title
stringlengths 1
93
| url
stringlengths 31
123
| text
stringlengths 0
257k
|
---|---|---|
औदुंबर (कविता) | https://mr.wikipedia.org/wiki/औदुंबर_(कविता) | ॥ औदुंबर रसग्रहण ॥
एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे. हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे. बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.
पहिल्या चार ओळींत टेकड्या, गाव, शेतमळे व झरा यांनी व्यापलेले विहंगम दृश्य दिसते.
शेतमळ्यांच्या हिरव्या गरदीतून वाहणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्यावरून जी नजर मागे जाते ती चार घरांचे चिमुकले गाव ओलांडून पैल टेकडीपर्यंत पोचते. केवढा विस्तीर्ण पट कवीने पार्श्वभूमीसाठी घेतलेला आहे! पुढील दोन ओळीत त्या काळ्या डोहाच्या लाटांवर गोड काळिमा पसरून जळात पाय टाकून बसलेला औदुंबर दाखविला आहे.
केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगविण्याचा कवीचा हेतू दिसत नाही. पहिल्या चार ओळींतील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर नैराश्याची छटा पसरविणारे, काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही पार बदलते. जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर वाटतो. विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते.
'ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे. चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट, अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून मूळचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. औदुंबराला मनुष्य कल्पून येथे 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे.
औदुंबर
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे
शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
संदर्भ व नोंदी
वर्ग:बालकवी यांचे साहित्य |
मुखपृष्ठ | https://mr.wikipedia.org/wiki/मुखपृष्ठ | <div title="" class="welcomeHolder" style="display:none;box-sizing:border-box; margin-top:10px;">
105px|alt=|link=
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे. मराठी भाषेत लेख असून कोणीही बदल घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
{|class="mp-left" style="background:#faf5ff;"
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-right:0px; padding:0px; vertical-align:middle; font-weight:normal; width:100%;" |
25px|left|alt=|link=विशेष लेख
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-left:0px; padding:0px; vertical-align:middle;" | 90px|alt=|link=
|-
| colspan=2 style="color:#000; background:#FFFFE0; padding:15px 5px" | |}
25px|left|alt=|link= दिनविशेष 90px|alt=|link= <div style="text-align:left;">
{|class="mp-left" style="background:#f5fffa;"
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-right:0px; padding:0px; vertical-align:middle; font-weight:normal; width:100%;" |
25px|left|alt=|link= विकिपीडियाचे सहप्रकल्प
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-left:0px; padding:0px; vertical-align:middle;" | 90px|alt=|link=
|-
| colspan=2 style="color:#000; background:#FFFFE0; padding:15px 5px" | |}
25px| विशेष लेख मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा 25px| आजचे छायाचित्र 25px| थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग 25px| आपण नवीन सदस्य आहात? 25px| दिनविशेष 25px| उदयोन्मुख लेख मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा 25px| आणि हे आपणास माहीत आहे का?
संक्षिप्त सूची
निवेदन
इतर ीय भाषांमधील विकिपीडीया
विकिपीडियाचे सहप्रकल्प
__NOTOC__
__NOEDITSECTION__ |
म्हणी | https://mr.wikipedia.org/wiki/म्हणी | ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी' आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो. 'म्हण' शब्द समूहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्थापेक्षा निराळा असू शकतो.<ref> या शिवाय गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात.
प्रचलित मराठी म्हणी
मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ
एका हाताने टाळी वाजत नाही
अर्थ: कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
खाई त्याला खवखवे
अर्थ: अपराधी व्यक्तीला मनातून भीती वाटत असते, तो मनात अस्वस्थ असतो.
गर्जेल तो पडेल काय?
अर्थ: केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
पाण्यात राहून माशाशी वैर कशाला?
अर्थ: समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
जी खोड बाळा ती जन्म काळा
अर्थ: जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
अति तेथे माती
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच
अडला हरी गाढवाचे पाय धरी
अर्थ: शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
आधी पोटोबा मग विठोबा
अर्थ: आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करावा आणि त्यानंतर अन्य कामांचा (परमार्थाचा) विचार करावा
आयत्या बिळात नागोबा
अर्थ: दुसऱ्याच्या कष्टांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
अर्थ: किमान लाभाची अपेक्षा केली असताना आर्थिक लाभ मिळणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला
अर्थ: विचार न करता बोलणे.
करावे तसे भरावे
अर्थ: केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
काखेत कळसा गावाला वळसा
अर्थ: हरवलेली वस्तू जवळपास असताना सर्वत्र शोधत राहणे.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
अर्थ: आपलाच माणूस आपल्याच माणसांच्या नुकसानीला जबाबदार होतो.
(गोत >गोत्र> कूळ >आपली माणसे )
कुठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भटाची तट्टाणी
अर्थ: अति थोर माणूस आणि अति सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
अर्थ: आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तितक्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत नाहीतर काहीच नको असे वाटणे.
गरज सरो नी वैद्य मरो
अर्थ: आपली गरज संपली की लोक उपकारकर्त्याला विसरतात.
गोगलगाय आणि पोटात पाय
अर्थ: वरून दिसायला अगदी घरी पण प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी असणे.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
अर्थ: प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी अधिकाऱ्याची संधी मिळते.
चोर सोडून संन्याशाला फाशी
अर्थ: अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
अर्थ: मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
झाकली मुठ सव्वालाखाची
अर्थ: स्वतःविषयी वल्गना करत राहण्याऐवजी मौन पाळल्यास अब्रूचे रक्षण होते.
तहान लागल्यावर विहीर खणणे
अर्थ: एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर उपाय शोधण्याची धडपड करणे.
दगडापेक्षा वीट मऊ
अर्थ: मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
दाम करी काम
अर्थ: पैशाने (बरीच) कामे होतात.
देश तसा वेश
अर्थ: भोवतालच्या परिस्थितीनुसार वागावे.
न कर्त्याचा वार शनिवार
अर्थ: काहीतरी सबबी सांगून काम टाळणे
नाव मोठे लक्षण खोटे
अर्थ: भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी त्या विरुद्ध
नाचता येईना अंगण वाकडे
अर्थ: आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
अर्थ: दुसऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन स्वतः वागावे
प्रयत्नांती परमेश्वर
अर्थ: कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी सध्या होते.
पी हळद नी हो गोरी
अर्थ: केलेल्या कामाचे फळ लागलीच मिळावे अशी अपेक्षा बाळगणे.
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
अर्थ: प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
अर्थ: भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
अर्थ: एखाद्याच्या भावी काळातील कर्तबगारीचा अंदाज त्याच्या लहानपणीच बांधता येतो.
रात्र थोडी सोंगे फार
अर्थ: काम कमी करणे आणि देखवा जास्त करणे
लेकी बोले सुने लागे
अर्थ: एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
शेंडी तुटो का पारंबी तूटो
अर्थ: दृढ निश्चय करणे.
सुंठी वाचून खोकला जाणे
अर्थ: उपाययोजना करण्याआधीच संकट दूर होणे.
हसतील त्याचे दात दिसतील
अर्थ: चांगली गोष्ट करताना हसणाऱ्यांची पर्वा करू नये.
शेरास सव्वा शेर
अर्थ: समर्थ माणसाला त्याच्याहून अधिक समर्थ माणूस भेटणे.
हातच्या काकणाला आरसा कशाला?
अर्थ: प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
(मराठी म्हणींची यादी विकीकोट सहप्रकल्पात पहावी.)
म्हणीसंबंधातील ग्रंथ आणि कोशवाङ्मय
मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी - इंग्रजी पर्यायांसह (वा.गो. आपटे)
हेसुद्धा पहा
संस्कृत न्याय
वाक्प्रचार
उखाणे
संदर्भ
वर्ग:मराठी भाषा |
वसंत पंचमी | https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_पंचमी | thumb|200px|right|वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर.
thumb|विद्येची देवता सरस्वतीची
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.
भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३
कृषी संस्कृती
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.
देवी सरस्वती जयंती
हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
एकदा फिरत असताना सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना अवतीभवती शांतात वाटू लागली, त्यामुळे येथे काही कमतरता आहे असे वाटून त्यांच्या मुखातून वीणावादन करीत देवी सरस्वती प्रकट झाली अशी कथी प्रचलित आहे.
नैवेद्याचे पदार्थ
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो.
दिनांक
गेल्या किंवा येत्या काही वर्षांतील वसंत पंचमीच्या तारखा :
सन २०२२ - ४ फेब्रुवारी,
सन २०२१ - १६ फेब्रुवारी
सन २०२० - ३० जानेवारी, ३१ जानेवारी
सन २०१९ - फेब्रुवारी १०
सन २०१८ - जानेवारी २२
पेशवेकालीन उत्सव
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांंची देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.डाॅॅ.कर्णिक शशिकांंत, पेशवेकालीन महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,इतिहास आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५
बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंंतिणींंचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.डाॅॅ.पाटील रत्नप्रभा, पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्रियांंचे धार्मिक जीवन,२००७,श्वेता पब्लिकेशन्स,पृृष्ठ ७२
कुंभमेळा
वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान होते.
सूर्य मंदिर
बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.Anirudha Behari Saran; Gaya Pandey (1992). Sun Worship in India: A Study of Deo Sun-Shrine. Northern Book Centre. p. 68. ISBN 978-81-7211-030-7.
प्रेमाचे प्रतीक
मथुरा येथील बांके बिहारी मंदिरातील ४० दिवसीय होळी उत्सवाचा आरंभ या दिवशी केला जातो. प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात.Roy, Christian. Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia. ABC-CLIO. Vol.2. pp. 192-195. 2005. ISBN 9781576070895 Vema, Manish. Fast and Festivals of India. Diamond Pocket Books. p.72. 2000. ISBN 9788171820764
भारताच्या विविध प्रांतांत
मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.भारतीय संस्कृती कोश खंड आठ शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India
बंगाल-
पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.
thumb|कोलकाता येथील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली बालिका
राजस्थान - पिवळा पोशाख घालून, गोड जेवण करून, पिवळ्या रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा करतात. राजस्थानात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते. Journal of the Indian Anthropological Society, Volume 30 (1995)
कुमाऊ पर्वतीय प्रदेशात या दिवशी महिला अपिवले वस्त्र परिधान करतात. पुरुष डोक्याला पिवळी टोपी अथवा रुमाल बांधतात.
सुफी संप्रदायात
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.
शीख संप्रदायात
वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.Hari Ram Gupta (1991). History of the Sikhs: The Sikh lion of Lahore, Maharaja Ranjit Singh, 1799-1839. Munshiram Manoharlal. अब हमारे घर बसंत असा उल्लेख गुरुग्रंथसाहिब मध्ये आहे. याचा अर्थ आमच्यावर आज ईश्वरी कृपा आहे असा होतो.पतियाळा येथील गुरुद्वारात या विशेष दिवसाचे आयोजन केले जाते.
भारताबाहेर
भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.Nikita Desai (2010). A Different Freedom: Kite Flying in Western India; Culture and Tradition. Cambridge Scholars Publishing. pp. 32–34, 60, 99–100, 151. ISBN 978-1-4438-2310-4.
शक्ती गुप्ता festivals fairs and fasts of India
बालीमध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात. "Bali Cultural Ceremony and Ritual". Balispirit.com. Retrieved 2017-10-08.
चित्रदालन
संदर्भ
वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव
वर्ग:शेती |
HomePage | https://mr.wikipedia.org/wiki/HomePage | पुनर्निर्देशन मुखपृष्ठ |
काश्मीर | https://mr.wikipedia.org/wiki/काश्मीर | काश्मीर हा अफगानिस्तान,तिबेट(चीनने अनधिकृत कब्जा केलेला) व भारतीय उपखंड (पाकिस्तान,भारत,भुटान, बांग्लादेश,नेपाळ, म्यांमार, श्रीलंका, मालदीव यांआ भारतीय उपखंडात धरतात) यांच्या मध्यभागी असलेला भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग आहे.
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. "पृथ्वीवरील स्वर्ग" असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे.
२०१९ पूर्वी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पूर्णपणे भारतात समाविष्ट केले.
जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
चित्रदालन
काश्मीरवरील मराठी पुस्तके
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
वर्ग:जम्मू आणि काश्मीर |
मराठी भाषा | https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_भाषा | मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा, गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार
मराठी भाषिक प्रदेश
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या संघराज्यशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ९ राज्ये, ४ संघराज्यशासित प्रदेश आणि ११३ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.इंडियनलॅंग्वेजेस.कॉम- मराठी .
राजभाषा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे.महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात नियमानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली या संघराज्यशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगणा), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
प्रमाणभाषा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रमाणीकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते.
औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो.
प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.
प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन शोधयंत्रास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच नियम विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा नियमाचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी वैद्य/डॉक्टर अनेक शब्द वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीनमध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिवस
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी पुस्तके
'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि शासकीय प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. शासकीय संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारताच्या सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मयकोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्रीधर व्यंकटेश केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
पुरस्कार
विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने 'अखिल भारतीय कला सन्मान' दिला जातो.
भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्वना मिळाले आहेत.
सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या ''श्यामची आई'’ चित्रपटास मिळाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर हे आजवरचे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. सदर महाराष्ट्र शासनाच्या संशोधन अभिजात मराठी प्रतिवृत्ताने केले आहे. ज्ञात इतिहासावर पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला.
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
इवलेसे|इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा राजव्यवहारकोश तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. तत्कालीन भारतावर (आताचा पाकिस्तान, इंडिया आणि बांग्लादेश) राज्य करतांना देखील मराठीचा अधिकृत भाषा म्हणून वापर होत असे. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत/ इंडिया देशाने मराठीला अधिकृत भाषेचं पद दिलं. इ.स. १९६०१९६० मधे महाराष्ट्राच़े एकभाषिक राज्य स्थापन झाले - मराठीमाती मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे . अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स. १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -
thumb|राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
अर्थ : "जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले." लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।'
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे २५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाळ
हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
इवलेसे|परळ, मुंबई येथे आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.
यादवकाळ
हा काळ इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले.
बहामनी आणि सल्तनत काळ
हा लेख बघा:मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द
इवलेसे|मराठी लेखक व कवी संत सर्वज्ञ दासोपंत यांच़े सुमारे १६ व्या शतकातील लिहिलेले मराठी.
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी काळ सुरू झ़ाला.
सल्तनत काळात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. राज्यकर्ते मुस्लिम असले तरी स्थानिक सरंजामदार, जमीनदार,महसूल गोळा करणारे अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती. प्रशासन आणि महसूल संकलन सुलभ करण्यासाठी, सुलतानांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये मराठीच्या वापरास प्रोत्साहन दिले. तथापि, त्या काळातील मराठी भाषेत बरेच फारसी प्रचलित झाले. उदाहरणार्थ, दररोजच्या भाषणात वापरलेले शब्द जसे की बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, हुशार, कागद,खुर्ची, जमिन,जाहिरात), हजार इत्यादी.
अहमदनगर सल्तनत काळात मराठी ही प्रशासनाची भाषा बनली.[20] विजापूरच्या आदिलशाहीनेही प्रशासन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठीचा वापर केला. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
मराठा साम्राज्याचा काळ
हा काळ अंदाजे इ.स. १६५० ते इ.स. १८१८ असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
इवलेसे|रामदास स्वामी यांच़े इ.स १६०० शतकातले मराठी हस्ताक्षर.
याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या.
याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1926 पासून राबवली त्यातूनच अनेक मराठी शब्द निर्माण झाले आणि ते आज प्रचलित आहेत . ते वापरण्यात येऊ लागले
स्वातंत्र्योत्तर कालखंड
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पॅंथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
अभिजात मराठी
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाआधी किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
मराठी साहित्य
मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख -
कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, बालगीते, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलने, अग्रलेख संपादकीय स्तंभलेख समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्प्रचार
मराठीचे आद्य कवी
मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
मुकुंदराज
माहीमभट
महदंबा
ज्ञानेश्वर
नामदेव
जगमित्रनागा
एकनाथ
तुकाराम
रामदास
वामन पंडित
श्रीधर
मुक्तेश्वर
मोरोपंत
माधवस्वामी - तंजावरचे लेखक
होनाजी
महिपती
केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
दामोदर पंडित
मुसलमान मराठी संतकवी
मराठी विश्वकोश
thumb|200px|मोडी लिपीतील मजकूर
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर १९६०ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहीला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
मराठीतील बोली भाषा / प्रांतिक भेद
प्रमुख विभागणी -
कोकणी
अहिराणी
माणदेशी
मालवणी
वऱ्हाडी
तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
तपशीलवार माहिती -
उत्तर महाराष्ट्र
अहिराणी - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. 'क'च्या जागी 'ख'च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
कोकण
कोंकणी / चित्पावनी - कोकणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक बोली आहेत. अधिक माहितीसाठी कोकणी भाषा हा लेख पहा.
माणदेशी सांगली, सातारा, या जिल्ह्यांतील आटपाडी, माण या तालुक्यांत प्रामुख्याने तर सांगली जिल्ह्यातील जत, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या, सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांच्या काही भागांत बोलली जाते.
मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
कोळी - मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. कोळी जातीतील अनेक उपजातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, कोळी, मांगेली, वैती, आगरी इ..या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " मांगेली " भाषेत "ळ"ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत. शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).
कर्नाटक सीमा
कोल्हापुरी - कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच़ कोकणी भाषेच़ा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांच़ा वापर आढळतो.
चंदगडी बोली - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाज़ारास गेल्लो'(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
बेळगावी - बेळगाव या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
मराठवाडा
मराठवाडी - मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळपणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठीचे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'आव' या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
विदर्भ
नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वऱ्हाडी बोलली जाते. मूळ मराठी अशी ही बोली कुठल्याही प्रकारचा हेल न काढता, अनुनासिक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली जाते. प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुद्ध वाटते. म्हाइंभट यांच़ा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला ज़ातो. ज़से, 'नदीचा गायात, गाय फसली' (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच़ व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
इतर
डांगी
नारायणपेठी बोली - महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीभाषा बोलतात.
तंजावर मराठी - ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारताच्या तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
नंदभाषा - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
भटक्या विमुक्त - भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभागातील डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
इस्रायली मराठी
मॉरिशसची मराठी
मराठी मुळाक्षरे
मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही!) मराठी मुळाक्षरे होत. यात एकोणीस स्वर आणि छत्तीस व्यंजने आहेत. देवनागरी लिपीत नसलेली ॲ, ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ ॡ, दंततालव्य च, छ, झ,आणि ऱ्य, ऱ्ह ही खास मराठी अक्षरे आहेत.
स्वर
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡए ऐ ओ औ अं अः
ॲ ॲा
व्यंजने
क ख ग घ ङच छ ज झ ञट ठ ड ढ णत थ द ध नप फ ब भ मय र ल वश षस ह ळक्ष ज्ञ
विशेष - 'ङ' आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो.
'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जूषा=मंजूषा.
अधिक माहितीसाठी पहा देवनागरी
मराठी मुळाक्षरांचे उच्चार
+Consonants LabialDentalAlveolarRetroflexAlveopalatalVelarGlottalVoicelessstops Voicedstops Voicelessfricatives Nasals Liquids
+Vowels FrontCentralBackHigh MidLow
संगणकावर मराठी
आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन
संगणकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या -
प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टॅंडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्नशील आहे.
मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. सी डॅक या संस्थेने निर्माण केलेले टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये ANSI ते UNICODE (युनिकोड)असा पर्याय पुरवत नाहीत.
आंतरजालावर शोध घेण्यासाठी युनिकोडचा (इंग्रजी : UNICODE) वापर गुगलसारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक टंक युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
युनिकोड धर्तीचे टंक विंडोज २००० व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणाऱ्यांना युनिकोड वापरणे जड जाते. परंतु लिनक्सवर आधारित संचालन प्रणालींत युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कमी समस्या येतात.
हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेलेअसल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. परंतु काही अक्षरे मराठीसाठी विशेष आहेत, ती सगळी टाईप करता येतील असे टंक कमी आहेत.
सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
काळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकनपद्धती असे दोन प्रकार करता येतील.
पूर्व टंकनपद्धती
युनिकोडच्या आधी ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप कर
'
'ता येत असत. (उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.) तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आली होती. (उदा. मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DACचे ISM-OFFICE, श्री-लिपी, इत्यादी)
आधुनिक टंकनपद्धती-१
आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध keyboard layout यांचा समावेश होतो.
युनिकोड टंकनपद्धती व software.
कगप :- कगप हा भाषाशास्त्रानुसार विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े
देवनागरी इनस्क्रिप्ट - ज्यांना पारंपरिक टंकन यंत्रावर टंकलेखनाचा सराव आहे, अशांसाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
बोलनागरी
Traditional :-
आधुनिक टंकन पद्धती-२
यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून softwareच्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.
Microsoft Indic Tool / मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल : इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर चालते.
Google Input Tool / गूगल इनपुट टूल : गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउजरच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
OCR तंत्रज्ञान
OCR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते.
टेसरॅक्ट ओसीआर हे software लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.
मराठी आणि परिचालन प्रणाली
मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
युनिकोड तक्ता
हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.
मराठीत वापरली जाणारी पण युनिकोड तक्त्यात नसणारी अक्षरे
ॲ
च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख
ऱ्य
ऱ्ह
पाऊण य
युनिकोड तक्त्यात असलेली पण मराठीत न वापरली जाणारी अक्षरे
ऄ (हे अक्षर तक्त्यात २४ वेळा आले आहे, त्यांतले एकही मराठीत नाही)
ऍ
ऐ
ओ
े
ो
क़ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे; दोन्ही अक्षरे मराठीत नाहीत.)
ख़
ग़
ड़
ढ़
ङ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे, दोघांपैकी एक मराठीत आहे)
न
य़
ऱ
ळ
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे.
भाषा संचालनालय
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे.
भाषा सल्लागार समिती
विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे).
राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे).
मराठी भाषा अभ्यास परिषद
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था .
मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
संस्था आहे.
अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसकारी संस्थ आहे.
हेसुद्धा पहा
शुद्धलेखनाचे नियम
देवनागरी
मोडी
युनिकोड
संगणक आणि मराठी
महाराष्ट्र
मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
मराठी साहित्य संमेलने
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
मराठी-मराठी शब्दकोशांची सूची
शब्दकोशांची सूची
अभिजात मराठी भाषा परिषद
मराठी संकेतस्थळे
विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे''
या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
वर्ग:भारतामधील भाषा
वर्ग:महाराष्ट्र
वर्ग:भाषा
वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा |
विकीपीडिया | https://mr.wikipedia.org/wiki/विकीपीडिया | पुर्ननिर्देशन विकिपीडिया |
विकिपिडीया | https://mr.wikipedia.org/wiki/विकिपिडीया | पुर्ननिर्देशन विकिपीडिया |
ज्ञानकोश | https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश | |
महाराष्ट्र | https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्र | महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते.पंढरपुर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.या राज्याला खुप मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग खुप आहे.
नावाचा उगम
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महाराष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ चक्रधर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.
इतिहास या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास
200px|thumb|left|अजिंठ्यातील लेणी
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य
महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे.
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
मराठे व पेशवे
right|thumb|255px|छत्रपती शिवाजी महाराज
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
130px|thumb|left|हुतात्मा स्मारक,मुंबईया विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
भौगोलिक स्थान
thumb|left|200px|महाराष्ट्रातील पर्वत
thumb|right|200px|कोकण
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.
या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
प्रशासन
200px|thumb|left|मंत्रालयःमहाराष्ट्र राज्य
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता प्रस्थापित झाली आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
विभाग
right|thumb|400px|महाराष्ट्र राज्याचे विभागया विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे
महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.
हेसुद्धा पहा
महाराष्ट्रातील तालुके
अर्थव्यवस्था
right|thumb|150px|मुंबई शेअर बाजार
राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.)
वर्ष वार्षिक उत्पन्न १९८० १६,६३१ १९८५ २९,६१६ १९९० ६४,४३३ १९९५ १,५७,८१८ २००० २,३८,६७२
सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन (द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
महत्त्वाची नगदी पिके - शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू. माहाराष्ट्रातील सिंचनाखालील जमीन ३३,५०० किमी२ इतकी आहे.
मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.
लोकजीवन
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (किमी२) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.
लोकसंख्येचे घनता
सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती. इंग्लिश मजकूर
संस्कृती
thumb|200px|जेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा
महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
thumb|left|200px|त्र्यंबकेश्वर, नाशिक
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा, कलर मराठी, झी मराठी, स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
thumb|right|150px|गणेशोत्सव
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे " कोळी ". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.
भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते.
thumb|right|150px|महात्मा जोतिबा फुले
हवामान
राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व दख्खनचे पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.
वाहतूक व्यवस्था
thumb|200px|मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.
महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.
मुख्य शहरे
मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
नागपूर – विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या छ्त्रपती संभाजीनगर परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय छ्त्रपती संभाजीनगर येथे आहे.
नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
अमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख.
सातारा- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा प्रखरतेने जानवतात. शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख.
नांदेड- नांदेड हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. येथे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचे उप मुख्यालय आहे. येथेच शीख धर्मीयांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंग यांची समाधी (गुरुद्वारा) आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथेच आहे.
पर्यटन
right|thumb|वेरूळची लेणी
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी'' नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.
धार्मिक
त्र्यंबकेश्वर, तुळजापूरची भवानी, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिरे, पंढरपूर येथील भगवान पांडुरंग मंदिर या मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू भाविक येतात.पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबाचे देवाचे खंडोबा मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेकरूंना आकर्षित करतात जेथे उपासक एकमेकांना भांडार (हळद पावडर) ची वर्षाव करतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी यांसारखी वारकरी संप्रदायाशी संबंधित ठिकाणे वर्षभर लोकप्रिय राहतात आणि धार्मिक निरीक्षणादरम्यान राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक येतात.
महाराष्ट्रावरील ग्रंथसाहित्य
महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-
आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण - लेखक वसंत सिरसीकर
मराठ्यांचा युद्धेतिहास - ब्रिगेडियर का.गं. पित्रे
महाराष्ट्र - लेखक प्रा. वि.पां. दांडेकर
महाराष्ट्र - एका संकल्पनेचा मागोवा - लेखक माधव दातार
महाराष्ट्र दर्शन (संपादक - सुहास कुलकर्णी)
महाराष्ट्र संस्कृती - लेखक पु.ग. सहस्रबुद्धे
महाराष्ट्र संस्कृती - प्रा. शेणोलीकर आणि प्रा. देशपांडे
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास - लेखक प्रा. द.बा. डिकसळकर
महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास - लेखक डॉ. शं.दा. पेंडसे
महाराष्ट्रातील दुर्ग - लेखक निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
महाराष्ट्राचे विशेष दिवस
मराठी लोक
महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
इंटरॅक्टीव्ह महाराष्ट्र नकाशा खेळ
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
वर्ग:भारतीय राज्ये |
संगणक विज्ञान | https://mr.wikipedia.org/wiki/संगणक_विज्ञान | संगणक विज्ञान ही एक इलेक्ट्राॅनिक शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा (complexity analysis) अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती (algorithms) शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल विदा (डेटाबेसेस) , क्रिप्टोग्राफी (Cryptograpy), जाल (नेट्वर्किंग), प्रतिमा विश्लेषण (इमेज प्रोसेसिंग) इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात.
प्रथम संगणक प्रामुख्याने संख्यात्मक गणनेसाठी वापरले गेले. तथापि, कोणतीही माहिती संख्यात्मकपणे एन्कोड केली जाऊ शकते, लोकांना लवकरच समजले की संगणक सामान्य उद्देशाने माहिती प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. मोठ्या प्रमाणात डेटा हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे हवामान अंदाज वर्तवण्याची श्रेणी आणि अचूकता वाढली आहे. त्यांच्या गतीमुळे त्यांना नेटवर्कद्वारे टेलिफोन कनेक्शनचे रूटिंग आणि ऑटोमोबाईल, आण्विक अणुभट्ट्या आणि रोबोटिक सर्जिकल साधने यांत्रिक यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी मिळाली आहे. ते दैनंदिन उपकरणांमध्ये एम्बेड करण्यासाठी आणि कपडे ड्रायर आणि राईस कुकर "स्मार्ट" बनविण्यासाठी देखील स्वस्त आहेत. संगणकांनी आम्हाला असे प्रश्न मांडण्याची आणि उत्तरे देण्याची परवानगी दिली आहे ज्यांचा आधी पाठपुरावा केला नाही. हे प्रश्न जीन्समधील डीएनए अनुक्रम, ग्राहक बाजारातील क्रियाकलापांचे नमुने, किंवा डेटाबेसमध्ये संग्रहित केलेल्या मजकूरातील शब्दाच्या सर्व वापराबद्दल असू शकतात. वाढत्या प्रमाणात, संगणक ते काम करत असताना शिकू आणि जुळवून घेऊ शकतात.
संगणक
संगणक (काँप्युटर) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे डिजिटल (Digital) स्वरूपातील माहिती हाताळतात.
thumb|Science museum 025 adjusted
स्मृती, तर्कशुद्ध विचारशक्ती, आणि तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीची तीन अचाट अंगे आहेत. पण स्मृती हे माणसाच्या बुद्धीचे अंग तीन तऱ्हांनी बरेच मर्यादित आहे: माणूस एकदा शिकलेली/अनुभवलेली कोणतीही लहानमोठी गोष्ट आयुष्यात कधीही विसरत नाही आणि त्यांपैकी काही गोष्टी त्याच्या बुद्धीच्या निदान "मागच्या कप्प्यात"—सुप्त मनात-- संचित रहातात असे काही बुद्धिशास्त्रज्ञ/मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तरीही पूर्वायुष्यात शिकलेल्या/अनुभवलेल्या काही काही गोष्टी माणसाच्या "जाणत्या" मनाला त्याच्या पुढच्या आयुष्यात आठवत नाहीत हा आपणा माणसांचा सर्वसामान्य अनुभव आहे. शिवाय आयुष्यकालात किती गोष्टी माणूस शिकू/अनुभवू शकेल ह्यालाही साहजिक मर्यादा आहेत. तिसरे म्हणजे ज्या गोष्टी माणसाला आठवल्यासारख्या भासतात त्या एकूण एक त्याला अचूकपणे आठवतीलच ह्याची शाश्वती नसते.
"अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते/घडणार, एरवी दुसऱ्या काही गोष्टी संभवतात" हा तर्कशुद्ध विचारशक्तीचा/तर्कशुद्धताधिष्ठित कल्पनाशक्तीचा गाभा आहे. ही तर्कशुद्ध विचारसरणी साधीसरळ असून सगळी माणसे ती नेहमी अर्थात सहजपणे वापरत असतात अशी बऱ्याच माणसांची एक अगदी चुकीची कल्पना असते. वास्तविक बरीच माणसे फक्त माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करू शकतात. त्यात महत्त्वाची भर अशी की संबंधित वस्तुस्थितीचे ज्ञान माणसाला बऱ्याचदा अपुरे असते; (आणि खोल विचार करू शकणारी माणसे पुष्कळदा फक्त काही प्रांतांमधेच खोल विचार करू शकतात!)
जी माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याही तर्कशुद्ध विचारसरणीला मुख्यत्वे स्मृतीच्या अपुरेपणाने बरीच मर्यादा रहाते. एक उघड उदाहरण म्हणजे आकडेमोड. आकडेमोडींमागे तर्कशुद्धता असते, आणि आकडेमोडींकरता स्मृतीचीह गरज असते. पण स्मृतीच्या मर्यादिततेमुळे आपण माणसे मनातल्या मनात फक्त मोजक्या आकडेमोडी करू शकतो. इतकेच नव्हे तर कागदपेन्सिल वापरूनही खूप आकडेमोडी करायला आपल्याला बराच वेळ तर लागतोच, शिवाय रटाळपणामुळे कंटाळाही चट्कन येतो. आता एक अगदी खूप आश्चर्य वाटण्याजोगी बाब अशी की कोणतीही माहिती आकड्यांच्या रूपात प्रकट करता येते आणि कोणत्याही प्रांतातल्या "अमुक वस्तुस्थिती असली तर अमुक गोष्ट घडते/घडणार, एरवी दुसऱ्या काही गोष्टी संभवतात" ह्या विचारसरणीचे "आकडेमोडीं"मधे रूपांतर करता येते ही अचाट कल्पना गेल्या शतकात माणसाच्या लक्षात आली. अर्थात गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी "आकडेमोडीं"च्या रूपात करण्याकरता लाखो "रटाळ" आकडेमोडींची गरज असते. संगणक विज्ञान ही आज काळाची गरज आहे
आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणाऱ्या "संगणक" ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी लावला. ती चीज अविश्वसनीय रीत्या अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे चालू आहे. येत्या पन्नास, शंभर, पाचशे, हजार,...वर्षात माणसाने संगणक किती प्रभावी केलेला असेल आणि त्यायोगे माणसाचे आयुष्य भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे असेल ते पाहू शकणारा द्रष्टा ह्या पृथ्वीतलावर असणे अशक्य आहे. केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत "संगणक" ह्या चीजेने माणसाचे आयुष्य पार बदलून टाकले आहे. (त्यापूर्वी पंधराव्या शतकातल्या सुकर छ्पाईच्या शोधाने आणि अठराव्या शतकातल्या वाफेवर चालणाऱ्या यंत्रांच्या शोधाने माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल केले होते).
माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात ह्यामागे संगणकाची दोन वैशिष्ट्ये आहेत ती अशी : (त्यांपैकी समजा हेना ते फक्त एकच वैशिष्ट्य संगणकात असते तर संगणक ही चीज माणसाला निरुपयोगी ठरली असती). वर लिहिलेल्या माणसाच्या स्मृतीच्या कोणत्याच मर्यादा निदान प्रभावी संगणकांना "जवळजवळ" लागू नाहीत हे हल्लीच्या संगणकांचे पहिले वैशिष्ट्य आहे. संगणक चालू ठेवणारी विद्युत ऊर्जा बंद पडली तर पूर्वी संगणक त्यांच्या स्मॄतीत माणसाने "कोंबलेल्या" सगळ्या गोष्टी एखाद्या अतिवृद्ध माणसाप्रमाणे तत्काळ कायमच्या विसरून जात असत. पण तो प्रकार शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी भिन्न रीतींनी झटपट जवळजवळ संपुष्टात आणला आहे. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील ह्याची मर्यादाही शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. आणि संगणकांच्या स्मॄतीत माणसाने "कोंबलेल्या" सगळ्या गोष्टी ते सर्वकाळ, शेंडी तुटो की पारंबी तुटो, अगदी अचूकपणॆ आठवत राहतील ह्या तिसऱ्या गोष्टीबाबतही शास्त्रज्ञांनी/तंत्रज्ञांनी एव्हाना खूप प्रगती केली आहे.
संणकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी "आकडेमोडीं"च्या रूपात करण्याकरता ज्या लाखो "रटाळ" आकडेमोडींची गरज असते त्या रटाळ, कंटाळवाण्या न मानता काही सेकंदांमध्ये त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या "हातचा मळ" झाला आहे! आणि कमीकमी वेळात आकडेमोडी करण्याचे संगणकांचे कसब शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणीबद्दल अचूक आणि निःसंदिग्ध सूचना मिळण्याची. त्या सूचना संगणकांना विशद करायला जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणकसंचालनविज्ञान. तर्कशुद्धतानधिष्ठित कल्पनाशक्ती (आणि गूढवादात्मक "अंतर्ज्ञान") ही माणसाच्या बुद्धीची वैशिष्ट्ये मात्र त्याच्या बुद्धीचे अपत्य असलेल्या संगणकाच्या (निदान सध्यातरी) पार आवाक्याबाहेरची आहेत. गोविंदाग्रजांच्या "अरुण" कवितेतल्यासारख्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या असलेली एखादी कविता लिहू शकणारा संगणक कोणी शास्त्रज्ञ/तंत्रज्ञ निदान येत्या पन्नासएक वर्षात निर्माण करू शकतील असे दिसत नाही. पण माणसाच्या बुद्धीची झेप ती मर्यादा कधीच ओलांडणार नाही हे आज कोण निश्चितीने सांगू शकेल?
वाढत्या संगणक वापरामुळे जगातील सर्व माहिती ही क्षणार्धात उपलब्ध होते. त्यामुळे सर्वांच्या समस्यांचे जलद निराकरण होते...
संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.भ ारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले.
भारतात कॉम्प्युटर आला होता सन 1952 मध्ये, ज्याला Dr. Dwijish Dutta यांनी कोलकत्ता मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था येथे स्थापन केला होता. परंतु हा संगणक बाहेरून मागवला होता. सिद्धार्थ हा पहिला कॉम्प्युटर होता जो भारतामध्ये बनला होता आणि Param 8000 हा पहिला सुपर कॉम्प्युटर होता जो भारतात बनला होता. या सुपर कॉम्प्युटरला 1991 मध्ये विजय भटकर यांनी बनवलं होत.
प्रत्येक महिन्याला जवळजवळ 6000 नवीन कॉम्प्युटर व्हायरस तयार केले जातात.पहिला कॉम्प्युटर माऊस हा लाकडाचा बनवला गेला होता. ज्याला 1964 मध्ये Doug Engelbart Carl यांनी बनवलं होत.एक साधारण माणूस 1 मिनिटात 20 वेळा आपल्या पापण्या झाकतो परंतु जेव्हा तो कॉम्प्युटर समोर बसतो तेव्हा तो फक्त 7 वेळा पापण्या झाकतो.कोणत्याही टायपिंग करणाऱ्या माणसाची बोटे जवळजवळ दररोज 20 किलोमीटर अंतर पार करतात.
संगणक रचना
संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतो.संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे, आवाज, ध्वनी अशी बहुरूपी असू शकते, पण संगणकसंचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार "आकडेमोडी" करणे हे सामान्य लोकांना अगदी अजब भासणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे.
चर्च-टयूरिंग युतीच्या सिद्धांतानुसार वेळेचे बंधन नसेल तर कमीतकमी क्षमतेचा संगणकसुद्धा कोणत्याही उच्च क्षमतेच्या संगणकाइतकेच काम करू शकतो. त्यामुळे सगळ्या तऱ्हांच्या संगणकांची रचना मूलतः सारखीच असते. पूर्वी अगदी माफक क्षमतेचे संगणक एक मोठी खोली व्यापत असत. आता फक्त अतिकूट आकडेमोडी करू शकणारे अतिप्रभावी संगणक (महासंगणक) तसे मोठे असतात. त्यांना इंग्रजीत "मेनफ्रेम" अशी संज्ञा आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या लहान संगणकांना "पर्सनल कंम्प्यूटर" अशी इंग्रजी संज्ञा आहे, तर कुठेही सहज नेता येणाऱ्या छोट्या संगणकंना "नोटबुक कम्प्यूटर" अशी संज्ञा आहे. आज सर्वांत अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे "एम्बेडेड कंम्प्यूटर". लष्करी विमानांपासून डिजिटल कॅमेरापर्यंत अनंत गोष्टो नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात.
संगणकात सर्वप्रथम माहिती किंवा डेटा भरावा लागतो. या माहितीवर प्रक्रिया होऊन ही व्यवस्थित माहिती तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळवता येते. माहिती भरण्याच्या क्रियेला इनपुट असे म्हणतात. त्यावर प्रक्रिया होऊन आवश्यक आउटपुट मिळवले जाते. म्हणजेच,
कच्चे इनपुट -> प्रोसेस -> आउटपुट
माहिती भरण्यासाठी जी साधने वापरली जातात त्याना इनपुट डिव्हाइसेस असे म्हणतात. कोणत्याही यंत्रणेचे इनपुट डिव्हाइसेस म्हणजे ज्या भागाद्वारे माहिती आत घेतली जाते तो भाग होय. उदा. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. म्हणजेच नाक, कान, डोळे व जीभ इ. आपले इनपुट डिव्हाइसेस आहेत, माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या भागाला सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिट अस म्हणतात. थोडक्यात सीपीयू हा संगणकाचा मेंदू होय. तर अंतिम उत्तरे किंवा माहिती ज्या साधनांद्वारे मिळवली जाते त्यांना आऊटपुट डिव्हाइसेस असे म्हणतात, अशा प्रकारे संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रितरित्या काम सुरू असते व ते अतिशय वेगाने होऊन आपणास आपल्याला हवी ती उत्तरे मिळवता येतात. संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया होऊन आवश्यकतेनुसार ती साठवून ठेवली जाते. मात्र टाईप करताना आपण जरी डेटा आपल्या नेहमीच्या भाषेत (मराठी, इंगजी किंवा इतर कोणतीही भाषा) लिहीत असलो तरी ही भाषा संगणकाला कळत नसते. संगणकाला कळतात त्या फक्त दोन स्थिती - ० व १। किवा ० ०) या दोन स्थितींच्या सहाय्याने प्रत्येक अक्षरास किंवा अंकास किंवा चिन्हास एक सांकेतिक कोड़ बहाल केले जाते. प्रत्येक अक्षर / अंक 03च्या संचाने बनलेला असतो.
म्हणजे या संकेतानुसार अक्षरे खालीलप्रमाणे लिहिली जातात
+अक्षरकोडA००००१०१०P०१११००००९०१०११००१
अशा प्रकारे ० व १ च्या संचाने एक अक्षर / अंक बनते. यास बायनरी सिस्टिम (Binary System) असे म्हणतात. प्रत्येक 0 व 1ला बिट (Bit) असे म्हणतात. आठ बिटसच्या संचास एक बाईट (Bite) असे म्हणतात.
म्हणजेच
अक्षर / अंक = ८ बिटस् =१ बाईट.
बायनरी सिस्टिममधील इतर एकके खालीलप्रमाणे आहेत -
१०२४ बाईट = १ किलो बाईट (KB)
१०२४ किलो बाईट = १ मेगा बाईट (MB)
१०२४ मेगा बाईट = १ गिगा बाईट (GB)
१०२४ गिगा बाईट = १ टेरा बाईट (TB)
अशाप्रकारे ० व 1च्या सहाय्याने संगणकात सर्व माहिती साठविली जाते. संगणकावर काम करताना मात्र ही भाषा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. टाईप करताना आपण आपल्याच भाषेत टाईप करतो व मॉनिटर किंवा प्रिंटरवरील आऊटपुट हाही आपल्याच भाषेत असतो. संगणकाच्या आत मात्र बायनरी सिस्टिम वापरली जाते.
संगणकाचा विकास
प्रथम पिढी (First Generation) १९४२ ते १९४५ यामध्ये व्हॅक्यूम्य ट्यूब म्हणजेच काचेच्या नळ्या वापरलेल्या होत्या, या नळ्यांद्वारे संदेश नियंत्रित केले जात असत.त्या काळातील हे सर्वात गतिमान यंत्र होते व यात आकडेमोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागत असे. EDVAC-45 मद्धे डेटा व प्रोग्राम साठवून ठेवता येत तसेच यात प्रोसेसिंग युनिट होते. जॉन व्हॉन न्युमन याने हा संगणक विकसित केला. मात्र या सर्व संगणकाचे बरेचसे तोटे होते.
दुसरी पिढी (Second Generation) १९५५ ते १९६४ १९४७ च्या सुमारास विलियम शॉकले यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला व त्यानंतरच्या दहा वर्षात त्यांचा उपयोग संगणकामध्ये केला जाऊ लागला. या पिढीतील संगणक खूप माहिती साठवून ठेवू शकत तसेच यात प्रिंटर, टेप, मेमरी, स्टोरेज या सर्वांचा समावेश होता. सुरुवातीला फक्त अणुशक्ती केंद्रात (Automic Research) मध्ये वापरले जाणारे हे संगणक हळूहळू मोठमोठ्या कंपन्या, व्यवसाय, विद्यापीठ व सरकारी कामकाजात वापरले जाऊ लागले.
तिसरी पिढी (Third Generation) १९६४ ते १९७५ १९५४ नंतर इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात इंटिग्रेटेड सर्किटस्चा (ICs)चा शोध लागला.म्हणजे सिलिकॉनपासून बनलेल्या छोट्या चिप्स. या चिप्स संगणकात वापरल्या जाऊ लागल्या. यामध्ये अनेक सर्किटस् एका छोट्या चिपवर बसवल्या जातात. या संगणकात सूचनांचा एक मोठा संच साठवलेला होता व या वेगवेगळया सूचनांच्या साहाय्याने हे संगणक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकत. तसेच यामध्ये एकच मुख्य प्रोग्राम इतर प्रोग्राम्सचे नियंत्रण करीत असे. यातूनच Operating Systemची कल्पना पुढे आली.
चौथी पिढी (Fourth Generation) १९७५ नंतर या पिढीतील संगणकातल्या चिपवर केवळ १० ते २० छोटे भाग मावत. मात्र चौथ्या पिढीतील संगणकात अधिक विकसित चिप्स वापरल्या गेल्या. यात एका छोट्या चिपवर अगणित भाग मावतात. यामुळे संगणकाचा आकार साहजिकच लहान झाला. अतिशय स्वस्त असल्याने याचा जगभर वेगाने प्रसार झाला. आज जगात वापरले जाणारे सर्व संगणक चौथ्या पिढीतील आहेत. यात आकार, काळ व क्षमतेनुसार या पिढीतील अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
संगणकाचे प्रकार
जेव्हा आपण कधीही संगणक या शब्दाचा वापर ऐकतो तेव्हा केवळ वैयक्तिक संगणकाचे चित्र आपल्या मनात येते. मी तुम्हाला सांगतो की संगणकावर बरेच प्रकार आहेत. ते विविध आकार आणि साईजमध्ये येतात. आम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम, बारकोड स्कॅन करण्यासाठी स्कॅनर, मोठी बेरीज करण्यासाठी कॅल्क्युलेटर यासारख्या आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करतो. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे संगणक आहेत.
1. डेस्कटॉप
बरेच लोक घरी, शाळा आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी डेस्कटॉप संगणक वापरतात. ते अशा प्रकारे डिझाइन केलेले आहेत की आम्ही त्यांना आमच्या डेस्कवर ठेवू शकू. त्यांच्याकडे मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, कॉम्प्यूटर केस(case) सारखे बरेच भाग आहेत.
2. लॅपटॉप
लॅपटॉपविषयी आपल्याला बरीच माहिती असेल. हे बॅटरी पॉवर वर चालतात, ते खूप पोर्टेबल आहेत जेणेकरून ते कोठेही आणि कधीही नेता येऊ शकतात.
3. टॅब्लेट
आता आपण टॅब्लेटबद्दल बोलू ज्यास आम्ही हँडहेल्ड संगणक देखील म्हणतो कारण ते सहजपणे हातामध्ये पकडले जाऊ शकते.
यात कीबोर्ड आणि माऊस नाही, फक्त एक टच सेन्सिटिव्ह स्क्रीन आहे जी टाइपिंग आणि नेव्हिगेशनसाठी वापरली जाते. उदाहरण- आयपॅड.
4. सर्व्हर - Servers
सर्व्हर हा एक प्रकारचा संगणक असतो जो आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा आम्ही इंटरनेटमध्ये काहीतरी शोधतो, त्या सर्व गोष्टी सर्व्हरमध्ये संग्रहित केल्या जातात.
इतर प्रकारचे संगणक
आता इतर प्रकारचे संगणक म्हणजे काय ते समजू घेऊया.
स्मार्टफोनः
जेव्हा इंटरनेट एखाद्या नॉर्मल सेल फोनमध्ये सक्षम असते, आपण ते वापरून बऱ्याच गोष्टी करू शकतो, मग अशा सेल फोनला स्मार्टफोन म्हणतात.
घालण्यायोग्यः
फिटनेस ट्रॅकर्स आणि स्मार्टवॉचसह - इतर डिव्हाईस घालण्यायोग्य असतात. हे संपूर्ण दिवसभर परिधान करता येईल असे डिझाइन केलेलले असतात. या उपकरणांना सहसा वेअरेबल्स म्हटले जाते.
गेम कन्सोल:
हा गेम कन्सोल हा एक विशिष्ट प्रकारचा संगणक आहे जो आपल्या टीव्हीवर व्हिडिओ गेम खेळण्यासाठी वापरला जातो.
टीव्ही:
टीव्ही हा देखील संगणकाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आता असे बरेच अप्लिकेशन किंवा ॲप्स आहेत की जे त्यास स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करतात. आपण इंटरनेटवरून व्हिडिओ थेट आपल्या टीव्हीवर प्रवाहित करू शकतो.संगणकाचे फायदे व तोटे आणि वैशिष्ट्ये कोणती?
सुपर कॉम्प्युटर - सुपर कॉम्प्युटरमध्ये इतर संगणकातून एकत्र केलेल्या माहितीवर अतिशय वेगाने आकडेमोड किंवा प्रक्रिया घडवून आणली जाते. यामध्ये अधिक प्रोसेसर्स बसवलेले असतात व प्रत्येक प्रोसेसरकडे एक एक काम सोपविलेले असते. आपल्या मेंदूप्रमाणेच हे प्रोसेसर्स समांतर कार्य करू शकतात. अनेक प्रोसेसर्स एकत्रितरित्या काम करत असल्याने काम अतिशय वेगाने होते. या संगणकाची क्षमता फ्लॉप (Floating Point Operations per Second) या एककात मोजली जाते. सुपर कॉम्प्युटरमधील चिप ही गॅलियम अर्सनाइडची बनविलेली असते व ती सिलिकॉन चिपपेक्षा सहापट वेगाने काम करू शकते. सुपर कॉम्प्युटरची स्मरणशक्ती खूपच जास्त असल्याने ज्ञानाचे विशाल भंडार यात सामावलेले असते. सुपर कॉम्प्युटरचा उपयोग जेथे खूप मोठी माहिती साठवून ठेवणे आवश्यक असते व या माहितीवर आधारित निष्कर्ष काढले जातात, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिसाइल डिझाईन, न्युक्लिअर रिऍक्टर, खगोलशास्त्र, हवामानखाते, जेनेटिक इंजिनिअरिंग इ. आतापर्यंत फक्त जपान व अमेरिका हे दोनच देश सुपर कॉम्प्युटरचे प्रमुख उत्पादक होते. पण मागील दशकात पुण्यातील सी-डॅक या संस्थेने परम-10000 हा सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे.
मेन फ्रेम कॉम्प्युटर - मेनफ्रेम कॉम्प्युटर आकाराने खूपच मोठे असतात. एखाद्या मोठ्या खोलीत मावतील एवढे. हे संगणक अतिशय वेगाने माहितीवर प्रक्रिया घडवून आणतात. एका सेकंदात किती सूचनांवर प्रक्रिया घडवून आणल्या जातात त्यावर यांची गतिमानता / क्षमता ठरवली जाते. महाग असूनही हे संगणक वापरले जातात कारण याची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता जास्त आहे. टेल्कोसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच विद्यापीठ, रेल्वे आरक्षण इ. ठिकाणी मेनफ्रेम कॉम्प्युटर वापरला जातो. सर्व माहिती एका मुख्य संगणकामध्ये साठविली जाते व ह्या माहितीतून आवश्यक तेवढीच माहिती वेगळी करून वापरता येते. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी एकाच प्रकारच्या माहितीवर वेगवेगळी कामे करू शकतात.
मिनी कॉम्प्युटर - १९६०नंतर या प्रकारचे संगणक विकसित झाले. त्या काळातील इतर संगणकापेक्षा हे संगणक आकाराने लहान होते व त्याची गती व क्षमताही कमी होती. म्हणून त्यांना मिनी कॉम्प्युटर हे नाव दिले गेले. यावर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकत. सध्या या प्रकारचे संगणक फारसे अस्तित्वात नाहीत.
मायक्रो कॉम्प्युटर / पर्सनल कॉम्प्युटर - १९८१ मध्ये IBM या कंपनीने सर्वप्रथम घर, कार्यालये व शाळा या ठिकाणी वापरता येतील असा छोटेखानी कॉम्प्युटर बाजारात आणला. या प्रकारचे संगणक व्यक्तिगत उपयोगासाठीच तयार केले गेले. यात एका छोट्याशा चिपवर प्रक्रियेसाठी लागणारे सर्व प्रोसेसर्स बसवलेले असतात. त्यामुळे हे संगणक आकाराने अर्थातच लहान असतात. म्हणून यास मायक्रो काम्प्युटर म्हणतात.
लॅपटॉप व पामटॉप हेही मायक्रो कॉम्प्युटरचेच प्रकार होत.
लॅपटॉप म्हणजे एका छोट्या ब्रिफकेसमध्ये मावणारा पर्सनल कॉम्प्युटर, ब्रीफकेसप्रमाणेच हा कुठेही नेता येतो किंवा मांडीवर ठेवून काम करता येते. ऑफीसपासून दूर किंवा बाहेरगावी काम करण्यासाठी लॅपटॉप वापरला जातो. उदा. आय बी एम थिंक पॅड.
पामटॉप संगणकाचे उदाहरण म्हणजे डिजिटल डायरी व कॅलक्युलेटर प्रमाणेच हातात मावणारे हे छोटे संगणक. फोन नंबर्स किवा पत्ते साठवून ठेवण्यासाठी या प्रकारची डायरी वापरली जाते.
संगणक अभियांत्रिकी
संगणकविज्ञान आणि संगणक अभियांत्रिकी ह्या शाखा भिन्न आहेत. संगणकाची रचना आणि संगणकनिर्मिती/विकासांचा अभ्यास हे संगणक अभियांत्रिकीचे वैशिष्ट्य आहे.
संगणक कार्यप्रणाली
संगणक कार्यप्रणाली (operating system) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेर' ह्या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणाऱ्या वेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. इतर सॉफ्टवेरना लागणाऱ्या काही मूलभूत सॉफ्टवेर सर्व्हिसेससुद्धा संगणक कार्यप्रणाली पुरवते. संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो.
उदाहरणार्थ :
मायक्रोसॉफ्ट विंडोज (Microsoft Windows)
ग्नू/लिनक्स (Linux)
मॅकिंटॉश
पहा: संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम)
टर्मिनल व प्रकार
संगणकात डेटा भरण्यासाठी म्हणजेच इनपुटसाठी व आऊटपटसाठी जी साधने वापरली जातात त्यांना टर्मिनल असे म्हणले जाते. * टर्मिनल्स तीन प्रकारचे असतात.
डम्ब टर्मिनल : डेटा भरण्यासाठी कीबोर्ड, डेटा स्क्रीनवर दिसावा यासाठी मॉनिटर व तो छापण्यासाठी प्रिंटर व या सर्व साधनांना एकमेकांशी जोडायच्या वायर्स यांचा एकत्रित संच म्हणजे डम्ब टर्मिनल होय. रेल्वे रिझर्वेशनच्या कार्यालयातील माणसासमोर असतो तो हाच डम्ब टर्मिनल. यात डेटावर कोणतीही प्रक्रिया होत नाही.
स्मार्ट टर्मिनल : स्मार्ट टर्मिनल मध्ये कीबोर्ड, मॉनिटर व प्रिंटर यांच्या जोडीला मेमरी व सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सी.पी.यु.) असतो. त्यामुळे डेटा संपादित करून तो सीपीयूकडे पाठवण्याचे काम हे टर्मिनल करू शकते. म्हणजेच यात डेटावर प्रक्रिया केली जाते.
इंटेलिजंट टर्मिनल : या टर्मिनलमध्ये प्रोग्राम तयार करता येतो. कारण यात एक मायक्रोकॉम्प्युटर असतो. भरलेल्या डेटावर प्रक्रिया करणे तसेच हा डेटा बरोबर आहे किंवा कसे हे समजून घेण्याची क्षमता इंटेलिजंट टर्मिनलमध्ये असते.
संगणक-प्रणाली (प्रोग्रॅमिंग लँग्वेज)
पहा : प्रोग्रॅमिंग भाषा (प्रोग्रॅमिंग लँग्वेज)
संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक 'संगणक प्रणाली' अर्थात प्रोग्रॅमिंग लँग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. संगणक हा विविध प्रकारची कामे एकाचवेळी करत असते.
प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते .
कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages)
उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल, आर(R),
या संगणक भाषा शिकणे खूप जरुरी आहे.
वस्तुनिष्ठ भाषा (Object Oriented language)
उदा. जावा (Java), सी++ (C++)
विवृत भाषा (Interpreted language)
उदा. पर्ल (Perl), पायथॉन (Python), रुबी (Ruby)
हे सुद्धा पहा
इंटरनेट
कॅरॅक्टर एनकोडिंग (Character encoding)
मुक्त सॉफ्टवेर (Free Software)
संगणक टंक(Devanagari Fonts)
ऑपरेटिंग सिस्टम
संदर्भ
वर्ग:संगणकशास्त्र |
वांतरीक्ष अभियांत्रिकी | https://mr.wikipedia.org/wiki/वांतरीक्ष_अभियांत्रिकी | पुनर्निर्देशन अंतरीक्ष अभियांत्रिकी |
विनायक दामोदर सावरकर | https://mr.wikipedia.org/wiki/विनायक_दामोदर_सावरकर | विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. १९३८ च्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 'हिंदुत्व' या संकल्पनेचे प्रणेते असून सर्वसमावेशक हिंदुत्व मांडणारे होते. सावरकरांच्या मतानुसार हिंदुत्वाची व्याख्या पुढीलप्रमाणे :- आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥
चरित्र
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन मुलांपैकी ते दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना केल्या . चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
विवाह
मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले.
शिक्षण आणि क्रांतिकार्य
लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. यांना लंडन मधे कायद्याचे शिक्षन घेण्यासाठी प्रतिष्ठित शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेवून सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची- काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केली आणि ब्रिटिश सरकारची माफी मागितली. त्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
७ ऑक्टोबर १९०५ ला वीर सावरकरांनी लोकमान्य टिळकांना घेऊन पुण्याच्या fc रोड ला विदेशी कपड्यांची होळी पेटवली.
सावरकरांचे जात्युच्छेदन
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६) . हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३०नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली.http://www.savarkar.org/mr/समाजसुधारणा/जात्युच्छेदक-निबंध वेबसाईट दिनांक २६ जुलै २०१२ १४-३५ वाजता पाहिले स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्नागिरी येथे त्यांनी भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्याने पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या २८ डायरीजमध्ये सावरकर आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी मिळून आयोजित केलेल्या सर्वजातीय भोजनांचे संदर्भ मिळतात. ही हस्तलिखिते राष्ट्रीय पांडुलिपी मिशनच्या संकेतस्थळावर तालिकीकरण केलेली आहेत.
हिंदू महासभेचे कार्य
रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
सावरकर स्मारके
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
संस्था
सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता, पुणे
नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ ()
स्वातंत्र्यवीर सावरकर पुस्तकप्रेमी मंडळ ( संस्थापक - शिवम सत्यवान मद्रेवार )
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
ग्रंथ आणि पुस्तके
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५००हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :
अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उःशाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें
इतिहासविषयावरील पुस्तके
१८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
कथा
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
कादंबऱ्या
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात् मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.
आत्मचरित्रपर
माझी जन्मठेप
शत्रूच्या शिबिरात
अथांग (आत्मचरित्र पूर्वपीठिका)
लेखसंग्रह
गरमागरम चिवडा
गांधी गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
तेजस्वी तारे
मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित
लंडनची बातमीपत्रे
विज्ञाननिष्ठ निबंध
सावरकरांची राजकीय भाषणे
सावरकरांची सामाजिक भाषणे
स्फुट लेख
नाटके
संगीत उत्तरक्रिया
संगीत उःशाप
बोधिवृक्ष (अपूर्ण)
संगीत संन्यस्तखड्गरणदुंदुभी''
महाकाव्ये
कमला
गोमांतक
विरहोच्छ्वास
सप्तर्षी
स्फुट काव्य
सावरकरांच्या कविता
सावरकर साहित्य
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकरांनी '१८५७ चा स्वातंत्र्यसमर' हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ चा उठाव हे बंड नसून हा एक स्वातंत्र्यसंग्राम होता.
सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.
सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगात असताना काही उर्दू गझला लिहिल्या होत्या; त्या जुलै २०१३मध्ये सापडल्या. नंतर त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. सावरकरांच्या गझला, काही हिंदी कविता आणि आणि मराठीतून हिंदीत भाषांतरित केलेल्या सावरकरांच्या काही रचना यांची एक सीडी निघाली आहे. सीडीतील कविता जावेद अली, जसविंदर नरुला, स्वप्नील बांदोडकर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, साधना सरगम आणि वैशाली सामंत यांनी गायल्या आहेत.
भाषा विषयक कार्य
भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर सावरकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यानंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
पुरस्कार
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा०
’निनाद’तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूरच्या वतीने स्वा. सावरकर गौरव पुरस्कार, सामाजिक अभिसरण पुरस्कार, तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
सावरकरांवर लिहिलेली पुस्तके
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:
मोरे शेषराव. १. गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी (राजहंस प्रकाशन),२. सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन) ३. सावरकरांचे समाजकारण, ४.सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन), ५.'सावरकरांचे समाजकारण', 'सत्य आणि विपर्यास'
अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, विश्वास २००८. परिसस्पर्श- स्वातंत्र्यवीरांचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
--?--१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्तिनी विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
--?--१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणिच : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
--?--१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
--?--१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६०००ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
--?-- (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरुणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
--?--१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.
सावरकर, बाळाराव (संकलक) १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
--?--१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
--?--१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
--?--१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
--?--१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
--?--(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
--?--१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
--?--१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्तेनी लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
चित्रपट आणि नाटके
सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, व इतर कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.
नाटके
होय मी सावरकर बोलतोय! (लेखक - अनंत शंकर ओगले)
अनादि मी अनंत मी (लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी
चित्रपट
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
वीर सावरकर (२००१ चा हिंदी चित्रपट)
स्वातंत्र्य वीर सावरकर (२०२४ चा हिंदी चित्रपट)
हे सुद्धा पहा
वीर सावरकर (चित्रपट)
स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन
सावरकर साहित्य संमेलन
सावरकर साहित्य अभ्यास मंडळ
चित्रदालन
संदर्भ
बाह्य दुवे
सावरकर.ऑर्ग
कामत.कॉम - सावरकरांचे चरित्र
हू वॉज वीर सावरकर? - रेडिफ संकेतस्थळावरील लेख (प्रश्नोत्तर स्वरूपात)
द मास्टरमाइंड? - आउटलुक या साप्ताहिकाचा लेख. या लेखात गांधीहत्येच्या कटाचे
Official Website of Savarkar National Memorial
A website dedicated to Savarkar
Satyashodh.com facts
Newsreel on Savarkar
सावरकरांचे समग्र मराठी साहित्य
वर्ग:इ.स. १८८३ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९६६ मधील मृत्यू
वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा
वर्ग:मराठी कवी
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:इतिहासकार
वर्ग:भारतीय नास्तिक
वर्ग:लाल दुवे असणारे लेख
वर्ग:भारतीय क्रांतिकारक
वर्ग:भारतीय क्रांतिकारक |
लोकमान्य टिळक | https://mr.wikipedia.org/wiki/लोकमान्य_टिळक | बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; जुलै २३, १८५६ - ऑगस्ट १, १९२०) हे एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते.
टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना "लोकमान्य" ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ "लोकांनी त्यांचा (नेता म्हणून) स्वीकार केला" असा होतो.महात्मा गांधींनी त्यांना "आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले.
इवलेसे|लाल-बाल-पाल
टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात. टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते.
प्रारंभिक जीवन
इवलेसे|लोकमान्य टिळक हे पत्नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई तसेच मुली व नातवंडे यांच्याबरोबर
केशव गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे एका मराठी हिंदू चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला, जे सध्याच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय आहे (तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी ). त्यांचे वडिलोपार्जित गाव चिखली होते. त्यांचे वडील गंगाधर टिळक हे शाळेत शिक्षक होते आणि टिळक सोळा वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले. १८७१ मध्ये, वडिलांच्या मृत्यूच्या काही महिने आधी, सोळा वर्षांचे असताना, टिळकांचा तापीबाई यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांचे नाव बदलून सत्यभामाबाई ठेवण्यात आले.
१८७७ मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात प्रथम श्रेणीत कला शाखेची पदवी घेतली. एल.एल.बी. कोर्समध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांनी एम.ए.चा अभ्यासक्रम अर्धवट सोडला आणि १८७९ मध्ये त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून एलएलबी पदवी प्राप्त केली. पदवी घेतल्यानंतर टिळकांनी पुण्यातील एका खाजगी शाळेत गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे नवीन शाळेतील सहकाऱ्यांशी वैचारिक मतभेद झाल्याने त्यांनी माघार घेतली आणि पत्रकार बनले. टिळकांनी सार्वजनिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. ते म्हणायचे: "धर्म आणि व्यावहारिक जीवन वेगळे नाही. केवळ स्वतःसाठी काम न करता देशाला आपले कुटुंब बनवणे हाच खरा आत्मा आहे. पुढची पायरी म्हणजे मानवतेची सेवा करणे आणि त्याही पुढची पायरी म्हणजे देवाची सेवा करणे."
