . या प्रयोगात वायू संवेदक कॅप्सूल डुकरांच्या शरीरात सोडण्यात आल्या होत्या . पोटाच्या विकारांचे निदानही अशा कॅप्सूलच्या मदतीने करता येते . ( टीप : ‘ आरोग्यवार्ता ’ मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात . त्यामुळे त्यातील मतांशी ‘ लोकसत्ता ’ चा संबंध नाही . कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे . )
1
भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ( आयओए ) चेन्नईत झालेल्या वार्षिक बैठकीत सुरेश कलमाडी व अभयसिंह चौटाला यांची अनुक्रमे तहहयात आश्रयदाते आणि अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा निर्णय झालाच नसल्याचे , आयओएचे अध्यक्ष एन . रामचंद्रन यांनी सांगितले . सुरेश कलमाडी यांच्यावर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत . त्या वेळी कलमाडी भारतीय ऑलिंपिक संघटना आणि राष्ट्रकुल संयोजन समितीचे अध्यक्ष होते . याच भ्रष्टाचार प्रकरणात कलमाडी यांना 2014 मध्ये अटकदेखील करण्यात आली होती . यानंतरही 2015 मध्ये त्यांना ऍथलेटिक्समध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आशियाई ऍथलेटिक्स संघटनेच्या अध्यक्षीय पदकाने गौरविण्यात आले होते . त्याचबरोबर अभयसिंह चौटाला यांच्या अध्यक्षाच्या निवडीस आक्षेप घेत भारतीय ऑलिंपिक संघटनेस निलंबित करण्यात आले होते . मात्र , घटनाबदल झाल्यावर त्यांना पदावरून दूर करण्यात आले होते . सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची नियुक्ती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अंगलट आली होती . केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावताना या जोडगोळीला हटवत नाही तोपर्यंत सर्व संबंध तोडून टाकण्याचा इशारा दिला . कलमाडी व चौटाला यांनी ही वेळ योग्य नसल्याचे कारण देत हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता . आता रामचंद्रन यांनीही चेन्नईतील बैठकीत असा काही प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचे म्हटले आहे .
2
मिताली व स्मृती यांची अर्धशतके ; मालिकेत २ - ० अशी आघाडी मिताली राज व स्मृती मानधना या सलामीच्या फलंदाजांनी वैयक्तिक अर्धशतकांसह शतकी भागीदारी केली . त्यामुळेच भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी - २० सामना नऊ विकेट राखून जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २ - ० अशी आघाडी घेतली . प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने २० षटकांत ७ बाद १४२ धावा केल्या . त्यामध्ये सून लूस ( ३३ ) व नेदिनी डी क्लर्क ( २६ ) या दोनच खेळाडू फलंदाजीत चमक दाखवू शकल्या . भारताकडून अनुजा पाटील व पूनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले . मिताली व स्मृती यांनी सलामीसाठी १०६ धावांची खणखणीत भागीदारी करीत भारताचा विजय दृष्टिपथात आणला . मितालीने त्यानंतर कर्णधार हरमानप्रीत कौरच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले . भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले . हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखून धरले . लूस व क्लर्क यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या ४३ धावांच्या भागीदारीचा अपवाद वगळता आफ्रिकेकडून अन्य मोठी भागीदारी झाली नाही . पाटील व यादव यांना पूजा वस्त्रकार व शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद करीत चांगली साथ दिली . मिताली व स्मृती यांनी आत्मविश्वासाने खेळ करीत भारताच्या विजयाचा पाया रचला . स्मृतीने चार चौकार व तीन षटकारांसह ५७ धावा केल्या . मोसेलीन डॅनियलने तिला बाद करीत ही जोडी फोडली . मितालीने ६१ चेंडूंत नाबाद ७६ धावा करताना आठ चौकार मारले . संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ७ बाद १४२ ( सून लूस ३३ , नेदिनी डी क्लर्क २६ ; अनुजा पाटील २ / ३७ , पूनम यादव २ / १८ ) पराभूत वि . भारत : १९ . १ षटकांत १ बाद १४४ ( मिताली राज नाबाद ७६ , स्मृती मानधना ५७ )
2
क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिंपिक स्पर्धांच्या यजमानपदाचा निर्णय मतदानाशिवाय घेण्यात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला यश आले . पॅरिस आणि लॉस एंजलिस या शहराच्या पदाधिकाऱ्यांनी परस्पर सामजंस्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता ऑलिंपिक २०२४ पॅरिस , तर २०२८ मध्ये लॉस एंजलिसला होईल . पॅरिस आणि लॉस एंजलिस या दोन्ही शहरांनी २०२४च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या यजमानपदाची तयारी दर्शविली होती . गेल्यावर्षी जूनमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या छाननीनंतरच ही दोन नावे शर्यतीत राहिली होती . त्या वेळी बोस्टन , हॅम्बुर्ग , रोम आणि बुडापेस्ट या शहरांनी वाढता खर्च आणि जनतेकडून असणारा विरोध लक्षात घेऊन यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती . यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी दोन्ही शहरांनी आपापसात चर्चा करून कुणी प्रथम ऑलिंपिकचे आयोजन करायचे याचा निर्णय घ्यावा , असे आवाहन ऑलिंपिक समितीने केले होते . यजमानपदासाठी संभाव्य मतदान आणि त्यानंतरचे मतभेद टाळण्यासाठी हा सगळा प्रयत्न होता . ऑलिंपिक समितीच्या या प्रयत्नांना अखेर यश आले . लॉस एंजलिसने २०२४च्या यजमानपदाचा हट्ट सोडून २०२८मध्ये आयोजन करण्याची तयारी दर्शविली आणि हा सगळा प्रश्न सुटला . आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे . दोन्ही शहरांनी घेतलेला हा समजूतीचा निर्णय आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत कार्यकारी समितीसमोर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल , असे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी सांगितले . पॅरिस आणि लॉस एंजलिस वैयक्तिक जबाबदारीवर या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत . कारण , २०१८ मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक समितीने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे .
2
भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार लौकिक मिळवलेला महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत हे दोघेही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वावरत आहेत . बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत याने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारल्यानंतर लोकप्रिय झाला आहे . या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा सुशांत राजपूत आणि महेंद्र सिंग धोनी चर्चेत आले होते . आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मोहालीमध्ये रंगलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात सुशांत राजपूतने उपस्थिती लावल्याने दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत . ट्विटरवर सध्या # DhoniSushantOnField हा हॅश टॅग ट्रेंडिगमध्ये आला आहे . धोनीच्या आयुष्यावरील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सुशांत प्रत्यक्षात सामन्यावेळी एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ आहे . त्यामुळे या भेटीची नेटीझन्सनी एका फिल्डवर दोघांचे दर्शन झाल्याची तुलना करताना दिसत आहेत . धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारताना धोनीचा हेलिकॉप्टर शॉटसाठी सुशांतने मेहनत घेतली होती . या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली . त्यामुळे धोनीच्या नावाने लोकप्रियता मिळविलेल्या सुशांतच्या उपस्थित न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार धोनी सुशांतला आपला हेलिकॉफ्टर शॉट दाखविणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल . धोनीने एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत १९३ षटकार ठोकले आहेत . आजच्या सामन्यात सुशांतच्या साक्षीने त्याने चित्रपटासारखी खेळी केली तर भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकाराचा विक्रम धोनी आपल्या नावे करु शकतो . भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक १९५ षटकार ठोकले आहेत .
0
प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीने तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले . मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या . त्यामुळे कसोटी नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे . १ बाद २९ वरून इंग्लंडचा पहिला डाव २२७ धावांत आटोपला . २१५ धावांच्या आघाडीनंतर मात्र कांगारूंची दिवसअखेर ४ बाद ५३ अशी घसरगुंडी उडाली . यानंतरही कांगारू २६८ धावांनी पुढे आहेत . इंग्लंडचा निम्मा संघ १०२ धावांत गारद झाला होता . त्यानंतर यष्टिरक्षक - फलंदाज जॉनी बेअरस्टॉ तसेच वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रतिकार केला . बेअरस्टॉ - वोक्स यांनी ६६ धावांची भागीदारी रचली . नवव्या क्रमांकावर उतरलेला ओव्हर्टन ४१ धावांवर नाबाद राहिला . त्याची कामगिरी इंग्लंडसाठी डावात सर्वोत्तम ठरली . लायनने चार विकेटसह छाप पाडली . यात सर्वाधिक अनुभवी कूकच्या विकेटचा समावेश होता . इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा केला . अँडरसनने सलामीवीर कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट ( ४ ) आणि ख्वाजा हे दोन मोहरे टिपले . वोक्सने वॉर्नर आणि स्मिथ ( ६ ) यांचा अडथळा दूर केला . दिवसअखेर हॅंडसकाँब ( ३ ) आणि नाईटवॉचमन लायन ( ३ ) नाबाद होते . संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया ८ बाद ४४२ घोषित व ४ बाद ५३ ( डेव्हिड वॉर्नर १४ , उस्मान ख्वाजा २० , जेम्स अँडरसन २ - १६ , ख्रिस वोक्स २ - १३ ) विरुद्ध इंग्लंड ः ७६ . १ षटकांत सर्वबाद २२७ ( ३७ , मोईन अली २५ , जॉन बेअरस्टॉ २१ , ख्रिस वोक्स ३६ , क्रेग ओव्हर्टन नाबाद ४१ - ७९ चेंडू , ५ चौकार , मिचेल स्टार्क ३ - ४९ , पीटर कमिन्स २ - ४७ , नेथन लायन ४ - ६० ) .
2
डार्क सर्कलची समस्या आपल्यातील अनेकांना सतावते . कधी जागरण झाल्याने तर कधी शरीराला आहारातून योग्य ते घटक न मिळाल्याने ही समस्या उद्भवते . मात्र त्यावर वेळीच उपाय करणे आवश्यक असते . अन्यथा ही सर्कल्स जास्त वाढत जातात . कधी ही सर्कल दिसून नयेत म्हणून सौंदर्यप्रसाधनांचा वापर केला जातो तर कधी आणखी काही उपचार केले जातात . मात्र आहारात योग्य ती फळे आणि भाज्यांचा समावेश केल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते . पाहूयात अशी कोणती फळे आहेत ज्याच्या सेवनाने डार्क सर्कल कमी होतील आणि तुम्ही जास्त चांगले दिसू शकाल… टोमॅटो टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हीटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते . हे घटक त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरतात . टोमॅटोमुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते आणि डोळ्याखालील नाजूक स्कीन चांगली राहण्यासही मदत होते . टोमॅटोमधील घटक चेहऱ्याला टवटवी देण्यास उपयुक्त ठरतात . त्यामुळे टोमॅटोबरोबरच संत्री , पपई आणि ब्रोकोली यांसारखी व्हीटॅमिन सी ने युक्त असणारी फळे खाल्ल्यास चांगले . काकडी काकडी ही जवळपास सर्व सिझनमध्ये मिळणारी फळभाजी आहे . काकडीमध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने ती आरोग्यासाठी चांगली असते असे आपण नेहमीच ऐकतो . डार्क सर्लची समस्या कमी होण्यासाठी काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवल्यास फायदा होतो . अनेकदा ताण आणि थकवा आल्यानेही डार्क सर्कल येतात . ती कमी होण्यासाठी काकडीचा उपयोग होतो . बदाम डोळे आणि त्याच्या खालील त्वचा चांगली राहण्यासाठी व्हीटॅमिन ई अतिशय उपयुक्त असते . त्वचेतील लवचिकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या एन्झाईम्सशी लढा देण्यासाठी ई व्हीटॅमिन उपयुक्त ठरतात . बदामामध्ये मोठ्या प्रमाणात व्हीटॅमिन ई असल्याने त्याचा आरोग्याला मुख्यतः त्वचेला फायदा होतो . याबरोबरच आक्रोड , जर्दाळू , सूर्यफुलाच्या बिया हे अतिशय उपयुक्त ठरतात . हिरव्या भाज्या हिरव्या भाज्यांना आपल्या आहारात कायमच महत्त्वाचे स्थान आहे . या भाज्यांमधून शरीराला अनेक आवश्यक घटक मिळत असल्याने जास्तीत जास्त पालेभाज्या खाव्यात . यात ब्रोकोली , पालक यांसारख्या भाज्या खाव्यात . यामुळे के जीवनसत्त्व मिळते जे त्वचेसाठी चांगले असते . रक्ताभिसरण चांगले नसणे हे त्वचेच्या आणि डार्क सर्कलच्या समस्यांचे एक मुख्य कारण असते . त्यामुळे हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश ठेवावा .
1
फॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं ही तरुणांसाठी क्रेझ असते . सध्या असे ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांना “फॅशन सेन्स” आहे असेही संबोधले जाते . आधुनिक काळानुसार ही फॅशन बदलत असते . प्रत्येकाची आवड , गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते . कुठलाही ट्रेंड फॉलो करताना आपण बाजारात सुरु असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्त वापर करतो . या ट्रेंडमध्ये ओल्ड फॅशन किंवा फंकी लूक असं काही नसतं . सध्या तरुण पिढी सोशल मीडियाच्या साह्याने फॅशन ट्रेंड्स बद्दल अपडेट राहते . मागच्या ५ ते १० वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे . विशेष म्हणजे यात काही वर्षांपूर्वी ट्रेंडमध्ये असणारी फॅशन परत येत आहे . ६० च्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये ‘हिट’ ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे . फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या ‘लिवा’ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे . पाहूयात कशा आहेत या नवीन डिझाईन्स… गडद रंगसंगती : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते , ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत आहे . सध्या पिवळा , ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स फॅशन इन आहेत . निवड : कपडे घेताना आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टी यानुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे . या फ्लोरल प्रिंटमध्ये काहीसा ‘रेट्रो’ टच असल्याने आपण त्या काळातील फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आणू शकता . मल्टिपल आऊटफिट्स : पूर्वी फक्त ‘वन पीस’ फ्रॉकपेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती . अशाचप्रकारे फिकट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट वेगळाच स्टायलिश लूक देऊन जातो . वेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स , चेक्स आणि रेषांचे प्रिंट्ससुद्धा चर्चेत होते . आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे . पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ऑकेजनला अशा प्रिंटचे कपडे आकर्षक दिसतात .
1
इंग्लिश येणं ही आता एक अतिशय गरजेची गोष्ट झाली आहे . पूर्वी फक्त पेपरा - पुस्तकात असणाऱ्या इंग्लिश भाषेने स्मार्चटफोन युगात आपल्या रोजच्या जीवनाचा ताबा कधी घेतला हे कळलंच नाही . अर्थात मातृभाषा शिकण्याचं महत्त्व जराही कमी झालेलं नाही . पण त्याजोडीला इंग्लिश येत नसेल तर काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असते . नोकरीसाठी अर्ज करताना तर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं . तुमच्या बायोडेटामध्ये असणारी इंग्लिश ग्रामरची एखादी चूक किंवा एखादा स्पेलिंग एरर तुमचं इंप्रेशन खराब करू शकतो . कितीतरी इंग्लिश शब्दांचा उच्चार आणि त्यांचं स्पेलिंग जवळजवळ सारखंच असतं पण त्यांच्या अर्थांमध्ये फरक असतो . अशी गडबड टाळायची असेल तर पुढच्या काही शब्दांच्या जोड्या वाचा १ . Affect ( अफेक्ट ) आणि Effect ( इफेक्ट ) हे दोन शब्द एकसारखेच वाटले तरी ते वेगवेगेळे आहेत . ‘Affect’चा अर्थ परिणाम करणं तर Effect चा अर्थ परिणाम होणं २ . it’s आणि its या दोन्ही शब्दांमध्ये नेहमी गल्लत केली जाते अनेकदा सगळ्यांना वाटतं की हे दोन्ही शब्द एकच आहेत . पण तसं न होता या दोन्ही शब्दांचे वेगवेगळे अर्थ आहेत . it’s हा शब्द ‘it is’ चं छोटं रूप म्हणून वापरला जातो तर its हा शब्द ‘त्याचा / त्याची / त्याचे’ अशा अर्थाने वापरतात . उदा . ‘बाळ त्याच्या खेळण्यांशी खेळत आहे’ याचं भाषांतर करताना ‘The baby is playing with its toy’ असं लिहितात . तर ‘आज पाऊस पडतोय’ या वाक्याचं भाषांतर करताना ‘It’s raining today’ असं लिहिलं जाईल . दुसऱ्या वाक्यामधल्या it’s चा वापर it is अशा अर्थाने केला गेला आहे . ३ . Expect / except / accept या शब्दांचे उच्चार जवळचे असल्याने त्यांच्यामध्ये गोंधळ होणं साहजिक आहे . Expect ( एक्सपेक्ट ) म्हणजे ‘अपेक्षा करणे’ , Accept ( अॅक्सेप्ट ) म्हणजे ‘स्वीकार करणे’ आणि Except ( एक्सेप्ट ) म्हणजे ‘…च्याशिवाय’ ४ . Breath / Breathe ‘Breath’ म्हणजे श्वास . हे नाम आहे . तर श्वास घेण्याच्या प्रत्यक्ष क्रियेला ‘Breathe’ किंवा ‘Breathing’ म्हणतात . ५ . Principal / Principle Principal म्हणजे मुख्याध्यापक तर Principle म्हणजे तत्व . न्यूटनचा सिध्दांत याचं इंग्लिश भाषांतर Newton’s Principle असं होतं . फिरले का डोळे ? अशा अजून ३० आणखी जोड्या देता येतील . ‘English is a very funny language’ असं म्हटलं जातं ते खरंच आहे . पण काही मोजक्या बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या तर ही भाषा आत्मसात करणं कठीण नाही .
1
खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या नवव्या सिझनची शूटिंग सध्या अर्जेंटिनामध्ये सुरू आहे . यामध्ये सेलिब्रिटी थरारक आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारे स्टंट्स करताना पाहायला मिळतात . या स्टंटदरम्यान आदित्य नारायण आणि विकास गुप्ता हे स्पर्धक दुखापतग्रस्त झाले आहेत . एका स्टंटदरम्यान आदित्यच्या डोळ्याला इजा झाली . तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला आठवडाभर आराम करण्याचा सल्ला दिला आहे . तर दुसऱ्या एका स्टंटदरम्यान विकास गुप्ताला साप चावला . त्याला काही इंजेक्शन्स दिले असून बरा होण्यास काही दिवस लागणार असल्याचं कळतंय . Fanney Khan Review : स्वप्नपूर्तीचा वेध घेणारा ‘फन्ने खान’ प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी खरंतर प्रत्येक स्टंट स्पर्धकांना करण्यास सांगण्यापूर्वी शोच्या टीमकडून सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाते . या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी स्वतः सुरक्षेबाबत खातरजमा करून घेत असतो . तसंच पहिल्यांदाच अशा प्रकारच्या घटना घडल्याचं शोच्या टीमकडून म्हटलं जात आहे . या घटनांमुळे रोहितनेही सेटवर राग व्यक्त केला . स्पर्धकांच्या सुरक्षेची अधिक काळजी यापुढे घेतली जाईल अशी ग्वाही टीमकडून देण्यात आली आहे .
0
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत . हल्ली वेडिंग फोटोग्राफी , प्री वेडिंग , पोस्ट वेडिंग असे नवनवे ट्रेंड सुरू झाले आहेत . पण फोटोग्राफीबरोबरच लग्नाच्या अल्मबबाबतही ग्राहकांनी सजक असायला हवं . अनेक जोडप्यांना वेडिंग अल्बमसाठी पैसे खर्च करणं म्हणजे मोठी खर्चिक बाब वाटते . ‘कशाला खर्च करायचे एवढे पैसे ? नाहीतरी अल्बम नंतर पडूनच राहणार आहे त्यापेक्षा दुसरीकडे पैसे खर्च करा” असे डायलॉग सर्रास कानावर पडतात . पण लग्न झाल्यावर जेव्हा हाच अल्बम कित्येक वर्षांनी आपण उघडून पाहतो तेव्हा ते अनमोल क्षण पुन्हा जगताना किती आनंद मिळतो , हा आनंद पैशांत मोजता न येण्यासारखाच आहे . आपण लग्नासाठी कित्येक वायफळ गोष्टींवर खर्च करतो पण आठवणी जपून ठेवण्यासाठी थोडे अधिक पैसे खर्च केले तर ? ही कल्पना नक्कीच चांगली असेल . आता हा वेडिंग अल्बम निवडायचा कसा ? हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्यासमोर असेल म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणलाय हा खास व्हिडिओ ज्याच्या मदतीनं वेडिंग अल्बम कसा निवडायचा ? त्यासाठी किती पैसे खर्च करायचे ? कोणत्या प्रकारचा अल्बम दीर्घकाळ टिकतो ? यासारख्या तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहा आणि हो तुमच्या ओळखीच्या मित्र मैत्रिणींचं लग्न होत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका !
1
शुक्रवारी समिट अटेंप्टला रवाना व्हायचे असल्यामुळे वेगळाच उत्साह होता . मध्यरात्री दीड वाजता निघायचे ठरले होते . त्यामुळे त्याआधी मी आणि विशाल कडुसकरने दोन - तीन तास विश्रांती घेतली . आम्ही टेंटमध्ये पाठ टेकली . आमच्या कुकने १२ . ३० वाजता नाष्टा तयार ठेवेन असे कळविले होते . त्यामुळे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उठलो . निघण्यापूर्वी बेस कँपवरील आमच्या टेंटमधील मंदीरात पुजा केली . त्यानंतर गणपती , स्वामी समर्थ , शंकर , देवी , दत्त यांची आरती केली . त्यानंतर उपमा आणि चहा घेतला . कुकने आम्हाला पॅक लँच दिले होते . त्यात उकडलेली अंडी आणि बटाट्याची भाजी होती . याशिवाय आमच्याजवळ चिक्की , ड्राय फ्रुट्स आणि चॉकलेट होती . निघण्यापूर्वी पुण्यातील काही जणांशी संपर्क साधला . आमच्या सॅक आधीच भरून तयार ठेवल्या होत्या . त्या घेऊन रवाना झालो . मध्यरात्री निघाल्यनंतर खुंबू आईसफॉल क्रॉस करायला आम्हाला साधारण साडेचार तास लागले . यानंतर आम्हाला कँप १ ऊन पडायच्या आत क्रॉस करायचा होता . वरच्या कँपला पहाटे साडे पाच - सहाच्या सुमारासच ऊन पडते . ऊन पडल्यानंतर बर्फ वितळू लागतो . त्यामुळे हिमनग किंवा हिमकडे कोसळण्याची शक्यता असते . मुख्य म्हणजे मार्गात लावलेल्या शिड्या , अँकर्स यांची पोझीशन सुद्धा हालते . आमची चढाई अगदी नियोजनानुसार झाली . आम्ही सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कँप १ला पोचलो . त्यानंतर आम्ही तेथे थोडा वेळ थांबलो . आम्ही अर्धा तास थांबलो . तेथे उपमा खाल्ला . आणखी अर्धा तास विश्रांती घेतली . मग पुढील चढाई सुरु केली . कँप २ला दुपारी १२ पर्यंत पोचायचे नियोजन होते . कँप १ ते कँप २ या मार्गात सपाट जागा आहे . चढाई नसली तरी हा टप्पा सोपा नक्कीच नाही . कँप १ ची उंची ५९०० , तर कँप २ ची उंची ६३०० - ६४०० मीटरपर्यंत आहे . तुम्ही कँप २ ला तुमचा टेंट कुठे लावता यानुसार ही उंची बदलते . कँप १ला तुम्ही पोचता आणि कँप २च्या दिशेने नजर टाकता तेव्हा तो आय - लेव्हलला वाटतो . याचा अर्थ हे अंतर सपाटच आहे असे वाटते . तांत्रिक चढाई नाही म्हणून हा मार्ग सोपा नक्कीच नसतो , हे मला आवर्जून सांगावेसे वाटते . चालायला सुरवात केल्यानंतर पहिल्या काही पावलांमध्येच ते तुमच्या लक्षात येते . तुम्ही अॅक्लमटाईज कसे झाला आहात यावर सगळी आगेकूच अवलंबून असते . जो कुणी या भागात जाऊन आला आहे त्यालाच या मार्गाची कल्पना येईल . तरी सुद्धा मी शब्दांत शक्य तेवढे वर्णन करायचा प्रयत्न करतो . कँप १ ते कँप २ यातील भागास वेस्टर्न कुम असे संबोधले जाते . डावीकडे एव्हरेस्टचा पश्चिम भाग ( वेस्ट शोल्डर ) , समोर ल्होत्से आणि उजवीकडे नुप्स्ते अशी तीन शिखरे आहेत . मध्ये ही जागा आहे . त्यात अनेक ठिकाणी क्रीव्हास म्हणजे हिमभेगा आहेत . खुंबू आईसफॉल आणि या मार्गातील हिमभेगांमध्ये फरक आहे . खुंबूत तुम्हाला बऱ्याचदा हिमभेगांची खोली दिसू शकते . इथे मात्र तसे नसते . याचे कारण या हिमभेगा फार खोल आहेत . नुसत्या डोळ्यांनी तुम्हाला दीड - दोनशे फूट खोलीचा अंदाज येऊ शकतो . कँप १ ते कँप २ या भागात बऱ्याच ठिकाणी रोप फिक्स झालेला नसतो . रुट ओपनिंग झाले म्हणजे शंभर टक्के रोप - फिक्सींग झाला असे होत नाही . ज्या भागात जास्तच हिमभेगा आहेत , तेथे रोप लावतात . इतर ठिकाणी तो नसतो . त्यामुळे अगदी ५० मीटर अंतर सुद्धा इकडे - तिकडे करून चालत नाही . याचे कारण अनेक हिमभेगा बर्फाखाली दडलेल्या असतात . त्यात हिडन क्रीव्हासेस असे संबोधले जाते . वरून त्यांचा अंदाज येत नाही . हा भाग तिन्ही बाजूंनी पर्वतांनी वेढलेला असल्यामुळे ढग आले किंवा वारा वाहू लागला तर लगेच तापमान खाली येते . हेच हवा कमी असल्यामुळे तेथे उष्णता सुद्धा निर्माण झालेली असते . गिर्यारोहकांच्या भाषेत तेथील वातावरण सोलर कुकरसारखे असते . २०१२ मधील मोहीमेच्यावेळी अॅक्लमटाईज होताना याच भागात नुप्त्सेवरून हिमकडा कोसळला होता . अलिकडे इतका मोठा हिमप्रपात झाल्याचे ऐकले नाही . या भागाचे आणखी एक आव्हान म्हणजे अंतिम चढाईच्यावेळी तुम्ही कँप १ ते कँप २ हा टप्पा थेट पूर्ण करता . यास डायरेक्ट मुव्हमेंट असे संबोधले जाते . अंतिम चढाईच्यावेळी कँप २ हा बेस कँपसारखा वापरला जातो . बेस कँप ते कँप २ ही चढाई साधारण बारा तासांची असते . कँप २ चे लोकेशन खडकाळ ( रॉकी ) असते . आम्ही घालतो ते बूट आणि क्रम्पॉन्स हे बर्फाळ भागासाठी अनुकूल असतात . त्यामुळे खडकाळ भाग येतो तेव्हा जपून चालावे लागते . आम्ही बेस कँप ते कँप 2 हे अंतर दहा तासांत पोचलो . माझ्याबरोबर दोर्ची शेर्पा , तर विशालबरोबर लाक्पा नोर्बू हा शेर्पा आहे . ( क्रमशः )
2
नाटक हे प्रेक्षकांचे मनोरंजन जरी करत असलं तरी ते मनोरंजन करणारे कलाकारही शेवटी माणूस असतात . त्यांनाही भावना असतात . पण कधी कधी कठीण प्रसंगातही ते फक्त नाटकाच्या प्रेमासाठी कसे सारं काही विसरुन जातात याचाच एक अनुभव सांगितलाय अभिनेता सुयश टिळक याने . . कोल्हापुरला आमचा स्ट्रॉबेरीचा प्रयोग होता . त्या दिवशी आम्ही गोव्यावरुन कोल्हापुरला जाणार होतो . मी माझी गाडी घेऊन पुढे आलेलो तर बाकीचे कलाकार मागच्या गाडीने येत होते . मी गोव्यावरुन थोडा लवकर निघालो होतो त्यामुळे मी कोल्हापुरला आधीच पोहोचलो . पण मागच्या गाडीला यायला वेळ लागल्यामुळे प्रयोग सुरु करायला आम्हाला अर्धा तास उशिर होणार होता . प्रेक्षकांनीही सहकार्य केले . तेही तेवढा वेळ थांबून होते . थोड्या वेळाने प्रयोग सुरुही झाला , प्रयोग रंगात असताना अचानक स्पॉटची काच तडकली आणि ती काच सरळ खाली पडली . खाली सतरंजी असल्यामुळे आणि काच गरम असल्यामुळे आग लागते का अशी भीती मला वाटत होती . ती काच फार गरम होती , पण त्याने आग लागू नये या भीतीने मी ती काच उचलली आणि विंगेत फेकली . त्यामुळे माझा हात फार भाजला होता . त्यावेळी मी आणि सुरुची दोघंच सेटवर होतो . आम्ही प्रयोग न थांबवता तो तसाच सुरु ठेवला होता पण मला आतून फार दुखत होतं . गरम काच उचलल्यामुळे माझी बोटं सुजली होती . सुरुचीने तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पटकन पाण्याचा पेला आणला आणि त्यात मी माझी बोटं बुडवून तो प्रयोग न थांबवता पूर्ण केला होता . तर दुसरीकडे महाडला प्रयोग सुरु करण्याच्या काही मिनिटं आधी मला अश्विनी एकबोटे यांचे निधन झाल्याची बातमी कळली होती . तिच्या अचानक जाण्यामुळे मी फारच हादरलो होतो . मी ढसाढसा रडत होतो . मी तो प्रयोग करु शकेन की नाही हेही मला माहित नव्हते . प्रयोग सुरु असतानाही मला काही आठवत नव्हतं , त्यामुळे प्रयोग पूर्ण होईल की नाही हेही मला कळत नव्हते . अनेकदा असेही झाले होते की मला पुढची वाक्य आठवत नव्हती . तेव्हा सुरुची सांभाळून घेत होती . तो प्रयोग जेव्हा संपला तेव्हा मी रुममध्ये जाऊन फार रडलो . मी नंतर प्रयोगामध्ये केलेल्या चुकांबद्दल प्रत्येकाची माफीही मागितली . पण प्रेक्षकांना त्या दिवशीचा प्रयोग फार आवडला होता . या प्रसंगातून मला असा अनुभव मिळाला की , एकदा का तुम्ही रंगमंचावर गेलात की ते एक वेगळंच जग असतं . तो रंगमंच तुम्हाला खूप काही शिकवत असतो . शब्दांकन - मधुरा नेरूरकर madhura . nerurkar @ indianexpress . com
0
फेसबुक आपल्या आयुष्याचा जणू एक भागच बनला आहे . काहिंची दिवसाची सुरुवात फेसबुकच्या दर्शनाने होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . सोशल मीडिया फ्रेंडली एखादा व्यक्ती दिवसातून किमान दहावेळा तरी फेसबुकवर लॉगिन करतो . तर कित्येक जण असे असतात की ते दिवसातून जे जे काही करतील त्याच्या सगळ्या अपडेट्स फेसबुकवर टाकत असतात . नुकतेच एक संशोधन समोर आले आहे . यानुसार जर एखाद्याच्या पोस्टवर दिवसांतून त्या युजर्सच्या जवळच्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर त्यांच्या दैंनदिन जीवनात याचा खूप मोठा फरक पडू शकतो . जवळच्या किंवा आवडत्या व्यक्तीच्या दिवसातील दोन कमेंट देखील फेसबुक युजर्सच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो . हा फंडा गरोदर महिला आणि लग्न होणा - यांना जास्त लागू होऊ शकतो असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे . कारनेगी मेलान यूनिवर्सिटीने केलेल्या संशोधनात हे समोर आले आहे . कंप्युटर मेडिटेड कम्युनिकेशनकडून या संशोधनासंबधिताच प्रबंध प्रकाशित करण्यात आला . जगभरातल्या ९१ देशातील जवळपास दोन हजार युजर्सना घेऊन काही संशोधन करण्यात आले आणि त्यांच्यावर जवळपास ३ महिने अभ्यास करण्यात आला त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला . गरोदर महिला किंवा नवीन लग्न ठरलेल्यांनी जर फेसबुकवर काही पोस्ट टाकली आणि त्यावर आवडत्या व्यक्तींकडून कमेंट आल्या तर साहजिक त्यांच्या चेह - यावर हसू येते . आपली आवडती व्यक्ती आपल्यासाठी वेळ देते किंवा आपल्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळे अशा युजर्सच्या मानसिकतेत हळूहळू सकारात्मक बदल होतात . हे बदल आपसूकच त्यांची चिडचिड , एकटेपणा , ताण दूर करतात . जर अशा जवळच्या व्यक्तींकडून दिवसांतून दोन कमेंट म्हणजे महिन्याला ६० कमेंट आल्या तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच चांगले बदल घडलील असा निष्कर्ष यातून काढला आहे . पण याच बरोबर पोस्ट लाईक केल्याने मात्र फारसा काही फरक पडत नाही असेही यात सांगितले आहे .
