सांबा हो... फुटबॉल महासंग्राम सुरू! मटा ऑनलाइन वृत्त । साओ पावलो अवघ्या जगाचे लक्ष लागलेला फुटबॉलचा महासंग्राम अखेर सुरू झाला आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठे महानगर असलेल्या साओ पावलो येथे ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फिफा वर्ल्डकपचे उद्घाटन झाले 'सांबा'च्या तालावर थिरकणारे हजारो कलावंत आणि पॉपस्टार जेनिफर लोपेझ, ब्राझीलियन स्टार क्लॉडिया लेइट्टे आणि पिटबूल यांचा धमाकेदार परफॉर्मन्स यामुळे स्टेडियममध्ये जमलेल्या फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.