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेने, १८८० मध्ये गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर या त्यांच्या काही महाविद्यालयीन मित्रांसह त्यांनी प्राथमिक माध्यमिक शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलची सह-स्थापना केली. भारतातील तरुणांसाठी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हे त्यांचे ध्येय होते. शाळेच्या यशामुळे त्यांनी १८८४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून एक नवीन शिक्षण प्रणाली तयार केली ज्याने भारतीय संस्कृतीवर जोर देऊन तरुण भारतीयांना राष्ट्रवादी विचार शिकवले. याच सोसायटीने १८८५ मध्ये माध्यमिकोत्तर व पदवी शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. टिळक हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते.
१८९० मध्ये उघडपणे राजकीय कार्य करण्यासाठी टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली. त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनावर भर देऊन स्वातंत्र्याच्या दिशेने एक व्यापक चळवळ सुरू केली.
राजकीय कारकीर्द
लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वतंत्रता व स्वायत्ततेसाठी लढा दिला. महात्मा गांधी यांच्या आधी ते सर्वात प्रसिद्ध भारतीय राजकीय नेते होते. त्यांचे समकालीन सहकारी गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विपरीत टिळक हे प्रखर राष्ट्रवादी परंतु सामाजिक परंपरावादी मानले जात होते. त्यांना अनेक प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला. मंडाले येथे ते दीर्घकाळ तुरुंगात होते. त्यांच्या राजकीय जीवनाच्या एका टप्प्यावर ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना "भारतीय अशांततेचे जनक" म्हटले होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
टिळक १८९० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांनी विशेषतः स्वराज्याच्या लढ्यासाठी काँग्रेसच्या मवाळ वृत्तीला विरोध केला. तो त्यावेळच्या सर्वात प्रतिष्ठित जहालवादींपैकी एक होते. खरेतर १९०५-१९०७ च्या स्वदेशी चळवळीमुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी अशी विभागणी झाली होती.
१८९६ च्या उत्तरार्धात बुबोनिक प्लेगचा प्रसार मुंबई ते पुण्यापर्यंत झाला. जानेवारी १८९७ पर्यंत या रोगाने महामारीचे रूप धारण केले. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश भारतीय सैन्य आणले गेले आणि प्लेगला आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजले गेले, ज्यात खाजगी घरांमध्ये सक्तीने प्रवेश, घरातील रहिवाशांची तपासणी, रुग्णालये आणि अलग ठेवण्याच्या शिबिरांमध्ये स्थलांतरित करणे, वैयक्तिक वस्तू काढून टाकणे आणि नष्ट करणे समाविष्ट आहे. मालमत्ता, आणि रुग्णांना शहरात प्रवेश करण्यापासून किंवा सोडण्यापासून प्रतिबंधित करणे. मे महिन्याच्या अखेरीस साथीचे रोग नियंत्रणात आले. साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी वापरण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे भारतीय जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली. टिळकांनी हिंदू धर्मग्रंथ, भगवद्गीता उद्धृत करून केसरी (केसरी मराठीत लिहिला होता, आणि "मराठा" इंग्रजीत लिहिला गेला होता) मध्ये प्रक्षोभक लेख प्रकाशित करून हा मुद्दा उचलला, की कोणाला दोष देता येणार नाही. बक्षीसाचा कोणताही विचार न करता अत्याचारी व्यक्तीला मारले. यानंतर, २२ जून १८९७ रोजी, कमिशनर रँड आणि आणखी एक ब्रिटिश अधिकारी, लेफ्टनंट आयर्स्ट यांना चापेकर बंधू आणि त्यांच्या इतर साथीदारांनी गोळ्या घालून ठार केले.
प्लेगविरोधी फवारणीस विरोध
इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्ल्स रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकू लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात :"रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरांसकट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे."
दुष्काळ
thumb|अभ्यासिकेत टिळक|अल्ट=
इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.
जहालवाद विरुद्ध मवाळवाद
तत्कालीन भारतीय नेतृत्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.
लाल-बाल-पाल
thumb|लाल बाल पाल|अल्ट=
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिकुटाला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा
८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.
सामाजिक कार्य
न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी
विष्णूशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना भेटले. १ जानेवारी १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. विष्णूशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि १८८४ मध्ये वेडरबर्न, वर्ड्स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. येथे टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत.
इवलेसे|न्यू इंग्लिश स्कूल, पुणे
इवलेसे|फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे पुढे वैचारिक मतभेदांमुळे टिळक येथून बाहेर पडले , नंतर त्यांच्या व गोपाल कृष्ण गोखल्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळी ची स्थापना झाली . पुढे टिळकांच्या विनंतीस अनुसरून पुण्याच्या मध्याजवळ सदाशिव पेठेत महाविद्यालयास सरदार जगन्नाथ महाराज पंडित ह्यांनी आपली जागा भाडेकरारावर दिली. हे नवीन महाविद्यालय जामखंडी चे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन ह्यांच्या पुण्यस्मृतीस स्मरून दिलेल्या २ लक्ष रुपयांच्या देणगीने बांधण्यात आले . त्याचे नामकरण सर परशुरामभाऊ पटवर्धन महाविद्यालय असे करण्यात आले.
सार्वजनिक उत्सवांची सुरुवात
राजकीय जनजागृतीसाठी इ.स. १८९३ साली टिळकांनी घरगुती गणेशोत्सव हा सार्वजनिक रित्या सुरू केला आणि महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवाजी जयंतीला व्यापक स्वरूपात साजरी करणं केले. शिवजयंती आणि गणेशोत्सव या सार्वजनिक सणांद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लोकांना उभे राहण्यासाठी जागृत करणे हे टिळकांचे उद्दिष्ट होते.
पत्रकारिता
thumb|केसरीतील अग्रलेख|100x150px|अल्ट=
मराठातील अग्रलेख|right|thumb|100x150pxचिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला. टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठाचे संपादक होते. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणाऱ्या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.
सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी 'चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी'त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी 'चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी 'चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहाब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.
साहित्य आणि संशोधन
टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांचे इतर लिखाण :-
आर्क्टिक होम ऑफ वेदाज
ओरायन
गीतारहस्य
टिळक पंचांग पद्धती. (ही आज कित्येक ठिकाणी विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात वापरली जाते.)
टिळकांची पत्रे, एम. डी. विद्वांस यांनी संपादित.
वेदांचा काळ व वेदांग ज्योतिष (Vedic Chronology and Vedang Jyotish)
Selected documents of Lokamanya Bal Gangadhar Tilak, 1880-1920, रविंद्र कुमार यांनी संपादित केले आहे.
The Hindu philosophy of life, ethics and religion (१८८७ मध्ये प्रकाशित).
सामाजिक सुधारणांबाबत प्रतिकूल विचार आणि कार्य
टिळकांच्या काळात, महिला आणि जातीच्या प्रश्नावर काँग्रेसमध्ये दोन गट होते - सुधारणावादी आणि पुराणमतवादी. जातीय भेदभाव दूर करणे, बालविवाहावर बंदी घालणे, विधवा विवाहाचे समर्थन करणे आणि महिला शिक्षण हे सुधारणावादी विचारधारेचे चार मुख्य आधार होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डब्ल्यू.सी. बॅनर्जी, विष्णू हरी पंडित आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर तसेच गोपाळ कृष्ण गोखले आदी या पक्षात होते. दुसरीकडे, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक हे रूढीवादी विचारांचे नेतृत्व करीत होते.https://hindi.theprint.in/opinion/why-was-dr-ambedkar-not-crazy-about-the-greatness-of-balgangadhar-tilak/156878/
महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार
टिळकांनी घराबाहेरील स्त्री शिक्षणाला टिया काळी विरोध केला. टिळकांचे मत होते की परकीय सत्ता घालवून स्वराज्य आणल्यावर सामाजिक बदल या त्या अनुरूप निर्णय घेता येतील . स्त्रियांना घरीच शिक्षण घेऊन शिक्षित व्हावे , मात्र बाहेर जाऊन तूर्तास शिक्षण घेऊ नये हे टिळकांचे मत होते. रानडे, गोखले, आगरकर प्रभृति ह्या विपरीत स्त्रियांनी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे हे मत ठेवणाऱ्या होत्या. विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि टिळक यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कट्टरपंथी गटाने १८८१ ते १९२० च्या दरम्यान कशाप्रकारे मुलींसाठी शाळा सुरू करण्याला आणि प्रत्येक समुदायाला शिक्षण देण्याच्या प्रयत्नांना विरोध केला. या गटाच्या विरोधामुळे महाराष्ट्रातील ११ पैकी ९ नगरपालिकांमध्ये प्रत्येकाला शिक्षण देण्याच्या प्रस्तावाला पराभवाला सामोरे जावे लागले. या गटाने राष्ट्रवादी शिक्षणाचा पुरस्कार केला, ज्यामध्ये धर्मशास्त्रांचे अध्यापन व त्याच्या कौशल्यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.. ह्या प्रकरणात आगरकर, आपटे आदि मंडळींनी पुढाकाराने स्त्री शिक्षणास असलेला विरोध मावळला वकालांतराने पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात स्त्रियांना प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली.
विवाहाचे वय व टिळकांचे विचार
त्यावेळी मुलींचे लग्न अगदी लहान वयात होते, त्यामुळे त्यांना असह्य छळ व यातना सहन करावा लागला. एका प्रसिद्ध प्रकरणात, मुलगी फूलमणीचे ११व्या वर्षीच लग्न केले होते, तिच्या ३५ वर्षीय पतीने तिच्याशी जबरदस्तीने संभोग (लैंगिक अत्याचार) केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ब्रिटिश भारतात अशा अनेक घटना घडल्या होत्या ज्यामध्ये अल्पवयीन मुलींशी लैंगिक संबंध ठेवल्याने त्या अपंग झाल्या. विवाह आणि संमतीने लैंगिक संबंध यासाठीचे वय वाढविण्याची मागणी भारतातील समाजसुधारकांकडून करण्यात येत होती. म्हणूनच ब्रिटिश सरकारने १८९१ साली एक कायदा "एज ऑफ कॉन्सेन्ट ॲक्ट १८९१" तयार केला आहे ज्यानुसार १२ वर्षापेक्षा कमी वयाच्या विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्काराच्या प्रकारात येईल. काँग्रेसचे सुधारवादी लोकांचे या विधेयकाला समर्थन होते, परंतु टिळकांनी या प्रकरणात ब्रिटीश सरकारच्या हस्तक्षेपाला विरोध केला. ते म्हणाले - 'हा सरकारचा कायदा योग्य आणि उपयुक्त असू शकेल, परंतु तरीही सरकारने आमच्या सामाजिक परंपरा आणि जीवनशैलीत हस्तक्षेप करावा अशी आमची इच्छा नाही.'
जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार
टिळकांनी जातीव्यवस्थेचे (द प्रॉस्पेक्ट्स ऑफ हिंदू कास्ट, मराठा, 10 जुलै 1881) समर्थन केले. टिळकांचा वर्ण व्यवस्थेवर ठाम विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की ब्राह्मण जात सर्वात शुद्ध आहे आणि जातीव्यवस्थेला टिकवून ठेवणे देश व समाजाच्या हिताचे आहे. त्यांचे म्हणणे होते की जातींचे निर्मूलन होणे म्हणजे राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास होणे होय. त्यांच्या मते, जात हा हिंदू समाजाचा आधार आहे आणि जातीचा नाश म्हणजे हिंदू समाजाचा नाश.
जेव्हा जोतीराव फुले यांनी अनिवार्य शिक्षणाचे अभियान सुरू केले तेव्हा टिळकांनी त्याला विरोध केला. टिळकांचे असे म्हणणे होते की, प्रत्येक बालकाला इतिहास, भूगोल, गणित शिकवण्यास काही अर्थ नाही, कारण त्यांचा उपयोग त्यांच्या आयुष्यात होत नाही. कुणबी जातीच्या मुलांना इतिहास, भूगोल किंवा गणिताचे शिक्षण दिल्यास त्यांचे नुकसान होईल कारण ते त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील. ते पुढे म्हणाले की, कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय करावा आणि शिक्षणापासून दूर रहावे. टिळक हे विचार मांडत असताना, त्याच वेळी ब्रिटिश सरकार शाळा उघडत होती, आणि त्यात सर्व जातींच्या मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार देत होती. टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक म्हटली. सार्वजनिक शाळेत महार आणि मांग जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटीश सरकारला इशारा दिला की, महार-मांग मुले ब्राह्मण मुलांबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही.
टिळक-आगरकर मैत्री व वाद
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद "आधी काय? राजकीय की सामाजिक स्वातंत्र्य?" या विषयावर झाला होता. जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही.
टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असा विश्वास होता की टिळकांमुळे काँग्रेसने समाज सुधारणेचे काम थांबवले. यामुळे भारतातील सामाजिक परिवर्तनाचा मार्ग बंद झाला आणि राजकीय सुधारणाही थांबल्या. ज्या काळात महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ कृष्ण गोखले ते ज्योतिबा फुले सामाजिक सुधारणेसाठी कार्यरत होते, त्या काळात टिळक पारंपरिक नेत्यांचे नेतृत्व करीत होते. आणि या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी टिळकांबद्दल सातत्याने टीकात्मक लेखन केलेले आहे.
टिळक त्यावेळी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्येच एक संस्था होती - सोशल कॉन्फरन्स ज्याने समाज सुधारणेसाठी काम केले. १९९५ मध्ये जेव्हा काँग्रेसचे अधिवेशन चालू होते, तेव्हा काही लोक म्हणाले की जर काँग्रेसच्या अंतर्गत सोशल कॉन्फरन्सने समाज सुधारणेचे काम केले तर आम्ही काँग्रेसचा पंडाल जाळून टाकू. अशा लोकांचे वैचारिक नेतृत्व टिळक करीत होते. शेवटी निर्णय घेण्यात आला की काँग्रेसचा समाजसुधारणाच्या कोणत्याही कार्यक्रमाशी संबंध राहणार नाही, मग ते कितीही महत्त्वाचे असले तरीही. काँग्रेस केवळ एक राजकीय व्यासपीठ बनले, त्यांनी समाज सुधारणेचे कार्यक्रम थांबविले. याचे वर्णन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या "गांधींनी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले?" पुस्तकात तपशीलवार केले आहे. "रानडे, गांधी आणि जिन्ना" या आपल्या दुसऱ्या पुस्तकात आंबेडकर लिहितात - "विचारवंतांचा एक गट कट्टरपंथी आणि अराजकीय आहे आणि दुसरा गट पुरोगामी आणि राजकीय आहे." पहिल्या गटाचे नेतृत्व आधी चिपळूणकर आणि नंतर टिळक यांनी केले. या दोघांमुळे रानडे यांना विविध प्रकारचे त्रास झाले. यामुळे केवळ सामाजिक सुधारणांच्या कामांचेच नुकसान झाले नाही तर राजकीय सुधारणांनाही सर्वाधिक फटका बसल्याचे अनुभवावरून दिसून येते.'
टिळक आणि रानडे यांची तुलना करताना बाबासाहेब आंबेडकर हेही लिहितात की निःसंशयपणे टिळक तुरुंगात राहिले, परंतु रानडे यांची लढाई अधिक कठीण होती. ज्या व्यक्तीने राजकीय लढा दिला त्याला समाज डोक्यावर घेतो, तर समाज सुधारणेसाठी संघर्ष करणारी व्यक्ती बऱ्याचदा एकटी असते आणि तिला सर्व प्रकारच्या अपमानांना सामोरे जावे लागते.
टिळकांचे स्पष्ट मत होते की शेतकरी आणि कारागीर जातींनी राजकारणात प्रवेश करू नये. १९१८ मध्ये या जातींनी राजकीय प्रतिनिधित्त्व मागितले असता टिळकांनी सोलापुरातील एका सभेत असे म्हटले होते की 'तेली-तामोली-कुणबी विधानसभेत जाऊन काय करणार?' बाबासाहेबांच्या मते, टिळकांच्या मते या जातींतील लोकांचे कार्य कायद्यांचे अनुसरण करणे आहे आणि त्यांना कायदे करण्याचा अधिकार असू नये.
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.
प्रभाव आणि वारसा
टिळकांवर लिहिलेली पुस्तके
टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न.चिं. केळकर
लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके
लोकमान्य ते महात्मा लेखक सदानंद मोरे
लोकमान्य व लोकराजा लेख लेखक इंद्रजित नाझरे
लाल,बाल,पाल लेख लेखक इंद्रजित नाझरे
लोकमान्य टिळकांच्या जीवनावर "दुर्दम्य" नावाची चरित्रात्मक कादंबरी प्रा.गंगाधर गाडगीळ यांनी लिहिली आहे.
अग्रलेखास्त्र - लेखक शिरीष कुलकर्णी ,लोकव्रत प्रकाशन, पुणे लोकमान्य टिळक यांच्या केसरी या वृत्तपत्रातील अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास- किंमत -२५० /-रु
चित्रपट
"लोकमान्य : एक युगपुरुष" (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे) - इ.स. २०१५.
टिळकांवर न निघालेला चित्रपट
चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी टिळकांवर चित्रपट बनवण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हा चित्रपट बनलेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
पुतळे
महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील लोकमान्य टिळकांच्या काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-
खामगाव (बुलढाणा जिल्हा
तळोदा (नंदुरबार जिल्हा)
नवी दिल्ली (महाराष्ट्र सदन-प्रस्तावित)
नागपूर
निगडी (पुणे)
पुणे (भाजी मंडई/रे मार्केट/फुले मार्केट ; टिळक स्मारक मंदिर, गायकवाड वाडा/केसरी वाडा)
बार्शी (भाजी मंडई)
बोरीवली (मुंबई) : हा पुतळा रस्त्यावरचे सिग्नल दिसण्याला अडथळा होतो, म्हणून हलवणार आहेत.
मुंबई (गिरगांव चौपाटी) : हा टिळकांचा पहिला पुतळा - टिळकांच्या हयातीतच शिल्पकार रघुनाथराव फडके यांनी टिळकांना समोर बसवून बनवला.
रत्नागिरी (टिळकांच्या राहत्या घराच्या केलेल्या स्मारकात)
[इचलकरंजी] राजवाडा चौक टिळक रोड .
सोलापूर टिळक चौकात शाम सारंग यांनी तयार केलेला पुर्णाकृती पुतळा आहे.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लोकमान्य टिळकांचा देखील पुतळा उभारण्यात येणार आहे
पुण्याच्या भाजी मंडईतील पुतळा
पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त झाले.
१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल केला. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते, आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.
कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.
बाह्य दुवे
टिळकांचा अग्रलेख - गणपतीचा उत्सव, केसरी सप्टेंबर १८, १८९४
साध्वी सत्यभामाबाई टिळक
संदर्भ
वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म
वर्ग:महाराष्ट्रामधील राजकारणी
वर्ग:भारतीय राजकारणी
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक
वर्ग:मराठी संपादक
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:मराठी गणितज्ञ
वर्ग:मराठी इतिहास संशोधक
वर्ग:मराठी साहित्यिक
वर्ग:मराठी विचारवंत
वर्ग:इ.स. १९२० मधील मृत्यू
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:पुरुष चरित्रलेख |
विकी | https://mr.wikipedia.org/wiki/विकी | thumb|विकीचे निर्माते वॉर्ड कनिंघम
विकी (Wiki / wiki) हे वापर करणाऱ्यांना उपलब्ध माहितीत भर घालायला, तसेच त्या माहितीचा वापर करणाऱ्यांना बदल किंवा दुरुस्त्या करण्यास मुभा देणारे एक तंत्रज्ञान आहे.
साधारणपणे इंटरनेट वर आढळणारी पाने (वेब पेजेस) जी माहिती पुरवतात, ती पानाच्या वाचकास बदलता येत नाहीत. विकी तंत्रज्ञानावर आधारित पानंमधील माहिती मात्र वाचकास बदलता येते.
विकीतील नाव नोंदणी मुळे विकीचे संपादन सुकर होते, पण बहुतेक वेळा नाव नोंदणी ही अत्यावश्यक बाब नाही. यामुळे एकत्र येउन लिखाण करण्याचे काम आणि संपर्क सुलभ रहाते.
विकी या संकेतस्थळचे काम करणाऱ्या संगणक प्रणालीस सुद्धा विकी असे म्हणतात. विकीचे पहिले प्रारूप "विकीविकीवेब" हे वॉर्ड कनिंघम यांनी १९९५ मध्ये केले. हवाई (Hawaii) प्रदेशातील भाषेत 'विकी-विकी'चा अर्थ 'लौकर लौकर' किंवा 'चटपट' असा होतो.
अधिक माहिती
विकिपीडिआ
विकीविकीवेब
विकी
वर्ग:विकिपीडिया |
कोश | https://mr.wikipedia.org/wiki/कोश | कोश म्हणजे विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा. कोश ह्या शब्दाचा मूळ अर्थ धनाचा साठा, संग्रह असा आहे.कोश म्हणजे एखाद्या चरित्र होय
कोशांचे प्रकार
ज्ञानकोश
शब्दकोश
संज्ञा कोश
विश्वकोश
स्थल कोश
शाब्दबंध
बालकथा-कविता कोश
महाजालावर उपलब्ध असलेल्या कोशांचे पत्ते
हे ही पाहा
मराठीतील कोश
वर्ग: ज्ञानकोश
वर्ग:कोश साहित्य |
साहित्य | https://mr.wikipedia.org/wiki/साहित्य | ह्या ठिकाणी मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, साहित्य संमेलने आणि इतर माहिती नोंदवा.
[ललित साहित्य]
संत साहित्य
मराठी साहित्य
कादंबरी
कविता
Category:साहित्य |
कादंबरी | https://mr.wikipedia.org/wiki/कादंबरी | साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.
कादंबऱ्याचे प्रकार
ऐतिहासिक
दलित
ग्रामीण
पौराणिक
सामाजिक
वास्तववादी
राजकीय
समस्याप्रधान
शेेतकरीवादी
बालकादंबरी
वैज्ञानिक
कौटुंबिक
आत्मकथनात्मक
काल्पानिक
प्रसंग चित्रणपर
कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप
कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणाऱ्या करार, काळ,आवाज हे पैलू लक्षात घ्यावे लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणारा जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लॅंगरच्या ‘काळ’ या संकल्पनेनुसार भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत असतो, म्हणजे टी. रास इलियटच्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.
कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी
लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला.
व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.
कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मनःस्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हटले. 'काळा सूर' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झाले.
डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.
जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूहजीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..
मराठी कादंबरीचा इतिहास
पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक - बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक - विनायक कोंडदेव ओक
पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (इ.स. १८९३), लेखक - हरी नारायण आपटे
भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कादंबऱ्या
१. कसे दिवस जातील (न. वि. कुलकर्णी) : यांचा खेडूत सृष्टीचे कादंबरीकर म्हणून गौरव झाला आहे.
त्यांची "मजूर"(१९२५) ही कामगार जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.
२. माकडीची माळ (अण्णा भाऊ साठे) : या कादंबरीत उपेक्षितांच्या जीवनातील वास्तव्य शब्दबद्ध केले आहे..
३. ब्राह्मणकन्या (श्री.व्यं. केतकर ) : कालिंदी या तरुणीची बंडखोर कहाणी या कादंबरीत वर्णिली आहे.
प्रसिद्ध मराठी कादंबरीकार
अण्णा भाऊ साठे
अरुण साधू
प्रल्हाद केशव अत्रे
आनंद यादव
कैलास दौंड
गंगाधर गाडगीळ
गौरी देशपांडे
केशव मेश्राम
चिं. त्र्यं. खानोलकर
चिं. वि. जोशी
जयंत नारळीकर
जयवंत दळवी
द. मा. मिरासदार
दया पवार
नरेंद्र नाईक
ना.सी. फडके
भालचंद्र नेमाडे
पु.भा. भावे
बाबा कदम
बाबूराव बागूल
रघुनाथ जगन्नाथ सामंत (रघुवीर सामंत)
रणजित देसाई
रा.रं. बोराडे
लक्ष्मण माने
विजय शेंडगे (विजय शेंडगे)
लक्ष्मण लोंढे
व. पु. काळे
वि. स. खांडेकर
व्यंकटेश माडगुळकर
शंकरराव खरात
श्री.ना.पेंडसे
सदानंद देशमुख
सुधाकर गायकवाड
सुहास शिरवळकर
सुधाकर गायकवाड
चंद्रकांत निकाडे
बाबाराव मुसळे
साने गुरुजी
भाऊ पाध्ये
गौरी देशपांडे
रंगनाथ पठारे
दीनानाथ मनोहर
श्याम मनोहर
सानिया
कविता महाजन
मेघना पेठे
जी के ऐनापुरे
प्रवीण दशरथ बांदेकर
किरण गुरव
श्रीकांत देशमुख
आसाराम लोमटे
प्रसिद्ध कादंबऱ्या
अमृतवेल (कादंबरी)
आनंदी गोपाळ
आमदार सौभाग्यवती
आम्हांला जगायचंय
उपकारी माणसे (त्रिखंड)
कापूसकाळ
काळोखातील अग्निशिखा
कोसला
छावा
जरिला
जीवन गंगा (काहूर)
झाडाझडती
झेप
झोपडपट्टी
झोंबी
झुलू
प्राजक्ताची फुले
हाल्या हाल्या दुधू दे
पखाल
वारूळ
पाटीलकी
दंश
स्मशानभोग
आर्त
झळाळ
द लास्ट टेस्ट
नो नाॅट नेव्हर
एक पाऊल पुढं
झुंड
तांबडफुटी
दुनियादारी
पाचोळा
पाणधुई
पानिपत
पार्टनर
पोखरण
फकिरा
बनगरवाडी
ब बळीचा
महानायक
मुंबई दिनांक
मृत्युंजय
ययाति
रणांगण
राऊ
व्यासपर्व
शूद्र्
श्रीमान योगी
सत्तांतर
संभाजी
सूड
स्वामी
ही वाट एकटीची
तुडवण
चाळेगत
उजव्या सोंडेच्या बाहुल्या
इंडियन अॅनिमल फार्म
वर्ग:मराठी साहित्य
वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख
वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा |
कविता | https://mr.wikipedia.org/wiki/कविता | कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.
कवितांचे प्रकार
लेखन पद्धतीनुसार
अंगाई
अभंग
आर्या
ओवी
कणिका
खंडकाव्य
गझल
चारोळी
चौपदी
दशपदी
दिंडी
पोवाडा
महाकाव्य
मुक्तछंद
रूबाया
लावणी
विडंबन
श्लोक
साकी
सुनीत
हायकू
आशयानुसार
निसर्गवर्णनात्मक कविता
चित्रपटगीत
नाट्यगीत
विनोदी कविता
भलरी (शेतकरी गीत)
बालकविता
बालगीत
भक्तिगीत
भावगीत
मराठी कवी
संतकवी
एकनाथ
कान्होपात्रा
चोखामेळा
जनाबाई
जोगा परमानंद
तुकाराम
नरहरी सोनार
नामदेव
महिपती
मुक्ताबाई
रामदास
सावता माळी
ज्ञानेश्वर
पंडित कवी(पंत कवी)
अमृतराय
आनंदतनय
देवनाथ महाराज
मुक्तेश्वर
मोरोपंत
रघुनाथ पंडित
वामनपंडित
श्रीधर
तंतकवी / शाहीर
अनंतफंदी
परशराम
प्रभाकर
रामजोशी
सगनभाऊ
होनाजी बाळा
बशीर मोमीन (कवठेकर)
अन्य कवी
अनंत काणेकर
अनंत सदाशिव शेट्ये
अनिल (आत्माराम रावजी देशपांडे)
अनिल बाबुराव गव्हाणे
अरुण काळे
अरुण कोलटकर
अरुण म्हात्रे
डॉ. अरुणा ढेरे
अशोक परांजपे
आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर)
इंदिरा संत
कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर)
के. नारायण काळे
केशवकुमार (प्र. के अत्रे)
केशवसुत
वि. स. खांडेकर
प्रभा गणोरकर
ग.ह. पाटील
कवी गिरीश
गुरू ठाकूर
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
ग्रेस (माणिक गोडघाटे)
चंद्रशेखर गोखले
नामदेव ढसाळ
ना.वा. टिळक
लक्ष्मीबाई टिळक
ग.ल. ठोकळ
दशरथ यादव
नीरजा
प्रज्ञा पवार
फ.मुं. शिंदे
बशीर मोमीन (कवठेकर)
बहिणाबाई चौधरी
बा.भ. बोरकर
बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)
कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
भवानीशंकर पंडित
भा.रा. तांबे
मंगेश पाडगावकर
बा. सी. मर्ढेकर
ग.त्र्यं. माडखोलकर
ग. दि. माडगूळकर
माधव ज्युलिअन
यशवंत मनोहर
लक्ष्मीकांत तांबोळी
वा.गो. मायदेव
कवी यशवंत
रजनी परुळेकर
वसंत बापट
वा.रा कांत
वि.द. घाटे
विंदा करंदीकर
कवी विनायक (विनायक जनार्दन करंदीकर)
वि.म. कुलकर्णी
शांता शेळके
संदीप खरे
वि.दा. सावरकर
सुधीर मोघे
सुरेश भट
नारायण सुर्वे
श्रीकृष्ण राऊत
विठ्ठल वाघ
नारायण कुळकर्णी कवठेकर
अशोक बागवे
प्रवीण दवणे
ना. धों. महानोर
प्रकाश होळकर
अनंत राऊत
बाह्य दुवे
वर्ग:कविता |
अरूण साधू | https://mr.wikipedia.org/wiki/अरूण_साधू | पुर्ननिर्देशन अरुण साधू |
अरुण साधू | https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_साधू | अरुण मार्तंडराव साधू (१७ जून, १९४१ - २५ सप्टेंबर, २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य
कादंबऱ्या
झिपऱ्या
तडजोड
त्रिशंकू
बहिष्कृत
मुखवटा
मुंबई दिनांक
विप्लवा
शापित
शुभमंगल
शोधयात्रा
सिंहासन
स्फोट
कथासंग्रह
एक माणूस उडतो त्याची गोष्ट । कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले) । ग्लानिर्भवति भारत। बिनपावसाचा दिवस । बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती। मंत्रजागर । मुक्ती
नाटक
पडघम
ललित लेखन
अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)
समकालीन इतिहास
आणि ड्रॅगन जागा झाला
जेव्हा ड्रॅगन जागा होतो
फिडेल चे आणि क्रांती
शैक्षणिक
संज्ञापना क्रांती
भाषांतर
एकांकिका
प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
इंग्रजी
The Pioneer (चरित्र)
पुरस्कार आणि सन्मान
नागपूर येथील ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार (फेब्रुवारी २०१५)
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (जानेवारी २०१७)
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
वर्ग:मराठी पत्रकार
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म
वर्ग:इ.स. २०१७ मधील मृत्यू |
पु.ल. देशपांडे | https://mr.wikipedia.org/wiki/पु.ल._देशपांडे | पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात.
पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.
त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
जीवन
thumb|पु.ल.देशपांडे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट
पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.
मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.
मृत्यू
पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते तेव्हा ८० वर्षांचे होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता.
बालपण आणि शिक्षण
देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.
देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.
पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.
वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
कारकीर्द
१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भट्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. २०१४ मध्ये प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.
भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती.
१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महारा''ची भूमिका केली.
संगीतकार पु.ल. देशपांडे
पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल.
'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते.
नभोवाणी आणि दूरचित्रवाणी
१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.
पुरस्कार आणि सन्मान
साहित्य अकादमी पुरस्कार ("व्यक्ती आणि वल्ली"साठी)- १९६५
पद्मश्री- १९६६
संगीत नाटक अकादमी पुरस्कार- १९६७
संगीत नाटक अकादमी फेलोशीप- १९७९
कालीदास सन्मान- १९८७
पद्मभूषण- १९९०
पुण्यभूषण"- १९९२
महाराष्ट्र भूषण पुरस्कार- १९९६
रवींद्र भारती विद्यापीठ(१९७९), पुणे विद्यापीठ(१९८०) आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ(१९९३) कडून मानाची डी. लिट. पदवी
महाराष्ट्र गौरव (बहुरूपी) पुरस्कार
नवीन स्थापन झालेल्या दूरदर्शनसाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलाखत घेणारी पहिली व्यक्ती
महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली मुंबईत "पु.ल. देशपांडे कला अकादमी"ची स्थापना
पुण्यातील सुप्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यान ("पुणे-ओकायामा मैत्री उद्यान" या नावानेही ओळखले जाते.)
८ नोव्हेंबर २०२०ला गुगलने त्यांच्या १०१ व्या जन्मदिवसानिमित्त गुगल डूडल तयार करून आदरांजली वाहिली.
PuLa100 नावाचा संगणक फॉन्ट, जो देशपांडे यांच्या हस्ताक्षरावर आधारित आहे, २०२० साली उपलब्ध झाला.
लोकप्रिय माध्यमांमध्ये
पु.ल. आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहिली गेलेली पुस्तके
अमृतसिद्धी : (स.ह.देशपांडे, मंगला गोडबोले), पु.ल.देशपांडे गौरवग्रंथ
असा मी... असा मी... (संकलन, संकलक - डाॅ. नागेश कांबळे)
जीवन त्यांना कळले हो ! (सहसंकलक - अप्पा परचुरे,) पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल विविध साहित्यिकांव्च्या लेखांचे संकलन)
पाचामुखी (संकलन : पु.ल. देशपांडे यांच्या भाषणांचे आणि मुलाखतींचे संकलन).
पुन्हा मी..पुन्हा मी! (संकलक. डाॅ. नागेश कांबळे)
पुरुषोत्तमाय नम: (मंगला गोडबोले)
पु.ल. : एक साठवण (संपादक जयवंत दळवी)
पु.ल. चांदणे स्मरणाचे (मंगला गोडबोले)
पु. ल. देशपांडे यांचे निवडक विनोद (तुषार बोडखे)
पु. ल. नावाचे गारुड (संपादक - मुकुंद टाकसाळे)
बदलते वास्तव आणि पु. ल. देशपांडे (प्रकाश बुरटे) [संदर्भ: लोकवाङ्मय गृह, मुंबई. पहिली आवृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६.
भावगंध (पु.ल. देशपांडे यांच्या काही लेखांचे संकलन)
विस्मरणापलीकडील पु.ल. (गंगाधर महाम्बरे)
चित्रपटांची यादी
वर्ष-इसवी सन चित्रपटाचे नाव भाषा कामगिरी १९४७ कुबेर मराठी अभिनय १९४८ भाग्यरेषा मराठी अभिनय १९४८ वंदे मातरम् मराठी अभिनय १९४९ जागा भाड्याने देणे आहे मराठी पटकथा, संवाद १९४९ मानाचे पान मराठी कथा-पटकथा-संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); संगीत १९४९ मोठी माणसे मराठी संगीत १९५० गोकुळचा राजा मराठी कथा, पटकथा, संवाद १९५० जरा जपून मराठी पटकथा, संवाद १९५० जोहार मायबाप मराठी अभिनय १९५० नवरा बायको मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत १९५० पुढचं पाऊल मराठी पटकथा, संवाद (ग.दि.माडगूळकरांसह); अभिनय १९५० वर पाहिजे मराठी कथा (अच्युत रानडे यांच्यासह); संवाद १९५० देव पावला मराठी संगीत १९५२ दूधभात मराठी कथा, पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत १९५२ घरधनी मराठी पटकथा, संवाद, गीतरचना, संगीत १९५२ संदेश हिंदी कथा, पटकथा, संवाद (संवादाचे हिंदी भाषांतर: मीर असगर अली) १९५३ देवबाप्पा मराठी पटकथा, संवाद, संगीत, गीतरचना(ग.दि.माडगूळकरांसह) १९५३ नवे बिऱ्हाड मराठी संवाद, संगीत १९५३ गुळाचा गणपती मराठी कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन १९५३ महात्मा मराठी, हिंदी, इंग्रजी कथा १९५३ अंमलदार मराठी पटकथा, संवाद, संगीत, अभिनय १९५३ माईसाहेब मराठी पटकथा, संवाद १९६० फूल और कलियॉं हिंदी कथा, पटकथा १९६३ आज और कल हिंदी कथा, पटकथा
साहित्य
अघळ पघळ (पुस्तक) (१९९८)
अपूर्वाई
असा मी असामी (१९६४)
आपुलकी
उरलं सुरलं (१९९९)
एक शून्य मी
एका कोळीयाने
कान्होजी आंग्रे
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
कोट्याधीश पु.ल. (१९९६)
खिल्ली (१९८२)
खोगीरभरती (१९४९)
गणगोत
गाठोडं
गुण गाईन आवडी
गोळाबेरीज (१९६०)
चार शब्द
जावे त्याच्या देशा
दाद
द्विदल
नस्ती उठाठेव (१९५२
निवडक पु.ल. भाग १ ते ६
पुरचुंडी (१९९९)
पु लंची भाषणे
पु.लं.चे काही किस्से
पूर्वरंग (१९६३)
बटाट्याची चाळ (१९५८)
भाग्यवान
भावगंध
मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास (१९९४)
मैत्र
वंगचित्रे (१९७४)
व्यक्ती आणि वल्ली (१९६६)
स्वगत (१९९९) (अनुवादित)
हसवणूक (१९६८)
अनुवादित कादंबऱ्या
काय वाट्टेल ते होईल (१९६२) (मूळ लेखक: जॉर्ज पापाश्विली आणि हेलन पापाश्विली)
एका कोळीयाने (१९६५) (मूळ कथा: The Old Man and the Sea लेखक : अर्नेस्ट हेमिंग्वे)
कान्होजी आंग्रे
प्रवासवर्णने
अपूर्वाई (१९६०)
पूर्वरंग (१९६३)
जावे त्यांच्या देशा (१९७४)
वंगचित्रे (१९७४)
व्यक्तिचित्रे
आपुलकी (१९९९)
गणगोत (१९६६)
गुण गाईन आवडी (१९७५)
चित्रमय स्वगत - आत्मकथन (डीलक्स आवृत्ती, किंमत १६०० रुपये))
मैत्र (१९९९)
व्यक्ती आणि वल्ली (काल्पनिक) (१९६६) [ यावर आधारित 'नमुने' ही हिंदी मालिका २०१८साली सोनी टीव्हीवरून प्रसारित झाली.]
स्वगत (१९९९) (अनुवादित, मूळ लेखक - जयप्रकाश नारायण)
चरित्रे
गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)
एकपात्री प्रयोग
बटाट्याची चाळ (१९६१-- )
वाऱ्यावरची वरात (काही प्रसंग) (१९६२-- )
एकांकिका-संग्रह
आम्ही लटिकेना बोलू (१९७५)
मोठे मासे आणि छोटे मासे (१९५७)
विठ्ठल तो आला आला (१९६१)
नाटके
अंमलदार (नाटक) (१९५२) (मूळ लेखक - निकोलाय गोगोल)
एक झुंज वाऱ्याशी (१९९४)
तीन पैशाचा तमाशा (१९७८) (मूळ लेखक - बेर्टोल्ट ब्रेख्त)
ती फुलराणी (१९७४) (मूळ लेखक - जॉर्ज बर्नार्ड शॉ) (मूळ नाटक - पिग्मॅलियन)
तुका म्हणे आता (१९४८)
तुझे आहे तुजपाशी (१९५७)
नवे गोकुळ
पहिला राजा/आधे अधुरे (१९७६) (मूळ लेखक: जगदीशचंद्र माथुर)
पुढारी पाहिजे (एकांकिका)
भाग्यवान (१९५३)
राजा ईडिपस (राजा ओयादिपौस) (१९७९) (मूळ लेखक - सोफोक्लीझ)
वटवट वटवट (१९९९)
सुंदर मी होणार (१९५८)
लोकनाट्ये
पुढारी पाहिजे (१९५१)
वाऱ्यावरची वरात
काही विनोदी कथा
एका रविवारची कहाणी
बिगरी ते मॅट्रिक
मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर?
म्हैस. या कथेवर मराठीत एक चित्रपट बनत आहे. (२-४-२०१३ची बातमी)
मी आणि माझा शत्रुपक्ष
पाळीव प्राणी
काही नवे ग्रहयोग
माझे पौष्टिक जीवन
उरलासुरला (कथा)
व्यक्तिचित्रे
अण्णा वडगावकर
गजा खोत
ते चौकोनी कुटंब
तो
दोन वस्ताद
नामू परीट
परोपकारी गंपू
बबडू
बापू काणे
बोलट
भय्या नागपूरकर
लखू रिसबूड
हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
हरितात्या
संकीर्ण
चार शब्द
दाद
पुरुषराज अळूरपांडे (सहलेखक म.वि. राजाध्यक्ष, रा.वा. अलूरकर)
मित्रहो!
रवींद्रनाथ : तीन व्याख्याने
रसिकहो!
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १
रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २
श्रोतेहो!
सृजनहो!
इतर
पुलंची काही प्रासंगिक वाक्ये
‘‘एखादा प्रश्न सरकारच्या विचाराधीन आहे या इतके विनोदी विधान अन्य नाही,’’ असे पु. ल. देशपांडे म्हणत. सरकार विचार करते ही त्यांच्या मते विनोदी कल्पना. फटाक्यांसंदर्भात दिवाळीच्या तोंडावर विविध शासनांनी घेतलेले निर्णय पुलंच्या विधानाची कालातीतता दाखवून देतात. करोनासाथ जाणारी नाही, यात श्वसनाचा विकार होतो, ज्यांना तो आहे त्यांचा बळावतो हे सरकारला गेले सहा महिने ठाऊक आहे आणि यंदा दीपावली कधी आहे हे माहीत नसण्याची शक्यता नाही. तरीही फटाक्यांवरील बंदीसाठी सरकारला दिवाळी तोंडावर यावी लागली. आणि ही बंदी तर मूळ निर्णयापेक्षा विनोदी. फटाके विकायला, विकत घ्यायला बंदी नाही. पण विकत घेतलेले फटाके फोडायला मात्र बंदी. अशी कमाल फक्त सरकारच करू शकते.'''
उल्लेखनीय
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परर्फॉर्मिंग आर्ट्स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले. संशोधकांना आधारभूत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख आदी बरेच साहित्य पु.लंनी जमा करून ठेवले आहे. मराठी नाटकाचा आरंभापासूनचा इतिहास त्यांनी अशा जबरदस्त प्रयत्नान्ती जमा केला की त्यांच्यावरून स्फूर्ती घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतांतील कलांचा इतिहास जमा करून नोंदवायची सुरुवात केली. NCPAच्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले.
पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.
पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर 'भाई' - व्यक्ती की वल्ली' या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे.
पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत. शिवाय त्यांच्या साहित्यावर आधारित ‘नमुने’ नावाची हिंदी मालिका येत असून अभिनेते संजय मोने मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘सोनी सब’ या वाहिनीवर ही मालिका प्रसारित होणार आहे. पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ ही मालिका आधारित आहे. यामध्ये सुबोध भावे आणि इतर काही मराठी आणि हिंदी कलाकारांची फौज दिसणार आहे.
पुलंची काही टोपणनावे
धोंडो भिकाजी कडमडे जोशी
मंगेश साखरदांडे
बटाट्याच्या चाळीचे मालक
भाई
कोट्याधीश पु.ल.
पुरुषराज अळूरपांडे(उरलंसुरलं)
संदर्भ
बाह्य दुवे
पु. ल. देशपांडे संकेतस्थळ
वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म
वर्ग:इ.स. २००० मधील मृत्यू
वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते
वर्ग:मराठी गायक
वर्ग:मराठी गीतकार
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी पटकथाकार
वर्ग:मराठी नाटककार
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:मराठी संगीतकार
वर्ग:मराठी संवादलेखक
वर्ग:महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कारविजेते
वर्ग:संवादिनी वादक
वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते
वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते
वर्ग:कालिदास सन्मान पुरस्कारविजेते
वर्ग:भारतीय नास्तिक |
चित्रपट | https://mr.wikipedia.org/wiki/चित्रपट | पुनर्निर्देशन चलचित्र |
बालकवी | https://mr.wikipedia.org/wiki/बालकवी | पुर्ननिर्देशन त्र्यंबक बापूजी ठोंबरे |
भाषाभ्यास | https://mr.wikipedia.org/wiki/भाषाभ्यास | भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या मनातील विचार, भावना व अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा हे एक समर्थ माध्यम आहे. भाषेद्वारेच आपण ऐहिक व्यवहार पुरे करू शकतो. भाषेमुळे मानवाच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा विचारांच्या अभ्यासाच्या अनेक शाखा आहेत त्यापैकी भाषाविचार हीही एक शाखा आहे. मानवी जीवनाप्रमाणे भाषेचे स्वरूपही गुंतागुंतीचे आणि कधीकधी अनाकलनीय भासते. भाषा आणि समाज यांचा एक अनन्यसाधारण संबंध असतो. संस्कृतीच्या परंपरा, श्रद्धा, रुढी, धार्मिक आचार-विचार इत्यादी बाबींचे दर्शन भाषेतून होत असते म्हणून व्यक्तीसमूह समजून घेण्यासाठी भाषाभ्यासाची गरज असते. अशा अभ्यासामुळे मानवाचे मनोव्यापार, मानवी संस्कृती आणि समाज यांचा अभ्यास करण्यास मदत होते. म्हणूनच भाषावैज्ञानिकांनी समाजविज्ञान, मनोविज्ञान आणि मानववंशविज्ञान यांचा अभ्यास सुरू केला त्यातूनच सामाजिक भाषाविज्ञान, मानववंशभाषाविज्ञान, आणि मनोभाषाविज्ञान अशा भाषाभ्यासाच्या नव्या शाखा सुरू झाल्या.
Category:भाषाभ्यास |
वि.स. खांडेकर | https://mr.wikipedia.org/wiki/वि.स._खांडेकर | विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.
पूर्वायुष्य
वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.
व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य
इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
खांडेकरलिखित पुस्तके
अजून येतो वास फुलांना
अमृत (पटकथा)
अमृतवेल
अविनाश
अश्रू
अश्रू आणि हास्य
आगरकर : व्यकी आणि विचार
उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा)
उःशाप
कल्पलता
कांचनमृग (१९३१)
कालची स्वप्ने
कालिका
क्रौंचवध (१९४२)
घरटे
घरट्याबाहेर
चंदेरी स्वप्ने
चांदण्यात
छाया (पटकथा)
जळलेला मोहर (१९४७ )
जीवनशिल्पी
ज्वाला (पटकथा)
झिमझिम
तिसरा प्रहर
तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३
ते दिवस, ती माणसे
दंवबिंदू
देवता (पटकथा)
दोन ध्रुव (१९३४)
दोन मने (१९३८)
धर्मपत्नी (पटकथा)
धुके
नवा प्रातःकाल
परदेशी (पटकथा)
पहिली लाट
पहिले पान
पहिले प्रेम (१९४०)
पाकळ्या
पांढरे ढग (१९४९)
पारिजात भाग १, २
पाषाणपूजा
पूजन
फुले आणि काटे
फुले आणि दगड
मंजिऱ्या
मंझधार
मंदाकिनी
मध्यरात्र
मृगजळातील कळ्या
ययाति
रंग आणि गंध
रिकामा देव्हारा (१९३९)
रेखा आणि रंग
लग्न पहावे करून (पटकथा व संवाद)
वामन मल्हार जोशी : व्यक्ति-विचार
वायुलहरी
वासंतिका
विद्युत् प्रकाश
वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८)
समाजशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
समाधीवरील फुले
सहा भाषणे
सांजवात
साहित्यशिल्पी (लेख, संपादन सुनीलकुमार लवटे)
सुखाचा शोध
सुवर्णकण
सूर्यकमळे
सोनेरी सावली (पटकथा)
सोनेरी स्वप्ने भंगलेली
स्त्री आणि पुरुष
हिरवळ
हिरवा चाफा (१९३८)
हृदयाची हाक (१९३०)
क्षितिजस्पर्श
पटकथा
'अंतरिचा दिवा' हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.
खांडेकरांचे चरित्र
सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.
पुरस्कार आणि सन्मान
वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) - ययाति (कादंबरी)
पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) - ययाति कादंबरीसाठी
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.
बाह्यदुवे
संदर्भ
वर्ग:इ.स. १८८९ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९७६ मधील मृत्यू
वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष
वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:ज्ञानपीठ पुरस्कार विजेते
वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख |
संगीत | https://mr.wikipedia.org/wiki/संगीत | नादयुक्त गायन,वादन आणि नृत्य यांच्या तिहेरी संगमाला संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे कारण ,संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.संगीतामधून आपण आपले भावना व्यक्त करू शकतो. जेव्हा आपण आनंदीत असतो तेव्हा संगीतातला शब्द आपल्याला समजतो पण जेव्हा आपण दुखात असतो तेव्हा त्या संगीतातल्या शब्दाचा अर्थ समजतो.संगीत हे ईश्वराने दिलेली एक देन आहे.आपल्या मनातील भावना ह्या कदाचित संगीतानेच व्यक्त होऊ शकतात.संगीत आयुष्याला प्रेरणा देते.एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत होय.
--मयुरी विखे--
सुगम संगीत । नाट्यसंगीत । भावगीते । भक्तिगीते । शास्त्रीय संगीत । संगीतातील राग । संगीतविषयक ग्रंथ
वर्ग:संगीत |
भारत | https://mr.wikipedia.org/wiki/भारत | भारत किंवा भारतीय गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज आहे परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. भारताला प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे
राष्ट्रीय मानचिन्हे
+ भारताची अधिकृत राष्ट्रीय मानचिह्ने राष्ट्रीय प्राणी वाघ50px राष्ट्रीय पक्षी मोर 50px राष्ट्रीय वृक्ष वड 50px राष्ट्रीय फूल कमळ 50px राष्ट्रीय प्राणीवाघ 50px राष्ट्रीय जलचर प्राणीगंगा डॉल्फिन 50px राष्ट्रीय सरपटणारा प्राणीकिंग कोब्रा 50px राष्ट्रीय परंपरागत प्राणीमाकड 50px राष्ट्रीय फळ आंबा 50px राष्ट्रीय नदी गंगा 50pxराष्ट्रग्रंथ भारताचे संविधान50px
नावाची व्युत्पत्ती
'भारत नावाचा अर्थ ' भारत हे नाव कसे पडले याबद्धल मतभेद आढळतात. जैन अनुश्रुतिनुसार भगवान ॠषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव भरत होते. त्यावरून भारत हे नाव पडले असे सांगण्यात येते. ॠग्वेदकालीन सिंधू प्रदेशातील सर्वश्रेष्ठ टोळी भरत होती. तिच्या नावावरून भारत हे नाव पडले असेल असेही समजण्यात येते.
'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय.
कथा
शकुंतला ही विश्वामित्र ऋषींची मेनका या अप्सरेपासून झालेली कन्या होती. तिचा विवाह पुरुवंशीय राजा दुष्यंताशी झाला होता. त्यांचा पुत्र पराक्रमी भरत होता. यावरून हिंदुस्थान देशाला भारत हे नाव पडले असा एक मतप्रवाह आहे.
काहीच्या मते स्वायंभुव मनूची पत्नी शतरूपा ऊर्फ बार्हिष्मती यांचा पुत्र असलेल्या प्रियव्रताच्या सात मुलांपैकी एकाचे नांव अग्निध्र होते. अग्निध्राला वारसाहक्काने जंबूद्वीप नावाचा प्रदेश मिळाला. अग्निध्राचा मुलगा नाभि आणि त्याची पत्नी मेरुदेवी यांचा पुत्र ऋषभदेव होता. या ऋषभदेवामुळे जंबूद्वीपाला अजनाभवर्ष या नावाने ओळखले जाऊ लागले. ऋषभदेवाची पत्नी ही इंद्रकन्या जयंती होती व त्यांना भरत नावाचा मुलगा होता. हा जडभरत या नावाने ज्ञात आहे. त्या ऋषभपुत्र भरतामुळे अजनाभवर्ष नावाचा देश भारत या नावाने प्रसिद्ध झाला.
सिंधू नदीचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द आला. त्यामुळे हे स्थान हिंदुस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी दंतकथा आहे.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी देशाची नवी राज्यघटना अंमलात आल्यानंतर देशाचे नाव अधिकृतपणे 'भारत' अर्थात इंडिया (इंग्रजी: India) असे झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात भारताचे संविधान निर्माण झाले होते.
इतिहास
इवलेसे|right|150px|महाभारत काळातील भारतवर्षाचा नकाशा
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारताच्या मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुन्या पुराव्यांपैकी आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू सिंधू संस्कृतीमध्ये. रूपांतर झाले. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. मोहेंजोदडो व हरप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदिक काळ सूरू झालाडिस्कव्हरी ऑफ इंडिया-ले. पंडित जवाहरलाल नेहरु. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.
उत्तरं यत्समुद्रस्य
हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद्भारतं नाम
भारती यत्र सन्ततिः ।।
म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत.
thumb|left|अजिंठा-वेरूळची लेणी येथील भित्तीचित्रे
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर भारतात बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. चंद्रगुप्त मौर्याने मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा सम्राट अशोकाने कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपात पुनर्बांधणी झाली. साहित्य, गणित, शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."
प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन भारताबद्दल लिहीतात,
"India is the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the great-grandmother of tradition. Our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only."
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील चोल साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य, महाराष्ट्रातील सातवाहन, या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. अजिंठा-वेरूळची लेणी, वेरुळ, हंपीचे प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली चोल साम्राज्याचा विस्तार आग्नेय आशियातील इंडोनेशिया या देशापर्यंत पोहोचला होता.
११ व्या शतकात इराणमधील मोहम्मद बिन कासीम ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारताच्या मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली. भारताच्या अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. गझनी येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात. दिल्ली सल्तनत ते मोगलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील मुघल राजवट सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली ज्याला त्यांनी स्वराज्य असे नाव दिले , ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्नस्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. इंग्लिश लोक, पोर्तुगीज, फ्रेंच, डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सदेगीरी, फुटीचे राजकारण करून हळूहळू भारताच्या सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. बंगालपासून सुरुवात करत, म्हैसूरचा टिपू सुलतान, १८१८ मध्ये मराठा साम्राज्य, १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली घेतले. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार ब्रिटीश सरकारकडे गेला.
अल्ट=बाळ गंगाधर टिळक|इवलेसे|बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. १९२० मधे टिळकांच्या मृत्युनंतर महात्मा गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अनेक चळवळी केल्या. सरते शेवटी १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली. जम्मू आणि काश्मिर व ईशान्येकडील राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरीबीमुळे ग्रामिण भागात सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारताच्या दहशतवादही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे. १९९० पासून भारताच्या विविध शहरात दहशतवादी हल्ले झाले आहेत. मागील एका दशकापासुन कट्टर धार्मिक समुदायांमधील जातीय तेढांमुळे धार्मिक दहशतवाद ही भारताच्या एक गंभीर समस्या बनली आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची जगातील सर्वात मोठे धर्मनिरपेक्ष राष्ट्र ही प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत आहे. भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९४७, १९६५, १९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली. भारत अलिप्ततावादी चळवळीच्या प्रस्थापकांपैकी एक आहे. भारताने १९७४ मधे भूमीगत अणुचाचणी केली. १९९८ मध्ये यापाठोपाठ पाच आणखी अणुस्फोट करण्यात आले,ज्याने भारतास अणुसज्ज देशांच्या यादीत नेऊन बसविले. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगिकार केल्यानंतर् झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे. खासकरून सॉफ्टवेर क्षेत्रामध्ये भारताने लक्षणिय कामगिरी केली आहे.
भूगोल
thumb|भारताचा भौगोलिक नकाशा.
भौगोलिक दृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत (हिमालय), गंगेचे खोरे, वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.
भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता. पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व नैऋत्य दिशेला सरकू लागले. साधारणपणे ५ कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ अशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व ईशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली. भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला. आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोऱ्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे. अरावली पर्वत हा जगातील सर्वांत प्राचीन पर्वतामध्ये गणला जातो. अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे. पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूरचे पठार इत्यादी भूभाग येतो. दख्खनच्या पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत. दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालामुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ फॉर्मेशन आहेत. दगडांचे काही नमुने १०० कोटी वर्षांपेक्षाही अधिक आहे.
भारताला एकूण कि.मी. इतका समुद्रकिनारा लाभला आहे. त्यातील कि.मी. इतका द्वीपकल्पीय भारतात आहे तर उर्वरित द्वीपसमूहांमध्ये समाविष्ट आहे. भारतीय नौदलीय सांख्यिकीनुसार मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये ४३ टक्के वाळूचे किनारे आहे, ११ टक्के खडकाळ तर उर्वरित ४६ टक्के दलदलींनी भरलेला आहे.
बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाउन मिळतात. गंगेच्या मुख्य उपनद्यांमध्ये यमुना, कोसी, गंडक नदी इत्यादी आहेत. हिमालयातून जेव्हा सपाट प्रदेशात वाहू लागतात तेव्हा या नद्या मोठा पूर येण्याची शक्यता असते. दख्खनच्या पठारावरील मह्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी , कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी महत्त्वाच्या नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात. मध्य भारतातून नर्मदा सर्वांत मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खाऱ्यापाण्याची दलदल आहे त्याला कच्छचे रण असे म्हणतात. गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्वीपसमूह भारताच्या अधिकारात येतात. दक्षिण अरबी समुद्रातील लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरातील म्यानमार व इंडोनेशियाजवळील अंदमान व निकोबार द्वीपसमूह हे दोन द्वीपसमूह आहेत.
भारतीय हवामान हिमालय व थारचे वाळवंटाने प्रभावित आहे. हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखून धरतो तर थारचे वाळवंट आणि हिमालय हे दोघेही भारतात मोसमी पाऊस पडण्यास जवाबदार आहेत. थारचे वाळवंट दक्षिणेकडील हिंदी महासागरातून बाष्प आकर्षित करते, या प्रभावामुळे मोसमी वारे वाहतात. जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण भारतभर पाउस पडतो तर इतर वेळ कोरडे हवामान असते. हिमालय कोरडे थंड वारे रोखून धरतो त्यामुळे भारताचे हवामान वर्षभर उष्ण असते. अगदी कडक हिवाळ्याच्या महिन्यातही दिवसाचे सरासरी तापमान सुसह्य असते. ढोबळमानाने चार विविध प्रकारचे हवामान भारतात आढळून येतात विषवृतीय आर्द्र हवामान, विषुववृत्तीय शुष्क हवामान, समविषुववृतीय आर्द्र हवामान व हिमालयीन प्रकारचे हवामान.
चतुःसीमा
भारतीय द्वीपकल्प अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेला आहे. हिंदी महासागरात तमिळनाडूच्या जवळ श्रीलंका हा शेजारी देश आहे. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा पर्यंत घोड्यांच्या नाल्याच्या आकारात बांगलादेशास वेढलेले आहे. पूर्वेस म्यानमार आहे तर पूर्वोत्तर राज्यांच्या सीमा चीनला भीडल्या आहे. सिक्कीम व अरुणाचल प्रदेश यंच्यामधील प्रदेशात भूतान हा देश आहे. सिक्कीम व उत्तरांचल ह्या राज्यांच्या मध्ये नेपाळची सीमा उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांना लागते. उत्तरांचल पासून पुन्हा उत्तरेकडे लद्दाख पर्यंत चीनची सीमा आहे. काश्मीर मधील सियाचीन हिमनदीपासून ते गुजरात राज्यातील कच्छच्या रणापर्यंत पश्चिमेकडे पाकिस्तानची सीमा आहे.
राजकीय विभाग
प्रशासनाच्या सोयीकरता राजकीयदृष्ट्या भारताचे २८ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश असे विभाग पाडण्यात आले आहेत.सर्व राज्ये आणि दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर ह्या केंद्रशासित प्रदेशांत निर्वाचित सरकारे आहेत; तर इतर केंद्रशासित प्रदेशांत केंद्र शासननियुक्त प्रशासनाद्वारे राज्यकारभार चालतो.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नकाशा (संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या लेखावर जाण्यासाठी नकाशावर टिचकी मारा) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश:
अरुणाचल प्रदेश
आसाम
आंध्रप्रदेश
उत्तरप्रदेश
उत्तराखंड
ओडिशा
कर्नाटक
केरळ
गुजरात
गोवा
छत्तीसगढ
झारखंड
तमिळनाडू
तेलंगण
त्रिपुरा
नागालॅंड
पश्चिम बंगाल
पंजाब
बिहार
मणिपूर
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
मिझोरम
मेघालय
राजस्थान
सिक्कीम
हरियाणा
हिमाचल प्रदेश
केंद्रशासित प्रदेश
जम्मू आणि काश्मीर
लडाख
अंदमान आणि निकोबार
चंदीगढ
दमण आणि दीव
दादरा आणि नगर हवेली
दिल्ली
पुद्दुचेरी
लक्षद्वीप
मोठी शहरे
नवी दिल्ली
मुंबई (पूर्वीचे बाॅम्बे)
कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता)
चेन्नई (पूर्वीचे मद्रास)
हैद्राबाद
कोचीन
बंगळुरू
मैसुरू
अमृतसर
कानपूर
अहमदाबाद
पुणे (पूर्वीचे पूना)
नागपूर
चंदीगढ
ठाणे
सुरत
अमरावती (पूर्वीची इंद्रपूरी)
नांदेड (पूर्वीचा नंदिग्राम)
लोकजीवन व समाजव्यवस्था
भारताच्या धर्म
भारतात ६ प्रमुख धर्म आहेत (सर्व आकडे अंदाजे):
१) हिंदू धर्म – ७५-७९%;
२) इस्लाम – १४%;
३) बौद्ध धर्म – ६%;
४) ख्रिश्चन धर्म – २.५%;
५) शिख – २%;
६) जैन – ०.५%.
वरील धर्मांपैकी बौद्ध धर्म, जैन धर्म, शीख धर्म आणि हिंदू धर्म या ४ धर्मांचा उगम भारतात झाला.
शिक्षण
भारताच्या सध्याची शिक्षणपद्धती ही बहुतांशी ब्रिटिश व पाश्चात्य पद्धतीवरून आधारित आहे. पारंपारिक गुरूकूल शिक्षणपद्धती कालौघात लुप्त पावली आहे. काही शिक्षणतज्ञ अजूनही गुरूकूल शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करतात. बहुतेक राज्यांत शालेय शिक्षण १२वी पर्यंत असते तर काही राज्यात १०वी पर्यंत असते. शालेय शिक्षणानंतर विद्यार्थी शास्त्र, वाणिज्य अथवा कला यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेऊ शकतात अथवा पदविका शिक्षण घेऊ शकतात. पदवीसाठी विद्यापीठाशी संलग्न शिक्षणसंस्थांमध्ये महाविद्यालयांमध्ये घेणे गरजेचे असते. पदवी शिक्षण अभ्यासक्रमानुसार ३ ते ५ वर्षाचे असते.
दक्षिणेकडील महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमध्ये शैक्षणिक सोयी उत्तरेकडील राज्यांपेक्षा जास्त आहेत. काही ठिकाणी इच्छुक विद्यार्थ्यांपेक्षा उपलब्ध जागा जास्त असतात. भारत सर्वाधिक अभियंते तयार करणारा देश म्हणून आज ओळखला जातो. भारतात पदवी शिक्षणाच्या सोयींवर बऱ्यापैकी सोयी व उपलब्धता यांचे प्रमाण जमलेले आहे. परंतु शालेय शिक्षणावर स्तरावर अजूनही सरकार झगडत आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांची होणारी गळती हा ग्रामीण तसेच शहरी भागातील एक मोठा प्रश्न आहे. तसेच पदवी शिक्षणात विविध जाती जमातींबद्दलच्या आरक्षणाच्या प्रमाणाबद्दलही अनेक प्रश्न आहेत. सततच्या वाढत्या आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या संधी कमी होउन अन्याय होत असल्याची भावनाही प्रबळ आहे, त्यामुळे या संदर्भात गेल्या काही वर्षात अनेक वेळा सरकार व विद्यार्थी यांच्यात हिंसाचार घडला आहे. परंतु आरक्षणामुळेच भारताच्या शैक्षणिक क्रांती घडल्याचे अनेकांचे मत आहे.
विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर शिक्षणही मिळू शकते त्यासाठी संलग्न क्षेत्रामध्ये पदवी असणे गरजेचे आहे. परदेशातील पदव्युत्तर शिक्षणाबद्दल आकर्षण व सोयी गेल्या काही वर्षात वाढल्याने भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यात कल वाढला आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व जर्मनी या देशांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यास भारतीय विद्यार्थ्यांची पसंती असते. काही भारतीय विद्यापीठे परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्यात यशस्वी झाली आहेत. आफ्रिका व आशियातील अनेक देशातील विद्यार्थी स्वस्त व दर्जेदार शिक्षणाच्या शोधात भारतात येतात.