1
क्रोनिक फटिक सिंड्रोम किंवा गल्फ वॉर इलनेस या दोन शारीरिक व मानसिक ताणाशी निगडित रोग लक्षणसमूहांमध्ये मानसिक कारणे नसून मेंदूतील बदल कारणीभूत आहेत , असे नवीन संशोधनात दिसून आले आहे . आतापर्यंत हे दोन्ही लक्षण समूह हे निव्वळ मानसिक समजले जात होते ; पण ते मेंदूतील रेणूंच्या रचनेत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात असे आता दिसून आले आहे . या दोन्ही रोगांत झोप बिघडते , घसा धरतो , हातपाय व डोके दुखत राहते , व्यायामानंतर थकवा येतो , स्नायू सतत कसर लागल्याप्रमाणे दुखत राहतात , ताण जाणवतो तसेच बोधनशक्ती राहत नाही . नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासात असे म्हटले आहे , की क्रोनिक फटिक डिसॉर्डर हा मानसिक आजार नाही , त्यात रुग्णाच्या विचारांचा व मानसिकतेचा काही संबंध नसतो . या आजारावर अद्याप उपाय सापडलेला नाही व त्याची कारणेही माहिती नाहीत , पण आता मेंदूतील रेणवीय फरकांमुळे हा रोग होत असल्याचे सूचित होत आहे . त्यामुळे अमेरिकेतील ८३६००० ते २५ लाख लोकांसाठी आशेचा किरण आहे . भारतातही याचे अनेक रुग्ण असून या रोगाचे निदान करणे अवघड असते . आखाती युद्धातून परतलेल्या १७५००० लोकांच्या अभ्यासातून असे निष्पन्न झाले , की मेंदूतील बदलांमुळे हा आजार होतो . जॉर्ज टाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ . जेम्स एन बरानिक यांनी सांगितले , की या दोन्ही रोगांतील लोकांचा रक्तद्रव तपासला असता त्यात फरक दिसून आला . स्थिर सायकल चालवणे व इतर व्यायामातून यात फायदा होऊ शकतो . मेंदूचा एमआरआय केला असता रोगात मेंदूत होणारे बदल दिसून येतात . फिजिओथेरपीचाही यात उपयोग होतो . व्यायामानंतर प्रथिनांचे नियंत्रण करणाऱ्या मायक्रोआरएनएचे प्रमाण बदलते , त्यामुळे हा रोग होतो . या रोगांमध्ये मेंदूत होणारे बदल हे अल्झायमर , डिमेन्शिया व नराश्यापेक्षा वेगळे असतात .
1
माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांची सूचना भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी गमावणाऱ्या भारताने भविष्यात जागतिक दर्जाचे ड्रॅग - फ्लिकर्स घडवण्याची नितांत आवश्यकता आहे , अशी प्रतिक्रिया माजी हॉकीपटू दिलीप तिर्की यांनी रविवारी व्यक्त केली . विश्वचषक हॉकी स्पध्रेत यजमान भारताला उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून २ - १ असा पराभव पत्करावा लागला . रुपिंदर पाल सिंगच्या अनुपस्थितीत हरमनप्रीत सिंग , अमित रोहिदास व वरुण कुमार यांनी भारतासाठी ड्रॅग - फ्लिकर्सची भूमिका बजावली . मात्र त्यांना फक्त सरासरी ३० . ७ टक्क्यांपर्यंतच मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले . दक्षिण आफ्रिकेविरुद्धदेखील भारताला पाचपैकी तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले . भारताच्या कामगिरीचे विश्लेषण करताना तिर्की म्हणाले , ‘‘आपल्याला अव्वल दर्जा असलेल्या ड्रॅग - फ्लिकर्सची गरज आहे . सध्या भारताच्या ताफ्यात हरमनप्रीत , अमित व वरुण हे तीन ड्रॅग - फ्लिकर्स असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे . महत्त्वाच्या सामन्यांत भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सरासरी ६० ते ७० टक्क्यांपर्यंत उंचावली पाहिजे . ’’ ‘‘भारतीय संघातील अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या लैकिकास साजेसा खेळ केला नाही , असे मला वाटते . मात्र संघाची कामगिरी उत्तम होती . बचावफळीने विशेषतः सर्वाना प्रभावित केले , पण दुर्दैवाने उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा ओलांडण्यात आपण अपयशी ठरलो . त्यामुळे माझ्या मते तरी आपण विश्वचषक गमावलाच , ’’ असेही तिर्की म्हणाले . याव्यतिरिक्त युवा खेळाडूंचा भरणा असूनदेखील बलाढय़ बेल्जियमला २ - २ असे बरोबरीत रोखणे भारतासाठी स्पर्धेतील सर्वोत्तम क्षण होता , असे तिर्की यांनी नमूद केले . हरेंद्र सिंग हे सर्वोत्तम प्रशिक्षक ! तिर्की यांनी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या कामगिरीचीसुद्धा प्रशंसा केली असून ते भारताला लाभलेले सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत , असे तिर्की म्हणाले . ‘‘हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स करंडकात उपविजेतेपद मिळवले , तर विश्वचषकातदेखील समाधानकारक कामगिरी केली . हरेंद्र यांच्यामुळे प्रशिक्षणाचा स्तर उंचावला असून यासाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे , ’’ असे तिर्की म्हणाले .
2
डेव्हिड वॉर्नरच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११७ धावांनी दणदणीत विजय मिळवला . या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश साकारले . नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . मालिकेत भन्नाट सूर गवसलेल्या वॉर्नरने सहकारी नियमित अंतरात बाद होत असतानाही एकेरी , दुहेरी धावांबरोबरच चौकारांची लूट केली . अन्य फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी धडपडत असताना वॉर्नरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत खेळ केला . मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर चौकार खेचत वॉर्नरने एकदिवसीय प्रकारातील अकराव्या तर यंदाच्या कॅलेंडर वर्षांतील सातव्या शतकाची नोंद केली . एका कॅलेंडर वर्षांत एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक शतकांच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची वॉर्नरने बरोबरी केली . मात्र यंदाच्या वर्षांतला ऑस्ट्रेलियाचा हा शेवटचा एकदिवसीय सामना असल्याने वॉर्नरला तेंडुलकरचा विक्रम मोडता येणार नाही . सलामीला येत संपूर्ण डाव खेळून काढण्याचा विक्रम नावावर करण्याची वॉर्नरला संधी होती . मात्र डावातील शेवटच्या चेंडूवर वॉर्नर धावचीत झाला . त्याने १३ चौकार आणि ४ षटकारांसह १५६ धावांची मॅरेथॉन खेळी केली . वॉर्नरचा दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला २६४ धावांचीच मजल मारता आली . न्यूझीलंडतर्फे ट्रेंट बोल्टने ३ बळी घेतले . प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जराही प्रतिकार न करता सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव १४७ धावांतच संपुष्टात आला . मार्टिन गप्तीलने सर्वाधिक ३४ धावा केल्या . ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले . या मालिकेत २९९ धावा करणाऱ्या वॉर्नरला सामनावीर तसेच मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले . संक्षिप्त धावफलक
2
आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल , तर त्याला चांगली झोप हवीच . दीर्घकाळ निद्रानाशाचा विकार असेल तर त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी निगडीत विकार होण्याची शक्यता असल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे . आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं . हलक्या झोपेपासून गाढ झोपेपर्यंत आणि नंतर पुन्हा हलक्या झोपेकडे . आपलं शरीर गाढ झोपेच्या टप्प्यात शिरण्यासाठी स्वतःला सज्ज करतं , तेव्हा हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो . याच काळात आपलं शरीर इंद्रियांना आवश्यक असलेली विश्रांती देऊन स्वतःला पुन्हा ताजंतवानं करतं . येणारा दिवस आपण चांगल्या पद्धतीने सक्रिय राहावे यासाठी रक्तदाब आणि हृदययाची गती कमी होणं आवश्यक असतं . मात्र गाढ झोपेच्या टप्यात झोपमोड झाली तर हृदयाच्या विश्रांतीचा काळ कमी होतो . पुरेशी झोप न मिळाल्यास निद्रेला तिच्या या महत्त्वाच्या टप्प्यांतून जाण्यासाठी वेळ मिळत नाही . यामुळे तुम्ही झोपेत असताना तुमच्या आरोग्याची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरू असते त्यात बाधा येते . पुरेशी झोप झाली नाही तर शरीरात जळजळ वाढते . याची परिणती गंभीर स्वरूपाच्या हृदयाच्या तक्रारींमध्ये होऊ शकते . याशिवायही अनेक समस्या उद्भवतात . सतत झोप न मिळणे किंवा पुरेशी झोप न झाल्याने दिवसा तणावाचा सामना करावा लागतो , वाढत्या तणावाला प्रतिक्रिया देत राहिल्याने तसेच चिंतेमुळे शरीरात अतिरिक्त कार्टिसोल हार्मोनची निर्मिती होते . हा हार्मोन , तणावाचा हार्मोन म्हणूनही ओळखला जातो . तुम्हाला रात्री नीट झोप लागत नाही , तेव्हा तुम्हाला दिवसभर झोप येत राहते . अनेक दिवस झोप अपुरी राहिल्यास एक कायमची आळशी भावना मनात निर्माण होते आणि त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते . याउलट नियमित व्यायाम केल्याने कोलस्टेरॉलची पातळी कमी होते , रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो . काय उपाय कराल ? दिनक्रमाचे पालन कराः तुमच्या झोपेच्या वेळेनुसार वेळापत्रक निश्चित करा आणि त्याचे पालन करा . फोन , गॅझेट्स किंवा रात्री उशिराच्या टीव्ही मालिकांसारखी प्रलोभनं दूर ठेवा . वेळेवर आणि चांगल्या झोपेची सवय लावून घेण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करा . व्यायामः कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल शरीरासाठी चांगली , हे तर सर्वांना माहीत आहेच . कार्डिओ व्यायाम आठवड्यातून किमान चार वेळा किंवा एक दिवसाआड करा . जॉगिंग , पोहणे , सायकलिंग आणि साधे चालणे यांसारखे कार्डिओ व्यायाम तुमच्या हृदयाची गती वाढवून त्याचे कार्य चांगले राहण्याची काळजी घेतात . निद्रातज्ज्ञाचा सल्ला घ्याः एवढे करूनही तुम्हाला झोपेसंबंधीत अडचणी असतील आणि तुम्हाला हृदयविकाराचा धोका असल्याची काळजी सतावत असेल , तर निद्रातज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या . तुम्हाला रात्री नक्की कोणती गोष्ट जागं ठेवते हे कदाचित डॉक्टरांशी बोलल्याने समजू शकेल . डॉ . प्रीती देवनानी , स्लीप थेरपिस्ट , स्लीप @ 10 – आरोग्य जागरूकता उपक्रम
1
१ . दूषित पाण्यापासून होणाऱ्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी , घातक जीवजंतू नाहीसे करण्यासाठी , १ लिटर पाण्यात ३ - ४ थेंब क्लोरीन घाला . २ . सरबत किंवा ताक करणार असाल तर त्यासाठी उकळलेलं पाणी वापरा . ३ . पावसाळ्यात पचनशक्ती कमी झाल्यामुळे काही जणांना दूध पचत नाही , त्यांनी ताक किंवा दही घ्यावं . दही बनताना दुधामधील लॅक्टोजचं लॅक्टीक अॅसिड बनतं , ते पचायलाही हलकं असतं . ४ . पचनाचा त्रास असणाऱ्यांनी कच्चे सालाड न खाता ते वाफवून घ्यावे . त्यामुळे पचायला सोपे तर होतेच पण पावसाळ्यामुळे भाज्यांमध्ये असणारे जंतू मरण्यासही मदत होते . ५ . कडधान्य शक्यतो दुपारच्या आत खावीत , रात्री टाळावीत . वाफवून घेतल्यास उत्तम . डाळींमध्ये मूग डाळ पचायला हलकी असते . ६ . आहार योग्य प्रमाणातच घ्या , पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नका . ७ . आवश्यक तेवढंच अन्न शिजवा . उरलेलं अन्न लवकर खराब होऊ शकतं . शिजवून ठेवलेलं खायची वेळ आली तर गरम करून , उकळवून घ्या . ८ . शिजलेले पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवा , नाहीतर माशा बसून दूषित होतील . ९ . घराबाहेर खायची वेळ आली तर असं हॉटेल निवडा जिथे दर्जा , स्वच्छता पाळली जाते . बाहेरील पदार्थ स्वतःच्या नजरेसमोर शिजवलेले , उकळलेले किंवा परतलेले असावेत . पनीर काठी रोल साहित्य : गव्हाचं पीठ - दीड वाटी , ड्राय यीस्ट - १ चमचा , साखर - अर्धा चमचा , पनीर - दीड वाटी , कांदा - बारीक चिरून - अर्धी वाटी , सिमला मिरची - बारीक चिरून अर्धी वाटी , हिरवी मिरची - चिरून २ , लसूण - चिरून ४ पाकळ्या , कोथिंबीर - चिरून अर्धी वाटी , तेल - २ चमचे , मीठ - चवीनुसार . कृती : ४ चमचे कोमट पाण्यात , १ / २ चमचा साखर , १ / २ चमचा मीठ , यीस्ट घालून १५ - २० मिनिटे झाकून ठेवावे . नंतर कणकेमध्ये यीस्ट मिसळून भिजवून ठेवावे . दीड ते दोन तासांनी पीठ व्यवस्थित फुगेल . त्याच्या ५ पोळ्या , पातळसर लाटून भाजून घ्याव्यात . पनीरच स्टफींग करण्यासाठी पॅनमध्ये तेलात कांदा , हिरवी मिरची , परतून घ्यवी . गुलाबी रंग आल्यावर , सिमला मिरची परतून घ्यावी . लसूण घालावा . पनीर किसून / कुस्करून घ्यावं . तेही परतावं . २ - ३ मिनिटं परतून कडेने तेल सुटायला लागल्यावर मीठ घालावं . ढवळून gas बंद करून , कोथिंबीर घालून ढवळावं . काठी रोल सर्व्ह करताना , पोळीमध्ये पनीरचं स्टफींग भरून रोल करून मग सर्व्ह करावा . गार्निशिंग साठी सिमला मिरची आणि कांद्याच्या रिंग्स वापराव्यात . चटपटीतपणा वाढवायचा असेल तर , रोलमध्ये स्टफींग भरण्याआधी पुदिन्याची चटणी / टोमाटो सॉस पोळीला लावू शकता . * पावसाळ्खयात खमंग , पौष्टिक , चविष्ट लागणारे रोल कमीतकमी तेलात होत असल्याने आरोग्यदायीही असतात . * पनीर आणि भाज्यांमुळे प्रोटीन्स , व्हिटामिन , मिनरल्स मिळतात . यीस्ट मधून व्हिटामिन B 6 मिळतं . सुकेशा सातवळेकर , आहारतज्ज्ञ
1
चेन्नई कसोटीत मोईन अलीचे दमदार शतक आणि जो रुटची ८८ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडचा डाव सावरला असून संघाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडला ४ बाद २८४ धावा केल्या आहेत . इंग्लंडकडून बेअरस्टो यानेही ४९ धावांचे योगदान दिले . सामन्याचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता . पण सलामीजोडी स्वस्तात तंबूत परतल्याने इंग्लंडची सुरूवात निराशाजनक झाली . चेन्नई कसोटीत संधी देण्यात आलेल्या इशांत शर्मा याने भारताला पहिले यश मिळवू दिले . शर्माने इंग्लंडच्या जेनिंग्स याला यष्टीरक्षक पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले . त्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याला स्लिपमध्ये झेलबाद केले होते . विराट कोहलीने स्लिपमध्ये कुकचा अप्रतिम झेल टीपला . सलामीचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुट याने मैदानात जम बसवून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यास यश देखील आले . जो रुट याने मोईन अलीच्या साथीने तिसऱया विकेटसाठी शतकी भागीदारी रचली . उपहारापर्यंत इंग्लंडची सलामी जोडी तंबूत दाखल झाली असून केवळ ६८ धावा करता आल्या होत्या . दुसऱया सत्रात जो रुटने चांगली फलंदाजी केली . जो रुटने १० चौकारांच्या साथीने ८८ धावांची खेळी साकारली . पण जडेजाच्या गोलंदाजीवर स्विप शॉट खेळताना जो रुटच्या बॅटला कट लागून पार्थिव पटेलने झेल टीपल्याची अपील भारतीय संघाने केली होती . मात्र पंचांनी नकार दिला होता . मग भारतीय संघाने डीआरएस प्रणालीची मदत घेतली . डीआरएस पद्धतीनुसार तो बाद असल्याचे ठरविण्यात आले , पण पंचांच्या निर्णयावर जो रुटने यावेळी नाराजी व्यक्त केली . जो रुट बाद झाल्यानंतर मोईन अलीने धुरा सांभाळत मैदानात जम बसवला . दिवसाच्या तिसऱया सत्रात मोईन अलीने आपले शतक देखील पूर्ण केले . बेअरस्टोने मोईन अलीला चांगली साथ दिली . पण तो ४९ धावांवर जडेजाच्या फिरकीवर झेलबाद झाला . अशाप्रकारने निराशाजनक सुरूवातीनंतर इंग्लंडला दिवसाच्या अखेरीस ४ बाद २८४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारताल आली आहे . मोईन अली नाबाद १२० धावांवर , तर बेन स्टोक्स नाबाद ५ धावांवर खेळत आहेत . भारताकडून जडेजाने तीन , तर इशांत शर्माने एक विकेट घेतली . भारताने मालिका ३ - ० अशी खिशात घातली असली असून चेन्नई कसोटी जिंकून इंग्लंडला व्हॉईटवॉश देण्याचा भारताचा इरादा आहे . ‘वर्दा’ चक्रीवादळाच्या आव्हानाचा मुकाबला करणाऱ्या चेन्नई शहरात दाखल झालेल्या इंग्लंडच्या संघाने भारतीय वादळाचाच विलक्षण धसका घेतला आहे . मालिकेतील पाचवी आणि अखेरची कसोटी जिंकून भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे . या विजयानिशी भारत सलग १८व्या कसोटी सामन्यात अपराजित राहण्याची किमया साधू शकेल . cricket scores , India vs England : दिवसभरातील अपडेट्स
2
गुगलने आपलं लोकप्रिय मेसेजिंग अॅप Allo बंद करण्याची घोषणा केली आहे . सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने हे अॅप लाँच केलं होतं . मात्र अपेक्षेऐवढी लोकप्रियता या अॅपला न मिळाल्याने कंपनीने हे अॅप बंद करण्याची घोषणा केली आहे . मार्च 2019 पर्यंत Allo बंद होईल . या अॅपमुळे बरंच काही शिकायला मिळालं , असं गुगलने एका ब्लॉगमध्ये म्हटलं आहे . यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच कंपनीने या अॅपमध्ये गुंतवणक करणं बंद केलं होतं , याऐवजी इतर प्रोजेक्ट्सवर कंपनीने जास्त भर दिला होता . मध्यंतरी काही नवीन फिचर्स कंपनीने या अॅपसाठी आणले होते , मात्र तरीही व्हॉट्सअॅपशी टक्कर देण्याऐवढी याची लोकप्रियता या अॅपला कधीही मिळाली नाही . यामध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचर दिलं नाहीये , याशिवाय फाइल शेअरिंग फिचरही देण्यात आलं नव्हतं . अॅलो अॅपद्वारे फोटो , लोकेशन आणि स्टिकर्स पाठवता येत होते मात्र , डॉक्युमेंट्स शेअर करता येत नव्हते . दुसरीकडे व्हॉट्स अॅपमध्ये ही सर्व फिचर्स बरीच लोकप्रिय आहेत .
1
विम्बल्डन ओपन स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे . जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राफेल नदालला विम्बल्डनची हिरवळ तितकीशी मानवत नाही . मात्र तरीही त्याच्या नावावर विम्बल्डनची २ विजेतेपद जमा आहेत . नदालप्रमाणेच प्रत्येक टेनिसपटूला चाहत्यांच्या अनेक विचित्र मागण्यांना सामोरं जावं लागतं . सामना संपल्यानंतर आपल्या आवडत्या खेळाडूची सही घेण्यासाठी चाहते झुंबड करत असतात . नदालने आपल्या एका चाहत्याच्या चक्क शरिरावर ऑटोग्राफ दिली आहे . मात्र विम्बल्डनमधला आपला दुसरा सामना संपल्यानंतर नदालला चाहत्याच्या विचित्र मागणीला सामोरं जावं लागलं . अमेरिकेच्या डोनाल्ड यंगवर मात केल्यानंतर मैदानाबाहेर पडताना स्टेडियममध्ये बसलेल्या एका चाहत्याने आपल्या कृत्रिम पायावर सही मागितली . नदालनेही फार आढेवेढे न घेता त्या चाहत्याच्या कृत्रिम पायावर सही केली . सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नदाल म्हणाला , ”मी मैदान सोडत असताना ‘तो’ आधीपासूनच आपला कृत्रिम पाय काढून माझ्या ऑटोग्राफची वाट बघत होता . त्यामुळे मी त्याला नकारही देऊ शकलो नाही . ” मात्र यापेक्षाही अनेक विचित्र मागण्यांना आपण सामोरे गेल्याचं नादालने कबूल केलं . यावरुन चाहत्यांचं खेळाडूंवर असलेल्या प्रेमाविषयी आपल्याला कल्पना येतच असेल .
2
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेला इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्याने सुरवात होईल . हा सामना ३० मे रोजी ओव्हलवर होईल . अंतिम सामना १४ जुलैस लॉर्डसवर खेळविण्यात येईल . ऑस्ट्रेलिया विजेतेपद टिकविण्याच्या मोहिमेस १ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध सुरवात करेल . माजी विजेते पाकिस्तानची सलामी वेस्ट इंडिजसी ( ३१ मे २०१९ ) होईल . भारताचा पहिला सामना ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेशी होईल . पारंपिरक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना १६ जून रोजी ओल्ड ट्रॅफर्डवर होईल . आफ्रिका ९ जून - वि . ऑस्ट्रेलिया १३ जून - वि . न्यूझीलंड १६ जून - वि . पाकिस्तान २२ जून - वि . अफगाणिस्तान २७ जून - वि . वेस्ट इंडीज ३० जून - वि . इंग्लंड २ जुलै - वि . बांगलादेश ६ जुलै - वि . श्रीलंका
2
त्यांनी कथ्थक , भरतनाटय़म्चे प्रशिक्षण घेतले होते . नृत्याचे कार्यक्रमही त्या करत होत्या . सितारादेवी , गोपीकृष्ण , मंजुश्री बॅनर्जी , रोशनकुमारी यांच्याप्रमाणे त्यांना शास्त्रीय नृत्यांगना व्हायचे होते . पण नियतीने त्यांच्या बाबतीत काही वेगळेच योजिले होते . पुढे नृत्य सुटले ते सुटलेच . मराठी रंगभूमी व चित्रपटातून त्यांचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले . सोज्वळ , शालीन चेहरा आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व लाभलेल्या व मराठी रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळविलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे - नाईक आजच्या ‘पुनर्भेट’च्या मानकरी आहेत . नियती काही गोष्टी ठरवते आणि त्या तशाच घडतात . जे घडायचे ते घडते . नियतीवर त्यांचा विश्वासही आहे . नृत्याचे शिक्षण घेतले असल्याने केवळ नृत्याचे कार्यक्रम करायचे . रंगभूमी किंवा चित्रपटात काम करायचे नाही असे त्यांनी ठरविले होते . पण पुढे याच नियतीमुळे ‘अभिनय’ हाच त्यांचा श्वास बनला . आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या . त्यांचा जन्म गडहिंग्लजचा . वडील रामकृष्ण ऊर्फ रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते . शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली . आई , वडील , मोठा भाऊ , धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब . रत्नागिरी , पाली , भोर , पुणे , कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले . शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या . लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच . नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे ( भरतनाटय़म् , कथ्थक ) धडे घेतले . आठ - दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत . आईचे मामा आप्पासाहेब इनामदार ( अभिनेते प्रकाश इनामदार हे आशा काळे यांचे मामेभाऊ ) यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले . त्या वेळच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले , माझ्या वडिलांना ज्योतिषाचीही थोडी जाण होती . माझा जन्म अमावास्येचा आणि शनिवारचा . त्यामुळे आई , घरचे काही नातेवाईक आणि परिचित यांच्यात माझ्या भविष्याबाबत चर्चा व्हायची . वडिलांनी माझी पत्रिका मांडून ही कलाकार होणार असे भविष्य तर जोशी नावाच्या आमच्या परिचित विद्वान गृहस्थांनी ‘अमावास्येची पोर सर्वाहुनी थोर’ असे माझ्याबद्दल सांगितले होते . घरातील वातावरण बाळबोध असल्याने नाटक , चित्रपटात काम करणे हा दूरचाच भाग होता . पण म्हणतात ना नियती काही ठरविते आणि तसे घडते . माझ्याही बाबतीत तेच झाले . १९६२ मध्ये भारत - चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही . शांताराम , बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती . या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते . माझ्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय . पेंढारकर आमच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का ? असे विचारले . आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर मला नृत्य करायचे होते . आई - वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून मी काम केले . स्वतः बाबुराव पेंढारकर , बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते . माझे नृत्य झाले की मी विंगेत येऊन बसायचे आणि पुढचे नाटक पाहायचे . एका प्रयोगाच्या वेळी नाटकातील डोहाळजेवणाच्या प्रसंगात काम करणाऱ्या एक अभिनेत्री आल्या नाहीत . त्यामुळे ऐनवेळी केवळ गंमत म्हणून ते काम मी केले . त्यावेळी मी अवघी १४ / १५ वर्षांंची होते . त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले . माझ्यातील नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ( बाळ कोल्हटकर आणि बाबुराव पेंढारकर यांची भागीदारीतील ही संस्था होती ) ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली . पौगंडावस्थेतील नायिका मला त्यात साकारायची होती . माझ्यासाठी आणि आईसाठीही तो धक्काच होता . खरे तर मला नाटकात काम करायचे नव्हते . मुंबईला जाण्यापूर्वी मी आमच्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात गेले आणि देवीला त्यांनी मला नापास करू दे . तुला खडीसाखर ठेवेन’ , असे साकडे घातले . पण देवीने आणि नियतीने वेगळेच ठरविले असावे . ‘सीमेवरून परत जा’ नाटकातील नायिकेच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली . व्यावसायिक रंगभूमीवरचे ते माझे पहिले नाटक . याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते . नाटकात माझ्या नृत्यकलेला वाव मिळावा म्हणून दोन गाणीही होती . या नाटकापासून माझा रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला . पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक मिळाले आणि या नाटकाने मला ‘ताई’ अशी ओळख मिळाली . आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली . यात प्रामुख्याने ‘कलावैभव’ , ‘अभिजात’ , ‘नाटय़संपदा’ , ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे . ‘गहिरे रंग’ , ‘गुंतता हृदय हे’ , ‘घर श्रीमंतांचे’ , ‘देव दीनाघरी धावला’ , ‘लहानपण देगा देवा’ , ‘वर्षांव’ , ‘विषवृक्षाची छाया’ , ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके . ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५ , ‘गुंतता’चे ८७५ प्रयोग त्यांनी केले . रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला . भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट . ‘गनिमी कावा’ , ‘घर गंगेच्या काठी’ , ‘कैवारी’ , ‘हा खेळ सावल्यांचा’ , ‘सासुरवाशीण’ , ‘थोरली जाऊ’ , ‘ज्योतिबाचा नवस’ , ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ , ‘कुलस्वमिनी अंबाबाई’ , ‘चांदणे शिंपीत जाशी’ , ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’ , ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट . त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला . राज्य शासनाच्या व्ही . शांताराम , अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत . चित्रपट आणि नाटकांधील सोशीक , सहनशील मुलगी , सून , आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली . या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का ? यावर त्या म्हणाल्या , हो तसा प्रयत्न केला . ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’ , ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या . सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले . माझे कौतुक झाले . या भूमिकाही गाजल्या . वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक , सहनशील , सोज्वळ , सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या . अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही . जे घडायचे ते घडले . पण या सर्व भूमिका मी अक्षरशः जगले . त्या जिवंत केल्या . त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते . आई , ताई , मुलगी , सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे . माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे . नवरे , डॉ . काशिनाथ घाणेकर , वसंतराव जोगळेकर , विजया मेहता , सुलोचना दीदी आदी मान्यवरांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे . बाबुराव पेंढारकर यांच्यामुळे रंगभूमीवर आणि भालजी पेंढारकर यांच्यामुळे रुपेरी पडद्यावर माझा प्रवेश झाला . आशा काळे म्हणून मी आज जी काही आहे त्यात माझे सर्व दिग्दर्शक , लेखक , निर्माते , सहकलाकार आणि रसिक प्रेक्षकांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले . ‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या , दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला . त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला , हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते . खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता . पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले . दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले . तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले , अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते . तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते . ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा , ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा . श , स , ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते . आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची . दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले . या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले . संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा िंकंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती . ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात , पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण , स्पष्ट उच्चार कर असे सांगायची . आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला . नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणाल्या , बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते . पुढे आणखी काही वर्षांनी त्यांच्याच मोठय़ा चिरंजीवांबरोबर माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह होणार आहे , अशी तेव्हा कल्पनाही केली नव्हती . पण पुढे तसे झाले . लघुपट निर्माते - दिग्दर्शक माधव नाईक यांच्याबरोबर माझा विवाह झाला . म्हटले तर माझे लग्न उशिराच झाले . पण नाटय़ - चित्रपटातील यशस्वी प्रवासाप्रमाणेच माधवरावांसोबतचा माझा २५ वर्षांचा वैवाहिक जीवनाचा प्रवासही सुखाचा झाला . लग्नानंतरही त्यांच्यामुळेच मी नाटक - चित्रपटात काम करू शकले . माझे आई - वडील , भाऊ अनिल आणि पती माधवराव अशी माझी जीवाभावाची माणसे आज या जगात नाहीत . पण तितक्याच उत्कटतेने माझ्यावर प्रेम करणारी चांगली माणसे आजुबाजूला आहेत . रसिक प्रेक्षक आजही भरभरून प्रेम करतात . माझ्यासाठी हा खूप मोठा ठेवा आहे . वयाच्या ६५ व्या वर्षांत असलेल्या आशाताईंना आजही चित्रपट , मालिका यात काम करण्यासाठी विचारणा होते . त्या सांगतात , गेली बावन्न वर्षे मी या क्षेत्रात काम केले . जे मिळाले त्यात मी समाधानी आणि तृप्त आहे . थोडेसे वेगळे काही करावे , त्याला वेळ देता यावा त्यासाठी विचारणा झाली तरी नम्रपणे नाही म्हणते . ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर मी सध्या आहे . वृद्धाश्रम , मूकबधिर , मतिमंद मुलांच्या शाळा येथे मी जाते . कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटते . सगळ्यांशी बोलते . त्या भेटीतून लोकांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहून मिळणारे मानसिक समाधान खूप मोलाचे आहे . मला वाचनाचीही आवड असल्याने एकीकडे पुस्तकांचे वाचनही सुरू असते . या सगळ्यात खूप छान वेळ जातो . एक वेळ विष पचविणे सोपे आहे , पण यश पचविणे अवघड आहे . हे क्षेत्रच असे आहे की इथे जमिनीवरचे पाय हलतात . पण तू तुझे पाय कायम जमिनीवरच ठेव , असे माझी आई मला नेहमी सांगायची . आईचे ते वाक्य मी कायमचे मनावर कोरून ठेवले असल्याचे सांगत आशा काळे यांनी गप्पांचा समारोप केला .
0
OnePlus 6T Launch Event : वनप्लस कंपनी OnePlus 6 ची पुढील आवृत्ती OnePlus 6T भारतामध्ये लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे . गेल्या काही दिवसांपासून OnePlus 6T या फ्लॅगशिप फोनबद्दल अनेक माहिती समोर आली आहे . टेलिकॉम क्षेत्रातील जाणकरांच्या माहितीप्रमाणे OnePlus 6T हा फोन भारतामध्ये १७ ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे . OnePlus 6T लाँचिंगची कार्यक्रम पत्रिका लीक झाली . चीनमधील सोशल मीडियावर OnePlus 6T ची लाँचिंग पत्रिका लीक झाली आहे . यामध्ये कंपनीने नवी टॅगलाईन “Unlock The Speed” चा वापर केला आहे . इन - डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरककडे “Unlock The Speed” चा कल दिसून येतोय . कंपीनीने यामध्ये काही अमुलाग्र बदल केल्याचे बोलले जात आहे . OnePlus 6T या फोनचे काही फोटोही समोर आले आहेत . त्यानुसार फोनच्या मागील बाजूला तीन सेंसर आहेत . हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप फोन आहे . समोर आलेल्या फोटोनुसार , या फोनला मागील बाजूला तीन कॅमेरा आहेत . वनप्लसद्वारा जारी केलेल्या टीजरनुसार , OnePlus 6Tमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक नसेल . हा फोन यूएसबी टाइप - सी ईअरफोनसोबत येईल . OnePlus 6Tमध्ये वनप्लस 6 सारखे स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम असणार आहे . याशिवाय फोनमध्ये अँड्रॉइडचे 9.0 चे व्हर्जन अशेल . या फोनची किंमत अंदाजे ४० हजार रूपये असण्याची शक्यता आहे .
1
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकताच तिचा २४ वा वाढदिवस साजरा केला . बी - टाऊनमधल्या अनेक कलाकारांनी तिला आपआपल्या परिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . पण आलिया मात्र तिच्या कुटुंबात सहभागी होणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीत व्यग्र होती . आलियाने स्वतःसाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक मांजरीचे पिल्लू घेतले आहे . आलियाने पांढऱ्या रंगाच्या या मांजराच्या पिल्लासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत , कुटुंबातील नवीन सदस्य असा मेसेजही टाकला आहे . आलियाला पाळीव प्राणी फार आवडतात हे तर सर्वांनाच माहित आहे . त्यातही तिला मांजरींवर जास्त प्रेम आहे . आलियाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला मांजरींचे फोटो अधिक दिसतील . सध्या आलिया तिच्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे भलतीच खूश आहे . ‘बद्रीनाथ की . . ’ हा सिनेमा १०० कोटींच्या घरात पोहोचला आहे . ‘उडता पंजाब’ आणि ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली होती . उडता पंजाबमध्ये आलियाने एका बिहारी मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती . या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता . याशिवाय आलिया , अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ड्रॅगन’ या सिनेमात रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे . ‘ड्रॅगन’ सिनेमाच्या चित्रिकरणानंतर आलिया झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरूवात करणार आहे . यात आलियासोबत रणवीर सिंगची मुख्य भूमिका आहे .
0
पुढच्या माणसाला ठेच लागली , की मागचा माणूस शहाणा होतो व काळजीपूर्वक तो पाऊल टाकतो , असे आपण नेहमी म्हणत असतो . मात्र , आपल्या देशातील बॉक्सिंग संघटकांना याचा विसर पडला असावा . बॉक्सिंग क्षेत्राचे उच्चाटन होण्याची वेळ आली तरी ते आपापसात ठोसेबाजी करीत आहेत . आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने अंतिम मुदत दिल्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर नवीन संघटना स्थापन होत आहे . देशातील सर्व संघटकांनी मतभेद विसरून खेळाच्या हितासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे . बॉक्सिंग या खेळात ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट करण्याची भरपूर संधी उपलब्ध असते . पदके मिळविण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य आपल्या देशात विपुल प्रमाणात उपलब्ध आहे . विजेंदरसिंग व मेरी कोम यांनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे . या दोन्ही खेळाडूंनी बॉक्सिंग संघटनेकडून फारशी मदत न घेता हे यश मिळविले आहे . विजेंदर याच्याकडे आणखी एक ऑलिम्पिक पदक मिळविण्याची क्षमता निश्चित आहे . मात्र संघटनांमधील मतभेद व गलिच्छ राजकारणास वैतागूनच त्याने व्यावसायिक बॉक्सिंगचा रस्ता पकडला . मेरी कोम ही जगातील सर्वच क्रीडापटूंसाठी प्रेरणादायक खेळाडू मानली जाते . एकीकडे सांसारिक आघाडी सांभाळून तिने बॉक्सिंगचे करिअर केले आहे . दोन अपत्ये झाल्यानंतर तिने ऑलिम्पिक पदक मिळविले आहे . त्याखेरीज अनेक विश्वविजेतेपदे तिच्या नावावर आहेत . तिसरे अपत्य झाल्यानंतरही ती पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली आहे . आपल्या देशात मेरी कोम व विजेंदर यांच्यासारखेच कौशल्य असलेले अनेक खेळाडू आहेत , मात्र संघटनात्मक स्तरावर असलेले मतभेद व सत्तालोलुप वृत्तीमुळे या खेळाडूंचे कौशल्य मातीतच गाडले जात असते . राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत सर्वच स्तरांवर दोन - तीन संघटना कार्यरत आहेत . आपल्या देशात ‘एक खेळ एक संघटना’ हे तत्त्व सर्रासपणे पायदळी तुडविण्यात आले आहे . खेळाच्या व खेळाडूंच्या विकासापेक्षा स्वतःकडे आणि स्वतःच्या पाठीराख्यांकडे कशी सत्ता राहील याचाच विचार या संघटना करीत असतात . दुर्दैवाने भारतीय ऑलिम्पिक महासंघ व राज्य स्तरावरील संघटना आपण कोणत्या संघटनेस पाठिंबा द्यायचा याच्याच संभ्रमात पडलेल्या आढळतात . या संघटकांच्या गोंधळात खेळाडूंची मात्र ससेहोलपट होताना दिसते . आपण कोणत्या संघटनेकडे सदस्य व्हायचे , हा प्रश्न खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना नेहमीच पडत असतो . अंतर्गत कलह हा तर आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रास असलेला शापच आहे . बॉक्सिंग क्षेत्र त्याला अपवाद नाही . गेली अनेक वर्षे मोठय़ा प्रमाणावर भांडणे सुरू आहेत . मात्र २०१२ मध्ये त्याची तीव्रता एवढी वाढली की , आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतीय बॉक्सिंगवरच बंदीचा बडगा आणण्याचा इशारा दिला . २०१२ मध्ये राष्ट्रीय संघटनेच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यानंतर आंतरराष्ट्रीय महासंघाने त्या संघटनेची मान्यता काढून घेतली व नव्याने संघटना स्थापन करण्याचे आदेश दिले . त्यानंतर बऱ्याच मेहनतीने नवीन संघटना उभी राहिली ; तथापि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध बंडाळीचे निशाण उभे राहिले . वैयक्तिक अहमहमिका हेच या बंडाळीमागचे कारण होते . सातत्याने चाललेली भांडणे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतात राष्ट्रीय बॉक्सिंग संघटना स्थापन करण्यासाठी १४ मे ही मुदत दिली आहे . जर या मुदतीत नवीन संघटना कार्यरत झाली नाही तर भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशाच्या ध्वजाखाली भाग घेता येणार नाही , असा इशाराच दिला आहे . या इशाऱ्यामुळे बॉक्सिंग संघटक खडबडून जागे झाले आहेत . केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन संघटना स्थापन करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे . आता बॉक्सिंग संघटकांवर आपापसातील मतभेदांना मूठमाती देत सन्मानाने एकत्र काम करण्याची जबाबदारी आली आहे . जर खेळाडू असतील तरच संघटना आहे , हे तत्त्व त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे . मिलिंद ढमढेरे millind . dhamdhere @ expressindia . com
2
क्रिकेट विश्वात हल्ली प्रत्येक सामन्यात नवनवे विक्रम रचले जातात , तर जुने विक्रम मोडले जातात . हल्ली ट्वेन्टी - २० क्रिकेटला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे . तीन तासांत झटपट क्रिकेटचा रोमांचक आनंद देणारा हा प्रकार घड्याळाच्या काट्यावर धावणाऱया लोकांना सर्वार्थाने आपलासा वाटू लागला . कसोटी आणि एकदिवसीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी जवळपास पूर्ण दिवसच द्यावा लागतो . पण ट्वेन्टी - २० मध्ये केवळ तीन तासांचा वेळ खर्ची होतो आणि त्यात चुरशीच्या लढतीचा रोमांच पाहायला मिळतो . एकाच दगडात दोन उद्देश साध्य होत असल्याने क्रिकेट रसिकांचा ओढा ट्वेन्टी - २०कडे वाढला . भारतीय संघाने मात्र क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आपले वर्चस्व कायम राखले . महेंद्रसिंग धोनीने भारताला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून दिले , तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी - २० मध्ये संघ अनुक्रमे तिसऱया व दुसऱया स्थानावर आहे . धोनीच्या भरवशाच्या फलंदाजीने भारतीय संघाने अनेक सामने जिंकले आहेत . भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या धोनीने क्रिकेटविश्वात एक फलंदाज म्हणून मॅच विनर अशी ओळख निर्माण केली . क्रमवारीत अनेकदा सहाव्या स्थानावर फलंदाजीला येऊनही धोनीने केव्हाच दबावाखाली फलंदाजी केली नाही . ट्वेन्टी - २० करिअरमध्ये धोनीच्या नावावर तर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे . ट्वेन्टी - २० विश्वात गेल्या ११ वर्षात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही . धोनी ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्ये याआधी २००६ साली द . आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद झाला होता . यानंतर धोनीने एकूण ६४ ट्वेन्टी - २० सामने खेळले आणि यात धोनी एकदाही शून्यावर बाद झालेला नाही . याशिवाय , ट्वेन्टी - २० क्रिकेटमध्ये यष्टीरक्षण करताना धोनीने सर्वाधिक विकेट्स घेतल्याचाही पराक्रम केला आहे . धोनीने आजवर ६३ वेळा स्टम्पिंग केले आहे , यात ४१ झेल आणि २२ स्टम्पिंग्सचा समावेश आहे .
2
अनेकदा नवोदित कलाकारांना सिनेमा किंवा मालिका मिळाल्यावर आपले करिअर आता सुरू झाले असेच वाटते . सिनेमा आणि मालिका करुनच आपण पैसा , प्रसिद्धी मिळवू शकतो आणि ती टिकवू शकतो असं वाटत असतं . किंबहुना तशीच काहीशी स्वप्नही त्यांना पडत असतात . पण कोणतीही गोष्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी करावा लागणारं तपही तेवढंच महत्त्वपूर्ण असतं . मालिका आणि सिनेमे याने प्रसिद्धी जरी मिळत असली तरी स्वतःला समृद्ध करण्यासाठी रंगभूमीची नाळ जोडलेली असणं फार गरजेचं आहे . रंगभूमीशी असलेल्या आपल्या याच नात्याविषयी आज कथा पडद्यामागचीमध्ये आपल्यासोबत संवाद साधणार आहे अभिनेता आस्ताद काळे… नाटकांमध्ये रिटेक कधीच नसतात . तिकडे चुकांना वावच नसतो . पण म्हणून काही चुका होतच नाहीत , असे नाही . मात्र चुका झाल्यावर त्यातून कसे सावरायचे आणि पुढचे वाक्य , पुढचा प्रसंग कसा सांभाळून घ्यायचा याचे शिक्षण रंगभूमीवरच मिळते . पहिले काही प्रयोग हाऊसफुल्ल झाले म्हणून नंतरचे प्रयोग करायचे म्हणून करायचे असे चालत नाही . प्रत्येक प्रयोगाला येणारा प्रेक्षक वेगळा असतो . त्यामुळे पहिल्या प्रयोगावेळी तुमच्यात जी एनर्जी असते , तेवढीच एनर्जी तुम्हाला पुढच्या प्रत्येक प्रयोगावेळी द्यावी लागते . रंगभूमीवर तुम्ही दररोज नव्याने जगत असता . अभिनयात स्वतःचा पाया भक्कम करण्यासाठी रंगभूमी ही फार आवश्यक गोष्ट आहे . नाटकांमध्ये आव्हानेही खूप असतात . एखाद्या विनोदी नाटकात कोणत्या जागी लोकं हसणार हे अनेकदा माहित असते आणि तसे ते हसतातही . पण काही वेळा त्याजागी लाफ्टर न येता अनपेक्षित ठिकाणी लाफ्टर मिळून जातो . यावरूनच प्रयोगाच्यावेळी किती सर्तक राहावे लागते ते कळते . कोणतेही वाक्य तुम्ही सहज घेऊ शकत नाही . टीव्हीवर मात्र असे काही नसते . तुम्ही वाक्य चुकलात तरी रिटेकवर रिटेक घेता येतात . शिवाय सिनेमांमध्येही काहीसे तसेच आहे . सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आपल्याला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कळतात . पुण्यात प्रायोगिक रंगभूमी फार महत्त्वपूर्ण काम करते . दुर्दैवाने तसे काम मुंबईतील प्रायोगिक रंगभूमी करताना दिसत नाही . याला कारणेही वेगवेगळी आहेत . राधिका आपटे , अमेय वाघसारखे ताकदीचे कलाकार पुण्यातील प्रायोगिक रंगभूमीमुळे मिळाले . आता त्यांचा असा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे . पण मुंबईमध्ये मात्र प्रायोगिक रंगभूमी मंदावलेली दिसते . सुरुवातीला कलाकारांना आविष्कारसारखे व्यासपीठ होते , पण आता तेही थंड पडल्याचे दिसून येते . दुसरीकडे मुंबईत इंग्रजी आणि हिंदी प्रायोगिक रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात ; पण मराठीत मात्र फार काही होत नाही . शब्दांकन - मधुरा नेरुरकर madhura . nerurkar @ loksatta . com
0
दहिसर क्राईम ब्रँच युनिट १२च्या पोलीस टीमने २००६ साली मुंबईशी काडीमात्र संबंध नसलेल्या हैदराबाद येथे घडलेल्या एका गुन्ह्याचा कसा छडा लावला ते तुम्हाला येत्या १३ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येणार आहे . त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अनेक प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे मिसींग केस . त्याचप्रमाणे आजवरच्या पोलिसी अभ्यासावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढलाय की बेपत्ता व्यक्ती ही कधी ना कधी जिवंत किंवा मृतावस्थेत सापडतेच . खारघर येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत नेमकं असंच काहीसं घडलं … हसरा खेळकर जेरॉम दि . ३१ जानेवारी २००९ या दिवसानंतर अचानक बेपत्ता झाला . मिसिंग जेरॉमचं गूढ पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ ने कसं उकळून काढलं … त्याचा बुरखा फेडणारी ही धक्कादायक कथा तुम्हाला १४ जानेवारीला रात्री ९ वाजता पाहता येईल . सन २००६ मध्ये हैदराबाद मधील आलुकास ज्वेलरी शॉप मध्ये मोठी चोरी झाली . संपूर्ण भारतभर त्याची चर्चा सुरु होती . चोरीची स्टाईल मुंबईतील दहिसर पोलिसांना ओळखीची वाटली . विनोद नावाच्या मुंबईतील तडीपार गुंड , ज्याने मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या चोऱ्या केल्या होत्या . पोलिसांना त्याचा संशय आला . पोलीस अधिकारी सुनील दरेकर यांनी त्यांच्या माणसांना कामाला लावले . गुन्हा घडला होता हैदराबाद मध्ये , ज्याचा मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नव्हता . पण गुन्हा हा गुन्हा असतो आणि पोलिसांची त्यावर व्यवस्थित नजर असतेच . कोणताही पुरावा नसताना एका अंदाजावर सुरु झालेला हा तपास मुंबई पोलिसांना खऱ्या गुन्हेगारापर्यंत घेऊन गेला आणि कश्या प्रकारे त्यांनी हैदराबादमध्ये झालेल्या चोरीतील गुन्हेगाराला सापळा रचून मुंबईच्या एका बारमध्ये पकडले आणि सर्व माल कसा ताब्यात घेतला हे तुम्हाला शुक्रवारच्या भागात पहायला मिळेल . सन २००९ , जेरॉम सलढाणा नावाची व्यक्ती अचानक गायब झाली . जेरॉम हा अतिशय हसरा खेळकर रिटायर्ड धनाढ्य व्यक्ती होता . त्याला मुंबईतील प्रॉपर्टी विकून गोव्याला सेटल व्हायचं होत . आणि अचानक ती व्यक्ती गायब झाली . पनवेल क्राईम ब्रँचच्या युनीट २ चे संतोष धनवडे यांच्याकडे ही केस आली . त्यांनी शोधकार्य हात घेतले . पहिलाच क्लू जेरॉमची स्कोडा गाडी मिळाली पण जेरॉम गायब होता . गाडीच्या स्टिअरिंगवर आणखी एका माणसाचे ठसे सुद्धा मिळाले . पण नक्की काय झालं हे कळत नव्हते . हे शोधकार्य सुरु असतानाच जेरॉमच्या भावाच्या ई मेल आयडीवर शाह नावाच्या व्यक्तीचा ई मेल येतो की त्याने जेरॉमची प्रॉपर्टी १ . ५० कोटीला विकत घेतली आहे . पोलिसांच्या दृष्टीने हे सगळं विचित्र होतं . ते शाह नावाच्या व्यक्तीच्या तपासाला लागतात . तपास करता करता पोलीस शाहपर्यंत कसे पोहचतात आणि जेरॉमच्या खुनाचा प्लॅन कसा सोडवला जातो याची चित्तरकथा येत्या शनिवारी पाहायला मिळेल . या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा , तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे , कलादिग्दर्शक विवेक देशपांडे , छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे .
0
स्टेडियमवर जाऊन " याची देही याची डोळा ' एखादा सामना पाहणे ही एक अनुभूती असते . ऑस्ट्रेलियाच्या एका मुलाला अशीच अनुभूती झाली आणि प्रेरित होऊन त्याने थेट विश्वकरंडकापर्यंत मजल मारली . ऑस्ट्रेलियन संघातील जॅक्सन आयर्विन याची यशोगाथा अशीच आहे . जॅक्सन 12 वर्षांचा असताना सिडनीतील विश्वकरंडक पात्रता सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेला . ऑस्ट्रेलियाने पहिल्या विश्वविजेत्या उरुवेला हरवून 32 वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर विश्वकरंडक पात्रता साध्य केली . 2006 च्या स्पर्धेला " सॉकेरूज ' पात्र ठरल्यानंतर एकच जल्लोष झाला . त्यात सहभागी झालेल्या जॅक्सनसाठी मग फुटबॉल हाच श्वास अन् ध्यास बनला . वयाच्या 25व्या वर्षी त्याचा विश्वकरंडक संघात समावेश झाला . मेलबर्नमध्ये जन्मलेल्या जॅक्सनने सेल्टिक ऍकॅडमीत खेळाचा श्रीगणेशा केला . त्याचे वडील स्कॉटलंडचे आहेत . त्यामुळे तो " यूएफा ' युवा ( 19 वर्षांखालील ) स्पर्धेत त्याने स्कॉटलंडचे प्रतिनिधित्व केले , पण त्याची पहिली पसंती ऑस्ट्रेलियालाच होती . 2012 मध्ये त्याने 20 वर्षांखालील स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले . मग पुढच्याच वर्षी त्याने वरिष्ठ पातळीवर आंतरराष्ट्रीय पदार्पण केले . तो इंग्लिश साखळीतही खेळतो . 2017 - 18 मध्ये तो द्वितीय श्रेणी साखळीत बरटॉन अल्बिऑनकडून खेळला . त्यानंतर हल सिटीने 25 लाख डॉलरचा करार त्याच्याशी केला . जिगरी दोस्तही संघात ! ऑस्ट्रेलियन संघात जेमी मॅक्लारेन नावाचा खेळाडू आहे . तो आणि जॅक्सन खास मित्र आहेत . लहानपणापासून ते विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पाहायचे . प्रशिक्षक बर्ट वॅन मार्विक यांनी निवडलेल्या 26 जणांच्या प्राथमिक संघात जेमीची निवड झाली नव्हती . त्यामुळे तो दुबईला सहलीसाठी गेला होता . दरम्यानच्या काळात टॉमी ज्युरीचला दुखापत झाली . त्यामुळे जेमीला पाचारण करण्यात आले . दुबई सहलीसाठी जेमीने नवे बूट खरेदी केले होते . " कॉल ' येताच त्याने " स्टड्स ' चढविले आणि तो सज्ज झाला .
2
लोकप्रिय फोटो - मेसेजिंग अॅप इन्स्टाग्रामने अनेक दिवसांच्या पडताळणीनंतर आपल्या सर्व युजर्सना अकाउंट व्हेरिफायचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे . आता कोणताही इन्स्टाग्राम युजर आपल्या अकाउंटला ‘ब्ल्यू टिक’सह व्हेरिफाय करु शकतो . विशेष म्हणजे तुम्ही इन्स्टाग्राम अॅपवरुनच अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करु शकतात . तर जाणून घेऊया इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय कसं करायचं – इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफिकेशनचा पर्याय सध्या केवळ आयओएस युजर्ससाठी सुरू करण्यात आला आहे . जर तुम्ही अॅन्ड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल . जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटला व्हेरिफाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमचं अॅप अपडेट करा . यानंतर अकाउंटच्या सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला Request Verification चा पर्याय मिळेल . त्यानंतर तुम्हाला इन्स्टाग्राम आयडी , नाव आणि फोटोसह एक ओळखपत्र मागितलं जाईल . त्यानंतर इन्स्टाग्रामकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला कन्फर्मेशनचा ई - मेल मिळेल . इन्स्टाग्राम ब्ल्यू टिकची सुरूवात ऑस्ट्रेलियातून झाल्याचं सांगितलं जातं . सर्वात आधी कंपनीने ऑस्ट्रेलियातच याची चाचणी घेतली होती . चाचणीदरम्यान पारदर्शकता आणि फेक अकाउंट्स रोखण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचं इन्स्टाग्रामने सांगितलं होतं .
1
भारतात २००५ ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील १० लाख मुलांचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे . न्यूमोनिया , अतिसार , धनुर्वात , गोवर यांसारख्या रोगांवर मात करण्याने हा फरक दिसून आला , असे लँसेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे . भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता आहे . त्यामुळे बालमृत्युदर आणखी पाच टक्क्यांनी कमी होऊन त्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेले उद्दिष्ट साध्य होईल . २०३० पर्यंत बालमृत्यूचे प्रमाण हजारात २५ इतके खाली आणण्याचे संयुक्त राष्ट्रांनी दिलेले उद्दिष्ट आहे . २००० ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील २९ दशलक्ष मुले विविध कारणांनी भारतात मरण पावली , असे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीत दिसून आले आहे . पण बालमृत्युदर वाढण्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून आले आहे . तो दर जर कायम राहिला असता तर या काळात ३० दशलक्ष मुले मरण पावली असती , पण तसे झालेले नाही , असे या संशोधनाचे लेखक डॉ . प्रभात झा यांनी म्हटले आहे . गोवर लसीचा दुसरा डोस , सरकारच्या गर्भवती महिलांसाठीच्या योजना यांचा चांगला परिणाम झाल्यामुळे हा फरक दिसला आहे . १ ते ५९ महिने वयाच्या मुलांमध्ये हिवतापाने मृत्यू पावण्याचा दर अजून कमी झालेला नाही . नवजात बालकांच्या मृत्यूचा दर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दुप्पटच असून कमी वजनाची बालके जन्माला येण्याने ग्रामीण भागात जास्त मृत्यू होतात . मुलगा व मुलगी यांच्यातील बालमृत्युदरातील तफावतही कमी होत चालली आहे .
1
धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे . ज्या वेळी आधुनिक शस्त्रे उपलब्ध नव्हती , त्या वेळी अनेक युद्धांमध्ये सवरेत्कृष्ट धनुर्धाऱ्यांचाच विजय होत असे . भारतीय संस्कृतीमधील रामायण - महाभारतामधील युद्धे धनुर्विद्येवरच आधारित होती . असे असूनही या क्रीडा प्रकारात भारताला एकही ऑलिम्पिक पदक मिळवता आलेले नाही . ऑलिम्पिक पदकांचा ध्यास ठेवत येथील ‘आर्चर्स अकादमी ऑफ एक्सलन्स’ ही संस्था या खेळाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी कार्यरत आहे . क्रिकेट , फुटबॉल , टेनिस आदी लोकप्रिय खेळांच्या झगमगाटापुढे धनुर्विद्या हा क्रीडाप्रकार अपेक्षेइतका लोकांच्या मनावर प्रभाव पाडू शकलेला नाही . एखादा िलबाराम आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये चमक दाखवीत ऑलिम्पिकपर्यंत झेप घेतो , तेव्हा त्याचा खेळ कोणता आहे , याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण होते . जेव्हा त्याचा खेळ कळतो , तेव्हा अरे हा तर आपला प्राचीन खेळ असल्याची जाणीव लोकांना होते . मात्र या खेळासाठी आर्थिक पाठबळ देण्यासाठी मात्र फारसे हात पुढे येत नाही . त्यामुळेच या खेळाची संस्था चालवणे म्हणजे पदरमोड करीतच विकासाचे कार्य करण्याखेरीज संघटकांपुढे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नसतो . आर्चर्स अकादमीलाही मैदान मिळण्यापासून सर्वच गोष्टींबाबत संघर्ष करावा लागला आहे . या खेळाच्या विकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या रणजित चामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली १६ वर्षे अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत . धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील विविध अंतरांच्या स्पर्धासाठी साधारणपणे फुटबॉल किंवा क्रिकेटच्या मैदानाच्या निम्मे आकाराचे मैदान आवश्यक असते . लहान जागेत १० मीटर , २५ मीटर , ५० मीटर आदी अंतराच्या स्पर्धाचा सराव करता येत असला , तरीही जेवढे मैदान मोठे असेल , तेवढा या खेळाचा सराव अधिक चांगला करता येतो . त्यामुळेच मोठे मैदान मिळवण्यासाठी आर्चर्स अकादमीला नेहमीच संघर्ष करावा लागला आहे . सुरुवातीला शासकीय तंत्रनिकेतन , विखे - पाटील प्रशाला आदी संस्थांमध्ये या अकादमीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली . सुरुवातीला १० - १२ खेळाडूंची संख्या आता तीन आकडी झाली आहे . केवळ पुण्यातील नव्हे , तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून या अकादमीत खेळाडू प्रशिक्षणासाठी येत असतात . अधूनमधून अन्य राज्यांमधूनही या अकादमीत प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक खेळाडू येतात , हीच या अकादमीच्या कार्याची पावती आहे . कटारिया प्रशाला , महावीर प्रशाला , दिल्ली पब्लिक स्कूल , गंगाधाम सोसायटीसमोरील मोकळी जागा , पोद्दार इंटरनॅशनल स्कूल , शाहू विद्यामंदिर महाविद्यालय , महेश बालभवन आदी ठिकाणी या अकादमीतर्फे खेळाडूंच्या प्रशिक्षणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . या अकादमीतून प्रशिक्षण घेणारे प्रवीण जाधव , तन्मय मालुसरे , भाग्यश्री कोलते यांची आगामी ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण शिबिराकरिता निवड झाली आहे . या खेळाडूंप्रमाणेच स्वप्निल ढमढेरे , मेघा अगरवाल , पूर्वा पल्लिवाल , साक्षी शितोळे आदी खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे . राष्ट्रीय स्तरावरील शिबिराकरिता या अकादमीतील १५हून अधिक खेळाडूंची निवड झाली आहे . राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र संघातील ७० टक्के खेळाडू या अकादमीतून तयार झालेले असतात . अमोल बोरिवले , आदिल अन्सारी , श्रीनिवास आदी अपंग खेळाडूंनाही या अकादमीत प्रशिक्षण मिळाले आहे . पुणे शहराबरोबरच राज्यात अन्यत्रही या अकादमीचे प्रशिक्षक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करीत आहेत . नवोदित खेळाडू , हौशी खेळाडू व व्यावसायिक अशा विविध स्वरूपाद्वारे प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असते . अलीकडेच नऊ वर्षांखालील खेळाडूंकरिता स्पर्धा सुरू करण्यात आल्यामुळे सहा वर्षांपासूनची मुले - मुली या खेळाकडे येऊ लागली आहेत . या अकादमीतून तयार झालेल्या काही खेळाडूंना विविध उद्योगसंस्थांकडून थोडय़ा फार प्रमाणात आर्थिक मदत मिळू लागली आहे . तीन - चार खेळाडूंना ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट , लक्ष्य फाउंडेशन आदी संस्थांनी दत्तकही घेतले आहे . शालेय व महाविद्यालयीन स्तरावर या खेळाची व्याप्ती वाढावी , या दृष्टीने वासंतिक शिबिरेही या अकादमीतर्फे घेतली जात असतात . त्यामधूनच त्यांना चांगले नैपुण्य मिळत आहे . असे असूनही अकादमीकरिता स्वतःच्या हक्काची जागा मिळत नाही , तोपर्यंत या अकादमीच्या संघटकांवर सतत टांगती तलवार असते . महानगरपालिकेकडून कायमस्वरूपी जागा मिळाली , तर या अकादमीतील खेळाडू निश्चितपणे ऑलिम्पिक पदकावर नाव कोरतील .