संस्कृती
thumb|आग्रा येथील ताजमहाल.
thumb | सुवर्ण मंदिर
भारतीय संस्कृती ही हडप्पा संस्कृती, नागर संस्कृती, सिंधू संस्कृती आहे.
भारतीय स्थापत्य
भारतीय स्थापत्य हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. मोहेंजोदारोचे शहरी स्थापत्य हे प्राचीनकाळातील नगर रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्राचीन मंदिरे काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी, प्राचीन लेण्यांमधील कोरीव काम तत्कालीन स्थापत्यामधील बारकावे दर्शवतात. अजिंठा येथील बौद्ध लेणी आणि हिंदु लेणी, वेरूळ येथील हिंदू, बौद्ध व जैन लेणी तत्कालीन सर्वधर्मसमभावाचे उदाहरण आहे. खजुराहो येथील मंदिरांवरील प्रणयक्रीडारत मूर्ती तत्कालीन कलेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एक उदाहरण आहे. दक्षिणेमधील अजस्त्र मंदिरे, हंपी बदामी येथील ओसाड शहरे, हळेबीड व वेलूर येथील मंदिरे दक्षिण भारतीय स्थापत्यांची उदाहरणे आहेत.
इस्लामी आक्रमणाबरोबर इस्लामी राज्यकर्त्यांनी मध्य अशियाई, पर्शियन शैली देखील भारतात आणली व काळाच्या ओघात येथील जुन्या शैलीबरोबर सरमिसळून गेली. ताजमहाल व इतर मुघल स्थापत्ये आज भारताची ओळख बनली आहेत. ताजमहाल आज नव्या युगातील ७ आश्चर्यांमध्ये गणला जातो.
आधुनिक काळात स्थापत्यशास्त्रातील प्रगतीनुसार भारतीयांनी अनेक ठिकाणी स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने सादर केले आहेत, अक्षरधामची मंदिरे हे आधुनिक व पौराणिक स्थापत्याचे उदाहरण आहे.
लाल किल्ला
इवलेसे|उजवे|250px|लाल किल्ला
लाल किल्ला (इंग्रजी: The Red Fort हिंदी – लाल क़िला ) दिल्लीतील मुघलकालीन किल्ला आहे. याचे नाव त्यात वापरलेल्या लाल संगमरवरी दगडावरून दिलेले आहे. हा किल्ला यमुना नदीच्या किनारी आहे. मोगल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला. लाल किल्ला हा सुद्धा भव्य राजवाडयापैकी एक आहे. भारताच्या इतिहासाशी हा किल्ल्याचे खुपच संबध आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंनी याच किल्ल्यावरून भारत स्वंतत्र झाल्याची घोषणा केली होती. लाल किल्ल्याची बांधणी मुघल सम्राट शाहजहान यांनी केली. मुघल सम्राट शाहजहानने हा किल्ला इ. स. १६३८ला बांधून घेण्यास सुरू केले व तो इ. स. १६४८ मध्ये पूर्ण झाला.
राष्ट्रपती भवन
राष्ट्रपती भवन हे भारत देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. ३४० खोल्या असलेली ही इमारत १९२९ साली बांधली गेली.ही एक ब्रिटिशकालीन इमारत आहे.Rashtrapati Bhavan of India
सचिवालय इमारत, दिल्ली
सचिवालय इमारत रायसीना टेकडी , नवी दिल्ली , भारत.
इंडिया गेट
इवलेसे|इंडिया गेट दिल्ली
इंडिया गेट हे भारताचे एक राष्ट्रीय स्मारक आहे. ते दिल्ली येथे स्थित असून त्याची रचना सर एडविन लुटयेन्स यांनी केली होती. या स्मारकाची प्रेरणा पॅरीस येथील आर्क दे ट्रायम्फे (फ्रेंच: Arc de Triomphe) या स्मारकावरून घेण्यात आली होती, जे स्वतः रोमन साम्राज्यातील आर्क ऑफ टायटस (इंग्रजी: Arch of Titus) या स्मारकावरून बनविले आहे. इंडिया गेट इ.स. १९३१ साली बांधले गेले. सुरुवातीला ते ऑल इंडिया वॉर मेमोरिअल (इंग्रजी: All India War Memorial) या नावाने ओळखले जात असे. पहिल्या महायुद्धात व तिसरे ॲंग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या ९०,००० ब्रिटिश इंडियन आर्मीमधील सैनिकांसाठी हे स्मारक बनविले गेले होते. ते लाल आणि फिक्या ग्रॅनाइट दगडांपासून बनविले आहे. सुरुवातीला ब्रिटिश राजा पाचवा जॉर्ज याचा पुतळा इंडिया गेटसमोरील मंडपात उभा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तो पुतळा व इतर अनेक ब्रिटिशकालीन पुतळे कोरोनेशन पार्क येथे हलविण्यात आले. सध्या भारतीय सैन्यदलातील शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती इंडिया गेट येथे आहे.
गेटवे ऑफ इंडिया
इवलेसे|गेटवे ऑफ इंडिया,मुंबई.
गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या (आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे. भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.
संसद भवन
भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. १९१२–१३ साली ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
मरीन ड्राइव्ह
मरीन ड्राइव्ह मुंबई मध्ये १९२० मध्ये बांधले गेले. त्याला क्वीन’स नेकलेस असेही म्हटले जाते.
वांद्रे – वरळी सागरीसेतू
thumb|right|300px| वांद्रे वरळी समुद्रसेतू
भारतीय संगीत
भारतीय संगीत हे मुख्यत्वे दोन प्रकारात गणले जाते. भारतीय शास्त्रीय संगीत व लोकसंगीत. दोन्ही प्रकारात विविध उपप्रकार असून प्रत्येक उपप्रकाराची शैली आहे. या विविध शैलींचीच विविध घराणी असून प्रत्येक घराण्याने आपापला वेगळेपणा व ठसा भारतीय संगीतावर उमटवला आहे.
नृत्य
इवलेसे|उजवे|200px|बिहु नृत्य
भारतात वेगवेगळे शास्त्रीय व लोकनृत्याचे प्रकार आहेत. भांगडा नृत्य (पंजाब), बिहु नृत्य (आसाम), छाऊ (पश्चिम बंगाल), संबळपुरी (ओडिशा), घूमर (राजस्थान), लावणी (महाराष्ट्र) हे काही लोकनृत्याचे प्रसिद्ध प्रकार आहेत. तसेच आठ नृत्यप्रकारांना नॅशनल अॅकॅडॅमी ऑफ म्युझिक, डान्स ॲण्ड ड्रामातर्फे शास्त्रिय नृत्यप्रकाराचा दर्जा दिला आहे. ते भरतनाट्यम् (तमिळनाडू), कथ्थक (उत्तर प्रदेश), कथकल्ली, मोहिनीअट्टम् (केरळ), कुचिपुडी (आंध्र प्रदेश), मणिपुरी (मणिपुर), ओडिसी (ओडिशा) व सत्रीया
(आसाम) आहेत.
रंगमंच
भारतात पर रंगमंचाची परिकल्पना अतिशय पुरातन असून संस्कृत साहित्यात त्यांची नोंद आहे. गुप्त कालीन अनेक नाटके आजही प्रसिद्ध आहेत. नृत्य, संगीत व त्यांची संवादातील लयबद्धता हे भारतीय रंगमंचाचे खास वैशिष्ट्ये आहे. प्राचीन काळातील अनेक नाटके हिंदू पुराणांवर आधारित आहेत. स्थानिक नाटके देखील लोकप्रिय आहेत. गुजराथमधील भावई, बंगालमधील जत्रा, उत्तर भारताच्या नौटंकी व रामलिला तसेच महाराष्ट्रातील तमाशा, तमिळनाडूतील तेरुकूट्टू व कर्नाटकातील यक्षगण ही स्थानिक पारंपरिक रंगामंचाची उदाहरणे आहेत. आधुनिक काळात रंगमंचामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्रातील नाटके त्याचे सुरेख उदाहरण आहे. या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचे तसेच कलेचे, अभिनयाचे सादरीकरण विविध विषयातून सादर केले जाते.
चित्रपट
भारताच्या चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे. धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ॲक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगू व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिकांपेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत, परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला शोले हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये लगान या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली 'स्लमडॉग मिलयोनेर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
भारतीय साहित्य
इवलेसे|उजवे|200px|रविंद्रनाथ टागोर
भारतीय साहित्य हे अतिशय पुरातन आहे. प्राचीन भारतीय साहित्य हे प्रामुख्याने संस्कृत व पाली बौद्ध साहित्य आहे. वैदिक कालात वेदांची निर्मिती झाली. वेद हे जगातील सर्वांत पुरातन ग्रंथ असल्याची मान्यता आहे. प्रामुख्याने संस्कृत साहित्य हे केवळ पठण होत असत व दुसऱ्या पिढीला पठणाद्वारेच सूपूर्त होत. भूर्जपत्रांवर व इतर माध्यमांवर लिहण्याची कला विकसित झाल्यावर साहित्य लिखित स्वरूपात तयार झाले. वेदांसोबत रामायण, महाभारत हे प्राचीन भारतीय साहित्याचे परमोच्च उदाहरण आहे. इतर महत्त्वाच्या साहित्य शृखलांमध्ये पुराणे, शृती व स्मृतींचा समावेश आहे. वैदिक साहित्या सोबत, जैन धर्मीय व बौद्ध धर्मीय साहित्यही प्राचीन भारतीय साहित्यांचे नमुने आहेत. गुप्त कालीन सुवर्णयुगात विविध नाटके लिहीली गेली. १० व्या शतकानंतर विविध प्रातांमध्ये साहित्य तयार झाले. संत ज्ञानेश्वर लिखित भावार्थ दीपीका, नामदेवाच्या ओव्या, एकनाथांची भारुडे, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, अभंग गाथा आदि लिहुन सामाजिक क्रान्ति घडवली. तुकारामांच्या साहित्याने महाराष्ट्रात सामाजिक चळवळ आणली. तमिळ भाषेचे साहित्य हे संस्कृत भाषेखालोखाल पुरातन मानले जाते. इंग्रजांच्या आगमनाबरोबर इंग्रजी भाषेतही भारतीयांनी साहित्यात आपली चूणूक दाखवली. सुरुवातीच्या लेखकांनी याचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी पुरेपूर करून घेतला. रविंद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.
उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी भारतात ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो.
आहार
इवलेसे|भारतीय आहार
भारतीय पाककला ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. भारतात प्रांतानुसार आहाराच्या सवयी बदललेल्या दिसतात. उत्तर भारतात आहारात गव्हाच्या पदार्थांचा समावेश असतो तर दक्षिण व पूर्वेकडे आहारात तांदळाच्या पदार्थांचा जास्त वापर आहे. मध्य भारतात संमिश्र प्रकारचा आहार असतो. प्रत्येक प्रांतातील हवामान पावसाचे प्रमाण बदलत असल्याने तेथे पिकणाऱ्या फळभाज्या, फळे, कडधान्ये यात फरक पडतो त्यामुळे प्रांतवार आहारात मोठ्या प्रमाणात विविधता दिसून येते.Delphine, Roger, "The History and Culture of Food in Asia", in मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावरील वापर भारतीय आहारातील सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. तिखट, मिरी, लवंग, दालचिनी व इतर अनेक पदार्थ वापरून गरम मसाला, गोडा मसाला, इ. मसाले तयार केले जातात., या विविध प्रकारच्या मसाल्यांचे मिश्रण करून अजून वेगवेगळे मसाले तयार करण्यात येतात. मसाल्यांसोबत विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग चव वृद्धींगत करण्यासाठी केला जातो. मसालेदार आहारासोबत विविध प्रकारच्या मिठाया व गोड पदार्थ आहाराला परिपूर्ण बनवतात. भारतीय जेवणात प्रामुख्याने शाकाहाराचा जास्त वापर होतो. विविध प्रकारच्या भाज्या कडधान्ये, तांदूळ व गव्हाची पोळी अथवा चपाती किंवा बाजरीची/ ज्वारीची भाकरी हे शाकाहारी जेवणात प्रामुख्याने असते. मासांहारी जेवणात कोंबडी व बोकडाचे मांस प्रामुख्याने खाल्ले जाते. किनाऱ्यालगतच्या प्रदेशात (कोकण, केरळ व पूर्व किनारपट्टी), बंगाल, आसाम या प्रांतात माशांचा जेवणात समावेश असतो. भारतीय आहार हा समतोल आहार आहे.
वेशभूषा
भारत हा उष्ण हवामानाचा देश असल्याने सुती कपड्यांचा वापर जास्त होतो. पारंपारिक वेषभूषा प्रत्येक प्रांताचे वैशिष्ट्ये आहे. तरीपण पारंपारिक वेषभूषा पुरुषांसाठी धोतर अथवा लुंगी व स्रियांसाठी साडी हे आहे. बदलत्या काळाप्रमाणे भारतीयांनी वेषभूषेतही बदल केला आहे. ग्रामीण भागात पारंपारिक वेषभूषा अजूनही प्रचलित असली तरी शहरी भागात पुरुषांचा प्रामुख्याने पॅंट शर्ट हाच पोषाख आहे. स्रिया प्रामुख्याने साडी अथवा सलवार कमीझ पसंत करतात. गेल्या काही वर्षात शहरी भागात जीन्स व टॉप हा किशोरवयीन मुलींत पसंतीचा प्रकार आहे.
इवलेसे|दिवाळीतील फटाक्यांची आतिषबाजी
सणवार व इतर सार्वजनिक सोहळे
भारतीय लोक हे अतिशय उत्सवप्रिय आहेत. एक भारतीय मुख्य सण म्हणजे दिवाळी होय. प्रत्येक प्रांतात सण हे कमी अधिक प्रमाणात साजरा करतात. तसेच प्रत्येक प्रांताचे खास सण आहेत. बौद्ध धर्मीयांचे आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे तीन मुख्य सण आहेत. भारताच्या बहुतांशी सण हे धार्मिक आहेत. इतर मुख्य सणांमध्ये मकरसंक्रांत, होळी, पोंगल, गणेश चतुर्थी, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा, ओणम हे मह्त्वाचे सण आहेत. ख्रिश्चन व इस्लाम धर्मीय पण नाताळ व ईदचे सण साजरा करतात.
वरील नमूद केलेल्या धार्मिक सणांसोबतच १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिवस, २६ जानेवारी गणतंत्र दिवस व गांधी जयंती तसेच शिवजयंती हे सण साजरे करतात.
राज्यतंत्र
भारतीय राज्यघटनेनुसार भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभा व राज्यसभेतील सभासदांना खासदार असे म्हणतात. लोकसभेतील खासदार हे निवडणुकीतून निवडले जातात. लोकसभेत एकूण ५४५ खासदार आहेत. राज्यसभेतील खासदार विशिष्ट मतदारसंघांतून निवडले जातात. हे सहसा विविध क्षेत्रातील मान्यवर असतात. कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, सहकार, सामाजिक संस्था अश्या ठिकाणी काम करत असणाऱ्यांना या राज्यसभेत खासदारकी मिळते. राष्ट्रपती घटनात्मक दृष्ट्या भारतीय शासनातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही लोकसभा, राज्यसभा व विविध राज्यातील आमदारांच्या मतदानाप्रमाणे होते. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सर्वाधिक खासदार असणाऱ्या पक्षास राष्ट्रपती सरकार स्थापण्यास निमंत्रण देतात. या पक्षास संसदेत आपले बहुमत सिद्ध करावे लागते. बहुमतासाठी ५० टक्यापेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने वर्चस्व राखले असून सर्वाधिक वेळा सरकार स्थापन केले आहे. १९८४ च्या निवडणूकीनंतर कोणत्याही पक्षास ५० टक्क्यांचा आकडा पार करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे विविध पक्षांशी युती करून सरकार स्थापनेचा पायंडा पडला आहे. सरकार स्थापन केलेला पक्ष पंतप्रधान निवडतात व पंतप्रधान मंत्रीमंडळ निवडतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. नरेंद्र मोदी सध्याचे पंतप्रधान आहेत. राष्ट्रपती हे सर्वोच्च पद असले तरी घटनेत पंतप्रधान हे सर्वाधिक जवाबदारीचे पद आहे. मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री अशी विभागणी असते. विविध खात्यांचे मंत्री आपपल्या खात्याचा कारभार बघतात. सर्व मंत्री पंतप्रधानांच्या अखत्यारीत येतात. गृह, संरक्षण, रेल्वे, अर्थ, कृषी अशी काही विविध मंत्रालये आहेत. नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून संसदही तेथेच आहे.
भारताच्या राज्यांची रचना भाषावार झालेली आहे. प्रत्येक राज्यात विधानसभा अस्तित्वात आहे. विधानसभेच्या सभासदांना आमदार असे म्हणतात. प्रत्येक राज्यातील आमदारांची संख्या त्या राज्याच्या आकारमान व लोकसंख्येवर अवलंबून असते. महाराष्ट्र, तमिळनाडू या सारख्या मोठ्या राज्यांत विधान परिषद ही असते. राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च नागरिक तर मुख्यमंत्री हे अधिकारीक दृष्ट्या प्रमुख असतात. प्रत्येक राज्याला काही प्रमाणात स्वायत्त अधिकार आहेत उदा: करप्रणाली, आर्थिक धोरणे, शैक्षणिक धोरण इत्यादी.
जैववैविध्य
भारत हा जगातील सर्वाधिक जैववैविध्यपूर्ण देशात मोडतो. भारतात प्राणी पक्षी व वनस्पतींमध्ये कमालीचे वैविध्य आहे. भारतात जगात आढळणारे सस्तन प्राणी पैकी ७.६ टक्के, पक्ष्यापैकी १२.६ टक्के, सरपटणारे प्राण्यांपैकी ६.२ टक्के, भू-जलचर प्रजाती ४.४ टक्के, ११.७ टक्के माश्यांच्या प्रजाती व ६ टक्के वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. भारताच्या अनेक प्रदेशात जैववैविध्यात स्थानिक प्रजातींची संख्या लाक्षणिक आहे. भारतीय वनस्पतींतील एकूण ३३ टक्के प्रजाती स्थानिक आहेत.Botanical Survey of India. 1983. Flora and Vegetation of India — An Outline. Botanical Survey of India, Howrah. p. 24.Valmik Thapar, Land of the Tiger: A Natural History of the Indian Subcontinent, 1997. ISBN 978-0-520-21470-5 पर्जन्याच्या प्रमाणात असलेली मोठ्या प्रमाणातील विषमतेमुळे भारतात विविध प्रकारची वने आहेत. अंदमान निकोबार, सह्याद्रीतील तसेच ईशान्येकडील राज्यांमध्ये आद्र विषववृतीय वने आहेत तसेच हिमालयात सूचीपर्णी वृक्षांचे देखील जंगल आहे. या दोन टोकांमध्ये मध्य भारतात साल वृक्षाची आद्र पानगळी प्रकारची जंगले आहेत तसेच बहुसंख्य साग वृक्ष असलेले शुष्क पानगळी जंगले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक व राजस्थान मधील अतिशुष्क प्रदेशात बाभूळ सारख्या काटेरी वनस्पतींची जंगले आहेत.Tritsch, M.E. 2001. Wildlife of India Harper Collins, London. 192 pages. ISBN 0-00-711062-6
भारतात आढरणाऱ्य अनेक प्रजाती स्थानिक असून पूर्वीच्या गोंडवन या महाखंडातून आलेल्या आहेत. भारतीय पृष्ठाचे युरेशिय पृष्ठाशी टक्कर झाल्यानंतर भारतात इतर प्रजातींचा शिरकाव झाला. दख्खनच्या पठारावरील प्रंचड ज्वालामुखीच्या हालचाली तसेच २ कोटी वर्षांपूर्वीचे हवामानातील बदल यामुळे मूळच्या बहुतांशी प्रजाती नामशेष पावल्या.K. Praveen Karanth. (2006). Out-of-India Gondwanan origin of some tropical Asian biota भारतात आलेल्या सस्तन प्राण्यांच्या जाती ह्या बहुतांशी हिमालयाच्या पूर्व व पश्चिम कोपऱ्यातून आल्या. उदा वाघ हा भारतात म्यानमार कडून आला असे मानण्यात येते तर सिंह हा इराणच्या मार्गाने आला. म्हणूनच भारताच्या सस्तन प्राण्यात केवळ १२.६ टक्के तर पक्ष्यांमध्ये केवळ ४.५ टक्के प्रजाती स्थानिक आहेत व सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये ४५.८ टक्के तर उभयचर प्राण्यांमध्ये ५५.८ टक्के स्थानिक् आहेत. निलगीरी वानर हे भारताच्या स्थानिक् प्रजातीचे खास उदाहरण आहे. भारतात एकूण पक्ष्यांच्या १२०८ प्रजाती तर सस्तन प्राण्यांच्या ४५० प्रजाती आढळतात.द बुक ऑफ इंडियन बर्डस- ले. सलीम अली. भारतात अनेक IUCN ने निर्देशित केलेल्या अनेक प्रजाती आहेत.Groombridge, B. (ed). 1993. The 1994 IUCN Red List of Threatened Animals IUCN, Gland, स्वित्झर्लंड and Cambridge, UK. lvi + 286 pp. यात वाघ, अशियाई सिंह, पांढऱ्या पाठीचे गिधाड यांचा समावेश होतो. पांढऱ्या पाठीच्या गिधाड ज्यांची १०–१५ वर्षांपुर्वी संख्या चांगली होती ते आज जनावरांना देण्यात येणारे जे डिफ्लोमेनियॅक या औषधामुळे जवळपास नामशेष होत आले आहेत.
भारतात सस्तन प्राण्यांम्ध्येही कमालीची वैविध्यता आहे. मार्जार कुळातील सर्वाधिक प्रजाती भारतात आढळतात. भारत हा एकच देश आहे ज्यात वाघ व सिंह व बिबट्या सारख्या मोठ्या प्रजाती अस्तित्वात आहेत. तसेच केवळ भारतातच हरिणांच्या सारंग व कुरंग प्रजाती पहावयास मिळतात.आपली सृष्टी आपले धन- भाग ४ सस्तन प्राणी ले. मिलिंद वाटवे गेल्या काही वर्षात मानवी अतिक्रमणामुळे भारतीय वन्यसंपदा धोक्यात आली आहे, बहुमुल्य वन्यसंपदेचे संवर्धन व्हावे यासाठी अनेक राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. बेसुमार शिकारींनी १९७० पर्यंत वाघांचे अस्तित्व संपुष्टात आले होते. १९७२ मध्ये वन्यजीव कायदा मंजूर करण्यात आला व वाघांसह अनेक जीवांना कायद्याने संरक्षण मिळाले. बहुतांशी वन्यजीवांच्या शिकारींवर प्रतिबंध आणले. तसेच अनेक व्याघ्रप्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
अलांछित (untouched ecosystems) नैसर्गिक ठिकाणे अजूनही भारतात अस्तित्वात आहेत. अशी ठिकाणी जशीच्या तशी रहावीत यासाठी यांना बायोस्फेअर रिझर्व म्हणून घोषित केले आहेत्. भारतात सध्या १८moef.nic.in/report/1112/AR-11-12-En.pdf page no 45 बायोस्फेअर रिझर्व घोषित आहेत.
अर्थव्यवस्था
भारताची अर्थव्यवस्था जगातील १२व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती. परंतु अलिकडच्या काळात भारताने औद्योगिक क्षेत्रातही बरीच आघाडी मारलेली आहे. भारतात काम करणाऱ्या लोकांपैकी दोन-तृतियांश लोकांचा उदरनिर्वाह अजूनही शेती अथवा शेतीशी संबंधित उद्योगांवर चालतो, परंतु अर्थव्यवस्थेत विविध प्रकारच्या सेवांचाही वाढता वाटा आहे आणि अलिकडे सेवांवर आधारित व्यवसायही अर्थव्यवस्थेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.भारताच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये सध्या १७ % वाटा शेतीचा आहे, २८ % वाटा उद्योगांचा आहे, तर ५५ % वाटा सेवांचा आहे.
सध्या भारताची अर्थव्यवस्था जगातिल तिन क्रमावारीत तिसऱ्या स्थानी आहे
पुस्तके
भारताच्या भूगोलाचा अतुलनीय इतिहास (मूळ इंग्रजी लेखक – संजीव सान्याल; मराठी अनुवाद – सायली गोडसे).
महाराष्ट्राचा भूगोल - ए.बी. सवदी
हे सुद्धा पहा
भारताचा इतिहास
भारताच्या सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
वर्ग:आशियातील देश
वर्ग:दक्षिण आशियातील देश
वर्ग:जी-२० सदस्य देश |
पक्षीशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/पक्षीशास्त्र | पक्षीशास्त्र ही जीवशास्त्राची एक शाखा आहे.
भारतामध्ये डॉ. सलीम अली हे या मधील अध्यगुरू म्हणून संबोधले जातात, त्याचप्रमाणे श्री. मारुती चित्तमपल्ली यांची अनेक पुस्तके या बाबत विवेचन करतात.
नव्या पिढीत सचिन मेन हे नाव प्रचलित आहे त्यांचे पक्षिजगत हे पुस्तक प्रकाशित आहे.
वर्ग:पक्षीशास्त्र |
नृत्य | https://mr.wikipedia.org/wiki/नृत्य | नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.
फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहे व ते सफल सुद्धा झालेल आहे.
पार्श्वभूमी
भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.
नृत्यात कारकीर्द करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.
रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।
भारतीय नृत्यशैली
नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.आठ शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् सत्रिया आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत, तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.
भरतनाट्यम
ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
यात कर्नाटक संगीत असते.
एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघेही नाचू शकतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
संस्कृत, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
वाद्य- मृदंग, घटम, खंजिरा, मोरसिंग, बासरी, व्हायोलीन, तालम आणि वीणा.
दैवत- शिव,विष्णू, मुरुगन, गणेश, देवी.
ग्रंथ- नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण.
रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम
कथक
उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
मोगल संस्कृतीचा प्रभाव
हिंदुस्थानी संगीताचा वापर
एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
हिंदी, ब्रिज, भोजपुरी,उ र्दू भाषांमध्ये रचना असतात.
वाद्य - बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी.
दैवत- कृष्ण, शिव.
ग्रंथ - नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष.
कथकली
केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
कर्नाटक सोपनम संगीत
समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
भाषा -मल्याळम, संस्कृत
वाद्य - चेंगला, मद्दल, चेंडा, एल्लतालम
दैवत - रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटके
ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
रचना - श्लोक, पदम, कलाझीम
मणिपुरी नृत्य
मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली.
वैष्णव संप्रदायाचा प्रभाव.
समूह शैली
भाषा -मणिपुरी
वाद्य - ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग
दैवत- कृष्ण
ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
रचना - रासलीला
भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार
अरुणाचल प्रदेश -बार्दो छम
आंध्र प्रदेश -कुचिपुडी, कोल्लतम
आसाम -बिहु नृत्य, जुमर नाच
उत्तर प्रदेश -कथक, चरकुला
उत्तराखंड -गढवाली
उत्तरांचल -पांडव नृत्य
ओरिसा -ओडिसी नृत्य, छऊ नृत्य
कर्नाटक -यक्षगान, हत्तारी
केरळ -कथकली
गुजरात -गरबा, दांडिया रास
गोवा -मंडो
छत्तीसगढ -पंथी
जम्मू आणि काश्मीर -रौफ
झारखंड -कर्मा, छाऊ
मणिपूर -मणिपुरी नृत्य
मध्य प्रदेश -कर्मा, चरकुला
महाराष्ट्र -लावणी
मिझोरम -खान्तुम
मेघालय -लाहो
तामिळनाडू -भरतनाट्यम
पंजाब -भांगडा, गिद्धाह(गिद्दा)
पश्चिम बंगाल -गंभीरा, छऊ नृत्य
बिहार -छऊ नृत्य
राजस्थान -घुमर नृत्य
नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने
नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजऱ्यांची व दागिन्यांची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही दुकाने:-
आभूषा (टिळक रोडजवळील विजयनगर कॉलनी-पुणे, संचालक - सई परांजपे) : स्थापना २९ एप्रिल, २००८. या दुकानात मंचाच्या सुशोभनाचे साहित्य, गाताना मांडीवर घ्यायच्या शाली, झब्बे यांपासून सर्व नृत्य-संगीत वस्त्रसामग्री मिळते.
नृत्यभूषा (धायरी-पुणे, संचालक - नीलिमा हिरवे) : या दुकानात भरतनाट्यम, कथक, ओडिसीसह सहा नृत्यशैलींशी संबंधित वस्त्रे मिळतात. त्यांत निळा, लाल, हिरवा यांसह विविध रंगांतील जवळपास १०० घागरे, मोत्याचे आणि सोन्याचे दागिने, त्यातही नेकलेस आणि डूल यांच्यासहित वेल, कंबरपट्टा, गजरे यांचा समावेश आहे.
नृत्यारंभ स्टोअर
संदर्भ
http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-109033100044_1.htm
वर्ग:नृत्य
वर्ग:कला |
जीवशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/जीवशास्त्र | जीवशास्त्र
जीवशास्त्र (जीव - प्राणी , शास्त्र - वैज्ञानिक अभ्यास) या ही विज्ञान विषयाची एक शाखा आहे.यात प्राणी, कीटक,पशू ,पक्षी यांचा अभ्यास केला जातो.
इतिहास
व्याख्या
निसर्गातील सजीवांचा अभ्यास करणारी विज्ञानाची शाखा.
यात अगदि सुक्श्म जिवापासुन ते मोठ़या जिवांचा अभ्यास केला जातो.
जैविक आणि जैविक समुदाय बऱ्याच वेळा नियमितपणे भौगोलिक ग्रॅंडियन्ट्ससह अक्षांश, उन्नयन, अलगाव आणि निवासस्थान क्षेत्रानुसार बदलतात.
फायटोग्जोग्राफी म्हणजे जीवशास्त्रातील शाखा ज्या वनस्पतींचे वितरण अभ्यास करते. प्राणीसंग्रहालय हे प्राणी आहेत जनावरांचे वितरण अभ्यास.
जीवशास्त्र या विषयात पृथ्वीवरील सर्व सजीवांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो.
प्रतिमा दालन
संदर्भ
वर्ग:जीवशास्त्र
वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा |
वि.वा. शिरवाडकर | https://mr.wikipedia.org/wiki/वि.वा._शिरवाडकर | विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदीप्यमान रत्न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. ( अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे. १ मे रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.)
कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
जीवन
कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.http://www.loksatta.com/navneet-news/marathi-articles-on-kusumagraj-1495525/ कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयातून त्यांनी आपले बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.https://m.lokmat.com/television/dr-babarasaheb-ambedkar-serial-be-seen-kalaram-temple-satyagraha-story/https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/artical-on-vashivarcha-paulkhuna/articleshow/57349100.cms १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले.
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.
लेखनशैली
सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. "साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे" या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
साहित्यविचार
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णतः लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंताच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्यव्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे. कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानतात, त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखनप्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो, हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. आविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामीलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार समाजसापेक्ष असून ते सामाजिकतेलाच परतत्त्व मानतात, विविध जातींतील लेखक लिहू लागणे यात त्यांना साहित्याची परपुष्टता, समृद्धी वाटते.२९ सप्टें. २०११ कुसुमाग्रजांचे साहित्य: राष्ट्रीय चर्चासत्र, नागपूर शोधनिबंध: प्रा. देवानंद सोनटक्केकुसुमाग्रजांचा साहित्यविचार : सामाजिक चिंतनाचा आलेख (प्रा. देवानंद सोनटक्के, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर)
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाचवेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याचा व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते "अहंकार, अनुभव आणि आविर्भाव ही साहित्याचीच नव्हे कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत.” (रूपरेषा,पृ.२३)
प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मतानुसार कलाकृतीत नावीन्य अनुभवामुळेच येते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजे कुसुमाग्रजांची नावीन्याची संकल्पना आकृतिवादी नसून आशयवादी आहे. नावीन्य व अनुभव समृद्धीसाठी लेखकाने सामीलकी आणि सामाजिकतेचा स्वीकार करावा. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाज जीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातीयता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानतात.
कुसुमाग्रज, क्रांती ही साहित्याची प्रेरणा मानतात. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते, असे मानतात. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन मानतात. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार बा. सी. मर्ढेकर आणि कुसुमावती देशपांडे यांच्या साहित्यविचारांचा संवादसेतू आहे. मर्ढेकरांच्या नंतर मराठी साहित्यात दुर्बोधता, अश्लीलता आणि लैंगिकता हीच श्रेष्ठ साहित्याची लक्षणे रूढ होत होती, त्यावर कुसुमाग्रजांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर पारंपरिक नीतिमत्ता आणि श्लीलता या कल्पनांना ढोंगी ठरवून नकार दिला आहे. नाटक मूलतः वाङमय असते, नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण असते, असे म्हणणे त्यांच्या अहंकार-आविर्भाव सुसंगत आहे. मीपणाशिवाय अहंकार आणि आविर्भाव शक्य नाहीच.
"साहित्य ही मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक समर्थ अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संस्कृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. माणसे मर्त्य असतात, पण त्यांनी उच्चारलेला वाङ्मयीन शब्द मात्र अजरामर असतो. पृथ्वीवरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच एक शक्ती अशी आहे, की जिला चिरंजीवनाचे वरदान लाभलेले आहे. शब्दाच्या या शक्तीचा उपयोग करूनच संस्कृती जगत असते, पुढे जात असते. देशादेशांतील अंतर या शब्दाने कमी होते आणि युगायुगांची साखळी या शब्दानेच जोडली जाते. या प्रभावी शक्तीचे, शब्दाचे अवतारकार्य कोणते? माणसांच्या मनावर संस्कार करणे हे एकच एक त्यांचे अवतारकार्य होय. संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव आहे. साहित्य हे शब्दाश्रित असल्यामुळे तेही वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या मनावर कोणते न कोणते संस्कार केल्याविना राहत नाही."
कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर हे कवी, नाटककार म्हणून जितके प्रसिद्ध आहेत, तितके साहित्यमीमांसक म्हणून प्रसिद्ध नाहीत. त्यांनी आपला साहित्यविचार स्वतंत्रपणे मांडला नाही. ‘रूपरेषा’ या ग्रंथात त्यांचे साहित्य-चिंतन संकलित करण्यात आले आहे. त्याच्याच आधारे कुसुमाग्रजांचा साहित्यविचार प्रस्तुत निबंधात शोधला आहे. कुसुमाग्रजांच्या कवितेत आलेला साहित्यविचारही येथे विचारात घेतलेला नाही. या शोधनिबंधात त्यांच्या काव्यविचाराचा अभ्यास व विचार स्वतंत्रपणे केलेला नाही.
कलेचे आधारभूत तत्त्व
कुसुमाग्रजांच्या या विचारात मर्ढेकरी कलाविचारातील आत्मनिष्ठा, सौंदर्य किंवा नेमाडेप्रणित लेखकाची नैतिकता, देशीयता यांपेक्षा वेगळी भूमिका दिसते. सर्व संत ज्या अहंकाराच्या विसर्जनाला महत्त्व देतात त्या अहंकाराला शिरवाडकर कलेत महत्त्वाचे मानतात. त्यांचे म्हणणे असे की, लेखकाचा अहंकार अनन्यसाधारण रूप धारण करतो तेव्हाच लेखकाला लिहावेसे वाटते. या अहंकारामुळेच स्वतःचे स्वत्व बाहेर पल्लवीत करण्याचा एक आंतरिक आग्रह त्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो. अहंकाराची ही प्रवृत्ती नुसत्या आविष्काराने नव्हे तर वर्चस्वाने समाधान पावते. हे वर्चस्व लेखकाला जवळ व दूर प्रत्यक्षात वा अप्रत्यक्षात असलेल्या वाचकांच्या संदर्भात प्राप्त होते. म्हणजे वाचकवरील वर्चस्वाच्या भावनेने कलानिर्मिती होते असे त्यांचे म्हणणे आहे.
ही प्रक्रिया रसिक, वाचक कशी स्वीकारतो? तर, वाचक शब्दांच्या माध्यमातून लेखकाच्या विश्वात प्रवेश करतो आणि स्वतःच्या जीवनाचे संन्यसन करून त्या वेळेपुरता लेखकाच्या आधीन होतो. याला Empathy म्हणजे ``अंतरानुभूती म्हणतात. वाचकाच्या दृष्टीने जी अंतरानुभूती; तेच लेखकाच्या दृष्टीने वर्चस्वाचे स्वरूप. कुसुमाग्रज म्हणतात, ”कोणत्याही कलेच्या मुळाशी असलेल्या अहंकाराच्या प्रेरणेने आपल्या अंकित होणाऱ्या मनांचे म्हणजेच माणसांचे हे अस्तित्व मूलत:च गृहीत धरलेले असते. या प्रेरणेच्या अभावी साहित्याची अथवा कोणत्याही कलेची निर्मितीच सर्वस्वी अशक्य आहे.” (रूपरेषा, पृ.२३/२४)
या अहंकाराच्या प्रेरणेचा समावेश कुसुमाग्रज निर्मितिप्रक्रियेत करतात. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. “माणसाचे सारे अस्तित्व म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. साहित्य म्हणजे मूलतः अशा प्रकारचा एक संबंध होय. हा संबंध एका बाजूला साहित्यिकाच्या अहंकाराने आणि दुसऱ्या बाजूला वाचकाच्या अनुभवशोधकतेने नियंत्रित झालेला असतो.” (रूपरेषा, पृ.२५/२६)
निरुद्देश आविष्कार सृष्टीच्या व्यवहारात तत्त्वतः नामंजूर आहे
आविर्भाव
यानंतर कुसुमाग्रज कलेच्या आविर्भाव या तत्त्वाचे विवेचन करतात. ते म्हणतात, साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते आविर्भाव व अनुभव या तत्त्वांमुळे. “आविर्भाव म्हणजे जे अरूप आहे किंवा विरूप आहे त्याला परिणामकारक, सौंदर्यबुद्धीला आवाहन करील असा आकार देण्याची प्रवृत्ती होय. अनुभव मुळात निराकार व निरामय असतो. आविर्भाववृती त्याला शब्दांच्या साह्याने आकार देते, रूप देते. शब्द हे या वाङ्मयीन आविर्भावाचे साधन आहे. कुसुमाग्रजांच्या मते, साहित्यप्रकारांचा जन्मही या वृत्तीतूनच होतो. ही वृत्ती मनोगताची रहदारी सुलभ करण्यासाठी साहित्यप्रकार जन्माला घालते. वाङ्मयप्रकारात जे काळानुसार बदल होतात त्याचेही कारण कुसुमाग्रज ही वृत्तीच मानतात. त्यांच्या मते, आविर्भावाच्या प्रयोगशीलतेमुळे व नवीनतेच्या आग्रहामुळेच हे बदल होतात. काळाची गरज भागवण्यासाठी आविर्भाववृत्ती वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे साहित्यप्रकार जन्मास घालते.
अनुभव
कुसुमाग्रजांच्या मते, आविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. “आविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे...लेखकांमध्ये अहंकाराची प्रेरणा प्रबळ आहे, अविर्भावाचे सामर्थ्यही प्रभावी आहे; परंतु त्याची अनुभव घेण्याची शक्ती जर संकुचित, बोथट आणि केवळ वरच्या थरालाच स्पर्श करणारी असेल तर त्याचे साहित्य उथळ आणि घायपाताच्या रेशमी कापडासारखे दिखाऊ परंतु तकलादू होण्याची शक्यता असते.”(रूपरेषा, पृ.२९)
म्हणजे, जे स्थान मर्ढेकर आत्मनिष्ठेला देतात तेच कुसुमाग्रज अनुभवाला देतात. या अनुभवाचे अधिक विश्लेषण करताना ते म्हणतात, अनुभव प्रत्येक माणसागणिक वेगळा असल्यामुळे एकाच विषयाबाबतही सारखेपणा येत नाही. माणसे संपत नाही, माणसाचे अनुभव संपत नाही, विषय संपत नाहीत. त्यामुळे साहित्यसरितेचा प्रवाह सतत जिवंत, वाहता आणि वाढता ठेवण्याचे कार्य मुख्यत: अनुभवाकडून होत असते. शिवाय साहित्याला कलाकृतीचे स्वरूप अनुभवामुळेच येते. कुसुमाग्रज, अनुभव आणि आविर्भाव यांचा परस्पर संबंध असा स्पष्ट करतात: आविर्भाव-सामर्थ्य प्रभावी असूनसुद्धा योग्य अनुभवाच्या अभावी साहित्याला श्रेष्ठ कलाकृतीचे रूप येणार नाही. आशय आणि आकार यांत सुसंवाद असतो मात्र त्यांच्यात अभिन्नता नसते. समाजाने दिलेला शब्द, साहित्यक्षेत्रातील प्रचलित परंपरा, त्या सांभाळण्याची अथवा तोडण्याची प्रवृत्ती आणि आवश्यकता, परिसरातील बदलती परिस्थिती इत्यादी गोष्टी आविर्भावाचे नियमन करतात. “साहित्यासारख्या कलेत हे जे पारंपरिक असते, आवाहनात्मक असते, समाजाच्या जवळ जाणारे असते ते आविर्भावातून उत्पन्न होते. आणि याच्या पलीकडचे, साहित्यकृतीच्या अंतरंगातील गर्भागार सिद्ध करणारे, त्या ठिकाणी एका नवीन जीवनाची आपल्याला देणगी देऊन आपले व्यक्तिगत जीवन परमेश्वराच्या साहाय्याशिवाय द्विगुणित करणारे, साहित्याला अजरामरता देणारे, जे काही असते ते या अनुभवामुळेच आपल्याला लाभते.” (रूपरेषा, पृ.३०)
म्हणजे कलाकृतीत नाविन्य अनुभवामुळेच येते. कलेचे कलारूप याचठिकाणी पूर्ण होते, किंबहुना याचमुळे पूर्ण होते. आविर्भावाच्या म्हणजे आकाराच्या पलीकडे असलेली कलाकृतीची खास नवीनता, तिची खास स्वतंत्रता या अनुभवातच समाविष्ट असते. एखादी कलाकृती ही खास आणि फक्त तिच्या निर्मात्याचीच असते ती तिच्यातील अनुभवामुळे. अशा अनुभवामुळेच चांगल्या साहित्यकृतीला अनन्यसाधारणता व केवलता प्राप्त होते. “अपार आणि अनंत अशा जीवनाचा एक तुकडा, म्हणजेच एक जाणीव, लेखक-कवीच्या मनात प्रवेश करते. जागृत वा सुप्त अवस्थेत असलेल्या इतर संबंधित जाणिवांचे या जाणिवेवर काही संस्कार होतात, आणि या संस्कारामुळेच पूर्णरूप पावलेला त्याचा अनुभव कथा, नाट्य, अथवा काव्य अशा कलाकृतींच्या द्वारा व्यक्त होतो.” (रूपरेषा, पृ.३०) अशी लेखकाची निर्मितिप्रक्रिया घडून येते.
काव्याविषयीचा दृष्टिकोन
कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. काव्यातून हा अनुभव दुसऱ्यापर्यंत पोचतो तेव्हा कवीला मीपण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजे त्याचा अहंकार सुखावतो. एकाचा अनुभव अनेकांचा होतो. कुसुमाग्रजांच्या मते, हीच काव्यलेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय. येथे शब्दांच्या द्वारा कवीचे व्यक्तित्व बाहेर पल्लवीत होते. कवी काव्याच्या साह्याने एक सामाजिक संबंध जोडीत असतो. अशाप्रकारे काव्य म्हणजे अखेरत: कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित, प्रतिमामय संबंध होय.
काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्माविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते, तेव्हाच काव्याचा उदय होतो. हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो, तेव्हा तो काव्यरूप पावतो. शब्द ही एक सामाजिक घटना आहे. म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे, आविष्कारातून संवादाकडे जाणे होय. यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते, असे कुसुमाग्रज म्हणतात. म्हणजेच काव्यातील आविष्कारात कल्पना आणि रचना यांचेही पदर विणले जातात.
शब्दांची सामाजिकता आणि कवीची कल्पकता यांची प्रक्रिया येथे घडून येते. या प्रक्रियेचे आणखी स्पष्टीकरण ते करतात: “नदीचे वाहते पाणी एखाद्या खड्ड्यात थांबते, साचते आणि तिथे डोह तयार होतो. त्याप्रमाणे जीवनासंबंधीच्या प्रतिक्रिया काही व्यक्तित्वात थांबतात, साचतात, आणि काव्याला जन्म देतात. ही निर्मितीदेखील पूर्णतः स्वयंभू नसते, तर अपरिहार्यपणे संस्कारित असते. हे संस्कार पूर्वसूरींचे असतात, प्रचलित ज्ञानाचे असतात, आणि ज्या परिसरात कवी जन्मतो, वावरतो, त्या परिसराचेही असतात.”
शिरवाडकरांचे आनंद हे पुस्तक काव्याचे उत्तम उदाहरणआहे. त्यातील आनंदच्या मुखी गुंफलेल्या कविता मनाचा ठाव घेतात
(रूपरेषा, पृ.५)
इथे कुसुमाग्रजांनी लेखकाची निर्मितिप्रक्रिया सांगितली असून तिचे आलंबन लेखकाचे व्यक्तित्व, संस्कार आणि सामाजिक परिस्थिती हे मानले आहे.
नाटक आणि संगीत नाटक
कुसुमाग्रज हे नाटककार होते त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक ‘मी’च असतात. इतर वाङ्मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वतःच्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत.
कुसुमाग्रजांच्या मते, नाट्यप्रगती लेखकाच्या तत्त्वज्ञानात्मक समृद्धीनेच होते. नाटक हे मूलत: वाङ्मय असते. नाटकाची परिणती प्रेक्षकांच्या रसास्वादात होत असली तरी त्याचा उगम नाटकाच्या प्रतिभेत होत असल्यामुळे त्याच ठिकाणी त्याचे शुद्ध, अविकृत स्वरूप शोधायला हवे. वाङ्मयीन गुणवत्ता हा चांगल्या नाटकाचा पहिला निकष आहे. नाटक म्हणजे प्रेक्षकाचे लक्ष बांधून ठेवणारे, त्यांचे रंजन करणारे, स्टेजवर उभारलेले केवळ एक यांत्रिक वा तांत्रिक बांधकाम नव्हे.
नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. नाटकातील ही गुणवत्ता हरवली तर सारेच हरवले.
संगीत नाटक हा मराठी रंगभूमीचा एक अमोल वारसा आहे. संगीतकाराच्या सुप्रमाण, कल्पक व प्रयोगशील योजनेने तो अधिक संपन्न करता येईल. शब्दार्थाचे फारसे साहाय्य न घेता, केवळ स्वररचनेच्या प्रभावाने संवादी वातावरणाचा शामियाना उभा करण्याचे संगीतात सामर्थ्य असते, असे ते म्हणत.
दुर्बोधता आणि अलिप्तता
कुसुमाग्रजांच्या काळात, मर्ढेकरांच्या अनुकरणातून आलेल्या दुर्बोधता, अश्लीलता, लैंगिकता या प्रवृत्ती फोफावल्या होत्या. त्याबद्दलची तीव्र नापसंती ते व्यक्त करतात. काव्य दुर्बोध, कथा विश्लेषणात्मक, कादंबरी लैंगिक, नाटक काव्यशून्य आणि त्रोटक असायला हवे, या आग्रहाच्या मुळाशी, ‘लौकिक आहे त्यापासून दूर जाण्याची आणि अलिप्ततेच्या अंधाऱ्या अरुंद गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेण्याची’ एक समान प्रवृत्ती आहे, असे ते म्हणतात.
“आपल्या अंगावरील लक्तरे स्वतःपासून लपवत धुळीने माखलेल्या स्वतःच्या पायांचा शरमिंद्या नजरेने धिक्क्कार करत ही उच्चभ्रू कलावंतांची सारी यात्रा असामान्यतेच्या शोधासाठी वाटचाल करीत आहे...साहित्य हे मुळातच असामान्य असते आणि साहित्यिक हा साहित्याची निर्मिती करीत असताना असामान्याच्या कक्षेबाहेर जात असतो. परंतु प्रतिभेची असामान्यता वेगळी आणि प्रवृत्तीची वेगळी.” (रूपरेषा, पृ.५०)
येथे कुसुमाग्रजांनी लेखकांच्या मध्यमवर्गीय, समाजापासून अलिप्त राहण्याच्या वृत्तीवर टीका केली आहे. दुर्बोधतेला नकार दिला असून सामाजिकतेचा स्वीकार केला आहे. साहित्यिक स्वतःला दुर्बोधतेच्या, अतिरेकी विश्लेषणाच्या, विकृत आत्मनिष्ठेच्या आणि पढिक पांडित्याच्या कैदखान्यात स्वतःला बांधून ठेवत आहे. जुनी समाजरचना ढासळली आणि नव्याची रूपरेषा नीट ठरली नाही या परिस्थितीमुळे ते असे करीत आहेत. ‘हजारो वर्षे अज्ञानाच्या, जातिभेदाच्या आणि दारिद्र्याच्या खाईत बेशुद्धावस्थेत पडलेला समाज आपले हातपाय हालवू लागला आहे.. नव्या जाणिवांनी, आकांक्षांनी आणि अहंकारांनी निपचित पडलेल्या मनात चैतन्य निर्माण केले आहे’ असे हे जग मध्यमवर्गाच्या पलीकडचे असून; या घडामोडींची वार्ता न ठेवत मध्यमवर्गीय लेखक, ‘कोणत्याही सामाजिक प्रतिक्रिया वैफल्याच्या स्वरूपातच हवी’ असा आग्रह धरतो आहे, ‘तिरसट, कडवट आणि सहानुभूतिशून्य उद्गार तेच उस्फूर्त व प्रामाणिक काव्य’ असे मानतो आहे. आणि कोणी लेखनात प्रागतिक, राष्ट्रीय अथवा दलितांसंदर्भात सहानुभूती मांडली तर ते प्रचारी, आक्रस्ताळी, कृत्रिम आहे असे मानतो आहे.. यावर कुसुमाग्रजांनी, ‘साहित्यात ही नवी पुरोहितशाही अवतीर्ण होत आहे’ अशी टीका केली आहे.
साहित्य आणि सामाजिकता
कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात. त्यांचा साहित्यविचार लौकिकतावादी आहे. जीवनवादी आहे. मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते; तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते, असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे. ते म्हणतात, साहित्यिकाची प्रतिभा कितीही आकाशमार्गी असली तरी त्याचे पाय-नव्हे सारे जीवन पृथ्वीवरती टेकलेले असते. लेखकाचे व्यक्तित्व स्वयंभू आणि स्वतंत्र असत नाही. परिसरातील परिस्थितीचे नानाविध संस्कार त्याच्यावर होत असतात व त्या क्रिया-प्रतिक्रियांतून त्याला विशिष्ट आकार, विशिष्ट रंग प्राप्त होतो. लेखकाच्या अलिप्ततेतून निर्माण होणारे साहित्य आणि साहित्यशास्त्र केव्हाही निरामय आणि विकसनशील असू शकणार नाही. साहित्यविचाराबाबत निर्विकल्पतेचा आव खरा नसतो, असे ते म्हणतात.
कुसुमाग्रज साहित्याच्या सामाजिकतेचा पुरस्कार आणि जातीयतेचा निषेध करतात. त्यांच्या मते, साहित्य आणि संस्कृती यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे साहित्याचा जीवननिरपेक्ष अथवा संस्कृतिनिरपेक्ष असा विचार करता येत नाही. ज्या समाजातील जीवन समृद्ध आणि विशाल आहे तेथेच साहित्याचा निरामय आणि निर्वेध विकास होऊ शकेल. जातिभेदामुळे आमच्या सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक विकासाचाही मार्ग कुंठित केला आहे. “आमच्या लेखकाच्या सभोवार जन्मापासून असलेल्या जातीयतेचा तट इतका अभेद्य असतो की आपल्या जागेवरून समग्र समाजजीवनाचे यथार्थ दर्शन त्याला कधी घेताच यायचे नाही.” (रूपरेषा, पृ.६८) असे ते म्हणतात.
त्यांच्या मते, श्रेष्ठ लेखनाच्या मागे अप्रत्यक्ष अनुभूती असते; तरी तिचा धागा प्रत्यक्षाशी जुळलेला असल्यामुळेच अप्रत्यक्ष अनुभूती ही अनुभूती होते. त्यासाठी लेखकाजवळ प्रतिभाबळ असावे लागते. ‘मराठी वाङ्मयाची उंची आपणा सर्वाना अभिमान वाटावी अशीच आहे. परंतु आपले साहित्य आणि साहित्यामागे असलेली आपली जीवनदृष्टी प्रगतिशील असल्यामुळे ज्या तळावर आपण आलो आहोत त्यापुढील तळ कोणते हे पाहणे आवश्यक ठरते.’ त्यामुळे आपले साहित्य संपूर्ण आणि समृद्ध होण्यासाठी जातीयतेची बंधने नष्ट होणे आवश्यक आहे.
इथे कुसुमाग्रज, मराठी साहित्य, सकस समृद्ध आणि परपुष्ट नसण्याचे कारण आपली समाजरचना मानतात. आचार्य धर्माधिकारी यांचा दाखला देऊन कुसुमाग्रज सांगतात, हिंदू समाजात हिंदू कोणीच नाही; जे आहेत ते तेली, वंजारी, मराठा असे आहेत. या सर्व भिंती ओलांडून सर्वत्र संचार करण्याचे सामर्थ्य लेखकाच्या प्रतिभेत येणे कठीण आहे. त्यामुळे विविध जातींतील लेखक लिहू लागल्यावर वाङ्मयाचे क्षितिज खूप रुंदावेल यात शंका नाही. म्हणजे साहित्य समृद्धीसाठी सर्व जातिसमूहांचा समावेश त्यांना महत्त्वाचा वाटतो.
सामाजिकता हेच आजचे परतत्त्व
सामाजिकतेलाच कुसुमाग्रज साहित्याचे परतत्त्व मानतात. काव्याचे श्रेष्ठत्व त्यातील कवित्वाने आणि रसिकत्वाने सिद्ध होते. त्याला परतत्त्वाचा स्पर्श झाल्यास अधिक श्रेयस्कर होय. पण परतत्त्वाचा अर्थ सध्याच्या सामाजिक संदर्भात, जे दलित पतित व व्यथित आहेत त्यांच्या हिताहिताची जाणीव ठेवणे होय. ते म्हणतात, जातिभेदाप्रमाणेच दारिद्र्य्, अज्ञान आणि ऐहिकनिष्ठेचा अभाव यांचाही समाजजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. औदासिन्य आणि निवृत्तीची छाया समाजावर शतकानुशतके पडली आहे. सांस्कृतिक पुनरुज्जीवनाच्या नावाखाली आध्यात्मिक धुके पुन्हा लादले जात आहे. या काळोखातून मार्ग काढण्याची प्रतिभा, प्रज्ञा आणि सहानुभूती असलेल्या साहित्यिकाला, कलावंताला साहाय्य करायला हवे. अशाप्रकारे त्यांनी वंचितांच्या साहित्याचे स्वागतच केले आहे.
बांधिलकी आणि सामिलकी
कुसुमाग्रज बांधिलकीपेक्षा सामिलकीला मानतात. “एखाद्या विचाराशी व अनुभूतीशी बांधलेल्या बांधिलकीपेक्षा, विचारशक्ती आणि अनुभवक्षमता मुक्त ठेवणाऱ्या ‘सामिलकी’चे महत्त्व मला अधिक वाटते. सामिलकीत बांधिलकी समाविष्ट असतेच, पण बांधिलकीची मर्यादा आणि कृपणता तीत असत नाही. बांधिलकी हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अंगभूत भाग असतो, तो बाहेरून आणता येत नाही”(रूपरेषा, पृ.१०६)
बांधिलकी ही विचाराच्या बाबतीत खरोखर संभवतच नाही. कारण बांधून घेणे हे जे स्थिर आहे त्याच्याबाबतीत शक्य आहे; पण विचार स्थिर नसून गतिमान असतात. ‘सामिलकी म्हणजे घटनांच्या प्रवाहात मनाने सामील होणे, आणि संस्कृतीच्या वरच्या बांधकामावर नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या आधारभूत मूल्यांची जाण आणि त्यासाठी आग्रह असणे’ होय. अशाप्रकारे कुसुमाग्रज विचारांच्या प्रवाहीपणाला महत्त्व देतात.
‘विचारांचे प्रवाहीपण नाकारणे म्हणजे त्याचे अस्तित्वच नाकारणे आणि पर्यायाने संस्कृतीचा विकासही नाकारणे होय.’ असे ते मानतात. लेखक, कवी हा प्रथमत: विचारभावनांच्या आविष्काराने बांधलेला असतो. म्हणूनच त्याची जीवनविषयक जाणीव व्यापक आणि सर्वस्पर्शी असणे इष्ट असते. बांधिलकी, सामिलकी ही लेखकाच्या सामाजिक विचारभावनांशी संबधित असते. निसर्गसौंदर्याच्या बाबतीतही त्याची प्रतिक्रिया वेगळी असल्याचे दिसत नाही. ‘समाज आणि व्यक्ती यांच्यातील सबंधक्षेत्र हेच सामिलकीचे व बांधिलकीचे प्रमुख प्रभावक्षेत्र आहे, असे ते मानतात.
साहित्याचे सामाजिक प्रयोजन
कुसुमाग्रजांच्या मते, साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी, क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते. तसेच साहित्य लहानमोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते. केवळ कलात्मक प्रेरणेचा आग्रह धरणे म्हणजे साहित्याच्या स्वाभाविक विस्ताराला मर्यादा घालणे होय. ही प्रेरणा सौंदर्यात्मक (बालकवी), भावनात्मक (खांडेकर), संशोधनात्मक (गाडगीळ-गोखले), तात्त्विक (खाडिलकर), पारमार्थिक (संतकाव्य) अशी जशी असू शकते तशी ती क्रांतिकारक असू शकते. त्यांच्या मते, “सृष्टीतील सौंदर्य खरे तेवढेच सामाजिक जीवनातील प्रक्षोभही खरे आहेत. श्रद्धा प्रेमावर परमेश्वरावर जशी असू शकते तशी ती एखाद्या राजकीय व सामाजिक तत्त्वज्ञानावर असू शकते” (रूपरेषा, पृ.५३)
साहित्य, नीती आणि अश्लीलता
कुसुमाग्रजांच्या मते, लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो. आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही. लेखक नीतिबाह्य असू शकत नाही. प्रचलित नीतिकल्पनांच्या संदर्भात तो नीतिविरोधी असू शकेल. जुने नीतिनियम हे न्याय देण्यास असमर्थ होतात, मनावर अत्याचार करू लागतात, समाजाच्या प्रगतीस अडथळा आणतात. प्रस्थापित नीती ही नीतीचे नाटक असते. अशावेळी रूढ नीतीचे उल्लंघन लेखक करतात. तेव्हा त्यांच्या प्रतिभेला, माणसाला माणुसकी देणाऱ्या शुद्ध सनातन नीतीचे दर्शन व्हायला हवे. नीतीची ही कल्पना बुद्धिवादी आहे, पारंपरिक नाही. द.दि. पुंडे म्हणतात, कुसुमाग्रज, नीतीची उभारणी मध्ययुगीन पापपुण्यादि कल्पनांच्या आधारे न करता माणुसकीच्या तत्त्वावर, न्यायअन्यायाच्या मूलगामी विचारांवर करतात..(कुसुमाग्रज/ शिरवाडकर: एक शोध, पृ १४)
कुसुमाग्रजांच्या मते, अश्लीलतेचा प्रश्न सामाजिक बंधनाचा आहे, तसाच तो अनुभव प्रामाणिकतेचाही आहे. ही भूमिका एकदमच निराळी आहे. “आधुनिक काळातील परिस्थितीने आणि ज्ञानाने संस्कारित झालेल्या जाणिवा म्हणजेच त्यांच्या पासून सिद्ध होणारा अनुभव, वाङ्मयात प्रामाणिकतेने यायचा असेल, आणि तो आल्याशिवाय राहणार नाही, तर श्लीलतेच्या सरहद्दी आपल्याला आणखी व्यापक करण्यावाचून गत्यंतर नाही.” (रूपरेषा, पृ.३६) असे त्यांनी म्हटले आहे. अशा रीतीने कुसुमाग्रजांनी केलेल्या वाङ्मयीन चिंतनातून त्यांचा साहित्यविचार शोधता येतो.
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्त्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले नाशिकच्या प्रसिद्ध सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असे असूनही यश साजरे करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
मराठी साहित्यात अजरामर साहित्यकृती निर्माण करणाऱ्या वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या प्रकाशित न झालेल्या साहित्यापैकी बरेच साहित्य दुर्लक्षित असल्याची बाब समोर आली आहे. हे दुर्लक्षित साहित्य नाशिक शहरात असतानाना रसिकांना त्याची दखल घ्यावीशी वाटली,ना कुसुमाग्रजांच्या नावाने स्थापन झालेल्या प्रतिष्ठानला. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यातील सर्व प्रकारांमध्ये विपुल लेखन केले. यात कथा, कविता, नाटक, एकांकिका, बालसाहित्य अशा सर्व प्रकारांचा समावेश आहे. वि. वा. शिरवाडकर या नावाने लिखाण करण्याअगोदर कुसुमाग्रजांनी पूर्वाश्रमीच्या गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावानेदेखील मोठ्या प्रमाणात लेखन केले होते. मात्र त्यांचे पुस्तकरूपाने प्रकाशित झालेले साहित्यच फक्त जनतेसमोर आले. त्यांनी लिहिलेले लेख, व्यक्तिचित्रणे, प्रवासवर्णने, बालकविता असा साहित्य प्रकार आजही दुर्लक्षित व असंग्रहित आहे. या साहित्यामध्ये १८९ कविता व १३ बाल कविता आहेत.
साहित्य
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
कविता संग्रह
अक्षरबाग (१९९0)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)
निबंधसंग्रह
आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटके
ऑथेल्लो
आनंद
आमचं नाव बाबुराव
एक होती वाघीण
किमयागार
कैकेयी
कौंतेय
जेथे चंद्र उगवत नाही
दिवाणी दावा
दुसरा पेशवा
दूरचे दिवे (रूपांतरित, मूळ इंग्रजी नाटक ॲन आयडियल हजबंड. लेखक ऑस्कर वाईल्ड)
देवाचे घर
नटसम्राट
नाटक बसते आहे
बेकेट
महंत
मुख्यमंत्री
ययाति देवयानी
राजमुकुट
विदूषक
वीज म्हणाली धरतीला
वैजयंती
कथासंग्रह
अंतराळ (कथासंग्रह)
अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
एकाकी तारा
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
जादूची होडी (बालकथा)
प्रेम आणि मांजर (कथासंग्रह)
फुलवाली (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)
कादंबऱ्या
कल्पनेच्या तीरावर
जान्हवी
वैष्णव
आठवणीपर
वाटेवरच्या सावल्या (पूर्वीचे नाव- विरामचिन्हे)
एकांकिका
दिवाणीदावा १९५४, ४ आवृत्ती १९७३.
देवाचे घर १९५५, २री आवृत्ती १९७३.
नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका१९६०, २ री आवृत्ती १९८६.
प्रकाशाची दारे मौज दिवाळी अंक, १९५९.
बेत, दीपावली, १९७०.
संघर्ष, सुगंध दिवाळी अंक, १९६८.
लघुनिबंध आणि इतर लेखन
आहे आणि नाही
एकाकी तारा
एखादं पण, एखादं फूल
प्रतिसाद
बरे झाले देवा
मराठीचिए नगरी
विरामचिन्हे
कुसुमाग्रजांसंबंधी पुस्तके
कुसुमाग्रज शैलीचे अंतरंग (डाॅ. सुरेश भृगुवार)
कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित 'समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास (डाॅ. द.दि. पुंडे)
भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक, निशिकांत मिरजकर; मराठी अनुवाद - अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक - डाॅ. नागेश कांबळे)
वि.वा. शिवाडकरांसंबंधी पुस्तके
रूपरेषा, वि.वा .शिरवाडकर, संपादक : सुभाष सोनवणे, चेतश्री प्रकाशन, अमळनेर, १९८४
शिरवाडकरांची नाटके (शोभा देशमुख)
पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली
’स्वगत’ला १९६२ साली
’हिमरेषा’ला १९६२ साली
’नटसम्राट’ला १९७१ साली
’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
"ययाती आणि देवयानी" या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (१९९१ साली)
भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला.
अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.