2
रणबीर आणि कतरिना येत्या काळात ‘जग्गा जासूस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . या दोन्ही कलाकारांमध्ये असणाऱ्या नात्याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही . एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले रणबीर आणि कॅट आता मात्र या नात्यातून वेगळे झाले असून फक्त आणि फक्त एकमेकांचे सहकलाकार म्हणून वावरताना दिसतात . त्यांच्या ब्रेकअप विषयीसुद्धा या दोघांनीही बोलणं टाळलं . जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रणबीर आणि कतरिनाने हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला . सुरुवातीच्या काळात ब्रेकअपमुळे त्यांच्यात कमालीचा दुरावा पाहायला मिळाला . पण , आता मात्र ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने दोघंही एकमेकांसोबत जास्त वेळ व्यतीत करत आहेत . प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत . अशाच एका मुलाखतीदरम्यान रणबीरने त्याच्या आयुष्यातील कतरिनाचं नेमकं स्थान आहे तरी काय , यावरुन पडदा उचलला . त्यांच्या नात्याची वेगळीच बाजू रणबीरच्या वक्तव्यातून पहायला मिळाली . ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटानंतर कतरिनासोबतचा हा माझा तिसरा चित्रपट आहे . चित्रपट हे एक महागडं माध्यम आहे . इथे अनेकांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो . त्यातही बरेच लोक तुमच्यावर अवलंबून असतात . माझ्या आणि कतरिनाच्या नात्याविषयी आजवर माध्यमांमध्ये जे काही सांगण्यात आलं , जे काही अंदाज बांधण्यात आले ते नेहमीच सकारात्मक होते . माझ्या आयुष्यात तिचं स्थान महत्त्वाचं आहे . ती मला माझ्या आयुष्यात हवीये , मला तिची आजही गरज आहे . कारण , आजवरच्या प्रवासात तिच्यासोबत असण्याचा बराच प्रभाव माझ्यावर पाहायला मिळाला आहे आणि हे असंच सुरू राहिल’ , असं रणबीरने स्पष्ट केलं . वाचा : ‘या’ अभिनेत्याची मुलगी शाहिद कपूरला मानत होती पती यावेळी त्याने चित्रपटातील भूमिकेविषयीसुद्धा बरीच माहिती दिली . ‘या चित्रपटासाठी तिनेही बरीच मेहनत घेतली आहे . त्यामुळे माझ्या इतकीच तिची भूमिकासुद्धा फार महत्त्वाची आहे . तिच्यासोबतचं माझं नातं , आमची पार्टनरशिप या साऱ्याबद्दल मी तिचे आभार मानतो’ , असं रणबीर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला . दरम्यान , ‘सावरिया’ रणबीर सध्या दिल्लीस्थित एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे . चित्रपटसृष्टीशी तिचा काहीच संबंध नसून आता हे नातं कधी सर्वांसमोर येतंय याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे . वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…
0
दीपिका पदुकोण सध्या संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे . आपल्या कामात ती कितीही व्यस्त असली तरी स्वतःसाठी वेळ काढायला ती विसरत नाही . शॉपिंगला जाणं , चांगल्या ठिकाणी जेवायला जाणं यातून ती स्वतःला वेळ देते . तिची नवीन जाहिरात पाहून हे तर अजूनच स्पष्ट होतं . या जाहिरातीत दिसणाऱ्या तिच्या मोहक हास्यावरून नजरच हटत नाही . या जाहिरातीची प्रत्येक फ्रेम तिचं सौंदर्य अधिकच खुलवते . कमीत कमी मेकअपमध्ये खुलणारं तिचं सौंदर्य अजूनच लक्ष वेधून घेतं . राजकारणामुळे फवाद खानचा बळी गेला - रणबीर कपूर जवळपास १८ प्रॉडक्टची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणाऱ्या दीपिकाने नुकतेच अॅक्सिस बँकेसाठी एका जाहिरातीचं चित्रीकरण केलं . न्यू - यॉर्कमधील नावाजलेले दिग्दर्शक आणि छायाचित्रकार डीन फ्रीमॅन यांनी या जाहिरातीचे चित्रीकरण केले आहे . बँकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून बॉलिवूडच्या मस्तानीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला . सौंदर्य प्रसाधनांपासून एअर लाइन्सपर्यंत आणि मोबाइल फोनपर्यंत सर्वच मोठ्या कंपन्यांची दीपिका ब्रॅण्ड अँम्बेसिडर आहे . आपल्या हरहुन्नरी अभिनयाने तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडकरांची मनं तर जिंकलीच आहेत . शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही तिने अधिराज्य गाजवलं आहे . काही महिन्यांपूर्वी तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता . याशिवाय ‘फोर्ब्स’च्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिच्या नावाचा समावेश होता . ३१ वर्षीय दीपिका ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमानंतर लवकरच ‘पद्मावती’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . तिचा अजून एक हॉलिवूडपट येणार असल्याची चर्चाही सिनेवर्तुळात रंगत आहे . Priyanka Chopra : बॉलिवूडच्या देसी गर्लचा आजवरचा प्रवास
0
महिला आशिया ट्वेन्टी - २० कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आशियाई ट्वेन्टी - २० क्रिकेट स्पध्रेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्स आणि चार चेंडू राखून विजय मिळवला . भारताने १९ . २ षटकांत ५ बळींच्या मोबदल्यात ९८ धावांचे लक्ष्य पार केले . कौरने दोन बळी टिपले , तर २२ चेंडूंत २६ धावांचे योगदानही दिले . भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला . एकता बिस्त आणि अनुजा पाटील यांनी पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना झटपट बाद केले . त्यानंतर पाकिस्तानच्या आयेशा जाफर व नैन अबिदी यांनी संयमी खेळ करताना संघाला निर्णायक २० षटकांत ७ बाद ९७ धावांपर्यंत मजल मारून दिली . या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचीही दैना उडाली , परंतु मिताली राज व कौर यांनी संघाचा विजय निश्चित केला . सीमेवरील चाललेल्या तणावामुळे उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळणार की नाही , याबाबत तणावाचे वातावरण होते . मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे ( आयसीसी ) ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने भारतीय संघाने खेळण्यास हिरवा कंदील दिला . संक्षिप्त धावफलक पाकिस्तान : ७ बाद ९७ ( आयेशा जाफर २८ , नैन अबिदी नाबाद ३७ ; एकता बिस्त ३ - २० , हरमनप्रीत कौर २ - १६ ) पराभूत वि . भारत : ५ बाद ९८ ( मिताली राज ३६ , हरमनप्रीत कौर नाबाद २६ ; निदा दार २ - ११ ) .
2
नवी दिल्ली : उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी आज ( मंगळवार ) दुपारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेवर पुन्हा गोळीबार केला . पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांच्या ठाण्यांना लक्ष्य केले . या गोळीबारामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही . दुपारी 1.10 ते 1.30 या कालावधीमध्ये हा गोळीबार झाला . उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे . त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा ही आगळीक केली आहे . या गोळीबाराचे अधिक तपशील अद्याप हाती आलेले नाहीत . रविवारी उरीत झालेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले . या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे .
2
मुंबई : भारतीय बॉक्सिंग खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील यशोमालिका मंगळवारी देखील सुरू ठेवली . भारताचे मनोज कुमार तसेच सुमीत सांगवान ऑलिंपिक पात्रतेपासून एक विजय दूर आहे . त्याचबरोबर विकास कृष्णननेही बाकू ( अझरबैझान ) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय मिळवत पात्रतेच्या आशा कायम ठेवल्या . मनोज कुमारने लाईट वेल्टर वेट ( 64 किलो ) गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली . त्याने बल्गेरियाच्या आयरिन स्मेतॉव याचा 3 - 0 असा पाडाव केला , तर सुमीत सांगवाने लाईटहेवीवेट गटात ( 81 किलो ) मंगोलियाच्या एर्देनेबायर सॅंदासुरेन ( मंगोलिया ) याला 3 - 0 असेच हरवले , तर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत विकास कृष्णनने मिडलवेट ( 75 किलो ) गटात जपानच्या माकातो ताकाहाशी याला 3 - 0 असे हरवले . सुमीतने तीनही फेऱ्यात 27 - 20 अशी हुकूमत राखली . त्याचा या लढतीत क्वचितच कस लागला . सुमीतने हुशारीने आक्रमण करताना प्रतिस्पर्ध्यास आपल्या नजीक येऊ दिले नाही . मनोजला मात्र कडव्या लढतीस सामोरे जावे लागले . त्याने चांगला प्रतिहल्ला केला . मनोजने दुसऱ्या फेरीत दिलेल्या ठोशाने त्याच्या प्रतिस्पर्ध्यास दुखापत झाली . त्यामुळे त्याचे मनोधैर्य खच्ची झाले . मनोजने त्याचा फायदा घेत बाजी मारली . मनोजने चांगला हल्ला परतवला . त्याने बचाव आणि आक्रमणाची चांगली सांगड घातली . संधी मिळताच त्याने केलेले आक्रमण जबरदस्त होते . सुमीतने खूपच सुरेख कामगिरी केली . त्याने पहिल्यापासून लढतीवर हुकूमत राखली , तरीही तो कधीही गाफील नव्हता . त्याने प्रतिस्पर्ध्याच्या सर्व योजना हाणून पाडल्या . - गुरबक्षसिंग संधू , भारतीय मार्गदर्शक
2
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान इम्तियाज अली याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . नुकतेच या जोडीचे पंजाबमधील चित्रीकरणावेळीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले . इम्तियाजच्या चित्रपटाचे पंजाबमधील चित्रीकरण पूर्ण झाले असून याची संपूर्ण टीम मुंबईला परतली आहे . मुंबईच्या विमानतळावर इम्तियाज अली , अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यासह टीममधील अनेक चेहरे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले . मात्र , मुंबई विमानतळावर अनुष्काचा हिरो अर्थात शाहरख खान मात्र दिसला नाही . त्यामुळे शाहरुख नक्की आहे तरी कुठे असा प्रश्न अनेकांना पडला आहे . पंजाबमध्ये या चित्रपटातील एक गाणे चित्रीत करण्यात आले आहे . या गाण्यामध्ये शाहरुख खान पहिल्यांदाच पंजाबी पगडीमध्ये दिसला . त्याचा हा लूक चांगलाच व्हायरलही झाला . प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिसने अनुष्का आणि शाहरुख यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे . अनुष्का शाहरुखच्या या आगामी चित्रपटाच्या शिर्षकाची चांगलीची चर्चा झाली . चित्रपटाची तारीख पक्की झाली असताना अद्यापही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही . इम्तियाज अलीचा शाहरुख सोबतचा हा पहिला प्रोजेक्ट आहे . तर ‘रब ने बनादी जोडी’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटानंतर शाहरुख आणि अनुष्काचा हा तिसरा चित्रपट आहे . शाहरुख - अनुष्काचा हा आगामी चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे . याचवेळी अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे . त्यामुळे बॉक्स ऑफिसवर बादशहा आणि खिलाडी अशी टक्कर पाहायला मिळणार आहे . अनुष्का शर्माचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘फिल्लौरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता . त्यामुळे अनुष्कालाही या चित्रपटाकडून चांगल्या यशाची अपेक्षा असेल .
0
साधारण ३० जीवनसत्त्वे आणि क्षार यांच्या मिश्रणाचा पूरक आहार घेतल्यास अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स यांसारख्या चेतासंस्थेच्या विकारांच्या वाढीचा वेग बराच मंदावता येतो , असे नव्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे . कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातील जेनिफर लेमन यांनी हे संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्नमेंटल अँड मोलेक्युलर म्युटॅजेनेसिस’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत . लेमन यांच्या संशोधकांच्या गटाने प्रयोगशाळेत उंदरांवर यासंबंधी संशोधन केले . त्यात सामान्य आणि मेंदूच्या चेतापेशींचा अंशतः नाश झालेल्या उंदरांचा समावेश होता . साधारण अशाच प्रकारची स्थिती अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स विकार झालेल्या मानवी मेंदूतही असते . या उंदरांना नेहमीच्या खाद्याबरोबर ३० जीवनसत्त्वे आणि क्षार यांच्या मिश्रणाचा पूरक आहार नियमितपणे देण्यात आला . त्यात ब , क , ड जीवनसत्त्वे , फॉलिक आम्ल , ग्रीन - टीचा अर्क , कॉड लिव्हर ऑइल आणि अन्य उपयोगी सत्त्वे होती . मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधकांनी या मिश्रणाचा २००० साली शोध लावला असून , त्यात आजवर अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत . गेल्या १५ वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित केलेल्या या सत्त्वयुक्त पूरक आहाराच्या नियमित सेवनाने चेतासंस्थेच्या कार्यात लक्षणीय सुधारणा होत असल्याचे दिसून आले . ज्या उंदरांच्या मेंदूच्या पेशी नाश पावत होत्या त्यांना हा आहार देण्यात आल्यानंतर पेशी नष्ट होण्याच्या प्रमाणात खूप घट झाली . तसेच सामान्य उंदरांच्या चेतासंस्थेच्या कार्यातही बरीच सुधारणा झाली . इतकेच नव्हे तर त्यांच्या दृष्टी आणि घ्राणेंद्रियांच्या ( वास घेण्याच्या ) क्षमतेतही सुधारणा झाली . चेतापेशी नष्ट होण्याने त्यावर परिणाम होतो . या पूरक खाद्याचा उपयोग अल्झायमर्स , पार्किन्सन्स तसेच अॅमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरॉसिस ( एएलएस ) यांसारख्या चेतापेशींच्या विकारांवर होऊ शकतो . तसेच सामान्य व्यक्तींमध्ये तारुण्याच्या जोपासनेसाठीही त्याचा फायदा होऊ शकतो , असे संशोधकांचे मत आहे .
1
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताला तिसरा सलामीवीर आणि दुसरा यष्टीरक्षक या राखीव पर्यायांची प्रमुख चिंता आहे . राष्ट्रीय निवड समिती आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून अॅडलेडच्या पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे . वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने निभ्रेळ यश मिळवले . या मालिकेतील कामगिरीआधारे पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनी आपले स्थान अंतिम ११ खेळाडूंमध्ये पक्के केले आहे . पृथ्वीसोबत सलामीवीर म्हणून निवड समिती लोकेश राहुललाच प्राधान्य देईल . तो मागील १७ डावांपैकी १४ डावांमध्ये अपयशी ठरला आहे . परंतु या प्रदीर्घ दौऱ्यासाठी राखीव सलामीवीरसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे . ‘‘लोकेशच्या फलंदाजीत काही त्रुटी आहेत . मात्र तो त्यात सुधारणा करील . परंतु सामन्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन चांगला आहे , ’’ अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने रविवारी सामन्यानंतर व्यक्त केली होती . या पाश्र्वभूमीवर अॅडलेडच्या कसोटीत पृथ्वी - लोकेश जोडीवरच सलामीची मदार असेल . वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांक अगरवाल हा सलामीसाठी तिसरा पर्याय होता . ऑस्ट्रेलियाविरुद्ध निवडल्या जाणाऱ्या १७ खेळाडूंच्या संघातसुद्धा मयांक हाच सर्वोत्तम पर्याय असेल . मयांकचा समावेश न झाल्यास करुण नायरला संधी मिळू शकते . अनुभवी फलंदाज मुरली विजयच्या नावाचासुद्धा विचार केला जाऊ शकतो . दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या मुरलीने नुकतेच निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्याबाबत मतप्रदर्शन केले होते . परंतु भारतीय संघातून वगळल्यानंतर इसेक्सकडून कौंटी क्रिकेट खेळताना त्याने ५६ , १०० , ८५ , ८० धावा केल्या होत्या . याशिवाय रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांची त्याची कामगिरीसुद्धा विचारात धरता येईल .
2
दिल्लीला हरवून जयपूर अव्वल स्थानी ’ यू मुंबाची तेलुगूशी बरोबरी दबंग दिल्लीचा इराणी संघनायक मेराज शेखने आपल्या लवचीकतेचा प्रत्यय घडवत हुकमी चढाया आणि पकडी केल्या . परंतु त्याची ही एकाकी झुंज अपयशी ठरली . जयपूर पिंक पँथर्सने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत दिल्लीला २४ - २२ असे पराभूत केले आणि प्रो कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर मुसंडी मारली आहे . याचप्रमाणे यू मुंबाला तेलुगू टायटन्सने बरोबरीत रोखले . वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत जसवीरने आपल्या शैलीदार चढायांच्या बळावर प्रारंभीपासून वर्चस्व निर्माण केले . परंतु दिल्लीकडून मेराजचा प्रतिकार रोखणे जयपूरला अवघड जात होते . मध्यंतराला जयपूरने १४ - ११ अशी आघाडी घेतली होती . उत्तरार्धात मात्र कमालीची चुरस टिकून होती . मात्र जयपूरने शांत चित्ताने खेळ करीत सामना हातातून निसटू दिला नाही . दुसऱ्या सामन्यात अनुप कुमारच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर यू मुंबाने मध्यंतराला १६ - ७ अशी आघाडी मिळवली . पहिल्या सत्रात सावधपणे खेळणाऱ्या राहुल चौधरीने दुसऱ्या सत्रात अप्रतिम खेळ केला . त्यामुळे २८व्या मिनिटाला तेलुगू टायटन्सने लोणची परतफेड केली आणि यू मुंबाला १७ - १७ असे बरोबरीत गाठले . त्यानंतर हा सामना २५ - २५ असा बरोबरीत सुटला . आजचे सामने
2
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या दिवसभरातील गोष्टींमधील शारीरिक श्रम कमी झाले आहेत . त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन न झाल्याने शरीरावरील चरबी वाढते . ही समस्या सध्या अनेकांना भेडसावत असून त्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा अवलंब केला जातो . भारतीय योगविद्येमध्ये हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही विशेष आसने सांगण्यात आली आहेत . थोडा संयम ठेऊन ठराविक कालावधीसाठी ही आसने नियमितपणे केल्यास त्याचे होणारे परिणाम आपल्याला सहज दिसतात . कोणती आहेत ही आसने पाहूया… कटीसौंदर्यासन – ज्या व्यक्तींना आपली कंबरेकडील चरबी कमी करायची आहे त्यांनी हे आसन नियमित केल्यास फायद्याचे ठरते . यामध्ये दोन्ही पाय पसरुन जमिनीवर बसावे . दोन्ही हात बाजूला घेऊन एका हाताचा पंजा दुसऱ्या हाताच्या पंज्याला लावण्याचा प्रयत्न करावा . यामुळे कंबरेला काही प्रमाणात पीळ पडतो . त्यामुळे कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते . पशुविश्रामासन – दोन्ही पाय पसरुन बसावे . आता डावा पाय मागे नेऊन बाहेरच्या बाजूला दुमडावा . आता उजवा पाय डाव्या पायाच्या जांघेत ठेवावा . आता दोन्ही हात वर करुन श्वास घ्यावा . मग दोन्ही हात जमिनीला टेकवत श्वास हळूहळू सोडावा . ही प्रक्रिया दोन्ही बाजूने करावी . सुरुवातीला ५ वेळा आणि नंतर वाढवत किमान २५ ते ३० वेळा हे आसन केल्यास चरबी कमी होण्यास मदत होते . कोनासन – एका जागेवर उभे राहून दोन्ही पायांमध्ये समान अंतर घ्या . आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करा . ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी ठराविक वेळा केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास फायदा होतो . आडवे ताडासन – पार्श्वभाग कमी करायचा असल्यास हे आसन उपयुक्त आहे . उभे राहून दोन्ही पायात थोडे अंतर घ्या . दोन्ही हात वर घेऊन बाजूला जितके शक्य आहे तितके वाका . हीच क्रिया दुसऱ्या बाजूनेही करा . कपालभाती – लठ्ठपणा कमी करण्यासाठी कपालभाती ही क्रिया उपयुक्त असते . दररोज ५ ते १५ मिनीटांसाठी कपालभाती केल्यास वाढलेले वजन कमी होण्यासाठी त्याचा निश्चितच फायदा होतो . कपालभाती करताना सिद्धासन किंवा पद्मासनात बसणे आवश्यक आहे . मात्र ज्यांना हृदयरोग किंवा रक्तदाबाचा त्रास असेल तसेच अल्सर आणि कंबरदुखीचा त्रास असल्यास कपालभाती करणे तोट्याचे ठरु शकते . आसनांचा वाढलेले वजन कमी होण्यासाठी निश्चितच फायदा होतो . मात्र कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना त्याबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच ते करावे अन्यथा त्यामुळे त्रास उद्भवण्याची शक्यता असू शकते . त्यामुळे वजन कमी करण्याच्या घाईमध्ये आसनांचा अतिरेक किंवा चुकीच्या पद्धतीने ही आसने न करता तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊन केलेली चांगली असे फिटनेस अभ्यासक मनाली मगर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले .
1
गुजरातमध्ये सरदार पटेल क्रिकेट स्टेडियममध्ये काही बदल करण्यात येणार असून या स्टेडिअमला जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे मैदान बनविण्यात येणार आहे . तसेच एक लाख दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात येत आहे , याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशन महामंडळाने माहिती दिली आहे . या भव्य - दिव्य मैदानाच्या उभारणीसाठी लार्सन ऍण्ड टर्बो ( एल ऍण्ड टी ) ही कंपनी पुढाकार घेणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे . सध्या या मैदानाची क्षमता 54 हजार प्रेक्षक बसतील एवढी आहे . मैदानाचा कायापालट करण्याचे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होणार आहे . सध्या मैदानावर करण्यात येणार बदल हा आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार केला जाणार आहे . " या मैदानावर वातानुकुलित बॉक्स , प्रशस्त वाहनतळाची सुविधा , प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे मार्ग हे एकदम सहज - सोपे करण्यात येणार आहेत . पर्यटकांना , प्रेक्षकांना जागोजागी माहिती देणारे फलक , नकाशे तसेच माहितीपर संग्रहालय , उभारण्यात येणार आहेत . फूड कोर्ट , फॅन झोन , स्वच्छतागृहे यासारख्या अत्यावश्यक सुविधांचा देखील यात समावेश असेल , ' अशी माहिती गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजेश पटेल यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिली .
2
मोकळा वेळ घालविण्यासाठी आपण मोबाईलवर सतत काही ना काही करत असतो . यामध्ये सोशल मीडियावर सर्फिंग करण्याबरोबरच मोबाईलवरचे वेगवेगळे गेम खेळणे आणि क्विझची अॅप डाऊनलोड करणे हे सामान्य झाले आहे . आपल्याला असलेले ज्ञान अजमावण्यासाठी आपण या अॅपमधील क्विझ सोडवत राहतो आणि पुढचे टप्पे गाठतो . मात्र आता अशाप्रकारचे अॅप्स वापरणे काहीसे धोक्याचे ठरु शकते . फेसबुककडून अशी क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा नुकताच लिक झाला आहे . नेमटेस्टस ( NameTests ) या क्वीझ अॅपकडून नुकताच १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असल्याचे समोर आले आहे . या वेबसाईटवरुन फेसबुकच्या युआरएलवरुन युजर्सची माहिती काढली जात असल्याचे काही सायबर सुरक्षेतील तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे . विशेष म्हणजे युजरनी हे अॅप्लिकेशन डिलीट केले तरीही त्यांचा डेटा हॅकर्सकडे राहणार आहे . त्यामुळे तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कोणालाच समजू द्यायेच नसेल तरीही आता ते शक्य नाही . कारण अशाप्रकारच्या हॅकींगमुळे तुमची माहिती तुम्ही काहीच न करता हॅकर्सपर्यंत सहज पोहोचते . यामध्ये तुमचे फोटो , व्हिडियो , वैयक्तिक माहिती अशा सर्वांचा समावेश असतो . नेमटेस्ट्स डॉट कॉम ही अतिशय प्रसिद्ध अशी वेबसाईट असून त्याद्वारे फेसबुकवर वेगवेगळ्या क्वीझ सातत्याने टाकल्या जातात . याबाबत नुकतीच चौकशी करण्यात आली असून , असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही ज्याद्वारे युजर्सची माहिती हॅक केली जात असल्याचे समजेल . तसेच या माहितीचा गैरवापर केला जात असल्याचीही माहिती उपलब्ध नाही . त्यामुळे भविष्यात सोशल मीडियाचा वापर करताना आणि विशेषकरुन अशाप्रकारची अॅप्लिकेशन्स वापरताना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे .
1
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी हॉकी इंडियाने आज १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे . भारताची सर्वात अनुभवी खेळाडू राणी रामपालकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे . तर गोलकीपर सविताकडे संघाचं उप - कर्णधारपद सोपवण्यात आलेलं आहे . राष्ट्रकुल स्पर्धांसाठी भारतीय महिला संघाची अ गटात वर्णी लागलेली आहे . या गटात भारताला मलेशिया , वेल्स , इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांशी सामना करायचा आहे . भारतीय महिलांचा सलामीचा सामना ५ एप्रिलरोजी वेल्सच्या संघाविरुद्ध होणार आहे . दक्षिण कोरिया दौऱ्यात विश्रांती दिलेल्या गोलकीपर सविताने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी संघात पुनरागमन केलं आहे . भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी भारतीय महिलांचा संघ मोठ्या संघांना चकीत करु शकतो असा विश्वास वर्तवला आहे . काल हॉकी इंडियाने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताच्या पुरुष संघाचीही घोषणा केली होती . अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय हॉकी संघाची घोषणा , सरदार सिंहला वगळलं राष्ट्रकुल स्पर्धेसाठी असा असेल भारतीय महिलांचा संघ – गोलकीपर – सविता ( उप - कर्णधार ) , रजनी इटीमार्पू बचावफळी – दिपीका , सुनिता लाक्रा , दिप ग्रेस इक्का , गुरजीत कौर , सुशीला चानू मधली फळी – मोनिका , नमिता टोपो , निक्की प्रधान , नेहा गोयल , लिलीमा मिन्झ आघाडीची फळी – राणी रामपाल ( कर्णधार ) , वंदना कटारिया , लारेमिसामी , नवज्योत कौर , नवनीत कौर , पुनम राणी
2
‘लवरात्री’ या चित्रपटातून सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे . सलमानचा मेहुणा असल्यानेच मला हा चित्रपट मिळाला असं खुद्द आयुष याने म्हटलं आहे . सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला . या ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान आयुषनं पत्रकारांशी संवाद साधत पहिल्या चित्रपटाचा अनुभव सांगितला . ‘सलमानचा मेहुणा असल्यानंच मला हा चित्रपट मिळाला . पण मला चित्रपटसृष्टीत चांगले चित्रपट करून आणि माझ्या अभिनयाच्या जोरावर पुढे जायचं आहे , स्वतःला सिद्ध करायचं आहे , ’ असं तो म्हणाला . ‘मी खूप नशिबवान आहे कारण या क्षेत्रात वाट दाखवण्यासाठी , मला मार्गदर्शन करण्यासाठी सोबत सलमान आहे . या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच त्याने मला मार्गदर्शन केलं आहे . मी तुझ्यासाठी चित्रपट काढू शकतो , पण कॅमेऱ्यासमोर मात्र तुला स्वतःलाच उभं राहायचं आहे . तुझं अभिनय कौशल्य दाखवायचं आहे . त्यावेळी मी कोणतीच मदत करू शकत नाही , असं सलमान नेहमी मला सांगत असे . ऑडिशनसाठीही त्याने मला प्रशिक्षण दिलं , ’ असं आयुष सांगतो . कलाकारांना नेहमीच प्रसिद्धी हवीशी वाटते , मात्र तुमचा चित्रपट अपयशी ठरतो तेव्हा तुमच्याबद्दल चांगल्या - वाईट गोष्टी बोलल्या जातात . अशा सर्व गोष्टी सांगत सलमाननं माझ्याकडून पहिल्या चित्रपटासाठी शंभर टक्के काम करून घेतलंय , असंही आयुषनं सांगितलं . वाचा : प्रभूदेवाच्या ‘उर्वशी’ गाण्याला अनोख टच ; रिक्रिएटेड व्हर्जनवर थिरकणार शाहिद कपूर - कियारा अडवाणी प्रेमाचा पहिला बहर आणि एखाद्या प्रेमळ व्यक्तीचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्यावर साऱ्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलतो , याचं चित्रण ‘लवरात्री’तून करण्यात आलं आहे . अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत . त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो , हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .
0
जुनाट चेतावेदनेशी संबंधित आजारावर प्रभावी औषध तयार होण्याच्या मार्गावर आहे . चेतावेदना प्रकारात दात किंवा चेहऱ्याच्या काही भागात थेट मेंदूत वेदना जाणवतात , त्या विकाराला ट्रायजेमिनल न्यूरालगिया असे म्हटले जाते . यात काही औषधे उपलब्ध असली तरी त्यांचे दुष्परिणाम अधिक आहेत . या विकारात अतिशय तीव्र वेदना दात व चेहऱ्याच्या भागात जाणवतात . या वेदना दाढी करणे , मेकअप करणे , शॉवर घेणे , बोलणे , ब्रशने दात घासणे या कृतीतही जाणवतात . काही वेळा जोराच्या वाऱ्याचा स्पर्श झाल्यानेही वेदना तीव्र होतात . ट्रायजेमिनल नव्र्ह ही कवटी , चेहरा व तोंडाच्या खळग्यात असते , ती यात दुखावली जाते . या दुखण्यावर बीआयआयबी ०७४ हा पदार्थ शोधून काढण्यात आला असून त्यात वेदना कमी करता येतात , असे स्वित्र्झलडमधील झुरिच विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आले आहे . यामुळे सोडियम मार्गिका १ . ७ बंद केली जाते . यातून वेदना मेंदूपर्यंत पोहोचते व ठणका लागत असतो . यावर सध्या जी औषधे आहेत त्यात थकवा येणे , लक्ष न लागणे असे परिणाम होतात . आता नवीन औषधामुळे हे दुष्परिणाम न होता वेदना कमी होतील , असे झुरिच विद्यापीठाचे दंतरोगतज्ज्ञ डॉमनिक एटलिन यांनी सांगितले . या पदार्थाच्या आणखी चाचण्या घेतल्या जाणार आहेत . साधारण दहा हजार लोकांमध्ये १३ जणांना दरवर्षी ट्रायजेमिनल न्यूरालगियाचे निदान होत असते . हा विकार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त होतो . मल्टिपल स्क्लेरॉसिस असलेल्या १ टक्के रुग्णांना हा विकार होतो .
1
हॉलिवूड अभिनेता पिअर्स ब्रॉस्नॅन गेल्यावर्षी पान मसालाच्या जाहिरातीमुळे चांगलाच चर्चेत आला होता . हॉलिवूडमधला हा जेम्स बॉन्ड भारतात पान मसाल्याची जाहिरात करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता , विशेष म्हणजे आपण शरीरास हानिकारक पदार्थाची जाहिरात करतोय हे मला माहितीच नव्हतं असं म्हणत पिअर्सनं त्यावेळी या प्रकरणातून काढता पाय घेतला होता . पण आता दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागानं पिअर्स ब्रॉस्नॅनला कारणे दाखवा नोटीस बजावली असून दहा दिवसात उत्तर देण्याचे आदेश त्याला दिले आहेत . दिल्ली सरकारच्या तंबाखू नियंत्रण कक्षाचं म्हणणं आहे की पान मसाल्याच्या आडून तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली जात आहे . सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण अधिनियमाप्रमाणे २००३ पासून तंबाखूजन्य पदार्थांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या जाहिरातबाजी करण्यावर बंदी आहे . पण वेगवेगळ्या माध्यमांची मदत घेऊन देशभरातील अनेक दुकानांत पान मसाल्याची विक्री खुलेआमपणे सुरू आहे असं तंबाखू नियंत्रण कक्षाचे अतिरिक्त संचालक एसके अरोडा यांचं म्हणणं आहे त्यामुळे पिअर्स ब्रॉस्नॅनयांच्यावर सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियंत्रण अधिनियमाप्रमाणे कारवाई होणार आहे . पिअर्स यांनी पान मसाल्याची जाहिरात केली होती . यात सुपारीचा वापर केला जातो आणि सुपारीमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक आहेत असं एका अहवालातून समोर आलं आहे . पिअर्स हे जगभरातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत तेव्हा त्यांनी अशा पदार्थांची जाहिरात करणं हे चुकीचं आहे त्यामुळे पिअर्स यांना नोटीस बजवण्यात आली आहे . याआधीही पिअर्स यांना नोटीस बजावण्यात आली होती . पान मसाल्याची जाहिरात केली म्हणून पिअर्स यांच्यावर सोशल मीडियाद्वारे कडाडून टीका करण्यात आली होती . तेव्हा ही तंबाखूजन्य उत्पादनाची जाहिरात असल्याची पूर्वकल्पना आपल्याला नव्हती असं एका मुलाखतीत स्पष्ट करत त्यांनी कंपनीशी करार रद्द केला होता .
0
गेल्या तीन दशकांपासून आपल्या दमदार अभिनय कौशल्याने अभिनेते परेश रावल यांनी बरेच चित्रपट गाजवले . आगामी संजय दत्तच्या ‘संजू’ या बायोपिकमध्ये ते सुनील दत्त यांची भूमिका साकारणार आहेत . याशिवाय आणखी एक आव्हानात्मक भूमिका ते भविष्यात साकारणार आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका . गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीची चर्चा ऐकायला मिळत होती . अखेर त्यावर परेश रावल यांनी शिक्कामोर्तब केला आहे . पुढील काही महिन्यांत त्याच्या शूटिंगला सुरुवात होणार असून परेश रावल यामध्ये मोदींची भूमिका साकारणार आहेत . वाचा : फुटबॉल सामनादरम्यान रणबीर कपूरला दुखापत ‘चित्रपटाच्या कथानकावर सध्या काम सुरू असून पुढील काही दिवसांत ते पूर्ण होईल . त्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत , ’ अशी माहिती त्यांनी दिली . परेश रावल हे स्वतः भाजपा खासदार असून मोदींची भूमिका साकारणं काही सोपं नाही असं त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं . ‘ही सर्वात अवघड आणि आव्हानात्मक भूमिका आहे , ’ असं ते म्हणाले . १९९४ मध्ये त्यांनी ‘सरदार’ या बायोपिकमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची व्यक्तिरेखा साकारली होती . आता मोदींच्या लूकमध्ये परेश रावल यांना पाहण्याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे . सूत्रांच्या माहितीनुसार , रावल हे स्वतः चित्रपटाची निर्मितीसुद्धा करत आहेत .
0
बॉलिवूडमध्ये कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या आणि व्यावसायिकतेच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकत असले तरीही या चौकटीपलीकडे जात कलाकारांमध्ये नात्याचे अनोखे बंध असतात हे नाकारता येणार नाही . मित्र , बहिण - भाऊ , गुरु , सल्लागार , ते अगदी आई - वडिलांचे आदराचे नातेही काही कलाकारांमध्ये खुलल्याचे पाहायला मिळते . बॉलिवूडमध्ये अशा काही कलाकारांची नाती सर्वज्ञात आहेत . त्याचाच प्रत्यय काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘स्टारडस्ट’ पुरस्कार सोहळ्यात आला . जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने अनेकांना भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यापुढे नतमस्तक होत अभिनेता ऋषी कपूर यांनी आशाताईंचा आशिर्वाद घेतला , असे वृत्त आज तक या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे . पुरस्कार सोहळे म्हटलं की कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार यात शंकाच नाही . नुकत्याच पार पडलेल्या स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यातही असेच काहीसे दृशय पाहायला मिळाले . दिग्गज कलाकारांपासून ते अगदी नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती . मनिष पॉलच्या खुमासदार सुत्रसंचालनाने या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढविली होती . याच कार्यक्रमादरम्यान मनिषने सेलिब्रिटी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आशाताईंना व्यासपीठावर येण्याची विनंती केली . त्यासोबतच मनिषने आशाताईंना ‘हमने तुमको देखा…’ गाणे गाण्याची सुद्धा विनंती केली . आशाताईंनीही या विनंतीचा स्वीकार करत गाणे गायले आणि हे गाणे गात असतानाच समोर बसलेल्या ऋषी कपूर यांना इशारा करत ‘वो रहा मेरा हिरो . . ’ असे त्या म्हणाल्या . कारण , हे गाणे अभिनेता ऋषी कपूर यांच्यावरच चित्रित करण्यात आले होते . वाचाः ‘सध्याच्या घडीला आमिरच बॉलिवूडमधील राज कपूर’ आशाताईंच्या या धम्माल अंदाजाला दाद देण्यासाठी ऋषी कपूर यांनी त्यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशिर्वाद घेतला . सोबतच ऋषी कपूर यांनीसुद्धा आशाताईंना त्यांच्या गाण्यात साथ दिली . ऋषी कपूर आणि आशा भोसले यांच्यामध्ये असलेल्या या अनोख्या नात्याने त्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उपस्थितांचे लक्ष वेधले . त्यावेळी उपस्थित कलाकारांच्या चेहऱ्यावरील भावही पाहण्याजोगे होते . उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात आशाताई आणि ऋषी कपूर यांचे कौतुक केले . कलाकारांचे धम्माल परफॉर्मन्सेस आणि त्यासोबत होणारा पुरस्कार , कौतुकाच्या वर्षावात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण लवकरच करण्यात येणार आहे . त्यामुळे प्रेक्षकांनाही स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यातील ही धम्माल पाहता येणार आहे .
0
चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पत्करावा लागलेला पराभव आजही अनेक भारतीयांच्या मनात सलतोय . भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले , मात्र एकट्या हार्दीक पांड्याने पाकिस्तानी आक्रमणाचा नेटाने सामना केला . हार्दीक पांड्या सामना भारताच्या बाजूने झुकवणार अस वाटतच असताना चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पांड्या रनआऊट झाला आणि पाकिस्तानने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केलं . यावेळी मैदानात हार्दीक पांड्याचं संतापलेलं स्वरुप सर्व भारतीयांनी पाहिलं होतं . अनेकांनी सोशल मीडियावरुन यासाठी रविंद्र जाडेजाला जबाबदार ठरवलं . तर काहींनी अशावेळी जाडेजाने आपल्या विकेटवर पाणी सोडायला हवं होतं असही मत व्यक्त केलं . मात्र त्या सामन्यात धावांची बरसात करणाऱ्या हार्दीक पांड्याचं या प्रकाराविषयी वेगळचं मत आहे . वेस्ट इंडिजमध्ये पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पांड्याने घडलेल्या प्रकाराविषयी म्हणलं की , ”तो त्या सामनात्यातला एक महत्वाचा क्षण होता . मी चांगली फलंदाजी करत होतो त्यामुळे मी भारताला या परिस्थितीतही सामना जिंकवून देईन अशी आशा मला होती . मात्र त्याचवेळी मी बाद झाल्यामुळे मला प्रचंड राग आला होता . मात्र जितक्या लवकर मला राग येतो तितक्या लवकर मी शांतही होतो . ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर अवघ्या ३ मिनीटात मी ताळ्यावर आलो मी इतर खेळाडूंसोबत हसत खेळत होतो . मला बघून माझे काही सहकारीही चांगलेच हसत होते . ” या सामन्यात जर हार्दीक पांड्या अखेरपर्यंत टीकला असता तर त्याने नक्कीच भारताला विजय मिळवून दिला असता . याचसोबत ही खेळी त्याच्या करिअरच्या दृष्टीनेही एक टर्निंग पॉईंट ठरु शकली असती . मात्र दुर्दैवाने तसं घडलं नाही आणि सामना पाकिस्तानने जिंकत चॅम्पियन्स करंडक आपल्या नावे केला .
2
मालिका आणि रिअॅलिटी शो विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि सध्याच्या घडीला प्रकाशझोतात असणाऱ्या अभिनेत्री हिना खानने एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे . ‘बिग बॉस’ या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या ११व्या पर्वाची उपविजेती ठरलेल्या हिनाने आपल्याला या कार्यक्रमाविषयी काही आठवत नसल्याचं स्पष्ट केलं आहे . तिच्या या वक्तव्याने थक्क होऊन जाऊ नका . कारण फक्त ‘बिग बॉस’च नव्हे , तर जवळपास आठ वर्षे ज्या कार्यक्रमात तिने मुख्य भूमिका साकारली , ज्या कार्यक्रमामुळे तिला कलाविश्वात वेगळी ओळख मिळाली , त्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेविषयीसुद्धा तिला फार गोष्टी आठवत नसल्याचं खुद्द हिनानेच स्पष्ट केलं आहे . ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना तिने याविषयीचा खुलासा केला . ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर गोष्टी बऱ्याच बदलल्या होत्या . लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता , असं तिने स्पष्ट केलं . पण , याच कार्यक्रमाविषयी आपल्याला आता फार काही आठवत नसल्याचंही ती म्हणाली . ‘मी तुम्हाला अगदी खरं सांगतेय की मला त्याविषयी काही आठवतच नाही . मी गोष्टी लगेच विसरते . किंबहुना आठ वर्षे ज्या मालिकेत मी काम केलं , त्याविषयीसुद्धा मला फार काहीच लक्षात नाही . हे थोडं विचित्र आहे . पण , खऱ्या आयुष्यात मी ही अशीच आहे . मी सतत पुढे जात राहते . भूतकाळात अडकून राहणाऱ्यांपैकी मी नाही’ , असं हिना म्हणाली . Bigg Boss Marathi : विजेती मेघा धाडेबद्दल जाणून घ्या ‘या’ पाच गोष्टी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमातील फार काही गोष्टी न आठवणारी हिना कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या संपर्कात मात्र आहे . या ठिकाणी प्रत्येकजण त्यांची खेळी खेळतो , असं म्हणणाऱ्या हिनाने आपण आजही प्रियांका शर्मा , लव त्यागी आणि विकास गुप्ता यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं . तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना आणि या दोन्ही कार्यक्रमांशी संबंधित व्यक्तींना थोडा धक्का बसला असणारच यात शंका नाही .
0
१७ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघाचा इटलीवरील विजय फसवा भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाने शुक्रवारी इटलीच्या संघावर २ - ० असा विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली , असा दावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ( एआयएफएफ ) जाहीर केलेल्या प्रत्येक निवेदनातून केला जात आहे . हा विजय भारतीय फुटबॉल क्षेत्राचा नवा अध्याय असल्याची कौतुकाची थापही एआयएफएफ आपल्या पाठीवर मारून घेत आहे . मात्र या विजयामागचे सत्य वेगळेच आहे . भारत ज्या संघाविरुद्ध खेळला तो इटलीचा राष्ट्रीय संघ नसून तेथील तिसऱ्या व चौथ्या विभागीय स्तरावरील खेळाडूंचा समावेश असलेला संघ होता . त्यामुळे एआयएफएफकडून करण्यात आलेली ऐतिहासिक विजयाची ‘बनवाबनवी’ उघड झाली आहे . इटलीचा १७ वर्षांखालील राष्ट्रीय संघ ९ मे रोजी अखेरचा सामना खेळला . युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेतील ( १७ वर्षांखालील ) या लढतीत टर्कीने २ - १ असा विजय मिळवला . तसेच भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेची पात्रता मिळवण्यातही इटलीला अपयश आले आहे . भारताविरुद्ध खेळणाऱ्या त्या संघात एकाही राष्ट्रीय संघातील खेळाडूचा समावेश नव्हता . तेथील तिसऱ्या व चौथ्या विभागीय स्पर्धेतील ( त्यांना अनुक्रमे लेगा प्रो व लेगा प्रो २ असे संबोधले जाते ) खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाविरुद्ध भारताने हा विजय मिळवला आहे . यापैकी एकाही खेळाडूने युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेत इटलीचे प्रतिनिधित्व केलेले नव्हते . तरीही या विजयाने फुटबॉल क्षेत्रात गोंधळाचे वातावरण निर्माण केले . माजी फुटबॉलपटू , क्रिकेटपटू , सिने अभिनेते , महासंघाचे अधिकारी , क्रीडा मंत्रालय आणि आशियाई फुटबॉल महासंघ या ‘ऐतिहासिक’ विजयाच्या जल्लोषात मश्गूल झाले . सर्वानी प्रशिक्षक लुइस नॉर्टन डे मॅटोस आणि त्यांच्या संघाचे भरभरून कौतुकही केले , परंतु या सामन्याचा निकाल इटालियन फुटबॉल महासंघाच्या अधिकृत संकेतस्थळावर शोधूनही सापडला नाही . त्याबाबतची माहिती ( खेळाडूंच्या नावांसह ) लेगा प्रोच्या संकेतस्थळावर सापडली . त्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार , तो संघ ‘राष्ट्रीय लेगा प्रो’चा प्रतिनिधित्व करणारा असल्याचे नमूद केले होते . त्यामध्ये मोडेना , पॅर्मा , अब्लिनोलेफ , पॅडुआ आणि कॅरारा या क्लबमधील खेळाडूंचा समावेश होता आणि त्यांना डॅनिएल अॅरिगोनी हे मार्गदर्शन करीत होते . एमिलियानो बिगिसा हे इटलीच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत . भारतात होणाऱ्या फुटबॉल ( १७ वर्षांखालील ) विश्वचषक स्पध्रेच्या पूर्वतयारीसाठी भारतीय संघ परदेश दौऱ्यावर गेला आहे . आतापर्यंत या दौऱ्यातील ७ सामन्यांत पाचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला , तर दोन सामने अनिर्णित राहिले . या निराशाजनक कामगिरीकडून लक्ष हटविण्यासाठी एआयएफएफकडून हा फसवा दावा करण्यात येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे .
2
आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंगच्या आयुष्यात एक नवे वळण आले आहे . काही दिवसांपूर्वीच गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगमध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची लग्नगाठ बांधली गेली . चार दिवस रंगलेल्या या सोहळ्यात बऱ्याच टेलिव्हिजन सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती . सोशल मीडियावरही # bhartikibaraat या हॅशटॅगसह अनेकांनीच भारती आणि हर्षच्या लग्नाचे फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळाले . लग्नसोहळ्यानंतरही भारतीचे पोस्ट वेडिंग फोटो अनेकांचे लक्ष वेधत आहेत . सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळते . तीच उत्सुकता लक्षात घेत खुद्द भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले . लग्नसोहळा आटोपल्यानंतर या नवविवाहित दाम्पत्याने गोव्यातील काही निसर्गरम्य ठिकाणी खास क्षण व्यतीत केले . आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवासाला सुरुवात झाली आहे , असे कॅप्शन देत भारतीने हर्षसोबतचा एक फोटो पोस्ट केला . तर , हर्षनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीसोबतचा फोटो पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला . वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये ? गोव्यात काही खास क्षण व्यतीत केल्यानंतर ही जोडी मुंबईतही परतली . तेव्हा आता काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा कार्यक्रम आणि ठरलेल्या वेळापत्रकाकडे वळतील असे म्हटले जात आहे . एका रिअॅलिटी शोच्या सेटवर भारती आणि हर्षची भेट झाली होती . ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट ‘वगैरे ज्या काही संकल्पना आहेत , तसे त्यांच्यात काहीच झाले नाही . पण , कलाकारांच्या प्रेमकहाणीत असणारी मजेशीर वळणं मात्र त्यांच्या प्रेमकहाणीला आणखीनच खास टच देऊन गेली . त्यांचे हे नाते नेमके कसे खुलत गेले त्याचा प्रवास त्यांनी एका वेब शोच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणला आहे . ‘ऑनबोर्ड लाइव्ह’ या युट्यूब चॅनलवर # BhartiKiBaraat या नावाने वेब शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे .
0
राजीव मेहता सरचिटणीसपदी आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे ( एफआयएच ) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ( आयओए ) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे , तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे . आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवडय़ात अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ६० वर्षीय बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला होता . आयओएच्या निवडणुकीतून मी माघार घेत असून , अध्यक्षपदासाठी बात्रा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत आहे , अशा आशयाचे पत्र खन्ना यांनी आयओए निवडणूक आयोगाला लिहिले होते . मात्र हे पत्र खन्ना यांनी ३ डिसेंबरची माघार घेण्याची मुदत उलटल्यानंतर पाठवले होते . त्यामुळे औपचारिकता म्हणून झालेल्या निवडणुकीत बात्रा यांना १४२ मते पडली , तर खन्ना यांना १३ मते मिळाली . सरचिटणीस पदासाठी मेहता हे एकमेव उमेदवार असल्यामुळे सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ते पद सांभाळणार आहेत . भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष बिरेंद्र बैश्य हेसुद्धा सुरुवातीला अध्यक्षपदासाठी उत्सुक होते . मात्र त्यांनी अचानक माघार घेतली . दिल्ली उच्च न्यायालयामुळे निवडणुकीपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते . क्रीडा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न क्रीडा प्रशासक अॅड . राहुल मेहरा यांनी केला . मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला . कोषाध्यक्ष पदासाठी आनंदेश्वर पांडे यांची निवड झाली आहे , तर वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आर . के . आनंद यांनी जनार्दनसिंग गेहलोत यांचा ९६ - ३५ असा पराभव केला . अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा , २०३०च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करणार आहे . या स्पर्धाच्या आयोजनासाठी सरकारचे आर्थिक बळ महत्त्वाचे असते . - नरिंदर बात्रा , भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष
2
सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर तामिळनाडूने देवधर चषक क्रिकेट स्पर्धेत भारत अ संघावर ७३ धावांनी मात केली . तामिळनाडूने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावांची मजल मारली . कर्णधार दिनेश कार्तिकने ६ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली . नारायण जगदीशनने ७१ धावा केल्या . भारत अ संघातर्फे शार्दूल ठाकूरने ३ बळी घेतले . प्रत्युत्तरादाखल खेळताना भारत अ संघाचा डाव २३० धावांतच आटोपला . मनदीप सिंगचे शतक व्यर्थ ठरले . त्याने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ९७ धावांची खेळी केली . मनदीपला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही . राहिल शाह आणि रविश्रीनिवासन साई किशोर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले . या विजयासहतामिळनाडू संघाने २ गुणांची कमाई केली . संक्षिप्त धावफलक तामिळनाडू : ५० षटकांत ६ बाद ३०३ ( दिनेश कार्तिक ९३ , नारायण जगदीशन ७१ ; शार्दूल ठाकूर ३ / ४९ ) विजयी विरुद्ध भारत अ : ४४ . ४ षटकांत सर्वबाद २३० ( मनदीप सिंग ९७ ; राहील शाह ३ / ३७ ) .
2
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तानचा एक चाहता चर्चेचा विषय ठरला आहे . त्याने पाकिस्तानच्या वन - डे संघातील क्रिकेटपटूंची जर्सी घातली आहे . ही जर्सी अशासाठी विशेष आहे , की मागील बाजूस धोनी असे नाव असून त्याचा नंबर सातही आहे . अलीकडेच आसाममध्ये एका सामन्यादरम्यान शाहीद आफ्रिदीच्या नावाची जर्सी घातल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी रिपोन चौधरी नामक चाहत्याला ताब्यात घेतले होते . त्यावर आफ्रिदीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती . क्रिकेटवरून राजकारण खेळले जाणे वाईट असल्याचे तो म्हणाला होता . जानेवारीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधील ओकारा येथे उमर दराझ नामक पाक चाहता चर्चेत आला होता . विराट कोहलीचा फॅन असल्याचे जाहीर करत त्याने घरावर तिरंगा झळकाविला होता . त्याबद्दल अटक करून त्याला दहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला . नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली . मेलबर्नमधील या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाला . हा फोटो पोस्ट करून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या . भारत - पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात , अशी प्रतिक्रियाही एका चाहत्याने व्यक्त केली आहे .
2
प्रासंगिक प्रशांत मोरे – response . lokprabha @ expressindia . com सिनेमा पाहताना काही प्रमाणात का होईना , डोके बाजूला ठेवावे लागते . रूपेरी पडद्यावरचे विश्व वेगळे असते , सरावाने त्याची सवय होत असते आणि त्यात वावगेही नसते . कारण सिनेमागृहात येणारी व्यक्ती स्वतःची दोन घटका करमणूक करण्याच्या हेतूने आलेली असते . त्यामुळे पडद्यावरील लार्जर दॅन लाईफ चित्रण तो गमतीने घेतो . मात्र सिनेमागृहातील ही करमणूक हल्ली मध्यंतरात भलतीच महाग पडू लागली आहे . कारण बहुतेक बहुपडदा ( मल्टिप्लेक्स ) सिनेमागृहांमध्ये अगदी मोजकेच खाद्यपदार्थ आणि तेही अवाच्या सवा किमतीला मिळतात . त्यामुळे करमणुकीबरोबरच हजारो सिने शौकिनांची मध्यंतरात चक्क फसवणूक होत असते . कोणत्याही बहुपडदा सिनेमागृहात सर्वसाधारणपणे कोक , पॉपकॉर्न , उकडलेले मके , सामोसे आणि आईस्क्रीम इतकेच पर्याय उपलब्ध असतात . तेही बाजारभावापेक्षा कित्येकपट अधिक किमतीत . कोकचा एक मोठा जार आणि पॉपकॉर्न प्रत्येकी ७५ म्हणजेच १५० रुपयांना पडतो . सामोशाची किंमत २० रुपये . पॉपकॉर्न आणि कोकच्या मोठय़ा ग्लासाची किंमत बाहेर बाजारात जास्तीत जास्त ५० रुपये होईल . म्हणजे जवळपास तिप्पट दराने हे पदार्थ विकले जातात . सामोसा कुठेही घेतला तरी १० ते १२ रुपयांच्या वर त्याची किंमत नसते . त्यासाठी २० रुपये ? पूर्वी सिनेमागृहात पाणी न्यायलाही बंदी होती . मध्यंतरी त्याविरुद्ध आवाज उठविल्यानंतर आता पाण्याची बाटली अडवत नाहीत , इतकेच . बहुतेक सर्व सिनेमागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत . त्यामुळे तिथे या वस्तू आणायला जादा वाहतूक खर्च वगैरे होतोय , असेही नाही . थिएटरमध्ये बसून आरामात चित्रपट पाहत खाण्याची किंमत म्हणून काही जास्तीचे शुल्क जरूर घ्यावे . त्या चैनीसाठी बाहेर उपलब्ध असलेल्या किमतीपेक्षा दहा - वीस टक्के अधिक दर आकारला तर ते ठीक होते . मात्र सध्या हे दर सरासरी शंभर ते दोनशे टक्के अधिक आहेत . सिनेमा पाहायला येणाऱ्या ग्राहकांची ही लूट आहे . एकीकडे शासकीय यंत्रणा या दरांवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरली , तर दुसरीकडे सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्या राजकीय पक्षांनीही याबाबतीत उदासीनता दाखवली . गेल्या आठवडय़ात उच्च न्यायालयाने सिनेमागृहातील खाद्य पदार्थाच्या दरांबाबत आवाज उठविल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी आंदोलने केली . मात्र याविषयासंदर्भात जी व्यापक चर्चा व्हायला हवी , ती मात्र अद्याप झालेली नाही . दुसरे महत्त्वाचे म्हणजे सिनेमा हा फक्त पॉपकॉर्न खाऊनच पाहायला हवा असा काही नियम आहे का ? बहुतेकांना पॉपकॉर्न आवडत असेलही , पण चणे , शेंगदाणे आदी तत्सम पदार्थ खावे असे वाटणारेही असतीलच की . एरवी बाहेर बाजारात शीतपेयांचे अनेक प्रकार उपलब्ध असतात . मग थिएटरमध्ये कोकच का ? तिथे येणाऱ्या प्रेक्षकांना लिम्का , फँटा अथवा इतर शीतपेयांचे पर्याय का निवडता येत नाहीत ? संबंधित मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकांनी या खाद्यपदार्थ विक्रेत्यांसोबत तसा करार केला असण्याची शक्यता आहे . मात्र ते जर खरे असेल , तर मग असे करार करताना सिनेमा पाहायला येणारा प्रेक्षक जो ग्राहक आहे , त्याला विश्वासात का घेतले नाही ? या लूटमारीमुळे एरवी बाहेर राजा असणारा ग्राहक सिनेमागृहात मात्र अगदीच केविलवाणा होत असतो . मध्यंतर जेमतेम पाच - दहा मिनिटांचा असतो . प्रेक्षकांना स्वच्छतागृहात जाऊन येऊन पुन्हा उर्वरित चित्रपट पाहण्याची घाई असते . त्यामुळे एखाददुसरा अपवाद वगळला तर या अवाजवी दरांविरुद्ध विक्रेत्यांशी हुज्जत घालायच्या कुणी फंदात पडत नाही . सर्वसामान्य व्यक्ती वर्ष सहा महिन्यातून एखाददुसऱ्या वेळी सहकुटुंब सिनेमा पाहायला येत असते . त्यामुळे कुटुंबप्रमुख बिचारा स्टॉलवरील विक्रेता जी सांगेल की किंमत मोजून मोकळा होतो . मात्र एकूणच खाद्यपदार्थाच्या या अवाजवी किमतीमुळे बहुपडदा सिनेमागृहांमध्ये सहकुटुंब चित्रपट पाहायला येणाऱ्यांची अवस्था ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशी होते . तिकीट खर्चापेक्षा मध्यंतरातील या खाण्यावर जास्त पैसे खर्च होतात . आधीच टी . व्ही . मुळे सिनेमागृहातील प्रेक्षकसंख्या घटली आहे . त्यात आता इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या विविध संकेतस्थळांद्वारेही घरबसल्या सिनेमा पाहण्याची सोय उपलब्ध आहे . अशा परिस्थितीत खाद्यपदार्थाचे हे दर असेच चढे राहिले तर या बहुपडदा सिनेमागृहांकडे कुणीतरी फिरकेल का ? बाकी बाजारातील वस्तूंच्या कमाल किमतींवर शासकीय यंत्रणांचे नियंत्रण असते . ठरावीक किमतीपेक्षा अधिक कुणी पैसे घेत असेल , तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येते . मग सिनेमागृहातील खाद्य वस्तूंच्या दरावर कुणाचेच कसे नियंत्रण नाही ? आता न्यायालयाने आदेश दिल्यानंतर तरी करमणुकीच्या नावाखाली सर्रास सुरू असलेल्या फसवणुकीला लगाम लागणार का ? सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर आंदोलने करण्याची भाषा करणारे राजकीय पक्ष याची दखल घेणार का ? की मनोरंजनाच्या क्लोरोफॉर्मची भूल पडलेल्या प्रेक्षकांचे खिसे भविष्यातही असेच कापले जाणार आहेत ? सौजन्य – लोकप्रभा
0
आशियाई चषकासाठी भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारताचा संघ २७ डिसेंबरला अबुधाबी येथे ओमानशी झुंजणार असल्याचे फुटबॉल महासंघाने म्हटले आहे . संयुक्त अरब अमिरातमध्ये ५ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान आशियाई चषकाचे सामने रंगणार आहेत . भारतीय फुटबॉल संघाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून दर्जेदार देशांविरुद्ध खेळला जाणारा हा तिसरा सामना आहे . भारताने यापूर्वी चीनविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधली होती . तर जॉर्डनविरुद्धच्या सामन्यात भारताला १ - ० असा निसटता पराभव स्वीकारावा लागला होता . आशियाई चषकामध्ये भारतीय संघाचा समावेश अ गटात तर ओमानचा संघ फ गटात आहेत . फिफाच्या जागतिक क्रमवारीनुसार ओमानचा संघ ८४ व्या स्थानी तर भारताचा संघ ९७ व्या स्थानावर आहे . आशियाई चषकात भारताचा पहिला सामना ६ जानेवारीला थायलंडशी अबुधाबी येथे होणार आहे . त्याशिवाय भारताच्या गटात बहारिन आणि संयुक्त अरब अमिरात यांचादेखील समावेश आहे . त्या पाश्र्वभूमीवर भारताचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाइन यांनी भारताला ओमानविरुद्धचा सामना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले . ‘‘बहारिन आणि संयुक्त अरब अमिरात या संघांची फुटबॉल खेळण्याची शैली ओमानशी मिळती जुळती आहे . भारताला अ गटात या दोन्ही संघांशी झुंजायचे असल्याने त्या शैलीत खेळणाऱ्या संघांविरुद्ध खेळणाऱ्यांशी कशी लढत द्यायची त्याची पूर्वतयारी होणार आहे . भारतीय खेळाडूंना आपापसातील ताळमेळ राखणे आणि काय करायचे आहे , ते समजून खेळ करण्यावर भर द्यायला हवा , ’’ असेदेखील कॉन्स्टन्टाइन यांनी नमूद केले .