१९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
१९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
१९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
१९६० मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड
१९६४ च्याच मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
१९७० साली कोल्हापूर येथे भरलेल्या ५१व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
१९९० साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्कार
नक्षत्राचे देणे काव्यमंच संस्थेचा कुसुमाग्रज स्मृति गौरव पुरस्कार : हा कवी प्रा. शांताराम हिवराळे यांना मिळाला होता.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार
कुसुमाग्रज प्रतिष्ठान (नाशिक) यांच्यातर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. २०१३साली भालचंद्र नेमाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
नशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे याही पुरस्काराचे स्वरूप असते. २०१० साली कन्नड साहित्यिक जयंत कैकिणी, २०११ साली हिंदी साहित्यिक डॉ. चंद्रकांत देवतळे, २०१२ साली मल्याळी साहित्यिक के.सच्चिनानंदन आणि २०१३ साली गुजराती कवी, नाटककार आणि समीक्षक डॉ. सितांशू यशश्चंद्र यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने काव्य विभागासाठी दिला जाणारा कुसुमाग्रज पुरस्कार : हा, हत्ती इलो (काव्यसंग्रह-कवी अजय कांडर) आणि कल्लोळातील एकांत (काव्यसंग्रह-कवी अझीम नवाज) यांना विभागून मिळाला होता.
नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीदिनी, १० मार्चला एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव पुरस्कार' देण्यात येतात. अभिनेते नाना पाटेकर, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापिका डॉ. कनक रेळे, रॅम सायकल शर्यत विजेते डॉ. महाजन बंधू, प्रसिद्ध वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. शशीकुमार चित्रे व महिला सबलीकरणाचे कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांना हा पुरस्कार मिळाला आहे, (२०१६)
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे काॅन्टिनेन्टल प्रकाशनपुरस्कृत कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जालना येथील संजीवनी तडेगावकर यांच्या 'संदर्भासहित' कवितासंग्रहाला प्रदान झाला. (२८ फेब्रुवारी २०१९)
संदर्भ ग्रंथ
सौंदर्याचे उपासक कुसुमाग्रज (संपादक - डाॅ. नागेश कांबळे)
कुसुमाग्रज/शिरवाडकर : एक शोध, लेखक : द.दि. पुंडे, मेहता प्रकाशन, पुणे, १९९१, (दुसरी आवृत्ती)
कुसुमाग्रजांचा सामाजिक साहित्यविचार : डॉ. देवानंद सोनटक्के लिखित 'समीक्षेची अपरूपे-हर्मिस प्रकाशन (पुणे, २०१७) या पुस्तकातील एक लेख
रूपरेषा, वि.वा .शिरवाडकर, संपादक : सुभाष सोनवणे, चेतश्री प्रकाशन, अमळनेर, १९८४
भारतीय साहित्याचे निर्माते कुसुमाग्रज, निशिकांत मिरजकर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक अविनाश सप्रे, साहित्य अकादमी, २०११)
संदर्भ
बाह्य दुवे
कुसुमाग्रज प्रतिष्ठान
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९१२ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९९९ मधील मृत्यू
वर्ग:चित्र हवे |
मंगेश पाडगांवकर | https://mr.wikipedia.org/wiki/मंगेश_पाडगांवकर | मंगेश केशव पाडगांवकर (मार्च १०, इ.स. १९२९; वेंगुर्ला, ब्रिटिश भारत - डिसेंबर ३०, इ.स. २०१५;) हे मराठी कवी होते. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जीवन
thumb|right|250px|मंगेश पाडगांवकर यांच्या लग्नाचे दुर्मिळ चित्र
पाडगांवकरांचा जन्म मार्च १०, इ.स. १९२९ रोजी वेंगुर्ला, ब्रिटिश भारत (वर्तमान सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र) येथे झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या भाषाविषयांत एम.ए. केले. ते काही काळ मुंबईच्या रुइया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवत होते. पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.
मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान
साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी 'कथारूप महाभारत' या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.
त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७ अमेरिकन साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’- [वादळ] या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.
पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या पटावर ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकाचा प्रवेश १९६५ साली झाला. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केले असून त्याला काकासाहेब कालेलकर यांची सविस्तर प्रस्तावना आहे. त्यात मीराबाईच्या चरित्राविषयी, तिचे भावजीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.
प्रकाशित साहित्य
साहित्यकृती साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशन वर्ष (इ.स.) आवृत्ती अफाटराव इ.स. २००० आता खेळा नाचा इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६ आनंदऋतू कवितासंग्रह इ.स. २००४ आनंदाचे डोही कवितासंग्रह उदासबोध (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९४ १९९५, १९९६, १९९८, २००२, २००५ उत्सव (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ १९८९, २००१, २००६ कबीर (कवितासंग्रह) (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद) कवितासंग्रह इ.स. १९९७ २०००, २००३, २००५ कविता माणसाच्या माणसासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००२, २००६ द काॅज (अनुवादित) निबंधसंग्रह मूळ पुस्तक, अमेरिकेचे उपाध्यक्ष ह्यूबर्ट एच. हंफ्री यांचे The Cause of Mankind काव्यदर्शन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६२ गझल (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८१ १९८९, १९९७, २०००, २००४ गिरकी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. चांदोमामा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५ छोरी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५७ १९८८, १९९९, २००३ जिप्सी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५३ १९५९, १९६५, १९६८, १९७२, १९८६, १९८७, १९९३, १९९४, १९९५, १९९७, २००१, २००३, २००५ ज्युलिअस सीझर (नाटक)(विल्यम शेक्सपियरच्या 'जुलियस सीझर' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर) नाटक इ.स. २००२ २००६ झुले बाई झुला इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००६ तुझे गीत गाण्यासाठी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८९ १९९१, १९९६, १९९८, २००१, २००३, २००४ तृणपर्णे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. त्रिवेणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९५ २००४ धारानृत्य (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९५० २००२ नवा दिवस इ.स. १९९३ १९९७, २००१ निंबोणीच्या झाडामागे (कवितासंग्रह) ललितलेख इ.स. १९५४ १९५८, १९९६ फुलपाखरू निळं निळं इ.स. २००० बबलगम इ.स. १९६७ बोलगाणी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९० १९९२, १९९४, १९९६, १९९७, १९९९, २०००, २०००, २००१, २००२, २००३, २००३, २००४, २००४, २००५, २००६ भटके पक्षी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९८४ १९९२, १९९९, २००३ भोलानाथ कवितासंग्रह इ.स. १९६४ मीरा (कवितासंग्रह) (मीराबाईंच्या भजनांचा अनुवाद) कवितासंग्रह इ.स. १९६५ १९९५, १९९९, २००३ मुखवटे (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००६ मोरू (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००६ राधा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००० २००३ रोमिओ आणि ज्युलिएट (विल्यम शेक्सपियरच्या 'रोमिओ आणि ज्युलिएट' या नाटकाचे मुळाबरहुकूम भाषांतर)नाटक इ.स. २००३ वाढदिवसाची भेट इ.स. २००० वात्रटिका (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६३ १९९९, २००२, २००४ वादळ ( नाटक) नाटक इ.स. २००१ विदूषक इ.स. १९६६ १९९३, १९९९, २००३ वेड कोकरू कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २०००, २००५ शब्द कवितासंग्रह शर्मिष्ठा (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९६० २००३ शोध कवितेचा कवितासंग्रह सलाम (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९७८ १९८१, १९८७, १९९५, २००१, २००४, २००६ सुट्टी एक्के सुट्टी (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९२ १९९३, १९९३, २००० सूर आनंदघन (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. २००५ सूरदास (कवितासंग्रह) कवितासंग्रह इ.स. १९९९ २००४ क्षणिका कवितासंग्रह
मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
अफाट आकाश
असा बेभान हा वारा
आतां उजाडेल
आम्लेट
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
प्रत्येकाने आप-आपला चंद्र निवडलेला असतो
फूल ठेवूनि गेले
मी आनंदयात्री
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
सलाम
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
सांगा कसं जगायचं
सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
टप टप करति आंगावरति प्राजक्ताची फुले
पापड कविता
एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बँक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.
पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता
१. रिमझिम पावसात जाऊ गं,
गुण गुण गाणे गाऊ गं,
थेंब टपोरे आले गं,
सगळे गोकुळ न्हाले गं,
थुइथुइ नाचत न्हाऊ गं ||
२. निळ्या निळ्या घुंगुरांनी खळाळले रान;
ओथंबल्या आभाळाचे ओलावले भान.
काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा;
एकाएकी कोसळला पाऊस मधाचा ||
३. या मेघांनो आभाळ भरा
या धरतीवर अभिषेक करा
विहंगाचे मधुगान हरपले
या मातीचे श्वास करपले ||
वाहु दे सुखाचा पुन्हा झरा
सुकून गेल्या वनांवनांवर
सचिंत झाल्या मनांमनांवर
करुणेची संतत धार धरा ||
एखाद्या नव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.
मंगेश पाडगावकरांचे काव्यवाचन
साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा.भ. बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच.
वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला अशी पडली होती की, ज्या गावात त्यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम असे, तिथे रसिक जथ्थ्या- जथ्थ्याने येत. काव्यरसिकांवर गारुड करणारी एक अजब बेहोषी या तिघांच्या काव्यवाचनात असायची. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती.
इ.स. १९९० च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणारे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.
प्रत्येकाची वेगळी शैली
बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असे नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेकजण गळेपर्यंत.
पैसे मोजून काव्यश्रवण
बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारून जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी रसिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.
गौरव
अध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, संगमनेर, इ.स. २०१०
अध्यक्ष, विश्व साहित्य संमेलन, (इ.स. २०१०)
पुरस्कार आणि सन्मान
साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) : सलाम या कवितासंग्रहासाठी
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२४-११-२००८)
पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २०१३)
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार (इ.स. २०१३)
मुंबईतील जी-दक्षिण विभागात असलेल्या जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाला जोडणाऱ्या नाक्यावरील चौकास मंगेश पाडगावकर चौक असे नाव देण्यात आले आहे.
त्यांच्या नावाने मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार दिला जातो.
संदर्भ
बाह्य दुवे
वर्ग:मराठी कवी
वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते
वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते
वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म
वर्ग:इ.स. २०१५ मधील मृत्यू
वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख
वर्ग:मंगेश पाडगांवकर |
नाटक | https://mr.wikipedia.org/wiki/नाटक | नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मकती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा०. ब्रेथ) बारा तासांपर्यंत (उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.
नाटकाची व्याप्ती
नाट्य हे "सर्वकर्मांनुदर्शक आहे". कर्म हे संचित असते आणि त्याचे दर्शन कृती द्वारा होणारे असते . त्याचे अनुसंधान म्हणजे नाट्य म्हणता येईल .नाट्य हे त्रैलोक्याचे 'भावानुकीर्तन' असते. सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन असते. संपूर्ण विश्वातील सर्व जीवन व्यवहारातील भावांच्या श्रनुकीर्तनातून नाट्य प्रकट होते असे म्हटले की नाट्याची ही व्याप्ती लक्षात येईल .भावकीर्तनात जे जे असेल त्याचा परस्पर अन्वय, संबंध येथे प्रकट असतो असे म्हटले तर, नाट्य हा "सर्वभावान्वयापेक्षी वेद" आहे.
संदर्भ:-
(संपा) आनंद वास्कर,वाङमयप्रकार: संकल्पना व स्वरूप, अन्वय प्रकाशन, पुणे.२००४, पृ.क्र.६७-६८
महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे.
मराठीतील नाटकांपेक्षा हिंदीत आणि बंगालीत जास्त नाटके होतात. फरक एवढाच आहे की, एखादे मराठी नाटक दशकानुदशके रंगमंचावर येत राहते, आणि हिंदी नाटकाचे एक-दोन प्रयोग झाले की ते रंगमंचावर येणे बंद होते.
अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक :- नाटकासारखे जिवंत माध्यम जेथे असते, तेथे जिवंत माणसे जिवंत माणसांशी संवाद साधत असतात. जिवंत माणसे एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणे, त्यांचे विचार, त्यांना काय वाटते हे लोकांसमोर मांडणे हा एक त्यांतला महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप मोठा आनंद असतो. नाटकाचा झालेला कुठलाही प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नवीनच होत असतो, म्हणून नाटकाला प्रयोग म्हणतात. प्रत्येक वेळी त्याच्यात प्रेक्षकाला काहीतरी नवीन सापडते. आता सापडणे हेच जर तत्त्व मान्य केले तर ते सापडण्यासाठी प्रेक्षकाच्या फुटपट्ट्या काय असाव्यात, हा केवळ त्याचा व्यक्तिगत मुद्दा असतो. त्याला काय आवडते, काय वाटते, त्याच्या स्वतःच्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, संवेदना काय आहेत, त्याला समाजकारण - राजकारणाविषयी काय वाटते, माणूस म्हणून जगत असताना त्याचे अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत, की ज्यामुळे त्याला कोंडीत पकडल्यासारखे वाटते, हे महत्त्वाचे असते. अभिव्यक्त कशातूनही होणे याला मराठीतून माध्यम असे म्हंटले जाते. म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.
नाटक आणि प्रयोगानुभव :-
माणूस जेव्हा एखादे नाटक पाहायला जातो, तेव्हा तो अनुभव कसा असतो?
एकतर त्याने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते, किंवा कोणीतरी त्याला नाटकाविषयी सांगितलेले असते. मग तो नाटक पाहायला जायचे ठरवतो, कोणासोबत किंवा एकटेच. कदाचित त्या नाटकाचा भाग असलेल्या कोणीतरी त्याला नाटक पाहायचे आमंत्रण दिलेले असते, नाहीतर मग तो तिकिट काढतो.
प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला माणूस नाटकघरात पोचतो. त्याच्याप्रमाणेच इतरही लोक नाटक पाहायला आलेले असतात. नाटकघराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या तसेच काही आगामी नाटकांची माहिती लावलेली असते. या माहितीमध्ये प्रामुख्याने नाटक कधी, किती वाजता आणि कुठे सादर होणार आहे, नाटकाचे नाव काय आहे, नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार कोण आहेत हे लिहिलेले असते. क्वचित प्रसंगी नाटकाचा प्रकार (संगीत, कौटुंबिक, सामाजिक, वगनाट्य, विनोदी, फार्स, इत्यादी) किंवा नाटकाचा विषय (महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे, भ्रष्टाचारावर भाष्य करणारे, इत्यादी) देखील नोंदविलेले असते. कधीकधी नाटकातील कलावंतांची किंवा नाट्यप्रसंगांची छायाचित्रे असतात. ते वाचत, बघत असतानाच माणसाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झालेली असते.
त्यानंतर माणूस तिकिट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर अनेक खुर्च्यांच्या रांगा ओळीने लावलेल्या दिसतात. तो त्याच्या आसनावर जाऊन बसतो. त्याच्या आजूबाजूलाही लोक येऊन बसलेले असतात. मग तो पण ह्या प्रेक्षकसमूहाचा एक भाग होतो. थोड्या थोड्या कालावधीने तीन घंटा होतात, प्रेक्षागृहातील दिवे मंद होऊ लागतात. आता, सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितले जाऊ लागते. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो. नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.
रंगमंचावर हळूहळू प्रकाश येऊ लागतो आणि प्रेक्षक नाटकाच्या विश्वात प्रवेश करतो. कधी कधी मंचावर काही वस्तू मांडलेल्या असतात, त्यावरून त्याला हे नाटक कुठे घडते आहे याची कल्पना येऊ शकते. एखादे घर किंवा कार्यालय, महाल, रस्ता किंवा जंगल असे काहीही. मंचावर असलेले किंवा प्रवेश केलेले नट-नट्या त्याला व्यक्तिरेखांची प्रचिती देतात. या व्यक्तिरेखा त्याच्याच समाजातील आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांसारख्या असू शकतात किंवा परक्या देशातल्या, इतिहासातल्या किंवा काल्पनिकदेखील असू शकतात. त्यांनी घातलेले कपडे, त्यांचे चालणे बोलणे असे काही असते की, ते ज्या जगात राहतात त्याची प्रेक्षकाला कल्पना येऊ शकते.
हळूहळू नाटक पुढे सरकते. प्रेक्षकाला नाटकातील व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध लक्षात यायला लागतात. कोणकोणत्या व्यक्तिरेखा एकमेकांच्या जवळ येता आहेत, कोणकोणत्या एकमेकांशी फटकून वागताहेत. हळूहळू आपल्याला त्यांचा परिचय होऊ लागतो. काही व्यक्तिरेखा त्याला आपल्या अगदी जवळच्या वाटतात, तर काहींचा त्याला राग येतो. मंचावर जे काही घडते आहे त्यामुळे कधी त्याला गंमत वाटते तर कधी तो गंभीर होतो. व्यक्तिरेखा जेव्हा स्वतःचीच चेष्टा करतात, तेव्हा तो पण त्यांच्यावर हसतो. जेव्हा त्यांच्यावर संकटे कोसळतात, तेव्हा त्याला त्यांची काळजी वाटायला लागते. त्यांच्या वेदनेने तो ही दुःखी होतो. कधी नाटकातील थरार आणि रहस्य वाढत जाते, प्रेक्षक श्वास रोखून पहात राहतो. नाटक त्याच्या अत्युच्च बिंदुपाशी पोचते. हळूहळू प्रसंगांची उकल होते, आणि शेवटी त्याला हायसे वाटते.
पडदा पडतो. नाटक संपते. प्रेक्षाघरातील दिवे उजळतात.नाटक बघायला आलेली माणस टाळ्या वाजवतात. लोक हळूहळू प्रेक्षाघराबाहेर पडून काल्पनिका विश्वातून वस्तुनिष्ठ विश्वात प्रवेश करतात. नाटकातले काही विचार, काही ठसे, काही भावना मात्र त्या प्रेक्षाकाच्या मनात नंतर बराच काळ रेंगाळत राहतात. हा अनुभव केवळ एखाद्यालाच नाही तर अनेकांना येतो. शेकडो वर्षांपासून लक्षावधी-कोट्यवधी प्रेक्षक हा अनुभव घेत आलेत. अर्थात प्रत्येक वेळी हा अनुभव असाच असेल असे मात्र नाही; कधी ते जास्त हसले असतील तर कधी जास्त दुःखी झाले असतील. नाटकाचा हाच अनुभव अनेक वेगवेगळ्या पद्धतींनी अनुभवता येऊ शकतो. कधी एका मोठ्या प्रेक्षाघरात हजारो लोकांसोबत हा अनुभव घेता येतो, तर कधी समीपमंच घरात अगदी साठ-सत्तर प्रेक्षकांसोबत हा अनुभव घेता येतो. कधी नाटकातल्या गोष्टीत प्रेक्षक गुंगून जातो, तर कधी नाटकातील गोष्टीमुळे त्याला सभोवतालची जाणीव होते. कधी त्याला स्वतःसारख्याच व्यक्तिरेखा दिसतात, तर कधी आदर्श व्यक्तिरेखा दिसतात. काही नाटकांमधून त्याच्या भोतालच्या समाजातील समस्या मांडल्या जातात, तर काही नाटके त्याला त्रिकालबाधित सत्याची जाणीव करून देतात; काही विचार करायला लावतात, तर काही केवळ केवळ अनुभव देतात. असे जरी असले, तरी एखाद्या नाट्यप्रयोगाचा एकदा जो अनुभव येतो, तो एकदाच येतो. कारण नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा जरी एकसारखा असला तरी त्याचा अनुभव मात्र प्रयोगागणिक वेगळा असतो, कारण नाटक ही प्रयोगकला आहे.
नाटकाचा इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे.
भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.
इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि ऊरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालिदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शूद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारांमध्ये भवभूती (नाटक - उत्तररामचरित), विशाखादत्त (नाटक - मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो.
भास हा एक प्राचीन भारतीय नाटककार होता. तसेच कालिदास हा कवीही नाटककार होता. ही नाटके बहुधा संस्कृत भाषेत असली तरी त्यांतली काही पात्रे प्राकृत भाषेत बोलत असत.
नाट्यकोश
मुख्यत्वे मराठी भाषेतील नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा ’मराठी नाट्यकोश’, मराठी लेखक डॉ. वि.भा. देशपांडे यांनी संपादित केला आहे. १२००हून अधिक पृष्ठांच्या या ग्रंथाचा हिंदी अनुवाद अमेय इन्स्पायरिंग बुक्सतर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.
नाटकांचे लांबीनुसार वर्गीकरण
नाट्यछटा (प्रयोग कालावधी काही मिनिटे)
एकांकिका (३० ते ४५ मिनिटे)
दीर्घांक (सव्वा ते दीड तास)
लघुनाटक/नाटिका (सव्वा ते दीड तास)
नाटक (तीन ते सहा तास)
दीर्घ नाटक (प्रयोग कालावधी ९ तास)
नाट्यत्रयी (३ नाटकांना लागणारा कालावधी)
नाट्यांतर्गत काळावरून वर्गीकरण
पौराणिक (उदा० सौभद्र)
मिथकाधारित (ययाति)
ऐतिहासिक (उदा० भाऊबंदकी, भंगले स्वप्न महाराष्ट्रा, वेडात मराठे वीर दौडले सात)
अनैतिहासिक-ऐतिहासिक (उदा० घाशीराम कोतवाल)
सामाजिक (उदा० भावबंधन)
कौटुंबिक (बाळ कोल्हटकरांची नाटके)
भविष्य-नाटक (फ्युचरिस्ट प्ले, उदा० चारशे कोटी विसरभोळे)
फॅंटसी (अद्भुतरम्य नाटक, उदा० जादूचा शंंख))
विशिष्ट काळ नाट्य/प्रासंगिक नाटक (उदा० शारदा; डॉक्टर लागू; तो मी नव्हेच)
राजकीय नाटक (स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर नाटक) (उदा० कीचकवध; संन्यस्त खड्ग; मी नथूराम बोलतोय)
शोकात्मिका (उदा० सवाई माधवरावांचा मृत्यू)
सुखात्मिका (उदा० तुझे आहे तुजपाशी)
नाट्यलेखन काळावरून वर्गीकरण
अभिजात नाटक (क्लासिक)
मॉडर्न (आधुनिक) नाटक
मॉडर्न-क्लासिक स्थल-कालातीत नाटक (उदा० तमाशा, लोकनाट्य, दशावतार)
अलिखित तत्कालस्फूर्ती नाटक (सोंगाड्याची बतावणी)
नाट्यस्थळावरून वर्गीकरण
पथनाट्य
परिसर रंगभूमी
रिंगण नाट्य
रंगमंच नाटक
निकट-मंच नाटक
देवळात, पटांगणात, जत्रेत, झाडाच्या पारावर वा तंबूत होणारी लोकनाट्ये
नाट्यसंगीत
मराठी संगीत नाटकांच्या उत्कर्षकाळात मराठी नाट्यसंगीत या नावाचा एक नवाच गीतप्रकार उदयास आला. मराठी नाट्यसृष्टीची शताब्दी झाली तरी संगीताचा हा प्रकार महाराष्ट्रात अजूनही लोकप्रिय आहे. मराठीत नाट्यसंगीताचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.
मराठी नाटकाचे आद्य प्रवर्तक
ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. किर्लोस्करांनी कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.
संगीत मराठी नाटके
विष्णूदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते.
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली. नाटके बंद झाली तरी त्यांतील पदे अनेकदा अन्य गायकांकडून गायली जातात.
प्रायोगिक रंगभूमी
मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
नाटकांमधील नावीन्य आणि प्रयोग हे प्रायोगिकमध्ये पाहायला मिळतात. प्रायोगिक नाटक काही वेळा सामान्यापर्यंत पोहोचू शकत नाही.
प्रायोगिक नाटकात नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा आदींचा वापर अत्यंत कमी असतो. यात नेपथ्य “सूचक’ आणि प्रतिकात्मक असते. संगीत मर्यादित असू शकते किंवा अजिबात नसू शकते. यामध्ये संहिता आणि संहितेचा आशय मांडण्यावर अधिक भर दिलेला असतो; परंतु व्यावसायिक नाटकात या सगळ्याचा वापर आणि भर हा कलाकृती आकर्षक करण्यावर दिलेला असतो. संहिता आणि संहितेचा आशय याचा विचार व्यावसायिक दृष्टिकोनातून कलाकृती आकर्षक करण्यावर अधिक असतो. यामध्ये असणाऱ्या स्पर्धा आणि प्रेक्षकांचा विचार केला, तर प्रेक्षक वर्ग दोन्ही ठिकाणी भिन्न किंवा एकसारखा असू शकतो. आर्थिक गणिते मात्र, सर्वस्वी संहिता कोणत्या प्रकारची आहे?, तिचे किती प्रयोग करायचे आहेत?, प्रायोगिक का व्यावसायिक? यावरूनच मांडावी लागतात. विविध रुची संपन्न प्रेक्षक वर्ग आणि प्रेक्षकसंख्या नेहमीच कमी-जास्त होत असतात.
नटसम्राट
मराठी नाटकांमध्ये गाजलेल्या नाटकांत नटसम्राट हे नाटक खूप चर्चिले जाते. हे नाटक शेक्सपियरच्या किंग लियर या नाटकावर आधारित आहे. नाटकात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका करणे हे एक आव्हान समजले जाते. फारच थोड्या नटांनी ते स्वीकारले आणि यशस्वीरीत्या पार पाडले. श्रीराम लागू, दत्ता भट, दत्ता मयेकर, मोहन जोशी, सतीश दुभाषी, चंद्रकांत गोखले, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी हे त्यांपैकी काही अभिनेते होत. ह्या नाटकावर एक मोठा चित्रपटही झाला. त्यात अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारली होती. नटसम्राट नाटकाचे हिंदी रूपांतरही झाले आहे. त्यात अप्पा बेलवलकरांची भूमिका आलोक चटर्जी करतात.
नाटकांचे प्रकार
अतिनाट्य (मेलोड्रामा)
अभिजात नाटक
असंगत नाट्य (न-नाट्य)
आधुनिक अभिजात नाटक
एकपात्री नाटक
एकांकिका
ऐतिहासिक नाटक
कलावादी नाटक
गद्यनाटक
चर्चानाट्य
चित्रनाट्य
जीवनवादी नाटक
तमाशा
त्रिनाट्यधारा (नाट्यत्रयी)
दशावतार
दूरचित्रवाणी मालिका
दीर्घनाटक
दीर्घांकिका
न-नाट्य (असंगत नाट्य)
नभोनाट्य (श्रुतिका)
नाटिका
नाट्यछटा
नाट्यत्रयी (त्रिनाट्यधारा)
नाट्यवाचन
नुक्कड नाटक
नृत्यनाटिका (बॅले)
पथनाट्य
पुरुषपात्रविरहित नाटक
पौराणिक नाटक
प्रहसन (फार्स)
प्रायोगिक नाटक
फिजिकल नाटक
बालनाट्य
बाहुली नाट्य (कठपुतळी)
बिनवास्तववादी नाटक (फॅन्टसी)
भक्तिनाट्य
भयनाट्य
भविष्य नाटक (फ्यूचरिस्ट प्ले)
भाण किंवा मिश्र भाण : एक प्रकारचे संस्कृत एकपात्री नाटक
भारूड
महानाट्य : रंगमंचावर सादर न करता येण्यासारखे मैदानावर करायचे नाटक
मिथकाधारित नाटक (मिथ्-बेस्ड)
मुक्तनाट्य
मूकनाट्य
रिंगणनाट्य
लघुनाटक
लळीत
लोकनाट्य
वास्तववादी नाटक
विधिनाट्य
विनोदी नाटक
विशिष्टकाळ नाट्य (पीरियड प्ले)
विज्ञान नाटक (सायन्स-फॅन्टसी)
व्यक्तिकेंद्री नाटक
शोकात्मिका
स्त्रीपात्रविरहित नाटक
श्रुतिका (नभोनाट्य)
संगीत नाटक
संगीतिका (ऑपेरा)
समस्याप्रधान नाटक
समूहकेंद्री नाटक
साभिनय नाट्यवाचन
सामाजिक नाटक
सुखात्मिका
सुरचित नाटक (वेल्-मेड्-प्ले)
क्षोभ नाट्य
बहुभूमिका नाटके
नाटक, आणि त्या नाटकात एकाच व्यक्तीची अनेक रूपे सादर करणारे अभिनेते: -
गंमत जंमत (अरुण नलावडे + रसिका ओक + सोनाली चेऊलकर(?))
चार दिवस प्रेमाचे (दहा भूमिका, सविता प्रभुणे + प्रशांत दामले)
चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, निर्मिती सावंत)
जस्ट हलकंफुलकं (५ भूमिका, विजय कदम + रसिका ओक); (सागर कारंडे + अनिता दाते)
तू तू मी मी (१४ भूमिका, विजय चव्हाण); (संतोष पवार)
तो मी नव्हेच (प्रभाकर पणशीकर)
प्यार किया तो डरना क्या (३ भूमिका)
थरार (दोन भूमिका, सतीश पुळेकर)
बहुरूपी प्रशांत दामले (२ भूमिका, प्रशांत दामले)
बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२ भूमिका)
श्रीमंत दामोदर पंत (२ भूमिका)
सही रे सही (४ भूमिका, भरत जाधव)
हसवाफसवी (सहा भूमिका, दिलीप प्रभावळकर); (पुष्कर श्रोत्री)
रंगभूमीचे प्रकार आणि शाखा
आसामी रंगभूमी
उर्दू रंगभूमी
एलिचपूरची नाट्यपरंपरा
ओरिसा रंगभूमी
कानडी रंगनभूमी
कामगार रंगभूमी
गुजराती रंगभूमी
ग्रिप्स थिएटर
ग्रीक रंगभूमी
झाडीपट्टीची रंगभूमी
तंजावरी रंगभूमी
तामीळ रंगभूमी
तिसरी रंगभूमी
तेलगू रंगभूमी
दलित रंगभूमी
निमव्यावसायिक रंगभूमी
नुक्कड नाट्य
पंजाबी रंगभूमी
पथनाट्य
परिसर रंगभूमी
पारसी रंगभूमी
प्रचार रंगभूमी
प्रसार रंगभूमी
प्रायोगिक रंगभूमी
प्रौढ रंगभूमी
बंगाली रंगभूमी
बाल रंगभूमी
ब्लॅक रंगभूमी
भक्तिनाट्य
मल्याळी रंगभूमी
रिंगणनाट्य
लोककला रंगभूमी
विधिनाट्य
विद्यार्थी रंगभूमी
व्यस्ततावादी रंगभूमी
व्यावसायिक रंगभूमी
शालेय रंगभूमी
संस्कृत रंगभूमी
समांतर रंगभूमी
सिंधी रंगभूमी
स्त्री-रंगभूमी (हिंदीत नारी-रंगभूमी]])
हिंदी रंगभूमी
हौशी रंगभूमी
नाट्यशास्त्र अध्यापन संस्था
ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (नाट्यशास्त्र विभाग), औरंगाबाद
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, नाट्यशास्त्र विभाग (महाराष्ट्र)
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, औरंगाबाद (महाराष्ट्र).
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स ॲन्ड रिसर्च (IAPAR), पुणे. (२०१७ सालचे संचालक - प्रसाद वनारसे)
चतुरंग प्रतिष्ठान, पुणे
नाट्यसंस्कार कला अकादमी
भरत नाट्यसंशोधन मंदिर, पुणे
मॉडर्न महाविद्यालय, पुणे
ललितकला केंद्र, पुणे विद्यापीठ, पुणे
शिक्षकांसाठी अभ्यासनाट्य शिबीर : ही शिबिरे हे अनेक संस्था भरवतात. असे एक शिबीर, पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीने संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भरवले होते.
विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान : नाट्यसंगीतातली पदवी आणि पदविका देणारी संस्था
रंगशाळा, कोकणाचे सिने- नाट्य विद्यालय रत्नागिरी.
रमेश कीर कला अकादमी, रत्नागिरी
नाट्य महोत्सव
महाराष्ट्रात वेळोवेळी अनेक नाट्य महोत्सव होतात. महोत्सवांत उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर सादर होतात. असे काही नाट्य महोत्सव --
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे इ.स. १९०५ पासून भरत आले आहे.
औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचा वार्षिक नाट्यमहोत्सव (इ.स. १९७३पासून)
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय , औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभाग आयोजित वार्षिक नाट्य महोत्सव.
पिंपरी-चिंचवड येथील प्रयोग या संस्थेचा प्रायोगिक व बालनाट्य महोत्सव
पु.ना. गाडगीळ ज्युवेलर्स पुरस्कृत नाट्यमहोत्सव
पुणे नाट्यसत्ताक महोत्सव (इ.स. २०१६पासून)
पृथ्वी थिएटर्सचा आंतरराष्ट्रीय थेप्सो नाट्य महोत्सव
झी युवा (दूरचित्रवाणी) वाहिनीचा (गाजलेल्या एकांकिकांचा) प्रयोगोत्सव (इ.स. २०१७पासून)
प्रेरणायन (पुण्यातील 'प्रेरणा – एक कलामंच' या संस्थेचा नाट्यमहोत्सव) (इ.स. २००८पासून)
महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव (इ.स.. १९६१पासून)
मुंबई विद्यापीठाच्या "ॲकॅडमी ऑफ़ थिएटर आर्ट्स "या नाट्यप्रशिक्षण संस्थेचा दरवर्षी होणारा "राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव" (इ .स. २००४पासून)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने आयोजलेला कणकवली नाट्योत्सव (इ.स. १९९२पासून)
भरत नाट्य मंदिराचा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव
विनोद दोशी (स्मृती) नाट्य महोत्सव (इ.स. २००९पासून), (२०१९ सालापसून 'सारंग थिएटर नाट्यमहोत्सव' या नवीन नावाने), पुणे.
दैनिक सकाळ आयोजित नाट्यमहोत्सव
नाट्यस्पर्धा
अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
कांकरिया करंडक बालनाट्य स्पर्धा, अहमदनगर
चंद्र सूर्य रंगभूमी या नृत्य-नाट्य-संगीत संस्थेच्या आंतरशालीय एकांकिका स्पर्धा
दादा कोंडके करंडक नाट्य एकांकिका आणि एकपात्री स्पर्धा
दीर्घांक स्पर्धा
दैनिक लोकसत्तातर्फे चालणाऱ्या लोकांकिका नावाच्या एकांकिका स्पर्धा
दैनिक सकाळ सोशल फाउंडेशनच्या ’आंतरशालेय सकाळ नाट्यवाचन स्पर्धा’ आणि शिक्षकांसाठी ’सकाळ नाट्यलेखन स्पर्धा’
नवी मुंबई महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (२०२० सालापासून)
नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा (२०२० सालापासून)
फिरोदिया करंडक एकांकिका स्पर्धा
पुरुषोत्तम करंडक नाट्यस्पर्धा
पुणे जिल्हा परिषद मुख्याध्यापक संघ घेत असलेली आंतरशालेय (यशवंतराव चव्हाण) बालनाट्य स्पर्धा (इ.स. १९६०पासून)
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वार्षिक राज्य नाट्य स्पर्धा (इ.स. १९६१पासून)
महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा (इ.स. १९६२पासून)
रंगवैखरी : आंतरमहाविद्यालयीन नाट्य, चित्र, शिल्प, संगीत, नृत्य स्पर्धा. या वार्षिक स्पर्धा राज्य मराठी विकास संस्थेतर्फे सन २०१७ पासून भरवल्या जातात.
रंगसंगीत एकांकिका स्पर्धा : संगीत नाटकांची परंपरा अबाधित राहावी, या उद्देशाने 'थिएटर ॲकॅडमी'तर्फे इ.स. २०११ सालापासून आयोजित केली जाणारी स्पर्धा.
राजा परांजपे प्रॉडक्शन्सतर्फे राजा परांजपे करंडक (महाराष्ट्र) राज्यस्तरीय दीर्घांक (नाट्य) स्पर्धा
रोटरी क्लबतर्फे विनोदी एकांकिका स्पर्धा
विजय फौंडेशन, अकलूज आयोजित पु.ल.देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (सन २००५ पासून) राज्यातील ५ विभागांमध्ये : नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती व पुणे.
विनोद दोशी नाट्यस्पर्धा
शाहू मोडक स्मृती करंडक स्पर्धा, अहमदनगर
श्रीरामपूरला महाराष्ट्र शुगर फॅक्टरीतर्फे चालणाऱ्या नाट्यस्पर्धा (आता बंद झाल्या असाव्यात).
सोलापूरची हरिभाऊ देवकरण प्रशाला आंतरशालेय नाट्यस्पर्धा
नाट्य पुरस्कार
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
झी नाट्य गौरव पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार
पार्श्वनाथ आळतेकर स्मृती पुरस्कार
पु.श्री. काळे स्मृती पुरस्कार
नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
उत्कृष्ट एकांकिेसाठी पुरुषोत्तम करंडक
भार्गवराम आचरेकर स्मृती पुरस्कार
एकपात्री कलाकारांसाठी मधुकर टिल्लू स्मृती पुरस्कार
लोकनाट्यातील कलाकारांसाठी मधू कडू स्मृती पुरस्कार
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ पुरस्कार
विनोदी एकांकिकेसाठी विनोदोत्तम करंडक
विष्णूदास भावे पुरस्कार
सुनील तारे स्मृती पुरस्कार
रंगभूषाकार
नाटक रंगभूमीवर सादर करण्यासाठी त्यातील कलाकारांना सुयोग्य वेश चढवणे आणि त्यांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करणे हे रंगभूषाकारांचे काम असते. मराठी नाटय सृष्टीतले असे काही रंगभूषाकार --
कृष्णा बोरकर (जन्म : इ.स. १९३३)
नारायण देशपांडे (मृत्यू डिसेंबर २०१७)
पंढरीनाथ जूकर
प्रा. रवी कुलकर्णी ( औरंगाबाद )
प्रकाशयोजनाकार
शीतल तळपदे
प्रा. कैलास पुपुलवाड , भिसिकर.( महाराष्ट्र )
नाट्यसमीक्षक
अरुण धाडीगावकर
जयंत पवार
दिवाकर दत्तात्रय गंधे
वि.भा. देशपांडे
आधुनिक मराठी नाटके
१९७० च्या दशकात, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित दोन ऐतिहासिक नाटके लोकप्रिय झाली ज्यात 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' हे छत्रपती राजाराम भोसले त्यांच्या नेतृत्वाखाली संताजी-धनाजी यांनी स्वराज्य टिकवण्यासाठी मुघल साम्राज्या विरुद्ध केलेल्या संघर्षावर आधारित"लेखणीतून ग्रामीण लोककला संपन्न करणारे बशीर मोमीन कवठेकर", ‘सांज महानगरी-मुंबई आवृत्ती', दि. २२ जानेवारी २०१९ तर 'वेडात मराठे वीर दौडले सात' हे मराठा साम्राज्याचे तिसरे सेनापती प्रतापराव गुजर यांनी केवळ सहा सरदारांना बरोबर घेऊन बहलोल खानाच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यावर आधारित होतेबशीर मोमीन – कवठेकरः कोंबड्या विकण्यापासून जीवनगौरव पुरस्कारापर्यंत "कोलाज- फिचर वेबसाईट", Published on 16-Jan-2019 . यानंतर, १९८४ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे 'जाणता राजा' हे महानाट्य रंगमंचावर आले आणि अफाट लोकप्रिय झाले.
१९९० च्या आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकाकडे मराठी प्रेक्षकांनी काही प्रमाणात पाठ फिरवली होती. या काळातील उत्तम नाटकांना नोंद घेण्याइतपत प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता. टीव्ही मालिकांच्या सस्त्या करमणुकीशी स्पर्धा करत व्यावसायिकांनी विनोदी नाटके देऊन प्रेक्षकांना वश करून पाहण्याचा सपाटा लावला होता. सर्वसामान्य माणसांच्या जीवनशैलीत जागतिकीकरणोत्तर बदलांनी इतका प्रभाव टाकला होता की मराठी मध्यमवर्गाने तोवर टिकवून धरलेली त्याची सांस्कृतिक ओळखही बदलू लागली होती. या बदलांत मराठी माणसाच्या करमणुकीच्या यादीतले नाटकाचे अग्रस्थान घसरत घसरत खूप खाली गेले. तशात मराठी चित्रपटांनी आश्चर्यकारकरीत्या उचल खाल्ली आणि नाटकांना आणखी एक धक्का बसला. असे असले तरी एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठी नाटकांना परत ऊर्जितावस्था आली. या काळात रंगभूमीवर नवीनच किंवा नव्याने येऊन प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली नाटके अशी :
‘अबीर गुलाल’, ‘अ फेअर डील’, ‘ऑल दि बेस्ट, ‘ऑल दि बेस्ट २’, ‘इंदिरा’, ‘कळत नकळत’, ‘कहानी में ट्विस्ट’, ‘के दिल अभी भरा नही’, ‘गोष्ट तशी गमतीची’, जन्मरहस्य’, ‘ठष्ट’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘ढोलताशे’, ’दी दोघं’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘दोन स्पेशल’, ‘परफेक्ट मिसमॅच’ ‘लगीनघाई’, 'वाडा चिरेबंदी’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘श्री बाई समर्थ’, ’सही रे सही’, ‘स्पिरीट’, ‘सुस्साट’, ‘सेल्फी’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’, वगैरे. (अपूर्ण यादी)
आधुनिक मराठी नाटककार (व त्यांचे एखादे नाटक)
अतुल पेठे, अनिल दांडेकर, डॉ. अनिल बांदिवडेकर, आशुतोष पोतदार, इरफान मुजावर (नंगी आवाजे), किरण यज्ञोपवीत, केदार शिंदे, चैतन्य सरदेशपांडे, तुषार भद्रे (लादेनच्या शोधात), दिलीप जगताप, धर्मकीर्ती सुमंत ('गेली एकवीस वर्षे', 'पाणी चारु आरो इत्यादी...', ‘नाटक नको’ ), डॉ. निलेश माने, प्रदीप वैद्य, प्राजक्त देशमुख, मनस्विनी लता रवींद्र, महेश एलकुंचवार, बशीर मोमीन (कवठेकर), मिहिर राजदा (मराठी नाटक - Don't Worry Be Happy), युगंधर देशपांडे (दीर्घांक- अगदीच शून्य प्रयोग), राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला), राजन देऊसकर, राजीव मुळे (बैल-अ-बोलबाला), विद्यासागर अध्यापक (दर्द-ए-डिस्को), संतोष गुर्जर, सौरभ पाटील, प्रा. हिमांशु स्मार्त (ढेकर आख्यान, परफेक्ट मिसमॅच)
बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१५ चा 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरविले आहे.
धर्मकीर्ती सुमंत यांना २०१२ या वर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित केले गेले.
बशीर मोमीन (कवठेकर) यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१८ चा 'विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार' देऊन गौरविले आहे.आयुष्यभराच्या निरपेक्ष सेवेचा गौरव- लोकशाहीर बशीर मोमीन यांच्या भावना "दै.सामना”, 1-March-2019अवलिया लोकसाहित्यिक "दै.सकाळ”, पुणे, 20-Nov-2021
(अपूर्ण यादी)
नाट्यगृहे
नाटके आणि अन्य करमणुकीचे किंवा राजकीय व सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक नाट्यगृहे आहेत.यांतील बरीच त्या त्या गावातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बांधलेली आहेत, आणि या सभागृहांचे व्यवस्थापन त्या संस्था पाहतात.
‘ॲड. नाना लिमये रंगमंच’ हे अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्त्वावर उभारलेले महाराष्ट्र राज्यातील पहिले नाट्यगृह आहे. ह्याचे उद्घाटन ७-७-२०१७ रोजी झाले.
प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृह, चंद्रपूर (विदर्भ) आसन संख्या 830
बृहन्महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहे :
अण्णा भाऊ साठे रंगमंच, बिबवेवाडी, पुणे (आसनसंख्या ८५०)
अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह, राणीचा बाग प्रांगण, भायखळा, मुंबई
अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक कलामंदिर (नाट्यगृह), येरवडा (पुणे). (आसनसंख्या ७००)
अण्णा भाऊ साठे स्मारक नाट्यगृह (पद्मावती-पुणे)
आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण
प्र.के. अत्रे नाट्यगृह, संत तुकारामनगर, पिंपरी (पुणे); (आसनसंख्या ८००)
अनंतफंदी खुले नाट्यगृह, संगमनेर (अहमदनगर जिल्हा)
अमर ग्यान ग्रोव्हर, (हाजीअली), मुंबई;(आसनसंख्या६५८)
अल्फोन्सो, मुंबई
अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी (पिंपरी-चिंचवड) (आसनसंख्या १०००)
अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, मुंबई
अनंतराव ठाकुर नाट्यगृह (वसई पारनाका)
डॉ.अ.ना. भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
आनंदी विधान, अहमदनगर (बंद झाले)
आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे (आसनसंख्या ४००)
आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
उद्यान प्रसाद, पुणे
एकनाथ नाट्यगृह (संत एकनाथ रंगमंदिर), औरंगाबाद. स्थापना सप्टेंबर १९८९.
एन.सी.पी.ए.चे टाटा थिएटर, नरीमन पॉइन्ट, मुंबई
एन.सी. पी.ए.चे गोदरेज सभागृह
एन.सी.पी.ए.चे टाटा नाट्यगृह
एन.सी.पी.ए.चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
एन.सी.पी.ए.चा जमशेदजी भाभा हॉल
एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
एस.एम. जोशी हॉल, पुणे
औंधकर नाट्यगृह, बार्शी (बहुधा बंद पडले असावे).
कर्नाटक संघ (झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई; (आसनसंख्या ७७४)
कला अकॅडमी, पणजी, गोवा
कॉकटेल थिएटर, मुंबई
कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
कामा हॉल, काळा घोडा, मुंबई
कालिदास, नाशिक
कालिदास, मुलुंड, मुंबई; (आसनसंख्या १५८०)
कावसजी जहांगीर हॉल, फ्लोरा फाउंटन, मुंबई
कावसजी पटेल हॉल, धोबी तलाव, मुंबई
काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे
काशीनाथ (मिनी), ठाणे
काळे सभागृह, पुणे
कीर्तन केंद्र, संघवी शाळेसमोर, जुहू, मुंबई
कुंदनलाल सैगल खुले नाट्यगृह, मालाड पूर्व, मुंबई
मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
केशवराव भोसले नाट्यगृह (पॅलेस थिएटर), खासबाग(कोल्हापूर)
खासबाग कुस्त्यांचे मैदान वजा खुले नाट्यगृह, कोल्हापूर
गडकरी रंगायतन, ठाणे;(आसनसंख्या ८००)
गणेश कला केंद्र, पुणे (आसनक्षमता २५००)
गणेश कला क्रीडा मंच
गणेश नाट्यगृह, इचलकरंजी
गरवारे महाविद्यालय सभागृह, पुणे
गर्दे वाचनालयाचे सभागृह, बुलढाणा
गोकुळ तमाशा थिएटर, सांगली
गोखले सभागृह, पुणे
ग्रोव्हर ऑडिटोरियम, हाजी अली(मुंबई)
गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीचे नाट्य गृह , औरंगाबाद .
घाटे नाट्यगृह, सातारा
घोले रोड(पुणे)च्या आर्ट गॅलरीच्या बिल्डिंगमध्ये असलेले प्रस्तावित नाट्यगृह (आसन क्षमता २२५)
चंद्रशेखर ऑडिटोरियम, पुणे विद्यापीठ परिसर(पुणे)
ज्योत्स्ना भोळे सभागृह
चव्हाण नाट्यगृह, अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई (आसनसंख्या ९२८)
चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव (आता पाडून टाकले.)
छबिलदास रंगमंच, दादर, मुंबई; (आसनसंख्या ७००)
छाया तमाशा थिएटर, सोलापूर
जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह, घोले रोड (पुणे).
पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल, कॅन्टॉनमेन्ट (पुणे). (आसनसंख्या २२५)
जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्या २५०)
जैन संघ, कोथरूड (पुणे)
जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
ज्योत्स्ना भोळे रंगमंच, हिराबागेजवळ, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी छोटे नाट्यगृह)
झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
झवेरभाई पटेल सभागृह ,(कर्नाटक संघ, विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम (मुंबई), (आसनसंख्या ७७४)
टाटा थिएटर (एन्.सी.पी.ए.), नरीमन पॉइन्ट, मुंबई
टिंबर भवन , यवतमाळ
टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड(पुणे) (आसनसंख्या ९००)
प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई (बोरीवली नाट्यगृह या नावाने अधिक परिचित)
तमिळ संघम्(षण्मुखानंद),माटुंगा
तापडिया नाट्यमंदिर, औरंगाबाद
संत तुकाराम नाट्यमंदिर (प्रचलित नाव सिडको नाट्यगृह), औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाट्यगृह, औरंगाबाद
तेजपाल ऑडिटोरियम, गोवालिया टॅंक, मुंबई
तेंडुलकर रेस्टॉरन्ट्स हॉल, मुंबई
मास्टर दत्ताराम नाट्यगृह, फोंडा, गोवे.
दमाणी सभागृह (सोलापूर. येथे आता नाटके होत नाहीत.)
दर्शन हॉल , चिंचवड
दादासाहेब गायकवाड, नाशिक
दादासाहेब सरदेशपांडे (खुले?) नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा). हे नाट्यगृह बंद पडले आहे?
दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
दीनानाथ नाट्यगृहर, विलेपार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
दीनानाथ सभागृह, पणजी (गोव्याच्या कला अकादमीतला एक रंगमंच)
देवांग मेहता ऑडिटोरियम, सेनापती बापट रस्ता, पुणे
पु.ल. देशपांडे नाट्यगृह, आकुर्डी (पुणे) (आसनक्षमता १००० - बांधकाम चालू)
नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, कोपरगाव (अहमदनगर जिल्हा)
नटराज नाट्यकला मंडळाचे नाट्यगृह, (बारामती) या नाट्यगृहात २९-४-२००१ रोजी हेमंत एदलाबादकर यांनी ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग सलग २८ तास ३० मिनिटे सादर केला.
नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
नॅशनल कॉलेजशेजारचे खुले नाट्यगृह, वांद्रे, मुंबई
नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
बॅ. नाथ पै रंगमंच (छोटे नाट्यगृह), पुणे (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
ॲड. नाना लिमये रंगमंच (अलिबाग) : सहकारी तत्त्वावर उभारलेले नाट्यगृह
निर्मलकुमार फडकुले नाट्यगृह, सोलापूर
निळूभाऊ फुले रंगमंदिर (पिंपळे गुरव-नवी सांगवी-पुणे)
नूतन मराठी विद्यालय, पुणे
नेहरू मेमोरियल हॉल,पुणे
नेहरू सेंटर, हाजी अली, वरळी, मुंबई
पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
पत्रकार भवन, पुणे
परशुराम सायखेडकर, नाशिक
पलुस्कर सभागृह, पंचवटी(नाशिक)
पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह), कोल्हापूर्
पाटकर हॉल , सर विठ्ठलदास ठाकरसी मार्ग, मरीन लाइन्स(मुंबई)
पाटोळे नाट्यगृह, मलकापूर
पाटोळे नाट्यगृह, खामगाव
पुरंदरे नाट्यगृह, पंढरपूर
पु.ल. देशपांडे सभागृह (पु.ल.देशपांडे कला अकादमी -रविंद्र नाट्य मंदिर),
पिंपळे गुरव नाट्यगृह, पिंपरी-चिंचवड (बांधकाम चालू -आसनसंख्या ५१८)
पुरंधरे यांचे नाट्यगृह, पंढरपूर
पृथ्वी थिएटर, जुहू चर्च रोड, मुंबई(आसनसंख्या २२०) (शिवाय एक खुला रंगमंच)
पै ट्रियाट्रिस्ट हॉल, मडगाव, गोवा
बॅ. नाथ पै नाट्यमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसठी छोटे नाट्यगृह) (आसनसंख्या १०० खुर्च्या आणि ७५ लोकांसाठी भारतीय बैठक)
पैसाफंड हायस्कूल रंगमंदिर, संगमेश्वर (रत्नागिरी जिल्हा)
प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली (पश्चिम), मुंबई
प्रबोधनकार ठाकरे मिनी थिएटर, बोरीवली(प), मुंबई
प्रबोधनकार ठाकरे खुला रंगमंच, शिवडी, मुंबई
प्रमिलाताई ओक सभागृह(खासगी), अकोला
प्रियदर्शिनी खुले नाट्यगृह, श्रीरामपूर (अहमदनगर जिल्हा)
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
फर्ग्युसन कॉलेजचे अॅम्फी थिएटर, पुणे
फाइन आर्ट्स,चेंबूर, मुंबई
महात्मा फुले नाट्यगृह, वानवडी (पुणे) (आसनसंख्या ७५० की ८१५?)
[[सावित्रीबाई फुले[[ नाट्यगृह, डोंबिवली.
सावित्रीबाई फुले सभागृह, गंज पेठ (पुणे). (आसनक्षमता ४७५)
बाकानेर, नागपूर
बागडे नाट्यगृह, अहमदनगर
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का (पुणे)
बालगंधर्व खुले नाट्यगृह, जळगाव
बालगंधर्व, नगरपालिकेचे खुले नाट्यगृह, धुळे
बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज(पुणे) (आसनसंख्या ९९०)
बालगंधर्व, मिरज
बालप्रसार, नागपूर
बालमोहन, शिवाजी पार्क(मुंबई)
बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, पुणे
बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, कोथरूड, पुणे (आसनसंख्या ३८४)
बिर्ला क्रीडा केंद्र, गिरगाव चौपाटी(मुंबई); (आसनसंख्या ६१७)
बिर्ला मातुश्री, मरीन लाइन्स(मुंबई); (आसनसंख्या११६२)
बी.एन.वैद्य हॉल, हिंदू कोलनी (मुंबई)
बुरीबेन गोळवाला, घाटकोपर (मुंबई)
बोरीवली नाट्यगृह, मुंबई
ब्रह्मानंद, नाशिक
भरत नाट्यमंदिर, डोंबिवली
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ(पुणे)
भवभूती रंगमंदिर, गोंदिया
भाईदास, पार्ले, मुंबई; (आसनसंख्या ११५७)
भागवत चित्र मंदिर (सोलापूर. आता नाट्यप्रयोग होणे बंद झाले)
भारत भवन, खुले आणि बंदिस्त नाट्यगृहे, भोपाळ
भारतीय विद्या भवन, गिरगाव चौपाटी, मुंबई; (आसनसंख्या ५००)
भालेराव (साहित्य संघ), गिरगाव, मुंबई
भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
पं. भीमसेन जोशी कलामंदिर, औंध, पुणे (आसनसंख्या ५००)
भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
महालक्ष्मी तमाशा थिएटर, बार्शी
मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना
माहीम म्युनिसिपल स्कूल सभागृह, मुम्बई
माणिक सभागृह, वांद्रे रिक्लेमेशन,मुंबई; (आसनसंख्या ८००)
मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
मीनाताई ठाकरे, भिवंडी
मुक्त आकाश रंगमंच, मुंबई विद्यापीठ प्रांगण, कलिना, मुंबई
मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
मेघदूत खुले नाट्यगृह, दिल्ली
कवी मोरोपंत नाट्यगृह, बारामती
म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अहमदनगर
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड(पुणे) (आसनसंख्या ८९३)
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बॉम्बे रेक्लमेशन, मुंबई; हे नाट्यगृह ११८ बाय १६७ फूट या मापाचे असून त्याची उंची ३४ फूट आहे. आत एक ६७ बाय २६ फुटाची बाल्कनी आहे. नाट्यगृहात एकूण ९२८ बैठक व्यवस्था आहेत. नाट्यगृहाच्या पुढील बाजूस ५६ बाय १९ फुटाचे फॉयर असून त्याचप्रमाणे बाल्कनीतही त्या मापाचे फॉयर आहे. नाट्यगृहाचे स्टेज ६७ बाय २६ फुटाचे आहे. नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस उपहारगृह व ११५ बाय २५ फुटाचे ओपन टेरेस आहे. साऊंड, लाइट आदी सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी तेथे करण्यात आलेल्या आहेत.
यशवंत नाट्यमंदिर, मनमाला टॅंक रोड, माटुंगा, मुंबई
रंगभवन खुले नाट्यगृह, धोबी तलाव, मुंबई (आता हे नाट्यगृह बंदिस्त झाले\बंद झाले!)
रंगशारदा, वांद्रे रिक्लेमेशन, मुंबई (आसनसंख्या ८११)
रघुवीर, नागपूर
रमणबाग, पुणे
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई;(आसनसंख्या ९११)
रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, (पु.ल.देशपांडे कला अकादमी), प्रभादेवी, मुंबई (आसनसंख्या १९९)
रवींद्र भवन, मडगाव, गोवा
रशियन सांस्कृतिक केंद्र, पेडर रोड, मुंबई
रसिक रंजन नाट्यगृह, दापोली (रत्नागिरी जिल्हा)
राजीव गांधी कला मंदिर, फोंडा, गोवा
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे) (आसनसंख्या १२००)
राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
लक्ष्मी नारायण बाग हॉल, शिवाजी पार्क, मुंबई १६
लक्ष्मीप्रसाद, कोल्हापूर (बंद झाले)
लक्ष्मीविलास, जळगाव (आता बंद पडले असावे)
लेडी रमाबाई हॉल, एस. पी.कॉलेज(पुणे)
वरेरकर नाट्य संघाचे महावीर मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर
वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती
वागळे हॉल, खाडिलकर रोड, गिरगाव, मुंबई
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल (आसनसंख्या ७००)
विजय तेंडुलकर नाट्यगृह, सहकारनगर (पुणे) गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह
विजयानंद, धुळे
विजयानंद, नाशिक
विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर (कर्नाटक संघ, झवेरभाई पटेल सभागृह), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
विष्णूदास भावे, वाशी, नवी मुंबई (आसनसंख्या ८००)
वि़ष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली
वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर, अमरावती
शांतादुर्गा, कणकवली
शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर (या नाट्यगृहाचे नाव 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह' असे ठेवण्याची मागणी फेटाळली गेली)
शाहू नाट्य मंदिर, नंदुरबार
शाहू महाराज नाट्यगृह, हडपसर (पुणे) (निर्माणाधीन)
शाहू स्मारक मंदिर, कोल्हापूर
शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
शिवाजी मंदिर, दादर, मुंबई; (आसनसंख्या १०३२)
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, राजापूर (रत्नागिरी जिल्हा) (आसनसंख्या ४५०)
छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन (सोलापूर)
श्रीराम, अकोले(विदर्भ)
षण्मुखानंद(तमिळ संघम्), माटुंगा(मुंबई)
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृतिभवन, शंकरनगर-अकलूज (जिल्हा सोलापूर)
संगीत नाट्यगृह, सोलापूर
सदासुख नाट्यगृह, सांगली (बंद झाले)
सर्वेश, डोंबिवली
साई सभागृह , नागपूर
साठ्ये कॉलेज हॉल, विले पार्ले, मुंबई
सायखेडकर, नाशिक
सायंटिफिक हॉल, नागपूर
सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
सावित्रीबाई फुले, डोंबिवली
साक्षी गॅलरी, लोअर परेल, मुंबई
साहित्य संघ मंदिर, गिरगांव, मुंबई (आसनसंख्या ८००)
सिडको नाट्यगृह, (नवीन नाव : संत तुकाराम नाट्यगृह), औरंगाबाद
सुदर्शन रंगमंच, पुणे (प्रायोगिक नाटकांसाठी अहिल्यादेवी प्रशालेजवळचे छोटे नाट्यगह)
सुरेश भट सभागृह , रेशीमबाग, नागपूर
सुयोग सोसायटी, मुंबई
सेन्ट ॲन्ड्ऱ्यूज कॉलेज सभागृह, वांद्रे (पश्चिम), मुंबई
सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई (आसनसंख्या ८१८)
स्नेहसदन, पुणे
हनुमान तमाशा थिएटर, लालबाग (बंद झाले)
हनुमान नाट्यगृह, म्हापसा, गोवा
हॅपी कॉलनी हॉल, कोथरूड (पुणे)
हॉर्निमन सर्कल गार्डन,मुंबई (खुले नाट्यगृह)
हिंदुजा ऑडिटोरियम, गिरगाव, मुंबई;(आसनसंख्या ६४१)
हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
हैदरी तमाशा थिएटर, जळगाव
होमी भाभा सभागृह, नेव्हीनगर, मुंबई; (आसनसंख्या १०३०)
ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृह, मोर्शी रोड, अमरावती
पुण्यातली जुनी बंद झालेली नाट्यगृहे
आनंदोद्भव, पुणे
आर्यभूषण तमाशा थिएटर, पुणे
किर्लोस्कर, पुणे
नटराज रंगमंदिर, पुणे
पूर्णानंद, पुणे. येथे संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी झाला होता.
बहुरूपी मंदिर, पुणे
बाजीराव, पुणे
भानुविलास (आता तेथे भानुविलास चित्रपटगृह आहे), पुणे
महाराष्ट्रीय मंडळ, पुणे
ललकार, पुणे
लक्ष्मीविलास, पुणे
किबे नाट्यगृह (नंतरचे लिमये नाट्यचित्रमंदिर, आता विजय टॉकीज), पुणे
वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे
सरस्वती मंदिर, पुणे
मुंबईतील जुनी बंद झालेली तमाशा थिएटरे व नाट्यगृहे
ऑपेरा हाउस (तिथे नंतर न्यू ऑपेरा हाउस चित्रपटगृह), गिरगांव
एम्पायर
एली कदूरी हायस्कूलसमोरचे थिएटर, माझगांव
कॉरोनेशन
केळीच्या वखारीशेजारचे थिएटर, भायखळा (पश्चिम)
कृष्ण थिएटर
गुलशन थिएटर(तिथे आता त्याच नावाचे चित्रपटगृह)
गेइटी
ग्रॅन्ड
डिलाइल रोड थिएटर
ताज थिएटर
दौलत थिएटर, बटाट्याच्या चाळीसमोर, पिला हाउस
नायगाव थिएटर
नॉव्हेल्टी (आता तेथे नॉव्हेल्टी चित्रपटगृह), ग्रॅन्ट रोड
न्यू एलफिन्स्टन थिएटर, ग्रॅन्ट रोड
न्यू हनुमान थिएटर, लालबाग (आता तिथे ‘न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय’)
पलटण रोड थिएटर (क्रॉफर्ड मार्क्रेटजवळ)
प्रिन्सेस
बालीवाला थिएटर (तिथे आता आल्फ्रेड चित्रपटगृह), पिला हाउस
बॉम्बे थिएटर, पिला हाउस
बीडीडी चाळीजवळचे थिएटर , वरळी
भांगवाडी थिएटर, काळबादेवी
रंगमंदिर, दादर (या जागेवर नंतर ’शारदा’ चित्रपटगृह झाले.)
राणीच्या बागेतले खुले थिएटर
रॉयल थिएटर (आता चित्रपटगृह), पिला हाउस
रिपन थिएटर (आताचे रोशन चित्रपटगृह),पिला हाउस
लोकमान्य थिएटर
वडाचा नाका थिएटर (दीपक टॉकीजशेजारी, ग्लोब मिल पॅसेज, वरळी)
व्हिक्टोरिया थिएटर, ग्रॅंट रोड
शिवानंद थिएटर, प्लाझा टॉकीजमागे, दादर
सैतान चौकीजवळचे थिएटर
विदर्भातली बंद झालेली नाट्यगृहे
धनवटे रंग मंदिर, नागपूर
बोके इंद्रभुवन नाट्यगृह, अमरावती
अन्य गावांतील बंद झालेली नाट्यगृहे
आनंदी निधान, गांधी मैदानाजवळ, अहमदनगर
चिंदोडी लीला रंगमंदिर, बेळगाव
दीनानाथ नाट्यगृह, सांगली
पुरुषोत्तम स्मृती नाट्यगृह, रत्नागिरी
बागडे थिएटर, चितळे रोड, अहमदनगर
मेढे यांचे शनिवार नाट्यगृह, कोल्हापूर
लक्ष्मीप्रसाद नाट्यगह, कोल्हापूर
शिवाजी नाट्यगृह, कोल्हापूर
सदासुख, सांगली (हे नाट्यगृह १८८७मध्ये बांधले होते)
हंसप्रभा, सांगली (हे नाट्यगृह १८९७मध्ये बांधले होते) त्या जागी आता (नवे) बालगंधर्व नाट्यगृह आहे.