2
ब्रिटन आणि भारत या दोन देशांमधील आरोग्य आणि त्याच्याशी जोडलेल्या विविध क्षेत्रांतील गुंतवणूक आणि सहकार्यविषयक झालेल्या सामंजस्य कराराविषयी चर्चा करण्यासाठी ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचे ( एनएचएस ) चे अध्यक्ष सर मालकोम गॅ्रन्ट यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ भारतभेटीवर आले आहे . या प्रतिनिधी मंडळाचा भारतदौरा हा सुनियोजित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी आरोग्य क्षेत्रातील भरीव गुंतवणूक आणि परस्पर सहकार्यासाठी भर देण्याचे मान्य केल्याचे ब्रिटनच्या उच्च आयोगाच्या सूत्रांनी सांगितले . त्याचबरोबर या भेटीदरम्यान भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमध्ये ११ आरोग्य संस्थांच्या उभारणीवरदेखील विशेष भर दिला जाणार आहे . या अंतर्गत जून ६ ते ८ ला ब्रिटनमधील आधुनिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीवर असलेल्या २३ कंपन्यांचे एक पथक मुंबईला भेट देणार असून भारताच्या स्मार्ट हेल्थ केअरच्या मोहिमेला या अंतर्गत पाठिंबा दिला जाणार आहे . या वेळी सर मालकोम यांच्या हस्ते दिल्लीतील एका प्रदर्शिनीचे उद्घाटन केले जाणार असून त्यादरम्यान आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरेकडील प्रमुख रुग्णालयांसोबत आयोजित बैठकीतदेखील सहभागी होणार आहेत . त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या विविध कंपन्या आणि गुंतवणूकदार यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत . तर मुंबईतील एका प्रदर्शिनीचे उद्घाटनदेखील केले जाणार असून याप्रसंगी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि अपोलो हॉस्पिटलचे प्रताप रेड्डीदेखील उपस्थित राहणार आहेत . या वेळी महाराष्ट्रातील आरोग्यविषयक विविध सेवांचे सक्षमीकरण आणि खासगी रुग्णालयांच्या , नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या कंपन्या आणि मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल ( केईएम ) वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधणार आहेत .
1
तुम्ही तुमच्या मोबाईलवरील व्हॉटसअॅप या सोशल मीडियावरचे अॅडमिन आहात ? एखाद्या तरी ग्रुपचे नक्की असाल…त्यांच्यासाठी एक खूशखबर आहे . व्हॉटसअॅपच्या अॅडमिनला एक नवीन अधिकार मिळणार आहे . आता असा कोणता अधिकार आहे जो या अॅडमिनला मिळू शकेल ? तर एखाद्या ग्रुपचा फोटो , नाव कोण बदलू शकेल हे आता अॅडमिन ठरवणार आहे . या नव्या फिचरचे टेस्टिंग सुरु असून थोड्याच दिवसात ते वापरात येईल असे म्हटले जात आहे . WABetaInfo . com नुसार एका वेबसाईटकडून या नव्या फिचरचे टेस्टिंग सुरु आहे . गुगल प्लेमध्ये हे नवे फिचर असलेले व्हॉटसअॅपचे २ . १७ . ३८७ हे व्हर्जन उपलब्ध आहे . काही दिवसांतच ज्यांनी आपले व्हॉटसअॅप अपडेट केले आहे त्यांना हे फिचर उपलब्ध होणार आहे . विशेष म्हणजे ज्याने एखादा ग्रुप तयार केला आहे त्या व्यक्तीला ग्रुपमधील इतर अॅडमिन त्या ग्रुपमधून बाहेर काढू शकणार नाहीत . याशिवाय व्हॉटसअॅपकडून डिलीट फॉर एव्हरीवन आणि एनसेंड फिचरही लवकरच ग्राहकांना वापरता येईल असे सांगण्यात आले आहे . याशिवायही व्हॉटसअॅप कायमच आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही अपडेटेड फिचर्स देण्यासाठी प्रयत्न करत असते . त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच व्हॉटसअॅपने एक नवीन सुविधा आपल्या ग्राहकांना दिली आहे . फोन नंबर बदलला की युजर्स नवीन नंबरवरून व्हॉट्स अॅप सुरू करतात . आता आपला नवीन नंबर प्रत्येकाकडेच असतो असं नाही , तेव्हा प्रत्येकला वैयक्तिक मेसेज करून सांगावं लागतं . युजर्सची ही अडचण लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणलं आहे . त्यानुसार , जर युजरने नंबर बदलला तर त्याचे नोटीफिकेशन त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येक व्यक्तीला जाणार आहे . त्यामुळे प्रत्येकाला वैयक्तिक मेसेज करून माहिती देण्याचे ग्राहकांचे श्रम वाचणार आहेत . आपल्या बदललेल्या नंबरची माहिती कोणाला द्यायची किंवा कोणाला नाही , हे देखील युजर ठरवू शकतो . नुकतंच व्हॉट्सअॅपने भारतीयांसाठी लाईव्ह लोकेशन शेअरचं फीचर आणलं होतं . त्यामुळे युजर्सना आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करता येणार आहे . युजर्सच्या सुरक्षेसाठी याचा अधिक फायदा होईल असंही म्हटलं जातं आहे .
1
आपल्याला बऱ्याचदा झटपट होणारे काही तरी हवे असते . पण झटपट करण्याच्या नादात त्यातली पोषणमूल्ये मात्र आपण हरवून बसतो . ही पाककृती नेहमी घाईत असणाऱ्यांसाठी खास . हिचे वैशिष्टय़ म्हणजे ही जरी झटपट होणारी असली तरी पोषणमूल्येही त्यात भरपूर आहेत . याला ओट्स इन जार असे म्हणतात . साहित्य काचेची बऱ्यापैकी आकाराची आणि मोठय़ा तोंडाची बरणी , रोल्ड ओट्स , दूध ( याला पर्याय म्हणून नारळाचे दूध किंवा बदामाचे दूधही घेता येईल . ) , खजूर , अक्रोड , सुके अंजीर किंवा ताजी फळे कापून . आवडीनुसार मध अथवा साखर . कृती रात्री कामधाम आवरल्यावर काचेची ही बाटली घ्यावी . ती स्वच्छ पुसून त्यात अध्र्यापर्यंत ओट्स आणि वरचा अर्धा भाग दूध घालून फ्रिजमध्ये ठेवावी . सकाळी बाहेर काढायची . त्यात मध किंवा साखर घालायची . आवडतील त्याप्रमाणे सुका मेवा नाही तर ताजी फळे घालायची . वेळ असेल तर ताज्या फळांचे तुकडे वगैरे करायचे . नाही तर सुका मेवा झिंदाबाद . हे मिश्रण चवीला झक्कास लागते . झटपट नाश्ता तयार झाला . पाककृतीसाठी लागणारा वेळ : पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1 एकूण वेळ : 1 पदार्थाचा प्रकार : किती व्यक्तींसाठी : लेखक :
1
जगज्जेता मॅग्नस कार्लसन आणि विश्वनाथन आनंद यांच्यातील लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेतील लढत झटपट बरोबरीत सुटली . या स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यांतील सर्व लढती बरोबरीत सुटल्या आहेत . आनंद - कार्लसन लढत कॅटालॅन पद्धतीने झाली . डावाच्या सुरवातीस जगज्जेत्या कार्लसनने एका प्याद्याचा मोबदला दिला . आक्रमण सुकर करण्याची त्याची योजना होती . आनंदने प्यादे जिंकले ; पण तरीही तो कधीही गाफील राहिला नाही . उच्च स्तरावर जिंकलेल्या मोहऱ्यांपेक्षा पटावरील स्थिती महत्त्वाची असते , हे तो जाणून होता . कार्लसन याकडेच लक्ष देत आक्रमणाची योजना तयार केली ; पण त्याचा फायदा त्याला मिळणार नाही याकडे आनंदने लक्ष दिले . आनंदचे आक्रमणाचे प्रयत्नही विफल ठरले . अखेर दोघांनी ३१ चालीनंतर बरोबरी मान्य केली . कार्लसन आपल्या खेळावर नाराज होता . आनंदने वर्चस्वासाठी शर्थीचे प्रयत्न केले . त्यात माझे कुठे चुकले तेच मला कळले नाही . माझ्या खेळावर मी समाधानी नाही ; पण त्यालाही आक्रमणापासून रोखण्यात यशस्वी ठरलो , असे कार्लसनने सांगितले .
2
सध्या मल्टिपल मायलोमा या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वेदनादायी बायोप्सीला पर्याय म्हणून कमी खर्चाची रक्तचाचणी विकसित करण्यात आली असून त्यात प्लास्टिक चिपचा वापर करण्यात आला आहे . ही चिप क्रेडिट कार्डच्या आकाराची आहे . अमेरिकेतील कन्सास विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मल्टिपल मायलोमा या कर्करोगात प्रभावित होणाऱ्या प्लाझ्मा पेशींसाठी वापरली जाणारी हाडाची बायोप्सी टाळण्याचा प्रयत्न केला आहे . त्याची जागा ही नवी चाचणी घेणार असून यात अस्थिमज्जेचा नमुना घेण्यासाठी सुई घालावी लागत होती ती पद्धत वेदनादायी होती . इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी नियतकालिकात नवीन रक्तचाचणीचा उल्लेख असून त्यात प्लास्टिकची क्रेडिट कार्डच्या आकाराची चीप वापरून माहिती घेतली जाते . यात नेहमी रक्त घेतले जाते त्याच पद्धतीने रक्त घेऊन तपासणी करतात . दहा वर्षांत ही चाचणी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू होते असे स्टीव्हन सोपर यांनी सांगितले . यात कर्करोगाची अवस्था कळू शकते व कोणत्या प्रकारचे औषध लागू पडेल हे ठरवता येते . सीडी , डीव्हीडी व ब्लू रे डिस्क तयार करण्याच्या पद्धतीने प्लास्टिक चिप तयार केली जाते . काही डॉलर्स खर्चात चिप तयार करता येते त्यामुळे रोगनिदान स्वस्तात होते .
1
अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे . गेल्या बऱ्याच काळापासून आमिरच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे . त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे . या चित्रपटात काम केलेल्या कलाकारांचे अमिरने कौतुक केले आहे . या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तीन महिने काम सुरु होते . त्यातून फातिमा सना शेख , सन्या मल्होत्रा , सुनाही भटनागर आणि जायरा वसी याची निवड करण्यात आली . या चित्रपटात फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांची निवड तब्बल १० हजार मुलींमधून करण्यात आली आहे . फातिमाने या चित्रपटात गीताची भूमिका साकारली आहे . या चित्रपटामध्ये सुहानी ही बबिताच्या भूमिकेत दिसणार आहे . अमिर खानने देखील या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे . ‘चित्रपटात वयस्कर भूमिका साकारण्यासाठी अमिरने पाच महिन्यात त्याचे वजन कमी केले . त्याच्या या प्रवासाचा व्हिडिओ चांगलाच गाजला होता . आमिरने तब्बल पाच महिने आपल्या शरीरयष्टीवर मेहनत घेतल्याचे व्हिडिओतून समोर आले होते . या चित्रपटात एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का ? हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेकांचेच लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागून राहिले आहे . आमिर खान , किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल . आमिरच्या या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे . या चित्रपटामध्ये आभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे . तर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर झळकणार आहे . या चित्रपटामध्ये आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी आणि वयाच्या विविध टप्प्यातील त्यांचे रुप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच मेहेनत घेतल्याचे दिसतेय . नुकतेच आमिरने प्रसारमाध्यमांसाठी ‘दंगल’ चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सीन्स’ची स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती .
0
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मागील काही दिवसांपासून धमाकेदार ऑफर्स देऊन अक्षरशः वेड लावले आहे . काही दिवसातच कंपनीने आपला मोबाईल फोनही बाजारात दाखल होणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचं बुकींगही सुरु झालं . कंपनीच्या मोबाईल मार्केटमधील आक्रमक पवित्र्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले . यामुळे त्यांनी नवीन मोबाईलची मॉडेल लाँच करण्याच्या घोषणा केल्याच पण जिओच्या कार्डमुळे इतर कंपन्यांनीही आपले स्वस्तातील प्लॅन्स घोषित करण्यास सुरुवात केली . ग्राहकांसाठी आणखी एक खूषखबर म्हणजे जिओने आपल्या वायफाय सेवेवर तब्बल १ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे . नवरात्रीसाठी सॅमसंगच्या धमाकेदार ऑफर्स १९९९ रुपयांचे जिओफाय jiofi आता केवळ ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे . कंपनीने आपली ही ऑफर जाहीर केली असून ग्राहकांना त्याचा लाभ २० ते ३० सप्टेंबर या कालावधीतच घेता येणार आहे . या १० दिवसांदरम्यान जर तुम्ही जिओफायचे कनेक्शन घेतलेत तर तुम्हाला केवळ ९९९ रुपये भरावे लागतील असे जिओकडून सांगण्यात आले आहे . ही कनेक्शन आपण कंपनीच्या वेबसाईटवर तसेच रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहे . क्रेडिट कार्डच्या व्यवहारात अडचणी येताहेत ? ही कारणे असू शकतात… जिओने आपली इंटरनेटची वायफाय सुविधा लाँच केली तेव्हा त्याची किंमत २३२९ रुपये इतकी होती . त्यानंतर काही काळात ही किंमत कमी करण्यात येऊन १९९९ इतकी करण्यात आली . आता पुन्हा एकदा सणांच्या मुहूर्तावर किंमत कमी करुन जिओने आपल्या ग्राहकांना खूश केले आहे . तुम्ही हे वायफाय डिव्हाईस खरेदी केले तर तुम्हाला जिओचे कार्ड खरेदी करावे लागणार आहे . याशिवाय जिओच्या सिमकार्डच्या बरोबरच डेटाप्लॅनही घ्यावा लागणार आहे . यासाठी जिओकडून विविध इंटरनेट प्लॅन उपलब्ध करून देण्यात आले आहेत
1
महाराष्ट्राच्या मुलींनी ३४व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मंगळवारी दुबळा प्रतिस्पर्धी असल्याचा फायदा उठवून मोठ्या विजयासह उपांत्य पूर्व फेरीतील स्थान निश्चित केले . त्याचवेळी गच्चीबौली क्रीडा संकुलातील बंदिस्त हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला . महाराष्ट्राच्या मुलींनी दुबळ्या राजस्थानचा ७० - ३४ असा सहज पराभव केला . उद्या बुधवारी त्यांची गटातील शेवटची लढत गतविजेत्या तमिळनाडू बरोबर होणार असून या लढतीतील विजेता संघ गटविजेता ठरणार आहे . मुलांना मात्र गटातील शेवटच्या सामन्यात पंजाबकडून ५८ - ७५ अशी हार पत्करावी लागली . मात्र , उद्याच्या पंजाब - तमिळनाडू या सामन्याच्या निकालानंतर त्यांची बाद फेरीतील पुढची वाटचाल ठरणार आहे . राजस्थान विरुद्धच्या एकतर्फी सामन्यात महाराष्ट्रास अजिबात मेहनत करावी लागली नाही . महाराष्ट्राने या सामन्यात आपल्या बहुतेक सर्व खेळाडूंना संधी दिली . महाराष्ट्राच्या मुलांनी आज अखेरच्या साखळी लढतीत पंजाबला मध्यंतरापर्यंत चांगली लढत दिली . उत्तरार्धात मात्र उंच प्रिन्सपाल सिंगला सूर गवसल्यानंतर सामना एकतर्फी झाला . विजेत्यांचा धडाका एवढा जबरदस्त होता की महाराष्ट्रास तिसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ ५ गुण नोंदवता आले . याउलट विजेत्यांनी २७ गुण नोंदवून निकाल स्पष्ट केला . रागीट प्रिन्सपाल सिंगने प्रथमार्धात दोन धोकादायक फाऊल केल्याने त्यास विश्रांती देण्यात आली होती . मात्र , त्याच्या अनुपस्थितीचा फायदा महाराष्ट्राला घेता आला नाही . सामन्यात धसमुसळेपणा सुरू झाल्यावर पंचांनी अतिशय कडक भूमिका घेतली आणि त्यामुळे सामन्यात एकूण ५६ फाऊल्सची नोंद झाली . त्यात विजेत्यांचा वाटा ३२ फाऊल्सचा होता . ९५ पैकी केवळ २१ प्रयत्नात यश आलेल्या सदोष नेमबाजीमुळे महाराष्ट्रास पराभव पत्करावा लागला . संपूर्ण सामना खेळणाऱ्या कमलेश राजभरला तर १७ प्रयत्नात एकच बास्केट करता आला आणि त्याच्याकडून अनेक वेळा चेंडूचा ताबा विजेत्यांकडे गेला . परंतु , त्याला विश्रांती देण्यात आली नाही . उंचपुऱ्या विजेत्यांना रोखण्याचा प्रयत्नात केलेल्या वैयक्तिक ५ फाउलमुळे महाराष्ट्राच्या अर्जुन यादव , प्रीतीश कोकाटे आणि तनय थत्तेला मैदान सोडावे लागले . निकाल : मुली : महाराष्ट्र : ७० ( खुशी डोंगरे २१ , सुझान पिंटो १६ ) विजयी राजस्थान ३४ ( शताक्ष राठोड १४ , अक्षता १० ) मुले : महाराष्ट्र ५८ ( तनय थत्ते २९ , अर्जुन यादव १४ , ओम पवार १२ ) पराभूत पंजाब ७५ ( प्रिन्सपाल सिंग २० , मणी १५ , राजन १३ )
2
एकेकाळी फेब्रुवारी - मार्चमध्ये मिळणारी अंजीर आता वर्षातील सहा महिने मिळतात . अंजीरमध्ये आर्द्रता , पिष्टमय पदार्थ , प्रथिने , मेद , कार्बोहायड्रेट , कॅल्शिअम , फॉस्फरस , लोह , तंतुमय पदार्थ , ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते . अंजीर थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते . हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते . पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते . ताज्या अंजीराच्या सेवनानं पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात , तर सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात . अंजीरचे फायदे – पोट साफ करायचं असेल तर अंजीर खावे . कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात . – अंजीरमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते . – शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे . कारण अंजीर हे थंड असते . – जागरण , रात्रपाळी , अति चहा किंवा धूम्रपान , दारू यामुळे शरीराला नुकसान पोहोचतं म्हणूनच शरीराची ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खावे . – पायांना भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास भेगा लवकर भरून येतात . – आजारपणामुळे अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर खावे . आठवड्याभरात अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते .
1
‘बाहुबली २’ चित्रपट जगभरात सर्वत्र आपली छाप पाडत असल्याचे चित्र आहे . जगभरातील सर्वच लोक या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत . नेपाळमधील बॉक्स ऑफिसवरही ‘बाहुबली २’ने दमदार कमाई केल्याचे वृत्त नुकतेच येऊन गेले होते . नेपाळमधील ‘छक्का पंजा’ या चित्रपटालाही त्याने कमाईत मागे टाकले आहे . त्यानंतर आता पाकिस्तानमध्येही एसएस राजामौलीच्या या चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आहे . ‘डेक्कन क्रोनिकल’ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली २’ ने पाकिस्तानमध्ये ४ . ५ कोटी रुपयांची कमाई केली आहे . तसेच , तेथे जवळपास १०० चित्रपटगृहांमध्ये प्रभासचा हा चित्रपट दाखवला जातोय . पाकिस्तानमधील वितरक अमजद रशिद यांनी म्हटले की , यामध्ये जरी पौराणिक आणि हिंदू परंपरा काही प्रमाणात दाखवण्यात आल्या असल्या तरी खासकरुन सिंगल स्क्रिनवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय . यातील वीएफएक्स आणि अॅक्शन सिन्सने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे . इतकेच नव्हे तर , पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने कोणतीही कात्री न लावता चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी हिरवा कंदील दिला . चित्रपटात कोणतेही आक्षेपार्ह दृश्य नव्हते त्यामुळे त्यातील एकही दृश्य काढण्यात आलेले नाही , असेही रशिद म्हणाले . ‘बाहुबली द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली द कन्क्लुजन’ मधील अमरेंद्र बाहुबली व महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेमुळे अभिनेता प्रभास मोठा स्टार बनला आहे . केवळ भारतातच नाही तर परदेशातही त्याचे चाहते निर्माण झाले आहेत . सध्या मुलींच्या हृदयावर कोणी राज्य करत असेल तर तो प्रभास आहे . प्रभासला चक्क सहा हजार मुलींचे लग्नासाठी प्रस्तावही आले होते . मात्र , त्याने ते नम्रपणे नाकारले . त्याच्या आयुष्यात एक मुलगी असून , तो लवकरच तिच्याशी लग्न करणार असल्याचे म्हटले जातेय . प्रभासव्यतिरीक्त चित्रपटात राणा डग्गुबती , अनुष्का शेट्टी , तमन्ना भाटिया , सत्यराज , नसिर , रम्या कृष्णन यांच्याही मुख्य भूमिका आहेत .
0
शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असल्याने यकृताचा कर्करोग होण्याची संभावना कमी होत असल्याचे एका अभ्यासात संशोधकांना आढळले आहे . सूर्यप्रकाशामुळे त्वचेत ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते . ‘ड’ जीवनसत्त्वामुळे शरीरात कॅल्शियमची पातळी राखणे त्याचप्रमाणे दात आणि स्नायू निरोगी ठेवण्यात मदत होते . हाडांच्या रोगांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे अनेक फायदे असून यामुळे कर्करोगासह इतर अनेक रोगांच्या उपचारामध्ये मदत होत असल्याचे पुरावे समोर येत आहेत . याबाबत युरोपीय आणि अमेरिकी लोकांवर अधिक अभ्यास करण्यात आला असून आशियाई लोकांवर याबाबत अद्याप मर्यादित अभ्यास करण्यात आला आहे . आनुवंशिकतेनुसार ‘ड’ जीवनसत्त्वाच्या चयापचयातील प्रक्रियेत बदल होतो . त्यामुळे अश्वेत लोकसंख्येवर ‘ड’ जीवनसत्त्वाचा समान परिणाम होतो का नाही यासाठी हा अभ्यास करण्यात येत आहे . जपानमधील राष्ट्रीय कर्करोग केंद्र आणि शिगा वैद्यकीय विज्ञान विद्यापीठातील संशोधक ‘ड’ जीवनसत्त्वाचा कर्करोगावर काय परिणाम होतो यावर संशोधन करीत आहेत . यासाठी त्यांनी ४० ते ६९ वयोगटातील ३३ , ७३६ लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण केले . या अभ्यासात सहभागी झालेल्यांनी त्यांचे आरोग्य , आहार , जीवनशैली याबाबत माहिती दिली . त्याचप्रमाणे त्यांची रक्तचाचणीदेखील करण्यात आली . शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाच्या प्रमाणानुसार या लोकांना चार गटांमध्ये विभाजित करण्यात आले होते . या लोकांचा सरासरी १६ वर्षांच्या कालावधीसाठी अभ्यास करण्यात आला यात कर्करोगाची ३ , ३०१ प्रकरणे समोर आली . धूम्रपान , मद्यपान , आहारविषयक कर्करोगांच्या जोखीम घटकांसाठी समायोजित केल्यानंतर ‘ड’ जीवनसत्त्व जास्त असणाऱ्यांमध्ये यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण कमी असल्याचे आढळले .
1
कुस्तीमध्ये भारताला खरे तर सुरवातीलाच धक्का बसला . डबल ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार पात्रता फेरीचा अडथळाही दूर करू शकला नाही . बहारिनच्या आदमविरुद्ध सुरवातीला मिळविलेल्या आघाडीचा त्याला फायदा घेता आला नाही . दुसऱ्या फेरीत सुशीलला आक्रमकच होता आले नाही . आदमविरुद्ध दुसऱ्या फेरीत तो चपळताही दाखवू शकला नाही . बचावाच्या आघाडीवरदेखील तो निष्प्रभ ठरला . त्यामुळेच त्याला ५ - ३ असा परभव पत्करावा लागला . संदीप तोमरने ५७ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत तुर्कमेनिस्तानच्या रुस्तम नझरोला याला अटीतटीच्या लढतीत १२ - ८ असे पराभूत केले ; पण दुसऱ्या फेरीत तो इराणच्या रेझाचे आक्रमण पेलू शकला नाही . अर्थात , बलाढ्य रेझाला दिलेली झुंजही संदीपचे भवितव्य उज्ज्वल असल्याची साक्ष देत होती . संदीप ९ - १५ असा हरला असला , तरी क्षणाक्षणाला डावपेचांची होणारी उधळण आणि लढतीचा बदलणारा निर्णय रोमांचकारक ठरला . पवन कुमारने ८६ किलो वजनी गटात कंबोडियाच्या हेंद युथीविरुद्ध ८ - ० असा विजय मिळवून झकास सुरवात केली ; पण इराणच्या हसन याजदानीकडून तो ११ - ० असा हरला . रेपिचेजमध्येही तो टिकला नाही . मौमस खत्रीला ९७ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या इब्रा जिमोवचे आव्हान पहिल्याच फेरीत पेलवले नाही . हा खेळाचा भाग झाला . मी सध्या माझी शरीरयष्टी राखण्यावर भर देत आहे . आज मी तीन मिनिटांनंतर प्रतिआक्रमणच करू शकलो नाही . आता पुढील लक्ष्यावर माझे लक्ष केंद्रित करेन . - सुशील कुमार
2
२००२ मध्ये झालेल्या नॅटवेस्ट सीरिज क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचे माजी क्रिकेट कर्णधार नासीर हुसेनने मला बसचालक म्हणून हिणवले होते , असा गौप्यस्फोट भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने केला आहे . लॉर्ड्सचा अंतिम फेरीचा सामना कैफने युवराज सिंगसोबत साकारलेल्या १२१ धावांच्या सामना जिंकून देणाऱ्या भागदारीसाठी विशेष ओळखला जातो . त्यामुळेच ५ बाद १४६ अशा कठीण परिस्थितीनंतर भारताने ३२६ धावांच्या धावसंख्येचा विक्रमी पाठलाग केला होता . कैफने ७५ चेंडूंत ८७ धावांची खेळी साकारून सामनावीर पुरस्काराला गवसणी घातली होती . ट्विटरवर एका क्रिकेटरसिकाच्या प्रश्नाला उत्तर देताना कैफने त्या सामन्यातील घटना मांडली . नॅटवेस्टच्या अंतिम फेरीत इंग्लिश क्रिकेटपटूने तुला त्रास दिला होता का . यावर उत्तर देताना कैफ म्हणाला , ‘‘होय , नासीर हुसेन मला बसचालक म्हणाला होता . मात्र तुम्हाला चांगला प्रवास घडवतो , असे उत्तर दिले होते . ’’ सलामीवीर मार्क ट्रेस्कॉथिक आणि कर्णधार नासीर हुसैन यांच्या शतकांच्या बळावर इंग्लंडने ५ बाद ३२५ धावा उभारल्या होत्या .
2
कोरिया सुपर सीरिज विजेतेपदामुळे पी . व्ही . सिंधू जागतिक क्रमवारीत पुन्हा दुसरे स्थान मिळवण्याची दाट चिन्हे दिसत आहेत . सध्या सिंधू चौथ्या क्रमांकावर आहे . सिंधूला कोरिया विजेतेपदाबद्दल ९ , २०० गुण मिळतील . तिचा गतवर्षी या स्पर्धेत सहभाग नव्हता . त्यामुळे या स्पर्धेबद्दलचे तिचे गुण कमी होणार नाहीत . त्यामुळे गेल्या ५२ आठवड्यांतील सर्वांत कमी गुण मिळालेला टप्पा रद्द होईल , अर्थातच ५ , ०२० गुण रद्द होतील . यामुळे तिचे एकंदर गुण ७६ , ९४६ वरून ८१ , १०६ होतील . सिंधू अर्थातच गतविजेती अकेन यामागुची आणि गतउपविजेती सुंग जी ह्यून यांना मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे . यापूर्वी एप्रिलमध्ये तिने इंडिया ओपन सुपर सीरिज जिंकून हा क्रमांक मिळविला होता . यामागुची उपांत्य फेरीत पराजित झाली होती , तर सुंग उपांत्यपूर्व फेरीत अर्थातच दोघींना गुणांचा मोठा फटका बसणार आहे .
2
नाना पाटेकर हे इंडस्ट्रीतील बडं नाव . पण , कितीही बडं नाव असलं तरी ते किती साधे आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच . नाना पाटेकर " आपला मानूस ' हा त्यांचा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत . त्यांच्याबरोबर अभिनेता सुमित राघवन आणि अभिनेत्री इरावती हर्षेही या चित्रपटात काम करत आहेत . चित्रपटात नाना पोलिस ऑफिसरची भूमिका करत आहेत . चित्रपट जरी सस्पेन्स असला , तरी या चित्रपटाचे चित्रीकरण करताना त्यांनी पडद्यामागे खूप धमाल केली . " आपला मानूस ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला . त्या वेळी पडद्यामागच्या गप्पा रंगल्या . या वेळी नाना बोलत होते की , " आम्ही पडद्यामागे खूप धम्माल केली आहे . सुमित खूप छान गातो . जेव्हा तो गाणं गायचा तेव्हा मला गाण्याचा चांगला सेन्स असल्यामुळे मी टेबलवर तबला वाजवायचो . दोन शॉटच्यामध्ये आम्ही पत्ते खेळत बसायचो आणि लाईट्स वगैरे लावून झालेले जरी असले , तरी आम्ही सतीशला सांगायचो की , अजून थोडावेळ लाईट्सचं काम कर ना . कारण आम्हाला पत्त्याचा डाव पूर्ण करायचा असायचा . सेटवर आम्ही घरून डबे घेऊन यायचो . सुमित डबा आणायचा आणि मी ही . रोज मी स्वतः जेवण बनवायचो . इरावती कधीच काही आणायची नाही ( हसून . ) मी खवय्यापेक्षा आचारीच जास्त चांगला आहे . मला खाण्यापेक्षा खायला घालायला खूप आवडतं . त्यामुळे मी उत्तम जेवण बनवतो . ' नानांना परत एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आता आतुर झालेत . . .
0
वेब सीरिज आणि सुमित व्यास हे समीकरण जणू ठरलेलंच आहे . ‘परमनंट रुममेट्स’ , ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे . सुमित व्यासने अभिनयाच्या जोरावर स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे . नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकलेला या अभिनेत्याने त्याच्या प्रियसीबरोबर लग्नगाठ बांधली आहे . सध्या सुमितच्या लग्नाचे हे फोटो व्हायरल होत असून तो फुलऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे . आणि सुमितने प्रियसी एकता कौलबरोबर १५ सप्टेंबर रोजी जम्मूमध्ये लग्न केलं असून सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत . पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये सुमित आणि एकताच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं . या सोहळ्याचे काही फोटो टेलिव्हिजन अभिनेत्री मालिनी कपूरने शेअर केले आहेत . दरम्यान , सुमित व्यासचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी त्याने अभिनेत्री शिवानी टाकसाळे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती . मात्र त्यांचा संसार फार कमी काळ टिकू शकला . लग्नानंतर काही काळातच या दोघांनी कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर आता सुमितने पुन्हा एकदा लग्नाचा निर्णय घेत एकताबरोबर सप्तपदी घेतली आहे .