हनुमान नाट्य मंदिर, दाभोळ
प्रसिद्ध मराठी नाटककार
शफ़ाअत खान
प्रा. दत्ता भगत
जयवंत दळवी
दिलीप परदेशी
पु.ल. देशपांडे
प्रेमानंद गज्वी
बशीर मोमीन (कवठेकर)
महेश एलकुंचवार
डॉ. रंजन दारव्हेकर
रत्नाकर मतकरी
वसंत कानेटकर
विजय तेंडुलकर
वि. वा. शिरवाडकर
श्याम मनोहर
सतीश आळेकर
नाटककार
नाटके लिहिणाऱ्या लेखकांमध्ये पुरुष नाटककारांची संख्या तीनशेहून बरीच अधिक आहे. प्रसिद्ध स्त्री नाटककारांची संख्या मात्र साठाहून अधिक नसावी. नाट्यलेखन करणाऱ्या काही लेखिका :
अनसूया वाघ
आनंदीबाई किर्लोस्कर
इंदिराबाई पेंडसे
इंदुमती देशमुख
इरावती कर्णिक
उमाबाई सहस्रबुद्धे
कमलाबाई टिळक
कविता नरवणे
काशीबाई फडके
कुसुम अभ्यंकर
कृष्णाबाई मोटे
गिरिजाबाई माधव केळकर
चंद्राबाई शिंदे
ज्योती म्हापसेकर
ज्योत्स्ना देवधर
ज्योत्स्ना भोळे
द्वारका दत्तात्रेय गुप्ते
नलिनी सुखटणकर
नीलकांती पाटेकर
पद्मा गोळे
भागीरथीबाई वैद्य
मधुगंधा कुलकर्णी
मनस्विनी लता रवींद्र
मनोरमाबाई लेले
माई वरेरकर
माधुरी पुरंदरे
माया पंडित
मालती तेंडुलकर
मालती मराठे
मालतीबाई दांडेकर
मालतीबाई बेडेकर
मुक्ताबाई दीक्षित
योगिनी जोगळेकर
रचेल गडकर
लीला चिटणीस
वनिता देसाई
वसुंधरा पटवर्धन
वसुधा पाटील
विभावरी देशपांडे
विमल काळे
विमल घैसास
शकुंतला परांजपे
शिरीष पै
सई परांजपे
सरिता पदकी
सुधा साठे
सुधा करमरकर
सुमतीबाई धनवटे
सुषमा देशपांडे
हिराबाई पेडणेकर
क्षमाबाई राव
यांशिवाय काही नवोदित लेखिकाही आहेत.
भाषांतरित-रूपांतरित नाटके
नोबेल पुरस्कारप्राप्त लुइजी पिरांदेल्ली (१८६७ ते १९३६) या इटालियन नाटककाराच्या ’सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ऑथर’ या नाटकाचे माधव वाटवे यांनी केलेले ’नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ हे मराठी रूपांतर. २५ ऑगस्ट १९६७ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाने या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत सादर केला. ’टीपॉट’ नावाच्या एका नाटक कंपनीनेही हे नाटक २०१४साली रंगमंचावर सादर केले आहे.
हे सुद्धा पहा
विल्यम शेक्सपियर
आक्षेप घेतलेली नाटके
सरकारने, विविध संघटनांनी आणि व्यक्तींनी नाटकाच्या नावावर, कथानकावर किंवा कथानकाच्या काही भागांवर आक्षेप घेऊन बंद पाडलेली किंवा बंद पाडायचा प्रयत्न केलेली काही नाटके :
’आग्ऱ्याहून सुटका’ आणि ’बेबंदशाही’ या नाटकांत शिवाजीला टाळ्या मिळत असल्याने नाटकांवर बंदी येण्याची शक्यता निर्माण झाली, म्हणून नाटकाचे लेखक औंधकर यांनी शिवाजीपेक्षा औरंगजेबाचे महत्त्व वाढवून प्रयोग पुढे चालू ठेवले.
एक चावट संध्याकाळ (नाटक फक्त प्रौढांसाठी असल्याने स्त्रियांना आयोजकांनी मनाई केली)(बोरीवली नाट्यगृहाची बंदी)(मुंबई महापालिकेचीही बंदी)
संगीत कीचकवध (लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर). या नाटकावर ब्रिटिशांनी २७ जानेवारी १९१० रोजी बंदी घातली. (नाटकातील कीचक म्हणजे इंग्रज अधिकारी कर्झन या कल्पनेमुळे)
कुलवधू नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी या नाटकात पाचवारी साडी नेसली होती म्हणून वाद झाले होते.
गणपतीबाप्पा मोरया (लेखक योगेश सोमण). याच नावाचे वेगळ्या लेखकाचे एक बालनाट्यही आहे, त्यावर आक्षेप नव्हता.
गांधी विरुद्ध गांधी (लेखक अजित दळवी). गांधीच्या नावाचा तथाकथित दुरुपयोग. आक्षेप टिकला नाही.
घाशीराम कोतवाल (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात नाना फडणिसांचे तथाकथित विकृतीकरण केल्यावरून नाटकावर आक्षेप घेतला गेला होता.
पती माझे छत्रपती (संजय पवार). छत्रपती या शब्दाने शिवाजीची बदनामी होते म्हणून आरडाओरडा झाल्यावर, ह्या नाटकाचे आता ’पती माझे छत्रीपती‘ या नावाने प्रयोग होतात.
जय भीम, जय भारत या नाटकातल्या ’खैरलांजी’, कुत्रे’, ’रमाबाईनगर’ आदी शब्दांना परिनिरीक्षण मंडळाने हरकत घेतली आहे; या शब्दांऐवजी अनुक्रमे वैरांजली, श्वान, मीराबाईनगर असे शब्द वापरावेत अशी त्यांची सूचना आहे.
बंधविमोचन (लेखक गोपाळ गोविंद सोमण) (ब्रिटिश सरकारच्या सचिवाच्या आज्ञेवरून मुंबई पोलीस आयुक्तांनी या नाटकावर अनौपचारिक बंदी घातली होती.)
संगीत भातुकलीचा खेळ (लेखक धोंडो रामचंद्र करमरकर ) या बालनाट्यावर तत्कालीन इंग्रज सरकारने बंदी घातली होती.
मी नथुराम गोडसे बोलतोय (लेखक प्रदीप दळवी). नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप. नाटकात शरद पोंक्षे यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकाचे ८००हून अधिक प्रयोग झाले आहेत.
यदाकदाचित (संजय पवार). नाटकात देवदेवतांचे विकृत चित्रण आहे हा आक्षेप होता. कुठल्या तरी गावात हिंदू जागरण मंचाने हे नाटक बंद पाडले होते.
योनीमनीच्या गुजगोष्टी (बोरीवलीच्या नाट्यगृहाची बंदी) (ठाणे महापालिकेचीही बंदी). (कारण उघड आहे.)
संगीत राष्ट्रोद्धार (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या संहितेच्या प्रती गुप्तपणे वाटल्या गेल्या.)
वस्त्रहरण (लेखक गंगाराम गवाणकर). महाभारताची तथाकथित चेष्टा करण्यावरून.
विजयतोरणा (या नाटकाच्या १५ कलाकारांना ब्रिटिश सरकारने एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.)
शॅंपेन आणि मारुती (लेखक विवेक बेळे) या नाटकाचे नाव बदलून ’माकडाच्या हाती शॅंपेन’ असे करावे लागले. (१९ व्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक मराठी नाट्यस्पर्धेले सर्वोत्कृष्ट नाटकाचे बक्षीस मिळालेले नाटक).
शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (लेखक संभाजी (की राजकुमार?) तांगडे-भीमनगर शब्दाबद्दल नांदेड पोलिसांचा आक्षेप)- नाटकाचे परीक्षण {http://artnviews.com} वर वाचता येईल). नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर). नाटकात साडी बदलण्याचे एक दृश्य होते. न्यायाधीशांनी ते पाहून नाटकावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली.
स्वदेशी नाटक -१९०६ (लेखक गणेश बल्लाळ फणसाळकर) (सरकारी बंदी) (प्रयोगावर बंदी आल्यानंतर नाटकाच्या प्रती नाममात्र किमतीला विकल्या गेल्या.)
हे राम नथुराम : (लेखक-दिग्दर्शक-अभिनेते शरद पोंक्षे). या नाटकाविरुद्ध कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने करण्यात आली. (१९-१२-२०१६). संभाजी ब्रिगेड आणि स्वाभिमानी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनीनीही औरंगाबादमधील संत तुकाराम नाट्यगृहाबाहेर आणि आत हे राम नथुराम या नाटकाविरुद्ध उग्र निदर्शने केली (२१-१-२०१७). तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने या कार्यकर्त्यांना चोपून काढले. दंगल करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर नाटक पुन्हा सुरू झाले.
परिनिरीक्षण मंडळ
कोणत्याही नाटकाचा प्रयोग करावयाचा असेल तर त्या नाटकाच्या संहितेच्या दोन प्रती. महाराष्ट्र राज्य परिनिरीक्षण मंडळाला सादर कराव्या लागतात. या सेन्सॉर बोर्डाचे दोन प्रतिनिधी ही संहिता वाचून त्याविषयीचा अभिप्राय बनवतात. मंडळाच्या अध्यक्षांची सही झाल्यावर एक प्रमाणपत्र आणि डीआरएम क्रमांक दिला जातो. हे प्रमाणपत्र किंवा हा क्रमांक नसेल तर नाटकाचा प्रयोग रंगभूमीवर करता येत नाही.
मात्र, महाराष्ट्र नाट्य-परिनिरीक्षण मंडळाची स्थापना १९९०मध्ये झाली असल्याने,. जर नाटक इ.स. १९९० पूर्वीचे असेल तर त्याचे परिनिरीक्षण करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला नाही. ते नाटक डीआरएम क्रमांकाशिवाय सादर करता येते.
मराठीतली काही बोल्ड नाटके
ॲग्रेसिव्ह (लेखक निनाद शरद शेट्ये)
अवध्य (लेखक चि.त्र्यं. खानोलकर)
एक चावट मधुचंद्र (लेखक रमेश वारंग)
एक चावट संध्याकाळ (लेखक अशोक पाटोळे)
गुपीत योनींच्या गुप्त गोष्टी (लेखिका सोनिया चौधरी, दिग्दर्शक विक्रम पाटील)
गेली एकवीस वर्षे (धर्मकीर्ती सुमंत)
चावट शेजारी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
त्या चार योनींची गोष्ट (मूळ कथा-Vagina, the Shadow of a Lady; मराठीलेखन दिग्दर्शन नितिनकुमार)
दोन बायका चावट ऐका (लेखक सुदेश म्हशीलकर, संतोष कोचरेकर)
नशिल्या मुलीची मदमस्त कहाणी (लेखक-दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी)
मात्र रात्र (मूळ इंग्रजी Bradley Hayward's romantic comedy, LEGITIMATE HOOEY; मराठी अनुवाद सागर देशमुख)
म्युझिक सिस्टिम (दिग्दर्शक विजय केंकरे)
नाटक नको (लेखक धर्मकीर्ती सुमंत)
योनीमनीच्या गुजगोष्टी (मूळ इंग्रजी नाटक Vagina Monologues, लेखिका ईव्ह एन्स्लर, मराठी रूपांतर वंदना खरे)
सखाराम बाईंडर (लेखक विजय तेंडुलकर)
पाचशेहून अधिक प्रयोग झालेली नाटके
नाटकाचे नाव लेखक शेवटच्या ज्ञात प्रयोगाची क्रमसंख्या त्या प्रयोगाची तारीखअवघा रंग एकचि झालाडॉ. मीना नेरूरकर>३०० २०१३अश्या बायका तश्या बायका मधुसूदन घाणेकर५००मार्च २०१३आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका भक्ती बर्वे) अशोक पाटोळे७५० ॑॑॑॑॑आई रिटायर होतेय (प्रमुख भूमिका स्मिता जयकर) अशोक पाटोळे११२१३-९-२०१४इथे ओशाळला मृत्यू वसंत कानेटकर****** ॑॑॑॑॑एका लग्नाची गोष्ट श्रीरंग गोडबोले१५०६३०-१-२००५संगीत एकच प्याला राम गणेश गडकरी****** ॑॑॑॑॑कचऱ्या हिंदुस्थानी (एकपात्री) रमेश थोरात७६९१२-१०-२०११कट्यार काळजात घुसली पुरुषोत्तम दारव्हेकर****** ॑॑॑॑॑कथा अकलेच्या कांद्याची शंकर पाटील****** ॑॑॑॑॑करायला गेलो एक बाबूराव गोखले****** ॑॑॑॑॑कुलवधू मो.ग. रांगणेकर>२००० ॑॑॑॑॑कुटुंब रंगलंय काव्यात (एकपात्री नाट्यानुभव) विश्वनाथ श्रीधर तथा विसुभाऊ बापट२२५०१७-७-२०११कुर्यात् सदा टिंगलम् शिवराज गोर्ले>१२००ऑक्टोबर २०११खळखळाट (एकपात्री) बंडा जोशी१००२२ एप्रिल २०१४गारंबीचा बापू श्री.ना. पेंडसे****** ॑॑॑॑॑गुंतता हृदय हे शं.ना. नवरे****** ॑॑॑॑॑गेला माधव कुणीकडे वसंत सबनीस१७५०२३-३-२०१३गोकुळचा चोर नानासाहेब शिरगोपीकर****** ॑॑॑॑॑गोलमाल शिवराज गोर्ले१००२-३-२०१३घाशीराम कोतवाल विजय तेंडुलकर१८५०१८-१-२०१२घोटभर पाणी (एकांकिका) प्रेमानंद गज्वी३००१२६-५-२०१२चार दिवस प्रेमाचेरत्नाकर मतकरी१०२६?जाणता राजाबाबासाहेब पुरंदरे१२५१२७-२-२०१३जांभूळ आख्यानविठ्ठल उमप>७००२६-११-२०१२ज्याचा त्याचा प्रश्नअभिराम भडकमकर>४५०?झोपी गेलेला जागा झाला बबन प्रभू****** ॑॑॑॑॑टुरटूरपुरुषोत्तम बेर्डे५४३?तरुण तुर्क म्हातारे अर्क मधुकर तोरडमल****** ॑॑॑॑॑तुझे आहे तुजपाशी पु.ल.देशपांडे****** ॑॑॑॑॑तो मी नव्हेच आचार्य प्र.के.अत्रे>३०००१४-३-२०१२दिनूच्या सासूबाई राधाबाईबबन प्रभू****** ॑॑॑॑॑दिलखुलास (एकपात्री)स्वाती सुरंगळीकर२५०२५-५-२०१३दुरिताचे तिमिर जावो बाळ कोल्हटकर****** ॑॑॑॑॑नटसम्राट वि.वा.शिरवाडकर ११५१९-८-२०१५पंडितराज जगन्नाथ विद्याधर गोखले****** ॑॑॑॑॑प्रेमा तुझा रंग कसा? वसंत कानेटकर****** ॑॑॑॑॑ब्रम्हचारीआचार्य अत्रे५०३१९८६संगीत भावबंधन राम गणेश गडकरी****** ॑॑॑॑॑मराठी पाऊल पडते पुढे (मराठमोळ्या गीत-नृत्यांचा कार्यक्रम) उदय साटम (दिग्दर्शक)२७००९-१०-२०१२संगीत मानापमान कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर****** ॑॑॑॑॑मिस्टर ॲन्ड मिसेस अस्लम परवेझ व निलेश रूपापारा१११२४-८-२०१४मी जोतीराव फुले बोलतोय ... ? ...६८० (?)२७-६-२०१२मी नथूराम गोडसे बोलतोय प्रदीप दळवी८१७जानेवारी २०१६मोरूची मावशी आचार्य प्र.के.अत्रे१३३०१९८५यदा कदाचित संतोष पवार३६००इ.स. २०००रमाई प्रभाकर दुपारे५०१२१-४-२०११रायगडाला जेव्हां जाग येते वसंत कानेटकर२५२०२९-३-२०१५लग्नाची बेडी आचार्य प्र.के.अत्रे>५००० ॑॑॑॑॑लावणी भुलली अभंगाला जगदीश दळवी >२००० ॑॑॑॑॑लोच्या झाला रे केदार शिंदे>१०००या नाटकावरून चित्रपट बनला.वऱ्हाड निघालंय लंडनला लक्ष्मण देशपांडे>>२००० ॑॑॑॑॑वस्त्रहरण गंगाराम गव्हाणकर५०००२१-११-२००९वाटेवरती काचा गं (बाहुली नाट्य) डाॅ.अनिल बांदिवडेकर>५०० ॑॑॑॑॑वाहतो दुर्वांची ही जुडी बाळ कोल्हटकर>१०००..?..विच्छा माझी पुरी करा वसंत सबनीस****** ॑॑॑॑॑व्यक्ती आणि वल्लीपु.ल. देशपांडे>४५२ २०१३शंभूराजे सुरेश चिखले३३३२१-३-२०१३शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला राजकुमार तांगडे२२४२७-७-२०१३श्रीमंत दामोदरपंत केदार शिंदे३५०३५० प्रयोगानंतर नाटकाची सीडी बनली आणि नंतर सिनेमासंगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर****** ॑॑॑॑॑संगीत शारदा गोविंद बल्लाळ देवल****** ॑॑॑॑॑सबकुछ मधुसूदन (इ.स. १९६३पासून सुरू असलेला एकपात्री मनोरंजक कार्यक्रम) २००००मार्च २०१३संगीत संशयकल्लोळ गोविंद बल्लाळ देवल****** ॑॑॑॑॑सही रे सही केदार शिंदे>१००० ॑॑॑॑॑सासूबाईंचं असंच असतं आचार्य प्र.के.अत्रे****** ॑॑॑॑॑संगीत सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्कर****** ॑॑॑॑॑संगीत स्वयंवर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर****** ॑॑॑॑॑हसवाफसवी ;;दिलीप प्रभावळकर]]केदार शिंदे७५०७५०नंतर प्रयोग थांबवले.
दुहेरी तिहेरी भूमिका
एकाच नाटकात किंवा एकाच एकपात्रीत अभिनेते एकाहून अधिक भूमिका करत आले आहेत, अशी काही नाटके, व त्यांतील अभिनेत्याचे नाव :
गंमत जंमत (विविध भूमिका, अरुण नलावडे)
गंमत जंमत (विविध भूमिका, रसिका ओक)
गंमत जंमत (विविध भूमिका, सोनाली चेऊलकर)
चूक भूल द्यावी घ्यावी (तीन भूमिका, राजाभाऊंच्या सासूबाई/राजाभाऊंची मैत्रीण/दाक्षिणात्य शेजारीण, निर्मिती सावंत)
जस्ट हलकं फुलकं (सहा भूमिका, सागर कारंडे)
जेव्हा यमाला डुलकी लागते (दोन भूमिका, सुधा करमरकर)
तो मी नव्हेच
थरार (२, सतीश पुळेकर)
बहुरूपी सदा इंगवले (२, प्रशांत दामले)
बहुरूपी प्रशांत दामले (२, प्रशांत दामले)
बे दुणे पाच (पाच भूमिका, प्रशांत दामले)
मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी (२, हिटलर/हिटलरचा तोतया, पुरुष कलाकार)
रणांगण (२ किंवा ३, स्त्री कलाकार)
रथचक्र (दोन, रोहिणी हट्टंगडी)
व्हॉटस युअर राशी? (हिंदी चित्रपट. १२ भूमिका, प्रियांका चोप्रा)
शंभु माझा नवसाचा (मराठी चित्रपट, १२ भूमिका, राजेश शृंगारपुरे)
सही रे सही (तीन, भरत जाधव)
हलकं फुलकं (विविध भूमिका, रसिका ओक)
हलकं फुलकं (विविध भूमिका, विजय कदम)
हसवाफसवी (सहा भूमिका - चिमणराव जोग/प्रिन्स वांटुंग पिन पिन/ नाना पुंजे/
पटेल/ लुमुम्बा/बॉबी मॉड/कृष्णराव हेरंबकर, दिलीप प्रभावळकर)
नाटक या विषयावरील मराठी पुस्तके
नाट्य निर्मिती (ले.यशवंत केळकर,परिमल प्रकाशन औरगाबाद)
अॅबसर्ड थिएटर (माणिक कानेड)
अस्ताई (केशवराव भोळे)
आताची नाटके (राजीव नाईक)
Indian English Drama (इंग्रजी, ॲटलांटिक पब्लिशर्स)
इब्सेन : व्यक्ती व नाटक (अनिरुद्ध कुलकर्णी)
एकपात्री प्रयोग : स्वरूप आणि कलारूप (डॉ. मधुरा कोरान्ने)
एका खेळियाने (दिलीप प्रभावळकर) : किमान पाच आवृत्या; प्रभावळकरांच्या भूमिकांवरील लेखसंग्रह.
ऐतिहासिक मराठी नाटक (भीमराव कुळकर्णी)
कथा दोन सोंगाड्यांची (सोपान हरिभाऊ खुडे) : गायक दत्ता महाडिक आणि तमासगीर गुलाबराव बोरगावकर यांचे चरित्र)
कथारूप शेक्सपिअर (अनेक खंड, प्रभाकर देशपांडे साखरेकर)
कलावंतांच्या सहवासात (वसंत शांताराम देसाई)
कलेचे कटाक्ष (वसंत शांताराम देसाई)
कालमुद्रा मराठी नाट्यसृष्टीची (श्रीराम रानडे)
किर्लोस्कर आणि देवल (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई))
कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी (वसंत शांताराम देसाई)
खाडिलकरांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
खानोलकरांची नाट्यसृष्टी (डॉ. पुष्पलता राजापुरे-तापस)
खानोलकरांचे नाटक (डॉ. माधवी वैद्य)
गडकऱ्यांची नाट्यसृष्टी (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
चौकट दिग्दर्शनाची (कुमार सोहोनी)
'द थिएटर ऑफ द ॲबसर्ड (डाॅ. सतीश पावडे). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा २०१८ सालचा ना.गो. नांदापूरकर पुरस्कार मिळाला आहे.
दलित रंगभूमी आणि नाटक (बबन भाग्यवंत)
दलित रंगभूमी आणि नाट्यचळवळ (डॉ. मधुकर मोकाशी)
दळवींची नाटके : एक अंतर्वेध (डॉ. स्वाती कर्वे)
दहाव्या रांगेतून (वसुंधरा काळे)
नट, नाटक आणि आपण (त्र्यं.वि. सरदेशमुख)
नट, नाटक आणि नाटककार (वसंत शांताराम देसाई)
नाटक : उमल आणि उमज (संपादक डाॅ. मुकुंद करंबेळकर)
नाटककाराची कला (अनुवादित, मूळ लेखक - जे.बी. प्रीस्टले; मराठी अनुवाद - व.ह. गोळे)
नाटकवाल्याचे प्रयोग (अतुल पेठे)
नाट्यकोश (वि.भा. देशपांडे)
नाट्यलेखन (एक क्ष-किरण): लेखक - श्रीनिवास भणगे
नाट्याक्षरे (मधुरा कोरान्ने),
पडद्यामागील किस्से (अरुण धाडीगावकर) :रंगमंचाच्या मागे घडलेले कलावंतांचे आणि नाटककारांचे काही भन्नाट किस्से.
बातचीत महेश एलकुंचवारांशी (आशिष राजाध्यक्ष, समीक बंडोपाध्याय, संजय आर्वीकर)
बालगंधर्व : व्यक्ती आणि कला (वसंत शांताराम देसाई)
‘बेगम बर्वे' विषयी (रेखा इनामदार साने)
बोलता...बोलता... (नाट्यविषयक मुलाखती, मधुरा कोरान्ने)
भरतमुनींचे नाट्यशास्त्र (सरोज देशपांडे)
भारतीय नाट्यप्रयोगविज्ञान (प्रा. अ.म. जोशी)
भारतीय प्रयोगकलांचा शास्त्रविचार (अमला शेखर, सरोज देशपांडे, शुभांगी बहुलीकर)
भारतीय रंगभूमीची परंपरा (डॉ. माया सरदेसाई)
मखमलीचा पडदा (वसंत शांताराम देसाई)
मराठी नाटक आणि डॉक्टर प्रतिमा (मधुरा कोरान्ने)
मराठी नाटक आणि रंगभूमी - विसावे शतक (वसंत आबाजी डहाके)
मराठी संगीत रंगभूमीची वाटचाल (श्रीपाद लाटकर)
महानगरी नाटके (२००० ते २०१०) - नाट्यपरीक्षणे, लेखक - कमलाकर नाडकर्णी
महाराष्ट्राची लोकनृत्य नाट्यधारा (हिरामण लांजे रमानंद)
रंगदर्शन (हिंदी नाट्यसमीक्षा, नेमिचन्द्र जैन)
रंगदर्शन (मौज प्रकाशन) या पुस्तकात काकासाहेब खाडिलकर ते जयंत पवार यांच्यापर्यंतच्या सात नाटकांच्या समीक्षासहित समाजातल्या प्रतिक्रियांची नोंद घेतली आहे.
रंगदेवतेचे आंग्लरूप : मुंबईतील अ-मराठी रंगभूमी (हिंदी-इंग्रजी नाटकांचा परीक्षणसंग्रह, लेखक - अविनाश कोल्हे)
रागरंग (वसंत शांताराम देसाई)
रिंगणनाट्य (सहलेखक राजू इनामदार)
ललितकलेच्या सहवासा-त (‘ललितकलादर्श नाटक मंडळी’मधील आठवणी, पु.श्री. काळे)
विद्याहरणाचे अंतरंग (नाट्यसमीक्षा, वसंत शांताराम देसाई)
विस्मरणात गेलेली नाटके (डॉ. अरविंद वामन कुलकर्णी) (शोधमूलक, विश्लेषणात्मक आणि चिकित्सक नाट्यसमीक्षा असणारा ग्रंथ. या ग्रंथात महात्मा फुले यांच्या ‘तृतीय नेत्र’ (१८५५) नाटकापासून पु. भा. डोंगरे यांच्या ‘संगीत चंद्रहास’(१९०३) नाटकापर्यंतच्या क्रमाने बारा महत्त्वाच्या नाटकांवर विस्तृत असे शोधसमीक्षालेख समाविष्ट आहेत. पद्मगंधा प्रकाशन)
संगीताने गाजलेली रंगभूमी (न.वि ऊर्फ बाबुराव जोशी)
संस्कृत नाट्यसृष्टी (गो.के. भट)
सहा शोकनाट्ये : कमला, राजा इडिपस, एकच प्याला, वेड्याचं घर उन्हात, संध्याछाया, सवाई माधवरावाचा मृत्यू ह्या नाटकांच्या पार्श्वभूमीवर एकूण शोकांतिकांचेच विश्लेषण (शशिकांत लोखंडे)
स्त्री नाटककारांची नाटके (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
स्त्री समस्या आणि आजचे नाटक (स्नेहवर्धन प्रकाशन, मधुरा कोरान्ने)
ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्म-दर्शने (प्रा. मधु पाटील)
हे सुद्धा पहा
महाराष्ट्रातील नाट्य संस्था,
नाट्यस्पर्धा,
एकपात्री नाटक,
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
संदर्भ
My Theatre -सुनील चांदूरकर यांचे संकेतस्थळ)
(Pune Theatre -पुणे थिएटर गाईड)
(Art n views -प्रदीप वैद्य यांचे संकेतस्थळ)
वर्ग:नाटक
वर्ग:लाल दुवे असणारे लेख |
मुम्बई | https://mr.wikipedia.org/wiki/मुम्बई | पुनर्निर्देशन मुंबई |
संस्कृत भाषा | https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृत_भाषा | इवलेसे|गीता
संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने इ.स. पूर्व काळात संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. त्यांना तत्सम शब्द म्हणतात. संस्कृतमधूनच उत्तर भारतीय भाषा जन्मल्या आहेत, म्हणूनच संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटले जाते.
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, देवभाषा, अमरभारती,इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले शिलालेख सर्वात प्राचीन आहेत, पण काही कालांतलरांने संस्कृत भाषेचे महत्त्व संपुष्टात आले व इसवी सन १२००नंतर संस्कृत भाषा प्रचलित झाली. आरुवर्तीय संस्कृत ही प्राचीन आहे आणि मेघवर्तिया संस्कृत ही प्राकृत नंतर विकसित झाली आहे.
कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. कवी कालिदासाचे मेघदूत हे खंडकाव्य, रघुवंशम्, कुमारसंभवम् आणि ऋतुसंहार ही महाकाव्ये, तसेच विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम् आणि मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.
संस्कृत भाषेची निर्मिती
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा
संस्कृत भाषेतील शब्द भांडार अतिशय समृद्ध आहे.धातूपासून शब्द,अनेक धतुसादिते आणि एका शब्दापासून अनेक शब्द अशी ही भाषा शब्द प्राचूर्याच्या शिखरावर दिसते.या भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक पर्यायी शब्द दिसून येतात.
जसे :-
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
संस्कृत भाषेत एकेका देवाला ही अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णूसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही अनेक जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम हे त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.
संस्कृत भाषेचे मुख्य वेगळेपण म्हणजे वाक्यातील शब्द मागे पुढे जरी झाले तरी त्याचा अर्थ बदलत नाही.
वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) याचं अर्थ निश्चिती मुळे ही भाषा अंतराल क्षेत्रात उपयोगी ठरू शकते.
एकात्म भारताची खूण
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. पाणिनी पाकिस्तानचा, आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती...
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत ही भारताची राजभाषा, (संपर्क भाषा) व्हावी असे वाटे.
सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. उदाहरणार्थ इंग्रजी मधील i am तर संस्कृत मध्ये अहं अशा अनेक भाषांमध्ये आणि संस्कृत मध्ये साम्य दिसते, यावरून सिद्ध होते की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे.
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.
मोगल आणि संस्कृत
मोगलांनाही संस्कृतचा अभ्यास करावासा वाटे असे सांगणारे पुस्तक ‘कल्चर ऑफ एन्काउन्टर्स – संस्कृत अॅट द मुघल कोर्ट’ लेखिका ऑड्रे ट्रश्क यांनी लिहिले आहे.
इतिहास
thumb|right
पूर्वी संस्कृत लोकभाषा असावी. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक मानतात.
संस्कृत ही सर्व भाषांची मातृभाष, आहे असे सुद्धा काही लोक मानतात .
लिपी
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखिते अनेक लिप्यांत लिहिलीले जात असत; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.
प्रणव
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.त्यात अ , उ , मचा समावेश केला आहे.
स्वर
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ
व्यञ्जने
क् ख् ग् घ् ङ्
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व् श्
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् (शेवटवी दोन जोडाक्षरे असली, तरी सातत्याने लागत असल्याने व्यंजने समजली जातात.)
उच्चारस्थाने
सूत्र - अकुहविसर्जनीयानां कण्ठः
कण्ठ्यवर्ण - अ क् ख् ग् घ् ङ् ह्
सूत्र - इचुयशानां तालुः
तालव्यवर्ण - इ च् छ ज् झ् ञ य् श्
सूत्र - ऋटुरषानां मूर्धा
रूपे आणि वाक्यशास्त्र
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.
उपसर्ग
संस्कृतभाषेत उपसर्ग आहेत. प्र हा पहिला असल्याने उपसर्गांना प्रादि (प्र+आदि) म्हणतात.
संस्कृत साहित्य
एके काळी भारताची ज्ञानभाषा संस्कृत होती. संस्कृत भाषेत भरपूर साहित्य निर्मिती झाली आहे. बाणभट्ट- कादंबरी; महाकवी कालिदास- अभिज्ञानशाकुन्तलम्, मेघदूत, कौटिल्य-अर्थशास्त्र, अश्वघोष-बुद्धचरितम् हे काही संस्कृत साहित्यामधील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे ग्रंथ आहेत.
संस्कृत भाषेची आताची स्थिती
२१व्या शतकात माहाराष्ट्रात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत, शाळेत केवळ एक विषय या हेतूने संस्कृत शिकली जाते.
संस्कृतचा अभ्युद्धार
संस्कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.
ग्रंथ संपदा
वेद
ऋक्संहिता
उपनिषद्
बृहत्संहिता
रसार्णव
अगस्त्य संहिता
वैशेषिक संहिता
दर्शने
न्यायदर्शने
न्यायकंदली
सूर्यसिद्धान्त
सिद्धान्त शिरोमणी
भारतात संस्कृतचा प्रचार करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती
श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्र, नासिक. (प्रा. श्री. अतुल तरटे सर)
श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ (पुणे)
अजित मेनन
आनंद-पत्रिका (नियतकालिक)
आनंदाश्रम (पुणे)
Dr Ambedkar Hindi Sanskrit Vidyapeeth Bihar Cum Education And Training (ब्रेगुसराई, बिहार)
उषा (नियतकालिक)
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक, महाराष्ट्र)
श्रीकाशी पत्रिका (नियतकालिक)
संगमनेर संस्कृत संशोधन केंद्र ( संगमनेर महाविद्यालय संगमनेर )
कौशलेन्द्र संस्कृत विद्यापीठ (दुर्ग, मध्य प्रदेश)
गाण्डीवम् (नियतकालिक)
गीर्वाण (नियतकालिक)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
डेक्कन कॉलेज (पुणे)
दिव्यज्योति (नियतकालिक)
नेपाळ संस्कृत विश्वविद्यालय
रूरू संस्कृत विद्यापीठ (ऋदी, नेपाळ)
शारदा संस्कृत विद्यापीठ (महेंद्रनगर, नेपाळ)
हरिहर संस्कृत विद्यापीठ (खिदीम, नेपाळ)
जनता संस्कृत विद्यापीठ (बिजौरी, नेपाळ)
कालिका संस्कृत विद्यापीठ (नेपाळ)
संस्कृत पाठशाळा (राजेश्वरी-काठमांडू, नेपाळ)
वाल्मीकी विद्यापीठ आणि राणीपोखरी संस्कृत माध्यमिक शाळा (काठमांडू, नेपाळ)
तीनधारा संस्कृत हॉस्टेल (काठमांडू, नेपाळ)
प्रभातम् (नियतकालिक)
प्रसाद प्रकाशन (पुणे)
ब्राह्मण महा-सम्मेलनम् (नियतकालिक)
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (पुणे)
भारतधर्म (नियतकालिक)
भारतश्री (नियतकालिक)
मिथिला संस्कृत विद्यापीठ (बिहार)
जगद्गुरू रामानन्दाचार्य राजस्थान संस्कृत विश्वविद्यालय (मडाऊ, जयपूर)
राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (तिरुपती)
राष्ट्रीय संस्कृत संस्थान (देवप्रयाग, उत्तराखंड); (नवी दिल्ली)
श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
लोक संस्कृतम् (नियतकालिक)
पं. वसंतराव गाडगीळ
विद्या (नियतकालिक)
विश्व संस्कृतम् (नियतकालिक)
वेदशास्त्रोत्तेजक सभा (पुणे)
वैदिक संशोधन मंडळ (पुणे)
व्रजगंधा (नियतकालिक)
शारदा मासिक
शारदा (पत्रिका)
शारदा संस्था (प्रकाशन संस्था, वाराणशी)
श्यामला (नियतकालिक)
श्री श्रद्धा संस्कृत विद्यापीठ (लक्ष्मणगढ-सीकर, राजस्थान)
श्री (नियतकालिक)
कै. श्री.भा. वर्णेकर
सम्भाषण सन्देश (मासिक)
दैनिक संस्कृत (नियतकालिक, कानपूर)
संस्कृत अध्ययन केंद्र (तळेगाव-पुणे)
संस्कृत कॉलेज (बनारस)
संस्कृत गुरुकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
संस्कृत ग्रंथमाला
संस्कृत पाठशाळा (या अनेक आहेत, ८०हून अधिक पाठशाळांना केंद्र सरकारचे अनुदान आहे.)
संस्कृत प्रसारिणी सभा (पुणे)
संस्कृत भवितव्यम् (नियतकालिक)
संस्कृत भारती (अखिल भारतीय संस्था, मुख्यालय - नवी दिल्ली)
संस्कृत महाविद्यालय (आणि विद्यापीठ, कलकत्ता) - स्थापना इ.स. १८२४)
संस्कृत विद्यापीठ (विशालखंड, गोमतीनगर, लखनौ)
संस्कृत श्री (नियतकालिक)
संस्कृत साकेत (नियतकालिक)
महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान (भरतपूर, उज्जैन)
सुप्रभातम् (नियतकालिक)
स्विद् (नियतकालिक)
हरियाणा संस्कृत अकादमी
संस्कृत नियतकालिके
इ.स. १९९६मध्ये उत्तर प्रदेशातून एकूण ४८ संस्कृत नियतकालिके प्रकाशित होत असत, त्यांमध्ये ३ दैनिके, ७ साप्ताहिके, ४ पाक्षिके, १५ मासिके, १३ त्रैमासिके आणि ६ अन्य प्रकारची नियतकालिके होती.
संस्कृत साहित्याविषयी मराठी पुस्तके
संस्कृत साहित्य शास्त्राची तोंडओळख (सरोज देशपांडे) आणि असंख्य
बाहेरील दुवे
संस्कृतदीपिका - संस्कृत-संबंधी संपूर्ण सूचनायुक्त संकेतस्थळ
इंग्रजी दुवे
अनेक भारतीय लिपींमध्ये संस्कृत स्तोत्रे-इंग्रजी भाषांतरासहित
महर्षि वैदिक विश्वविद्यालयाने देवनागरी लिपीत उपलब्ध करून दिलेले अजरामर वैदिक व इतर साहित्य
अनेक संस्थांनी सभासदांसाठी, आणि काही इतरांसाठी, उपलब्ध करून दिलेले अनेक लिपी आणि टंकातले हजारो संस्कृत ग्रंथ
TITUS Indica - Indic Texts
Internet Sacred Text Archive - अनेक संस्कृत ग्रंथ इंग्रजी अर्थासहित या संकेतस्थळावर आहेत.
क्ले संस्कृत पुस्तकालय संस्कृत साहित्याचे प्रकाशक आहेत. त्यांच्या या इंग्रजी संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी आणि खरेदीसाठी बरेच साहित्य आहे.
हेसुद्धा पहा
मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)
*
वर्ग:भारतामधील भाषा
वर्ग:हिंद-आर्य भाषासमूह
वर्ग:भाषा
वर्ग:लाल दुवे असणारे लेख
वर्ग:अभिजात भाषा |
भारतीय-सूची | https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय-सूची | |
चंद्रगुप्त (निःसंदिग्धीकरण) | https://mr.wikipedia.org/wiki/चंद्रगुप्त_(निःसंदिग्धीकरण) | चंद्रगुप्त या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत:
चंद्रगुप्त मौर्य - मौर्य राजघराण्यातील सम्राट (इ.स.पू. ३२२-२९३).
चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक सत्ता यातील संघर्ष
चंद्रगुप्त पहिला - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३२०-३३५).
चंद्रगुप्त दुसरा - गुप्त राजघराण्यातील सम्राट (इ.स. ३७५-४१४). हा चंद्रगुप्त विक्रमादित्य या नावानेही ओळखला जातो.
वर्ग:निःसंदिग्धीकरण पाने |
पान कसे संपादायचे? | https://mr.wikipedia.org/wiki/पान_कसे_संपादायचे? | पुनर्निर्देशन साहाय्य:संपादन |
धुंडिराज गोविंद फाळके | https://mr.wikipedia.org/wiki/धुंडिराज_गोविंद_फाळके | धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, - नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.
भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.
जीवन
दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते.
इ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.
छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.
सरस्वतीबाई धुंडिराज फाळके
सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.
रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.
सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.
सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.
सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.
कारकीर्द
चित्रपट
राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)
सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)
श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
कालिया मर्दन (इ.स. १९१९)
सेतुबंधन (इ.स. १९३२)
गंगावतरण (इ.स. १९३७)
सन्मान
मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)
अमिताभ बच्चन (इ.स. २०१८)
[[अशोककुमार (१९८८)
दिलीपकुमार (१९९४)
देव आनंद (२००२)
देविकाराणी (१९६९)
पृथ्वीराज कपूर (१९७१)
प्राण (२०१२)
[[मनोजकुमार (२०१५)
राज कपूर (१९८७)
रूबी मेयेर्स
[[विनोद खन्ना (२०१७)
शशी कपूर (२०१४)
सुलोचना (१९७३)
सोहराब मोदी (इ.स. १९७९)
दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके
दादासाहेब फाळके (इसाक मुजावर)
दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व (जया दडकर)
ध्येयस्थ श्वास - दादासाहेब फाळके (लेखिका - ज्योती निसळ)
भारतीय चरित्रमाला : दादासाहेब फाळके (बापू वाटवे)
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (रमेश सहस्रबुद्धे)
दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट
हरिश्चंद्राची फॅक्टरी
हे सुद्धा पहा
दादासाहेब फाळके पुरस्कार
दादासाहेब फाळके स्मारक
हरिश्चंद्राची फॅक्टरी
वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक
वर्ग:मराठी व्यक्ती
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:इ.स. १८७० मधील जन्म
वर्ग:इ.स. १९४४ मधील मृत्यू
बाह्य दुवे
List of Silent films made in India
Dadasaheb Phalke @ SPICE
Website on Dada Saheb Phalke
दादासाहेब फाळके यांचे जीवनचरित्र - Dadasaheb Phalke biography in marathi |
मुंबई | https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई | |
कॉपीराइटवरील मर्यादा व अपवाद | https://mr.wikipedia.org/wiki/कॉपीराइटवरील_मर्यादा_व_अपवाद | वर्ग:प्रताधिकार
वर्ग:मराठी विकिपीडिया प्रकल्पाकरता व्युहात्मक अत्यावश्यक आणि म्हणून न वगळावयाची पाने
वर्ग:रिकामी पाने
वर्ग:प्रताधिकार कायदा |
वल्लभभाई पटेल | https://mr.wikipedia.org/wiki/वल्लभभाई_पटेल | संक्षिप्त सूची
thumb|सरदार वल्लभभाई पटेल
पूर्ण नाव
वल्लभभाई पटेल
जीवनकाळ
ऑक्टोबर ३१, १८७५(नडियाद, खेडा जिल्हा, गुजरात)तेडिसेंबर १५, १९५०
आई-वडील
लाडबा व झवेरभाई
पत्नी
झवेरबा
शिक्षण
बॅरिस्टर
धर्म
हिंदू
कार्यषेत्र
राजकारण
गौरव
'भारताचे लोहपुरुष', 'सरदार'
वल्लभभाई पटेल (जन्म : नडियाद, ३१ आॕक्टोबर १८७५; - १५ डिसेंबर १९५०) हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते.
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.
वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
जन्म व कौटुंबिक जीवन
thumb|गांधी यांच्यासमवेत पटेल
वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म लेवा पटेल समाजामध्ये, त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांची अचूक जन्मतारीख ज्ञात नाही, पण त्यांनी मॅट्रिक परीक्षेच्या वेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ऑक्टोबर अशी लिहिली होती. पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत. झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होती. त्यांना एक काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतीत मदत करत असत. ते१८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२/१३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले. वल्लभभाई मॅट्रिकची परीक्षा तुलनेने उशिरा, म्हणजे वयाच्या २२व्या वर्षी उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई पटेल वकिलीची परीक्षा पास झाले. त्यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरुवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४मध्ये मणीबेन आणि १९०६मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले.
वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही सांभाळत होते.
अन्य
जुनी सांगवी (पुणे) येथे असलेले सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान हे पटेलांच्या स्मरणार्थ, एकदिवसीय वल्लभभाई पटेल साहित्य संमेलन भरवते. हीच संस्था गावोगावी राष्ट्रीय एकात्मता साहित्य संमेलन भरवते. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी आठवे एकात्मता संमेलन होणार आहे.
पटेलांसंबंधी पुस्तके
पोलादी राष्ट्रपुरुष (अरुण करमरकर) : या पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘चेतना पुरस्कार’ प्रदान झाला. (मे २०१७).
महामानव सरदार पटेल (अनुवादित, अनुवादक - सुषमा शाळिग्राम; मूळ गुजराथी, लेखक - दिनकर जोषी)
लोहपुरुष (सुहास फडके)
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (मूळ इंग्रजी - लेखक बी. कृष्ण; मराठी अनुवादक - विलास गिते.)
सरदार पटेल (मूळ इंग्रजी लेखक - आर.एन,पी. सिंग; मराठी अनुवाद - जयश्री टेंगसे)
पुरस्कार
वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान सरदार पटेल यांच्या नावाने समाजभूषण पुरस्कार देते.
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते.https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949
संदर्भ
वर्ग:भारतीय राजकारणी
वर्ग:भारतीय गृहमंत्री
वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
वर्ग:इ.स. १८७५ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९५० मधील मृत्यू
वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन
वर्ग:भारतीय उपपंतप्रधान
वर्ग:भारतीय संविधान सभेचे सदस्य
वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक |
चन्द्रगुप्त | https://mr.wikipedia.org/wiki/चन्द्रगुप्त | पुनर्निर्देशन चंद्रगुप्त (निःसंदिग्धीकरण) |
Main Page | https://mr.wikipedia.org/wiki/Main_Page | REDIRECT मुखपृष्ठ |
मुखप्रुष्ठ | https://mr.wikipedia.org/wiki/मुखप्रुष्ठ | पुनर्निर्देशन मुखपृष्ठ |
संत साहित्य | https://mr.wikipedia.org/wiki/संत_साहित्य | संत सााहित्य :-
पद्यप्रकारानुसार सूची
अभंग
आर्या
ओवी
फटका
भारूड
श्लोक
काव्यरचना करणारे संत
संत एकनाथ
गॊरा कुंभार
चोखामेळा
जनाबाई
जॊगा परमानंद
संत तुकाराम
संत नामदेव
बहिणाबाई
मुक्ताबाई
समर्थ रामदास स्वामी
सावता माळी
संत ज्ञानेश्वर
संतांचे लेखनिक
जेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा प्रत्यक्ष गणेशाने ते लिहून घेतले असे सांगितले जाते. संत कितीही अलौकिक प्रतिभेचे असले तरी त्यांना स्वतः रचलेले काव्य स्वतःच लिहून घेता आले असेलच असे नाही. त्यांना लेखनिकाची गरज भासली असणार. काही अशा संतांची नावे आणि त्यांचे ज्ञात लेखनिक :-
कर्ममेळा (वसुदेव काईत)
चांगदेव (शामा कासार)
चोखामेळा (अनंतभट्ट अभ्यंग)
तुकाराम (संताजी जगनाडे)
दासगणू (संत छगनकाका आणि दामोदर आठवले)
जनाबाई (प्रत्यक्ष पांडुरंग)
निवृत्तिनाथ (सोपानदेव)
जोगा परमानंद (विसोबा खेचर)
मुक्ताबाई (ज्ञानेश्वर)
सावता माळी (काशिबा गुरव)
ज्ञानेश्वरी (सच्चिदानंद बाबा)
रामदास (कल्याणस्वामी)
संतसाहित्यावर अनेक मराठी लेखकांनी असंख्य ग्रंथ लिहिले आहेत, त्यांपैकी काही हे :
अभंगसागरातील दीपस्तंभ (संतसाहित्याचा तौलनिक अभ्यास, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
जनाबाईचे निवडक अभंग (संतसाहित्यपर, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव (डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
नामदेवकृत ज्ञानेश्वरचरित्र (ग्रंथपरिचय, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईचे व्यक्तिचित्रण, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
संत कवि आणि कवयित्री : एक अनुबंध (साहित्य आणि समीक्षा, लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
संत साहित्य - एक रूपवेध (लेखिका - डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
समर्थ रामदासांची करुणाष्टके (ग्रंथपरिचय आणि रसग्रहण, लेखिका डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
ज्ञानियांचा राजा (संत साहित्याचे सखोल विवेचन, लेखिका डाॅ. सुहासिनी इर्लेकर)
बाह्य दुवे
संत साहित्य
* |
संदीप सावंत | https://mr.wikipedia.org/wiki/संदीप_सावंत | इवलेसे
संदीप सावंत हे मराठीतील चित्रपट दिग्दर्शक आहेत. श्वास या त्यांच्या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार व बरीच नामांकने व पुरस्कार मिळाले.
कारकीर्द
श्वास (२००४) -
२००४ सालच्या 'सुवर्णकमळ' पुरस्काराचा विजेता२००५ च्या अकॅडमी अवार्डस् स्पर्धेसाठी 'श्वास'चा भारतातर्फे अधिकृत सहभाग
सावंत,संदीप
सावंत,संदीप |
मराठी साहित्य | https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_साहित्य | मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात.
मराठी साहित्य
इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी.
अभिजात मराठी साहित्य
कादंबरी
कथा
कविता
ललित लेख
(कविता )
नाटक
लोक साहित्य
बाल साहित्य
कथा
विनोद
अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।
समीक्षा
चारोळी
गझल
ओवी
अभंग
भजन
कीर्तन
पोवाडा
लावणी
भारूड
बखर
पोथी
आरती
लोकगीत
गोंधळ
उखाणे
मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिके
अंतर्नाद
अभिधानंतर
अक्षरगाथा
अक्षर वाङ्मय
आपला परममित्र
आमची श्रीवाणी
ऊर्मी
कवितारती
केल्याने भाषांतर
खेळ
ग्रंथसखा
दक्षिण मराठी साहित्य पत्रिका
नवभारत
नावाक्षर दर्शन
परिवर्तनाचा वाटसरू
प्रबोधन प्रकाशन ज्योती
भाषा आणि जीवन
भूमी
महा अनुभव
मुक्त शब्द
मुराळी
ललित
शब्दवेध
सर्वधारा
साधना
साहित्यक्षुधा
मराठी साहित्याचा इतिहास
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), माधव राजगुरू लिखित 'सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४ चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.
मराठीतील आक्षिप्त साहित्य
भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे.
त्या यादीतील काही नावे :-
अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)
कीचकवध (नाटक, १९०७, कृ.प्र. खाडिलकर)
निबंधमाला (आमच्या देशाची स्थिती या शेवटच्या निबंधाबद्दल, १८७४)
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले (कविता, कवी गोविंद) . (या कवितेतील एक कडवे मृत्युंजय नाटक सुरू होण्याआधी गायले जाई. ही कविता प्रसिद्ध करण्याच्या अपराधाकरता बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली होती.)
लोकमान्यांचा निरोप (राजद्रोहाची शिक्षा सुनावल्यानंतर टिळकांनी कोर्टात केलेले भाषण, १९०८)
स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :-
लज्जा (कादंबरी, तस्लिमा नसरीन)
'द सॅटनिक व्हर्सेस' (१९८८, सलमान रश्दी)
शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया (जेम्स लेन)
संदर्भ
आक्षिप्त मराठी साहित्य (प्रबंध व पुस्तक, डाॅ. गीतांजली घाटे)
शब्दकोश
आर्यभूषण मराठी-इंग्रजी शब्दकोश
मोल्सवर्थ यांचा सर्वात मोठा व जुना मराठी-इंग्रजी शब्दकोश
[http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php शाब्दबंध मराठी - मराठी शब्दकोश
+ अनेक कोश
सूची
साहित्यिक सूची
वर्ग:मराठी साहित्य
बाह्य दुवे
http://santeknath.org/vagmayavishayi.html
Marathi Poetry in the Early Twentieth Century
Contemporary Marathi Writers
संदर्भ आणि नोंदी |
युनिकोड | https://mr.wikipedia.org/wiki/युनिकोड | युनिकोड (रोमन लिपी: Unicode) हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रमाणभूत होत असलेला असा एक वर्णसंच आहे.
कॅरॅक्टर एनकोडिंग
'कॅरॅक्टर एनकोडिंग' ह्या संज्ञेची अगदी सोपी व्याख्या म्हणजे ‘कोणत्याही एका मानवी भाषेतील सर्व अक्षरे, चिन्हे यांना काही विशिष्ट क्रमाने ठरवून दिलेले गणितीय आकडे’.
उदाहरणार्थ, कल्पना करा, की एका भाषेत ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ही फक्त पाच अक्षरे आहेत. समजा आपण ठरवले की ही पाच अक्षरे (२१,२२,२३,२४,२५) ह्या पाच आकड्यांनी ओळखायची. असे केल्यास ह्या काल्पनिक भाषेतील कोणताही शब्द किंवा वाक्य आपल्याला हे पाच आकडे वापरून लिहिता येईल. उदा. 'कखग' हा शब्द '२१२२२३' असा लिहिता येईल व 'खघकञ' हा शब्द '२२२४२१२५' असा लिहिता येईल.
येथे (२१,२२,२३,२४,२५) ह्या आकड्यांच्या समूहाचे ('क', 'ख, 'ग', 'घ, 'ञ') ह्या पाच अक्षरांच्या समूहाशी आपण जे नाते ठरवले त्यास एक कॅरॅक्टर संच म्हटले जाते.
हेच उदाहरण पुढे वाढवल्यास मराठीतील १२ स्वर आणि ३६ व्यंजन अक्षरे ही एकूण ४८ आकड्यांनी ओळखता येतील. असे केल्यास हा नवीन कॅरॅक्टर संच एकूण ४८ अक्षरांना आकड्यांचे स्वरूप देईल.
पण असे आकडे ठरवण्याची गरज काय ?
असे करण्याचे एकच कारण आहे व ते म्हणजे संगणकास कोणत्याही भाषेचे ज्ञान नसते. संगणकावर साठवलेली सर्व माहिती ही केवळ आकड्यांच्या स्वरूपात साठवलेली असते. त्याचप्रमाणे संगणकास समजणारी सर्व आज्ञावली हीदेखील आकड्यांच्याच स्वरूपात साठवली जाते.
संगणकाची ही रचना लक्षात घेतली की कॅरॅक्टर संचाचे महत्त्व लक्षात येईल. संगणकास भाषा वा अक्षरे समजत नसल्यामुळे, सर्व अक्षरे, चिन्हे (उदा प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम इत्यादी) हीदेखील केवळ आकड्यांच्याच स्वरूपात साठवावी लागतात. त्यामुळे कोणताही मजकूर साठवताना कोणत्यातरी एका कॅरॅक्टर एनकोडिंगच्या साहाय्याने तो आकड्यांच्या स्वरूपात साठवला जातो. तो मजकूर पुन्हा दाखवताना (उदा. कॉंप्युटर मॉनिटरवर दाखविताना ), त्याच आकड्यांवरून अक्षरे ठरवून दाखवली जातात. अशा प्रकारचा एक कॅरॅक्टर संच आहे, जो जगातल्या सध्याच्या बहुतांश संगणकांतील बहुतेक सर्व सॉफ्टवेअर्समध्ये वापरला जातो - तो म्हणजे आस्की (इंग्लिश: ASCII - American Standard Code for Information Interchange. आस्की ह्या सेटमध्ये रोमन लिपीतील सर्व अक्षरे, अंक, विरामचिन्हे (पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह इत्यादी) , तसेच इतर काही चिन्हे ह्यांच्यासाठी एकूण १२८ आकड्यांचा क्रम ठरवला गेला आहे. A ते Z ही अक्षरे ६५ ते ९० ह्या आकड्यांनी तर a ते z ही अक्षरे ९७ ते १२२ ह्या आकड्यांनी ओळखली जातात. अक्षरेच नव्हे तर अंकदेखील काही विशिष्ट आकड्यांनी दर्शविले जातात. 0 ते 9 हे अंक आस्की मध्ये ४८ ते ५७ असे साठवले जातात. दोन शब्दांमधली रिकामी जागा दर्शविण्यासाठी ३२ हा आकडा आहे.
उदा. cat हा शब्द आस्कीमध्ये ९९ ९७ ११६ ह्या तीन आकड्यांत साठवला जातो; तर Cat हा शब्द ६७ ९७ ११६ असा साठवला जातो. 'Windows 95' हा मजकूर '८७ १०५ ११० १०० १११ ११९ ११५ ३२ ५७ ५३' असा होईल व संगणकात साठवला जाईल. आस्कीप्रमाणे इतर अनेक कॅरॅक्टर सेट्स प्रचलित असून बहुतांश देशांमध्ये त्या देशाच्या भाषेप्रमाणे कोणतातरी एक कॅरॅक्टर संच प्रमाण मानला जातो. भारतीय भाषांकरिता प्रमाण कॅरॅक्टर सेट इस्की (इस्की) हा आहे. (हा भारतीय सरकारद्वारे साधारणतः १९८० च्या दशकात विकसित करण्यात आला)
असाच एक कॅरॅक्टर सेट म्हणजे युनिकोड.
युनिकोड नावाचा नवीन कॅरॅक्टर संच निर्माण करण्याची गरज काय ?
आस्की किंवा इस्की यांसारखे कॅरॅक्टर सेट फक्त ठरावीक भाषेसाठी ठरवण्यात आले आहेत. भारतीय भाषांसाठी जरी 'इस्की' संच असला तरी तो 'आस्की'चेच रूप आहे. कारण 'आस्की'ला फक्त इंग्रजीलाच बरोबर घेऊन पुढे जायचे होते, तर 'इस्की'ला देवनागरीसह इंग्रजीला घेऊन पुढे जायचे होते. जगातील सर्व भाषांचा संगणकावर वापर करता यावा व सर्व भाषा एकाच कॅरॅक्टर सेटमध्ये वापरता याव्यात यासाठी युनिकोडची निर्मिती करण्यात आली.
युनिकोड मध्ये देवनागरी
(The :en:Unicode range for Devanāgarī is U+0900 .. U+097F.)
राखाडी रंगाचा ठोकळा अक्षरांसाठी सध्या रिकामी ठेवलेली घरे दाखवतो.
जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)
अतिरिक्त वाढवलेले देवनागरी युनिकोड
जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf-२ संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)
जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्य प्रकारे दिसत नसतील तर ही pdf-३ संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या)
अक्षर टंक
टंक म्हणजे font. देवनागरी लिपीसाठी हजारो टंक उपलब्ध आहेत.
टंकाबद्दल माहिती
देवनागरी युनिकोड लेखन नियम
स्वतंत्र युनिकोड असलेली अक्षरे
काही अक्षरे ही दोन युनिकोड जोडून तयार करावी लागतात, परंतु काही अक्षरांना स्वतःचा युनिकोड असतो, तरीही बऱ्याचदा ही अक्षरे चुकीची लिहिली जातात. जसे की ॲच्या जागी 'ऍ (ही चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे ).(ही चूक कशी? ऍ'' हे अक्षर मराठीत नाही, अॅ (‘अ’ वर चंद्र) हे आहे.
अक्षर युनिकोड ! ॲ U0972 मराठी अक्षर. ॐ U0950 ऍ U090D हिंदी अक्षर
काही विशिष्ट शब्द कसे निर्माण करतात
क + ् + ष = क्ष
युनिकोड U0915+U094D+U0937 = क्ष
ज + ् + ञ = ज्ञ
युनिकोड U091C+U094D+U091E = ज्ञ
ऱ +् + य = ऱ्य
युनिकोड U0931+U094D+U092F = ऱ्य
(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्यच्या जागी ऱ्य ). .)
ऱ +् + ह = ऱ्ह
युनिकोड U0931+U094D+U092F = ऱ्ह
(वरील चूक स्वतः wikipedia मध्ये करण्यात आली आहे. ऱ्हच्या जागी ऱ्ह ). .)
क + ् + र = क्र
प + ् + र = प्र
युनिकोड
क + ् + क + ् + य = क्क्य
युनिकोड
त + ् + र = त्र
युनिकोड
र +् + क = र्क
युनिकोड
र + ् + व = र्व
युनिकोड
ब + ृ = बृ
युनिकोड
अक्षर विलगकZWNJ आणि अक्षर सांधकZWJ
व्यंजनाला पायाशी लावलेले हलन्त(पाय मोडायचे) चिन्ह त्या व्यंजनाचा निभृत(स्वरहीन) उच्चार करावा असे सूचित करते. अशा हलन्त व्यंजनापाठोपाठ दुसरे व्यंजन आले की जोडाक्षर बनते.जोडाक्षर झाल्यामुळे पहिले हलन्त व्यंजन तसे रहात नाही. पण कधीकधी हे पायमोडके अक्षर दिसावे अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर विलगक’(ZWNJ-Zero Width Non-joiner) वापरून एका पायमोडक्या व्यंजनाशेजारी दुसरे व्यंजन टंकित करता येते. हे साध्य करण्यासाठी युनिकोडने U+200C या संकेताक्षराची योजना केली आहे.
उदा० क् + ZWNJ + ष = क्ष.
या उलट कधीकधी दोन्ही व्यंजने आडव्या बांधणीने जोडली जावी अशी आपली इच्छा असते. अशा वेळी ’अक्षर सांधक’((ZWJ-Zero Width Joiner) लागतो. युनिकोडने त्यासाठी U+200D या कोडची योजना केली आहे. (कधीकधी अक्षरे उभ्या जोडणीने जोडली जावी अशीही आमची इच्छा असते, त्यासाठी युनिकोडने काय सोय केली आहे?)क् + ZWJ + ष = क्ष
जर अक्षर-सांधक किंवा विलगक वापरला नाही तर,
क् + ष = क्ष
आणि, क् + ZWNJ + ह = क्ह क् + ZWJ + ह = क्ह. '''
टंकन पद्धती
Microsoft BhashaIndia —Indic Language Computing resources
Online tool for English (Roman Script) to Hindi (Devanagari script) Transliteration by CDAC Mumbai
On line tools for typing in Unicode Devanagari for the Nepali language
Romanized Nepali Unicode Keyboard developed by OOPSLite Technologies
IndiX, Indian language support for Linux , a site by the Indian National Centre for Software Technology
Devanāgarī Tools: Wiki Sandbox, Devanāgarī Mail, Yahoo/Google Search & Devanāgarī Transliteration
Online Latin to Devanāgarī transliteration tool
Devawriter & Devawriter Pro digitisation tools.
हेही वाचा
संगणक आणि मराठी
महाजाल आणि मराठी
बाह्य दुवे
युनिकोड संस्था संकेतस्थळ
वर्ग:अक्षरसंच
वर्ग:युनिकोड
वर्ग:संगणक |
धर्म | https://mr.wikipedia.org/wiki/धर्म | thumb|380px|
thumb|
धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. .तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -
निर्जीव वस्तूंची उदाहरणे
उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता
उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता
उदा ३ - अग्नि या '''वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता
उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता
सजीवांची काही उदाहरणे
उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले, असे जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य
उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
मनुष्याशी निगडित काही उदाहरणे
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय.
धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.
धर्म या विषयावरील मराठी पुस्तके
ईश्वरविहित जीवन (शरद बेडेकर)
गजर झाला जागे व्हा ... ज्योत जागृतीची (सरश्री)
देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे (प्रबोधनकार ठाकरे)धर्म हा मानवीय असावा
धर्म आणि हिंसा (मंगला आठलेकर)
निरीश्वरवाद पुन्हा एकदा (शरद बेडेकर)
(मला समजलेले) पाच हिंदू धर्म (शरद बेडेकर)
बुद्ध, धर्म आणि संघ (धर्मानंद कोसंबी)
मानव विजय : धर्म-ईश्वर चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे (शरद बेडेकर)
राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता)
समग्र निरीश्वरवाद (शरद बेडेकर)
हिंदुत्व (वि.दा. सावरकर) |
वेद | https://mr.wikipedia.org/wiki/वेद | इवलेसे|वेद
जे जगात नाही ते वेदांत आहे असे म्हणतात. वेद हे भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ.'मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्' अशी वेदाची व्याख्या करता येईल. जगातील पहिले साहित्य वेद. वेद हे मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले आणि म्हणूनच ते अनादी आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद आणि अथर्ववेद यांना वेद अथवा संहिता असे म्हटले जाते.या वेदांचे संहिता, आरण्यके, ब्राह्मणे आणि उपनिषदे असे चार उपविभाग आहेत. यापैकी उपनिषदे ही वेदांच्या शेवटी येतात म्हणून त्यांना 'वेदान्त' असे म्हटले जाते. वेद वाड्.मयावर आधारलेले संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली वेदांमधील काही सूक्त स्त्रियांनी रचलेली आहेत वैदिक भाषा संस्कृत ही होती वैदिक साहित्य अत्यंत समृद्ध आहे ऋग्वेदात यातील मूळ ग्रंथ मानला जातो तो काव्यरूप आहे ऋग्वेदा सह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत. या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात विद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली त्याचा अर्थ ज्ञान असा होतो मौखिक पठनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले वेदांना श्रुती असे म्हणतात. अनेक ॠचा ज्यात आहेत तो ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये विविध देवतांची स्तुती करणारी सूक्त आहेत यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत यज्ञविधी मध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेमध्ये केलेले आहे त्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे स्पष्टीकरण अशी या समितीची रचना आहे तर साम वेदामध्ये यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जात असे ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन यामुळेच संहितेमध्ये केलेला आहे भारतीय संहितेच्या निर्मितीमध्ये सामवेद याचा मोठा वाटा आहे तर अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले अथर्व वेदांमध्ये दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते आयुष्यात येणाऱ्या संकटावर तसेच दुःखांवर कशा पद्धतीने उपाय करायचे हे त्यामध्ये सांगितले आहेत तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहिती त्यात दिलेली आहे राजाने राज्य कसे करावे याचेही मार्गदर्शन त्यामध्ये केलेले आहे त्यांच्या नंतर ब्राह्मणग्रंथ उपनिषदे याची रचना केली गेली त्यांचाही समावेश यामध्ये केला जातो यज्ञविधी मध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण्य ग्रंथ म्हणतात प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मणग्रंथ आहेत तर आरण्यक हे अरण्यात जाऊन एकाग्रचित्ताने केलेली चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे यज्ञ विधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी घेतलेली दिसते तर उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. जन्म-मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत अशा गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे चार वेद ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे पंधराशे वर्षांचा कालावधी लागला त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वांग्मय हे महत्त्वाचे साधन आहे
शब्दोत्पत्ती
वेद हा संस्कृत शब्द असून तो 'विद्' या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. वेद या शब्दाचा अर्थ 'ज्ञान' असा सुद्धा घेतला जातो. वेदभक्तांच्या दृष्टीने हे ज्ञान पवित्र आणि दैवी ज्ञान आहे. परंतु मूळ रूपामध्ये हा शब्द साहित्य ग्रंथामध्ये एक विशाल राशी-विशेषाचा बोधक आहे. प्राचीन काळी ऋषींना वेद 'दिसले' म्हणून त्यांना वेद असे नाव मिळाले आहे. सत्, चित् आणि आनंद असे ब्रह्माचे स्वरूप असल्याचे वेदांमध्ये म्हटले आहे; म्हणून वेदाला "ब्रह्म" असेही म्हणतात. जो ग्रंथ इप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य असा उपाय दाखवून देतो त्याला वेद असे म्हणावे.