0
ऍडलेड : दुसऱ्या अॅशेस कसोटीत आज ( बुधवार ) पाचव्या दिवशी दोन्ही संघांना समान संधी असताना मिशेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 0 अशी आघाडी घेतली . इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन याच्या पाच विकेट आणि कर्णधार रुटच्या नाबाद अर्धशतकामुळे प्रकाशझोतातील कसोटीत इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधण्याची संधी इंग्लंडकडे होती . त्यांनी ३५४ धावांच्या आव्हानासमोर ४ बाद १७६ धावा अशी सुरवातही केली . इंग्लंडला आज पाचव्या दिवशी इंग्लंडला १७८ धावांची गरज होती . पण , जोश हेझलवूडने रुटला बाद करत विजयातील मोठा अडसर दूर केला . त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर टीकू दिले नाही . अखेर इंग्लंडचा दुसरा डाव 233 धावांत संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने 120 धावांनी विजय मिळविला . स्टार्कने दुसऱ्या डावात 5 बळी मिळविले . तत्पूर्वी , चौथ्या दिवशी ४ बाद ५३ वरून ऑस्ट्रेलियाचा डाव १३८ धावांत संपला होता . वोक्सने चार विकेट टिपल्या . कांगारूंनी द्विशतकी आघाडीनंतरही इंग्लंडला फॉलोऑन दिला नव्हता . दुसऱ्या डावात त्यांची ७ बाद ९० अशी स्थिती झाली होती , पण कांगारूंचे शेपूट इंग्लंडसाठी पुन्हा डोकेदुखी ठरले . संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया - ८ बाद ४४२ घोषित व ५८ षटकांत सर्वबाद १३८ ( डेव्हिड वॉर्नर १४ , उस्मान ख्वाजा २० , स्टीव स्मिथ ६ , नेथन लायन १४ , शॉन मार्श १९ , मिचेल स्टार्क २० , जेम्स अँडरसन ५ - ४३ , क्रेग ओव्हर्टन १ - ११ , ख्रिस वोक्स ४ - ३६ ) विजयी विरुद्ध इंग्लंड २२७ व सर्वबाद 233 ( ऍलिस्टर कुक १६ , मार्क स्टोनमन ३६ , ज्यो रूट ६७ , डेविड मलान २९ , स्टार्क 5 - 88 , लायन 2 - 45 ) .
2
भारतीय संघाविरोधात खेळण्यासाठी उत्सुक ; मात्र कारवाईचे दडपण आशियाई क्रीडा स्पर्धेतील मैदानी लढाईत कबड्डीमधील हक्काची सुवर्णपदके गमावल्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ सप्टेंबरला दिल्लीत होणाऱ्या दोन सामन्यांमध्ये भारतीय कबड्डी संघांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे . भारतीय संघाला आव्हान देऊ शकणारा संघ तयार करण्यासाठी देशातील कबड्डीक्षेत्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे . या संघात सहभागी होण्यासाठी खेळाडू उत्सुक असले तरी त्यांच्यावर कारवाईचे दडपण आहे . दिल्लीला होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवू न शकलेल्या देशातील अव्वल कबड्डीपटूंना या संघातून खेळण्यासाठी विचारणा केली जात असल्याची माहिती मिळत आहे . मात्र जनार्दनसिंग गेहलोत यांचे भारतीय कबड्डीवरील नियंत्रण कायदेशीरपणे संपुष्टात आले असले , तरी संघटनात्मक नियंत्रण गमावले नसल्यामुळे खेळाडू द्विधा मनःस्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले . आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेबाबत आक्षेप घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात माजी अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू होनप्पा गौडा यांनी सादर केली होती . यावर निकाल देताना न्यायालयाने निवड प्रक्रियेसाठीचे दोन सामने १५ सप्टेंबरला दिल्लीच्या त्यागराज क्रीडा संकुलात सकाळी ११ वाजता आयोजित करण्याचे निर्देश आले आहेत . आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातून खेळलेल्या प्रत्येकी १२ खेळाडूंशी झुंजण्यासाठी डावललेल्या किंवा अन्य खेळाडूंना या नव्या भारतीय संघात स्थान मिळू शकेल . न्यायालयीन दावा करणाऱ्या होनप्पा आणि एस . राजरत्नम यांच्याशी पाठीशी असलेली नवे भारतीय हौशी कबड्डी महासंघ संघबांधणीसाठी प्रयत्नशील आहेत . ‘‘आशियाई स्पर्धेतील भारताच्या संघात मध्य रक्षणाचा मोठा अभाव होता . याचप्रमाणे सुरजित , नितीन तोमर , सुरेंदर नाडा , सुकेश हेगडे , प्रशांत राय , विशाल भारद्वाज , विकास काळे , सचिन शिंगार्डे , नीलेश साळुंखे यांच्यासारख्या असंख्य गुणी खेळाडूंना भारतीय संघातून डावलण्यात आले होते . निवड प्रक्रियेच्या सामन्यांसाठी आमची संघबांधणी अंतिम टप्प्यात असून , विशेष तयारी शिबिराला लवकरच प्रारंभ होणार आहे , ’’ अशी माहिती नव्या भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे समन्वयक जया शेट्टी यांनी दिली . ते पुढे म्हणाले , ‘‘भारतीय संघाशी संलग्न असलेल्या राज्य संघटना तसेच रेल्वे , सेनादल या संघांवर या सामन्यात न खेळण्यासाठी दडपण आणले जात आहे . कारण भारतीय कबड्डी संघटनेविरोधातील हे कृत्य असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे . मात्र कबड्डीच्या हितासाठी ही प्रक्रिया होत आहे , याची जाणीव खेळाडूंना व्हायला हवी . ’’ निवृत्त जिल्हा न्यायाधीश रविंदर कौल या सामन्यांसाठी निरीक्षक म्हणून काम पाहतील . या निवड प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यात येईल आणि ते नंतर न्यायालयासमोर सादर केले जाईल . या सामन्यांसाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांकडून तीन निवड समिती सदस्य नियुक्त केले जाणार आहेत . आशियाई क्रीडा स्पर्धेतील आक्षेपार्ह खेळाडूंच्या कामगिरीचा या वेळी कस लागेल . ते या निवड प्रक्रियेत यशस्वी ठरले , तरच त्यांना पदकविजेत्याला मिळणारे आर्थिक इनाम आणि अन्य लाभ मिळणार आहेत . या खटल्याची पुढील सुनावणी ३० ऑक्टोबरला आहे .
2
नवीन किंवा चित्रपटगृहात सुरू असलेल्या चित्रपटाची प्रसिद्धी करण्याचे नानाविध मार्ग आज चित्रपटनिर्मात्यांकडून अवलंबले जातात . पण चित्रपटांच्या इतिहासाच्या सुरुवातीला चित्रपटांची प्रसिद्घी कशी व्हायची याची काही देखणी उदाहणे राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालयाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहेत . भारतात चित्रपटांचे पर्व सुरू झाल्यानंतर पहिल्या वीस वर्षांनंतरच्या काळातल्या चित्रपटांचा हा खजिना आहे . प्रभात , न्यू थिएटर्स , बाँबे टॉकीजतर्फे आलेल्या चित्रपटांसह १९३२ ते १९३५ या काळातील दहा हॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्धीपत्रके ( हँडबिले ) मंगळवारी एनएफएआयकडे आली आहेत . सतीश गोविंद अडिवरेकर यांनी ती संग्रहालयाकडे सुपूर्द केली असून त्यांच्या वडिलांच्या संग्रहातून ती आली आहेत . व्ही . शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कुंकू’ ( १९३७ ) या गाजलेल्या चित्रपटाचे १६ व्या आठवडय़ात पदार्पण होत असल्याबाबत काढलेले प्रसिद्धीपत्रक यात आहे . चित्रपटाचा सोळावा आठवडा सुरू होण्याच्या दिवशी सकाळी सोळा सुवासिनी घरोघरी जाऊन हळदी - कुंकू देतील , असे या प्रसिद्धीपत्रकावर लिहिले आहे . दिग्दर्शक बाळासाहेब यादव यांचा ‘बाजी प्रभू देशपांडे’ ( १९३९ ) हा चित्रपट , अभिनेत्री रतन बाई यांची प्रमुख भूमिका असलेला प्रेमांकुर अतोर्थी दिग्दर्शित ‘सरला’ ( १९३६ ) हा हिंदी चित्रपट अशा जुन्या चित्रपटांची हँडबिलेही मिळाली आहेत . एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले , ‘देशातील चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळातील ही हँडबिले असल्यामुळे ती खूप महत्त्वाची आहेत . त्या वेळच्या चित्रपट प्रसिद्धीच्या पद्धती त्यातून दिसतात . ’ चित्रपट रसिक व संग्राहकांनी त्यांच्याकडे असलेले जुने व दुर्मिळ चित्रपटसाहित्य जतनासाठी विभागाकडे सुपूर्द करावे , असेही त्यांनी सांगितले .
0
भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेत मंगळवारी ७०वा स्वातंत्र्यदिन साजरा केला . या वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले . या वेळी भारतीय संघ आणि साहाय्यक मार्गदर्शकही उपस्थितया वेळी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी ध्वजारोहण केले होते . या वेळी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतही गायले गेले . या वेळी कोहलीसह भारताच्या सर्व खेळाडूंनी तिरंग्याला मानवंदना दिली . कोहलीने या वेळी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या . त्याचबरोबर माझ्या वडिलांचा वाढदिवसही १५ ऑगस्टला असल्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खास आहे , असे कोहली म्हणाला . ‘‘देशवासीयांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा . एक भारतीय असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो . पण स्वातंत्र्यदिनी देशाभिमानाच्या भावना वेगळ्याच उंचीवर असतात . हा दिवस माझ्यासाठी फारच विशेष असतो , कारण या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस असायचा , ’’ असे कोहलीने ट्विटरवर म्हटले आहे . या वेळी कोहलीने आपल्या लहानपणाच्या आठवणींनाही या वेळी उजाळा दिल्या . तो म्हणाला , ‘‘लहानपणी मी मित्र आणि कुटुंबीयांबरोबर पतंग उडवायचो . त्याचबरोबर सर्वत्र तिंरगा फडकताना पाहिला की आनंद होतो . भारतीय असल्याचा अभिमान तर मला आहेच आणि तो कायम राहील . जय हिंद ! ’’ आफ्रिदीकडून भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने या वेळी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . ‘‘भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा . चला शांतता , सहिष्णुता आणि प्रेम वाढण्यासाठी एकत्रित काम करू या , ’’ असे आफ्रिदीने ट्विटरवर म्हटले आहे .
2
नॉर्थ साऊंड ( अँटिगा ) : भारतीय महिला संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच शुक्रवारी सकाळी टी - 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरतील . भारतीय महिला संघाला त्या वेळी इंग्लंड संघाकडून चुरशीच्या लढतीत 9 धावांनी पराभव पत्करावा लागला होता . एकदिवसीय क्रिकेटप्रमाणेच टी - 20 विश्वकरंडक स्पर्धेतही भारतीय महिलांची आगेकूच विलक्षण राहिली आहे . गटातील सर्व सामने जिंकताना त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले . मिताली राज आणि हरमनप्रीत कौर या दोघींची कामगिरी भारतीय संघाचे खरे बलस्थान राहिले आहे . मर्यादित षटकांच्या सामन्यात इंग्लंडसारख्या गुणवान संघावर विजय मिळविण्यासाठी मिताली आणि हरपमनप्रीत यांच्याकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे . स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची त्यांना साथ मिळेल . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत मितालीला विश्रांती दिल्यानंतरही भारताने विजय मिळविला ही सर्वात मोठी गोष्ट आहे . आता मिताली या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात परतणार आहे . त्यामुळे भारतीय संघाची ताकद नक्कीच वाढलेली असेल . एकच वेगवान गोलंदाज घेऊन खेळण्याचे प्रशिक्षक रमेश पोवार यांचे नियोजन चांगलेच यशस्वी ठरले आहे . भारतीय फिरकी गोलंदाजांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आहे . पूनम यादवने 8 , तर राधा यादव हिने 7 गडी बाद केले आहेत . दिप्ती शर्मा आणि हेमलता या ऑफ स्पिन गोलंदाजही फॉर्मात आहेत . चार सामन्यांत भारताच्या अरुंधती रेड्डी आणि मानसी जोशी या मध्यमगती गोलंदाजांनी मिळून केवळ 13 षटके टाकली आहेत . यावरून भारतीय फिरकीची ताकद लक्षात येऊ शकते . इंग्लंड संघाचे नियोजन बरोबर विरुद्ध आहे . त्यांच्या वेगवान गोलंदाज यशस्वी ठरल्या आहेत . त्याचबरोबर फलंदाजीतील ऍमी जोन्स हिचे सातत्य इंग्लंडसाठी महत्त्वाचे ठरेल . तिने तीन अर्धशतके झळकाविली आहेत . या वेळी तिला भारतीय फिरकीचे आव्हान परतवावे लागेल .
2
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र आहे . गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रोमो प्रदर्शित करण्यात येत आहेत . त्यामधील एका प्रोमोमध्ये असलेल्या ‘इंटरकोर्स’ या शब्दावरून वाद उद्भवला आहे . सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी हा शब्द चित्रटातून हटविण्याचा निर्णय घेतला आहे . पण , एका अटीवर ते ‘इंटरकोर्स’ शब्द चित्रपटात तसाच ठेवण्यास तयार आहेत . सामान्य जनतेने पाठिंबा म्हणून ‘इंटरकोर्स’ शब्दासाठी मतदान केल्यास आणि त्यातून किमान एक लाख मतं जरी मिळाली तरी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रोमो आणि चित्रपटातील हा शब्द वगळला जाणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे . वाचा : सुव्रत - मृण्मयीच्या ‘लग्ना’चा फोटो पाहिलात का ? एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निहलानी म्हणाले की , तुम्ही मतदान घ्या , मी तो शब्द ( इंटरकोर्स ) प्रोमो आणि चित्रपटात तसाच ठेवेन . त्यासाठी मला किमान एक लाख मतं हवी आहेत . भारत बदलला आहे का ते मला बघायचं आहे . आपल्या १२ वर्षांच्या मुलाला त्या शब्दाचा ( इंटरकोर्स ) अर्थ कळावा असं भारतातील कुटुंबांना वाटतं का ते मला बघायचं आहे . ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटाचा दुसरा मिनी प्रोमो सोमवारी प्रदर्शित करण्यात आला . यामध्ये अनुष्का शर्माने एका दृश्यात इंटरकोर्स या शब्दाचा उच्चार केला आहे . त्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असून प्रोमो टेलिव्हिजनर दाखवण्यास नकार दिला . प्रोमो बघितल्यानंतर निहलानी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की , इंटरकोर्स शब्द असलेला संवाद डिलिट करण्याच्या अटीवर आम्ही चित्रपटाला यूए सर्टिफिकेट दिले आहे . त्यावर अजून त्यांचे उत्तर येणं अपेक्षित आहे . अजूनही आमच्याकडून प्रोमोला परवानगी मिळालेली नाही . वाचा : नागिण , माशी झाली आता आणखी एक भंपक हिंदी मालिका तुमच्या भेटीला आतापर्यंत चित्रपटाच्या टीमने तीन मिनी ट्रेलर्स प्रसिद्ध केलेले आहेत . यामध्ये शाहरुखला ‘हॅरी’च्या तर अनुष्का शर्माला ‘सेजल’ या गुजराती मुलीच्या रुपात समोर आणण्यात आले आहे . ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट येत्या ४ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे .
0
World Boxing Championship या स्पर्धेत भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने पदक निश्चित करत उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या एका भारतीय महिला बॉक्सरनेदेखील उपांत्य फेरीत धडक मारली आहे . भारताच्या लोव्हलीना बोरगोहैन हिने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट ५ - ० ने धुवा उडवत हा पराक्रम केला आहे . त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आता दुसरे पदक निश्चित झाले आहे . लोव्हलीना हिने ऑस्ट्रेलियाच्या के स्कॉट हिला ६९ किलो वजनी गटात धूळ चारली . तिने सामन्यात स्कॉटला चारी मुंड्या चीत केले आणि भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले . या आधी आज मेरी कोम हिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली . उपांत्यपूर्व फेरीत तिने चीनच्या वू यु हिला ५ - ० असे पराभूत केले . मेरी कोमच्या या विजयामुळे तिचे जागतिक स्पर्धेमध्ये पहिले पदक निश्चित झाले होते . ४८ किलो वजनी गटात तिची झुंज चीनच्या वू यु हिच्याशी झाली . या सामन्यात मेरी कोमने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व राखले . चीनच्या प्रतिस्पर्ध्याला सामन्याच्या कोणत्याही क्षणाला तिने डोके वर काढू दिले नाही . तिच्या या सुंदर खेळीमुळे तिला या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला होता .
2
Australia vs India 2nd Test Perth live update – भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली . उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे . त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला . त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ बळी टिपले . ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली . फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला . पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला . त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली . अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला . पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श ( ४५ ) दुसऱ्या डावात झेलबाद झाला . शमीने त्याला ५ धावांवर बाद केले . हँड्सकॉम्बही १३ धावांवर पायचीत झाला . तर पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला . हेडने केवळ १९ धावा केल्या . सध्या ख्वाजा ४१ आणि पेन ८ धावांवर नाबाद आहेत . नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला . पहिल्याच षटकात अजिंक्य रहाणे झेलबाद झाला . विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले . मात्र त्यानंतर विहारी ( २० ) , कोहली ( १२३ ) आणि शमी ( ० ) झटपट बाद झाले . ऋषभ पंतने काही काळ झुंज दिली पण तोदेखील ३६ धावांवर माघारी परतला . अखेर बुमराहला माघारी पाठवत लॉयनने भारताचा डाव संपवला . तत्पूर्वी काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १७२ धावा केल्या . ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला . त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली . भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली . उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला . दुसऱ्या सत्रात राहुल २ धावा काढून त्रिफळाचित झाला . विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला . स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले . ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला . ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच ( ५० ) , हॅरिस ( ७० ) आणि हेड ( ५८ ) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली . इशांत शर्माने सर्वाधिक ४ बळी टिपत यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली . भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली . उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे . त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला . त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ बळी टिपले . पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणारा ट्रेव्हिस हेड झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी तंबूत परतला . हेडने केवळ १९ धावा केल्या . पहिल्या डावात विराटने अफलातून झेल टिपलेला हँड्सकॉम्ब या डावात पायचीत झाला . इशांतने टाकलेला वेगवान चेंडू त्याच्या पायावर आदळला आणि तो १३ धावांवर माघारी परतला . पहिल्या डावात अर्धशतकाने हुलकावणी दिलेला शॉन मार्श ( ४५ ) दुसऱ्या डावात झेलबाद झाला . शमीने त्याला ५ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला . ऑस्ट्रेलियाला बुमराहने पहिला धक्का दिला . सावध सुरूवात केल्यानंतर बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला . दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक झाले असून त्यांच्याकडे ९७ धावांची आघाडी आहे . ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली . फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला . पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ' रिटायर्ड हर्ट ' झाला व तंबूत परतला . त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली . भारताविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पर्थच्या मैदानावर रंगला असून सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे . नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर संपुष्टात आला . इशांत शर्मा माघारी ; भारताला आठवा धक्का भारताने उपहारापर्यंत भारत ७ बाद २५२ या धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे . विहारीच्या साथीने कोहलीने डाव पुढे नेला आणि आपले शतक पूर्ण केले . मात्र त्यानंतर विहारी ( २० ) , कोहली ( १२३ ) आणि शमी ( ० ) झटपट बाद झाले . शतकवीर कोहली माघारी ; भारताचा सहावा गडी बाद चांगली सुरुवात मिळाल्यानंतर हनुमा विहारी २० धावांवर बाद झाला . त्याला हेजलवूडने बाद केले . कर्णधार विराट कोहलीने झुंजार खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील २५ वे शतक झळकावले . त्याने २१९ चेंडूत झळकावलेल्या शतकात ११ चौकार लगावले . - - अनुभवी अजिंक्य रहाणे ५१ धावांवर बाद झाल्यामुळे भारतीय संघाची सर्व मदार आता विराट कोहलीवर आहे . विराट कोहली ८१ धावांवर खेळत आहे . भारत आणखी १५३ धावांनी पिछाडीवर आहे . तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या षटकात रहाणे बाद झाला . फिरकी गोलंदाज नाथन लॉयनने रहाणेला ५१ धावांवर बाद केले .
2
आधारकार्ड ही प्रत्येक व्यक्तीची अतिशय महत्त्वाची ओळख आहे . व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार आणि इतर गोष्टीही मोदी सरकारने आधार कार्डशी संलग्न केल्या आहेत . त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे . आधार क्रमांक म्हणजे तुमचा युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक असतो . व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सध्या नाव , राहण्याचा पत्ता यांबरोबरच डोळे , फिंगरप्रिंट यांच्यावरुन ओळख पटविण्याचे काम केले जायचे . मात्र आता नव्याने चेहऱ्यावरुन व्यक्तीची ओळख पटवली जाणार आहे . युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरीटी ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार , चेहेऱ्यावरुन ओळख पटवली जाणार आहे . काही दिवसांपूर्वी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी डोळे आणि फिंगरप्रिंट हे व्यक्तीची ओळख पटण्यासाठी पुरेसे नाही . असे म्हटले होते . त्यामुळे या नवीन फिचरचा समावेश कऱण्यात आला आहे . वृद्ध व्यक्ती तसेच लहान मुले यांच्या बाबतीत अनेकदा फिंगर प्रींटला अडचणी येतात . त्यामुळे आता हे नवीन फिचर लाँच केले जाणार आहे . १ जुलैपासून हे नवीन फिचर लागू करण्यात येणार असून नव्याने आधारकार्ड काढणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे . याबरोबरच आधारचा व्हर्च्युअल आयडी आता वेबसाईटवरुन तयार होईल . त्यामुळे सीमकार्ड किंवा इतर अनेक गोष्टींसाठी तुम्ही आधार क्रमांकाऐवजी चेहेऱ्यावरुन तुमची ओळख पटणार आहे .
1
तुमच्या आमच्या , सर्वाच्या जीवनात दोन प्रकारच्या ‘कडकीचा’ अनुभव आपण घेत असतो . आपण दोन - चार मित्र हॉटेलात जातो . वयाने मोठी व्यक्ती फक्त ‘चहा’ मागवते . का तर , आज ‘कडकी’ आहे . खिशात चार जणांच्या चहापुरतेच पैसे आहेत . असो . दुसरी शारीरिक कडकी म्हणजे तळहात , तळपाय नेहमी गरम राहतात . डोळ्यांची आग होते , लघवीला गरम हाते . प्रत्यक्ष थर्मामीटरमध्ये ताप दिसत नाही , पण तापाची सारखी भावना होते . शौचास कडक होते व काही वेळा शौच करताना रक्त पडते ; रात्री खूप उशिरा झोप लागते . अशी पित्ताची विविध लक्षणं आलटूनपाटलून दिसतात . कडकी विकाराची गंमत अशी की कडकी कमी झाली तर काहींना लगेचच सर्दी , नाक वाहणे सुरू होते . कृश व्यक्तींची कडकी लवकर बरी होत नाही . कारण त्यांच्या पित्तसदृश लक्षणांना वाताच्या रुक्ष , लघू या गुणांची जोड असते . त्यामुळे त्यांच्या कडकीच्या जोडीला उलटीची भावना , आम्लपित्त या रोगांचाही सामना करायला लागतो . कडकी विकाराच्या निर्मूलनाकरिता दोन प्रकारे उपचार करावे लागतात . मानवी शरीरात रसधातूला अनन्यसाधारण महत्त्व आहे . आपण जे खातो - पितो , त्यातून रसधातू तयार होतो . रसधातू शीत गुणांचा आहे . रसधातूपासून रक्ताची निर्मिती होते . रक्त हे उष्ण निर्दालक आहे . त्यामुळे कडकी विकारात उष्णता कमी होईल , पण पंडुता , सर्दी , कफ , खोकला , दमा होणार नाही ; अशी काळजी घ्यावी लागते . आयुर्वेदिक चिकित्सक कडकीकरिता अंगावर पुरळ उठते का , शरीराची आग होते का , खाज सुटते का याचा मागोवा घेत असतात . कडकी पित्तप्रधान असली तर प्रवाळ , मौत्यस्य , उमळसरी अशी औषधे दिली जातात . कडकी क्वचितच कफप्रधान असते ; त्यावेळेस संबंधित व्यक्तीस बारीक ताप येणार नाही याकरिता लघु मालिनी वसंत , ज्वरांकुश , अम्लपित्तवरी अशी औषधी योजना केली जाते . कडकी विकारांत रसरक्त वाहिन्यांत आम दोष वाढलेला असतो . आपण जो आहार घेतो , त्याचे सूक्ष्म पचन मंदावलेले असते . मिरी हा आपल्या नेहमीच्या परिचयाचा असा पदार्थ आहे की ; तो शरीरात रसरक्त वाहिन्यांत खोलवर पोचून सूक्ष्म पचनाचे उत्तम काम करतो . एकदोन मिरेपूड व आठदहा तुळशीची पाने असे मिश्रण सकाळी व सायंकाळी जेवणाअगोदर तीनचार तास घ्यावे . ज्यांच्या अंगात खूप खूप कडकी आहे , त्याच्या जोडीला शरीरभर खाज आहे ; त्यांनी गेरू किंवा कावेचे चूर्ण पाव चमचा एक वेळ अवश्य घ्यावे . दही , लोणची , पापड , शिळे अन्न , कोल्ड्रिंक , आईस्क्रीम , ज्यूस , उसांचा रस असे खाणे - पिणे कटाक्षाने टाळावे . चाकवत , राजगिरा , तांदुळजा , सुरण अशा भाज्या व पुदिना , आले अशी चटणी नियमितपणे , खावी . डाळिंब , सफरचंद , ताडेगोळे , पांढरे खरबूज अशी फळे शरीरांतील नेहमीची गरमी कमी करायला निश्चित मदत करतात . रात्रौ उशिरा जेवण , मांसाहार , शंकास्पद अन्न अवश्य टाळावे . कावीळ मानवी जीवनात सर्वानाच केव्हा ना केव्हा काम , क्रोध , मोह , मद , मत्सर , शोक या षड्रिपूंचा सामना करावा लागतो . या षड्रिपूंमध्ये काम - इच्छा - वासना यांना काही वेगळे स्थान आहे . तुमच्या आमच्या जीवनात काम म्हणजे चांगल्या अर्थाने भूक , आवड . वासना नसेल तर जीवनच व्यर्थ ठरेल . संत , महंत मंडळींचे ठीक आहे . त्यांचे पुढे उदाहरण असते निष्काम कर्मयोग्याचे . असो . तुम्ही - आम्ही जर जेवणखाणच नकोसे केले म्हणजे सगळाच कारभार आटपला असे समजावे . कावीळ हा शब्द ‘कामला’ या मूळ संस्कृत शब्दाचा मराठी प्रतिशब्द आहे . बहुतेक सर्वाना कावीळ या रोगलक्षणांचा केव्हा ना केव्हा सामना करावाच लागतो . माझे लहानपणी एककाळ काविळीची जबरदस्त साथ आली होती . कामला म्हणजे ‘कामाचा लय’ ; खाण्या - पिण्याची अजिबात इच्छा वा रुची नसणे . या रोगाचे सर्वसामान्यपणे दोन प्रकार आढळतात . रुद्धपथ कामला व बहुपित्त कामला . रुद्धपथ कामला किंवा नेहमीचा काविळीचा प्रकार हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे . या विकारात डोळे , नखे , मूत्र या सगळ्यांना गडद पिवळा रंग येतो . मल मात्र पांढरा किंवा क्वचित काळा असतो . आपल्या पोटात यकृत व प्लीहा या दोन अवयवांकडून पित्ताचे स्राव येणाऱ्या अन्नात मिसळत असतात . ते स्राव आमाशय व पक्वाशय या दोन आतडय़ांमध्ये असणाऱ्या पित्ताशयाकडूनही अन्नावर पचनाचे काम सतत करत असतात . कावीळ या विकारांत विविध कारणांनी हे पित्ताचे स्राव अन्नात न मिसळता रक्तांत मिसळतात . त्यामुळे लघवी पिवळी होते , क्वचित लाल होते . भूक नाहीशी होते . बहुपित्त कामलेत मल , मूत्र , नखे सर्वच पिवळ्या किंवा लालसर रंगाची असतात . मला स्वतःला खूप वर्षांपूर्वी , पुण्याहून मुंबईला रेल्वेने जात असताना , काविळीचा सामना करावा लागला होता . लघवी गर्द पिवळी , किंचित लाल आढळल्याबरोबर मी लगेचच उकळलेले पाणी प्यायला सुरुवात केली . कोरफडीच्या एका संपूर्ण पानाचा गर दिवसभरात खात होतो . तेल , तूप , लोणी , शेंगदाणे , खोबरे , मिठाई काही दिवस पूर्णपणे वर्ज्य केली . माझ्याकडे आरोग्यवर्धिनी , त्रिफळा गुग्गुळ , कुमारीआसव , गंधर्वहरीतकी इ . खूप खूप औषधे होती . पण ती न घेता एक दिवस फक्त साळीच्या लाह्य खाऊन काढला . दुसऱ्या दिवसापासून चार दिवस ज्वारीची भाकरी , मुगाचे वरण , उकडलेल्या भाज्या खाल्ल्या . कावीळ झालेल्या व्यक्तीने वरील उपचारांशिवाय पूर्णपणे उताणे झोपून विश्रांती घेतली तर लवकर आराम पडतो . कावीळ विकारांकरिता आरोग्यवर्धिनी , त्रिफळा गुग्गुळ , अम्लपित्तवरी , कुमारीआसव व गंधर्वहरीतकी चूर्ण नियमितपणे घ्यावे . पोटदुखी त्रास देत असल्यास जेवणानंतर प्रवाळ पंचामृत गोळ्या घ्याव्या . कडक पथ्ये पाळावीत . कावीळ विकारात एरवी अन्नात मिसळणारे पित्ताचे स्राव अन्नात न मिसळता रक्तांत मिसळतात . त्यामुळे लघवी पिवळी होते , क्वचित लाल होते . भूक नाहीशी होते . सौजन्य – लोकप्रभा response . lokprabha @ expressindia . com
1
‘चीनची भिंत’ ही एक अभेद्य तटबंदी म्हणून ओळखली जाते . कबड्डीविश्वात सामथ्र्यशाली बचावामुळे इराणच्या संघालासुद्धा हेच महत्त्व प्राप्त झाले आहे . शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेमकी हीच भिंत भेदून सलग तिसरा विश्वचषक आपल्याकडे राखण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे . भारत सलग तिसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इराणशी झुंजणार आहे . २००४मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने इराणवर ५५ - २७ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला होता . त्यानंतर २००७मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्वचषकात भारताने त्यांना २९ - १९ अशा फरकाने हरवले . अगदी २०१०च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतसुद्धा भारताने त्यांना सहज हरवले होते . मात्र २०१४मध्ये प्रो कबड्डी लीगचे वैभवशाली पर्व सुरू झाले . खेळातील या क्रांतीमुळे कबड्डीला चांगले दिवस आले . इराणी खेळाडू प्रो कबड्डीच्या अनुभवातून अधिक तरबेज झाले . २०१४ सालीच झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला सुवर्णपदक राखणे कठीण झाले होते . राकेश कुमारच्या समर्थ अनुभवामुळे जेमतेम दोन गुणांच्या ( २७ - २५ ) फरकाने भारताने निसटता विजय मिळवला . हेच दडपण भारतावर इराणविरुद्ध लढताना असणार आहे . इराणचा संघनायक मेराज शेख म्हणतो , ‘‘विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आम्ही भारताला शंभर टक्के हरवू . इराणच्या संघाने नेहमीच ताकदीने आपला ठसा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उमटवला आहे . योग्य रणनीतीनुसार आम्ही खेळू . आमच्या संघात लढण्याची ऊर्जा असलेल्या युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे . ’’ भारताचा कर्णधार अनुप कुमार आणि प्रशिक्षक बलवान सिंग यांना भारताच्या विजेतेपदाची खात्री आहे . भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत . प्रो कबड्डीत नियमित खेळल्यामुळे मेराज , फझल अत्राचाली , आदी खेळाडूंचा खेळ आम्ही उत्तम जाणतो , असे अनुपने या वेळी सांगितले . प्रो कबड्डीच्या आकडेवारीनुसार इराणचा बचाव भारतासाठी आव्हानात्मक अंतिम सामना
2
बॉलीवूड अभिनेत्रींचे करोडो प्रशंसक आहेत . त्यांचा अभिनय आणि स्टाइलचे अनेक चाहते आहेत . दरम्यान , काहीजण त्यांच्यासारखे काम करून किंवा त्यांची स्टाइल कॉपी करून आपले प्रेम व्यक्त करतात . तर काहीजण मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आवडत्या कलाकाराविषयीचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात . आपले चाहते असणे ही आनंदाची गोष्ट आहे पण त्यापलीकडे जाऊन या चाहत्यांनी काही वेडेवाकडे केले तर त्याचा त्रास या अभिनेत्रींना सहन करावा लागतो . त्यामुळे आपल्यासोबत सुरक्षारक्षकांना घेऊन फिरण्याशिवाय या अभिनेत्रींकडे काही पर्याय राहत नाही . अशाच काही प्रसंगांना बॉलीवूड अभिनेत्रींना सामोरे जावे लागले होते . विद्या बालन ‘डर्टी पिक्चर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विद्या बालनच्या चाहत्याने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता . मात्र , सुरक्षारक्षकांच्या सावधानतेमुळे त्यावेळी कोणतीही हानी झाली नाही . सुष्मिता सेन एकदा एका चाहत्याने सुष्मिता सेनचा लग्न करण्यासाठी पिच्छा पुरवला होता . मात्र , सुष्मिताने या गोष्टीकडे तेव्हा दुर्लक्ष केले . त्या चाहत्याला याबद्दल कळताच त्याने सुष्मिताला जीवे मारण्याची धमकी दिली होती . कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना रणौत हिच्या प्रेमात पडलेल्या एक चाहत्याने तिला भेटवस्तू आणि प्रेमपत्र पाठवण्यास सुरुवात केली होती . त्यानंतर या व्यक्तीने जीममध्येही तिचा पाठलाग करण्यास सुरु केली . तेव्हा मात्र त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . दिया मिर्झा दियाच्या घरी एका डॉक्टरचे काही कारणास्तव येणेजाणे होते . एकेदिवशी दियाने डॉक्टरच्या विचित्र स्वभावामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली . जेनेलिया डिसुझा देशमुख जेनेलिया एकदा विजयवाडा येथे स्टोअरच्या अनावरणाला गेली होती . त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केलेला . जेनेलियाला त्याचा राग आल्याने तिने लगेच त्या व्यक्तीच्या कानाशिलात मारली . कतरिना कैफ बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफचाही एका चाहत्याने पाठलाग केला होता . २००९ सालची ही घटना आहे . कतरिनाने त्या व्यक्तिला ब - याचदा तंबी देऊन सोडले होते . पण , या चाहत्याने एक दिवस तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला . त्यावेळी त्याला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले . श्रुती हसन श्रुती हसनला फार वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते . एक व्यक्ती श्रुतीच्या राहत्या घराचा दरवाजा रोज ठोकावून जात असे . एके दिवशी तर श्रुती जेव्हा दरवाजा उघडण्यास गेली त्यावेळी दरवाजाच्या मधल्या फटीतून हात काढत त्या माणसाने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला .
0
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली . पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली . आता भारताला विजयासाठी ६ बळींची गरज आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची आवश्यकता आहे . या सामन्याचा केवळ एका दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामन्यात रंगत आली आहे . त्याआधी भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान ठेवले . फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला . भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली आणि भारताला समाधानकारक आघाडी मिळवून दिली . ३ बाद १५१ या धावसंख्येवरुन आज भारताच्या डावाला सुरुवात झाली . चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे जोडीने भारताच्या खात्यात धावसंख्येची भर घालत डावाला आकार दिला . दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही झाली . अखेर नॅथन लॉयनने पुजारा ( ७१ ) आणि त्यापाठोपाठ रोहित शर्माचा ( १ ) अडसर दूर करत भारताला दोन धक्के दिले . पण पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली . उपहारानंतर मात्र भारताचा डाव गडगडला . ऋषभ पंत ( २८ ) , अश्विन ( ५ ) , रहाणे ( ७० ) , शमी ( ० ) आणि इशांत शर्मा हे पाच गडी भारताने झटपट गमावले . दुसऱ्या डावात लॉयनच्या ६ गड्यांव्यतिरिक्त स्टार्कने ३ तर हेजलवूडने १ गडी माघारी धाडला . भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १०४ धावांपर्यंत मजल मारली . पहिले चार गडी झटपट गमावल्यानंतर शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली . आता भारताला विजयासाठी ६ गडींची आवश्यकता आहे तर ऑस्ट्रेलियाला २१९ धावांची गरज आहे . या सामन्याचा केवळ एक दिवसाचा खेळ शिल्लक राहिला असल्याने सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे . ४ गडी झटपट बाद झाल्यानंतर आता शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आणि संघाला शतकी मजल मारून दिली . शमीने टाकलेला उसळता चेंडू पीटर हॅंड्सकाॅंबला टोलवता आला नाही . बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागून तो झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला . उस्मान ख्वाजा झेलबाद , ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला . सलामीवीर हॅरिस २६ धावांवर माघारी परतला . फिरकीपटू अश्विनने सलामीवीर फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला . फिंच ११ धावांवर माघारी परतला . त्यामुळे चहापानांपर्यंत ऑस्ट्रेलियाआजी धावसंख्या १ बाद २८ अशी झाली . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद ३०७ धावांपर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियापुढे सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे ठेवले . फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले आणि भारताच्या धावसंख्येला लगाम लावला . अश्विन आणि रहाणे बाद झाल्यानंतर पाठोपाठ शमीही तंबूत परतला . पहिल्याच चेंडूवर त्याने हवेत उंच फटका मारला अजिंक्य रहाणे ७० धावांवर बाद , भारताचा आठवा गडी माघारी अश्विन झेलबाद , भारताला सातवा धक्का लॉयनला सामन्यात आणखी एक यश , भारताचा सहावा गडी माघारी भारताकडे २७५ धावांची आघाडी , अजिंक्य रहाणे - ऋषभ पंत जोडी खेळपट्टीवर कायम लॉयनच्या गोलंदाजीवर हँडस्काँबने घेतला झेल , भारताचा निम्मा संघ माघारी पुजारा माघारी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपलं अर्धशतक झळकावत संघाच्या आघाडीमध्ये भर घालण्याचं काम सुरुच ठेवलं आहे नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर पुजारा झेलबाद , दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी पुजारा - रहाणेची चौथ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी भारताची आघाडी २०० धावांच्या पलीकडे
2
प्रशांत केणी सचिन तेंडुलकर , प्रवीण अमरे , विनोद कांबळी , अमोल मुझुमदार यांच्यासारखे एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर सरांचे गुरुकुल सर्वश्रुत आहे . परंतु निष्णात प्रशिक्षकांचे विद्यापीठ म्हणूनसुद्धा त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठे योगदान आहे . मुंबईतील यशस्वी प्रशिक्षकांमध्ये आचरेकर यांच्या शिष्यांची गणना केली जाते . सोमवारी वयाची ८६ वर्षे पूर्ण करणाऱ्या आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडणारे बलविंदर संधू , लालचंद रजपूत , चंद्रकांत पंडित , प्रवीण अमरे , सुलक्षण कुलकर्णी , पारस म्हांब्रे , समीर दिघे आणि विनायक सामंत यांनी मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवले आहे . यापैकी अनेकांनी मुंबईला रणजी विजेतेपदसुद्धा जिंकून दिले आहे . रजपूत सध्या झिम्बाब्वेचे प्रशिक्षक आहेत . माजी क्रिकेटपटू पंडित यांनी गतवर्षी विदर्भाला प्रथमच रणजी जेतेपदाचा मान मिळवून देण्याची किमया साधली होती . अमरे यांनी आयपीएलमधील प्रशिक्षकपदासह अजिंक्य रहाणे , सुरेश रैना यांच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना वैयक्तिक मार्गदर्शन केले आहे . देशात आदर्श क्रीडापटू घडवण्याच्या उद्देशाने सचिन तेंडुलकरने तेंडुलकर - मिडलसेक्स ग्लोबल अकादमी सुरू केली . या उपक्रमात त्याच्यासोबत विनोद कांबळीसुद्धा मुलांना मार्गदर्शन करतो . मुझुमदार आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा फलंदाजीचा प्रशिक्षक असणार आहे . रोहित शर्मा , शार्दूल ठाकूर , सिद्धेश लाड यांना घडवणाऱ्या दिनेश लाड यांच्यासह भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक रमेश पोवार हेसुद्धा आचरेकर यांचे शिष्य आहेत . प्रशिक्षकांच्या या यादीत आचरेकर सरांनंतर शारदाश्रम विद्यामंदिर शाळेचे प्रशिक्षकपद सांभाळणारे नरेश चुरी यांच्यासह पांडुरंग साळगावकर , अमित दाणी , विनायक माने , किरण पोवार , ओंकार खानविलकर , संदेश कवळे , राजा अधटराव , मनोज जोगळेकर , जय धुरी , मयूर कद्रेकर , नितीन खाडे , लक्ष्मण चव्हाण , विशाल जैन , श्रेयस खानोलकर , विनोद राघवन यांचाही समावेश होतो . कुटुंब रंगलंय प्रशिक्षणात . . आचरेकर यांची मुलगी कल्पना मुरकरने बीसीसीआयचा प्रथमस्तरीय प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला असून , गेली २७ वर्षे ती आचरेकर क्रिकेट अकादमी सांभाळत आहे . सध्या ती मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवड समितीची सदस्य आहे . आचरेकर यांचे नातू ( मुलीची मुले ) प्रदोष मयेकर आणि सोहम दळवी अनुक्रमे रुपारेल आणि कीर्ती महाविद्यालयात मार्गदर्शन करतात . त्यांचा पुतण्या मिलाप आचरेकरसुद्धा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे . कोणत्या खेळाडूच्या स्वप्नाचा प्रवास हा प्रशिक्षकासोबत सुरू होतो , त्यांचा तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो . आचरेकर सर शिस्तबद्ध आणि प्रेमळ आहेत . त्यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवताना ते कधीही मला ‘छान खेळलास’ असे म्हणाले नाहीत . परंतु ते जेव्हा मला भेळपुरी किंवा पाणीपुरी खायला न्यायचे , तेव्हा माझ्या मैदानावरील कामगिरीवर सर खूश आहेत , याची मला खात्री व्हायची . – सचिन तेंडुलकर आचरेकर सरांनी जे मुंबईच्या क्रिकेटला योगदान दिले आहे . त्याच्या १० टक्केही योगदान मला अद्याप देता आलेले नाही . त्यांनी आम्हाला आत्मीयतेने घडवले , याची आता आम्हाला जाणीव होते आहे . प्रशिक्षक म्हणून खेळाडू घडवताना तोच दृष्टिकोन समोर असतो . माझ्या कारकीर्दीला वळण देणारा तो सामना आचरेकर सरांनी पाहिला नसता , तर मी प्रवीण अमरे म्हणून घडूच शकलो नसतो . - प्रवीण अमरे
2
अपराजित मालिका कायम राखणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाची जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी टप्प्यात मंगळवारी नेदरलँड्सविरुद्ध खरी कसोटी लागणार आहे . मात्र पाकिस्तानविरुद्धच्या मोठय़ा विजयानंतर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या नेदरलँड्सला पराभूत करण्यासाठी भारतीय खेळाडूंनी कंबर कसली आहे . ही लढत ‘ब’ गटातील अव्वल स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची असल्याने दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे . भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे आणि ‘ब’ गटात तीन विजयांसह त्यांनी ( ९ गुण ) अव्वल स्थान पटकावले आहे , परंतु नेदरलँड्स ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे . भारताचा गटातील हा अखेरचा सामना असून नेदरलँड्सला आणखी एक सामना शिल्लक आहे . त्यामुळे त्यांना अव्वल स्थानी झेप घेण्याची संधी आहे . मात्र भारताने येथे विजय मिळवल्यास गोल सरासरीच्या जोरावर ते अव्वल स्थानी कायम राहतील . भारताने स्कॉटलंड ( ४ - १ ) , कॅनडा ( ३ - ० ) आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ( ७ - १ ) यांच्यावर एकहाती वर्चस्व गाजवत विजयी हॅट्ट्रिक नोंदवली . भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याने या विजयाचे श्रेय पेनल्टी कॉर्नरमधील यशाला दिले आहे . तो म्हणाला , ‘‘येथे दाखल होण्यापूर्वी जर्मनीत तीन देशांच्या स्पध्रेत आम्हाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सातत्याने अपयश येत होते . ती आमची कमकुवत बाजू झाली होती , परंतु पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत आम्ही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश मिळवले आणि कमकुवत बाजूवर मात केली . संघातील खेळाडू झटपट सुधारणा करत आहेत . नेदरलँड्सविरुद्ध सातत्यपूर्ण खेळ करण्याचा आमचा प्रयत्न असेल . ’’ दुसरीकडे नेदरलँड्सने पाकिस्तान ( ४ - ० ) , स्कॉटलंड ( ३ - ० ) यांच्यावर मात केली आहे आणि भारताविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक साजरी करण्यासाठी तेही सज्ज आहेत . असे असले तरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे . ‘‘संघाच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर मी समाधानी आहे , परंतु आमचे काम अजून संपलेले नाही . आम्हाला अपराजित्व कायम राखायचे आहे . त्यासाठी सातत्याने आक्रमक खेळ व रणनीतीची १०० टक्के अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे . नेदरलँड्सचीही स्पध्रेतील कामगिरी चांगली झालेली आहे , ’’ असे ओल्टमन्स म्हणाले .
2
कुठल्याही सणाच्या निमित्ताने केले जाणारे खास पदार्थ हे त्या सणाचं खास वैशिष्ट्य असतं . त्या त्या सणाच्या वेळेस केले जाणारे हे पदार्थ चवदार तर असतातच पण त्या ऋतुमधला तो एक वैशिष्ट्यपूर्ण आहार असतो . तर आज आपण पाहणार आहोत होळीनिमित्त केल्या जाणाऱ्या कटाच्या आमटीची रेसिपी . पुरणपोळीचं पुरण करताना सुरूवातीला आपण हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ शिजत घालतो तेव्हाच जास्त पाणी घालून डाळ शिजवावी . डाळ शिजली की गूळ घालण्याआधी डाळीच्या वरचं पाणी अलगद काढून घ्यावं . त्यात थोडी डाळ आली तरी चालते . यावेळी मोठ्या स्टीलच्या गाळण्यातून गाळून पाणी वेगळं केलं तरीही चालतं . या पाण्यालाच ‘कट’ असं म्हणतात . याच पाण्याचा आमटीसाठी उपयोग करायचा आहे . कटाच्या आमटीचे साहित्यः १ . कट २ . कांदा ३ . सुके खोबरे ४ . लसूण ५ . आलं ६ . गरम मसाला पावडर ७ . लाल तिखट ८ . धणेजिरे पावडर ९ . मीठ १० . पुरण ११ . तेल १२ . कोकम कृतीः १ . अख्खा कांदा थोडंसं तेल लावून सालासकट गॅसच्या ज्वाळांवर भाजून घ्यावा . अशाच प्रकारे खोबऱ्याचा तुकडाही भाजून घ्यावा . २ . साल काढून कांद्याचे तुकडे करावेत . खोबऱ्याचेही तुकडे करावेत . ३ . मिक्सरमध्ये कांदा , खोबरं , लसूण आणि आलं यांची पेस्ट करून घ्यावी . ४ . गॅसवर भांडं ठेवून त्यात तेल टाकावं . मोहरी , हिंग , जिरं , कढीपत्ता आणि हळद घालून फोडणी टाकावी . ५ . डाळीचा कट फोडणीत घालून लगेचच त्याला मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण लावावं आणि उकळी येऊ लागताच त्यात गरम मसाला पावडर , लाल तिखट , धणेजिरे पावडर , मीठ घालून चांगली उकळी येऊ द्यावी . पुढे मंद आचेवर आमटी उकळू द्यावी ६ . आमटी चांगली उकळल्यावर त्यात थो़डेसे तयार पुरण ( एका लिंबाएवढं ) घालावं व आणखी १ - २ मिनिटं उकळावं . ७ . आता ३ - ४ कोकम ( आमसुलं ) घालून गॅस बंद करावा . वरून बारीक चिरलेली कोथिंबिर घालावी आणि पुरणपोळीबरोबर सर्व्ह करावी कटाची आमटी जरा पातळसर ठेवावी कारण गार झाल्यावर ती खूप घट्ट होते . तर बघताय काय ! होळी आणि धुळवडीच्या रंगासोबत झक्कास मराठमोठी कटाची आमटी करा आणि कुटुंबासोबत मस्त ताव मारा !
1
काही लोक नाताळाला ‘ख्रिसमस’ म्हणतील , काही त्याला ‘ख्रिस्तजयंती’ म्हणतील . अशा अनेक नावांच्या मागे अंतर्भूत आहे एकच घटना – येशू ख्रिस्ताचा जन्म . येशू स्वर्गातून पृथ्वीवर आला . दोन हजार वर्षांपूर्वी घडलेली ही घटना . आशिया खंडातील इस्रायल देशामधील बेथलेहेम गावात डोंगराळ प्रदेशात एका गुहेत गुरांच्या गोठय़ात झालेला येशूचा जन्म ही एक ऐतिहासिक घटना आहे . या घटनेपासून इतिहासाने नवे वळण घेतले . इथपासून येशूच्या नावाने नवीन कालगणना सुरू झाली , त्याला ‘इसवी सन’ असं म्हणू लागलो . येशूच्या जन्माची ही घटना घडली २०१६ वर्षांपूर्वी . ख्रिस्तजन्माचे गुणगान गाणारी ही २०१६वी ‘ख्रिस्तजयंती’ ऊर्फ ‘ख्रिसमस’ . आज सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जात आहे . यानिमित्त ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारे संदेश आणि पोस्ट आपल्याला सोशल मिडीयावर पाहावयास मिळत आहेत . त्यात आपले बॉलीवूड सेलिब्रिटी तरी कसे मागे राहतील . कोणताही सण असो आपले बॉलीवूडकर तो आनंदाने साजरा करतातचं . पण त्याचसोबत आपल्या चाहत्यांनाही त्याच्या शुभेच्छा द्यायला ते विसरत नाही . बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन , बादशहा शाहरुख खान , सोनाक्षी सिन्हा , डेजी शाह आणि अन्य काही सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्याना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत . २५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्तांची जयंती किंवा ख्रिसमस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो . जरी हे सत्य असले की नाताळ हा दिवस येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो त्याबरोबरच हा दिवस अध्यात्माचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्याचे प्रतीक आहे . प्रभू येशू ख्रिस्त हे दिव्यत्वाचा साक्षात अवतार मानले जातात . त्यांचा जन्म अशा काळात झाला त्या वेळी अज्ञान , अंधकार , लोभ , हिंसा , दांभिकता , अंधश्रद्धा या दुर्गुणांचा प्रभाव जगावर निर्माण झाला होता . करुणा , पवित्रता आणि नैतिकतेचा वसा जणू काही मानव जात विसरलीच की काय अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती . या काळात प्रभू येशूंचा जन्म झाला आणि त्यांनी लाखो लोकांचे आयुष्य प्रकाशमान केले . येशू ख्रिस्ताने सामान्य माणसाच्या आयुष्याला नवे आणि आध्यात्मिक वळण दिले . येशूंनी दिलेला मार्ग प्रेम आणि पवित्रतेवर आधारित होता त्यांच्या या संदेशामुळे जगात एक नवी पहाट निर्माण झाली .
0
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन - डे सामन्याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे . आपल्या आजारी बायकोची काळजी घेण्यासाठी शिखर धवनला संघातून सुट्टी देण्यात आलेली आहे . १७ सप्टेंबरला भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वन - डे सामना रंगणार आहे . याआधीही श्रीलंका दौऱ्यात पाचवा वन - डे सामना आणि एकमेव टी - २० सामन्यात आपल्या आजारी आईची काळजी घेण्यासाठी धवन लंकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता . शिखरची बायको आयेशा मुखर्जी ही एक प्रोफेशनल बॉक्सर आहे . हरभजन सिंहच्या मध्यस्थीने शिखर आणि आयेशाची भेट झाली . २०१२ साली शिखर आणि आयेशाचं लग्न झालं . २०१४ साली दोघांनाही एक गोंडस मुलगा झाला . शिखरने आपल्या मुलाचं नाव झोरावर असं ठेवलं आहे . सध्या बीसीसीआयने शिखर धवनच्या जागी संघात कोणत्याही नवीन खेळाडूची घोषणा केलेली नाहीये . त्यामुळे शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल किंवा अजिंक्य रहाणे भारताच्या डावाची सुरुवात करु शकतील . इंग्लंडमध्ये पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडकात शिखर धवनने भारतीय संघात पदार्पण केलं . यानंतर वेस्ट इंडिज , श्रीलंका दौऱ्यात शिखरचा धडाकेबाज फॉर्म कायम आहे . शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पहावं लागणार आहे . अजिंक्य रहाणेचं वन - डे संघातलं स्थान अजुनही पक्क नाहीये . वेस्ट इंडिज दौऱ्यात रहाणेला शिखर धवनसोबत सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती , या दौऱ्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत मालिकेत सर्वाधीक धावा करुन मालिकावीराचा किताब पटकावला होता . त्यामुळे धवनच्या अनुपस्थितीत वन - डे संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी रहाणेकडे संधी असणार आहे .
2
अंडी सेवनाने टाइप - २ मधुमेही आणि इतरांच्या हृदयाची हानी होते हा समज खरा नसून त्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होत नसल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे . ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतचा वाद संपुष्टात आणताना सांगितले की , अंडी सेवन करण्यात कुठलाही धोका नाही . आठवडय़ाला बारा अंडी खाण्याने मधुमेहाची पूर्वपीठिका असलेल्यांच्या हृदयाची हानी होत नाही . अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या शोधनिबंधानुसार यापूर्वीही तीन महिन्यांच्या संशोधनात असेच निष्कर्ष काढण्यात आले होते . यात सहभागी व्यक्तींचे दोन गट करून एका गटास आठवडय़ाला १२ अंडी तर दुसऱ्या गटास आठवडय़ाला दोनपेक्षा कमी अंडी देण्यात आली पण त्यांच्या हृदयाच्या आरोग्यात कुठलाही फरक पडला नाही . जोखीम दिसून आली नाही . या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठीच्या आहारावर तीन महिने ठेवण्यात आले त्यात त्यांना कमी - जास्त प्रमाणात अंडी देण्यात आली . यात पुढील सहा महिने त्यांना बारा अंडय़ांपर्यंत आहार देण्यात आला . त्यात त्यांच्या हृदयाच्या आरोग्याला कोणताही धोका दिसून आला नाही , असे सिडनी विद्यापीठाचे निक फ्युलर यांनी म्हटले आहे . टाइप दोन मधुमेह असलेल्यांनी अंडी सेवन करू नये त्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो हा समज होता . तो खरा नसून त्यांनी अंडी खाण्यास हरकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे . हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी बटरऐवजी अॅव्होकॅडो आणि ऑलिव्ह तेलाचा वापर करावा असे सुचवण्यात आले आहे . अंडय़ात आहारात्मक कोलेस्टेरॉल जास्त असते आणि टाइप - २ मधुमेहींसाठी एलडीएल ( वाइट - लो डेन्सिटी लिपोप्रोटिन ) कोलेस्टेरॉल घातक असते पण टाइप दोन मधुमेहींनी अंडीसेवन केल्याने त्यांच्या रक्तातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे दिसून आले नाही . अंडय़ात प्रथिने आणि सूक्ष्मपोषके असतात . त्यातून आरोग्यास मोठा फायदा होतो , त्यामुळे कबरेदके आणि मेदाचे नियंत्रण होऊन डोळे , हृदय यांचे आरोग्य राखले जाते . अंडी सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये तीन महिन्यांनंतर वजन घटलेले दिसून आले , असा दावा संशोधनात करण्यात आला आहे .
1
स्वयंपाकघरात आपण रोज जे टॉवेल हात पुसण्यासाठी वापरत असतो , त्यामुळे घातक जीवाणूंचा प्रसार होऊन काही वेळा विषबाधेचा धोका निर्माण होतो , असे भारतीय वंशाच्या संशोधकाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे . एकूण ४९ टॉवेल यात तपासण्यात आले . त्यात जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात दिसून आली . कुटुंबातील जास्त सदस्य हे टॉवेल भांडी पुसणे , हात पुसणे , गरम भांडी पकडणे , साफसफाई करणे यासाठी वापरत असतात . त्यावर एका वापरातच बरेच जीवाणू येतात . टॉवेल ओले असल्याने त्यावर जीवाणू अधिक असतात . कोरडय़ा टॉवेलवर ते कमी असतात . ४९ टॉवेलमध्ये ३६ . ७ टक्के कोलीफॉर्म , ३६ . ७ टक्के एंटरोकॉकस , १४ . ३ टक्के एस ऑरियस जीवाणूंच्या वाढीस अनुकूल होते . स्वयंपाकघर व इतर कारणांनी होणारा जीवाणूंचा प्रसार यात तपासण्यात आला असे मॉरिशस विद्यापीठाच्या सुशीला बिरानजिया यांनी सांगितले . कुटुंबाच्या सवयी व कुटुंबाचा आकार तसेच रचना यावर जीवाणूंचा प्रसार अवलंबून असतो . १०० टॉवेल महिनाभराच्या वापरानंतर तपासले असता त्यावर वेगवेगळे जीवाणू आढळून आले . एस ऑरियस जीवाणूचे प्रमाण कमी सामाजिक व आर्थिक गटांच्या कुटुंबात जास्त दिसून येते . बहुवापराचे टॉवेल व ओले टॉवेल यात इशरेशिया कोली जीवाणू जास्त प्रमाणात आढळून आले . कोलिफॉर्म व एस ऑरियस जीवाणू मांसाहार करणाऱ्या कुटुंबात जास्त दिसून येतात . इशेरिशिया कोलाय हा जीवाणू अनारोग्यकारक सवयी दाखवतो कारण तो विष्ठेतून पसरत असतो . यातून र्सवकष परिणाम म्हणून विषबाधा होण्याची शक्यताही असते अशी भीती त्यांनी व्यक्त केली .
1
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा ‘रेस ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला . ‘रेस ३’ ने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली असून हा चित्रपट २०० कोटी रुपयांचा गल्ला सहज पार करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे . ‘रेस ३’ प्रदर्शित झाल्यानंतर भाईजानने त्याचा मोर्चा अन्य प्रोजेक्ट्सकडे वळविला असून त्याच्या आगामी चित्रपटामध्ये तो अभिनेता साकिब सलीम याला पुन्हा एक संधी देणार असल्याचं सांगण्यात येत आहे . कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अभिनेता साकिब सलीम याने ‘रेस ३’ या चित्रपटामध्ये दमदार अभिनय करत चंदेरी दुनियेमध्ये आपले स्थान निश्चित केल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे . कारण साकिबचा ‘रेस ३’ मधील अभिनय पाहून त्याच्याकडे काही चित्रपटांची विचारण्यात करण्यात आली असून आगामी ‘दबंग ३’ या चित्रपटामध्येही त्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . सलमानला ‘रेस ३’ मधील साकिबचा अभिनय आवडला असून तो त्याच्या आगामी ‘दबंग ३’ मध्ये साकिबला खलनायकाच्या भूमिकेमध्ये घेऊ इच्छित असल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे ‘दबंग ३’ मध्ये साकिब खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसून आला तर वावगं ठरणार नाही . दरम्यान , ‘दबंग ३’ मध्ये साकिबला घेण्याविषयी दिग्दर्शक अरबाज खानला विचारणा केली असता त्याने सध्यातरी चित्रपटाच्या कथेविषयी विचार सुरु आहे त्यामुळे चित्रपटामध्ये झळकणा - या स्टारकास्टच्या नावाची घोषणा ऑफिशली करण्यात येईल . मात्र सलमानच्या डोक्यात साकिबला घेण्याचा विचार सुरु असल्यामुळे ‘दबंग ३’ मध्ये तो खलनायकाची भूमिका साकारेल असं एकंदरीत दिसून येत आहे .
0
राज कपूरच्या अनेक वैशिष्ट्यातील एक म्हणजे , त्याच्याच दिग्दर्शनातील चित्रपटातील गाण्यांचे रुपेरी सादरीकरण . मेहबूबा . ओ मेहबूबा मेरे दिल के पास हो तुम मेरी मंझिले पटकन ‘संगम ' ( १९६४ ) चित्रपटातील राज कपूर आठवला ना ? एका निसर्गरम्य स्थळावरील नदीत स्वयंचलित छोट्या बोटीतून प्रवास करताना पुढील प्रवाशी बोटीत असणार्या वैजयंतीमालाला उद्देशून तो विनवणी करतोय . ती मात्र स्तब्ध आहे . राज कपूर कशी बरे आपली समजूत घातलोय हे पाहूया असे तिच्या चेहर्यावर भाव आहेत . किस बात से नाराज हो किस बात का है गम किस चीज मे डूबी हो तुम हो जायेगा संगम राज कपूर आणखीनच मोकळेपणाने गात समजूतीचा स्वर लावतो . मुकेशच्या पार्श्वगायनाशी राज कपूरचे व्यक्तिमत्व जुळले होते म्हणा अथवा अभिनय व गायन यांचे सूर जुळले होते म्हणूयात . पण राज कपूर गातोय हा फिल मिळतो हे महत्त्वाचे ! हसरत जयपुरीच्या गीताला शंकर जयकिशन यांचे संगीत याचे देखिल आर . के . फिल्मच्या चित्रपटाशी छान नाते जुळलेले… बाहो के तुझे हार मै पहनुंगा एक दिन सब देखके रह जायेंगे ले जाऊंगा एक दिन एव्हाना राज कपूर वैजयंतीमालाच्या छोट्या लॉन्चपर्यंत येऊन तिला आपल्या लॉन्चमध्ये खेचून घेतो . ती देखील तो अनुभव छान एन्जॉय करतेय . तर या दोघांचा तिसरा मित्र राजेंद्र कुमार काठावर उभा राहून ही सगळी मस्ती पाहतोय . त्याच्या चेहर्यावर मात्र वैजयंतीमालावरचे प्रेम व्यक्त होतेय . त्या काळातील हा प्रेम त्रिकोणावरचा सर्वोत्तम मनोरंजक चित्रपट होय . तो गीत संगीतामधून अधिकच खुलला . रुपेरी पडद्यावर नायिकेवर हक्काने व हट्टाने प्रेम करतानाच असोशी व कमालीची उत्कटता साकारावी ती राज कपूरने ! पडदाभर प्रेम वाहत राहणे हे राज कपूरचे वैशिष्ट्यच . फक्त जरा कुठे संधी मिळू देत . ओ मेहबूबा , मेरे दिल के पास है तेरी दिलीप ठाकूर
0