वेदांचा आविष्कार
वेद असे निर्माण झाले याविषयी अनेक मते आढळून येतात.परमात्मा किंवा ईश्वर या म्हाभूताचे निःश्वास म्हणजे वेद होत असे बृहदआरण्यक उपनिषदात सांगितले आहे.वेद हे शब्दस्वरूप असल्याने ते आकाशातून उत्पन्न झाले असेही एक मत आहे.वेद आपला धर्म आहे...
वेदांचे महत्त्व व प्रामाण्य
वेद हे आर्यधर्माच्या मूलस्थानी आहेत. 'वेदोऽखिलो धर्ममूलम् |' असे मनुवचन प्रसिद्धच आहे. वेदांवरून तत्कालीन आर्य जनांच्या भौतिक उन्नतीची कल्पना येते. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र या तीन गोष्टींच्या माध्यमातून आर्यांनी भौतिक उत्कर्ष साधला होता. वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे बरे वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे आहेत. भारतीय आस्तिक दर्शनानी आपापले तत्त्वज्ञान मांडताना वेदांचा आधार घेतला आहे.
वेदांचा कालनिर्णय
ख्रिस्ती शतकापूर्वी १००० वर्षांच्या पलीकडच्या काळात वेदरूप काव्ये रचली असावी असे दिसते. काही विद्वानांचे असे मत आहे की छंदांचा काल ख्रिस्ती शकापूर्वी दोन किंवा तीन हजार वर्षापूर्वीचा असावा. लोकमान्य टिळकांनी 'ओरायन'हा ग्रंथ लिहून वेदकाळासंबंधी आपले मत सविस्तरपणे मांडले आहे. वेदकालाचा निर्णय करण्यासाठी वेद वाक्यांचाच आधार घेतला पाहिजे असे त्यांनी नोंदविले आहे.
डॉ.भांडारकर ऋग्वेदाचा काल सनपूर्व २५०० मानतात तर अविनाशचंद्र दास यांच्या मते तो सनपूर्व २५००० इतका मागे जातो.भारतीय संस्कृती कोश खंड नववा
वेदांचे रक्षण व अध्ययन
व्यासांनी वेदांचे प्रवर्तन केले व त्यांच्या शिष्यांनी वेदांचे ग्रहण करून त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली.हे सर्व शिष्य ज्ञानोपासक होते. वेदांचे अध्ययन करणे, त्यांचे अध्यापन करणे व वेदांचे संरक्षण करणे हे त्यांचे जीवित कार्य होते. मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ नये यासाठी प्राचीन ऋषींनी अनेक कॢप्त्या योजल्या आहेत.
हे वेदमंत्र सस्वर असे टिकावेत यासाठी आणखी एक युक्ती प्राचीन आर्यांनी योजिली आणि ती म्हणजे वेदांच्या विकृती तयार करणे ही होय...
वेदांचे स्वरूप
वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरुण, उषा,मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळ्या शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत. वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था, लोकजीवन, संस्कृती, आश्रम व्यवस्था, शिक्षण पद्धती ,राष्ट्र दर्शन ,तत्त्वज्ञान विषयक संकल्पना अशा विविध मुद्द्यांची माहिती आपल्याला वेदांमध्ये अभ्यासायला मिळते.
आधुनिक काळातही अभ्यासाची गरज
खऱ्या अर्थाने वेदांचे रक्षण करायचे असेल तर वेदांतील ऋचांचाचा उच्चार योग्य माणसाने, योग्य वेळी व योग्य परिस्थितीत केल्याने त्यातील खरा अर्थ प्रकट होतो, असे सांगितले जाते. गुरू शिष्य परंपरेने चालत आलेले हे ज्ञान आजवर सांभाळले गेले आहे.
वेदांशी निगडित असे -
व्यास
वेदान्त (उपनिषदे, वगैरे)
टीका
हिंदू धर्माचे अनेक विश्लेषक असा दावा करतात की हिंदू धर्म सर्व समकालीन धर्मांचे घटक स्वीकारतो आणि हिंदू धर्मातील वैदिक पुराणांसह अनेक धर्मग्रंथांमध्ये बौद्ध, जैन आणि शीख धर्माचे घटक आहेत आणि ग्रीक आणि झोरोस्ट्रियन धर्मातील महत्त्वपूर्ण घटकांनी दत्तक घेतलेले आहे. अवेस्ताः आहूरा ते असुर, देयब ते देवा, अहुरा ते मजदा ते एकेश्वरवाद, वरुण, विष्णू व गरुड, अग्निपूजा, सोम ते होम असे सोम, स्वर्ग ते सुधा, यासना ते योजना किंवा भजन, नरियसंघ ते नरसंघ (ज्याचे बरेच लोक म्हणतात) इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांचे भविष्यवाणी), इंद्र ते इंद्र पर्यंत, गंडरेवापासून गंधर्व, वज्र, वायु, मंत्र, याम, आहुती, हुमाता ते सुमती इ.
वेदांविषयी मराठी पुस्तके
अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा (रघुनाथ जोशी)
ऋग्वेद शांतिसूक्त (वेदरत्न केशवशास्त्री जोगळेकर)
ऋग्वेदसार - अनुवादासह (मूळ हिंदी, ऋग्वेद-सारः (विनोबा भावे, मराठी अनुवाद - अच्युत देशपांडे)
ऋग्वेदाची ओळख (गुंडोपंत हरिभक्त)
ऋग्वेदाचे प्राचीनत्व (ज्ञानेश्वर कुलकर्णी)
ऋग्वेदीय सूक्तानि (सार्थ - संक्षिप्त- सस्वर; स्वामी विपाशानंद)
चार वेद (विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर)
वेदांची ओळख : परंपरा आणि नवा दृष्टिकोन (डॉ. प्रमोद पाठक)
वेदामृत (विनोबा भावे)
वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - ना.स.पाठक, १९९०, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 81-7058-178-8
वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम
संदर्भ
वर्ग:वेद
वर्ग:हिंदू धर्म
वर्ग:वैदिक साहित्य
वर्ग:हिंदू ग्रंथ
वर्ग:प्राचीन इराणी धर्माचे स्रोत
वर्ग:संस्कृत ग्रंथ |
ऋग्वेद | https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद | इवलेसे|300x300अंश|Rigveda
ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे.
स्वरूप
बहिरंग-
ऋग्वेद संस्कृत वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे. ऋग्वेदामध्ये एकूण १० मंडले, १०२८ सूक्ते,१०.४६२ ऋचा आणि १०५८९ मंत्र आहेत. निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. त्यांची स्तुती गाणारी कवने ऋग्वेदात आहे. ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रास 'ऋचा' म्हणतात. ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी केली असे मानले जाते.
अंतरंग-
ऋग्वेदातीला सूक्तांचे कर्ते ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णांचे लोक आहेत. ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत. 'अग्निमीळे पुरोहितम्' हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो.
पाणिनीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे, क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली. ती पदे न फिरवता तशीच म्हंटली जावीत या साठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सुरू झाली.
ऋग्वेद हा स्तुतिपर असून पद्यमय आहे. ऋग्वेदाच्या १०व्या मंडलातल्या पुरुषसूक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे. श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे. पुरुष सूक्त मध्ये विराट पुरुषाची संकल्पना मांडलेली आहे या विराट पुरुषाच्या विविध अवयवांपासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांची निर्मिती झाली असे वर्णन केलेले आहे
वैदिक ग्रंथ अनेक ऋषिमुनींनी रचलेले असल्यामुळे त्यांना अपौरुषेय असे म्हणतात तसेच हे ग्रंथ पाठांतर द्वारे गुरूकडून शिष्याकडे हस्तांतरित झालेले आहेत.
रचना
ऋच् धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे. यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तुतिपर कविता असा होतो. वेद शब्दामध्ये विद् असा धातू आहे, त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. अशा १०|२० ऋचांचे एक पद म्हणजे एक सूक्त. अशा १०|२० सूक्तांचे एक अनुवाक् व अनेक अनुवाकांचे एक मंडल. अशी दहा मंडले ऋग्वेदात आहेत. ऋग्वेदातील मंत्र हे अतिशक्करी, अनुष्टुभ, गायत्री, जगती, द्विपदाविराज, पंक्ति, अशा विविध छंदांत रचलेले आहेत. ऋग्वेदात अग्नी, अश्विनीकुमार, इंद्र, उषा, द्यावापृथिवी, मरुत, मित्रावरुण, पूषा, ब्रह्मणस्पती, वरुण, सूर्य, अशा विविध देवतांवरच्या सूक्तांची रचना दिसते.देवता सूक्ते, संवाद सूक्ते, लौकिक सूक्ते, ध्रुवपद सूक्ते, आप्री सूक्ते असे सूक्तांचे विविध प्रकार ऋग्वेदात आढळतात.
शाखा
ऋग्वेद संहितेच्या २१ शाखा असल्याचा उल्लेख पतञ्जलीने आपल्या व्याकरण महाभाष्यात केला आहे. तथापि आज शाकल ही एकमेव शाखा उपलब्ध आहे. ऋग्वेदाच्या आश्वलायन, बाष्कल, मांडूकेय, शाकल व शांखायन अशा पांच प्रमुख शाखा होत्या परंतु त्या लुप्त होऊन आता शाकल ही एकच शाखा शिल्लक आहे.
ऋग्वेदात एकूण १०२८ सूक्ते आहेत. पहिल्या व दहाव्या मंडलात समानच म्हणजे १९१ सूक्ते आहेत.
ऋग्वेदात एकूण अक्षरांची संख्या ४३२००० आहे.
ऋग्वेदातील काही नीतिकल्पना व तत्त्वज्ञान
मृत्यूनंतरच्या जीवनासंबधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे.
१) सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात. मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो; पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो.
२) सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्तही ऋग्वेदात आहे. हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे. तो उत्पादक म्हणजे पुरुष, विश्वकर्मा, हिरण्यगर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात म्हटले आहे की, देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवापासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे.हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने[सृष्टी निर्माण केली, असेही काही ठिकाणी म्हटले आहे. काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे म्हटले आहे.
३) पापी, दुष्ट लोकांना परलोकांत स्थान नाही. यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो. अशा या निवासस्थानी अधार्मिक, यज्ञ न करणारे, असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात.
४) पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे.
५) ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे ५६ वेळेस आला आहे. नैतिक कायदे व आचार असा काहीसा अर्थ काही ठिकाणी आहे.
अभ्यासक आणि भाष्यकार
ऋग्वेदकालीन मूर्तिपूजेविषयी विद्वानांत तीव्र मतभेद आहेत. मॅक्समुल्लर, विल्सन, मॅकडोनाल्ड यांच्या मते, वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित नव्हती. भारतीय विचारवंतांतील वेंकटेश्वर दास व वृंदावन भट्टाचार्य हे वैदिक काळात मूर्तिपूजा प्रचलित असावी, असे म्हणतात. वेदांमध्ये देवांच्या मानवी रूपाचे वर्णन आढळत असले, तरी वेदांत त्यांच्या मूर्तिपूजा ध्वनित करणारी वचने मुळीच सापडत नाहीत. ऋग्वेदातील रचना आणि शब्द द्विअर्थी आहेत.
ऋग्वेद मंडलानुसार कवी
ऋग्वेद मंडलानुसार कवी प्रथम मण्डल अनेक ऋषि द्वितीय मण्डल गृत्समद तृतीय मण्डल विश्वामित्र चतुर्थ मण्डल वामदेव पंचम मण्डल अत्रि षष्ठम मण्डल भारद्वाज सप्तम मण्डल वसिष्ठ अष्ठम मण्डल कण्व व अंगिरा नवम मण्डल (पवमान मण्डल) अनेक ऋषी दशम मण्डल अनेक ऋषि
वेदांतील गोष्टी
मराठी लेखक वि.कृ. श्रोत्रिय यांनी ’वेदांतील गोष्टी’ हे दोन भागांतले पुस्तक लिहून वेदांत गोष्टी आहेत, हे जनतेच्या पहिल्यांदा ध्यानात आणून दिले.
एच.व्ही. बाळकुंदी यांनी ऋग्वेदाच्या अनेक मंडलांत दुष्काळाचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. इसवी सन पूर्व ७००० ते इ.स.पू. ६५०० या काळात सतत दहा वर्षे अवर्षण होऊन दुष्काळ पडल्याचे उल्लेख ऋग्वेदात आहेत. अनेक दिवस अन्न न मिळाल्याने विश्वामित्रांवर कुत्र्याचे मांस खाण्याची वेळ आल्याची कथा ऋग्वेदात आहे.
नोंदी
अनोखा परिचय ऋग्वेद आणि उपनिषदांचा (रघुनाथ जोशी)
ऋग्वेददर्शन - श्री.रा.गो. कोलंगडे
ऋग्वेद शांतिसूक्त (केशवशास्त्री जोगळेकर)
ऋग्वेद-संहिता, ५ भाग, (संपादन : वैदिक-संशोधन-मंडळ, पुणे, १९३३-५१).
ऋग्वेद-संहिता, औंध, १९४० (संपादक : श्रीपाद दामोदर सातवळेकर).
ऋग्वेद - सार (मूळ हिंदी संकलक विनोबा भावे, मराठी अनुवाद - अच्युत देशपांडे)
ऋग्वेदाचे आकलन प्रथमच वैज्ञानिकरीत्या (डाॅ. शरच्चंद्र गोविंद इंगळे)
ऋग्वेदाचे मराठी भाषांतर- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव
ऋग्वेदाचे प्राचीनत्व (ज्ञानेश्वर कुलकर्णी)
ऋग्वेदाचे सामाजिक अंतरंग (ॲड. शंकर निकम)
ऋग्वेदीय सूक्तानि : सार्थ, संक्षिप्त, सस्वर (अनुवादक स्वामी विपाशानंद)
चार वेद (शंकर वासुदेव अभ्यंकर)
ओळख वेदांची - ऋग्वेद (शीतल उवाच)
A History of Indian Literature, Vol. I, Calcutta, 1927.(ंM. Winternitz)
A History of Sanskrit Literature, Delhi, 1961.(Arthur A. Macdonell)
वेदांतील गोष्टी (२ भाग, लेखक - वि.कृ. श्रोत्रिय)
History of Dharmshastra- Author,Bharatratna P.V.Kane
संदर्भ
वर्ग:वैदिक साहित्य
वर्ग:ऋग्वेद
वर्ग:संस्कृत साहित्य
वर्ग:प्राचीन इराणी धर्माचे स्रोत
वर्ग:वेद
वर्ग:हिंदू धर्म
वर्ग:हिंदू ग्रंथ
वर्ग:संस्कृत ग्रंथ |
ऋग्वेद, मंडल १०, सुक्त १२९ | https://mr.wikipedia.org/wiki/ऋग्वेद,_मंडल_१०,_सुक्त_१२९ | पुनर्निर्देशन नासदीय सूक्त |
मनाचे श्लोक | https://mr.wikipedia.org/wiki/मनाचे_श्लोक | ’मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे.
मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.
पद्य रचनेची वैशिष्ट्ये
या पद्यात श्लोकांची एकूण संख्या २०५ आहे. मनाच्या श्लोकांची रचना ही भुजंगप्रयात वृत्तात आहे. प्रत्येक ओळीत १२ अक्षरे आहेत.
संबधित ग्रंथ
'मनाचे श्लोक' - ल.रा. पांगारकर - इ.स. १९२४
सार्थ मनाचे श्र्लोक - ज्ञानेश्वर तांदळे
मनाच्या श्लोकातून मनःशांती - सुनील चिंचोलकर
समर्थ रामदासविरचित मनाचे श्लोक - डॉ. र.रा. गोसावी
सार्थ मनाचे श्लोक - केशव विष्णू बेलसरे
इतर भाषांतील अनुवाद
मन-समझावन (इ.स. १७५८) - भाषा दखनी (उर्दू) -(स्वैर रूपांतर) अनुवाद : शाह तुराब (१६९५ - १७८३)
शाहतुराब हे सूफी धर्म प्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले.
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.{http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दास्तॉं ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनिटांनी जसा दिसला.
गायनस्वरूपातील मनाचे श्लोक (अल्बम्स) - गायक/गायिका
अनुराधा पौडवाल
रवींद्र साठे आणि गायिका आशा खाडिलकर यांनी गायलेल्या ध्वनिफितींमध्ये नागपूरच्या रेणुका देशकर यांचे निरूपण आहे
श्रीधर फडके
संदर्भ
वर्ग:समर्थ रामदास स्वामी साहित्य |
श्वास (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/श्वास_(चित्रपट) | श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वासला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
कथानक
नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे.
कलाकार
अश्विन चितळे (परशुराम विचारे , रेतीनल कॅन्सर ग्रस्त मुलगा )
अरुण नलावडे (परशुरामचे आजोबा , जे त्याला मुंबईला उपचारासाठी नेतात)
संदीप कुलकर्णी (डॉक्टर मिलिंद साने , परशुराम वर उपचार करणारे वैद्य)
अमृता सुभाष (आसावरी , वैद्यकीय समाजसेविका जी आजोबा व मुलगा यांच्यात सांगड घालते. )
गणेश मांजरेकर (दिवाकर , परशुरामचे काका)
अश्विनी गिरी (परशुरामची गावातील आई)
यशालेख
७७ व्या अकॅडमी अवार्ड्सकरिता भारतातर्फे अधिकृत सहभाग
राष्ट्रीय पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट (सुवर्णकमळ),
सर्वोत्तम बाल कलाकार
महाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक
सर्वोत्तम अभिनेता
सर्वोत्तम उल्लेखनीय अभिनेता
सर्वोत्तम बाल कलाकार
महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक
सर्वोत्तम संकलन
सर्वोत्तम बाल कलाकार
कै. बाळासाहेब सरपोतदार चित्रगौरव पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट
संस्कृति कलादर्पण पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक
सर्वोत्तम अभिनेता
सर्वोत्तम संगीत
महाराष्ट्र टाईम्स सन्मान २००४
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक
सर्वोत्तम अभिनेता
सर्वोत्तम पटकथा/संवाद
ख़ास ज्यूरी पुरस्कार: सर्वोत्तम बाल कलाकार
सर्वोत्तम छायाचित्रण
अल्फा गौरव पुरस्कार २००४
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम दिग्दर्शक
सर्वोत्तम अभिनेता
सर्वोत्तम पटकथा/संवाद
सर्वोत्तम बाल कलाकार
सर्वोत्तम संकलन
स्टार-स्क्रीन पुरस्कार २००४
सर्वोत्तम अभिनेता
पार्श्वभूमी
आजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो
बाह्य दुवे
श्वासचे अधिकृत संकेतस्थळ |
मुक्त तंत्रांश | https://mr.wikipedia.org/wiki/मुक्त_तंत्रांश | पुनर्निर्देशन मुक्त आज्ञावली |
भारतीय जनगणना, २००१ | https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_जनगणना,_२००१ | पुनर्निर्देशन भारताची जनगणना २००१ |
ईंटरनेट | https://mr.wikipedia.org/wiki/ईंटरनेट | पुनर्निर्देशन महाजाल |
इतिहास | https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास | इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.
प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :
१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान
२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत
३) इतिहास आणि आपला भूतकाळ
४) भूतकाळ आणि भविष्यकाळ
प्राचीन साहित्यात इतिहास
इवलेसे|पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.
राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘सच द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.
धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णू पुराण टीका}
अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात
आधुनिक व्याख्या
हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.
संदर्भसूची
बाह्य दुवे
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश - इतिहास |
भौतिकशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/भौतिकशास्त्र | भौतिकशास्त्र ही नैसर्गिक शास्त्रांपैकी एक फार पुरातन शाखा आहे. यामध्ये पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, ध्वनिशास्त्र, उपयोजित गणित, विद्युत-चुंबकशास्त्र, अणुभौतिकी, कणशास्त्र, ऊर्जाशास्त्र, अंतराळ विज्ञान, वातावरणशास्त्र या व अशा इतर उपशाखांचा समावेश होतो. ढोबळमानाने, हे नैसर्गिक घटनांमधील कार्यकारणभाव शोधणारे शास्त्र आहे असे म्हणता येईल. यासाठी प्रामुख्याने पदार्थावरील (यात पदार्थाचे अविभाज्य घटक असणारे अणु-रेणु व मूलकण देखील समाविष्ट आहेत) बल व कार्य यांचा अभ्यास केला जातो. तसेच त्यामुळे होणारी हालचाल, मिळणारी ऊर्जा व गती, तसेच या सर्वांचा आजुबाजुच्या परिस्थितीशी असणारा संबंध देखील अभ्यासला जातो.
300px|thumb|भौतिकशास्त्राच्या अभ्यासकक्षेतील विषयांशी संबंधित काही दृश्ये
पुरातन असणारी ही ज्ञानशाखा खगोलशास्त्राच्या त्यातील समावेशामुळे कदाचित सर्वात प्राचीन ठरते. भौतिकशास्त्राचे मानवी प्रगती (विशेषतः गेल्या दोन शतकांमधील) वृद्धिंगत करण्यामागील योगदान वादातीत व एकमेवाद्वितीय आहे. भौतिकशास्त्र हा एक विज्ञानाचा प्रकार आहे.
सुमारे दोन सहस्र वर्षे भौतिकशास्त्र हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा इतर शास्त्रशाखांच्या बरोबरीने तत्त्वज्ञानाचा भाग समजले जात असे. परंतु सोळाव्या शतकात प्रारंभ झालेल्या वैज्ञानिक क्रांतीमुळे या सर्व शाखांना समर्पकपणे त्यांच्या हक्काचे स्वतंत्र अस्तित्व मिळाले. भौतिकशास्त्र तरीही इतर शास्त्रशाखांच्या कक्षांमध्ये आपले कार्यक्षेत्र विस्तारित करते, उदाहरणार्थ जीवभौतिकशास्त्र (इंग्रजी: biophysics) किंवा पुंजरसायनशास्त्र (इंग्रजी: quantum chemistry). अशा आंतरशाखीय संशोधनक्षेत्रांमुळे सर्वच शास्त्रशाखांच्या कक्षा आता ठळक न राहता विरळ झाल्या आहेत. भौतिकशास्त्रातील नवीन संकल्पना बरेचदा इतर शास्त्रशाखांमधील मूलभूत तत्त्वे समजण्यास मदत करतात.
मूलभूत संकल्पनांवर आधारित असणाऱ्या नवीन तंत्रशाखा वाढवण्यास भौतिकशास्त्राचे मोठे योगदान आहे. विद्युतचुंबकीय क्षेत्राच्या अभ्यासातूनच पुढे दूरचित्रवाणी, घरगुती वापराची विद्युत उपकरणे, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) या तंत्रशाखा विकसित झाल्या व मानवी जीवन अक्षरशः नाट्यमयरीत्या उजळून निघाले. उष्मागतिकी प्रगत होण्याने औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला. यामिकी व गतिशास्त्र (इंग्रजी: mechanics and dynamics) यातील प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नांमुळे उपयोजित गणित व कलन यांचा विकास प्रेरित झाला.
इतिहास
नैसर्गिक घटना, त्यांच्या मागचा कार्यकारणभाव, त्यांचे परिणाम यांच्या अभ्यासाच्या पद्धती तत्त्वज्ञानातून विकसित झाल्या. पुढे विविध प्रागतिक टप्प्यांवर या अभ्यासाला नैसर्गिक-तत्त्वज्ञान व नंतर नैसर्गिक-शास्त्र अशी नावे मिळाली. अंतिमतः सध्या आपण त्याला भौतिकशास्त्र या नावाने ओळखतो. हाच इतिहास पुढील काही परिच्छेदांमध्ये वर्णन केला आहे.
नैसर्गिक-तत्त्वज्ञान याची पाळेमुळे पुरातन ग्रीक कालखंडात (ख्रिस्तपूर्व ६५०-४८० वर्षे) शोधता येतात. सॉक्रेटीस-पूर्व काळात थेल्स याने नैसर्गिक घटना घडण्यामागे काही अतिभौतिक, धार्मिक अथवा दैवी शक्तींचा हात असतो हे नाकारून त्यामागे केवळ नैसर्गिक कारणच असते असे प्ततिपादन केले. काळजीपूर्वक मांडलेले विचार व प्रयोगांच्या परिणामांचे केलेले निरीक्षण यांमुळे संकल्पना सिद्ध करता येतात हेही त्याच्यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी दाखवून दिले. आधुनिक काळात अणु व रेणुंचे अस्तित्व सिद्ध करता आल्याने मुलभूत, अविभाज्य कणांनी सर्व पदार्थ बनलेले असतात हा प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींमधील विचारवंतांनी मांडलेला सिद्धांत पडताळून पहाता आला.
नैसर्गिक-विज्ञान हे ख्रिस्तपूर्व सुमारे ४थे ते १०वे शतक या काळात भारत, चीन व अरब प्रदेशात विकसित झाले. विविध मोजमापांचे गणन करण्याची पद्धती याच काळात प्रयोगकर्त्यांमधे रुजली. घटनांची निरीक्षणे करणे, वैचारिक प्रयोग करून बघणे अशा पद्धती वापरून युरोपमध्ये आर्किमिडीज तसेच मध्यपूर्वेत अल्बेरूनी यांनी स्थितिशास्त्र (इंग्रजी: statics) किंवा स्थैतिकी, यामिकी , द्रव-स्थितिशास्त्र (इंग्रजी: hydrostatics) याचा पाया रचला.
मध्ययुगीन युरोपमध्ये पूर्वार्धात केपलर आणि गॅलिलिओ व उत्तरार्धात प्रामुख्याने न्यूटन यांनी प्रायोगिक व मोजणी पद्धती वापरून विविध नियम मांडले जे आज भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र यातील मुलभूत नियम मानले जातात. यातूनच अभिजात यामिकी (इंग्रजी: Classical mechanics) ही भौतिकशास्त्राची प्रमुख शाखा म्हणुन स्थापित झाली.
आधुनिक भौतिकशास्त्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला येऊन लोकप्रिय झाले ते प्रामुख्याने अल्बर्ट आइनस्टाइन यांनी केलेल्या सापेक्षता व पुंजवाद (इंग्रजी: quantum theory) या क्षेत्रांतील असाधारण कामगिरीमुळे विश्वनिर्मिती कशी झाली या प्रश्नाचे उत्तर मिळण्यास मदत झाली.E=mc^२ या सूत्रावरून त्यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला.
प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ
आयझॅक न्यूटन
अल्बर्ट आइनस्टाइन
जेम्स क्लार्क मॅक्सवेल
मॅक्स प्लांक
गॅलिलिओ
ॲंपियर
लॉर्ड केल्विन
वर्नर हायझेन्बर्ग
वोल्फगांग पाउली
मॅक्स बॉर्न
एर्विन श्र्यॉडिंगर
नील्स बोर
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
चंद्रशेखर वेंकट रामन
मुख्य विभाग
वर्ग:भौतिकशास्त्र
वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा |
खगोलशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/खगोलशास्त्र | खगोलशास्त्र ( ग्रीक : ἀστρονομία ) एक नैसर्गिक विज्ञान आहे ज्याने आकाशीय वस्तू आणि घटनांचाअभ्यास केला आहे . हे गणित , भौतिकशास्त्रआणि रसायनशास्त्र वापरून त्यांचे मूळ व उत्क्रांतीप्रयत्न करतात . आवडीच्या वस्तूंमध्ये ग्रह , चंद्र , तारे , निहारिका , आकाशगंगे आणि धूमकेतूंचा समावेश आहे . संबद्ध घटनेत सुपरनोवा स्फोट, गामा रे स्फोट , क्वासर ,ब्लेझर , पल्सर आणि कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी विकिरण . सामान्यत: खगोलशास्त्र पृथ्वीच्या वातावरणाबाहेर उद्भवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो . कॉसमोलॉजी ही खगोलशास्त्राची एक शाखा आहे,जी संपूर्ण विश्वाचा अभ्यास करते .
खगोलशास्त्र सर्वांत प्राचीन विज्ञानांपैकी एक आहे; रेकॉर्ड इतिहासाच्या सुरुवातीच्या सभ्यतांनी रात्रीच्या आकाशाचे पद्धतशीर निरीक्षण केले . यामध्ये बॅबिलोनी , ग्रीक , भारतीय , इजिप्शियन , न्युबियन्स , इराणी , चिनी , माया आणि अमेरिकेतील अनेक प्राचीन देशी लोकांचा समावेश आहे . पूर्वी, खगोलशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्र , खगोलीय नॅव्हिगेशन , वेधशाळा खगोलशास्त्र आणि कॅलेंडर तयार करण्याइतकी विविध विभागांचा समावेश होता . आजकाल व्यावसायिक खगोलशास्त्र हे बऱ्याचदा अस्ट्रोफिजिक्ससारखेच म्हटले जाते . व्यावसायिक खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी आणि सैद्धांतिक शाखांमध्ये विभागले गेले आहे . पर्यवेक्षण खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तूंच्या निरीक्षणावरील डेटा मिळविण्यावर केंद्रित आहे; भौतिकशास्त्रातील मूलभूत तत्त्वे वापरून या माहितीचे विश्लेषण केले जाते. सैद्धांतिक खगोलशास्त्र खगोलशास्त्रीय वस्तू आणि घटनेचे वर्णन करण्यासाठी संगणक किंवा विश्लेषणात्मक मॉडेल्सच्या विकासाकडे केंद्रित आहे; या दोन्ही शाखा एकमेकांना पूरक आहेत. सैद्धांतिक खगोलशास्त्र निरीक्षणासंबंधी निकाल समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि निरीक्षणे सैद्धांतिक परिणामाची पुष्टी करण्यासाठी वापरली जातात.
खगोलशास्त्रामध्ये हौशी खगोलशास्त्रज्ञांची सक्रिय भूमिका असते, हे अशा काही विज्ञानांपैकी एक आहे ज्यामध्ये ही घटना आहे. क्षणिक घटनांच्या शोधासाठी आणि निरीक्षणासाठी हे विशेषतः खरे आहे . हौशी खगोलशास्त्रज्ञांनी नवीन धूमकेतू शोधण्यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण शोधांमध्ये मदत केली. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोल शास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केलेला होता. एक ते नऊ आणि शून्य या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. 1,10 अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ प्रथम लिहिलेला होता.त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिलेली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञ देखील होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या सहाव्या शतकात होऊन गेलेल्या वराहमिहिर यांनी 'पंच सिद्धांत टीका' नावाचा ग्रंथ लिहिला: त्यात भारतीय खगोल शास्त्रीय सिद्धांतांबरोबरच ग्रीक-रोमन इजिप्त या संस्कृतमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही त्याने केलेला दिसतो. इसवीसनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेला ब्रह्मगुप्त या गणितज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. 'कनादाचे वैशेषिक दर्शन' हा ग्रंथ याच काळात लिहिला गेला. या ग्रंथात अणू-परमाणूंचा विचार प्रामुख्याने केलेला आहे. त्याच्या मते विश्व हे असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात.
व्युत्पत्तीशास्त्र
खगोलशास्त्र (पासून ग्रीक ἀστρονομία पासून ἄστρον Astron "स्टार" आणि -νομία, -nomia पासून νόμος nomos , "नियमशास्त्राच्या" किंवा "संस्कृती") याचा अर्थ असा "तारे कायदा" (किंवा भाषांतर अवलंबून "तारे संस्कृती") . खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्रात गोंधळ होऊ नये , अशी विश्वास प्रणाली जी मानवाच्या कार्ये आकाशीय वस्तूंच्या स्थितीशी संबंधित आहे असा दावा करते. दोन फील्ड एक समान मूळ असूनही , ती आता पूर्णपणे वेगळी आहेत.
"खगोलशास्त्र" आणि "खगोलशास्त्र" या शब्दाचा वापर
सामान्यत: "खगोलशास्त्र" आणि "खगोलशास्त्रशास्त्र" या दोन्ही शब्द एकाच विषयाचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कडक शब्दकोशाच्या परिभाषावर आधारित, "खगोलशास्त्र" "" पृथ्वीच्या वातावरणाबाहेरच्या वस्तूंचा आणि त्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास "तर" अॅस्ट्रोफिजिक्स "संदर्भित करते खगोलशास्त्राची शाखा "वर्तन, भौतिक गुणधर्म आणि आकाशीय वस्तू आणि घटनेच्या गतीशील प्रक्रियेचा व्यवहार करते." काही प्रकरणांमध्ये, फ्रॅंक शू यांनी दि फिजिकल युनिव्हर्स या प्रास्ताविक पाठ्यपुस्तकाच्या परिचयात, "खगोलशास्त्र" या विषयाच्या गुणात्मक अभ्यासाचे वर्णन करण्यासाठी वापरले जाऊ शकते, तर "अॅस्ट्रोफिजिक्स" या विषयाची भौतिकशास्त्र देणाऱ्या आवृत्तीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. तथापि, बहुतेक आधुनिक खगोलशास्त्रीय संशोधन भौतिकशास्त्राशी संबंधित विषयांशी संबंधित असल्यामुळे आधुनिक खगोलशास्त्र प्रत्यक्षात खगोलशास्त्रशास्त्र म्हणू शकते; अॅस्ट्रोमेट्रीसारखी काही फील्ड केवळ खगोलशास्त्र नसून खगोलशास्त्र आहेत. शास्त्रज्ञ या विषयावर संशोधन करीत असलेले विविध विभाग "खगोलशास्त्र" आणि "अॅस्ट्रोफिजिक्स" वापरू शकतात, हे विभाग ऐतिहासिकदृष्ट्या भौतिकशास्त्र विभागाशी संबंधित आहे की नाही यावर अवलंबून आहे,आणि बऱ्याच व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञांना खगोलशास्त्र डिग्रीऐवजी भौतिकशास्त्र आहे; या क्षेत्रात अग्रगण्य वैज्ञानिक जर्नल्स काही शीर्षके समावेश खगोलीय जर्नल , Astrophysical जर्नल , आणि खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी .
खगोलशास्त्राचा इतिहास
पूराण काळीं खगोलशास्त्र फक्त निरीक्षण आणि उघड्या डोळ्यानी बगितलेल्या वस्तूंची भविष्यवाणी पूर्तींत मर्यादित होतें. निरीक्षण केलेल्या वस्तूंच्या माहितीचा उपयोग विविध ऋतूंच्या बाबतींत प्राप्त करण्यास होतो व एक वर्ष किती लांब असू शकितो याची माहिती पुरवितें. दूरबिणीच्या संशोधनाच्या पहिलें, विविध ताऱ्यांचा अध्यय करण्यासाठी केवळ काही उंच जागेवर त्या ताऱ्यांचें निरीक्षण करावें लागायचें. दूरबिणीच्या संशोधनानंतर सर्वांत पहिलें विविध ताऱ्यांची व ग्रहांची स्थिती या बाबतींत माहिती पुरवली गेली. या निरीक्षणाच्या आदरे विविध ग्रहांची गती, आणि सूर्य, चंद्र, व पृथ्वीच्या संदर्भित माहिती दिली गेली. पहिलें सर्व लोकांमध्ये असा अंधविश्वास होता कि पृथ्वी, चंद्र आणि सूर्यांच्या मध्यभागी स्थित आहे. परंतु विविध संशोधनांनांतर हें सिद्ध झालें कि सूर्य सर्वग्रहांच्या मध्यभागी स्थित आहे. एक विशेष रूपामध्ये महत्त्वपूर्ण प्रारंभ विकासाच्या वैज्ञानिक आणि गणितीय खगोलशास्त्र, जें बाबुल मध्ये प्रारंभ झालें, ते नंतर खगोलीय परंपरा अनेक अन्यसभ्यता मध्ये विकसित करण्यासाठी तदियों माहिती झालें कि चंद्रग्रहण एक दोहरा चक्र मध्ये परतिते एक सरोसच्या रूप मध्ये मानला जातो. ३ शताब्दी ई.पु., of सामोस ने पृथ्वीच्या आकाराची गणना केली, आणि सूर्य व चंद्राच्या मधील दूरी नापली.
वैज्ञानिक क्रांती
पुनर्जागरणाच्या वेळीं, निकोलौस कोपेर्निकुस यानी सूर्यमालेच्या एक मॉडल कॅ प्रस्ताव मांडला, गालिलेओ आणि केप्लर यानी त्यांच्या कामामध्ये सुधारणा आणली. गालिलेओ दूरबिणीचा उपयोग करून केलेल्या निरीक्षणामध्ये सुधारणा केली.
रेडियो खगोलशास्त्र
रेडियो खगोलशास्त्र विविध किरणोत्सर्गाच्या अध्यय करितो. त्यांची तरंगलांबी एक मिलिमीटरच्या आस-पास असिते. रेडियोच्या विविध तरंग आपण विवध फ़ोटो नाहीं मानलें तरी चालितें, ज्या कारणानें आपण त्याचें कोणांकाची लांबी मापायला सोपा होतें.
इन्फ्रारेड खगोलशास्त्र
अवरक्त खगोलशास्त्र विविध प्रकाराच्या प्रार्न्न स्म्भातीत माहिती देतें. बहुतेक वेळा ही किर्नानला वातावरण शोषून घेतें, ज्या कारणामुळीं त्याचे उत्सर्जन होतात. अवरक्त पंक्ती, विविध प्रकाराच्या वस्तू जे खूप थंड असितात ते दृश्य पंक्तीय प्रदेश करू नाहीं शकीत.
यांचा उपयोग आंतरिक्षा रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यास साह्य करितो.
ऑप्टिकल खगोलशास्त्र
ऑप्टिकल खगोलशास्त्र हें एक खगोलशास्त्राची प्राचीन शक आहे.
जुन्या काळी ग्रहांचे प्रतिमा हाताने काढली ज्याची,२० शतकानंतर विविध प्रकारच्या च्हायाचीत्न सामग्री संशोधन झाल्या मुले त्याचा वापर वाढला .
ज्ण्बूलातीत खागोलश्स्त्र
ज्ण्बूलातीत खागोलश्स्त्र बहुतेक वेळा ज्ण्बूलातीत तरंगलांबीच्या निरीक्षणासाठी उपयोग होतो. त्याची तरंगलांबी १० ते ३२० nmच्या आस-पास असितें. पृथ्वीच्या वातावरण बहुतेक वेळा हे किरणे शोषून घेते. वरील सर्व खगोलशास्त्राचे विविध प्रकारे आहेत.
सूर्यमाला
सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळीं त्याच्याभोवतीं फिरणाऱ्या खगोलीय वस्तूनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे १६५ ज्ञात नैसर्गिक उपग्रह, बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असांख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा तसेच ऊर्टचा मेघ यांचा समावेश होतो.
सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रह असे आहेत - बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस व नेपटून. आठ पैकीं सहा ग्रहांच्या भोवतीं नैसर्गिक उपग्रह आहेत.
वर्गीकरण
सुर्याभोवतीं फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंचे तीन मुख्य वर्गांत वर्गीकरण केलें जातें ग्रह, लघुग्रह व सूर्यमालेतील छोट्या वस्तू.
रचना
सूर्यमालेतील प्रमुख वस्तू म्हणिजे सूर्य होय. सूर्याचें वस्तुमान सूर्यमालेतील एकंदर ज्ञात वस्तुमानाच्या सुमारे ९९.८६% इत्कें आहे. इत्क्या प्रचंड वस्तूमानामुळींच सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती इतर वस्तूना त्याच्या भोवतीं फिरावण्यास लावतें.[४] उरलेल्या वस्तुमानाच्या ९०% पेक्षा अधिक वस्तुमान हें गुरू व शनी या ग्रहांमध्ये आहे.
सूर्याभोवतीं फिरणाऱ्या जवळजवळ सगळ्या मोठ्या वस्तू या एकाच पातळींत सूर्याभोवतीं फिरितात. ग्रहांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीच्या अगदी जवळ आहे तर धूमकेतू व क्यूपरचा पट्टा यांची फिरण्याची पातळी ही पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीशीं काही अंशांचे कोन करितात.
चित्रकाराच्या नजरेतून सूर्यमाला
सूर्यमालेची निर्मिती ही तेजोमेघ सिद्धान्ताप्रमाणे झाली असल्याचे खगोलशास्त्रज्ञ मानितात. या सिद्धान्ताप्रमाणे ही निर्मिती एका मोठ्या रेणूंच्या ढगाच्या कोसळण्यामुळीं सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वीं झाली. हा रेणूंचा ढग कित्येक प्रकाशवर्ष अंतरावर पसरला होता व त्यापासून अनेक ताऱ्यांची निर्मिती झाली.
संदर्भ यादी
वर्ग:खगोलशास्त्र |
वनस्पतीशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/वनस्पतीशास्त्र | वनस्पतीशास्त्रात विवध वनस्पतींचा अभ्यास केला जातो.
वनस्पतींचे जीवनचक्र
झाडांना फुटणारे कोवळे कोंब फिकट हिरव्या, पिवळ्या किंवा तांबूस रंगाचे तसेच मोहक, नाजुक, रसरशीत आणि तजेलदार असतात. ती पाने पाहतां पाहतां वाढतांना हिरवी गार होतात. थोडी जून झाल्यानंतर ती निबर होतात तसेच त्यांचा गडद हिरवा रंग जरासा काळपट वाटू लागतो. कालांतराने ती पाने पिकून पिवळी पडतात, सुकत जातात आणि अखेरीस गळून पडतात.
बहुतेक झाडांना रंगीबेरंगी, सुरेख आणि सुवासिक अशी फुले लागतात. फुलपाखरे, भुंगे, मधमाशा अशासारखे कीटकांना ती फुले आपल्याकडे आकर्षित करतात. या कीटकांद्वारे फुलांचे परागकण दुसऱ्या फुलांपर्यंत पोचतात आणि त्यामुळे फलधारणा होते. झाडांची फळेसुद्धा आपले रंग, रूप, चंव यांनी पक्ष्यांना व प्राण्यांना आपल्याकडे ओढून घेतात. त्यांच्याकडून या झाडांच्या बिया दूरवर पसरतात. यातून त्याच जातीची नवी झाडे उगवतात. अशा प्रकारे वनस्पतींचे प्रजनन चालत राहते.
वर्ग:वनस्पतीशास्त्र |
रसायनशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/रसायनशास्त्र | thumb|right|250px|रसायनशास्त्र हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे
रसायनशास्त्र (इंग्लिश: Chemistry, केमिस्ट्री ;) हे पदार्थाचे गुणधर्म व त्याची स्थित्यंतरे अभ्यासणारे विज्ञान आहे. विविध पदार्थ, त्यांचे गुणधर्म, तसेच त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम यांचा रसायनशास्त्रात अभ्यास होतो. रसायनशास्त्रात रसायनांचे पृथक्करण करून त्यातील संयुगांचाही अभ्यास केला जातो. रसायने अतिरिक्त प्रमाणत शरीरास घातक असतात.
रसायनशास्त्राला कधीकधी केंद्रीय विज्ञान असे सुद्धा म्हटले जाते. कारण, हे शास्त्र मूलभूत पातळीवर आणि अनुप्रयुक्त वैज्ञानिक विषयांना समजून घेण्याचे एक आधार प्रदान करते. [4] उदाहरणार्थ वनस्पती रसायनशास्त्र (वनस्पतीशास्त्र), अग्निजन्य खडकांची निर्मिती (भूशास्त्र), वायुमंडलातील ओझोन कसा तयार होतो आणि पर्यावरण प्रदूषके कशा प्रकारे तयार होतात आणि कशा प्रकारे कमी होतात (पर्यावरणशास्त्र), चंद्रावरील व इतर ग्रहावरील जमिनीचे गुणधर्म (खगोलभौतिक), औषधे कसे कार्य करतात (औषधशास्त्र), आणि गुन्हेगारांचा डीएनए, तसेच इतर पुरावे (फॉरेनसिक) कसे गोळा करावेत.
रसायनशास्त्राचा वापर इतिहासमध्ये फार पूर्वीपासून ते आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आल्याचा दिसून येतो. अनेक सहस्र ख्रिस्तपूर्व काळापासून विविध संस्कृती रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत होत्या, जे अखेरीस रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा आधार बनले. उदाहरणार्थ खनिजापासून धातू काढणे, मातीची भांडी आणि glazes बनवणे, बीयर आणि वाइन आंबवणे, औषधी आणि सुगंधी वनस्पती पासून रसायने काढणे, साबण मध्ये चरबी वापरणे, काच बनवण्यासाठी, आणि कांस्य सारख्या मिश्रक बनवण्यासाठी इ. रसायनशास्त्राची सुरुवात त्याच्या प्रतिशास्त्रापासून, अल्केमीने केली होती, जी वस्तूंच्या घटकांना आणि त्यांच्या परस्परक्रियांना समजण्यासाठी एक अंतर्ज्ञानी पण गैर-वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु, पदार्थ आणि त्याच्या परिवर्तनांचे स्वरूप समजावून सांगण्यात ते अयशस्वी ठरले. तरीसुद्धा, विविध प्रयोग करून आणि परिणामांचे लेखण/ नोन्द् करून, अल्केमिस्टने आधुनिक रसायनशास्त्रासाठी पाया रचला. रसायनशास्त्रातील शोध हे इतर शास्त्रांमधील शोधांपेक्षा अलौकिक किंवा वेगळे होते. तेव्हा रॉबर्ट बॉयल यांनी त्यांच्या कामात द स्काप्टिकल केमिस्ट (1661) मध्ये स्पष्ट फरक निर्माण केला तेव्हा त्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली. अल्केमी आणि रसायनशास्त्र दोन्ही विषयांबद्दल आणि त्यांच्या बदलांसह चिंतेत असताना, महत्त्वपूर्ण फरक शास्त्रज्ञांच्या पद्धतीने दिला होता की रसायनशास्त्रज्ञांनी त्यांच्या कामात नियुक्त केले. रसायनशास्त्र हे एंटोनी लेवेसियरच्या कामामुळे एक स्थापित विज्ञान झाले आहे असे मानले जाते, ज्यांनी सावधगिरीचा मोजमाप केला आणि रासायनिक गुणधर्माचा परिमाणवाचक निरीक्षण करण्याची मागणी केली. रसायनशास्त्राचा इतिहास विशेषतः विलार्ड गिब्सच्या कार्याद्वारे, उष्मप्रदेशांचा इतिहास यांच्याशी घनिष्ठ आहे.
रसायनशास्त्राची व्याप्ती खूप मोठी आहे. इस्पितळामध्ये दिली जाणारी औषधे ही रासायनेेेच असतात. इमारतीला दिला जाणारा रंग रसायनापासून बनवलेला असतो. अन्नपदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये टाकले जाणारे संरक्षक हेही मानवी शरीराला अपाय न करणारे रसायनच आहे. तसेच सजीवांच्या शरीरामध्ये खूप रसायने तयार होतात, त्यांचे विघटन होते, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होतात. धातू शुद्ध स्वरूपात मिळवताना त्याच्या अशुद्ध स्वरूपावर रासायनिक प्रक्रिया केली जाते.
रसायनशास्त्र
अकार्बनी रसायनशास्त्र:
कार्बनी रसायनशास्त्र
जीवरसायनशास्त्र
भौतिकीय रसायनशास्त्र
विश्लेषणात्मक रसायनशास्त्र
वापर
साबण, औषधे, प्लॅस्टीक, अत्तरे, सौंदर्यवर्धक उत्पादने ही सर्व रसायनशास्त्राशी संबंधित उत्पादने आहेत.
हे सुद्धा पहा
रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
बाह्य दुवे
वर्ग:विज्ञान |
गणित | https://mr.wikipedia.org/wiki/गणित | मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात. आलेख कॅल्क्युलेटर चा वापर गणिताचा अभ्यास करतना होत.यात एचपी प्राइम चा वापर खुप केला जातो
नवीन संकल्पना(थिअरी) मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात.
इतिहास
अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्र विकसित पावले. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहेमीच व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळींवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होतांना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, इजिप्त, मेसोपोटॅमिया, प्राचीन चीन, इत्यादी संस्कृतींमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथांत दिसून येतो. पाश्चात्य इतिहासलेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या एलिमेंट्स या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. सोळाव्या शतकाच्या रेनैसन्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी-अधिक मगदुराने झालेला दिसतो. रेनैसन्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरीत्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे.
आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतांत. कलेसाठी कला या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने शुद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितीही आहेत. अशा शुद्ध गणितातील शोधांचा कालांतराने उपयोजित गणितात वापर कसा करावा त्या पद्धतींचा शोध बहुधा लागतोच.
व्युत्पत्ती
गणित या शब्दाची व्युत्पत्ती "गण्" या संस्कृत धातूपासून झाली आहे; गण् म्हणजे मोजणे.
इतिहास
गणिताविषयी एक संस्कृत श्लोक असा आहे :
यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा |
तथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||
अर्थ: ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे. हा श्लोक वेदाङ्गज्योतिषामधील ३५व्या श्लोकामधे बदल करून हा बनवला आहे.
गणिताचा सध्याचा विकास अमूर्त संकल्पनांच्या चढत्या भाजणीतून किंवा विषयाच्या विस्तारातून झाला असे मानता येईल . संख्या ही अमूर्ततेची पहिली पायरी होय. भौतिक वस्तूंची मोजदाद करण्याशिवाय प्राचीन लोकांना काळासारख्या अमूर्त कल्पना (जसे दिवस, महिने वर्ष) कसे मोजावे याचेही ज्ञान होते . अर्थातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत अंकगणिती क्रिया येणे क्रमप्राप्तच होते. प्राचीन काळातील भव्य वास्तू पूर्वजांच्या ज्ञानाची साक्ष देतात.
गणिताच्या अधिक प्रगतीसाठी लेखनाची किंवा संख्यांची नोंद करण्याची पद्धतीची गरज पडली. पडताळ्याच्या रेघा किंवा इंका साम्राज्यातील क्विपू नावाच्या गाठ मारलेल्या दोऱ्या वापरून संख्यात्मक माहितीची नोंदी ठेवल्या जात होत्या. जगभर विविध संख्यापद्धती प्रचलित होत्या.
लिखित इतिहासाच्या प्रारंभापासूनच कर आणि वाणिज्याशी संबंधित व्यवहारांची आकडेमोड करण्यासाठी, संख्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी गणिताची निकड भासली. यावरूनच मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्या अभ्यासांचा गणिताच्या शाखांशी स्थूलरूपाने संबंध जोडता येतो.
विज्ञान आणि गणित यांचा एकमेकांशी परस्परपोषक असा संबंध असल्याने असून हल्लीचे गणित अतिशय विकसित आहे. ऐतिहासिक काळापासूनच गणितात विविध शोध लागले आणि हे चक्र सुरूच आहे.
अमेरिकी गणिती संघटनेच्या (American Mathematical Society जानेवारी २००६ च्या वार्तापत्रातील मिखाईल बी. सेव्हरिक यांच्या लेखानुसार, संघटनेच्या मॅथॅमॅटिकल रिव्ह्यू या विदागारात, त्याच्या प्रथम वर्षापासून म्हणजेच इसवी सन १९४० पासून १९ लाख पुस्तके आणि प्रबंध होते. दरवर्षी त्यांत ७५ हजार नवीन रचना जोडल्या जातात . यातील बहुतांश कृती या नवीन प्रमेये आणि त्यांच्या सिद्धान्तांशी संबंधित आहेत.
प्रेरणा, शुद्ध व उपयोजित गणित, आणि सौंदर्यशास्त्र
जेव्हा मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्याशी संबंधित क्लिष्ट समस्या उभ्या ठाकतात तेव्हा गणित प्रगटते. प्राचीन काळी जमिनीची मोजणी, कर, खगोलशास्त्र इत्यादींमध्ये या समस्यांची सुरुवात झाली. आज विज्ञानातील सर्व शाखांत निर्माण होणाऱ्या समस्या गणिताच्या वापराने सुटू शकतात. तसेच, खुद्द गणितातही अनेक मनोरंजक समस्या प्रगटतात. अनंताश्रयी कलनाचा शोध लावणाऱ्यांपैकी न्यूटन हा एक मानला जातो. फेनमन पथ कलनाचा शोध फेनमनने भौतिकशास्त्रातील अंतर्दृष्टी आणि तर्काच्या साहाय्याने लावला. सांप्रत काळी भौतिकशास्त्रात, ब्रह्मांडशास्त्राशी संबंधित तंतुसिद्धान्तामुळे गणितात नवनिर्मिती होत आहे. गणिताचा काही भाग हा एखाद्या विशिष्ट शाखेशीच निगडित असतो आणि तेथेच त्याचा वापर होतो. परंतु, बहुतेक वेळा ज्ञानाच्या एखाद्या शाखेतील प्रेरणेने विकसित झालेले गणित इतर शाखांमध्येही उपयोगी पडते आणि गणितातील विविधोपयोगी भव्य कोठाराचा भाग बनते. अगदी शुद्धतम गणिताचासुद्धा उपयोजित शाखांमध्ये कुठेना कुठे उपयोग होतोच. या अद्भुत सत्याला स्तिमित होऊन यूजिन विगनर या भौतिकीतील शास्त्रज्ञाने गणिताची अतर्क्य कार्यक्षमता (| इंग्रजी दुवा) असे संबोधले आहे.
ज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणेच गणिताच्या देदीप्यमान विकासामुळे त्यांतही वैशेषीकरण झाले आहे. मुळात शुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन प्रमुख शाखा होत्या. आता मात्र, गणिताच्या नाना उपयोजित शाखांचा गणिताबाहेरील परंपरांशी संगम होऊन सांख्यिकी, क्रियन संशोधन आणि संगणन विज्ञानासारख्या अनेक नवीन विषयांची निर्मिती झाली आहे.
अनेक गणिती, गणिताच्या नेटकेपणाबद्दल म्हणजेच त्याच्या कलात्मक आणि उस्फूर्त सौंदर्याबद्दल बोलतात. गणिताच्या साधेपणाला आणि व्यापकत्वाला विशेष महत्त्व दिले जाते. चतुरपणे मांडलेली सिद्धता (उदाहरणार्थ, जसे मूळ संख्या अनंत असल्याची युक्लिडची सिद्धता) किंवा आकडेमोड सोपी करण्याच्या पद्धती (जसे चपळ फोरियर रूपांतर) यांतही सौंदर्य आहे. जी. एच. हार्डीने "एका गणितीचे वक्तव्य" या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की सौंदर्याचे हे निकषच शुद्धगणिताचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे आहेत. नेटक्या प्रमेयांच्या सिद्धता शोधण्यासाठी गणिती विशेष प्रयत्न करतात. पॉल इरडॉजने या प्रकारास "देवांच्या गणितविषयावरील आवडत्या पुस्तकातील प्रमेयांचा शोध" असे म्हटले आहे. बऱ्याच लोकांना गणिती समस्या उकलण्यास आवडते. अशानेच गणिताचे रंजकत्व आणि लोकप्रियता समजते कि ज्यामुळे गणिताची भीती कमी होण्यास मदत होईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे)चे एस जी. त्यांचा असा विश्वास आहे की याने गणिताच्या शिक्षणाच्या अध्यापनशास्त्राला कोणत्याही वैचारिक कठोरतेशिवाय युक्त्यांचा गुच्छ म्हणून सादर केले आणि इतिहासशास्त्रातील संशयास्पद मानदंडांचे पालन करून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासाला (एसटीएस) या दोहोंचा उच्छेद केला. [२] [ अ] तीर्थ यांची प्रणाली शिकवण्याच्या सहाय्याने वापरली जाऊ शकते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले की “पब्लिक”चा वापर रोखण्याची गरज होती
नोटेशन, भाषा आणि तर्काधिष्ठता
गणितात हल्ली वापरल्या जाणाऱ्या नोटशनपैकी काहीच सोळाव्या शतकापर्यंत शोधले गेले होते. त्या आधी गणित हे केवळ शब्दांत व्यक्त केले जात असे. शब्दांच्या बोजडपणामुळे गणिताचा फारसा विकास होऊ शकलेला नव्हता. आधुनिक नोटेशनमुळे तज्ज्ञांसाठी गणित सोयीचे, परंतु, नवशिक्यासाठी अधिक क्लिष्ट झाले आहे. आधुनिक नोटेशन अतिशय संक्षिप्त आहे. मोजक्याच मुळाक्षरांमध्ये प्रचंड माहिती देता येते. पाश्चात्य संगीताच्या नोटेशनप्रमाणेच गणिताच्या नोटेशनचे कडक नियम असून ते नोटेशन ज्या प्रकारची माहिती लिखित रूपात सांगते, ती इतर कोणत्याही पद्धतीने व्यक्त करणे जवळजवळ अशक्यच आहे.
नवशिक्यांसाठी गणिताची भाषासुद्धा अंमळ क्लिष्टच आहे. अगदी, किंवा-केवळ सारख्या साध्यासुध्या शब्दांनाही गणितात दैनंदिन व्यवहारापेक्षा अधिक नेमका अर्थ असतो. तसेच ‘उघड’ आणि १क्षेत्र’, सारख्या कित्येक शब्दांना गणितात विशेष अर्थ असतो. गणितात सारणिक आणि कलनीय अशा तांत्रिक संज्ञाही आहेत. या विशेष नोटेशन आणि तांत्रिक संज्ञांमागे एक मोठेच कारण आहे. ते म्हणजे, गणिताला दैनंदिन व्यवहारातील बोलीपेक्षा अधिक नेमकेपणा लागतो. भाषेच्या आणि तर्काच्या या नेमकेपणास गणिती "काटेकोरपणा" म्हणतात.
मूलतः काटेकोरपणा हे गणितातील सिद्धतांसाठी आवश्यक आहे. शिस्तबद्ध कार्यकारणभाव लावून मूळ वाक्यांपासून प्रमेये सिद्ध करण्याची गणितींची इच्छा असते. अंतःप्रेरणा आयत्या वेळेस दगा देऊ शकते. त्यामुळे चुकीचे सिद्धान्तही मांडले जाऊ शकतात. गणिताच्या इतिहासात असे अनेक वेळा झालेही आहे. हे टाळण्यासाठी काटेकोरपणा पाळावाच लागतो. हा काटेकोरपणा काळानुसार कमी-अधिक झालेला आहे.
ग्रीकांच्या काळी सिद्धतांचे मुद्दे विस्तृत रितीने मांडण्यावर भर होता. न्यूटनच्या काळी काटकोरपणा त्या मानाने कमी होता. न्यूटनने वापरलेल्या व्याख्यांमधील कच्च्या दुव्यांमुळे १९ व्या शतकात काळजीपूर्वक विश्लेषण आणि औपचारिक सिद्धतांचा पुन्हा उदय झाला. संगणकाच्या मदतीने लिहिलेल्या सिद्धता वापरल्या जाव्यात अथवा नाही यावर आजच्या गणितींमध्ये मतभेद आहेत. अतिभव्य आकडेमोडींचा पडताळा करणे अत्यंत अवघड असल्याने अशा प्रकारच्या सिद्धान्तांमध्ये अपेक्षित काटेकोरपणाचा अभाव असू शकतो. परंपरेच्या दृष्टीने मूलवाक्ये ही स्वयंप्रकाशित तथ्ये होती. परंतु, पुढेपुढे ती तथ्ये जशीच्या तशी मानण्यात बऱ्याच व्यावहारिक अडचणी असल्याचे लक्षात आले. औपचारिक दृष्टीने पाहता, ज्याचा मूळ अर्थ त्या-त्या मूळवाक्याच्या विधिविधानातील सूत्रांच्या संदर्भातच असतो असे मूलवाक्य म्हणजे चिन्हांनी बनलेले केवळ एक नाम असते,
सगळ्याच गणितास मूलवाक्याच्या आधाराने सिद्ध करणे हे हिलबर्टच्या आज्ञावलीचे उद्दिष्ट होते. परंतु गोडेलच्या अपूर्णतेच्या सिद्धान्तानुसार कुठल्याही यथोचित मूळ वाक्यांच्या विधिविधानात सिद्ध न करता येण्याजोगी सूत्रे असतातच. त्यामुळे गणिताचे संपूर्ण मूलवाक्यायन अशक्य आहे. इतके असले तरी गणित हे कुठल्यातरी संच सिद्धांतातील (संचप्रवादातील) मूळवाक्यायन आहे असे समजले जाते. या दृष्टीने पहाता प्रत्येक गणिती वाक्य किंवा सिद्धान्त हा संचसिद्धान्तातील सूत्रांच्या रूपात मांडला जाऊ शकतो.
गणितातला "पाय"(π)
याबद्दलचा विस्तृत लेख येथे आहे.
ग्रीक भाषेतले अक्षर "पाय" "पाय x व्यासाची लांबी = परीघाची लांबी" ह्या वर्तुळासंबंधित समीकरणात रूढीने वापरण्यात येते आणि त्यात
पायची किंमत जवळ जवळ ३.१४१५९ आहे. वर्तुळातील परिघाची लांबी व व्यासाची लांबी यांचे गुणोत्तर म्हणजेच पाय हे स्थिरांक म्हणून मानले जाते.
फर्माचे "शेवटचे प्रमेय"
पिएर फर्मा (इ.स. १६०१ -१६६५) हे एक बुद्धिमान फ्रेंच गणिती होते. वास्तविक कायदेशास्त्राच्या शिक्षणानंतर ते सरकारी नोकरीत वकिलीचा व्यवसाय करत असत, पण गणितशास्त्राचा अभ्यास हा त्यांचा आवडता छंद होता.
"जर
ह्या समीकरणात, 'न'ही २हून मोठी नैसर्गिक संख्या असेल, तर
या समीकरणाचे समाधान करणारे 'क', 'ख' आणि 'ग' असे तीन पूर्णांकात अस्तित्वात नाहीत" असे एक विधान फर्माने आपल्या एका शोधनिबंधात मांडले. शिवाय "या विधानाची एक खास सिद्धता मी शोधून काढली आहे, पण ह्या पानावरची (छापील मजकुराभोवतीची) समासाची जागा ही सिद्धता लिहायला अपुरी आहे" असेही त्याने या शोधनिबंधात लिहिलेसंदर्भ?. मात्र फर्माने आपल्या हयातीत ही सिद्धता कुठेही लिहिली नाही. त्याच्या पश्चात जेव्हा हे विधान सिद्ध करण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा गणितज्ञांच्या ध्यानात आले की हे विधान सिद्ध करणे सोपे नाही.
फर्मा ह्यांच्या निधनानंतर हे विधान "फर्माचे शेवटचे प्रमेय" ह्या नावाने गणितशास्त्रात प्रसिद्धीला आले --- सिद्ध केले नसले तरी या विधानाले प्रमेय म्हटले जात होते. सुमारे ३३० वर्षे ते प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करायचे जंगी प्रयत्न अनेक बुद्धिमान गणितज्ञांनी केले, पण त्या प्रदीर्घ काळात कोणालाही त्यात यश मिळाले नव्हते. सरतेशेवटी आंड्र्यू वाइल्स ह्या ब्रिटिश गणितज्ञाने अनेक वर्षांच्या प्रयत्नाने १९९४ साली ते प्रमेय सिद्ध केले!
पिएर फर्मा, रेने देकार्त, आणि ब्लेस पास्कॅल हे तीन श्रेष्ठ फ्रेंच गणिती समकालीन होते.
प्रसिद्ध गणिती
आर्यभट्ट
पिएर फर्मा
रेने देकार्त
ब्लेस पास्कॅल
कार्ल फ़्रिडरीश गाऊस
लिओनार्ड ऑइलर
बर्नार्ड रिमान
श्रीनिवास रामानुजन
शकुंतला देवी
भास्कराचार्य
आंड्र्यू वाइल्स
पायथागोरस
हिरो
आर्किमिडीज
हे सुद्धा पहा
भारतीय गणित
भारतीय गणित (निःसंदिग्धीकरण)
इतर वाचनीय
विज्ञानरूपी गणित
गणिताच्या शाखा
बाह्य दुवे
*
वर्ग:विज्ञान
वर्ग:लाल दुवे असणारे लेख |
चित्रकला | https://mr.wikipedia.org/wiki/चित्रकला | इवलेसे|उजवे|राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र
right|thumb|संगणकाच्या वापराने क्युबिझम पद्धतीने काढलेली अक्षरे
चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले.
इतिहास
इवलेसे|उजवे|महाभारतातील चित्र
प्राचीन ग्रंथ विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात होती.
प्राचीन चित्रकला
इवलेसे|डावे|अजिंठा लेण्यातील चित्र
महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते.
पौराणिक चित्रकला
पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात.
मध्ययुगीन चित्रकला
युरोपीय चित्रकला
वास्तवदर्शी कला
आशियायी चित्रकला
भारतीय चित्रकला
उत्तर भारतीय
कांगडा
बंगाली
राजपूत
राजस्थानी
वारली
प्रमुख चित्रकार
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध चित्रकार
आबालाल रहिमान
गंगाराम तांबट
जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर
गोपाळ देऊसकर
बाबूराव पेंटर
मिलिंद मुळीक
वासुदेव तारानाथ कामत
वासुदेव गायतोंडे
विकास सबनीस
सुहास बहुळकर
चित्रकला आणि धर्म
संगणकीय चित्रकला
संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो .
या प्रकारातील मोडणारे sOftware निर्मित इमारत चित्रे सातारा येथील कॅड point येथे बनवली जातात.
चित्रकलाविषयक आणि चित्राकारांवरील पुस्तके
कलोपासना (सचिन क्षीरसागर)
चित्रकार अमृता शेर-गील (रमेशचंद्र पाटकर)
आदर्श चित्रकला (प्रा. जयप्रकाश जगताप)
कॅनव्हास (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)
चित्रकार गोपाल देऊसकर : कलावंत आणि माणूस (सुहास बहुळकर)
चित्रे काढा वाहनांची (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
चित्रे रंगवा पक्षांची (बालसाहित्य,लेखक - पुंडलिक वझे)
चित्रे रंगवा माणसांची (बालसाहित्य, लेखक - गोपाल नांदुरकर, राहुल देशपांडे )
चित्रे काढा माणसांची (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
मास्टर आर्टिस्ट ज. द. गोंधळेकर (ज्योत्स्ना प्रकाशन)
पर्स्पेक्टिव्ह (मराठी पुस्तक, लेखक - मिलिंद मुळीक)
पेन्सिल टेक्निक्स भाग १, २ (गोपाल नांदुरकर, राहुल देशपांडे)
पेन्सिल शेडिंग (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
पेन्सिल शेडिंग - वास्तुचित्रे (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
पोर्ट्रेट्स (मराठी/इंग्रजी, वासुदेव कामत)
भारतीय चित्रकला आणि संगीत (डॉ. अलका विश्वनाथ खाडे)
मिलिंद मुळीक @ Home (मराठी पुस्तक, लेखक - मिलिंद मुळीक)
रहस्य रेखांकनाचे (ऋजुला पब्लिशिंग हाउस)
रेखाचित्रविचार : एक संवाद (रणजित होस्कोटे, सुधीर पटवर्धन)
वॉटरकलर लॅन्डस्केप्स स्टेप बाय स्टेप (मिलिंद मुळीक)
वारली चित्र संस्कृती (डॉ. गोविंद गारे)
व्यंगनगरी (विकास सबनीस)
हास्यचित्र कसे काढावे (डॉ. श्याम जोशी)
हे सुद्धा पहा
सर ज.जी. कलामहाविद्यालय
बाह्य दुवे
चित्रकला हाच श्वास
वर्ग:चित्रकला |
शिल्पकला | https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला | thumb|right|200px|महाराष्ट्रामधील घारापुरी लेण्यांमधील 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प
इवलेसे|अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन विहीर
शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
यामध्ये मातीची भांडी आणि ऊस आणि बांबू इत्यादीपासून बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. काही हस्तकला जसे की लाकूडकाम, चित्रकला आणि दगडी बांधकाम स्थापत्य घटक आणि कलेच्या वस्तू म्हणून चित्रित केले आहे. सिंधू संस्कृतीच्या कालखंडातील (3000-1500 ईसापूर्व) कलाकुसर समाजाच्या क्रियाकलाप आणि सक्रियतेचे पुरावे आपल्याला मिळतात. सुती कापड आणि विविध आकार, आकार आणि डिझाईन्सचे सिरॅमिक, अर्ध-मौल्यवान दगडांपासून बनवलेले मणी, मातीच्या मूर्ती आणि सील या ठिकाणी अत्याधुनिक हस्तकला सांस्कृतिकडे निर्देश करतात. नंतर, 16व्या आणि 17व्या शतकात मुघल शासकांच्या राजवटीत, कलाकुसरीचा एक नवीन प्रकार उदयास आला.
thumb|right|200px|मार्कंडा येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.
संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. भारताच्या स्थापत्य, शिल्पकला, कला आणि हस्तकलेची मुळे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात खोलवर दिसते. भारतीय शिल्पकलेने सुरुवातीपासूनच एक वास्तववादी रूप धारण केले आहे, ज्यात मानवी व्यक्तिरेखा बहुतेक वेळा पातळ कमर, लवचिक अवयव आणि एक तरुण आणि संवेदनशील रूप दर्शवते. भारतीय शिल्पांमध्ये वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवलेल्या असंख्य देवतांचे चित्रण करण्यात आले आहे.
सिंधू खोरे सभ्यता भारतातील मोहेंजोदरोचे मोठे जलसाठा प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. दक्षिणेकडील कांचीपुरम, मदुरै, श्रीरंगम आणि रामेश्वरम आणि उत्तरेकडील वाराणसीची मंदिरे ही मंदिरे ही भारतातील भरभराट झालेल्या कलेचे एक प्रसिद्ध उदाहरण आहे.
इतकेच नाही तर मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर आणि ओरिसाच्या सूर्यमंदिरातही या नितांत कलेचा जिवंत देखावा आहे. सांची स्तूप शिल्पसुद्धा अतिशय भव्य आहे जे ईसापूर्व तिसऱ्या शतकातील आहे. तसेच सभोवतालची जंगले (बलसट्रेड्स) आणि तोरणांचे दरवाजे सुशोभित करीत आहे. ममल्लापुरमचे मंदिर; सारनाथ संग्रहालयाची लायन कॅपिटल (जिथून भारताच्या अधिकृत सीलला अभिवादन करण्यात आले होते) ही मोरयाची मूर्ती आहे, अमरावती महात्मा बुद्धांच्या जीवनातील घटना आणि नागार्जुनघोंडाच्या स्थापत्य शिल्पांचे वर्णन करणारे इतर उदाहरण आहेत.
मुंबईच्या जवळ असलेल्या एलिफंटा लेण्यांमध्ये हिंदू गुहेच्या स्थापत्य वास्तूचा कळस दिसतो आणि त्याचप्रमाणे एलोराच्या हिंदू आणि जैन खडकांच्या मंदिरांमध्ये, विशेषतः आठव्या शतकातील कैलास मंदिरही या वास्तुकलेच्या रूपात पाहिले जाऊ शकते.
भारतातील प्राचीन शिल्पकला/मूर्तीकला
भारतातील एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरून ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.
मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वाडा विश्रामबागवाडा नाशिकचा सरकार वाडा कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा सातारकर छत्रपतींची वाडे याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिंता आहेत या बांधकामात विटा वापरल्या जात लाकडी खांब तुळ्या पाठ घडीव दगड कमानी उत्तम घोटलेले चुना नळीच्या कौलांचे छप्पर चिखल व बांबू यांचा वापर बांधकामात केला जात असे वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम रंग काम काष्ठशिल्प आरसे याचा वापर केला जात असे मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य व स्थान मिळाले शिवकाळ ते पेशवाई काळ याकाळात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प शैली बहरली
शैली किंवा डौल
मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात.
आसनपर्यक
अर्धपर्यक
आलीढ
प्रत्यालीढ
पद्म
वीर - इत्यादी
उभी राहण्याची शैली
यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.
समभंग
त्रिभंग
अतिभंग
आयुधे व उपकरणे
मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.
आयुधे
शंख
चक्र
त्रिशूल
परशू
अंकुश
गदा
बाण
खड्ग
इत्यादी.
उपकरणे
वीणा
डमरू
कमंडलू
पोथी
दर्पण
शुक
पुष्प
इत्यादी.
मुद्रा
हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.
नमस्कार
अभय
वरद
भूस्पर्श
तर्जनी
तर्पण
अर्धचंद्रहस्त
अंजली
ज्ञानमुद्रा
इत्यादी.
मूर्तींचे अलंकार
अंगद
मकरकुंडले
चन्नवीर
मुकुट
बाजुबंद
मेखला
श्रीवत्स
इत्यादी.
हेसुद्धा पहा
शिल्पकार राम सुतार
चित्रकला
कला
बाह्य दुवे
शिल्पकला - मनसे
भारतीय शिल्पकला
अत्युच्च्य शिल्पकला : हळेबीड व बेलूर
राजस्थानातील अतुल्य शिल्पकला
संदर्भ
वर्ग:शिल्पकला
वर्ग:कला |
हस्तकला | https://mr.wikipedia.org/wiki/हस्तकला | right|thumb|हस्तकला
हस्तकला म्हणजे हात किंवा / व साधी हत्यारे/उपकरणे वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू आहेत.हा कले
चा पारंपारिक भाग आहे.यात कातणे,विणणे, सुईकाम, जरीकाम,शिवणकाम, बाहुल्या बनविणे, कोरीवकाम,नक्षीकाम ,सुतारकाम कुंभारकाम अश्या
सारख्या कामांचा समावेश होतो.भारत यासाठी प्रसिद्ध आहे.
वर्ग:हस्तकलाकलेचे महत्त्व
ज्या भावना, जे विचार शब्दांत सांगता येत नाहीत व मांडता येत नाहीत ते अनेकदा कलेच्या माध्यमातूर व्यक्त करणे जास्त परिणामकारक होते.
कलेमुळे आपले जीवन आनंदी व समृद्ध होते. कलेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि त्यातून
परस्परांबद्दलचा आदर वाढतो. जगण्यातील सौंदर्य वाढवण्याची वृत्ती
तयार होते. आपण स्वतःलाही चांगल्या प्रकारे ओळखू शकतो.
कोणत्याही समाजामध्ये मग तो सुशिक्षितांचा, अशिक्षितांचा मागासलेला किंवा सुसंस्कृत पुढारलेला असो, कलानिर्मिती है लोकजीवनाचे एक आवश्यक अंग बनले आहे.
कलेचा विकास हा कोणत्याही शास्त्रीय प्रगतीवर अवलंबून नाही. अगदी प्राचीन काळातही इजिप्त मेसोपोटेमिया भारत, चीन, ग्रीस, इ. देशांमधील मानव प्रगत नसतानाही कलाक्षेत्रात त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केल्याचे दिसून येते.
भारतीय संस्कृतीमध्ये खूप प्राचीन काळापासून उत्कृष्ट शिल्पकलेचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा केव्हज, कोपेश्वर शिवमंदिर, खजुराहो, हळेबीड, बंगळूर अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे उत्तम शिल्पकला आपण पाहू शकतो. |
भूशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/भूशास्त्र | भूशास्त्र ( - from the Greek γῆ, gê, "पृथ्वी" and λόγος, logos, "अभ्यास" )
हे भूगर्भाच्यासंदर्भात अभ्यासाचे शास्त्र आहे. भूगर्भातील विविध स्तरांचा अभ्यास भूशास्त्रात केला जातो. याचा मुख्यत्वे खनिजांचा शोध, खनिजतेलाचे उत्खनन, पाणी नियोजन यांत केला जातो.
*
वर्ग:विज्ञान
वर्ग:सामाजिक शास्त्रे
वर्ग:भूगोल |
कृषिशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/कृषिशास्त्र | पुनर्निर्देशन कृषिसंशोधन |
पाककला | https://mr.wikipedia.org/wiki/पाककला | thumb|Cooking (Unsplash)
पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. निरामिष (शाकाहारी, vegetarian) व सामिष (मांसाहारी, non-vegetarian) या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात चवीने खाल्ले जातात.
महाराष्ट्रातसुद्धा कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा इत्यादी भागांप्रमाणे वेगळ्या पाकशैली आणि वेगवेगळे पदार्थ पहायला मिळतात. प्रत्येक भागात वापरले जाणारे विशिष्ट जिन्नस, तिखट-गोड चवींबद्दलची आवड निवड यातील बदल याचा त्या भागातील पाककलेवर परिणाम झालेला आहे.
स्वयंपाक किंवा स्वयंपाकाचे भांडे म्हणजे कला, तंत्रज्ञान, विज्ञान आणि अग्नी किंवा उष्णता यांच्या वापरासह किंवा त्याव्यतिरिक्त वापरासाठी अन्न तयार करण्याचे शिल्प. स्वयंपाक तंत्र आणि साहित्य जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत, जे अग्निशामक स्टोव्ह वापरण्याकरिता खुल्या अग्नीवर अन्न खाणे, विविध प्रकारचे ओव्हनमध्ये बेकिंग, अद्वितीय पर्यावरण, आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरांवर व ट्रेन्डचे प्रतिबिंबित करतात. स्वयंपाकाच्या मार्गांमुळे किंवा प्रकाराचे कौशल्य देखील वैयक्तिक कुकच्या कुशलतेवर आणि प्रशिक्षणाच्या प्रकारावर अवलंबून असतो. स्वयंपाक घरात स्वयंसेवक आणि रेस्टॉरंट्स आणि इतर अन्न आस्थापनांमध्ये व्यावसायिक स्वयंपाकी व शेफ यांच्या द्वारे पाककला केली जाते. रासायनिक अभिक्रियांच्या माध्यमातून उष्णतेच्या उपस्थितीशिवाय पाककला केली जाऊ शकते जसे की सेव्हचेस, एक पारंपारिक दक्षिण अमेरिकन डिश जिथे मासा लिंबू किंवा लिंबाचा रस यातील ऍसिडसह शिजवला जातो.
उष्णता किंवा आग्नेसह अन्न तयार करणे ही मानवजातीसाठी एक अद्वितीय वैशिष्ट्य आहे. कदाचित सुमारे २ दशलक्ष वर्षांपूर्वी हे पुरातत्त्ववादी पुरावे १ दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत पोहोचत असले तरी
शेती, व्यापार, व्यापार आणि विविध क्षेत्रातील संस्कृती यांच्यातील वाहतूक विस्ताराने अनेक नवीन साहित्य शिजवल्या जात आहेत. नवीन शोध आणि तंत्रे, जसे की धारण आणि उकळत्या पायीसाठी मातीचा शोध, विस्तृत पाककला तंत्र. काही अद्ययावत कूक अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासाठी अन्न तयार करतात.
इतिहास
फिलेजेनेटिक विश्लेषण सुचवितो की मानवी पूर्वजांनी १.८ दशलक्ष ते २.३ दशलक्ष वर्षांपूर्वी पाककृती शोधली असू शकते. दक्षिण आफ्रिकेच्या वॅंन्डरक गुहेतील बर्न फ्रॅग्रेम्स आणि वनस्पती ऍशचे पुनर्नवीनीकरणाने १ दशलक्ष वर्षांपूर्वी सुरुवातीच्या मानवांच्या द्वारे अग्निशामक नियंत्रण करणारे पुरावे प्रदान केले आहेत. असा पुरावा आहे की होमो ईटेन्टस ५००००० वर्षांपूर्वीचे त्याचे अन्न स्वयंपाक करत होते. जवळजवळ ४००००० वर्षांपूर्वी होमो ईटेक्टसच्या आगमधल्या नियंत्रित वापरासाठी पुरावा म्हणून व्यापक विद्वत्तापूर्ण आधार आहे.३००००० वर्षांपूर्वीचे पुरातत्त्व पुरावे, प्राचीन हिरे, पृथ्वी ओव्हन, जाळलेले पशू हाडे, आणि फ्लिंट या स्वरूपात, युरोप आणि मध्य पूर्व मध्ये आढळतात. मानवशास्त्रज्ञांना असे वाटते की, कचरा पेटी मोठ्या प्रमाणात सुमारे २५०००० वर्षांपूर्वी घडली होती, जेव्हा हेरथची सुरुवात झाली.
अलीकडे, लवकरात लवकर हेरथची संख्या किमान ७९०००० वर्षांपूर्वी नोंदवली गेली आहे.
ओल्ड वर्ल्ड आणि द न्यू वर्ल्ड इन द कोलम्बलयन एक्स्चेंज यांच्यात दळणवळणाचे आक्रमण कुकिंगच्या इतिहासावर पडले. न्यू वर्ल्डमधून अत्यावश्यक पदार्थांची चळवळ, जसे बटाटे, टोमॅटो, मका, याम, सेम, बेल मिरी, मिरची मिरपूड, या वनस्पतीसाठी केलेला अर्क, भोपळा, कसावा, आवाकोडा, शेंगदाणे, पेकॅन, काजू, अननस, ब्ल्यूबेरी, सूर्यफूल , चॉकलेट, गोवरी, आणि स्क्वॅशचा जुन्या जागतिक पाकळीवर मोठा परिणाम झाला. जुन्या जगापासून अत्यावश्यक पदार्थांमधील चळवळी जसे की गुरेढोरे, मेंढी, डुकरे, गहू, ओट्स, जव, तांदूळ, सफरचंद, नाशवंत चिअर, मटार, चणे, हिरवे सोया, सरस आणि गाजर यामुळेच नवीन विश्व पाककृती बदलली.
सतराव्या आणि अठराव्या शतकात, युरोपमधील अन्नपदार्थ ओळखणे हा क्लासिक मार्कर होता. १९ व्या शतकाच्या "राष्ट्रवादाची वय" खाद्यपदार्थ राष्ट्रीय ओळखीचे परिभाषित प्रतीक झाले.
औद्योगिक क्रांतीमध्ये प्रचंड प्रमाणावर उत्पादन, जन-विपणन आणि अन्नाचे मानकीकरण आणले गेले. निरनिराळ्या पदार्थांचे संसाधित, संरक्षित, कॅन केलेला आणि पॅकेज केले जाणारे कारखाने, आणि प्रक्रिया केलेले अन्नधान्यांचा पटकन अमेरिकन नाश्त्याचा एक निर्णायक वैशिष्ट्य बनला. १९२० च्या दशकात फ्रीझिंग पद्धती, कॅफेटेरिया आणि फास्ट फूड रेस्टॉरंट्स उदयास आले.
साहित्य
स्वयंपाक करण्याचे बरेच घटक जिवंत प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. भाजीपाला, फळे, धान्य आणि पिके तसेच वनस्पती आणि मसाल्या वनस्पतीपासून येतात, तर मांस, अंडी आणि डेअरी उत्पादने प्राण्यांमधून येतात. मशरूम आणि बेकिंगमध्ये वापरलेले यीस्ट प्रकारचे बुरशी आहेत कूक देखील मीठ म्हणून पाणी आणि खनिजे वापर कुक वाइन किंवा आत्मीतेही वापरू शकतात.
नैसर्गिकपणे येणाऱ्या घटकांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि चरबी नावाचे अणू असतात. त्यात पाणी आणि खनिजे देखील आहेत पाककलामध्ये या रेणूंच्या रासायनिक गुणधर्मांचा हेतू आहे.
कार्बोहायड्रेट
कार्बोहायड्रेटमध्ये सामान्य खोबरेल, सुक्रोज (टेबल सॅचर्स), डिसाकार्डिड, आणि अशा साध्या शर्करा जसे ग्लुकोज (सूरोझनाच्या एन्झामाय विभाजनाने बनवलेला) आणि फळांच्यापासून बनवलेले पदार्थ (फळापासून) आणि अन्नधान्य आंबा, तांदूळ, अर्रोक आणि बटाटे.
उष्णता आणि कार्बोहायड्रेटचे ऑनस्क्रान्स जटिल आहे लांबचिकर शुगर शुक्ल जसे स्टार्च शिजवल्यावर सोवळ्या शुद्ध विघटनित असतात, तर साधारण साखर शुक्ल तयार करतात. जर हा कार्बोहाइड गरम झाला तर क्रिस्टलझिझेशनचा सर्व पाण्याने वाहून गेला असेल तर कार्मिलायझेशन सुरू होईल, ज्यामुळे कार्बन तयार झाल्याने तेमल विघटन होणारी साखर आणि कॅरमैल उत्पादक इतर ब्रेकडाउन उत्पादने वापरली जातील.
चरबी किंवा पाण्यातून द्रव एक मिश्रण, नंतर ताजे गरम करून, शिजवलेला डिशला अस्थिरता द्या. युरोपियन पाककला, लोणी व आलेठ या मिश्रणाचा एक रौक्स वापरला जातो ज्यामुळे द्रव किंवा सोस तयार होतात. आशियाई पाककला, तांदूळ किंवा कॉर्न स्टार्च आणि पाण्यास मिश्रणे हीच प्रभाव प्राप्त होतात. या तंत्रांवर स्टॉच गुणधर्म अवलंबून असते जे तयार करताना सरळ म्युसेललागिनस सैकराइड तयार करतात, ज्यामुळे सॉसचे परिचित जाड होते. तथापि, अतिरीक्त उष्णतामुळे विघटन कमी होऊ शकते.
चरबी
चरबी प्रकार म्हणजे भाजीपाला, जनावरे इत्यादी जसे की बटर आणि चरबी, तसेच धान्य आणि फ्लेक्स ऑइलसह अन्न देखील पाककला आणि बॅकिंग अनेक प्रकारांचा चरबी वापरतो. मिस फ्रीज, ग्रील्ड चीज किंवा पॅनकेस तयार करा, पॅन किंवा कांदयाचे इ. नीट ढवळत जाणे वारंवार चरबी किंवा तेल सह भाजलेले पदार्थ जसे की कुकीज, केक्स आणि पाईप्समध्ये देखील चरबी वापरतात. चरबी उष्णकटिबंधातील पाण्याच्या पातळीपेक्षा जास्त तपमान असणे आणि ते इतर द्रव्यांचे जसे तेफ, भिजवून किंवा सॉटिंगमध्ये जास्त उष्णता वापरते. अन्नामध्ये चव डालना अन्न (तेलात किंवा खारटलेला डुकराचे मांस चरबी) ते चरबी वापरत असल्यास, खाद्यपदार्थांना चिकटून राहाणे आणि एक अपेक्षित पोत तयार करणे थांबवा.
प्रथिने
स्नायु, ऑफल, दूध, अंडे आणि अंडे श्वानांचा समावेश आहे प्रथिने सामग्रीमध्ये प्रथिने खूप प्रमाणात आहेत जवळजवळ सर्व भाजी पदार्थ (विशेषतः शेड्ये आणि बियाणे) प्रथिनेच त्यात समाविष्ट होते, साधारणपणे लहान प्रमाणात मशरूम उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आहेत की कुठल्याही अत्यावश्यक अमीनो एसिडचे स्रोत. जेव्हा प्रथिने गरम होतात तेव्हा ती विकृत होते (उघडकीस होतात) आणि पोत बदलतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये, या पदार्थांचे रचना मलम किंवा अधिक सुगंधी बनविणे कारणीबूड - मांस शिजलेले आहे आणि ते ते अधिक सुगंधी आणि कमी लवचिक असतात. काही प्रसंगी, प्रथिने अधिक कठोर संरचना बनविते, जसे की अंडे पंक मध्ये ॲलेकनचा दाग अंडा पांढरा पिसांचा एक लवचिक पण लवचिक मॅट्रिक्स तयार करणे बॅकिंग केक्स एक महत्त्वाचा घटक प्रदान करते आणि मिडीयअम आधारीत अनेक डिझर्ट्स मिस होतात.
पाणी
पाककला सहसा इतर द्रवांमध्ये वारंवार आढळलेले पाणी, जे शिजलेले पदार्थ (विशेषतः पाणी, स्टॉक किंवा वाइन) विसर्जित करणे आणि खाद्यपदार्थांतून ते स्वतःच सोडले जातात डिश मध्ये एक व्यवस्थित पद्धत जोडणे एक आवडीचे पद्धत जोडण्यासाठी एक द्रव पदार्थ द्रव पदार्थ द्रव पदार्थ स्वयंपाक करणे इतके महत्त्वाचे आहे की वापरण्याजोगी पाककृती पद्धती नाव सहसा द्रव कसे अन्न एकत्रित करते, जसे की वाफाळ, उकळत्या, उकळत्या पाण्यात, आणि ब्लीचिंग करते. ओपन केटेनर परिणामी गरम द्रव वाढते ज्यामुळे बाष्पीभवन वेगाने वाढते, जे उर्वरित चव आणि साहित्य लक्ष केंद्रित करते - हे एक विशेष घटक आहे.
जीवनसत्त्वे आणि खनिजे
सामान्य चयापचय प्रक्रियेसाठी विटामिन आणि खनिजे आवश्यक असतात परंतु शरीर स्वतः निर्माण करू शकत नाही आणि त्यामुळे बाह्य स्रोतांमधून येणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन्स ताजी फळे आणि भाज्या (व्हिटॅमिन सी), गाजर, यकृत (व्हिटॅमिन ए), अन्नधान्य कोंडा, ब्रेड, यकृत (ब जीवनसत्त्वे), फिश लिव्हर ऑइल (व्हिटॅमिन डी) आणि ताजी हिरव्या भाज्या (व्हिटॅमिन के) यासह अनेक स्त्रोतांमधून येतात. लोहा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराईड आणि सल्फर यासारख्या छोट्या प्रमाणातील अनेक खनिज देखील आवश्यक असतात; आणि लहान प्रमाणात तांबे, जस्त आणि सेलेनियम फळे आणि भाज्यामधील सूक्ष्म पोषक घटक, खनिजे आणि जीवनसत्त्वे नष्ट होऊ शकतात किंवा स्वयंपाकाद्वारे बोलता येते व्हिटॅमिन सी विशेषतः स्वयंपाक करताना ऑक्सिडेशनला बळी पडतो आणि प्रदीर्घ स्वयंपाक करून पूर्णपणे नष्ट होऊ शकतो.[दिलेल्या उद्धरणानुसार नाही] काही जीवनसत्त्वे जसे की थायामिन, व्हिटॅमिन बी , नियासिन, फॉलेट आणि कॅरोटीनॉड्स यांची जैवउपउपलब्धता वाढवते.
संदर्भ
https://en.wikipedia.org/wiki/Cooking
बाह्यदुवे
वर्ग:पाककला |
जब्बार पटेल | https://mr.wikipedia.org/wiki/जब्बार_पटेल | जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत), २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.
बालपण
जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली.
पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० तेंडुलकरांची ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले. हे नाटक खूप गाजले.
जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.
चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात
एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची पटकथा ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले. (इ.स. १९७४)
कारकीर्द
डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे.x २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."
डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर ॲंकेडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्थापना केली आहे.
इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे. जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.
वैयक्तिक जीवन
डॉ. जब्बार पटेल यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत.
जब्बार पटेल यांची भूमिका असलेली नाटके
तुझे आहे तुजपाशी
माणूस नावाचे बेट
वेड्याचे घर उन्हात
तीन पैश्याचा तमाशा
घाशीराम कोतवाल
जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
डॉ बाबासाहेब आंबेडकर (२०००)
मुक्ता (१९९४)
एक होता विदूषक (१९९२)
महाराष्ट्र (१९८६)
मुसाफिर (१९८६)
उंबरठा (१९८२)
सिहासन (१९७९)
जैत रे जैत (१९७७)
सामना (१९७४)
जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले लघुपट
कुमार गंधर्व (हंस अकेला) (२००५)
फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र (१९९०)
इंडियन थिएटर (१९९०)
कुसुमाग्रज
पथिक (१९८८)
मी एस.एम. (१९८७)
लक्ष्मणराव जोशी (१८८९)
पुरस्कार
२०१४ सालचे अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे दिले गेलेले (४९वे) विष्णूदास भावे गौरव पदक.
पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार.
दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
बाह्य दुवे
संदर्भ
पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल!
पटेल,जब्बार
वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म
वर्ग:लाल दुवे असणारे लेख
वर्ग:चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारविजेते |
सई परांजपे | https://mr.wikipedia.org/wiki/सई_परांजपे | सई परांजपे (१९ मार्च, इ.स. १९३८) या एक मराठी लेखिका, नाटककार, बालनाट्ये लिहून रंगमंचावर सादर करणाऱ्या, पटकथाकार व चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्या आहेत. समांतर चित्रपट या वर्गवारीत येणारे अनेक चित्रपट त्यांनी प्रामुख्याने दिग्दर्शित केले आहेत.
सई परांजपे हे नाव त्यांच्या बालवयापासूनच लोकांना परिचयाचे आहे. कारण, ज्या वयात मुले लंगडी, लपाछपी खेळतात त्या वयात म्हणजे वयाच्या ८व्या वर्षी, सई परांजपे यांचे पहिले पुस्तक -मुलांचा मेवा- केवळ लिहून नव्हे तर, छापून प्रकाशित झाले होते. त्यामुळे त्यांची सुरुवातच मुळात बाल वयातील लेखीका म्हणून झाली. पुढे त्यांच्या लेखणीला सखोलता प्राप्त झाली आणि अल्पावधीतच त्या यशस्वी आणि लोकप्रिय लेखिकाही झाल्या. बालसाहित्य लेखिका, बालनाट्य लेखिका, नाटककार, पटकथाकार तसेच, निर्मात्या अश्या एकापेक्षा एक अश्या सरस कामगिऱ्या सई परांजपे यांनी पार पाडल्या आहेत.
चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या.
कुटुंब
रँग्लर र.पु. परांजपे हे सईचे आजोबा, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या शकुंतला परांजपे या आई, अरुण जोगळेकर हे घटस्फोटित पती, आणि गौतम जोगळेकर आणि विनी ही अपत्ये.
सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेली प्रमुख नाटके
एक तमाशा सुंदरसा (या नाटकात सुहास भालेकर भूमिका करत)
गीध
जादूचा शंख (बालनाट्य)
झाली काय गंमत (बालनाट्य)
धिक् ताम्
पत्तेनगरी (बालनाट्य)
पुन्हा शेजारी
माझा खेळ मांडू दे
शेपटीचा शाप (बालनाट्य)
सख्खे शेजारी
सई परांजपे यांचे चित्रपट
कथा (१९८३)
चष्मेबद्दूर (१९८१)
चुडिया (१९९३)
दिशा (१९९०)
साज (१९९७)
स्पर्श (१९८०)
सई परांजपे यानी लिहिलेली पुस्तके
आलबेल (नाटक)
जादूचा शंख (बालसाहित्य)
जास्वंदी (बालनट्य)
झाली काय गंमत (बालसाहित्य)
नसीरुद्दीन शाह आणि मग एक दिवस (अनुवादित आत्मचरित्र, मूळ इंग्रजी And Then One Day, लेखक नसीरुद्दीन शाह)
भटक्याचें भविष्य (बालसाहित्य)
मुलांचा मेवा (बालसाहित्य)
शेपटीचा शाप (बालसाहित्य)
सख्खे शेजारी (नाटक)
सय-माझा कलाप्रवास
सळो की पळो (बालसाहित्य)
पुरस्कार
अनेक चित्रपटांना पुरस्कार
१९८५चा फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - ’स्पर्श’ या चित्रपटासाठी
१९९३ साली ‘चुडिया’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार
२००६ सालचा पद्मभूषण पुरस्कार
२०१२ सालचा कलामहर्षी बाबूराव पेंटर सन्मान
२०१२ सालचा राजा परांजपे पुरस्कार
२०१७ सालचा (पाचवा) आरती प्रभू पुरस्कार
मसापचा २०१७ सालचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार - सई परांजपे यांच्य ‘सय-माझा कलाकार’ या पुस्तकाला.
अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा साहित्य पुरस्कार (१३-१-२०१८)
हे सुद्धा पहा
अडोस पडोस
शंकर गोविंद साठे
चिंतामणी त्र्यंबक खानोलकर
शेखर नवरे
संदर्भ
पहा : बाल नाट्य
परांजपे,सई
वर्ग:इ.स. १९३८ मधील जन्म |
व्ही. शांताराम | https://mr.wikipedia.org/wiki/व्ही._शांताराम | thumb|thumbtime=35|upright=1.5|Dharmatma (1935)
शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली.
चित्रपटसूची
व्ही शांताराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने व्ही शांताराम फाउंडेशन नावाची एक संस्था काढली आहे. या फाउंडेशनने 'शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा' या नावाची एक मराठी चित्रपट सूची प्रकाशित केली आहे. या सूचीत १९१३ ते १९३१ या कालावधीत मराठी दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या ३७२ मूकपटांची नावे आहेत. त्या सूचीत 'अयोध्येचा राजा' या पहिल्या चित्रपटापासून ते २०१३ मधील 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटापर्यंतच्या २०० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. कलाकार, तंत्रज्ञ, चित्रपटातील गीतांच्या ओळी अशा विशेष माहितीने ही सूची सजली आहे.
चित्रपटांच्या मूळ प्रती (नेगेटिव्ह्ज)
राजकमल कलामंदिरच्या सर्व चित्रपटांच्या नेगेटिव्ह्ज राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवल्या आहेत.
चरित्र
मधुरा जसराज यांनी व्ही. शांताराम यांचे चरित्र लिहिले आहे.
व्ही.शांताराम यांच्यावरील अनुबोधपट
पोट्रेट ऑफ ए पायोनियर : व्ही शांताराम (दिग्दर्शक- मधुरा जसराज)
ध्वनिफिती
सारेगमपा कंपनीने शांतारामबापूंच्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांची 'अमर मराठी चित्रगीते' ही ध्वनिफीत काढली आहे. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी शांतारामबापूंच्या चित्रपटांसाठी अजरामर गाणी लिहिली.
कारकीर्द
महाराष्ट्र सरकार दरवर्षी चित्रपटांशी संबधित असलेल्या एखाद्या व्यक्तीला व्ही. शांताराम यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार देत असते. असा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी पुढीलप्रमाणे आहे.
बाह्य दुवे
चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार
संदर्भ
वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते
वर्ग:दादासाहेब फाळके पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९०१ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९९० मधील मृत्यू
वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती |
अरुण खोपकर | https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_खोपकर | अरुण वसंत खोपकर (जन्म : मुंबई, ५ नोव्हेंबर, इ.स. १९४५) हे एक मराठी लेखक, लघुचित्रपट निर्माते व चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांना मराठीसह एकूण बारा भाषा येतात.
रेडिओवरील कारकीर्द
अरुण खोपकर सातवी आठवीपासूनच रंगमंचावर वावरायला लागले. त्यानंतर रेडिओवर लहान मुलांच्या 'गंमतजंमत' या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला, तेव्हा त्यांची व पुलंची ओळख झाली. रेडिओवर त्यानंतर ते श्री.ना. पेंडसे यांच्या 'हत्या' या कादंबरीच्या वाचनातही खोपकर सहभागी झाले. खोपकरांनी रेडिओवरील बऱ्याच म्हणजे ७०-८० श्रुतिका केल्या.
नाटके
खोपकरांनी पुढे नाटकातही कामे केली. भक्ती बर्वे, सुधा करमरकर, वसुंधरा पेंडसे या त्यांच्यासोबत होत्या. त्या काळात त्या 'नाट्यनिकेतन'च्या दौऱ्यांवरही गेल्या होत्या. तेव्हा बालमोहन नाट्यसंस्थेमध्ये गंगाधर पाटील, गुमास्ते हे शिक्षक होते. पाटीलसरांनी त्यांचा कल ओळखला आणि त्यांना प्रोत्साहन दिले. या अभिनयाच्या अनुभवांतर अरुण खोपकर साहित्यलेखनाकडे वळले.
ज्याची भुरळ पडेल ते
ज्याची भुरळ पडेल ते करायचे, असे खोपकरांना वाटे. आठवी-नववीत असतानाच 'सौंदर्य आणि साहित्य'सारखा सौंदर्याशास्त्रावरचा ग्रंथ त्यांचा वाचून झाला होता. त्यांना तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करावासा वाटत होता आणि विज्ञानातही रस होता. ज्यांनी इंग्रजी-मराठी डिक्शनरी लिहिली ते खोपकरांचे इंग्रजीचे शिक्षक एस.व्ही. सोहनी त्यांना मला म्हणाले, ’हे बघ, तू जर साहित्याकडे गेलास तर तुला विज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही, मात्र तू विज्ञान शिकलास तर कलेचा, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करण्यात काही अडचण येणार नाही’ म्हणून अरुण खोपकर बी.एस्सी. झाले आणि ते करताकरता त्यांनी कलाशाखेचा अभ्यास सुरू केला. त्यांना मराठी शिकवायला रा.ग. जाधव, म.वा. धोंड, आणि विजया राजाध्यक्ष होत्या. या प्राध्यापकांमुळे खोपकरांना भाषेची गोडी लागली आणि त्यांचा नाटकाचा छंद कमी झाला. त्याच काळात अरुण खोपकरांची लच्छू महाराजांशी ओळख झाली आणि खोपकरांना नृत्यातही रस वाटू लागला. मध्येच त्यांनी मणी कौलच्या 'आषाढका एक दिन' मध्ये भूमिका करण्याचीही संधी मिळाली, आणि अरुण खोपकरांचा चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला...
चित्रपट-कारकीर्द
चित्रपट हा खोपकरांचा खरा ध्यास आणि श्वास. त्यामुळेच पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये ('एफटीआयआय') चित्रपट-दिग्दर्शनाचे रीतसर शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिनेक्षेत्र हेच कार्यक्षेत्र निवडले आणि तेव्हापासून चित्रपट करणे आणि चित्रपटांवर बोलणे हे जणू त्यांचे जीवनध्येय बनले. सिनेमाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे तर ते पिढी दरपिढीला शिकवत आहेत. निखिलेश चित्रे, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे असे अनेक चित्रपटसमीक्षक खोपकरांच्या चित्रपटविषयक मार्गदर्शन आणि गप्पाटप्पांतून घडले. खोपकरांमध्ये चांगला कथाकथक दडलेला आहे. त्यामुळे लिहिणे असो, बोलणे असो किंवा एखाद्या विषयावर फिल्म करणे असो, प्रत्येक कृतीत त्यांचा आश्वासक सूर लागतो. त्यामुळे वाचणारा, ऐकणारा आणि पाहणारा त्यांच्याशी, त्यांच्या कलाकृतीशी सहज जोडला जातो.
त्यांनी भूपेन खक्कर, विवान सुंदरम व नलिनी मालानी या समकालीन चित्रकारांबरोबर ’फिगर्स ऑफ थॉट’ हा लघुपट बनवला आहे.
अरुण खोपकर विविध संस्थांमध्ये चित्रपट ह्या विषयाच्या थिअरीचे आणि प्रॅक्टिकल्सचे वर्ग घेतात. त्यांनी चित्रपटकलेच्या सौंदर्यप्रधान अंगाबद्दल लिहिलेले संशोधन लेख अनेक राष्ट्रीय आणि आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
स्मिता पाटील यांच्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात अरुण खोपकर यांच्या ’डिप्लोमा’साठी बनवलेल्या लघुपटापासून झाली.
साहित्य आणि चित्रपट
आषाढका एक दिन (चित्रपटातील भूमिका)
इमेजेस ऑफ इंडिया : माय टाऊन (माहितीपट, १९८८)
ओरल सेल्फ एक्झॅमिनेशन (माहितीपट, १९८९)
कथा दोन गणपतरावांची (पटकथा)
Confronting Tobacco (Documentary, १९८४)
कलर्स ऑफ ॲबसेन्स (माहितीपट, १९९३)
Computer-aided Design (Documentary, १९७६)
गुरुदत्त - तीन अंकी शोकांतिका (मराठी, राष्ट्रीय पुरस्कारप्रारप्त पुस्तक)
Guru Dutt - A Tragedy in Three Acts
ग्रामायण (माहितीपट, १९८१)
चलत्-चित्रव्यूह (मराठी)
वास्तुरचनाकार चार्ल्स कोरिया यांच्यावरील ’व्हॉल्युम झीरो’ हा लघुपट
चित्रव्यूह (मराठी)
Tobacco Habits and Oral Cancer (Documentary, १९७७)
Threads that Bind (चित्रपट दिग्दर्शन)
डिप्लोमा
’नारायण गंगाराम सुर्वे’ हा नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकणारा लघुपट
निर्णय (चित्रपट)
प्रवाही (माहितीपट)
फिगर्स ऑफ थॉट हा लघुपट (१९९०)
रसिकप्रिया (लघुपट)
लीला सॅम्पसन (लघुपट)
लोकप्रिया (लघुपट)
व्हॉल्यूम झीरो (लघुपट)
संचारी (भरत नाट्य संदर्भात लीला सॅम्सन यांच्याशी संवाद साधणारा माहितीपट, १९९१)
हाथी का अंडा (चित्रपट, २००२)
पुरस्कार
खोपकर यांच्या लघुपटांना तीनदा राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या चित्रपटाला मे १३ १९९६ रोजी कुटुंब कल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
त्यांच्या 'चलत्-चित्रव्यूह' आणि ’चित्रव्यूह’ या चरित्रात्मक निबंधांच्या जोड पुस्तकांना २०१५ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
बाह्य दुवे
पेंग्विन बुक्स
बुकगंगा
अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार - लोकसत्ता, १८ डिसेंबर २०१५
'महाराष्ट्र टाइम्स'मधील परिचय - १९ डिसेंबर २०१५
'थोबाडीत मारून भाषा येत नाही!' - मुलाखत, 'महाराष्ट्र टाइम्स', २७ डिसेंबर २०१५
खोपकर,अरुण
वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म |
अमोल पालेकर | https://mr.wikipedia.org/wiki/अमोल_पालेकर | अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; मुंबई, ब्रिटिश भारत - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.
पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली.
त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटापसून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते.
इ.स. १९७४ मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत.
गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला.
इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.
मराठी चित्रपट आक्रीत पासून अमोल पालेकर यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.
मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.
त्यांनी आपला आवाज टीच एड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे.
वैयक्तिक जीवन
अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत, आणि आई खाजगी कंपनीत काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहेSilvers of the year . पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.Amol Palekar at ibnlive.
अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके
मराठी:
अवध्य
आपलं बुवा असं आहे
काळा वजीर पांढरा घोडा
गार्बो
गोची
पार्टी
पुनश्च हरि ॐ
मी राव जगदेव मार्तंड
मुखवटे
राशोमान
वासनाकांड
हिंदी :
आधे अधुरे
चूप कोर्ट चालू है
पगला घोडा
सुनो जनमेजय
हयवदन
अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले किंवा निर्मिती केलेले चित्रपट
आक्रीत (मराठी)
थोडासा रूमानी हो जाय (हिंदी)
धूसर(मराठी)
ध्यासपर्व
पहेली (हिंदी)
मानसन्मान
२१ व २२ जानेवारी, इ.स. २०१२ या दोन दिवशी सांगली येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे उद्घाटन करण्याचा मान अमोल पालेकरांना मिळाला होता.
झेनिथ एशिया सन्मान (डिसेंबर २०१८)
पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार - इ.स. १९७९ साली गोलमाल या चित्रपटासाठी.
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. अमोल पालेकर यांना इ.स.२०१२ साली हा पुरस्कार मिळाला आहे.
अमोल पालेकर यांना २०१२सालापर्यंत महाराष्ट्र सरकारचे सहा पुरस्कार मिळाले आहेत.
रंगभूमीसाठी योगदान
अमोल पालेकर यांनी प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. त्यामुळे पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही त्यांची नाटके गाजली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.
चित्रपटसृष्टीतील योगदान
हिंदी चित्रपटांतील दमदार कारकीर्द
बासु चॅटर्जी यांच्या 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे अमोल पालेकर यांनी हिंदी मनोरंजन विश्वात प्रवेश केला. त्याचा ‘रजनीगंधा’ हा चित्रपट हिट ठरला आणि मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘चित्तचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवीकी शादी’, ‘बातो-बातो में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान श्रीमती’ यासारखे अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. बहुतेक चित्रपटांमध्ये ते मध्यमवर्गीय समाजातील नायकांचे प्रतिनिधित्व करताना दिसले.
दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून
’वी आर ऑन..होऊन जाऊ द्या’ या नावाचा एक हलकाफुलका विनोदी मराठी चित्रपट अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. त्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सतीश आळेकर, आनंद इंगळे, विजय केंकरे, वंदना गुप्ते, मनोज जोशी, सुहासिनी परांजपे, दिलीप प्रभावळकर, रमेश भाटकर, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री आणि अशोक सराफ, निवेदिता सराफ, यांच्या सारखे २० प्रसिद्ध मराठी कलावंत काम करीत आहेत. पटकथा, सहदिग्दर्शन आणि निर्मिती पालेकरांच्या पत्नी संध्या गोखले यांची आहे.
अभिनेता म्हणून
वर्ष/साल चित्रपट भूमिका सह-कलाकारइ.स. १९७४रजनीगंधासंजयविद्या सिन्हाइ.स. १९७५छोटी सी बातअरुणविद्या सिन्हा, असराणी, अशोक कुमारइ.स. १९७६चितचोर विनोद झरीना वहाबइ.स. १९७६घरोंदा सुदीप झरीना वहाबइ.स. १९७७भूमिका केशव दळवीस्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह, अनंत नागइ.स. १९७७टॅक्सी टॅक्सी देव जाहिरा, रीना रॉय, अरुणा इराणीइ.स. १९७८दामाद रंजिताइ.स. १९७९बातों बातों में टोनी ब्रिगांझाटीना मुनीम, डेविड, असराणीइ.स. १९७९गोलमाल राम प्रसाद शर्मा /लक्ष्मण प्रसाद शर्माबिंदिया गोस्वामी, उत्पल दत्तइ.स. १९७९दो लडके दोनों कडके हरीनवीन निश्चलइ.स. १९७९मेरी बीवी की शादी भगवंत कुमार बरतेंदू "भागू "रंजिता, अशोक सराफइ.स. १९८०'ऑंचल|किशन लाल
|राखी, राजेश खन्ना
|-
|इ.स. १९८०
|अपने पराये |चंद्रनाथ
|शबाना आझमी, गिरीश कर्नाड, उत्पल दत्त
|-
|इ.स. १९८१
|नरम गरम |राम ईश्वर प्रसाद
|स्वरूप संपत, उत्पल दत्त, ए . के . हनगल
|-
|इ.स. १९८२
|ओळंगळ (मल्याळी)
|रवी चाततान
|पूर्णिमा जयाराम, अदूर भासी
|-
|इ.स. १९८३
|श्रीमान श्रीमती |मधु गुप्ता
|संजीव कुमार, राखी, राकेश रोशन
|-
|इ.स. १९८३
|रंग बिरंगी |अजय शर्मा
|परवीन बाबी, फारूक शेख, दीप्ति नवल
|-
|इ.स. १९८४
|तरंग |राहुल
|स्मिता पाटील, श्रीराम लागू, गिरीश कर्नाड
|-
|इ.स. १९८४
|आदमी और औरत |
|माहुया रॉय चौधुरी , कल्याण चॅटर्जी
|-
|इ.स. १९८५
|खामोश |हिमसेल्फ |नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी
|-
|इ.स. १९८५
|झुठी|इन्स्पेक्टर कमाल नाथ
|रेखा, राज बब्बर
|-
|इ.स. १९८६
|बात बन जाए |येशवंतराव भोसले
|झीनत अमान, उत्पल दत्त
|-
|इ.स. १९९४
|तीसरा कौन ?|सी . के . कदम
|चंकी पांडे, सतीश शाह, राकेश बेदी
|-
|इ.स. २००१
|अक्स| द डिफेन्स मिनिस्टर
|अमिताभ बच्चन, रवीना टंडन, मनोज वाजपेयी
|-
|इ.स. २००९
|समांतर (मराठी चित्रपट)'' केशव वझे शर्मिला टागोर, मकरंद देशपांडे
अन्य भाषेतील चित्रपट
मदर (बंगाली) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दीपंकर डे )
कलंकिनी (बंगाली) (सहकलाकार - ममता शंकर, दिग्दर्शक - धीरेन गांगुली )
चेना अचेना (बंगाली) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चटर्जी )
कन्नेश्वर राम (कन्नड) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठ्यू )
पेपर बोट्स (कन्नड आणि इंग्रजी) (सहकलाकार-दीपा, दिग्दर्शक - पट्टाभिराम रेड्डी )
ओळंगळ (मल्याळम) (सहकलाकार - जयराम आणि अंबिका, दिग्दर्शक - बालू महेंद्र )
चित्रपटाच्या पडद्यावर गाजलेली गाणी(आवाज पार्श्वगायकाचा)
आजसे पहले आजसे ज्यादा
आनेवाला पल जानेवाला हैं
गोरी तेरा गॉंव बडा प्यारा
जब दीप जले आना
जानेमन, जानेमन
तुम्हें हो ना हो
तू जो मेरे सूर मे
दो दीवाने शहर में
रजनीगंधा फूल तुम्हारे
शाम रंग रंगा रे, हर पल मेरा रे
सपने में देखा सपना
सुनिये, कहिये
संदर्भ
बाह्य दुवे
राष्ट्रीय पुरस्कार यादी इ.स. २००१
ग्रेटभेटमध्ये अमोल पालेकर
वर्ग:फिल्मफेअर पुरस्कार विजेते
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:मराठी चित्रकार
वर्ग:मराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक
वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते
वर्ग:इ.स. १९४४ मधील जन्म
वर्ग:भारतीय नास्तिक |
अरुण सरनाईक | https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_सरनाईक | अरुण शंकरराव सरनाईक (जन्म : ऑक्टोबर ४, १९३५; - मार्च १४, इ.स. १९९८) - हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपटांतूब व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले रंगल्या रात्री अशा, एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन इत्यादी चित्रपट विशेष गाजले.
हिंदुस्तानी संगीतातील ख्यातनाम गायक निवृत्तीबुवा सरनाईक त्याचे काका होते.
संदर्भ
बाह्य दुवे
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म
वर्ग:इ.स. १९९८ मधील मृत्यू
वर्ग:अल्पायुषी अभिनेते |
निळू फुले | https://mr.wikipedia.org/wiki/निळू_फुले | निळू फुले (४ एप्रिल, १९३० - जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत काम केलेले आहे.
जीवन
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. मुळातच नास्तिक असलेल्या फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले . महाराष्ट्र टाईम्स
निळू फुले यांचे जुलै १३, २००९ रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
कारकीर्द
निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गाजल्या.
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार
आई (नवीन)
आई उदे गं अंबाबाई
आघात
आयत्या बिळावर नागोबा
एक गाव बारा भानगडी
एक रात्र मंतरलेली
एक होता विदुषक
कडकलक्ष्मी
कळत नकळत
गणानं घुंगरू हरवलं
गल्ली ते दिल्ली
चटक चांदणी
चांडाळ चौकडी
चोरीचा मामला
जगावेगळी प्रेमकहाणी
जन्मठेप
जिद्द
जैत रे जैत
दिसतं तसं नसतं
दीड शहाणे
धरतीची लेकरं
नणंद भावजय
नाव मोठं लक्षण खोटं
पटली रे पटली
पदराच्या सावलीत
पायगुण
पिंजरा
पुत्रवती
पैज
पैजेचा विडा
प्रतिकार
फटाकडी
बन्याबापू
बायको असावी अशी
बिन कामाचा नवरा
भन्नाट भानू
भालू
भिंगरी
भुजंग
मानसा परीस मेंढरं बरी
मालमसाला
मुक्काम पोस्ट ढेबेवाडी
राघुमैना
राणीने डाव जिंकला
रानपाखरं
रावसाहेब
रिक्षावाली
लाखात अशी देखणी
लाथ मारीन तिथं पाणी
वरात
शापित
सतीची पुण्याई
सर्वसाक्षी
सवत
सहकारसम्राट
सामना
सासुरवाशीण
सोबती
सोयरीक
सिंहासन
सेनानी साने गुरुजी
सोंगाड्या
हर्या नाऱ्या जिंदाबाद
हळदी कुंकू
हीच खरी दौलत
थापाड्या .
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं
जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
पुरस्कार
महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे - इ.स. १९७२, इ.स. १९७३ आणि इ.स. १९७४ मध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार (१९९१)
'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार
जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार (२००८)
बाह्य दुवे
निळू फुले यांची कारकीर्द्
निळू फुले यांची मुलाखत
संदर्भ
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९३१ मधील जन्म
वर्ग:इ.स. २००९ मधील मृत्यू
वर्ग:भारतीय नास्तिक |
श्रीराम लागू | https://mr.wikipedia.org/wiki/श्रीराम_लागू | डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू (जन्म : सातारा, १६ नोव्हेंबर १९२७; - पुणे, १७ डिसेंबर २०१९) हे मराठी व हिंदी नाट्यसृष्टी-चित्रपटसृष्टीतील अभिनेते व दिग्दर्शक होते. देवाला रिटायर करा असे म्हणत त्यांनी पुरोगामी आणि आणि तर्कसंगत सामाजिक कारणांसाठी आवाज उठवला होता.Support pours in for Hazare Indian Express, 13 August 1999.
सुरुवातीचे जीवन
श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.
कारकीर्द
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले.
त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.Still Waters Indian Express, 20 April 1998.
धर्म
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे होते. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.
ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले होते. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे होते.As quoted by Vivek Jagar in his Article "Debates on Conscious Awakening" on Antisuperstition.Org ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटे. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरुण पिढीला डॉ. लागू नेहमी देत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटे. बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगत.
चित्रपट
अगर... इफ (१९७७)
अग्निपरीक्षा (१९८१)
अनकही (१९८५)
अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
आखरी मुजरा (१९८१)
आज का ये घर (१९७६)
आतंक (१९९६)
आपली माणसं (मराठी)
आवाम (१९८७)
इक दिन अचानक (१९८९)
इनकार (१९७७)
इमॅक्युलेट कन्सेप्शन
इंसाफ़ का तराजू (१९८०)
ईमान धर्म (१९७७)
एक पल (१९८६)
औरत तेरी यही कहानी (१९९२)
करंट (१९९२)
कलाकार (१९८३)
कामचोर (१९८२)
Common man (१९९७) (टी.व्ही.)
काला धंदा गोरे लोग (१९८६)
काला बाज़ार (१९८९)
कॉलेज गर्ल (१९७८)
किताब (१९७७)
किनारा (१९७७)
किशन कन्हैया (१९९० )
खानदान (१९८५) (टी.व्ही.मालिका)
खुद्दार (१९९४)
गजब (१९८२)
गलियों का बादशाह (१९८९)
गहराई (१९८०)
गाँधी (१९८२)
गुपचुप गुपचुप (१९८३)
गोपाल (१९९४)
घरद्वार (१९८५)
घर संसार (१९८६)
घरोंदा (१९७७)
घुँघरूकी आवाज़ (१९८१)
चटपटी (१९८३)
चलते चलते (१९७६)
चिमणरांव गुंड्याभाऊ (मराठी)
चेहरे पे चेहरा (१९८१)
चोरनी (१९८२)
ज़माने को दिखाना है (१९८१)
जीवा (१९८६)
जुर्माना (१९७९)
ज्योति बने ज्वाला (१९८०)
ज्वालामुखी (१९८०)
झाकोळ (१९८०)
तमाचा (१९८८)
तरंग (१९८४)
तराना (१९७९)
तौहेँ (१९८९)
थोडीसी बेवफाई (१९८०)
दाना पानी (१९८९)
दामाद (१९७८)
दिलवाला (१९८६)
दिल ही दिल में (१९८२)
दीदार-ए-यार (१९८२)
दुश्मन देवता (१९९१)
दूरीयाँ (१९७९)
देस परदेस (१९७८)
देवता (१९७८)
दो और दो पाँच (१९८०)
दौलत (१९८२)
ध्यासपर्व -मराठी(२००१)
नया दौर (१९७८)
नसीबवाला (१९९२)
नामुमकीन (१९८८)
'नीयत (१९८०)
पिंजरा (१९७२/I)
पिंजरा (१९७२/II)
पुकार (१९८३)
पोंगा पंडित (१९७५)
प्यार का तराना (१९९३)
प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
फूलवती (१९९१)
बडी बहन (१९९३)
बद और बदनाम (१९८४)
बिन माँ के बच्चे (१९८०)
बुलेट (१९७६)
भिंगरी (मराठी)
मकसद (१९८४)
मगरूर (१९७९)
मंज़िल (१९७९)
मर्द की ज़बान (१९८७)
मवाली (१९८३)
माया (१९९२/I)
मीरा (१९७९)
मुकद्दर का सिकंदर (१९७८)
मुक्ता (१९९४)
मुकाबला (१९७९)
मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
मेरा रक्षक (१९७८)
मेरी अदालत (१९८४)
मेरे साथ चल (१९७४)
मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
रास्ते प्यार के (१९८२)
लव मैरिज (१९८४)
लावारिस (१९८१)
लॉकेट (१९८६)
लूटमार (१९८०)
शंकर हुसेन (१९७७)
शालीमार (१९७८)
शेर शिवाजी (१९८७)
श्रीमान श्रीमती (१९८२)
सदमा (१९८३)
संध्याछाया (१९९५) (टी.व्ही.)
सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
समय की धारा (१९८६)
सम्राट (१९८२)
सरगम (१९७९)
सरफ़रोश (१९८५)
सरफिरा (१९९२)
सवेरे वाली गाड़ी (१९८६)
साजन बिना सुहागन (१९७८)
सामना -मराठी (१९७४)
सितमगर (१९८५)
सिंहासन -मराठी(१९८०)
सुगंधी कट्टा(मराठी)
सौंतन (१९८३)
स्वयंवर -मराठी(१९८०)
हम तेरे आशिक हैं (१९७९)
हम नौजवान (१९८५)
हम से है ज़माना (१९८३)
हाहाकार (१९९६)
हेराफेरी (१९७६)
होली'' (१९८४)
नाटके
श्रीराम लागू यांनी काम केलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव)
अग्निपंख (रावसाहेब)
अँटिगनी (क्रेयाँ)
आकाश पेलताना (दाजीसाहेब)
आत्मकथा (राजाध्यक्ष)
आंधळ्यांची शाळा (आण्णासाहेब, विश्वनाथ)
आधे अधुरे (यात ४ भूमिका केल्या आहेत.)
इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
उद्याचा संसार (विश्राम)
उध्वस्त धर्मशाळा (श्रीधर)
एकच प्याला (सुधाकर)
एक होती राणी (जनरल भंडारी)
कन्यादान (नाथ देवळालीकर)
कस्तुरीमृग (रावबहादुर पेंडसे)
काचेचा चंद्र (बाबुराव)
किरवंत (सिद्धेश्वरशास्त्री)
खून पहावा करून (आप्पा)
गार्बो (पॅन्सी)
गिधाडे (रमाकांत)
गुरू महाराज गुरू (गुरुनाथ)
चंद्र आहे साक्षीला
चाणक्य विष्णूगुप्त (चाणक्य)
जगन्नाथाचा रथ (भुजबळ, सखा)
डॉक्टर हुद्दार (हुद्दार)
दुभंग
दूरचे दिवे (सदानंद)
देवांचे मनोराज्य (विष्णू)
नटसम्राट (बेलवलकर)
पप्पा सांगा कुणाचे (पप्पा)
पुण्यप्रभाव (वृंदावन)
प्रतिमा (चर्मकार)
प्रेमाची गोष्ट (के. बी.)
बहुरूपी
बेबंदशाही (संभाजी)
मादी
मित्र
मी जिंकलो मी हरलो (माधव)
मुख्यमंत्री (मुख्यमंत्री)
यशोदा (अण्णा खोत)
राजमुकुट (राजेश्वर)
राव जगदेव मार्तंड (जगदेव)
लग्नाची बेडी (कांचन)
वंदे मातरम् (त्रिभुवन)
वेड्याचं घर उन्हात (दादासाहेब)
शतखंड (प्रा. धुंडिराज धांदेफळकर)
सुंदर मी होणार (डॉ. पटवर्धन)
सूर्य पाहिलेला माणूस (सॉक्रेटीस)
हिमालयाची सावली (गुंडो गणेश)
क्षितिजापर्यंत समुद्र
पुस्तके
झाकोळ (पटकथा)
डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले ’रूपवेध’ नावाचे पुस्तक आहे. पुस्तकाला डॉ. पुष्पा भावे यांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे.
"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.
पहा
नाटककार आणि नाट्यकर्मी यांची चरित्रे
पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार - १९७८ - 'मुख्य सहायक अभिनेता' घरोंदा (हिंदी)
१९९७, कालिदास सन्मान
२००६, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील योगदानाबद्दल मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार.
२०१०, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
२०१२, राजश्री शाहू कला गौरव पुरस्कार
तन्वीर सन्मान
श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त सौ. दीपा लागू) हे इ.स. २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.
२०१३ सालचे पुरस्कारार्थी
तन्वीर पुरस्कार : गो.पु. देशपांडे (मरणोत्तर) यांना
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : नाट्यनिर्माते वामन पंडित यांना
२०१७ सालचे पुरस्कार
तन्वीर पुरस्कार : नाटककार सतीश आळेकर यांना
तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार : मुंबई येथील फॅटस थिएटरची संस्थापक फैजे जलाली यांना
संदर्भ
बाह्य दुवे
आयएमडीबी.कॉम - श्रीराम लागूंवरील पान (इंग्लिश मजकूर)
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते
वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म
वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू
वर्ग:भारतीय नास्तिक
वर्ग:कालिदास सन्मान पुरस्कारविजेते
वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते
वर्ग:पुरुष चरित्रलेख |
राजा परांजपे | https://mr.wikipedia.org/wiki/राजा_परांजपे | राजा परांजपे ( एप्रिल २४ इ.स. १९१०- फेब्रुवारी ९ १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते
कारकीर्द
४० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राजा परांजपे यांनी ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कामे केली. सचिन(पिळगांवकर) या नटाच्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या वयाच्या ४ थ्या वर्षी राजा परांजपे यांनी करून दिली.
निर्माण केलेले चित्रपट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
दिग्दर्शित केलेले चित्रपट (२९)
(इ. स. १९६९) आधार
(इ. स. १९६७) काका मला वाचवा
(इ. स. १९६६) गुरुकिल्ली
(इ. स. १९६६) Love and Murder
(इ. स. १९६५) पडछाया
(इ. स. १९६४) पाठलाग
(इ. स. १९६३) बायको माहेरी जाते
(इ. स. १९६३) हा माझा मार्ग एकला
(इ. स. १९६२) सोनियाची पाउले
(इ. स. १९६१) आधी कळस मग पाया
(इ. स. १९६१) सुवासिनी
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
(इ. स. १९५९) बाप बेटे
(इ. स. १९५६) आंधळा मागतो एक डोळा
(इ. स. १९५६) देवघर
(इ. स. १९५६) गाठ पडली ठका ठका
(इ. स. १९५६) पसंत आहे मुलगी
(इ. स. १९५५) गंगेत घोडे न्हाहले
(इ. स. १९५४) उन पाउस
(इ. स. १९५३) चाचा चौधरी
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे
(इ. स. १९५१) पारिजातक
(इ. स. १९५१) श्रीकृष्ण सत्यभामा
(इ. स. १९५०) जरा जपून
(इ. स. १९५०) पुढचं पाउल
(इ. स. १९४८) बलिदान
(इ. स. १९४८) दो कलियॉं
(इ. स. १९४८) जिवाचा सखा
अभिनय केलेले चित्रपट(आणि त्यातील भूमिका) (१९)
(इ. स. १९७४) उस पार (मोहनचे पितामह)
(इ. स. १९७२) पिया का घर (गौरी संकर)
(इ. स. १९७१) जल बिना मछली नृत्य बिना बिजली (चमय ’रॉयल’ रॉय)
(इ. स. १९६९) आधार
(इ. स. १९६३) बायको माहेरी जाते
(इ. स. १९६३) बंदिनी (कल्याणीचे वडील)
(इ. स. १९६०) जगाच्या पाठीवर
(इ. स. १९५४) ईन मीन साडेतीन
(इ. स. १९५४) ऊनपाउस (बापूचे वडील)
(इ. स. १९५३) चाचा चौधरी
(इ. स. १९५२) लाखाची गोष्ट
(इ. स. १९५२) पेडगावचे शहाणे (काका शहाणे-दुहेरी भूमिका)
(इ. स. १९५२) रागरंग
(इ. स. १९४६) सासुरवास
(इ. स. १९४२) सूनबाई
(इ. स. १९३९) Life's for Living: आदमी मामा
(इ. स. १९३९) माणूस
(इ. स. १९३७) कान्होपात्रा
(इ. स. १९३७) प्रतिभा मंडूक
बाह्य दुवे
फेब्रुवारी ९ १९७९ रोजी त्यांचे निधन झाले.
संदर्भ
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म
वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू |
शरद तळवलकर | https://mr.wikipedia.org/wiki/शरद_तळवलकर | (नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
शरद तळवलकर हे के.ना. वाटवे यांचे जावई लागत.
कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्स’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.
विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.
मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहऱ्याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणाऱ्या ‘विष्णूदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.
चित्रपट
चित्रपट वर्ष भाषा सहभाग अष्टविनायक मराठी अभिनय गडबड घोटाळा १९८६ मराठी अभिनय गौराचा नवरा १९८८ मराठी अभिनय घरकुल १९७० मराठी अभिनय चुडा तुझा सावित्रीचा १९७१ मराठी अभिनय धाकटी सून १९८६ मराठी अभिनय धूमधडाका १९८५ मराठी अभिनय नवरे सगळे गाढव १९८२ मराठी अभिनय मामा भाचे १९७९ मराठी अभिनय मुंबईचा जावई १९७० मराठी अभिनय राणीनं डाव जिंकला १९८३ मराठी अभिनय वरदक्षिणा १९६० मराठी अभिनय
प्रकाशित साहित्य
'गुदगुल्या' दैनिक 'लोकसत्ता' मधून याच शीर्षकाखाली लिहिलेल्या अनुभव लेखांचा संग्रह
मी रंगवलेले म्हातारे
मराठी चित्रपटअभिनेते
वर्ग:मराठी लेखक
वर्ग:इ.स. १९१८ मधील जन्म
वर्ग:इ.स. २००१ मधील मृत्यू |
अशोक सराफ | https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_सराफ | अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्यअभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.
त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे.
ओळख
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.
गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.
चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.
अभिनय-प्रवास
250px|left|thumb|अशोक सराफ आणि निवेदिता जोशी
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.
'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' ही मराठी व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.
अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे.आधीच्या काळी ते नायक,खलनायक,दुहेरी भूमिका सहाय्यक व्यक्तीरेखा व विनोदी भूमिकेत लहान होते आणि सुधीर जोशी,विजू खोटे मोठे होते आणि आजकाल वडलांच्या पात्रात मोठे आहेत आणि प्रथमेश परब, परश्या,अभिजीत खांडकेकर असे ठरावीक जण लहान आहेत.
कारकीर्द
अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. मुुुख्यात्वे त्यानी सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले.सचिन पिळगांवकर अशोक सराफ यांचा आदर करतात. आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामांची भूमिका असावी असा त्यांचा प्रयत्न असतो.
अशोक सराफ यांनी मराठी नाटकांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. अशोक सराफ यांनी बँकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषकाची होती. दादा साहेब कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या चित्रपटात त्यांनी 'सखाराम हवालदार' या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनल कॉमेडी स्वरूपाची आहे.त्यांची मिमीक्री कुशल बद्रिके व ओमकार भोजने करतात.
अभिनय सूची
मराठी चित्रपट
चित्रपटाचे नाव भूमिकाकार्यआयत्या घरात घरोबागोपू काकाअभिनयआमच्या सारखे आम्हीचभूपाल / निर्भय अभिनय दुहेरी भूमिकाआत्मविश्वासविजय झेंडेअभिनयनवरी मिळे नवऱ्यालाबाळासाहेबअभिनयगंमत जंमतफाल्गुनअभिनयभुताचा भाऊबंडूअभिनयमाझा पती करोडपतीदिनेश लुकतुकेअभिनयअशी ही बनवाबनवीधनंजय मानेअभिनयबिनकामाचा नवरातुकारामअभिनयफेका फेकीराजनअभिनयएक डाव भुताचाखंडोजी फर्जंदअभिनयएक डाव धोबीपछाडदादा दांडगेअभिनयआलटून पालटूनअभिनयएक उनाड दिवसविश्वास दाभोळकरअभिनयसगळीकडे बोंबाबोंबसदा खरे अभिनयसाडे माडे तीनरतन दादाअभिनयकुंकूअभिनयबळीराजाचं राज्य येऊ देअभिनयघनचक्करमाणकू अभिनयफुकट चंबू बाबुरावतू सुखकर्ताविनायक विघ्नहर्तेअभिनयनवरा माझा नवसाचाकंडक्टर अभिनयवजीरअभिनयअनपेक्षितदुहेरी भूमिका उत्तमराव आणिअभिनयएकापेक्षा एकइन्स्पेक्टर सर्जेराव शिंदेअभिनयचंगु मंगुचंगू आणि रामन्नाअभिनय (दुहेरी भूमिका)अफलातूनबजरंगरावसुशीलावाजवा रे वाजवाउत्तमराव टोपलेशुभमंगल सावधानप्रतापराव पाटील केतकावळीकरअभिनयजमलं हो जमलंबापू भैय्याअभिनयलपंडावअभिजीत समर्थचौकट राजागणागोडीगुलाबीराजेश/अनिलपैकी एकनायक सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तीरेखा-पुरुषगडबड घोटाळाहेमू ढोलेमुंबई ते मॉरिशसप्रेम लडकूनायकधमाल बाबल्या गणप्याचीबाळाचे बाप ब्रम्हचारीसारंगनायकप्रेम करू या खुल्लम खुल्लाबजरंगगुपचुप गुपचुपप्रोफेसर धोंडगोष्ट धमाल नाम्याचीनामदेव (नाम्या) हेच माझं माहेरकामन्नागोंधळात गोंधळमदननायकचोरावर मोरजवळ ये लाजू नकोपांडू हवालदारसखाराम हवालदारअभिनयदोन्ही घरचा पाहुणाराम राम गंगारामम्हामदूअरे संसार संसारवाट पाहते पुनवेचीभस्मखरा वारसदाररंजीतनायककळत नकळतसदू मामाआपली माणसंपैजेचा विडाबहुरूपीधूमधडाकाअशोक गुपचूपअभिनयमाया ममतासखीबाबा लगीननिशाणी डावा अंगठाहेडमास्तरअभिनयआयडियाची कल्पनाझुंज तुझी माझीटोपी वर टोपीखलनायक
हिंदी चित्रपट
अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व सहाय्यक भूमिका निभावल्या त्या चित्रपटांची नावे खाली दिलेली आहेत.
चित्रपट भूमिका वर्षकुछ तुम कहो कुछ हम कहेंगोविंदबेटी नं. १राम भटनागरकोयलावेदजीगुप्तहवालदार पांडूऐसी भी क्या जल्दी हैडॉ. अविनाशसंगदिल सनमभालचंद्रजोरू का गुलामपी. के. गिरपडेखूबसूरतमहेश चौधरीयेस बॉसजॉनीकरण अर्जुनमुंशीजीसिंघमहेड कॉन्स्टेबल सावलकर२०११प्यार किया तो डरना क्यातडकालाल
रंगमंच
अशोक सराफ अभिनित नाटके
नाटकाचं नावहमीदाबाईची कोठीअनधिकृतमनोमिलनहे राम कार्डिओग्रामडार्लिंग डार्लिंगसारखं छातीत दुखतंयव्हॅक्यूम क्लीनर
मालिका
अशोक सराफ अभिनित दूरचित्रवाहिनी मालिका.
मालिकेचे नाव साकारलेली भूमिका टीव्ही चॅनल भाषा वर्षटन टना टनई टीव्ही मराठीमराठीहम पांचआनंद माथुरझी टीव्हीहिंदी१९९५डोन्ट वरी हो जाएगासंजय भंडारीसहारा टीव्हीहिंदी२००२छोटी बडी बातेंहिंदीनाना ओ नानानानामी मराठीमराठी२०११
संदर्भ
बाह्य दुवे
आय.एम.डी.बी वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र
वर्ग:मराठी नाट्यअभिनेते
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म
वर्ग:पुरुष चरित्रलेख |
महेश कोठारे | https://mr.wikipedia.org/wiki/महेश_कोठारे | महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत. त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.
जीवन
महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले . "ओह डैम इट" हे त्यांचे पेटंट वाक्य आहे.
महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिली देखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असताना देखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकाचे पात्र साकारण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.
कारकीर्द भरात असताना कोठारेंनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठाऱ्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठाऱ्यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वाऱ्याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.
कारकीर्द
अभिनीत चित्रपट
वर्ष शीर्षक शेरा 2010 आयडियाची कल्पना 2000 खतरनाक 2005 खबरदार Guest Appearance 1983 गुपचुप गुपचुप Ashok 1971 घर घर की कहानी घरचा भेदी 1964 छोटा जवान 2007 जबरदस्त 1992 जिवलगा 1993 झपाटलेला CID Inspector Mahesh Jadhav 2013 झपाटलेला २Mahesh Kothare returns with Zapatlela 2 CID Inspector Mahesh Jadhav 1989 थरथराट CID Inspector Mahesh Jadhav थोरली जाऊ 2011 दुभंगDubhang 1987 दे दणादण Sub Inspector Mahesh Danke 1990 धडाकेबाज Mahesh Nemade 1998 धांगडधिंगा Advocate Mithare 1985 धूमधडाका Mahesh Jawalkar 2004 पछाडलेला Inspector Mahesh Jadhav 2008 फुल ३ धमाल 1994 माझा छकुला Inspector 1996 मासूम Hindi Movie 1968 राजा और रंक लेक चालली सासरला 2010 वेड लावी जीवा 2006 शुभमंगल सावधान 1970 सफर Feroz Khan's Younger Brother
दिग्दर्शित चित्रपट
वर्ष नाव २००० खतरनाक २००५ खबरदार २००० चिमणी पाखरं'''
|-
| २००८ || जबरदस्त|-
| १९९१ || जिवलगा
|-
| १९९३ || झपाटलेला|-
| २०१३ || झपाटलेला २|-
| १९८९ || थरथराट|-
| २०११ || दुभंग
|-
| १९८७ || दे दणादण १९९० धडाकेबाज १९९८ धांगडधिंगा १९८५ धूमधडाका २००४ पछाडलेला १९९४ माझा छकुला १९९६ मासूस १९९९ लो मै आ गया २०१० वेड लावी जीवा २००७ शुभमंगल सावधान
गुपचुप गुपचुप
घरचा भेदी
लेक चालली सासरला
महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट
छोटा जवान
मेरे लाल
छोटा भाई
राजा और रंक
घर घर की कहानी
सफर
चित्रपट
महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट
वेड लावी जीवा
फुल ३ धमाल
महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट
मासूम
लो मैं आ गया
खिलौना बना खलनायक
दूरचित्रवाणी
मस्त मस्त है जिंदगी (झी टीव्ही)
मन उधाण वाऱ्याचे (स्टार प्रवाह)
जय मल्हार (झी मराठी)
विठू माऊली (स्टार प्रवाह)
प्रेम पॉयझन पंगा (झी युवा)
पाहिले न मी तुला (झी मराठी)
सुख म्हणजे नक्की काय असतं! (स्टार प्रवाह)
पिंकीचा विजय असो! (स्टार प्रवाह)
माझी माणसं (सन मराठी)
आई मायेचं कवच (कलर्स मराठी)
बाह्य दुवे
झपाटलेला २’ पहिला मराठी थ्रीडी चित्रपट
वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते
वर्ग:मराठी अभिनेते
वर्ग:इ.स. १९५७ मधील जन्म
वर्ग:पुरुष चरित्रलेख |
अभियांत्रिकी | https://mr.wikipedia.org/wiki/अभियांत्रिकी | वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक व प्रत्यक्षातील ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना अभियांत्रिकी असे म्हणतात. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला अभियांत्रिकी म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्य आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो. यातील पदवीधरांना अभियंता असे म्हणतात.
अभियांत्रिकी शाखा
प्रमुख अभियांत्रिकी शाखा पुढील प्रमाणे आहेत:
शाखा कार्यक्षेत्र उत्पादन अणुकेंद्रीय अभियांत्रिकी अणुकेंद्रीय ऊर्जेचे उत्पादन, किरणोत्सर्गी द्रव्यांचा उपयोग अणुकेंद्रीय विक्रियक, अणुकेंद्रीय विषयातील उपकरणे, ट्रँझिस्टर, लेसर, मेसर इ. अभियांत्रिकीय भौतिकी भौतिकीमधील नवीन शोधांचा अभियांत्रिकीय समस्या सोडविण्यासाठी उपयोग धरणे, विहिरी, नळकाम आरोग्य अभियांत्रिकी शुद्ध पाण्याचा पुरवठा, भुयारी गटाराचे अभिकल्प व बांधकाम. अपशिष्ट पदार्थाचा निर्यास. मलमूत्र-संस्करणाची यंत्रसामग्री. इलेक्ट्रॉनिय अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनीय सामग्रीचे उत्पादन, विकास व उपयोग रेडिओ, रडार, दूरचित्रवाणी, संगणक (गणकयंत्र),इलेक्ट्रॉनीय उपकरणे. औद्योगिक अभियांत्रिकी औद्योगिक प्रक्रियांचे शास्त्रीय व्यवस्थापन. कारखान्यांचीव्यवस्था माणसे व सामग्री यांचा योग्य समन्वय. मोटारगाड्या, गृहोपयोगी उपकरणे, कापड अशा मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू. कृषी अभियांत्रिकी शेतजमिनीचा विकास, शेतीच्या पद्धतीत सुधारणा,शेतजमिनीचे धूप-नियंत्रण, सिंचाई. शेतीसंबंधीची बांधकामे व यंत्रसामग्री. खनिज तेल अभियांत्रिकी खनिज तेलाच्या साठ्यांचा शोध, तेलविहिरी खणणे,उत्पादित तेल व नैसर्गिक वायू यांची वाहतूक व साठवण. खनिज तेलापासून मिळणारे विविध रासायनिक पदार्थ,नैसर्गिक इंधन-वायू. खाणकाम अभियांत्रिकी खनिजांचा शोध करणे ती जमिनीतून बाहेर काढणे त्यांवर प्रक्रिया करणे. लोखंड, तांबे वगैरे धातूंची धातुकेॲस्बेस्टस, ग्रॅफाइटअशी अधातवीय खनिजे दगडी कोळसा. धातुविज्ञानीय अभियांत्रिकी धातुकांपासून धातूंचे निष्कर्षण, धातूंचा विविध कार्यासाठी विकास करणे व कसोट्या घेणे. सर्व प्रकारच्या शुद्ध धातू आणि मिश्रधातू. नाविक वास्तुशिल्प व अभियांत्रिकी जहाजांचे अभिकल्प व बांधणी. प्रवासी व मालवाहू जहाजे, पाणबुड्या, युद्धनौका,बॅथिस्कॅफ. प्रदीपन अभियांत्रिकी प्रकाशयोजना, साधनसामग्री व त्यांचा अभिकल्प. मोठे रस्ते, नाटकगृहे, क्रीडांगणे, कारखाने अशाठिकणाची प्रकाशयोजना. मृत्तिका अभियांत्रिकी अपघर्षक, विटा पोर्सेलीन अशा अधातवीय पदार्थांचेउत्पादन व विकास. विद्युत् निरोधक, इलेक्ट्रॉनीय साहित्य, जेट व रॉकेटएंजिनातील काही भाग. यांत्रिक अभियांत्रिकी यांत्रिक शक्तीचे उत्पादन व उपयोग. एंजिनांचा अभिकल्प,बांधणी व चाचणी. सर्वसाधारण यंत्रनिर्मिती. सर्व प्रकारची एंजिने, यंत्रे व उपकरणे. रासायनिक अभियांत्रिकी रासायनिक प्रक्रियांचा विकास करणे. कच्च्या रासायनिकमालापासून उपयुक्त वस्तूंचे उत्पादन करणे. स्फोटक द्रव्ये, खते, रंग, प्लॅस्टिक, रबर, वैद्यकीयरसायने इ. वस्त्र अभियांत्रिकी वस्त्र-निर्मितीसाठी यांत्रिक व रासायनिक अभियांत्रिकीतत्त्वांचा उपयोग. नैसर्गिक व कृत्रिम धागे व त्यांपासून बनलेले कापड. वास्तुशिल्प अभियांत्रिकी निरनिराळ्या इमारतींच्या योजना तयार करणे व त्याबांधणे. नाट्यगृहे, बोलपटगृहे, रुग्णालये, बाजार, बँकांच्याइमारती इ. वाहतूक अभियांत्रिकी वाहतुकीचे मार्ग आखणे व ते बांधणे व त्यांची देखभाल ठेवणे. हमरस्ते, रूळमार्ग, पूल, विमानतळ व तेथील विशेषइमारती. विद्युत अभियांत्रिकी विद्युत् शक्तीचे प्रेषण, वितरण. विद्युत् सामग्रीचे उत्पादनव विकास. विजेचा उपयोग विद्युत् जनित्रे, चलित्रे, रोहित्रे, प्रेषण, नियंत्रण-साहित्य इ. वैमानिकीय व अवकाश अभियांत्रिकी विमाने व अवकाशयानांचे अभिकल्प. वातविवरासारख्याचाचणी-सामग्रीचे अभिकल्प व बांधणी. विमाने, हेलिकॉप्टर, रॉकेट, अवकाशयाने इ. संदेशवहन अभियांत्रिकी संदेशवहनाच्या विविध पद्धतींचे अभिकल्प व विकास. तारायंत्र, दूरध्वनी, दूरमुद्रक, संदेशवहन उपग्रह इ. सैनिकी अभियांत्रिकी युद्धोपयोगी साहित्याचे उत्पादन. लष्करी उपयोगाचेपूल, रस्ते वगैरे बांधकामांचा अभिकल्प व विकास. विविध प्रकारची शस्त्रे, स्फोटक पदार्थ, प्रक्षेपणास्त्रे. स्थापत्य अभियांत्रिकी सर्वसाधारण बांधकामांचे अभिकल्प व प्रत्यक्ष बांधकाम,नगररचना, पाणीपुरवठा. इमारती, पूल, धरणे, कालवे, बोगदे, रूळमार्ग,विमानतळ इ. स्वयंचल अभियांत्रिकी स्वयंचलित वाहनांचा व त्यांना लागणाऱ्या भागांचाअभिकल्प व उत्पादन. मोटारगाड्या, स्कूटर, ट्रॅक्टर इ. वाहने यंत्र अभियांत्रिकी उत्पादन अभियांत्रिकी अणुविद्युत अभियांत्रिकी वैद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी उपकरण अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी संगणकशास्त्र अभियांत्रिकी जैव अभियांत्रिकी पर्यावरण अभियांत्रिकी रासायनिक प्रक्रिया अभियांत्रिकी बांधकाम अभियांत्रिकी भूकंप अभियांत्रिकी
हे सुद्धा पहा
भारतातील अभियांत्रिकी महाविद्यालये
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
संदर्भ
वर्ग:अभियांत्रिकी |
प्राणिशास्त्र | https://mr.wikipedia.org/wiki/प्राणिशास्त्र | प्राणिशास्त्र हे जीव शास्त्रचा एक भाग आहे.
वर्ग:प्राणिशास्त्र
वर्ग:प्राणीशास्त्र
इवलेसे
इवलेसे
इवलेसे
इवलेसेप्राणिशास्त्रामध्ये प्राण्यांच्या जन्म ते मृत्यू यामधील सर्व अवस्ता, बदल यांचा अभ्यास होतो.इवलेसे
बाह्य दुवे
Books on Zoology at Project Gutenberg
Online Dictionary of Invertebrate Zoology |
यजुर्वेद | https://mr.wikipedia.org/wiki/यजुर्वेद | इवलेसे
यजुर्वेद या शब्दाचा अर्थ (संस्कृत:- यजुस् + वेदः = यजुर्वेदः) असा होतो. हा हिंदुंच्या चार वेदांपैकी दुसरा वेद आहे. वेदांची रचना ख्रिस्तपूर्व ६००० पूर्वीच्या काळात झाली, असा एक मतप्रवाह आहे.या विषयी विविध अभ्यासकात मतमतांतरे प्रचलित आहेत. यजुर्वेद संहितेत वैदिक काळातील यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश आहे. त्यांच्या प्रस्तुतीकरण व वापराच्या पद्धतीत ब्राह्मणग्रंथ व श्रौतसूत्रे यांनी मोलाची भर घातली. यज्ञसंस्थेचा तपशीलवार विचार या संहितेने मांडला आहे.धनुर्वेद हा यजुर्वेदाचा उपवेद मानला जातो.हा यजुर्वेद ब्रह्मदेवाने लिहीला आहे.ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले.
शाखा
यजुर्वेदाच्या प्राथमिक अशा दोन संहिता आहेत - शुक्ल संहिता व कृष्ण संहिता.दोहोंमध्येही धार्मिक अनुष्ठान करावयासाठीचे मंत्र आहेत. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेतच ब्राह्मणग्रंंथातील गद्य भाग दिले आहेत, तर शुक्ल यजुर्वेदासाठी ते शतपथ ब्राह्मणात स्वतंत्रपणे दिले आहेत. यजुर्वेद का सुबोध भाष्य- डॉ. सातवळेकर श्री. दा.,स्वाध्याय मंडळ,पारडी
शतपथ ब्राह्मण हा शुक्ल यजुर्वेदाचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ होय. याज्ञवल्क्यशिक्षा हा ग्रंथ या वेदाच्या पठणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
शुक्ल यजुर्वेद
शुक्ल यजुर्वेदाच्या 'वाजसनेयी संहिता' म्हणून नाव असलेल्या (आणि बरेच साम्य असलेल्या)दोन शाखा आहेत.
वाजसनेयी माध्यंदिन - मुळची बिहार येथील
वाजसनेयी कण्व- मुळची, कोशल येथील
वाजसनेयी माध्यंदिन ही शाखा उत्तर भारत , गुजरात , महाराष्ट्रातील नाशिकच्या उत्तरेकडील भागात प्रसिद्ध आहे. तर, काण्व ही शाखा नाशिकच्या दक्षिणेकडीलओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागांत प्रसिद्ध आहे..
जगदगुरू आदि शंकराचार्य यांच्या चार प्रमुख् शिष्यांपैकी एक असणाऱ्या सुरेश्वराचार्य यांनी, काण्व शाखेचा स्वीकार केला. त्यांच्या गुरूंनी आपस्तंब कल्पसूत्रासहित तैत्तिरीय शाखा अवलंबिली. म्हैसूरजवळ असलेल्या, भारतातील दुसऱ्या मोठ्या, श्रीरंगम येथील रंगनाथस्वामीच्या देवळात,काण्व शाखीय वैदिक पद्धतीने पूजा-अर्चा होते. रघुवंश,दशरथ, रामाने व त्याच्या वंशजांनी शुक्ल यजुर्वेदाचे अनुसरण केले. शुक्ल यजुर्वेदाशी दोन उपनिषदे संलग्न आहेत- ईशोपनिषद व बृहदारण्यकोपनिषद .त्यापैकी, 'बृहदारण्यक'हेहा सर्व उपनिषदांत आकाराने सर्वात मोठे आहे. ईशोपनिषदालाच ईशावास्य उपनिषद असेही म्हटले जाते.
वाजसनेयी संहितेत,खालील मंत्रांचे एकूण ४० अध्याय आहेत(ओरिसात-४१ अध्याय). ते असे -
अध्याय-
१ व २ : नवीन व पूर्ण चंद्र आहुती. याला दर्श व पूर्ण इष्टी असे म्हणतात.
३ : अग्निहोत्र
४ ते ८ : सोमयज्ञ
९ व १० : वाजपेय व राजसूय - सोमयज्ञाचे दोन सुधार
११ ते १८ : अग्निचयनासाठी विशेषेकरून वेदी व कुंड निर्माण.
१९ ते २१ :सौत्रामणी, अती सोमपानाने होणाऱ्या असरावर उतार म्हणून
२२ ते २५ :अश्वमेध
२६ ते २९ : वेगवेगळ्या धार्मिक प्रयोजनांसाठी पूरक मंत्र
३० व ३१ : पुरुषमेध
३२ ते ३४ : सर्वमेध
३५ : पितृयज्ञ
३६ ते ३९ : प्रवरयज्ञ
४० : हा शेवटला अध्याय हे प्रसिद्ध ईशोपनिषद आहे.
'वाजसेनीय संहिते'चे संपादन व प्रकाशन 'वेबर'(लंडन व बर्लिन,१८५२) आणि इंग्रजीत भाषांतर, राल्फ टी.एच. ग्रिफिथ (बनारस,१८९९) यांनी केले.
कृष्ण यजुर्वेद
कृष्ण यजुर्वेदाच्या चार शाखा आहेत.
तैत्तिरीय संहिता - मुळची, पांचालची
मैत्रयणी संहिता - मुळचीकुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडील भागातली
चरक कथा संहिता - मुळची, मद्र व कुरुक्षेत्र प्रांतातली
कपिष्ठल कथा संहिता - बाहिका, दक्षिण पंजाबातील
प्रत्येक शाखेसमवेत, ब्राह्मणे व बहुतेकांसमवेत, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, आरण्यके, उपनिषद व प्रातिशाख्ये संलग्न होते.
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय ब्राह्मणात अनेक कथा आल्या असून त्यांचे तात्पर्य 'यज्ञ' हे आहे.(१)
तैत्तिरीय शाखा : यापैकी प्रसिद्ध व चांगली जतन केलेली ही तैत्तिरीय संहिता आहे. हे नाव ' निरुक्तकार यास्काचार्य यांंचा शिष्य 'तैत्तिरी' वरून पडले. त्यात ७ अध्याय /कांडांचा समावेश आहे.त्याची पुढे 'प्रपाठक' व नंतर 'अनुवाक्'म्हणुन विभागणी झाली आहे. त्यापैकी काहींनी हिंदू धर्मात मानाचे स्थान पटकावले आहे. उदाहरणार्थ : तै-४.५ व ४.७ ज्यात 'रुद्र चमक' आहे आणि १.८.६.१ यात महामृृत्युंंजय मंत्र. भूः ,भुवः,स्वः हे बीजमंत्र ऋग्वेदातील सवितृ गायत्री मंत्रास जोडले असलेला मंत्र हा यजुर्वेदातील आहे. दक्षिण भारतात, कृष्ण यजुर्वेदाची तैत्तिरीय पाठ्य असलेल्या शाखेचे सध्या प्रचलन आहे. या शाखेच्या लोकांत आपस्तंब सूत्र हे सर्वमान्य आहे. तैत्तिरीय शाखेत, तैत्तिरीय संहिता(७ कांड), तैत्तिरीय ब्राह्मण(३ कांड), तैत्तिरीय (७ प्रश्न) तैत्तिरीय उपनिषद-(शिक्षावली, आनंदवल्ली भृगूवल्ली व महानारायण उपनिषद.
उच्चारणाचे वेगळेपण
इतर वेदांपेक्षा स्वर व उच्चार या बाबतीत शुक्ल यजुर्वेद फार वेगळा आहे. माध्यंदिन शाखेचे लोक "य"च्या जागी "ज" आणि "श"च्या जागी "ख" उचारतात. काही वर्ण द्वित्व पद्धतीने उचारतात.अनुस्वाराचा उच्चार विशेष सानुनासिक करतात आणि स्वर मानेने व्यक्त न करता हाताने करतात.भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
आख्यायिका
याज्ञवल्क्य' हा 'वैशंपायन ऋषीं'कडून परंपरेनुसार 'वेद शिकला. ते त्याचे मामा होते. त्याचा जन्म हा या कामासाठीच देवदत्त होता असे मानले जाते. तो एकपाठी(एकसंधीग्रही) होता. त्यास एका शिकवण्यातच तो ते आत्मसात करू शकत असे. वेदांच्या निरूपणात(interpretation ) दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचे मतभेद झाले. एका प्रसंगी,'वैशंपायन ऋषी' इतके संतापले की, त्यांनी त्यांंचे ज्ञान परत मागितले.
याज्ञवल्क्य याने ते ओकून टाकले. 'वैशंपायन ऋषी' यांंच्या एका शिष्याने, जो ते ग्रहण करण्यास उत्सुक होता, तित्तिर पक्षाचे रूप घेउन ते खाऊन टाकले. म्हणून, यास 'तैत्तिरीय संहिता' असे म्हणतात. गुरूने दिलेले सर्व ज्ञान ओकून टाकल्यावर, याज्ञवल्क्याने सूर्याची आराधना केली व सूर्यनारायणाकडून थेट नवीन ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी सूर्याने घोड्याचे रूप घेतले होते अशी आख्यायिका प्रचलित आहे. वैशंपायन मूळ संहितेला शुक्ल यजुर्वेद आणि ओकून टाकलेल्या ज्ञानातून स्वीकारलेला तो कृष्ण यजुर्वेद अशी मान्यता आहे.
आशय
श्री.शकुंतला राव शास्त्री यांचे मत :- देवताविषयक कल्पनांमध्ये ऋग्वेदापेक्षा यजुर्वेदात फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ऋग्वेदातील देवतांचीच यजुर्वेदातही आराधना व प्रार्थना असून यज्ञात त्याच देवतांना हविर्भाग अर्पण करण्यास सांगितले आहे. ब्रह्मा,विष्णू व रुद्र या देवतांच्या दर्जामध्ये फेरफार झाला आहे. या देवतात्रयीचे गुणकर्मानुसार पृथकत्व पुराण ग्रंथांमध्ये पूर्णावस्थेला गेले आहे. त्याचा प्रारंभ यजुर्वेदात झालेला दिसून येतो. उपनिषद साहित्यात वाढीस लागलेली एका ईश्वराची कल्पना यजुर्वेदात निश्चित व सप्रमाण मांडली गेली आहे. यजुर्वेदातल्या नीतिविषयक कल्पना ऋग्वेदातील कल्पनांपेक्षा बऱ्याच प्रगत झालेल्या दिसतात. तिथे उच्चतर नैतिक जीवनाबद्दल खरीखुरी तळमळ दिसून येते. ज्ञान, पापाची क्षमा, अमरत्व इ.आध्यात्मिक गुणांच्या प्राप्तीबद्दलच्या प्रार्थना यजुर्वेदात विपुल प्रमाणात आढळतात.भारतीय संस्कृती कोश खंड सातवा
.
हे सुद्धा बघा
यज्ञ
कल्प(वेदांग)
शतपथ ब्राह्मण
महिधर
वेद
बाह्य दुवे
Sanskrit Web Freely downloadable, carefully edited Sanskrit texts of Taittiriya-Samhita, Taittiriya-Brahmana, Taittiriya-Aranyaka, Ekagni-Kanda etc. as well as English translations of the Taittiriya-Samhita etc.
Albrecht Weber, Die Taittirîya-Samhita 1871
Ralph Griffith, The Texts of the White Yajurveda 1899, full text, (online at sacred-texts.com)
A. Berridale Keith, The Yajur Veda - Taittiriya Sanhita 1914, full text, (online at sacred-texts.com)
Retrieved from "http://en.wikipedia.org/wiki/Yajurveda"
संदर्भ आणि नोंदी
वर्ग:यजुर्वेद
वर्ग:वेद
वर्ग:वैदिक साहित्य
वर्ग:संस्कृती
वर्ग:हिंदू ग्रंथ |
अथर्ववेद | https://mr.wikipedia.org/wiki/अथर्ववेद | इवलेसे
अथर्ववेद हा चार प्रमुख वेदांपैकी एक आहे. हा ग्रंथ चार वेदांपैकी सगळ्यात शेवटी म्हणजे इ.स.पूर्व ६००० या काळात लिहिला गेल्याचे मानले जाते. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे.आयुर्वेद हा विष्णू अवतार धन्वंतरी यांनी आयुर्वेदाची रचना केली. अथर्ववेदात तत्त्वज्ञानाबरोबर जीवनातील अडचणी, औषधी वनस्पती आणि संकटावरील उपायांचीही माहिती आहे. समाजातील सर्व थरांमध्ये, तसेच भारतातील सर्व धर्मांमध्ये अथर्ववेदीय उपासनांचा प्रचार आजही दिसतो.
निर्माण
हा वेद ऋषी अथर्व यांनी लिहीला आहे.
हा वेद सोडून सर्व वेद ब्रह्म देवाने त्यांच्या मुखातून
सांगून लिहीले आहे. ज्यावेळी ते निद्रेत होते
याला शंकर देवाने चौथ्या वेदाच्या रूपात मान्यता दिली.
प्रस्तावना
भारतीय संस्कृती-इतिहासात चतुर्थ वेद म्हणून मान्यता पावलेला,परंतु परंपरागत ब्राह्मण वर्गाने वेद त्रयीमध्ये समावेश करण्यास नाकारलेला अथर्ववेद, यज्ञीय धर्मसाधनेच्या दृष्टीने ऋग्वेदाहून कमी महत्त्वाचा असला, तरी भारतीय लोकसाहित्याचा आद्य स्रोत या दृष्टीने सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या तो ऋग्वेदाहूनही अधिक महत्त्वाचा आहे. सर्वंकष समाजाभिमुखता हे अथर्व वेदाचे प्रमुख वैशिष्ट्य असून, समाजातील निष्कांचन ग्रामीण जनतेपासून उच्चपदस्थ राजा-महाराजांपर्यंतच्या समस्त वर्गांचा परामर्श या ग्रंथात आढळतो.
अथर्ववेदाची नावे
अथर्ववेद हा अथर्वन आणि अंगिरस या दोन ऋषि समूहांनी रचला म्हणून यास अथर्वांगिरस असे एक प्राचीन नाव आहे. वैदिक गोपथ ब्राम्हणाच्या लेखनकाळाच्या उत्तरार्धात हा भृगु आणि अंगिरस यांच्या नावाने ओळखला जाऊ लागला. याखेरीज परंपरेनुसार यातील काही रचनांचे श्रेय हे कौशिक, वसिष्ठ, कश्यप ह्या ऋषींनाही दिले जाते. अथर्वशिरस, घोरस्वरूपी अंगिरस, आथर्वण, क्षत्रवेद, ग्रामयाजिन, पूगयज्ञीय, ब्रह्मवेद, भेषज, भृगु अंगिरस, सुभेषज अशी याची विविध नवे आहेत.डॉ.चित्राव सिद्धेश्वरशास्त्री-अथर्ववेदाचे मराठी भाषांतर- (१९७२)
शौनकीय व पैपलाद या अथर्ववेदाच्या दोन शाखा आहेत. आयुर्वेद, राजधर्म, समाजव्यवस्था, अध्यात्म, तत्त्वज्ञान अशा विविध विषयांना अथर्ववेदाने स्पर्श केला आहे.
करण्यव्यूहांनी (शौनकीय) अथर्ववेदाच्या नऊ शाखा सांगितल्या अहेत.
पैपलाद (याचा प्रसार नर्मदेच्या दक्षिणेकडील प्रदेशात झाला)
स्तौद
मौद
शौनकीय (याचा प्रसार नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशात झाला)
जाजल
जलद
कुन्तप
ब्रह्मावद
देवदर्श
करणवैद्य
यापैकी केवल शौनकीय शाखा गुजरात अणि वाराणसी येथे अस्तित्वात आहे, शेवटच्या काही दशकांन मध्ये ही सर्वत्र विस्तारते होते. आणि ओडिशा येथे पैपलाद ही टिकून आहे. अलीकडील काळात यात काही भर घालण्यात आली, परंतु पैपलादीय सहित्य हे शौनकीय साहित्यापेक्षा प्प्राचीन मानले जाते. अनेकदा अनुरूप स्तोत्रांमध्ये दोन आवर्तनामध्ये वेगवेगळे छंद पाहण्यात येतात, किंवा जे दुसऱ्या ग्रंथामध्ये नाहीत असे काही अधिक स्तोत्र एखाद्या प्रतीत आढळतात. पाच कल्पांपैकी संहिताविधी, शांतिकल्प, नक्षत्रकल्प हे काही कल्प स्वतंत्र शाखा म्हणून नसून दाखले म्हणून शौनकीय परंपरेत आढळतात. अथर्ववेदात विविध कालखंडाचे दीर्घ असे ७२ भागांची परिशिष्टे आहेत, त्यांतील बहुतेक सर्व पुराणकालीन आहेत.
अथर्ववेदाच्या उत्तरार्धात वैनतेय सूत्र आणि कौशिक सूत्र अशा दोन संबधित उत्तर संहिता आहेत.वैनतेय सूत्र हे अथर्ववैदिकांच्या श्रौत्र विधींमधील सहभागासंबधित आहे,तर कौशिकसूत्रातील अनेक सुत्रांमध्ये चिकित्सेसंबधित व तंत्रासंबधित माहिती आहे.ह्यांचा उद्देश ऋग्वेदामधील विधानांन समान आहे आणि म्हणुन अथर्ववैदिक साहित्यातिल उपायुक्ततेचा अभ्यास हा वैदिक काळात बहुमुल्य समजला गेला आहे.अथर्ववेदांशी संबधित सुद्धा अनेक उपनिषदे आहेत,परंतु परंपरेमध्ये अलिकडेच सामाविष्ट करण्यातआलेले अढळते. यांमध्ये मुडंक आणि प्रश्न उपनिषद हे सर्वधिक महत्त्वाचे मानले गेले.त्यांतील पहिल्यामध्ये (मुडंकामध्ये)शौनकिय शाखेचा प्रमुख, शौनकांबद्दल महत्त्वाचा सदंर्भ मिळतो, तर नंतरचा(प्रश्न उपनिषदात) हा पैपलादिय शाखेशी संबंधित आहे.
अभिचारविद्या
भारतीय अभिचारविद्येचा आद्य स्रोत अथर्ववेदात आढळत असून, या ग्रंथात अंगभूत असणारी आंगिरसी विद्या हे अभिचार अथवा यातुविद्येचेच अन्य रूप होय. अथर्वविद्येतील यातुविद्येचे दोन आवडीचे विषय म्हणजे स्त्रीवशीकरण आणि रणभूमीतील शत्रूंचे निर्दालन हे होत. अभिचार, यातुविद्येसारख्या समस्त बऱ्या-वाईट आचारांची नोंद त्यामध्ये धर्मविधी म्हणून आढळते.
लोकजीवनाचे चित्रण
अथर्ववेद आणि त्याच्या कौशिकसूत्र संज्ञक याज्ञिक ग्रंथात वैदिक आर्यांच्या सामान्य जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडत असून, त्यास पूरक साहित्य गृह्यसूत्रात आढळते. गृह, शेती, पशू, प्रेम आणि विवाह, व्यापार आणि ग्रामीण रीतिरिवाजासंबंधीची या ग्रंथातील माहिती गृह्यसूत्रांच्या तुलनेने सर्वंकष वाटते. अथर्ववेदातील राजकर्मणि सूक्ते, ब्राह्मणहितार्थ प्रार्थना, ब्रह्मशत्रूंना अभिशाप देणारी सूक्ते ही या वेदाची वैशिष्ट्ये आहेत.डॉ.चित्राव सिद्धेश्वरशास्त्री-अथर्ववेदाचे मराठी भाषांतर- (१९७२)
संदर्भ आणि नोंदी
वर्ग:अथर्ववेद
वर्ग:वेद
वर्ग:लाल दुवे असणारे लेख
वर्ग:वैदिक साहित्य
वर्ग:हिंदू धर्म |
सामवेद | https://mr.wikipedia.org/wiki/सामवेद | इवलेसे
सामवेद हा प्राचीन हिंदू संस्कृतीतील चार वेदांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे 'गायन' आणि वेद म्हणजे 'ज्ञान' होय. हा वेद ब्रह्मदेवाने लिहिला आहे, असे मानले जाते.
निर्माण
ब्रह्मदेव निद्रेत असताना त्यांच्या तोंडातून तीन वेद निघाले, त्यांच्यापैकी एक म्हणजे सामवेद.
साम शब्दाचा अर्थ
साम शब्दाचा पहिला अर्थ प्रिय किंवा प्रियकर वचन असा आहे. कुठे कुठे गान या अर्थानेही तो प्रयुक्त आहे. प्रचलित सामवेदाला हाच अर्थ लागू पडतो. साच अमश्चेति तत् साम्न: सामत्वम्। (बृहदारण्यक उपनिषद १.३.२२) सा म्हणजे ऋचा आणि अम् म्हणजे गांधारादी स्वर होत. दोन्ही मिळून साम होते.
स्वरूप
सामवेदात ॠग्वेदातील ॠचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेदाला भारतीय संगीताचा पाया म्हटले जाते. यातील ७५ ऋचा ऋग्वेदाच्या शाकल शाखेतून घेतल्या, तर इतर ७५ या बाष्कल शाखेमध्ये मोडतात. या ऋचांचे गायन-सामगान हे सुचवलेल्या विशिष्ट सुरांमध्ये गायले जाते. सामगान गाऊन विशिष्ट विधी करतांना विविध देवतांना प्रसाद पेयार्पण म्हणून दूध व इतर पदार्थाबरोबर सोम वनस्पतीचा रस अर्पिला जाई.
सामवेदातील काही ऋचा या इ.स.पू. १७०० च्या आधी (ऋग्वेदाच्या कालखंडात) रचल्या असल्या पाहिजेत असे मानले जाते. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने वेदानां अहम् सामवेदोस्मि असे म्हटले आहे, हा सामवेदाचा गौरवच आहे. कौथुम आणि राणायनीय, जैमिनीय या सामवेदाच्या शाखा मानल्या जातात. ताण्ड्य/पञ्चविंश, षड्विंश, साम विधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद् आणि वंश ही सामवेदाची ब्राह्मणे आहेत.
गंधर्ववेद
गंधर्ववेद हा सामवेदाचा उपवेद आहे.
सामवेद आणि यज्ञसंस्था
वेदा ही यज्ञार्थ अभिप्रवृत्ता:| वेद हे यज्ञासाठीच प्रवृत्त झाले आहेत अशी वैदिकांची धारणा आहे. यज्ञातील वेगवेगळी कर्मे करणारे ऋत्विज वेगवेगळे असतात. त्यांना विशिष्ट नावे असतात. देवतांना संतुष्ट करण्यासाठी ऋचांचे गायन करण्याचे काम सामवेद्यांचे असते. ते करणाऱ्या चार ऋत्विजांचा एक गट असतो.त्यांच्या प्रमुखाला उद्गाता म्हणतात. एखादे साम तयार झाले की त्याच्या गायनाचे पाच अवयव तयार होतात, ते असे :-
१. प्रस्ताव
२. उद्गीथ
३. प्रतिहार
४.उपद्रव
५. निधन
सामगान करताना त्यातील ऋचांची आवृत्ती केली जाते त्याला स्तोम असे म्हणतात. साम हे प्रायः तीन ऋचांवर गायले जाते आणि त्याचे तीन पर्याय म्हणजे तीन आवृत्त्या करतात.
सामगानाचे स्वरूप
सामगानात पदांच्या १ ते ७ अंकांनी संगीताच्या सात स्वरांचा निर्देश केला जातो. प्रायः अधिकांश मंत्रांमध्ये पाचच स्वर लागतात. सहा स्वरांनी गायिली जाणारी सामे थोडी आहेत आणि सात स्वरांची त्याहून थोडी आहेत.
सामतंत्र
यात तेरा प्रपाठक असून, सामगायनाचा विधी, त्याचे संकेत आणि त्याच्या पद्धती यांचे हे वर्णन आहे. हे एका प्रकारचे सामवेदाचे व्याकरणच आहे.
सामवेदावरची मराठी पुस्तके
सामवेद (सामवेदाचे शुद्ध बिनचूक मराठी भाषांतर, लेखक - कृ.म. बापटशास्त्री)
सामवेद - (मराठी अर्थ व स्पष्टीकरण), लेखक - श्रीपाद दामोदर सातवळेकर
सामवेदाचा सुबोध अनुवाद (लेखक - ?)
वर्ग:सामवेद
वर्ग:वेद
वर्ग:वैदिक साहित्य
वर्ग:हिंदू धर्म |
भगवान व्यास | https://mr.wikipedia.org/wiki/भगवान_व्यास | पुनर्निर्देशन पाराशर व्यास |
वेदान्त | https://mr.wikipedia.org/wiki/वेदान्त | वेदान्त म्हणजेच उतर मीमांसा. ही याचीची रचना बादरायण यांनी केली. उपनिषदांसकट सर्व वेगवेगळ्या मतांचा समन्वय हिच्यात करण्यात आला आहे. वेदांमध्ये २ भाग आहेत. कर्मकांड आणि ज्ञान कांड. त्यापैकी वेदान्तामध्ये ज्ञानकांड येते.
वेदान्तावरील मराठी पुस्तके
कर्माचा सिद्धांत (मूळ गुजराथी हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
देवमाळ (पांडुरंग हरी कुलकर्णी) : या पुस्तकात मूळ ब्रह्मसूत्रांचा म्हणजे वेदान्तसूत्रांचा सोप्या मराठीत अनुवाद केला आहे.
ब्रह्मसूत्र (श्रीकांत देसाई)
ब्रह्मसूत्र शांकरभाष्य भाग - १, २, ३. (श्रीकृष्ण देशमुख)
ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थ (विष्णू वामन बापटशास्त्री)
मूळ सांख्यांच्या शोधात (उदय गजानन कुमठेकर)
वेदांत विचार (मूळ गुजराथी लेखक हीराभाई ठक्कर, मराठी अनुवाद - बळवंत शंकर काशीकर)
वर्ग:वेदान्त |
उपनिषदे | https://mr.wikipedia.org/wiki/उपनिषदे | पुनर्निर्देशन उपनिषद |
क्रीडा | https://mr.wikipedia.org/wiki/क्रीडा | क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे (किंवा संघापरत्वे) कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात.
अर्थ शारीरिक व्यायाम व मानसिक दृष्ट्या सबळ बनवतो खेळाने मन आणि शरीर सुदृढ बनते
इतिहास प्राचीन काळी राजे महाराजे कुस्ती, मलखांब, दांडपट्टा तलवारबाजी.
खेळाडूव्रुत्ती आधुनिक जगात या व्यायाम प्रकाराला जिम असे म्हणतात जिम आणि खेळ यामध्ये खूप फरक आहे
व्यावसायिक खेळ शरीर सौष्ठव स्पर्धा
राजकारण क्रीडा आणि राजकारण या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत
शारीरिक कसरत
तंत्र क्रीडा या प्रकारात तंत्राचा खूप उपयोग केला जातो
परिभाषा
प्रेक्षणीय खेळ
हेसुद्धा पहा
दालन:क्रीडास्पोर्ट्स सायन्स एक व्यापक शैक्षणिक शिस्त आहे आणि athथलीट कामगिरीसह अशा क्षेत्रांवर लागू केले जाऊ शकते, जसे की व्हिडिओ विश्लेषणाचा उपयोग फाइन-ट्यून तंत्रात करणे, किंवा सुधारित धावण्याच्या शूज किंवा स्पर्धात्मक स्विमवेअरसारखे उपकरणांसाठी. १ 1998 1998 in मध्ये स्पोर्ट्स अभियांत्रिकी शास्त्राच्या रूपात उदयास आली ती केवळ मटेरियल डिझाइनवरच नव्हे तर खेळात तंत्रज्ञानाचा वापर विश्लेषणे आणि मोठ्या डेटापासून ते घालण्यायोग्य तंत्रज्ञानापर्यंत देखील होती. []]] वाजवी खेळावरील तंत्रज्ञानाच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, नियमन मंडळाकडे वारंवार विशिष्ट नियम असतात जे सहभागी दरम्यान तांत्रिक फायद्याच्या प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेट केले जातात. उदाहरणार्थ, २०१० मध्ये पूर्ण शरीर, नॉन-टेक्सटाईल स्विमूट सूटवर एफआयएनएने बंदी घातली होती, कारण ते जलतरणपटूंच्या कामगिरीत वाढ करीत होते. []०] []१] तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे क्रीडा सामने, मैदानावरील अनेक निर्णय घेण्याचे किंवा त्यांचे पुनरावलोकन करण्याचेही अनुमती मिळाली आहे. या निर्णयासाठी इन्स्टंट रीप्ले वापरून दुसऱ्या अधिका-याने. काही खेळांमध्ये आता अधिकारी अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात. असोसिएशन फुटबॉलमध्ये, गोल-लाइन तंत्रज्ञान बॉलने लक्ष्य रेखा ओलांडली की नाही यावर निर्णय घेते. [42२] तंत्रज्ञान अनिवार्य नाही, [] 43] परंतु २०१ Brazil मधील ब्राझीलमधील फिफा वर्ल्ड कप, [44 44] आणि कॅनडामधील २०१ F फिफा महिला विश्वचषकात, [] 45] तसेच २०१–-१ from मध्ये प्रीमियर लीगमध्ये ते वापरले गेले होते. 46] आणि बुंदेस्लिगा 2015–16 पासून. [47] एनएफएलमध्ये, एक रेफ्री रिप्ले बूथवरून पुनरावलोकन मागू शकतो किंवा मुख्य प्रशिक्षक पुन्हा खेळाच्या पुनरावलोकनाचा वापर करून आव्हान देऊ शकतात. अंतिम निर्णय रेफरीवर अवलंबून आहे. [] 48] व्हिडिओ रेफरी (सामान्यत: टेलिव्हिजन मॅच ऑफिशियल किंवा टीएमओ म्हणून ओळखला जातो) रग्बी (लीग आणि युनियन दोन्ही) मध्ये निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी रीप्ले देखील वापरू शकतो. []]] []०] आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच तिसऱ्या अंपायरला निर्णयासाठी विचारू शकतात आणि तिसरा पंच अंतिम निर्णय घेतात. []१] []२] २०० Since पासून, खेळाडूंच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यासाठी एक निर्णय पुनरावलोकन प्रणाली आयसीसी-संचालित टूर्नामेंटमध्ये आणि वैकल्पिकरित्या इतर सामन्यांमध्ये वापरली गेली. []१] [] 53] डी
संदर्भ व दुवे
अधिक माहिती
मिनिंग ऑफ स्पोर्ट्स - मायकल मंडेल (PublicAffairs, ISBN 1-58648-252-1). (इंग्लिश मजकूर)
वर्ग:क्रीडा
en:Sport |
रमा बिपिन मेधावी | https://mr.wikipedia.org/wiki/रमा_बिपिन_मेधावी | पंडिता रमाबाई सरस्वती (२३ एप्रिल, इ.स. १८५८ - ५ एप्रिल, इ.स. १९२२) या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.
बालपण
पंडिता रमाबाई यांचा जन्म अनंतशास्त्री डोंगरे व लक्ष्मीबाई डोंगरे यांच्या पोटी, गंगामूळ (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते, स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. पत्नी लक्ष्मीबाई व मुलगी रमाबाई यांस त्यांनी वेद शास्त्रांचे शिक्षण दिले होते. रमाबाई नऊ वर्षांच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करून दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. त्या काळात रमाबाईंच्या आई-वडिलांना लोकांच्या त्रासामुळे राहण्याची ठिकाणे बदलावी लागली. रमाबाई १७-१८ वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.
मुलींना तर बाहेर पडणे शक्यही नव्हते. त्या काळात अनंतशास्त्र्यांनी मुलीला संस्कृत शिकवले. त्यामुळेच पौराणिक संस्कृतात ही मुलगी पारंगत झाली. फक्त शिक्षण देऊन थांबवले नाही, तर मुलीवर लग्नासाठी दबावही आणला नाही. उलट शक्य तेवढे ज्ञान ग्रहण कर असा उपदेशच केला. रमाबाईंवरचा हा उदारमतवादी पिता मात्र जास्त काळ जगू शकला नाही. रमाबाई सोळा वर्षाच्या असतानाच अनंतशास्त्री वारले. त्यांची पत्नीही गेली. रमाबाई आणि त्यांच्या भावाला आता कुणीही नव्हते.
मातृपितृछत्र हरपल्यानंतर आपल्या ज्येष्ठ बंधूंसह भ्रमण करत त्या कोलकत्याला पोहोचल्या. रमाबाईंना आई-वडिलांकडून, विशेषतः आईकडून, संस्कृत व्याकरण व साहित्याचे शिक्षण मिळाले होते. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला. त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.
विवाह आणि समाजकार्य
इ.स. १८८० साली त्यांनी कोलकत्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न केले. पंडिता रमाबाई या ब्राह्मण तर त्यांचे पती शूद्र मानल्या गेलेल्या जातीचे होते. पण रमाबाईंनी चुकीच्या रूढींना झुगारून देण्याचेच ठरवले होते. दुर्दैवाने इ.स. १८८२ मध्ये मेधावी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आपली एकुलती एक मुलगी मनोरमा हिच्यासह त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी यांसारख्या घातक चालीरीती व दुष्ट रूढींपासून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुण्यात व नंतर अहमदनगर,सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी ‘आर्य महिला समाजाची स्थापना केली. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी ‘स्त्रीधर्मनीति’ हे पुस्तक लिहिले. इ.स. १८८३ साली त्या आर्य महिला समाजाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. परंतु तेथे एका महिला महाविद्यालयात (चेल्टनहॅम लेडीज कॉलेज) त्यांनी संस्कृत शिकवले. १८८६ मध्ये त्या आपल्या स्त्री-शिक्षणविषयक कार्याला मदत मिळवण्यासाठी अमेरिकेस गेल्या. तेथे त्यांनी हिंदू बालविधवांच्या परंतुप्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले. अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी भारतातील समस्या तेथील लोकांसमोर मांडल्या. भारतातील बालविधवांच्या कार्यात मदत करण्यासाठी काही अमेरिकन लोकांनी बॉस्टन येथे ‘रमाबाई असोसिएशन’ची स्थापना केली होती. पुढील काळात त्यांनी ‘युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांनी मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतरही केले.
१८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उद्धाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवासखर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टिकोणामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
११ मार्च, इ.स. १८८९ रोजी त्यांनी मुंबईला विधवांकरिता ‘शारदा सदन’ नावाची संस्था काढली. त्यांनी केशवपनाविरुद्धही प्रचार केला व संमती वयाच्या चळवळीसही पाठिंबा दिला. इ.स. १८९० च्या नोव्हेंबर महिन्यात ‘शारदा सदन’ पुण्यात आणले गेले. २४ सप्टेंबर, इ.स. १८९८ रोजी केडगाव येथे ‘मुक्तिसदना’ची त्यांनी स्थापना केली. इ.स. १८९७ मध्ये मध्य प्रदेशात व इ.स. १९०० मध्ये गुजरातमध्ये पडलेल्या दुष्काळात निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी या आश्रमात आश्रय दिला. त्यांनी स्थापन केलेल्या ‘प्रीतिसदन'(अपंग व दुबळ्या साठी)‘शारदासदन’, ‘शांतिसदन’ या सदनांमधून गरजू व पीडित स्त्रिया राहत असत. या सदनांत दुर्दैवी स्त्रियांच्या राहण्या-जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांनी आपल्या आश्रमातील-सदनांतील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम यांसह शालेय शिक्षणही देण्याचा प्रयत्न केला.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरिक श्रमाचे महत्त्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. ’मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या मदतीने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली.
याच काळात त्यांनी वंचित, पीडित स्त्रियांसाठी काम करणे सुरू केले होते. या सगळ्या परिस्थितीत रमाबाईंनी पुण्यात विधवा आणि अनाथ महिलांसाठी आश्रम काढला. नंतर मुंबईतही तो सुरू केला. या केंद्रांत महिलांना मूलभूत शिक्षण देण्यात येई. शिवाय समाजात रहाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक शिक्षणही त्यांना देण्यात येई. अल्पावधीतच रमाबाई वंचित, पीडित महिलांच्या जणू वकीलच बनून गेल्या.
त्यांच्या या समाजकार्यातच त्यांचा ख्रिस्ती मिशनऱ्यांशी संबंध आला. त्यांच्या मदतीने १८८३ मध्ये रमाबाईंना इंग्लंडला जायची संधी मिळाली. तिथे गेल्यानंतर तेथील स्त्रियांची स्थिती त्यांनी पाहिली. हिंदू रूढीवादी मानसिकतेत स्त्रियांचा होत असलेला संकोच त्यांना प्रकर्षाने जाणवला. त्यावर आधारीत त्यांनी उच्च जातीतील हिंदू स्त्रिया नावाचे पुस्तकही लिहिले. त्याचा अनुवाद इंग्रजीत होऊन त्याचा प्रसार इंग्लंड-अमेरिकेत झाला. त्याचवेळी त्यांनी बायबलचाही अभ्यास सुरू केला. आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी ख्रिश्चन धर्म अंगीकारला. त्यांच्या धर्मांतराने तत्कालीन सनातनी समाजात मोठी खळबळ उडाली. टीकेचा भडिमार झाला. पण रमाबाईंनी आपल्या धर्मांतराचे समर्थन केले.
मुंबईत शारदासदन आणि केडगावला मुक्तीमिशन या त्यांच्या संस्था. एकीकडे त्यांच्या समाजसुधारणेचे आयाम विस्तारत असताना त्यांनी ज्या ख्रिश्चन धर्मात प्रवेश केला, रमाबाई ख्रिश्चन धर्मात आल्या तरी त्या ज्यांच्यासाठी काम करत होत्या, त्या महिलांनी ख्रिश्चन धर्मात यावे यासाठी त्या काहीही करत नव्हत्या. सत्य तुम्हा समजेल आणि सत्य तुम्हास बंधमुक्त करील बायबल मधील या वचनानुसार पंडिता रमाबाई ज्या स्त्रियांसाठी काम करत होत्या त्या स्त्रियांना सांगितलेल्या ख्रिस्ताच्या सुवार्ता वर विश्वास ठेवून या स्त्रिया ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करीत होत्या रमाबाईंचे धर्मांतरण हे दांभिक आहे, अशी टीका करण्यास त्यांनी सुरुवात केली.
रमाबाईंनी बिशप वगैरे परंपराही नाकारली. त्यामुळे त्यांचा अधिकच भडका उडाला. त्यावर रमाबाईंचे म्हणणे स्पष्ट होते. मी ख्रिस्ताच्या चर्चची खरी भाविक आहे. पण बिशप किंवा ख्रिस्ती पुजाऱ्याच्या तोंडून येणाऱ्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यास मी बांधील नाही. कारण हिंदू संस्कृतीतील भिक्षुक पुरोहित संस्कृतीतून स्वतःला मी सोडवून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तशाच प्रकारच्या भिक्षुक संस्कृतीत स्वतःला अडकविण्याची माझी इच्छा नाही.
महाराष्ट्रात नऊवारी ऐवजी पाचवारी साडी नेसण्यास महिलांनी सुरुवात करण्यामागे पंडिता रमाबाई यांचेच प्रयत्न होते. ‘पाचवारी साडी नेसणे सहज, सोपे आहे, सुसह्य आहे व आर्थिकदृष्ट्याही परवडणारे आहे.’ या विषयावर इ.स. १८९१ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुणे येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्या काळात स्त्रियांच्या वेशात ‘हा’ बदल करणेही त्यांना खूप अवघड गेले होते. पण रमाबाईंनी ही चळवळ चालूच ठेवली. तो केवळ कपड्यांचा मुद्दा नव्हता, तर स्त्री-स्वातंत्र्य, स्वयंनिर्णयाचा हक्क हे मुद्दे महत्त्वाचे होते.
अशा या थोर विदुषीला इ.स. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन ब्रिटिश राज्यव्यवस्थेतील सर्वोच्च पुरस्कार कैसर-ए-हिंदने गौरविण्यात आले. ‘कैसर-ए-हिंद’ हे सुवर्णपदक होते. पुढे १९८९ मध्ये त्यांच्यावर टपाल तिकीटही काढण्यात आले. स्त्री-शिक्षण, स्त्रियांचे समाजासमोर येणे, कोणत्याही क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग या गोष्टी फारशा प्रचलित नसतानाच्या काळात संस्कृत भाषा, स्त्रियांचे प्रश्न आदी क्षेत्रांत भारतासह परदेशांतही पंडिता रमाबाई यांनी आपल्या विचारांचा व कार्याचा ठसा उमटवला. प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट, धाडस इत्यादी गुणांसह समाजसुधारणा क्षेत्रात एक उत्तम वस्तुपाठ समाजासमोर ठेवणाऱ्या पंडिता रमाबाई यांचे इ.स. १९२२ मध्ये केडगाव येथे निधन झाले.
चरित्रग्रंथ
पंडिता रमाबाई सरस्वती (चरित्र : लेखक - प्रबोधनकार ठाकरे)
महाराष्ट्राचे शिल्पकार पंडिता रमाबाई : लेखिका : श्रीमती सिसिलीया कार्व्हालो. (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
पुरस्कार
पुण्याच्या माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्टचा पंडिता रमाबाई पुरस्कार : २०१६ साली हा पुरस्कार सांगलीच्या वीमन्स एज्युकेशन सोसायटीला मिळाला.स्त्रियांच्या सबलीकरणाचे कार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. पहा - www.majhimaitrin.in
पुण्याच्या माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्टचा पंडिता रमाबाई पुरस्कार २००४ साली भगिनी निवेदिता संस्थेला प्रदान झाला.स्त्रियांच्या सबलीकरणाचे कार्य करीत असलेल्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
• अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने पंडिता रमाबाई सेवारत्न पुरस्कार हा राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. महिला व बालकल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
हे सुद्धा पहा
रीरायटिंग हिस्ट्री : द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
वर्ग:मराठी लेखिका
वर्ग:मराठी समाजसुधारक
वर्ग:इ.स. १९२२ मधील मृत्यू
वर्ग:इ.स. १८५८ मधील जन्म
वर्ग:स्त्री चरित्रलेख
वर्ग:कैसर-ए-हिंद पुरस्कार विजेते |
व्यक्ती आणि वल्ली | https://mr.wikipedia.org/wiki/व्यक्ती_आणि_वल्ली | व्यक्ती आणि वल्ली (१९६६) हा मराठी भाषेतील पु.ल. देशपांडे यांचा कथासंग्रह आहे. मौज प्रकाशनाकडून तो प्रसिद्ध करण्यात आला होता. हे पुस्तक मराठीतल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात प्रसिद्ध पुस्तकांमध्ये गणले जाते. बऱ्याच खाजगी संकेतस्थळांकडून याचा समावेश मराठीतल्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये केला गेला आहे.
या पुस्तकावर आधारित नमुने नावाची दूरदर्शन मालिका सोनी सब या वाहिनीने तयार केली.
पार्श्वभूमी:
इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु.लं.नी 'अण्णा वडगावकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आवृत्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.
व्यक्तिरेखा
अण्णा वडगावकर
अंतू बर्वा
गजा खोत
चितळे मास्तर
ते चौकोनी कुटंब
दोन वस्ताद
नंदा प्रधान
नाथा कामत
नामू परीट
नारायण
परोपकारी गंपू
बबडू
बापू काणे
बोलट
भैय्या नागपूरकर
रावसाहेब
लखू रिसबूड
सखाराम गटणे
हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका
हरीतात्या
संदर्भ
वर्ग:मराठी साहित्य नामसूची
वर्ग:पु.ल. देशपांडे यांचे साहित्य
वर्ग:सर्वोत्कृष्ट पुस्तके (निवड : मुंबई आकाशवाणी; इ. स. १९९७) |
देवबाप्पा (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/देवबाप्पा_(चित्रपट) | संक्षिप्त सूची
Please insert image here
निर्मितीवर्ष
१९५३
निर्मितीसंस्था
XYZ
निर्मिती
पु. ल. देशपांडे
दिग्दर्शन
राम गबाले
कथा
XYZ
पटकथा
पु. ल. देशपांडे
संवाद
पु. ल. देशपांडे
संपादन
XYZ
छायांकन
XYZ
गीत
ग.दि.माडगूळकर
पु. ल. देशपांडे
संगीत
पु. ल. देशपांडे
ध्वनी
XYZ
गायन
XYZ
वेशभूषा
XYZ
रंगभूषा
XYZ
भूमिका
XYZ
पार्श्वभूमी
कथानक
उल्लेखनीय
बाह्य दुवे
वर्ग:इ.स. १९५३ मधील मराठी चित्रपट |
गुळाचा गणपती (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/गुळाचा_गणपती_(चित्रपट) | उल्लेखनीय
या चित्रपटात खालील गाणी आहेत.
ही कुणी छेडिली तार
इथेच टाका तंबू
इंद्रायणी काठी
श्रीहरी विदुराघरी पाहुणा
केतकीच्या बनात
पार्श्वभूमी
या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय वगैरे सबकुछ पु. ल. असा हा चित्रपट आहे!!
चित्रपटाची हस्तलिखित प्रत
या चित्रपटाची निर्मिती विनायक राजगुरू यांनी केली होती. त्यांच्याच कुटुंबातील डॉ. सरोजिनी राजगुरू यांच्याकडे या चित्रपटाच्या हस्तलिखिताची प्रत होती. ती त्यांनी २०१५ सालच्या नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिली. हा चित्रपट १९५३ साली प्रकाशित झाला होता, त्याअर्थी ही हस्तलिखित प्रत त्याआधीची आहे. हे हस्तलिखित चांगल्या अवस्थेत असून त्यामध्ये 'पुलं'नी काही सूचना लिहून ठेवल्या आहेत. |
कुबेर (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/कुबेर_(चित्रपट) | कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले.
संदर्भ
वर्ग:इ.स. १९४७ मधील मराठी चित्रपट |
भाग्यरेखा (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/भाग्यरेखा_(चित्रपट) | भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या.
बाह्य दुवे
भाग्यरेखा १९४८
वर्ग:इ.स. १९४८ मधील मराठी चित्रपट |
वंदेमातरम् (चित्रपट) | https://mr.wikipedia.org/wiki/वंदेमातरम्_(चित्रपट) | पार्श्वभूमी
कथानक
उल्लेखनीय
सुनीताबाई देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट
गाजलेली महत्त्वाची गाणी:
वेद मंत्राहुनी आम्हा वंद्य वंदे मातरम्
अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी
बाह्य दुवे
वर्ग:इ.स. १९४८ मधील मराठी चित्रपट |